मोफत आरोग्य तपासणी शिबिरात 1000 वारकर्यांनी घेतला लाभ
‘महाराष्ट्र लोकसेवा हक्क विधेयक’ आज विधानसभेत मंजूर-
माजी नगरसेवक संजय नांदे यांचे निधन
पुणे-माजी नगरसेवक संजय नांदे यांचे मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास निधन झाले. अमरनाथ यात्रेसाठी गेले असता बद्रीनाथ येथे ह्दयाच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे वडील ,पत्नी , मुले ,भाऊ असा मोठा परिवार आहे . धनकवडी येथील महापालिकेच्या एका प्रभागातून सुभाष जगताप , जयश्री कांबळे यांच्या समवेत ते निवडून आले होते . पद्मावती हून गुलाबनगर कडे जाणाऱ्या मार्गावर क्रांतिसूर्य महात्मा फुले चौक अर्थात तीन हत्ती चौकाची जी सुरेख निर्मिती झाली त्यात त्यांचा महत्वपूर्ण सहभाग होता .नांदे हे मित्रांसमवेत अमरनाथ यात्रेला गेले होते. शनिवारी रात्री मुंबईहून विमानाने ते श्रीनगरला गेले. रात्री तिथे मुक्काम करून रविवारी त्यांनी अमरनाथच्या दिशेने कुच केले. सोमवारी रात्री त्यांनी सोनमर्गजवळील बालताल येथे मुक्काम केला. मंगळवारी सकाळी त्यांच्या सोबतचे काही मित्र घोडयावरून पुढे गेले. रामदास गाडे यांच्यासह नांदे चालत निघाले होते. सकाळी साडे नऊच्या सुमारास बालताल येथे काही अंतर चालून गेल्यानंतर त्यांच्या छातीमध्ये दुखू लागले. त्यानंतर त्यांना लगेच रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला
‘ भर दो झोली मेरी या मोहम्मद , लौटकर मै ना जावूंगा खाली ‘ (जुन्या कव्वालीची नवी बहारदार हवा – बजरंगी भाईजान )
पहा आणि ऐका कव्वाली
सलमान खान च्या बजरंगी भाईजान ची प्रचंड हवा सिनेरासिकात आहे या चित्रपटातील ‘ भर दो झोली मेरी या मोहम्मद , लौटकर मै ना जावूंगा खाली ‘ या (खरे तर जुन्याच असलेल्या )कव्वालीने प्रचंड वातावरण निर्मिती केली आहे २२ लाख ८८ हजाराहून अधिक लोकांनी ती केवळ पहिली आणि ऐकलीअसली तरी ७३ लाख ८० हजाराहून अधिक लोकांनी यु ट्युबवर हि कव्वाली सबस्क्राईब केली आहे . सलमान चे चाहते आणि तमाम रसिकांना या चित्रपट बाबत उत्सुकता लागून राहिली आहे पाहू या या चित्रपटातील हि कव्वाली …
स्मार्ट सिटी करिता ४० हजाराहून नागरिकांनी केल्या सूचना आणि मांडली मते
पुणे- पुणे शहराच्या स्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये लोक सहभाग असावा म्हणून महापालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत चक्क ४० हजाराहून अधिक नागरिकांनी आपापली मते आणि सूचना मांडल्या आहेत अशी माहिती महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी संजय मोरे यांनी येथे दिली
ते म्हणाले पुणे शहराच्या स्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये लोक सहभाग घेण्यासाठी शहराच्या विविध विकासकामे, प्रकल्प, योजना, करावयाची कामे, आवश्यक बदल, याकरिता नागरिकांकडून आपली मतं, सूचना मागविणे अर्थात लोक सहभाग वाढवून नागरिकांच्या सूचनानुसार स्मार्ट सिटीमध्ये आवश्यक अंतर्भाव करण्यात यावा याकरिता . महापौर दत्तात्रय धनकवडे व महानगरपालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी पत्रकार परिषदेद्वारे आवाहन केले त्यानुसार नागरिकांनी आपली मतं, आपल्या सूचना दि.२० जुलै,२०१५ रोजी पर्यंत महानगरपालिकेच्या smartcity.punecorporation.org किंवा punesmartcity.in यावर तसेच www.facebook.com/pmcpune यावर सूचना, मतं मागविली होती. त्यानुसार दिनांक १४/०७/२०१५ सायंकाळपर्यंत सुमारे ४०००० पेक्षा अधिक नागरिकांनी संपर्क साधला, तसेच ३५० पेक्षा अधिक नागरिकांकडून सूचना/ मतं प्राप्त झालेले आहेत.
