मुंबई-‘गणेशोत्सव दणक्यात साजरा करा, विघ्नांना घाबरू नका, शिवसेना पाठिशी आहे,’अशी स्फूर्ती आज शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना दिली वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात आज महापालिका अधिकारी व गणेशोत्सव समन्वय समितीची संयुक्त बैठक झाली. या बैठकीनंतर समन्वय समितीच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना उद्धव यांनी गणेशोत्सव मंडळांच्या मागे ठामपणे उभे राहणार असल्याचे स्पष्ट केले.यावेळी गणेशोत्सवातील जल्लोषाला विरोध करणाऱ्यांवर आणि त्याविरोधात न्यायालयात जाणाऱ्यांवर उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली. ‘गणेशोत्सव भारतात नाही तर काय पाकिस्तानात साजरा होणार? या उत्सवाला ब्रिटिशांनी विरोध केला नाही, मग तुम्ही का विरोध करता? अशा प्रश्नांची सरबत्ती करतानाच, ‘हा मुर्दाडांचा उत्सव नाही, जिवंत माणसांचा उत्सव आहे तो दणक्यातच साजरा होणार,’ असे उद्धव यांनी विरोधकांना ठणकावले.
प्रत्येक गणेशोत्सवाच्या वेळी काही-ना-काही अडथळे आणणाऱ्यांवर त्यांनी टीका केली. ‘गणेशोत्सवाला विरोध करणाऱ्यांनी मंडळांच्या सामाजिक कार्याकडेही लक्ष द्यावे, असं उद्धव म्हणाले. ‘शहरात बॉम्बस्फोट झाले, त्यातील आरोपींविरोधात अद्याप खटले सुरू आहेत. या विरोधात कोणाला न्यायालयात जावेसे वाटत नाही. पण आपलेच लोक आपल्याच उत्सवांच्या विरोधात जातात. नमाजाच्या भोंग्याच्या विरोधात त्यांच्यातला कुणी न्यायालयात गेल्याचे दिसत नाही. मग आमच्याच उत्सवात विघ्न का,’ असा संताप व्यक्त करून, ‘विघ्नांना घाबरू नका, शिवसेना पाठिशी आहे,’ असे आश्वासन उद्धव यांनी यावेळी समन्वय समितीला दिले. गणेशोत्सव समितीसाठी कार्यालय उपलब्ध करून देण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
गणेशोत्सव दणक्यात साजरा करा, विघ्नांना घाबरू नका, शिवसेना पाठिशी आहे–उद्धव ठाकरे
भारतात सर्वात जास्त गरीब आणि दलितांनाच फासावर लटकवलं जातं- न्यायमूर्ती ए. पी. शाह
नवी दिल्ली ‘भारतात सर्वात जास्त गरीब आणि दलितांनाच फासावर लटकवलं जातं. त्यामुळं कायद्यातील मृत्यूदंडाच्या शिक्षेच्या तरतुदीवर गंभीरपणे फेरविचार होण्याची गरज आहे.’
हे खळबळजनक मत विधी आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती ए. पी. शाह यांनी स्वत: तसं निरीक्षण करून नोंदवलं आहे. ‘युनिव्हर्सल अॅबॉलिशन ऑफ डेथ पॅनल्टी: अ ह्युमन राइट्स इम्परेटिव्ह’ या विषयावर व्याख्यान देताना शाह यांनी हे वक्तव्य केलंय. दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती असलेल्या शाह यांनी आपलं मत मांडताना व्यवस्थेतील विसंगतींवर बोट ठेवले. ‘आपल्या देशात सर्वसाधारणपणे गरीब आणि दलितच मृत्यूदंडाचे बळी ठरतात, असं दिसतं. कारण आपल्या व्यवस्थेत अनेक विसंगती आहेत. त्या दूर करण्याची गरज आहे. एखाद्या गुन्ह्याची शिक्षा देण्यासाठी पर्यायी मॉडेलची आवश्यकता आहे,’ असं ते म्हणाले.
पुण्याचा पाहुणचार घेवून संत निघाले पंढरीला ….



