पुणे- आज मराठी भाषा दिनानिमित्त म न से च्या रवि सहाने यांनी मी मराठी माझी स्वाक्षरी मराठी हा उपक्रम यंदाही राबविला . नगरसेविका रुपली पाटील ठोंबरे , गणेश सातपुते , वसंत खुटवड , कुणाल निंबाळकर यांनी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदविला . सहाने यांनी कित्येक वर्षापासून सुरु ठेवलेल्या या उपक्रमाची आता अन्य विविद स्तरावर दाखल घेतली जात असून अनेक संस्था , संघटनांनी हा उपक्रम आता हाती घेतल्याने याचे स्वरूप व्यापक बनले आहे
‘व्हॉट अबाऊट सावरकर ?’ सावरकरांच्या वैचारिक लढ्याची गाथा रुपेरी पडद्यावर
आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत आणि गृह राज्य मंत्री राम शिंदे यांची “डायल 108′ आपत्कालीन रुग्णवाहिका सेवा केंद्रास भेट
पुणे:
राज्याचे आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी “महाराष्ट्र मेडिकल इमर्जन्सी सर्व्हिसेस'(“डायल 108′) सेवेच्या पुण्यातील औंध येथील रिस्पॉन्स सेंटरला आज दिनांक 26 फेब्रुवारी रोजी सकाळी भेट दिली आणि सेवेचा आढावा घेतला. बी. व्ही. जी. संचालित आपत्कालीन वैद्यकीय सेवा (डायल 108) चे हे केंद्र “औंध उरो रुग्णालय’ येथे आहे. यावेळी गृहराज्यमंत्री राम शिंदे, आमदार लक्ष्मण जगताप, सुजाता सौमिक (सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग), श्रीमती आय.ए.कुंदन (“नॅशनल हेल्थ रूरल मिशन’च्या व्यवस्थापकिय संचालक) आदी मान्यवर उपस्थित होते.
“बीव्हीजी इंडिया लि.’चे अध्यक्ष एच.आर. गायकवाड, “महाराष्ट्र मेडिकल इमर्जन्सी सर्व्हिसेस’ चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर शेळके, धैर्यशील काळे (बीव्हीजी इंडिया लि., मनुष्यबळ विभाग प्रमुख) यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
“शहरामध्ये रूग्णवाहिकांना पर्याय मिळू शकतो, मात्र ग्रामीण भागात या “डायल 108′ रूग्णवाहिका सेवेची अधिक आवश्यकता आहे’, असे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी यावेळी सांगितले.
“डायल 108′ रूग्णवाहिका सेवेद्वारे ग्रामीण भागात साप – विंचु चावणे, हृदयविकार अशा प्रसंगात आपत्कालीन सेवा देण्यात येतात. तसेच अपघात, भोवळ येणे, अर्धांगवायू, विषबाधा, आगीत भाजणे अशा अनेक प्रकारच्या आपत्कालीन स्थितीमध्ये ही रुग्णवाहिका बोलावता येते. संपूर्ण महाराष्ट्रभर आपत्कालीन सेवा देणारी “एम.ईएम.एस-बी.व्ही.जी डायल 108′ ही एकमेव आप्तकालीन सेवा आहे. सेवेला येत्या 26 जानेवारी रोजी एक वर्ष पूर्ण झाले आहे. एक वर्षात या आपत्कालीन वैद्यकीय सेवेचा सुमारे दोन लाख बारा हजार, तीनशे चौसष्ट रुग्णांनी लाभ घेतला आहे, अशी माहिती “महाराष्ट्र मेडिकल इमर्जन्सी सर्व्हिसेस’ चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर शेळके यांनी दिली.
राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत, गृहराज्यमंत्री राम शिंदे, आमदार लक्ष्मण जगताप यांनी अत्याधुनिक रुग्णवाहिकेची पाहणी करून ही आपत्कालीन वेद्यकिय सेवा कशाप्रकारे चालविली जाते त्याबाबत अधिक माहिती घेतली व समाधान व्यक्त केले.
