Home Blog Page 3593

अच्छे दिन कोणाचे? उद्योगपती अदानी-अंबानींचे…

लातूर -प्रधानमंत्र्यांच्या ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमात सहभागी झालेल्या शेतकऱ्यानेच आत्महत्या केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यवतमाळ येथे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी मुक्काम करून मदतीचा शब्द दिला होता. तरीही कोणतीच मदत न दिल्यामुळे त्याच गावातील शांताबाई ताजणे यांनीसुद्धा आत्महत्या केली आहे.
भूसंपादन विधेयकात शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्याची हमी नाही. शेतकऱ्यांच्या संमतीची दखलही नाही. मग अच्छे दिन कुणाचे म्हणायचे, उद्योगपती अदानी-अंबानीचे का? असा सवाल करीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  सध्या मोगलाईचा कायदाच सुरू आहे.
शिक्षणाचाही  विचका पाडला जातो आहे.अशी जोरदार टीका भाजप सरकारवर केली

लातूर येथे  मराठवाड्यातील कार्यकर्त्यांची कार्यशाळा झाली. त्यात शेतकऱ्यांच्या समस्या आणि शासनाचे विरोधी धोरण या विषयावर मार्गदर्शन करताना अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली
ते म्हणाले , आम्ही सरकारमध्ये असताना मराठवाड्याला निधी देताना कधीही हात आखडता घेतला नाही. अनेक साठवण तलाव मराठवाड्यात बांधले. कृष्णा खोऱ्यातील हक्काचे पाणी गेल्याने मराठवाड्याची अडचण झाली आहे. महात्मा फुले जलभूमी अभियान हा आपल्या सरकारचा. पण आता त्याचे नाव जलयुक्त शिवार योजना झाले आहे. आर. आर. पाटील यांनी राबवलेल्या संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानाचे नामकरणही महाराष्ट्र ग्रामस्वच्छता अभियान करण्यात आले आहे.
शेतीच्या धोरणात्मक निर्णयातही हे सरकार कमी पडते आहे. जिल्हा बँकेत, बाजार समित्यांमध्ये आपली माणसे होती. ती उत्तम प्रशासक होती. त्यांना काढून टाकण्यात आले. पवारसाहेब देशाचे कृषिमंत्री असताना त्यांनी ७१ हजार कोटींची कर्जमाफी केली. पीककर्ज पुरवठा केला. शेतीमालाच्या आधारभूत किमंती वाढवल्या. आयात, निर्यातीचे निर्णय योग्य वेळी घेतले.
पवारसाहेब शेतीची जाण असणारे नेते आहेत. विदर्भातील आत्महत्या कमी करण्यासाठी त्यांनी तीन हजार कोटींचा कार्यक्रम राबवला. आज आपण काय पाहतो? प्रधानमंत्र्यांच्या ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमात सहभागी झालेल्या शेतकऱ्यानेच आत्महत्या केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यवतमाळ येथे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी मुक्काम करून मदतीचा शब्द दिला होता. तरीही कोणतीच मदत न दिल्यामुळे त्याच गावातील शांताबाई ताजणे यांनीसुद्धा आत्महत्या केली आहे.
भूसंपादन विधेयकात शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्याची हमी नाही. शेतकऱ्यांच्या संमतीची दखलही नाही. मग अच्छे दिन कुणाचे म्हणायचे, उद्योगपती अदानी-अंबानीचे का? यावरून सध्या मोगलाईचा कायदाच जणू सुरू आहे.
शिक्षणाचाही असाच विचका पाडला जातो आहे. अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करणार नाहीत. बहुजनांच्या शाळा जिथे आहेत, तिथे शिक्षक देणे बंद करत आहेत. मंत्र्यामध्ये एकवाक्यता नाही. गारपिटीच्या वेळेस खडसे सिनेमा पाहण्यात दंग होते. मोबाइलचे भरण्यास पैसे आहेत, मग विजेचे बिल का भरत नाही, असे चुकीचे वक्तव्य ते करतात. आदिवासी विकासमंत्री धनगर समाजाला आरक्षण देता येणार नाही म्हणतात. मराठा आरक्षणासाठी चांगला वकील नेमला नाही. मुस्लिम समाजाला कोर्टाने मान्य केलेले आरक्षणही काढून टाकले. सरकारात एकही मुस्लिम व्यक्ती मंत्री, राज्यमंत्री नाही. प्रधानमंत्री ‘मन की बात’ मधून ईदच्या शुभेच्छाही देऊ शकले नाहीत…
राज्यात दुबार पेरणीचे संकट उभे असताना मुख्यमंत्री परदेशात जात आहेत. कामगार कायद्याच्या सुधारणेच्या नावाखाली कामगारांचे संरक्षण काढण्याचा प्रयत्न केला जातोय…
राष्ट्रवादीची स्थापना ही स्वाभिमानातून झाली आहे. शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने पक्षसंघटना मजबूत करताना, नवीन चेहरे पुढे आणणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने पक्षाची कार्यकारिणी होत आलेली आहे. जिल्हाध्यक्षांनी बुथप्रमाणे कमिटी बांधण्यासाठी कामाला लागावे. यापुढे सर्व जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षांची अंकाउंटेबिलिटी तपासणार आहोत. समाजाच्या गरजेसाठी तुम्हाला-आम्हाला आता आंदोलनाची सवय करून घ्यावी लागणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सार्वजनिक उत्सवात सहभागी व्हायला हवे. अतंर्गत वाद आणि बंडखोरीमुळे पक्षाचेच नुकसान होते. त्यामुळे असे वाद टाळावेत. सर्व जाती-जमातीच्या लोकांना स्थान द्यावे. फक्त भाषणबाजी करणाऱ्या कार्यकर्ते आणि नेत्यांचेही यापुढे ऑडिट करणार आहे. दिल्लीत अरविंद केजरीवाल यांनी जे यश मिळवले ते जनमानसामुळे… त्यामुळे कार्यकर्त्यांनी जनमानसाचा पाठिंबा मिळेल, अशा प्रकारेच काम करायचे आहे.असेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले

मानव जातीचे कल्याण करतो तोच पुरुषार्थ :डॉ शंकर अभ्यंकर

उद्यम गौरव पुरस्कार पराग गाडगीळ,प्रदीप मराठे  यांना तर सेवा गौरव पुरस्कार डॉ राजा दांडेकर ,विजय फळणीकर यांना प्रदान
पुणे :
‘मागणी तसा पुरवठा ‘ हे तत्वाने कशाचाही पुरवठा करून नफा मिळवणे , राक्षसी महत्वाकांक्षा ठेवून नफ्यासाठी ग्राहकांची पिळवणूक करणे  चूक असून भारतीय नितीशास्त्राप्रमाणे सात्विक व्यावसायिक व्हावे,सचोटीने व्यवसाय करावा  . कारण जास्तीत जास्त मानव जातीचे कल्याण करतो तोच पुरुषार्थ असतो ‘ असे प्रतिपादन रविवारी सकाळी संत साहित्याचे अभ्यासक डॉ शंकर अभ्यंकर यांनी केले .
शेठ चिमणलाल गोविंददास मेमेओरिअल ट्रष्ट च्या वतीने देण्यात येणाऱ्या उद्यम गौरव आणि सेवा गौरव पुरस्कार उद्योजक पराग गाडगीळ ,प्रदीप मराठे यांना तर सेवा गौरव पुरस्कार डॉ राजा दांडेकर ,विजय फळणीकर यांना शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले . त्यावेळी डॉ अभ्यंकर बोलत होते सचोटीने व्यापार करून मानदंड निर्माण करणारे उद्योजक स्व . चिमणलाल गोविंद दास गुजराथी यांच्या स्मृती प्रित्यर्थ हे पुरस्कार दिले जातात
रविवारी सकाळी मयुर कॉलोनी कोथरूड येथील बाल शिक्षण मंदिर सभागृहात हा कार्यक्रम झाला . स्मृतिचिन्ह ,धनादेश ,पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे .
डॉ शंकर अभ्यंकर म्हणाले ,’व्यापारी व्यवस्था ही अर्थ व्यवस्था आणि राष्ट्र उभारणी साठी आवश्यक आहे . स्पर्धेच्या युगात उभे राहण्यासाठी व्यापारी ,व्यावसायिक ,उद्योजकांनी तडजोडी करू नयेत . बारा बलुतेदारांना बरोबर ठेवावे . ‘अर्थ ‘ हे मानवी जीवनात प्रधान असले तरी धनसंपदा वाढविण्यासाठी सद्गुण कमी होवू देवू नयेत आणि  पाय जमिनीवर ठेवावेत . सचोटीने उत्तम धन संचय केल्यानंतर समाजोपयोगी  कामे करावीत . स्व . चिमणलाल गुजराथी यांचे कार्य त्यादृष्टीने पथदर्शक आहे ‘
मागणी तसा पुरवठा ‘ हे तत्वाने कशाचाही पुरवठा करून नफा मिळवणे , राक्षसी महत्वाकांक्षा ठेवून नफ्यासाठी ग्राहकांची पिळवणूक करणे  चूक असून भारतीय नितीशास्त्राप्रमाणे सात्विक व्यावसायिक व्हावे . कारण जास्तीत जास्त मानव जातीचे कल्याण करतो तोच पुरुषार्थ असतो . साधने शुद्ध ठेवावीत ,प्रयत्न प्रामाणिक करावेत मग दैवही साथ देते  ‘ असे ही ते म्हणाले
सत्कारार्थींच्या वतीने बोलताना विजय फळणीकर म्हणाले ,’ चांगले काम लोकांच्या पाठींब्यावर आणि त्यांच्या पैशातून उभे राहते . त्यामुळे ते चांगले चालते आहे ना हे पाहणेही लोकांची जबाबदारी आहे ‘
शाहीर होनराज मावळे यांनी चिमणलाल गुजराथी यांच्या जीवनावर पोवाडा सादर केला
मोहनराव गुजराथी यांनी प्रास्ताविक केले . डॉ आदिती गुजराथी ,प्रा . नलिनी गुजराथी यांनी सूत्रसंचालन केले .   कन्हय्यालाल गुजराथी यांनी आभार मानले
यावेळी डॉ सतीश देसाई ,ज्ञान प्रबोधिनीचे संचालक डॉ गिरीश बापट ,वालचंद संचेती ,प्रा . राम डीम्बळे ,जयंत गुजराथी ,सुभाष देवी , प्रा सुभाष देशपांडे ,प्रवीण चोरबेले उपस्थित होते
पुरस्कार परीक्षक समितीचे सदस्य डॉ  गिरीश बापट ,मल्हार अरणकल्ले यांचा सत्कार करण्यात आला

दारूची नशा आयुष्याची दुर्दशा – शटर

(सिने समीक्षण आणि ट्रेलर देखील  )

निर्मिर्ती : सिलिकॉन मिडिया ट्रेंड्स अँडफिल्म मेकर्स प्रा. लि.

दिग्दर्शन : व्ही. के. प्रकाश

मूळ कथा : जॉन मॅथ्यू

पटकथा – संवाद : मनीषा कोरडे

छायांकन : के. के. मनोज

संगीत : पंकज पडघन

कलाकार : सचिन खेडेकर, सोनाली कुलकर्णी , अमेय वाघ, प्रकाश बरे, जयवंत वाडकर, कमलेश सावंत, राधिका हर्षे, कौमुदी वालोकर आदी

. दर्जा – ४/५

सरकार मॅगी  वर बंदी घालते दारूवर का नाही ? असा प्रश्न हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांना पडला असेल . दारूची नशा आणि आयुष्याची दुर्दशा  हि सरकारचीच बोध वाक्येही आठवतील सिलिकॉन मिडिया ट्रेंड्स अँडफिल्म मेकर्स प्रा. लि.ने   प्रदर्शित केलेला  ‘शटर’ हामल्याळममधील ‘शटर’ याच सुपरहिट चित्रपटाचा हा मराठी रिमेक आहे. एका सुस्थितीतील चांगल्या कुटुंबातील , चांगले जीवन जगणाऱ्या मॅच्युयर्ड माणसाचे आयुष्य दारूच्या नशेत कसे उध्वस्त होवू शकते याची हलकीशी जाणीव करून देणारी हि कथा आहे
ही कथा एका रात्रीत सुरू होते आणि दुसर्‍या रात्री संपते. . एका सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात क्षणिक मोहापायी घडलेली ही घटना एका रात्रीपुरती र्मयादित असली तरी त्या अनुषंगाने निर्माण झालेल्या सामाजिक परिस्थितीवर पुरेसे भाष्य करणारी ठरली आहे.जितेंद्र ऊर्फ जित्याभाऊ हा जहाजावर काम करणारा कामगार तसा सुखवस्तू आहे. पत्नी आणि दोन मुली असा त्याचा छान संसार आहे. मात्र कॉलेजमध्ये जाणारी त्याची मुलगी सतत तिच्या मित्रपरिवाराबरोबर असते ही बाब त्याला खटकत असते म्हणून तो तिचे लवकर लग्न लावून द्यायच्या विचारात आहे. आपल्या बंगल्यासमोर त्याची भाड्याने दिलेली काही दुकाने आहेत. त्यातील एक दुकान बंद आहे. एक्या नावाचा रिक्षावाला तसेच एक ट्रकचालक आणि जित्याभाऊचे काही मित्र मिळून त्या बंद दुकानात एका रात्री दारूचीपार्टी करतात. दारू संपल्यानंतर जित्याभाऊचे इतर मित्र घरी जातात, मात्र जित्याभाऊला आणखी दारू पिण्याची हुक्की येते म्हणून तो एक्यासह त्याच्या रिक्षात बसून दारू आणायला मध्यरात्री बाहेर पडतो. वाटेत एका बसथांब्यावर त्याला एक वेश्या भेटते. तिला एक्याच्या मध्यस्थीने तो तिला घेऊन त्या बंद दुकानात येतो. त्या वेश्येला भूक लागलेली असते म्हणून एक्या खायला आणण्यासाठी दुकानाचे शटर बाहेरून कुलूप लावून बंद करतो आणि जातो. मात्र येताना पोलिसाच्या तावडीत सापडतो आणि त्याला रात्रभर पोलीस ठाण्यात मुक्काम करावा लागतो. इकडे त्याची वाट पाहून जित्याभाऊची तगमग सुरू होते आणि बंद शटर मध्ये अडकलेल्या जीत्याभावू ला बाहेरच्या जगात उघडपणे जी माणसे समजत नाहीत ती बंद शातारमध्ये अडकून पडल्यानंतर समजतात  आणि त्याला झाल्या गोष्टीचा पश्‍चाताप होतो. त्या बंद शटरमधून त्याची सुटका कशी होते हा अनुभव पडद्यावर पाहण्यासारखाच आहे.
या कथेत एक लेखक-दिग्दर्शकही आहे. त्याची महत्त्वाची बॅग एक्याच्या रिक्षात विसरलेली असते. म्हणून तोही या कथेतील एक महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे जित्याभाऊ, एक्या, ती स्त्री आणि हा लेखक यांच्याभोवतीच ही एका रात्रीची कथा फिरत राहते. या कथेच्या अनुषंगाने असलेले, जित्याभाऊचे शेजारच्या गॅरेजवाल्याशी झालेले भांडण, तसेच बंद दुकानावरून त्याचा, त्याच्या सख्ख्या मेहुण्याशी झालेला वाद आणि दुकानाचा ताबा घेण्यासाठी मेहुण्याचे त्याचवेळी पोलिसांना घेऊन येणे आदी काही प्रसंग कथेची चांगली उत्कंठा वाढविणारे ठरले आहेत. कथेचा शेवट धक्कादायक असला तरी जित्याभाऊबरोबरच इतरांनाही विचार करायला लावणारा आहे. सचिन खेडेकरने जित्याभाऊ ग्रेटच  रंगविला आहे. सोनाली कुलकर्णी  हिनेही  शरीरविक्रय करणार्‍या स्त्रीची भूमिका उत्तम पार पाडली आहे. दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश बरे यांनी लेखक-दिग्दर्शकाची भूमिका  केली आहे. मात्र सर्वाधिक लक्षात राहतो तो अमेय वाघ याचा एक्या रिक्षावाला. रिक्षावाल्याची भूमिका तो अक्षरश: जगला आहे, असेच म्हणावे लागेल.

