Home Blog Page 3645

श्रद्धेचं सेल्स-मार्केटिंग-ब्रँडिंग दाखवणारा स्वामी पब्लिक लिमिटेड

0

एकेकाळी महाराष्ट्रात होऊन गेलेल्या थोर संतांना तेव्हा स्वप्नातही वाटलं नसेल, की त्यांनी दाखवलेला अध्यात्माचा मार्ग एक दिवस कॉर्पोरेट कंपन्यांच्या जगातून जाईल! त्यांनाच काय, पण आपल्यासारख्या सामान्य लोकांनाही कधी वाटलं नव्हतं, की एक दिवस भक्तीचं ‘मार्केटिंग’ केलं जाईल, श्रद्धेचं ‘ब्रँडिंग’ होईल आणि ‘बॉटम लाइन’साठी अध्यात्म विकलं जाईल. पण हेच सध्याचं वास्तव आहे. देवापेक्षाही ‘स्वामी, बाबा, महाराज’ जास्त महत्त्वाचे झाले आहेत. म्हणूनच सामान्य भक्ताच्या मनात असणारी श्रद्धा आणि कॉर्पोरेट कंपन्यांनी तिचा फायदा घेऊन मांडलेला बाजार यावर बोचरं भाष्य करणारा ‘स्वामी पब्लिक लिमिटेड’ हा सिनेमा येत्या २८ नोव्हेंबर २०१४ या दिवशी संपुर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

सिद्धार्थ (चिन्मय मांडलेकर) हा एक साधा-सरळ आणि सामाजिक जाणिवा जिवंत असलेला तरुण असतो. आजीच्या (नीना कुलकर्णी) तालमीत तयार झालेला… एमएसडब्ल्यू करून समाजसेवा करत असतो. मात्र, त्याच्या आयुष्यात एक असं वळण येतं, की मूल्यं- नितीमत्ता यांची कास सोडून तो थेट पैशांच्या मागे लागतो. वाट्टेल ते झालं, तरी भरपूर पैसे कमवून यशस्वी व्हायचं या त्याच्या महत्त्वाकांक्षेला नचिकेत (सुबोध भावे) हा चलाख बिझनेसमन खतपाणी घालतो. आलिशान लाइफस्टाइल जगता यावी म्हणून आजकाल सगळेजण मान मोडून काम करतात, भरपूर पैसे कमावतात आणि मग मनाला शांती नाही म्हणून रडत बसतात. अशांच्या भाबड्या श्रद्धेचा योग्य वापर करून खोऱ्याने पैसे ओढता येतील हे त्याच्या धूर्त मनानं ओळखलेलं असतं. म्हणून मग, नचिकेत सिद्धार्थलाच ‘स्वामी’ बनवून लाँच करतो, ‘स्वामी पब्लिक लिमिटेड’. एखाद्या प्रॉडक्टप्रमाणे तो या स्वामीचं उत्तम पॅकेजिंग आणि मार्केटिंग करतो आणि त्याच्यासाठी ब्रँडिंग अॅक्टिव्हिटीजही आखतो. हा स्वामी लोकांचा विश्वास मिळवण्यात कसा यशस्वी होतो, नचिकेतचं ध्येय पूर्ण होतं का ? सिद्धार्थ हे स्वामीपण निभावू शकतो का ? नचिकेतच्या नफ्याच्या गणिताचं काय होतं ? वगैरे प्रश्नांची उत्तर देताना सिनेमा आणखी रंजक होतो.

प्रेक्षकांची उत्कंठा सतत वाढवत नेणाऱ्या या सिनेमाची संकल्पना विजय मुंडे यांची आहे, तर प्रसिद्ध दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी या सिनेमासाठी कथालेखक, गीतकार आणि दिग्दर्शन अशी तिहेरी भूमिका यशस्वीपणे निभावली आहे. मॅटर या सिनेंमाच्या यशस्वी निर्मितीनंतर पूनम शेंडे यांच्या ‘सारथी एंटरटेनमेंट’ ने या सिनेमाची निर्मिती केली आहे. अतिशय वेगळ्या प्रकारच्या या कथेला दिग्गज कलाकारांची साथ मिळाल्यामुळे सिनेमा लक्षवेधी झाला आहे. सुबोध भावे आणि चिन्मय मांडलेकर यांच्यासारख्या तरुण, आघाडीच्या अभिनेत्यांच्या जुगलबंदीचा अनुभव प्रेक्षकांना यात घेता येईल, तर विक्रम गोखले, नीना कुलकर्णी यां दिग्गज कलाकारांचा अभिनयही सिनेमाची जमेची बाजू आहे. स्वर्गीय कलाकार विनय आपटे यांचा अविस्मरणीय अभिनयही ‘स्वामी पब्लिक लिमिटेड’मध्ये पाहायला मिळणार आहे. नवोदित चेहरा आणि आश्वासक अभिनयगुण असेलली संस्कृती खेर या सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. त्याशिवाय सविता मालपेकर, मिलिंद शिंदे, भारत गणेशपुरे, विनोद खेडकर हे लोकप्रिय कलाकारही सिनेमात आहेत.

सिनेमाची सांगीतिक आघाडी हिंदी इंडस्ट्रीतल्या नामवंतांनी सांभाळलेली आहे. ‘दिल तो पागल है’’ सारख्या सिनेमाला संगीत देणारे प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक उत्तम सिंग यांनी ‘स्वामी पब्लिक लिमिटेड’ ला कर्णमधुर संगीत दिले आहे, तर प्रख्यात शास्त्रीय गायक पं. अजय चक्रवर्ती आणि गायक सुखविंदर सिंग यांनी ती गायली आहेत. पार्श्वसंगीत चैतन्य आडकर यांचे आहे.

राजस्थानसह भारतातल्या विविध निसर्गरम्य ठिकाणी सिनेमाचं शूटिंग करण्यात आलं असून विक्रम अमलाडी यांच्या छायाचित्रणाने तो आणखी सुखद बनला आहे. कलादिग्दर्शन सिद्धार्थ तातूस्कर यांचे असून रंगभूषा महेश बराटे यांनी तर वेशभूषेची जबाबदारी सोनिया सहस्त्रबुद्धे यांनी निभावली आहे. सिद्धार्थ घाडगे या सिनेमाचे कार्यकारी निर्माते असून लाइन प्रोड्युसरची जबबादारी विनोद सातव व आश्विनी तेरणीकर यांनी समर्थपणे सांभाळली आहे. विवेक वाघ हे या सिनेमाचे सहनिर्माते आहेत.

