Home Blog Page 358

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हिंदीच्या सक्तीला पाठिंबा

म्हणाले,’संपर्कसूत्रासाठी हिंदी शिकावी

मुंबई-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवे शैक्षणिक धोरण व त्याअंतर्गत करण्यात येणाऱ्या हिंदीच्या सक्तीचे जोरदार समर्थन केले आहे. महाराष्ट्रात मराठी भाषा सर्वांना आली पाहिजे. पण देशात एक संपर्कसूत्र तयार करण्यासाठी हिंदी भाषेचा पर्याय ठेवण्यात आला आहे. त्यामुळे संपर्कसूत्राची भाषा म्हणून लोकांनी हिंदी शिकलीच पाहिजे, असे ते म्हणालेत.

महाराष्ट्रात इयत्ता पहिलीपासूनच हिंदी भाषा शिकण्याच्या अनिवार्यतेवर नुकतेच शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. ‘राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा 2024’नुसार, मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मराठी व इंग्रजीसह हिंदी ही तृतीय भाषा म्हणून शिकावी लागणार आहे. अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये पहिली ते पाचवीसाठी माध्यम भाषा, मराठी व इंग्रजी अशा 3 भाषा असणार आहेत. येत्या जून महिन्यापासून सुरू होणाऱ्या नव्या शैक्षणिक वर्षापासूनच या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. पण आता मनसेसह मराठी भाषेसाठी लढणाऱ्या संघटनांनी यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी या धोरणाचे समर्थन केले आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आपण यापूर्वीच नवे शैक्षणिक धोरण लागू केले आहे. त्यामुळे या प्रकरणी कोणताही नवा निर्णय घेण्यात आला नाही. महाराष्ट्रात प्रत्येकाला मराठी भाषा आलीच पाहिजे. हा आमचा आग्रह आहे. पण या देशात एक संपर्कसूत्र तयार करण्यासाठी हिंदी भाषा हा एक पर्याय आहे. त्यामुळे लोकांनी ही भाषाही शिकावी असा आमचा प्रयत्न आहे.

कुणाला इंग्रजी भाषा शिकायची असेल तर त्यांना इंग्रजी शिकता येईल. अन्य एखादी भाषा शिकायची असेल तर कोणतीही मनाई नाही. पण मराठी सर्वांना आली पाहिजे. तसेच आपल्या देशातील इतर भाषाही आल्या पाहिजेत. केंद्राने याविषयी विचार केला आहे. आपल्या देशात संपर्काची एक भाषा असावी असा केंद्राचा विचार आहे. त्यासाठी हा प्रयत्न करण्यात आला आहे, असे ते म्हणाले.

उल्लेखनीय बाब म्हणजे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) पायाभूत स्तर व शालेय स्तर असे दोन राज्य अभ्यासक्रम आराखडे तयार केले आहेत. शालेय शिक्षणमंत्र्यांच्या नेतृ्त्वातील सुकाणू समितीने या दोन्ही आराखड्यांना मान्यता दिली आहे.

महाराष्ट्रात हिंदीची सक्ती खपवून घेणार नाही-राज ठाकरे यांचा इशारा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्यास कडाडून विरोध केला आहे. मनसे हिंदीची सक्ती कोणत्याही स्थितीत खपवून घेणार नाही. या प्रकरणी आम्ही सरकारचे सर्वत्र ‘हिंदीकरण’ करण्याचे प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही, असे त्यांनी सरकारला निर्वाणीचा इशारा देताना म्हटले आहे.

खाली वाचा राज ठाकरेंची भूमिका जशीच्या तशी.. त्यांच्याच शब्दात

राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४ नुसार महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात आली आहे. मी स्वच्छ शब्दांत सांगतो की ही सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही. केंद्र सरकारचं सध्या जे सर्वत्र ‘हिंदीकरण’ करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, ते या राज्यात आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही. ती देशातील इतर भाषांसारखी एक राज्यभाषा आहे. ती महाराष्ट्रात का म्हणून पहिलीपासून शिकायची ? तुमचं त्रिभाषेचं सूत्र जे काही आहे ते सरकारी व्यवहारांपुरतंच मर्यादित ठेवा, त्याला शिक्षणापर्यंत आणू नका. या देशात भाषावार प्रांतरचना झाली, आणि ती इतकी वर्ष टिकली. पण आत्ताच ही दुसऱ्या प्रांताची भाषा इथे महाराष्ट्रावर लादण्याचे प्रकार का सुरु झालेत? भाषावार प्रांतरचनेच्या तत्वालाच हरताळ फासला जात आहे. प्रत्येक भाषा ही सुंदरच असते आणि तिच्या जडण्याघडण्याच्या मागे एक दीर्घ इतिहास असतो, परंपरा असते. आणि ती ज्या राज्याची भाषा असते, त्या राज्यात तिचा सन्मान राखलाच गेला पाहिजे. महाराष्ट्रात जसा मराठीचा सन्मान इतर भाषिकांकडून राखला गेला पाहिजे, तसा सन्मान इतर राज्यात त्या भाषेचा सर्व भाषिकांकडून राखला गेला पाहिजे. अगदी इतर राज्यात राहणाऱ्या मराठी जनांनी त्या राज्याची भाषा आपली मानली पाहिजे हा आमचा आग्रहच आहे. पण हे सोडून या देशाची भाषिक परंपराच खिळखिळी करणार असाल तर ते आम्हाला मान्य नाही. आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही आहोत ! महाराष्ट्रावर हिंदीकरणाचा मुलामा द्यायचा प्रयत्न कराल तर महाराष्ट्रात संघर्ष अटळ आहे. या सगळ्याकडे पाहिलं तर लक्षात येतं की सरकार हा संघर्ष मुद्दामून घडवत आहे. येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये मराठी विरुद्द मराठीतर असा संघर्ष घडवून स्वतःचा फायदा काढून घेण्यासाठी हा सगळा अट्टाहास सुरु आहे? या राज्यातील मराठीतर भाषिकांनी पण सरकारचा हा डाव समजून घ्यावा. त्यांना तुमच्या भाषेबद्दल विशेष प्रेम आहे असं काही नाही. त्यांना तुमची माथी भडकवून स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे. आज राज्याची आर्थिक अवस्था बिकट आहे, सरकारकडे योजनांसाठी पैसाच शिल्लक नाही. मराठी तरुण-तरुणी नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. कर्जमाफी करू असं निवडणुकीच्या आधी सांगितलं, पण पुढे ती केलीच नाही. त्यामुळे कर्जमाफीच्या आशेवर असलेला शेतकरी निराश आहे. आणि उद्योग जगताने महाराष्ट्राकडे पाठ फिरवल्यासारखी परिस्थिती आहे. जेंव्हा सांगण्यासारखं किंवा ठोस दाखवण्यासारखं काहीच नसतं, तेंव्हा फोडा आणि राज्य करा हा ब्रिटिशांचा मंत्र इथे वापरला जातोय, अशी शंका यावी अशीच पाऊलं सरकारकडून उचलली जात आहेत. बरं हिंदी भाषेची सक्ती महाराष्ट्रातच का ? ही अशी हिंदीची सक्ती दक्षिणेच्या राज्यात कराल का ? आणि करून तर बघा, तिथली सरकारंच पेटून उठतील. इथलं राज्यातील सरकार आणि त्यातील घटक पक्ष निमूटपणे हे सगळं खपवून घेतात म्हणून इथे ही सक्ती केली जात आहे. बाकीच्यांचं आम्हाला माहीत नाही आणि आम्हाला देणंघेणं पण नाही, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे खपवून घेणार नाही. महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी भाषा शिकण्याची सक्ती इथे खपवून घेतली जाणार नाही. शालेय अभ्यासक्रमातील हिंदीची पुस्तकं दुकानांमध्ये विकू दिली जाणार नाहीत आणि शाळांना देखील ती पुस्तकं विद्यार्थ्यांना वाटू दिली जाणार नाहीत, याची नोंद शाळा प्रशासनाने घ्यावी. प्रत्येक राज्यात फक्त त्यांच्या राजभाषेचाच मान राखला गेला पाहीजे ! उद्या सर्व राज्यांमध्ये मराठी भाषा पहिली पासून शिकवाल का ? नाही ना ? मग ही जबरदस्ती इथेच का ? हा मुद्दा ताणू नये असं माझं सरकारला आवाहन आहे. पण या आवाहनाला आव्हान देणार असाल आणि हिंदी लादणार असाल तर मात्र संघर्ष अटळ आहे आणि ज्याला फक्त सरकारच जबाबदार राहील. त्यामुळे सरकारने लोकभावनेचा आदर करत हा निर्णय मागे तात्काळ घेण्याचे आदेश द्यावेत. माझ्या महाराष्ट्रातील तमाम मराठी मातांना, भगिनींना आणि बांधवांना तसेच माझ्या मराठी वर्तमानपत्रात आणि मराठी वृत्तवाहिन्यांमध्ये काम करणाऱ्या सर्व बांधवांना आणि भगिनींना देखील विनंती आहे की यात कोणताही वादविवाद न करता याचा निषेध आणि विरोध करावा ! आणि हो महाराष्ट्रातील इतर राजकीय पक्षांना जर थोडं जरी मराठी भाषेबद्दल प्रेम असेल तर ते देखील याला विरोध करतील. आज भाषा सक्ती करत आहेत, उद्या इतर सक्तीचे फतवे काढतील. म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतो !

आपला नम्र राज ठाकरे ।

उपराष्ट्रपती धनखड म्हणाले- न्यायालय राष्ट्रपतींना आदेश देऊ शकत नाही

सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात राष्ट्रपती आणि राज्यपालांना विधेयकांना मान्यता देण्यासाठी अंतिम मुदत दिली होती. यावर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की न्यायालये राष्ट्रपतींना आदेश देऊ शकत नाहीत.

उपराष्ट्रपती म्हणाले- आपण अशी परिस्थिती निर्माण करू शकत नाही जिथे न्यायालये राष्ट्रपतींना निर्देश देतील. संविधानाच्या कलम १४२ अंतर्गत न्यायालयाला देण्यात आलेले विशेष अधिकार लोकशाही शक्तींविरुद्ध २४x७ उपलब्ध असलेले अणुक्षेपणास्त्र बनले आहेत.

लोकशाहीमध्ये, निवडून आलेले सरकार सर्वात महत्वाचे असते आणि सर्व संस्थांनी त्यांच्या संबंधित मर्यादेत काम केले पाहिजे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की कोणतीही संस्था संविधानापेक्षा वर नाही.

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते- राष्ट्रपतींना पूर्ण व्हेटो करण्याचा अधिकार नाही

राज्यपालांनी पाठवलेल्या विधेयकावर राष्ट्रपतींना ३ महिन्यांच्या आत निर्णय घ्यावा लागेल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. वास्तविक, ८ एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडू सरकार आणि राज्यपालांच्या प्रकरणात एक ऐतिहासिक निर्णय घेतला होता. विधानसभेने पाठवलेल्या विधेयकावर राज्यपालांना एका महिन्याच्या आत निर्णय घ्यावा लागेल, असे न्यायालयाने म्हटले होते.

या निर्णयादरम्यान, न्यायालयाने राज्यपालांनी राष्ट्रपतींना पाठवलेल्या विधेयकावरील भूमिका देखील स्पष्ट केली. हा आदेश ११ एप्रिल रोजी सार्वजनिक करण्यात आला . ११ एप्रिलच्या रात्री वेबसाइटवर अपलोड केलेल्या आदेशात सर्वोच्च न्यायालयाने संविधानाच्या कलम २०१ चा हवाला दिला. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले-
राज्यपालांनी पाठवलेल्या विधेयकांच्या बाबतीत राष्ट्रपतींना पूर्ण नकाराधिकार किंवा खिशात नकाराधिकार वापरण्याचा अधिकार नाही. त्याच्या निर्णयाचा न्यायालयीन आढावा घेतला जाऊ शकतो आणि महाभियोग विधेयकाची घटनात्मकता न्यायपालिका ठरवेल.
राज्यपालांनी राष्ट्रपतींना पाठवलेल्या विधेयकावर सर्वोच्च न्यायालयाचे ४ मुद्दे

१. निर्णय घ्यावा लागेल: सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की कलम २०१ मध्ये असे म्हटले आहे की जेव्हा विधानसभा विधेयक मंजूर करते. ते राज्यपालांकडे पाठवावे आणि राज्यपालांनी ते राष्ट्रपतींकडे विचारार्थ पाठवावे. या परिस्थितीत राष्ट्रपतींना एकतर विधेयकाला मान्यता द्यावी लागेल किंवा ते मान्यता देत नसल्याचे सांगावे लागेल.

२. न्यायालयीन आढावा: सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की राष्ट्रपतींच्या निर्णयाचे कलम २०१ अंतर्गत न्यायालयीन पुनरावलोकन केले जाऊ शकते. जर विधेयक केंद्र सरकारच्या निर्णयाला प्राधान्य देत असेल, तर न्यायालय मनमानी किंवा द्वेषाच्या आधारावर विधेयकाचे पुनरावलोकन करेल.

न्यायालयाने म्हटले आहे की जर विधेयक राज्य मंत्रिमंडळाला प्राधान्य देत असेल आणि राज्यपालांनी मंत्रिमंडळाच्या मदत आणि सल्ल्याविरुद्ध विधेयकावर निर्णय घेतला असेल, तर न्यायालयाला विधेयकाची कायदेशीर तपासणी करण्याचा अधिकार असेल.

३. राज्याने कारणे द्यावीत: सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की जेव्हा वेळ मर्यादा निश्चित केली जाते तेव्हा निर्णय वाजवी वेळेत घेतला पाहिजे. विधेयक मिळाल्यापासून ३ महिन्यांच्या आत राष्ट्रपतींनी निर्णय घेणे बंधनकारक असेल. जर विलंब झाला असेल तर विलंबाची कारणे सांगावी लागतील.

४. विधेयके वारंवार परत पाठवता येत नाहीत: न्यायालयाने म्हटले आहे की राष्ट्रपती दुरुस्ती किंवा पुनर्विचारासाठी विधेयक राज्य विधानसभेकडे परत पाठवतात. जर विधानसभेने ते पुन्हा मंजूर केले तर राष्ट्रपतींना त्या विधेयकावर अंतिम निर्णय घ्यावा लागेल आणि वारंवार विधेयक परत करण्याची प्रक्रिया थांबवावी लागेल.

राज्यपालांसाठी एक वेळ मर्यादा देखील निश्चित करण्यात आली होती, असे म्हटले होते – व्हेटो पॉवर नाही

८ एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडूचे राज्यपाल आणि राज्य सरकारच्या बाबतीत राज्यपालांच्या अधिकारांच्या ‘मर्यादा’ निश्चित केल्या होत्या. न्यायमूर्ती जे.बी. पारदीवाला आणि न्यायमूर्ती आर. महादेवन यांच्या खंडपीठाने म्हटले होते की, ‘राज्यपालांना व्हेटो पॉवर नाही.’

राज्यपालांनी सरकारच्या १० महत्त्वाच्या विधेयकांना रोखणे बेकायदेशीर ठरवले. न्यायालयाने म्हटले की हे एक मनमानी पाऊल आहे आणि कायदेशीर दृष्टिकोनातून ते योग्य नाही. राज्यपालांनी राज्य विधानसभेला मदत करणे आणि सल्ला देणे अपेक्षित होते. विधानसभेने मंजूर केलेल्या विधेयकावर राज्यपालांनी एका महिन्याच्या आत कारवाई करावी, असे न्यायालयाने म्हटले होते.
तामिळनाडू सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. राज्यपाल आरएन रवी यांनी राज्यातील महत्त्वाची विधेयके स्थगित ठेवल्याचे सांगण्यात आले. केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) मध्ये काम केलेले माजी आयपीएस अधिकारी आरएन रवी यांनी २०२१ मध्ये तामिळनाडूचे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारला होता.

माजी कायदा मंत्री कपिल सिब्बल यांनी या निर्णयाचे कौतुक केले-माजी कायदा मंत्री कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे कौतुक करताना म्हटले आहे की, आता केंद्र सरकार राज्यांच्या विधेयकांवरील निर्णय जाणूनबुजून विलंब करू शकणार नाही. त्यांनी सांगितले की, अॅटर्नी जनरल यांनी वेळ मर्यादा निश्चित करण्याच्या निर्णयाला विरोध केला होता, परंतु सर्वोच्च न्यायालयाने सरकारची उलट भूमिका फेटाळून लावली.

