Home Blog Page 3602

पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ करणाऱ्या ज्योतिषाचे चक्क महापालिकेने केले स्ट्रिंग ऑपरेशन….

0
पुणे-बहुधा हि दुर्मिळ घटना असेल ,बहुधा पहिली हि असावी  पण  थोतांड मांडून धंदा करणाऱ्या एका ज्योतिषावर चक्क पुणे महापालिकेने कारवाई केली आहे … ते हि स्ट्रिंग ऑपरेशन करून ….

महापालिकेने अशा प्रकारे स्ट्रिंग ऑपरेशन करून केलेल्या या कारवाईचे कौतुक करावे लागेल . नेमकी हि कारवाई कशी आहे ते पाहू …

हिंगणे खुर्द येथील पियुष हावूस मधील फ्ल्याट क्रमांक १० मध्ये चालत असे प्रगती ज्योतिष यांचा धंदा… वृत्तपत्रात जाहिरात देवून विठ्ठल तुकाराम गन्जेवार उर्फ अण्णा गायत्री उपासक  हे हा धंदा चालवीत जन्मकुंडलीवरून नौकरी , आजार , लग्न , संतती पुत्रकामेष्टी यज्ञा बाबत सल्ला देणाऱ्या या ज्योतिषाची जाहिरात वाचून गणेश बोऱ्हाडे नावाच्या नागरिकाने महापालिका आयुक्तांकडे याबाबत तक्रार केली . आणि विशेष म्हणजे ती आयुक्तांनी मनावर हि घेतली .  आश्चर्य आणि कौतुक वाटावी अशी हि घटना आहे .

आयुक्तांनी मग सहायक आरोग्यप्रमुख वैशाली जाधव कायदेशीर सल्लागार विभागातील वकील निशा चव्हाण आणि अन्न निरीक्षक महेंद्र जगताप , अजित भुजबळ , रोहिदास सोनावणे यांचे पथक केले आणि या पथकाने बोगस गिऱ्हाईक पाठवून छुपे क्यामेरे, रेकॉर्डर वापरून स्ट्रिंग ऑपरेशन केले पुत्रप्राप्तीसाठी साडेपाच हजार रुपये खर्च येईल असा यज्ञ करा असे सांगून या तथाकथित ज्योतिषाने धंदा मांडला होता

महापालिकेने त्याच्यावर गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व निदान तंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध )१९९४ आणि सुधारित २००३ कायद्याचे कलम २२ चे उल्लंघन केल्याप्रकरणी न्यायालयात खटला दाखल करण्यासाठी कारवाई केली आहे .

महापालिकेच्या कारवाईने खटला दाखल होणार असला तरी यावर पोलिस कारवाई का नाही झाली हा प्रश्न हि अनुत्तरीत आहेच पुत्रप्राप्तीचे आमिष दाखवून यज्ञ करणे म्हणजे देवादिकांच्या नावाने फसवणूक करणे असेही याप्रकरणात दिसते आहे . यानुसार कारवाया झाल्या तर पुण्यातील गलेलठ्ठ असे ज्योतिष महापालिकेच्या आणि पोलिसांच्याही गळाला लागतील आणि भोळ्याभाबड्या जनतेची फसगत टळेल असे म्हणता येणार आहे

म्यानमार कारवाई नंतर भारत -पाक शाब्दिक युध्द सुरु

0

ईस्लामाबाद – म्यानमार कारवाई  नंतर भारत आणि पाक मध्ये जोरदार शाब्दिक युध्द सुरु झाल्याचे दिसते आहे आम्ही म्हणजे म्यानमार नाही … अणुबॉम्ब काय शब-ए-बारात साठी राखून ठेवला आहे का?अशा शब्दात पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांनी भारताच्या म्यानमार कारवाईवर  रग्गेल विधान केल्याच्या बातम्या येत आहेत

Del58578
म्यानमारमधील कारवाईनंतर संपूर्ण पाकिस्तानात खळबळ माजली आहे. पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांनी या मुद्यावरून पाकिस्तानच्या लष्कराला चिथावणी देण्याचा प्रयत्न केला आहे. आपण अणुबॉम्ब काय शब-ए-बारात साठी राखून ठेवला आहे का? असा सवाल मुशर्रफ यांनी लष्कराला केला आहे.वेळप्रसंगी म्यानमारप्रमाणेच शेजारी देशांच्या सीमेतही प्रवेश करून ऑपरेशन करू या इशाऱ्यावर पाकिस्तानने पलटवार केला आहे. आम्ही म्यानमार नसून अण्वस्त्रधारी देश आहोत, त्यामुळे सीमोल्लंघन केल्यास त्याचे उत्तर दिले जाईल, असे पाकिस्ताने म्हटले आहे. पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाशी संबंधित मंत्री राणा तनवीर हुसेन यांनी भारताला इशारा देत असे म्हटले आहे की, ”आम्ही म्यानमार नाही, तुम्हाला आमच्या शक्तीचा अंदाज नाही का? पाकिस्तान एक न्युक्लिअर नेशन आहे. आमच्याकडे न्युक्लिअर बॉम्ब आहे. म्यानमारप्रमाणे शेजारी देशांत दहशतवाद्यांविरोधी कारवाईसाठी भारत सीमेपलिकडेही जाऊ शकतो, असे संकेत भारताने बुधवारी दिले होते.

30-manohar-parrikar-latest

भारताच्या लष्काराने म्यानमारमध्ये दहशतवाद्यांच्या विरोधात केलेल्या कारवाईतून दहशतवाद्यांना बंदोबस्त करण्याबाबत भारताचा बदललेला दृष्टीकोन दिसत असल्याचे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर गुरुवारी म्हणाले. पर्रिकर म्हणाले की, बदल घडण्यासाठी दृष्टीकोन बदलण्याची गरज असते. दहशतवाद्यांच्या विरोधात घेतलेल्या एका साधारण अॅक्शमुले देशात सुरक्षेच्या संदर्भात दृष्टीकोन बदलला आहे. तसेच जे भारताच्या या बदललेल्या दृष्टीकोनामुले घाबरले आहेत

