Home Blog Page 3611

शशी कपूर यांना ‘दादासाहेब फाळके’ पुरस्कार प्रदान

– पहा काही छायाचित्रे

355722-dpz-10myab-47 355720-dpz-10myab-49 355639-dpz-10myab-26 355653-dpz-10myab-36 355718-dpz-10myab-51 355719-dpz-10myab-50

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांना माहिती आणि प्रसारण मंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते आज (रविवार) प्रतिष्ठेचा ‘दादासाहेब फाळके‘ पुरस्कार प्रदान करण्यात आला. चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत हा सोहळा पृथ्वी थिएटरमध्ये झाला.

गेल्या आठवड्यात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते दिल्लीमध्ये पुरस्कारांचे वितरण झाले होते. मात्र, प्रकृतीअस्वास्थ्यामुळे शशी कपूर दिल्लीस जाऊ शकले नाहीत. त्यामुळे हा सोहळा मुंबईत आयोजित करण्यात आला होता. यावेळी अमिताभ बच्चन, रेखा, हेमामालिनी, झीनत अमान, वहीदा रेहमान, आशा पारेख, राज बब्बर, सैफ अली खान, जावेद अख्तर, आशा भोसले असे दिग्गज उपस्थित होते. याशिवाय, कपूर कुटुंबीयांमधील कुणाल कपूर, संजना कपूर, रणधीर कपूर, ऋषि कपूर, राजीव कपूर, करिष्मा कपूर, करीना कपूर, नीतूसिंह, रणबीर कपूर उपस्थित होते.

चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी दिला जाणारा ‘दादासाहेब फाळके‘ पुरस्कार मिळण्याची ही कपूर कुटुंबाची तिसरी वेळ आहे. यापूर्वी पृथ्वीराज कपूर आणि राज कपूर या दोघांना ‘दादासाहेब फाळके‘ पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

दक्षिण आफ्रिकेत पुरुषांवर महिलांकडून बलात्कारच्या घटना

0

पोर्ट एलिझाबेथ-दक्षिण आफ्रिकेतील एका शहरात तीन महिलांनी पुरुषावर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. पत्ता विचारण्याच्या बहाण्याने या महिलांनी अपहरण करून त्याच्यावर बलात्कार केला. त्या पुरुषाचं वीर्य मिळवण्यासाठी महिलांनी त्याच्यावर बलात्कार केल्याचं सांगण्यात येतंय.असा प्रकार यापूर्वी कधी घडलेला नाही, असं पोलिसांचं म्हणणं आहे. पण दक्षिण आफ्रिकेत पुरुषांचं वीर्य मिळवण्यासाठी महिलांकडून बलात्कारच्या घटना वाढल्या आहेत. हा नवा ट्रेन्डच तिथे सुरू झाला आहे.
एका आलिशान BMW गाडीतून या तीन महिला आल्या. त्यांनी त्या पीडित ३३ वर्षीय पुरुषाला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने गाडीजवळ बोलवलं. गाडीजवळ येताच त्या पैकी एका महिलेने त्याला डोक्याला पिस्तूल लावलं आणि धमकावून त्याला गाडीत बसवलं. यानंतर नशेचं पेय देऊन त्या पीडित पुरुषाला अज्ञात स्थळी नेलं. एकेक करून या तिन्ही महिलांना त्याच्यावर सतत बलात्कार केला. यावेळी त्या महिलांनी त्याचं वीर्य प्लॅस्टीक बॅगमध्ये जमा केलं आणि एका कुलर बॉक्समध्ये घेऊन त्या फरार झाल्या.

पोर्ट एलिझाबेथमधील क्वाझाखेल टाउनशिपमधून त्या पुरुषाचं अपहरण करण्यात आलं आणि तो राहत असलेल्या ठिकाणापासून किमान ५०० किलोमीटर अंतरारवर त्याला एका निर्जन स्थळी सोडून आरोपी महिला गाडीतून फरार झाल्या. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून अजून कोणालाही अटक झालेली नाही.

महिलांनी पुरुषाचं अपहरण करून एका अज्ञात स्थळी गाडी थांबवली आणि त्याच्याशी सेक्स करण्याच प्रयत्न केला. पण घाबरलेल्या परिस्थितीत त्याच्या मनात कुठलीही भावना निर्माण झाली नाही. त्यामुळे त्या महिलांनी त्याला उत्तेजक द्रव्य पाजलं. आणि त्याची इच्छा नसतानाही त्याच्यावर अत्याचार केला. या सर्व प्रकारात तो पुरुष शुद्धीवर होता.

भारतीय ग्राहक पंचायतीचे संस्थापक बिंदूमाधव जोशी यांचे निधन

Untitled-131

पुणे : भारतीय ग्राहक पंचायतीचे संस्थापक बिंदूमाधव जोशी ( वय 85 ) यांचे आज (रविवार) वृद्धापकाळाने पुण्यात एका खासगी रुग्णालयात निधन झाले.

