Home Blog Page 3595

महावितरणचे मुख्य अभियंता श्री. निळकंठ वाडेकर सेवानिवृत्त

0

unnamed
पुणे : पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. निळकंठ वाडेकर मंगळवारी (ता. 30) महावितरण

कंपनीमधून सेवानिवृत्त झाले. परिमंडलातील अभियंता, अधिकारी व कामगार संघटनांच्या वतीने त्यांना भावपूर्ण

तत्कालिन विद्युत मंडळ व सध्याच्या महावितरण कंपनीत श्री. निळकंठ वाडेकर यांनी 34

वर्ष सेवा दिली आहे. पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता म्हणून ते ऑगस्ट 2013 पासून

कार्यरत होते. या कार्यकाळात त्यांनी भरीव योगदान दिले आहे. पुणे परिमंडलाचा मासिक

महसूल त्यांच्या कार्यकाळात सुमारे 12 टक्क्यांनी वाढला आहे. देयकांच्या वसुलीचे प्रमाण

दरमहा 100 टक्क्यांपेक्षा अधिक राहिले आहे. सद्यस्थितीत पुणे परिमंडलाची वीजहानी 9

टक्के दरम्यान असून ती राज्यात इतर परिमंडलांच्या तुलनेत सर्वात कमी आहे, हे

पारदर्शी प्रशासनासाठी आग्रही श्री. वाडेकर यांनी महावितरणच्या ग्राहकसेवेत अनेक बदल घडवून आणले आहे.

ग्राहकांना वीजविषयक सर्व सेवा तात्काळ व तत्पर मिळण्यासाठी महावितरण अंतर्गत विविध सुधारणा केलेल्या आहेत.

नवीन वीजजोडणीमध्ये अडथळे आल्यास मुख्य अभियंत्यांपर्यत थेट तक्रार करण्याची सेवा त्यांनी उपलब्ध करून दिली

होती. सोबतच वीजविषयक तक्रारी थेट कार्यकारी अभियंता यांच्याकडे मांडण्यासाठी दरमहा ग्राहक तक्रार निवारण

दिनाचे आयोजन त्यांनी लोकाभिमुख केले. इन्फ्रा योजनेच्या टप्पा दोनमध्ये 964 कोटींच्या प्रस्तावित कामांसाठी पुणे व

पिंपरी चिंचवड शहरातील खोदाई शुल्काचा तिढा त्यांनी समन्वय साधून मार्गी लावण्यास पुढाकार घेतला होता. यात

पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेने महावितरणच्या विनंतीनुसार 2300 रुपये प्रतीमीटर खोदाई शुल्क मंजूर केल्याने

इन्फ्रा दोनच्या अंमलबजावणीला सुरवात झाली आहे. अभ्यासू व लोकाभिमुख प्रशासनासाठी श्री. निळकंठ वाडेकर

यांचा नावलौकीक आहे. महावितरणचे मुख्यालय, भांडुप, पेण आदी ठिकाणी सेवा दिल्यानंतर मंगळवारी (ता. 30) श्री.

निळकंठ वाडेकर पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता म्हणून सेवानिवृत्त झाले.

चिरतरुण आशा भोसले यांनी गायली ‘गुरुकुल’ ची लावणी

0

आगामी मराठी चित्रपट ‘गुरुकुल’ मध्ये आशाताइंच्या आवाजात एक झकास लावणी ऐकायला मिळणार

आहे. फार कालावधी नंतर आशाताइंच्या आवाजात एक अप्रतिम ठसकेबाज लावणी ऐकायला मिळणार

आहे. चिरतरुण गायक असलेल्या आशाताई यांच्या आवाजात फार दिवासांनी मराठी प्रेक्षकांना मोठी

पर्वणी मिळणार असल्याची भावना लेखक दिग्दर्शक रोमिल रोड्रीग्स यांनी व्यक्त केली.

एवढेच नव्हे तर ‘गुरुकुल’ साठी इतर गाणी सुद्धा दिग्गज गायक सुरेश वाडकर यांच्या सोबत सचिन

पिळगावकर तसेच डॉक्टर नेहा राजपाल यांनी गायली आहेत. गाणी प्रशांत इंगोले यांनी लिहिली असून

संजय राज गौरीनंदन यांनी संगीत दिले आहे.

नागेश भोसले यांना एका आगळ्या वेगळ्या लुक मध्ये पाहण्याची संधी गुरुकुल’ निमित्ताने प्रेक्षकांना

मिळणार असून विद्याधर जोशी असल्याने दोघांच्या अभिनयाची जुगलबंदी अनुभवायला मिळेल.

तसेच सोबत प्रशांत मोहिते, प्रदीप कुंवर, स्वप्नील जोशी, सोनाली शेवाळे, नेहा खान, रींना, आसीत

रेडीज , उमेश बोळके, अनिल सुतार यांचाही महत्व पूर्ण भूमिका या चित्रपटात आहे. प्रीती सदाफुले

हिने लावणीवर आपली अदाकारी पेश केली आहे.

