Home Blog Page 3632

बार असोसिएशन आयोजित ‘मिस्टर अँड मिसेस’नाटकाच्या प्रयोगासमयी प्रेक्षकांतून अश्लील शेरेबाजी -कलाकारांनी व्यक्त केला संताप

0

आक्षेपार्ह कृत्य वकिलांनी केला नसल्याचा बार असोसिएशनतर्फे  दावा

पुणे – पुणे बार असोसिएशनतर्फे आयोजित “मिस्टर अँड मिसेस‘ या नाटकाचा प्रयोग गोंधळात पार पडला. प्रयोगादरम्यान वकिलांनी आक्षेपार्ह शेरेबाजी केल्याची तक्रार कलाकारांनी केली. तर कोणतेही आक्षेपार्ह कृत्य वकिलांनी केला नसल्याचा दावा अध्यक्ष विकास ढगे पाटील यांनी केला.
शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता या नाटकाचा प्रयोग आयोजित केला होता. या प्रयोगाविषयी अभिनेता चिन्मय मांडलेकर आणि अभिनेत्री मधुरा वेलणकर यांनी नाराजी आणि वकिलांच्या या वर्तणुकीचा मनस्ताप व्यक्त केला. याबाबत मांडलेकर म्हणाला, ‘प्रयोगाच्या सुरवातीपासूनच वकिलांनी आक्षेपार्ह शेरेबाजी सुरू केली. ही शेरेबाजी करणाऱ्यांना काही जणांनी थांबविण्याचा प्रयत्नही केला. ती न थांबल्यामुळे मध्यंतरापूर्वी आम्ही प्रयोग काही वेळ थांबविला. त्यांना शेरेबाजी न करण्याची विनंती केली. परंतु, प्रयोगाच्या दुसऱ्या अंकातही ती शेवटपर्यंत सुरूच राहिली. वकिलांकडून अशा वर्तनाची अपेक्षा आम्ही केली नव्हती. मध्यंतरात या प्रकाराबद्दल काही वकिलांकडे तक्रार केली होती. या प्रकाराबद्दल संघटनेकडून कोणतीही दिलगिरी व्यक्त केली गेली नाही.‘‘ नाराजी व्यक्त करीत मधुरा म्हणाली ‘आमच्या नाटकाचा हा 151 वा प्रयोग होता. अत्यंत दर्जेदार नाटक असून, अशाप्रकारे वाद निर्माण करून नाटकाला प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा वकिलांचा आरोप चुकीचा आहे. ‘‘

या बाबतीत असोसिएशनचे अध्यक्ष विकास ढगे – पाटील म्हणाले, ‘नाटकाचा प्रयोग साडेनऊऐवजी दहा वाजता सुरू झाल्याने सुरवातीला थोडी गडबड झाली. पण वकिलांनी आक्षेपार्ह शेरेबाजी केली नाही. प्रयोग थांबविला नाही, त्यांनी मध्यतंराच्या वेळी माझ्याकडे तक्रार केली नाही. मी संयोजक होतो, संपूर्ण नाटक मी पाहिले. मध्यतंराला सर्व कलाकारांचा संघटनेतर्फे सत्कारही केला. तेव्हा ते मला सांगू शकले असते. केवळ प्रसिद्धी मिळविण्यासाठी हा प्रकार केला जात आहे.‘‘

खा.वंदना चव्हाण यांनी घेतली आयुक्तांसमवेत बैठक

0
3s
पुणे:
‘ब्रँडिंग पुणे’, हेरिटेज पर्यटन, ‘सायन्स पार्क’ ची उभारणी ‘दिल्ली हट’ च्या धर्तीवर ‘पुणे हट’ ‘बाजार प्रदर्शन’, नदीत पडणारा राडारोडा तातडीने थांबविणे अशा अनेक महत्वाच्या मुद्यांसाठी आज खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण यांनी आयुक्त कुणाल कुमार यांच्याबरोबर बैठक घेतली. यावेळी महापौर  दत्तात्रय धनकवडे, सभागृह नेते सुभाष जगताप, स्थायी समिती अध्यक्ष बापूसाहेब कर्णेगुरूजी,  हेरिटेज विभागाचे प्रमुख श्याम ढवळे, उद्यान विभाग प्रमुख घोरपडे, अतिरीक्त आयुक्त ॐप्रकाश बकोरिया,शहर अभियंता प्रशांत वाघमारे, रवी चौधरी, संघटक युवती राष्ट्रवादी काँग्रेस मनाली भिलारे, आणि प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
‘ब्रँडिंग पुणे’ साठी या क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा घडविली पाहिजे. ब्रँडिंगच्या वास्तू केल्या पाहिजेत आणि हेरिटेज पर्यटनाला चालना दिली पाहिजे. ‘सायन्स पार्क’ च्या उभारणी गती देण्याबरोबर फुलपाखरू उद्यान, पुणे शहराची प्रवेश द्वारे, पेशवे पार्कचे उर्जा उद्यान पुन्हा सुरू करणे अशा मुद्यांवर आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचेे खासदार वंदना चव्हाण यांनी पत्रकाद्वज्ञारे  सांगितले. पर्यटन प्रकल्पांना पाठपुरावा करण्यासाठी विविध क्षेत्रातील पुणेकर नागरिकांची समिती स्थापन करण्याची सूचना अ‍ॅड.वंदना च्वहाण यांनी केली.
 नदी पात्रात सातत्याने राडारोडा टाकला जात असल्याकडे खा.चव्हाण यांनी आयुक्तांचे लक्ष वेधले. कचरा व्यवस्थापनाचा आराखडा, ‘अ‍ॅमिनीटी स्पेस’चे मॅपिंग यावरही चर्चा झाली.
‘दिल्ली हट‘ च्या धर्तीवर पु.ल.देशपांडे उद्यानानजिक ‘पुणे हट’ हे प्रदर्शन व्यापार केंद्र सुरू करण्याबाबत अ‍ॅड. चव्हाण आग्रही आहेत.
पुणे दर्शन बस आकर्षक करणे, बंडगार्डन ला आर्ट प्लाझा करणे. पर्यटकांसाठी माहिती केंद्र उभारणे अशा सूचना करण्यात आल्या. गणेश विसर्जन मिरवणुकीच्या वेळेला लक्ष्मी रस्त्यावर नागरिक पर्यटकांना बैठक व्यवस्था करणे, सांस्कृतिक उत्सवांचे कॅलेंडर करणे, ब्रोशर करणे यावरही चर्चा झाली.

