Home Blog Page 3646

अर्धा तास लिफ्टमध्ये अडकले पृथ्वीराज चव्हाण

0

मुंबई – माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण चर्चगेट येथे लिफ्टमध्ये अर्धा तास अडकले होते. हा धक्कादायक प्रकार शनिवारी सायंकाळी घडला. अग्निशमन दलाच्या जवानांनी लिफ्टचे दार तोडून त्यांची सुटका केली.
चर्चगेटमधील दिनशॉ वाच्छा रोडवरील रवींद्र मॅन्शन इमारतीत सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या इमारतीत एका कार्यक्रमाला चव्हाण कॉंग्रेसच्या नेत्यांसह गेले होते. कार्यक्रम संपल्यानंतर ते लिफ्टने तळमजल्यावर आले. पण, लिफ्टचे दार बराच वेळ उघडत नव्हते. चव्हाण यांनी सुटकेसाठी धडपड सुरू केली. आयोजकांनी याची माहिती अग्निशमन दलाला दिली. जवानांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. बराच वेळ प्रयत्न करूनही लिफ्टचे दार उघडत नसल्याचे पाहून जवानांनी लिफ्टचा दरवाजा तोडून त्यांची सुटका केली

1 कोटी 15 लाखांच्या वहया खरेदी प्रकरणात ‘राजकारण ‘

0

पुणे – दोन ठेकेदारांच्या हट्टापायी महापालिकेच्या सुमारे 80 हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाच्या द्वितीय सत्रातही शिक्षण मंडळाकडून वह्या उपलब्ध होऊ शकल्या नाहीत. विशेष म्हणजे यातील एका ठेकेदाराने दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतरही याबाबत कनिष्ठ न्यायालयास अंधारात ठेवून त्याने “जैसे थे‘चा आदेश मिळविला आहे.

महापालिकेच्या शाळांमध्ये असलेल्या सुमारे 80 हजार विद्यार्थ्यांना शिक्षण मंडळामार्फत शैक्षणिक साहित्य पुरविण्यात येते. महापालिकेने त्यासाठी 1 कोटी 15 लाख रुपयांची तरतूद केली आहे. शिक्षण मंडळाने वह्या पुरविण्यासाठी 21 ऑगस्ट रोजी दरपत्रक मागितले होते. त्यानुसार सनराज प्रिंटपॅक इंडस्ट्रिज आणि महावीर एजन्सी यांनी महापालिकेला दरपत्रक सादर केले. याबाबतचा ठराव स्थायी समितीपुढे आल्यानंतर 25 ऑगस्ट रोजी त्याला मंजुरीही देण्यात आली. सनराज प्रिंटपॅक इंडस्ट्रिजचे दरपत्रक हे सर्वांत कमी रकमेचे होते; परंतु महापालिकेचे पूर्वीचे ठेकेदार महावीर एजन्सीचे अजयकुमार कटारिया यांनी याबाबत उच्च न्यायालयात धाव घेतली होती; परंतु न्यायमूर्ती नरेश पाटील आणि ए. पी. भंगाळे यांच्या खंडपीठाने 10 नोव्हेंबर रोजी ही याचिका फेटाळून लावली. त्यामुळे विद्यार्थ्यांना वह्या मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता; परंतु त्यानंतरही महावीर एजन्सीतर्फे महापालिका न्यायालयात धाव घेत वह्या खरेदीसाठी “जैसे थे‘चा आदेश मिळविला.

या दाव्याबाबत महापालिकेने न्यायालयात खंबीर बाजू मांडण्याऐवजी बोटचेपे धोरण स्वीकारल्याचेच दिसते. उच्च न्यायालयाने फेटाळलेल्या दाव्याचा निकाल महापालिकेने कनिष्ठ न्यायालयात दाखल करणे आवश्‍यक असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. दाव्याशी संबंधित कागदपत्रे आणि कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे बाजू मांडण्यात येत नसल्याचा अर्ज महापालिकेतर्फे न्यायालयात दाखल करण्यात आला. त्यामुळे महापालिका न्यायालयाने वह्या खरेदी प्रक्रियेला “जैसे थे‘ आदेश दिला. त्यामुळे विद्यार्थ्यांना वह्यांसाठी आणखी किती काळ वाट पहावी लागते, याबाबत अनिश्‍चितता निर्माण झाली आहे.
याबाबत शिक्षणमंडळाचे अध्यक्ष प्रदीप ऊर्फ बाबा धुमाळ यांच्याशी संपर्क साधला असता, ठेकेदाराच्या न्यायालयीन लढ्यामुळे वह्या खरेदीस विलंब होत असल्याचे त्यांनी मान्य केले.