पुणे – साधु संत येती घरा, तोची दिवाळी दसरा अशा आनंदी वातावरणात ज्ञानोबा -तुकाराम आणि अन्य संतांच्या पालख्यांचा पुणेकरांनी उत्कट भावनेने पाहुणचार केला.आज सकाळी ज्ञानोबा माउली आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांना भक्तिभावाने पंढरपूरकडे मार्गस्थ हि केले आज सकाळी दोन्ही पालख्या पुण्याहून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्या आहेत.
शनिवारी माऊलींनी पुण्यामध्ये मुक्काम केल्यानंतर रविवारी सर्व संत मंडळींच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने रवाना झाल्या. नाना पेठेत मुक्कामी असलेली संत तुकाराम महाराजांची पालखी सकाळी साडे सहा वाजता पुढील मार्गक्रमणासाठी रवाना झाली. तर भवानी पेठेत मुक्कामी असलेली संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सकाळी सहा वाजता मार्गस्थ झाली.
आज सकाळी संत ज्ञानेश्वरांच्या पालखीची शिंदे छत्रीजवळ परंपरागत आरती झाली. त्यानंतर हडपसरमध्ये अल्पविश्रांती घेण्यात आली आज सकाळी संत तुकाराम महाराजांची पालखी हडपसरमधील अल्पविश्रांतीनंतर सोलापूर रस्त्याने पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली संत ज्ञानेश्वरांची पालखी आज दुपारी अडीच वाजता दिवेघाटापर्यंत पोचली आज ती सासवड यथे मुक्कामी असेल .
विठ्ठलनामाच्या गजरातील उत्साही वातावरणात पालखी आगेकूच करत आहे. पालखीच्या पुण्यातील वास्तव्यात पुणेकरांनी प्रचंड उत्साहात पालखीचे स्वागत केले होते. आजही पालखी सोहळ्यात पुणेकरांनी गर्दी केली आहे. विशेषत: तरुणांची उपस्थिती लक्षणीय आहे. आज अधिकमासातील कमला एकादशी असल्याने वारकऱ्यांच्या उत्साहाला उधाण आले होते. संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची पालख्या हडपसरपर्यंत एकत्र होत्या . तेथून पुढे वेगळ्या वाटेने दोन्हीही पालख्या पांडुरंगाकडे धावघेतली . संत तुकारामांची पालखी सकाळी पावणे दहा वाजता हडपसरमध्ये पोचली. तर अल्पशा विश्रांतीनंतर सोलापूर रोडने पुढील प्रवासासाठी रवाना झाली. तर संत ज्ञानेश्वरांची पालखी सकाळी पावणे दहाच्या सुमारास सासवड मार्गे निघाली.
दोन्हीही पालख्यांनी हडपसरमध्ये अल्पविश्रांतीसह अल्पोपहार घेतला. एकादशीच्या निमित्ताने बहुतेक वारकऱ्यांना उपवास असल्याचे ठिकठिकाणी विविध संघटना, संस्थांच्यावतीने उपवासाच्या अल्पोपाहराचे वितरण करण्यात आले. दिवेघाटातील 33 किलोमीटरचा विनाथांबा प्रवास असल्याने संत ज्ञानेश्वरांच्या पालखीतील आजचा दिवस वारकऱ्यांसाठी सत्वपरीक्षा असल्याचे मानले जाते. तर शनिवारी आपला नगर जिल्ह्यातील डोंगलगाव येथील मुक्कामानंतर संत निवृत्तीनाथांची पालखी पुढे मार्गस्थ झाली आहे.