केंद्रीय मंत्री राज्यवर्धन राठोड यांनी बुधवारी इंडियन आर्मीच्या ऑपरेशनचे कौतुक करत असे म्हटले होते की, म्यानमारमध्ये करण्यात आलेले ऑपरेशन हे दहशतद्यांना आसरा देणाऱ्या शेजारी देशांसाठी एक इशारा आहे. भारत शत्रुच्या शोधासाठी सीमा पार करायला मागे पुढे पाहणार नाही. राठोड यांच्या या वक्तव्यानंतर मोदी सरकारच्या अनेक मंत्र्यांनीही त्याचे समर्थन केले होते. २६/११ च्या मुंबई हल्ल्यानंतरही भारतीय लष्कराने शेजारी देशाविरोधात अशी कारवाई करायला हवी, होती असेही काही मंत्री म्हणाले.
पाकचे गृहमंत्री चौधरी निसार अली खान म्हणाले की, ‘हिंदुस्तानी नेत्यांनी दिवसा स्वप्ने पाहणे बंद करावे. आम्हाला म्यानमार समजू नका. जर हिम्मत केली तर त्याचे परिणामही भोगावे लागतील. संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले, अशा वक्तव्यांनी वातावरण खराब होते. भारताने सुरुवात केली तर आम्ही नक्की धडा शिकवू. पाकिस्तानचे विरोधीपक्ष नेते इम्रान खान यांनीही असाच सूर आळवला. पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांनीही धमकीच्या स्वरात म्हटले की, पाकिस्तानच्या सैन्याच्या हातात बांगड्या नाहीत, आणि आम्ही म्यानमारही नाही. भारताने इस्लामाबाबत काहीही गैरसमज बाळगू नये असेही ते म्हणाले.

नेपाळ मध्ये जमीन खचली ६ गावे गाडली गेल्याची भीती … ?

0
काठमांडू- नेपाळच्या पूर्वेकडील पर्वतांमध्ये झालेल्या मुसळधार पावसाने भुस्खलन झाले असून त्याखाली६गाव दबले असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. यावेळी घरांमध्ये झोपलेल्या ३० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
यासंदर्भात आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी सुरेंद्र भट्टराई म्हणाले, की भूकंपानंतर जवळपास दररोजच भुस्खलनाच्या घटना घडत आहेत. काल (बुधवार) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली तेव्हा लोक घरी झोपले होते.
 भुस्खलनाने तपलजंग जिल्ह्यातील गावांचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना रात्रीच्या वेळी झाल्याने मोठे नुकसान झाले असल्याचे सांगितले जात आहे.
भट्टराई यांनी सांगितले, की जोरदार पावसामुळे पूर्वेकडील  भागांत भुस्खलनाचा धोका वाढला आहे. नेपाळमध्ये या दिवसांमध्ये भुस्खलन होण्याच्या घटना सामन्य आहेत. बुधवारी झालेल्या भुस्खलनानंतर 12 लोक बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. पण याची अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. ही परिसर फारच दुर्गम आहे. पर्वतांमध्ये असलेल्या या गावापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक तास लागतात.
डीएसपी शांती राज कोईराला यांनी सांगितले, की अनेक घरे ढिगाऱ्यांसाठी दबले आहेत. त्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या आणि जखमी झालेल्या लोकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. बचाव आणि मदत कार्यासाठी पोलिसांचे एक पथक पाठविण्यात आले आहे.

वडगाव- धायरी पुलावर भीषण अपघात- ६ ठार

0

पुणे-कात्रज-देहूरोड बाह्यवळण महामार्गावर वडगाव पुलाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे भरधाव डंपरने लक्‍झरी बस, दुचाकी आणि चारचाकींसह दहा वाहनांना धडक दिल्यामुळे सहा जण ठार, तर दहा जण जखमी झाले. मृतांमध्ये सातारा जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश आहे. हा अपघात गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास झाला. अपघातानंतर डंपरचालक पसार झाला आहे.

रवींद्र तुकाराम सावंत (वय 35), त्यांची पत्नी सारिका सावंत (वय 30), मुलगी रेवती सावंत (वय 10, सर्व जण रा. मुंबई, मूळ रा. सांगवी-कुडाळ, ता. जावळी, जि. सातारा), सुभाष विनायक चौधरी (वय 29, रा. सुदाम पाटील चाळ, रामनगर, डोंबिवली), बालाजी रामसिंग राठोड (वय 25, रा. धायरी, मूळ रा. पिंगळी, ता. हदगाव, जि. नांदेड) आणि महेबर यादव गायकवाड (वय 23, रा. शिर्गापूर, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) अशी मृतांची नावे आहेत, तर जखमींमध्ये रचना रवींद्र सावंत (वय 14), भालचंद्र विठ्ठल कालूरकर (वय 42), मयाप्पा पांडुरंग कोळेकर (वय 42), रूपेश राजेंद्र पळसदेवकर (वय 34, तिघे रा. धनकवडी), बाळासाहेब विठ्ठल घाडगे (वय 56, रा. कोंढवा), शरद सर्जेराव मोरे (वय 54, रा. सातारा), रवी अंकुश वाघमारे (वय 22, रा. आंबेगाव पठार), नीलेश शिवलाल पवार (वय 23), रमेश हरी जाधव (वय 25) आणि स्वप्नील सुरेश जोशी (वय 45, तिघे रा. वारजे) यांचा समावेश आहे. जखमींवर नवले, मंगेशकर आणि जगताप रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिस कर्मचारी हरीश गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून सिंहगड रस्ता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
रवींद्र सावंत हे त्यांच्या मेव्हणीच्या लग्नासाठी कुटुंबासह त्यांच्या मूळ गावी आले होते. लग्न समारंभ आटोपून ते सॅण्ट्रो कारमधून मुंबईला परत जात होते. त्यांच्यासमवेत मित्र सुभाष चौधरी हे होते. सावंत यांचा मुंबईत सीसीटीव्ही बसविण्याचा व्यवसाय आहे, तर राठोड हा बिगारी कामगार असून, तो कामावर पायी जात होता.
महामार्गावर वडगाव बुद्रुक पुलाजवळ पीएमपी बसचा थांबा आहे. तेथून पुढे काही अंतरावर एक महिला मोबाईलवर बोलत जात होती. तिला वाचविण्यासाठी बसचालकाने बस अचानक उजव्या बाजूस घेतली. त्या वेळी वारज्याच्या दिशेने जाणाऱ्या खडी आणि डांबराचे मिश्रण भरलेल्या डंपरने प्रथम लक्‍झरी बसला धडक दिली. त्यामुळे बस झाडावर जाऊन आदळली. त्या बसने मॅक्‍स जीपला धडक दिली. तसेच, डंपरने पुढे जाऊन तवेरा आणि सहाआसनी रिक्षाला धडक दिली. त्यानंतर तीन दुचाकींना धडक दिल्यामुळे त्या डाव्या कठड्याच्या बाजूस पडल्या. तेथून पुढे डंपरने स्विफ्ट डिझायर, सॅण्ट्रो आणि ओम्नी व्हॅनला धडक दिली. त्यानंतर सॅण्ट्रो, डंपर आणि ओम्नी व्हॅन पुलाचा कठडा तोडून खाली पडली.
अपघाताची माहिती मिळताच पोलिस, अग्निशामक दलाच्या जवानांनी क्रेनच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. जवानांनी कटरच्या साहाय्याने सॅण्ट्रो कारचा पत्रा कापून चार मृतदेह बाहेर काढले. त्याच कारमध्ये जखमी असलेल्या रचना सावंत हिला बाहेर काढले. दरम्यान, घटनास्थळी बघ्यांची गर्दी उसळल्यामुळे मदतकार्यात अडथळे येत होते. यामुळे कात्रजच्या पुढे काही अंतरापासून वारज्यापर्यंत रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती.
प्रत्यक्षदर्शी संदीप भंडारी हे हिंगणे खुर्द येथून वारज्याकडे जात होते. ते म्हणाले, “”मी पुलावर जात असताना पाठीमागे मोठा आवाज झाल्यामुळे वळून पाहिले. डंपर काही वाहनांना धडकत येत होता, म्हणून मी माझी गाडी उभी करून दूर पळालो. काही वेळातच त्या डंपरने माझ्या व्हॅनलाही उडविले. मी गाडी सोडून पळालो म्हणून वाचलो.‘‘

