Home Blog Page 3620

आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींची पाचव्या आशियाई सॉफ्टबॉल स्पर्धेत निवड

0

 

1

पुणे :

‘आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालया’च्या शुभदा जगदाळे आणि दीक्षा पिल्ले या विद्यार्थिनीची पाचव्या आशियाई कनिष्ठ गट सॉफ्टबॉल स्पर्धेत भारतीय संघामध्ये निवड झाली आहे. 19 वर्षांखालील ही सॉफ्टबॉल स्पर्धा दि. 15 ते 20 मार्च 2015 या कालावधीत चयापुम (थायलंड) येथे सुरू आहे.

या स्पर्धेमध्ये भारत, मलेशिया, सिंगापूर, जपान, थायलंड, इंडोनेशिया, चीन  असे एकूण 7 संघ सहभागी झाले आहेत. या संघाचे प्रशिक्षण शिबिर कल्याणी (पश्‍चिम बंगाल) येथे संपन्न झाले.

आझम स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमीचे संचालक गुलजार शेख यांनी या विद्यार्थिनींना मार्गदर्शन केेले. महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पी. ए. इनामदार आणि सर्व विश्‍वस्त मंडळातील पदाधिकार्‍यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत.

कोशिश करनेवालोकी कभी हार नही होती…. प्राध्यापक श्री गोपीचंद चाटे सरांच्या वाढदिवसा निमित्त …

0

प्रा. गोपीचंद चाटे सरांचे शैक्षणिक कार्य कौतुकास्पद…

आज १७ मार्च त्यांचा वाढदिवस –  ज्येष्ठ आणि श्रेष्ठ  कवी हरिवंश राय ‘बच्चन’ यांची कविता इथे देवून चाटे सरांच्या बाबत चा हा अती  अल्प परिचय

लहरों से डर कर नौका पार नहीं होती,
कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती।

नन्हीं चींटी जब दाना लेकर चलती है,
चढ़ती दीवारों पर, सौ बार फिसलती है।
मन का विश्वास रगों में साहस भरता है,
चढ़कर गिरना, गिरकर चढ़ना न अखरता है।
आख़िर उसकी मेहनत बेकार नहीं होती,
कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती।

डुबकियां सिंधु में गोताखोर लगाता है,
जा जा कर खाली हाथ लौटकर आता है।
मिलते नहीं सहज ही मोती गहरे पानी में,
बढ़ता दुगना उत्साह इसी हैरानी में।
मुट्ठी उसकी खाली हर बार नहीं होती,
कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती।

असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो,
क्या कमी रह गई, देखो और सुधार करो।
जब तक न सफल हो, नींद चैन को त्यागो तुम,
संघर्ष का मैदान छोड़ कर मत भागो तुम।
कुछ किये बिना ही जय जय कार नहीं होती,
कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती।

तांबवा, तालुका केज, जि. बीड या ग्रामीण भागात गोपीचंद चाटे सरांचा जन्म झाला. प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. मुलांना दर्जात्मक शिक्षण मिळाले पाहिजे, असा त्यांचा कायम आग्रह असायचा. श्री भास्कराचार्य प्रतिष्ठान अंतर्गत चाटे शिक्षण समूहाच्या औरंगाबाद, विदर्भ, प. महाराष्ट्र, खानदेश, मुंबई, पुणे अशा ठिकाणी जवळपास १६५ शाखा स्थापन केल्या. आज लाखो विद्यार्थी यातून स्वत:चे भविष्य घडवित आहेत. शिक्षणाची पंढरी असलेल्या पुण्यात त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रांत देदीप्यमान प्रगती करीत आहेत. पालक-विद्यार्थी शैक्षणिक बदल त्यातील स्पर्धा याचा विचार करून त्यात सातत्याने बदल घडवून आणण्याची महत्त्वाची भूमिका ते पार पाडतात. कित्येक होतकरू गरीब विद्यार्थी यांना मोफत शिक्षण देतात याची कुठेही ते प्रसिद्धी घेत नाहीत. आपणास फक्त विद्यार्थी घडवायचा असून, त्याच्या पालकाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी फक्त चांगल्या प्रकारे त्याला शिक्षण द्यायची भूमिका आपली राहील, असे ते नेहमी आवर्जून सांगत असतात. त्यांचा आज वाढदिवस, त्यानिमित्ताने आतापर्यंत अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. निराधारासाठी काम करणार्‍या संस्थेला पुरस्कार, दुष्काळग्रस्त भागात चारावाटप, गरीब मुलांसाठी दत्तक योजना, विशेष मुलांच्या आश्रमांना मदत, वृद्धाश्रम, सामाजिक उपक्रम राबविले जातात. एचआयव्हीग्रस्त ममता फाउंडेशन, सिंधुताई सपकाळ यांना पुरस्कार देऊन गौरविलेले आहे आणि आज माहेर या संस्थेद्वारे निराधारांसाठी काम करणार्‍या लुसी कुरियन या विशेष पुरस्काराने सन्मानित करणार आहोत. या उपक्रमाबाबत अनेक राजकीय, शैक्षणिक, सामाजिक सहकार असलेल्या मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले आहे. त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने मन:पूर्वक शुभेच्छा. त्यांनी केलेल्या या खडतर शैक्षणिक प्रवासास आमचा सलाम

11062819_1567601700182720_4531549529009635661_n 11063424_434681823374547_4256470790536380900_n

 

कोळसा विधेयक विषयक ‘सिलेक्ट कमिटी’च्या कामास प्रारंभ खासदार, अ‍ॅड. वंदना चव्हाण यांचा समितीत समावेश

0

दिल्ली :

कोळसा विशेष तरतुदी विषयक, विधेयक सुधारणांसाठी राज्यसभेच्या ‘सिलेक्ट कमिटी’कडे सुपूर्द करण्यात आले आहे.  विधेयकातील संभाव्य बदलावर ही समिती काम करणार आहे. 19 खासदारांच्या या समितीत राज्यसभेतील 10 सदस्य  समितीवर असून,  त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार अ‍ॅड.वंदना चव्हाण यांचा समावेश आहे. अनिल दवे या कमिटीचे अध्यक्ष आहेत. दिनांक 18 मार्च 2015 या तारखेपर्यंत ही समिती आपला अहवाल सादर करेल.