मनपाची प्लास्टिक व्यापाऱ्यांवरील कारवाई बेकायदेशीर: प्लास्टिक असोसिएशन
पुणे :
केंद्रीय व राज्य सरकारच्या कायद्याप्रमाणे प्लास्टिक प्रायमरी पॅकिंग बॅग्जवर कुठलीही बंदी किंवा जाडीची मर्यादा नाही, असे असताना महानगरपालिकेच्या चुकीच्या कारवाईचा आम्ही निषेध करीत आहोत, असे “महाराष्ट्र प्लॅस्टिक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन’ने पत्रकार परिषदेत सांगितले. अशी माहिती “महाराष्ट्र प्लास्टिक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन’चे अध्यक्ष गोपाळ राठी, सचिव प्रमोद शहा यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
पुणे मनपाने ता. 21/2/2015 रोजी प्लॅस्टिक व्यापाऱ्यांवर बेकायदेशीर कार्यवाही केली. पालिका अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांकडे पाच हजार रुपये प्रशासकीय शुल्काची मागणी केली असताना व्यापाऱ्यांनी विरोध केला म्हणून व्यापाऱ्यांच्या मागणीनंतर साधा पंचनामा करून महानगरपालिका अधिकाऱ्यांनी प्रत्येक दुकानातून माल जप्त केला.
50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरीबॅग विक्री व वापरावर बंदी आहे व किराणा पॅकिंग बॅग किंवा ब्रेड, फरसाण पॅकिंग (पी. पी.) बॅग अशा प्रायमरी पॅकिंग बॅगवर कुठलीही बंदी किंवा 50 मायक्रॉनची मर्यादा लागू होत नाही. (केंद्रीय कायदा 2011 व महाराष्ट्र शासन कायदा 2006)
प्लॅस्टिक पिशवी म्हणजे सरसकट सगळ्या बॅगची व्याख्या करून महानगरपालिका चुकीची कारवाई करीत आहे व व्यापाऱ्यांवर दडपशाही करीत आहे. या आधीपण अशा कारवायांमुळे आमच्या काही सदस्यांनी उच्च न्यायालयात फिर्याद केली आहे. हा खटला न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे, असे असतानाही कारवाई एक प्रकारचा न्यायालयाचा अपमान आहे.
पुण्याचा नागरिक म्हणून पुणे शहराची मुख्य भेडसावणारी समस्या म्हणजेच “कचऱ्याची समस्या’ ही लवकरात लवकर सुटावी अशी आमचीपण इच्छा आहे. त्यासाठी कचऱ्याचे वर्गीकरण करणे गरजेचे आहे. प्लॅस्टिक पिशव्यांचे “रिसायकलिंग’ होत आहे व “रिसायकलिंग’ करण्यासाठी असोसिएशन महानगरपालिकेला शक्य ते सहकार्य करण्यास तयार आहे.
महाराष्ट्र राज्य प्रदूषण बोर्डाने 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरीबॅग्ज उत्पादन करणारे राज्यातील व राज्या बाहेरील उत्पादकांवर कडक कारवाई करून निर्मितीच्या ठिकाणीच कारवाई करणे योग्य ठरेल. असे मत व्यापारी ललित राठी यांनी व्यक्त केले आहे.
या कारवाई वेळी शासनाचे अधिकारी व व्यापाऱ्यांतर्फे अमृत ललवाणी, ललित राठी, नितीन पटवा, सचिन राठी, हरीशभाई चंदवाणी हे सर्व उपस्थित होते.
फर्ग्युसनमध्ये सावरकरांना अभिवादन
पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वास्तव्याने पवित्र झालेली फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वसतिगृहातील खोली आज त्यांच्या 49व्या स्मृतिदिनानिमित्त नागरिकांना दर्शनासाठी खुली ठेवण्यात आली होती. पाच हजारहून अधिक सावरकरप्रेमींनी आज या वास्तुला भेट देऊन अभिवादन केले.
इतिहास प्रेमी महामंडळाने मिलिंद शेटये यांच्या मार्गदर्शनाखाली ‘क्रांतिसूर्य सावरकर’ हा नाटयप्रयोग सादर केला. सिंहगडावरील मित्रांसोबची सहल, लोकमान्य टिळकांची भेट, विदेशी कपडयांची होळी, जयोस्तुते गीताची निर्मिती आदी सावरकरांच्या महाविद्यालयीन जीवनातील घटना सादर केल्या.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह प्रा. आनंद भिडे, नियामक मंडळाचे सदस्य राम निंबाळकर, डॉ. शरद कुंटे, डॉ. श्रीकृष्ण कानेटकर, सावरकरांचे अनुयायी श्री. म. जोशी यावेळी उपस्थित होते.