सोने पहिल्यांदाच 95 हजारांच्या पुढे:लग्नसराईने वाढली मागणी

नवी दिल्लीसोन्याच्या किमतींनी नवीन उच्चांक गाठला. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ₹६२८ ने वाढून ₹९५,२०७ झाली आहे. पूर्वी १० ग्रॅम सोन्याची किंमत ९४,५७९ रुपये होती.आज चांदीच्या किमतीत घसरण झाली आहे. आज एक किलो चांदीचा भाव ९३६ रुपयांनी घसरून ९५,६३९ रुपये प्रति किलो झाला. पूर्वी चांदीची किंमत प्रति किलो ₹ 96,575 होती. २८ मार्च रोजी चांदीने १,००,९३४ रुपयांचा उच्चांक गाठला होता.सोन्याच्या किमतीत वाढ होण्याची 3 कारणे

अमेरिकेच्या टॅरिफ धोरणामुळे व्यापार युद्धाचा धोका वाढला आहे. यामुळे अर्थव्यवस्थेचा विकास दर मंदावू शकतो. जागतिक मंदीची भीतीही वाढली आहे. अशा परिस्थितीत लोक सोन्यात गुंतवणूक वाढवत आहेत. मंदीच्या काळात सोन्याला सुरक्षित गुंतवणूक मानले जाते.
डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाल्यामुळे सोन्याच्या किमती वाढल्या आहेत. कारण जेव्हा रुपया कमकुवत होतो तेव्हा तो आयात करण्यासाठी जास्त पैसे लागतात. या वर्षी रुपयाचे मूल्य जवळपास ४% घसरले आहे, ज्यामुळे सोन्याच्या किमतींवर दबाव आला आहे.
लग्नसराईचा हंगाम जवळ येत आहे, त्यामुळे सोन्याच्या दागिन्यांची मागणी वाढत आहे. मुंबई, दिल्ली आणि चेन्नईसारख्या शहरांमधील ज्वेलर्सनी सांगितले की, लोक सोन्याला गुंतवणूक आणि समृद्धीचे प्रतीक मानत असल्याने, उच्च किमती असूनही विक्री तेजीत होती.
मुंबई आणि 4 महानगरांमध्ये सोन्याचा भाव

दिल्ली: २२ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ८९,३५० रुपये आणि २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ९७,४६० रुपये आहे.
मुंबई: २२ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ८९,२०० रुपये आणि २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ९७,३१० रुपये आहे.
कोलकाता: २२ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ८९,२०० रुपये आणि २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ९७,३१० रुपये आहे.
चेन्नई: २२ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ८९,२०० रुपये आणि २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ९७,३१० रुपये आहे.
भोपाळ: २२ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ८९,२५० रुपये आणि २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ९७,३६० रुपये आहे.
या वर्षी आतापर्यंत सोने १९,०४५ रुपयांनी महागले
या वर्षी, १ जानेवारीपासून आतापर्यंत, २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ७६,१६२ रुपयांवरून १९,०४५ रुपयांनी वाढून ९५,२०७ रुपये झाली आहे. त्याच वेळी, चांदीची किंमत देखील ९,६२२ रुपयांनी वाढून ८६,०१७ रुपये प्रति किलोवरून ९५,६३९ रुपये झाली आहे. त्याच वेळी, गेल्या वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये सोने १२,८१० रुपयांनी महाग झाले होते.

वर्षाच्या अखेरीस सोन्याचा भाव ₹१.१० लाखांपर्यंत पोहोचू शकतो
अमेरिका आणि चीनमधील वाढत्या व्यापार युद्धामुळे आणि मंदीच्या भीतीमुळे, यावर्षी सोन्याचा भाव प्रति औंस $३,७०० पर्यंत पोहोचू शकतो. आंतरराष्ट्रीय दरांनुसार मोजले तर भारतात १० ग्रॅम सोन्याची किंमत १.१० लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते. परदेशी गुंतवणूक बँक गोल्डमन सॅक्सने हा अंदाज जाहीर केला आहे.

‘आतली बातमी फुटली’

 मोहन आगाशे आणि रोहिणी हट्टंगडी पहिल्यांदा एकत्र

आजपर्यंत दोन दिग्गज कलाकार एकाच चित्रपटात काम करणे काही नवीन नाही; पण मराठीत असा सुवर्णयोग फार क्वचितच पाहायला मिळतो. ‘आतली बातमी फुटली’ या सिनेमाच्या निमित्तानं ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी मराठी सिनेमात पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. या दोघांनी अभिनयाच्या जोरावर मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही आपला वेगळा ठसा उमटवला आहे. अशा दोन कलासंपन्न कलाकारांना एकत्र पडद्यावर पाहणं प्रेक्षकांसाठी पर्वणी असेल. विशाल पी.गांधी आणि जैनेश इजरदार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. येत्या ६ जूनला ‘आतली बातमी फुटली’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

या दोन दिग्गजांची चित्रपटात एकत्र येण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे या दोघांच्या अभिनयाची वेगळी केमिस्ट्री रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. सामान्य माणसाच्या माध्यमातून लेखक-दिग्दर्शकांनी वर्तमानातील कटू सत्य पडद्यावर सादर केलं आहे.  

वीजी फिल्म्स बॅनरखाली विशाल पी. गांधी व जैनेश इजारदार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ‘आतली बातमी फुटली’ या चित्रपटाची निर्मिती विशाल पी. गांधी आणि ग्रीष्मा अडवाणी यांची आहे. सह निर्माता अम्मन अडवाणी तर सहयोगी दिग्दर्शक जीवक मुनतोडे आहेत. चित्रपटाचे छायांकन अमित सुरेश कोडोथ तरसंकलन रवी चौहान यांचे आहे. संगीत एग्नेल रोमन यांनी दिले आहे. कथा जैनेश इजरदार यांनी रचली आहे, तर पटकथा जीवक मुनतोडे, अम्मन अडवाणी, जैनेश इजरदार, विशाल पी. गांधी यांची आहे. संवादलेखन जीवक मुनतोडे व अद्वैत करंबेळकर यांनी केले आहे. वेशभूषा ग्रीष्मा अडवाणी यांची, नृत्यदिग्दर्शन राहुल ठोंबरे, तिजो जॉर्ज यांचे आहे. प्रॉडक्शन डिझायनर रवी नाईक आहेत. कास्टिंग दिग्दर्शन जोकीम थोरास यांनी केले आहे, तर कार्यकारी निर्माते अब्दुल खान आहेत. फिल्मास्त्र स्टुडिओजने ‘आतली बातमी फुटली’ या चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी सांभाळली आहे

देशाच्या स्वातंत्र्याच्या दिपस्तंभाच्या व योगदान देणाऱ्या कुटुंबाच्या’ बदनामीचे प्रयत्न, स्वातंत्र्य संग्राम’ बाबतची असुया स्पष्ट करते..! काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी

पुणे दि १६ एप्रिल
२०२४ च्या लोकसभा निवडणूकीत बॅंक-खाती गोठवुन देखील, जनतेने काँग्रेस पक्षास दुप्पट जागा देऊन मजबूत विरोधी पक्ष केले व देशात काँग्रेस पक्ष विरोधी पक्षाची भुमिका सक्षमतेने बजावत असतांना.. मोदी सरकार ११ वर्षा नंतर देखील स्वातंत्र्य संग्रामात दिपस्तंभाची भुमिका निभावणाऱ्या ‘नॅशनल हेरॅाल्ड वृत्तसंस्थेची व ती स्थापन केलेल्या नेहरू – गांधी कुटुंबाची तथ्यहीन बदनामी करण्याचे कुटील राजकारण’ करत आहेत व पुन्हा एकदा स्वातंत्र्य संग्रामा विषयी, स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणाऱ्यां विषयी असूयाच स्पष्ट करत असल्याची घणाघाती टिका काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली.
पुणे शहर जिल्हा कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांचे नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या काँग्रेसच्या निदर्शनात ते बोलत होते.
नॅशनल हेरॅाल्ड चा कथित घोटाळा व गांधी कुटुंबीयावरील ईडी च्या आरोपपत्रा विरोधात पुणे शहरासह देशभरात आज आंदोलने करण्यात आली.
भाषणात ते पुढे म्हणाले की, मोदी सरकारच्या ‘भ्रष्टाचार विरोधी भुमिकेवर व हेतू’वर आता कोणाचाच विश्वास राहिलेला नसुन केवळ स्वायत्त सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून व दबाव आणून मोदी सरकार विरोधी पक्षास बदनाम करून नेस्तनाबूत करण्यात धन्यता मानत आहे.
ते करण्या ऐवजी मोदी सरकारने ‘पंतप्रधान-निधी’ची पारदर्शकता न दडवता त्याचे विवरण जाहीर करावे व देशाप्रती ऊत्तर दायीत्वाचा राजधर्म निभवावा.. असे आवाहन देखील काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केला.या प्रसंगी अरविंद शिंदे, रमेश बागवे,अविनाश बागवे, संजय बालगुडे, अभय छाजेड, इ भाषणे झाली. अजीत दरेकर यांनी संचालन केले व प्राची दुधाणे यांनी आभार व्यक्त केले