वीज यंत्रणेच्या सुरक्षेसाठी राज्यात तात्पुरते भारनियमन-पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दिलासा : दोन टप्प्यात सव्वा तासांचे भारनियमन-
महावितरणचे सहकार्याचे आवाहन
मुंबई:- पावसाने मारलेली दडी, वातावरणातील उकाडा-उष्णता, ग्राहकांचा वाढता वीजवापर,
कृषिग्राहकांची वाढती मागणी यासर्व कारणांमुळें आजही राज्यात विजेची मागणी सुमारे 16,500 मे.वॅ. इतकी प्रचंड
वाढली आहे. विजेची उपलब्धता 15,000 ते 15,500 मे.वॅ. असल्याने वीज यंत्रणा वाचविण्यासाठी नाईलाजास्तव आज
दुसर्या दिवशीही सर्वच गटांमध्ये काही तासांचे अघोषित भारनियमन करण्यात आले.
महानिर्मितीने आज चंद्रपूर येथील 500 मे.वॅ.चा संच सुरूं केल्यामुळें महानिर्मितीच्या वीज उपलब्धतेत 4,055
मे.वॅ. एवढी वाढ झाल्याने मोठा दिलासा मिळांला. पाण्याअभावी परळी येथील 1,130 मे.वॅ. विजेची निर्मिती बंद आहे.
पवन ऊर्जेतून अपेक्षित असलेल्या 2,000 मे.वॅ. विजेमध्ये मोठ्या प्रमाणात घट होऊन तेथून आता केवळं 500 ते 600
मे.वॅ. वीज मिळंत आहे. अदानी पॉवरचा संच क्र. 4 (660 मे.वॅ.) हा तांत्रिक बिघाडामुळें बंद आहे. तसेच कोयना
प्रकल्पाचा टप्पा क्र. चार मधील एक संच (250 मे.वॅ.) तांत्रिक बिघाडामुळे बंद आहे. हे भारनियमन आटोक्यात
आणण्यासाठी कोयना येथून सध्या 1,500 मे.वॅ. विजेची निर्मिती होत आहे. याशिवाय पॉवर एक्सचेंजमधून
महावितरणने आजही 1,000 ते 1,200 मे.वॅ. वीज काही तासांसाठी विकत घेतली आहे.
ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून मिळेंल त्या सर्व स्त्रोतांमधून जास्तीत जास्त वीज उपलब्ध करण्याचा महावितरण
प्रयत्न करीत आहे. ही परिस्थिती उद्यापर्यन्त पूर्वस्थितीवर येण्याची शक्यता आहे. असे असूनही महावितरणने कृषिपंपाचे
भारनियमन न करण्याची दक्षता घेतली असून त्यांना निर्धारीत तासांचा वीजपुरवठा करण्यात येत आहे. जनतेने
महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दिलासा : दोन टप्प्यात सव्वा तासांचे भारनियमन-
पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील काही भागात बुधवारी (दि. 14) ‘अ’ गटातील 340 वाहिन्यांवर दोन टप्प्यात 1 तास
20 मिनिटांचे तात्पुरते भारनियमन करण्यात आले. पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये भारनियमनाच्या वर्गवारीनुसार ‘अ’
गटात एकूण 425 वाहिन्या आहेत. यातील 161 वाहिन्यांवर सकाळी 9.40 ते 10.45 दरम्यान 1 तास 05 मिनिटांचे
भारनियमन करण्यात आले. तर दुपारी 14.30 ते 14.45 या कालावधीत 179 वाहिन्यांवर 15 मिनिटांचे भारनियमन
करण्यात आले. याशिवाय ‘ब’ गटातील 12 वाहिन्यांवर 11 मिनिटे ते 2 तासांपर्यंत चक्राकार पद्धतीने भारनियमन
करण्यात आले. दुपारी 14.45 नंतर पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील तात्पुरते भारनियमन मागे घेण्यात आले.