‘ यूपीएससी’मध्ये इरा सिंघल देशात पहिली -अबोली नरवणे ही महाराष्ट्रातून प्रथम

0

नवी दिल्ली – केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (यूपीएससी) 2014 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, आघाडीच्या पाचमधील पहिल्या चारही क्रमांकांवर उत्तीर्ण होत मुलींनीच बाजी मारली. ईरा सिंघल, रेणू राज, निधी गुप्ता आणि वंदना राव यांनी अनुक्रमे पहिले चारही क्रमांक पटकाविले आहेत. तर, बिहारच्या सुहर्ष भगत या उमेदवाराने पाचवा क्रमांक मिळवत मुलांमध्ये पहिला येण्याचा मान मिळविला. अबोली नरवणे ही महाराष्ट्रातून प्रथम आली आहे. यूपीएससीच्या पहिल्या शंभर जणांच्या यादीत ती 78 व्या क्रमांकावर आहे. अबोली एम. ए. इंग्रजी असून मागील वर्षी तिची आयआरएससाठी निवड झाली होती. यंदा मुख्य परीक्षेसाठी तिने राज्यशास्त्र हा विषय घेतला हाेता

. शारीरिकदृष्ट्या 60 टक्के अपंग असलेली इरा सिंघल देशात पहिली आली. रेणू राजने पहिल्याच प्रयत्नात दुसरा क्रमांक पटकावला. निधी गुप्ता तिसऱ्या तर वंदना राव चौथ्या क्रमांकावर आहेत. सुहर्ष भगत हा पाचव्या क्रमांकावर आहे. तर सहाव्या क्रमांकावरही तरुणीच आहे. म्हणजेच टॉप-10 मध्ये 5लेकीच! यापूर्वी 2013मध्ये टॉप-5 मध्ये भारती दीक्षित ही एकमेव मुलगी होती. यूपीएससीने पहिल्यादांच मुलाखतीनंतर चौथ्याच दिवशी परीक्षेचे निकाल जाहीर केले आहेत
.एकूण 1236 उमेदवारांची निवड करण्यात आली असून, त्यांची नियुक्ती भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस), भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस), भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) आणि केंद्रीय सेवेच्या “ए‘ तसेच “बी‘ दर्जाच्या वेगवेगळ्या पदांवर केली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांमध्ये 590 सर्वसाधारण, 354 ओबीसी, 194 एससी, 98 एसटी वर्गातील आहेत. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांपैकी 180 जण आयएएस, 32 जण आयएफएस आणि 150 जण आयपीएससाठी पात्र ठरले आहेत. तर, 710 उमेदवार अ दर्जाच्या आणि 292 उमेदवारांची ब दर्जाच्या पदांसाठी निवड करण्यात आली आहे. 254 उमेदवारांना राखीव यादीत ठेवले जाईल.