मागील वर्षभरापासून ते हृदयाच्या आणि फुफ्फुसांच्या विकाराने आजारी होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. प्रकृती खालावल्यामुळे जोशी यांना मागील आठवड्यात उपचारासाठी रुणालयात दाखल करण्यात आले होते. आज (रविवार) दुपारी सव्वा तीनला त्यांची प्राणज्योत मालवली. अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव सायंकाळी 6 ते 8 दरम्यान कसबा पेठेतील ‘पसायदान‘ या बंगल्यात ठेवले जाणार असून त्यानंतर नवी पेठेतील ‘वैकुंठ‘ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातील,

इतिहास संशोधक निनाद बेडेकर यांचे निधन

पुणे

ज्येष्ठ इतिहास संशोधक, साहित्यिक आणि शिवचरित्राचे व्याख्यातेर निनाद बेडेकर यांचं आज पहाटे दीर्घ आजाराने निधन झालं. ते ६५ वर्षांचे होते. पुण्यातील रत्ना मेमोरियल हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.त्यांच्या पार्थिवावर उद्या, सोमवारी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

२००९ मध्ये वयाची साठी पूर्ण केल्यानंतर बेडेकरांनी युवक आणि गडप्रेमींना घेऊन ६१ किल्ल्यांवर भ्रमंती केली होती. शिवकालीन इतिहासाबद्दलची त्यांची ही तळमळ लक्षात घेऊन, शिवरायांच्या चरित्राची नव्या पिढीला ओळख करून देण्यासाठी आणि गड-किल्ल्यांच्या जतन-संवर्धनासाठी राज्य सरकारनं अलीकडेच नेमलेल्या समितीमध्ये प्रमुख मार्गदर्शन म्हणून निनाद बेडेकर यांची नियुक्ती करण्यात आली होती.

छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठेशाहीच्या इतिहासावर अधिकारवाणीनं बोलू शकणाऱ्या अभ्यासकांच्या प्रभावळीत निनाद बेडेकर यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं होतं. जगभरात फिरून, पुरातन कागदपत्रांचा सखोल अभ्यास करून, गड-किल्ले धुंडाळून ते शिवकालीन इतिहासात अक्षरशः रममाण झाले होते. या अभ्यासासाठीच मोडी आणि पर्शियन भाषाही ते शिकले होते. अनेक वर्षांच्या संशोधनानंतर, शिवरायांचा राज्यकारभार आणि मराठेशाही संदर्भात त्यांनी वेगळ्या दृष्टिकोनातून विश्लेषण केलं होतं. शिवाजी महाराजांचे युद्धकौशल्य, नेतृत्वगुण, दुर्गबांधणी, आरमार उभारणी अशा अनेक पैलूंपैकी प्रत्येकाचा स्वतंत्रपणे विचार करून त्यांनी त्यावर लिखाण केलं होतं. शिवरायांची व्यवस्थापकीय कौशल्य आजच्या ‘एमबीए’वाल्यांना कळावीत म्हणून इंग्रजीतही भाषण दिली होती. विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाची गोडी निर्माण करण्यासाठी व्याख्यानमाला आयोजित केल्या होत्या.

 

पुणे शहरातील रबरी स्पीडब्रेकर धोकादायक

पुणेशहरातील अनेक रस्त्यांवर वाहनांची गती कमी करण्यासाठी बसविण्यात आलेले रबरी स्पीडब्रेकर वाहनचालकांसाठी अत्यंत धोकादायक ठरत आहेत. .हे स्पीडब्रेकर काढून टाकावेत, अशी मागणी पीपल्स युनियनचे निमंत्रक रमेश धर्मावत यांनी वाहतूक शाखेचे उपायुक्त सारंग आव्हाड यांच्यासह पालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे केली आहे.
    चुकीच्या नियमांच्या आधारे बेकायदा पद्धतीने बसविण्यात आलेले हे स्पीडब्रेकर तातडीने काढून टाकावेत, अशी मागणी केली जात आहे. नियमबाह्य पद्धतीने बसविण्यात आलेल्या या स्पीडब्रेकरमुळे वाहनचालकांची तारांबळ उडत असून, यामुळे अनेकांना पाठीच्या, तसेच मणक्याच्या आजारांना सामोरे जावे लागत असल्याची तक्रार केली जात आहे.शहरातील रहदारीच्या अनेक रस्त्यांवर वाहनांचा वेग कमी करण्यासाठी स्पीडब्रेकर बसविले जातात. वाहतूक शाखेच्या मान्यतेनंतर पालिका ते बसवते. हे स्पीडब्रेकर कसे असावेत, याबाबत इंडियन रोड काँग्रेसमध्ये मार्गदर्शक तत्वे घालून देण्यात आले आहेत. यामध्ये केलेल्या सूचनांनुसार रस्त्यांवर स्पीडब्रेकर बसविणे गरजेचे असते. मात्र, याकडे दुर्लक्ष करत चुकीच्या पद्धतीने रबरी स्पीडब्रेकर बसविण्याचा ‘प्रताप’ महापालिका प्रशासनाने केला आहे. वाहतूक शाखेने दिलेल्या मान्यतेनंतरच अशा पद्धतीचे स्पीडब्रेकर बसविण्यात आल्याचा खुलासा करून पालिका आपली जबाबदारी झटकून टाकत आहे.