“आबेदा इनामदार ज्युनियर कॉलेज’च्या शिफा खानचे राज्य पातळीवरील “एमएससीआयटी 2015′ परीक्षेत यश

0

unnamed

पुणे :

राज्य पातळीवरील एमएससीआयटी 2015 (MS-CIT-2015)  च्या परीक्षेत “आबेदा इनामदार ज्युनियर कॉलेज’ची विद्यार्थीनी शिफा रफीक खान  हिने 200 पैकी 192 गुण मिळवून यश संपादन केले. “महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्ष पी. ए. इनामदार यांनी शिफा खान हिचे कौतुक केले.

“आबेदा इनामदार ज्युनियर कॉलेज’चे उपप्राचार्य गफार सय्यद, विज्ञान विभागाच्या निरीक्षक तस्निम शेरकर आणि शिफा खान हिचे पालक तसेच कॉलेजचे प्राचार्य, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी शिफा खानचे अभिनंदन केले.

बाळासाहेब ठाकरेंची संपत्ती … उद्धव ठाकरे आणि जयदेव ठाकरे वादात तिसऱ्या अनोळखी व्यक्तीमुळे न्यायाधीश टेन्शन मध्ये …

0

मुंबई, – शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती स्थिर नसताना उद्धव ठाकरेंच्या दबावामुळे मृत्युपत्रावर बाळासाहेबांची जबरदस्तीने स्वाक्षरी घेतल्याचा दावा जयदेव यांनी केल्यानंतर त्यांच्या संपत्ती बाबतच्या खटल्यात अनोळखी व्यक्तीची लूडबूड सुरु असल्याचे खुद्द मुंबई उच्च न्यायालयानेच म्हटले त्यामुळे या खटल्याला आता वेगळेच वळण लागत असल्याचे चिन्ह आहे . अज्ञात व्यक्तीकडून प्रत्येक सुनावणीनंतर नोंदवलेल्या पुराव्यांची मागणी होत असल्याचे सांगत न्यायालयाने बुधवारी नाराजी व्यक्त केली आहे.
उद्धव ठाकरे आणि जयदेव ठाकरे यांच्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीवरून वाद सुरु आहेत. या खटल्यातील सुनावणीनंतर अनोळखी व्यक्ती चेंबरमध्ये येऊन नोंदवलेल्या पुराव्यांची प्रत मागत असल्याचे न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी बुधवारी सुनावणीदरम्यान सांगितले.
जयदेव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूपत्राला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी सुरू आहे. न्यायमूर्ती पटेल यांनी बुधवारी जयदेव ठाकरे यांच्या वकील सीमा सरनाईक आणि उद्धव ठाकरे यांचे वकील राजेश शाह यांना सांगितले की, “एका अज्ञात व्यक्तीने माझ्या चेंबरमध्ये येऊन या प्रकरणात नोंदवलेल्या पुराव्यांची प्रत मागितली आहे. हा अज्ञात व्यक्ती ४ वेळा माझ्या चेंबरमध्ये आला. सरनाईक यांच्या ऑफिसमधील असल्याचे सांगत त्याने पुरावे मागितले. तो नक्की कोण आहे आणि पुरावे मागण्यामागे त्याचा काय उद्देश आहे, याची मला कल्पना नाही. परंतु हे प्रकरण थांबायला हवे, असे न्यायमूर्ती पटेल म्हणाले.”
त्यानंतर जयदेव यांच्या वकील सरनाईक आणि उद्धव यांचे वकील शाह यांना या अनोळखी व्यक्तीचा शोध घेण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. वकिलांनी त्यांच्या ज्युनिअर्सच्या नावे पत्र लिहून हे पुरावे गोळा करण्यासाठी कोण आले होते, याचा शोध घ्यावा असे म्हटले आहे. तर ओळखपत्र दाखवल्याशिवाय ज्युनिअर वकिलांच्या हाती कोणतेही पुरावे सोपवू नये, असे वकिलांनी सुचवले आहे.
या खटल्यात २००७ पासून बाळासाहेबांवर उपचार करणाऱ्या डॉ. जलील पारकर यांचा जबाब न्यायालयाने नोंदवला आहे. उच्च न्यायालय ३० जून रोजी शिवसेना नेते अनिल परब यांचा जबाब नोंदवणार आहे. १३ डिसेंबर २०११ रोजी बनवलेल्या बाळासाहेबांच्या मृत्युपत्रात माझ्या नावावर फार कमी संपत्ती ठेवल्याचा आरोप करत जयदेव ठाकरे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. बाळासाहेबांची प्रकृती स्थिर नसताना उद्धव ठाकरेंच्या दबावामुळे मृत्युपत्रावर बाळासाहेबांची जबरदस्तीने स्वाक्षरी घेतल्याचा दावा जयदेव यांनी केला आहे