पाकिस्तान कडूनच भारतात दहशतवाद -राजनाथ सिंह

0

नवी दिल्ली – भारतातील दहशतवादाला खतपाणी घालण्याचे काम पाकिस्तान करीत असून, कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम यालाही त्यांनी आश्रय दिला आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवर दाऊद सध्या राहात आहे, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी शनिवारी (ता.22) सांगितले.
राजनाथसिंह म्हणाले, “भारताला पाकिस्तानशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवायचे आहेत. मात्र, मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्याची त्यांची तयारी दिसत नाही. भारतातील दहशतवाद पाकिस्तानातून जन्माला आलेला आहे. तो पाकिस्तान पुरस्कृत आहे. पाकिस्तानमधील घटक भारतातील दहशतवादात सहभागी नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येते. त्यांची “आयएसआय‘ ही यंत्रणा दहशतवाद पसरवीत असून, ती काय पाकिस्तानाच्या बाहेरील आहे काय? मुंबईवरील 26/11च्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी तेथे सुरू असलेल्या खटल्याची सुनावणीही अतिशय संथ गतीने सुरू आहे. पाकिस्तान न्यायिक प्रक्रियेत मदत करीत नसून, जाणीवपूर्वक यातील तथ्य बदलण्याचा प्रयत्न करीत आहे.‘
“दाऊद इब्राहिम हा सध्या पाकिस्तानात राहत आहे. अनेकवेळा भारताने विनंती करूनही त्यांनी दाऊदला भारताकडे सोपविलेले नाही. पाकिस्तानचे अध्यक्ष भारतात आले त्या वेळी दाऊदला भारताच्या ताब्यात देण्याची विनंती आपल्या पंतप्रधानांनी केली होती. यासाठी पाकिस्तानवर राजनैतिक पातळीवर दबाव आणण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. दाऊद सध्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्या सीमेवर राहात आहे,‘ असे राजनाथसिंह यांनी सांगितले.
“भारताला पाकिस्तानच नव्हे, तर सर्व शेजारी देश आणि जगातील अन्य देशांशी मैत्रीपूर्ण संबंध हवे आहेत. पाकिस्तानकडूनही मैत्रीचे प्रयत्न व्हायला हवेत. त्यांनी कमीतकमी मैत्रीपूर्ण बोलण्याची जबाबदारी तरी पार पाडावी. चर्चेच्या प्रक्रियेबाबत ते काय भूमिका घेतात यावर ती सुरू होणे अवलंबून असेल. त्यांच्याकडून मैत्रीची भावना अपेक्षित असून, नजीकच्या काळात यात सुधारणा होईल, अशी मला आशा आहे,‘ असे त्यांनी नमूद केले. दाऊद इब्राहिम याला भारतात परत आणण्यासाठी एखादी मोहीम आखणार आहात का? या प्रश्‍नावर बोलताना राजनाथसिंह म्हणाले, “आम्हाला थोडा वेळ द्या आणि काही काळ वाट पाहा. सामरिक बाबी अशा उघड करता येत नाहीत. पाकिस्तानवर राजनैतिक पातळीवर दबाव आणून दाऊदला लवकरात लवकर भारताच्या हवाली करावे, यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत.‘
मोदी सरकारवरील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रभावाबद्दल विचारले असता राजनाथसिंह म्हणाले, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही बाह्य शक्ती नाही. मी स्वतः या संघटनेतून आलो आहे.

ताकदीच्या अभिनयाने साकारलेल्या मामाच्या गावाचा प्रवास

0

चित्रपट समीक्षण

चित्रपट -‘ मामाच्या गावाला जावू या ‘
10430444_1492327504365136_5062746117432786301_n

प्रकार -फॅमिली थ्रील ड्रामा
दिग्दर्शक – समीर हेमंत जोशी
निर्माता -पंकज छल्लानी

दर्जा -तीन स्टार

कलाकार -अभिजित खांडकेकर , मृण्मयी देशपांडे , शुभंकर अत्रे साहिल मालगे,आर्या भरगुडे

