सोबत फेसबुक वरील छायाचित्र पहा
एम आय एम ला रोखण्यासाठी शिवसेनेच्या शिलेदारांनी कसली कंबर
माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील मुस्लिम आरक्षण परिषदेच्या अध्यक्ष पदी -ओवेसी बोलणार ?
पुणे- मुस्लिम आरक्षण परिषदेला पुणे पोलिसांनी काही अटींवर परवानगी दिली आहे. आज (बुधवार) पुण्यात होऊ घातलेल्या या आरक्षण परिषदेला एमआयएमचे खासदार असावुद्दीन ओवेसी हे हजर राहणार आहेत. आता गोळीबार मैदानावर नव्हे तर कोंढव्यातील कौसरबाग या बंदिस्त सभागृहात परिषद घेण्यात येणार आहे. तसेच यात आक्षेपार्ह वक्तव्य करता येणार नाहीत. कोणत्या समाजाबद्दल चिथावणीखोर भाषण करता येणार नाही, अशा स्वरुपाच्या अटी घालण्यात आल्या आहेत. पुणे पोलिसांनी समोर ठेवलेल्या या अटींच्या हमीपत्रावर असावुद्दीन ओवेसी यांनी सही केली आहे. ओवेसी हे धार्मिक व वादग्रस्त वक्तव्य करणारे असल्याने शिवसेनेचे पुणे शहरप्रमुख विनायक निम्हण यांनी ओवेसींच्या भाषणाला व सभेला विरोध केला होता. माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील या परिषदेच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत.
मुख्यमंत्री झाल्यावर फडणवीस जुने दिवस विसरले… एकनाथ खडसे यांच्याशी धुसफूस-मिडियाचे ‘खयाली पुलाव ‘ खडसे यांचे स्पष्टीकरण
मुंबई- सत्ता नसताना खडसे यांनी फडणवीस यांना खुपदा प्रोत्साहन दिले . फडनविसांचा तारू पुढे फडकावत ठेवला पण आता खडसेंना ओव्हरटेक करीत मुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतरही जुन्या गोष्टी विसरून -मागे न पाहता फडणवीस हे जोमाने पुढे निघाले आहेत या कार्यभारात त्यांच्याकडून खडसे यांच्या कामात हि खोड्या केल्या जात असल्याने खडसे यांची धुसफूस सुरु झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते आहे;दरम्यान आपण आजारी होतो म्हणून बैठकीला उपस्थित नव्हतो हे मिडियाचे मिडियाचे ‘खयाली पुलाव’ आहेत असे स्पष्टीकरण खडसे यांनी केले आहे राज्यातील भाजप सरकारमधील सर्वात ज्येष्ठ मंत्री असलेले महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी बदलीसाठी शिफारस केलेल्या अधिकाऱ्यांच्या फाइल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रोखत असल्याची धुसफूस काही दिवस सुरू आहे. या पार्श्वभूमीवर खडसे मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीस अनुपस्थित राहिल्याची चर्चा आहे.
खडसे विधानसभेचे विरोधी पक्षनेते असताना त्यांच्या मागच्या बाकावर बसणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी अनेक विषयांवर बोलण्याची संधी दिली. इतकी मुभा कोणताच विरोधी पक्षनेता आपल्या सहकाऱ्यांना देत नाही. तसेच प्रदेशाध्यक्षपद नियुक्तीच्या वेळीही खडसे यांनीच देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात या पदाची माळ घातली. मात्र राज्यात भाजपचे सरकार स्थापन झाल्यापासून फडणवीस हे खडसे यांनी शिफारस केलेली कामे रोखत आहेत. खडसे यांना विश्वासात न घेता महसूल अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जात आहेत, असा आरोप खडसे समर्थक आमदार करीत आहेत.