अमेरिकेत ‘महाराष्ट्र परिचय केंद्र’ सुरु करणारः मुख्यमंत्री

लॉस एन्जेलिस- महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कसोशीने प्रयत्न करत असून त्यात अमेरिकेसारख्या देशाच्या भूमीवर कर्तृत्व गाजवित  असलेल्या  मराठी मंडळींनी योगदान दिल्यास महाराष्ट्र हे एक सर्वोत्तम राज्य म्हणून नावारुपास येईल,अमेरिकेतील मराठी बांधवांशी महाराष्ट्राचा ऋणानुबंध वाढावा यासाठी तेथे महाराष्ट्र परिचय केंद्र तातडीने कार्यान्वित करण्याची घोषणाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केली . अमेरिकेच्या लॉस एंजलीस शहरात बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनाचे मुख्यमंत्र्यांनी उदघाटन केले. यावेळी ते बोलत होते. उद्योगमंत्री सुभाष देसाई यावेळी उपस्थित होते.
अमेरिका आणि कॅनडा या देशांमध्ये स्थायिक झालेल्या महाराष्ट्रातील मंडळींच्या बृहन्महाराष्ट्र मंडळातर्फे लॉस एन्जेलिस येथे 17 वे अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाच्या उद्घाटन सोहळ्यास मुख्यमंत्र्यांसह राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष सुनील सूर्यवंशी, ज्येष्ठ पदाधिकारी शैलेश शेट्ये, विवेक रणदिवे आदी उपस्थित होते.
अमेरिकेतील मराठी मंडळींनी केलेल्या प्रगतीची विशेष प्रशंसा करुन मुख्यमंत्री म्हणाले, परकीय भूमीवर कर्तबगारी गाजविण्याचे मोठे काम करणाऱ्या महाराष्ट्राच्या सुपुत्रांबद्दल राज्याला आनंद, समाधान आणि अभिमान वाटतो. अमेरिकेच्या वाटचालीत महाराष्ट्रातील जनतेचा लक्षणीय वाटा आहे. कर्तृत्व गाजविण्यासोबतच येथील मराठी माणसाच्या या पिढीने आपले मराठीपण निष्ठने जोपासले आहे, ही बाब अभिमानास्पद आहे.
महाराष्ट्रात परिवर्तनाचे पर्व सुरू झाले असून राज्य आता वेगाने बदलत असल्याची माहिती या अधिवेशनातील मराठीजनांना देताना मुख्यमंत्री म्हणाले, मेक इन इंडिया या देशातील महत्त्वाकांक्षी मोहिमेच्या यशस्वीतेसाठी मेक इन महाराष्ट्र आवश्यक आहे, कारण महाराष्ट्र हे भारताचे पॉवर हाऊस आहे. मेक इन महाराष्ट्र हा आमचा केवळ एक नारा नाही, तर ती एक व्यापक लोकचळवळ आहे. इथल्या तरुणांना योग्य शिक्षण, प्रशिक्षण आणि रोजगार देण्याची गरज आहे, ते देण्याचे काम आमचे सरकार करत आहे. राज्याच्या प्रशासनात आमूलाग्र परिवर्तन होत असून ‘रेड टेप’ ऐवजी ‘रेड कार्पेट’ संस्कृती आम्ही प्रस्थापित करीत आहोत. औद्योगिक क्षेत्रातील परवानाराज आम्ही संपुष्टात आणले आहे. यासोबत जलयुक्त शिवार अभियानासारख्या कार्यक्रमातून राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आमचे कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. या विकासयात्रेत मराठी मंडळींनी सहभागी व्हावे. त्यांच्या योगदानातून महाराष्ट्र एक सर्वोत्तम राज्य म्हणून नावारुपास येईल, असा आशावादही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

‘मर्डर मेस्त्री’ सिनेमात विनोदवीरांची जुगलबंदी

 321

मराठीत रहस्यमयी चित्रपट तसे फार कमीच पहायला मिळत असताना रहस्याच्या जोडीला विनोदही…ही हटके कल्पना कशी वाटते…?असाच एक धमाल विनोदाच्या सहाय्याने उत्कंठावर्धक झालेला रहस्यमयी गुंता ‘मर्डर मेस्त्री’ या आगामी चित्रपटाद्वारा प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीत सिनेमॅटोग्राफर म्हणून नावलौकिक मिळवणारे राहुल जाधव यांनी ‘मर्डर मेस्त्री’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे.

विनोदाची उत्तम जाण असलेले अनेककलाकार ‘मर्डर मेस्त्री’ सिनेमाच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. यातल्या प्रत्येक कलाकराच्या अभिनयाची स्वतःची अशी एक वेगळी शैली आहे. दिलीप प्रभावळकर, वंदना गुप्ते या दोन मात्तबर कलाकारांसोबत हृषिकेश जोशी, विकास कदम, संजय खापरे, कमलाकर सातपुते, देवेंद्र भगत, क्रांती रेडकर, मानसी नाईक या नव्या दमाच्या कलाकारांची फळी या चित्रपटात पाहयला मिळणार आहे. चित्रपटातील निखळ विनोद हरवत चालला आहे. या निखळ विनोदाची अनुभती रसिक-प्रेक्षकांना ‘मर्डर मेस्त्री’ सिनेमा देणार आहे.

‘मर्डर मेस्त्री’ हा सस्पेन्स कॉमेडी चित्रपट आहे. हे सगळेच विनोदवीर आपल्या अचूक टायमिंगने धमाल उडवून देणारे असल्यामुळे एवढी सगळी स्टारकास्ट एकाच चित्रपटात येऊन काय धमाल उडवणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. रहस्य लपवण्याच्या प्रयत्नात घडणाऱ्या गमती-जमतीना विनोदाची जबरदस्त फोडणी देत निर्माण होणारी गूढता हे या चित्रपटाच वेगळेपण आहे.

दिग्गज कलाकार आणि कुशल तंत्रज्ञांच्या जोडीने उत्कंठता वाढवणारा सस्पेन्स कॉमेडीचा जबरदस्त तडका ‘मर्डर मेस्त्री’ मध्ये पहायला मिळणार आहे. या चित्रपटाची कथा नेहा कामत यांची आहे तर पटकथा व संवाद प्रशांत लोके यांनी लिहिलेत. नाडियादवाला जेननेक्स्ट प्रोडक्शन्स आणि व्हीटीबी एन्टरप्राईझेस यांची संयुक्त निर्मिती असलेला ‘मर्डर मेस्त्री’ हा सिनेमा निर्माते अब्रार नाडियादवाला यांचा पहिलाच मराठी सिनेमा आहे.अब्रार नाडियादवाला आणि वैभव भोर निर्मित‘मर्डर मेस्त्री’ सिनेमातलं सगळ्या विनोदवीरांच विनोदाचं धूमशान… हास्याचे मळे फुलवणारं असणार आहे.

रहस्याला विनोदी तडका देणारा ‘मर्डर मेस्त्री’ हा धमाका चित्रपट येत्या १० जुलैला प्रदर्शित होणार आहे.

प्रामाणिक कार्यकर्त्याची वास्तववादी कहानी

(‘ढोल-ताशे’ समीक्षण )

निर्माते – राजकुमार अंजुटे आणि अतुल तापकीर
दिग्दर्शक –अंकुर अ. काकतकर
कलावंत
-, अभिजित खांडकेकर, हृषिता भट, विनय आपटे, प्रदीप वेलणकर, इला भाटे आणि
जितेंद्र जोशी
दर्जा -४/५