अनिकेत विश्वासराव – पूजा सावंत पुन्हा एकत्र – स्टोरी हाय पण खरी हाय …

सुकर्मा फिल्म्स निर्मिती संस्थेअंतर्गत संजय मेहता निर्मित, उमेश जंगम लिखित आणि आशिष भेलकर दिग्दर्शित स्टोरी हाय पण खरी हाय या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण मुंबईत वेगाने सुरु आहे, अनेक दिवसांपासून चित्रपटात अनिकेत विश्वासरावच्या नायिकेची भूमिका कोणती अभिनेत्री साकारते याबाबत अनेक शक्यता वर्तवल्या जात होत्या, परंतु अखेर या नाट्यावर पडदा पडला असून चित्रपटात अनिकेतची नायिका म्हणून पूजा सावंतची वर्णी लागली आहे, म्हणजे पुन्हा एकदा ही रोमैंटिक जोडी एका वैविध्यपूर्ण कथानकातुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

याबाबत पूजा सावंत ने आपली पहिली प्रतिक्रया नोंदवितांना सांगितले की, स्टोरी हाय पण खरी हाय..हा खरोखरंच माझ्यासाठी खुप वेगळा विषय असून, या चित्रपटात मला पहिल्यांदाच वेगवेगळया छटा असणारी व्यक्तिरेखा साकारायाला मिळाली आहे. एका चाळ मध्ये सामान्य मुलीपासून ते कोर्पोरेट पर्यंतचा माझा प्रवास यात प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे, सदर चित्रपटात विषयाचे अनेक पदर असून लेखक उमेश जंगम यांनी ते चपखलपपने मांडले आहे, शिवाय दिग्दर्शक आशिष भेलकर यांचा हिन्दी सिनेमा जगतातील दिग्दर्शनाचा अनुभव या मराठी चित्रपटात काम करतांना सहजपणे दिसून येतो आहे.

अनिकेत विश्वासराव चित्रपटाबाबत सांगतो की, खरतंर हा चित्रपट मी स्वीकारला तो कथानक आणि थरारक शेवट लक्षात घेउन. या चित्रपटात मी इंडस्ट्रीयालिस्टच्या मुलाची भूमिका साकारत आहे, त्याने केलेला संघर्ष, स्वतःच्या ध्येयासाठी केलेली साधना या सर्वातून युवकांना नक्कीच प्रेरणा मिळणार आहे.. एका वाक्यात सांगायाचे झाले तर स्टोरी हाय पण खरी हाय आणि विशेष म्हणजे या चित्रपटातून माझी चॉकलेट हिरोची इमेज मोडीत निघणार आहे, म्हणुनच तुमच्याप्रमाणे मी देखील या चित्रपटाची वाट पहातो आहे.

दिग्दर्शक आशिष भेलकर सांग्तात की, सर्व काही चित्रपटाच्या नावांतच दडलंय.. स्टोरी हाय पण खरी हाय यात प्रत्येक भुमिकेची वेगवेगळी स्टोरी आहे, जी प्रत्येकाच्या दैनदिन जीवनात घडत असल्याने ती खरी आहे म्हणुन आम्ही पुन्हा पुन्हा सांगतोय की स्टोरी हाय पण खरी हाय. चित्रपटात एकुण चार गाणी असून महेश चिनार यांचे संगीत लाभले आहे. शिवाय चित्रपटात वैभव मांगले, आशा शेलार, राजेश भोसले, नम्रता आवटे, नितिन जाधव, योगिनी पोफळे, स्मिता डोंगरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

जागतिक मातृदिनानिमित्त विश्‍वमाता फाऊंडेशन च्या वतीने आदर्श माता चा सन्मान .. 51 मातांना आदर्श माता गौरव पुरस्कार प्रदान

पुणे :
विपरीत परिस्थितीत संघर्ष करीत अपत्यांना पुढे नेणाऱ्या आदर्श मातांचा सत्कार  मातृदिना निमित्त विश्वमाता फौन्डेशन तर्फे गृहराज्यमंत्री राम शिंदे ,पद्मविभूषण डॉ के एच संचेती ,साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ सदानंद मोरे  हस्ते

करण्यात आला
‘संघर्ष मानवाला पुढे जाण्यास प्रवृत्त करतो, माता पिता त्यात प्रेरणा देतात म्हणून त्यांचा सन्मान महत्वाचा आहे ‘ असे प्रा राम शिंदे यांनी सांगितले . तर ‘ आई कष्टाची सवय लावते आणि घराला पुढे नेते . मलाही यशाची प्रेरणा आई कडून मिळाली ‘ असे  डॉ  के एच संचेती यांनी सांगितले
शिवाजी घाडगे यांनी प्रास्ताविक केले . अन्वय बेंद्रे यांनी सूत्र संचालन केले

जागतिक मातृदिनानिमित्त विश्‍वमाता फाऊंडेशन, पुणे च्या वतीने भारतातील 51 मातांना ‘आदर्श माता गौरव पुरस्कार -2015’ आज दिनांक 9 मे रोजी प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार प्रदान सोहळा बालगंधर्व रंगमंदीर, पुणे येथे सायंकाळी पद्मविभूषण डॉ. के. एच्. संचेती (थोर मातृभक्त आणि विश्‍वविख्यात अस्थिरोग तज्ज्ञ) आणि ना. प्रा. राम शिंदे (गृह राज्यमंत्री, पर्यटन आणि पालकमंत्री, अहमदनगर ) यांच्या हस्ते संपन्न झाला.