खडसे यांनी महसूल खात्यांच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांची शिफारस मुख्यमंत्र्यांकडे केली होती. परंतु मुख्यमंत्र्यांनी या शिफारशी डावलून दुसऱ्याच अधिकाऱ्यांची त्या जागांवर नियुक्ती केली. मंत्री आस्थापनेवर अधिकारी आणि कर्मचारी घेण्याचे मंत्र्यांना अधिकार असतात. परंतु केंद्र सरकारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, मंत्र्यांच्या आस्थापनांवर हस्तक्षेप केला आहे. तसाच हस्तक्षेप फडणवीस हे खडसे यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांमध्ये करीत आहेत, असा खडसे समर्थकांचा आरोप आहे. गेले अनेक वर्षे खडसे यांच्यासोबत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांनी मंत्रिआस्थापनेवर घेतले होते. परंतु दहा वर्षांत केव्हाही मंत्री आस्थापनेवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या भाजप सरकारमधील मंत्र्यांना करता येणार नाही, असा आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी काढला. त्यात खडसे यांच्या कार्यालयात घेतलेल्या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही मुख्यमंत्री फडणवीस यांनी रद्द केल्या. त्यामुळे खडसे यांनी, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवरच बहिष्कार टाकला. विशेष म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस यांचे एक प्रधान सचिव हे काँग्रेसच्या राजवटीत १९९९मध्ये तत्कालीन मुख्यमंत्र्यांचे सचिव होते.
तैवानी प्रवासी विमान नदीत कोसळले
तैपेइ -तैवान- येथील एक प्रवासी विमान आज सकाळी नदीत कोसळून झाला या विमानात ५८ प्रवासी होते उड्डाण केल्यानंतर लगेच तैवानी प्रवासी विमान उड्डाणपूलाला चाटत जात तैपेइमधील एका नदीत कोसळले. आतापर्यंत 10 प्रवाशांना वाचविण्यात यश आले असल्याचे तैवान सेंट्रल न्युज एजन्सीने सांगित ले आहे. दरम्यान, या दुर्घटनेत 9 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 18 जखमी झाले असल्याचे वृत्त आहे. इतर प्रवाशांना आधीच वाचविण्यात आले आहे का, यासंदर्भात एजन्सीने कोणतीही माहिती दिलेली नाही. तैवानच्या मीडियाने विमान कोसळल्याची छायाचित्रे प्रकाशित केली आहेत. तैपेइमधील कीलुंग नदीच्या किनाऱ्यापासून सुमारे 100 मीटर आत पाण्यात विमान कोसळले आहे. तैपेइमधील विमानतळावरुन स्थानिक वेळेनुसार आज सकाळी 10.55 वाजता विमानाने उड्डाण केले होते. किनमेन येथील आयलॅंडवर हे विमान जात होते. उड्डाणानंतर लगेच वैमानिकाचे नियंत्रण सुटले. त्यानंतर विमान हवेतच गट्यांगळ्या खाऊ लागले. एका उड्डाणपुलालाही विमानाने निसटसा धक्का दिला. त्यानंतर ते नदीत कोसळले.
तुळशीबागेतील वाकणकर वाड्यास भीषण आग
पुणे – तुळशीबागेतील वाकणकर वाड्यास सोमवारी(ता.3) मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत कटलरी साहित्याचे दुकान आणि कपड्याचे गोडाऊन खाक झाले. आगीचे कारण निश्चित समजू शकले नाही. मात्र, यात मोठ्या प्रमाणावर वित्त हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
बुधवार पेठेतील तुळशीबागेत केदार पंढरीनाथ वाकणकर यांचा वाडा आहे. ते सध्या राहण्यास नवी पेठेत आहेत; परंतु या वाड्यात त्यांचे जनरल स्टोअर्स आणि कपड्याचे गोडाऊन आहे. वाड्यालगत इमारतींमध्ये नागरिक राहत असून कपडे, स्टेशनरी आणि कटलरी साहित्याची दुकाने आहेत.
वाकणकर वाड्यास सोमवारी मध्यरात्री एकच्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळाली. त्यानंतर अग्निशामक दलाच्या नऊ गाड्या आणि दोन पाण्याचे टॅंकर तातडीने घटनास्थळी पोचले. त्यांनी प्रथम शेजारच्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविले. इतरत्र आग लागू नये, याची खबरदारी घेत अग्निशामक दलाच्या जवानांनी चारही बाजूंनी पाण्याचा मारा केला. मुख्य अग्निशमन अधिकारी प्रशांत रणपिसे, सहायक विभागीय अधिकारी दत्तात्रेय नागलकर, स्टेशन अधिकारी प्रकाश गोरे, समीर शेख, राजेश जगताप, संजय रामटेके, प्रकाश उमराटकर, गजानन पाथरूडकर, विजय भिलारे यांच्यासह इतर जवानांनी अथक प्रयत्न करीत अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली, असे मध्यवर्ती अग्निशमन केंद्राचे अधिकारी गोरे यांनी सांगितले.