दमदार कथा आणि लक्षात राहाणारा विषय, अनुभवी, कसलेलं दिग्दर्शन, अवीट गोडीचं संगीत आणि कलाकारांचा समर्थ अभिनय यांनी सजलेला ‘स्वामी पब्लिक लिमिटेड’ हा सिनेमा २८ नोव्हेंबर २०१४ या दिवशी प्रदर्शित होत आहे.
2

3

पुण्याला आणखी पाच टीएमसी पाणी हवे -महापौर

0

पुणे – मुळशी धरणामधून पाच टीएमसी पाणीपुरवठ्याबरोबरच मोशी येथील सरकारी खाणीची जागा कचरा टाकण्यासाठी महापालिकेला त्वरित द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडे करण्यात येणार असल्याचे महापौर दत्तात्रेय धनकवडे यांनी सोमवारी सांगितले.

महापालिकेच्या हद्दीमध्ये भविष्यात 34 गावांचा समावेश होणार आहे. हद्दीलगतच्या गावांना पाणीपुरवठा करणे महापालिकेला बंधनकारक असल्यामुळे पाटबंधारे विभागाकडून मिळणारे पाणी अपुरे पडत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मुळशी धरणातून पाच टीएमसी पाणी पिण्यासाठी प्राधान्याने शहराला देण्यात यावे, अशी मागणी करणार असल्याचे धनकवडे यांनी सांगितले.

मुळशी धरणाची क्षमता 21.33 टीएमसी आहे. पुणे जिल्ह्यातील गावांसाठी 1.2 टीएमसी पाणी पिण्यासाठी देण्यात येत आहे. त्याचधर्तीवर पुणे शहराला पाच टीएमसी पाणी देता येऊ शकते, असे त्यांनी सांगितले.

फुरसुंगी आणि उरुळी देवाची येथील कचरा डेपोमध्ये 31 डिसेंबरनंतर कचरा टाकता येणार नाही. त्यामुळे शहरातील कचऱ्याची समस्या लक्षात घेता मोशी येथील 25 एकर जागा महापालिकेला घनकचरा व्यवस्थापनासाठी त्वरित द्यावी, अशी मागणी आहे. ही जागा मिळावी म्हणून 30 ऑगस्टला महापालिकेने जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवला आहे, असेही त्यांनी सांगितले.

शहरातील मेट्रो प्रकल्पाला अंतिम मान्यता मिळवून देणे, मेट्रोसाठी आवश्‍यक असणाऱ्या कंपनीची स्थापना करणे, सिंचन पुनर्स्थापना खर्च माफ करणे, पर्वती जलशुद्धीकरण केंद्राचा प्रस्तावाला निधी देणे, 23 गावांमधील बीडीपीच्या आरक्षणाला मंजुरी देणे, विकास आराखड्यातील सार्वजनिक प्रयोजनार्थ आरक्षित जागांचा आगाऊ ताबा देणे आदी विषयांवर बैठकीत चर्चा होणार आहे. “जेएनएनयूआरएम‘ प्रकल्पांतर्गत पाठवण्यात आलेल्या प्रस्तावांसाठी निधी मिळण्यासाठी मदत करणे, शासनाकडील महापालिकेची थकीत रक्कम त्वरित मिळावी, अशी मागणी बैठकीत करणार असल्याचे महापौरांनी सांगितले.

नरेंद्र मोदींच्या पत्नीला भीती सुरक्षा रक्षकांचीच -कशासाठी ‘कोणाच्या सूचनेवरून सुरक्षा दिली ? जाशोदाबेन यांनी उपस्थित केले १२ प्रश्न ….

0

अहमदाबाद-

देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या त्यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या एसपीजी कमांडोनेच केली होती​. मलाही माझ्या सुरक्षा रक्षकांची भीती वाटते, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन यांनी आपल्याला सुरक्षा कोणत्या अधिकारात दिली, याचा माहिती अधिकाराअंतर्गत तपशील मागवला आहे. त्यासाठीचा अर्ज त्यांनी मेहसाना पोलिस अधीक्षक यांच्याकडे सादर केला आहे.

आपल्याला कोणत्या कायद्याखाली आणि कोणाच्या विनंतीवरून ही सुरक्षा देण्यात आली, असा प्रश्न जशोदाबेन यांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर त्यांनी इतर १२ प्रश्नांचीही उत्तरे मागितली आहेत. तसेच ज्या कायद्यान्वये त्यांना एसपीजी सुरक्षा बंधनकारक आहे, त्याची प्रतही देण्याची विनंती त्यांनी केली आहे. एसपीजी सुरक्षेबरोबरच नियमानुसार पंतप्रधानांची पत्नी म्हणून कोणते लाभ आहेत, तसेच कोणते प्रोटोकॉल पाळण्याची आवश्यकता आहे, सार्वजनिक वाहनातून प्रवास करण्यासाठी का रोखले जाते, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.

जशोदाबेन माहिती अधिकारातून माहिती मागवणारा अर्ज करण्यासाठी बंधू अशोक मोदी यांच्याबरोबर आल्या होत्या. यंदाच्या लोकसभा निवडणुकीवेळी बडोद्यातून उमेदवारी अर्ज दाखल करताना जशोदाबेन यांचा नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच ‘पत्नी’ म्हणून उल्लेख केला होता.

स्त्रीत्वाच्या हुंकाराचा उद्गार : ‘कँडल मार्च’ येतोय ५ डिसेंबरला

0

1

2

3

पुणे- अन्याय आणि अत्याचाराने घुसमटणा-या स्त्रीला मोकळा श्वास घेण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या अन् आत्मसन्मानाने जगायला शिकवणारा असा “कँडल मार्च” हा सिनेमा येत्या ५ डिसेंबर रोजी राज्यभरात प्रदर्शित होत आहे. चाणक्या क्रिएशन्स अन् K4 एन्टरप्रायझेस यांची निर्मिती असलेल्या “कँडल मार्च” क़डे स्त्रीत्वाच्या हुंकाराचा उद्गार म्हणून आपल्याला पाहता येईल.