शिवसेनेच्या जीवावरच राज्यातले भाजप सरकार – अजित पवार
पुणे-उद्धव ठाकरे ठरवतील तो फडणवीस सरकारचा अखेरचा दिवस असेल असे स्पष्ट प्रतिपादन करीत राज्यातले सरकार तरी शिवसेनेनच्याच कृपेवर चालले असल्याचा गर्भित इशारा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे दिला
अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना भाजप-शिवसेनेत सुरू असलेल्या कुरबुरींबाबत थेट भाष्य करताना, सांगितले कि ‘राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारकडे पूर्ण बहुमत नसून, शिवसेनेने अनेक मुद्द्यांबाबत विरोधी भूमिका घेतली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी वेगळा निर्णय घेतला, तर फडणवीस सरकारचा तो अखेरचा दिवस असेल,’ असे नमूद करीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सरकारच्या अस्थितरतेवर बोट ठेवले. भाजप-शिवसेनेतील दरी वाढत चालली असल्याने मुदतपूर्व निवडणुकीसाठी तयार राहण्याचा संदेश राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला असतानाच, अजित पवार यांनीही त्याचीच री ओढत फडणवीस सरकारच्या भवितव्याची दोरी शिवसेनेच्या हाती असल्याची टिपण्णी केली.
पवार म्हणाले, राज्यातील नव्या सरकारमधील मतभेद मात्र अवघ्या सात महिन्यांतच चव्हाट्यावर आले असून, शिवसेनेच्या मुखपत्रातूनच सरकारच्या अनेक निर्णयांवर जाहीर टीका केली जात आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी निर्णय घेतला, तर भाजपच्या अल्पमतातील सरकारचे दिवस भरले.’
‘नुसताच लाल दिवा मिळाला; पण अधिकार मिळाले नाहीत, निर्णयप्रक्रियेत सामावून घेतले जात नाही, अशी तक्रार सत्तेत सहभागी असलेल्या भाजपच्या मित्रपक्षाकडूनच केली जात आहे. भारत-पाक संबंधांविषयी देखील शिवसेनेकडून वेगळा विचार व्यक्त केला जात असल्याने हे सरकार किती काळ तग धरेल, याबद्दल शंका आहे,’ असेही पवार म्हणाले.
अंधशाळेतील विद्यार्थींनीना ‘अंकनाद अॅप’ची भेट
पुणे शहर ‘राष्ट्रवादी काँग्रेस’तर्फे कृतज्ञता पर्वामुळे मान्यवर भारावले ; अजित पवार यांनी मान्यवरांच्या घरी जाऊन केला सत्कार

पालख्यांचे स्वागत झाले लई भारी …
पुणे- महापालिकेतील अधिकाऱ्यांनी आणि तमाम पुणेकरांनी काळ पुण्यात आलेल्या संत तुकाराम आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्यांचे आणि वारकऱ्यांचे स्वागत लई भारी केले . पालिका आयुक्त कुणाल कुमार , सह आयुक्त ज्ञानेश्वर मोळक, विलास कानडे , जनसंपर्क अधिकारी संजय मोरे यांच्यासह कित्येक अधिकारी आणि कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने वारीत दिसले . महापौर दत्ता धनकवडे , उपमहापौर आबा बागुल तसेच काही आमदार माजी आमदार , नगरसेवक , असा राजकीय नेते कार्यकर्त्यांचा ताफा हि नेहमीप्रमाणे स्वागताला सज्ज होताच . पुणे बार असोसिअशन चे पदाधिकारी प्रसिध्द वकील शिरीष शिंदे , राणी कांबळे इत्यादी असंख्य मान्यवरांसह अनेक नागरिक हि त्यासाठी आणि वारकऱ्यांना सहाय्य- मदतीसाठी स्वयंस्फूर्तीने पुढे आले होते यापूर्वीच्या बातम्या प्रसिध्द करताना हीअर्थात काही फोटो प्रसिध्द केले आहेतच पाहू यात उर्वरित काही फोटो
कात्रज तलावाच्या परिसरात २६ फुट उंचीचा विठूराया अवतरणार
पुणे-कात्रज येथे २६ फुट उंचीची विठ्ठलाची मूर्ती नगरसेवक वसंत मोरे बसविणार आहेत जागतिक मराठी भाषा दिना दिवशी आषाढ़ी एकादशीला हि मूर्ती स्थानापन्न करण्याचा त्यांचा मानस आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी फायबरची 26 फूटी मूर्ति कात्रज तलावावर स्वखर्चाने बसवनार असे वचन श्री वसंत मोरे यांनी भाविकांना दिले होते ते 5 महिन्यामधे पूर्ण होत आहै येत्या 27 तारखेला ला ही भव्य मूर्ति तलावावर बसणार आहे नुकतीच माउली जंगले यांनी मूर्तिला भेट दिली आणि त्यांचे कौतुक केले
शरद पवार यांच्या अमृत महोत्सवनिमित्त गौरव समारंभाला सुरुवात
पुणे- राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या अमृत महोत्सवनिमित्त ७५ विविध मान्यवरांचा गौरव केला जाणार आहे त्याची सुरवात आज श्री अजित पवार यांचे हस्ते झाली.आज डॉ के एच संचेती प्रा शं ना नवलगुंदकर बी आर खेडकर हुकुमचंद चोरडिया दादा वासवानी आणि पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष जितेंद्र अष्टेकर यांचा गौरव करण्यात आला.