ईश्‍वरचंद गोयल ( ज्येष्ठ समाजसेवक व उद्योगपती, प्रिस्टाईन ग्रुपचे संस्थापक) कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होते. यावेळी भाग्यश्री दांगट (प्रभाग समितीच्या अध्यक्ष), ज्येष्ठ उद्योगपती नंदकुमार वाळंज , बाळासाहेब बोठे -पाटील ( पत्रकार , अहमदनगर), शिवाजी घाडगे (संस्थांपक अध्यक्ष, विश्‍वमाता फाऊंडेशन) आदी मान्यवर उपस्थित होते.

अतिशय प्रतिकुल परिस्थितीशी संघर्ष करून ज्या मातांनी आपल्या मुलांना लहानाचे मोठे केले, संस्कार-शिक्षण, आदर्शाचे बाळकडू दिले आणि आज ही मुले समाजामध्ये आदर्शवत सेवाकार्य करीत आहेत अशा मातांचा सत्कार या सोहळ्यात करण्यात आला. आजपर्यंत संस्थेने संपूर्ण जगभरातून निवडक 582 आदर्श मातांचा आणि 121 आदर्श पित्यांचा गौरव केला आहे.

राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलच्या विद्यार्थ्यांचे जेईई (मुख्य) 2015 परीक्षेत दैदिप्यमान यश उपमहापौर – आबा बागुल यांची माहिती

पुणे,  – समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गांतील आणि खासकरून झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या

विद्यार्थ्यांना मोफत दर्जेदार शिक्षण देण्याच्या उद्देशाने राजीव गांधी अॅकेडमी ऑफ ई-लर्निंग स्कूल आणि

ज्यूनियर सायन्स कॉलेजची स्थापना करण्यात आली आहे. येथील विद्यार्थ्यांनी जेईई मेन (जेईई मुख्य – 2015)

परीक्षेत दैदिप्यमान यश मिळवून हा उद्देश साध्य केला आहे. ही केवळ सुरूवात असून हाच प्रयोग पुणे

महापालिकेच्या अन्य शाळांमध्ये राबविण्याची योजना आहे, अशी माहिती पुण्याचे उपमहापौर उल्हास उर्फ आबा

बागुल यांनी दिली.

याविषयी अधिक माहिती देताना श्री. बागुल म्हणाले, की पुणे महापालिकेने 1 ऑगस्ट 2013 पासून

शिवदर्शन, सहकार नगर येथे राजीव गांधी अॅकेडमी ऑफ ई-लर्निंग स्कूल आणि ज्यूनियर सायन्स कॉलेज सुरू

केले. सरकारी आणि खासगी भागीदारीचे हा प्रकल्प एक उत्तम उदाहरण असून पेस एज्युकेशनल ट्रस्ट, मुंबई या

संस्थेद्वारे हे ज्यू. कॉलेज चालविले जाते.

या महाविद्यालयात पहिल्या वर्षी 176 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला होता. त्यातील 40 जण पुणे पालिकेच्या

शाळांमधून होते आणि 16 विद्यार्थी पुणे पालिकेच्या हद्दीत राहणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातून आले होते.

यातील सुमारे 168 विद्यार्थ्यांनी 12वीची परीक्षा दिली. या 168 विद्यार्थ्यांपैकी 156 विद्यार्थ्यांनी जेईई मेन,

बीआयटी-सॅट, व्हीआयटी सॅट आदी यांसारख्या विविध अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा दिल्या आहेत. 156

विद्यार्थ्यांपैकी 151 विद्यार्थ्यांनी जेईई मेन परीक्षा दिली तर 12 विद्यार्थ्यांनी एआयपीएमटी व एनएचटी-सीईटी

यांसारख्या वैद्यकीय परीक्षांची तयारी केली आहे.

ते म्हणाले, “इंजिनियर किंवा डॉक्टर होण्याचे या विद्यार्थ्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांचे

सशक्तीकरणही करण्याचे प्रयत्न शाळेच्या माध्यमातून करण्यात येत आहेत. केवळ परीक्षा देऊन न थांबता परीक्षा

दिलेल्या या महाविद्यालयातील 151 विद्यार्थ्यांपैकी 69 विद्यार्थी जेईई अॅडव्हान्स्डसाठी (म्हणजेच 21

आयआयटीच्या प्रवेशासाठी) पात्र ठरले आहेत. उत्तीर्णांचे हे प्रमाण 46 टक्के असून या पात्र ठरलेल्या 69

विद्यार्थ्यांपैकी 57 विद्यार्थी सामान्य वर्गातून आणि 12 विद्यार्थी मागासवर्गातून पुढील फेरीसाठी निवडले गेले

आहेत. पुणे महापालिकेसाठी खरोखर हा अभिमानाचा क्षण आहे.”

या संस्थांव्यतिरिक्त बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (3000 जागा असलेले 4 बिट्स) व वेल्लोर

इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, एसआरएम, मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इ. अन्य आघाडीच्या

संस्थांमध्ये प्रवेशासाठीही विद्यार्थी प्रयत्न करत आहेत. वैद्यकीय प्रवेश परीक्षांची प्रक्रिया चालू आहे आणि त्यांचे

निकाल जून 2015 मध्ये जाहीर होतील. आमच्या 12 विद्यार्थ्यांनी या परीक्षांसाठी तयारी केली आहे आणि

त्यांच्या निकालांची प्रतीक्षा आहे, असेही श्री. बागुल यांनी सांगितले.