‘एक तारा ‘नंतर संतोष जुवेकरचा थरारक ‘बायकर्स अड्डा’ हि बनला यंदाचे आकर्षण

0
मोकळ्या रस्त्यावर वाऱ्याशी तुफान स्पर्धा..  बेफाम स्टन्टस.. थरारक रेसिंग्स आणि बाईकर्स. तारुण्याचा जोष आणि थरार दिसून येतो तो बाईकिंगमध्ये. बाईकिंग ही केवळ तारुण्यातली नशा न राहता करिअर म्हणूनही या क्षेत्राला वलय आलंय. हेवेदावे आणि स्पर्धा यात न अडकता स्पोर्टिंगली घेत निरनिराळे स्टन्ट करत आपले कौशल्य बाईकर्स आणि त्यांचे ग्रुप्स जगासमोर आणू लागलेत. बाईकिंगचे हेच वेड, त्यांच्यातले संघर्ष, येणाऱ्या अडचणी, एकमेकांवर केलेल्या कुरघोडी, शह-मातचा रोमांचकारी खेळ आपल्याला आगामी ‘बायकर्स अड्डा’मध्ये पहायला मिळणार आहे. श्री नवकर प्रस्तुत प्रमोद मारुती लोखंडे, विजय हरिया निर्मित, गणेश रमेश निबे सहनिर्मित आणि राजेश लाटकर लिखित-दिग्दर्शित ‘बायकर्स अड्डा’ हा चित्रपट येत्या १० एप्रिलला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. त्याआधी चित्रपटाची तरुणांमध्ये असलेली क्रेझ ओळखून ‘बायकर्स अड्डा’चा फर्स्ट लूक आणि गाण्यांची खास झलक नुकत्याच एका दिमाखदार सोहळ्यात दाखवण्यात आली. केंद्रीय मंत्री श्री. श्रीपाद नाईकसाहेब यांच्या शुभहस्ते चित्रपटाच्या ध्वनिफितीचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी श्री. अमर सिंह, सुप्रसिद्ध अभिनेत्री जयाप्रदा, सुप्रसिद्ध संगीतकार श्री. आनंद राज आनंद, श्री. दिपकभाऊ निकाळजे, श्री. सुधीर गिरी आणि श्री, कुमार मंगत, मा. वंदना जैन तसेच हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील असंख्य मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
सुपर बाईकवर फुल ऑन स्टायलिश एन्ट्री घेत संतोष जुवेकरने उपस्थित रसिकांची वाहवा मिळवली. प्रार्थना बेहेरे आणि संतोष जुवेकरने दिलेला रोमांटीक परफ़ोर्मन्स, गायिका शाल्मली खोलगडेचे मधाळ स्वर आणि विशी-निमो यांच्या रॉकिंग म्युझिकच्या उत्साही वातावरणात उपस्थित सगळ्यांनीच ठेका धरला. ‘लेक्चर ग्यान’, ‘आला रे आला बाप्पा तू आला’, ‘ट्युन टू लव्ह’, ‘रिमझिम’, ‘वल्लाह वल्लाह’ अशी वेगवेळ्या मूडची गाणी ‘बायकर्स अड्डा’ मध्ये ऐकायला मिळतील. सत्यजित रानडे, प्रशांत हळवे, श्रेयस धर्माधिकारी आणि अमित जॉन यांनी ही गीते लिहिली आहेत तर जसराज जोशी, शाल्मली खोलगडे, श्रेयस धर्माधिकारी, प्रियांका बर्वे, शोना गोन्साल्विस आणि सिद्धांत भोसले यांनी ती गायली आहेत. म्युजिक लॉंचसोबतच ‘बायकर्स अड्डा’चा फर्स्ट लूकही यावेळी दाखवण्यात आला. ४ मित्र आणि त्यांचा बाईकिंगकडे असणारा ओढा या कथानकाभोवती चित्रपटाची कथा गुंफण्यात आली आहे. ‘बायकर्स अड्डा’मध्ये संतोष जुवेकर आणि प्रार्थना बेहेरेसोबत श्रीकांत मोघे, श्रीकांत वट्टमवार, राहुलराज डोंगरे हृषीकेश मांडके, जय आदित्य गिरी, अनिरुद्ध हरीप, देवेंद्र भगत आणि निखिल राजेशिर्के आदींच्या प्रमुख भूमिका पहायला मिळतील.
फ्रेश लूक आणि मन्सूर आझमी यांच्या वेगवान संकलनामुळे ‘बायकर्स अड्डा’चा ट्रेलर तरुणांना आकर्षित करतोय. मेहुल कपाडिया, जीत सिंग आणि संतोष पालवणकर यांनी चित्रपटातील गाणी कोरिओग्राफ केली आहे तर शकील खान यांच्या छायांकनाने ‘बायकर्स अड्डा’ चे सेट्स, लोकेशन्सना योग्य न्याय दिला आहे. कला दिग्दर्शन आणि कार्यकारी निर्मात्याची जबादारी अतुल तारकर यांनी सांभाळली आहे. वेशभूषा – चैत्राली डोंगरे, साहसदृश्य – प्रशांत नाईक आणि मेकअप – किरण सावंत ही इतर श्रेयनामावली आहे.

परवडणाऱ्या , प्रगत आणि उत्तम वैद्यकीय उपचारांसाठी संशोधन व्हावे :डॉ रघुनाथ माशेलकर