पुणे परिमंडलात वीजदेयकांचा ऑनलाईन भरणा 66 कोटींवर
पुणे, : गेल्या जूनमध्ये पुणे परिमंडलातील महावितरणच्या 3 लाख 61 हजार 248 वीजग्राहकांनी इंटरनेटद्वारे
तब्बल 66 कोटी 43 लाख रुपयांच्या देयकांचा ऑनलाईन भरणा केला आहे. आतापर्यंतचा हा उच्चांक आहे.
रांगेत उभे राहण्याऐवजी घरबसल्या वीजदेयकांचा भरणा करण्यासाठी महावितरणने इंटरनेटद्वारे ऑनलाईन
बील पेमेंट सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पुणे परिमंडलात ऑनलाईन पेमेंटला मोठा प्रतिसाद मिळत आहे. डिसेंबर
2014 मध्ये साडेतीन लाख वीजग्राहकांनी वीजदेयकांपोटी तब्बल 52 कोटी 30 लाख रुपयांचा ऑनलाईन भरणा केला
होता. त्यानंतर जानेवारी ते मे 2015 पर्यंत यात वाढ होऊन जूनमध्ये तब्बल 3 लाख 61 हजार 248 ग्राहकांनी 66
कोटी 43 लाख रुपयांचा ऑनलाईन वीजबील भरणा केला आहे. गेल्या दीड वर्षात पुणे परिमंडलात ऑनलाईन
वीजदेयकांचा भरणा दुपटीने वाढला आहे.
गणेशखिंड मंडलमधील ऑनलाईन पेमेंट करणार्या ग्राहकांची संख्या जूनमध्ये एक लाख 84 हजारांवर गेली
असून त्यांनी 33 कोटी 45 लाखांचा वीजबील भरणा केला आहे. यात सर्वाधिक पिंपरी विभागात 72 हजार 829
ग्राहकांनी 9 कोटी 97 लाख रुपयांचा तसेच शिवाजीनगर विभागात 40 हजार 905 वीजग्राहकांनी 9 कोटी 6 लाख
रुपयांचा ऑनलाईन भरणा केला आहे.
रास्तापेठ मंडलमधील एक लाख 49 हजार 824 ग्राहकांनी गेल्या महिन्यात 26 कोटी 99 लाखांचा ऑनलाईन
वीजबील भरणा केला आहे. यात सर्वाधिक बंडगार्डन विभागात सर्वाधिक 6 कोटी 24 लाख तसेच नगररोड विभागात 6
कोटी 5 लाख रुपयांचा ऑनलाईन वीजबील भरणा झाला आहे. तसेच पुणे ग्रामीण मंडलातील 27 हजार 134 ग्राहकांनी
5 कोटी 99 लाखांचा ऑनलाईन वीजबील भरणा केला आहे.
महावितरणने www.mahadiscom.in या संकेतस्थळावर देयकांचा भरणा करण्याची सुविधा उपलब्ध
करून दिली आहे. सर्व लघुदाब वीजग्राहकांना क्रेडीट किंवा डेबीट कार्ड किंवा नेटबॅकींगद्वारे वीजदेयके भरण्याची सुविधा
उपलब्ध आहे. ऑनलाईन पेमेंटसोबत ग्राहकांना इमेलद्वारे वीजदेयक प्राप्त करण्याची सोय आहे. किंवा छापील
देयकांऐवजी फक्त इमेलद्वारे वीजबील पाहिजे असल्यास गो-ग्रीन हा पर्याय उपलब्ध आहे. गो-ग्रीनमध्ये देयकात तीन
रुपयांची सूट दिली जात आहे. याशिवाय वीजदेयक भरण्याची मुदत संपल्यानंतरही दंडाच्या रकमेसह देयक ऑनलाईन
भरणाची सोय उपलब्ध आहे. याबाबतची सर्व माहिती महावितरणच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
कुंभमेळ्यात भेदाभेद का ? मुख्यमंत्र्यांच्या भाषणा दरम्यान मंचावर साध्वीचा गोंधळ