सरकारने अल्पसंख्यांक समाजासाठी आखलेल्या सर्व योजना अंमलबजावणीसाठी आपण लक्ष केंद्रित देणार-गिरीश बापट
पुणे-समाजाची फसवणूक आता चालणार नाही . आता कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी मिळाली आहे . आपण सरवणी हातात हात घालून काम करणार आहोत . मुस्लिम अल्पसंख्यांक व पुणेकरांच्यावतीने महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष मोहम्मद हुसेन खान व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा संपन्न झाला . पुणे कॅम्प मधील आझम कॅम्पसमधील असेम्ली हॉलमध्ये झालेल्या नागरी सत्कार सोहळ्यास अप्पर पोलिस आयुक्त कैसर खालिद , हाजी इसहाक चाविवले , बासित शेख ,नगरसेवक अशोक येनपुरे , इक्राम खान ,मौलाना डॉ. शबि अहसन काझ्मी, अली इनामदार , लतिफ़ मकदूम , पोलिस निरीषक फिरोज बागवान , अक्रम मदारी आदी मान्यवर उपस्थित होते .
यावेळी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले कि , सर्व धर्माला बरोबर घेऊन आपण काम करतो म्हणूनच आत्मविश्वासाने काम करतो दोन समाज एकत्र आले पाहिजे , त्यातून कठीण परिस्थिती दूर होईन . मागचा इतिहास विसरून पुढील आपले भवितव्य ठरवायचे आहे . सर्वजण वातावरण बदलून एकमेकांचा विश्वास निर्माण करण्याचे काम करत आहे . कोणत्या समाजावर मी टीका करणार नाही , शिक्षणावर मुस्लिम अल्पसंख्यांक समाजाने लक्ष केंद्रित केले पाहिजे . त्यामुळे शिक्षणातून माणूस भावनिक होत नाही . मुस्लिम समाजाने चांगले व्यवसाय करण्यासाठी शिक्षण घेणे आवश्यक आहे . समाजाने शिक्षणाबरोबर पुढे आले पाहिजे . सरकारने अल्पसंख्यांक समाजासाठी खूप योजना आखलेल्या आहेत . या सर्व योजना अंमलबजावणीसाठी आपण लक्ष देणार आहोत
यावेळी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष मोहम्मद हुसेन खान यांनी सांगितले कि , आपण आपल्या पदाचा अल्पसंख्यांक समाजाच्या उन्नतीसाठी करणार आहोत , समाजाने देखील काम करताना कोठे अडचण भासल्यास माझ्याशी संपर्क साधला पाहिजे . जास्तीत जास्त कामे या आयोगाकडून करण्याचा माझा विश्वास आहे . अल्पसंख्यांक महाविद्यालयाच्या ५० टक्के सवलती आहेत त्या मिळत नाहीत . या सवलती मिळण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे . महाराष्ट्रातील पहिले अल्पसंख्यांक महाविद्यालय राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री एकनाथ खडसे यांच्या सहकार्याने जळगाव येथे सुरु करणार आहे .
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत बासित शेख यांनी केले तर सूत्रसंचालन इकबाल अन्सारी यांनी केले तर आभार हाजी इसहाक चाविवले यांनी मानले .
“इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी’ला “औषधनिर्माण सप्ताहा’चे सलग पाचव्यांदा विजेतेपद
पुणे:
“महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या “इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी’ ने 53 व्या “राष्ट्रीय औषधनिर्माण सप्ताह2014-15′ मध्ये सलग पाचव्यांदा विजेतेपद पटकाविले आहे. “इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन’ (खझअ) ने या ” राष्ट्रीय औषधनिर्माण सप्ताह 2014-15′ चे आयोजन केले होते, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही.एन.जगताप यांनी पत्रकाद्वारे दिली.
लोकसभा सदस्य संजय पाटील यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी बी.आर.मासाळ (उपआयुक्त, अन्न व औषध प्रशासन, पुणे), अनिल इंदुलकर (व्यवस्थापकीय संचालक, आर.पी.एच.कॅलिफोर्निया, यू.एस.ए.), डॉ. आत्माराम पवार (अध्यक्ष, इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन, पुणे), सचिन ईटकर (उपाध्यक्ष, इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन), प्रशांत हंबर (सचिव, इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन) उपस्थित होते.
