नवी दिल्ली – सर्व विरोधी पक्षांची एकजूट ठेवण्याचे प्रयत्न करणारी शरद पवार यांची पहिली बैठक संपन्न झाली
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. शरद पवार यांच्या दिल्ली येथील ६ जनपथ या निवासस्थानी आज राष्ट्रीय पातळीवरील विरोधी पक्षांनी एकत्र येऊन देशातील सद्य परिस्थितीतील विविध समस्यांवर विचारविमर्श केला. वाढती बेरोजगारी, महिलांवरील वाढते अत्याचार यांसारखे अनेक प्रश्न ऐरणीवर आणण्याबाबत या सर्व विरोधी दलांचे एकमत झाले. तसेच श्री. शरद पवार यांच्या पुढाकाराने झालेल्या या बैठकीत विरोधी पक्षांची एकत्रित फळी सामूहिक प्रयत्नांद्वारे अधिक सक्षम राष्ट्रनिर्मितीच्या कार्यासाठी कटिबद्ध राहील व समाजाच्या सर्व घटकांना सामावून घेऊन त्यांच्या प्रगतीसाठी नियोजनपूर्वक एकत्र येईल असा संकल्प ठरवला गेला. या बैठकीला जम्मू-काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते डॉ. फारुख अब्दुल्ला, समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, जदयूचे अध्यक्ष शरद यादव हे हजर होते. दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनीही श्री. पवार यांना फोन करून या विरोधकांच्या फळीत सामील होण्याची इच्छा असल्याची भावना व्यक्त केली. परंतु त्यांच्या पूर्वनिर्धारित कार्यक्रमामुळे ते या बैठकीला येऊ शकले नाहीत. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी खासदार सुप्रिया सुळे, तारिक अन्वर, महंमद फैजल तसेच प्रफुल पटेल उपस्थित होते.
शरद पवार यांच्या पुढाकाराने सक्षम राष्ट्रनिर्मितीसाठी सर्व विरोधक कटिबद्ध
35 कॉमेडी कलाकारांची राष्ट्रवंदना…
प्रसिध्द गायक , मिमिक्री आर्टिस्ट सुदेश भोसले यांच्या सहकार्याने सिने-नाट्य सृष्टीतील 35विनोदी कलाकारांनी यंदा .. जन गण मन … या राष्ट्र गीताने देशाला नमन केले आहे . ‘पहचान कौन ‘ फेम नवीन प्रभाकर दिग्दर्शित या गाण्यात चक्क विनोदाचा बादशहा जॉनी लिव्हर यांची मुलगी जय्मी लिव्हर आणि पुण्यातील मराठी विनोदाचे विद्यापीठ असा लौकिक मिळविलेले थिएटर आर्टिस्ट सदानंद चांदेकर यांच्या सह दिनेश हिंगु, राजू श्रीवास्तव , गुरूप्रीत गुग्गी , छोटी गंगुबाई ,सलोनी ; कपिल कॉमेडी शो मधील चंदन प्रभाकर , मेघना एरंडे, डॉ. सुमित शिंदे , संकेत लोखंडे, माधव मोघे , सुगंधा मिश्रा , सुदेश लेहरी,नरेंद्र बेदी , सुनील पाल , स्वतः नवीन प्रभाकर आणि सुदेश भोसले असे एकूण ३५ कलाकारांनी या गीतामध्ये योगदान देवून राष्ट्रावंदना दिली आहे . सुदेश भोसले यांच्यासह आपआपल्या आवाजात त्यांनी सादर केलेली हि राष्ट्रवंदना कौतुकास्पद असून आम्ही हि राष्ट्रवंदनेसाठी सदैव पुढे राहू असेच नवीन प्रभाकर , जॉनी लिव्हर , सदानंद चांदेकर यांनी सांगितले .
येत्या १५ ऑगस्ट रोजी बहुतेक वाहिन्यां हि राष्ट्र्वंदना प्रसारित करीत आहे . यु ट्युब वर ती उपलब्ध आहे .
पहा — या राष्ट्रगीतापुर्वी चे ‘मेकिंग चे फोटो …
…अन् शेतरस्त्यांनी घेतला मोकळा श्वास…!
लेखक-गोविंद अहंकारी
जिल्हा माहिती अधिकारी, सोलापूर.