मुळानदी किनारा आणि सोंडमळा देवराई वाचवण्यासाठी मूळ शेतकरी आणि पर्यावरणप्रेमी संस्थानी घेतला पुढाकार , म्हणाले ,’हा तर नदी भवतालचे पर्यावरण नष्ट करणारा प्रकल्प

नदी सुधार काठ प्रकल्पाला बाणेर मधील स्थानिक नागरिकांचा विरोध.. वृक्ष तोड ताबडतोब थांबवा अन्यथा आंदोलनाचा इशारा

मुळा नदी काठ उध्वस्त करणाऱ्या प्रकल्पाचे शिल्पकार कोण? व नदी काठावरील झाडे तोडल्यानंतर या परिसरातील जैवविविधतेच्या भाग असलेल्या लहान प्राणी, पक्षी, कीटक ज्यांचे पुनर्वसन कसे करणार व यांनी जायचे कुठे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पिंपरी : मुळा नदीच्या पात्रात हजारो ट्रक राडारोडा टाकून भराव टाकला जात आहे. पिंपळे निलख परिसरात मुळा नदीच्या काठावर असंख्य झाडांची कत्तल करण्यात आली आहे नदी सुधार या गोंडस नावाचा वापर करून मोठ्या प्रमाणात विध्वंस केला जातो आहे. माणसांसाठी कोट्यावधी रुपये जिरवून नदी सुधार होईल ही परंतु या परिसरातील जैव विविधता अशी नष्ट करणार ? या बाबतीत अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.
विकास आणि सुशोभीकरणाच्या नावाखाली मुळा नदी काठावर असलेली सोंडमाळ परिसरातील देवराईतील विविध 100 वर्ष जुनी झाडे आता तोडण्यात येतील. बाणेर बालेवाडी स्मार्ट सिटीच्या नावाखाली अगोदरच उध्वस्त झाली आहे. बाणेर बालेवाडी चे सिमेंटचे जंगल करण्यात आले आहे. तसेच वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना मोकळा श्वास घेण्याची ठिकाणी देखील पालिका, राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या नावाखाली उध्वस्त केली जात आहेत.

नदीकाठ सुधार प्रकल्पा मुळे. बाणेर भागातील सोंडमळा येथील मुळा राम नदी देवराई तसेच तेथील जैवविविधता समूळ नष्ट होणार आहे. त्यामुळे तेथील स्थानिक निसर्ग प्रेमी सुधाकर धनकुडे, व निसर्गप्रेमी संस्था मध्ये कार्यरत असलेल्या वंदना चौधरी, शैलजा देशपांडे,अमेय जगताप मेघना भंडारी, सारंग वाबळे, बालेवाडी भागातून मोरेश्वर बालवडकर व आशिष कोटमकर यांनी पुढाकार घेत नदी काठची निसर्ग संपदा आणि पुराची समस्या कशी वाचेल यासाठी पाठपुरावा सुरु केला आहे. त्यामुळे सदर भागात प्राचीन वृक्ष, दुर्मिळ पशुपक्षी तसेच ऐताहासिक मंदिरे आणि बांधकामे असल्याने हा भाग संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करावा अशी मागणी संबंधित मंत्रालयास केलेली आहे त्यानुसार सर्वेक्षण करून अहवाल पाठवण्याचे आदेश वनविभागाला देण्यात आलेले आहेत

राम नदी व मुळा नदी काठावरती शेकडो वर्ष जुनी असलेली हजारो झाडे, वेली, गवतं या परिसरामध्ये सिमेंटच्या जंगलातून स्थलांतर झालेल्या लहान प्राणी, पक्षी, कीटक यांचा अधिवास आहेत. नदी सुधार होत असताना यांचा विचार कसा केला जाणार
?असा प्रश्न पर्यावरण प्रेमी नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

केंद्र सरकारची योजना म्हणून नदी सुधार प्रकल्प हा नदी भवतालचे पर्यावरण उध्वस्त करून राबवला जात आहे. पुणे महापालिकेच्या परिसरात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात विरोध केल्यानंतर तरी हा प्रकल्प थांबवला जाईल असे वाटत होते. परंतु पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने नदी काठ उध्वस्त करून नदीचा एक मोठा कॅनॉल तयार करण्याचा प्रकल्प असल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. नागरिकांचा विरोध होत असताना नागरिकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचा सहभाग प्रकल्पाला विरोध करत असताना फारसा दिसत नाही. पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील खासदारांनी या प्रकल्पांबाबत या संवेदना व्यक्त कराव्यात तसेच पर्यावरण प्रेमी नागरिकांच्या माध्यमातून होत असलेला विरोध केंद्रापर्यंत पोहोचवावा अशी मागणी सातत्याने केली जात आहे.

डॉक्टर घैसास यांच्या पाठीशी आयएमए तर सगळ्या आमदारांचे स्वीय सहायक भिसे यांच्या पाठीशी

पुणे- तनिशा भिसे मृत्यू प्रकरणी तातडीचे उपचार आवश्यक असताना अनामत रकमे अभावी उपचार नाकारल्याचा आरोप असलेल्या दिनानाथ रुग्णालयाच्या प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे. दिनानाथ रुग्णालयातील डॉक्टर घैसास यांच्या पाठीशी डॉक्टरांच्या संघटना आणि खुद्द आयएमए (इंडियन मेडिकल असोसिएशन) असल्याचे स्पष्ट होत असताना आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहायक भिसे यांच्यावर होत असलेल्या आरोपांमुळे आता सगळ्या आमदारांचे स्वीय सहायक भिसे यांच्या पाठीशी उभे राहत असल्याचे दिसून येते आहे.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर रुग्णांच्या जीवापेक्षा पैशांना प्राधान्य दिल्याचा आरोप करण्यात आला. डॉ सुश्रुत घैसास यांनी तनिषा भिसे यांच्या कुटुंबियांकडून १० ते २० लाख डिपॉझिट मागितल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता.त्यामुळे महिलेला घेऊन दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जावे लागले. त्याठिकाणी महिलेचा जीव गेला. या प्रकरणावरून घैसास यांच्यावर टीका होऊ लागली होती. त्यानंतर घैसास यांनी राजीनामाही दिला होता. आता या प्रकरणात इंडियन मेडिकल असोसिएशन डॉ घैसास यांच्या पाठीशी असल्याचे दिसून आले आहे. आयएमएचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ संतोष कदम यांनी स्पष्टीकरण देताना ऍडमिट करून घेत असताना लागणारा खर्च महिलेच्या कुटुंबासमोर ठेवला. त्यामुळे घैसास यांची कुठे या प्रकरणात चूक नसताना त्यांनी आपलं काम योग्य पद्धतीने केले असल्याचे सांगितले आहे.

महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने नोटीस पाठवल्यावर त्या चौकशीमध्ये घैसास निर्दोष म्हणून सिद्ध होतील. या सगळ्या प्रकरणात शासन जरी चूक कोणाची हे जरी अहवालाचा अभ्यास करून समोर आणणार असले तरी इंडियन मेडिकल असोसिएशन डॉ. घैसास यांच्या सोबत असल्याचे आयएमएने सांगितले आहे. या प्रकरणात डॉ. घैसास यांची चूक नसून त्यांना दोषी ठरवणे चूक असून इंडियन मेडिकल असोसिएशनने त्यांची बाजू मांडली आहे.

