Home Blog Page 3652

शिवसेनेशी भाजपची चर्चा केंद्रीय स्तरावर …मुख्यमंत्री फडणवीस

0

मुंबई – भाजपा सरकारमध्ये शिवसेना सहभागी होण्याबाबत सकारात्मक चर्चा चालू असून हि चर्चा राज्य पातळीवर नाही तर केंद्रीय स्तरावर सुरु असल्याचे वक्तव्य नूतन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याने खरी सूत्रे भाजपा अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हाती असल्याचे स्पष्ट झाले आहे . भाजपमध्ये महाराष्ट्राचा निर्णय राज्यापातळीवरच घेईल असा नेता आता गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर कोणी उरला नसल्याची भावना राजकीय वर्तुळात पसरली आहे
दरम्यान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा आकार छोटाच राहणार असून, आमदारांच्या संख्येच्या प्रमाणात 10 टक्के आमदारांचेच मंत्रिमंडळ असणार आहे. याचबरोबर आपले सरकार स्थिर व भक्कम राहावे यासाठी फडणवीस शिवसेनेसोबतच व घटकमित्रपक्षांना सोबत घेणार आहेत. फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाची संख्या 30-32 च्या आसपास असणार आहे. यात भाजपकडे 18, शिवसेनेकडे 8 तर चार घटकपक्षांना 2 कॅबिनेट व 3 राज्यमंत्रीपद अशी एकून 5 मंत्रिपदे दिले जाण्याची शक्यता भाजपमधील सूत्रांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र विधानसभेची संख्या 288 आहे त्यानुसार 10 टक्के मंत्रिपदाचे मंत्रिमंडळ बनवायचे झाल्यास 29 जणांचा समावेश होऊ शकतो. त्यानुसारच भाजप पावले टाकत असून आपल्या सरकारची मंत्रिपदाची संख्या 30-32 च्या वर जाणार नाही याची काळजी घेताना दिसणार आहे.

डेंग्यू उत्पत्ती प्रकरणी ससून रुग्णालयालाच महापालिकेची नोटीस

0

(फाईल फोटो )
पुण्याच्या ससून रुग्णालयातच आणि परिसरातील अस्वच्छता पाहून डेंग्यूच्या डासांची उत्पततेची येथे होवू शकते असा निष्कर्ष काढून पुणे महापालिकेने ससून रुग्णालयाला नोटीस बजावली आहे . हि नोटीस बजावल्याने येथील रुग्णांसह , डॉक्टर , कर्मचारी आदींचे आरोग्य धोक्यात आल्याचे वृत्त , वुत्तवाहिन्यांनी दिले आहे दरम्यान यावर ससून रुग्णालयाचे प्रशासन आणि अधिष्ठाता यांचे म्हणणे समजू शकले नाही