‘खेडी ’ हा देशाचा आत्मा आहे. खेड्यांचा विकास झाल्याशिवाय देशाचा विकास होणार नाही. आपल्या देशात ग्रामीण भागातील शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. शेतीद्वारे दरडोई उत्पन्न वाढविले पाहिजे. सुपीक जमीन, पाण्याची व्यवस्था, आधुनिक तंत्रज्ञान, यंत्रसामग्री शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. याबरोबरच शेतातला माल, आधुनिक यंत्रसामग्री याबरोबरच शेतापर्यंत पोहोचण्यासाठी बारमाही शेत रस्त्यांची गरज आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी सुवर्ण जयंती राजस्व अभियानात लोकसहभागातून शेतरस्त्यांचे काम केल्यास मनरेगामधून खडीकरण, डांबरीकरण करण्याचा संकल्प केला. याला ग्रामीण भागातून चांगला प्रतिसाद मिळून शेतकऱ्यांच्या विकासाबरोबरच ग्रामीण भागात शेतरस्त्यांनी मोकळा श्वास घेतल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
अक्कलकोट तालुक्यातील हलहळ्ळी (मैं) ते सातन दुधनी हा 2 कि.मी. अतिशय अरुंद रस्ता… रस्त्याच्या दोन्ही बाजूला अतिक्रमण काटेरी झुडपे, खड्डे यामुळे या रस्त्याने पूर्वी शेतात बी-बियाणे, शेतीची अवजारे घेवून जाणे खूपच अडचणीचे होते. पावसाळ्यात तर आणखी परिस्थिती कठीण होते. शेतरस्त्याबाबत जिल्हाधिकारी श्री. मुंढे यांनी गाव नकाशानुसार अतिक्रमित व बंद झालेले रस्ते मोकळे करण्याचे ठरविले. यासाठी प्रांताधिकारी श्रीमंत पाटोळे, मंडल अधिकारी व्ही. एस. मुडके, तलाठी टी.एन. थोरात यांनी या भागातील 30/40 शेतकऱ्यांची बैठक घेवून जिल्हाधिकारी यांची भूमिका समजावून सांगितली. यास सर्व शेतकऱ्यांनी सहमती दिली, सहमती न देणाऱ्यास कायदा व नियम समजावून दिले.
यासाठी सर्वप्रथम कल्याणी हिप्परगी, शावरेणा बसप्पा रोडगे यांनी स्वत:च्या उसाच्या पिकातून जागा दिली. त्यानंतर या परिसरातील सर्वच शेतकरी यामध्ये सक्रियपणे सहभागी झाले. याद्वारे दोन कि.मी.चा 33 फुटाचा रस्ता लोकसहभागातून दोन्ही बाजुंनी चर मारुन त्यातील निघालेल्या माती-मुरुमाने भराव करण्यात आला. अन् शेतरस्त्यांनी मोकळा श्वास घेतला. या रस्त्यामुळे शेतीमाल वाहतुकीची चांगली सोय झाली. त्याबरोबरच पूर्वी तोळणूरहून मैंदर्गीला येण्यासाठी दुधनीमार्गे 25कि.मी. यावे लागत असे. परंतु या नवीन रस्त्यामुळे 10 कि.मी. अंतर कमी झाले.
तोळणूर-अक्कलकोट-मैंदर्गी मार्गे येण्याचे अंतरही 15 कि.मी ने कमी झाले व बोराटी स्टेशनजवळ होवून कर्नाटकात जाणे सोईचे झाले. त्यामुळे कर्नाटकात जाण्याचा जवळचा मार्ग झाला. येथून कर्नाटकातील माशाळ- इंडी या गावाला जाणे सोईचे आहे. कर्नाटक-महाराष्ट्रासाठी दळणवळणाच्या सोयीचा रस्ता झाला. त्याचप्रमाणे या मार्गावरील वाहतूक वाढली. मैंदर्गीला आठवडी बाजार, दवाखान्यासाठी लोकांना जाणे सोईचे झाले. या परिसरातील हैद्रा देवस्थानला दर गुरुवारी खूप गर्दी असते, तेथे जाण्यासाठी हा मार्ग सोईचा झाला. त्यामुळे या परिसरातील शेतकरी, नागरिकांनी पूर्वीचा त्रास खूप कमी झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला व जिल्हाधिकारी, अधिकारी-कर्मचाऱ्यांना धन्यवाद दिले.
या कामापासून प्रेरणा घेऊन सातन दुधनी-बोरोटी-शंकरलिंग तांड्यापर्यंतचा रस्ताही लोकसहभागातून करण्यात आला. अशाप्रकारे तालुक्यात, जिल्ह्यात एकमेकापासून प्रेरणा घेऊन काम वाढले आहे. जिल्ह्यात 31 जुलै 2015 अखेर 481 रस्त्यांचे अतिक्रमण काढले असून 941.6 कि.मी. रस्ते शेतकऱ्यांना दैनंदिन वापराकरिता सुटसुटीत झाले आहेत.
या बारमाही शेतरस्त्यामुळे शेतकऱ्यांना मशागतीसाठी अवजारांची ने-आण करणे, खते-बियाणे शेतापर्यंत पोहोचविणे, फळे-भाज्या यासारखे नाशवंत माल तत्काळ बाजारपेठेत पोहोचविणे सोईचे झाले. वेळेवर माल बाजारपेठेत न पोहोचल्यामुळे सडून जावून होणारे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान कमी होईल. हे शेतरस्ते त्या भागातील अर्थकारणासाठी निश्चितच महत्वाचे ठरतील व शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास निश्चित मदत होईल.
