चेन्नई
अण्णा द्रमुकच्या प्रमुख जयललिता पुन्हा तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाल्या. मद्रास विद्यापीठाच्या सभागृहात आज (शनिवारी) सकाळी ११ वाजता झालेल्या सोहळ्यात जयललिता यांनी पाचव्यांदा तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल के. रोसय्या यांनी जयललिता यांना तसेच त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
माजी मुख्यमंत्री ओ पन्नीरसेल्वम यांना मंत्रिमंडळात जयललिता यांच्या खालोखाल दुस-या क्रमांकाचे स्थान मिळाले आहे.याआधी शुक्रवारी ओ पन्नीरसेल्वम यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर अण्णाद्रमुक पक्षाच्या आमदारांची बैठक झाली. या बैठकीत एकमताने जयललिता यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाली. विधिमंडळ गटनेनेतपदी निवड झाल्यामुळे राज्यपालांनी नियमानुसार जयललिता यांना सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिले. त्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास राजभवनाकडे निघालेल्या वाहनांच्या ताफ्यातून तब्बल २१७ दिवसांनंतर जयललिता पहिल्यांदा सार्वजनिक ठिकाणी दिसल्या. कार्यकर्ते आणि समर्थकांच्या गराड्यातून वाट काढत त्यांनी राज भवनात गाठले. राज्यपाल के. रोसय्या यांची भेट घेऊन त्यांनी विधीमंडळ गटनेतेपदी निवड झाल्याच्या निर्णयाची प्रत राज्यपाल रोसय्या यांना दिली. त्याचबरोबर मंत्र्यांची यादीही राज्यपालांकडे सोपवली.
अखेर जयललिता पुन्हा मुख्यमंत्रीपदावर विराजमान …
अभिनेत्री तेजस्विनी पंडीत हिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छ्या
अभिनयाचा वारसा घेवून , मराठीसिने-नाट्य सृष्टीचा आणि पुण्याचा लौकिक राखणारी ग्रेट अभिनेत्री तेजस्विनी पंडीत हिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छ्या
‘डायल 108’ रुग्णवाहिकेत हृदयविकाराच्या 2737 रूग्णांना मिळाले जीवनदान !
पुणे :
राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने आणि ‘बीव्हीजी इंडिया लिमिटेड’ या सेवा क्षेत्रातील कंपनीच्या माध्यमातून चालविण्यात येणार्या ‘महाराष्ट्र मेडिकल इमर्जन्सी सर्व्हिसेस’च्या ‘डायल 108’ रूग्णवाहिका सेवेद्वारे 2737 हृदयविकाराच्या झटका आलेल्या रूग्णांना अत्याधुनिक रूग्णवाहिकेतील उपचारामुळे आणि वेळीच रूग्णालयात दाखल केल्यामुळे जीवनदान मिळाले ! ही आकडेवारी 26 जानेवारी 2014 ते एप्रिल 2015 पर्यंतच्या तपशीलानुसार आहे.
‘108’ हा दूरध्वनी डायल केल्यानंतर ‘महाराष्ट्र इमर्जन्सी मेडीकल सर्व्हिस’च्या सुसज्ज रुग्णवाहिका मदतीला येतात. या रूग्णवाहिकेमध्ये 233 ‘अॅडव्हान्स लाईफ सपोर्ट’ रूग्णवाहिका असून, 704 ‘बेसिक लाईफ सपोर्ट’ रूग्णवाहिका आहेत.
या आपत्कालीन वैद्यकीय सेवेच्या संचालनाची जबाबदारी ‘बी.व्ही.जी. इंडिया लिमिटेड’ या सेवाक्षेत्रातील अग्रगण्य कंपनीकडे असून, पुण्यातील‘औंध उरो रुग्णालयात’ या सेवेचे प्रमुख केंद्र व ‘रिस्पॉन्स सेंटर’ आहे.
एप्रिल 2015 पर्यंतच्या तपशीलानुसार 2 लाख 97 हजार 541 जणांना विविध प्रसंगात अत्याधुनिक रुग्णवाहिका सेवेचा लाभ मिळाला आहे.
अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज ‘डायल 108’ रूग्णवाहिकेच्या आप्तकालीन वैद्यकीय सेवेमुळे हृदयविकारासारख्या आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांवर तातडीने उपचार होणे सोपे झाले आहे.
‘26 जानेवारी 2014 रोजी सुरू झालेल्या या सेवेत अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज अशा 937 रुग्णवाहिका राज्यभर आहेत. यामध्ये 233 ‘अॅडव्हान्स लाईफ सपोर्ट’ रूग्णवाहिका असून, 704 ‘बेसिक लाईफ सपोर्ट’ रूग्णवाहिका समाविष्ट आहेत. या अत्याधुनिक वैद्यकीय सेवेसाठी ‘108’ या दूरध्वनी क्रमांकावर डायल केल्यास विनामूल्य सेवा देणारी सुसज्ज रुग्णवाहिका डॉक्टरांसह येते. अपघात, हृदयविकार, भोवळ येणे, अर्धांगवायू, विषबाधा, आगीत भाजणे अशा अनेक प्रकारच्या आपत्कालीन स्थितीमध्ये ही रुग्णवाहिका बोलावता येते’, अशी माहिती ‘महाराष्ट्र इमर्जन्सी मेडीकल सर्व्हिस’चे मुख्य संचालन अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर शेळके यांनी दिली.
युथफुल ‘साटं लोटं’..पण सगळं खोटं
मराठी सिनेमाचा चेहरा बदलत असून आजच्या तरुणाईला आकर्षित करणारे कथाविषय या चित्रपटात
मांडण्यात येताहेत. मैत्री, प्रेम या पलीकडे जात तरुणांचे नातेसंबंध, भावबंध, आयुष्याबद्दलचे विचार त्यांच्या
नजरेतून दाखविले जात आहेत. अगदी आत्ताआत्तापर्यंत मराठी चित्रपट हा केवळ मध्यमवयीन मंडळींपुरताच
मर्यादित होता. परंतु अलीकडच्या काळात तरुणांना केंद्रस्थानी ठेवून चित्रपट निर्माण होऊ लागले आहेत,
मराठी चित्रपटात होत असलेला हा बदल निश्चितच स्वागतार्ह आहे.
