Home Blog Page 3597

तीन मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे ‘स्टिंग ऑपरेशन’ – काँग्रेस चे आगामी आकर्षण ….

0

अहमदनगर: पावसाळी अधिवेशनात तीन मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे ‘स्टिंग ऑपरेशन’ उघड करून
भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारचा खरा चेहेरा जनतेसमोर आणण्याचा इशारा विधानसभेतील विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला.काँग्रेस च्या आगामी आकर्षणाने आता काही मंत्री राधाकृश्नांच्या संपर्कात राहतील किंवा येतील काय ? यावर राजकीय खल सुरु झाला आहे, राधाकृष्ण यांनी किमान या आगामी आकर्षणाचा ट्रेलर तरी दाखवायला हवा होता असा तोम्नही मारला जातो आहे .

एका कार्यक्रमासाठी नगर येथे आलेल्या विखे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या कारभारावर कठोर टीका केली.केंद्रात आणि राज्यात भाजपप्रणीत सरकार सत्तेवर आल्यापासून एकाही घोटाळा झाला नसल्याचे सत्ताधारी सतत सांगत आहेत. मात्र प्रत्यक्षात या सरकारांच्या काळात गैरव्यवहारांची मालिकाच सुरू असल्याचा आरोप विखे पाटील यांनी केला. राज्यातील तिघा मंत्र्यांच्या गैरकारभाराचे आपण स्टिंग ऑपरेशन केले आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात त्याद्वारे सत्ताधा-यांच्या कारभाराचे वाभाडे काढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री पंकज मुंडे यांच्यावर झालेल्या २०६ कोटी रुपयांच्या खरेदी गैरव्यवहाराबाबत विखे पाटील म्हणाले की, मुंडे या सध्या परदेशात आहेत. त्यांनी आल्यानंतर याबाबत खुलासा करावा. विरोधीपक्षनेता म्हणून आपणही या प्रकरणाची माहिती मागविली असून त्याचा अभ्यास करून अधिवेशनात भूमिका मांडली जाईल. मात्र या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार अधिका-यांवरही कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज उद्या पुण्यात…

0
पुणे- राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे आजपासून (25 व 26 जून) पुण्यात दोन दिवसीय दौ-यावर येत आहेत. राष्ट्रपती भवनाने मुखर्जी यांच्या दोन दिवसीय दौ-याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार गुरुवारी सायंकाळी 4 वाजता पुणे लोहगाव विमानतळावर मुखर्जींचे आगमन होईल.
 काँग्रेस नेते डॉ. पतंगराव कदम यांच्या पुण्यातील भारती विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या समारंभाला राष्ट्रपती आज सायंकाळी 5 वाजता हजेरी लावतील. शुक्रवारी सकाळी 11 वाजता पुण्यातील बालगंधर्व सभागृहात राष्ट्रपती उद्योजक प्रतापराव पवार यांना पुण्यभूषण पुरस्कार प्रदान करतील. तर शुक्रवारी सायंकाळी 4 वाजता पुण्यातील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या सहाव्या पदवीदान समारंभाला हजेरी लावणार आहेत.

२२५ चित्रपटगृह आणि ३ हजार शोज् -‘किल्ला’ २६ जूनपासून…

0

यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरणारा, बर्लिनसारख्या मानाच्या चित्रपट महोत्सवात पुरस्कार पटकाविणारा, ‘इफ्फी’, ‘मामि’ आणि ‘पिफ’ सारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या भारतीय चित्रपट महोत्सवांमध्ये सर्वांच्या कौतुकास पात्र ठरलेला अविनाश अरूण दिग्दर्शित किल्ला हा चित्रपट येत्या शुक्रवारी २६ जून रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. प्रदर्शनापूर्वीच भाषेच्या आणि राज्याच्या सीमा तोडून सर्व प्रकारच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेला किल्ला आता महाराष्ट्रासहित गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात आणि इतर राज्यांमध्येही प्रदर्शित होणार असून तो तब्बल २२५ चित्रपटगृहे आणि तीन हजार शोज् द्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येतोय हे विशेष. एम. आर. फिल्म्स, जार पिक्चर्स आणि एस्सेल व्हिजन प्रॉडक्शन्सची निर्मिती असलेल्या या चित्रपटात अर्चित देवधर, पार्थ भालेराव, गौरीश गावडे, स्वानंद रायकर आणि अथर्व उपासनी या बालकलाकारांसोबत अमृता सुभाष ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहे.