कथा: खेड्यात राहणाऱ्या नंदन देवकर म्हणजे नंदू (अभिजित खांडकेकर ) याचे याच्या बहिणीवर निस्सीम प्रेम ; पण याच्या लहानपणीच त्याची बहिण आपल्या शहरातील प्रियकरासोबत पळून गेलेली . लहानपणातल्या या घटनेचा त्याच्यावर चांगलाच परिणाम झालेला असतो आणि काही वर्षानंतर त्याला शहरातून फोन येतात आणि त्याला जावेच लागते – तिथे भल्या मोठ्ठ्या बंगल्यात जातो तर त्याच्या बहिणीच्या आणि तिच्या पतीच्या प्रतिमेला पुष्पहार घातलेला त्याला दिसतो आपली बहिण मरण पावली याने आणखी त्यावर आघात होतो आणि तो तसाच पळत बाहेर येवून गावी निघतो, एस टी त बसल्या बसल्या बहिणी सोबतच्या बालपणातल्या आठवणीत हरवलेल्या नंदूची कटकट वाढते ती याच एस टी मध्ये बसलेल्या ३ मुलांशी वाद घालणाऱ्या कंडक्टर च्या वर्तनाने ; हा वाद पराकोटीला पोहोचतो आणि कंडक्टर या चौघांना हि वाटेत उतरवतो . तिथेच या एस टी बस मधून जाण्यासाठी मागून येथे धावत आलेल्या तेजू (मृण्मयी देशपांडे )या प्राथमिक शाळे तील बडबड्या शिक्षिकेशी त्यांची गाठ भेट होते हि तीनही मुले जी भावंडे असतात इरा (आर्या भरगुडे ), साहिल (शुभंकर अत्रे ) आणि कुणाल (साहिल मालगे )पण शहरी वातावरणात .इंग्रजी शिक्षणाने ‘फॉरवर्ड ‘ झालेली म्हणतात तशी असतात , जी मुंबईला गेलेली आपली आई परत का आली नाही म्हणून तिला शोधण्याच्या ‘ आपसात गुप्त ठेवलेल्या मोहिमेवर ‘निघालेली असतात आणि तेजू हि आपल्या प्रियकरासोबत पळून जावून लग्न करायच्या उद्देशाने आलेली असते . एकमेकांबद्दल नसलेल्या या पाच जणांचा जंगल प्रवास आनिओ स्वभाव प्रवास , कसे चकवे देत देत त्यांच्यात गोडवा निर्माण करतो याची हि कथा आहे . संपूर्ण जंगलातला रोमांचकारी आणि एकमेकातल्या स्वभावाच्या पैलू बद्दल उत्कंठा वाढविणारा हा प्रवास दोन रात्रीच दोन दिवसाचा असून तो मराठी रसिकांना नक्कीच आकर्षित करणारा ठरेल

समीक्षा – आज कालच्या शहरी आणि आधुनिक युगात हरवलेल्या मामाच्या गावी घेवून जाण्याच्या उद्देशाने हा चित्रपट आला असला तरी मामाचा गाव या चित्रपटात दिसलेला नाही मात्र मामा- भाच्याचे नाते- बहिण भावाच्या नात्याचा जिव्हाळा , आणि एकूणच जुन्या जमान्यातला पण मनोमनी अजूनही कुठे तरी कोपऱ्यात पडलेला हरवलेला जिव्हाळा जागृत करण्यात ,आणि विचार करायला लावण्यास हा चित्रपट यशस्वी ठरतो . कथा रहस्यमय करण्याचा प्रयत्न आणि त्यातून वाढणारी उत्कंठा हे भावणारे असले तरी त्यामुळे अधून मधून २/३ वेळा चित्रपट रटाळ आहे कि काय ? असे उगाचच वाटल्याशिवाय राहत नाही .तरीही तो रसिकांना कलावंतांच्या अभिनयाच्या ताकदीवर खिळवून ठेवतो हा चित्रपट केवळ अभिजित खांडकेकर आणि मृण्मयी देशपांडे आणि तिन्ही मुलांच्या अभिनयाच्या ताकदीवर च पूर्णतः अत्यंत चांगला असा झाला आहे आणि आजच्या जमान्यात मामाच्या गावाला जाण्याची वाट किती खडतर बनली आहे हे दाखवून देण्यातहि चित्रपट यशस्वी झाला आहे , अवधूत गुप्ते यांचे विशेष गीत चित्रपटाच्या शेवटी टाकून जणू काही मारूनच टाकले आहे असे म्हणण्यास वाव निश्चित आहे, ते सुरुवातीला असते तर जास्त मजेदार वाटले असते . जंगलात राहणाऱ्या ‘जना'(निनाद महाजनी )याच्या झोपड्यात लाईट नसल्याचा संवाद अगोदर येतो आणि नंतर एक बल्ब लावलेला दिसतो – जंगलातील केवळ एका घराला आलेली हि वीज , आणि सुरुवातीला पुण्याहून खेड्याकडे निघालेली एस टी , त्यातून मध्येच कंडक्टर ने वाटेत ३ मुले उतरवून देणे अशा काही बाबी खटकतात. पण आगळ्या वेगळ्या अशा धाटणीचा वाटावा असा हा चित्रपट उभा करण्यासाठी अभिजित खांडकेकर आणि अन्य सर्वच कलावंतांनी घेतलेली मेहनत पाहता रसिकांनी एकदा तरी या ‘ मामाच्या गावाला जावूनच यावे , मृण्मयी देशपांडे ने तर चक्क श्रीदेवीची आठवण येइल असा सुरेख अभिनय केला आहे .