पुणे रेल्वे स्थानकाच्या छताला भीषण आग

0

78
पुणे रेल्वे स्थानकाच्या पहिल्या मजल्यावरील एमसीएच्या कार्यालयाला शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास आग लागल्याने कार्यालयातील साहित्य जळून खाक झाले. स्थानकाच्या इमारतीत पहिल्या मजल्यावर बाहेरील बाजूस ही आग लागली होती. त्यामुळे रेल्वे वाहतुकीवर कोणताही विपरीत परिणाम झाला नाही. बाहेरील आग आत पोहोचण्यापूर्वीच अग्निशमन दलाच्या जवानांनी सुमारे एक तासात ती आटोक्यात आणली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.
पुणे रेल्वे स्थानकाची इमारत ऐतिहासिक असून, ब्रिटिश काळात २७ जुलै १९२५ रोजी बांधून पूर्ण झाली होती. एमसीएच्या कार्यालयात लष्करी अधिकारी, कर्मचार्‍यांसाठी विश्रामगृहासह कागदपत्रांची पूर्तता करण्याची कामेही येथे केली जातात. इमारतीचे छत पूर्णत: सागवानी लाकडे आणि कौलारू आहे. अचानक लागलेली आग या लाकडांमुळे जास्तच भडकत गेली. एका बाजूने वारा सुटल्यामुळे आग जास्तच भडकत जाऊन सुमारे शंभर ते दीडशे फुटापर्यंत गेली होती. लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या वरील बाजूसपहिल्या मजल्यावरील पोलिसांचे रेकॉर्ड सीसीटीव्ही नियंत्रण कक्षही जळाला
जीवितहानी नाहीया आगीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत, अशी माहिती रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी वाय. के. सिंग यांनी दिली.लागलेली ही आग पूर्वेकडून पश्‍चिमेकडे पसरत मुख्य प्रवेशद्वाराच्या वरपर्यंत आली होती. या आगीचे कारण मात्र समजू शकले नाही, असे अग्निशमन दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांनी सांगितले. महापालिकेच्या सात आणि कॅन्टोन्मेंटची एक अशा आठ गाड्या आणि तीन टँकरच्या साहाय्याने सुमारे एक तासात ही आग आटोक्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
स्थानकाच्या पहिल्या मजल्यावर प्रवासातील लष्करी अधिकार्‍यांसाठी विश्रांती कक्ष बनविण्यात आला आहे. या कक्षापासून सायंकाळी ७ वाजून ५ मिनिटांनी आगीला सुरुवात झाली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी ७ वाजून ३५ मिनिटांनी आगीवर पूर्णत: नियंत्रण मिळविले. खबरदारीचा उपाय म्हणून पुढील अर्धा ते एक तास गाड्या त्याच ठिकाणी थांबविण्यात आल्या होत्या. या आगीत रेल्वे पोलिसांच्या रेकॉर्डरूममधील कागदपत्रे जळून खाक झाली. स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचा नियंत्रण कक्षही आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. रेल्वे पोलिसांच्या गुन्हे शाखेची बहुतांशी कागदपत्रे आणि फाइल्स या ठिकाणी ठेवण्यात आल्या होत्या, असे सांगण्यात आले. रेल्वेचे मंडल प्रबंधक सुनीत शर्मा यांनीरेल्वे वाहतूक दुसर्‍या प्लॅटफॉर्मवर वळवली स्थानकाच्या मुख्य इमारतीलाच आग लागल्याने एक क्रमांकाच्या फलाटावर भीतीचे वातावरण होते. त्यामुळे तेथील प्रवाशांना बाजूला करण्यात आले. या फलाटावर येणार्‍या सगळ्या गाड्या तीन क्रमांकाच्या फलाटावर वळवून वाहतूक सुरळीतपणे चालूच ठेवण्यात आल्याचे वाय. के. सिंग यांनी सांगितले.

