Home Blog Page 3605

गोपीनाथ मुंडे यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त प्रात्यक्षिक चित्र व शिल्पनिर्मिती द्वारे आदरांजली

पुणे-

3 जुन – लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा प्रथम स्म्रुतिदिन- प्रथम पुण्यस्मरण दिनी त्यांचे विचार व कार्यकर्तुत्वाचे स्मरण व्हावे या उद्देशाने शिक्षण प्रबोधिनी व लोकनेते गोपीनाथजी मुंडे स्म्रुति समिती पुणे यांच्या वतीने एक श्रद्धांजली चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
रविवार दि.7 जुन रोजी सकाळी 9 वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे लोकनेते गोपीनाथजी मुंडे यांचे प्रात्यक्षिक चित्र व शिल्पनिर्मीती द्वारे त्याना श्रद्धांजली अर्पित करण्यात येणार असल्याचे समितीचे सदस्य सौ.मुक्ता टिळक व संदीप खर्डेकर यानी पत्रकार परिषदेत जाहीर केले.यावेळी समिती चे सदस्य दत्तात्रय खाडे,अशोक मुंडे,सौ.मंजुश्री खर्डेकर,शिक्षण प्रबोधिनीचे ना.रा.मिसाळ उपस्थित होते.
प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे हे साहेबांची शिल्पनिर्मिती करणार असुन प्रसिद्ध चित्रकार प्रशांत गायकवाड चित्रनिर्मिती करणार आहेत.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान पालकमंत्री गिरिष बापट भुषविणार असुन ना.पंकजाताई मुंडे , ना.दिलीप कांबळे,खा.अनिल शिरोळे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहणार आहेत.या मान्यवरांचे श्रद्धांजलीपर मनोगत ही होणार असुन साहेबांच्या कार्यावर आधारित एक चित्रफीत ही दाखविण्यात येणार आहे.
पुणे शहराशी साहेबांचे असलेले अतुट नाते लक्षात घेता सर्वसामान्य पुणेकरानी या कार्यक्रमास उपस्थित राहुन साहेबाना श्रद्धांजली अर्पण करावी असे आवाहन लोकनेते गोपीनाथजी मुंडे स्म्रुती समिती च्या वतीने आ.माधुरी मिसाळ,सौ.मुक्ता टिळक,संदीप खर्डेकर,मुरलीधर मोहोळ,दत्तात्रय खाडे व अशोक मुंडे यानी केले आहे.

गिर्यारोहक अरुणिमा सिन्हाच्या “फिरूनी नवी जन्मेन मी’ या मराठी पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

0

पुणे ः

कृत्रिम पायाने एव्हरेस्टसह जगातील तीन सर्वोच्च शिखरे पादाक्रांत करणाऱ्या अरुणिमा सिन्हा यांच्या जीवनावरील “फिरूनी नवी जन्मेन मी’ या मराठी पुस्तकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि “बीव्हीजी इंडिया लिमिटेड’चे संस्थापक अध्यक्ष एच. आर. गायकवाड यांच्या हस्ते झाले. हा प्रकाशन समारंभ “यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान’ मुंबई येथे मंगळवारी सायंकाळी संपन्न झाला.

मूळ इंग्रजी “”बॉर्न अगेन ऑन द माऊंटेन” या पुस्तकाचा मराठी अनुवाद निवृत्त सनदी अधिकारी प्रभाकर करंदीकर यांनी केला आहे. या प्रकाशन समारंभाला अरुणिमा सिन्हा उपस्थित होत्या. या मराठी पुस्तकाचे प्रकाशन “प्रफुल्लता प्रकाशन’ यांनी केले आहे. अरूणिमा सिन्हा या “बीव्हीजी इंडिया लि’ या कंपनीच्या “ब्रॅण्ड ऍबॅसिडर’ आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तरा मोने यांनी केले.

“अरुणिमा सिन्हा यांची जिद्द तरुणपिढीला प्रेरणादायक असून आणि “बीव्हीजी इंडिया लिमिटेड’ने सामाजिक दृष्टीकोनातून अरुणिमा सिन्हाच्या जगातील सर्वोच्च शिखरे पादाक्रांत करण्याच्या मोहिमेला केलेले सहकार्य या गोष्टी तरुणपिढीसाठी प्रेरक आहेत. अरुणिमा सिन्हा यांनी अपंग क्रीडा पटूंसाठी महाराष्ट्रात प्रशिक्षण अकादमी उघडावी, महाराष्ट्र शासन या अकादमीला पूर्ण सहकार्य करेन,’ अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. तसेच “अरुणिमा सिन्हा आणि हनुमंतराव गायकवाड हे दोघेही प्रेरणादायी व्यक्ती आहेत’, असे गौरवोद्‌गार मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना काढले.

“या पुस्तकाच्या तीन हजार प्रती शाळांमध्ये वितरित केल्या जातील.’ अशी घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली.

अरुणिमा सिन्हा यांच्या जीवनावरील पेन्ग्विन प्रकाशनाच्या “बॉर्न अगेन ऑन द माऊंटेन’ या इंग्रजी भाषेतील पुस्तकाचे प्रकाशन डिसेंबर 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. या इंग्रजी भाषेतील पुस्तकाचे लेखन मनीषचंद्र पांडे यांनी केले आहे.