राज ठाकरे तपासणार म न से पदाधिकाऱ्यांची योग्यायोग्यता

0

पुणे- विधानसभा निवडणुकीत दारूण पराभव झालेल्या म न से च्या अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता कुठे आपण नेमलेले पदाधिकारी योग्य आहेत कि कसे ? याबाबत माहिती घ्यायला सुरुवात केली आहे . आणि आताशी कुठे त्यांची योग्यायोग्यता तपासून घेण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ झाल्याने ‘ म नसे सोडून गेलेल्या अनेकांनी’ बैल गेला आणि झोपा केला’ अशा मराठी म्हणी चा यावर टोमणा मारला आहे .
दरम्यान यापुढे मनसे पक्षात ज्या पदाधिका-यावर जबाबदारी दिली जाईल त्याला पक्षाच्या चौकटीतच काम करावे लागेल. आपले काम सोडून इतरांच्या कामांत हस्तक्षेप केल्यास थेट पक्षाबाहेर जाल असा इशारा पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी आज पुण्यात पक्षाच्या पदाधिका-यांना इशारा दिला. राज्यस्तरीय पातळीवर पक्ष संघटनेत लवकरच फेरबदल करणार असल्याचेही राज यांनी जाहीर केले. यावेळी राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना थेट आपल्या समस्या, अडचणी, चांगल्या-वाईट गोष्टींची माहिती देण्यासाठी आपला ईमेल आयडी दिला. आपल्या सूचना, माहिती connectrajthackaray@gmail.com या मेलवर पाठवा असे आवाहन करतानाच फक्त तक्रारीच करू नका असेही राज यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर मागील 4-5 दिवसांपासून पुणे दौ-यावर असेलल्या राज ठाकरे यांनी पुण्यातील सर्व पदाधिका-यांशी गेली 3-4 दिवस संवाद साधला. त्यानंतर आज सकाळी छोटेखानी झालेल्या मार्गदर्शनपर भाषणात पक्षाच्या नेत्यांना व पदाधिका-यांना राज यांनी चांगलेच फैलावर घेतले. राज म्हणाले, लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील पराभवाबाबत मी माहिती घेत आहे. सगळेच याने दगाफटका केला. याने मान दिला नाही, त्याने काम केले नाही. अमक्याने दुस-याचे काम केले अशी माहिती देत आहेत. मान मिळत नसतो आपल्या कृतीने तो मान मिळतो. जे झाले ते गंगेला मिळाले. झाले गेले विसरून आता आपल्याला सर्वांना नव्याने कामाला लागावे लागणार आहे. मी लवकरच पक्षीय संघटनेत फेरबदल करीत आहे. त्यानुसार पक्षाने ज्याच्यावर जी जबाबदारी दिली त्याच्या चौकटीतच त्याने काम करावे लागेल. आपले काम सोडून इतर कामांत हस्तक्षेप केल्यास पक्षाबाहेर जाल. मागील काळात अनेकांनी बेशिस्तपणा केला तो खपवून घेतला. पण यापुढे बेशिस्तपणा मला चालणार नाही अशा इशारा राज यांनी नेते, पदाधिका-यांना दिला.

राज पुढे म्हणाले, आपल्याला लोकांनी स्वीकारले नसले तरी लोकांच्या आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत. यात आपण खरे उतरतो की नाही हे पाहणे गरजेचे आहे. अनेक लोक भेटले. ते म्हणाले राज आम्हाला तुमचे पटते पण तुमचे नेते नीट वागत नाहीत. आता आपल्याला लोकांच्या काय अपेक्षा आहेत त्यानुसार काम करावे लागेल. वह्या वाटप, फळे वाटप यापलीकडे विचार करावा लागेल. लोकांशी संपर्क ठेवून त्यांच्याशी जवळीक जपली पाहिजे. माणुसकी दाखवली पाहिजे. मनसेचे पदाधिकारी म्हणून काम करू नका. एक सामान्य म्हणून लोकांमध्ये मिसळा, मनाला समाधान मिळावे यासाठी काम करा. लोकांची मने जिंका. निकालासाठी, विजयासाठी व मतांसाठी काम करू नका. आपल्यापासून लोक दूर गेले नाहीत, तर आपण लोकांच्या जवळ राहिलेलो नाही असा त्याचा अर्थ आहे हे समजून घ्या. चांगले काम केले की लोक आपोआप दखल घेतील. प्रकाश आमटे, बाबा आमटे यांची लोक दखल घेतातच ना असे सांगत यापुढे मनसेच्या महाराष्ट्रातील एकाही पदाधिका-यांने आपल्या वाढदिवसाचे होर्डिंग लावू नये. तसे झाल्यास तो पदाधिकारी दुस-या दिवशी पक्षातून बाहेर गेलेला असेल असेही राज यांनी सांगितले.