शांततापूर्वक माध्यमातून अन्यायाचा विरोध महत्त्वाचा आहे, पण वेळीच अन्यायाविरूद्ध आवाज उठवण्याची नितांत गरज असते, हे उद्देश्य डोळ्यांसमोर ठेवून कँडल मार्चची निर्मिती करण्यात आली आहे. सामाजिक जाणिवा आणि सामाजिक भान असल्यामुळे भोवताली घडणा-या ज्वलंत प्रश्नांना रूपेरी पडद्यावर आणण्याचा प्रयत्न “चाणक्य क्रिएशन्स” करत आहे. कारण आजच्या घडीला ज्यांच्या हातात सूत्र आहेत अन् ज्यांना या प्रश्नांवर तोडगा काढता येईल त्यांचे लक्ष या कलाकृतींमार्फत वेधून घेण्याचा हा महत्त्वपूर्ण प्रयत्न असेल. जेणेकरून “चाणक्य क्रिएशन्स” सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणा-या कलाकृतींचे व्यासपीठ यापुढील काळात होईल.

आजच्या घडीला देशभरात महिलांवर होणा-या अत्याचाराच्या घटना मग ती सेक्स स्कँडल्स असोत वा अन्य त्यामधील प्रश्नांना एका वेगळया स्तरावर मांडण्याचा केलेला प्रयत्न म्हणून कँडल मार्चचे महत्त्व वेगळे आहे. या सिनेमातील प्रमुख भूमिकेत तेजस्विनी पंडित, स्मिता तांबे, मनवा नाईक आणि सायली सहस्त्रबुद्धे या अभिनेत्री आपल्याला दिसणार आहे. पुरूषी अहंकार आणि समाजातील अन्यायकारी खलनायकाच्या भूमिकेत आपल्यासमोर येणार आहे तो अभिनेता निलेश दिवेकर. विविध जाहिरातींमधला चेहरा फरारी की सवारीमध्ये अन् गुटरगूसारख्या मालिकांनंतर ब-याच वर्षांनी मराठी सिनेमात काम करत आहे, ही जमेची बाजू म्हणायला हवी. केवळ अन्याय आणि अत्याचाराने ग्रासलेला हा रंगहीन सिनेमा नाही तर आशिष पाथरे आणि सायली सहस्त्रबुद्धे यांच्या रोमॅण्टिक ट्रॅकने या सिनेमात प्रेमाचा रंग भरलेलाही आपल्याला बघायला मिळणार आहे.

अभिनयाचं खणखणीत नाणे वाजवणा-या या सिनेमामध्ये घुमणा-या संगीताचा सूरही तितकाच अंतर्मुख करणारा आहे. तीन गाण्यांचे प्रसंग ज्याप्रकारे चित्रित कऱण्यात आले आहेत, ते पाहता प्रेक्षकांना ठेका धरायला लावताना काळजाला हात घालण्याचा प्रयत्न यामधून केला गेला आहे.

मंदार चोळकर रचित गाण्याला अमितराज सारख्या प्रतिभावंत संगीतकाराने स्वर बद्ध केले ख्यातनाम गायक शंकर महादेवन याने ‘निखारे…’ हे गाण गायल. लिटिल चॅम्प रोहित राऊत आणि आनंदी जोशी यांच्या रोमॅण्टिक ‘सहर सहर…’ या गाण्याने चित्रपटाला एक रोमॅण्टिक टच दिला आहे.. आदर्श शिंदेने ‘काही केल्या’ हे गाण सुद्धा तितकंच काळजाला भिडणार आहे.

अभिरूची संपन्न कलाकृतीच्या निर्मितीमागे अंजली आणि निलेश गावडे यांचे खंबीर पाठबळ आहे तर सचिन देव यांच्यासारख्या संवेदनशील दिग्दर्शकाने या गोष्टीला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. सचिन दरेकर यासारख्या प्रतिभावंत लेखकाच्या लेखणीतून साकारलेली पटकथा अन् संवदेनशील संवादांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले नाही तरच नवल. मंदार चोळकर यांच्या गीतांना अमितराजच्या सूरावटींनी रंग भरले आहेत. छायाचित्रणाचा वेगळा अंदाज दाखवला आहे राजा सटाणकर यांच्यासारख्या कसलेल्या सिनेमॅटोग्राफरने तर संतोष फुटाणे यांसारख्या अनुभवी कलाकाराने कलादिग्दर्शनाची जबाबदारी पार पाडली आहे.

मनोरंजन करताना सामाजिक प्रश्नांना व्यासपीठ देणारी कलाकृती म्हणून “कँडल मार्च”कडे पाहता येईल.

उपाध्यक्षपदी अमीर अब्दुल अजीज ईनामदार

0

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट अल्पसंख्यांक आघाडी पुणे शहर उपाध्यक्षपदी अमीर अब्दुल अजीज ईनामदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे . या नियुक्तीचे पत्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट अल्पसंख्यांक आघाडी पुणे शहर कार्याध्यक्ष सैय्यद हबीब यासीन यांनी दिले आहे . रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राष्ट्रीय कोशाध्यक्ष एम. डी. शेवाळे व माजी नगरसेवक नवनाथ कांबळे यांच्या आदेशानुसार नियुक्ती करण्यात आली

अमीर अब्दुल अजीज ईनामदार हे हडपसरमध्ये राहत असून त्यांनी सामाजिक कार्यात त्यांचे महत्वपूर्ण योगदान आहे . त्यांना पत्रदेतेवेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पुणे शहर अध्यक्ष महेंद्र कांबळे , पश्चिम महाराष्ट्र अल्पसंख्यांक आघाडीचे अध्यक्ष रफिक दफेदार , सामाजिक कार्यकर्ते राजू शेठ , हडपसर विधानसभा अध्यक्ष संतोष खरात , अल्पसंख्यांक आघाडीचे हडपसर विधानसभा अध्यक्ष अमीन शेख सामाजिक कार्यकर्ते ईसाक ईनामदार , सामाजिक कार्यकर्ते गुलाबभाई शेख आदी मान्यवर उपस्थित होते .
16

राष्ट्रीय एकता सेवा संघाच्यावतीने नवनिर्वाचित सर्व आमदारांचा सत्कार सोहळा संपन्न

0

राष्ट्रीय एकता सेवा संघाच्यावतीने नवनिर्वाचित सर्व आमदारांचा सत्कार सोहळा संपन्न झाला . या कार्यक्रमात राज्याचे सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास राज्यमंत्री दिलीप कांबळे , आमदार जगदीश मुळीक यांना पुणेरी पगडी घालून , शाल , श्रीफळ आणि पुष्पगुछ देऊन भव्य सत्कार करण्यात आला .