जॉन और सोनाक्षी फ़ोर्स की सीक्वल में धमाकेदार एक्शन दृश्य परफॉर्म करते नज़र आएगे |
जॉन अब्राहम और सोनाक्षी सिन्हा फ़ोर्स की सीक्वल में बहुत जोखिम भरे एक्शन दृश्य करते नज़र आएगे । एक बहुत बड़ा हिस्सा फिल्म का पहले मुंबई में शूट किया गया, बाद में फ़ोर्स की सीक्वल के शूट के लिए विदेश भी गए अभिनय देओ ।
बूडपेस्ट में अभिनय का शिड्यूल पहले से ही ५० दिनों का था । ” ५ सितम्बर को सोनाक्षी और जॉन शामिल हुए। हम बहुत ही तीव्र एक्शन सीन सोनक्षी के साथ भी शूट कर रहे है, ” अभिनय ने कन्फर्म किया ” |
निर्माता विपुल अमृतलाल शाह ने भी कहा ” साउथ अफ्रीका के फ्रान्ज़ फिल्म के सारे स्टंट्स का रूपांकन करेंगे। मैंने उनके साथ फिल्म कमांडो और सिंह इस किंग में भी काम कर चूका है। हम शूटिंग शुरू होंगे से पहले लगभग १ महीने का रिहर्सल करेंगे । १० दिनों के लिए बूडपेस्ट से हम चीन गए उसके बाद में दो सप्ताह के लिये मुंबई ।
विपुल, जिन्होंने फ़ोर्स का पहला हिस्सा निर्मित किया था, वो अब फ़ोर्स के सीक्वल के लिए कोई भी कमी नहीं छोड़ रहे। एक सफल निर्माता, जिन्होंने शुरुवात में कुछ सुपर हिट फिल्मे प्रडूस की है, जैसे की हॉलिडे, फ़ोर्स, नमस्ते लंदन आदि, वो अब खुदही फिल्म से संभंधित सारी सूचि देख रहे है ।
फिल्म २०१६ के शुरुवात में ही रिलीज़ होगी।
अण्णांना 3 वेळा धमकी … तपास शून्य … व्वा रे सरकार …
पुणे–ज्येष्ठ समाजसेवक अन्ना हजारे यांना 3 वेळा धमकीची पत्रे आली -पोलिसात गुन्हे दाखल झाले पण तपास शून्य … अशी अवस्था का ? कोण पाठवतात असी पत्रे ? याबाबत पोलिसांना यश का येत नाही ? असे सवाल आता उपस्थित केले जात आहेत . काल राळेगण सिद्धी येथे अण्णांना पत्र पाठवून जिवे मारण्याची धमकी दिली होती व त्या प्रकारणी भ्रष्टाचार निर्मूलन न्यास राळेगण सिद्धी या संस्थेच्या माध्यमातून पारनेर जिल्हा अहमदनगर येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
अण्णा हजारे यांचे पुणे येथील वकील अॅड मिलींद दत्तात्रय पवार यांनी अण्णांना वरील आलेल्या धमकी पत्राची दखल घेऊन आज मुख्यमंत्री, गृहमंत्री, व केंद्रीय गृहमंत्री यांना स्पीड व रजिस्टर पोस्टाने व मेल पाठवून अण्णांना विशेष दर्जा असलेली झेड प्लस ही सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात यावी अशी मागणी केली आहे.
अॅड मिलींद दत्तात्रय पवार हे पत्रात म्हणतात अण्णा सुरक्षा स्वीकारण्यास नकारच देतील परंतू सरकारची जबाबदारी म्हणून अण्णा हजारे यांना झेड प्लस ही सुरक्षा पुरविण्यात आली पाहिजे.
दाभोळकर व पानसरे यांचे मारेकरी अद्याप पकडले गेले नाहीत. ठराविक नेत्यांच्या विरोधात बोलल्यावर असले प्रकार वाढु लागलेत की अशी शंका निर्माण होत आहे.
आज पर्यन्त अण्णा हजारे यांना 3 वेळा धमकीचे पत्र आलीत परंतु अद्याप एकाही पत्रकाचा लेखक किंवा धमक्या देणारा सापडला नाही व ही बाब फार गंभीर आहे व म्हणून वेळीच दखल घेणे गरजेचे आहे.
अण्णा हजारे यांच्या जिवाला काही धोका निर्माण झाल्यास वा कुठलाही अनुचित प्रकार घडल्यास त्यास सर्वस्वी सरकार जबाबदार राहील असे पत्रात नमूद केले आहे.