रासप पुणे शहराध्यक्षाच्या घरावर हल्ला, जीवे मारण्याची धमकी 24 तासात आरोपीला अटक करण्याची मागणी

0

पुणे :
“पुणे शहर आणि कात्रज- आंबेगाव भागात “राष्ट्रीय समाज पक्षा’ची वाढ का करतोस’ अशी दमदाटी, शिवीगाळ करून रासप पुणे शहराध्यक्ष देवेंद्र आनंदराव धायगुडे यांच्या घरावर हल्ला, दगडफेक करणाऱ्या शिवाजी सरोदे आणि त्याच्या गुंडांना अटक करा अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे कात्रज पोलिस स्टेशनचे ठाणे अंमलदार वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे, अशी माहिती रासप प्रदेश प्रवक्ते दीपक बिडकर यांनी दिली.

दिनांक 19 नोव्हेंबर रोजी रात्री हा प्रकार वाघजाई (आंबेगाव खुर्द) येथे घडला. परिसरातील रात्री वाजणाऱ्या स्पीकरचा आवाज बंद करण्यासाठी रासप शहराध्यक्ष देवेंद्र धायगुडे यांनी पोलिसांकडे तक्रार केली असावी असा खोटा संशय घेऊन शिवाजी सरोदे व त्याच्या गुंडांनी मद्य प्राशन करून देवेंद्र धायगुडे यांच्या गाडीवर दगड टाकले, घरावर दगडफेक केली, दमदाटी, शिवीगाळ केली. 20 नोव्हेंबर रोजी सकाळी देखील घराच्या दरवाजाला लाथा मारून धमकी दिली. धायगुडेंच्या पत्नीलाही शिवीगाळ केली. शिवाजी सरोदे हा महापालिकेच्या घनकचरा विभागात बिगारी म्हणून कार्यरत असल्याचे समजले आहे.

आरोपींना 24 तासात अटक करावी आणि परिसरातील त्यांची गुंडगिरी थांबवावी अशी मागणी मोठ्या संख्येने जमलेल्या रा.स.प. कार्यकर्त्यांनी ठाणे अंमलदार शिंदे यांना निवेदन देऊन केली.

यावेळी प्रदेश कार्यकारणी सदस्य बाळासाहेब कोकरे, शहराध्यक्ष देवेंद्र धायगुडे, जेमिश पठाण, शहर उपाध्यक्ष भगवान शिंदे, युवक आघाडी अध्यक्ष विनायक दगडे, दीपक मासाळ, संतोष आखाडे उपस्थित होते.

शिवसेनेच्या प्रवक्ते पदी अमोल कोल्हे

0

मुंबई- शिवसेनेच्या नेतृत्त्वाने संघटनेत . खासदार संजय राऊत यांना प्रवक्तेपदावरून दूर करून कडवे शिवसैनिक अरविंद भोसले, अमोल कोल्हे यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे.
मनोहर जोशी, विधानसभेत गोरेगावमधून पराभूत झालेले सुभाष देसाई, महिला आघाडीच्या श्वेता परूळेकर यांचीही प्रवक्तेपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. खासदार अरविंद सावंत, आमदार विजय शिवतारे यांच्यासह डॉ. मनिषा कायंदे यांची प्रवक्तेपदी वर्णी लागली आहे. निलम गो-हे यांची प्रवक्ते म्हणून निवड कायम ठेवण्यात आली आहे. संजय राऊत व मनोहर जोशींनी वारंवार वादग्रस्त वक्तव्ये करीत पक्षाला व पक्षनेतृत्त्वाला अडचणीत आणले तर अकार्यक्षम असल्याचा ठपका ठेवल्याने सुभाष देसाईंना या पदावरून दूर केल्याचे बोलले जाते