पुणे कॅम्पमधील कॅम्प एज्युकेशन सोसायटी शाळेच्या प्रांगणात या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे शिक्षणमहर्षी प्रा. डॉ. विश्वनाथ कराड ,राज्याचे सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास राज्यमंत्री दिलीप कांबळे , आमदार जगदीश मुळीक , कार्यक्रमाचे सयोजंक राष्ट्रीय एकता सेवा संघाचे अध्यक्ष जाकीर हुसेन कुरेशी, माजी कुलगुरू एस. एन. पठाण , भारतीय जनता पार्टीचे मानव अधिकार सेल महाराष्ट्र प्रदेश समन्वयक अड. रणजीत सांगळे , निवृत्त व्हाइस अडमिरल निझाम नदापह , महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे सदस्य अड. हाजी अहमद उस्मान पठाण, रवींद्र पोमण , माजी नगरसेवक मनीष साळुंके , माजी नगरसेवक गोपाळ चिंतल , डॉ. भरत वैरागे आदी मान्यवर उपस्थित होते .

यावेळी राज्याचे सामाजिक न्याय आणि आदिवासी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी सांगितले ,सर्वसामान्यांना समान न्याय भारतीय जनता पार्टीची भूमिका असल्याचे सांगून भारताला सुजलाम सुफलाम बनविण्याचे आपले सर्वांचे प्रयत्न आहे . त्यासाठी सर्वांनी एकत्रित येणे गरजेचे आहे . त्यासाठी शेजारच्या राष्ट्रांशी मैत्रीचे संबंध करून जगाच्या व्यासपीठावर एकत्र आणतात . त्यात प्रामुख्याने काळा पैसा आणि दहशतवाद हे प्रश्न सोडविण्याचे आहे . राज्यातील वक्फ बोर्डांच्या जमिनी सोडविण्याचे काम सरकार करणार आहे . पुणे कॅंटोन्मेंट मधील प्रलंबित प्रश्न सोडविणार आहे असे त्यांनी सांगितले .

यावेळी शिक्षणमहर्षी प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांनी सांगितले कि , भारतीय संस्कृती हि संस्कृती आणि परंपरावर चालणारी आहे , भारत ते ज्ञानाचे मंदिर आहे . इस्लाम अर्थ शांती आहे . त्यामध्ये मोदी हे समर्थ भारताचे प्रतिक आहे . मुस्लिम बांधव पाच वेळा नमाज पढतात तेव्हा दिवसातून त्या धरतीला पाच वेळा आपला माथा या जमिनीला टेकवतात . त्यामुळे ते या धर्तीचे हक्कदार आहेत .

कार्यक्रमाचे सयोजंक राष्ट्रीय एकता सेवा संघाचे अध्यक्ष जाकीर हुसेन कुरेशी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले कि , राष्ट्रीय एकता सेवा संघ हा सर्व समाजाला एकत्रित बांधण्यासाठी काम करणारी संस्था आहे , त्यामाध्यमातून समाजातील नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार करण्याचे आयोजन करण्यात आले .

या कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत कार्यक्रमाचे सयोजंक राष्ट्रीय एकता सेवा संघाचे अध्यक्ष जाकीर हुसेन कुरेशी यांनी केले तर सूत्रसंचालन आयेशा खान , असमा बेग व माजी नगरसेवक मनीष सालुंके यांनी केले तर आभार भारतीय जनता पार्टीचे मानव अधिकार सेल महाराष्ट्र प्रदेश समन्वयक अड. रणजीत सांगळे यांनी मानले . या कार्यक्रमाचे संयोजनासाठी जमेतुल कुरेश पुणे शहर अध्यक्ष हाजी शकील अहमद कुरेशी , हाजी हसन कुरेशी , हाजी अब्बास मौलाना कुरेशी , हाजी गफूर कुरेशी , हाजी कलाम कुरेशी , इक्बाल शेख , नितीन घुगे , अब्दुल अजीज कुरेशी , इक्तेदार कुरेशी , इर्शाद कुरेशी , अब्दुल अलीम चौधरी , प्रशांत टाईलवाले आदींनी विशेष परिश्रम घेतले .