व्ही. के. असोसिएट’ च्या वडगामासह तिघांना अटक;दुर्घटनाग्रस्तांची अवस्था हलाखीची

0

पुणे- पुण्यातील न-हे-आंबेगाव येथे इमारत कोसळून एका तरुणाचा मृत्यू झाल्याप्रकरणी पोलिसांनी बिल्डर आणि जागामालकासह तिघांना शनिवारी अटक केली. त्यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
किशोर पितांबर वडगामा (वय 48, रा. नऱ्हे गाव), रणजित संभाजी देसाई (वय 40, रा. सहकारनगर) आणि कैलास कृष्णा कंक (वय 48, रा. बिबवेवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
नऱ्हे ग्रामपंचायतीच्या हद्दीत शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास “पिताराम कॉम्प्लेक्‍स‘ ही इमारत कोसळून संगणक अभियंता संदीप दिलीप मोहिते (वय 29) यांचा मृत्यू झाला. शिवाय इमारतीत राहणाऱ्या नऊ कुटुंबांचे संसार उद्‌ध्वस्त झाले. या घटनेनंतर सिंहगड पोलिसांनी काल चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यानंतर शनिवारी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
नऱ्हे ग्रामपंचायत हद्दीत बांधण्यात आलेल्या “पिताराम कॉम्प्लेक्‍स‘ची जागा रणजित देसाई आणि सीताबाई ज्ञानोबा रानवडे यांची आहे. त्या जागेवर व्ही. के. असोसिएट्‌सचे मालक किशोर वडगामा आणि प्रकाश रामचंद्र कंधारे यांनी इमारत बांधली. त्यांच्यासह आरसीसी डिझायनर डेलकॉन कंपनीचे बाळ कुलकर्णी आणि पिताराम कॉम्प्लेक्‍सचे आर्किटेक्‍ट, आरसीसी कन्सल्टंट, कंत्राटदार, बांधकाम साहित्य पुरवठादार आणि त्यांच्या सहाय्यकांची चौकशी करण्यात येत आहे. चौकशीनंतर या दुर्घटनेस जबाबदार प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि संबंधितांवरही गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
पिताराम कॉम्प्लेक्‍समधील रहिवासी इमारत कोसळण्यापूर्वी वेळीच घराबाहेर पडल्याने एक तरुण वगळता सर्वांचे जीव वाचले. केवळ अंगावरील कपड्यानिशी बाहेर पडलेल्या रहिवाशांचे संसार उपयोगी साहित्य ढिगाऱ्याखाली दबल्यामुळे त्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
इमारतीमधील काही रहिवाशी नातेवाइकांच्या घरी आणि इतरत्र राहण्यास गेले आहेत. परंतु त्यांचे सोन्याचे दागिने, रोख रक्‍कम, मोबाईल, बॅंक पासबुक, एटीएम कार्ड आणि महत्त्वाची कागदपत्रे ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. त्या वस्तू आणि कागदपत्रे ढिगाऱ्यातून सापडतील या आशेने काही जण त्याचा शोध घेत आहेत. दुर्घटनेच्या दिवशी ढिगारा उपसताना सापडलेले काही दागिने आणि रोख रक्कम असलेली पर्स आणि पासपोर्ट पंचनामा करून पोलिसांनी संबंधितांना सुपूर्त केला आहे. सर्व काही जमीनदोस्त झाल्यामुळे साधा चहा प्यायचा तरी खिशात पैसे नाहीत. काही रहिवाशांनी शुक्रवारी रात्री बाजूच्या इमारतीत आसरा घेतला. शनिवार उजाडताच ढिगारा उपसताना आपले सामान मिळेल, या अपेक्षेने तेथील रहिवाशी दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या परिसरात आले. महत्त्वाच्या वस्तू मिळाव्यात यासाठी त्यांचा जीव टांगणीला लागला आहे.सहाव्या मजल्यावर राहणारे प्रकाश यादव यांना पासपोर्ट आणि पत्नीची पर्स मिळाली. पार्किंगमध्ये मोटारीत महत्त्वाची कागदपत्रे अडकली आहेत; परंतु संपूर्ण ढिगारा उपसल्यानंतरच काही वस्तू हाती लागण्याची शक्‍यता आहे.
महापालिका हद्दीलगतच्या गावांमधील अनधिकृत बांधकामाची पाहणी करण्यासाठी तलाठ्यांची पथके नियुक्त करण्यात येतील. येत्या सोमवारपासून ही पाहणी केली जाईल. महापालिकेने मदत केल्यास, अनधिकृत बांधकामाविरुद्ध कारवाई केली जाईल, असे प्रभारी जिल्हाधिकारी प्रदीप पाटील यांनी शनिवारी सांगितले.
दुर्घटना घडल्यानंतर, कारवाईसंदर्भात पाटील म्हणाले, ‘त्या इमारतीच्या पहिल्या दोन मजल्यावर वाहनतळ आणि त्यावर चार मजले बांधण्यास परवानगी देण्यात आली होती. बांधकाम व्यावसायिकाने त्यावर आणखी एक अनधिकृत मजला बांधला होता. तेरा गुंठे जागेवर ही इमारत बांधली होती. त्याला अकृषी प्रमाणपत्र देण्यात आले होते. त्या इमारतीचे प्लिंथ चेकिंग नगररचना विभागामार्फत झाले होते. मात्र, बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देण्यात आला नव्हता. संबंधित बांधकाम व्यावसायिकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.‘‘
‘प्रांत अधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, नगर रचना विभागाचे व महापालिकेचे अधिकारी यांची बैठक सोमवारी घेण्यात येईल. त्यामध्ये अनधिकृत बांधकामाच्या पाहणीबाबतचा तपशील ठरविला जाईल. त्यानुसार, अशा बांधकामांची पाहणी करून अहवाल तयार केला जाईल. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ती बांधकामे पाडण्यासाठी कर्मचारीवर्ग आणि यंत्रसामग्री नाही. महापालिकेने ती उपलब्ध करून दिल्यास, अनधिकृत बांधकामांविरुद्ध कारवाई केली जाईल. यापूर्वीच्या मोहिमेत 22 इमारतींविरुद्ध कारवाई करण्यात आली होती,‘‘ असे त्यांनी सांगितले.पाटील म्हणाले, ‘नोंदणी विभागाच्या दुय्यम सहनिबंधकांनाही अशा इमारतीच्या खरेदी विक्रीची नोंदणी न करण्याची सूचना देण्यात येईल. नोंदणी महानिरीक्षक यांना आम्ही त्यासंदर्भात कळविणार आहोत.‘‘