राष्ट्रीय औषधनिर्माण सप्ताहात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 35 महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. आयोजित एकूण 14 स्पर्धांपैकी 10 स्पर्धांमध्ये “इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी’ ने विजेते तर तीन स्पर्धांमध्ये उपविजेतेपद मिळवून एकूण 1200 गुणांसह “सप्ताहाचे मानकरीपद’ (ॠशपशीरश्र उहराळिेपीहळि) पटकाविले.
एम.सी.ई.सोसायटीचे अध्यक्ष पी.ए.इनामदार, सचिव लतिफ मगदूम, उपसचिव ईरफान शेख, प्रा.व्ही.एन.जगताप, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.
“आयएमईडी’च्या वतीने “सी-गुगली 2015′ चे आयोजन
पुणे :
“भारती विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ऍण्ड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंट’ (आयएमईडी)च्या “कॉम्प्युटर ऍप्लिकेशन ऍण्ड सिस्टीम स्टडिज्’ विभागाच्या वतीने “सी-गुगली-2015′ चे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 28 फेबु्रवारी रोजी आयएमईडी कॅम्पस, पौैड रोड येथे सकाळी 10 वाजता या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. अशी माहिती भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाच्या व्यवस्थापन शाखेचे अधिष्ठाता डॉ.सचिन वेर्णेकर आणि डॉ. अजित मोरे (कार्यक्रमाचे संचालक, एम.सी.ए) यांनी पत्रकाद्वारे दिली.
प्रा. सत्यवान हेंबाडे हे या कार्यक्रमाचे संयोजक आहेत. “सी-गुगली-2015′ मध्ये डिव्हाईस एकत्र करणे, एसक्यूएल लोडस्टर, डिए वीन-सी-कोड, लॅन गेमिंग (एनएफएस), प्रकल्प सादरीकरण असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. कार्यक्रमातील विजेत्यांना रोख बक्षिसे दिली जाणार आहेत. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नोंदणी शुल्क नाही.
नाव नोंदणीसाठी संपर्क -पल्लवी : 7709255102, ईमेल पत्ता : cgoogly@learnatimed.com
संवादातून नाते जपावे : सुभाषचंद्रा
रूपेरी पडद्यावर इतिहासाचा नवा अध्याय – रझाकार
मराठीमध्ये प्रथमच स्वातंत्र्योत्तर इतिहासाच्या रोमांचकारी घटनांचा रंगतदार सिनेमा
भारताचे नागरिक म्हणून आपल्याला भारताच्या इतिहासातील महत्त्वाचे टप्पे आपल्याला माहित
असतात… इतिहासाबद्दल आपण जाज्वल्य अभिमानही बाळगत असतोच. भारताचा स्वातंत्र्यसंग्राम…
फाळणी अन् १९४७ चा काळ… इतिहासाची पानं चाळताना घटनांच्या मागोवा घेतल्याशिवाय आपला
इतिहास हा पूर्णत्त्वाला जाणार नाही. तो काळ ज्यांनी याचि देही याचि डोळा पाहिला आहे, अशी काही
ठराविक माणसं हा इतिहासाचा दस्ताऐवज आपल्यासमोर खुला करू शकतात… स्वातंत्र्यानंतरच्या काही
घटना अन् त्यानंतरच्या काही वर्षांच्या इतिहासाला नव्याने उजळा देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
आजच्या युवापिढीला नव्याने आठवण करून देण्याच्या उद्देश्याने करम मुव्हीजने पुढाकार घेऊन रझाकार
सारखा वेगळ्या जातकुळीतला सिनेमाची निर्मिती केली आहे. जेणेकरून सर्वसामान्यांपर्यंत इतिहासाचा हा
अध्याय तितक्याच प्रभावीपणे पोहोचवला जाईल कारण सिनेमा हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे.