वायफाय यंत्रणा असलेली राज्यातील तिसरी-पुणे महापालिका …

0
पुणे -स्मार्ट शहराच्या दिशेने एक एक पाऊल टाकणाऱ्या पुणे महापालिकेने महापालिकेच्या इमारतीमध्ये ‘वायफाय’ यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या एक एप्रिलपासून पालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये ही यंत्रणा कार्यान्वित केली जाणार असून, यामुळे प्रशासनाचा कारभार अधिक गतीने होण्यास मदत होणार आहे. वायफाय यंत्रणा असलेली राज्यातील तिसरी महापालिका अशी ओळख यामुळे पुणे महापालिकेची होणार आहे.
महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये ‘वायफाय’ सुविधा उपलब्ध करून द्यावी, असा प्रस्ताव गेली अनेक वर्षे महापालिकेकडे प्रलंबित होता महापालिकेत कामानिमित्त येणाऱ्या लोकप्रतिनिधी तसेच पालिकेतील अधिकाऱ्यांना जलद गतीने इंटरनेटची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी वायफाय किती महत्त्वपूर्ण आहे, यावर गेल्या आठवड्यात पक्षनेत्यांच्या बैठकीत चर्चा झाली. पुणे शहर ‘स्मार्ट सिटी’च्या दिशेने वाटचाल करीत असून, लवकरच शहरात मेट्रो प्रकल्प कार्यान्वित होणार आहे. राज्याची राजधानी असलेल्या मुंबई शहरातील महापालिकेमध्ये, तर उपराजधानी असलेल्या नागपूर येथील महापालिकेत वायफाय सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे. असे असताना मग पुणे शहर यामध्ये मागे का, असा प्रश्न पक्षनेत्यांच्या बैठकीत उपस्थित करण्यात आला. पालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये वायफाय सुविधा सुरु करण्यावर पक्षनेत्यांच्या बैठकीत नुकतेच शिक्कामोर्तब करण्यात आले. यामुळे पालिकेच्या विविध प्रशासकीय विभागांच्या कामकाजाला गती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महाराष्ट्र इमर्जन्सी मेडीकल सर्व्हिस (डायल 108) रुग्णवाहिका सेवा फेब्रुवारी अखेर 2,40,790 जणांना लाभ

0

पुणे :

राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने आणि ‘बीव्हीजी इंडिया लिमिटेड’ या सेवा क्षेत्रातील कंपनीच्या माध्यमातून चालविण्यात येणार्‍या ‘महाराष्ट्र मेडिकल इमर्जन्सी सर्व्हिसेस’च्या ‘डायल 108’ रूग्णवाहिका सेवेतून आपत्कालीन परिस्थितीत रूग्ण सेवा सुरू असून, फेबु्रवारी 2015 पर्यंतच्या तपशीलानुसार 2 लाख 40 हजार 790 जणांना अत्याधुनिक रुग्णवाहिका सेवेचा लाभ मिळाला आहे.

‘108’ हा दूरध्वनी डायल केल्यानंतर ‘महाराष्ट्र इमर्जन्सी मेडीकल सर्व्हिस’च्या सुसज्ज रुग्णवाहिका मदतीला येतात. ही सेवा 26 जानेवारी 2014 रोजी सुरू झाली होती. या आपत्कालीन वैद्यकीय सेवेच्या संचालनाची जबाबदारी ‘बी.व्ही.जी. इंडिया लिमिटेड’ या सेवाक्षेत्रातील अग्रगण्य कंपनीकडे असून, पुण्यातील‘औंध उरो रुग्णालयात’ या सेवेचे प्रमुख केंद्र व ‘रिस्पॉन्स सेंटर’ आहे.

‘26 जानेवारी 2014 रोजी सुरू झालेल्या या सेवेत अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज अशा 937 रुग्णवाहिका राज्यभर आहेत. या अत्याधुनिक वैद्यकीय सेवेसाठी ‘108’ या दूरध्वनी क्रमांकावर डायल केल्यास विनामूल्य सेवा देणारी सुसज्ज रुग्णवाहिका डॉक्टरांसह येते. अपघात, हृदय विकार, भोवळ येणे, अर्धांगवायू, विषबाधा, आगीत भाजणे अशा अनेक प्रकारच्या आपत्कालीन स्थितीमध्ये ही रुग्णवाहिका बोलावता येते’, अशी माहिती ‘महाराष्ट्र इमर्जन्सी मेडीकल सर्व्हिस’चे मुख्य संचालन अधिकारी डॉ. ज्ञानेश्‍वर शेळके यांनी दिली.

फेब्रुवारी 2015 पर्यंतच्या तपशीलानुसार राज्यातील रूग्णांना दिलेल्या आपत्कालीन 108 सेवेची जिल्हानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे, अहमदनगर (10,614), अकोला (4237), अमरावती (8473), औरंगाबाद (10,976), बीड (6935), भंडारा (2958), बुलढाणा (6055), चंद्रपूर (4524), धुळे (4610), गडचिरोली (1750), गोंदीया (3643), हिंगोली (3834), जळगांव (8895), जालना (4356), कोल्हापूर (11,277),लातूर (7887), मुंबई (20,142), नागपूर (9146), नांदेड (9645), नंदूरबार (3299), नाशिक (11,623), उस्मानाबाद (4967), परभणी (3967), पुणे (17,161), रायगड (3400), रत्नागिरी (2510), सांगली (8196), सातारा (8015), सिंधुदूर्ग (2091), सोलापूर (10,824), ठाणे (11,425), वर्धा (1902), वाशिम (3089), यवतमाळ (7734), पालघर (630).

‘वेळेत उपचार न मिळाल्याने अपघातातील जखमींचा जीव जाण्याचे प्रमाण मोठे आहे ही गोष्ट लक्षात आल्यानंतर आरोग्य विभागाच्या आपत्कालीन वैद्यकिय सेवा प्रकल्पांतर्गत सुरू करण्यात आलेल्या ‘108 टोल फ्री’ रूग्णवाहिका सेवेमुळे फे्रबुवारी 2015 पर्यंतच्या कालावधीत दोन लाख चाळीस हजार सातशे नव्वद लोकांचे जीव वाचले.
’, अशी माहिती ‘बीव्हीजी इंडिया’चे अध्यक्ष एच. आर. गायकवाड यांनी दिली.मुंबईकडे जाणारी एस.टी बस पांगोळी (खंडाळा) येथे महामार्गावरून दरीत कोसळल्याने झालेल्या अपघात स्थळी सेवेच्या 6 अद्ययावत रूग्णवाहिकांनी दहाव्या मिनिटाला घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले. सोलापूरजवळील टेंभूर्णी येथे नुकत्याच झालेल्या अपघातामध्ये रुग्णवाहिका सेवेच्या 3 अद्ययावत रूग्णवाहिकांनी विसाव्या मिनिटाला घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले. तसेच जखमींना रुग्णालयात दाखल करून प्राण वाचविले. गणपती विसर्जन मिरवणुकी दरम्यान आपत्कालीन वैद्यकीय सेवा रुग्णांपर्यंत अत्यंत कमी वेळेत पोहोचविण्यासाठी ‘डायल 108’ च्या रूग्णवाहिका डॉक्टर आणि सहाय्यकांसह उपलब्ध करण्यात आल्या होत्या. यावेळी ‘इमर्जन्सी गो -टीम’ ही सेवा प्रथमच आप्तकालीन सेवेमध्ये राबविण्यात आली. ‘इर्मर्जन्सी गो -टीम’च्या आप्तकालीन कीटद्वारे रूग्णांपाशी जाऊन तातडीने मदत कार्य करण्यात आले. पोलीस, फायरब्रिगेड, गणेशमंडळ यांच्या सहकार्याने ही सेवा रूग्णांना चांगल्या प्रकारे आणि तातडीने देण्यात आली.