0
स्पाइन सर्जन च्या २८ व्या  अखिल भारतीय वार्षिक परिषदेचे उद्घाटन
पुणे :
प्रगत संशोधनाचे युग अवतरले असल्याने आरोग्याच्या क्षेत्रातही अत्याधुनिक ,उत्कृष्ट तरीही सर्वाना परवडणाऱ्या उपचारांचे संशोधन व्हावे आणि  ‘असोसिअशन ऑफ स्पाइन सर्जन ‘ ने त्यासाठी पुढाकार घ्यावा ‘ असे आवाहन नामवंत शास्त्रज्ञ डॉ रघुनाथ माशेलकर यांनी आज केले .
‘असोसिअशन ऑफ स्पाइन सर्जन ‘ च्या वतीने ‘एसिकोन २०१५ ‘ या  ३ दिवसीय २८ व्या अखिल भारतीय परिषदेचे उद्घाटन शुक्रवारी सायंकाळी डॉ रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते झाले . त्यावेळी ते ‘भारत आणि उत्तमतेचा  प्रगत शोध ‘ या विषयावर परिषदेचे उद्घाटक या नात्याने बोलत होते. मेरीयट हॉटेल येथे हि परिषद आजपासून सुरु झाली
 ‘असोसिअशन ऑफ स्पाइन सर्जन ‘ चे अध्यक्ष डॉ साजन हेगडे ,परिषदेचे सचिव डॉ अमोल रेगे , पुणे   ‘असोसिअशन ऑफ स्पाइन सर्जन  चे माजी अध्यक्ष  डॉ शरद हर्डीकर ,तसेच डॉ  राम छड्डा ,डॉ  सौम्यजित बसू ,डॉ  विनोद  इंगळहल्लीकर आणि आंतर राष्ट्रीय प्रतिनिधी व्यासपीठावर उपस्थित होते
डॉ माशेलकर म्हणाले ,’ बदलत्या काळात भारत जोमाने प्रगती करीत आहे .  संशोधनातील प्रगत उत्कृष्ठ्ता परवडणाऱ्या दरात सर्वाना उपलब्ध होत आहे . अशावेळी  आरोग्याच्या क्षेत्रातही अत्याधुनिक ,उत्कृष्ट तरीही सर्वाना परवडणाऱ्या उपचारांचे संशोधन व्हावे आणि  ‘असोसिअशन ऑफ स्पाइन सर्जन ‘ ने त्यासाठी पुढाकार घ्यावा ‘
‘सर्वांसाठी आरोग्य ‘ हे मिशन शक्य तेत उतरविण्यासाठी भारतीय नागरीक,संस्था ,संशोधक आणि उदयोगानि पुढे यायला हवे . कमीत कमी छेद घेवून मणक्याच्या शस्त्रक्रिया चे संशोधन होत असले तरी इथून पुढे छेद न घेताच मणक्याचे उपचार शक्य होतील याचे संशोधन करावे ‘ असे ते  म्हणाले
उत्कृष्ट संशोधन ,तंत्रज्ञान आणि सुविधा महाग दरात देण्यापेक्षा ,सर्वाना परवडणाऱ्या दरात मिळण्याची गरज आहे . जयपूर फुट ,हृदय शस्त्रक्रिया ,मोतीबिंदू शस्त्रक्रिया ,लशी या  आरोग्य क्षेत्रातील उतृष्ठ आणि परवडणाऱ्या भारतीय संशोधनांची उदाहरणे त्यांनी दिली
डॉ साजन हेगडे आणि डॉ अमोल रेगे यांनी स्वागत केले

अण्णांच्या आंदोलनप्रसंगी किरण बेदी भाजपसाठी हेरगिरी करीत होत्या काय ?

0
नवी दिल्ली – अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात किरण बेदी या भाजपसाठी हेरगिरी करत होत्या काय?  आता आप चे नेते कुमार विश्वास यांनी केला आहे .
 कुमार विश्वास म्हणाले की, इंडिया अगेन्स्ट करप्शन (आयएसी) च्या टीममध्ये सर्वांना किरण बेदींवर संशय होता. तो संशय आता खरा ठरा आहे. बेंदी मुंख्यमंत्रीपदाच्या उमेदवार बनल्याने आपलाच फायदा होणार आहे. कारण भाजपकडे केजरीवालांच्या तोडीचा उमेदवार नसल्याचे त्यावरून स्पष्ट होते. तर मनीष शिसोदिया यांनी किरण बेदी भाजपसाठी आंदोलनात उतरल्या होत्या असा आरोप केला आहे. एकेकाळी ज्या काळ्या पैशाच्या मुद्यावरून बेदी भाजपवर टीका करायच्या तोच काळा पैसा त्यांना आता आपलासा वाटत असल्याचेही ते म्हणाले. तर किरण बेदींनी भाजप विरोधात जी वक्तव्ये केली होती, त्यावर आता त्या काय उत्तर देतील, अशा शब्दांत विचारणा केली.
 दरम्यान, आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरू असताना किरण बेदी मात्र प्रचारामध्ये व्यस्त आहेत. शुक्रवारी बेदी यांनी त्यांचा मतदारसंघात रिक्षामध्ये प्रचार केला.  बेदी म्हणाल्या की, लवकरच लोकपालची नियुक्ती केली जाणार असल्याचे आश्वासन मोदींनी दिले आहे.

सत्तेत सोबत असलो म्हणून ‘शेपटी घातलेली’ नाही,—उद्धव ठाकरे

0

मुंबई-सत्तेत सोबत असलो म्हणून ‘शेपटी घातलेली’ नाही, असा इशाराही उद्धव यांनी दिला. आम्ही कुणाच्या लाटेवर तरंगणारे ओंडके नाही तर जे काही आहोत ते आम्ही आमच्या जीवावर आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी येथे  ठणकावून सांगितले.महाराष्ट्रात शिवसेना असेल तर तो स्थिर असतो अन्यथा अस्थिर. महाराष्ट्राला स्थिर करण्यासाठी म्हणून या सरकारला साथ दिली आहे. जर दिलेली आश्वासनं राज्यातील सरकारने पाळली नाहीत तर त्यांच्यावरही वार करू, असा सणसणीत इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिला. त्यामुळे भाजप-शिवसेनेत सोबत असूनही दुरावा पुन्हा समोर आला आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त मुंबईतील षण्मुखानंद येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. महाराष्ट्रातील जनतेला स्थिर सरकार हवे होते. गेली १५ वर्ष सत्तेवर बसलेले सरकार त्यांना नकोस झाले होते. ते ओळखून केवळ महाराष्ट्राला स्थिर सरकार देण्याच्या हेतूने शिवसेनेने राज्यातील सरकारसोबत जाण्याचे ठरवले, असे म्हणत भाजपचे नाव न घेता उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला. पण सत्तेत सोबत असलो म्हणून ‘शेपटी घातलेली’ नाही, असा इशाराही उद्धव यांनी दिला. आम्ही कुणाच्या लाटेवर तरंगणारे ओंडके नाही तर जे काही आहोत ते आम्ही आमच्या जीवावर आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.
विधानसभा निवडणुकांपूर्वी मी स्वत: दाखवलं होतं की राज्यात शिवसेनेचे सरकार आल्यास आम्ही मुलांच्या पाठीवरचा बोझा कसा कमी करणार ते. पण आता राज्यात गवगवा चालू आहे की दप्तरांचं ओझं आम्ही कमी केलं. ही तर आमची कॉपी झाली. आम्ही स्वत: उत्तर पत्रिका सोडवली कुणाची कॉपी नाही केली, असा टोला उद्धव ठाकरे यांनी शिक्षण मंत्र्यांना लगावला.
ज्या वीर सावरकरांनी या राष्ट्रातील जनतेसाठी, हिंदूंसाठी मोलाचं कार्य केलं, अंदमानात तुरुंगवास भोगला त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे, अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी बोलून दाखवली.
या देशातील हिंदू जनतेने केंद्रात स्थिर सरकार दिले आहे. काश्मीरमध्ये देखील हिंदूमुळे भाजपल्या अनेक जागांवर विजय मिळवता आला आहे. तेव्हा काश्मिरी पंडितांची खरी ‘घर वापसी’ झाली पाहिजे, तसेच समान नागरी कायदा हा आणलाच पाहिजे, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. तसेच काश्मीरचे ३७० कलम रद्द कधी होणार अस सवालही त्यांनी यावेळी केला.वृत्तपत्रांत छापून आल्यानुसार मुस्लिमांची संख्या वाढत चालली आहे. पण मग त्यांच्याकडे कोणी मुल्ला किंवा शंकराचार्य असे वक्तव्य करताना आढळतात की इतकी मुलं पाहिजे. आपल्याचकडे हा सारा गोंधळ आहे. भविष्याची चिंता ती फक्त आम्हालाच, असे म्हणत उद्धव ठाकरे बोलले की, लोकसंख्येवर अस्तित्व नसतं, एक मुलं असलं तरी चालेल पण वाघासारखं असलं पाहिजे.