‘आप’ च्या कायदा मंत्र्यांनंतर ‘आप’चे सोमनाथ भारती अडचणीत, पत्नीने केला कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप

0

नवी दिल्ली- आम आदमी पक्षाचे (आप) कायदामंत्री जितेंद्रसिंह तोमर यांना बनावट पदवी प्रकरणी अटक झाली असताना माजी कायदामंत्री सोमनाथ भारती एका नव्या वादात सापडले आहेत. सोमनाथ भारती यांच्याविरोधात त्यांची पत्नी लिपिता भारती यांनी महिला आयोगाकडे कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी सोमनाथ भारती यांना महिला आयोगाने नोटीस पाठविली आहे.
‘मला वेगळे व्हायचे आहे. आपल्याला २०१० पासून बेदम मारहाण केली जात आहे. मी हे शब्दांत सांगू शकत नाही’, असे लिपिता भारती यांनी महिला आयोगाकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. पतीला घटस्फोट देऊन आपल्याला मुलांसोबत सन्मानपूर्वक जीवन जगण्याचे असल्याचेही लिपिता भारती यांनी म्हटले आहे. याप्रकरणी सोमनाथ भारती यांना महिला आयोगाने नोटीस पाठवली असून २६जूनपर्यंत त्यांना हजर होण्यास सांगितले आहे.
दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा बरखा सिंह यांनी सांगितले की, लिपिका भारती या प्रचंड घाबरल्या आहेत. पती सोमनाथ भारती यांनी त्यांना मारहाण केली आहे. शिविगाळ केली आहे. एवढेच नव्हे पतीने त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी सोमनाथ भारती यांना नोटीस बजावून त्यांना २६ जूनला बोलवण्यात आले आहे.

अक्षय कुमारच्या” ब्रदर्स ‘चा पहा ट्रेलर …

0
अक्षय कुमार, सिद्धार्थ मल्होत्रा आणि जॅकलिन फर्नांडिस स्टारर आगामी ‘ब्रदर्स’ या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे

अभिनेत्री जॅकलिनने या सिनेमात अक्षयच्या पत्नीची भूमिका साकारली असून जॅकी श्रॉफसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत या सिनेमात दिसणार आहेत. ‘ब्रदर्स’ हा सिनेमा करण मल्होत्राने दिग्दर्शित केला असून करण जोहर, हीरु जोहरने एंडेमोल इंडियासोबत मिळून सिनेमाची निर्मिती केली आहे. येत्या 14 ऑगस्टला सिनेमा बॉक्स ऑफिसवर दाखल होणार आहे . ‘ब्रदर्स’ ही दोन भावांची कहाणी आहे. डेविड फर्नांडिस (अक्षय कुमार) आणि मोंटी फर्नांडिस (सिद्धार्थ मल्होत्रा) यांच्या भोवती सिनेमाचे कथानक गुंफण्यात आले असून दोघेही फायटर्स आहेत. बालपणी या दोन्ही भावांमध्ये खूप प्रेम असतं, मात्र काळानुसार दोघांमध्ये कटुता निर्माण होते. एक वेळ अशी येते, जेव्हा दोघेही भाऊ एकमेकांच्या विरोधात रिंगणात उभे ठाकतात.अशी कथा आहे

पावसाळी परिस्थितीला तोंडदेण्यासाठी महावितरण सज्ज-ग्राहक सेवेसाठी 1800-200-3435 किंवा 1800-233-3435 हे दोन टोल फ्री क्रमांक 24 तास उपलब्ध …

0

पुणे,  : पावसाळी परिस्थितीला तोंड देण्यासाठी पुणे परिमंडलात महावितरणची यंत्रणा सज्ज झाली आहे.

पावसाळ्यातील धोके टाळण्यासाठी सहकार्य करण्याचे तसेच 24 तास उपलब्ध टोल फ्री कॉल सेंटरमध्येच वीजविषयक

तक्रार नोंदविण्याचे आवाहन महावितरण केले आहे.

पावसाळ्यात वादळाने वीजतारांवर, खांबांवर झाडे पडून वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडतात.

पूरपरिस्थिती किंवा अतिवृष्टीमुळे खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी किंवा आवश्यक उपाययोजना

करण्यासाठी सर्व विभागांतर्गत साधनसामुग्रीसह फिरते पथक तयार ठेवण्यात येत आहेत. पुणे परिमंडल कार्यालय तसेच

रास्तापेठ, गणेशखिंड आणि पुणे ग्रामीण मंडल अंतर्गत सर्व विभागस्तरावर 24 तास कार्यरत राहणारे दैनंदिन नियंत्रण कक्ष

सुरु आहेत. पूर किंवा अतिवृष्टीमुळे कोणत्याही क्षणी प्रतिकूल स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने खबरदारीचा

उपाय म्हणून रोहित्र आणि वीजपुरवठा बंद करण्यात येतो. अशा स्थितीत संभाव्य धोका टाळण्यासाठी नागरिकांनी

महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

महावितरणकडून मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीची कामे पूर्णत्वाकडे आहेत. यात तांत्रिक देखभाल व दुरुस्तीच्या

कामांसह वीजवाहिन्यांना थेट धोका निर्माण करणार्‍या झाडांच्या फांद्यांची कटाई करण्यात येते. तथापि

वीजवाहिन्यांपासून दूर अंतरावर असलेल्या आणि खासगी किंवा संस्थांच्या मालकीच्या जमीनीवरील झाडे किंवा मोठ्या

लांबीच्या फांद्या वादळी व मुसळधार पावसामुळे वीजवाहिन्यांवर कोसळण्याची शक्यता असते. या शक्यतेचा अंदाज घेऊन

संभाव्य धोका निर्माण करणार्‍या झाडांची किंवा मोठ्या फांद्यांची संबंधीतांनी महानगरपालिकेची परवानगी घेऊन कटाई

करावी. त्यासाठी आवश्यकतेनुसार सहकार्य करण्यात येईल, असे आवाहन महावितरणने केले आहे.

शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांसाठी मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्गाचे 1800-200-3435 किंवा 1800-233-3435 हे

दोन टोल फ्री क्रमांक 24 तास उपलब्ध आहेत. कोणत्याही कंपनीच्या लॅण्डलाईन किंवा मोबाईलद्वारे या टोलफ्री क्रमांकावर

वीजग्राहकांना वीजसेवेविषयक तक्रार दाखल करता येणार आहे. यासोबतच अतिवृष्टी किंवा वादळामुळे वीजपुरवठ्यात

तांत्रिक बिघाड होऊन दुर्घटना होण्याची शक्यता आहे अशा ठिकाणांची माहिती या टोल फ्री क्रमांकावर देण्याची सोय

उपलब्ध आहे. महावितरणच्या टोल फ्री कॉल सेंटरमध्ये ग्राहकांना ग्राहक क्रमांकासोबत स्वतःचे कोणतेही तीन मोबाईल

किंवा दूरध्वनी क्रमांक रजिस्टर्ड करण्याची सुविधा आहे. यानंतर रजिस्टर्ड मोबाईल किंवा दूरध्वनी क्रमांकावरून तक्रार

नोंदविण्यासाठी फक्त तक्रारीचा तपशील सांगावा लागणार आहे. स्थानिक तक्रार निवारण केंद्गे कायमस्वरुपी बंद केल्याने

ग्राहकांनी टोल फ्री क्रमांकावरच तक्रार नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कुठे आहेत अच्छे दिन ? शरद पवारांचा सवाल

0

पाटना – कुठे आहेत अच्छे दिन ? सामान्य माणसाला अच्छे दिन तर जवळपास हि दिसेनात … जमिनी काबीज करणारे , आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाकून ठेवणारे हे सरकार आहे असे सांगत आज येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नरेंद्र मोदी सरकारला टिकेचे  लक्ष्य केले

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पाटणा येथील राष्ट्रीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस होता. सकाळीच राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्ताने ध्वजारोहण करण्यात आले. पक्षाच्या अध्यक्षपदी श्री. शरद पवार यांची फेरनिवडही आज करण्यात आली. पक्षाचे केंद्रीय निवडणूक अधिकारी टी. पी. पिथाम्बरन मास्टर यांनी तशी घोषणा केली. त्यानंतर देशभरातून अधिवेशनासाठी आलेल्या प्रतिनिधींना पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासह अन्य नेत्यांनी मार्गदर्शन केले…

काय म्हणाले शरद पवार ते वाचा त्यांच्याच शब्दात …
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहाव्या राष्ट्रीय अधिवेशनाला उपस्थित असणाऱ्या सर्वांचे स्वागत आणि अभिनंदन करतो. या अधिवेशनाची सुरुवात करताना आर. आर. पाटील, जे आपल्या पक्षातील निष्ठावान आणि मोठा जनाधार असलेले नेते होते त्यांचे स्मरण करतो. महाराष्ट्र तसेच देशात एनसीपी या पक्षाला मजबूत करण्यातील आर. आर. पाटील यांचे योगदान कधीच विसरता येणार नाही.
भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत पाटणा आणि बिहारची भूमिका सगळ्यांना ज्ञात आहेच. भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद हे बिहारचे सुपुत्र होते. लोकनायक जयप्रकाश बाबू यांचे वास्तव्य पाटण्यामध्येच होते. बिहारच्या राजकारणात पक्ष असो वा विपक्ष… वरिष्ठ नेते जयप्रकाश बाबू यांचे शिष्य सर्व देशाच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. देशात सगळ्यात जास्त प्रमाणात तरुणवर्ग असल्याने आज जगात भारताला अधिक महत्त्व आहे. बिहारच्या एकूण लोकसंख्येपेक्षा ५८ टक्के लोकसंख्या ही १८ ते २५ या वयोगटातील आहे. देशाच्या इतर राज्यांत इतक्या प्रमाणात युवक नाहीत. त्यामुळे भविष्यात देशाच्या विकासात बिहारची भूमिका ही निश्चितच महत्त्वाची राहणार आहे. बिहारमधील तरुण पिढीसोबत संवाद आणि संपर्क वाढविण्याच्या दृष्टिकोनातून याठिकाणी राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना युवा, महिला, अल्पसंख्याक, समाजातील दुर्लक्षित घटक दलित तसेच आदिवासी समाजाच्या रक्षणासाठी आणि विकासासाठी झाली आहे, याचा मला आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. देशाच्या मतदारांनी आपल्याला विरोधी पक्षाची नवीन जबाबदारी दिली आहे. गेली १० वर्षे केंद्रात आणि १५ वर्ष महाराष्ट्रात सत्तेत राहिल्यानंतर आता विरोधी पक्षाची भूमिका आपल्याला पार पाडायची आहे. गेल्या वर्षभरात आपण सक्षमपणे विरोधी पक्षाची भूमिका पार पाडली. सरकारने जनतेच्या हितासाठी जे निर्णय घेतले, त्यांचे आम्ही स्वागत केले. परंतु जे निर्णय लोकांच्या हिताविरोधात घेतले गेले, त्यांना कडाडून विरोध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केला आणि भविष्यातही हा पक्ष तो करत राहील. अच्छे दिन आयेंगे असं सांगितलं, पण सामान्य माणसाच्या जवळपास कुठेही अच्छे दिन आलेले नाहीत.
मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. मी स्वत: शेतकरी आहे, तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यामुळेच केंद्रात कृषिमंत्री होतो. त्यामुळे शेतकरी, गाव आणि शेती यांना माझ्या राजकारणात नेहमीच प्राधान्य राहील. सध्या साखर, दूध या व्यवसायात खूप चिंता आहे. सरकारने ठरवून दिलेला एफआरपी दर देणं साखर कारखान्यांना शक्य नाही कारण विक्री दराची तफावत ८०० रुपये प्रतिक्विंटल आहे. अशा परिस्थितीत साखर उद्योगाचं अस्तित्व टिकवणं कठीण आहे. देशाचे पंतप्रधान मन की बात करतात. पण कधीही सामान्य लोकांचे हाल त्यांना सांगितले नाहीत. वर्षाच्या सुरुवातीच्या ३५ दिवसांत फक्त मराठवाड्यातच ९३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, याची त्यांना माहिती नाही का? शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या आकडेवारीत फेरफार करून, आत्महत्या केलेले शेतकरी नव्हते हे दाखविण्याचा प्रयत्न सरकार करते आहे. देश आज कृषी संकटात असताना, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना शेती वाचवणं म्हणजे देश वाचविण्यासारखंच आहे हे मोदी सरकारला मान्य नाही.
हरियाणा, महाराष्ट्र निवडणुकीपुरता भाजप गप्प राहिला. या निवडणुकीत यश प्राप्त केल्यानंतर देशहिताच्या नावाखाली लोकांच्या परवानगीशिवाय त्यांच्या जमिनी काबीज करण्याचं षड्यंत्र हे सरकार करतंय. देशातील प्रत्येक शेतकरी भूमी अधिग्रहण कायद्याच्या विरोधात आहे. त्यामुळे या कायद्याला विरोध राजकाऱणातून होतोय, असं म्हणणं हे दुर्दैवाचं आणि घातक आहे. लोकसभेत भूमी अधिग्रहण कायदा संमत झाला पण राज्यसभेत भाजपची बहुसंख्या नसल्याने, ते बिल पार्लमेंटरी जॉइंट कमिटीकडे पाठवण्यात आलंय. हा कायदा शेतकऱ्यांच्या विरोधात असून, जर कायदा पारित केला तर देशातील शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील.
देशातील न्यायव्यवस्था हा सध्या चिंतेचा विषय झाला आहे. लाखो खटले न्यायालयात प्रलंबित आहेत. वर्षोनुवर्षे लोकांना न्याय मिळण्याची प्रतीक्षा करावी लागतेय. एका अहवालानुसार देशातील ३ कोटींवर लोक असे आहेत की, ज्यांच्या खटल्यांचे निकाल अजूनही लागले नाहीत. ही गंभीर परिस्थिती आहे. लवकरात लवकर ही परिस्थिती बदलणं गरजेचं आहे.
गाव आणि शहर यांच्यातील असंतुलन हा देखील मुद्दा आहे. स्मार्ट शहरं उभारतानाच गावांची स्थितीही चांगली असायला हवी. पंतप्रधानांची स्मार्ट सिटी संकल्पना चांगली आहे, मात्र शहरांसोबत गावंही स्मार्ट बनायला हवीत. गावाची उपेक्षा करून स्मार्ट शहर बनविण्याला आम्ही विरोध करू.
घरवापसी, लव जिहाद यासारखे अनुचित प्रकार देशात घडत आहेत. आपसात द्वेष निर्माण केला जातो आहे. पण सर्वधर्मसमभावायाशिवाय भारताचा विकास शक्य नाही.
महाराष्ट्रात आघाडी न झाल्याने दोन्ही पक्षांचं नुकसान झालं. महिला आरक्षण विधेयक संसदेत पारित व्हायला हवं. नाही तर महिला कधीही पुढे येऊ शकणार नाहीत. अंधश्रद्धा ही समाजाच्या विकासासाठी बाधक आहे. बिहारची जनता देशाची परिस्थिती पाहून सांप्रदायिक शक्तींना दूर ठेवण्यासाठी निश्चितच बदल करेल असा मला विश्वास आहे.