याआधी पुणे, सातारा, पंढरपूर या तीन जिल्ह्यांतून जाणार्‍या वारी मार्गावर या वर्षी प्रथमच 108 सेवेच्या आपत्कालीन रूग्णवाहिका तैनात करण्यात आल्या होत्या. या सेवेमुळे वारीदरम्यान विविध कारणांनी दरवर्षी होणार्‍या साधारण 25 ते 30 वारकर्‍यांच्या मृत्यूचे प्रमाण कमी होऊन यावर्षी हे प्रमाण सहापर्यंत खाली आणण्यात यश आले. तसेच भीमाशंकरजवळ माळीण गावात दरड कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत ‘महाराष्ट्र मेडिकल इमर्जन्सी सर्व्हिसेस’च्या (‘डायल 108’) 28 अद्ययावत रुग्णवाहिकांनी पूर्णवेळ मदतकार्य केले.

पीएमपीच्या धडकेत बहीण- भावाचा मृत्यू

0
पुणे- कात्रजच्या पीएमपी बस स्थानकात चालकाने प्रवाशांच्या अंगावर बस घातल्यामुळे त्यात चिरडून साताऱ्यातील डांगे कुटुंबातील बहीण- भावाचा मृत्यू झाला, तर याच कुटुंबातील अन्य चार जण गंभीर जखमी झाले. हा अपघात  दुपारी दीडच्या सुमारास झाला. बसचा ब्रेक निकामी झाल्यामुळे हा अपघात घडल्याचा अंदाज आहे.
सुभाष हनुमंत डांगे (वय 50, रा. माधवनगर, सांगली) व सुनंदा तानाजी काकडे (वय 45, रा. चेंबूर, मुंबई) अशी मृतांची नावे आहेत. सुशीला संजय डांगे (वय 45), अनुष्का संजय डांगे (वय 18) आणि हेमलता हनुमंत डांगे (वय 70, सर्व रा. गोळीबार मैदान, गोडोली, सातारा) व अर्चना सुभाष डांगे (वय 17, रा. माधवनगर, सांगली) अशी जखमींची नावे आहेत. जखमींवर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे सर्व जण सातारा येथून कात्रज येथे आले होते. कात्रज बस स्थानकातून ते कोथरूडला लग्न समारंभाला जाण्यासाठी बसची वाट पाहात होते. याप्रकरणी संजय डांगे (रा. गोळीबार मैदान, सातारा) यांनी फिर्याद दिली असून, पोलिसांनी चालक वसंत आबासाहेब गायकवाड (वय 39, रा. आंबेगाव बुद्रुक) याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून, त्याला अटक केली आहे.
या चालकाने कात्रज येथून निगडीकडे जाणारी बस सुरू केली. त्या वेळी ब्रेक निकामी झाल्यामुळे वेगाने पुढे आलेल्या बसने काही अंतरावर थांबलेल्या प्रवाशांना चिरडले. त्यात सुनंदा काकडे यांचा जागीच मृत्यू झाला, तर सुभाष डांगे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातानंतर पोलिसांनी क्रेनच्या मदतीने बस बाजूला घेत महिलेचा मृतदेह ससून रुग्णालयात पाठवला, तसेच रिक्षाचालक, कात्रजच्या अजिंक्‍य भैरवनाथ मित्रमंडळाचे कार्यकर्ते आणि कात्रज पोलिस चौकीतील कर्मचाऱ्यांनी बसखाली अडकलेल्यांना बाहेर काढले. चालकाला बसवर नियंत्रण ठेवता न आल्यामुळे हा अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले

आनंदने केलेल्या विश्वविक्रमांच्या सन्मानार्थ त्याला मानद डॉक्टरेट बहाल

0

भारताचे शिखरवीर, विश्वविक्रमवीर असे अनेक विक्रम व उपाध्या धारण करणारा
आनंद बनसोडे याच्या मानात आणखी एक सोनेरी पंख खोवला असून कालच (ता.१६
रोजी) इंग्लंडच्या विश्वविक्रमाच्या विद्यापिठाने त्याला सर्वोच्च अशी
मानद डॉक्टरेट पदवी बहाल केली आहे. त्याला “डॉक्टर इन रेकॉर्ड मेकिंग”
असा बहुमान देवून त्याचा सम्मान केला आहे. आनंदने आतापर्यंत चार खंडाच्या
सर्वोच्च शिखरांवर राष्ट्रगीत वाजवले असून “प्लेईंग मुझिक ऑन माउंटन” या
विषयावरील त्याच्या कार्याचा बहुमान म्हणून आनंदला हा संम्मान दिला आहे.
दिल्ली येथे झालेल्या भव्य समारंभासाठी विएतनामचे उच्चआयुक्त टोंग सीन
थे, विएतनाम बुक ऑफ रेकॉर्ड्स चे ली ट्रेन त्रोन, राजकारणी डॉ.व्होंग
कौंग ठौंग , इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स चे डॉ.विश्वरूप रॉय चौधरी हे प्रमुख
अतिथी म्हणून उपस्थित होते.
एखाद्या शिखरावर चढून गिटारवर संगीत वाजवण्याची आगळीवेगळी कल्पना ही
आनंदची स्वतची असून २००८ च्या १५ ऑगस्ट रोजी असा विचार त्याच्या मनात आला
होता. हा विक्रम करण्यापूर्वी आनंदने खूप तयारी केली होती. यामध्ये
गिटारची बांधणी पासून तापमान,वारा, हिमदंश (शरीराचा भाग गोठून जातो व तो
नंतर कापून काढावा लागतो), मेटलबाईट (बर्फात जर कोणत्याही धातूला स्पर्श
केला तर पूर्ण त्वचा त्या धातूला चिटकून फाटून जाण्याचा रोग) ई. अनेक
गोष्टीवर वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी आनंदने ३ वर्ष खर्च केलेली आहेत.
कालांतराने १५ ऑगस्ट २०११ रोजी अमेरिकेतील कलिफोर्निया राज्यातील माउंट
शास्ता या शिखरावर आनंदने प्रथम राष्ट्रगीत वाजवून विक्रम केला होता.
जानेवारी २०१२ मध्ये “गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड” ने आनंदच्या या
विक्रमाला नामांकन देऊन आनंदसोबत “जगाच्या सर्वोच्च शिखरावरील मुझिक
कन्सट” हा विक्रम करण्यासाठी करार केला होता.८ एप्रिल २०१२ मध्ये
नेपाळमधील माउंट आयलंड, ६ मे २०१२ रोजी एव्हरेस्ट कॅम्प-२, १७ जुलै २०१४
रोजी युरोपातील सर्वोच्च माउंट एल्ब्रूस, १५ ऑगस्ट २०१४ रोजी आफ्रिकेतील
सर्वोच्च माउंट किलीमांजारो , ३ नोव्हेंबर २०१४ रोजी ऑस्ट्रेलिया मधील
माउंट कोस्कीस्झ्को या सर्व शिखरांवर भारताचे राष्ट्रगीत वाजवून आनंदने
विक्रम केले आहेत.
इंग्लंड मधील गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, भारतातील लिम्का बुक, आशिया
बुक ऑफ रेकॉर्ड्स, इंडो-चायना बुक ऑफ रेकॉर्ड्स, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड,
नेपाळ बुक ऑफ रेकॉर्ड, विएतनाम बुक ऑफ रेकॉर्ड ई. अनेक देशांच्या रेकॉर्ड
बुकशी संबंधित असलेल्या इंग्लंडमधील विश्वविक्रमांच्या विद्यापीठाने
आनंदला त्याच्या या आगळ्यावेगळ्या विक्रमाच्या कल्पनेवर व त्याच्या
पूर्ततेसाठी कराव्या लागणाऱ्या सर्व तयारीवर एक थिसीस लिहायला सांगितली
होती. “प्लेईंग मुझिक ऑन माउंटन” या विषयावर जवळपास 60 पानांच्या थिसीस
(शोधनिबंध) साठी आनंदला मानद डॉक्टरेट बहाल केली गेली आहे. या विषयावरील
आनंदची थिसीस जगभर “रेकॉर्ड रेफरन्स थिसीस” म्हणून वापरण्यात येणार आहे.
एखाद्या विक्रमांची कल्पना व त्याच्या पुर्ततेसाठीचे प्रयत्न कसे केले
जातात यासाठी जगभरातील विक्रम करणार्यांना याचा उपयोग होणार आहे.

रेकॉर्ड बुक व विक्रमांचा जज-
आनंदला आता स्वतचे रेकॉर्ड बुक सुरु करता येणार आहे. याबाबतीत तो लवकरच
घोषणा करणार आहे. तसेच कोणत्याही रेकॉर्ड साठीचे मुल्याकन करणे तसेच
रेकॉर्ड करताना पंच म्हणून जाण्याचा अधिकार आनंदला मिळणार आहे.

आई-वडिलांना समर्पित- आनंद बनसोडे
“९ वी नापास झाल्यानंतर पुढचे शिक्षण कधी घेवू शकणार नाही असे वाटत
असतानाच माझ्या आईने मला शिक्षणासाठी प्रेरित केले. वडिलांच्या
पाठींब्यामुळेच आतापर्यंत अनेक विक्रम करू शकलो आहे. त्यामुळे  माझ्या
कुटुंबातील पहिली डॉक्टरेट त्यांना समर्पित करत आहे”

महिलांनी अन्याय सहन करण्याची वृत्ती सोडावी :विनिता देशमुख

0
बुरसटलेली मानसिकता दूर करून अन्यायावर प्रहार करा :राही भिडे 
लायन्स क्लब ऑफ पुणे एलीट ‘ च्या ‘स्वयंसिद्धा ‘ पुरस्कारांचे वितरण 
पुणे :
‘ अन्याय सहन करण्याचा पारंपारिक वृत्तीमुळे महिलांसह समाजाच्या वाट्याला अन्याय च येतो ,त्यामुळे अन्यायाला विरोध करून ,झगडून न्याय मिळविण्याची सवय लावून घेतली पाहिजे ‘ ,असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या  विनिता देशमुख यांनी केले
‘ लायन्स क्लब ऑफ पुणे एलीट ‘ च्या  ‘स्वयंसिद्धा ‘  पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुण्या या नात्याने त्या बोलत होत्या .
जलतरण पटू गौरी गाडगीळ यांच्या मातुश्री स्नेहा गाडगीळ , ‘ प्रबोधन माध्यम ‘ (न्यूज एजेन्सी ) च्या संचालक गौरी बिडकर , प्रकाशक डॉ स्नेहसुधा कुलकर्णी  ,डॉ गिरीजा शिंदे,प्राजक्ता कोळपकर ,सारा सिधये ,प्राची लिमये -शहा   यांच्यासह  एकूण १५ महिलांचा गौरव विनिता देशमुख आणि पुण्यनगरी च्या संपादक राही भिडे ,प्रांतपाल विक्रांत जाधव यांच्या हस्ते  करण्यात आला
.
परिस्थितीशी संघर्ष करत यशस्वी कामगिरी करणाऱ्या महिलांना सावित्रीबाई फुले स्मृतिदिन आणि महिलादिनानिमित्त हे पुरस्कार दिले जातात .  पुरस्काराचे हे दशकपूर्ती वर्ष आहे .
विनिता देशमुख म्हणाल्या ,’ नागरी प्रश्न ,ग्राहकांचे प्रश्न ,महिलांचे प्रश्न ,प्रशासनातील  प्रश्न अशा सर्व बाबतीत भारतीय सहनशीलतेमुळे  अन्याय होत राहिले .

अन्याय सहन करण्याचा पारंपारिक वृत्तीमुळे महिलांसह समाजाच्या वाट्याला अन्याय च येतो ,त्यामुळे अन्यायाला विरोध करून ,झगडून न्याय मिळविण्याची सवय लावून घेतली पाहिजे  ‘.  शासकीय प्रश्नाबाबत माहिती अधिकार वापरण्यावर त्यांनी भर दिला