अनिल काबरा सदर चित्रपट वितरीत करीत असून ‘अ नट्स एन बोल्ट्स प्रोडक्षंस’ निर्मित ‘गुरुकुल’ हा

चित्रपट येत्या ७ ऑगस्ट २०१५ रोजी सर्व महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

4

९० वाहने पेटविली -संशयीत पोलिसांच्या ताब्यात

0

पुणे – सिंहगड रस्ता येथील सनसिटी आणि नऱ्हे परिसरात रविवारी पहाटे 84 दुचाकी आणि सहा मोटारींना आग लावल्याप्रकरणी पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले आहे. सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या व्यक्‍तीशी संशयिताचे वर्णन मिळते-जुळते असून, त्याच्याकडे कसून चौकशी सुरू असल्याची माहिती सह पोलिस आयुक्त सुनील रामानंद यांनी सोमवारी दिली.
विनोद शिवाजी जामदारे (वय 27, रा. जाधवनगर, वडगाव बुद्रुक) असे त्या संशयिताचे नाव आहे. सीसीटीव्हीमधील व्यक्‍ती आणि संशयितामध्ये साधर्म्य आहे. ती व्यक्‍ती आणि जामदारे या दोघांनीही टी-शर्ट आणि जीन्स पॅंट परिधान केले असून, पोलिसांचा त्याच्यावर दाट संशय आहे; परंतु त्यानेच वाहनांना आग लावल्याचा पुरावा पोलिसांना अद्याप मिळाला नसल्याचे रामानंद यांनी स्पष्ट केले. वाहनांना आग लावणारी व्यक्‍ती ही विकृत मनोवृत्तीची माथेफिरू आहे की गुन्हेगार, हे स्पष्ट झाले नाही. जामदारे हा सिंहगड रस्ता परिसरातील सराईत गुंड बंट्या पवार याच्या टोळीतील असून, त्यालाही पोलिसांनी खंडणीच्या गुन्ह्यात ताब्यात घेतले आहे. जामदारे याने रविवारी नीलेश अमृत चव्हाण (वय 45, रा. समर्थनगर, हिंगणे खुर्द) याचा खून केल्याचा संशय आहे. या गुन्ह्यात त्याला अटक केली आहे. तो रविवारी पहाटे कोठे होता, यासह इतर बाबी तपासण्यात येत आहेत. या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी पोलिस आयुक्‍त के. के. पाठक आणि रामानंद यांनी विशेष पथके तयार केली आहेत. त्या दृष्टीने सराईत गुन्हेगारांची चौकशी करण्यात येत आहे. शहर पोलिसांनी रात्री गस्तीवर असताना काही तडीपार आणि फरारी गुन्हेगारांना अटक केली आहे. शहरातील काही उच्चभ्रू गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये सुरक्षारक्षक नाहीत. तेथील अंतर्गत सुरक्षा ही सुरक्षारक्षकांवर अवलंबून असून, बाहेरील सुरक्षेची जबाबदारी पोलिसांची आहे. सुरक्षारक्षक नेमण्याबाबत सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांना वेळोवेळी सूचना दिल्या आहेत; परंतु, त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.

तीन दिवसात तीन कोटींचा ‘किल्ला’ सर

0

 

 

राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केलेले आशयघन चित्रपट समीक्षकांच्या पसंतीस उतरतात मात्र सामान्य प्रेक्षकांचा त्या चित्रपटांना हवा तसा प्रतिसाद मिळत नाही आणि हे चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या अपयशी ठरतात असा एक समज आपल्याकडे प्रचलित झाला आहे. यामध्ये काही अंशी तथ्य असलं तरी आता मात्र हे चित्र बदलायला सुरुवात झाली आहे आणि याचं उत्तम उदाहरण ठरला आहे ‘किल्ला’ हा चित्रपट. या शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या किल्लाने सर्वत्र हाऊसफुल्लचे बोर्ड दिमाखात झळकवत पहिल्या तीन दिवसात कोटींची उड्डाणे घेत तीन कोटी पंचवीस लाख एवढी कमाई केली आहे. चित्रपटात स्टार पॉवर असलेले कलाकार नसताना, मनोरंजनाचा नेहमीचा मसाला नसतांना, सशक्त कथा आणि तेवढ्याच जबरदस्त अभिनयाच्या जोरावर ‘किल्ला’ ने हे यश मिळवलंय. पहिल्या आठवड्यात २२५ चित्रपटगृहे आणि तीन हजार शोज् द्वारे प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या ‘किल्ला’च्या शोज् मध्ये प्रेक्षकांच्या मागणीतून वाढ झाली आहे. विशेष म्हणजे मुंबई – पुण्यासह कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक, लातूर, नागपूर मध्येही ‘किल्ला’ला असाच तुफान प्रतिसाद मिळत आहे.

मराठी चित्रपट आणि आशयघनता हे एक समीकरणच बनलेलं आहे. कथेचा सशक्तपणा हे मराठी चित्रपटांचं वैशिष्ट्य आणि ‘किल्ला’ तर दमदार कथेसोबतच प्रेक्षकांना अप्रतिम दृश्यानुभव देतोय. निसर्गरम्य कोकणाला आपल्या सुंदर छायाचित्रणातून अधिक देखणं बनवलंय ते छायालेखक आणि दिग्दर्शक अविनाश अरूणने. लहान मुलांचं भावविश्व अतिशय संयतपणे चितारण्याचं काम त्याने या चित्रपटातून केलं आणि त्या विश्वात प्रेक्षकांनाही अलगदपणे नेलं. आज ‘किल्ला’ ला मिळणा-या प्रतिसादावरून त्याची प्रचिती येतच आहे. विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये मानाचे पुरस्कार पटकावित असतानाच किल्ला’ने राष्ट्रीय पुरस्कारावरही मोहोर उमटवली. हे यश मिळत असतानाच प्रेक्षकांच्या पसंतीचा पुरस्कार किल्लाला मिळेल का असा प्रश्न अनेकांच्या मनात होता आणि या शुक्रवारी त्याचं उत्तर थिएटरबाहेर लागलेल्या लांब रांगा आणि दिमाखात झळकणा-या हाऊसफुल्लच्या बोर्डमधून रसिकांनीच दिलं. पहिल्या तीन दिवसात तीन कोटी २५ लाख एवढी घसघशीत कमाई या चित्रपटाने केली.