दिव्य कुरआन आणि आधुनिक विज्ञान या मराठी भाषेतील पुस्तकाचे प्रकाशन

0

 

 

दिव्य कुरआन  आणि आधुनिक विज्ञान या मराठी भाषेतील पुस्तकाचे प्रकाशन हाजी गुलाम मोहम्मद आझम ट्रस्टचे चेअरमन मुन्नवर पीरभाई यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले . पुणे कॅम्प भागातील नवा मोदीखाना येथील आझम कॅम्पसमधील असेम्ब्ली हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमास जेष्ठ पत्रकार सोमनाथ देशकर , प्रमोद गवळी , सुरज व्यास , डॉ . रफिक सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते .

    यावेळी हाजी गुलाम मोहम्मद आझम ट्रस्टचे चेअरमन मुन्नवर पीरभाई यांनी सांगितले कि , सर्व धर्मीयसाठी दिव्य कुरआन  आणि आधुनिक विज्ञान हे पुस्तक मराठी भाषेत असल्यामुळे मार्गदर्शक ठरणार आहे .

 डॉ . रफिक सय्यद यांनी सांगितली कि ,  दिव्य कुरआन  आणि आधुनिक विज्ञान हे पुस्तक चित्र स्वरूपात असल्याने व साध्या सोप्या मराठी भाषेत असल्याने सर्व सामान्य माणसाला  या पुस्तकातून नक्कीच खूप माहिती मिळेल .

  या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत समीर शेख यांनी केले तर सूत्रसंचालन शफाक्कत शेख यांनी केले तर आभार मोहम्मद रफिक खान यांनी मानले .

महाराष्ट्र इमर्जन्सी मेडीकल सर्व्हिस (डायल 108) रुग्णवाहिका सेवेचा दहा महिन्यांत 1,92,045 जणांना लाभ

0

पुणे :
राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने आणि ‘बीव्हीजी इंडिया लिमिटेड’ या सेवा क्षेत्रातील कंपनीच्या माध्यमातून चालविण्यात येणार्‍या ‘महाराष्ट्र मेडिकल इमर्जन्सी सर्व्हिसेस’च्या ‘डायल 108’ रूग्णवाहिका सेवेद्वारे 26 जानेवारी 2014 ते 31 डिसेंबर 2014 पर्यंतच्या तपशीलानुसार 1 लाख 92 हजार 45 जणांना अत्याधुनिक रुग्णवाहिका सेवेचा लाभ मिळाला आहे.

‘108’ हा दूरध्वनी डायल केल्यानंतर ‘महाराष्ट्र इमर्जन्सी मेडीकल सर्व्हिस’च्या सुसज्ज रुग्णवाहिका मदतीला येतात. ही सेवा 26 जानेवारी 2014 रोजी सुरू झाली होती. या आपत्कालीन वैद्यकीय सेवेच्या संचालनाची जबाबदारी ‘बी.व्ही.जी. इंडिया लिमिटेड’ या सेवाक्षेत्रातील अग्रगण्य कंपनीकडे असून, पुण्यातील‘औंध उरो रुग्णालयात’ या सेवेचे प्रमुख केंद्र व ‘रिस्पॉन्स सेंटर’ आहे.

‘26 जानेवारी 2014 रोजी सुरू झालेल्या या सेवेत अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज अशा 937 रुग्णवाहिका राज्यभर आहेत. या अत्याधुनिक वैद्यकीय सेवेसाठी 108 या दूरध्वनी क्रमांकावर डायल केल्यास विनामूल्य सेवा देणारी सुसज्ज रुग्णवाहिका डॉक्टरांसह येते. अपघात, हृदय विकार, भोवळ येणे, अर्धांगवायू, विषबाधा, आगीत भाजणे अशा अनेक प्रकारच्या आपत्कालीन स्थितीमध्ये ही रुग्णवाहिका बोलावता येते’, अशी माहिती ‘महाराष्ट्र इमर्जन्सी मेडीकल सर्व्हिस’चे मुख्य संचालन अधिकारी डॉ. ज्ञानेश्‍वर शेळके यांनी दिली.

दिनांक 31 डिसेंबर 2014 पर्यंतच्या तपशीलानुसार डिसेंबर महिन्यातील राज्यातील रूग्णांना दिलेल्या आपत्कालीन सेवेची जिल्हानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे, अहमदनगर (1213), अकोला (407), अमरावती (772), औरंगाबाद (990), बीड (716), भंडारा (339), बुलढाणा (638), चंद्रपूर (614), धुळे (480), गडचिरोली (300), गोंदीया (364), हिंगोली (330), जळगांव (899), जालना (458), कोल्हापूर (902),लातूर (775), मुंबई (2257), नागपूर (944),नांदेड (1026), नंदूरबार (417), नाशिक (1191), उस्मानाबाद (499), परभणी (472), पुणे (1911), रायगड (389), रत्नागिरी (271), सांगली (827), सातारा (749), सिंधुदूर्ग (214), सोलापूर (1032), ठाणे (1572), वर्धा (178), वाशिम (339), यवतमाळ (784).

‘वेळेत उपचार न मिळाल्याने अपघातातील जखमींचा जीव जाण्याचे प्रमाण मोठे आहे ही गोष्ट लक्षात आल्यानंतर आरोग्य विभागाच्या आपत्कालीन वैद्यकिय सेवा प्रकल्पांतर्गत सुरू करण्यात आलेल्या ‘108 टोल फ्री’ रूग्णवाहिका सेवेला आठ महिन्याच्या कालावधीत या सुविधेमुळे लाखभराहून अधिक लोकांचे जीव वाचले. ’, अशी माहिती ‘बीव्हीजी इंडिया’चे अध्यक्ष एच. आर. गायकवाड यांनी दिली.