दलित हत्याकांडाचा निषेध -” रास्ता रोको ” आंदोलन

0

पुणे-
नगर जिल्ह्यातील जवखेडा मधील पाथर्डी येथील दलित कुटूबियांवर झालेल्या अत्याचार विरोधात पुणे लष्कर भागातील विविध सामाजिक संघटनांनी आज सकाळी महात्मा गांधी रस्त्यावरील ट्रायलक चौकात ” रास्ता रोको ” आंदोलन करण्यात आले . गेले अनेक दिवसापासून नगर जिल्ह्यामध्ये दलित समाजावर अन्याय अत्याचार वाढत आहेत ,त्याविरोधात वेळोवेळी आंदोलन घेऊन सुद्धा हे अत्याचार थांबत नाहीत त्यामुळे या अत्याचाराला विरोध करून निषेध करण्यासाठी ” रास्ता रोको ” आंदोलन करण्यात आले . या आंदोलनाचे आयोजन संदीप भोसले , रोहिदास गायकवाड , जगन्नाथ गायकवाड , विठ्ठल केदारी , रणजीत परदेशी , अनिल जगताप , संजय सोनावणे , भगवान गायकवाड , अक्षय गायकवाड , वसंतराव साळवे , घनश्याम सुसगोहेर , श्याम औचरे , रवि शिंदे , शशिकांत मोरे , विनोद साळवे , कुमार शिंदे , सुजित म्हस्के , मोहन यादव , अशोक चेटपेल्ली , उमेद कांबळे , विनोद चव्हाण , विक्रम मोरे , उमेश कदम , अनिरुद्ध सोनवणे , अक्षय चाबुकस्वार , सतीश वाघेला , सुनील जगताप , जितेंद्र कांबळे , नितीन म्हस्के , संदीप गाडे , पोपट गायकवाड , रमेश गाडे , तुकाराम मोरे , सागर परदेशी , मोहन जगताप , गंगाधर आंबेडकर , सनी भोसले आदी आंबेडकर चळवळीतील मोठ्या संख्यने कार्यकर्ते सहभागी झाले होते .

यावेळी जवखेडा दलित हत्याकाडाचा निषेध असो … , नगर जिल्हा पोलिसांचा निषेध असो । , या हात्याकाडाच्या रोपींना लवकरात लवकर अटक करण्यात यावी अन्यथा दहा दिवसाच्या आत आरोपींना अटक न झाल्यास पुणे कॅम्प बंदचा इशारा देण्यात आला , असे आंदोलनाचे सयोजक संदीप भोसले यांनी दिला .
4

5

पुस्तक प्रदर्शनात नारायण राणे

0

पुणे – महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेस पक्षाचे नेते नारायण राणे यांनी बाजीराव रोडवरील अत्रे सभागृहातील ” अक्षरधारा ” या पुस्तक प्रदर्शनास भेट देऊन पुस्तकांची खरेदी केली , त्यांच्यासमवेत विद्याधर अनास्कर उपस्थित होते .
2

3

उर्मिलाबेन कीर्तीकुमार शहा यांचे निधन

0

पुणे कॅम्प मधील सेंटर स्ट्रीटवरील राहणारे उर्मिलाबेन कीर्तीकुमार शहा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले . त्या ७३ वर्षांच्या होत्या . त्यांच्या मागे २ मुले , २ मुली , सुना, जावई , नातवंडे असा परिवार आहे .

भारतीय जनता युवा मोर्चा पुणे कॅम्प विभागाचे अध्यक्ष सागर शहा यांच्या त्या मातोश्री होत्या .तसेच , पुणे कॅम्प मधील सेंटर स्ट्रीटवरील केशवलाल माणिकलाल या कपड्याचे फर्मचे व्यापारी अमर शहा यांच्या त्या मातोश्री होत्या . त्यांच्यावर शंकरशेठ रोडवरील मुक्तिधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले . अंत्यसंस्कार समयी पुणे कॅम्प भागातील व्यापारी बांधव , सर्व सामाजिक , राजकीय क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती उपस्थित होते .
shaha(mahesh jambhulkar)

बेळगावात मराठी भाषिकांकडून कडकडीत हरताळ

0

बेळगाव- केंद्र आणि कर्नाटकाच्या निषेधार्थ 1 नोव्हेंबर काळ्यादिनाची सायकल फेरी बेळगावात मराठी भाषिकांकडून काढण्यात आली. मराठी नगसेसवकांनी महापालिकेत सीमाप्रश्‍नाचा ठराव न मांडल्याचे पडसादही फेरीत उमटले. महापौर महेश नाईक यांच्या निवासस्थानावर ठिय्या आंदोलन करण्यात आले तर, नगरसेवक राजेंद्र बिर्जे यांच्या घरावर किरकोळ दगडफेक झाली.
मराठी बेळगावसह सीमाभागाचा समावेश कर्नाटकात केल्याच्या निषेधार्थ दरवर्षी बेळगावात काळादिन पाळला जातो. आज काढण्यात आलेल्या सायकल फेरीत म. ए. समितीच्या नेतृत्वाखाली हजारो मराठी भाषिक एकत्र आले होते. काळा शर्ट, दंडास काळ्या फिती बांधून केंद्र सरकार व कर्नाटक शासनाचा निषेध नोंदविण्यात आला. बेळगावच्या नामांतराविरोधातही या वेळी रोष व्यक्‍त झाला.
महापौर नाईक यांनी सीमाप्रश्‍नाचा ठराव मांडला नसल्याने तसेच काळ्यादिन फेरीपासून दूर राहिल्याने मराठी भाषिकांना त्याचाही निषेध नोंदविण्यात आला. काळ्यादिनाच्या फेरीत मराठी भाषिक सहभागी होउ नयेत यासाठी सकाळपासूनच परिवहन मंडळाने बससेवा बंद ठेवली होती, तरीही हजारो लोक फेरीत सहभागी झाले होते. म. ए. समितीच्या आवाहनास प्रतिसाद देत शहरासह उपनगर परिसरात कडकडीत हरताळ पाळण्यात आला.