लहान मुलांच्या तरल भावविश्वाभोवती किल्ला चित्रपटाची गोष्ट फिरते. आईच्या नोकरीतील बदलीमुळे पुण्यातून गुहागरला आलेल्या चिन्मय ऊर्फ चिनूची ही कथा आहे. पुण्यासाऱख्या शहरातून कोकणात आलेल्या चिन्मयला नव्या वातवरणाशी जुळवुन घेणं अवघड जात असतानाच त्याच्या आयुष्यात त्याच्याय वर्गातील चार उनाड मित्र येतात. या मित्रांमुळे चिनूलाही त्याच्यातलाच एक वेगळा पैलू सापडतो. काही दिवसांतच एकमेकांचे चांगले मित्र बनलेल्या या पाचही जणांच्या आय़ुष्यात एक अशी घटना घडते जिथे चिनू या सर्वांपासून तुटुन एकटा पडतो आणि तिथूनच त्याचा स्वतःच्या शोधाचा प्रवास सुरू होतो. उनाड वयाची पायरी ओलांडून जाणत्या वयाचा उंबरठा ओलांडण्याचा त्याचा हा प्रवास त्याला खुप काही शिकवून जातो. या सर्व प्रवासाची कथा म्हणजे किल्ला हा चित्रपट.

कोकणच्या निसर्गसौंदर्याचा नितांत सुंदर अनुभव देणा-या अप्रतिम छायाचित्रणाने नटलेला असा हा किल्ला चित्रपट. साधी सरळ पण मनाला थेट भिडणारी कथा आणि कलाकारांचा तेवढाच संयत अभिनय यामुळे किल्लाने यापूर्वीच अनेक प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. राष्ट्रीय पुरस्कारावर मोहोर उमटवल्यानंतर अनेक प्रेक्षक किल्लाची आतुरतेने वाट बघत होते. ही प्रतीक्षा आता संपली असून शुक्रवारपासून हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे. यावर्षी लोकमान्य एक युगपुरूष आणि टाइमपास २’ सारखे ब्लॉकबस्टर हिट चित्रपट देणा-या एस्सेल व्हिजनच्या माध्यमातून हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

 

 

मालेगाव स्फोटातील कडव्या हिंदुत्ववादी आरोपींना वाचविण्यासाठी भाजपा सरकारकडून विशेष सरकारी वकिलांवर दबाव

0
मुंबई- सीबीआय आणि अन्य यंत्रणा या सरकारच्या ताटाखालचे मांजर बनून राहतात असे आजवर आपण ऐकत आलो पण आता इंडिअन एक्स्प्रेस या दैनिकातील एका बातमीने तर खळबळ उडविली आहे . महाराष्ट्रात 2008 साली नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणातील आरोपींना वाचविण्यासाठी केंद्रातील एनआयए म्हणजे राष्ट्रीय तपास यत्रंणेकडून आपल्यावर दबाव आणला गेल्याचा  गंभीर आरोप या प्रकरणाच्या विशेष सरकारी वकील रोहिणी सॅलियन यांनी केला आहे. असे वृत्त या इंग्रजी दैनिकाने प्रसिध्द केले आहे एनआयए अधिका-याचा सल्ला धु़डकावून लावल्याने रोहिणी सॅलियन यांच्याऐवजी दुस-या वकीलाची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. सॅलिअन 2008 पासून या खटल्यामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून काम बघत होत्या. यावर त्या म्हणाल्या, या प्रकरणी मी महाराष्ट्र सरकारची बाजू मांडावी असे वरिष्ठांना वाटत नाही असा आरोप केला.
‘इंडियन एक्स्प्रेस’ या इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना रोहिणी सॅलियन यांनीच हा गौप्यस्फोट केल्याने मोदी सरकार मालेगाव स्फोटातील कडव्या हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना वाचविण्याचा केविलवाणी प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे.रोहिणी सॅलियन म्हणाल्या, मालेगाव स्फोटातील आरोपींबाबत जरा मवाळ धोरण स्वीकारा असा संदेश आपल्याला राष्ट्रीय तपास यत्रंणाकडून देण्यात आला. मोदी सरकार आल्यानंतरच्या काळानंतर असले प्रकार सुरु झाल्याचेही सलियन यांनी सांगितले.
29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोटात 4 जण ठार झाले होते तर, 79 लोक जखमी झाले होते. या बॉम्बस्फोटानंतर त्याचा तपास करताना राष्ट्रीय तपास यत्रणांच्या हाती धक्कादायक माहिती लागली. हे बॉम्बस्फोट कडव्या हिंदुत्ववादी संघटनानी घडवून आणल्याचे तपासात स्पष्ट झाले. याप्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहित, सुनील जोशी यांच्यासह एकूण 12 जणांना अटक करण्यात आली होती. यातील सुनील जोशीचा मृत्यू झाला आहे तर ठाकूर व पुरोहित अद्याप तुरुंगात खितपत पडले आहेत. यातील आरोपींना विनाकारण गोवण्यात आल्याचे उजव्या विचारसरणीच्या संघटनांचे म्हणणे आहे.
दरम्यान, मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर कर्नल प्रसाद पुरोहित यांनी मोदींनी एक पत्र लिहले होते. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनीही आपण लवकरच जेलबाहेर येऊ असा विश्वास व्यक्त केला आहे. यामागे केंद्रात व राज्यात भाजप सत्तेत असल्याचे कारण दिले जात आहे. आता या आरोपींना सोडवण्यासाठी खुद्द तपास यत्रणांच सरकारी वकिलांवरच दबाव आणत असतील तर चिंतेची बाब आहे.