कदम म्हणाले, डॉ घैसास यांनी गर्भवती महिलेला योग्य उपचार दिले होते. शिवाय ते देत असताना काही सूचनाही वेळोवेळी केल्या होत्या. महिलेला गर्भधारणा रिस्क असल्याचे त्यांनी सांगितले होते. तसेच तुम्ही मुलं दत्तक घेण्याचा विचार करावा असा पर्यायही घैसास यांनी सुचवला होता. मात्र महिलेने अथवा त्यांच्या कुटुंबीयांनी हे ऐकले नाही. डॉक्टरांचे न ऐकता काही निर्णय संबंधित महिलेने आणि त्यांच्या कुटुंबीयांनी घेतले. जेव्हा महिलेची प्रकृती सिरीयस झाली तेव्हा सुद्धा घैसास यांनी महिलेला मदत करण्याची तयारी दर्शवली होती.

डॉ. घैसास यांच्यावर पैसे मागितल्याचा जो आरोप होत आहे. त्यावर आमचा आक्षेप आहे. कौन्सिलने जरी त्यांना नोटीस पाठवली असली तरी चौकशीमध्ये ते निर्दोष म्हणून सुटतील. आम्ही महाराष्ट्र आयएमएच्या सर्व डॉक्टरांनी घैसास यांना पूर्णपणे पाठिंबा दर्शवला असून त्यांच्या पाठीशी असल्याचे कदम यांनी यावेळी सांगितले आहे.

सगळ्या आमदारांचे स्वीय सहायक भिसे यांच्या पाठीशी….

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाविरोधात मोठा तनिशा भिसे प्रकरणावरून जन संताप निर्माण झाला. त्याचबरोबर मृत तनिषा भिसे यांच्या कुटुंबीयांवरही दुसऱ्या बाजूने काही आरोप करण्यात आले होते.दरम्यान, या सगळ्या आरोपांचं भिसे कुटुंबीयांनी खंडन केलं आहे. ज्या रेशनकार्डवरून ट्रोल करण्यात आलं तेच रेशन कार्ड भिसे कुटुंबीयांनी माध्यमांना दाखवलं.

आमदाराच्या पीएला 30 हजार पेक्षाही कमी मानधन असतं. आमदाराचा पीए म्हणजे सगळे वाईट काम करणारा नसतो अनेक आमदाराचे पीए प्रामाणिक काम देखील करतात. वार्षिक उत्पन्न 300000 पेक्षाही कमी आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदारांच्या स्वीय सहायकांनी देखील या लढ्यात सहभाग घेतला आहे. आमदाराचा स्वीय सहाय्यक असला तरीही इमानदारीने काम करणाऱ्या माणसाकडे एवढे पैसे नसतात. ज्या दिवशी दीनानाथ रुग्णालयात दहा लाख रुपये मागितले, त्यादिवशी आम्ही जागेवर तीन लाख रुपये द्यायला तयार होतो आणि सात लाख रुपयांची व्यवस्था आमदार अमित गोरखे हे करत होते, असंही भिसे कुटुंबीयांनी सांगितलं आहे.

दीनानाथ रुग्णालयातही तनिषा भिसे यांच्या डिलिव्हरीची सगळी तयारी सुरु होती. त्यादिवशी अनेक मोठ्या लोकांनी दीनानाथ रुग्णालयात फोन केले होते आणि एवढे मोठे लोक फोन करत असेल तर त्यांनी पैशाची गॅरंटी घ्यायला हवी होती. या सगळ्या दरम्यान वारंवार आमचे मीडिया ट्रायल घेतले जात आहे. आम्हाला अनेकांकडून चौकशीसाठी बोलावलं जात आहे. सोबतच कुटुंबीयांना मानसिक त्रासातून देखील जावे लागत आहे. सोशल मीडियावरील ट्रोलर्स न्याय मागणाऱ्याला गुन्हेगार ठरवत आहेत आणि गुन्हेगाराला संरक्षण देत आहेत. आमच्या दोन्ही मुली पोरक्या झाल्या आहेत. रुग्णालयाचे सीसीटीव्ही समोर आणले तर या सगळ्या गोष्टी सत्य आहे हे समोर येईल असंही ते म्हणाले.महाराष्ट्र शासन खूप चांगल्या पद्धतीने मदत करते आणि आम्हाला न्याय मिळेल यासाठी ही मदत करते. पण, आता ससूनचा अहवाल यावर उत्तर देणार आहेत आणि ससूनचा अहवाल तातडीने सादर करावा आणि न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे. ससून रुग्णालयाचा अहवाल का लांबवला जातोय, याचही उत्तर द्यावं आणि तोही अहवाल तातडीने सादर करून निश्चित कारवाई करावी आणि कठोर कारवाई करावी. डॉक्टर केळकर आणि दीनानाथ रुग्णालयाने जी काही पत्रकार परिषदेत माहिती दिली किंवा प्रसिद्धीपत्रक काढलं ते खोटं आहे. दीनानाथ रुग्णालयाने काढलेल्या प्रसिद्धी पत्रात आमची बदनामी करण्यात आली आणि चार डॉक्टरांच्या अंतर्गत समितीने ही आमची बदनामी केली असा आरोपच या कुटुंबाने केला आहे.

सगळ्या कुटुंबीयांनी मिळून आयव्हीएफ करण्याचा निर्णय घेतला होता. डॉक्टर घैसास यांनीच आम्हाला आयव्हीएफ करण्यासाठी विश्वास दिला होता. वहिनींना ओवरीमध्ये सीस्ट होतं आणि ते कधीच काढून टाकण्यात आलं होतं, त्याचा कोणताही आता त्रास होत नव्हता. डॉक्टरांनी आम्हाला मूल दत्तक घेण्याचा कोणताही सल्ला दिला नव्हता. तनिषा भिसे त्यांचे पती आणि संपूर्ण भिसे कुटुंब यांनी एकत्र मिळून आयव्हीएफ करण्याचा आणि मूल जन्माला घालण्याचा निर्णय घेतला होता.

डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या पत्नीकडे आयबीएफ करण्यासाठी सांगितलं होतं. मात्र, विमान नगर मधील इंदिरा आयव्हीएफ सेंटरमध्ये IVF करण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला. आता प्रशासनाने मुद्दा न भरकटवता तातडीने निर्णय घेऊन सगळे अहवाल एकत्र आणून कठोरातील कठोर कारवाई करावी. आयव्हीएफबाबत आम्हाला यापूर्वी कोणतीही फार माहिती नव्हती, त्याची सगळी माहिती डॉक्टर घैसास यांनी दिली आणि त्यांनीच आयव्हीएफ करण्याचा सल्लाही दिला.

पोलिसांकडे आम्ही सगळे पुरावे दिले आहेत आणि ससून रुग्णालयाकडेही सगळे पुरावे आहेत त्यामुळे त्यांनी तातडीने कारवाई करण्यात आता गरजेचं आहे. यात सरकारने किंवा बाकी कोणीही वेळकाढूपणा करू नये आणि मुद्दा भरकटवण्याचा प्रयत्न करू नये. सामान्य कुटुंबातील लोक आहोत आणि या सगळ्याला समोर जाणं आमच्यासाठी फार अवघड झाले आहे. रुग्णालयाने कुटुंबावर जे आरोप केले आहेत, त्याचा कोणताही वैद्यकीय पुरावा रुग्णालयांना दिला नाही, असा दावा भिसे कुटुंबीयांनी केला.

महावितरणच्या प्रशिक्षण केंद्रांमध्ये ‘ पुणे परिमंडल ‘ भागंदा अव्वल

पुणे, दि. १६ एप्रिल २० : महावितरणच्या पुणे मंडल प्रशिक्षण केंद्राने सन २०२४-२५ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक ठेवला आहे. पुणे परिमंडलातील ६ हजार ८५८ अभियंते, अधिकारी व कर्मचारी प्रशिक्षणार्थी वर्ग विद्युत विद्युतीय विद्युत चालक ९ हजार ५०० विद्यार्थी १ लाख २६ हजार शालेय व विद्यार्थी विद्यार्थी, विविध एजन्सीज कर्मचारी व नागरिकांसाठी प्रशिक्षण, कार्यशाळा, प्रबोधन जनजागरण कार्यक्रम सादर केले आहे.