आगामी निवडणुका कॅंटोन्मेंट बोर्डाच्या आखत्यारित होऊ द्या

0

पुणे कॅंटोन्मेंट कृती समितीच्या अध्यक्षा गितांजली संजय फटके

14

पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाच्या आगामी निवडणुका कॅंटोन्मेंट बोर्डाच्या आखत्यारित होऊ द्या अशी मागणी पुणे कॅंटोन्मेंट कृती समितीच्या अध्यक्षा गितांजली संजय फटके यांनी केली आहे . पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाचा कारभार हा केंद्रातील संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारित चालतो , त्यामुळे आतापर्यंत कॅंटोन्मेंट बोर्डाच्या निवडणुका लष्करी अधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार झाल्या आहेत . त्यामुळे आताच जिल्हाधिकारीच्या नेतृत्वानुसार निवडणुका का ? तसेच , पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाचे वार्ड मतदारांची संख्या देखील कमी असून त्यामध्ये बोर्डाचे आठच वार्ड आहेत . त्यामध्ये जिल्हाधिकारी यांना पुणे जिल्ह्याच्या जबाबदारी मोठ्या प्रमाणावर असतात . हि निवडणूक जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली केल्यास लष्करी अधिकाऱ्याकडे कोणत्या जबाबदाऱ्या उरतात , असा सवाल राहतो . तसेच , कॅंटोन्मेंट बोर्डाचे अधिकारी निवडणुका पार पाडण्यासाठी सक्षम आहेत . अन्यथा लष्करी अधिकाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण्याचे काम चालू आहे . पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाचा नागरी परिसर हा महापालिकेमध्ये विलीन झाल्यास निवडणूक जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्याचे सयुक्तिक ठरेल . तसेच या नागरी परिसरातील रखडलेली विकासकामे होऊ शकतील , त्यामध्ये घरांचा प्रश्न , स्वछतागृहांचा समस्या , पथारीवाल्यांचे पुनरवसन, त्यानंतर त्यामुळे पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाच्या आगामी निवडणुका कॅंटोन्मेंट बोर्डाच्या आखत्यारित होऊ द्या अशी मागणी पुणे कॅंटोन्मेंट कृती समितीच्या अध्यक्षा गितांजली संजय फटके , स्नेहल फटके , अंजली रेडीज , अलका गणदेवीया , स्वाती धामणस्कर , मनोज घाटे , सचिन हिरवे , तिलक परदेशी , सायमन अंथोनी , अरुण सुत्रावे आदींनी मागण्या केल्या आहेत .

भवानी पेठेतील चुडामण तालीम भागात ” स्वछता अभियान “

0

स्वछता अभियानाअंतर्गत पुणेकर सोशल वर्कर्सतर्फे भवानी पेठेतील चुडामण तालीम भागात ” स्वछता अभियान ” राबविण्यात आले . यामध्ये १००० जनजागृतीपर पत्रके वाटण्यात आली . यावेळी कार्यकर्त्यांनी हातामध्ये जनजागृतीपर फलके हातामध्ये धरून घोषणा देऊन ” स्वछता अभियान ” महत्व पटवून दिले . नागरिकांना अभियानास भवानी पेठमधील नवीन ताज बेकरी , चुडामण तालीम , जुना मोटार स्टेन्ड , पदमजी पोलिस चौकी , निशात टाकीज , भगवानदास चाळ , वॉचमेकर चाळ या भागात तरुणानी हातात खराटे घेऊन हेंडग्लोज घालून तोंडाला मास लाऊन सुमारे २० पोती कचरा उचलण्यात आला . हा महापालिकेच्या कचरा कुंड्यामध्ये टाकण्यात आला .

या स्वछता अभियानमध्ये रेहान शेख , अमीर शेख , असिफ शेख , निलेश गुमटे , हुसेन शेख , गोविंदा वरदानी , साबीर शेख , ऋषिकेश यादव , अशफाक पंजाबी , मेन्युअल जोसेफ , फुरकान पेनवाले , अबरार रियाझ , तौसीफ शेख , महेश पोफळे , सफवान खान , अबू बकद , मोबीन सय्यद , नबिरजा शेख , अल्ताफ इसाक , शारिक शकूर , अभिजित लेंगरे , तुषार परदेशी आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते .

यामध्ये कृपया कचरा पेटीतच टाका , जन जन मी याह संकल्प जगाये अपने शहर को स्वछ बनाये , अपना शहर साथ हो इसमे मेरा हाथ हो , स्वछता पाळा डेंग्यूला आळा घाला , नक्षीदार रांगोळी घराला तोरण अस्वछता संपवू हेच आपले धोरण , वातावरण को हे अगर बचाना हरियाली और सफाई को अपनाना , आओ भारत स्वछ बनाये , मेरा शहर साफ हो इसमे मेरा भी हाथ हो अशी जनजागृतीपर संदेश फलकाद्वारे देण्यात आला .
13

“सजग नागरिकांचा पर्यावरणविषयक उपक्रमात सहभाग आवश्यक’ ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांची अपेक्षा

0

पुणे :
“पर्यावरणीय कायदे आपल्याकडे आहेत. परंतु त्याची अंमलबजावणी नीट होत नाही. पर्यावरण अहवाल निघत असतात त्याची माहिती महापालिकेने देणे आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत:हून पर्यावरणाबाबत सजग राहून पर्यावरणीय उपक्रम राबवून स्वत: सहभाग घ्यायला हवा, असे आवाहन ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांनी केले. पर्यावरण, गृहनिर्मिती क्षेत्रात काम करणाऱ्या गंगोत्री संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित निसर्गस्नेही जीवनशैली या कार्यक्रमात ते बोलत होते. हा कार्यक्रम शनिवार, दिनांक 22 नोव्हेंबर रोजी “शिवचैतन्य सभागृह’ (कोथरूड) येथे पार पडला.

या कार्यक्रमाला “गंगोत्री’चे संचालक गणेश जाधव, राजेंद्र आवटे, मकरंद केळकर उपस्थित होते. यावेळी गाडगीळ यांनी प्रश्नोत्तराच्या माध्यामतून उपस्थितांशी संवाद साधला.

“ऑस्ट्रेलियामध्ये “सिटिझन रिव्हर वॉच’ नावाचा उपक्रम राबविला जातो. त्या उपक्रमांतर्गत लोकांना पाण्याची सध्याची स्थिती काय आहे, हे सांगितले जाते. प्रयोगशाळेत नेऊन नागरिकांच्या सहभागातून प्रयोग केले जातात त्यातून नागरिकांमध्ये जनजागृती होते, असे जनजागृती करणारे उपक्रम आपल्याकडे राबवायला हवेत’, असे मत ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांनी व्यक्त केले.

गाडगीळ म्हणाले, “ऑस्ट्रेलियामध्ये “सिटिझन रिव्हर वॉच’ नावाचा उपक्रम राबविला जातो. त्या उपक्रमांतर्गत लोकांना पाण्याची सध्याची स्थिती काय आहे, हे सांगितले जाते. प्रयोगशाळेत नेऊन नागरिकांच्या सहभागातून प्रयोग केले जातात त्यातून नागरिकांमध्ये जनजागृती होते, असे जनजागृती करणारे उपक्रम आपल्याकडे राबवायला हवेत. पर्यावरण विषय निघाला की, सध्या पर्यावरणाची हानी होत आहे. विज्ञान तंत्रज्ञानामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे, असे बोलले जाते.’