पेट्रोल डिझेल स्वस्त
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती उतरत असल्यामुळे पेट्रोल व डिझेलच्या दरात नव्याने कपात करण्यात आली आहे. पेट्रोल प्रतिलिटर २.४२ रुपयांनी, तर डिझेल २.२५ रुपयांनी स्वस्त झाले आहे. मंगळवारी मध्यरात्रीपासूनच ही दरकपात लागू होईल.
मुंबईमध्ये एक लिटर पेट्रोल आता ६६.३६ रुपयांऐवजी ६३.९० रुपयांना मिळेल. डिझेलसाठी ५५.४७ ऐवजी ५२.९९ रुपये द्यावे लागतील. याआधी १ आणि १५ जानेवारी रोजी पेट्रोल, डिझेलची दरकपात झाली होती.
‘डॅडी’ सिनेमासाठी डॅडी अरुण गवळी यांची विनापरवानगी भेट घेतल्याने अर्जुन रामपाल अडचणीत
मुंबई-कुख्यात गुंड अरुण गवळीची भेट घेतल्यानं बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल कायद्याच्या कचाट्यात अडकलाय. मुंबई पोलिसांनी त्याला समन्स बजावलं असून त्याची चौकशीही होऊ शकते.
नगरसेवक हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा अरुण गवळी भोगत आहे
अरुण गवळीच्या जीवनावर आधारित ‘डॅडी’ नावाच्या सिनेमाची तयारी सध्या सुरू आहे. या चित्रपटात अर्जुन रामपाल गवळीची भूमिका साकारणार आहे. त्यादृष्टीनं, गवळीचा गुंड म्हणून झालेला उदय, गिरणगावातील त्याची दहशत, दगडी चाळ, ‘डॅडी’चं वागणं-बोलणं-स्वभाव, राजकीय वाटचाल यासंदर्भात जमेल तेवढी माहिती तो गोळा करतोय. अशातच, २९ डिसेंबरला अरुण गवळीला चेक-अपसाठी जे जे हॉस्पिटलमध्ये आणलं जाणार असल्याचं समजताच त्यानं तडक हॉस्पिटल गाठलं होतं. त्यावरून तो अडचणीत येण्याची शक्यता आहे.
२००८मधील नगरसेवक कमलाकर जामसंडे हत्येप्रकरणी अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तो सध्या तळोजा जेलमध्ये आहे. तिथूनच त्याला जे जे हॉस्पिटलच्या ओपीडीमध्ये रुटीन चेक-अपसाठी आणण्यात आलं होतं. त्यावेळी, परवानगी नसतानाही अर्जुन रामपाल गवळीला भेटल्याचं आणि जवळपास तासभर त्याच्यात गप्पाही झाल्याचं समोर आलंय. त्याची गंभीर दखल घेऊन, जे जे मार्ग पोलिसांनी अर्जुनला समन्स बजावलंय. तसंच, गवळीला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलेल्या पोलीस पथकाच्या खातेनिहाय चौकशीचेही आदेश देण्यात आलेत. त्यात अर्जुन रामपाल दोषी आढळल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते
वैकुंठ स्मशानभूमीतील सर्व समस्यांचे १५ मार्च पूर्वी निराकरण करणार…
पुणे-पुणे-वैकुंठ स्मशानभूमीतील प्रलंबित कामे १५ मार्च पूर्वी पूर्ण करून इतर
समस्यांचे ही कायमस्वरूपी निराकरण करू असे वचन म न पा चे भवन विभागाचे
अधिक्षक अभियंता राजेंद्र राउत यांनी दिले.ते आज वैकुंठ स्मशानभूमीतील
प्रलंबित कामांची व अन्य समस्यांची पहाणी केल्यानंतर बोलत होते.वैकुंठ
मधील समस्यांबाबत प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करणारे भाजप चे
सरचीटणिस संदीप खर्डेकर यांच्यासह कार्यकारी अभियंता संदीप
खांडवे,कनिष्ठा अभियंता हांडे व अन्य कर्मचारी यावेळी उपस्थित
होते.यावेळी प्रामुख्याने खालील कामे १५ मार्च पूर्वी पूर्ण करण्याचे
निश्चित करण्यात आले-
१) वैकुंठातील सर्व अंतर्गत रस्त्यांचे काम (कॉंकरीटीकरण करणे )
२) विद्युत दाहिनी समोरील झाडांचे पार तसेच विसाव्याचे ओटा दुरुस्त
करणे/डागडुजी करणे.