‘मुव्हिंग पिक्चर्स’ प्रस्तुत, ‘साटं लोटं.. पण सगळं खोटं’ हा असाच एक युथफुल सिनेमा लवकरच
प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या मराठी सिनेमाची निर्मिती नितीन तेज अहुजा, अशोक भूषण यांची असून, सहनिर्माते
सई देवधर आनंद आणि शक्ती आनंद आहेत. तरुणाईचा हाच जोश, सळसळता उत्साह श्रावणी देवधर
दिग्दर्शित ‘साटं लोटं.. पण सगळं खोटं’ या मराठी चित्रपटात पहायला मिळणार आहे. अँक्शन, इमोशन, फन,
रोमान्स आणि ड्रामा असलेला हा चित्रपट येत्या ५ जूनला राज्यात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
आदिनाथ कोठारे, सिद्धार्थ चांदेकर, मृण्मयी देशपांडे, पूजा सावंत या युथफुल कलाकारांसोबत मकरंद
अनासपुरे, पुष्कर श्रोत्री हे हरहुन्नरी कलाकार या चित्रपटात आपल्या अफलातून अभिनयाने आणि विनोदाच्या
टायमिंग सेन्समुळे प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन करणार आहेत. ‘मुव्हिंग पिक्चर्स’ निर्मिती संस्थेच्या ‘साटं लोटं..
पण सगळं खोटं’ चित्रपटात श्रावणी देवधर यांच्या दिग्दर्शनाची कमाल बऱ्याच अवधीनंतर नव्याने
अनुभवायला मिळणार आहे. ‘थॅाटट्रेन एंटरटेनमेंट’ च्या सहकार्याने निर्माण झालेल्या ‘साटं लोटं’ ची खिळवून
ठेवणारी कथा श्रावणी देवधर यांनी लिहिली असून पटकथा-संवाद शिरीष लाटकर यांनी लिहिलेत. श्रीरंग
गोडबोले लिखित यातील गीतांना युवा संगीतकार सिद्धार्थ महादेवन व सौमिल शृंगारपुरे यांनी सुरेल संगीत
दिलंय. चित्रपटाचे छायांकन राहुल जाधव यांनी केलंय. फ्रेश लूक, उत्तम कथानक, वास्तवदर्शी मांडणी, नेटकं
दिग्दर्शन, कलाकारांचा सहजसुंदर अभिनय जोडीला अत्याधुनिक तंत्रज्ञांची साथ असलेला ‘साटं लोटं’
आजच्या तरुण पिढीला नक्कीच आवडेल असा आहे.
आगळ्या वेगळ्या कलाकृतींद्वारे आपले वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या संवेदनशील दिग्दर्शिका
श्रावणी देवधर यांच्या दिग्दर्शनातून साकारलेला वेगळ्या धाटणीचा ‘साटं लोटं..पण सगळं खोटं’ नक्कीच
प्रेक्षकांची निखळ करमणूक करणारा ठरेल.
पोर्न स्टार इमेज … म्हणून सनीला वारंवार करावा लागतोय अडचणींचा सामना …
पोर्न स्टार ते बॉलिवूड अभिनेत्री असा प्रवास करणारी सनी लिओन आता घराच्या बाबतीत हि अडचणीत सापडली आहे. मुंबईत ज्या घरात ती वास्तव्याला होती, ते घर तिच्याकडून रिकामे करुन घेण्यात आले आहे. त्यामुळे तिच्यावर हॉटेमध्ये राहण्याची वेळ आली आहे.
इन्टरनेट वर अश्लील, नग्न व विकृत छायाचित्रे आणि चलचित्रे टाकून तरुणाईला बिघडवण्याचे काम केल्याचा आरोप करीत अभिनेत्री सनी लिओनविरोधात विजापूर नाका पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे.
प्रभाग क्रमांक 35 मधील कचरा प्रश्नावरील कारवाईसाठी क्षेत्रिय कार्यालयाला निवेदन
पुणे :
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाच्या वतीने विभागाचे शहराध्यक्ष चैतन्य ऊर्फ सनी अशोक मानकर यांनी प्रभाग क्रमांक 35 (दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल) परिसरातील कचरा प्रश्नावरील कारवाईसाठी वारजे -कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालयात निवेदन सादर केले. पी.पी.श्रीमल (वारजे कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालयाचे आरोग्य अधिकारी) यांना निवेदन दिले.
‘प्रभाग क्रमांक 35 मध्ये कचर्याचे ढीग साचलेले दिसत आहे. कचर्याचे ढीग मोकळ्या मैदानावर, पादचारी मार्गावर, लहान मुलांच्या शाळेसमोर पडले आहेत. या कचर्याच्या ढिगांमुळे अनेक प्रकारची दुर्गंधी पसरत असून, नागरिकांना त्याचा त्रास व विविध रोगांना तोंड द्यावे लागत आहे.
ज्ञानदा शाळा नवसह्याद्री मैदानासमोर, 100 फुटी डी.पी. रोड बनियन ट्री हॉटेलजवळ, रानडे लॉन्स मातोश्री वृद्धाश्रमासमोर (पादचारी मार्ग), पंडीत दिनदयाळ शाळा, अभिनव इंग्शिल शाळेजवळ, भरत कुंज सोसायटीच्या हॉलजवळ (एच. डी.एफ. सी बँकसमोर), डॉ. शामाप्रसाद मुखर्जी उद्यानाजवळ (पटवर्धन बाग) या भागातील कचर्याच्या ढीगाची लवकरात लवकर साफसफाई करून महानगरपालिकेतर्फे दंडात्मक कारवाईचे फलक लावावेत. तसेच प्रभागात कचर्याच्या समस्या सोडविण्यासाठी घंटागाड्यांच्या संख्येत वाढ करावी, ज्यामुळे नागरिक अशा ठिकाणी कचरा टाकणार नाहीत’, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.