विज्ञान आणि वाढत्या लोकसंख्येमुळे केवळ अधोगतीच झाली आहे, असे नव्हे, तर प्रगतीही बरीच झाली आहे. शहरातील टिंबर मार्केटवाले फर्निचरसाठी वडाची झाडे सर्रास कापत आहेत, अशीही माहिती आहे; परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जाते. सरकार, प्रशासनामध्ये चांगले लोक आहेत; परंतु यंत्रणा नक्कीच सडली आहे. पुण्यात अनेक वेळा नागरिकांनी उत्स्फूर्तपणे टेकडी बचाव सारखी आंदोलने केली आहेत. मातीत खेळा, जेथे जाल तेथील पाणी प्यावे नाहीतर शरीराला त्याची सवय लागते. याचे उदाहरण म्हणजे माझ्या अमेरिकेतील एका मित्राला गव्हाची ऍलर्जी आहे. त्यामुळे निसर्गात ज्या गोष्टी आहेत. त्यासोबत आपण जुळवून घ्यायला हवे. निसर्गातील पशू, पक्षी, प्राणी साफ करून आपण नाही राहू शकत. त्यामुळे घरात पाली, झुरळे असावीत, असे गंमतीने सांगितले.

यावेळी उपस्थितांपैकी एकाने हल्ली टेकड्यांवर विदेशी झाडे लावली जातात, असे विचारले. यावर विदेशी झाडांचा पशू, पक्षी, किटकांना काहीच फायदा नाही. पक्षी अशा झाडांवर घरटी करीत नाहीत. त्यामुळे अशी झाडे लावू नयेत आणि लावलेली झाडे काढून देशी झाडे लावावीत असे सुचविले.’

डेंग्यु सर्वेक्षण आणि गणपती विसर्जन मिरवणूक मदतकार्यातील डॉक्टर सेवक-सुहृदांसाठी कृतज्ञता समारंभ

0

पुणे:
“शहरात डेंग्युला अटकाव घालण्यासाठी पालिका करीत असलेल्या उपाय योजनांतील सर्वेक्षण कार्यात राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या आणि “बीव्हीजी इंडिया लिमिटेड’ या सेवा क्षेत्रातील कंपनीच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या “महाराष्ट्र मेडिकल इमर्जन्सी सर्व्हिसेस’च्या डॉक्टरांनी दिलेले योगदान कौतुकास्पद आहे. ही सर्वेक्षण मोहिम झोपडपट्टी भागातील दीड लाख नागरिकांपर्यंत पोहोचली’, असे उद्‌गार भारतीय जनता पक्षाचे आमदार विजय काळे यांनी डॉक्टर सेवक- सुहृदांसांठी कृतज्ञता समारंभात काढले.

हा कृतज्ञता कार्यक्रम सोमवार दिनांक, 24 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता “वडके सभागृह’ (पुणे महानगरपालिका) येथे झाला. डॉ. संजय वावरे (सहाय्यक आरोग्य अधिकारी, पुणे महानगरपालिका) बोलताना म्हणाले, ” साथीच्या रोगावर नियंत्रण मोहिमेचे आयोजन करणारी पुणे महानगरपालिका एकमेव पालिका ठरली आहे.’

यावेळी कर्मचारी, डॉक्टर, अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला. “एमईएमएस’ चे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर डॉ. ज्ञानेश्वर शेळके यांनी यावेळी “डायल 108′ या अत्याधुनिक वैद्यकीय सेवेबद्दल माहिती दिली. एमईएमएस चे डॉ. प्रविण साधले, डॉ. प्रविण कोतवाल यांनी या मोहिमेच्या आयोजनात मदत केली.

पुण्यातील इंदिरा वसाहत, कस्तुरबा, बोपोडी (औंध), शंकर महाराज वसाहत, के.के मार्केट इंदिरानगर, आंबेडकरनगर (बिबवेवाडी), भवानी पेठ, कासेवाडी भवानी पेठ अशोक नगर, रामनगर (वारजे), जनवाडी, गोखलेनगर, पांडवनगर, वडारवाडी, संगमवाडी, विश्रांतवाडी (घोले रोड), वैधुवाडी कृष्णानगर, माळवाडी (हडपसर), यमुनानगर, विमाननगर, गांधीनगर, नागपूर चाळ (नगर रोड), लोअर इंदिरानगर धनकवडी, मार्केटयार्ड, भीमनगर, सिदार्थनगर-निंब, (कोंढवा), शिवाजीनगर, डीपी रोड, गुलटेकडी, ढोले-पाटील रोड या भागामध्ये पालिकेची डेंग्यु अटकाव मोहिम सुरू आहे.

पालिकेच्या या मोहिमेतील सर्वेक्षण कार्यात “महाराष्ट्र मेडिकल इमर्जन्सी सर्व्हिसेस’ चे 42 डॉक्टर्स व कर्मचारी सहभागी आहेत. गणपती विसर्जन अणि डेंग्यू सर्वेक्षणाच्या मदतकार्यात सहभागी झालेले डॉक्टर्स, पायलट, सहाय्यक, अधिकारी यांचा कृतज्ञता सन्मान करण्यात आला. एमईएमएस चे डॉ.साकेत टीळेकर यांनी कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले.

“26 जानेवारी 2014 रोजी सुरू झालेल्या या अत्याधुनिक वैद्यकीय सेवेसाठी 108 या दूरध्वनी क्रमांकावर डायल केल्यास सुसज्ज रुग्णवाहिका डॉक्टरांसह येते. 108 डायल वातानुकुलित विनामूल्य सेवा रूग्णवाहिकांमध्ये प्राण वाचविण्यासाठी व्हेंटीलेटरसहित सर्व अत्याधुनिक वैद्यकीय साधने आहेत. या सेवेचे मुख्य संचालन केंद्र व “रिस्पॉन्स सेंटर’ औंध उरो रुग्णालय (पुणे) येथे आहे, असे “बी.व्ही.जी. इंडिया’चे अध्यक्ष एच.आर. गायकवाड यांनी सांगितले.