पुणे पालिकेने पुरविलेल्या पायाभूत सोईसुविधा आणि पेस एज्युकेशनल ट्रस्टचे संचालक श्री. प्रवीण

त्यागी यांनी पुरविलेल्या उत्तम शिक्षकांमुळे हे यश मिळाले आहे, असे ते म्हणाले.

भविष्यातील योजनांबाबत बोलताना श्री. बागुल म्हणाले, “पालिकेच्या राजीव गांधी अॅकेडमीने पुण्यातील

कोणत्याही शाळा किंवा महाविद्यालयाच्या दृष्टीने आतापर्यंतचे सर्वात लक्षणीय निकाल दिले आहेत. एकदा हा

प्रयोग यशस्वी झाला म्हणजे ही सुविधा पुणे पालिकेच्या आणखी 3-4 शाळांमध्ये देण्याची आमची योजना आहे.

राजीव गांधी अॅकेडमीतील आणखी विद्यार्थ्यांपर्यत सुद्धा ही सुविधा पुरविण्याची आमची योजना आहे. सध्या

आम्ही 240 जागांवर प्रवेश देण्याची मंजुरी दिली आहे आणि या शैक्षणिक वर्षापासून आणखी 240

विद्यार्थ्यांपर्यंत ही प्रक्रिया पोचविण्याची प्रक्रिया सुरू आहे.”

पालिका शाळांमधील व समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गांतून निवडलेल्या विद्यार्थ्यांसाठी येथे

पायाभरणी कार्यक्रम (फाऊंडेशन बिल्डर प्रोग्राम) चालवण्यात येतो. आयपीएम, एमटीएसई, आरएमओ,

एनएसओ, राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा, महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षा, होमी भाभा बाल वैज्ञानिक, ज्यूनियर सायन्स

ऑलिम्पियाड यांसारख्या विविध स्पर्धात्मक परीक्षांसाठी या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येते किंवा

तयारी करून घेण्यात येते.

सर्वांना, खासकरून वंचित गटांना, दर्जेदार शिक्षण देण्याचे हे ध्येय साध्य करण्याकरिता संपूर्ण

पुण्यातील 50 प्रतिभावंत विद्यार्थिनींना राजीव गांधी अॅकेडमीत मोफत निवास व भोजन व्यवस्थेसह

महिला व बाल कल्याण विभाग, महाराष्ट्र सरकार यांच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्याची आमची योजना

आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

स्वत:च्या अंगावर फटके मारून घेत बालगृह चालक व कर्मचाऱ्यांचे आत्मक्लेश आंदोलन

पुणे : राज्यातील ८० हजार अनाथ बालके भोजन अनुदान नसल्याने उपासमारीच्या उंबरठ्यावर आलेली असतांना आणि ९ हजार बालगृह कर्मचारी वर्षानुवर्षे वेतनापासून वंचित राहून वेठबिगारीचे जीवन जगात असतानाची वस्तुस्थिती शासनाला ज्ञात असतांना हेतू पुरस्कर टाळाटाळ करणारया उदासीन शासनाच्या वेळकाढू धोरणाच्या निषेधार्थ आज (दि. ९) रोजी बालगृह चालक-कर्मचारीनी स्वत:च्या अंगावर चाबकाने फटके मारून घेत अनोखे लक्षवेधी आत्मक्लेश आंदोलन केले.

                 तीन वर्षापासून अनाथ बालकांचे सुमारे १२५ कोटी रुपयांचे भोजन अनुदान मिळालेले नाही,सदरचे थकीत अनुदान १२१५ या सुधारित दराने एकरकमी मिळावे,बालगृह कर्मचारीना वेतन आणि इमारतीना घरभाडे मिळावे,तसेच मंत्री महोदयांना बालगृहाच्या बाबत नकारात्म महिती देऊन अनाथ बालकांना वाऱ्यावर सोडणाऱ्या महिला व बालविकास विभागाचे ओर्धन सचिव,उपसचिव व संबधित तत्सम भ्रष्ट यंत्रणेची हकलपट्टी व्हावी,या प्रमुख मागण्यासाठी गत पाच दिवसांपासून बालविकास संस्थाचालक व कर्मचारी संघटनेच्यावतीने महिला व बालविकास आयुक्तालय पुणे येथे धरणे आंदोलन सुरु आहे.ढिम्म प्रशासन आणि निद्रीस्त शासन या आंदोलनाची दखल घेत नसल्याने आंदोलकांनी प्रचंड संताप व्यक्त करत आज आत्मक्लेश करून घेत स्वत:च्या अंगावर चाबकाचे कोरडे ओठून घेत गगनभेदी घोषणा देत असंवेदनशील शासनाचा तीव्र शब्दात निषेध केला. या आंदोलनात उषा फाले (वर्धा),ललित कुंभार (परभणी),शेख शाहीन (हिंगोली),सुशीला अल्बाद(नाशिक),कविता वाघ (औरंगाबाद) या महिला आंदोलकंसह माधवराव शिंदे (सातारा),सी. आर. पाईकराव,लालजीबा घाटे (नांदेड)ऱम शिंदे,सुरेश वाघमारे गुरुजी (लातूर)सौदाम सोनपीपळे (नागपूर),जावेद पटेल,उल्हास पाटील,प्रभाकर दंबरे (सोलापूर)डी. पी. नादरगे (उदगीर) इंद्र आहरे,संजय पगारे,संजय आहेर,संदिप शिंदे,आदींनी भाग घेतला. 