लष्कराच्या कारणावरून… पोलिस आणि नागरिक यांच्यात तुंबळ हाणामारी ।
बोपखेल गावाची सुमारे तीस हजार लोकसंख्या आहे. गावातून पिंपरी-चिंचवड, दापोडी, पुणे आदी भागांकडे जाण्याचा जवळचा मार्ग हा लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयातून (सीएमई) जातो. येथील रस्ता रहदारीसाठी खुला करावा, या मागणीसाठी बोपखेलमधील श्रीरंग धोदाडे यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. गेल्या मंगळवारी (ता. 12) न्यायालयाने ती फेटाळून लावली. त्या दिवसापासून लष्कराने हा रस्ता रहदारीसाठी बंद केला. त्यामुळे नागरिकांना 18 ते 20 किलोमीटरचा वळसा मारून दिघी किंवा खडकीमार्ग शहर परिसरात यावे लागते. विद्यार्थी आणि रुग्णांची प्रामुख्याने त्यामुळे मोठी गैरसोय झाल्याने गावकरी संतापले होते.
सीएमईमधील रस्ता पूर्ववत सुरू करण्यासाठी सुमारे दीड हजार नागरिकांनी सकाळी सात वाजता बोपखेलमधील लष्कराच्या प्रवेशद्वारापर्यंत मोर्चा काढला. सकाळी साडेआठ वाजता महिलांनी लष्कराच्या प्रवेशद्वारातून आत जाण्याचा प्रयत्न केला. या वेळी पोलिसांनी त्यांना रोखले. त्यावेळी आंदोलक आक्रमक झाले. आंदोलकांनी पोलिसांच्या वाहनाची हवा सोडली, काचा फोडल्या. नागरिकांनी तुफानी दगडफेक सुरू केल्याने पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यात चार महिला व मुले जखमी झाली. त्यानंतर श्रीरंग धोदाडे यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन सुरू झाल्याने तणाव होता.
गुरुवारी आंदोलन चिघळल्यानंतर नागरिकांनी तुफान दगडफेक केली, तर नागरिकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी प्रचंड लाठीमार केला. यामध्ये तब्बल शंभरहून अधिक नागरिकांना जबर मार लागला. त्यातील १५ महिला-पुरूष गंभीर जखमी झाले, तर नागरिकांनी केलेल्या दगडफेकीत दोन सहायक पोलिस आयुक्त, सहा निरीक्षक, नऊ सहायक निरीक्षक, पाच महिला फौजदार, ३५ महिला-पुरुष पोलिस कर्मचारी जखमी झाले.
या प्रकरणी भोसरीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रकांत भोसले यांनी फिर्याद दिली असून, सुमारे ८०० ते एक हजार नागरिकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यापैकी श्रीरंग धोदाडे यांच्यासह पावणेदोनशे जणांना अटक केली.
लाठीमार करून लोकांना पांगवल्यानंतर आंदोलकांंना पोलिसांनी अक्षरशः घरात घुसून ताब्यात घेतले.
एकूण १०४ पुरुष, ७४ महिलांना अटक करण्यात आली, तर १२ अल्पवयीन आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अटक केलेल्या सर्वांना खडकी येथे कोर्टात नेणे शक्य नव्हते. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून पोलिसांनी खडकी कोर्टाचे न्यायाधीश एस. पी. रासकर यांना पोलिस ठाण्यात येण्याची विनंती केली. त्यानंतर भोसरी पोलिस ठाण्यातच कोर्ट भरवण्यात आले. सर्वांना हॉस्पिटलमध्ये नेणे शक्य नसल्याने वायसीएम हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत शेलार व त्यांचे पथक भोसरी पोलिस ठाण्यात दाखल झाले. प्रमुख १८ जणांना पाच दिवस पोलिस कोठडी ठोठावण्यात आली, तर अन्य सर्वांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
काय म्हणणे आहे लष्कराचे ….
‘सीएमई’मधील रस्ता खुला करण्याच्या मागणीसाठी नागरिक आक्रमक झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर ‘सीएमई’तर्फे हा खुलासा करण्यात आला आहे. मुंबई हायकोर्टाने ‘कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग’मधून (सीएमई) बोपखेलकडे जाणारा रस्ता बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे.
”सीएमई’चा परिसर सीमाभिंत उभारून सुरक्षित करण्यात आलेला आहे. यामध्ये संरक्षण दलाच्या दृष्टीने संवेदनशील अशा विविध संस्था, प्रशिक्षण यंत्रणा आणि गोदामांचा समावेश आहे. ‘सीएमई’साठी १९५० ते १९६१दरम्यान संपादित केलेली ही सुमारे साडेतीन हजार एकरांहून अधिक जमीन ‘ए-वन डिफेन्स लँड’ या विभागात मोडते.
बोपखेल, रामनगर आणि गणेशनगर ‘सीएमई’च्या पूर्वेस आहे. या गावांना पुणे-नाशिक हायवे, तसेच पुणे शहराला जोडणारे अन्य रस्ते उपलब्ध आहेत. त्या माध्यमातून या नागरिकांना कामाच्या ठिकाणी जाणे, शाळा तसेच वैद्यकीय सुविधा उपलब्ध होऊ शकतात. गावांना उपलब्ध असलेले अन्य रस्ते, जमिनीच्या मालकीबाबतचे दस्तावेज, तसेच सुरक्षिततेविषयीचे गंभीर प्रश्न याबाबत ‘सीएमई’ने हायकोर्टात मांडलेली बाजू हायकोर्टाने मान्य केली आहे. त्यानुसार हायकोर्टाने २१ एप्रिल २०१५ रोजी निर्णय दिला आहे, असे निवेदनात म्हटले आहे. ”सीएमई’मधून नागरिकांना ये-जा करण्याची परवानगी दिल्यास सुरक्षिततेला धोका निर्माण होईल,’ असा आदेश आहे.संरक्षण मंत्रालयाचे धोरण आणि हायकोर्टाच्या आदेशाच्या आधारे १३ मेपासून हा रस्ता सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद करण्यात आला आहे; मात्र वैद्यकीय तसेच अन्य आणीबाणीच्या प्रसंगी संबंधित नागरिकांना या रस्त्याचा वापर करण्याची मुभा देण्यात येते, असे ‘सीएमई’तर्फे स्पष्ट करण्यात आले.