महावितरणच्या भरात २५ लघु प्रशिक्षण केंद्रांतून महिलांना प्रशिक्षण दिले जात आहे. गेल्या आर्थिक पुणे ६ लघु प्रशिक्षण केंद्राने २८ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले. नाशिक खाते महाचिकित्सक व मुख्याच्या सुरक्षेच्या उत्तरतेच्या मानांकनात पुणे परिक्षेतील लघु प्रशिक्षण केंद्र भागी मंडळ स्थानिक प्रथम क्रमांक ठरले आहे.

पुणे परिमंडल मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी देशाचे ज्ञानाचे, कौशल्ये व क्षमता वाढवणे आणि कार्यक्षमतेने भर दिला आहे. यासाठी मुख्य महाव्यवस्थापक श्री. दत्तात्रेय बनडे (नाशिक) सामनेही मतदान उमेदवार. लघु प्रशिक्षण केंद्राचे समन्वयक डॉ. संतोष पाटणी यांनी गेल्या आर्थिक वर्षात १०५ प्रशिक्षण वर्गाचे प्रश्न केले. यामध्ये अभियंते, अधिकारी, नियमित वस्त्रोत कर्मचारी, तंत्र कर्मचारी, अप्रेंटिस, विविध एजन्सी कर्मचारी अशा हजार ८५८ जणांना ६ सौर ऊर्जेसह सुरक्षा, उपेंद्र व विद्युत विद्युत् विद्युत्ची देखभाल, अव्हान्स मीटरींग इन्फ्रास्ट्रक्चर, सौर ऊर्जा, विद्युत वाहने, वीजचोरी रोखणे, प्रथमोपचार, तानवणूक व्यवस्थापन, वीजबिलांचे खरे बिलींग आदींवर प्रशिक्षण देण्यात आले.

या संपूर्ण महावितरण व विद्युत अभियांत्रिकींचे ज्ञानाचे आदानप्रदान सामंजस्य करारांतर्गत आहेत. या अभियांत्रिकी कनेक्ट ९ हजार ५०० विद्यार्थी डिजिटल संवाद साधून वीजक्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान व घडमोडी, वीजसुरक्षा व ग्राहक सेवा आदीं संयुक्त ‘नॉलेज शेअरिंग’ करण्यात येत आहे. तसेच वीज सार्वजनिक वीजसुरक्षा, डिजिटल ग्राहक सेवा, वीजबचत आदिं संयुक्त शहरी आणि सुमारे १ ग्राम मेळावे, कार्यशाळा प्रशिक्षण वर्गांद्वारे लाख २६ हजार नागरिक व शालेय वाहनचे प्रबोधन करण्यात आले.

राजेंद्र पवार, मुख्य अभियंता, पुणे परिमंडल- ‘इझ ऑफ लिव्हिंग’नुसार ग्राहक सेवा गतिमान करण्यासाठी विविध उपक्रमांना वेग देण्यात आला आहे. यासह प्रशिक्षणाची व्याप्ती व वेग कर्मचारी आला. त्याचा प्राधिकारी गतिमानता व तत्पर ग्राहकांसाठी मोठा पुणे परिच्छेच्या प्रशिक्षण केंद्रांच्या मंडलमंडल लघुदाध्ये प्रथम स्थान पटकावले याचे समाधान आहे’.

सोनिया व राहुल गांधीं वरील ईडीची कारवाई राजकीय सुडबुद्धीनेच..- अरविंद शिंदे

पुणे- केंद्रातील भाजपचे नरेंद्र मोदी सरकार काँग्रेस नेत्या  खा.‌ सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यावर सक्त वसुली संचालनालयामार्फत (ईडी) दबाब आणून लोकशाहीमध्ये विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. या अन्यायाविरोधात पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, पुणे येथे आंदोलन करण्यात आले.

     यावेळी बोलताना अध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘मोदी शासनाने द्वेषपूर्ण भावनेतून व सूडबुद्धीने नॅशनल हेराल्ड या वृत्तपत्राची मालमत्ता मनमानी पध्दतीने जप्त केली. तसेच देशाच्या नेत्या खा. सोनिया गांधी, लोकसभेचे विरोधी पक्षनेते व काँग्रेस पक्षाचे नेते मा. खा. राहुल गांधी व इतर ज्येष्ठ नेतेमंडळी विरूध्द सत्तेचा दुरूपयोग करून कोर्टामध्ये चार्जशीट दाखल करण्याचा मोदी सरकारचा निर्णय हा लोकशाही परंपरेला घातक आहे. अन्यायकारक निर्णयाच्या विरूध्द आम्ही लक्षा देण्याचे ठरविले आहे. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणामध्ये मुद्दाम नाव बदनाम करून खोट्या गुन्ह्यात अटक करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना असून पक्षाचा कार्यकर्ता कदापी शांत राहणार नाही, या विरोधात रस्त्यावर उतरून मोदी सरकारचा खरा चेहरा लोकांसमोर आणण्याचे काम काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते येथून पुढे करतील मोदी सरकारने चूकीच्या पध्दतीने राहुल गांधी यांना अटक करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही शांत बसणार नाही. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे मोठ्या  प्रमाणावर रस्त्यावर उतरून निषेध नोंदविला जाईल.’’

     यावेळी माजी गृहराज्य मंत्री रमेश बागवे, प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, गोपाळ तिवारी,अविनाश बागवे, वीरेंद्र किराड, संजय बालगुडे, मुख्तार शेख, नगरसेवक अजित दरेकर, रफिक शेख, , मेहबुब नदाफ, कैलास गायकवाड, प्राची दुधाने, स्वाती शिंदे, प्रियंका रणपिसे, अनिता धिमधिमे, प्रियंका मधाळे, कांचन बालनायक, सुंदर ओव्‍हाळ, ॲड. राजश्री अडसूळ, शिवानी माने, उषा राजगुरू, ज्योती परदेशी, शारदा वीर, ब्लॉक अध्यक्ष सुजित यादव, हेमंत राजभोज, विशाल जाधव, अक्षय माने, अजित जाधव, राज अंबिके, वाल्मिक जगताप, प्रवीण करपे, सतिश पवार, रवि आरडे, द. स. पोळेकर, चेतन अगरवाल, भगवान कडू, हर्षद हांडे, राजेंद्र नखाते, लतेंद्र भिंगारे, अक्षय जैन, वैभव डांगमाळी, मतीन शेख, देवीदास लोणकर, रवि पाटोळे, संदिप मोकाटे, अक्षय बहिरट, चेतन पडवळ, अविनाश अडसूळ आदींसह असंख्य काँग्रेस कार्येकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. 

प्रवाशांना चांगली सुविधा न देणाऱ्या हॉटेल -मोटेल थांबे रद्द करा!-परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे एसटी प्रशासनाला निर्देश

मुंबई: (१६ एप्रिल) लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान एसटी बसेस थांबत असलेल्या हॉटेल-मोटेल थांब्यावर प्रवाशांना आरोग्यदायी आणि किफायतशीर सुविधा मिळत नसतील तर असे थांबे रद्द करण्याचे निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री . प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत. या संदर्भात सध्या सुरू असलेल्या सर्व थांब्याचे सर्वेक्षण करून त्याचा अहवाल पुढील १५ दिवसात सादर करण्याच्या सूचना देखील त्यांनी एस. टी. महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना केल्या आहेत.
लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान एसटी बसेस विविध हॉटेल-मोटेल थांब्यावर थांबतात. तेथे प्रवाशांना चहा -नाष्टा अथवा जेवण तसेच नैसर्गिक विधीसाठी वेळ दिला जातो. परंतु अनेक हॉटेलमधील थांब्या बाबत प्रवाशांच्या तक्रारी येत असून प्रामुख्याने प्रसाधनगृहे अस्वच्छ असणे, फराळाचे जिन्नस शिळे, अशुद्ध व महाग असणे, याचबरोबर संबंधित हॉटेल वरील कर्मचारी व मालकांची वर्तणूक एस टी प्रवासांच्या सोबत अत्यंत वाईट असणे अशा प्रकारच्या तक्रारी उद्भभवत आहेत.
या तक्रारीची गंभीर दखल घेऊन मंत्री सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला याबाबत कडक धोरण स्वीकारण्याची निर्देश दिले आहेत. कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता प्रवाशांच्या आरोग्याची कोणती तडजोड न करता संबंधित हॉटेल-मोटेल थांब्यावर कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी यावेळी दिले आहेत. तसेच सध्या संपूर्ण राज्यभरात सुरू असलेल्या हॉटेल-मोटेल थांब्याचे नव्याने सर्वेक्षण करून तेथील प्रवासी सुविधांची चाचपणी करावी. जे थांबे प्रवाशांना योग्य सुविधा देत नसतील त्यांच्यावर कारवाई करावी व नव्या थांब्यांना मंजुरी द्यावी. तसेच याबाबतचा सविस्तर अहवाल येत्या १५ दिवसात आपल्याला सादर करावा असे निर्देशित त्यांनी दिले आहेत.