सुवर्ण महोत्सवानिमित्त भारती विद्यापीठ दिल्ली कॅम्पसच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा

111

‘विटेंज कार डिस्प्ले’ चे डॉ.विश्‍वजीत कदम यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे :

भारती विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त भारती विद्यापीठ दिल्ली कॅम्पसचा मेळावा पश्‍चिम विहार येथे यशस्वीरित्या पार पडला. विद्यापीठाचे सचिव डॉ. विश्‍वजीत कदम, आम आदमी पक्षाचे आमदार आणि माजी विद्यार्थी सौरभ भारद्वाज, व्यवस्थापनशास्त्र शाखेचे अधिष्ठाता डॉ. सचिन वेर्णेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ‘विटेंज कार डिस्प्ले’ चे डॉ. विश्‍वजीत कदम यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

माजी विद्यार्थी चंदन सकुजा यांनी डॉ. विश्‍वजीत कदम यांचा सत्कार केला. माजी विद्यार्थी आदीत्य वीज यांच्या संग्रहातील 11 जुन्या आणि दुर्मिळ कार हे या मेळाव्याचे वैशिष्ट्य ठरले. मेळाव्याला संगणक व्यवस्थापन, अभियांत्रिकी, वैद्यकीय विज्ञान, विधी, आयुर्वेद आदी विभागाचे प्राध्यापक, शिक्षक आणि माजी विद्यार्थी तसेच देश -परदेशातून माजी विद्यार्थी उपस्थित होते.

1100 विद्यार्थी या मेळाव्याला उपस्थित होते. ‘शाम- ए- मिलाप हा गझलांचा कार्यक्रम तसेच ‘विटेंज कार डिस्प्ले’ हे आकर्षण होते. यावेळी प्रियदर्शन डुंबरे, सी. बी. सावंत, डॉ.विकासनाथ, डॉ. एस. एन. हुडा, डॉ. धर्मेंद्र कुमार, पारूल आगरवाल, वरूण श्रीवास्तव उपस्थित होते.

सलमान खान च्या शिक्षेला हाय कोर्टाची स्थगिती -जेलवारी टळली

0
मुंबई – हिट अँड रन प्रकरणात सलमान खानला सेशन कोर्टाने सुनावलेल्या शिक्षेला हायकोर्टाने स्थगिती दिली आहे. त्याला जामीनासाठी नव्याने अर्ज करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यासाठी त्याला आधी कोर्टासमोर हजर होऊन, त्यानंतर जामीन मिळवावा लागेल. जवळपास दीड तास चाललेल्या युक्तीवादानंतर सलमानची तुरुंगवारी टळली आहे. सलमानच्या वतीने अॅड. अमित देसाई यांनी केलेल्या युक्तीवादासमोर सरकारी वकीलांचा युक्तीवाद कुचकामी ठरला. 
सलमानच्या वकिलांनी युक्तिवादात एक वगळता सर्व कलमं जामीनपात्रं असल्याचे सांगितले. त्यावर उच्च न्यायालयाच्या न्यायधीशांनी दिवंगत साक्षीदार रवींद्र पाटील याच्या जबाबाची प्रत पाहण्याची मागणी केली. तसेच सलमानच्या शिक्षेला स्थगिती देण्यास विरोध का? त्यामागचा आधार काय? अशी विचारणा न्यायधीशांनी सरकार पक्षाला केली आहे. तसेच माझ्या कोर्टासमोर सुनावणी सुरू असताना, निकाल लागेपर्यंत त्याला तुरुंगात पाठवण्याची गरज काय असे निरीक्षणही न्यायाधीशांनी मांडले. हे निरीक्षण आहे निकाल नाही, असेही त्यावेळी न्यायाधीशांनी सांगितले.
सत्र न्यायालयाच्या निर्णयचा आधार काय असेही कोर्टाने विचारले. या जामीनासाठी दिग्गज वकिलांची फौज सलमानच्या कुटुंबीयांनी उभी केली आहे. दरम्यान सलमानच्या एका चाहत्याने कोर्टाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.
हिट अँड रन प्रकरणी पुढची सुनावणी 15 जूनला होणार असून जूनमध्ये खटला संपवण्याची तयारी ठेवा असं कोर्टाने बजावलं आहे. दरम्यान सलमान खानला परदेशवारी करण्यापूर्वी हायकोर्टाची परवानगी घ्यावी लागणार आहे.

पी से पीए म तक 29 मे ला

111

धवल जयंतीलाल गाडा प्रस्तुत अक्षय जयंतीलाल गाडा आणि रेश्मा कडाकिया निर्मित व कुशल कांतिलाल गाडा सह निर्मित पी से पीऍम तक हा हिंदी चित्रपट 29 मे 2015 ला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रख्यात दिग्दर्शक कुंदन शहा यांनी केले आहे.