‘किल्ला’च्या कथेबद्दल, यातील बालकलाकारांच्या अभिनयाबद्दल अनेक जाणकार समीक्षकही भरभरून बोलत आहेत. हिंदी चित्रपटांतील लोकप्रिय कलाकारही किल्ला बघून भारावून गेलेत याचं मोठं उदाहरण म्हणजे सोशल नेटवर्कवरून किल्लाच्या आलेल्या प्रतिक्रिया. ट्वीटरवर तर किल्ला ट्रेडींग मध्ये टॉपवर होता. अशा प्रकारे ट्वीटर वर ट्रेंड होणाराही किल्ला हा पहिलाच मराठी चित्रपट असावा. या चित्रपटाने बॉलीवूडमध्येही जबरदस्त खळबळ माजवलीय. रितेश देशमुख, विद्या बालन, सिद्धार्थ रॉय कपूर, अनुराग कश्यप, अमोल गुप्ते, स्वानंद किरकिरे, अतुल कुलकर्णी, राजकुमार यादव या आणि अतर अनेक कलावंतांनी फेसबुक, ट्वीटरवर या चित्रपटाबद्दल आपल्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत.

‘किल्ला’ ला मिळालेल्या या यशाबद्दल या चित्रपटाची सहनिर्मिती आणि वितरण करणारे एस्सेल व्हिजनचे बिझनेस हेड निखिल साने म्हणाले की ,“‘किल्ला’ चं यश हे अनेक दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. किल्लाच्या यशाला ‘टाइमपास’ किंवा ‘लय भारी’ या चित्रपटांच्या यशाबरोबर तुलना करणं चुकीचं ठरेल कारण या चित्रपटाची जातकुळी पूर्णपणे वेगळी आहे. यात अमृता सुभाष वगळता इतर कुणीही लोकप्रिय कलाकार नाहीये शिवाय इतर सर्व बाल कलाकार आहेत. त्यामुळे मराठीमध्ये विनोदीपटांना, प्रेमकथांना किंवा अॅक्शन चित्रपटांना मिळणारा प्रेक्षकवर्ग किल्लाकडे वळेल का हा एक प्रश्न होता. या चित्रपटात विनोद आहे पण तो रूढार्थाने विनोदी नाहीये.. प्रेमाची गोष्ट आहे पण ती आई – मुलाच्या नात्याची आहे, मैत्रीची आहे. हा चित्रपट बघताना आपण नकळतपणे आपल्या भूतकाळात हरवून जाऊ आणि तोच या चित्रपटाचा युएसपी ठरेल याबद्दल मनात खात्री होती. मराठी चित्रपटाच्या कक्षा रूंदावतायत असं आपण नेहमी म्हणतो पण ‘किल्ला’मुळे आपला चित्रपट आणि प्रेक्षक हा अधिक प्रगल्भ झालाय असं म्हणता येईल. चित्रभाषेचा एवढा अप्रतिम वापर असणारा हा मराठीतील बहुधा पहिलाच चित्रपट असावा आणि त्याला मिळणारा हा प्रतिसाद हे मराठी चित्रपटक्षेत्रासाठी सकारात्मक चित्र आहे असं मी मानतो. हे यश जेवढं चित्रपटाच्या टीमचं आहे तेवढंच प्रेक्षकांचंही आहे.”

समाजाच्या हितासाठी काम करावे : चंद्रकांत पाटील ; डीएसके सेल्फ मेड मॅन प्रदीप लोखंडे यांना प्रदान

0

 

 

पुणे 1 3 :- यशस्वी होण्यासाठी तुमची पार्श्वभूमी आणि शिक्षणाबरोबरच तुम्ही आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी किती चिकाटीने प्रयत्न करता यालाही तेवढेच महत्त्व आहे.  डीएसके आणि प्रदीप लोखंडे हे अशाच काही उदहरणांपैकीच आहेत. आपल्या गरजा पूर्ण झाल्या नंतर राहिलेल्या पैशातून समाजाच्या हितासाठी काहीतरी करण्याचे ठरवले पाहिजे, आपल्या यशाबरोबर आपण समाजाचे देणे लागतो ही ह्या भूमिकेतूनच जगले पाहिजे, असे मत सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

 

डी. एस. कुलकर्णी यांच्या ६५व्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात ‘डीएसके सेल्फ मेड मॅन २०१५’ प्रदान सोहळ्यात ते बोलत होते.  रुरल रिलेशन्सचे संस्थापक संचालक श्री. प्रदीप लोखंडे यांना श्री. सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी डीएसके समूहाचे अध्यक्ष  डी. एस. कुलकर्णी, हेमंती कुलकर्णी, नेस वाडिया कॉलेज चे माजी प्राचार्य वसंत नूलकर, जलसंपदा राज्यमंत्री विजय बापू शिवतारे,आमदार मेधा कुलकर्णी तसेच  डी. एस.कुलकर्णी फाउंडेशनचे विश्वस्त असीम सरोदेविवेक वेलणकर, श्याम भुर्के, प्रमोद अडकर,अ. ल. देशमुख आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 