मुंबईकडे जाणारी एस.टी बस पांगोळी (खंडाळा) येथे महामार्गावरून दरीत कोसळल्याने झालेल्या अपघात स्थळी सेवेच्या 6 अद्ययावत रूग्णवाहिकांनी दहाव्या मिनिटाला घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले. सोलापूरजवळील टेंभूर्णी येथे नुकत्याच झालेल्या अपघातामध्ये रुग्णवाहिका सेवेच्या 3 अद्ययावत रूग्णवाहिकांनी विसाव्या मिनिटाला घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले. तसेच जखमींना रुग्णालयात दाखल करून प्राण वाचविले. गणपती विसर्जन मिरवणुकी दरम्यान आपत्कालीन वैद्यकीय सेवा रुग्णांपर्यंत अत्यंत कमी वेळेत पोहोचविण्यासाठी ‘डायल 108’ च्या रूग्णवाहिका डॉक्टर आणि सहाय्यकांसह उपलब्ध करण्यात आल्या होत्या. यावेळी ‘इमर्जन्सी गो -टीम’ ही सेवा प्रथमच आप्तकालीन सेवेमध्ये राबविण्यात आली. ‘इर्मर्जन्सी गो -टीम’च्या आप्तकालीन कीटद्वारे रूग्णांपाशी जाऊन तातडीने मदत कार्य करण्यात आले. पोलीस, फायरब्रिगेड, गणेशमंडळ यांच्या सहकार्याने ही सेवा रूग्णांना चांगल्या प्रकारे आणि तातडीने देण्यात आली.
याआधी पुणे, सातारा, पंढरपूर या तीन जिल्ह्यांतून जाणार्‍या वारी मार्गावर या वर्षी प्रथमच 108 सेवेच्या आपत्कालीन रूग्णवाहिका तैनात करण्यात आल्या होत्या. या सेवेमुळे वारीदरम्यान विविध कारणांनी दरवर्षी होणार्‍या साधारण 25 ते 30 वारकर्‍यांच्या मृत्यूचे प्रमाण कमी होऊन यावर्षी हे प्रमाण सहापर्यंत खाली आणण्यात यश आले. तसेच भीमाशंकरजवळ माळीण गावात दरड कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत ‘महाराष्ट्र मेडिकल इमर्जन्सी सर्व्हिसेस’च्या (‘डायल 108’) 28 अद्ययावत रुग्णवाहिकांनी पूर्णवेळ मदतकार्य केले.

गणेश जयंतीनिमित विविध धार्मिक कार्यक्रम

0

श्री. गणेश जयंतीनिमित जय भवानी मित्र मंडळाच्यावर्तीने

विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरी

श्री. गणेश जयंतीनिमित पुणे लष्कर भागातील सोलापूर बाजारमधील जय भवानी मित्र मंडळाच्यावर्तीने विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली .त्या निमित सकाळी होमहवन करण्यात आला तर त्यानंतर आरती करण्यात आली .  यावेळी नगरसेवक विवेक यादव यांच्याहस्ते महाप्रसाद वाटप करण्यात सुरुवात करण्यात आली . यावेळी जय भवानी मित्र मंडळाचे अध्यक्ष रणवीर अरगडे , उपाध्यक्ष निलेश खरात , सचिव उमेश रेड्डी , कार्याध्यक्ष अजय यादव आदी मान्यवर उपस्थित होते .

श्री. गणेश जयंतीनिमित राष्ट्रीय माथाडी कामगार सेनेच्यावतीने

गणेश मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम

श्री. गणेश जयंतीनिमित पुणे कॅम्पमधील क्लोव्हर सेंटरमध्ये राष्ट्रीय माथाडी कामगार सेनेच्यावतीने पुणे कॅम्प मधील क्लोव्हर सेंटर मध्ये गणेश मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम झाले . यावेळी होमहवन , महापूजा करण्यात आली . यावेळी महाप्रसाद वाटप राष्ट्रीय माथाडी कामगार सेनेचे अध्यक्ष मंगेशदादा  चंद्रमौर्य यांच्याहस्ते करण्यात आली . या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन   सचिन बोत्रे , रवि चव्हाण , सचिन कदम , अविनाश श्रुंगारपुरे , जय नारवाणी , विलास जिंदे , अशोक वाघचौरे , सलीम शेख आदींनी  केले होते .

श्री. गणेश जयंतीनिमित सावतामाळी मित्र मंडळाच्यावतीने

विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

श्री. गणेश जयंतीनिमित भैरोबानालामधील सावतामाळी मित्र मंडळाच्यावतीने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी श्री चा अभिषेक , होम हवन , आरती आणि महाप्रसाद आदी कार्यक्रम झाले . रात्री संत सावतामाळी भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला . यावेळी  सावतामाळी मित्र मंडळाचे अध्यक्ष निलेश सायकर , सुर्यकांत चौघुले , मनोज जांभुळकर , अनिल गवळी , सुनील लांडगे , नंदकुमार तेलगु , शाम जांभुळकर , पुंडलिक गवळी आदींनी केले .

श्री. गणेश जयंतीनिमित अशोक चक्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने

विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

श्री. गणेश जयंतीनिमित पुणे कॅम्प मधील डवायार लेनमधील अशोक चक्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी होमहवन , श्री ची आरती . महाप्रसादाचा कार्यक्रम झाला . यावेळी अशोक चक्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष रघुवीर व्हावळ व प्रेमराज परदेशी व मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते .

श्री. गणेश जयंतीनिमित स्नेहसवर्धंक युवक मंडळ सार्वजनिक गणेशोत्सवच्यावतीने

श्री गणेश जन्म सोहळा

श्री. गणेश जयंतीनिमित पुणे कॅम्प मधील सोलापूर बाजारमधील मानाचा पहिला गणपती स्नेहसवर्धंक युवक मंडळ सार्वजनिक गणेशोत्सवच्यावतीने श्री गणेश जन्म सोहळा उत्साहात पार पडला . यानिमिताने विबिध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी होमहवन , पूजा , श्रीची आरती , महाप्रसादाचा कार्यक्रम झाला . 

खा.वंदना चव्हाण यांनी दत्तक घेतलेल्या सुदुंबरे गावात जनजागृतीपर ‘संवाद सप्ताह’ संपन्न

0

पुणे:
सांसद आदर्श ग्राम योजने अंतर्गत राज्यसभेच्या खासदार वंदना चव्हाण यांनी मावळ तालुक्यातील सुदुंबरे हे गाव दत्तक घेतले आहे. या योजनेंतर्गत ग्रामस्थांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी दि. 13 ते 19 जानेवारी दरम्यान संवाद सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.  या सप्ताहाचा शुभारंभ  खा. वंदना चव्हाण, तहसीलदार शरद पाटील, सरपंच सौ. संगीता भांगे,  उपसरपंच – बाळकृष्ण गाडे, ग्रामसेवक – शरद ढोले यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

यामध्ये महिला सबलीकरण, प्रशिक्षण, आरोग्य तपासणी, युवकांसाठी व्यक्तिमत्व विकास आणि रोजगाराच्या संधी, विद्यार्थ्यांसाठी वैयक्तिक स्वच्छता, जेष्ठ नागरिकांना हेल्थ कार्ड चे वाटप, शेतकर्‍यांसाठी कांदा कार्यशाळा, हास्यषटकार हा मनोरंजनाचा कार्यक्रम तसेच चामात्कारामागील विज्ञान हा अंधश्रद्धा निर्मुलन समितीचा कार्यक्रम घेण्यात आले.