महात्मा ज्योतीराव फुले आणि सावित्रीमाई फुले यांच्या जीवनावर आधारीत नाटक “ज्योती – सावित्री”

0

महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवून स्त्री समाजाला शिक्षणासाठी प्रवुत्त करणारे ध्येयवादी त्याचप्रमाणे समाजातून जातीभेदाची कीड समूळ नष्ट करण्यासाठी प्राणपणाने लढणारे सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा ज्योतीराव फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीमाई फुले यांचा संपूर्ण जीवन संग्राम उलगडून दाखवणारे नवीन नाटक “ज्योती – सावित्री” लवकरच रंगभूमीवर येत असून त्याचा प्रारंभाचा प्रयोग ज्योतीराव फुले यांच्या १२४ व्या स्मृतिदिनी, शुक्रवार दि. २८ नोव्हेंबर, २०१४ रोजी रात्रो ८ वाजता यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा येथे होणार आहे. स्वयंदिप हया नाट्यसंस्थेच्या बॅनरखाली निर्माते मंगेश पवार आणि कविता मोरवणकर ह्यांनी संयुक्तरीत्या हया नाटकाची निर्मिती व लेखन केले असून प्रमोद सुर्वे यांनी दिग्दर्शन केले आहे.

सामाजिक क्रांतीचे प्रणेते पितामह ज्योतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांनी विषमतावादी समाजव्यवस्था आणि वर्ण व्यवस्थेच्या विरोधात केलेला विद्रोह लोकांपर्यंत पोहोचावा तसेच त्यांनी दिलेला लढा ही एक चळवळ आहे, क्रांतीची दिशा आहे यादृष्टीने विचार करून हया नाटकाची निर्मिती करण्यात आली आहे. ज्योतीराव फुले यांच्या सन १८४५ ते १८९० मृत्यूपर्यंतच्या कालखंडातील जीवनाचा आणि सामाजिक कार्याचा आढावा हया नाटकात घेतला आहे. ही कथा वास्तव स्वरुपात प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ज्योतीराव फुले यांच्या पुण्याच्या गंज पेठेतील वाड्यात काही ऐतिहासिक घटनांचे चित्रीकरण केले असून ते हया नाटकात दाखवण्यात येणार आहे. त्यात सत्यशोधक समाजाची स्थापनेची सभा, अस्पृश्यांसाठी खुला केलेला हौद, सावित्रीबाईना स्त्री शिक्षणासाठी होणारा विरोध अशा ठराविक घडामोडींचा समावेश आहे. हया नाटकात दोन गीतांचा समावेश केला असून त्यातील “सावित्री संगे ज्योती उभा” हे गीत मंगेश पवार यांनी लिहिले आहे तर ज्योतीराव फुले यांच्या लेखणीतून उतरलेले “विद्येविना गती गेली, गतीविना मती गेली” हे दोहे यात गीतस्वरुपात यात सादर केले आहे.

“ज्योती – सावित्री” हया नाटकाचे सहाय्यक दिग्दर्शन व व्यवस्थापन अभिनेते राहुल पवार यांनी सांभाळले असून नेपथ्य सचिन गोताड, प्रकाश योजना शाम चव्हाण, रंगभूषा व वेशभूषा मिलिंद कोचरेकर यांची आहे. संगीतकार प्रितम गडकरी यांनी हया नाटकाला संगीत दिले असून गायक प्रवीण डोणे, सुनील कदम, महेश्वरी आढाव, रोहित राणे, संदीप वाडेकर यांनी पार्श्वगायन केले आहे. यात ज्योतीराव फुले यांची भूमिका विक्रांत वाडकर व सावित्रीमाईची भुमिका प्रतिक्षा साबळे यांनी केली असून त्यांची शिष्या मुक्ता साळवे हीची भूमिका मुक्ता पवार यांनी केली आहे. सोबत दीपक मोरे, देवेंद्र पवार, प्रशांत मनोरे, नितिन कांबळे, प्रवीण डोणे, विनोद शिंदे, परी जाधव, कृतिका नागवेकर यांच्या भूमिका आहेत.

स्वयंदिप ही संस्था गेली १२ वर्ष नाट्यक्षेत्रामध्ये कलाकार घडविण्याच्या उद्देश्याने कार्यरत असून यापूर्वीही अनेक राज्यस्तरीय नाटके तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरील नाटके सादर केली आहेत. भविष्यात ही संस्था नव – नवीन नाटकांची निर्मिती करून कलाकारांना वाव देण्याचा प्रयत्न करणार आहे.

लोकसभा व राज्यसभा दिवसभरासाठी स्थगित

0

नवी दिल्ली – माजी केंद्रीय मंत्री व राज्यसभेचे खासदार मुरली देवरा यांच्यासह निधन झालेल्या अन्य लोकसभा व राज्यसभा सदस्यांना श्रद्धांजली वाहत आज (सोमवार) पहिल्याच दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.

संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होणार होते. पण, पहिल्याच दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये नुकतेच निधन झालेल्या सदस्यांना व नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत्यू झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी कामकाज दिवसभरासाठी स्थगित केले. त्यापूर्वी लोकसभा व राज्यसभेत नव्याने निवडून आलेल्या सदस्यांना शपथ देण्यात आली. गोपीनाथ मुंडे यांच्या जागी निवडून आलेल्या त्यांची कन्या प्रीतम मुंडे यांनी मराठीतून शपथ घेतली.

या अधिवेशनामध्ये केंद्र सरकार आपला आर्थिक अजेंडा पुढे करण्याची शक्‍यता आहे. सरकारच्या या अजेंड्याला विरोधी पक्षांकडून तीव्र विरोध होण्याची शक्‍यता आहे. केंद्रात सत्तेवर आल्यानंतर नरेंद्र मोदी सरकारचे हे दुसरे मोठे अधिवेशन आहे. मोठ्या प्रमाणावर आर्थिक बदल करणार असल्याचे सरकारने आधीच सूचित केले होते. परकी गुंतवणूकीला परवानगी देणारे प्रलंबित विमा विधेयक आणि वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) विधेयक हे सादर करण्याचे सरकारच्या अजेंड्यावर आहे. कोळसा ठराव विधेयकाची जागा घेणारे विधेयक सादर करण्यालाही सरकारचे प्राधान्य असणार आहे. या विधेयकांबाबत दोन्ही सभागृहांमध्ये समान धोरण ठरविण्यासाठी काही आठवड्यांपूर्वीच “जनता‘ पक्षांनी एकत्र बैठक घेतली होती.