राही भिडे म्हणाल्या ,’ स्त्रियांना अधिकार पदावर येण्यावाचून पुरुषी मानसिकता रोखत आली आहे . पत्रकारिता आणि बौद्धिक क्षेत्रातही याचा अनुभव येतो ,हि खेदा ची बाब आहे . नर -मादी दृष्टीकोन आणि  बुरसटलेल्या मानसिकता दूर केल्याशिवाय स्त्रियांवरील अन्याय -अत्याचार दूर होणार नाहीत . दुष्ट प्रवृत्तींना उघड करून अन्यायावर प्रहार करण्यावर भर दिला पाहिजे ‘
लायन्स क्लब ऑफ पुणे एलीट च्या  व्यवस्थापकीय संचालक जयश्री पेंडसे ,क्लब अध्यक्ष   छाया पांचाळ , डॉ ललित  रावळ ,रवि चौधरी यावेळी उपस्थित होते
संध्या देवरुखकर यांनी सूत्र संचालन केले .
  हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार दिनांक १५ मार्च २०१५ रोजी स्वानंद सभागृह ,सहकारनगर येथे सकाळी साडे दहा वाजता पार पडला
पुरस्कारार्थी नावे :
१. .जलतरण पटू गौरी गाडगीळ यांच्या मातुश्री स्नेहा गाडगीळ ,
२. ‘ प्रबोधन माध्यम ‘ (न्यूज एजेन्सी ) च्या संचालक गौरी बिडकर ,
३. प्रकाशक डॉ स्नेहसुधा कुलकर्णी ,
४. डॉ रजनी  गुप्ते ,
५. डॉ गिरीजा शिंदे
६. छाया जाधव
७. प्राजक्ता कोळपकर
८. चैताली माजगावकर
९. रिता सेठिया
१०. प्राची लिमये – शहा
११. योगिता भगत
१२. संध्या आगरकर
१३. पद्मावती शिवगुंडे
१४. सुशीला परदेशी
१५. सारा सिधये

गोल्डमॅन दत्ता फुगे यांच्यासह तीनजणांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

0

पुणे-

भोसरीतील गोल्डमॅन दत्ता फुगे यांच्यासह तीनजणांच्या विरोधात खडकी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दत्ता ज्ञानेश्‍वर फुगे (रा.भोसरी), गणेश मुनियार आणि रमेश घाडगे (दोघेही रा.गवळीवाडा, खडकी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत भागवत पांडुरंग चाटे (वय ३३, रा.विघ्नहर्ता अपार्टमेंट, सुनीतानगर, वडगाव शेरी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दत्ता फुगे यांची वक्रतुंड फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी आहे. फिर्यादी चाटे यांनी येथे एप्रिल २0१३ ते १६ जून २0१३ या कालावधीत १३ लाख रुपये गुंतविले. यापोटी चाटेंना सहा महिन्यांसाठी सात टक्के दराने व्याज देण्यात येणार होते.मात्र व्याज आणि मूळ रक्कमही चाटे यांना अद्याप परत करण्यात आली नाही. त्यामुळे त्यांनी शुक्रवारी फिर्याद दिली आहे. आरोपींवर भारतीय दंडविधान कलम ४२0, ४0६ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दत्ता फुगे हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका सीमा फुगे यांचे पती आहेत. त्यांनी सोन्याचा शर्टतयार केला होता, तेव्हापासून ते भोसरीतील गोल्डमॅन म्हणून प्रसिद्ध आहेत. खडकी पोलीस ठाण्याचे फौजदार एस. वाय. कामुनी तपास करीत आहेत.

मुंबईतून मुली बोलावून ली मेरिडिअन च्या पब मध्ये झाला अश्लील डान्स – १३ जणांना अटक

0

पुणे – ली मेरिडिअन पंचतारांकित हॉटेलच्या पबमध्ये बंडगार्डन पोलिसांनी शुक्रवारी रात्री छापा टाकून बेकायदा अश्लील डान्स पार्टी उधळून लावली. या प्रकरणी पोलिसांनी महिंद्रा कंपनीचे क्षेत्रीय व्यवस्थापक, हॉटेल व्यवस्थापक आणि नऊ तरुणींसह 13 जणांना अटक केली आहे.

रेल्वे स्थानक परिसरातील ली मेरिडिअन हॉटेलमध्ये “स्क्रीम द क्‍लब‘ पब आहे. पोलिस आयुक्‍तांनी वर्षभरापूर्वी या पबचा परवाना रद्द केलेला आहे. तरीही या पबमध्ये डान्स पार्टीचे आयोजन केले होते. महिंद्रा कंपनीच्या एका क्षेत्रीय व्यवस्थापकाने दसरा-दिवाळी या कालावधीत वाहन विक्रीचे लक्ष्य पूर्ण करणाऱ्या वितरकांसाठी बक्षीस समारंभ ठेवला होता. त्यासोबतच डान्स पार्टीचेही आयोजन केले होते. त्यासाठी खास मुंबई येथून नऊ तरुणींना नृत्यासाठी बोलावले होते. “इव्हेंट‘ आयोजित करणाऱ्या लोहगाव येथील एका महिलेने त्या तरुणींना कार्यक्रमासाठी आणले होते.
मुंबईच्या एका व्यक्‍तीने पोलिसांना या डान्स पार्टीबाबत माहिती दिली होती. त्यावरून बंडगार्डन पोलिसांनी रात्री साडेदहाच्या सुमारास पबवर छापा टाकला. त्या वेळी तेथे तरुणी संगीताच्या तालावर अश्‍लील हावभाव करीत नृत्य करीत होत्या, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक शरद उगले यांनी दिली.
अटक केलेल्या संशयितांमध्ये कंपनीचे क्षेत्रीय व्यवस्थापक मनोजकुमार प्रेमनारायण गुप्ता (वय 42, रा. बाणेर-पाषाण लिंक रस्ता), कर्मचारी किरणपालसिंग अहलुवालिया (वय 43, रा. सिंध कॉलनी, औंध), शुभ्रनील एकनाथ करमाकर (वय 35, रा. मोरवाडी, पिंपरी), हॉटेल व्यवस्थापक अँड्य्रू मायकेल फ्रॅक्‍स (वय 46, रा. मोदीखाना, कॅम्प) आणि नऊ तरुणींचा समावेश आहे. न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्‍तता केली आहे, तसेच विनापरवाना पब चालविल्याप्रकरणी हॉटेलचे मालक राम अगरवाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