हॉटेल – मोटेल थांब यावरून एसटीला मिळणारे उत्पन्न एक वेळ बुडाले तर चालेल, परंतु प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधा बाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही!

श्री . प्रताप सरनाईक

मंत्री (परिवहन) तथा अध्यक्ष, एसटी महामंडळ

दस्तलिक या भारत-उझबेकिस्तान दरम्यानच्या संयुक्त लष्करी सरावाच्या सहाव्या पर्वाचा औंध येथील परदेशी प्रशिक्षण केंद्रात प्रारंभ

नवी दिल्‍ली, 16 एप्रिल 2025

दस्तलिक या भारत-उझबेकिस्तान दरम्यानच्या संयुक्त लष्करी सरावाच्या सहाव्या पर्वाचा औंध (पुणे) येथील परदेशी प्रशिक्षण केंद्रात आज प्रारंभ झाला. हा सराव 16 ते 28 एप्रिल 2025 दरम्यान आयोजित करण्यात आला आहे.

60 जवानांचा समावेश असलेल्या भारतीय पथकात जाट रेजिमेंट आणि भारतीय हवाई दलाची बटालियन प्रतिनिधित्व करत आहेत. उझबेकिस्तान पथकात उझबेकिस्तानच्या लष्करी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दस्तलिक हा भारत आणि उझबेकिस्तान दरम्यान दरवर्षी होणारा संयुक्त सराव असून तो दोन्ही देशात आळीपाळीने आयोजित केला जातो. गेल्या वर्षी एप्रिल 2024 मध्ये उझबेकिस्तानच्या तेरमेझ जिल्ह्यात हा सराव आयोजित करण्यात आला होता.

या सरावाची संकल्पना ही निम-शहरी परिस्थितीत संयुक्त बहु क्षेत्रीय उप-पारंपरिक मोहीम या संकल्पनेवर आधारित असेल. हा सराव एका ठराविक प्रदेशावर कब्जा करण्याच्या दहशतवादी कारवाईला प्रत्युत्तर देण्यावर केंद्रित असेल. यामध्ये निरंतर संयुक्त कारवाईसाठी बटालियन स्तरावर संयुक्त कारवाई केंद्राची स्थापना, लोकसंख्या नियंत्रण उपाय, छापे, शोध आणि बिमोड कारवाया यासारख्या दहशतवादविरोधी मोहिमांची अंमलबजावणी आणि दहशतवाद्यांना निष्क्रिय करण्यासाठी हवाई साधनांसह अग्निशस्त्राचा वापर यांचा समावेश असेल. सरावा दरम्यान, लष्कर आणि हवाई दलाचे विशेष दल पुढील मोहिमांसाठी माउंटिंग बेस म्हणून वापरण्यासाठी हेलिपॅड सुरक्षित करतील. सरावात ड्रोन तैनात करणे, मानवरहित हवाई प्रणाली आणि प्रतिकूल भागात सैन्याला तग धरण्यासाठी हवाई दलाकडून लॉजिस्टिक सपोर्टचा देखील समावेश असेल. याव्यतिरिक्त, हेलिकॉप्टरचा वापर टेहळणी आणि निरीक्षण, विशेष हेलिबोर्न ऑपरेशन्स (SHBO), लहान टीम इन्सर्शन आणि एक्सट्रॅक्शन (STIE) आणि इतर संबंधित मोहिमांसाठी केला जाईल.

संयुक्त सराव दस्तलिक -VI दोन्ही बाजूंना संयुक्त उप-पारंपरिक मोहीम आयोजित करण्याच्या रणनीती, तंत्र आणि प्रक्रियांमध्ये सर्वोत्तम पद्धती सामायिक करण्यास सक्षम करेल. यामुळे दोन्ही सैन्यांमध्ये परस्पर-कार्यक्षमता, मैत्री आणि सौहार्द विकसित करण्यास मदत होईल. संयुक्त सराव संरक्षण सहकार्य देखील वाढवेल, ज्यामुळे दोन्ही मैत्रीपूर्ण राष्ट्रांमधील द्विपक्षीय संबंध आणखी वाढतील.

नाशकात अनधिकृत दर्गा काढण्यावरून वाद,जमावाची पोलिसांवर दगडफेक: पोलिसांकडूनही प्रतिकार; तणावपूर्ण शांतता

नाशिक- शहरातील कोठे गल्ली परिसरात असलेल्या अनधिकृत दर्गा काढण्याचे काम मध्यरात्री सुरू करण्यात आले. मुस्लिम धर्मगुरू आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थित संयुक्तपणे ही कारवाई करण्यात आली आहे. मात्र, त्या आधी रात्री उशिरा या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जमाव जमा झाल्यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रू धुराचा वापर केला. तर काही जणांना ताब्यात देखील घेण्यात आले आहे.


नाशिकच्या कोठे गल्ली परिसरातील अनधिकृत दर्गा हटवण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून होत होती. यासाठी मागील महिन्यातच काही हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन देखील केले होते. त्यासाठी वक्फ बोर्ड आणि उच्च न्यायालयात देखील या संदर्भात सुनावणी झाली होती. उच्च न्यायालयात दर्ग्याच्या जागेबाबत दर्गा प्रशासनाला काहीही पुरावे सादर करता आले नाही. त्यामुळे उच्च न्यायालयात दर्गा अनधिकृत ठरवण्यात आला होता. त्यानंतर पंधरा दिवसांपूर्वीच या दर्गा प्रशासनाला अतिक्रमण काढण्याची नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, तरी देखील दर्गा प्रशासनाने अतिक्रमण काढले नाही. त्यामुळे अखेर प्रशासनाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली.

नाशिक पोलिसांकडून पंधरा दिवसांपूर्वीच अनधिकृत दर्ग्याचे बांधकाम पाडण्याची नोटीस दर्गा प्रशासनाला देण्यात आली होती. मात्र, या दर्ग्याचे बांधकाम हटवण्यात आले नाही. त्यामुळे पोलिस आणि महानगरपालिकेच्या वतीने संयुक्तपणे दर्गा हटवण्याची कारवाई करण्यात आली. त्यासाठी परिसरात मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. मात्र, रात्री उशिरा या परिसरातील नागरिक संतप्त झाले होते. मोठ्या प्रमाणात जमाव जमला होता. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली होती. रात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास जमावाने अचानक पोलिसांवर तुफान दगडफेक केली. त्यामुळे काही पोलिस अधिकाऱ्यांच्या हाताला आणि पायाला जखमा देखील झाल्या आहेत. परिस्थितीत नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगवले.