हा सिनेमा स्वातंत्र्योत्तर काळ उलगडतो. १९४८चा काळ ब्रिटिशांनी भारत सोडल्यानंतर एका
अन्यायाविरोधातील लढ्याची ही गाथा आहे. सामान्यांवर रझाकारांनी केलेले अत्याचार अन् स्वतंत्र
भारताच्या विरोधातील अंतर्गत कारवायांना आलेला वेग या सगळ्याचं लोण पसरत होतं. प्रामुख्याने
मराठवाडा, तेलंगणा अन् कर्नाटकातील काही भागामध्ये या घटनांना वेग आला. सप्टेंबर १९४८ च्या
काळात अन्याय, अत्याचार अन् जुलमी सत्तेविरोधात संघर्ष झाला, पण आजतागायत या इतिहासाची रूपेरी
पडद्याने काय सामान्य माणसानेही दखल घेतली नाही. काही गोष्टी या अशाच राहिल्या इतिहासाच्या
पानांमध्ये दडलेल्या… हैदराबाद मुक्तीसंग्राम अन् रझाकार यांच्या अखेरच्या पर्वामुळे खरं तर अखंड अन्
स्वतंत्र भारत आपल्यासमोर आला तो काळ होता १९४८चा.. तो काळ रूपेरी पडद्यावर रझाकारच्या
निमित्ताने नव्याने चितारण्यात आला आहे.
सिद्धार्थ जाधवसारख्या हरहुन्नरी अन् प्रतिभावंत कलाकाराने आतापर्यंत वेगवेगळ्या भूमिका साकारल्या
आहेत, पण या सिनेमामध्ये दिसणारा सिद्धार्थ जाधव हा अत्यंत वेगळा अभिनेता असल्याची चुणूक
तुम्हाला बघायला मिळेल. एका खेडेगावातला साधासरळ मुलगा ते हैदराबाद मुक्ती संग्रामातील एक
सच्चा स्वातंत्र्यसैनिक होण्यापर्यंतचा त्याचा प्रवास यामध्ये चितारण्यात आला आहे. सिद्धार्थच्या
अभिनयाचे वेगवेगळे पैलू आपल्याला उलगडताना दिसतील, इतकंच काय तर त्याच्यासोबतच्या
सहकलाकारांचे दमदार परफॉर्मन्स यामुळे सिनेमाला चार चाँद लागले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने
खलनायक साकारणा-या झाकिर हुसेन आणि सिद्धार्थच्या आईच्या भूमिकेत झळकणा-या ज्योती सुभाष
यांसारख्या ख्यातनाम कलाकवंतांनी आपली छाप पाडली आहे. खरं तर सिद्धार्थ जाधव अन् ज्योती
सुभाष हे एकत्र प्रथमच या सिनेमाच्या निमित्ताने रूपेरी पडद्यावर झळकताना दिसतील. आई अन् मुलाचं
हे नातं उलगडतावना या दोन्ही कलावंतांमधील केमिस्ट्री ज्या प्रकारे रंगताना दिसते. त्या सगळ्या
गोष्टींमध्ये आपल्याला जाणवतं की काय ताकदीचे हे कलावंत असतील.
याप्रसंगी दिग्दर्शक राज दुर्गे म्हणाले की, हा सिनेमा म्हणजे केवळ एका गोष्टीवरचा सिनेमा नाही पण
या सिनेामामध्ये एक इतिहास आहे…अन् त्यासोबतच मी लहानाचा मोठा झालो कारण आजोबा अन्
वडिलांकडून ही गोष्ट ऐकायचो…रझाकारांच्या अन्यायाविरोधात लढणा-या काही महत्त्वाच्या वीरांपैकी एक
वीर माझे वडील आहेत. तत्कालीन महत्त्वपूर्ण सत्यघटना अन् अन्यायाविरोधात आवाज उठवणा-या अन्
लढणा-यांचा लढा आहे अन् त्यामध्ये सिनेमा माध्यमाचे भान ठेवत मनोरंजन मूल्यांचा समावेशही
करण्यात आला आहे.
रझाकार या सिनेमाचे दिग्दर्शन राज दुर्गे यांनी केले असून करम मुव्हीजच्या सतीश पिलंगवाड यांनी या
सिनेमाची निर्मिती केली आहे. सिनेमॅटोग्राफीची जबाबदारी सांभाळली आहे अनिकेत खंडागळे यांनी. नरेंद्र
भगत कलादिग्दर्शन करत आहेत तर अॅक्शन – साहसदृश्ये चित्रित केली आहेत कौशल – मोझेस यांनी.