या संवाद सप्ताहात पुण्यातील वंदन नगरकर यांनी महिलांना पालकत्व या विषयावर मागर्दर्शन केले तर संजीवनी जोगळेकर आणि नीला विद्वंस यांनी विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छतेचे धडे दिले. यशस्वी संस्थेचे श्री. तुपे यांनी युवकांना रोजगाराच्या विविध संधी बाबतीत मार्गदर्शन केले तर श्री. विकास लवांडे यांनी युवकांना व्यक्तिमत्व विकासावर मार्गदर्शन केले. पुणे जिल्हा विद्युत मंडळाचे सदस्य श्री. प्रवीण यांनी गावातील विजेच्या प्रश्नासंदर्भात गावकर्र्‍यांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे प्रा. विवेक सांबारे यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून विज्ञानिक दृष्टीकोन आणि बुवाबाजी यासंदर्भात मार्गदर्शन केले. पुण्यातील श्री. मिलिंद हल्याळ यांनी  हास्याचे षटकार मनोरंजनाचा कार्यक्रम  सदर केला. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गेंगजे यांनी आरोग्य तपासणी शिबीर आणि जेष्ठ नागरिकांना हेल्थ कार्ड चे वाटप या कार्यक्रमाचे आयोजन केले. तालुका कृषी अधिकारी श्री. कोथिम्बिरे यांनी शेतकर्‍यांची कांदा उत्पादन या विषयावर कार्यशाळा घेतली. यावेळी कृषी विज्ञान केंद्र्याच्या अधिकार्यांनी यावेळी शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले.

श्रीराम टेकाळे, विजय दिवेकर आणि ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.

अच्छे दिन — माधुरी -बच्चन -पासून ते रामदेवबाबा ;रविशंकर जी सगळ्यांसाठी मोदी महाल खुला ….

0
नवी दिल्ली,  -‘बेटी बचावो ; बेटी पढाओ ‘ अभियानाच्या ब्रांड अम्बेसिडर म्हणून माधुरी दिक्षित ची वर्णी लागल्यानंतर आता  शहेनशाह -डॉन  अमिताभ बच्चन आणि योग गुरु रामदेवबाबा -रविशंकर जी यांच्यासाठी मोदीमहाल खुला होत असल्याचे चित्र आहे . त्याबाबत चे वृत्त असे आहे कि , भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, अभिनेते अमिताभ बच्चन, योगगुरू रामदेव बाबा आणि अध्यात्मिक गुरू श्री. श्री. रविशंकर यांचा ‘पद्म’ पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना ‘भारतरत्न’ सन्मान जाहीर केल्यानंतर आता मोदी सरकार भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी ‘पद्मविभूषण’ पुरस्कार देऊन सन्मान करणार आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘पद्म’ पुस्कारांची घोषणा करण्यात आली असून या यादीत एकूण १४८ जणांची नावे आहेत. लाकृष्ण आडवाणी व पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिगं बादल या दोन राजकीय नेत्यांचा या यादीत समावेश आहे. तर अभिनेता अमिताभ बच्चन, ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, लेखक सलीम जावेद तसेच  गीतकार प्रसून जोशी यांनाही पद्म पुरस्काराने गौरवण्यात येईल.
बॅटमिंटनपटू पी.व्ही. सिंधू, हॉकी टीम कप्तान सरदारा सिंग, चेस ग्रँडमास्टर शशीकिरण कृष्णन या क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींचाही या यादीत समावेश आहे.

काळ्या पैशाचा विषय आत्ता नको , नाही तर तर माझा ‘अण्णा’ होईल- रामदेव बाबा

0

कोल्हापूर – मोदी यांनी काळा पैसा देशात आणण्यापासून जी अनेक आश्वासने दिली आहेत ती पूर्ण करण्यासाठी त्यांना थोडा वेळ देणे गरजेचे आहे. उठसूट जर मी सरकारवर टीका करायला लागलो तर माझी अवस्था अण्णांजींसारखी होईल, असा टोला रामदेव बाबांनी लगावला.तसेच  महात्मा गांधींपासून स्वामी विवेकानंदांपर्यंत अनेकांनी शिक्षणाच्या स्वदेशीकरणाची मागणी केली होती. त्याचसाठी देशातील प्रत्येक जिल्ह्यात २ ते ५ हजार विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येईल, अशी आचार्य कुले उभारणार असल्याची घोषणा योगगुरू बाबा रामदेव यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या प्रस्तावास मंजुरी दिली असल्याचा दावा त्यांनी केला.

योग, आयुर्वेद, वैदिक परंपरा, संस्कृती यासाठी काम केल्यानंतर आता पुढचा टप्पा म्हणून शिक्षणाकडे लक्ष देणार असून या कामाला यापुढे प्राधान्य देणार असल्याचे रामदेव यांनी सांगितले. आगामी २० वर्षांनंतर या देशाची सूत्रे उत्तम नेतृत्वाकडे जावीत यासाठीच आम्ही आतापासून कामाला लागलो आहोत.
भारत देशाला मोठं करणारं नेतृत्व आचार्य कुलातून घडवू, असेही त्यांनी सांगितले. राजकीय स्वातंत्र्याबरोबर आर्थिक स्वातंत्र मिळाले नाही हे वास्तव आहे. म्हणूनच उच्च गुणवत्ता, रास्त किंमत आणि कमाई समाजासाठी या त्रिसूत्रीवर आधारित उद्योग उभारण्याचीही तयारी आपण सुरू केली आहे. सबसिडीची शिडी न घेता स्वदेशी उत्पादनाला महत्त्व देणार असल्याचेही रामदेव म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली १७७ देशांनी योगदिनाला मान्यता दिली आहे. त्या दिवशी कोट्यवधी भारतीयांना आम्ही योगासाठी प्राेत्साहित करणार असल्याचे ते म्हणाले. या वेळी पतंजलीचे कोल्हापूरचे प्रमुख सन्मति मिरजे, प्रमोद पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