वल्लभभाई पटेल यांची जयंती ; इंदिराजी गांधी यांची पुण्यतिथीनिमित अभिवादन सभा

0

1

2
पुणे शहर कॉंग्रेस कमिटी व पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदार संघातर्फे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व राष्ट्रमाता माजी पंतप्रधान स्व. इंदिराजी गांधी यांची पुण्यतिथीनिमित अभिवादन सभा झाली . यावेळी या महापुरुषांच्या प्रतिमेस माजी राज्यमंत्री रमेश बागवे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले . तसेच ,संकल्प दिन म्हणून सर्व कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी सामुहिकपणे सामाजिक एकता आणि अखंडतेची शपथ घेतली . या शपथेचे वाचन माजी राज्यमंत्री रमेश बागवे यांनी केले .

पुणे कॅम्प भागातील इस्ट स्ट्रीटवरील राणी लक्ष्मीबाई उदयानजवळील इंदिरा गांधी चौकामध्ये हा कार्यक्रम झाला . यावेळी पुणे शहर कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय छाजेड , नगरसेवक सुधीर जानजोत , अविनाश बागवे , नगरसेविका लता राजगुरू , लक्ष्मी घोडके , माजी स्थायी समिती अध्यक्ष रशीद शेख ,शिक्षण मंडळ उपाध्यक्ष नुरुद्दीन सोमजी, पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाचे माजी नगरसेवक मंजूर शेख , करण मकवानी , प्रसाद केदारी , शैलेन्द्र बिडकर , संगीता पवार , विनोद मथुरावाला , गौतम महाजन , निझाम काझी , पुणे कॅंटोन्मेंट ब्लॉक कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष असिफ शेख , राजाभाऊ चव्हाण , वाल्मिक जगताप ,रमेश अय्यर , अड. अनुपमा जोशी , प्रदीप परदेशी , सुजित यादव , स्मिता मुळीक , विठ्ठल थोरात , लतीफ शेख , अझीम गुडाकुवाला, अरविंद अंगीरवाल, अच्युत निखळ , क्लेमंट लाझरस , सुरेंद्र परदेशी , विनोद मोगरे , रशीद खिजर , जोस्वा रत्नम आदी मान्यवर , कॉंग्रेस शहर पदाधिकारी , महिला कॉंग्रेस ,युवक कॉंग्रेस , एन. एस. यू. आय . , सेवा दल व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी माजी आमदार रमेश बागवे यांनी सांगितले कि , देशाची अखंडता टिकविण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित आले पाहिजे , देशाच्या अखंडतेला धक्का लावण्याचे काम सध्याचे सरकार करत आहे . त्यासाठी या सरकारची संकुचित वृत्ती बदलण्यासाठी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी आपला पक्षासाठी एकत्रित आले पाहिजे . राज्य हे लोकशाही पद्धतीने चालले पाहिजे , परंतु सध्याचे सरकार हे वेगळा विदर्भ करण्याचे बोलते , तर दुसरीकडे एकता दौड काढता ? हा काय प्रकार चालला आहे , विरोधी निर्णय घेणाऱ्या या सरकारला लोकशाहीच्या माध्यमातून धडा शिकविण्यासाठी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी एकत्रित या . असे आवाहन त्यांनी केले . गुजरात सरकारचे मुख्यमंत्री होते तेव्हां त्यांनी कधीही वल्लभभाई पटेल यांची जयंती घेतली नाही आताच त्यांना जयंतीनिमित एकता दौड काढता , नगरला दलित हत्याकांड झाले , त्याची दखल अद्यापदेखील या सरकारने घेतली नाही , या हत्याकांडातील पिडीत कुटुंबीयाची भेट घेवून सांत्वन केले नाही . हे सरकार सत्तेसाठी असून त्यांना जनतेचे कोणतेच सुख दुख नाही .

या कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत आणि सूत्रसंचालन राजाभाऊ चव्हाण यांनी केले तर आभार पुणे कॅंटोन्मेंट ब्लॉक कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष असिफ शेख यांनी मानले .