नात्यांच्या पलीकडच्या मैत्रीची गोष्ट ‘शुगर सॉल्ट आणि प्रेम’

0

महिला सक्षमीकरण आणि सबलीकरणासाठी सरकारी योजनांच्या घोषणा… अमलबजावणीचा वर्षाव दरवर्षी होत असतो. पण त्यामुळे खरंच महिलांवरील अत्याचार थांबलेत का… की, त्या सक्षम झाल्या आहेत? तर या साऱ्यांची उत्तरं ‘नाही’ अशीच येतील. त्याकरिता नितांत गरज आहे ती महिलांनी स्वतः खंबीरपणे उभं राहण्याची, आपल्यातला आत्मविश्वास जागृत करण्याची. हीच बाब अचूक हेरत निर्मात्या-दिग्दर्शिका सोनाली बंगेरा आजच्या काळाशी सुसंगत विषयावर आधारलेला ‘शुगर सॉल्ट आणि प्रेम’ हा चित्रपट घेऊन आल्या आहेत. तीन मैत्रीणींच्या निस्वार्थमैत्रीचीसहज-सुंदर कथा सांगणारा ‘शुगर सॉल्ट आणि प्रेम’१२ जूनपासून सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

 

आज स्त्रिया पुरूषांच्या बरोबरीने काम करत, देशाच्या प्रगतीत महत्त्वाचा वाटा उचलताना दिसतात. प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या स्त्रियांचं आपलं एक विश्व आहे. प्रत्येकीचा आपला एक मैत्रीणींचा ग्रुप आहे. हाच ग्रुप एकमेकींच्या सुख दुःखात मागे पुढे खंबीरपणे उभा राहून जीवनातील प्रत्येक लढाई समर्थपणे लढण्यास त्यांना पाठबळ देत असतो.‘शुगर सॅाल्ट आणि प्रेम’ हा सिनेमा अशाच तीन मैत्रीणींभोवती सोनाली कुलकर्णी, शिल्पा तुळसकर आणि क्रांती रेडकर यांवर गुंफला आहे. यांसोबतच अजिंक्य देव, समीर धर्माधिकारी, प्रसाद ओक आणि यतीन कार्येकर अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटाद्वारे रसिकांसमोर येत आहे.

 

अभिषेक जावकर व गुरुनाथ मिठबावकर प्रस्तुत व आरात्रिका एंटरटेनमेंट प्रा.लि यांच्या संयुक्त विद्यमानेया चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. नात्यांच्या पलीकडच्या मैत्रीची गोष्ट यात पाहायला मिळेल.गीतकार मंदार चोळकर यांच्या लेखणीतून शब्दबद्ध झालेल्या या गीतरचनांना सिद्धार्थ महादेवन आणि सौमिल शृंगारपुरे यायुवा संगीतकार जोडीने संगीत दिलं आहे.

“राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी’च्या “साहित्य, कला व सांस्कृतिक विभागा’च्या वतीने “आपलं घर’ संस्थेला धान्य वाटप

0

unnamed

पुणे :

“राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी’च्या “साहित्य, कला व सांस्कृतिक विभागा’च्या वतीने विभागाचे पुणे शहराध्यक्ष चैतन्य ऊर्फ सनी अशोक मानकर यांनी आज सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी “आपलं घर’ सिंहगड पायथा, डोंणजे, पुणे येथील अनाथ मुले मुली तसेच वृद्धांना धान्य व जेवणासाठी थाळ्यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी “आपलं घर’ या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय फळणीकर, अक्षय गांदले, व्यंकटेश भोंडवे, राहुल कुमठेकर उपस्थित होते.

“राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षा’च्या 16 व्या वर्धापन दिनानिमित्त “साहित्य, कला व सांस्कृतिक विभाग’ पुणेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

“राष्ट्रवादी कॉंग्रेस ‘चा 16 वा वर्धापनदिन विविध कार्यक्रमांनी साजरा

0

unnamed

पुणे :
“पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी’चा 16 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे शहरात आयोजन करण्यात आले होते.

झेंडा वंदन

“पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी’चा 16 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. पार्टीच्या वतीने पक्ष कार्यालय (टिळक रोड) येथे महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी रविंद्र माळवदकर, बापू पठारे, अश्विनी कदम, सुनील बनकर, श्रीकांत पाटील, अंकुश काकडे, सुभाष जगताप, भगवान साळुंके, वैशाली बनकर, मीना परदेशी, दिनेश धाडवे, आनंद रिठे, शारदा ओरसे, बाबुराव चांदेरे, विशाल तांबे, आनंद रिठे, अप्पा रेणूसे, रूपाली चाकणकर, विपुल म्हैसकर, अमित अगरवाल यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

स्वच्छता नारायण पूजा

पुणे शहरात “स्वच्छता अभियान’ राबविण्यात आले. यासाठी स्वच्छता नारायण पूजा घालण्यात आली व “समाज प्रबोधन’ व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी पालवे गुरुजी यांनी गाडगे महाराजांचा एकपात्री 1,850 वा प्रयोग करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक दीपक मानकर, कसबा विधानसभा अध्यक्ष दीपक जगताप, रत्ना नाईक, सादिका पारेख, गणेश नलावडे, अनिल अगावणे, अरुण गवळी, राहुल राऊत, सूर्यकांत येनपुरे यांनी केले होते.

पी.यू.सी. चाचणी शिबीर

वर्धापन दिनानिमित्त “पुणे शहर राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस’च्या वतीने मोफत पी.यू.सी चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे राकेश कामठे, मनोज पाचपुते, रूपेश संत, अभिषेक पळसकर, मंदार घुले, तुषार गायकवाड, सौरभ बडदे, विशाल मोरे, वर्धन बोरगावे यांनी केले होते.

विविध प्रकारचे दाखल्यांचे अल्पदरात वाटप

पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त प्रभाग क्रमांक 11 मध्ये नागरी सुविधा केंद्राच्या माध्यमातुन विविध प्रकारच्या दाखल्यांचे अल्पदरात वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी शारदा ओरसे, निलेश निकम, उदय महाले, अमित अग्रवाल, बाळासाहेब चव्हाण, युसूफ पठाण, अमर जाधव हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन शशिकांत जगताप यांनी केले.

कार्यकर्ता “करिअर ऍक्शन’ संपर्क पत्रिकेचे प्रकाशन

महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्या हस्ते “कार्यकर्ता करिअर ऍक्शन’ या संपर्क पत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. या पत्रिकेचे संयोजन शंकर शिंदे यांनी केले.

वृक्षारोपण

प्रभाग क्रमांक 44 सातववाडी येथे 75 वृक्षांचे रोपण करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन वैशाली बनकर व सुनील बनकर यांनी केले.

धान्य वाटप

“साहित्य, कला व सांस्कृतिक विभागा’च्या वतीने सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी ‘आपलं घर’ सिंहगड पायथा, डोणजे पुणे येथे अनाथ मुले, मुली तसेच वृद्धांना धान्य व जेवण्यासाठी थाळ्यांचे वाटप करण्यात आले.या उपक्रमाचे “साहित्य, कला व सांस्कृतिक  विभागा’चे पुणे शहराध्यक्ष चैतन्य उर्फ सनी मानकर, आणि राहुल कुमठेकर यांनी आयोजन केले होते.

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

प्रभाग क्रमांक 2 च्या वतीने वृक्षारोपण, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्त्कार, मोफत पी.यू.सी चाचणी शिबिर ठेवण्यात आले होते. संजीला पठारे, महेंद्र पठारे यांनी आयोजन केले होते.

खाऊ वाटप

सामाजिक न्याय परिषदेच्या वतीने गुरूवार पेठेतील अनाथ मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन आनंद रिठे यांनी केले.

नेत्रदान अर्ज

पक्षाचा “वर्धापन दिन’ आणि “जागतिक नेत्रदान’ दिनानिमित्त नेत्रदान अर्ज भरण्यात आले. यावेळी महापौर दत्तात्रय धनकवडे, अंकुश काकडे व पक्षाच्या कार्यकर्त्यांचे नेत्रदान अर्ज भरण्यात आले. या कार्यक्रमाचे सुनीता मोरे यांनी आयोजन केले होते.

शासनाकडे ऑनलाईन माहिती अधिकारांतर्गत किती अर्ज प्राप्त झाले याबाबतची माहिती नसल्याचे स्पष्ट

0

FB_IMG_1428325958984

पुणे-

शासनाकडे ऑनलाईन माहिती अधिकारांतर्गत किती अर्ज प्राप्त झाले याबाबतची माहिती नसल्याचे स्पष्ट झाले आहे असा दावा माहिती अधिकार क्षेत्रातील जाणकार कार्यकर्ते आणि सुराज्य संघर्ष समितीचे अध्यक्ष विजय कुंभार यांनी केला आहे त्यामुळे ऑनलाईन माहिती अधिकाराची सुविधा केवळ नावापुरतीच उरल्याचे चित्र आहे
त्यांनी यासंदर्भात प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे कि , ऑनलाईन आरटीआय सुरू झाल्यानंतर मी शासनाकडे ऑनलाईन  माहिती अधिकारांतर्गत  शासनाच्या सर्व विभागांकडे मिळून एकूण किती अर्ज प्राप्त झाले ? . माहिती अधिकार अधिनियमातील  कलम ६ (१) अंतर्गत अर्जांच्या फी पोटी एकूण  किती रक्कम जमा झाली ? . आणि दारिद्र्य रेषेखालील किती अर्ज प्राप्त झाले ?. याबाबतची माहिती मागीतली होती. मला शासनाकडून ‘Please refer to your RTI application no.ITDEP/R/2015/60065.The information which you have requested is not available in Govt. records.‘ असे उत्तर मिळाले.