पहा …संतोष जुवेकरच्या ‘बायकर्स अड्डा ‘ चा ट्रेलर
संतोष जुवेकर ची प्रमुख भूमिका असलेला बहुचर्चित पण रेंगाळलेला ‘बायकर्स अड्डा ‘प्रेक्षकांना प्रतीक्षा असूनही येतो कि नाही ? अशा कात्रीत अडकला आहे . पण त्याचा ट्रेलर मात्र लौंच झाला आहे . देवा भगत , राहुल डोंगरे अशा पुण्यातल्या कलाकारांचा त्यात समावेश आहे . हा चित्रपट येईल तेव्हा पहाच आता ट्रेलर तर पाहून घ्या … झक्कास …
आर्या आंबेकर आता नायिकेच्या रुपात रुपेरी पडद्यावर
‘सारेगमप लिटील चैम्प’ म्हणून एकेकाळी गाजलेली गायिका आर्या आंबेकर आता लवकरच रसिक प्रेक्षकांना नायिकेच्या रुपात रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. गायन क्षेत्रात यशस्वी झाल्यानंतर आर्याने आता अभिनयक्षेत्रात पदार्पण केले असून ‘रंगीला रे’ या आगामी चित्रपटात ती आपल्या अभिनयाचे रंग दाखविणार आहे. मुळची नागपूरची असलेली आर्या आंबेकर आता गायिकेबरोबरच ‘नायिका’ म्हणून मराठी चित्रपटसृष्टीत आपले यश अजमावून पाहण्यास सिद्ध झाली आहे. २००८ साली झी मराठी प्रस्तुत ‘सारेगमप लिटील चैम्प’ स्पर्धेत अंतिम फेरीत पोहोंचलेल्या आर्या आंबेकर हिने आपल्या बहारदार गायनाने हरिहरन, श्रेया घोसाल, महालक्ष्मी अय्यर यांच्यासारख्या दिग्गजांना मंत्रमुग्ध केले होते. या स्पर्धेनंतर गोड गळ्याची गायिका म्हणून नावारूपास आलेल्या आर्याने ‘पंचरत्न’, ‘जय हरी विठ्ठल’, ‘गर्जती सह्याद्रीचे कडे’, ‘आठवा स्वर’, ‘मराठी अभिमान गीत’, ‘गीत तुझे गाता गाता’, ‘खाऊचा गाव’, ‘माझ्या मातीचे गायन’, ‘दिवा लागू दे रे देव’, ‘मला म्हणतात आर्या आंबेकर’ आदी अल्बम मधून रसिक श्रोत्यांनाही तृप्त केले. ”२६/११ च्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात आर्याने गायलेल्या ” ए मेरे वतन के लोगो …” या अमर गीताने अनेक उपस्थितांचे डोळे पाणावले होते. तसेच थोर समाजसेवक बाबा आमटे यांच्या महान कार्याचे वर्णन करणारा आर्याच्या आवाजातील अल्बमला रसिकांच्या पसंतीची पावती मिळाली होती. आर्याच्या आवाजातील ‘हम और तुम’ हा हिंदी गीतांचा अल्बमही खुप गाजला होता. याशिवाय आर्याने ‘लेट्स गो बैक’, ‘कळी’ योद्धा’, ‘बालगंधर्व’, ‘रमा माधव’, ‘गोष्ट तिच्या प्रेमाची’ आदी चित्रपटात गायनही केले आहे. सध्या झी मराठीवर गाजत असलेल्या ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेचे शीर्षकगीतही आर्यानेच म्हटले आहे. गायिका म्हणून गाजलेली आर्या ‘नायिकाही होणार याची चुणूक ‘सारेगमप लिटील चैम्प’ या स्पर्धेतच पाहायला मिळाली होती. त्याप्रमाणे आर्यांचे हे स्वप्न ‘रंगीला रे’ या चित्रपटाच्या निमित्ताने प्रत्यक्षात उतरणार आहे. आपल्या या पहिल्याच चित्रपटाबाबत आर्या खूपच उत्सुक आहे. चित्रपटात नायिका म्हणून मला यापूर्वीच ऑफर आल्या होत्या मात्र मी चांगल्या भूमिकेच्या शोधात होते आणि ‘रंगीला रे’ चित्रपटाच्या निमित्ताने मला चांगली भूमिका मिळाली व नायिका म्हणून अभिनयात कोणतीही उणीव राहू नये यासाठीची मी आता दक्षता घेत आहे असे आर्याने मोठ्या उत्साहाने सांगितले. नागपूरच्या ‘सेव्हन हॉर्स एन्टरटेन्मेंट’ या निर्मिती संस्थेतर्फे ‘रंगीला रे’ चित्रपट तयार करण्यात येत असून त्याचे दिग्दर्शन पराग भावसार करीत आहेत. याशिवाय कथा-पटकथाही त्यांनीच लिहिली आहे. चित्रपटाची निर्मिती अमित धुपे करीत असून ‘तानी’ चित्रपटाचे निर्माते अजय ठाकूर हे या चित्रपटाचे क्रिएटिव्ह हेड आहेत. प्रवीण कुंवर यांनी चित्रपटाला संगीत दिले असून ‘रंगीला रे’ चे लवकरच चित्रीकरण सुरु होत आहे.
ज्येष्ठ साहित्यिक -कवी फ.मु . शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छ्या …
ज्येष्ठ साहित्यिक -कवी फ.मु . शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छ्या …
गैरभाजप, गैरकाँग्रेस पक्षांची मोट बांधण्याचे प्रयत्न-पवारांची चाणक्यनिती… ?