लष्कर हे प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षिततेसाठी असते; पण त्याच सुरक्षेचा बागुलबुवा करून नागरिकांना भीती दाखवण्याचे काम पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत संरक्षण खात्याकडून वर्षानुवर्षे करण्यात येत आहे. सुरक्षेचा मुद्दा आला, की पहिली कुऱ्हाड सार्वजनिक वापरासाठी असलेले रस्ते बंद करण्यावर घातली जाते. नागरिकांनी विरोध केलाच, तर त्यांना धाकधपटशाहीने गप्प बसवले जाते. आता तर संरक्षणमंत्र्यांच्या आदेशालाही जुमानायला कोणी तयार नाही. संरक्षणमंत्र्यांनी जानेवारी महिन्यात आदेश देऊनही पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील चारपैकी दोन रस्ते बंद ठेवून संरक्षण खात्याने लष्करी बाणा दाखवला आहे.
संरक्षण खात्याच्या या आडमुठेपणामुळे नागरिकांच्या मनात उद्रेक आहे. त्या उद्रेकाला राजकीय इच्छाशक्तीची जोड मिळाली, तरच या भागातील नागरिक मोकळा श्वास घेऊ शकणार आहेत.
वानवडी बाजार येथील राइट फ्लँग रस्ता आणि घोरपडीतील एलाइट लाइन रस्ता हे प्रमुख रस्ते अद्यापही बंद अवस्थेत आहेत. घोरपडीतील अलेक्झांडर रस्ता आणि क्वीन्स गार्डन रस्ता हे दोन रस्ते खुले करण्यात आले आहेत. सुरक्षेच्या नावाखाली बंद केलेले हे रस्ते कँटोन्मेंट बोर्डातीलच नव्हे, तर पुण्यातील नागरिकांसाठीही महत्त्वाचे आहेत. कारण महापालिकेचा परिसर असलेल्या मुंढवा, कल्याणीनगर, हडपसर, वानवडी या भागात जाण्यासाठी हे रस्ते नागरिकांसाठी उपयुक्त आहेत. सुरक्षा महत्त्वाची आहेच, ही बाब टाळून चालणार नाही; मात्र सुरक्षिततेसाठी अन्य उपाययोजना करून रस्ते नागरिकांसाठी खुले ठेवण्याचा मार्ग आहे. ते मार्ग अवलंबण्यापेक्षा रस्ते बंद करून मोकळे होण्याचा सपाटा संरक्षण खात्याकडून लावण्यात आला आहे. घोरपडीहून कल्याणीनगरकडे जाण्यासाठी असलेला एलाइट लाइन रस्ता बंद असल्याने नागरिकांसाठी सुमारे १४ किलोमीटरने अंतर वाढले आहे. या रस्त्यावरच स्मशानभूमी आहे. पार्थिव नेण्यासाठीदेखील हा रस्ता खुला करण्यात येत नाही.
नरेंद्र मोदी म्हणजे इंडिया चा ‘वन मॅन बँड’ ‘द इकॉनॉमिस्ट’ ची समीक्षा …
(‘द इकॉनॉमिस्ट’ ने प्रसिध्द केलेले छायाचित्र )
नवी दिल्ली- नरेंद्र मोदी म्हणजे भारताचा ‘वन मॅन बँड’ आहे असे सांगत
‘द इकॉनॉमिस्ट’ या ब्रिटनमधील प्रसिद्ध नियतकालिकानं मोदी सरकारच्या वर्षभरातील कामगिरीचा सविस्तर लेखाजोखा मांडला आहे. भारताचं भविष्य उज्ज्वल आहे, पंतप्रधान मोदींची दिशाही योग्य आहे, पण त्यांचा वेग अगदीच मंद आहे आणि अजूनही त्यांचा दृष्टिकोन गुजरातच्या मुख्यमंत्र्यासारखाच वाटतो, अशी समीक्षा ‘द इकॉनॉमिस्ट’ ने केली आहे . मोदींचा उल्लेख ‘वन मॅन बँड’ असा करून, देशात बदल घडवण्यासाठी त्यांना नवी ‘धून’ वाजवावी लागेल, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
केंद्रातील मोदी सरकारनं एका वर्षात ‘काय कमावलं, काय गमावलं’, यावर सगळ्याच स्तरांत दणक्यात चर्चा सुरू आहे. मोदींचे निर्णय कसे चुकले, याचा पाढा त्यांचे विरोधक वाचत आहेत; तर त्यांचे कट्टर समर्थक हे सगळे दावे खोडून काढत मोदींच्या कामगिरीवर स्तुतिसुमनं उधळत आहेत. देशात ही शाब्दिक चकमक सुरू असताना, परदेशातील मॅगझिनही मोदी सरकारच्या कामकाजाचा आढावा घेत आहेत. अमेरिकेतील ‘टाइम’ मॅगझिननंतर ब्रिटनच्या ‘द इकॉनॉमिस्ट’नं आपल्या ‘कव्हर स्टोरी’मधून मोदींच्या यशापयशाचं सर्वंकष मूल्यमापन केलंय. त्यात त्यांनी काही बाबतीत मोदींची पाठ थोपटली आहे
‘द इकॉनॉमिस्ट‘ ने प्रसिध्द केलेले ठळक मुद्देः
* कट्टर हिंदुत्ववादी संघटनांना आवर घालण्यास मोदी अपयशी ठरलेत, पण अजून कुठलाही धार्मिक हिंसाचार उसळला नाही, ही समाधानाची बाब आहे.