सलमान खान कडून बहिणीला १६ कोटीचा फ्लॅट ४ कोटीची कार गिफ्ट

0

मुंबई – सलमान खानने अर्पिताचे लग्न अविस्मरणीय बनवण्यासाठी कोणतीही कसर शिल्लक सोडली नाही. १८नोव्हेंबर रोजी हैदराबाद येथील प्रसिद्ध फलकनुमा पॅलेसमध्ये अर्पिता आणि आयुषचा शाही लग्नसोहळा पार पडला. आज २१ नोव्हेंबर रोजी मुंबईत रिसेप्शन आयोजित करण्यात आले आहे.
लग्नाच्या निमित्ताने सलमानने अर्पिताला मुंबईत १६ कोटींचा ३ BHK फ्लॅट गिफ्ट केला आहे. हा टेरेस फ्लॅट सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटपासून केवळ पाच मिनिटांच्या अंतरावर आहे. सलमानने आपल्या या लाडक्या बहिणीला फ्लॅटसोबतच आणखी एक महागडी भेटवस्तू दिली आहे. त्याने अर्पिताला रोल्स रॉयस कार भेट म्हणून दिली आहे.
पांढ-या रंगाच्या रोल्स रॉयस फँटम या कारची किंमत भारतात जवळजवळ चार कोटींच्या घरात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सलमान लग्नात खूप भावूक झाला होता. अर्पिता आणि आयुषला आशीर्वाद देताना त्याने दोघांना कारची चावी गिफ्ट केली.

समुद्रातील शिवरायांच्या स्मारकाचा मुहूर्त शिवजयंतीला; पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन

0

मुंबई- अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यासाठी केंद्रीय पर्यावरण विभागाकडून मंजुरीसाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. त्याचबरोबर अन्य विभागांच्या परवानगींसाठीही तातडीने कार्यवाही सुरु आहे. या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. फेब्रुवारी महिन्यात शिवजयंतीच्या मुहूर्तावर मोदींच्या हस्ते भूमिपूजन करण्यात येणार असल्याचे समजते आहे.
अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्याबाबत करावयाच्या पाठपुराव्याचा आढावा घेण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहात गुरुवारी बैठक घेण्यात आली. या बैठकीला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, विनायक मेटे, मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री यांनी याबाबत म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे झाले पाहिजे. यासाठी ज्या विभागांच्या मंजुरींची आवश्यकता आहे, त्या तातडीने आणि वेळेची मर्यादा पाळून पूर्ण केल्या जातील. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे या स्मारकाच्या मंजुरीसाठी पाठपुरावा आम्ही करीत आहोत. त्याचबरोबर स्मारकाच्या निर्मितीसाठी सल्लागार निवडण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना मी दिल्या आहेत. जगात अशा प्रकारचे स्मारक ज्या कंपन्यांनी उभारले आहे, त्यांचे देखील मार्गदर्शन यासाठी घेण्यात यावे, या सर्व तांत्रिक बाबी येत्या तीन ते चार महिन्यात पूर्ण करून पंतप्रधानांच्या हस्ते या स्मारकाचे भूमिपूजन करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
जे. जे. वास्तूविशारद महाविद्यालयाच्या वतीने स्मारकाचे संकल्पचित्र तयार करण्यात आले, त्याचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. हे स्मारक अरबी समुद्रातील भव्य अशा खडकावर उभारण्यात येणार असून ते राजभवनापासून दीड किलोमीटर अंतरावर, तर मरीन ड्राईव्ह पासून साडेतीन किलोमीटर आणि गेट वे ऑफ इंडियापासून साधारणत: 10 ते 12 किलोमीटर अंतरावर असणार आहे. या स्मारकात म्युझियम, ऑडोटोरीयम, वाचनालय, प्रदर्शन हॉल, ॲम्फी थिएटर अशा प्रकारची सुविधा असणार आहे. स्मारकाच्या आतील बाजूस लिफ्टची देखील सुविधा असणार आहे. तलवार हवेत उंचावलेल्या अश्वारूढ शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी उभारण्यात येणार असल्याची संकल्पना यावेळी सादर करण्यात आली. संकल्पीत स्मारकाची सफर घडविणारी चित्रफितदेखील यावेळी दाखविण्यात आली.

नौशाद शेख प्रकरणातील उद्देश शोधून काढावा : पिंपरी रासप ची मागणी

0

पुणे :

‘क्रिएटीव्ह अकॅडमी’ च्या नौशाद शेख ने लैंगिक शोषण प्रकरणात हार्मोन वाढविण्याची औषधे घेतल्याच्या सिरींज सापडल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे . या लैंगिक शोषणाचा उद्देश पोलिसांनी शोधून काढून गांभीर्य पूर्वक चौकशी पूर्ण करावी , असे आवाहन पिंपरी – चिंचवड राष्ट्रीय समाज पक्षाच्या शाखेचे अध्यक्ष विश्वास मते आणि युवक आघाडी अध्यक्ष गोकुळ आपटे यांनी आज प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी हे आवाहन केले आहे .

पालकांनी घाबरून न जाता पोलिसांना सहकार्य करावे , त्यातून पुरावे पुढे येतील , आणि आरोपीला शिक्षा देण्याची प्रक्रिया गतिमान होतील. तक्रारदार मुलींच्या पालकांवर आणण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही असेही या पत्रकात त्यांनी म्हणले आहे .