यात भरत जाधव, मिनाक्षी दीक्षित यांच्या प्रमुख भूमिका असून इंद्रजीत सोनी, यशपाल शर्मा, अंजन श्रीवास्तव, दीपक शिर्के, अखिलेन्द्र मिश्रा, मुश्ताक़ खान, आनंद काळे, वेदिश, प्रेरना वनवारी, चिन्मय जाधव, गीतांजलि कुलकर्णी, वीरेंद्र सक्सेना, उपासना सिंघ, पंढरीनाथ कांबळे, संजय दाधिच या कलकरांचा समावेश आहे.

हा चित्रपट ब्लैक कॉमेडी असून आजच्या राजकीय व्यवस्थेवर टिपणी करतो. हा राजकीय उपहासात्मक चित्रपट एका वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्री भोवती फिरतो जी जीव वाचवण्यासाठी पळत असते. नशिबाने ती एका छोट्या शहरात पोहोचते जेथे निवडणुकीची रनधुमाळि माजलेली असते. ती त्या निवडणुकीच्या रनधुमाळित अडकते आणि शेवटी मुख्यमंत्र्याच्या खुर्चीत बसते. पन त्यानंतर काय होते. खरच ती त्या पदाला न्याय देऊ शकेल का?

भरत जाधव

भरत जाधव यांचे बॉलीवुड मधे पुनः पदार्पण
या वेळी आपण त्यांना एका भ्रष्ट नेत्याच्या भूमिकेत पाहणार आहोत ज्याचा सुन्दर स्त्री हा वीक पॉइंट आहे.

मिनाक्षी दीक्षित

या चित्रपटात मिनाक्षी दीक्षित वेश्येच्या मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहे. जेव्हा तिच्या कुंटनखान्यावर पोलिस करवाई करण्यासाठी येतात तेव्हा ती जीव वाचवण्यासाठी तीथुन पळते. आसरा शोधण्यासाठी ती साताऱ्याला येते आणि तेथील निवडणुकीच्या रनधुमाळीत अडकून शेवटी मुख्यमंत्री होते.

 कुंदन शहा (दिग्दर्शक) या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत कुंदन शहा.

कुंदन शहा हे जाने भी दो यारो सारख्या क्लासिक चित्रपटाचे दिग्दर्शक असून बऱ्याच वर्षाने ते बॉलीवुड मधे पुनः आपली जादू दाखवन्यास सज्ज झाले आहेत.

 धवल गाडा

 हा चित्रपट धवल जयंतीलाल गाडा यांची प्रस्तुति असून ते हिंदीतील एका प्रख्यात निर्मिति संस्थेचे प्रमुख आहेत. त्यांच्या आगामी चित्रपटात सिंघ इज ब्लिंग या चित्रपटाचा समावेश आहे. तसेच ते दूरदर्शन वरील उड़ान (कलर्स चॅनेल) आणि इतना करो ना मुझसे प्यार (सोनी एंटरटेनमेंट चॅनेल) या मलिकांचे निर्माते आहेत.

रिदम वाघोलीकर ‘इस्मा’ पुस्काराने सन्मानित

0

पुणे :
पुण्यातील युवा ‘टॅरो कार्ड रिडर’ रिदम वाघोलीकर याला इस्मा इन्स्टिट्यूट (इंटरनॅशनल स्पिरिच्युअ‍ॅलिटी मार्केट )च्या वतीने अध्यात्म क्षेत्रातील दोन पुरस्कार प्राप्त झाले आहेत. हा पुरस्कार प्रदान कार्यक्रम मुंबई येथे पार पडला. अध्यात्म प्रशिक्षक किरण गुप्ता आणि देवकी राव यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

‘टॅरोकार्ड वाचन’ आणि ‘विका’ क्षेत्रातील युवा भविष्यवेत्ता म्हणून हे पुरस्कार देण्यात आले.

येत्या १५ मे ला …

समाजात अनेक चुकीच्या गोष्टी घडत असतात. पण याची झळ जोपर्यंत आपल्यापर्यंत  पोहचत नाही तोपर्यंत सारं काही आलबेल असतं. अन्याय अत्याचाराचे बळी ठरल्यानंतर त्याविरूद्ध आवाज उठवण्याची धमकही फार कमी जण दाखवतात. ‘युद्ध’ एक अस्तित्वाची लढाई या आगामी चित्रपटातही प्रस्थापित व्यवस्थेविरुद्धचा लढा पहायला मिळणार आहे. समाजात घडणाऱ्या कलंकित घटनांचं प्रतिबिंब दाखविण्याचा प्रामाणिक प्रयत्नदिग्दर्शक राजीव रुईया यांनी केला आहे. येत्या १५ मे ला हा चित्रपट प्रदर्शित होतोय.