३) विद्युतदाहिनी मधील अस्थी गोळा करण्याच्या ठिकाणी कुंपण घालणे तसेच
तेथील शेड चे गळके पत्रे बदलने.
४) सध्या सुरु असलेले कॅन्टीन,रिसेप्शन इमारत,स्वच्छतागृह,वाचमन केबिन व
दहन क्रिया शेड चे बांधकाम ही १५ मार्च पूर्वी पूर्ण करून त्यांचा वापर
सुरु करणे.तसेच रिसेप्शन इमारतीत पास देण्याची व्यवस्था करण्यास ही
मान्यता देण्यात आली.या इमारतीत अंत्यविधि करणारे गुरुजी,न्हावी तसेच
कर्मचार्यांना विश्राम घेता यावा अशी व्यवस्था असेल.
५) ज्या मोकळ्या जागेत अनेक सन्माननीय व्यक्तींचे दहन केले जाते ती
संपूर्ण जागा थाक ठीक करणे व तेथे नागरिकांना बसण्यासाठी तयार करण्यात
येणारी व अर्धवट बांधकाम झालेली इमारत पुढील बजेट तरतूदीतून पूर्ण करणे.
६) पुढील बजेट तरतूदीतून आणखी दोन विद्युत दाहिण्या उभारणे.
७) वैकुंठ च्या मागच्या बाजूस दोन जुनी बांधकामे असून त्यांचा प्रेमी
युगल व मद्यापिंकडून गैरवापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे.त्यामुळे ही
बांधकामे पाडून टाकावीत असे ही निश्चित करण्यात आले.
याव्यतिरिक्त वैकुंठ च्या मागील बाजूस नदीत राख टाकण्यात येते (लाकडा
वरील अंत्यसंस्कारा नंतर सावडण्याचा विधि झाल्यावर उरलेली रक्षा ) हे
सर्वथा गैर असून यातून नदीतील प्रदुषण वाढत असून हे त्वरित थांबवावे व
यावर कायम स्वरूपी पर्याय शोधावा अशी मागणी ही श्री.खर्डेकर यांनी केली
आहे.मात्र हे काम भवन अंतर्गत येत नसल्याने याबाबत आयुक्तंकडे पाठपुरावा
करणार असल्याचे संदीप खर्डेकर यांनी स्पष्ट केले.
तसेच स्मशाणभूमीच्या आवारात कॅन्टीन च्या उभारणीस माझा व्यक्तीश: पाठिंबा
असून याचा उपयोग मयता ची वाट बघणारे आप्तेष्ट,बाहेर गावाहून अंत्यविधि
साठी येणारे नागरिक,रात्री अपरात्री येणारे नागरिक यांना व्हावा व येथे
माफक दरात सेवा मिळावी.जागरूक पुणेकर स्मशान भूमीत कॅन्टीन हा विषय कसा
स्वीकारतात याचा प्रशासनाने चाचपणी करूनच हे कॅन्टीन सुरु करावे असे ही
संदीप खर्डेकर यांनी स्पष्ट केले आहे.एकूणच वैकुंठ पुढील महिन्यापासून
काट टाकेल व पुणेकरांना अधिक सुविधा उपलब्ध होतील असा विश्वास आजच्या
निर्णयांवरून वाटत असल्याचे ही खर्डेकर यांनी सांगितले.
क्रांतीवीर लहूजी वस्ताद साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणीसाठी आंदोलन
क्रांतीवीर लहूजी वस्ताद साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी होण्याबाबत मागणी पूर्ण करण्याकरिता समाज कल्याण आयुक्तांलय महाराष्ट्र राज्याच्या पुणे विभागाच्या कार्यालयासमोर अन्याय विरोधी आंदोलनाच्यावतीने ” आमरण उपोषण आंदोलन ” करण्यात आले .
अन्याय विरोधी आंदोलनाचे अध्यक्ष नवनाथ चांदणे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले . या आंदोलनात माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे , माजी आमदार उत्तमप्रकाश कंधारे , अन्याय विरोधी आंदोलनाचे सचिव अशोक शेडगे , उपाध्यक्ष दादाराव देवकुळे , मधुकर चांदणे , विठ्ठल थोरात , सुरेश अवचिते , प्रकाश बगाडे , अनंत बगाडे , अशोक शेडगे , रमेश चांदणे , संतोष माने , अशोक लोखंडे , राजाभाऊ लोखंडे , अनिल जाधव , संभाजी शिंदे , अनिल हातागळे , भास्कर पाटोळे , सुरेखा खंडाळे व अन्य मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते .
या मागण्यांचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले . शासनाच्यावतीने मातंग समाजाच्या विकासासाठी क्रांतीवीर लहूजी वस्ताद साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाच्या शिफारशी केलेल्या ८२ शिफारशीपैकी ६८ शिफारशीला राज्य मंत्रीमंडळाने मान्यता देण्यात आलेल्या आहेत . शासनाने यासाठी संबधीत विभागांना जबाबदारी दिलेली आहे . याबाबत शासन निर्णय ३१ डिसेंबर २०११ रोजी झालेला असून शासनाने अध्यादेशही जारी केलेला आहे . परंतु महाराष्ट्र शासनाच्या जबाबदारी देण्यात आलेल्या विभागाकडून अंमलबजावणीस मोठा विलंब होत असल्याचे दिसून येत आहे . त्यामुळे हि बाब मातंग समाज बांधवासाठी अन्यायकारक आहे . तरी या शासनाच्यावतीने मातंग समाजाच्या विकासासाठी क्रांतीवीर लहूजी वस्ताद साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी अन्याय विरोधी आंदोलनाच्यावतीने ” आमरण उपोषण आंदोलन ” करण्यात आले .
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गोर गरीब जनतेच्या अन्नधान्य पुरवठा बंद विरोधी आंदोलन
पुणे :
‘पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस’च्या वतीने अन्नधान्य पुरवठा बंद विरोधी आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र शासनाने धान्य पुरवठा बंद व रॉकेल पुरवठा कमी केल्याने गोर गरीब जनतेवर होणार्या अन्यायाविरोधी आंदोलन करण्यात आले. पक्षाच्या वतीने अन्नपुरवठा अधिकारी धनाजी पाटील यांना निवेदन सादर करण्यात आले. हे आंदोलन आज दिनांक 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता ‘राष्ट्रवादी काँग्रेस’च्या वतीने संपुर्ण महाराष्ट्रभर करण्यात आले.
महागाईच्या विळख्यात सर्वसामान्य जनता आधीच होरपळत असताना राज्यातील दारिद्रयरेषेवरील (एपीएल) एक कोटी 77 लाख केसरी शिधापत्रिकाधारक कुटुंबांचा धान्य पुरवठा बंद करण्याचा निर्णय केंद्र व राज्य सरकारने घेतल्याने हे शिधापत्रिकाधारक मध्यमवर्गीय गहू, तांदुळ या धान्यापासून वंचित राहणार आहेत. रॉकेल कपातीबरोबरच पामतेल, साखर, डाळी जीवनावश्यक वस्तू यापूर्वीच गायब झाल्याने राज्यातील सव्वा लाख रेशन दुकानदारांना टाळे लागणार अशी स्पष्ट चिन्हे दिसू लागली आहेत.
अजुनही 3 लाख 87 हजार लोक अजुनही या योजनेपासून वंचित आहेत, अशी माहिती यावेळी अधिकार्यांनी दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे हे आंदोलन करण्यात आले. यावेळी महापौर दत्तात्रय धनकवडे, अंकुश काकडे, माजी महापौर मोहनसिंग राजपाल, कमल ढोले-पाटील, सुभाष जगताप, रर्वींद्र माळवदकर यांची भाषणे झाली.
यावेळी नगरसेवक प्रदीप गायकवाड, महेंद्र पठारे, महाराष्ट्र प्रदेश लीगल सेलचे अध्यक्ष भगवानराव साळुंखे, राजलक्ष्मी भोसले, अशोक राठी, नितीन उर्फ बबलू जाधव, दीपक जगताप, गणेश माथवड, मिलींद वालवडकर, शिल्पा भोसले, शशीकला कुंभार, मनाली भिलारे, विपुल म्हैसुरकर, राकेश कामठे सुरेश बांदल तसेच पुणे शहरातील सर्व पदाधिकारी, सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.