नवी दिल्ली- धर्मनिरपेक्ष सरकार साठी काँग्रेस बरोबर हातमिळवणी केलेले शरद पवार आता त्यांच्या दृष्टीने नेहमीच जातीयवादी असलेल्या भाजपा सह काँग्रेस लाही बाजूला सारून या दोन्ही पक्षांच्या विरोधात अन्य राजकीय पक्षांची एकजूट होते काय याची नवी चाचपणी करीत असल्याचे वृत्त आहे . गोंधळ आणि गदारोळात संसदेचे पावसाळी अधिवेशन गुरफटले असतानाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजनीतीने वेग घेतला आहे. तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी मंगळवारी दिल्लीत आल्या असल्याने हीच संधी साधून गैरभाजप, गैरकाँग्रेस पक्षांची मोट बांधण्याचे प्रयत्न त्यांनी सुरू केले आहेत. याच प्रयत्नाचा भाग म्हणून बुधवारी सायंकाळी पवार यांच्या निवासस्थानी तिसऱ्या आघाडीची चाचपणी होणार असून ममता बॅनर्जी यावेळी उपस्थित राहणार आहेत.पवार आणि ममता यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीला जनता दल युनायटेडचे अध्यक्ष शरद यादव आणि के. सी. त्यागी, समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव किंवा रामगोपाल यादव, तृणमूल काँग्रेसचे सुदीप बंडोपाध्याय आणि डेरेक ओब्रायन आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या पक्षांचे लोकसभेत ५१, तर राज्यसभेत ४५ सदस्य आहेत. गैरभाजप-गैरकाँग्रेस आघाडीची चाचपणी करण्याची कल्पना पवार यांनी मांडल्यानंतर ज्येष्ठ नेत्याच्या नात्याने आपणच त्यात पुढाकार घेऊन आपल्या निवासस्थानी तशी बैठक बोलवावी, अशी सूचना ममतांनी केली. त्यानुसार पवार यांच्या ६ जनपथ येथे बुधवारी सायंकाळी सहा वाजता ही बैठक होणार आहे. तत्पूर्वी, सायंकाळी ४ वाजता ममता पंतप्रधान मोदींसोबत चर्चा करणार आहेत.
गेल्या चार दशकांपासून राजकारणात असलेल्या ममतांना दिल्लीच्या राजकीय वर्तुळात प्रथमच एवढा प्रतिसाद लाभत आहे. आपल्या तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी ममतांचे आगमन झाल्यानंतर संसद भवनात त्यांच्या समर्थकांनी स्वागतपर घोषणा दिल्या. संसदेत प्रवेश केल्यानंतर ममता शेवटपर्यंत व्यस्त होत्या. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये तृणमूल काँग्रेसचे सर्व ३४ खासदार त्यांची प्रतीक्षा करीत होते. त्यांच्यासोबत तसेच अन्य पक्षांच्या नेत्यांशी संवाद साधल्यानंतर ममता संसद भवनाच्या तळमजल्यावर मिळालेल्या पक्षाच्या नव्या कार्यालयात विविध नेत्यांशी भेटीगाठी घेण्यात व्यस्त झाल्या.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावरून राष्ट्रवादी आणि मनसे असा वादंग…
जिजामातेचे चारित्र्यहनन करणाऱ्यांना पाठीशी घालण्याची नीती आमची नाही-जितेंद्र आव्हाड
ठाणे -शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावरून राष्ट्रवादी आणि मनसे असा वादंग निर्माण होवू पाहतो आहे . काल मनसेचे राज ठाकरे यांनी पुरंदरे यांच्यावरून ‘जाणता राजा ‘ शरद पवार आणि ठाण्यातली वळवळ असे संबोधत जितेंद्र आव्हाड यांच्यावर आपल्या भाषणातून निशाना साधला होता . याबद्दल …
जिजामातेचे चारित्र्यहनन करणाऱ्यांना पाठीशी घालण्याची नीती आमची नाही , प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहीलेले शिवचरित्र आमच्या मनाला भावले. त्यांनी लिहीलेले शिवचरित्र वाचून माझ्यासारखे कार्यकर्ते घडले. पुरोगामी महाराष्ट्रात आम्ही प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार पुढे घेवून जात आहोत. पण राज ठाकरे पुरंदरेच्या मागे जाताना प्रबोधनकार ठाकरेंचा वारसा विसरत असल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे.
राज ठाकरे यांनी काल ठाण्यात झालेल्या भाषणात आव्हाड यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली होती. त्याला आव्हाड यांनी उत्तर दिले आहे. पुरंदरेंच्या पुस्तकात महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या राष्ट्रमाता जिजामातेचे चारित्र्यहनन केले आहे. चुकीचा इतिहास मांडण्याचे प्रयत्न पुरंदरेंच्या पुस्तकात करण्यात आला आहे. आम्ही त्याला विरोध करायचा नाही का असा प्रश्नही आव्हाड यांनी उपस्थित केला.
राज ठाकरे यांनी बाबासाहेब पुरंदरेंचा इतिहास वाचण्यापेक्षा वेळ काढून आजोबा प्रबोधनकार ठाकरेंनी लिहिलेला इतिहास वाचावा, असा सल्ला जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंना दिला आहे. पुरंदरेच्या पुस्तकाचा राज ठाकरेंवर प्रभाव पडतोय व त्यांना प्रबोधनकार ठाकरेंच्या वारशाचा विसर पडतोय हा महाराष्ट्रासाठी दुर्दैवी योग असल्याची टीकाही अाव्हाड यांनी यावेळी केली.