ओळख…टीमचा सिंबॉयसिसच्या विद्यार्थ्यांशी सवांद…
पुणे येथील सिंबॉयसिस महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसोबत ‘ओळख माय आयडेंटिटी’ या मराठी चित्रपटाच्या टीमने नुकताच सवांद साधला.
जमील खान दिग्दर्शित आणि भूषण पाटील, खुशबु तावडे, अलका कुबल-आठल्ये, अरुण नलावडे अभिनित ओळख माय आयडेंटिटी हा मराठी चित्रपट येत्या ३१ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असून, चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ओळख…टीम या महाविद्यालयात दाखल झाली होती. बिजनेस मैनेजमेंट आणि फिल्म मेकिंगच्या विद्यार्थ्यांना ओळख टीमने चित्रपटाविषयी आणि आपल्या भूमिकेबबत माहिती दिली. तर विद्यार्थ्यांनी, निर्माते आणि दिग्दर्शकांकडून चित्रपटाच्या तांत्रिक बाबीवर आणि निर्मीतीव्यवस्थेवर खोलवर चर्चा केली. यावेळी निर्माते हर्षादीप सासन आणि सह निर्मात्या शीतल राजवीर देखील उपस्थित होत्या.
संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर यांच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसमवेत मुस्लिम बांधवांनी सोडला रमजान चा उपवास
पुणे-
मुस्लिम बांधवांच्या रमजानच्या उपवासनिमित आणि संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर यांच्या पालखी सोहळ्यातील आलेल्या वारकरी बांधवासमवेत मुस्लिम बांधवांनी उपवास सोडला . मुस्लिम औकाफ वेल्फेअर ट्रस्ट व श्री समर्थ स्टोलधारंक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने वारीतील वारकरी आणि रमजानच्या उपवास करणारे मुस्लिम बांधवासाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय एकात्मता जोपासण्यासाठी करण्यात आले होते . सोमवार पेठेतील समर्थ व्यायाम मंदिरात हा कार्यक्रम झाला . या कार्यक्रमास मुस्लिम औकाफ वेल्फेअर ट्रस्टचे अध्यक्ष मुस्ताक पटेल ,पत्रकार सुनिल माळी , विघ्नहर्ता न्यायसचे विश्वस्त डॉ. मिलिंद भोई , बाबाजान दर्गाह ट्रस्टचे अध्यक्ष अड. ए. रेहमान , समर्थ व्यायाम मंदिराचे सचिव कांता येलवंडे , रफिक काझी , अड . नूरमोहम्मद तांबे , मेहबूब शेख , दीपक वनारसे , मरियम पटेल , फारुख बखला , आनंददास बाणे , मोहन डवरी , पांडुरंग चिकणे , शंकर खोपडे आदी मुस्लिम आणि वारकरी बांधव उपस्थित होते . यावेळी मुस्लिम बांधवानी दुआ म्हणली तर वारकरी बांधवांनी अभंगातून वारीचे महत्व पटवून दिले . आपण सर्व धर्म समभाव हा संदेश समाजाला देऊन राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडविले . अशा भावना व्यक्त करण्यात आल्या . यावेळी वारकरी बांधवानी शिरकुर्मा आणि फलाआहार देण्यात आला . तर मुस्लिम बांधवाना खजूर आणि फलाआहार देण्यात आला .