गणपती मंडळांनंतर आता वाढत चाललेलं ढोल-ताशे पथकांचं प्रस्थ आणि राजकारणासाठी पथकांचा होणारा वापर हा विषय तसा वास्तववादी ! हा  वास्तववाद  मांडणारी अनिल सपकाळ यांची उत्तम कथा आणि संवाद   दिग्दर्शक अंकुर काकतकर यांनी ते  चित्रपटाच्या चौकटीमध्ये मांडण्याचा चांगला प्रयत्न ‘ढोल ताशे’ या चित्रपटातून केला आहे. एक वेगळा विषय मांडण्याचा हा प्रयत्न निश्चितच सुरेख आहे पण शेवटाला थोडासा कुठेतरी लेखकच गोंधळेलेला असावा असे वाटणारा शेवट असलेला हा चित्रपट सुरेख संवादा मुळे आणि अभिजित खांडकेकर -जितु जोशी यांच्या उत्तम अभिनयामुळे चांगली रंगत भरतो .. आणि वास्तववादी आपल्या जवळपासच्या घटनांचा विचार करायला लावतो
अमेय कारखानीस (अभिजित खांडकेकर) हा आयटी क्षेत्रातील युवक चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. आई-वडिलांच्या इच्छेखातर ‘आयटी’ क्षेत्राकडे वळलेल्या अमेयला समाजासाठी वेगळं काही तरी करायचं आहे. अमेरिकेतील मंदीचा फटका अमेयला बसतो आणि अचानक त्याची नोकरी जाते. अगदी याच काळामध्ये तो मित्राच्या ढोलताशा पथकाकडे आकर्षित होतो. ढोलताशा पथकामध्ये असणाऱ्या युवकांच्या ऊर्जेचा सकारात्मक वापर करण्याची कल्पना अमेयला सुचते. दुसरीकडे महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचे स्वप्न पाहिलेला नेता (जितेंद्र जोशी) मुंबईमध्ये ढोलताशा पथकांच्या स्पर्धाचे आयोजन करतो. या स्पर्धेत अमेयचं पथकही सहभागी होतं. मुंबईत झालेल्या या स्पर्धेमध्ये आवाजाच्या मर्यादेचं उल्लंघन झाल्यामुळं जितेंद्र जोशीच्या विरोधकांकडून कोर्टात गुन्हे दाखल होतात. राजकीय स्वार्थापोटी ढोलताशा प‌थकांची नाहक बदनामी होते आहे, या भूमिकेतून अमेय कोर्टात ‘पीआयएल’ दाखल करतो. कोर्टातही अमेयच्याच बाजूने निकाल लागतो आणि युवा आघाडी पक्षाचा प्रमुख जितेंद्र जोशी (आदित्य देशमुख )अमेयला पक्षात येण्याची ऑफर देतो. अमेयची प्रेयसी आणि पत्रकार गोजिरी (हृषिता भट) आणि आई-वडिलांचा विरोध असतानाही जितेंद्र जोशीच्या युवा आघाडीच्या माध्यमांतून अमेय ढोलताशा पथकांच्या राज्यस्तरीय संघटनेचा प्रमुख होतो. त्यानंतर सुरू होतो राजकारणातील खेळ ! पक्षातील प्रवेशानंतर जितेंद्र जोशीला डोईजड होणाऱ्या अमेयला घोटाळ्यात गुंतवण्याचा डाव आखला जातो. नंतरच्या काळात हा संघर्ष आणखी तीव्र होतो. हा सारा संघर्ष ‘ढोल ताशे’ या चित्रपटात दिसतो.
पुण्यातील गणपतीची लक्ष्मी रस्त्यावरील मिरवणूक ,पुण्याचे ढोल ताशा चे शौर्य पथक हे हि पुणेकरांसाठी यात आकर्षण आहेच
प्रदीप वेलणकर, ईला भाटे . हृषिता भट यांचा  अभिनयही चांगलाच आहे  पुण्यातील सुदर्शन च्या शुभांगी दामलेही यात आहेत मोहन दामलेंनी हि न्यायाधीशाची छोटी भूमिका केली आहे पण न्यायाधीशाच्या निर्णयानेच चित्रपट घडतो .  एक लव्ह सॉंग सोडले तर अन्य 2 गाणी उत्तम आहेत काही अर्थ आणि भावना मांडणारी त्यांची चल हि सुरेख आहे   अमेयचा सहकारी ‘ संग्राम ‘हि चांगला रंगविला आहे विद्याधर जोशी तर ग्रेट असतातच बाबुभाई या त्यांच्या भूमिकेला फारसा वाव नसतानाही ते लक्षात राहतात . किरकोळ 3/४ चुका सिनेमात आहेत ज्या काढता आल्या असत्या पण त्यावर उहापोह करण्यासारखे एवढे काही नाही , सिनेमा ग्रेटच आहे

झी मराठीवरील ‘आम्ही सारे खवय्ये’त विविध तज्ञांचे मार्गदर्शन

माणसाच्या मनात शिरण्याचा मार्ग पोटातून जातो असं म्हणतात. एखाद्या माणसाला खाण्यातून जिंकलं तर मनाने जिंकणं फारसं कठीण नसतं. खाण्याच्या पद्धतीतून खाणा-याचे नि खिलवणा-याचे संस्कार डोकावतात. म्हणूनच म्हणतात, खाणे हा केवळ उदरभरणाचा उपचार नसून तो एक दक्ष संस्कार आहे. दर बारा कोसावर भाषा बदलते तशी दर कोसावर खाद्यसंस्कृतीही बदलते. महाराष्ट्राची ही वैविध्यपूर्ण खाद्यसंस्कृती केवळ देशभरातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृती जगभरात आपला ठसा उमटवते ती त्याच्या साधेपणामुळे आणि वैविध्यपूर्ण लज्जतीमुळे. महाराष्ट्रात खाद्यसंस्कृतीचा समृद्ध वारसा असूनही आज एकूण धकाधकीच्या जीवनात रोजच्या आहारात जागा घेतलीय ती फास्टफूड किंवा डाएटफूडने.

रोजच्या धावपळीत विविध व्यवधानं सांभाळताना अनेक ताणतणावांना सामोरे जावे लागतेय. याचा आरोग्यावर विपरित परिणाम होतोय आणि त्यामुळे अनेक व्याधींपासून मुक्तता मिळवण्यासाठी आहारसुद्धा संतुलित आणि योग्य पद्धतीचा घेण्याकडे लोकांचा कल वाढतोय. मात्र संतुलित आणि योग्य आहार म्हणजे नेमकं काय हे माहित नसल्यानं आहार संतुलनापेक्षा चुकीचा आहार घेतला जातो आणि आरोग्याची समस्या अधिक बिकट होते. म्हणूनच झी मराठीवर अन्न आणि आरोग्य यांचा सुरेख मिलाफ घालत आम्ही सारे खवय्ये कार्यक्रमात येत्या काही भागांमध्ये विशेष तज्ञमंडळींना पाचारण करण्यात येत आहे. आरोग्याबाबत काही खास सूचना देताना किंवा विविध विषयावर मार्गदर्शन करताना काही विशेष पाककृतींची ओळखही ही तज्ञमंडळी करून देणार आहेत. ६ जुलैला कान-नाक-घसा तज्ञ डॉ. ज्योत्सना जगताप तर ७ जुलैला ज्येष्ठ सौंदर्यतज्ञ माया परांजपे नोकरदार स्रियांनी कमीत कमी वेळेत पोषक आणि संतुलित तसेच सौंदर्य टिकवण्यसाठी काय आहार घ्यावा यासाठी मार्गदर्शन करतील. तसेच ८ जुलैला स्त्रीरोगतज्ञ डॉ. ललिता मायदेव आणि ९ जुलैला मार्गदर्शक सुचित्रा सुर्वे दहावी – बारावी झालेल्या मुलांना व पालकांना मार्गदर्शन करतील. सोमवार ते शनिवार दररोज दुपारी १.३० वाजता झी मराठीवर ‘आम्ही सारे खवय्ये’मध्ये हे विशेषतज्ञ खवय्यांना भेटतील त्यांच्या खास पाककृतींसह.