साहित्य संमेलनावर प्रकाशकांचा बहिष्कार
पुणे – घुमान येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनालावर “बहिष्कार‘ टाकण्याच्या भूमिकेवर प्रकाशक ठाम असून, मराठी प्रकाशक परिषदेच्या सोमवारच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे यंदाचे संमेलन पुस्तक प्रदर्शनाविनाच भरणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
मराठी प्रकाशक परिषदेचे कार्यवाह अनिल कुलकर्णी म्हणाले, की संमेलनस्थळ जाहीर झाल्यापासून परिषदेची भूमिका कायम आहे. “बहिष्कारा‘चा निर्णय अंतिम आहे. शिवाय आता कोणाबरोबरही चर्चा केली जाणार नाही.
चिमूकल्यांनी नृत्यातून दिला एकतेचा संदेश
महसूल कर्मचारी संघटनेच्यावतीने उपजिल्हाअधिकारी ज्योती कदम सन्मानित
पुणे – जिल्ह्याच्या उपजिल्हाअधिकारी ज्योती कदम यांना राष्ट्रीय मतदार दिनी दिल्लीमध्ये भारतीय निर्वाचन आयोगकडून नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत पर्वती विधानसभा मतदार संघाचा सर्वात कमी कालावधीत निकाल लावल्याबद्दल त्यांना माजी राष्ट्रपती ए . पे. अब्दुल कलाम यांच्याहस्ते स्मृतीचिन्ह , प्रमाणपत्र आणि चाळीस हजार रुपये रोख रक्कमेचे पारितोषिक मिळाल्याबद्दल त्यांचा महसूल कर्मचारी संघटनेच्यावतीने राज्याचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पाचारणे यांच्या हस्ते पुष्पगुछ देऊन सन्मानित करण्यात आले .
यावेळी शिक्षण खाते कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अनिल वाघमारे , महसूल कर्मचारी संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष दीपक चव्हाण , कोशाध्यक्ष संजय साखरे , शिवाजी खांडेकर , सतीश चांदेकर ,सुरेश मोकाशी , नायब तहसीलदार राजेंद्र सिंदकर व अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते .
ज्योती कदम यांनी पर्वती विधानसभा मतदार संघाचा सर्वात कमी कालावधीत निकाल १ तास ५० मिनिटांत लावला होता , त्यामुळे त्यांचा हा गौरव करण्यात आला . अशी माहिती शिक्षण खाते कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अनिल वाघमारे यांनी दिली . यावेळी पुणे जिल्ह्याच्या उपजिल्हाअधिकारी ज्योती कदम यांनी या गौरवाबद्दल सांगितले कि , सर्वांच्या सांघिक कौशल्याने आम्ही हे यश प्राप्त केले आहे . त्यामुळे त्यांनी सर्वांचे आभार मानले . या पुढील काळात देखील कमीत कमी वेळेत निकाल लावण्याचा विक्रम करण्याचे त्यांनी सांगितले .
भारत – पाक सामन्यात अमिताभ करणार कॉमेंट्री
किरण बेदींवर हुकुमशाही चा आरोप- भाजपच्या निष्ठावान प्रचारप्रमुखांचा राजीनामा
नवी दिल्ली – दिल्ली विधानसभा निवडणुकांपूर्वी भारतीय जनता पक्षाला (भाजप) मोठा धक्का बसला असून, भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी यांचे प्रचारप्रमुख नरेंद्र टंडन यांनी राजीनामा दिला आहे.
भाजपमध्ये येताच दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून किरण बेदींची पंतप्रधान मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी निवड करताच त्यांच्यात हुकुमशाहींचा दर्प चढला असल्याचा आरोप करीत टंडन यांनी अमित शहा यांना पत्र लिहले आहे. त्यात म्हटले आहे की, मी गेली 30 वर्षे भाजपचा सदस्य असून गेली दहा वर्षे पक्षाचा पदाधिकारी म्हणून काम करीत आलो आहे. मात्र, किरण बेदींसोबत काम करणे मला कठीन जात आहे. त्यांचा व्यवहार व वागणे-बोलणे ठीक नाही. बेदींचे सहकारी प्रत्येक बाबतीत माझा अपमान करीत आहेत. गेल्या दहा दिवसापासून बेदी ज्याप्रमाणे नेत्यांना, पदाधिका-यांना डिक्टेट करीत आहे त्या वातावरणात मला काम करणे अवघड जात आहे. मी केलेले आरोप कोणतेही सनसनाटी करण्यासाठी केले नसून पक्षाला तसे वाटल्यास त्यांनी मी केलेल्या आरोपांची चौकशी करावी असेही टंडन यांनी म्हटले आहे.