महावितरणकडून पालखी सोहळ्यात वीजसुरक्षेचे जनजागरण
पुणे : श्रीक्षेत्र देहू येथील संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे शुक्रवारी (दि. 10) महावितरणकडून
नाशिक फाटा येथे स्वागत करण्यात आले. यावेळी वीजसुरक्षा व बचतीबाबत जनजागरण करण्यात आले.
पिंपरी विभागाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात प्रभारी मुख्य अभियंता श्री. भालचंद्ग खंडाईत, कार्यकारी अभियंता
श्री. धनंजय औंढेकर, शरद रिनके यांची प्रमुख उपस्थिती होती. महावितरणचे अभियंता व कर्मचार्यांच्या वर्गणीतून
पालखीमध्ये सहभागी झालेल्या भाविकांना पिण्याचे पाणी व न्याहरीच्या पदाथार्ंची कापडी पिशवी देण्यात आली. या
पिशवीवर वीजबचतीचा संदेश छापण्यात आला आहे. तसेच पुणे लघु प्रशिक्षण केंद्गाने तयार केलेल्या वीजसुरक्षेच्या
माहितीपत्रकाचे वाटप करण्यात आले. यावेळी अनेक भाविकांनी महावितरणच्या अधिकार्यांशी संवाद साधला व
वीजसुरक्षा व बचतीबाबतच्या उपक्रमाचे स्वागत केले. आयोजनासाठी महावितरणचे रवींद्ग खडक्कर, एम. आर. साळुंके,
भाऊसाहेब सावंत, मनोहर कोलते, हरिविजय नाझरकर, मनोज पुरोहित, अनिल गावडा, एस.पी. शिवनेचरी आदींनी
पुढाकार घेतला.
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यनगरीत …
देहूहून पंढरपुरला निघालेली तुकाराम महाजारांची पालखी आपला आकुर्डी येथील दुसरा मुक्काम हलवून पुण्यामध्ये दाखल झाली. तुकाराम महाराजांच्या पालखीपाठोपाठ आळंदीहून निघालेली संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुण्यनगरीत दाखल जाली.
वाकडेवाडी जवळील पाटील इस्टेट येथे महानगरपालिकेच्या वतीने पालख्यांचे स्वागत करण्यात आले.ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी रथापुढे 27 व मागे 201 दिंड्या असून, तुकाराम महाराजांच्या पालखी रथापुढे 25 व मागे 304 दिंड्या आहेत.विविध राजकीय पक्ष,सामाजिक संस्था,संघटनां,सार्वजनिक गणेश मंडळांतर्फे तसेच सर्वधर्मिय नागरिकांच्या वतीने वारकऱ्यांना पिण्याच्या पाणी आणि खाद्यपदार्थांच्या पाकिटांचे वापट करण्यात येत होते.पालखी दर्शनाकरीता रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या.माऊली व तुकोबांच्या पालखी समोरून डौलाने चालणाऱ्या अश्वांचेही दर्शन नागरिक मोठ्या भक्तीभावाने घेत होते.
आषाढी एकादशीसाठी पंढरपूर येथे होणा-या वारीदरम्यान मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरते. तसेच तेथे शौचालयांची व्यवस्था नसल्याने वारीनंतर हाताने मैला साफ करण्याची कुप्रथा कायम असल्याची बाब एका स्वयंसेवी संस्थेने याचिकेच्या माध्यमातून उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली होती. न्यायमूर्ती अभय ओक यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने त्याची गंभीर दखल घेत ही कुप्रथा महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात सुरू असल्याबाबत राज्य सरकारला धारेवर धरले होते.
वारक-यांसाठी आवश्यक स्वच्छतागृहे तात्पुरत्या स्वरूपात उभारण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्याचबरोबर पंढरपूरच्या वाळवंटात तंबू उभारण्यासही बंदी घालण्यात आली होती. राज्य सरकारने या संदर्भात आवश्यक उपाययोजना न केल्यामुळे वारक-यांना त्याचा त्रास सहन करावा लागत असल्यामुळे वारकरी-फडकरी दिंडी समाजामध्ये नाराजीची भावना आहे.
















