“अरुणिमा सिन्हाला जगातील सर्वोच्च तीन शिखरे पादक्रांत करण्यासाठी “बीव्हीजी इंडिया’ने सहकार्य केलेले आहे, आणखी तीन सर्वोच्च शिखरांच्या मोहिमेसाठी कंपनी मदत करेल’, असे बीव्हीजी इंडिया लि. संस्थापक एच. आर. गायकवाड यांनी यावेळी बोलताना केले. निवृत्त सनदी अधिकारी प्रभाकर करंदीकर या कार्यक्रमाचे निमंत्रक होते. “ई -बुक’चे ही प्रकाशन यावेळी करण्यात आले.

‘लाल लाल..रेशमी रुमाल’ या गाण्यावर थिरकणार भाऊ कदम

वेगवेगळ्या कथाविषयांच्या चित्रपटांमुळे आणि त्यांच्या उत्तम सादरीकरणामुळे मराठी चित्रपटसृष्टीत उत्साहाचं वातावरण आहे. हे सकारात्मक बदल पाहता नवीन निर्माते चित्रपटसृष्टीकडे वळू लागले आहेत. चॅनल यु इंटरटेनमेंट प्रस्तुत, आतिफ खान निर्मित, आर विराज दिग्दर्शित ‘वाजलाच पाहिजे! गेम की शिणेमा’ हा नवीन चित्रपट येऊ घातला आहे. हा सिनेमा विनोदी ढंगाचा आहे. चित्रपट तयार करताना कोणत्या अडचणींना तोंड द्यावे लागते आणि चित्रपट निर्मिती कशा प्रकारे होते यावर आधारित या चित्रपटाचं कथानक आहे.

नुकतेच या चित्रपटातील ‘लाल लाल..रेशमी रुमाल’ या गाण्याचे चित्रीकरण करण्यात आले. हे गीत मंदार चोळकर यांनी लिहिले असून प्रफुल कार्लेकर यांनी संगीत दिले आहे तर प्रविण कुंवर यांनी या गाण्याला स्वरबद्ध केले आहे. या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन सुजित कुमार यांनी केले आहे. भाऊ कदम, गिरीजा जोशी, आरती सोलंकी, चिन्मय उदगीरकर या सर्व कलाकारांवर हे गाणे चित्रित करण्यात आले आहे. भाऊ कदम आणि विनोद हे समीकरण सर्वश्रुत आहे, पण प्रथमच या आयटम सॉगच्या माध्यमातून भाऊ कदम ‘लाल लाल..रेशमी रुमाल’ या गाण्यावर थिरकले आहेत. गिरीजा जोशी सोबत भाऊ कदम यांची केमेस्ट्री उत्तम जुळून आली आहे आणि आरती सोलंकी, चिन्मय उदगीरकर यांची त्यांना साथ लाभली आहे.

नेहमीच्या परिघाबाहेर असलेला कथाविषय, प्रेक्षकांना ‘वाजलाच पाहिजे! गेम की शिणेमा’ या चित्रपटात पाहता येणार आहे. भाऊ कदम, राजेश भोसले, चिन्मय उदगीरकर, संजय मोहिते, गिरीजा जोशी, आरती सोलंकी आदि कलाकारांच्या भूमिका या चित्रपटात आहेत. या चित्रपटाची कथा-पटकथा-संवाद बाळ-अमोल यांची असून सह निर्मात्याची भूमिका हेमंत अणावकर यांची आहे, तर मंगेश जगताप कार्यकारी निर्मात्याच्या भूमिकेत आहेत.

या चित्रपटातील गीते मंदार चोळकर, हरिदास कड यांनी लिहिली असून प्रफुल कार्लेकर आणि मधु कृष्णा यांनी संगीतबद्ध केले आहेत. अवधूत गुप्ते, आदर्श शिंदे, प्रविण कुंवर, रोहित राऊत, आनंदी जोशी, रेश्मा सोनावणे यांनी या चित्रपटातील गाण्यांना स्वरबद्ध केले आहे. छायांकन अंकुश बिराजदार यांचे असून नृत्य दिग्दर्शन महेश चव्हाण, सुजित कुमार यांचे आहे तर कला दिग्दर्शनाची जबाबदारी राज सांडभोर यांची आहे.

मंत्रालयातून गैरव्यवहारांना खतपाणी मिळत असल्यानेच ऑनलाईन आरटीआय ची दुरावस्था ….विजय कुंभार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

0

विजय कुंभार यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेले पत्र जसेच्या तसे  वाचा …

——————————

प्रती,

मा.श्री. देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री , महाराष्ट्र राज्य

मंत्रालय, मुंबई

 

विषय – मंत्रालयातून गैरव्यवहारांना खतपाणी मिळत असल्यानेच ऑनलाईन आरटीआय ची दुरवस्था….

 

महोदय,

आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर सर्वात प्रथम केलेल्या महत्वाच्या कामांमध्ये ऑनलाईन आरटीआयचा समावेश होता. तशी त्यासंदर्भातील यंत्रणा गेली काही वर्षे तयार होती . परंतु नोकरशाहीच्या दुराग्रहामुळे तसेच भ्रष्टाचाराला मंत्रालयातूनच खतपाणी मिळत असल्याने ती सुरू करण्यात आली नव्हती. आपल्या आग्रहाने ती सुरू करण्यात आली .परंतु नोकरशाही  ती व्यवस्थित चालणार नाही याची पूर्णपणे काळजी घेत आहे.