एसटी बस आणि टँकरची समोरासमोर धडक २० ठार ,२५ प्रवासी जखमी

0

चाळीसगाव – धुळे-चाळीसगाव मार्गावर एसटी बस आणि टँकरची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात २० जण ठार तर २५ प्रवासी गंभीररीत्या जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
धुळे-चाळीसगाव मार्गावरील चिंचगव्हाण फाट्यावर हा अपघात झाला. भरधाव टँकरने एसटी बसला जोरदार धडक दिल्याने बसच्या समोरच्या भागाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला. अपघात एवढा भीषण होता की, २० प्रवासी जागीच ठार झाले. घटनास्थळी सध्या गावकऱ्यांच्या सहाय्याने मदतकार्य सुरू असून सर्व जखमींना चाळीसगाव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

‘ओळख – माय आयडेंटिटी’ संगीत प्रकाशन सोहळ्यात वाढविली उत्सुकता !

0

जमील खान दिग्दर्शित ‘ओळख – माय आयडेंटिटी’ या चित्रपटाची पहिली झलक आणि संगीत प्रकाशन सोहळा नुकताच मुंबईत झाला. या निमित्ताने गाण्यातून आणि चित्रपटाच्या फस्ट लुकमधून ‘ओळख’ची उत्सुकता वाढवण्यात कलावंतांनी यश मिळवले आहे. त्यामुळे चित्रपटाची नेमकी कथा काय याची ‘ओळख’ ३१ जुलैला चित्रपटगृहातच होणार आहे.

लहेर एंटरटेनमेंचा हर्षादीप सासन निर्मित, शीतल राजवीर यांची सहनिर्मिती आणि जमील खान दिग्दर्शित ‘ओळख’ हा मराठी चित्रपट ३१ जुलैपासून प्रदर्शित होत आहे. चित्रपटाच्या फस्ट लूक आणि संगीत प्रकाशन सोहळ्याला अलका कुबल-आठल्ये, भूषण पाटील, खुशबू तावडे, अरुण नलावडे आणि गणेश यादव उपस्थित होते.

गीतकार स्वप्नील महालिंग यांच्या गाण्यांना राजेश, कमल आणि प्रणय प्रधान यांनी संगीत दिले आहे. यावेळी प्रणय म्हणाले की, चित्रपटात एकूण दोन गाणी आहेत ज्यात मी प्रिया मोरा जब से.. हे हिंदी गाणं संगीतबध्द केलं आहे, जे हिंदीचे प्रसिध्द गायक मोहंमद इरफान यांनी गायलं आहे, हे खरंतर भावनिक गाणं आहे, नायिकेची भावना व्यक्त करण्यासाठी आम्हाला एक दर्दभरा आवाज हवा होतो, जो हाय स्केलला देखील गाऊ शकेल म्हणून आम्ही मोहंमद इरफानकडून ते गाणं गाऊन घेतलं.. हे गाणं जरा सुफी स्टाईलचं गाणं आहे.
गीतकार स्वप्नील महालिंग सांगतात की चित्रपटात मी विठ्ठला कोसळले मंदिर आणि एक अंगाई गीत आणि एक तांडव गीत लिहिले आहे, विठ्ठला.. हे गीत मराठी फोक गीत आहे, जे आदर्श शिंदे यांनी गायले आहे, ज्यात नायकाने आयुष्यभर पाहिलेले स्वप्न क्षणार्धात हरवते तेव्हा हे गीत चित्रपटात येते. तांडव जे आहे ते व्यक्तिरेखेने शंकराला आपली भावना व्यक्त करण्यासाठी केलेला पयत्न आहे.