पुण्याचा सुरज राठी सब ज्युनीयर स्नूकर स्पर्धेत महाराष्ट्र राज्यात पहिला

0

मुंबई : द मलाबार हिल क्लब आयोजित महाराष्ट्र राज्य सब ज्युनीयर स्नूकर स्पर्धेत पुण्याचा सुरज राठी ने महाराष्ट्र नंबर १ खेळाडू २०१४-२०१५ चा किताब शुक्रवार दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता मिळविला. हा मोठा किताब मिळवण्या साठी सुरज ने मुंबईच्या रोहन सहानी वर ३:२ ने मात केली.

स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एकही फ्रेममध्ये पराभूत न होता पोहोचलेल्या सुरजने पहिल्या फ्रेममध्ये ७८-६२ असा विजय मिळवला. पण दुसऱ्या फ्रेममध्ये त्याला ५९-६७ असे पराभवाला सामोरे जावे लागले. तिसऱ्या फ्रेममध्ये त्याने सामन्यात पुन्हा पुनरागमन करत ५९-५५ असा विजय घेत आघाडी घेतली. चौथ्या फ्रेममध्ये सहानीने ७०-४४ अशी फ्रेममध्ये बाजी मारत सामना २-२ असा बरोबरीत आणला. पण पाचव्या निर्णायक फ्रेममध्ये सुरज राठीने आपला खेळ उंचावत ५८-३८ असा विजय मिळवत महाराष्ट्र नंबर १ चा किताब व जेतेपद पटकावले.

विजयात भर म्हणजे सुरज राठीने महाराष्ट्र राज्य सब ज्युनीयर बिलीयर्ड स्पर्धेत देखील महाराष्ट्र नंबर २ खेळाडू २०१४-२०१५ चा किताब मिळविला.

१८ वर्षाचा सुरज हा नेस वाडिया कॉलेज मध्ये पहिल्या वर्षात शिकत असून पूना क्लब येथे स्नूकर खेळतो. माझ्या या यशामधे पूना क्लब चे मार्केर्स तसेच सिनिअर खेळांडूचा व अर्थात माझे वडील शाम राठी यांचा मोठा सहयोग आहे असे सुरज म्हणाला.

मुंबईत सध्या चालू असलेल्या महाराष्ट्र राज्य ज्युनीयर स्नूकर स्पर्धेत देखील सुरज राठीची विजयी घोडदौड चालुच आहे.

पत्नीच्या वाढदिवसावर २०० कोटीचा खर्च

0

01mukesh-nita-ambani2
वाराणसी-शहाजहान ने मुमताज साठी ताजमहाल बांधला हा इतिहास ज्या देशात अभिमानाने मिरविला जातो आहे आहे त्याच देशात आपल्या पत्नीच्या वाढदिवसावर २०० कोटी रुपये खर्च करण्यासाठी एक उद्योजकसरसावले आहेत… मुकेश अंबानी असे त्यांचे सुपरिचित नाव आहे . नीता अंबानी यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमावर यंदा २०० कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय मुकेश अंबानी यांनी घेतल्याचे वृत्त आहे . पत्नी नीता यांचा ५१ वा वाढदिवसा साजरा करण्यासाठी उद्योजक मुकेश अंबानी कुटुंबीयांसह वाराणसीला आज आले आहेत. त्यांच्यासोबत खास ५०पाहुणे आहेत. यात बॉलिवूड, क्रिकेट, बिझनेस आणि राजकारणाशी संबंधित व्यक्ती आहेत.विशेष म्हणजे दिवाळीनंतर येणाऱ्या या कार्यक्रमाबाबत अंबानी यांच्या विविध कंपन्यांमधून कामगार-अधिकारी वर्गातही कुतूहल आहे . विविध क्षेत्रात अंबानी यांनी आपली व्यावसायिकता वाढविलेली आहे आणि उत्पन्नातही भरारी घेतलेली आहे .
काशीत त्यांची दोन चार्टड विमाने आली . सर्वांत आधी मुकेश यांची आई किकोलाबेन विमानातून उतरल्या. यावेळी विमानतळावर६ बीएमडब्ल्यू,८मर्सिडीज गाड्या ठेवण्यात आल्या आहेत. याशिवाय पाहुण्यांसाठी५० लक्झरी गाड्या आहेत.दरम्यान अंबानी कुटुंंबीयांनी काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले. सुमारे तासभर अंबानी कुटुंबीय येथे थांबले होते. यावेळी मुकेश आणि नीता यांना बघण्यासाठी मंदिराबाहेर बरीच गर्दी जमली होती. नागरिकांनी नीता यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
पाहुण्यांसाठी नादेसर पॅलेसमध्ये १० खोल्या आणि ३० सुट बुक करण्यात आले आहेत. त्यावर ३५ लाख रुपये खर्च झाला आहे. काशी विश्वनाथाचे दर्शन घेतल्यावर अंबानी कुटुंबीयांनी राजेंद्र प्रसाद घाटावर गंगा आरती केली. यासाठी मंदिर आणि घाटांवर फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. यासाठी १० लाख रुपये खर्च करण्यात आला. या घाटावर पहिल्यांदाच लाकडी शिड्या तयार करण्यात आल्या होत्या.
नीता अंबानी यांच्या वाढदिवसासाठी स्पेशल मलाई केक तयार करण्यात आला. वाराणसी येथील प्रसिद्ध हलवाई राजबंधू मिष्ठान भंडार यांनी केक तयार केला आहे. सायंकाळी होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात बॉलिवूडचे अनेक कलाकार सादरीकरण करणार आहे. या संपूर्ण दौऱ्यावर सुमारे २०० कोटी रुपये खर्च येणार असल्याचे सांगितले जात आहे.येत्या सोमवारी अंबानी दांपत्य मुंबईत परतणार आहे .
Mukesh-Ambani-with-wife-Nita-in-NDTV-Top-25-Greatest-Living-Legend