नाशिक – कुंभमेळ्यातील मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यानच एका साध्वीनं व्यासपीठावरच गोंधळ घातला. पुरुष साधूंच्या बरोबरीने महिला साध्वींना सन्मान मिळालाच पाहिजे हे सांगण्यासाठी मुख्यमंत्र्यांपुढील माईक ओढून घेण्याचा प्रयत्न यावेळी त्यांनी केला साध्वींच्या आखाड्याला मान्यता मिळावी अशी मागणी करत साध्वीने गोंधळ घातला.25 सप्टेंबरला त्याचा समारोप होणार आहे. आज पहाटे या ठिकाणी ध्वजारोहण होताच साध्वींच्या एका संघटनेने बंडाचा ध्वज फडकावत या सोहळ्यात पुरुष साधूंच्या बरोबरीने सन्मान देण्याची अपेक्षा व्यक्त केली केली. शिवाय त्यांनी वेगळ्या आखाड्याची मागणी केली आहे. एवढेच नाही तर शाही स्नानासाठी जागेची मागणीसुद्धा केली आहे. या मागणीसाठी साध्वींनी आज झालेल्या सोहळ्यात थेट व्यासपीठावर जाऊन गोंधळ घातला.या बाबत साध्वी त्रिकाल भैरवनाथ सरस्वती महाराज म्हणाल्या , ‘‘ वेगळ्या आखाड्यासाठी आम्ही जिल्हाधिका-यांपासून ते मंत्र्यांना निवेदन दिले आहे. त्यांनी आम्हाला आश्वासनही दिले होते. पण, मेळा सुरू झाला तरीही त्याची पूर्तता केली गेली नाही. पुरुषांच्या बरोबरीने महिला या धार्मिक कार्यक्रमात भाग घेतात. असे असताना महिला साधू या पुरुष साधूच्या एकाही आखाड्याचा भाग नाहीत. त्यामुळे त्यांना स्वतंत्र आखाडा मिळायलाच हवा. आम्हाला जर स्वतंत्र आखाडा मिळाला तर या ठिकाणी अजून 15 हजार स्वाधी येणार आहेत’’, असेही त्या म्हणाल्या
कुंभमेळ्यात पहिल्याच दिवशी अनेक मान्यवरांना चोरट्यांनी आपले हिसके दाखविले दागिने पाकिटे — मोबा ईल यांच्या मोठ्या प्रमाणात चोऱ्या झाल्या , मीडियातील एका महिलेचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याचा प्रकार हि घडला
बारा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर सिंहस्थ कुंभमेळ्याला आज प्रारंभ
कुंभमेळ्यासारख्या महापुष्करम उत्सवात चेंगराचेंगरी -27 ठार
हैदराबाद -आंध्र प्रदेशातील गोदावरी नदीकाठावरील ऐतिहासिक ‘पुष्कर’ मेळ्यात आज चेंगराचेंगरी झाली. यात २५ महिलांसह २७ जण ठार झाले. २५ जण जखमी झाल्याचे समजते. त्यांना जवळच्या रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे.
आंध्र प्रदेशातील गोदावरी नदीकाठावर पुष्कर मेळा भरला आहे. गोदावरीत स्नानासाठी लाखोंच्या संख्येने भाविक आले आहेत. अलोट गर्दीमुळे तेथे चेंगराचेंगरी झाली. त्यात २५ महिलांसह २७ जण ठार झाले. २५ जण जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयांत उपचार सुरू आहेत, अशी माहिती प्रशासनाने दिली.
कुंभमेळ्याप्रमाणेच आंध्रप्रदेशामध्ये दर 12 वर्षांनी गोदावरी नदीच्या काठी पुष्करम या उत्सवाचे आयोजन केले जाते. पवित्र गोदावरी नदीमध्ये स्नान करणे हे या उत्सवातील मुख्य वैशिष्ट्य असते. यंदाचा उत्सव हा 144 वर्षांतून एकदा येणारा असल्याने त्याला महापुष्करम असे म्हटले जात आहे. त्यामुळे यंदा येणाऱ्या भाविकांची संख्याही जास्त असेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.12 दिवस चालणाऱ्या या महोत्सवात कोट्यवधी भावीक याठिकाणी भेट देणार असल्याची शक्यता आहे. या ठिकाणी आंघोळीसाठी जवळपास 263 घाट आहेत. तर तेलंगणामध्ये अशा प्रकारचे 106 घाट आहेत. या घाटांवर पवित्र स्नान करण्यासाठी भावीक मोठ्या प्रमाणावर गर्दी करणार आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर तयारी करण्यात आलेली आहे.