“विवाहयोग्य युवक-युवतींसाठी “अग्रवाल समाज मंगल आयोजन’

0

रविवार दि.23 नोव्हेंबर रोजी
“विवाहयोग्य युवक-युवतींसाठी “अग्रवाल
समाज मंगल आयोजन’
पुणे :
अग्रवाल समाजातील उपवर युवक युवतींना विवाह विषयक चर्चेच्या भेटीची, परिचयाची संधी मिळावी म्हणून सातवे “अग्रवाल समाज मंगल आयोजन’ आयोजित करण्यात आले आहे. हे मंगल आयोजन “एस. एस. अगरवाल इंग्लिश मीडियम स्कूल’ (दत्तवाडी), पुणे-30 येथे रविवार दिनांक 23 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता होणार आहे. मंगल आयोजन कार्यक्रम विनामूल्य आहे, अशी माहिती संयोजक आर. एल. अगरवाल यांनी दिली.

दर महिन्याला आयोजित करण्यात येणाऱ्या या उपक्रमाला 6 महिने झाले पूर्ण झाले आहे. सहा महिन्यांमध्ये या उपक्रमातून आतापर्यंत 16 जोडप्यांच्या रेशीमगाठी बांधल्या गेल्या आहेत.

विवाहयोग्य वधू-वरांची माहिती विनामूल्य एकत्र करणे, अगरवाल समाजातील कुटुंबाचा परिचय वाढणे या प्रमुख हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या उपक्रमाचा विस्तार पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रभर व्हावा यासाठी जास्तीत जास्त अगरवाल समाजातील कुटुंबांनी या मंगल आयोजनात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

रविवार दिनांक 23 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाला उपवर युवक-युवती त्यांच्या पालकांनी उपस्थित रहावे. अग्रवाल समाजातील नागरिकांनी “मंगल आयोजन’ या उपक्रमाची माहिती पुण्यात व पुण्याबाहेरही दिली पाहिजे. या उपक्रमामुळे अग्रवाल समाजातील इतर कुटुंबांना देखील प्रेरणा मिळते.

अधिक माहिती व नावनोंदणीसाठी 9561220000 आर.एल.अगरवाल यांच्याशी संपर्क साधावा.

शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये संस्कृत भाषा सक्तीची करा- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

0

नवी दिल्ली

सीबीएसई बोर्डाच्या अभ्यासक्रमातून जर्मन भाषा वगळण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे बळ मिळालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आता संस्कृतसाठी दंड थोपटले आहेत. केंद्रीय बोर्डाच्या (सीबीएसई) शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये संस्कृत भाषा सक्तीची करा, अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न ‘संस्कृत भारती’ या संघटनेने केली आहे.

‘संस्कृत भाषा ही भारताची ओळख आहे. संस्कृत भाषा येत नसलेला किंवा माहीत नसलेला स्वत:ला भारतीय कसा म्हणवून घेऊ शकतो,’ असा सवाल संस्कृत भारतीचे राष्ट्रीय सरचिटणीस दिनेश कामत यांनी केला आहे. सीबीएसई बोर्डाने शाळा वा कॉलेजांमध्ये तिसऱ्या भाषेचा पर्यायामध्ये परदेशी भाषांना स्थान द्यायचे थांबवायला हवे. अन्यथा आंदोलन केले जाईल,’ असा इशाराही कामत यांनी दिला.
‘स्वातंत्र्यापासूनच्या प्रत्येक सरकारने संस्कृत भाषा संपवण्याचे काम पद्धतशीरपणे केले आहे. खरंतर संस्कृत ही इंडो-युरोपियन भाषांची जननी आहे. पण ही मूळ भाषाच आता मागे पडली आहे. तिच्याऐवजी पर्शियन आणि ऊर्दू भाषेतील शब्द रोजच्या वापरात आले आहेत. त्यांची गरज काय, असा सवाल कामत यांनी केला.

“डीएसके आनंदयात्रा” येत्या २३ नोव्हेंबरला

0

पुणे- डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्सच्या ठेवीदार व ग्राहकांसाठी २३ नोव्हेंबर रोजी “डीएसके आनंदयात्रा” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मागील शनिवारी (दि. १५) “डीएसके आनंदयात्रा’ हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. परंतु, अवेळी पावसामुळे हा कार्यक्रम त्यावेळी स्थगित करण्यात आला होता.
हाच कार्यक्रम आता येत्या २३ तारखेला (रविवारी) सायंकाळी सहा वाजता रमणबाग प्रशालेच्या मैदानावर होणार आहे, याची सर्व ठेवीदारांनी व ग्राहकांनी नोंद घ्यावी, या नियोजित कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्सतर्फे करण्यात आले आहे.