-दरम्यान
काल राज ठाकरे यांनी भाजप -राष्ट्रवादी- एम आय एम चे ओ वे सी यांच्या सह न्यायाधीशांवरही टीप्पणी केली होती
‘आजच्या सरकारला या देशात निवडणुकांच्या तोंडावर दंगली घडवायच्या आहेत. यासाठी याकूबच्या फाशीच्या तमाशा बनवला गेला. हे सर्व मतांचे उद्योग आहेत. पण खबरदार, जर या महाराष्ट्रात काही वेडेवाकडे घडवण्याचा प्रयत्न केलात तर राज ठाकरेंशी गाठ आहे. रस्त्यावर बाहेर काढून फोडून काढीन,’ अशा शब्दांत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी साेमवारी भाजपच्या केंद्र व राज्यातील सरकारवर जोरदार हल्लाबोल करत कित्येक महिन्यांचे ‘मौन’ सोडले. उद्धव ठाकरेंशी भेट, महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे राजकारण, याकूबची फाशी, नरेंद्र मोदींचे मौन आणि न्यायालयांची भूमिका अशा विविध विषयांवर त्यांनी परखड मते मांडली.विधानसभा निवडणुकांच्या निकालापासून शांत असलेल्या राज ठाकरेंनी साेमवारी ठाण्यातील कार्यकर्ता मेळाव्यात राज्यातील राजकीय परिस्थितीवर परखड भाष्य केले. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी उद्धव ठाकरे आणि आपल्या भेटींबद्दलच्या कथित बातम्यांबद्दल खुलासा केला. ‘इंदूरचे भय्यू महाराज यांच्या आमंत्रणावरून आपण तिकडे गेलो होतो, असा तर्क लावत भेटीच्या या बातम्या पुरवल्या गेल्या,’ असे सांगताना भाजपला घाबरवण्यासाठी शिवसेनेनेच या बातम्या पसरवल्याचा अप्रत्यक्ष आराेप राज ठाकरे यांनी केला.
देवेंद्र फडणवीस चांगला माणूस असल्याचे काैतुक करतानाच त्यांच्या सरकारवर मात्र ठाकरेंनी हल्लाबाेल केला. या सरकारच्या येण्याने राज्यात काही फारसा बदल झाला नसल्याचे त्यांनी नमूद केले. ‘शेतकरी आत्महत्या, सिंचन, टोल, दुष्काळ हे जुनेच प्रश्न आजही कायम आहेत,’ हे सांगतानाच ‘या सरकारची इतक्या लवकर भांडाफोड होईल वाटले नव्हते’, असा चिमटा काढत राज यांनी तावडे आणि पंकजा मुंडे या मंत्र्यांनाही लक्ष्य केले. राज्य सरकारच्या एका खात्यात कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी शंभर कोटींची लाच खाल्ल्याचा आरोपही त्यांनी केला. ‘मन की बात करणारे मोदी आता शांत का?’ असा सवाल करत राज यांनी मोदी आणि शहा या भाजपच्या सर्वोच्च नेत्यांवरही शरसंधान केले.
राष्ट्रवादीमुळेच जातीयवाद वाढला
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारावरून चाललेल्या राजकारणाचा निषेध करत राज ठाकरे यांनी जितेंद्र अाव्हाड आणि शरद पवार यांच्यावरही टीका केली. ‘राष्ट्रवादी नावाचा पक्ष जेव्हापासून जन्माला आला तेव्हापासून राज्यात जातीयवादाचे विष पसरू लागले अाहे,’ असा थेट आराेप करत राज ठाकरे यांनी ‘एमअायएम’चे अाेवेसी बंधूंनाही लक्ष्य केले.
जे काँग्रेस केले तेच भाजपही करतेय
परप्रांतीयांच्या नावावर बांगलादेशी नागरिकांना राज्यात प्रवेश दिला जात आहे. या सगळ्यांना पोसण्याचे काम भाजप करत अाहे. खोटी आधार कार्डे वाटताना मनसे कार्यकर्त्यांनी भाजपच्या एका कार्यकर्त्याला पकडल्याची माहिती राज ठाकरे यांनी दिली. पूर्वी जे काँग्रेस करायची, तेच आता हे पार्टी विथ डिफरन्स म्हणणारे भाजपवाले करताहेत, असा हल्लाबोल त्यांनी केला.
मांसाहार झेपत नसेल तर करू नका
मांसाहाराच्या मुद्द्यावरून राज यांनी गुजराती समाजावर शरसंधान केले. ‘मांसाहार आपल्याला नाही झेपत तर गप्प बसा, पण मांसाहार करणाऱ्यांना विरोध करणे ही दहशत मुंबईत खपवून घेतली जाणार नाही,’ असा इशारा त्यांनी दिला.
न्यायालयाच्या भूमिकेवरही टीका
‘न्यायालये एरवी न्यायासाठी सुट्यांची कारणे देतात अाणि याकूब मेमनसाठी पहाटे तीन वाजता न्यायालये उघडतात, हे दुर्दैवी अाहे,’ हे सांगतानाच महेश भट, सलमान, नसिरुद्दीन शहा, राम जेठमलानी यांनीही याकूबच्या फाशीसंदर्भात घेतलेल्या भूमिकेवर राज यांनी नाराजी व्यक्त केली. याकूबच्या केसला २२ वर्षे आणि गणपती मंडपांच्या केसेस मात्र एका फटक्यात निकाली काढल्या जातात,’ याकडेही लक्ष वेधले.