दिग्दर्शक जमील खान चित्रपटाबाबत सांगतात की, आपण जन्माला येतो आणि आयुष्यभर आपली ओळख शोधण्याचा आणि सिध्द करण्याचा प्रयत्न करत असतो, असाच आमचा नायक आपली ओळख तयार करण्याचा संघर्ष करत असतो, ज्यात त्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो तो प्रवास म्हणजेच ओळख माय आयडेंटिटी चित्रपट होय.

अलका कुबल-आठल्ये एका जबाबदार आणि महत्वाकाक्षी आईच्या भूमिकेत दिसणार आहेत. मराठीतला पहिला सिक्स पॅक हिरो म्हणून सध्या चर्चेत असणारा भूषण पाटील या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण करतो आहे, तो सांगतो की खरोखरंख अनेकांचे इथे स्वत:ची ओळख निर्माण करण्याचे स्वप्न असते, परंतु मला पदार्पणातच ओळख निर्माण करुन देणारा ओळख-माय आयडेंटिटी याच नावाचा सिनेमा मिळाला आहे. या चित्रपटासाठी मी पोलिस अकादमीत जाऊन रितसर पोलिस ट्रेनिंग घेतले होते, ज्याचा परिणाम तुम्हाला नक्कीच पडद्यावर दिसेल आणि विशेष बाब म्हणजे मला या चित्रपटासाठी ६ किलो वजन कमी करावे लागले होते.

खुशबू तावडे या चित्रपटात मुख्य नायिका साकारते आहे..ती सांगते की, चित्रपटात काम करण्याचा अनुभव खूप छान होता, माझ्या व्यक्तिरेखेला दोन शेड आहेत त्याबद्दल आत्ताच सांगण्यात काही अर्थ नाही, चित्रपट पहाल तेव्हा तुम्हाला ते लक्षात येईलच.. ३१ जुलैपासून संपुर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

पहिल्याच पावसात रस्त्यांवर खड्डे ? ठेकेदाराना दंड करा .. मनसे

0

पुणे- पहिल्याच पावसात पुणे शहरातील रस्त्यांची प्रचंड वाताहत झाली असून यास जबाबदार असणाऱ्या ठेकेदारा कडून दंड आकारण्यात यावा व त्यांच्याच कडून रस्ते पूर्ववत करुण घ्यावा अशी मागणी मनसे पर्यावरण विभागा तर्फे पथप्रमुख श्री विकेक खरवडकर यांना पत्रा व्दारे केली .
गेल्या सहा महिन्यात ड्रेनेज लाईन , पावसाळी लाईन , केबल इत्यादि कामा साठी खोदकाम केलेले रस्ते पूर्ववत न करता निकृष्ट पध्दतीने काम केले आहे त्यामुळे रस्ता खचण्याचे अनेक प्रकार समोर येत आहे.म्हणून
याला जबाबदार असणाऱ्या ठेकेदारांना दंड आकरण्यात अशी मनसे तर्फे मागणी केली आहे.
यावेळी मनसे पर्यावरण विभागाचे अध्यक्ष श्री संजय भोसले, वसंत खुटवड ,सीताराम तोंडे पाटील , रवि सहाणे , नितिन जगताप ,गणेश धुमाळ ,तेजस साठये ,दुर्गादास रामावत आदी उपस्थित होते.

पंकजा मुंडे यांच्या खात्यात २१० कोटीचा गैरप्रकार ?