 

कंत्राट पद्धतीवर काम करणाऱ्या ,चार महिन्यांपासून पगार न मिळालेल्या सफाई कामगाराचा कामावर हृदय विकाराने मृत्यू क्षेत्रीय कार्यालयाच्या बेपर्वाई मुळे कामगाराचा मृतदेह सहकाऱ्यांनी नेला पालिकेत :बिबवेवाडीतील घटना

पुणे :
कंत्राट पद्धतीवर काम करणाऱ्या ,चार महिन्यांपासून पगार न मिळालेल्या  नितीन दत्तात्रय मांजरेकर या  सफाई कामगाराचा बिबवेवाडी येथे सकाळी सात वाजता  कामावर असताना  हृदय विकाराने मृत्यू झाला .
 बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाला हि घटना कळवूनही क्षेत्रीय अधिकारी सुनील गायकवाड यांनी काहीच दखल न घेतल्याची तक्रार आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस पर्वती मतदार संघ अध्यक्ष सतीश वाघमारे यांनी केली
सतीश वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार ,आज सकाळी ही घटना घडली . बिबवेवाडी परिसरातील राजकीय ,सामाजिक  गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी नितीन मांजरेकर यांना सह्याद्री हॉस्पिटल मध्ये दाखल केले पण त्यांचा मृत्यू झाला होता . कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या या सफाई कामगारांनी चारच दिवसापूर्वी क्षेत्रीय कार्यालयावर आपल्या मागण्यांसाठी मोर्चा काढला होता . संतप्त कार्यकर्त्यांनी आणि कामगारांनी पालिका अधिकाऱ्यांच्या बेपर्वाई च्या निषेधार्थ मांजरेकर यांचा मृतदेहच पालिकेत नेला .
पालिका अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांच्याकडे सफाई कामगारांच्या अडचणी मांडण्यात आल्या आणि मृत कामगार नितीन मांजरेकर यांना नुकसान भरपाई ,कुटुंबातील एकाला नोकरी देण्याची मागणी केली . अखेर आयुक्त कुणाल कुमार यांच्याशी बोलल्यावर मागण्या मान्य झाल्या आणि मृतदेह पालिकेतून हलविण्यात आला . यावेळी गणेश बिडकर आणि नगरसेवक पिंटू धाडवे उपस्थित होते .
मृत नितीन मांजरेकर यांना चार महिन्यापासून पगार मिळालेला नव्हता आणि त्यांच्या २ मुलींच्या एडमिशन साठी ते चिंताग्रस्त होते . कंत्राटी सफाई कामगारांना ठेकेदार किवा पालिका प्रोव्हिडंड ,इ एस आय ,विमा अशा कोणत्याच सुविधा देत नाही अशी तक्रार कामगारांनी केली
राष्ट्रवादी युवक काँग्रेस पर्वती मतदार संघ अध्यक्ष सतीश वाघमारे ,दुर्गामाता मित्रमंडळ ,बंधुत्व मित्र मंडळ आणि परिसरातील कार्यकर्त्यांनी दिवसभर नितीन मांजरेकर यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी धावपळ केली

0

दिग्दर्शक दिपक सवाखंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छ्या

आदिवासी भागातील मुलांची गरुड झेप ‘भारतीय जैन संघटने’च्या विद्यालयाचा निकाल १०० टक्के

पुणे- कोणतीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसलेल्या आणि सर्वच दृष्टीने मागास असलेल्या आदिवासी भागातील मुलांनी, भारतीय जैन संघटनेच्या मदतीने गरुड झेप घेतली आहे. सर्वसाधारण शहरी भागात राहणाऱ्या मुलांच्या बरोबरीने, आदिवासी भागातील मुलांनी शालांत परीक्षेत मोठे यश मिळविले असून, त्यांनी मिळविलेले यश, हे नक्कीच कौतुकाचा विषय ठरायला हवे.
पालघरच्या डहाणू तालुक्यातील, गंजाड गावातील वरखंड पाड्यावरचा समीर वरखंडे, याला नुकत्याच झालेल्या शालांत परीक्षेमध्ये ८९.६० टक्के इतके गुण मिळाले आहेत. त्याला गणितामध्ये ९६, मराठीमध्ये ८६ आणि शास्त्र विषयात ९४ गुण मिळाले.
सुरज भंडारी याच्यावर, तर परीक्षेपूर्वी एक महिना अगोदर एक शस्त्रक्रिया झाली होती. पण त्याने परीक्षेला बसून ८२
टक्के गुण मिळविले. नितीन तांडेल, दीपक सुमडा, कारण कोंड्या अशी ‘भारतीय जैन संघटने’च्या ‘शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पा’तील सर्वच्या सर्व ५६ मुले पहिल्याच प्रयत्नामध्ये शालांत परीक्षेत यशस्वी झाली आहेत. ८० टक्के मुलांना ६० टक्क्यांपेक्षा जास्त, तर ४ मुलांना ८० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत.
या विद्यार्थ्यांचे यश यासाठी महत्त्वाचे आहे, की इयत्ता ५ विला येण्यापूर्वी त्यांची ‘भारतिय जैन संघटने’तर्फे चाचणी परीक्षा घेण्यात आली होती, तेंव्हा त्यांना गणितामध्ये १० पैकी केवळ ३-४ गुण मिळाले होते आणि आज ही मुले सर्वसामान्य मुलांशी स्पर्धा करीत, त्यांच्या बरोबरीने यशस्वी झाली आहेत. समीर वरखंडे तर विद्यालयात पहिला आला आहे. ‘भारतीय जैन संघटने’च्या दीर्घ पल्ल्याच्या कामाचे हे, आज भरभरून दिसणारे यश आहे.
‘भारतीय जैन संघटने’च्या वाघोली येथील शाळेचा यावर्षीचा दहावीचा निकाल आहे, ९९.४७ टक्के, आणि आदिवासी
भागातील सर्व ५६ मुले अतिशय चांगले गुण मिळवून पास झाले आहेत. पालघरच्या विविध पाड्यावरून सहा वर्षांपूर्वी ही मुले, ‘भारतीय जैन संघटने’च्या ‘शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पा’मध्ये वसतीगृहात दाखल झाली होती. केवळ पालघरच्या आदिवासी भागातूनच नव्हे, तर मेळघाटच्या पट्ट्यातील अनेक मुले दरवर्षी या प्रकल्पामध्ये दाखल होतात आणि जीवनाच्या स्पर्धेसाठी सक्षम होउन बाहेर पडतात. मेळघाटमधील २५ मुले आता यावर्षी दहावीला गेली असून, सध्या अशी ३०० मुले इथे शिक्षण घेत आहेत.
‘भारतीय जैन संघटने(बीजेएस)ने १९९३ साली लातूर भूकंपानंतर १००० भूकंपग्रस्त अनाथ मुलांना शिक्षणासाठी
पुण्यात आणले आणि या ज्ञान यज्ञाला सुरुवात झाली. लातूर, उस्मानाबादची मुले त्यांचे शिक्षण पूर्ण करून गेल्यानंतर, महाराष्ट्रातील ठीक-ठिकाणची अनाथ मुले आणि मेळघाट, ठाणे-पालघरमधील आदिवासी भागातील मुले या प्रकल्पात येऊ लागली आणि आता ही मुले यशस्वी होऊन परतत आहेत. केवळ शाळांत परीक्षाच नव्हे, तर नवोदय विद्यालय, राष्ट्री परज्ञा शोध परीक्षा, राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरच्या शालेय क्रीडा स्पर्धा अशा सर्वच ठिकाणी ही मुले चमकताना दिसतात. ‘पुनर्वसन प्रकल्पा’चे व्यवस्थापक सुरेश साळुंखे म्हणाले, “आम्ही या मुलांना त्यांच्या पाड्यावर जाऊन निवडतो. त्यांची पूर्व परीक्षा घेतो. आरोग्य चाचणी घेतो. त्यातून मुले निवडतो आणि त्यांचा ५ वी ते १२वी पर्यंतचा राहण्याचा, जेवणाचा, शिक्षणाचा सगळा खर्च करून, या मुलांना उभे करण्याचा प्रयत्न करतो. मुलांना दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमध्येही आम्हीच आमच्या खर्चाने त्यांच्या घरी नेतो आणि आणतो. शाळेबरोबरच, वसतिगृहामध्ये विषयांचे अधिक वर्ग घेतो. खेळ, संगीत अशा विषयांमध्येही तयारी करून घेतो.”
अधीक्षक राहुक कदम यांनी सांगितले, की नियमितपणे मुलांची आरोग्य तपासणी केली जाते. त्यातूनच या मुलांच्या आरोग्यामध्ये लक्षणीय फरक दिसू लागतो. खास मुलांसाठी, प्रकल्पामध्येच छोटे रुग्णालय आणि रुग्णवाहिका देखील आहे. या मुलांना जे जे आवश्यक आहे, ते सगळे देण्याकडे संस्थेचा भर आहे.
लातूर, गुजरात, जम्मू-काश्मीर आणि आता नेपाळ, ज्या ज्या ठिकाणी नैसर्गिक आपत्ती आली, त्या त्या ठिकाणी ‘भारतीय जैन संघटने’चे अध्यक्ष शांतीलाल मुथ्था गेले आणि त्यांनी तिथे मदतीचे नियोजन केले आणि त्यानंतर तिथल्या मुलांना पुण्यात आणून त्यांचे पुनर्वसन केले. आता याचप्रकारचे काम ते आणि त्यांचे सहकारी आदिवासी भागासाठी करीत आहेत. ते म्हणाले, “एखाद्या मोठ्या प्रश्नावर काम करायचे असल्यास, त्यावर दीर्घकालीन काम केल्याशिवाय, परिणाम दिसत नाहीत. आदिवासी भागामध्ये बदल करायचे असतील, तर त्या त्या भागातील मुले तयार झाली पाहिजेत. त्यांच्यासाठी त्यांचा लहानपणापासूनच अनेकवर्षे काम करावे लागेल. मग हीच मुले त्या त्या भागामध्ये ‘बदलाचे दूत’ म्हणून काम करतील. आम्ही मुलांना केवळ शिक्षण देतो असे नाही, तर अभ्यासेतर उपक्रमांसह सर्व प्रकारची आव्हाने पेलण्याची ताकद  आणि संस्कार व मूल्यं देतो, त्यातूनच असे आश्चर्य वाटावे असे परिणाम दिसतात.”  शांतीलाल मुथ्था म्हणाले, की असे प्रकल्प उभे राहू शकतात, याचे उदाहरण आम्ही उभे केले आहे. शासनाने मनावर घेतल्यास, असे अनेक प्रकल्प उभे राहतील.