‘एलिझाबेथ एकादशी’ ने मारली मटा सन्मान’ सोहळ्यात हि बाजी

0

मुंबई –सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून , मराठी चित्रपट, नाटक, टीव्ही क्षेत्रांत मानाचे स्थान असलेल्या ‘कोहिनूर मटा सन्मान’ सोहळ्यात शनिवारी’एलिझाबेथ एकादशी’  ने  तर सर्वोत्कृष्ट नाटक म्हणून  ‘वाडा चिरेबंदी’ यांनी बाजी मारली  टीव्ही विभागात ‘गंध फुलांचा गेला सांगून’ ही मालिका अव्वल ठरली. अंधेरीच्या ‘द ललित’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये हा दिमाखदार सोहळा रंगला.
सलाम पुणे , झी गौरव , आणि 
मटा सन्मान’ पुरस्कार मिळवणाऱ्या एलिझाबेथ ला वारकरी संघटनेच्या तहकाठीत पदाधिकाऱ्यांनी विरोध करून हा चित्रपट प्रदर्शित होवू न देण्याची धमकी दिली होती त्यानंतरही हा चित्रपट दिमाखात प्रदर्शित झाला आणि रसिकांनी हि त्याला भरभरून दाद दिली
‘एस्सेल व्हिजन प्रॉडक्शन लिमिटेड’ आणि ‘मयसभा’ची निर्मिती असलेल्या ‘एलिझाबेथ एकादशी’ने सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट बालकलाकार, सर्वोत्कृष्ट संवाद, सर्वोत्कृष्ट पटकथा आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन अशा पाच विभागांत बाजी मारली. ‘तप्तपदी’ चित्रपटाने सर्वोत्कृष्ट गीत, सर्वोत्कृष्ट संगीत आणि सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका असे सन्मान पटकावले; तर ‘लोकमान्य…एक युगपुरुष’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक (शंकर महादेवन), छायाचित्रण (प्रसाद भेंडे) आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता (सुबोध भावे) हे पुरस्कार देण्यात आले.नाटक विभागात ‘अष्टविनायक’ आणि ‘जिगीषा’ची निर्मिती असलेल्या ‘वाडा चिरेबंदी’ने सर्वोत्कृष्ट नाटक आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता या पुरस्कारांवर मोहोर उमटवली. ‘सर्किट हाऊस’ या नाटकाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (विजय केंकरे), सर्वोत्कृष्ट अभिनेता (संजय नार्वेकर) आणि सर्वोत्कृष्ट विनोदी भूमिका (भूषण कडू) या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. तसेच विजया प्रॉडक्शन्सच्या ‘वानरायण’ या नाटकाला सर्वोत्कृष्ट प्रायोगिक नाटकाच्या सन्मानाने गौरवण्यात आले.
‘गंध फुलांचा गेला सांगून’ या ‘सेवेन्थ सेन्स मीडिया’निर्मित मालिकेने टीव्ही विभागात सर्वोत्कृष्ट मालिका, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (धनश्री काडगांवकर), सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता (मयूर खांडगे), सहाय्यक अभिनेत्री (भक्ती देसाई), सर्वोत्कृष्ट संकलन (असीम अहमद, रूपेश गमरे) अशा पाच पुरस्कारांवर आपली नाममुद्रा उमटवली. तसेच ‘दुर्वा’ या मालिकेने सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन (दीपक नलावडे) आणि सर्वोत्कृष्ट छायाचित्रण (अशोक पवार) हे पुरस्कार मिळवले.’कोहिनूर मटा सन्मान २०१५’ सोहळ्याचे सूत्रसंचालन अभिनेत्री समिरा गुर्जर आणि मधुरा वेलणकर यांनी केले.

रती अग्निहोत्री ने केली पती च्या विरोधात कौटुंबीक हिंसाचाराची तक्रार -उद्योजक अनिल वीरवाणी विरोधात गुन्हा दाखल

0
mel_021209_raj2
रती आपल्या पती आणि मुलासमवेत
532016_124058577770298_1018732271_n
रतीचा पती अनिल आणि मुलगा तनुज

DSC_1407

मुंबई -वयाच्या १० व्या वर्षापासून मॉडेल आणि अभिनय या क्षेत्राशी निगडीत असलेल्या आणि १९८१ मध्ये आलेल्या ‘एक दुजे के लिये’ या हिंदी सिनेमाने प्रसिद्धीच्या अत्युच्च  शिखरावर नेवून बसविलेल्या अभिनेत्री रती अग्निहोत्रीने आपल्या वयाच्या ५५ व्या वर्षी नवऱ्याच्या विरोधात कौटुंबीक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. फेब्रु.  १९८५ मध्ये रती चे अनिल वीरवाणी यांच्याशी लग्न झाले तनुज नावाचा २८ वर्षाचा मुलगा या दाम्पत्याला आहे .रती आणि अनिल यांचा मुलगा तनुज वीरवानीने नुकतेच २०१३ मध्ये लव्ह यू  सोनियो आणि २०१४ मध्ये ‘पुरानी जींस’ द्वारे चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले आहे . वरळी पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात  आल्याचे वृत्त आहे. कलम 350, 323, 506, 498ए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रती अग्निहोत्री यांनी लावलेल्या आरोपांनुसार त्यांचे पती अनिल वीरवानी यांनी 7 मार्च रोजी त्यांना बेदम मारहाण केली.

रती यांनी गुन्हा दाखल केला तेव्हा त्यांनी त्यांच्या हातावर मारहाणीमुळे तयार झालेले व्रणही दाखवले. या संपूर्ण प्रकरणामागचे कारण काय? याचा उल्लेख मात्र तक्रारीमध्ये करण्यात आलेला नाही. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या पतींचा व्यवसाय सध्या चांगल्या स्थितीत नाही. हे या वादामागचे कारण असू शकते. पोलिसांनी या प्रकरणात चौकशीनंतर कारवाई करण्यात येईल असेस्पष्ट केले आहे . रती यांचे पती अनिल हे आर्किटेक्ट असून ते व्यावसायिक आहेत. रती आणि त्यांच्या विवाहाला 30 वर्षे झाली आहेत.

स्त्रियांना आनंदी ठेवू शकणारा समाज तयार व्हावा :डॉ कुमार सप्तर्षी

0
पुणे :
‘ समाजात अजूनही विचार  शून्यतेची उपासना सुरु असताना आर्थिक सत्ता ,समाज सत्ता स्त्रियांच्या हाती देवून त्यांना आनंदी ठेवू शकणाऱ्या समाजाची निर्मिती करण्यासाठी सर्वांनी योगदान देणे गरजेचे आहे ‘ असे प्रतिपादन गांधी भवन चे अध्यक्ष डॉ कुमार सप्तर्षी यांनी केले .
‘ रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवन ‘ च्या वतीने देण्यात येणाऱ्या , ‘ व्होकेशनल एक्सेलन्स अवार्डस ‘ वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते . रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवन चे अध्यक्ष अतुल जोशी अध्यक्ष स्थानी होते
शनिवारी सायंकाळी हा कार्यक्रम वूडलेंड सोसायटी सभागृहात झाला
या कार्यक्रमात कवयित्री  डॉ अरुणा ढेरे , नूतन क्षम उर्जा संशोधन क्षेत्रात कार्यरत संशोधक  डॉ प्रियदर्शिनी कर्वे , ज्ञान प्रबोधिनी च्या   महिला सबलीकरणासाठी कार्यरत कार्यकर्त्या सुवर्णा  गोखले यांना ‘ व्होकेशनल एक्सेलन्स अवार्डस ‘ देवून गौरविण्यात आले .
यावेळी बोलताना डॉ कुमार सप्तर्षी म्हणाले ,’ अनेक समाज सुधारकांनी स्त्रियांना दुष्ट चक्रातून बाहेर काढले . तरीही आर्थिक आणि सामाजिक सत्ता स्त्रियांकडे पूर्णपणे गेली नाहीत . ती सूत्रे  स्त्रियांच्या हाती देणे परिवर्तनासाठी गरजेचे आहे . समाजात अजूनही विचार  शून्यते ची उपासना सुरु असताना आर्थिक सत्ता ,समाज सत्ता स्त्रियांच्या हाती देवून त्यांना आनंदी ठेवू शकणाऱ्या समाजाची निर्मिती करण्यासाठी सर्वांनी योगदान देणे गरजेचे आहे
भारतीय स्त्रीचा चेहरा हा स्त्रीवादाचा चेहरा नसून परिस्थितीशी खंबीर सामना करणाऱ्या स्त्रीचा चेहरा आहे . निर्णायक क्षणी स्त्रिया स्वताचे सामर्थ्य वापरतात . तरीही स्त्रियांना अद्याप मागास ठेवण्यात आले आहे .  ही  विसंगती दूर करून विधायक चित्र निर्माण करण्याची जबाबदारी सर्वांनी स्वीकारावी
प्रियदर्शिनी कर्वे म्हणाल्या ,’ जागतिक तापमान वाढीच्या मध्ये  शहरांचा वाटा वाढत असून जीवनशैली ,उर्जास्त्रोत आणि ,तंत्रे बदलून  पर्यावरण पूरक जगण्याचे परीक्षण  केले पाहिजे . स्वताची ,आस्थापनांची कार्बन फुट प्रिंट तयार केली पाहिजे
सुवर्णा गोखले यांनी बचत गटांच्या माध्यमातून महिला सबलीकरणा च्या चळवळीचे अनुभव सांगितले . महिलांमधील आर्थिक साक्षरता वाढवून त्यांचा समाजातील सन्मान वाढविणे गरजेचे आहे त्यात अनेक व्यवस्था बदलाव्या लागतील असेही त्यांनी सांगितले
डॉ सुधीर राशिंगकर ,दिलीप कुंभोजकर ,गणेश जाधव ,शुभदा ताम्हणकर  ,अंजली मेहेंदळे ,प्रकाश भट इत्यादी मान्यवर उपस्थित होते

खासदार शरद यादव यांच्या टिप्पणीवर संसदेत नाराजी अ‍ॅड. वंदना चव्हाण यांनीही व्यक्त केली नाराजी

0

दिल्ली :

दक्षिणेकडील महिलांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीबद्दल राज्यसभेत शुक्रवारी नाराजीचा सूर उमटला. महिलांवरील अत्याचाराच्या चर्चेदरम्यान बोलताना खासदार शरद यादव यांनी दक्षिण भारतीय महिलांच्या रंगाचा उल्लेख केला होता. महिलांवरील अत्याचार आणि रंग यांचा संबंध जोडण्याचा यादव यांचा प्रयत्न होता. ब्रिटिश डॉक्युमेंटरी महिला निर्मात्या गोर्‍या असल्याने त्यांना पटापट परवानग्या मिळाल्या असाही शेरा यादव यांनी मारला.

त्याबद्दल नाराजीच्या प्रतिक्रिया राज्यसभा सदस्यांनी माध्यमांकडे नोंदविल्या. ‘एनडीटीव्ही’च्या वेबसाईटने या प्रतिक्रिया प्रसिद्ध केल्या.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार, अ‍ॅड. वंदना चव्हाण यांनीही प्रतिक्रिया देताना ‘खासदार यादव यांचे विधान स्वीकारार्ह नसल्याचे म्हटले आहे.’

झी चित्रगौरव पुरस्कारांत सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान ‘एलिझाबेथ एकादशी’ला

0

2 3 4

पुण्याच्या  ज्योती चांदेकर आणि तेजस्विनी पंडित  या   मायलेकीनां  अनुक्रमे उत्कृष्ट  सहायक अभिनेत्रीआणि  उत्कृष्ट  अभिनेत्री  'झी गौरव ' पुरस्काराने यावेळी सन्मानित करण्यात  आले
पुण्याच्या ज्योती चांदेकर आणि तेजस्विनी पंडित या मायलेकीनां अनुक्रमे उत्कृष्ट सहायक अभिनेत्रीआणि उत्कृष्ट अभिनेत्री ‘झी गौरव ‘ पुरस्काराने यावेळी सन्मानित करण्यात आले

‘ पोरी जरा जपून दांडा  धर या गाण्यावर संजय जाधव आणि रवि जाधव  मारलेले नृत्याचे ठुमके -भावू कदम -निलेश साबळे ची कॉमेडी गान्यांचे-नृत्यांचे  बहारदार सादरीकरण आणि अर्थातच झी म्हटल्यावर तारे  तारकांची प्रचंड गर्दी -अशा अनेन बहारदार वैशिष्टांनी भरलेल्या कालच्या शुक्रवारच्या संध्याकाळी  बांद्रा-कुर्ला  कॉम्प्लेक्स मध्ये झी चित्रगौरव पुरस्कार सोहळा रंग -रंग रंगला…

मनोरंजनाच्या दुनियेत यशाचे अनेक मापदंड प्रस्थापित करणारी मराठी माणसाची अत्यंत जिव्हाळ्याची वाहिनी झी मराठीचे यंदाचे ‘गार्नियर ब्लॅक नॅचरल्स प्रस्तुत झी चित्रगौरव पुरस्कार’ अत्यंत दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आले. मराठी कलांगणात आपल्या तेजाने लखलखणा-या या देदीप्यमान सोहळ्यात मराठी चित्रपटाच्या सुवर्णकाळाच्या साक्षीदार असणा-या लावणी सम्राज्ञी सुलोचनाताई चव्हाण यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे, याच्या हस्ते हा सन्मान त्यांना प्रदान करण्यात आला.  मराठी तारांगणातील लखलखत्या ता-यांच्या विशेष उपस्थितीत आणि सिनेरसिकांच्या अलोट गर्दीत वांद्रे येथील एमएमआरडीए मैदानावर हा सोहळा शुक्रवार १३ मार्चला शानदाररित्या संपन्न झाला. यावर्षी चित्रपट रसिकांची आणि समीक्षकांची भरभरून दाद मिळवलेल्या ‘एलिझाबेथ एकादशी’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान मिळाला तर विशेष ज्युरी पुरस्कार मिळवत ‘किल्ला’ने एकूण सहा पुरस्कार पटकावले. मराठी चित्रपटाची गगनभरारी अशी यावर्षीची संकल्पना असलेल्या या पुरस्कार सोहळ्यासाठी खास विमानाची भव्यदिव्य प्रतिकृती मंचावर उभारण्यात आली होती. चला हवा येऊ द्या’ फेम भाऊ कदम, सागर कारंडे, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे यांच्यासह संदिप पाठक, हेमांगी कवी यांच्या धम्माल स्किट्स, लोकप्रिय नायिकांच्या नृत्याच्या दिलखेचक अदा आणि डॉ. निलेश साबळे व सई ताम्हनकर यांचं खुमासदार सूत्रसंचालन याने कार्यक्रमात जोरदार रंगत आणली.