* देशात ‘अच्छे दिन’ आणण्याचं आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या मोदी सरकार खूप संथपणे काम करतंय.
* पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतःकडे जेवढे अधिकार ठेवलेत, तेवढे बहुधा कुठल्याच पंतप्रधानाकडे नव्हते.
* भारतात मोठ्या बदलांची गरज आहे आणि तेच ‘वन मॅन बँड’पुढील खडतर आव्हान आहे. हे ध्येय गाठण्यासाठी त्यांना राष्ट्रीय नेत्याचा दृष्टिकोन ठेवावा लागेल. मोदी अजूनही गुजरातच्या मुख्यमंत्र्यासारखाच विचार करताना दिसतात.
* मोदी योग्य दिशेनं वाटचाल करताहेत आणि भारताचं भविष्य निश्चितच उज्ज्वल आहे. भारत लवकरच जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनेल, पण सोबतच काही वर्षांत भारत, जगातील तीन मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असेल.
* विकासाच्या वाटेवर प्रवास करणाऱ्या भारताचं नेतृत्व एकच व्यक्ती करू शकते असं मोदींना वाटतं आणि ती म्हणजे, नरेंद्र दामोदरदास मोदी.
* इंधनाचे दर, व्याजदर आणि कमी होणारी महागाई ही अर्थव्यवस्था सुधारत असल्याची लक्षणं आहेत. ७.५ टक्के दराने जीडीपी वाढल्यास भारत चीनलाही मागे टाकेल. ही जगातील सगळ्यात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था ठरेल.
* आपल्याकडे अजून बराच वेळ आहे, असा विचार मोदींनी करू नये. तसंच, ‘आधी सत्ता सांभाळू, सुधारणा होत राहील, असा इतर राजकारण्यांसारखा विचारही घातक ठरू शकतो.
* सरकारी काम सोपं आणि प्रभावी करण्यासाठी मोदींनी खासगी क्षेत्रातील लोक आणायला हवेत. तसंच, रेल्वेची बिकट स्थितीही खासगी कंपन्या वेगानं सुधारू शकतात.
पायी चालण्यावरही टोल आणि प्रवासावरही आता द्या …. सर्व्हिस टॅक्स ।
भाजपचे आमदार २०१२ मध्ये होते; वन विहार टोल विरोधात … आता म्हणे पाचगाव पर्वतीच नाही; तर सगळ्याच टेकड्यांवर फिरायला ‘टोल ‘ लावणार …. शिवाय प्रवासावरही आता द्या …. सर्व्हिस टॅक्स …परदेशात वाटा , आणि देशातून वसूल करा … हे तर धोरण नाही ?
… या पहा १- २- ३ जुलै २०१२ च्या बातम्या … …चालण्यावर टोल चालू देणार नाही –या शिर्षकाची बातमी आहे ३ जुलै २०१२ ची … त्यात पहा भाजपचे आमदार -नगरसेवक दिसत आहेत ?
इतर बातम्या त्यापूर्वीच्या …
पुणे-गेल्या २०१२ च्या जुलै महिन्यात पाचगाव पर्वतीवर फिरायला म्हणजे वनविहार करायला – चालत जायला टॅक्स लावण्याचा प्रयत्न झाला – इथे आम्ही फोटो देत आहोत भाजपचे आमदार या टोल विरोधात सही करतानाचा हा फोटो आणि त्यावेळेची बातमी आहे . आता त्याच आमदारांच्या राज्यात त्यांचेच नातलग सभासद असलेल्या कमिटीने पाचगाव पर्वतीच नाही तर पुण्यातल्या सर्वच टेकड्यांवर पायी चालणाऱ्या कडून टोल वसूल करण्यास संमती दिली आहे . एकीकडे पेट्रोल, डिझेल महाग , आता प्रवासावर हि सर्व्हिस टॅक्स लावणार आणि पायी चालण्यावरही ……
जागोजागी टोल-करांच्या ओझ्याने दबलेल्या सर्वसामान्य नागरिकांना आता शहर व परिसरातील टेकडीवर मोकळा श्वास घेण्यासाठीदेखील दिवसाकाठी एक रुपया मोजावा लागणार आहे. टेकड्यांच्या संरक्षणासाठी वन विभागाने हा निर्णय घेतला असून, याद्वारे जमणाऱ्या निधीतून टेकड्यांवर सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. येत्या पाच जूनला पर्यावरणदिनी या शुल्कवसुलीस प्रारंभ होणार आहे. सर्वसामान्य पुणेकरांची प्रतिनिधी असणाऱ्या संयुक्त वनव्यवस्थापन समितीही याला अनुकूलता दर्शवली आहे.पहिल्या टप्प्यात भांबुर्डा वन विहार (वेताळ टेकडी), एआरएआय टेकडी आणि पाचगाव पर्वती फिरायला जाणाऱ्या नागरिकांकडून वन विभागातर्फे प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे. या टेकड्यांवरील संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांबरोबर झालेल्या बैठकीत प्रवेश शुल्काच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. कामात सुसूत्रता आणण्यासाठी टेकडीवर दररोज जाणाऱ्या नागरिकांना तीस रुपये शुल्काचे मासिक पास उपलब्ध करण्यात येणार आहेत. वनाधिकारी या दोन दिवसांत प्रवेश शुल्काचे माहिती फलक टेकड्यांच्या प्रवेशद्वारांवर प्रसिद्ध करणार आहेत.