यावेळी समाजासाठी काम करणाऱ्या ६ स्वयंसेवी  संस्थांना व व्यक्तींना फाउंडेशनच्या वतीने डॉ. प्रकाश आमटे यांच्या हेमलकसा येथील लोक-बिरादरी प्रकल्पाला शाल, श्रीफळ १ लाख रुपये तर विशेष मुलांना सर्वसामान्य मुलांसोबत शिक्षण देणारे पुण्यातील अंकुर विद्यालय, एचआयव्ही बाधित मुलांचे संगोपन करणारी पंढरपूर येथील पालवी संस्था,डॉ. शिवगुंडे यांची सोलापूर येथील आधार विश्वस्त संस्था, ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणारी मुंबईची जीवन आनंद संस्था आणि तोरणा राजगड समाजोन्नती न्यास, वेल्हे  या संस्थाना जलसंपदा राज्यमंत्री विजय बापू शिवतारे यांच्या हस्ते विशेष पुरस्काराने  शाल, श्रीफळ आणि प्रत्येकी २५ हजार रुपये देवून सन्मानित करण्यात आले.

 

केलेल्या कामाचे कौतुक म्हणून पुरस्कार मिळणे आवश्यक आहे. पण काम करताना पुरस्कारापेक्षा सामाजिक हिताचा विचार करून  नकारात्मक गोष्टीबाजूला सारून पुढे जायला हवे. तरुणांनी नोकर्‍या नाहीत म्हणून रडत रहण्यापेक्षा नवीन संधी साधण्याकडे लक्ष दिले पाहिजे. सातत्य आणि नाविन्य हे माझ्या यशामागचे गमक आहे. अशा भावना प्रदीप लोखंडे यांनी मांडल्या.

शिवतारे म्हणाले , न्यूनगंड बाजूला ठेवून प्रबळ इच्छाशक्ती असलेला व्यक्तीच समाजात सकारात्मक बदल घडवून आणू शकतो. त्यामुळेच ध्येयवेड होणेच आवश्यक आहे.  हयाच निस्वार्थ हेतुतून सेवा घडते.

डी. एस. कुलकर्णी  यांनी तरुणांना  बिझनेस कसा करावा, याबाबत मार्गदर्शन केले. राजेश दामले यांनी सूत्रसंचालन केले तर नुलकर यांनी मनोगत आणि प्रास्ताविक श्याम भुर्के यांनी केले. डी. एस. के वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेछा  देण्याकरिता त्यांचे ९१ वर्षाचे त्यांचे गुरुवर्य डॉ. गावडे हेही आवर्जून उपस्थित होते.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घुमेल ‘ढोल ताशे’ चा गजर

0

2 3

नेता आणि कार्यकर्ता यांची जुगलबंदी मी आणि जितु जोशी ने रंगविली आहे त्याला संगीताची उत्कृष्ट जोड  ढोल ताशे या चित्रपटात लाभली आहे . महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातया ‘ढोल ताशाचा गजर घुमेल असा विश्वास प्रसिध्द अभिनेता अभिजित खांडकेकर याने चाकण येथे व्यक्त केला

 चाकण येथे ‘ढोल ताशे ‘ संगीत सिडी चे थाटात प्रकाशन अभिजित ने केले ब्रम्हांडनायक मूवीज् निर्मित  राजकुमार अंजुटे आणि अतुल तापकीर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. भारतीय संस्कृतीत तरुणाईच्या मनगटातील बळ आणि सर्जनशीलतेची कसोटी पाहणारा रांगडा कलाप्रकार म्हणून ढोल ताशांकडे पाहिलं जातं. गणेशोत्सवात अभ्यास, ताण-तणाव या सगळ्या किचकट जीवनशैलीतून काही क्षणांचा विरंगुळा म्हणून तरुणाईची पाऊलं ढोल ताशांकडे वळताना दिसतात. ढोल ताशांच्या नादात बेधुंद होणाऱ्या तरूणाईचं चित्रण ‘ढोल ताशे’ या चित्रपटात करण्यात आलं आहे.

भारतीय संस्कृतीत आपलं अढळ स्थान निर्माण केलेल्या ढोल ताशे पथकांकडे व्यवसायाच्या दृष्टीकोनातून अद्याप पाहिलं जात नाही. गणेशोत्सवात किंवा एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमात आपल्या पथकाचा झेंडा उंचचं उंच फडकता ठेवण्यासाठी हे तरूण अहोरात्र झटताना दिसतात. मात्र अगदी तुटपुंज्या मानधनावर त्यांना समाधान मानावं लागतं. याचं परिस्थितीचं उत्साहवर्धक चित्रण ‘ढोल ताशे’च्या माध्यमातून करण्यात आलं आहे. काही कारणात्सव नोकरीवर गदा आलेला सामान्य घरातला तरूण या ‘ढोल ताशा पथकांचा’ भाग होतो आणि या पथकांची मेहनत पाहून या पथकांना ओळख मिळवून देण्याचा विडा उचलता. आपलं मार्केटिंगचं कसब वापरून ढोल ताशा पथकांना ओळख मिळवून देण्यात तो कितपत यशस्वी होतो, हे पाहण्याजोगं असणार आहे.अभिजित खांडकेकर या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे तर त्याच्या विरूद्ध जितेंद्र जोशी आपल्याला पाहायला मिळणार आहे. हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडणारी ह्रषिता भट्ट ढोल ताशेच्या निमित्ताने पुन्हा एकदा मराठीत दिसणार आहे. त्याव्यतिरिक्त या चित्रपटात प्रदीप वेलणकर, इला भाटे, विद्याधर जोशी, विनय आपटे आणि इतर कलावंत ही आहेत. या चित्रपटाची गीतं गुरु ठाकूर यांनी लिहिली आहेत तर निलेश मोहरीर यांनी संगीत दिलं आहे. चित्रपटाचं छायाचित्रदिग्दर्शन केदार प्रभाकर गायकवाड यांनी केले आहे. येत्या ३ जुलै ला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