टेरिफ कार्ड नाहीच -मीटरप्रमाणे च रिक्षा भाडे घ्या अन्यथा 1 हजार रुपये दंड

पुणे – टेरिफ कार्ड नाहीच -मीटरप्रमाणे च रिक्षा भाडे घ्या अन्यथा 1 हजार रुपये दंड अशी भूमिका उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील यांनी जाहीर केली आहे आणि मीटर रिकॅलिबरेशन केल्याशिवाय वाढीव भाडे घेणे नियमबाह्य आहे. त्यामुळे कोणताही रिक्षाचालक जर याप्रकारे जादा भाडे आकारत असेल तर त्याची तक्रार प्रवाशांनी आरटीओकडे करावी. असे आवाहन हिप्रवासी वर्गाला  केले आहे
रिक्षा मीटर रिकॅलिबरेशन (पुर्नप्रमाणिकरण) केल्याशिवाय टेरिफ कार्ड दाखवून वाढीव दराने भाडे आकारणाऱ्या रिक्षाचालकांना एक हजार रुपयांचा दंड करण्यात येणार आहे. अशा प्रकारे रिकॅलिबरेशन न करता जादा भाडे आकारणाऱ्या रिक्षाचालकाची तक्रार प्रवाशांना प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) करता येणार आहे. या तक्रारीच्या आधारे आरटीओच्या वतीने त्या रिक्षाचालकाकडून एक हजार रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील यांनी सांगितले.
पुणे शहर व परिसरामध्ये एक जुलैपासून रिक्षा भाडेवाढ लागू झाली आहे. मीटर रिकॅलिबरेशन केल्याशिवाय वाढीव भाडे आकारू नये, असा नियम आहे. मात्र, भाडेवाढीच्या पहिल्या दिवसापासून रिक्षाचालकांनी मीटर रिकॅलिबरेशनशिवाय जादा भाडे वसूल करण्यास सुरुवात केली आहे. जादा भाडे आकारल्यामुळे अनेक ठिकाणी वादाचे प्रसंगही उद्‌भवले.
रिकॅलिबरेशनचे काम लवकरात लवकर पूर्ण करून रिक्षाचालकांचे नुकसान टाळावे, यासाठी रिक्षा संघटना प्रयत्न करीत आहेत. संघटनेच्या प्रयत्नांना प्रशासनही सकारात्मक प्रतिसाद देत आहे, असे रिक्षा पंचायतीचे निमंत्रक नितीन पवार यांनी सांगितले. रिकॅलिबरेशनच्या कामास जर जास्त कालावधी लागत असेल तर संघटना रस्त्यावर उतरेल, असा इशाराही त्यांनी दिला.