 

मुळात ऑनलाईन आरटीआय करतानाच ब-याच अडचणी येतात.ब-याचदा अर्जाची फी व्यवस्थित पोहोचते, परंतु प्रत्यक्षात अर्ज पोहोचत नाही.ऑनलाईन अपीले स्वीकारली जात नाहीत.माहीती साठीचे अतिरिक्त शुल्क ऑनलाईन भरता येत नाही. ते मनिऑर्डरने किंवा समक्ष जाउनच भरावे लागते. परिणामी ‘ऑनलाईन आरटीआय‘ च्या मूळ संकल्पनेलाच हरताळ फासला जातो आहे. त्यातूनही अर्ज करण्यात यश मिळालेच तर अर्जाला उत्तर दिले जात नाही किंवा त्याला त्यासंदर्भात काही कळवले जात नाही.

 

यासंदर्भातील माझा अनुभव खालीलप्रमाणे आहे.

 

मी पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाने केलेल्या वीज अटकाव यंत्रणेतील गैरव्यवहारासंदर्भात आपणाकडे, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तसेच  पुणे महापालिकेकडे तक्रार केली होती. आपणाकडे केलेल्या तक्रारीचे काय झाले माहिती नाही. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ‘ ‘काम चालू आहे’ चे तुणतुणे सुरू ठेवले आहे. ‘विक़ास करायचा असेल तर भ्रष्टाचाराचा बाउ करण्याची आवश्यकता नाही‘ हे पुणे महापालिकेच्या आयुक्तांचे ब्रीदवाक्य असल्याने त्यांच्याकडून कोणत्याही कारवाईची अपेक्षा नाही.त्यातच त्यांनी विकास आणि भ्रष्टाचाराचे प्रमाण किती असावे हे स्पष्ट न केल्याने पुण्यात फक्त भ्रष्टाचार दिसतो विकास कुठेच दिसत नाही. असो

 

या तक्रारीतील मूळ मुद्दा असा होता की  शि्‌क्षण मंडळाने  बनावट शासन आदेशाच्या आधारावर, निविदा न काढता, शासनाचा दर करार नसताना तो असल्याचे भासवून एक कोटी ऐंशी लाख रुपयांची वीज अटकाव यंत्रणा खरेदी केली ( म्हणजे खरेदी केल्याचे भासवले व त्यामध्ये बाजारात जी वस्तू ४०/५० हजारांना मिळते ती चार साडेचार लखाला खरेदी केली गेली). ज्या शासन आदेशाच्या आधारावर सदर खरेदी केली गेली त्यावर संगणक सांकेतांक नसल्याने तसेच तो शासनाच्या संकेतस्थळावर न सापडल्याने तो बनावट असल्याचा किंवा त्यासंदर्भात काहीतरी गडबड असल्याची खात्री पटल्याने मी १६ एप्रिल २०१५ रोजी ‘महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाकडील शासन आदेश क्र. डीएमयु-२००७/सीआर- २२८/डीएम / – १ दिनांक ९ मे  २००८  चा शासनाच्या संकेत स्थळावर आढळ होत नाही . त्यामुळे  या आदेशाची प्रत तसेच सदर आदेश काढण्यासाठी राबविण्यात आलेल्या प्रक्रियेतील  सर्व कागदपत्रांच्या त्यावरील  फाईल नोटिंगसह प्रती देण्यात याव्यात‘ अशा अर्थाचा अर्ज केला होता . त्याला अद्याप उत्तर नाही. त्याच्या आज दिनांक ४ जून पर्यंतची स्थितीसाठी जोडपत्र १ पहा

 

 

त्याच दिवशी मी ‘महाराष्ट्र  शासनाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौ (गु) /३९/२०१४ जावक क्र. २६१६/१४ दिनांक २०/२/२०१४ नुसार श्री . प्रभाकर देशमुख यांच्या उघड  चौकशीसाठी मागण्यात आलेल्या परवानगीसंदर्भात घेण्यात आलेल्या निर्णयाच्या त्यावरील फाईल  नोटिंगसह प्रती ‘ मागीतल्या होत्या. मी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे केलेल्या तक्रारीवर ते खाते आता ‘ काम चालू आहे ‘  असेसुद्धा म्हणत नाही तर पूर्णपणे गप्प आहे.त्यामूळे शासनाकडे त्या खात्याने केलेल्या मागणीचे पुढे काय झाले हे पहाण्यासाठी मी १६ एप्रिल २०१४ रोजी अर्ज केला होता. त्याला अद्याप उत्तर देण्यात आलेले नाही. त्याच्या आज दिनांक ४ जून पर्यंतची स्थितीसाठी जोडपत्र २ पहा

 