अभिनेता मंगेश देसाई …

0

वाढ दिवसाच्या खूप खूप शुभेछ्या…

प्रदीप मराठे, सौरभ व पराग गाडगीळ यांना उद्यम गौरव आणि विजय फळणीकर, डॉ. राजाराम दांडेकर यांना सेवा गौरव पुरस्कार जाहीर

0

unnamed

पुणे:

सचोटीने व्यवसाय करणाऱ्या यशस्वी उद्योजकांना देण्यात येणारा “उद्यमगौरव’ पुरस्कार “कॉटनकिंग प्रा.लि. बारामती (पुणे)’चे संस्थापक संचालक प्रदीप गणपती मराठे आणि “पु.ना.गाडगीळ ज्वेलर्स’चे सौरभ गाडगीळ, पराग गाडगीळ यांना जाहीर झाला आहे. समाजसेवा क्षेत्रात कार्यरत विजय फळणीकर (“आपलं घर’, डोणजे, पुणे) आणि डॉ. राजाराम दांडेकर (लोकमान्य सार्वजनिक धर्मादाय न्यास,ता.दापोली, जि.रत्नागिरी) यांना “सेवागौरव’ पुरस्कार जाहीर झाला आहे.

“शेठ चिमणलाल गोविंददास मेमोरिअल ट्रस्ट’च्या वतीने हे पुरस्कार दिले जातात. 15 हजार रोख, प्रशस्तीपत्रक आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असून यंदाचे हे 17 वे वर्ष आहे.

“शेठ चिमणलाल गोविंददास मेमोरिअल ट्रस्ट’चे विश्वस्त मोहनराव गुजराथी यांनी पुणे श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकारपरिषदेत पुरस्कार्थींची माहिती दिली.
पुरस्कार वितरण पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते रविवार, दिनांक 5 जुलै रोजी सकाळी 10 वाजता बालशिक्षण मंदिर सभागृह (मयूर कॉलनी, कोथरूड) येथे होणार आहे. यावेळी संत साहित्याचे अभ्यासक व वक्ते डॉ. शंकर अभ्यंकर “भारतीय परंपरेतील उद्यम व्यवसायातील पुरूषार्थ प्रेरणा या विषयी आपले विचार मांडणार आहेत.

“ज्ञानप्रबोधिनी’चे संचालक डॉ.गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती नियुक्त करण्यात आली.या समितीत “पुणे मर्चंटस चेंबर’चे अध्यक्ष वालचंद संचेती, “मराठा चेंबर ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्रीज’चे महासंचालक डॉ. अनंत सरदेशमुख, मल्हार अरणकल्ले (संपादक, दै.सकाळ), राजेंद्र जगदाळे (सायन्स ऍण्ड टेक्नॉलॉजी पार्कचे महासंचालक) यांनी परीक्षण म्हणून काम पाहीले.

पुण्यात उच्च न्यायालयाच्या खंडपीठासाठी -मनसे आंदोलनात सहभागी

0

1345

पुणे- पुण्यात उच्च  न्यायालय खंडपीठ झालेच पाहिजे या मागणी साठी गेल्या 15 पंधरा दिवसा पासून वकिलांचे
आंदोलन सुरु आहे या आंदोलनाला पाठिंबा देण्या साठी मनसे ने आज पुढाकार घेतला व पाठिंबा असलेले सह्यांचे पत्र स्वाधीन केले. वसंत मोरे ,गणेश सातपुते ,वसंत खुटवड , रवी सहाने आदी मान्यवर मनसेचे सर्व प्रमुख पदाधिकारी ,नगरसेवक ,महिला सेना , पर्यावरण सेना ,विद्यार्थी सेना ,रस्ते आस्थापन चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
1978 साली विधिमंडळात पुणे आणि औरंगाबाद येथे उच्च्य न्यायलय करण्याचा ठराव समंत झाला होता, 1981 साली औरंगाबाद येथे उच्च्य न्यायलय झालेही पणपुणे शहरात अजुन झाले नाही , पुणे शहरातील 40% केसेस उच्च्य न्यायालयात जातात.यात सामान्य नागरिकांना प्रचंड मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागतो.
हे फ़क्त वकिलांचे आंदोलन नसून जनतेचे आहे आणि जनते साठी मनसे पाठिंबा दिला आहे व पुढे ही देत राहील.असे यावेळी मनसेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले .

कार्यकर्त्यांवरील खटले काढून घ्या – संदीप खर्डेकर

0
पुणे – राजकीय सामाजिक आंदोलनात झालेले कार्यकर्त्यांवरील खटले काढून घ्यावेत अशी मागणी भाजपचे सरचिटणीस संदीप खर्डेकर यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे
या संदर्भात त्यांनी आयुक्त श्री के के पाठक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि ,
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी १३ जानेवारी २०१५ रोजी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसाठी एक दिलासा देणारा निर्णय घेतला.सार्वजनिक हिताच्या निरनिराळ्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राजकीय पक्ष व सामाजिक संघटना यांच्यामार्फत बंद पुकारणे,घेराव घालणे,मोर्चा काढणे,निदर्शने करणे,इत्यादि प्रकारचे आंदोलनाचे मार्ग अनुसरले जातात.त्यामुळे त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हे दाखल करण्यात येतात व वर्षानुवर्षे त्यांच्याविरुद्ध चे खटले चालू राहतात.असे सर्व खटले काही अटींच्या अधीन राहून काढून घेण्याबाबत युती शासनाने ऐतिहासिक निर्णय घेतला व पूर्वी १ मे २००५ पर्यंत दाखल झालेले खटले मागे घेण्याच्या निर्णयाच्या कालावधीत बदल करून आता १ नोव्हेंबर २०१४ पूर्वी  दाखल झालेले व प्रलंबित खटले मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला.
या निर्णयामुळे आता जवळ जवळ सर्वच राजकीय व सामाजिक आंदोलनातील कार्यकर्ते,नेते यांना दिलासा मिळाला असून,खटले मागे घेतले गेल्यास त्यांच्या कोर्टाच्या खेटा वाचतील,तसेच यातून होणारा मन:स्ताप व पासपोर्ट मिळविताना येणाऱ्या अडचणीतून ही त्यांची सुटका होईल.
मात्र बहुतांश कार्यकर्त्यांना त्यांच्यावरील खटल्यांची माहितीच नसते व कधीतरी अचानक वारंट आल्यावरच त्यांच्या हे लक्षात येते.तसेच शासनाच्या जी.आर.ची व खटले काढून घेण्याच्या प्रोसिजर ची ही माहिती अनेकांना नसते.
ही अडचण लक्षात घेऊन २०१२ साली तत्कालीन पोलीस आयुक्त व पोलीस उपायुक्त विशेष शाखा यांनी सर्व पोलीस स्टेशन्स मधून अश्या स्वरूपाच्या खटल्यांची माहिती मागवली होती व असे खटले  मागे घेण्याची कार्यवाही सुरु केली होती.
या संदर्भात आपण ही सर्व पोलीस स्टेशन्स  मधून १ नोव्हेंबर २०१४  पर्यंतच्या खटल्यांची माहिती मागवून खटले मागे घेण्याची कार्यवाही सुरु करून कार्यकर्त्यांना दिलासा द्यावा.तसेच शक्य झाल्यास पोलीस स्टेशन निहाय राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन त्यांना शासन निर्णयाची माहिती द्यावी,यातून कार्यकर्ते उत्स्फुर्तपणे खटले  मागे घेण्यासाठी अर्ज करून प्रक्रिया सुरु करतील व पोलीस स्टेशन च्या पातळीवर जनसंपर्क ही होईल व त्याचा लाभ त्या त्या हद्दीतील पोलीस कर्मचाऱ्यांना होईल असेही या निवेदनात म्हटले आहे
सोबत शासन अधिसूचनेची प्रत-कॉपी
1 2 3

पंकजा मुंडे समर्थनार्थ पुण्यात रासप ची निदर्शने

0

 

धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेला मारले जोडे 
पुणे :
महिला ,बाल कल्याण विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्या यांच्यावरील खोट्या आरोपांच्या निषेधार्थ पुण्यात विभागीय आयुक्त कार्यालयासमोर पक्षाचे प्रदेश प्रवक्ते दीपक बिडकर ,अनुसूचित आघाडी अध्यक्ष बाळासाहेब हंगारगे ,महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष श्रद्धा भातंब्रेकर यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करण्यात आली
धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेला यावेळी कार्यकर्त्यांनी जोडे मारून निषेध व्यक्त केला . निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या . सोमवारी सकाळी ही निदर्शने झाली . यावेळी डॉ उज्वला हाके ,पुणे शहराध्यक्ष देवेंद्र धायगुडे ,बाळासाहेब कोळेकर ,अंकुश देवडकर ,सागर गोरे ,रमेश पाटील ,सुरज खोमणे ,बाळासाहेब शिंदे ,महादेव हरपळे ,
दरम्यान ,मुंबई चेंबूर येथे पक्षाध्यक्ष महादेव जानकर यांनी निदर्शनात भाग घेतला . जिल्हा आणि सर्व तालुक्यांच्या ठिकाणी राज्यभर रासप कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून पंकजा मुंडे यांना पाठींबा दिला . मुंबईत विलेपार्ले ,बोरीवली येथेही निदर्शने करण्यात आली
‘ राष्ट्रीय समाज पक्ष हा पंकजाताई मुंडे यांच्या पाठीशी खंबीर पणे उभा आहे . त्यांच्यावरील खोटे आरोप आम्ही सहन करणार नाही .  प्रतीमाहनन करण्यसाठी केलेलं  हे षड्यंत्र यशस्वी होवू देणार नाही  ‘ असे प्रदेश प्रवक्ते दीपक बिडकर यांनी पुणे विभागीय कार्यालयासमोर कार्यकर्त्यांशी संबोधित करताना सांगितले . डॉ उज्वला हाके ,श्रद्धा भातंब्रेकर ,बाळासाहेब कोळेकर ,देवेंद्र धायगुडे यांचीही भाषणे झाली
कार्यकर्त्यांनी त्यानंतर विभागीय आयुक्त  कार्यालयात निवेदन सादर केले

संवादाकरिता अभिव्यक्ती बदलाची आवश्यकता-डॉ. संजय उपाध्ये

0

1 2 3

पुणे-

व्यक्ती व्यक्तींमधील, दोहोंमधील सुसंवाद योग्य व सुसह्य करणेकरिता आवश्यकतेनुसार अभिव्यक्तीत बदल करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन . डॉ. संजय उपाध्ये यांनी केले.

पुणे महानगरपालिकेतील श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेत ‘‘व्यक्ती अभिव्यक्ती” या विषयावर डॉ. संजय उपाध्ये यांनी मार्गदर्शन केले.

याप्रसंगी महानगरपालिकेतील विविध खात्यांचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेतील ‘‘व्यक्ती अभिव्यक्ती” या विषयावर डॉ. संजय उपाध्ये मार्गदर्शन करताना सांगितले की, व्यक्तींच्या मनात विविध विचार असतात, परिस्थिती निहाय मन व्यक्त होत असते. साध्या वेषातील व्यक्ती व त्याच व्यक्तीने कर्तव्यावर बसताना परिधान केलेला पोशाख, पेहराव हा त्याच्या व्यक्तीमत्वात बदल घडवून आणत असतो. त्यानुसार त्याची अभिव्यक्ती व्यक्त होत असते.

लोकसंपर्क, जनसंपर्क सारख्या सेवेत असलेल्या व्यक्तींनी सेवेत कर्तव्य बजावत असताना संपर्कात येणाऱ्या नागरिकांशी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून लोकाभिमुख सेवा दिली पाहिजे. आदरार्थी सन्मानपूर्वक संवाद करुन त्यांची कामे करणे याच सवयी आत्मसात केल्या पाहिजेत. व्यक्तीने अभिव्यक्ती सादर करताना मी कोण आहे हे पाहिले पाहिजे. इतरांबाबत निर्णय प्रक्रिया अथवा मत व्यक्त करताना अभिव्यक्तीबाबत विचार केला पाहिजे, त्या दृष्टीने स्वपरिक्षण केले पाहिजे. काही प्रसंगी काळ हाच उत्तर देत असतो. श्वास, विश्वास, आत्मविश्वास हे श्वासातूनच येत असते, श्वासावर नियंत्रण अर्थात आनापान, ध्यानधारणा या पध्दतीचा अवलंब करुन आपल्या श्वासाबाबत श्वास घेणे, रोखणे, सोडणे या प्रक्रिया रोज कराव्यात व स्वपरिक्षण केले पाहिजे कारण झोप व श्वास योग्य होत असेल तर जीवन सुसह्य होईल. त्यामुळे अभिव्यक्ती व्यक्त होत असताना समोरच्या व्यक्तीला योग्य, सुसह्य वाटेल,आनंददायक वाटेल अशीच अभिव्यक्ती असावी. स्वभाव बदलता येत नसेल तर अभिव्यक्तीत बदल केला पाहिजे. व्यक्तीरेखे बरोबर असलेल्या विसंवादामुळे वाद होतात त्यामुळे व्यक्तीरेखा ओळखणे आवश्यक आहे. मानवी मनाच्या विविध अभिव्यक्ती प्रकारांबाबत अनेक उदाहरणे, तसेच दैनंदिन, कौटुंबिक, शासकीय कार्यालये अशा विविध स्तरांवरील उदाहरणे देऊन डॉ. उपाध्ये यांनी प्रभावी मार्गदर्शन केले.

व्याख्यानमालेच्या यशस्वी आयोजनाकरिता उपायुक्त मंगेश जोशी तसेच सुरेश परदेशी, आशिष चव्हाण, प्रशांत चव्हाण व विभागातील अन्य कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

‘जीत’मध्ये सायकलींगचा थरार

0

1

 

अलिकडच्या काळात मराठी चित्रपटसृष्टीत जरी नवनवीन प्रयोगांना वेग आला असला तरी आजवर मराठीत अभावानेच  पाहायला मिळणारा थरार ‘जीत’ या आगामी चित्रपटात अनुभवायला मिळणार आहे. एकेकाळी मराठी चित्रपट कुस्तीच्या रंगात रंगलेला पाहायला मिळायचा. स्थल कालपरत्वे मराठी चित्रपट कात टाकत असून कधीही न दिसलेली सायकल रेस ‘जीत’ या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे.

प्रीतपाल सिंग शेरगील निर्मितव वाईल्ड रोझ फिल्मची प्रस्तुती असलेल्या ‘जीत’ चित्रपटात कथानकाच्या मागणीनुसार एका सायकलचॅम्पियनशिपचंचित्रीकरण करण्यात आलं आहे. पुण्यातील भंडारा घाटामध्ये चित्रित झालेली ही सायकल रेसउत्कंठावर्धक आणि थरारक बनली आहे. यानिमित्ताने प्रथमच मराठी चित्रपटात निसर्गरम्य तरीही अवघड अशा भंडारा घाटाचा समावेश करण्यात आल्यामुळे एका नवीन लोकेशनमधील निसर्गसौंदर्य पाहण्याची संधीप्रेक्षकांना मिळणार आहे.

‘जीत’ चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या भूषण प्रधान आणि सचिन दाणाई यांच्यावर ही सायकल रेस चित्रीत करण्यात आली. या रेसमध्ये राज्यस्तरीय सायकल रेसर्सनी सहभाग घेतल्याने यातील रोमांच अधिक वाढला आहे. एकीकडे एक्स्पर्ट सायकल रेसर तर दुसरीकडे पडद्यावर अभिनय करणारे कलाकार… तीव्र चढ-उतार असलेला निमुळता रस्ता… एका बाजूला उंच कडा तर दुसऱ्या बाजूला खोल दरी… पावसाच्या वातावरणामुळे निसरडा झालेला रस्ता… अधूनमधून येणाऱ्या पावसाच्या जोरदार सरी… अशा प्रतिकूल वातावरणात या वेगवान रेसचं चित्रीकरण करण्यात आल्याने ही रेस अधिकच रोमहर्षक बनली आहे. या रेससाठी ‘जीत’चे दिग्दर्शक सागर चव्हाण आणि कॅमेरामन मनोज शॉ यांना अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागली.

बॉलिवुडमध्ये ‘जो जीता वही सिकंदर’ या चित्रपटात प्रेक्षकांना सायकल रेसचा थरार अनुभवता आला होता. ‘जीत’मधील सायकल रेसही त्याच ताकदीची बनली असल्याचं मत व्यक्त करत भूषण म्हणाला, ”अविस्मरणीय… चित्तथरारक… रोमहर्षक… उत्कंठावर्धक… ही सर्व विशेषणं या रेसला देता येतील. रेस सायकलची असल्याने विशेष काळजी घ्यावी लागली. रेसचं चित्रीकरण घाटात करण्यात येणार असल्याने मनात थोडी भीती होती. या रेसमध्ये सहभागी झालेल्या रेसर्सची खूप मदत झाली. वळणावळणाच्या नागमोडी आणि निमुळत्या रस्त्यावर सायकलच्या गतीवर नियंत्रण राखणं हे मोठं दिव्य होतं. ते दिव्यही पार पाडलं आणि हा अनुभव बरंच काही शिकवून गेला.भंडारा घाटातील चित्रीकरणानंतर ‘जीत’मधील सायकल रेसमधील पुढील भागाचं चित्रीकरण पुण्यातील बालेवाडी स्टेडियममध्ये करण्यात येणार आहे.

समाजातील फसवेगिरी, ढोंगीपणा, हतबलता आणि सामाजिक पातळीवर पसरलेली उदासीनता यावर या चित्रपटाद्वारे प्रहार करण्यात आला आहे. पैसा आणि सत्तेच्या बळावर आपण काहीही करू शकतो ही धारणा नष्ट करून त्याला मूठमाती देण्याचा प्रयत्न ‘जीत’मध्ये करण्यात येणार आहे. मंजुश्री गोखले यांनी या चित्रपटाची कथा लिहिली असून पटकथा मंजुश्री आणि सागर चव्हाण यांनी लिहिली आहे. भूषण आणि सचिनसोबत या चित्रपटात सयाजी शिंदे, त्रिशला शहा, शरद पोंक्षे, मनोज जोशी, विलास उजवणे, अंजली उजवणे, वरुण गुलाटी यांच्या अभिनयाने सजलेला ‘जीत’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

तिहार तुरुंगातून , भूयार खोदून कैदी पळाला….

0
नवी दिल्ली – देशातील सर्वात सुरक्षित  समजल्या जाणाऱ्या तिहार तुरुंगातून  भूयार तयार करुन पळून जाण्यात एक कैदी यशस्वी झाला तर त्याचा दुसरा साथीदार मात्र पळतापळता पकडला गेला या घटनेने भारतीय तुरुंग व्यवस्थेला शरमेने मान खाली घालावी लागणार आहे  . रविवारी घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी एका कैद्याला घटनास्थळीच पकडले मात्र दुसरा पळून जाण्यात यशस्वी झाला. दिल्ली पोलिसांच्या माहितीनूसार, जावेद आणि फैजान हे दोन कैदी तुरुंग क्रमांक 7 मध्ये कैद होते. या दोघांनी तुरुंग क्रमांक 7 आणि 8 येथे भूयार तयार केला. तुरुंगातील नाल्यातून जावेद फरार झाला, तर फैजानला पकडण्यात आले.आशिया खंडातील सर्वात मोठा तुरुंग अशी ख्याती असलेल्या तिहार तुरुंगातून कैद्यांनी पळून जाण्याची ही आजपर्यंतची तिसरी घटना आहे. याआधी बिकनी किलर नावाने कुप्रसिद्ध चार्ल्स शोभराज याने तिहारची अभेद्यता भेदली होती. त्याच्याही आधी फूलनसिंह हत्याकांडातील आरोपी शेरसिंह राणाने तुरुंगातून पोबारा केला होता.
तिहार तुरुंग देशातील सर्वात सुरक्षित तुरुंग मानले जाते. येथे देशातील मोठ-मोठ्या प्रकरणातील आरोपी आणि दोषींना ठेवण्यात आलेले आहे. सुरक्षेसाठी दिल्ली पोलिसांसह सीआरपीएफ आणि तामिळनाडू स्पेशल फोर्सचे जवान तैनात असतात. तुरुंगातून पळून जाण्यासाठी दोन्ही कैद्यांनी मॅकनिकल टूल्सचा वापर केल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले आहे. जावेद आणि फैजानने तुरुंग क्रमांक 7 आणि 8 येथून तुरुंगातील गुप्त नालीपर्यंत भूयार तयार केले. त्यानंतर नालीतून जावेद फरार झाला. मात्र या गुप्त नालीची माहिती तुरुंग प्रशासनाशिवाय कोणालाच नाही, असेही समोर आले आहे.

“चिंटू गँग’ दिनदर्शिका प्रकाशीत

0

unnamed

“चिंटू गँग’  या शैक्षणिक ,सामाजिक संदेश देणाऱ्या दिनदर्शिकेचे प्रकाशन उपस्थित बालगोपाळ आणि  एयर मार्शल भूषण गोखले ,शि द फडणीस ,श्रीरंग गोडबोले ,चारुहास पंडित, गंगोत्री -सिनर्जी चे मंदार केळकर ,राजेंद्र आवटे ,गणेश जाधव यांच्या हस्ते झालेहा कार्यक्रम रविवारी सायंकाळी गोखले इंसिटयूटयेथे झाला