0

मुंबई- विशिष्ट लोकांना टेंडर देण्यासाठी राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या खात्याने गैरप्रकार करवून सुमारे २१० कोटीची खरेदी केल्याचा आरोप आता होतो आहे
राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या खात्याने एकाच दिवसात २४ आदेश काढून सर्व नियम धाब्यावर बसवत २०६ कोटींची चिक्की, डिशेस, चटई आणि पुस्तकं खरेदी केल्याचा आरोप काँग्रेसने केला असून याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडेही तक्रार करण्यात आली आहे. दरम्यान, पंकजा यांनी मात्र सर्व आरोप फेटाळले आहेत.
अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजुश्री गुंड यांनी १५ जून रोजी महिला व बालकल्याण मंत्रालयाला एक पत्र लिहून ‘आदिवासी विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या चिक्कीत माती आहे. ती खाण्यालायक नाही. याप्रकरणी योग्य ती कारवाई व्हावी’, अशी मागणी केली होती. त्यानंतर याप्रकरणी अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले असता चौकशीतून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. ‘द न्यू इंडियन एक्प्रेस’ या इंग्रजी दैनिकाच्या वृत्तानुसार, ३ लाखांपेक्षा जास्त किंमतीचे साहित्य खरेदी करायचे असल्यास ई-निविदा काढणे आवश्यक असतानाही हा नियम पायदळी तुडवून कोणत्याही निविदेशिवाय एका दिवसात २०६ कोटींची खरेदी करण्यात आली.
१३ फेब्रुवारी या एकाच दिवसात ही खरेदी करण्यात आली आहे. त्यासाठी पंकजा यांच्या मंत्रालयाने तब्बल २४ आदेश दिवसभरात काढले. तशी नोंदच राज्य शासनाच्या रेकॉर्डला आहे. ३७ कोटींचं चिक्की पुरवण्याचं कंत्राट मागणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सूर्यकांता सहकारी महिला संस्थेला तब्बल ८० कोटींचं कंत्राट देण्यात आलं. हा खर्च ३ लाखांपेक्षा मोठा असल्याने केंद्रीय खरेदी आयुक्त राधिका रस्तोगी यांनी ई-निविदा काढण्याचा निर्णय घेतला होता मात्र त्यात पंकजा यांनी हस्तक्षेप करून हे कंत्राट सूर्यकांता महिला संस्थेला दिलं. विशेष म्हणजे या संस्थेकडे चिक्की बनवण्यासाठी स्वत:चा कोणताही प्रकल्प नसतानाही या संस्थेवर महेरबानी दाखवण्यात आल्याचा दावा या दैनिकाने केला आहे.
नवी मुंबईतील जगतगुरु प्रिंटिंग प्रेसकडून ५ कोटी ६० लाखांची वह्यापुस्तकांची खरेदी करताना या रक्कमेचा धनादेश प्रेसच्या नावे न काढता प्रेसचे मालक भानुदास टेकवडे यांच्या नावाने काढण्यात आला. नाशिकच्या एव्हरेस्ट कंपनीकडून करण्यात आलेल्या वॉटर फिल्टर्सच्या खरेदीतही अशीच मेहेरबानी करण्यात आली. फिल्टरची किंमत ४ हजार ५०० रुपये असताना त्यासाठी ५ हजार २०० रुपये मोजण्यात आले. ही कंपनीही स्वत: फिल्टरचं उत्पादन करत नाही. याशिवाय कुपोषित मुलांचं मॉनिटरिंग करणाऱ्या मशिन्स खरेदी करण्याचं २४ कोटींचं कंत्राट निविदेविना साई हायटेक आणि नितीराज इंजिनिअर्स या उत्तर महाराष्ट्रातील कंपन्यांना देण्यात आलं. औषधांच्या एका किटसाठी ५०० रुपयाची तरतूद आहे, पण कंत्राटदाराने ७२० रुपये किंमत लावली. ही बाब उघड होऊ नये म्हणून किटमधील औषधांची संख्या कमी करण्याची शक्कल पंकजा यांच्या खात्यानं चालवल्याचंही समोर आलं आहे.
या संपूर्ण प्रकरणाची काँग्रेसने कागदपत्रांनीशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे तर काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते अजय माकन यांनी न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे. याप्रकरणात आणखी कोणी मंत्री आहे का? याचाही तपास व्हायला हवा, असे माकन म्हणाले.दरम्यान, पंकजा मुंडे यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. ही संपूर्ण खरेदी केंद्र सरकारच्या नियामानुसारच झालेली आहे. अधिकृत दर उपलब्ध असल्याने ई-निविदा काढण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता शिवाय ही कंत्राटे मान्यताप्राप्त संस्थांनाच दिली गेली आहेत, असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केल्याचे वृत्त आहे

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कथित बनावट पदवी विरोधात न्यायालयाने याचिका स्वीकारली

0
न वी दिल्ली-केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या कथित बनावट पदवी विरोधातली याचिका पटियाळा हाऊस कोर्टाने स्विकारली आहे. स्मृती इराणी यांच्याविरोधात दाखल झालेली याचिका दाखल करण्याजोगी असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. या याचिकेवर पुढील सुनावणी 28 ऑगस्टला होणार आहे.
स्मृती इराणी यांच्याविरुद्ध अहमर खान यांनी कोर्टात याचिका दाखल केली. इराणी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला चुकीची माहिती दिल्याचा आरोप अहमर खान यांनी केला आहे.खान यांचे वकिलांनी कोर्टात सांगितले की, स्मृती इराणी यांनी राज्यसभा आणि लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करताना सादर केलेल्या शपथपत्रात शैक्षणिक पात्रतेबाबत वेगवेगळी माहिती दिली आहे.
यामुळे कॉंग्रेसला भाजपवर टीका करर्‍याची आयती संधी मिळाली आहे. या संधीचा फायदा घेत कॉंग्रेसचे प्रवक्ते अजय माकन यांनी बोगस पदवीप्रकरणी स्मृती इराणी यांनी आपल्या केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.