मी राज्य शासनाकडे आणखीही काही अर्ज करण्याचा प्रयत्नकेला. राज्य शासनाकडून दोन वर्षांपूर्वी खाजगी सहभागातून प्रत्येक जिल्ह्यात आरोग्य निदान केंद्रे सुरू करण्यात आली होती. त्यासाठी सुमारे १५० कोटी रुपये खर्च करण्यात आले होते . त्यातील जवळपास सर्व केंद्रे आता सुरू नाहीत किंवा त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामूळे मी शासनाच्या आरोग्य विभागाकडे अर्ज करण्याचा प्रयत्न केला. चार पाच वेळा प्रयत्न केल्यानंतर डेबिट कार्डाद्वारे अर्जाची फी व्यवस्थित गेली परंतु अर्ज मात्र गेला नाही . तसेच आणखी एक दोन विभागांच्या बाबतीतही घडल्यानंतर मी ‘ऑनलाईन  माहिती अधिकारांतर्गत  शासनाच्या सर्व विभागांकडे मिळून एकूण किती अर्ज प्राप्त झाले ? . माहिती अधिकार अधिनियमातील  कलम ६ (१) अंतर्गत अर्जांच्या फी पोटी एकूण  किती रक्कम जमा झाली ? . आणि दारिद्र्य रेषेखालील किती अर्ज प्राप्त झाले ?. अशा अर्थाची माहिती मागणारा अर्ज माहिती तंत्रज्ञान विभागाकडे केला. तो व्यवस्थित पोहोचला देखील .परंतु १६ एप्रिल २०१५ च्या त्या अर्जाला आजतागायत उत्तर नाही. त्याच्या आज दिनांक ४ जून पर्यंतची स्थितीसाठी जोडपत्र ३ पहा .

 

यासंदर्भात मी संबधित नोडल अधिका-यांशी बोलण्याचा प्रयत्न केला त्यातील दोघांनी बघतो , माहिती घेतो अशी उत्तरे दिली, तर गृह विभागाचा फोन अस्तित्वात नसल्याचे उत्तर मिळाले . वरील सर्व प्रकरणात मी रीतसर अपील करणार आहेच . परंतु ही स्थिती काही फारशी चांगली नाही, त्यामूळे आपण सदर प्रकरणी योग्य ती कार्यवाही करावी हि विनंती

Regards,
Vijay Kumbhar

(Surajya Sangharsh Samiti)

www.surajya.org

vijaykumbhar.blogspot.in

09923299199

RTI Online 1

हिंदू साम्राज्य दिनानिमित शिव राज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा

1

मंगळवार पेठमधील पारगे चौकात हिंदू साम्राज्य दिनानिमित शिव राज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची भव्य पालखी काढण्यात आली . तसेच , राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प . चारुदत्त आफळे बुआ, नगरसेवक बाळा शेडगे ,  दिलीप बहिरट , शंकर शिवले , दत्ता जाधव , विशाल धनवडे आदी मान्यवर उपस्थित होते .

  या कार्यक्रमाचे संयोजन सागर गायकवाड , अनुप जाधव , गणेश यादव , महेश खरात , तुषार दिवटे  , महेश नवगिरे , रोहित पवार , कुमार पैनग्लर , शेखर गायकवाड , चेतन जगताप , शुभम वर्दे , सुरज दिवटे , निखिल शिंदे , मिलिंद दरेकर आदींनी विशेष परिश्रम घेतले .

  अपोलो चौकापासून , खडीचे मैदान , महाराजा लॉज , सदानंद हॉटेलमार्गे पालखी काढण्यात आली .

२७. ६२ चे मायलेज देणारी डीझेल कार बाजारात …

0
celerio_625x300_41391839539
नवी दिल्ली- अवघ्या ५ ते ६ लाखात डीझेल ची कार आणि चक्क २७. ६२चे मायलेज देणारी कार आज बाजारात आली आहे . मारुती सुझुकीने आपल्या सेलेरियो या कारचे डिझेल व्हर्जन बुधवारी सादर केले . कंपनीच्या म्हणण्यानुसार, नव्या डिझेल कारचे इंजिन या कॅटेगरीतील सर्वात लहान व खूपच किफायतशीर आहे. हे इंजिन खुद्द मारुतीने फिएट कंपनीसोबत मिळून तयार केले आहे.
कंपनीने दावा केला आहे की, ही नवी कार 27.62 किमी प्रतिलीटर मायलेज देईल. कंपनीचा दावा खरा मानला तर सेलेरियो डिझेल आता भारतातील सर्वात जास्त मायलेज देणारी कार ठरली आहे. आतापर्यंत सर्वात जास्त मायलेज देणारी कार म्हणून स्विफ्ट डिझायर डिझेलचे नाव घेतले जाते जिचे मायलेज 26.59km/l आहे. कंपनीने या कारची चार मॉडेल्स आणली आहेत. ज्यांची किंमत 4.65 लाख रूपये पासून ते 5.71 लाख रुपये (एक्स शोरूम प्राईस, दिल्ली) दरम्यान आहे.

महिलेशी गैरवर्तन करणाऱ्या वाहतूक पोलिसांवर तातडीने कारवाई करा – खा . वंदना चव्हाण

पुणे :

चांदणी चौक येथील नाकाबंदीदरम्यान वाहतूक विभागातील निरीक्षकासह कर्मचाऱ्यांनी श्रीमती पुजा भाले या महिलेशी विनयभंग आणि धक्काबुक्की केल्याचा प्रकार सोमवारी 1 जून रोजी रात्री घडला. पोलीसांकडून विनयभंग, मारहाण झाल्याच्या प्रकाराबाबत खासदार ऍड.वंदना चव्हाण यांनी पोलीस आयुक्त श्री. के.के.पाठक यांना या कायद्याने गंभीर गुन्ह्याची दोन दिवसात दखल घेण्यात यावी या विषयीचे पत्र सादर केले आहे.