मीनल देसाईंची वेशभूषा आहे मेकअपची धुरा विजय पाटील यांनी सांभाळली आहे.
२७ फेब्रुवारीला राज्यभरातील थिएटर्समध्ये रझाकार प्रदर्शित होईल.
रखवालदारांची पिळवणूक करणाऱ्या ठेकेदाराला दिले १५ कोटीचे काम?
पुणे- काँग्रेस भवनात बसून कामगार नेता म्हणून मिरवणाऱ्या आणि कामगारनच्या समस्या सोडविण्याच्या बहाण्याने स्वतः च्या समस्या सोडविणारा खुद्द बालाजीनगरला राहनाऱ्या तथाकथित धेंडा बद्दल असंतोष असताना महापालिकेला रखवालदार पुरविण्याच्या निविदा प्रक्रियेमध्ये अपात्र ठरलेल्या ठेकेदाराला ठेक्यामध्ये १५ कोटी रूपयांचा वाटा देण्याचा बेकायदेशीर ठराव स्थायी समितीने मंजूर केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. स्थायी समितीमधील काही सदस्यांची मुदत संपत असताना जाता जाता ठेकेदाराच्या फायद्याचा निर्णय स्थायी समितीकडून घेण्यात आला आहे.महापालिकेची क्षेत्रीय कार्यालये व इतर ठिकाणी ११०० रखवालदार पुरविण्याची निविदा काढण्यात आली होती. या निविदा प्रक्रियेमध्ये पात्र ठरलेल्या ४ ठेकेदारांनी प्रत्येकी २७५ ठेकेदार पुरविण्याचा ठेका देण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीमध्ये दोन आाठवडयापूर्वी घेण्यात आला. त्याकरिता १४ कोटी ८५ लाख ३० हजार रुपयांची निविदा मंजूर केली होती.स्थायी समितीमधील सदस्य रवींद्र धंगेकर, पृथ्वीराज सुतार आणि शंकर केमसे यांनी या निविदेचा फेरविचार करण्याचे पत्र स्थायी समितीला दिले. त्यानुसार मागील बैठकीमध्ये हा विषय फेरविचारासाठी आला असताना केमसे आणि धंगेकर यांनी या कामामध्ये बंदुकधारी रखवालदार पुरविण्यासाठी श्रीकृपा सर्व्हिसेस प्रा. लि. यांचा समावेश करावा, अशी उपसूचना दिली. या उपसूचनेसह ठरावास स्थायी समितीच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली. रखवालदार पुरविण्याच्या निविदा प्रक्रियेमध्ये १५ ठेकेदार सहभागी झाले होते, त्यापैकी ११ जण अपात्र ठरले. उर्वरित चौघा जणांचे दर जवळपास सारखेच होते. यातील दोघांनी ४३२ रुपये ७८ पैसे; तर अन्य दोघांनी ४३२ रुपये ७९ पैसेएवढा दर दिला आहे. त्यामुळे याबाबत सांशकता व्यक्त केली जात आहे. तर अन्य एका ठेकेदाराने ४३२ रुपये ५ पैसे इतका दर दिला होता. मात्र धुलाई भत्ता, गणवेश, रजा वेतन यांचे दरपत्रक चुकीचे असल्याने सांगून त्या ठेकेदाराचा ठेका रदद्बातल करण्यात आला आहे.
साखर निर्यातीसाठी प्रतिटन पाच हजार रुपये अनुदान – सहकारमंत्री चंद्रकांत पाटील
पुणे- कच्ची साखर निर्यात करण्यासाठी केंद्राने देऊ केलेल्या प्रतिटन चार हजार रुपयांच्या अनुदानासह राज्य सरकारही यामध्ये एक हजार रुपयांची भर घालण्याचा विचार करीत आहे. त्यामुळे साखर निर्यातीसाठी प्रतिटन पाच हजार रुपये अनुदान मिळू शकेल, अशी माहिती सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी पत्रकारांना दिली.