गेल्या काही वर्षांपासून या टेकड्या चोहोबाजूंनी अतिक्रमणाने वेढल्या असून, टेकड्यांची सुरक्षितता धोक्यात आली आहे
दोन वर्षांपूर्वीपर्यंत महापालिकेने दिलेल्या निधीतून खासगी सुरक्षारक्षक टेकड्यांवर गस्त घालत होते. मात्र, त्यांच्या पगाराची तरतूद बंद झाल्यानंतर वन विभागाने त्यांना कामावरून काढून टाकले. तेव्हापासून पुन्हा गैरप्रकार सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर टेकड्यांच्या संरक्षणासाठी निधी जमा करण्याच्या उद्देशाने वनाधिकाऱ्यांनी प्रवेश शुल्काचा निर्णय घेतला आहे. ज्या टेकड्यांची सुरक्षाभिंतींचे काम अंतिम टप्प्यात आले आहे, अशा टेकड्यांवर सुरुवातीला प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे.
वेताळ टेकडीवर सोमवारी, तर पाचगाव पर्वतीवर मंगळवारी संयुक्त वनव्यवस्थापन समितीची या संदर्भात बैठक झाली. या वेळी समितीच्या सदस्या वर्षा तापकीर, जयश्री पेंडसे, किशोर आहेर, डॉ. सचिन पुणेकर तसेच वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. समितीच्या सर्व सदस्यांनी या शुल्कास मान्यता दिली आहे.
दरम्यान पेट्रोल, डिझेल महाग झाल्याने आधीच बेजार झालेल्या जनतेचे येत्या एक जूनपासून कंबरडे मोडणार आहे. एक जून पासून 14 टक्के सर्व्हिस टॅक्स (सेवाकर) द्यावा लागणार आहे. सध्या 12.36 टक्के सर्व्हिस टॅक्स आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 28 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्पात ही घोषणा केली होती. सर्व्हिस टॅक्स वाढल्यामुळे हॉटेलमधील जेवण आणि प्रवासासह सर्व सेवा महागणार आहेत. त्यामुळे आता जगणेच महागणार असल्याच्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.
सर्व्हिस टॅक्समध्ये 1.64 टक्क्याने वाढ झाल्याचा फटका सर्व वर्गातील जनतेला बसणार आहे. मध्यवर्गीयांना याची सर्वाधिक झळ पोहोचणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे रेस्तरॉं, मनोरंजन, विमान यात्रा, माल वाहतूक, इव्हेंट, केटरिंग, आयटी, स्पा-सलून, हॉटेल, बॅंकिंगसह अनेक प्रकारच्या सेवा महागणार आहेत.
संसदेत अर्थ विधेयक सादर केल्यानंतर अर्थ मंत्रालयाने मंगळवारी (19 मे) यासंबंधीची अधिसूचना जारी केली. 28 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्पात ही घोषणा करण्यात आली होती. नवा सर्व्हिस टॅक्स येत्या एक जूनपासून लागू होणार आहे.
पुण्यातील कलाकारांचे रंगणार क्रिकेट सामने – २५ मे पासून आठ संघ खेळणार १५ सामने …
सिंहगड वोरियर्स (ओनर-योगेश भोसले ), रियल केसरी (ओनर – कार्तिक केंढे ),रॉयल हडपसर( नितीन कोंढा ळकर ), कलावंत पेशवाज (ओनर-कलावंत फौन्डेशन ), श्रीमंत कसबा ११ (ओनर -प्रशांत सोलापूरकर ), पिंपरी चिंचवड मोरायाज (ओनर -अजिंक्य जाधव ), कोथरूड इंफिल्ड्स (ओनर-सागर पाठक ),डेक्कन सुपर मराठाज (ओनर -जीत मोर्या )असे आठ संघ मैदानात उतरणार आहेत .
“स्केरी मिरर मेझ” सहकारनगर मध्ये आणखी एका नाविण्यपूर्ण प्रकल्पाची भर…
पुणे-
नाविण्यपूर्ण प्रकल्प नागरीकांना पाहायला मिळणार. पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून व
उपमहापौर आबा बागुल यांच्या संकल्पनेतून ‘स्केरी मिरर मेझ’ हा प्रकल्प त्यांच्या प्रभाग क्र. ६७
मध्ये वसंतराव बागुल उद्यान सहकारनगर येथे उभारण्यात आला आहे.
स्केरी मिरर मेझ म्हणजेच आरशांचा भुलभुलैय्या हा प्रकल्प भारतरत्न पं. भीमसेन जोशी
कलादालन येथील वातानुकुलीत हॉलमध्ये उभारण्यात आला आहे. आतमध्ये गेल्यावर आरशामध्ये
आपण रस्ता शोधण्याचा प्रयत्न करतो पण गोंधळून जातो रस्ता सापडत नाही. मध्येच रस्ता
सापडल्यासारखे वाटते पण पडदा हलला की आपल्याला असे जाणवते की आपण पिंजऱ्यात उभे
आहोत. तसेच पुन्हा एकदा बाहेर पडण्याचा मार्ग शोधायला लागल्यास त्या ठिकाणी भिंत
असल्याचा भास होतो. रंगीबेरंगी लाईट इफेक्टमुळे वेगळा अनुभव अनुभवयास मिळतो.
याबरोबरच या स्केरी मिरर मेझ मध्ये जसे आपण आतमध्ये जातो तसे आणखी वेगवेगळे
अनुभव येतात. जसे दरीवरील हलणारा पुल, बाजुला खोल दरीचा भास, अचानक अंगावर येणारा
डायनासोर, खुनी दरिंदा, काळी गुफा व घाबरविणारे ध्वनी इ. अनुभव घेता येईल.
या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व वयोगटातील नागरिकांना याचा आनंद घेता येणार
आहे. स्केरी मिरर मेझ हा प्रकल्प प्रिमियम वर्ल्ड टेक्नोलॉजी लिमिटेड व गिनीज बुक ऑफ
वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर अँड्रीन फिशर यांनी तयार केला आहे व पुणे महानगरपालिकेचे उपमहापौर
आबा बागुल यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आला असून लवकरच नारिकांना याचा आनंद घेता
येणार आहे. यामुळे पुणे हे विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक नगरी या बरोबरच आता पर्यटनाचे शहर
म्हणून वाटचाल करीत आहे. असे आबा बागुल यांनी सांगितले.