पोलिसांच्या धक्काबुक्कीत काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड जखमी:जी. टी. रुग्णालयात दाखल

मुंबई- येथील ईडी कार्यालयाबाहेरील आंदोलनावेळी काँग्रसच्या खासदार वर्षा गायकवाड जखमी झाल्या आहेत. या आंदोलनादरम्यान पोलिसांच्या धक्काबुक्की मध्ये वर्षा गायकवाड किरकोळ जखमी झाल्या. त्यांना तातडीने जी. टी. रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे वर्षा गायकवाड यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत.काँग्रेसच्या नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र आणि असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (एजेएल) शी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी पहिले आरोपपत्र दाखल केले. यामध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी, सॅम पित्रोदा आणि सुमन दुबे यांची नावे आहेत. या विरोधात काँग्रेस देशभरात आंदोलन करत आहेत. तर मुंबई काँग्रेसच्या वतीने देखील मुंबईतील ईडी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली. या दरम्यान ही घटना घडली आहे.
या संदर्भात वर्षा गायकवाड म्हणाल्या की, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या राजकीय हेतूने प्रेरित आरोपपत्राविरुद्ध मुंबई काँग्रेसच्या वतीने शांततेत निदर्शने करत होते, परंतु मुंबई पोलिसांनी आम्हाला निदर्शने करू दिली नाही. इतर कार्यकर्त्यांसह माझ्यावरही मारहाण करण्यात आली आणि आम्हाला अलोकतांत्रिक पद्धतीने ताब्यात घेण्यात आले. भाजपला माहित आहे की काँग्रेस हा या देशात लोकशाहीचे समर्थन करणारा आणि लोकांच्या हक्कांसाठी लढणारा एकमेव पक्ष आहे. त्यांना राहुल गांधींच्या लोकप्रियतेची भीती आहे. काँग्रेस ही त्यांच्या फॅसिस्ट कारस्थानांविरुद्ध उभी असलेली एकमेव शक्ती आहे आणि म्हणूनच ते खोटे खटले दाखल करून धमकावण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही झुकणार नाही. आम्ही जे योग्य आहे त्यासाठी आवाज उठवत राहू, अशा इशारा या वेळी खासदार वर्षा गायकवाड यांनी दिला आहे.

वर्षा गायकवाड यांनी केलेली पोस्ट देखील पहा…

नॅशनल हेराल्डवरील बोगस खटल्याच्या प्रकरणात आमच्या नेत्या श्रीमती सोनिया गांधी आणि माननीय राहुल गांधी जी यांच्याविरोधात भाजपच्या ‘इलेक्शन डिपार्टमेंट’ बनलेल्या ED मार्फत खोट्या चार्जशीट दाखल करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलंय की, ते सर्वात मोठे घाबरगुंडे आहेत. त्यांना भीती वाटते सोनियाजी आणि राहुल गांधी यांच्या हिंमतीची, त्यांच्या सत्याची, त्यांच्या न डगमगणाऱ्या लढ्याची आणि न्यायासाठीच्या वचनबद्धतेची..!

आज मुंबईतील ED कार्यालयासमोर मोदींच्या हुकूमशाही सरकारनं सूडबुद्धीनं केलेल्या या कारवाईच्या विरोधात मुंबई काँग्रेसकडून शांततामय, लोकशाही मार्गानं आंदोलन करण्यात आलं. पण यामुळे हादरलेल्या फडणवीस सरकारनं मुंबई पोलिसांचा वापर करून आमच्या आंदोलनाला चिरडण्याचा प्रयत्न केला. ते एवढ्यावरच थांबले नाहीत — मला आणि इतर काँग्रेस कार्यकर्त्यांना धक्काबुक्की करण्यात आली, अमानवी पद्धतीनं ताब्यात घेण्यात आलं. माझ्यासह अनेक कार्यकर्त्यांना दुखापत झाली. राज्य सरकारच्या या दडपशाहीचा मी तीव्र शब्दांत निषेध करते.

काँग्रेस हा देशात लोकशाही जपणारा आणि जनतेच्या हक्कांसाठी सातत्यानं झगडणारा एकमेव पक्ष आहे, हे भाजपला ठाऊक आहे. राहुल गांधी यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळेच त्यांना घाम फुटतोय. म्हणूनच भाजप सरकार खोटे खटले आणि बनावट आरोप लावून आमचा आवाज दडपण्याचा कट रचत आहे. पण काँग्रेस इंग्रजांपुढे झुकली नाही, तर मोदी-शहांच्या या नवीन ईस्ट इंडिया कंपनीपुढेही कधीच झुकणार नाही. दडपशाही आणि अन्यायाविरुद्ध आम्ही लढत राहू. सत्य, संविधान आणि लोकशाहीच्या बाजूनं आमचा लढा अखंड सुरू राहील.

जय संविधान, जय काँग्रेस!

मोदी, शहांचे गांधी घराण्याविरुद्ध सुडाचे राजकारण:काँग्रेसची देशभरात ED कार्यालयांबाहेर निदर्शने

नॅशनल हेराल्ड केसमध्ये सोनिया-राहुलविरुद्ध आरोपपत्रास विरोध; म्हटले- मोदी, शहा धमकावताहेत


नवी दिल्ली-
काँग्रेसच्या नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र आणि असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (एजेएल) शी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी पहिले आरोपपत्र दाखल केले. यामध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी, सॅम पित्रोदा आणि सुमन दुबे यांची नावे आहेत.याच्या निषेधार्थ, पक्ष आज (बुधवार) देशभरातील ईडी कार्यालयांबाहेर निदर्शने करत आहे. मंगळवारी ही माहिती देताना काँग्रेसचे संघटन सरचिटणीस केसी वेणुगोपाल म्हणाले होते की, पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा धमकावण्याचे काम करत आहेत.

या प्रकरणाची सुनावणी २५ एप्रिल रोजी दिल्लीतील राऊस अव्हेन्यू कोर्टात होईल. न्यायालयाने ईडीकडून या प्रकरणाची केस डायरीही मागितली आहे. २०१२ मध्ये, भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी सोनिया, राहुल आणि त्यांच्या सहयोगी कंपन्यांशी संबंधित लोकांविरुद्ध या प्रकरणाची तक्रार केली होती.

१२ एप्रिल २०२५ रोजी, तपासादरम्यान, जप्त केलेल्या मालमत्ता जप्त करण्याची कारवाई करण्यात आली. ईडीने दिल्ली, लखनऊ आणि मुंबईतील ६६१ कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी नोटीस बजावली होती.

मंगळवारी खासदार प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात पोहोचले. गुरुग्रामच्या शिकोपूर जमीन घोटाळ्यात त्यांची चौकशी झाली.
ईडीचा आरोप – २००० कोटींच्या मालमत्तेवर ५० लाखांत ताबा

ईडीचा आरोप आहे की काँग्रेस नेत्यांनी एका कटाचा भाग म्हणून, ‘यंग इंडियन’ या खाजगी मालकीच्या कंपनीमार्फत ‘असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड’ (एजेएल) ची २००० कोटी रुपयांची मालमत्ता फक्त ५० लाख रुपयांना ताब्यात घेण्यासाठी ती विकत घेतली. या कंपनीत सोनिया आणि राहुल यांचे ७६% शेअर्स आहेत. या प्रकरणात ‘गुन्ह्यातून मिळणारे उत्पन्न’ ९८८ कोटी रुपये आहे. तसेच, संबंधित मालमत्तेचे बाजार मूल्य ५,००० कोटी रुपये असल्याचे मानले जात होते.

काँग्रेस म्हणाली- हे सूडाचे राजकारण आहे, भाजप म्हणाली- परिणाम भोगावे लागतील

काँग्रेसने याला सूडाचे राजकारण म्हटले. जयराम रमेश यांनी लिहिले की, ‘नॅशनल हेराल्डच्या मालमत्तेची जप्ती हा कायद्याच्या नियमाचे वेश धारण करणारा राज्य पुरस्कृत गुन्हा आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतर काही जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल करणे हे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांकडून सूडाचे राजकारण आणि धमकी देण्याशिवाय दुसरे काहीही नाही. तथापि, काँग्रेस आणि त्यांचे नेतृत्व गप्प बसणार नाही. सत्यमेव जयते.
तथापि, भाजपने म्हटले आहे की भ्रष्टाचार आणि सार्वजनिक मालमत्तेच्या लूटमारीत सहभागी असलेल्यांना आता त्याची किंमत मोजावी लागेल. राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनवाला म्हणाले- आता ईडीचा अर्थ दरोडा आणि घराणेशाहीचा अधिकार नाही. ते सार्वजनिक पैसे आणि मालमत्ता हडप करतात आणि कारवाई झाल्यावर बळीचे कार्ड खेळतात. नॅशनल हेराल्ड प्रकरणातही त्यांनी सार्वजनिक मालमत्ता स्वतःची केली.