मोदी यांच्या स्वच्छता मोहिमेचा एक ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून सर्वत्र मी स्वच्छतेचा संदेश देत असतो, असे सांगत रामदेवबाबा यांनी महालक्ष्मी मंदिरानजीक स्वच्छता केली. खासदार धनंजय महाडिक, महापौर तृप्ती माळवी आदी उपस्थित होते.
काय आहे ‘आचार्य कुल‘ बाबत रामदेव बाबांची योजना …
*प्रत्येक जिल्ह्यात २००० ते ५००० विद्यार्थ्यांना शिक्षण
*स्वतंत्र अभ्यासक्रम आणि मंडळ
*५ ते १० एकरांमध्ये संस्था
*१००० पेक्षा जास्त दानशूर संस्थेला जागा देण्यास तयार
*वर्षभरात १०० पेक्षा अधिक ठिकाणी उभारणीला सुरुवात
*पाच वर्षांत काही प्रकल्प पूर्ण करण्याचे नियाेजन
*सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेत अध्यापन
*गरिबांच्या मुलालाही प्रवेश घेता यावा इतकी कमी फी
*पतंजलीसह वेदांत समूह, राहुल बजाज यांचा सहभाग
*प्रत्येक कुल ३ ते ५ कोटींचे
*संस्कृत, योग, वेद, व्याकरणाबरोबरच संगणक, शास्त्र, तंत्रज्ञानाचेही अध्यापन

 

आत्तापर्यंतचे सर्व पंतप्रधान हे ‘भोगी’ होते, मात्र नरेंद्र मोदी ‘योगी’ — बाबा रामदेव

0

कोल्हापूर-सध्या रावण आणि कंस यांच्यासारखे अत्याचार होत नाहीत. जे थोडेफार पाप होते, ते देखील संपले. कारण आत्तापर्यंतचे सर्व पंतप्रधान हे केवळ ‘भोगी’ होते, मात्र नरेंद्र मोदी ‘योगी’ आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने अच्छे दिन निर्माण होत असल्याची मुक्ताफळे योगगुरू रामदेवबाबा यांनी उधळली.
कणेरी मठ येथे आयोजित भारतीय संस्कृती उत्सवात ‘युवा ज्ञानोत्सव’ या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संगणक तज्ज्ञ डॉ. विजय भटकर होते. रामदेवबाबा पुढे म्हणाले, ‘सध्याचा युवक आपल्यापुढे आदर्श नाही, असे सांगत असतो. पण, राम, कृष्ण, अर्जुन, विवेकानंद हे सर्व तरूण होते. त्यांनी अत्याचारी राक्षसांचा नाश केला. त्यांचा आदर्श समोर असताना असा विचार मनात येतोच कसा. छत्रपती शिवाजी महाराज, विवेकानंद, भगतसिंग यांची चित्रे घरात लावा. केवळ इतिहासातूनच प्रेरणा घेण्यापेक्षा स्वतः वेगळा इतिहास निर्माण करा. आपल्याला मिळालेला मनुष्यजन्म हा नशीबाने मिळालेला आहे. त्यामुळे जे काही प्राणपणाने करता येईल तेवढे करण्याचा प्रयत्न करा.’
डॉ. विजय भटकर म्हणाले, ‘संस्कृती रक्षणासाठी भारताला विश्वगुरू बनलेच पाहिजे. संस्कृती ही फार मोठी गुंतवणूक आहे, त्याचा विचार करता शिक्षणातून पूर्ण संस्कृती मिळत नाही त्यासाठी देशभरात अनेक ठिकाणी असे महोत्सव झाले पाहिजेत. भारतीय संस्कृती विचार हा वैश्विक आहे. गुरू परंपरा, मातृभक्ती याचा आदर सर्वांना समजला पाहिजे.’
बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनचे अधिक कदम यांनी देवाने एकच माणूस निर्माण केलेला असताना देशांनी सीमा का केल्या असा मुद्दा उपस्थित केला. देशाच्या सीमा सुरक्षित नाहीत, खुलेआम अंमली पदार्थांची देवाणघेवाण सुरू असते. सीमावर्ती भागामध्ये प्रचंड भीती आहे ती कमी झाली पाहिजे. आजच्या तरूणांमध्ये काम करण्याची इच्छा आहे पण लोक साथ देत नाहीत अशी नाराजी व्यक्त केली.
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिक्षण तज्ज्ञ गुरुराज करजगी यांनी मौखिक शिक्षणापेक्षा कृतीयुक्त शिक्षण अधिक गरजेचे असल्याचे सांगितले. सामाजिक कार्यकर्ते प्रदीप पुरोहीत यांनी राष्ट्र निर्मितीचे मिशन आवश्यक असून लोकांचा सरकारवरील विश्वास कमी झाल्याचे सांगितले.
गोव्याचे मंत्री राजेंद्र आर्लेकर यांनी परदेशातून आलेल्या गोष्टी चांगल्या असे म्हणण्याची आपल्याला सवय लागली असून परदेशी वस्तू, पोशाख आणि पद्धतीचा अंगीकार करू नये असे सांगितले. तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नात राजश्री चौधरी यांनी युवा चळवळ वाढीस लागली असून या देशात भारतमाता आणि मातृभूमीचा म्हणून महिलांचा सन्मान केला गेला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. गोविंदाचार्य यांनी प्रास्ताविक केले. यावेळी जीवरक्षक दिनकर कांबळे, उद्योजक बबनराव शेळके आणि अनिल वासुदेव यांचा सत्कार करण्यात आला. सकाळी ५ ते ७ यावेळेत बाबा रामदेव यांचे योगशिबीर झाले.

खाजगी जागेतील मंदिर पडल्यानंतर ;शिवसेना, भाजपच्या नगरसेवकांनी केला गदारोळ – याच ठिकाणी ‘अपघाती स्थळ ‘ याकडे मात्र पोलिसांसह राजकारण्यांचे ही दुर्लक्ष

0

पुणे
सहकारनगर भागातील खाजगी जागेतील मंदिरावर महापालिका प्रशासनाने केलेल्या कारवाईमुळे शिवसेना, भाजपच्या सभासदांनी सभागृहात गोंधळ घातला. सभा सुरू होऊन दीड तास झाल्यानंतर  त्यांनी सभागृहात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यापुढील काळात पालिका प्रशासनाने शहरातील बेकायदा पद्धत‌ीने बांधण्यात आलेल्या प्रार्थनास्थळांवर कारवाई करू नये, अशी मागणी काही लोकप्रतिनिधींनी सभागृहात करत राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र याच ठिकाणी म्हणजे गोळ्वलकर गुरुजी रस्त्यावर वारंवार दुचाकीस्वारांना गंभीर अपघात होत आहेत या घटनेकडे मात्र पोलिस आणि राजकीय नेते कार्यकर्ते लक्ष द्यायला तर नसल्याचे दिसते आहे अर्थात मंदिर पडणे आणि या नजीकचे अपघाती स्थळ या दोन्ही बाबी वेगवेगळ्या आहेत .