राष्ट्रीय एकतेची महावितरणमध्ये शपथ

0

पुणे – सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त महावितरणच्या पुणे परिमंडलातील मंडल व विभागीय कार्यालयात राष्ट्रीय एकतेची शपथ घेण्यात आली.
पुण्यातील रास्तापेठ येथील मुख्य अभियंता कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी महावितरणचे मुख्य अभियंता निळकंठ वाडेकर, अधिक्षक अभियंता अंकुश नाळे, उपमहाव्यवस्थापक योगेश खैरनार, सहाय्यक महाव्यवस्थापक (मानवसंसाधन), धैर्यशील गायकवाड, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी रामगोपाल अहिर, वरीष्ठ व्यवस्थापक माधुरी राऊत आदी उपस्थित होते.
उध्दव कानडे यांनी राष्ट्रीय एकता दिवस शपथेचे वाचन करुन ती उपस्थितांकडून वदवून घेतली.
4

पेट्रोल ,डिझेल दर अडीच रुपयांनी उतरले

0

नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भाव कमी झाल्याने पेट्रोलचे दर 2 रुपये 41 पैशांनी तर डिझेल दर 2 रुपये 25 पैशांनी कमी झाले आहेत. ऑगस्टपासून दर सहाव्यांदा कमी झाले आहेत.
एकाच महिन्यात डिझेलचे दर दुसऱ्यांदा कमी झाले आहेत. शुक्रवारी मध्यरात्रीपासून हे दर लागू होतील.
सरकारने 18 ऑक्‍टोबररोजी देशातील तेलकंपन्यांना नियंत्रणमुक्त केले आहे. त्यामुळे त्यांना दरनिश्‍चितीचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. तसेच विनाअनुदानित स्वयंपाकाच्या 14 किलोच्या एलपीजी गॅसचे दर 18.5 रुपयांनी कमी होणार आहेत. गेल्या चार महिन्यात विनाअनुदानित एलपीजी गॅसचेही दर चौथ्यांदा कमी करण्यात आले आहेत.गेल्या दशकभरात पहिल्यांदाच पेट्रोल आणि डिझेलवरील नियंत्रण काढल्याने हे दर कमी झाल्याचे इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे जाहीर केले.