हा एक गंभीर गुन्हा असून, कायद्याने यावर कारवाई केली जावी. पोलिसांनी महिलांशी गैरवर्तन करणे योग्य नाही. या अत्यंत गंभीर गुन्ह्याची दोन दिवसांत दखल घेतली जावी अशी मागणी खासदार ऍड. वंदना चव्हाण यांनी पोलिस आयुक्तांना दिलेल्या पत्राद्वारे करण्यात आली आहे.

श्रीमती भाले या एनडीए रस्त्यावर कुटुंबासह राहतात. यांनी सोमवारी सायंकाळी तिच्या मित्राला, तसेच कुटुंबियांना जेवावयास बोलावले होते. भाले यांचा मित्र असलेली कार पोलीसांनी अडविली; तसेच त्यांच्याकडून दंड आकारण्यात आला नाही. मात्र तरीही पोलिस घरी जाण्यास परवानगी देत नव्हते. त्यांनी मदतीसाठी श्रीमती भाले यांना बोलावले असता तेथे पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याने आणि कर्मचाऱ्याने विनयभंग केला, अशी तक्रार पुजा भाले यांनी केली आहे.

धक्काबुक्की करीत श्रीमती भालेच दारू प्यायल्या आहे का ?अशी तपासणीची सक्तीही केल्याचा भाले यांचा आरोप आहे. भाले यांनी या सर्व प्रकाराची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर त्या वेळी असलेले गस्तपथकाचे पोलिस घटनास्थळी धावून आले. आणि त्यांनी सर्वांना पोलिस चौकीत नेले असता, तेथेदेखील वाहतूक विभागातील कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यंानी भाले यांच्यासह मित्रांना धक्काबुक्की केली. तसेच, तेथे देखिल भाले दारू प्यायल्या आहे का, असे म्हणत वारंवार ब्रीदऍनालाइझर करण्याची जबरदस्ती केल्याचे भाले यांच्या तक्रार अर्जात नमूद केले आहे. या सर्व प्रकारामुळे चार-पाच तास या सर्वांना नाहक त्रास सहन करावा लागला.

शून्यातून विश्व निर्माण करणारे तरुण उद्योजका निर्माण करणे हेच ध्येय ‘ डीएसके’

पुणे  : जगामध्ये आपल्या देशाची अधिकाधिक प्रगती साधायची असेल तर तरुण उद्योजक पिढी

निर्माण करण्याचे आपले ध्येय आहे, असे मत बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांनी

व्यक्त केले. ते पुढे म्हणाले,येणाऱ्या काळात देशात १०० हून अधिक तरुण डीएसके तयार

झाले पाहिजेत, ज्यांनी माझ्यापेक्षा भरीव कामगिरी करायला हवी.हेच माझे स्वप्न

साकारण्यासाठी मी  यापुढील काळात प्रयत्न करणार आहे.

उत्कर्ष प्रकाशनातर्फे प्रकाशित व श्याम भुर्केलिखित ‘शून्यातून विश्व निर्माण करणारे डीएसके’

पुस्तकाचे प्रकाशन सिम्बायोसिस चे संस्थापक शां. ब. मुजुमदार यांच्या हस्ते झाले. यावेळी

जेष्ठ पत्रकार विजय कुवळेकर, डी. एस. कुलकर्णी, उत्कर्ष प्रकाशनचे सु. वा. जोशी, सुधीर

गाडगीळ  आणि श्याम भुर्के उपस्थित होते.

यावेळी मुजुमदार म्हणाले, डीएसके म्हणजे मोठी स्वप्न पाहणारे आणि ते प्रत्यक्षात

उतरवण्यासाठी प्रयत्नशील असणारे  पुणेकर आहेत. एकाच आयुष्या मध्ये माणूस किती काम

करू शकतो याचे डीएसके एक उदाहरण आहेत.  असमाधान हेच त्यांचे स्फूर्ती स्थान

असल्यामुळे त्यांचा उद्योगाचा पसारा वाढला आहे आणि त्यात यशस्वीरित्या पुढे जात आहेत

त्याच्यातील ही बाब कौतुकास्पद आहे.असेही त्यांनी नमूद केले.

गाडगीळांच्या खुमासदार प्रश्नांना उत्तर देताना म्हणाले, समाजासाठी मला अजून खूप काम

करायचे आहे. घरांच्या किंमती कमी करण्याबरोबरच गोरगरीबांसाठी, मध्यमवर्गीयांच्या घराचे

चित्र बदलायचे आहे. ग्राहकाला एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही तर तो भांडायला पुढे

आला पाहिजे हा विश्वास ग्राहकांच्या मनात निर्माण करून देण्यात जर तुम्ही सफल झालात

तरच तुम्ही यशस्वी झालात असे समजावे.