अधिवेशनाचा पहिला दिवस -राजकीय गदारोळाने गाजला
मुंबई – ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची मागणी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी केली विधानसभेच्या अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत फलक फडकावित काही आमदारांनी घोषणा दिल्या. या गोंधळातच मंत्र्यांनी अध्यादेश व विधेयके सभागृहात मांडत सभागृहाचे आजचे कामकाज गुंडाळले.
विरोधी पक्षांनी अधिवेशनाच्या सुरवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. गेली 15 वर्षे सत्तेवर असलेल्या कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनेक नेते विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनाच्या पायरीवर ठाण मांडत निदर्शने करीत होते. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीबरोबरच, भाजपचे मंत्री पंकजा मुंडे, विनोद तावडे, बबन लोणीकर यांच्या राजीनाम्याची व या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणीही त्यांनी केली.
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कल्पक घोषणांनी सत्ताधाऱ्यांवर शाब्दिक हल्ला चढविण्यास विरोधकांनी थोडीही कसर ठेवली नाही. “पंकजा पंकजा, येस पापा‘च्या तालावर भाजपच्या मंत्र्यांच्या कारभाराचा पाढा वाचत सरकारची लक्तरे वेशीवर टांगली. विरोधकांच्या रंजक घोषणांनीच अधिवेशनाचा पहिला दिवस गाजवला.
विधानसभेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी ते सर्व जण घोषणा देत सभागृहात पोचले. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा तातडीने करावी, अशी जोरदार मागणी त्यांनी केली. विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी प्रश्नोत्तराचा तास स्थगित केल्याचे जाहीर केले. त्या वेळी विखे-पाटील आणि जयंत पाटील यांनी राज्यातील शेतकऱ्यांचा प्रश्न उपस्थित केला. राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा करावी व त्याची चर्चा आज घ्यावी, असे त्यांनी सुचविले. तीन
वर्षे राज्यात दुष्काळ पडत आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा करावी, अशी मागणी विखे पाटील यांनी केली.
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी कर्जमाफीचा मुद्दा लावून धरला. ही मागणी कितपत व्यवहार्य आहे, या प्रश्नावर ते म्हणाले, “आणखी कर्ज घेण्याची क्षमता राज्याकडे आहे. सरकारने कर्जाची कमाल मर्यादा वापरावी. ते शक्य नसेल तर आंध्र प्रदेशप्रमाणे खुल्या बाजारातून पाच वर्षे मुदतीचे बाँड्स (कर्जरोखे) उभारावेत. मात्र, आता शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याशिवाय तरणोपाय नाही. दुबार पेरण्यांसाठीही शेतकऱ्यांना बियाणे आणि खते शासनाने उपलब्ध करून द्यावीत.’ काँग्रेस आघाडी सरकार सत्तेत असताना सन २००८-०९ मधे केंद्र आणि राज्य सरकारने ७० हजार कोटींची कर्जमाफी दिली होती. मात्र, या योजनेचा लाभ धनदांडग्या शेतकऱ्यांनी लाटल्याचा आरोप झाला होता. विशेष म्हणजे त्या वेळच्या ऐतिहासिक कर्जमाफीनंतरही शेतकरी आत्महत्या थांबल्याचे चित्र पाहायला मिळाले नाही. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी संपूर्ण कर्जमाफीची मागणी पूर्ण करणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशनात पुढचे काही दिवस शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीवरून गदारोळ माजण्याची चिन्हे आहेत.
‘अच्छे दिन‘ यायला 25 वर्षे लागतील -अमित शहांचे वक्त्यव-(जनतेला बनविले उल्लू … ?)