शाही थाटामाटा त देवेंद्रराज सुरु…

0

Dilip Kamble
मुंबई – देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी वानखेडे मैदानावर आयोजित दिमाखदार सोहळ्यात राज्याच्या 18 व्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. फडणवीस यांच्यासह एकूण आठ कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्र्यांना राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी या मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. वानखेडे स्टेडियमवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. प्रमुख उपस्थितांमध्ये लालकृष्ण अडवानी, भाजपशासित राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे, मुरली मनोहर जोशी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, चंद्राबाबू नायडू, तसेच अनेक आध्यात्मिक गुरू व इतर अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
एकनाथ खडसे, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, प्रकाश मेहता, चंद्रकांतदादा पाटील, पंकजा मुंडे-पालवे, विष्णू रामा सवरा, या कॅबिनेट मंत्र्यांसह दिलीप कांबळे व विद्या ठाकूर या राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. विनोद तावडे यांनी आईच्याही नावाचा आवर्जून उल्लेख करीत विनोद श्रीधर विजया तावडे या नावाने शपथ घेतली. काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव करत सत्तेवर आलेल्या भाजपने शपथविधीसाठी वानखेडे मैदानावर दिमाखदार सोहळ्याचे आयोजन केले होते. सोहळ्यासाठी मैदानावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. राज्यातील सर्व क्षेत्रातील दिग्गजांची यावेळी उपस्थिती होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वानखेडे मैदानावर आगमन होताच राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
देवेंद्र फडणवीस यांनी सर्वप्रथम शपथ घेतली. त्यांच्या पाठोपाठ एकनाथ खडसे, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, प्रकाश मेहता, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, विष्णू सावरा यांनी मंत्रिपदाची तर दिलीप कांबळे, विद्या ठाकूर यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रगीतानेच कार्यक्रमाची सांगता झाली. त्याआधी महाराष्ट्राची लोककला दर्शवणा-या गीतांनी कार्यक्रमाची सुरुवात झाली. अशोक हांडे यांच्या मराठी बाणा कार्यक्रमाच्या कला पथकातील कलाकार याचे सादरीकरण केले. या शपथविधी सोहळ्यासाठी राज्यातीलच नव्हे तर देशभरातील साधुसंत मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. हरियाणा सरकारच्या शपथविधी सोहळ्यालाही अशाच प्रकारे साधुसंतांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या सर्व साधुसंतांसाठी खास वेगळी आसन व्यवस्था करण्यात आली आहे. या सोहळ्यासाठी स्टेज आणि कार्यक्रमाच्या स्थळाच्या सजावटीची आणि संकल्पनेची जबाबदारी भव्य दिव्य सोहळ्यांच्या कला दिग्दर्शनात हातखंडा असलेल्या प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई म्हणजेच एन.डी.देसाई यांच्यावर होती. देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेल्या इच्छेनुसार प्राचीन आणि आधुनिक महाराष्ट्राची सांगड घालणारा सोहळा याठिकाणी आयोजित करण्यात आला होता.
वानखेडे स्टेडियमवर दुपारी चार वाजून २० मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन झाले. त्यांच्यासोबत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व्यासपीठावर आले. या सोहळ्यासाठी मोदी यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी, मुरलीमनोहर जोशी यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अनंत कुमार, रविशंकर प्रसाद, वेंकय्या नायडू, निर्मला सीतारामन उपस्थित होते. त्याचबरोबर राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर, छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंह, हरियानाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आदींसह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण; तसेच छगन भुजबळ, अजित पवार, दिलीप वळसे पाटील, खासदार प्रफुल्ल पटेल हे उपस्थित होते.
भाजपचे घटक पक्ष असलेले रासपचे महादेव जानकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले, शिवसंग्रामचे विनायक मेटेही उपस्थित होते. त्यांच्याबरोबर विविध धर्मांचे प्रमुख, संत, साधू उपस्थित होते. त्यात शांतीमहाराज, नरेंद्रमहाराज, प्रल्हाद वामनराव पै, अनिरुद्धबापू, अप्पा धर्माधिकारी, भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज, अच्च्युतानंद सरस्वती, जगतगुरू शंकराचार्य, अंजनगाव सुर्जीचे जितेंद्र महाराज, ख्रिस्ती धर्मगुरू, मुस्लिम मौलवी आदी उपस्थित होते.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, ज्येष्ठ गायिका आशा भोसले, अनुराधा पौडवाल, अभिनेते विवेक ओबेराय, रमेश देव, अजिंक्‍य देव, सीमा देव आदी उपस्थित होते. अभिनेते नाना पाटेकर आले आणि थोड्या वेळात गर्दीतून वाट काढता न आल्याने निघून गेले. वानखेडेवर उसळलेल्या गर्दीमुळे बाबासाहेब पुरंदरे यांच्यासाठी रस्ता मोकळा करा, अशी घोषणा माजी आमदार मधू चव्हाण यांनी केली. उद्योगपती आदी गोदरेज, ‘सकाळ’ वृत्तसमूहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार, बांधकाम व्यावसायिक निरंजन हिरानंदानी आदी उपस्थित होते. रिलायन्स उद्योगसमूहाचे अनिल अंबानी यांना मात्र गर्दीमुळे जागा मिळू शकली नाही.

Pankaja_Munde

Vinod_Tawde

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छ्या ।

0

आमचे मित्र , मराठी चित्रपट क्षेत्रात अल्पावधीत आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कौशल्याचा ठसा उमटविणारे ख्यातनाम निर्माते निलेश नवलखा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेछ्या –
शुभेच्छुक -अभिनेता संतोष जुवेकर ,संतोष चोरडिया , मयुर लोणकर ,संगीतकार आदी रामचंद्र , निखिल महामुनी , सोनिया बर्वे , जितेंद्र वाईकर ,शैलेंद्र साठे , आशिष लोणकर , अभिषेक लोणकर ,पत्रकार – श्रीकांत कुलकर्णी ,नरेंद्र शिंदे , शरद लोणकर , सुभाषचंद्र जाधव ,समीर सरदेशमुख , राम झोंड ,विवेक तायडे