पुस्तकातील काही गंमतीदार किस्से सांगत भुर्के यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कुवळेकर

यांनी  डीएसकेंच्या व्यक्तीमत्त्वातील वेगवेगळ्या पैलूंवर त्यांनी प्रकाश टाकला.  त्यानंतर सुधीर

गाडगीळ यांनी  डीएसकेंची मुलाखत घेवून त्यांच्या आयुष्यातील गमती-जमती दिलखुलासपणे

प्रेक्षकांसमोर मांडल्या.
सुधीर गाडगीळ यांनी तुमच्याकडे भरपूर पैसे आहेत असे तुम्हाला कधी वाटले असा प्रश्न

विचारला असता डीएसके म्हणाले, नववीमध्ये असताना मी वृत्तपत्र टाकायचो. त्यावेळी वृत्तपत्र

विकून जमा झालेली ८० रुपयांची चिल्लर ही आजही मला ६ हजार कोटी रुपयांच्या

उलाढालीपेक्षा मोठी वाटते अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

‘वजीर ‘ आगामी हिंदी सिनेमाचा प्रोमो …

 

Wazir Official Teaser 2 | Starring: Amitabh Bachchan, Farhan Akhtar, Aditi Rao Hydari

Release : December, 2015

मुसलमानांच्या मदती साठी मध्यरात्री ही धावून जाईल – नरेंद्र मोदी

नवी दिल्ली-कोणत्याही धर्माविरुद्ध भेदभाव किंवा हिंसाचार खपवून घेणार नाही, अशी तंबी रा. स्व. संघासह सर्वच हिंदुत्ववादी संघटनांना दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मुस्लिमांसाठी काय पण’ करायची तयारी दाखवली आहे. रात्री १२ वाजता जरी तुम्ही माझं दार ठोठावलंत, तरी मी तुमच्यासाठी उपलब्ध असेन, असं वचन त्यांनी मंगळवारी मुस्लिम नेत्यांच्या शिष्टमंडळाला दिलं. स्वतःला ‘हिंदू राष्ट्रवादी’ म्हणवणाऱ्या मोदींच्या या भूमिकेबद्दल आश्चर्य व्यक्त होत असलं, तरी ‘धर्मनिरपेक्ष पंतप्रधान’ अशी स्वतःची ओळख निर्माण करण्याचा त्यांचा हा प्रयत्न मानला जातोय.
देशातील १२५ कोटी जनतेच्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी, त्यांच्या संरक्षणासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. धर्माच्या आधारे लोकांमध्ये फूट पाडून राजकारण करण्यावर माझा विश्वास नाही आणि धार्मिक भेदभावाची भाषा मी कधीही बोलणार नाही, अशी ग्वाही नरेंद्र मोदी यांनी दिली. अखिल भारतीय इमाम संघटनेचे प्रमुख उमर अहमद इल्यासी यांच्या नेतृत्वाखालील ३० मुस्लिम सदस्यांच्या शिष्टमंडळनानं मोदींची काल ‘शब्बे बारात’च्या रात्री भेट घेतली, तेव्हा ४५ मिनिटांच्या चर्चेत मोदींनी त्यांना विकासाची खात्री दिली. विरोधकांची टीका ऐकून माझं मूल्यांकन करू नका, तर माझं काम पाहून माझी पारख करा, असं आवाहनही त्यांनी मुस्लिम नेत्यांना केलं.

सिनेसृष्टीत आता.. एम आय टी चे ही पाऊल पुढे …

q
पुणे-स्वर्गीय राजकपूर यांचे स्वप्न साकार करण्यासाठी , एम आय टी  तर्फे राजकपूर मेमोरियल राजबाग , लोणीकाळभोर येथे आता अभिनय आणि सिनेमाविषयक सर्वोतपरी ज्ञानाचे प्रशिक्षण देणाऱ्या नव्या दालनाचा प्रारंभ होतो आहे . प्रसिध्द दिग्दर्शक जब्बार पटेल आणि सिनेअभ्यासक समर नखाते हे येथील विद्यार्थ्यांना सिनेसृष्टीत घेवून जाणाऱ्या दालनाचे चेअरमन आणि मुख्य समन्वयक असतील अशी माहिती एम आय टी चे संस्थापक प्रा. डॉ . विश्वनाथ कराड आणि राहुल कराड यांनी येथे पत्रकार परिषदेतून दिली.

सिनेसृष्टीतील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यक्ती या संस्थेत विद्यार्थी घडवतील . यामध्ये मनी रत्नम , रेसूल पुकुट्टी , शंकर महादेवन , अंजुम रजाब अ  ली, विनोद प्रधान , उज्वल निरगुडकर , राजीव मंसाद, आदींचा समावेश असणार आहे . दिग्दर्शन , छायाचित्रण , ध्वनी मुद्रण , व संकलन या विषाचा ३ वर्षांचा तर पटकथा लेखन आणि कला दिग्दर्शन या विषयाचा २ वर्षांचा तर दूरचित्रवाणी निर्मितीमध्ये एक वर्षाचा अभ्यासक्रम ठेवण्यात आला आहे

 यासंदर्भात श्री कराड म्हणाले ,’राजकपूर यांनी राजबाग मध्ये अनेक चित्रपटांच्या पटकथा लिहिण्यापासून ते नियोजन आणि चित्रीकरण आदी बाबी केल्या . राजकपूर यांचे  पिताश्री पृथ्वीराज कपूर आणि मातोश्री रामसारणी देवी यांची हि समाधी येथे आहे . पुण्याला चित्रपट निर्मितीची समृध्द परंपरा आहे . राजबागेत राजकपूर मेमोरीयल  द गोल्डन ईरा ऑफ सिनेमा ‘ उभारण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर येथे सिने अभ्यासाचे धडे देवून कलावंत घडविणे हि राजकपूर यांना आदरांजलीच ठरणार आहे