सहकारनगर भागातील गंगधर मिठाई वाले नजीकचे मंदीर बेकायदा असल्याच्या तक्रारी पालिका प्रशासनाकडे आल्या होत्या. महापालिकेच्या लोकशाही दिनाबरोबरच विभागीय लोकशाही दिनामध्ये या प्रार्थनास्थळाबाबत तक्रारी आल्याने बुधवारी प्रशासनाने सहकारनगर भागातील प्रार्थनास्थळावर कारवाई केली. पोलिस बंदोबस्त घेऊन ही कारवाई करत बेकायदा बांधकाम काढून टाकण्यात आले. सर्वसाधारण सभा सुरू होऊन दीड तास झाल्यानंतर भाजपच्या नगरसेविका मनीषा घाटे यांनी हा मुद्दा उपस्थित करत प्रशासनाकडून खुलासा मागितला. प्रार्थनास्थळावर करण्यात आलेल्या कारवाईबाबत अधिकाऱ्यांवर तोंडसुख घेत संबधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी शिवसेना, भाजपच्या सभासदांनी केली. ‘पालिकेच्या ज्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली त्यांना सभागृहात बोलवा नाहीतर आम्ही त्यांच्या कार्यालयात जावून आंदोलन करू,’ अशी धमकीच काही सभासदांनी दिली.
सभागृहात हा विषय सुरू असतानाच सभागृहाच्या प्रेक्षक गॅलरीत जाऊन भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी गॅलरीत लावलेली काच फोडण्याचा प्रयत्न केला. अखेर महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी प्रशासनाला खुलासा करण्याचे आदेश दिले. महापालिकेने कारवाई केलेल्या प्रार्थनास्थळाबाबत अनेकदा तक्रारी आल्या होत्या. लोकशाही दिनामध्ये वारंवार याबाबत तक्रारी करण्यात आल्याने प्रशासनाने या प्रार्थनास्थळाला नोटीस बजाविली होती. हे बांधकाम बेकायदा असल्याने पोलिस बंदोबस्त घेऊन ही कारवाई करण्यात आल्याचा खुलासा नगर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी केला.
रस्तोरस्ती अनेक ठिकाणी बेकायदा मंदिरे आहेत हि बाब खरी आहे , मंदिरांच्या नावाने अनेक लोक आपापल्या हिताच्या गोष्टी साधून घेतात हे हि खरे आहे पण हे मंदिर रस्त्यात नव्हते ते खाजगी जागेत होते  ते पाडण्याची  तसदी घेण्यामागे कोणाच्या तक्रारी होत्या त्या कोणत्या स्वरूपाच्या होत्या हे मात्र उजेडात आलेले नाही . दरम्यान या समोरच रस्त्यावर कित्येकदा दुचाकीस्वांना सारखे गंभीर स्वरूपाचे अपघात होत आहेत अशावेळी जखमी अवस्थेत दुचाकीचालक येथे बराच काळ पडलेले दिसतात त्यांना कोणी तातडीने रुग्णालयात हलवायचे यावर केवळ हालहाल व्यक्त होताना दिसते . एरवी चौकाचौकात दुचाक्या अडवून वसुली करणाऱ्या पोलिसांनी इथे थांबून आपले काम सुरु ठेवले तरी प्रसंगी अपघातग्रस्तांना त्यांच्यामार्फत मदत होईल अशी हि भावना व्यक्त होते आहे , मात्र असा अपघात झाला कि पोलिस -कार्यकर्ते  यापासून सहसा दूरच राहतात असे दिसत आहे यामध्ये रिक्षावाले मात्र नागरी दबावाने भरडले जात असल्याचे सांगितले जाते

काँगेस भवन च्या वास्तूला ७५ वर्षे पूर्ण – अमृत महोत्सवी सप्ताह साजरा करणार

0

पुणे : महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांच्यापासून मनमोहनसिंग, राहुल गांधी आदी दिग्गज नेत्यांचा सहवास लाभलेल्या… अनेक महत्त्वाच्या घटना-घडामोडींचे साक्षीदार असलेल्या ऐतिहासिक ‘काँगेस भवना’ला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने २५ ते ३१ जानेवारीदरम्यान अमृत महोत्सवी सप्ताह शहरात साजरा केला जाणार आहे.महात्मा गांधी यांच्या इच्छेनुसार देशातील प्रत्येक शहरात काँग्रेस भवन उभारण्यात आले. त्यानुसार पुण्यात एक एकर जागेवर प्रशस्त काँग्रेस भवन २६ जानेवारी १९४० रोजी उभारण्यात आले. या वास्तूला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमांची माहिती शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय छाजेड व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विश्वजित कदम यांनी दिली.महात्मा गांधींनी पुण्यातील काँग्रेस भवनाच्या उद्घाटनानिमित्त ‘यह मकान सच्चे सेवकों का याने खिदमतगारों का बने’ अशा शुभेच्छा दिल्या होत्या. त्याची फलकावर नोंद करून या इमारतीचे उद्घाटन झाले होते. काँग्रेसचे नेते काकासाहेब गाडगीळ, केशवराव जेधे, शंकरराव मोरे यांच्या संयुक्त प्रयत्नांमधून ही वास्तू उभी राहिली.शहरामध्ये २५ जानेवारी रोजी सकाळी ७५ ठिकाणी आरोग्य शिबिरे घेतली जाणार आहेत. सायंकाळी काँग्रेस भवनामध्ये ऐतिहासिक घटनांच्या दुर्मिळ छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते होईल. २६ जानेवारी रोजी सकाळी ध्वजवंदन होईल. सायंकाळी स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.या मेळाव्यासाठी अनेक मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे. २७ जानेवारीला शहरातून प्रभात फेरी काढण्यात येईल. तसेच, ७५ अपंग सैनिकांचा सत्कार केला जाईल. २९ जानेवारी रोजी स्वातंत्र्यसैनिक कुटुंबीयांचा सन्मान केला जाईल. या वेळी काँग्रेसची मान्यवर नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत. ३० जानेवारी रोजी महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित मिरवणूक काढली जाईल. ३१ जानेवारीला ज्येष्ठ नागरिकांच्या स्पर्धेने याचा समारोप होईल, अशी माहिती छाजेड यांनी दिली. काँग्रेस भवन येथे बाल क्रांतिकारक हुतात्मा नारायण दाभाडे याने हातात घेतलेला तिरंगा खाली टाकावा म्हणून इंग्रजांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. या बलिदानाने काँग्रेस भवन पुनीत झाले आहे. या आठवणीलाही उजाळा दिला जाणार आहे.