 नुकतेच मी मुख्यमंत्र्याना एका पत्राद्वारे मंत्रालयातून गैरव्यवहारांना खतपाणी मिळत असल्यानेच ऑनलाईन आरटीआय ची दुरवस्था होत असल्याबद्दल लिहिले होते. मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात प्रथम केलेल्या महत्वाच्या कामांमध्ये ऑनलाईन आरटीआयचा समावेश होता. तशी त्यासंदर्भातील यंत्रणा गेली काही वर्षे तयार होती . परंतु नोकरशाहीच्या दुराग्रहामुळे तसेच भ्रष्टाचाराला मंत्रालयातूनच खतपाणी मिळत असल्याने ती सुरू करण्यात आली नव्हती.मुख्यंमंत्र्यांच्या आग्रहाने ती सुरू करण्यात आली. परंतु नोकरशाही  ती व्यवस्थित चालणार नाही याची पूर्णपणे काळजी घेत आहे.त्याचाच अनुभव सदर उत्तराने आला आहे.

 मंत्रालय स्तरावर अनेक विभागांमध्ये ऑनलाईन माहिती अधिकाराचे अर्ज स्विकारले जात नाहीत . स्विकारलेल्या अर्जांना वेळेत उत्तरे दिली जात नाहीत.अनेकदा फी स्विकारली जाते परंतु अर्ज स्विकारला जात नाही.याला कारणे अनेक आहेत, त्यामध्ये मंत्रालयातील फार कमी लोकांना इंटरनेटचा व संगणकाच्या इतर सुविधांचा वापर करता येतो .बाकीचे सर्व अधिकारी व कर्मचारी संगणकाचा वापर केवळ टाईपरायटर म्हणूनच करतात या बाबीचा समावेश आहे. परंतु सर्वात जास्त महत्वाची बाब म्हणजे  माहिती अधिकाराबाबत शासकीय अधिका-यांच्या मनात असलेली भिती हेच यामागचे खरे कारण आहे. भितीचीही दोन प्रमुख कारणे आहेत त्यातील पहिले भ्रष्टाचार – गैरव्यवहार हे असले तरी आपली अकार्यक्षमता उघड होण्याची भिती हेही कारण त्यामागे आहे.

 

महाराष्ट्रवासी परप्रांतीयांनी मराठी मातीशी एकरूप होवून राहावे – राज ठाकरे

0

पुणे: महाराष्ट्रात इतर राज्यातील म्हणजे परप्रांतीयांचे मतदार संघ नको , महाराष्ट्रात राहणाऱ्या परप्रांतीय नागरिकांनी मराठी मातीशी एकरूप होवून राहावे असे पुन्हा एकदा मनसे चे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केले

पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांना पुण्यामध्ये संतनामदेव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यावेळी राज ठाकरे बोलत होते.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट आणि राज ठाकरे हे यांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली होती.

राज ठाकरे यांनी यावेळी छोटेखानी भाषण केले “पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्याबद्दल खूप ऐकून होतो मात्र, आज प्रत्यक्ष त्यांना भेटून फार आनंद झाला. आज त्यांना भेटल्यानंतर सगळ्यात आधी त्यांच्या पाया पडलो. आज राजकारणात अशी फार कमी लोकं आहेत.” असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रकाशसिंह बादल यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला

.ते पुढे म्हणाले “मी कुठे तोडाफोडी करायला आलो आहे? माझं म्हणणं इतकंच आहे की, समोरच्या राज्याने आम्हाला मान द्यावा, आम्हीही त्यांना योग्य तो मान नक्कीच देऊ. शीख बांधव जिथेही राहिले त्यांनी कधीही कुठे आपला मतदारसंघ निर्माण केलेला नाही. या मातीशी एकरुप व्हा. एवढंच आमचं म्हणणं आहे. मराठी बांधवांनी देखील कधी असं केलं नाही. इतर राज्यातील लोकांनीही तसंच राहावं.” असं म्हणत राज ठाकरेंनी पुन्हा परप्रांतियांच्या मुद्द्याला हात घातला.” ‘इथं जमलेल्या शिख बांधवांना मी मराठीच म्हणतो. आणि पावसाळाच्या तोंडावर महाराष्ट्रात बादल येणं हा योगायोगच म्हणावा लागेल. या निमित्ताने महाराष्ट्रातील दुष्काळ दूर व्हावा हीच इच्छा.’ अशी कोटीही राज ठाकरेंनी केली. घुमान येथे होत पार पडलेल्या साहित्य संमलेनासाठी राज ठाकरे यांनाही निमंत्रण देण्यात आलं होतं. त्यावर बोलताना राज ठाकरेंनी साहित्य-समंलेनातील होणाऱ्या वादांवरही टीप्पणी केली. “आधीच साहित्य संमेलनात वाद-विवाद असतात. पुन्हा मी जाऊन आणखी वाद नको आणि तशीही माझी तब्येत बरी नव्हतीच.. खरोखरच बरी नव्हती बरं का… म्हणून मी ‘गप गुमान’ घरी बसून राहिलो.

महाराष्ट्र आणि पंजाबचं नातं हे संत नामदेवांपासूनचं आहे. इतक्या जुन्या नात्याचा धागा हा दिवसेंदिवस घट्ट होत आहे. घुमान साहित्य संमेलनात पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांनी जी व्यवस्था केली, त्यामुळे महाराष्ट्र-पंजाब आणखी जवळ आला आहे, अशी भावना यावेळी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.याशिवाय देशासाठी मराठे आणि शीखांनी मोठा लढा उभारला होता. या दोन्ही राज्यांचं देशासाठी कार्य अद्वितीय आहे, असंही फडणवीस म्हणाले.

संत नामदेव पुरस्कारासाठी माझी निवड केली, त्यामुळे मी आभारी आहे. आजचा दिवस माझ्यासाठी खूपच भाग्याचा आहे, अशी प्रतिक्रिया पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांनी व्यक्त केली.महाराष्ट्र आणि पंजाबचं प्रेमाचं, जिव्हाळ्याचं नातं आहे. ते आणखी घट्ट झालं आहे. मी महाराष्ट्राकडून खूप काही शिकलो, असं बादल म्हणाले.