आजच्या तरुण पिढीला जगताना अनेक संकटाना सामोरे जावे लागते या संकटाना न
घाबरता त्यातून मार्ग काढण्यासाठी आपण स्वतः रस्ता शोधण्याचा प्रयत्न करतो. स्वतःला
शोधण्यासाठी स्वतःच्या अस्तित्वाची चाचपणी करतो. यासाठी गोंधळून न जाता या स्केरी मिरर
मेझ भुलभुलैय्यातून बाहेर पडताना धैर्य, जिद्द, कल्पकता व आत्मविश्वास या गुणांची पारख
होते. वैयक्तिक आयुष्यात देखील या गुणांचा उपयोग जीवन यशस्वी होण्यासाठी होतो. असे
प्रतिपादन उपमहापौर आबा बागुल यांनी यावेळी केले.
निवडणुकीपूर्वी ज्या भांडवलदारांनी मदत केली, त्यांना फायदा पोहचविण्याचे काम नरेंद्र मोदी करीत आहेत … येचुरी
मुंबई
पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारकी थाटात भाषणे करीत देशविदेशात फिरत आहेत. काम कमी आणि प्रचार जादा या प्रवृत्तीने काम करणाऱ्या वर्षभराचा मोदी सरकारचा ताळेबंद पाहिला तर आर्थिक पातळीवर कमालीची घसरण सुरू आहे. ही घसरण भविष्यातही सुधारणार नाही. त्यानंतर कदाचित सत्तेसाठी ते धार्मिक हिंसाचाराचा आधार घेण्याची भीती आहे, तसेच निवडणुकीपूर्वी ज्या भांडवलदारांनी मदत केली, त्यांना फायदा पोहचविण्याचे काम त्यांचे सरकार करीत आहे .’ अशी घणाघाती टीका माकपचे सरचिटणीस सिताराम येचुरी यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना केली.
हिंदू व्होटबँक शाबूत राखण्यासाठी सांप्रदायिक तणाव वाढवून असुरक्षिततेचे वातावरण निर्माण केले जात आहे. सरकारची वर्षभरातील कामगिरी देशाची एकात्मता आणि अखंडतेसाठी घातक आहे. मोदी यांच्या कारकिर्दीत लोकशाही संघराज्यातील केंद्र व राज्य सरकारच्या संबंधात कमालीचे अंतर निर्माण झाले आहे. मागासलेल्या ईशान्येकडील राज्यांचा प्रगत राज्यांइतका विकास व्हावा, यासाठी गेल्या दोन दशकांपासून त्या राज्यांना १० टक्के जादा निधी केंद्राकडून दिला जातो. पण तेथील ८ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या मागणीला पंतप्रधानांनी केराची टोपली दाखवली, असा आरोप येचुरींनी केला.
एका वर्षात पंतप्रधानांनी १८ देशांचे दौरे केले. तिकडे जाऊन ते भारतातील विरोधी पक्षांवर टीका करतात हे अनुचित आहे. मोदी सरकारने वर्षभरात ५५ कायदे केले. त्यापैकी ५० कायदे हे जुन्या सरकारने आणलेले होते. मोदी सरकारची सात विधेयके राज्यसभेत रोखून ते विधेयक संयुक्त चिकीत्सा समितीकडे देण्यास सरकारला भाग पाडले, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
जगात कमी अधिक प्रमाणात इंधनाचे दर वाढतात पण यांच्या सरकारने पेट्रोल डिझेलची भरमसाठ दरवाढ करून प्रचंड महागाई जनतेवर लादली आहे, असे येचुरी म्हणाले. जमीन अधिग्रहण कायदा करून निवडणुकीपूर्वी ज्या भांडवलदारांनी मदत केली, त्यांना फायदा पोहचविण्याचे केंद्र सरकारचे स्वप्न देशातील शेतकरी हाणून पाडतील, असा विश्वासही येचुरी यांनी यावेळी व्यक्त केला.
सलमान खान विरोधात दुखतरेन-ए-मिलातची प्रमुख असिया अंद्रबी बरळली …
प्रत्येकानं आयुष्यात एकदा तरी काश्मीरला भेट द्यायलाच हवी,’-सलमान खान
(पहा सलमान खान ची काश्मीर मधील छायाचित्रे)
– भारत , सलमान खान आणि सिनेमा ला अंद्रबीने म्हटले राक्षस …
श्रीनगर-काश्मीर मध्ये बजरंगी भाई जान च्या चित्रीकरणाला गेलेल्या सलमान खान ला तेथेही आपल्या चाहत्यांच्या उत्सुकतेचा जसा आनंद घेता आला तसाच आपल्या विरोधात काहींनी ओकलेली गरळ ही -ऐकावी लागली सिलेब्रटी होण्याच्या आणि विचारलेल्या प्रश्नांवर साधे सरळ उत्तरे देण्याच्या प्रकारानेही तेथील दुखतरेन-ए-मिलातची प्रमुख असिया अंद्रबी सलमान सह भारता विरुध्द हि बरळली आहेदरम्यान , ‘ज्यानं काश्मीर पाहिलं नाही, त्यानं काहीच पाहिलं नाही. काश्मीर हे पृथ्वीवरचं सगळ्यात सुंदर ठिकाण आहे. प्रत्येकानं आयुष्यात एकदा तरी काश्मीरला भेट द्यायलाच हवी,’ असं मत अभिनेता सलमान खान यानं व्यक्त केलंय.’हिट अँड रन’ प्रकरणात न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर सलमान ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटाच्या शुटिंगासाठी काश्मीरमध्ये गेला होता. तेथील शुटिंग संपवल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सलमाननं काश्मीरच्या सौंदर्यावर तोंडभरून कौतुक केलं. ‘निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी आणि चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी स्वित्झर्लँडला जाणारे मूर्ख आहेत. निसर्गानं काश्मीरला भरभरून दान दिलं आहे. स्वित्झर्लंडची काश्मीरशी तुलना होऊ शकत नाही,’ असं सलमान म्हणाला.’काश्मिरी माणसं खूपच सभ्य, सुसंस्कृत, साधीभोळी व सुंदर आहेत. काश्मीरमध्ये ४० दिवस राहून मी याचा अनुभव घेतलाय. काश्मीरच्या मी प्रेमातच पडलोय. इतरांनीही या ठिकाणाला भेट द्यावी,’ असं आवाहनही त्यानं केलं. काश्मीरमधील सिनेमागृह पुन्हा सुरू व्हायला हवीत. तसं झाल्यास आम्ही चित्रपटांचे प्रिमीअर सोहळे इथं करू,’ असंही तो म्हणाला.