 

शेखर गिजरे निर्मित राजीव रुईया दिग्दर्शित ‘युद्धएक अस्तित्वाची लढाई’ या चित्रपटातून स्त्रीच्या आत्मसन्मानाची गोष्ट मांडण्यात आली आहे. प्रतिष्ठीत लोकांचे बुरखे फाडून त्यांना समाजासमोर आणण्याची धाडस करणारी ही प्रेरक कथा आहे. माणसाच्या मनातल्या पशूवृत्तीचे दर्शन घडवतानाच अशा पशूवृत्तीला वेळीच ठेचायला हवं त्यासाठी समाजानेच पुढाकार घ्यायला हवा, हा संदेश या चित्रपटातून प्रभावीपणे मांडण्यात आला आहे.पत्रकार रागिणी देव, या सामान्य तरुणीची अन्यायामुळे झालेली होरपळ व तिला भोगाव्या लागलेल्या यातनाया चित्रपटात दाखवण्यात आल्या आहेत. या यातनांना सामोरं जात ती लढा उभारते, पण हा लढा लढताना तिला अनेक कटू प्रसंगांचा सामना करावा लागतो. तरीही निकराने लढा देण्याची तिची जिद्द, या जिद्दीलाउज्वल देसाई,इन्स्पेक्टर गुरु नायक, आणि सारंगी देशमुख यांची मिळालेली साथ व त्यांनी एकत्रितपणे दिलेलाअन्यायाविरुद्धचा हा लढा आहे.

 

‘माय फ्रेंड गणेशा’ सारखा सुरेख हिंदी चित्रपट दिग्दर्शित करणाऱ्या राजीव रुईया यांचा हा पहिलाच मराठी सिनेमा आहे.‘युद्ध’ एक अस्तित्वाची लढाई’ हा सिनेमा सर्वसामान्य माणसाची होणारी ससेहोलपट, प्रस्थापित व्यवस्थेविरुद्धचा राग यावर भाष्य करतो. या चित्रपटातून अपप्रवृत्तीवरकेलेली मात प्रत्येकाला विचार करायला लावणारी आहे.

 

चित्रपटाची कथा शेखर गिजरे यांची आहे. अभिजीत गाडगीळ यांनी या सिनेमाचे लेखन केलं आहे, तर छायांकन सुरेश बिसावेनी व कला दिग्दर्शन सुरेश पिल्लई याचं आहे. चित्रपटातील गीते जाफर सागर यांनी शब्दबद्ध केली असून संगीताची जबाबदारी विवेक कार यांनी सांभाळली आहे. राजेश शृंगारपुरे,  तेजस्विनी पंडित, क्रांती रेडकर, पंकज विष्णू, वर्षा उसगांवकर, स्मिता ओक, संजय कुलकर्णी, सोमनाथ तडवलकर, शीतल मंत्री यांच्या भूमिकाया चित्रपटात आहेत. श्रद्धा एंटरटेण्मेंटची निर्मिती असलेला  हा सिनेमा १५ मे पासून सर्वत्र प्रदर्शित होतोय.

पै. आय.सी.टी. अ‍ॅकॅडमीतर्फे संगणक साक्षरता अभियान 7 प्रकारच्या कार्यशाळांचे आयोजन

पुणे :

संगणक आणि माहिती तंत्रज्ञान साक्षरता गरीब आणि मागास वर्गापर्यंत पोहोचविण्याच्या हेतूने पी.ए.इनामदार खउढ  अ‍ॅकॅडमीतर्फे (इन्फर्मेशन अ‍ॅण्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी) संगणक साक्षरता अभियानाचे आयोजन करण्यात आले असून, त्यात 7 कार्यशाळांचा समावेश आहे. अ‍ॅकॅडमीच्या वतीने प्रा. मुमताझ सय्यद आणि प्रा. ऋषी आचार्य यांनी ही माहिती दिली.

महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीमधील शिक्षकांसाठी विनामूल्य कार्यशाळा घेण्यात आली. पालिकेच्या उर्दू शाळांमध्ये 17 शिक्षकांसाठी विनामूल्य कार्यशाळा घेण्यात आली. पहिली ते 7 वीपर्यंत ई-लर्निंगचे उर्दू सॉफ्टवेअर तयार करण्याचे मार्गदर्शन देण्यात आले.

विषय शिक्षकांसाठी झालेल्या कार्यशाळेत 147 विषय शिक्षक सहभागी झाले. याशिवाय इंग्रजी बोलण्याचे प्रशिक्षण पुण्याबाहेरील 19 प्रशिक्षकांना देण्यात आले. एकूण 43 ठिकाणी पी.ए. इनामदार कॉम्प्युटर सेंटर आहेत. त्यातील मुलांच्या 247 पालकांना संगणक प्रशिक्षण देण्यात आले. नवीन शैक्षणिक वर्षांत आठवीपर्यंतच्या 110 विद्यार्थ्यांना आयपॅड वर अध्ययन करण्याची संधी मिळणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष पी.ए.इनामदार यांनी दिली. ‘संगणक आणि माहिती तंत्रज्ञानात केवळ सधन वर्गाची प्रगती होऊन चालणार नाही. तळागाळातील वर्गापर्यंत ही क्रांती पोचली नाही तर मोठी सामाजिक दरी उभी राहून असंतोष तयार होऊ शकतो. त्यामुळे या विनामूल्य अभियानाद्वारे उन्हाळी सुटीतील वेळ कारणी लाऊन आम्ही संगणक आणि माहिती तंत्रक्रांती शेवटच्या घटकापर्यंत पोचवत आहोत,’ असे ते म्हणाले.