रेशनधान्याचा काळाबाजार करणाऱ्यांना लावला मोक्का – गिरीश बापटांची धडक मोहीम …

0

पुणे-रेशनधान्याचा काळाबाजार करणाऱ्या नाशिकमधील पाच व्यापाऱ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यान्वये (मोक्का) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेशनच्या धान्याचा अपहार करणाऱ्यांवर प्रथमच या कायद्यान्वये कारवाई करण्याचे धाडस दाखविण्यात आले असून, या रेशनमाफियांना ‘सहकार्य’ करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही अशी कडक कारवाई करण्याचा सरकारचाप्रयत्न राहील  अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी  पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
धान्याचा संघटितपणे काळाबाजार केल्याप्रकरणी संपत घोरपडे, विश्वास घोरपडे, अरुण घोरपडे, मगन पवार व रमेश पाटणकर यांच्यावर नाशिकच्या इगतपुरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धान्याच्या अपहाराचा तपास जिल्हा पोलिस उपअधीक्षकांमार्फत केला जाणार आहे; तसेच सहा महिन्यांत हा तपास पूर्ण करण्यात येणार असल्याचेही बापट यांनी स्पष्ट केले.
नाशिकमधील धान्य गैरव्यवहारप्रकरणी १७ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची घोषणा विधानसभेत करण्यात आली होती. त्यानंतर तीन आठवड्यांत निलंबन करण्यात आले. अन्नधान्य महामंडळाच्या गोदामातून धान्य वितरीत केल्यानंतर तालुका पातळीवरील गोदामांत पोहोचेपर्यंत धान्याची मोठी गळती होत असल्याचे निदर्शनास आले आहे. धान्याच्या अपहाराबद्दल जीवनावश्यक वस्तू कायद्याप्रमाणे कारवाई केली जाते. अन्न व औषध प्रशासनामार्फतही कारवाई होते. अशा गैरप्रकारांना घालण्यासाठी कायद्यात अनेक कलमे आहेत; पण प्रत्यक्षात कारवाई होत नाही. महाराष्ट्र झोपडपट्टी कायद्यान्वयेही अशा प्रकारांमध्ये कारवाई करता येऊ शकते. ‘त्याचा अभ्यास करून तसेच पोलिस व विधी विभागाच्या चर्चेअंती कायदा करण्याचा विचार सुरू आहे,’ असे मंत्र्यांनी स्पष्ट केले.
नाशिकमधील सुरगाणा येथील धान्य गोदामात ३१ हजार क्विंटल धान्याचा अपहार झाल्याचे उघडकीस आले आहे. हा अपहार तब्बल ७ कोटी ८४ लाख रुपयांचा आहे. याशिवाय, सिन्नर तालुक्यातील शासकीय गोदामातून पन्नास किलो धान्याच्या २८० गोण्या एका राइस मिलमध्ये नेल्याचेही आढळले आहे. नाशिकमध्ये रेशनमाफियांनी केलेला काळाबाजार व सुरगाणा आणि सिन्नरमधील धान्य अपहारामध्ये समान धागा आढळला आहे. त्यामुळे संघटित गुन्हेगारीच्या माध्यमातून धान्य अपहार होत असल्याने या पाच व्यापारी, वाहतूकदारांवर ‘मोक्का’ कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आल्याचे गिरीश बापट यांनी सांगितले.
नाशिकमधील धान्य घोटाळ्याप्रकरणी सात तहसीलदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ती मागे घेण्यासाठी तहसीलदार संघटनेने काम बंद आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. ‘तहसीलदारांनी काम बंद केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल,’ असे गिरीश बापट यांनी स्पष्ट केले. ‘पुरवठा खात्याचे काम बंद झालेले नाही. धान्य वितरणाचे काम शंभर टक्के होणारच आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आंदोलनाच्या मार्गाने जाऊ नये, ते त्यांच्या हिताचे नाही,’ असाही इशारा त्यांनी दिला आहे.
रेशनच्या धान्य वितरणामध्ये दोन ते साडेतीन हजार कोटी रुपयांची ‘गळती’ होत असल्याची माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठी मंत्री गिरीश बापट यांनी सोमवारी दिली. ही ‘गळती’ रोखण्यासाठी काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यापासून बायोमेट्रिक वितरण व्यवस्थेपर्यंत राज्य सरकार पावले उचलणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नाशिकमधील रेशनधान्य अपहार प्रकरणी प्रथमच ‘मोक्का’ कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आल्यानंतर पुरवठा मंत्री बापट यांनी रेशन व्यवस्थेतील त्रुटींवर भाष्य केले.

‘नेस्ले’ची पुरती कोंडी – यु पी नंतर केरळात मॅगीची विक्री बंद -कंपनीसह बच्चन ;माधुरी; प्रीती झिंटा वर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

0

मुंबई
-दिल्ली सरकारच्या आरोग्य विभागाने केलेल्या तपासणीत मॅगी नापास झाली आहे. त्याचवेळी आज केरळ सरकानेही राज्यात मॅगीची विक्री बंद करण्याचे आदेश दिले आहे. उत्तर प्रदेशपाठोपाठ अन्य राज्येही मॅगीविरोधात उभी ठाकल्याने ‘नेस्ले’ची पुरती कोंडी झाली आहे.