तर दुसरीकडे……..
‘सिनेमांद्वारे भारत काश्मीरमध्ये अनैतिक आणि इस्लामविरोधी कट रचत आहे आणि खुनी असलेल्या सलमान खान सारख्या एजंटच्या माध्यमातून भारताचे हे प्रयत्न सुरू आहेत. पण आम्ही काश्मीरमध्ये कोणत्याही परिस्थितीत सिनेमागृहे उघडू देणार नाही’, असं महिला फुटीरतावादी संघटनेची प्रमुख आणि दुखतरेन-ए-मिलातची प्रमुख असिया अंद्रबीनेम्हटले आहे .
काश्मीरमधील चित्रपटगृह पुन्हा सुरू झाली पाहिजेत, असं म्हटल्याने अभिनेता सलमान खानला फुटीरतावाद्यांनी टार्गेट केलंय. ‘सलमान खान हा खुनी आहे’, असा हल्लाबोल दुखतरेन-ए-मिलातची प्रमुख असिया अंद्रबीने केली आहे.
चित्रपट हा राक्षस आहे आणि तो समाजात चंगळवाद पसरवतो. त्यामुळे काश्मीरमध्ये आम्ही कदापि सिनेमागृह पुन्हा उघडू देणार नाही. भारताच्या सांस्कृतिक अतिक्रमणाला काश्मीरमध्ये प्रोत्साहन देण्यासाठी सलमान खान हा भारतीय एजंट असल्यासारखा बोलतोय, असं असिया अंद्रबीने सांगितलं.
‘सिनेमांद्वारे भारत काश्मीरमध्ये अनैतिक आणि इस्लामविरोधी कट रचत आहे आणि सलमानसारख्या एजंटच्या माध्यमातून भारताचे हे प्रयत्न सुरू आहेत. पण आम्ही काश्मीरमध्ये कोणत्याही परिस्थितीत सिनेमागृहे उघडू देणार नाही’, असं अंद्रबीने ठणकावलं.
‘बजरंगी भाईजान’ चित्रपटाच्या शुटींगसाठी गेलेल्या सलमान खानला काश्मीरमध्ये चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे गेल्या रविवारी सलमानने काश्मीरमधील चित्रपटगृहे पुन्हा सुरू करण्याचं वक्तव्य केलं होतं. चित्रपटांची आवड असल्याने अनेक जण टीव्ही किंवा पायरेटेड सीडीद्वारे सिनेमे बघतात. पण चित्रपटगृहे सुरू झाल्यास हे थांबेल आणि सर्वांना सहज सिनेमे बघता येतील, असं सलमान म्हणाला होता.
दुखतरेन-ए-मिलात ही कट्टर महिलांची फुटीरतावादी संघटना सिनेमागृहे, ब्युटी पार्लर, वाइन शॉप आणि व्हिडिओ पार्लरच्याविरोधात आहे. या संघटनेने १९९० पासून काश्मीर खोऱ्यातील चित्रपटगृहे बंद पाडली आहेत. तेव्हापासून काश्मीरमधील चित्रपटगृहे बंदच आहेत.
सोनिया गांधी आणि मनमोहन सिंह ‘ठग’ आणि ‘हरामखोर’; तर नरेंद्र मोदी कपटी आणि खुनी…. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आणि प्रेस काऊन्सिल ऑफ इंडियाचे माजी संचालक मार्कंडेय काटजू यांची टिप्पणी
नवी दिल्ली
माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काट्जू यांनी पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. यावेळी काट्जू यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले आहे. ‘सोनिया, मनमोहन सिंह या दोन्ही व्यक्ती भामट्या आहेत, तर नरेंद्र मोदी हे नरसंहारक आहेत. या तिघांनाही जिवंत राहण्याचा अधिकार नाही,’ असं काट्जू यांनी म्हटलं आहे.
काट्जू यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर व ट्वीटर अकाउंटवर या संदर्भातील पोस्ट टाकल्या आहेत. आपल्या पोस्टमध्ये काट्जू म्हणतात…
”घोटाळ्यांवर घोटाळे करून देशाची कोट्यवधी रुपयांची लूट करणारे सोनिया गांधी व मनमोहन सिंग हे भामटे आणि हरामखोर आहेत. गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर नरसंहार घडवून आणणारे नरेंद्र मोदी हे सुद्धा धोकेबाज आहेत. या तिघांना जगण्याचा अधिकार आहे का? अजिबात नाही. त्यांनी आपल्या कर्मानं जगण्याचा अधिकार गमावला आहे.”काटजूंनी लिहिलं आहे की, “घोटाळे करुन देशांला लूटणाऱ्या सोनिया गांधी आणि मनमोहन सिंह यांच्यासारख्या ‘ठग’ आणि ‘हरामखोर’; तर नरेंद्र मोदीसारखे कपटी आणि खुनी लोकांनी जगायला हवं? नाही, त्यांनी त्यांच्या कृत्यामुळे जगण्याचा अधिकार गमावला आहे.”
राजस्थानमध्ये वाळू चे वादळ
जयपूरमध्ये 85 किलोमीटर प्रतितास या वेगाने वारे आले