भोपाळ – अगोदर जनतेला स्वप्ने दाखवायची आणि नंतर कोलवायचे असाच प्रकार आता भाजपने मतदारांशी केल्याचे वाटू लागले आहे त्याला कारण हि तसेच घडते आहे ‘अच्छे दिन‘ची स्वप्ने दाखवून सत्तेत आलेल्या भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ‘अच्छे दिन‘ यायला 25 वर्षे लागतील असे म्हटले आहे.भारताला पहिल्या क्रमांकावर पोहोचवण्यासाठी भाजपला या 25 वर्षांमध्ये ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंत प्रत्येक निवडणूक जिंकावी लागणार आहे, असे शहा म्हणाले.
‘आणि…त्या दिवशी माझा मृत्यू झाला’चे प्रकाशन
पुणे- ‘मी कोण आहे? याचा शोध घेणे हे जीवनाचे अंतिम सत्य आहे, जीवनात ताणतणाव घेऊ नका, भविष्याचा विचार करू नका, जगत असलेला प्रत्येक क्षण उत्तम करण्याचा प्रयत्न करा, जीवनाचा हेतू हसणे आणि निरपेक्ष प्रेम करणे असा आहे’ असे मत सुप्रसिध्द लेखिका अनिता मुरजानी यांनी व्यक्त केले.
अनिता मुरजानी यांनी लिहिलेल्या ‘डायिंग टू बी मी’ या ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या विक‘मी खपाच्या पुस्तकाचा मराठी अनुवार ‘आणि…त्या दिवशी माझा मृत्यू झाला’ ‘वॉव पब्लिकेशन’च्या वतीने प्रकाशित करण्यात आला. त्यावेळी श्रीमती मुरजानी अनुभव कथन करीत होत्या. ज्येष्ठ लेखक प्रा. मिलिंद जोशी अध्यक्षस्थानी होते. बुक गंगा इंटरनॅशनल बुक सर्व्हिसेस, डेक्कन जिमखाना येथे प्रकाशन समारंभ झाला.
श्रीमती मुरजानी पुढे म्हणाल्या, ‘चार वर्षे कॅन्सरच्या आजारानंतर मी कोमात गेले. त्या अवस्थेत मी छत्तीस तास होते. मला बाह्य जगाची जाणीव होत होती. या अवस्थेत माझ्या वेदनाही खूप कमी झाल्या. माझे वडील आणि कॅन्सरने मृत झालेल्या मैत्रिणीशी संवाद झाला. मी प्रत्यक्ष मृत्यूला स्पर्श करून आले. स्वर्गात जायचे की भौतिक जगात परतायचे हे पर्याय माझ्यासमोर खुले होते. मी पुन्हा भौतिक जगात जाऊन माझ्या शरीरात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर माझा कॅन्सर पाच आठवड्यात पूर्णपणे बरा झाला. आता मी नेहमीचे जीवन जगत आहे. स्वर्ग ही जागा नसून ती एक अवस्था असल्याचे माझे मत झाले आहे. मनुष्यामध्ये अद्भूत शक्ती असल्याची जाणीव ही या अवस्थेत मला झाली.’
प्रा. जोशी म्हणाले, ‘लौकिक जगापलीकडील अलौकिक अनुभव मुरजानी यांनी शब्दबध्द केले आहेत. त्यांनी ‘मी’च्या पलिकडे जाऊन ‘स्व’चा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. भौतिक जीवनातील प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी बाह्य जगाऐवजी अंतर्मनात डोकावण्याची गरज असते, तसेच जीवन उन्नत करण्यासाठी तंत्रज्ञानाबरोबरच तत्वज्ञानाची आवश्यकता आहे.’
‘मृत्यूनंतरचे जीवन’ हा सर्वांसाठीच कुतूहलाचा विषय असतो. अनिता मुरजानी यांचा कॅन्सरपासून मृत्यूपर्यंत आणि मृत्यूपासून पुन्हा सुरू झालेल्या नवजीवनापर्यंतचा रोमांचकारी प्रवास या पुस्तकात शब्दबध्द करण्यात आला आहे. त्यांचा हा रोमांचकारी अनुभव अनेक वाचकांच्या जीवनाला दिशा देणारा आणि विचारांच्या कक्षा रुंदावणारा आहे. ‘बुक गंगा’च्या संचालिका सुप्रिया लिमये यांनी स्वागत, चेतन कोळी यांनी सूत्रसंचालन आणि कृष्णा अय्यर यांनी आभार मानले.