सन 2004 च्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करताना 1996 मध्ये दिल्ली विद्यापीठाची बीएची पदवी सादर केली होती. तर 2011 च्या निवडणुकीच्या शपथपत्रात बीकॉम प्रथम वर्ष अशी शैक्षणिक पात्रता नमूद केली आहे. एवढेच नव्हे तर गेल्या लोकसभा निवडणुकीत बीकॉम प्रथम वर्ष हे ओपन स्कूलमधून केल्याचे म्हटले आहे.

साहित्य – गणवेश याचे वाटप २ जुलै पर्यंत – शिवाजीराव दौंडकर यांची ग्वाही.

0
पुणे-शाळा सुरु होऊन १० दिवस झाले तरी पुणे मनपा शिक्षण मंडळा तर्फे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप झाले नव्हते,याबाबत आंदोलन उभारण्याचा इशारा भाजप चे शहर सरचिटणीस संदीप खर्डेकर,शिक्षण मंडळ सदस्य रघुनाथ गौडा,सौ.मंजुश्री खर्डेकर,किरण कांबळे,यांनी दिला होता.आज याबाबत शिक्षण मंडळाचे प्रशासकीय अधिकारी शिवाजीराव दौंडकर यांच्याशी संदीप खर्डेकर व रघुनाथ गौडा यांनी संपर्क साधला असता-बूट,वह्या,दप्तर,चित्रकला साहित्य व एक गणवेश यांची खरेदी प्रक्रिया पूर्ण झाली असून २ जुलै पर्यंत त्याचे वाटप पूर्ण होईल असे त्यांनी स्पष्ट केले.तसेच उर्वरित दुसरा गणवेश ही लवकरात लवकर देण्यात येईल असे ही ते म्हणाले.(प्रत्येक विद्यार्थ्यास दोन गणवेश दिले जातात)
प्रशासनाने आश्वासन पाळले नाही तर भाजप आंदोलन उभारेल असे  भाजप चे शहर सरचिटणीस संदीप खर्डेकर,शिक्षण मंडळ सदस्य रघुनाथ गौडा,सौ.मंजुश्री खर्डेकर,किरण कांबळे,यांनी स्पष्ट केले आहे.

भिडे पुलाजवळील नदी पात्रातील जॉगिंग ट्रॅकचे काम थांबवा : खासदार वंदना चव्हाण

0

 

पुणे :
भिडे पुलाजवळील नदी पात्रातील जॉगिंग ट्रॅकचे काम थांबवावे अशी मागणी करणारे पत्र खासदार ऍड.वंदना चव्हाण यांनी आज महापौर दत्तात्रय धनकवडे आणि पुणे महानगरपालिका आयुक्त कुणाल कुमार दिले.

“नदीपात्रात नदीची वहनक्षमता कमी होईल असे कोणत्याही स्वरूपाचे पक्के बांधकाम करण्यास राष्ट्रीय हरित लवादाने पुर्णत: मनाई केली आहे. असे असताना महानगरपालिकेने हे जॉगिंग ट्रॅकचे बांधकाम करणे पुर्णत: अवैध आहे.’ असे या पत्रात नमुद करण्यात आले आहे. हे जॉगिंग ट्रॅकचे बांधकाम करण्यासाठी संबंधित खात्याची महापालिकाने परवानगी घेतली आहे का? याबाबत खुलासा देण्याची मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.

“सध्या तेथे सुरू असलेले काम तत्काळ थांबवावे, अन्यथा महापालिकेच्या विरोधात राष्ट्रीय हरित लवादाकडे याबाबत दाद मागण्यात येणार’ असल्याचेही त्यात म्हणले आहेे.

कवी बादशहा सय्यद श्रमिक साहित्यिक पुरस्काराने सन्मानित

0

पुणे- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेड वतीने श्रमिक साहित्यिक कवी बादशहा सय्यद यांचा सन्मानचिन्ह , अकरा हजार रोख , शाल आणि पुष्पगुछ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे अध्यक्ष व खासदार रामदास आठवले यांच्या हस्ते दलित चळवळीतील ” श्रमिक साहित्यिक पुरस्कार ” देण्यात  आला . सातारा रोड वरील अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवनमध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडला . यावेळी रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेड अध्यक्ष महेश शिंदे , रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पुणे शहर अध्यक्ष महेंद्र कांबळे , झुबेर शेख , माजी नगरसेवक नवनाथ कांबळे , एम. डी. शेवाळे , परशुराम वाडेकर , अशोक शिरोळे , बाळासाहेब जानराव , आदिल सय्यद , रफिक दफेदार , झुबेर शेख , हनुमंत साठे, फैय्याज शेख लतिका साठे , सुन्नाबी शेख  आदी मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते .

साहित्यिक कवी बादशहा सय्यद हे आंबेडकर चळवळीत गेली तीस वर्षापासून काम करीत आहे , दलित चळवळीत दलित पेन्थर पासून काम करीत आहे . दलित रंगभूमी , बुकोई , वतन सुरक्षा , रिक्षा युनियन , सामाजिक संस्थेवर त्यांनी भरीव कार्य केले आहे . सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न , अभ्यासू वृतीने त्यांनी सोडविले आहेत . त्यांनी सुचल्या कविता संग्रह प्रकाशित केला आहे तसेच , सावधान राजकारण चालू आहे आणि घटना बचाव आदी पुस्तकांचे त्यांनी लिखाण केले आहे .

सुर्यदत्ता इन्स्टिट्यूटतर्फे प्रथमच वास्तूविशारद आणि रचना (डिझाईन) प्राथमिक पदविका अभ्यासक्रम

0

(Foundation Diploma in Architecture & Design)

पुणे -वास्तुविशारद क्षेत्रात आपले भवितव्य घडवू इच्छिणारया विद्यार्थ्यांसाठी सुर्यदत्ता

ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे प्रथमच वास्तूविशारद आणि रचना क्षेत्रातील प्राथमिक पदविका

अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे. अशी माहिती

सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडीया यांनीयेथे दिली

ते म्हणाले , या क्षेत्रातील पदवी अभ्यासक्रमाला सामोरे जाण्यापूर्वी

विद्यार्थ्यांना या विषयाची तोंड ओळख व्हावी, या उद्देशाने हा विशेष अभ्यासक्रम सुरु होत

असून दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी पात्र ठरू शकतात. या

अभ्यासक्रमातील महत्वाची बाब म्हणजे, हा अभ्यासक्रम ११ वी १२ च्या अभ्यासक्रमाशी समांतर

आहे.

या अभ्यासक्रमातील विषयांची रचना विशिष्ट पद्धतीने करण्यात आली आहे. यातील अर्धे विषय

हे ११ व १२ च्या विज्ञान शाखेतील (cbsc pattern) विषयांवर तर उर्वरित विषय वास्तूविशारद

आणि रचना क्षेत्रावर आधारित आहे. यामुळे कोणत्याही शाखेच्या पदवीसाठी आवश्यक असणाऱ्या

प्रवेशिका परीक्षेच्या तयारीसाठी हा पदविका अभ्यासक्रम लाभदायी ठरेल यात शंका नाही.

सद्य: असलेला ११ वी १२चा अभ्यासक्रम आणि वास्तुविशारद क्षेत्रातील पदवीसाठी घेतली

जाणारी प्रवेशिका परीक्षा यातील अभ्यासक्रम एकमेकांशी सबंधित नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना

प्रवेशिका उत्तीर्ण होणे अवघड जाते. या परीक्षेत अपयश आल्याने अनेक विद्यार्थ्यांना आवड

असूनही या क्षेत्रापासून वंचित राहावे  लागते. विद्यार्थ्यांचे होणारे हे नुकसान टाळण्यासाठी हा

विशेष पदविका अभ्यासक्रम सुरु होत असून ही पदविका प्राप्त केलेल्या विद्यार्थ्याना पुढील

पदवीचा मार्ग नक्कीच सुकर होईल, अशी खात्री आहे.

हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांस कोणत्याही नावाजलेल्या कला महाविद्यालायात

सहजरित्या प्रवेश मिळू शकतो. तसेच वास्तूविशारद क्षेत्राशी निगडित पदवी अभ्यासक्रम उदा.

इंटेरियर डिझाईन, प्रोडक्ट डिझाईन, फर्निचर डिझाईन, सेट डिझाईन, इंडस्ट्रीयल डिझाईन इ.

डिझाईन क्षेत्रातील पदवी अभ्यासक्रमासही प्रवेश घेता येवू शकतो. हे अभ्यासक्रम आयआयटी

(इंडीयन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी) कॅम्पस येथेही सुरु आहेत.

पदविका अभ्यासक्रमाचे आणखी एका वैशिष्ट्य म्हणजे येथे आखीव अभ्यासक्रमाबरोबरच विशेष

शिबिरेही विद्यार्थ्यासाठी घेतली जाणार आहेत. वास्तूविशारद, कला आणि डिझाईन क्षेत्रात

आपल्या आवडीनुसार शाखा निवडायची संधी या पदविकेमुळे विद्यार्थ्यांना प्राप्त होणार आहे.

त्यामुळे या क्षेत्रात करीयर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम नक्कीच फलदायी

ठरेल.