हेमा मालिनींच्या कारच्या धडकेने चिमुकलीचा मृत्यू, ड्रायव्हर अटकेत, हेमामालिनीही जखमी

0

hema12A2E78C100000578-3147696-Hema_Malini_at_a_hospital_in_Jaipur-m-3_1435876960795hema-malini-car-accident-1hema-car-accidenthema-malini-accident-4-650_070215115657

जयपूर – राजस्थानमधील दौसा येथे भाजप खासदार हेमा मालिनी यांच्या मर्सिडीझ गाडीने एका अल्टो कारला जोरदार धडक दिली. समोरासमोर झालेल्या या अपघातात ४ वर्षाच्या सोनम या मुलीचा घटनास्थळीच मृत्यू झाला आणि हेमा मालिनी यांच्यासह ५ जण जखमी झाले. हेमा मालिनी यांच्या डोक्याला दुखापत झाली असून त्यांच्यावर जयपूर येथील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.दरम्यान,  याप्रकरणी हेमा मालिनी यांच्या मर्सिडीजचा चालक महेश ठाकूरला पोलिसांनी आज अटक केली.
हा अपघात काल रात्री ८.५५ वाजता झाला. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळाला वरिष्ठ पोलीस आणि प्रशासकीय अधिका-यांनी भेट दिली.
अल्टो कारमध्ये असलेल्या दीडवर्षीय चिन्नी खंडेलवाल हिचा मृत्यू झाला आहे. या अपघातात या मुलीचे वडील हनुमान (30), आई शिखा (28), भाऊ शोमिल (4) आणि सीमा (45) हे चार जण जखमी झाले आहेत. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अल्टो कारमध्ये जाणारे हेे कुटुंब जयपूरहून लालसोटकडे जात होते. मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया यांनी ट्विटद्वारे दुःख व्यक्त केले आहे.
हेमा मालिनी त्यांच्या मर्सिडीझ कारमध्ये मेहंदीपूर बालाजीचे दर्शन घेऊन मथुरेला जात होत्या. त्यावेळी जयपूर-आग्रा हायवेवर दौसा येथे समोरून येणाऱ्या अल्टो कारबरोबर त्यांच्या गाडीची जोरदार धडक झाली. त्यात दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हेमा मालिनी यांच्या डोक्याबरोबरच त्यांच्या पायाला आणि हातालाही जखमा झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना उपचारासाठी जयपूरच्या फोर्टीस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हेमा मालिनी यांची प्रकृती स्थिर असल्याचे फोर्टिस हॉस्पिटलच्या प्रवक्त्याने सांगितले. प्लास्टिक सर्जन डॉ. संदीपन मुकुल आणि न्युरो सर्जन हेमंत भारतीय यांच्या नेतृत्वाखाली एक टीम हेमा मालिनी यांच्यावर उपचार करत आहे. अपघात होताक्षणी एअरबॅग उघडल्यामुळे हेमा मालिनी यांना मोठी दुखापत झाली नाही. मात्र डोक्याच्या उजव्या बाजूला कपाळावर जोरात मार लागल्याने त्या भागातून सतत रक्त येत होते. हा रक्तस्त्राव थांबवण्यासाठी डॉक्टरांनी तातडीने उपाय सुरु केले आहेत. हेमा मालिनी यांच्या डोळा आणि नाकालाही जबर मार लागला आहे. हेमा मालिनींचे कुटुंबीय जयपूरमध्ये आज पोहोचणार आहेत.
अशी माहिती दौसाचे जिल्हाधिकारी स्वरूप पवार यांनी दिली. हेमा मालिनी यांचा ड्रायव्हर अती वेगाने कार चालवत होता, असे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले तर अल्टो चुकीच्या दिशेने पुढे आल्याने अपघात झाला असे काहींचे म्हणणे आहे.
दौसाचे पोलिस अधीक्षक अंशुमान भौमिया यांनी सांगितले, की ओव्हरस्पीडमुळे अपघात झाला असण्याची शक्यता आहे. कारण अल्टो कार चालकाच्या म्हणण्यानूसार वळणावर त्याला कोणतेही वाहन येत असल्याचे दिसले नव्हते.

विमान रोखून धरले ? मुख्यमंत्री व्यथीत तर पंतप्रधान कार्यालयाने मागविला अहवाल

नवी दिल्ली –
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सचिवामुळे विमान दीड तास रखडले आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजीजू यांच्यामुळे विमानाला झालेला उशीर या दोन्ही प्रकरणांवर पंतप्रधान कार्यालयाने नागरी उड्डाण  मंत्रालयाकडे अहवाल मागवला आहे. तर दुसरीकडे अमेरिकेला जाणारे विमान रोखून धरल्याचा आरोप केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्यथित झाले असून मी विमान रोखून धरल्याचा प्रकार दिशाभूल करणारा असल्याचे म्हटले आहे.
मीडियात विमान रोखून धरल्याच्या  घटनेवर  जोरदार चर्चा झाल्यानंतर पंतप्रधान कार्यालयानेही याची देखील घेतली आहे. एअर इंडियाच्या विमानांना व्हिआयपींमुळे उशीर झाल्याच्या घटना नुकत्याच समोर आल्याअसून त्याचा अहवाल नागरी उड्डयान मंत्रालयाकडून मागवण्यात आला आहे, असे सरकारच्या मुख्य प्रवक्त्यांकडून सांगण्यात आल्याचे टाइम्स नाऊने ट्विट केले आहे. तसचे एअर इंडियाच्या विमानाला उशीर झालेल्या घटनांची माहिती आम्ही घेत आहोत, असे नागरी उड्डयान मंत्रालयाचे सचिव आर. एन. चौबे यांनी यांनी दिल्लीत सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. रवाना होण्यापूर्वी त्यांच्या ताफ्यातील एका अधिकाऱ्याच्या पारपत्राबाबत अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे  तब्बल एक तासापेक्षा अधिक काळ विमान रोखून धरल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान या साऱ्या आरोपांमुळे व्यथित होऊन फडणवीस यांनी आज ट्‌विटरद्वारे स्पष्टीकरण दिले आहे. त्यामध्ये त्यांनी “मी वेळेत विमानात बसलो होतो. मागील आणि पुढील प्रवाशी याला साक्षीदार आहेत. मी वेळेत शांतपणे माझ्या जागी बसलो होतो.‘ असे फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच हे आता पुरे झाले मी भारतात परतल्यावर या प्रकरणी बदनामीचा गुन्हा दाखल करणार आहे‘ असा इशाराही त्यांनी दिला आहे.

दहीहंडीचा थर २० फुटाचाच- उच्च न्यायालयाचेही शिक्कामोर्तब

0

मुंबई :

दहीहंडीचा थर २० फुटाचाच राहील आणि या खेळात १८ वर्षाखालील मुलांचा समावेश करता येणार नाही या निर्णयावर आता मुंबई उच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केले आहे दहीहंडीचे थर 35 फूट करावी तसंच 14 वर्षांवरील मुलामुलींना सहभागी करण्यास परवानगी द्या, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे गोविंदा पथकांना 20 फूट उंचीचेच थर लावता येतील आणि 18 वर्षांखालील मुलांचा समावेश करता येणार नाही.हे आता स्पष्ट झाले आहे गेल्या वर्षी ऐन दहीहंडीच्या तोंडावर उच्च न्यायालयाने निर्बंध घातले होते. पण गोविंदा पथकाच्या मंडळांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितल्याने त्यावरील तात्पुरते निर्बंध हटवण्यात आले होते. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने या निर्बंधांवर शिक्कामोर्तब केलं आहे.दहीहंडीचा घातक खेळांमध्ये समावेश करा;कारवाईसाठी मुंबई पोलिस कायद्यात दुरुस्ती करावी;धर्मादाय आयुक्तांनी आयोजकांना मिळणाऱ्या पैशांची चौकशी करावी;जखमी गोविंदाला तातडीने रुग्णालयात नेण्याची व्यवस्था करावी असे निर्देश हि न्यायालयाने दिले आहेत