केजरीवालांची साथ सोडा .. अन्यथा तुमचा दाभोलकर करू… अण्णांना धमकी
मुंबई -ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना निनावी पत्राद्वारे हत्येची धमकी देण्यात आली आहे. ‘अरविंद केजरीवाल यांच्याशी संबंध ठेवू नका, नाहीतर तुमचा नरेंद्र दाभोलकर करून टाकू,’ असा इशारा या पत्रातून देण्यात आला आहे. याप्रकरणी नगर जिल्ह्यातील पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अण्णांना पाठविण्यात आलेले ‘धमकीपत्र’ इंग्रजीत असून त्यावर ७ ऑगस्टची तारीख असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येची आठवणही पत्रातून करून देण्यात आली आहे. ‘अण्णांनी राळेगणसिद्धी या आपल्या गावीच राहावे. आम आदमी पक्षाचे नेते केजरीवाल यांच्याशी फार जवळीक वाढवू नये,’ असा इशाराही देण्यात आला आहे.
अरविंद केजरीवाल यांनी राजकीय पक्ष स्थापन केल्यानंतर अण्णा त्यांच्यापासून तसे पाहता फारसे जवळ नाहीत .पण आता अण्णांनी आंदोलन इशारा दिला आहे .
रंगकर्मी भालचंद्र पेंढारकर यांना मान्यवरांची पुष्पांजली …
निष्ठावंत रंगकर्मी गमावला – मुख्यमंत्री
मुंबई: भालचंद्र पेंढारकर यांच्या निधनाने मराठी रंगभूमीची निष्ठेने सेवा करणारा ज्येष्ठ रंगकर्मी आपण गमावला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.
मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, नाट्यदिग्दर्शक, नाट्यनिर्माते, ध्वनी-प्रकाश व्यवस्थापक, अभिनेते, गायक, संगीतकार अशा विविध भूमिकेतून श्री. पेंढारकर यांनी रंगभूमीची निस्वार्थपणे सेवा केली. ललितकला दर्श संस्थेच्या माध्यमातून ते नाट्यक्षेत्रासाठी आयुष्यभर झटत होते. विशेषत: संगीत रंगभूमीला त्यांच्या योगदानाचा कधीही विसर पडणार नाही. त्यांच्यासारखा हरहुन्नरी रंगकर्मीच्या निधनाने नाट्यक्षेत्राची मोठी हानी झाली आहे.
संगीत रंगभूमीचा आधारवड हरपला – विनोद तावडे
ज्येष्ठ रंगकर्मी भालचंद्र पेंढारकर यांच्या निधनाने संगीत रंगभूमीचा आधारवड हरपला आहे, अशा शब्दांत सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिर येथे जाऊन श्री. तावडे यांनी भालचंद्र पेंढारकर यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. अभिनय, दिग्दर्शन, नाट्यनिर्मिती, नेपथ्य, ध्वनिमुद्रण, छायाचित्रण अशा विविध क्षेत्रात तितक्याच ताकदीने वावर असणारे श्री. पेंढारकर संगीत रंगभूमीशी शेवटपर्यंत प्रामाणिक राहिले. अत्यंत व्यासंगी, शिस्तप्रिय आणि रंगभूमीवर अमाप श्रद्धा असणारे ते रंगकर्मी होते. त्यांच्या निधनाने रंगभूमीची अपरिमित हानी झाली आहे, अशा शब्दात श्री. तावडे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
श्री. पेंढारकरांच्या गाजलेल्या नाटकांमध्ये प्रामुख्याने दुरितांचे तिमिर जावो, पंडितराज जगन्नाथ, गीता गाती ज्ञानेश्वर, शाब्बास बिरबल शाब्बास यांचा विशेष उल्लेख करता येईल. रंगभूमीला ते तीर्थासारखे पवित्र मानत. संगीत रंगभूमीशी शेवटपर्यंत प्रामाणिक राहिलेल्या या तपस्वी, हळव्या कलाकाराच्या निधनाबद्दल श्री. तावडे यांनी दु:ख व्यक्त केले आहे.
मराठी रंगभूमीने चतुरस्त्र कलावंत गमावला – गिरीष बापट
ज्येष्ठ नाट्य कलावंत भालचंद्र पेंढारकर (वय 94) यांच्या निधनाने मराठी रंगभूमीने चतुरस्त्र कलावंत गमावला. पेंढारकर यांनी अभिनयाबरोबच दिग्दर्शन, नाट्यनिर्मिती, नेपथ्य, ध्वनिमुद्रण, छायाचित्रण या क्षेत्रातही त्यांनी छाप पाडली होती. ललितकलादर्श नाटकमंडळी या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी रंगभूमीची अविरत सेवा केली.
रक्त नको मज प्रेम हवे, दुरितांचे तिमीर जावो, जय जय गौरीशंकर, आनंदी गोपाळ, पंडित जगन्नाथ, गीता गाती ज्ञानेश्वर, शाब्बास बिरबल शाब्बास ही पेंढारकर यांची गाजलेली नाटके आहेत. त्यांना विष्णुदास भावे पुरस्कार, १९७३, बालगंधर्व पुरस्कार, १९८३
केशवराव भोसले पुरस्कार, १९९०, जागतिक मराठी परिषद, १९९६, संगीत नाटक कला अकादमी, २००४, तन्वीर सन्मान पुरस्कार, २००५, चतुरंग जीवनगौरव पुरस्कार, २००६
प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कार, २००६ या पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
रंगभूमीच्या सेवेचे व्रत आयुष्यभर समर्थपणे पेलणा-या या कलावंतास माझी भावपूर्ण श्रद्धांजली.