या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून निधी उपलब्ध करून देण्यासाठी मंत्रिमंडळापुढे प्रस्ताव दाखल करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. साखरेचे दर कोसळल्यामुळे राज्यातील अनेक साखर कारखान्यांना ऊस उत्पादकांना वाजवी दर (एफआरपी) देणे शक्य झालेले नाही. त्यासाठी केंद्राकडून कच्च्या साखरेच्या निर्यातीसाठी अनुदान देण्यात येणार आहे. केंद्राकडून प्रतिटन चार हजार रुपयांचे हे अनुदान असेल. उसाचे गाळप झाल्याने आता हे अनुदान उपलब्ध झाले, तरी किती साखरेची निर्यात होईल, यावर प्रश्नचिन्ह आहे. दरम्यान, राज्य सरकारकडूनही यामध्ये एक हजार रुपयांची भर घालण्याचा विचार असल्याचे पाटील यांनी सांगितले. यासाठी सुमारे शंभर कोटी रुपये निधी अपेक्षित असून त्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मंत्रिमंडळापुढे प्रस्ताव आणण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकारच्या या प्रस्तावाचे स्वागत केले आहे. याबाबतचा निर्णय लवकर झाला, तर कारखाने कच्ची साखर निर्माती करतील व अतिरिक्त साखरेचा प्रश्न निकाली निघेल. राजस्थानप्रमाणे राज्यातही सार्वजनिक वितरणासाठी साखर थेट कारखान्यांनकडूनच खरेदी करावी, कच्ची साखर निर्मिती होणार नसल्यास पांढऱ्या साखरेचा २० लाख टनांचा बफर साठा केल्यास अतिरिक्त साखरेचा प्रश्न काही अंशी निकाली लागेल व साखरेचे दर स्थिर राहतील, असे त्यांनी म्हटले आहे.
आजारी सहकारी बँका आणि पतसंस्थांवर सरकारी अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात येते. यापुढे त्या क्षेत्रातील चांगल्या संस्थांनी पुढाकार घेऊन अन्य संस्थांची जबाबदारी घ्यावी.
पुण्याच्या प्रश्नांवर उत्तरे देण्यासाठी भाजपच्या सहा आमदारांनी’ फ्रेंडस् ऑफ बीजेपी’कडे फिरविली पाठ
‘फे्रंडस ऑफ बीजेपी’च्या प्रदेश सह समन्वयक उषा बाजपेयी आणि ‘कुमार सिटी लेडीज् असोसिएशन्स्’ यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे शहरातील सर्व आमदार आणि नागरिक यांच्या चर्चासत्राच्या कार्यक्रमाचे (जनसंवाद २०१५ ) आयोजन रविवारी शनिवार वाड्यावर करण्यात आले होते .
पुण्याचे वाढते प्रश्न, नागरिकांच्या समस्या, समस्यांबाबत आमदारांची भूमिका तसेच नागरिकांच्या प्रश्नांवर व समस्यांवर योग्य तोडगा काढण्याच्या दृष्टिने आमदार आणि नागरिक यांच्यात संवाद साधला जाणे आवश्यक आहे. आमदारांना नागरिकांच्या समस्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी हा उपक्रम आयोजित केला असे मनोगत उषा वाजपेयी यांनी व्यक्त केले.
शहरात स्वाइन फ्लूने मृत्यूंची संख्या २१— १४ वर्षाच्या मुलीचाही मृत्यू
पुणेः स्वाइन फ्लूच्या संसर्गाचा धोका आता प्रौढ, ज्येष्ठांसह आता लहान मुलांनाही होऊ लागला आहे. येरवडा येथील चौदा वर्षांच्या ग्लोरिया कुडूक नावाच्या मुलीचा इनलॅक्स बुधराणी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. त्यामुळेश हरातील मृतांची संख्या एकवीसवर पोहोचली आहे. या आजाराचे गांभीर्य वाढले असून, शहरात सध्या २४ जणांची प्रकृती अत्यवस्थ आहे.
ग्लोरिया कुडूक मुलगी येरवड्यात राहत होती. लक्षणे दिसून आल्यानंतर तिच्या लाळेची तपासणी करण्यात आली. त्यात २० फेब्रुवारीला तिला स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे निदान झाले. मात्र, निदान होण्यापूर्वीच तिचा स्वाइन फ्लू तसेच सेप्टिसिमियाच्या आजाराने मृत्यू झाल्याची नोंद केली आहे. उपचारासाठी दोन दिवस उशीर झाल्याची नोंद आरोग्य खात्याने केली आहे.