केएसबी कामगारांना दहा हजार रुपयांची वेतनवाढ

0

पुणे – केएसबी पंम्प लिमिटेडच्या कामगारांना दहा हजार रुपयांची घसघशीत वेतनवाढ जाहीर झाली आहे. गुलाल व भंडा-याची उधळण करत कामगारांनी कराराचा आनंदोत्सव साजरा केला.
केएसबी पंम्प लिमिटेडचा पिंपरी-चिंचवड विभाग व केएसबी मजदूर युनियन यांच्यात वेतनवाढीचा करार नुकताच पार पडला. वेतनवाढीमुळे कामगारांचे किमान वेतन ४३ हजार ५६८ तर कमाल वेतन ५५ हजार २७० रुपये प्रतिमाह झाले आहे. २०१३ ते २०१६ या कालावधीसाठी हा करार करण्यात आला.
करारामुळे कामगारांना आपली घरदुरुस्ती अथवा मुला-मुलींच्या लग्नासाठी तीन लाख रुपयांचे कर्ज पाच वर्षाच्या परत फेडीवर मिळणार आहे. हे कराराचे वैशिष्ट्य ठरले. याखेरीज गृहभत्त्यामध्ये १६५७ रुपये, शैक्षणिक भत्त्यामध्ये १४०४, गणवेश भत्त्यामध्ये ९५० आणि वैद्यकीय भत्त्यामध्ये २९८ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. कराराचा फरार नोव्हेंबरच्या वेतनात मिळणार असून तो सुमारे एक ते दीड लाख रुपये असणार आहे. ३५२ कामगारांना या वेतनवाढीचा लाभ मिळणार आहे. औद्योगिक क्षेत्रात मंदीचे वातावरण असतानाही चांगल्या प्रकारचा वेतनकरार झाल्याची प्रतिक्रिया कामगार संघटनेच्या पदाधिका-यांनी दिली.
वेतनकरारावर व्यवस्थापनाच्या वतीने मनुष्यबळ विभागाचे संचालक शिरीष कुलकर्णी, उत्पादन विभागाचे संचालक नंदन परांजपे, सरव्यवस्थापक नितीन पाटील, गुणवत्ता विभागाचे सरव्यवस्थापक आर. बी. सवदीकर, मनुष्यबळ विभागाचे व्यवस्थापक किरण शुक्ल यांनी तर संघटनेच्या वतीने अध्यक्ष सॅमसन उर्फ श्याम चक्रनारायण, सरचिटणीस सतिश सगलगिले, सहसचिव सुधाकर कुदळे, लक्ष्मण पाटील, दिपक पवार, उपाध्यक्ष शामकांत साबळे, विजय गायकवाड, जनार्दन शिंदे, उपखजिनदार ए. जे. पीटर, सदस्य सतिश कुलकर्णी, साक्षीदार म्हणून व्यवस्थापनाच्या वतीने विवेक कुंटे, अजय जडे आणि कामगारांच्या वतीने पी. व्ही. पाटील, डि. जी. कारभारी यांनी स्वाक्षरी केली.

बाणेर, पुणे येथे कोलते- पाटील डेव्हलपर्स यांचा पहिला डीएमए प्रकल्प

0

बाणेर, पुणे येथे कोलते- पाटील डेव्हलपर्स यांचा पहिला डीएमए प्रकल्प

पुणे : पुण्यातील बांधकाम क्षेत्रातील अग्रगण्य संस्था कोलते पाटील डेव्हलपर्स लिमिटेड यांची बाणेर येथील निवासी प्रकल्प सिरीनो साठी , नाऊ रियालिटी प्रायवेट लिमिटेडच्या संयोगाने विकास व्यवस्थापक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रकल्पातील ०.६ दशलक्ष चौ. फुट भूखंड विकसित क्षेत्रातील विक्रीयोग्य असणार आहे. प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामासाठीच्या परवानग्या तसेच आवश्यक अशा सर्व मंजुरी अगोदरच घेण्यात आल्या आहेत. कोलते पाटील देव्ह्ल्पमेंट व्यवस्थापक म्हणून कोलते पाटील २४ के हा ब्रान्ड प्रसिद्ध आहेच आणि नाऊ रियालिटी देखरेखीखाली प्रकल्पाचे सर्व पैलू, संकल्पना आणि अंमलबजावणी, उत्पादन रचना, विक्री, विपणन, प्रकल्प पायाभूत सुविधा आणि निवासी प्रकल्पाचे हस्तांतरण याकडे लक्ष पुरवण्यात येणार आहे. त्याचा परतावा म्हणून कंपनीला व्यवस्थापन शुल्क प्राप्त होईल, प्रकल्पातील सर्व खर्च भरले जाणार आहेत.