शिक्षण मंडळाच्या अाजी-माजी अध्यक्षांना २ दिवसांची पोलीस कोठडी

0

पुणे-नगर जिल्ह्यातील शिक्षकाकडून पुण्यात बदलीच्या कामासाठी  दहा लाख रुपयांची लाच स्विकारल्याप्रकरणी  पुणे शिक्षण मंडळाचे अध्यक्ष प्रदीप ऊर्फ बाबा धुमाळ तसेच माजी अध्यक्ष रवी चौधरी तब्बल आठ दिवसांनी बुधवारी लाचलुचपत प्रतिबंध विभागापुढे शरण आले.  बुधवारी सायंकाळी त्यांना शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना  दोन दिवसांच्या पोलीस कोठडीचे आदेश सुनावण्यात आले.एसीबीने दिलेल्या माहितीनुसारगुरूवारी (18 मे) अहमदनगर जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकाला पुण्याच्या शिक्षण मंडळ शाळेमध्ये बदली देण्यासाठी आरोपींनी तीन लाख रुपयांची लाच मागितली होती. याप्रकरणी पुणे महापालिका शिक्षण मंडळाचे अध्यक्ष प्रदीप ऊर्फ बाबा धुमाळ, माजी अध्यक्ष रवींद्र चौधरी यांच्यासह लिपीक आणि मध्यस्थावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेनंतर आरोपी संतोष मेमाणे (लिपीक) आणि भाऊसाहेब बाबासाहेब भापकर (मध्यस्त) यांना अटक करण्यात आली होती. तर प्रदीप ऊर्फ बाबा धुमाळ (अध्यक्ष), रवींद्र चौधरी (माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य) हे फरारी झाले होते.अहमदनगर जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये नोकरी करणार्‍या एका शिक्षकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. या शिक्षकाची पत्नी पुणे शिक्षण मंडळाच्या शाळेमध्ये शिक्षिका आहे. त्यामुळे या शिक्षकाने पुण्यामध्ये बदली मागितली होती. नगर जिल्हा परिषदेने त्याला मान्यता दिली होती. पुणे शिक्षण मंडळाची त्याला अनुमती आवश्यक होती. या शिक्षकाला हजर करुन घेण्यासाठी लेखी ऑर्डर देण्यासाठी धुमाळ, चौधरी आणि मेमाणे यांनी तीन लाख रुपयांची लाच मागितली होती. यातील एक लाख रुपये वर्षभरापुर्वी त्यांनी दिलेले होते. उर्वरीत दोन लाख रुपये देण्यासाठी या सर्वांनी शिक्षकाच्या मागे तगादा लावला होता. दोन लाख रुपयांची रक्कम रोख द्या आणि ऑर्डर घेऊन जा असे त्यांना सांगण्यात आले होते.

एल. बी. टी. विरोधात पुणे कॅम्प मर्चंट असोंसिएशनने पुकारलेला बंद यशस्वी

0

पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाच्या भागात लागू झालेल्या एल. बी. टी.विरोधात  पुणे कॅम्प मर्चंट असोंसिएशनने विरोध होता .  एल. बी. टी.च्या विरोधात बंद आंदोलन  व्यापाऱ्यांनी यशस्वी केला .

 पुणे कॅम्प मर्चंट असोंसिएशनने सर्व व्यापाऱ्यांची एल. बी. टी. बाबत पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव कुमार यांना निवेदन दिले .   दि फेडरेशन ऑफ ट्रेड असोंसिएशनस ऑफ पुणे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल , सुर्यकांत पाठक  , सचिव महेद्न पितळीया , पुणे कॅम्प मर्चंट असोंसिएशनचे अध्यक्ष आनंद कोच्चर , उपाध्यक्ष पराग शहा , जयंत शेटे , अरविंद बुधानी , कावस पंडोल , किशोर संघवी , मनोज सेठी , संजीव फडतरे , विजय ओसवाल , महेंद्र चावला , गिरीश पटेल , अमित व्होरा , सागर शहा , राहुल काळे , मनेश मेहता , बोमन भरुचा , सुनील आठवानी , रोहन खंबाटा , प्रकाश ओसवाल , राहुल रांका व मोठ्या संख्येने व्यापारी बांधव उपस्थित होते .

  पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाच्या भागात लागू झालेल्या एल. बी. टी. विरोधात सर्व व्यापाऱ्यांनी एकजुटीने विरोध दर्शविन्यासाठी आपले व्यवसाय बंद ठेवण्यात आले होते . सायंकाळी भोपळे चौकातील राजस्थान भवन मध्ये सर्व व्यापारी बांधवांची बैठक पार पडली .