भारतविरोधी कारस्थान रचणाऱ्या हाफिज सईदला ‘फँटम’कसा आवडेल? : सैफ अली
नवी दिल्ली : -भारताविरोधात कारस्थान रचणारी माणसं पाकिस्तानमध्ये आहे, त्यामुळे साहजिकच त्यांना ‘फँटम’ चित्रपटाचं कथानक रुचणार नाही, असा घणाघात अभिनेता सैफ अली खानने केला आहे. ‘फँटम’ चित्रपटाचं कथानक 26/11 च्या हल्ल्यावर आधारित आहे.मुंबईवरील 26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदने ‘फँटम’ चित्रपटावर पाकिस्तानात बंदी आणण्याची मागणी करणारी याचिका केल्याच्या पार्श्वभूमीवर सैफने प्रतिक्रिया दिली. चित्रपटामुळे जगभरात पाकिस्तानची प्रतिमा दहशतवादी देश अशी करत असल्याचा आरोप हाफिज सईदने केला आहे.’पाकिस्तानात बसलेल्या मुंबईवरील हल्ल्याच्या आरोपीला मोठा पडद्यावर कटाचं कथानक पाहण्याची भीती वाटत आहे. पाकिस्तानी सेन्सॉर बोर्डाचे सदस्य कसा विचार करतात, हे मला माहित नाही’ असंही सैफ म्हणाला. लाहोर कोर्टाने पाकिस्तान सेन्सॉर बोर्ड आणि सरकारला यासंदर्भात नोटीस पाठवली आहे.कबीर खान दिग्दर्शित ‘फँटम’ चित्रपटात सैफ अली खान आणि कतरिना कैफच्या मुख्य भूमिका आहेत. कबीर आणि सैफ यांना यापूर्वीही पाकिस्तानात बंदीला सामोरं जावं लागलं आहे. कबीर खानच्या ‘एक था टायगर’ तर सैफच्या ‘एजंट विनोद’ला पाकिस्तानात बंदी घातली होती.हुसैन झैदी यांच्या कादंबरीवरील ‘फँटम’ चित्रपटाचं कथानक 26/11 च्या हल्ल्यावर आधारित आहे. चित्रपटाच्या कथानकानुसार डॅनियल या भारतीय एजंटवर हाफिज सईदला शोधून मारण्याची जबाबदारी सोपवण्यात येते. या सिनेमाचे प्रोमो नुकतेच रिलीज करण्यात आले असून यामध्ये डेव्हिड हेडली, हाफिज सईद, झकी उर रहेमान लख्वी यांच्यावर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे.
आषाढी अमावस्येच्या सायंकाळी पुण्यात महिलांकडून व्यसनमुक्तीसाठी सामूहिक दीपपूजन
ज्येष्ठ रंगकर्मी भालचंद्रजी पेंढारकर यांचे दुःखद निधन
मराठी रंगभूमीतील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेले भालचंद्र ऊर्फ अण्णा पेंढारकर यांचे आज (मंगळवार) वृद्धापकाळने निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. दिग्दर्शन, नाट्यनिर्मिती, नेपथ्य, ध्वनिमुद्रण, छायाचित्रण अशाच सर्वच क्षेत्रात त्यांनी आपला ठस्सा उमटवला होता. ‘दुरितांचे तिमिर जावो’, ‘पंडितराज जगन्नाथ’, ‘गीता गाती ज्ञानेश्वर’ आणि ‘शाब्बास बिरबल शाब्बास’, ‘ पंडितराज जगन्नाथ’, ‘बावनखणी’, ‘जय जय गौरिशंकर’, ‘आनंदी गोपाळ’, ‘रक्त नको मज प्रेम हवे’, ही त्यांची नाटके विशेष गाजली. मराठी नाट्य क्षेत्रातील बिरबल म्हणून त्यांची ओळख होती. त्यांना त्यांच्या वडिलांकडूनच कलेचे बाळ कडू मिळाले होते.
नाट्चळवळीला बळकटी दिली
अण्णांनी ऐन उमेदीच्या काळातच ‘ललितकलादर्श नाटकमंडळी’च्या कार्यासाठी स्वत:ला झोकून दिले. या संस्थेची स्थापना १ जानेवारी १९०८ रोजी संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी केली होती. ४ ऑक्टोबर १९२१ रोजी केशवरावांचा मृत्यू झाला. दरम्यान, बापुरावांनी संस्थेची धुरा सांभाळाली. पुढे १९३७ साली बापुरावांचे अकाली निधन झाले. आणि १९४२ साली बापुरावांचे चिरंजीव भालचंद्र व्यंकटेश तथा अण्णा पेंढारकरांनी, वयाच्या सोळाव्या वर्षी, कंपनीची सूत्रे हाती घेतली.
संक्षिप्त जीवनपट
जन्म – २१ नोव्हेंबर १९२१.
पुरस्कार –
विष्णुदास भावे पुरस्कार,१९७३
बालगंधर्व पुरस्कार, १९८३
केशवराव भोसले पुरस्कार, १९९०
जागतिक मराठी परिषद, १९९६
संगीत नाटक कला अकादमी, २००४
तन्वीर सन्मान पुरस्कार, २००५
चतुरंग जीवनगौरव पुरस्कार, २००६
प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कार, २००६