दिंडीमध्ये ‘डायल 108’ च्या रूग्णवाहिकेच्या वतीने 25 जणांना आप्तकालीन मदत तसेच 850 जणांची आरोग्य तपासणी
सायबर क्राइम सारख्या ज्वलंत विषयावर भाष्य – ‘शॉर्टकट’!!
सध्याची युवापिढी ही इंटरनेट, सोशल मिडिया, मोबाईल फोन आणि विविध अॅप्लिकेशन्सच्या कचाट्यात पूर्णतः गुंतत जात असल्याचे चित्र आपल्या सर्वत्र पहायला मिळत आहे. एका बाजूला विज्ञानाची होणारी जलद गतीची प्रगती आपल्याला उपयुक्त जरी ठरत असली तरी दुसऱ्या बाजूला ह्या प्रगतीचा गैरवापरदेखील जगात मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळेच सायबर क्राइमसारख्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दिवसेंदिवस कमालीची वाढ होत आहे. झटपट श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी हल्लीची युवापिढी पैसा, प्रसिद्ध मिळवण्यासाठी ‘शॉर्टकट’ चा मार्ग अवलंबायला जराही मागे पुढे पाहात नाही, पण हाच ‘शॉर्टकट’ कधीतरी वेगळं वळण घेउन आपल्याला घातक ठरू शकतो याचा जराही विचार या तरुण मंडळीना नसतो.”सायबर क्राइम” सारखा अत्यंत ज्वलंत विषय ‘शॉर्टकट’ दिसतो पण नसतो, या आगामी सिनेमातून अतिशय उत्तम पद्धतीने मांडण्यात आला आहे.‘एम के मोशन पिक्चर्स’चे मुकेश चौधरी आणि चित्रकार फिल्म्सचे बी. आर. देढीया यांची निर्मिती असलेल्या ‘शॉर्टकट’ सिनेमाचे दिग्दर्शन हरीश राऊत यांनी केले असून त्यांचा हा पहिलाच मराठी सिनेमा आहे.
“शॉर्टकट” सिनेमात अभिनेते राजेश शृंगारपुरे, वैभव तत्ववादी, नरेश बिडकर आणि अभिनेत्री संस्कृती बालगुडे या त्रिकुटाचा उत्तम अभिनय आपल्याला पहायला मिळणार आहे. सिनेमाची कथा हरीश राऊत यांची असून पटकथा हरीश राऊत, विनय नारायणे आणि राजेश बाळापुरे यांची आहे, तर संवाद विनय नारायणे यांचे आहेत.शकील खान यांनी सिनेमॅटोग्राफर म्हणून काम पाहिले असून या सिनेमात रॉक संगीतासोबतच रोमॅंटिक संगीताची मेजवानी आपल्याला मिळणार आहे. या सिनेमात एकूण सहा गाणी असून चार गाणी मराठीत तर दोन गाणी हिंदीत स्वरबद्ध करण्यात आली आहेत
संगीतकार निलेश मोहरीर, सुशांत-शंकर, प्रेमानंद, पुनीत दीक्षित, चाँद साध्वानी आणि निक अशा संगीतकारांचे संगीत या सिनेमाला लाभले असून सिनेमातील गाणी गायक स्वप्नील बांदोडकर, कौशिक देशपांडे, मोहोमद इरफान, निक, अभिषेक, अमित मिश्रा, असित त्रिपाठी, गायिका सावनी रविंद्र, आनंदी जोशी आणि राही यांच्या सुमधुर आवाजात रेकॉर्ड करण्यात आली आहेत.
आजवर अनेक नावाजलेल्या मराठी आणि हिंदी सिनेमांसाठी प्रमोटर म्हणून काम पाहणाऱ्या GSEAMS कंपनीचे अर्जुन सिंग बारन आणि कार्तिक निशाणदार हे या सिनेमासाठीदेखील प्रमोटर म्हणून काम पाहत आहे.
तर असा हा रोमॅंटिक आणि थ्रिलरचे अनोखे कॉम्बिनेशन असलेला ‘शॉर्टकट’ दिसतो पण नसतो, सिनेमा ७ ऑगस्टपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.