झी गौरव पुरस्कारामध्ये यावर्षी पासून चित्रपटांसाठी चित्रगौरव आणि नाटकांसाठी नाट्यगौरव असे दोन वेगळे पुरस्कार सोहळे आखले गेले त्यापैकी चित्रगौरवचा सोहळा शुक्रवार १३ मार्चच्या संध्याकाळी पार पडला. यावर्षी चित्रगौरवसाठी एकूण ६१ चित्रपटांची एन्ट्री झाली होती. यात प्रामुख्याने ‘लय भारी’, ‘एलिझाबेथ एकादशी’, ‘क्लासमेट्स’, ‘पोश्टर बॉईज’, ‘लोकमान्य – एक युगपुरूष’ या चित्रपटांमध्ये चुरशीची टक्कर होती. आपलं सगळंच लय भारी म्हणत यावर्षी मराठी चित्रपटसृष्टीत दमदार एन्ट्री घेणा-या रितेश देशमुखला ‘लय भारी’ चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला तर ‘लोकमान्य-एक युगपुरूष’ या चित्रपटातील प्रभावी अभिनयासाठी सुबोध भावेला विशेष ज्युरी पुरस्कार देण्यात आला. ‘तिचा उंबरठा’ चित्रपटातील दमदार भूमिकेसाठी तेजस्विनी पंडितने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा तर ‘किल्ला’ चित्रपटातील संवेदनशिल अभिनयासाठी अमृता सुभाषने विशेष ज्युरी पुरस्कार पटकावला. सर्वोत्कृट चित्रपटासाठी ‘एलिझाबेथ एकादशी’, ‘लय भारी’, ‘लोकमान्य – एक युगपुरूष’, ‘पोश्टर बॉईज’ आणि ‘हॅपी जर्नी’ या चित्रपटांमध्ये चुरस होती यात ‘एलिझाबेथ एकादशी’ ने सरशी घेत बाजी मारली.

कार्यक्रमाचा परमोच्च बिंदू ठरला तो जीवनगौरव पुरस्कार प्रदानाचा क्षण. आपल्या ठसकेबाज आवाजाने मराठी लावणीला लोकप्रियतेच्या शिखरावर नेणा-या लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांना यावर्षीचा चित्रजीवन गौरव पुरस्कार राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, एन. चंद्रा ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक कमलाकार सोनटक्के यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. याप्रसंगी बोलतांना विनोद तावडे म्हणाले की, “एखादा शास्त्रीय गायक ‘बडा ख्याल’ ज्या तब्येतीने गातो त्याच तब्येतीने आणि भक्तीभावाने सुलोचनाताई लावणी गातात. एके काळी उंबरठ्याबाहेर असणारी लावणी दिवाणखान्यात आली आणि मराठी घरातली महिला माजघरातसुद्धा ती लावणी गुणगुणायला लागली याचं श्रेय सुलोचनाताईंनाच आहे. ताईंचं आयुष्य अपार कष्ट आणि संघर्षातून घडलंय. संघर्ष करून मोठी झालेली व्यक्ती अनेकदा व्यवस्थेवर आगपाखड करताना दिसते परंतू आजवर मी सुलोचनाताईंची एकही मुलाखत पाहिली, वाचली किंवा ऐकली नाही की ज्यात त्यांनी आपल्या या संघर्षासाठी व्यवस्थेला जबाबदार धरत आगपाखड केली. एक श्रेष्ठ कलाकार आणि श्रेष्ठ मनाची व्यक्तीच हा मनाचा मोठेपणा दाखवू शकते त्यामुळेच त्यांच्याबद्दल मनात अपार आदराची भावना आहे. हा पुरस्कार माझ्या हस्ते देण्यात येतोय हा मी माझा सन्मान समजतो” अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपलं मनोगत व्यक्त करतांना सुलोचनाताई म्हणाल्या की,  “माझी कारकीर्द घडविण्यात अनेक संगीतकारांचा मोलाचा वाटा आहे. मला आजवर मराठीसोबतच ज्या हिंदी, गुजराती, तेलगू, आणि पंजाबी संगीतकारांनी गाण्याची संधी दिली त्यां सर्वांचे मी मनापासून आभार मानते.  आज मिळालेला हा जीवनगौरव पुरस्कार मला लावणीचा खरा बाज देणारे माझे पती शामराव चव्हाण यांचा आशीर्वाद आहे असे मी मानते. कलाकारांचे मायबाप हे रसिक श्रोते असतात त्यांनी पसंतीची पावती दिल्यामुळेच कोणताही कलाकार मोठा होतो. आजवर मला दिलेल्या भरभरून प्रेमासाठी, आशीर्वादासाठी मी तुम्हा सर्व रसिकांचे आभार मानते आणि तुम्हाला विनम्र अभिवादन करते.”

यावेळी सुलोचनाताईंनी प्रेक्षकांच्या विनंतीवरून “फड सांभाळ तु-याला गं आला” ही लावणी त्याच सदाबहार अंदाजात गायली आणि ख-या कलाकाराला वयाचं बंधन नसतं हे दाखवून दिलं. त्यांच्या आवाजाने रोमांचित झालेल्या समस्त प्रेक्षकांनी टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात त्यांना अभिवादन केले. तत्पूर्वी सुलोचनाबाईंच्या लोकप्रिय लावण्यांवर सोनाली कुलकर्णी, भार्गवी चिर्मुले, मानसी नाईक, पूजा सावंत आणि स्मिता तांबे यांनी बहारदार नृत्यही सादर केलं.

यावर्षीच्या झी चित्रगौरव पुरस्कारासाठी जानेवारी २०१४ ते डिसेंबर २०१४ या काळात प्रदर्शित झालेल्या आणि सेन्सॉर संमत झालेल्या चित्रपटांचा विचार करण्यात आला. चित्रपट विभागासाठी रघुवीर कुलकर्णी, मिलिंद इंगळे आणि विद्याधर पाठारे यांनी परीक्षक म्हणून काम बघितले.

मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरांसह  हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत पार पडलेला झी चित्रगौरवचा हा शानदार सोहळा लवकरच झी मराठीवरून प्रसारित होणार आहे.