सर्वात आधी उत्तर प्रदेशमध्ये मॅगी अन्न आणि औषध प्रशासनाच्या कचाट्यात सापडली. मॅगी आरोग्यासाठी घातक असल्याचं तेथील तपासणीत स्पष्ट झाल्यानंतर मॅगीचे उत्पादन करणारी नेस्ले कंपनी तसेच मॅगीची जाहिरात करणारे अभिनेते अमिताभ बच्चन, अभिनेत्री माधुरी दीक्षित, प्रीती झिंटा यांनाही दणका बसला. नेस्ले कंपनीपाठोपाठ आता या तीन स्टारवरही गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुजफ्फरपूर न्यायालयाने दिले आहेत.

अशाप्रकारे चहुबाजूने मॅगीची कोंडी झाली असताना आज दिल्ली सरकाच्या तपासणीतही मॅगी नापास झाली आहे. सरकारने लॅबमधून मॅगीचे नमुने तपासून घेतले असता मॅगीतील घटक आरोग्यासाठी अपायकारक असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, दिल्लीत एकीकडे मॅगीच्या अडचणी वाढल्या असताना केरळमध्ये तातडीने मॅगीची विक्री थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दुसरीकडे हिमाचल प्रदेशातही अनेक स्वयंसेवी संस्थांनी मॅगीवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

माहेश्वरी समाज आयोजित महेश नवमी उत्सव संपन्न रक्तदान शिबिरामध्ये 83 जणांचे रक्तदान

unnamed

पुणे :

“समस्त माहेश्वरी समाज’ आणि संस्थांतर्फे “महेश नवमी’ उत्सवादरम्यान रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 83 जणांनी रक्तदान केले.

रक्तदान शिबिरामध्ये 40 ते 50 महिलांना रक्तातील हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे रक्तदान करता आले नाही, अशी खंत भगीरथ राठी यांनी व्यक्त केली.

“अपनोंसे अपनी बात’ या युवती व महिला प्रबोधन कार्यक्रमाचे देखिल आयोजन करण्यात आले होते. यामध्ये युवराज जैन यांनी आजकालच्या महिलांना नोकरी, व्यवसायाबरोबरच कुटुंबाकडे देखिल लक्ष द्यायचे असते. यावेळी त्यांनी कशाप्रकारे संतुलन सांभाळावे याबाबत महिलांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमामध्ये सुमारे 300 महिला सहभागी झाल्या होत्या.

पुण्यातील “माहेश्वरी समाज’ आणि संस्थांतर्फे दिनांक 30 व 31 मे अशा दोन दिवसीय “महेश नवमी’ उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यंदाचे उत्सवाचे आठवे वर्ष होते. यामध्ये विविध पुरस्कार वितरण समारंभ आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

हा कार्यक्रम ओसवाल बंधू समाज कार्यालय, शंकरशेठ रोड येथे हा कार्यक्रम झाला .

उत्सव समितीतर्फे जुगल किशोर पुंगालिया, गोविंद मुंदडा, त्र्यंबकदास मुंदडा, भगीरथ राठी,  सुरेश नावंदर, पुष्पा तोष्णिवाल, राकेश माहेश्वरी, राजेंद्र डागा, सचिन चांडक, रामेश्वर लाहोटी, अशोक राठी, उमेश झंवर, अनिल राठी, जयप्रकाश सोनी, रमेश जाजु, धीरज मुंदडा, सुभाष भट्टड,  शेखर सारडा आदी मान्यवर उपस्थित होते.

देवा तुझ्या देवळात चोरट्यांचा फड … …

सिद्धांत’ या सिनेमानंतर आता निलेश नवलखा आणि विवेक कजरिया यांची निर्मिती असलेला ‘चौर्य’ सिनेमा प्रदर्शनासाठी तयार झाला आहे. दमदार विषय असलेल्या सिनेमांची निर्मिती करण्यात हातखंडा असलेले हे निर्माता आता ‘चौर्य’ हा सिनेमा घेऊन येत आहेत. या सिनेमाचा टीझर नुकताच रिलिज करण्यात आलाय.देवा तुझ्या देवळात चोरट्यांचा फड … हे गाणे यातील लक्ष्यवेधी ठरते आहे
चौर्य’ या टायटलवरून सिनेमाची उत्सुकता वाढली आहे. सिनेमाचा टीझर सिनेमाची आणखीही उत्सुकता वाढतो. समीर आशा पाटील यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले असून लेखनही त्यांनीच केले आहे. तर सिनेमात किशोर कदम, मिलिंद शिंदे, गणेश यादव, प्रदीप वेलणकर, दिग्विजय रोहिदास, दिनेश लता शेट्टी, त्रिथा मुरबाडकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. सिनेमात सोशल क्राईम थ्रिलर कथा असून एक वेगळाच विषय यातून पुढे येणार आहे. ‘फॅन्ड्री’, ‘अनुमती’, ‘सिद्धांत’, ‘शाळा’ सारखे वेगळे सिनेमे देणारे हे निर्माते नेहमीच प्रेक्षकांसाठी नवीन काहीतरी घेऊन येत असतात. त्यानुसारच याही सिनेमातून काही धमाल बघायला मिळेल असे टीझरवरून वाटते आहे.