संयुक्त जनता दल, राष्ट्रीय जनता दल, धर्मनिरपेक्ष जनता दल आणि समाजवादी पक्षाने सरकारच्या या विधेयकांबाबत समान भूमिका घेण्याचे ठरविले आहे. या पक्षांच्या लोकसभेत एकूण 15, तर राज्यसभेत 25 जागा आहेत. कॉंग्रेसही सरकारच्या विधेयकांना विरोध करण्याची शक्‍यता आहे.

‘ हेल्मेट चे भूत पुणे पोलिसांच्या डोक्यातून तातडीने उतरवा ‘उद्या मुख्यमंत्र्यांपुढे बोलणार कोण ?

0

पुणे- हेल्मेट चे भूत पुणे पोलिसांच्या डोक्यातून तातडीने उतरवा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करा अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे पुण्याच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी मंगळवारी विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक बोलविली आहे. या पार्शभूमीवर हि मागणी होते आहे . आमदार असून रस्त्यावर उतरून विरोधी पक्षांप्रमाणे , सामान्य नागरिकांप्रमाणे आंदोलने काय करता – मौख्य्मान्त्र्याक्डून पुणे पोलिसांची कान उघाडणी करा असे हि वाहनचालक बोलत आहेत
दरम्यान या बैठकीच्या तयारीसाठी रविवारी महापालिका आयुक्त कुणाल कुमार व अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्या अध्यक्षतेखाली महापलिकेतील विभाग प्रमुखांची बैठक झाली. बैठकीत सादरीकरणासाठी आवश्‍यक गोष्टींची तयारी करण्यात आल्याचे महापालिकेतील सूत्रांनी सांगितले.
मेट्रो, बीआरटीचा निधी, पूर्व भागासाठी स्वतंत्र महापालिकेचा प्रस्ताव, पुणे महानगर प्रादेशिक विकास प्रधिकरण (पीएमआरडीए), नवीन गावांचा समावेश, पीएमपीएमएलसाठी पाचशे बस, जलशुद्धीकरण प्रकल्पासह पुण्यासाठी अन्य काही महत्त्वाचे प्रश्‍न गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर या विषयांचे सादरीकरण करण्यासाठी महापालिका प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे. प्रश्‍न जुनेच आहेत. मात्र, प्रशासनाला नव्या सरकारकडे ते नव्याने मांडावे लागणार आहेत.
झोपडपट्टी पुनर्वसन नियमावली (एसआरए), म्हाडाचा वाढीव “एफएसआय‘, मलनि:सारण हेदेखील महत्त्वाचे विषय आहेत. पंडित जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजना (जेएनएनयूआरएम) केंद्रातील कॉंग्रेस सरकारच्या काळात सुरू झाली. गेली दहा वर्षे सुरू असलेल्या या योजनेतून सीएसयूपी, बस खरेदी, बीआरटी प्रकल्प, नदी सुधारणा प्रकल्प, जलशुद्धीकरण केंद्र, तलावांचे पुनरुज्जीवन व जलनि:सारणाच्या प्रकल्पावर दोन टप्प्यांत सुमारे दीड हजार कोटी रुपये खर्च झाला. एवढा निधी खर्च केल्यानंतर एकही प्रकल्प शंभर टक्के मार्गी लागलेला नाही.
कामाला उशीर होत असल्याने प्रस्तावित मेट्रो प्रकल्पाचा खर्च वाढणार आहे. त्रुटी दूर करून महापालिकेने मेट्रोचा सुधारित प्रस्ताव राज्य सरकारमार्फत केंद्र सरकारकडे पाठविला आहे. बस खरेदीसारखा अत्यंत महत्त्वाचा विषय मार्गी लागत नाही. बीएसयूपीच्या प्रकल्पासाठी उर्वरित निधी अद्याप मिळालेला नाही. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड महापालिका, नगरपालिका व हद्दीलगतच्या गावांचा प्रादेशिक विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या “पीएमआरडीए‘चे काम बंद आहे. भामा आसखेड योजनेच्या भूसंपादनाचे काम निधीसाठी थांबले आहे.

“रज्जूचक्षू’ प्रकल्प महत्त्वाचा ठरेल – राज्यमंत्री कांबळे

0

पुणे – “”शहरातील अनेकांचे नातेवाईक देश-विदेशात राहतात. येथे नातेवाईक, मित्रपरिवार यांच्यापैकी कोणाचा मृत्यू झाल्यास त्यांना अंत्यविधीसाठी येणे शक्‍य होत नाही. त्यामुळे रज्जूचक्षू हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे,‘‘ असे मत सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी रविवारी येथे व्यक्त केले.

निनाद संस्थेने वैकुंठ स्मशानभूमीत हा प्रकल्प उभारला आहे. याचे उद्‌घाटन कांबळे यांच्या हस्ते झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कसबा विभागाचे सहसंघचालक सुहास पवार, माजी नगरसेविका शुभदा जोशी, संस्थेचे संस्थापक उदय जोशी उपस्थित होते.

उदय जोशी म्हणाले, “”अंत्यविधीसाठी येऊ न शकणाऱ्यांना मृतांच्या नातेवाइकांना अंत्यविधी पाहता यावा, यासाठी हा प्रकल्प आहे. हा प्रकल्प केवळ विद्युतदाहिनीत सुरू केला आहे.‘‘ या प्रकल्पाद्वारे जगातून कोणत्याही ठिकाणाहून आपल्या नातेवाइकांचा अंत्यविधी पाहता येणार आहे. संस्थेतर्फे अंत्यविधीची चित्रफीत पेनड्राइव्हमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे.