Home Blog Page 3568

चिरंजीवी झाला ६० वर्षांचा …

0

1 3 (1) 3 (2) 4 5 6 7 9 10 11 12 13 11917889_1027544100613112_588716142_n

चेन्नई :  आघाडीचा अभिनेता चिरंजीवी परवा 60 वर्षांचा झाला .    अभिनेता रामचरण तेजाने हैदराबादच्या एका हॉटेलमध्ये त्याच्या  ‘बर्थ डे’ पार्टीचं आयोजन केलं होतं.  यावेळी  दिग्गज कलाकारांनी उपस्थिती लावली . सलमानखान ने या पार्टीत डान्स केल्याने बरीच रंगत आल्याचे सांगण्यात येते अवघ्या काही सेकंदाचे अशा डान्सचे मोबाईल व्हिदिओ यु ट्युब वर प्रसारित झालेआहेत या शिवाय अनेक वेबसाईट ने या बर्थ डे पार्टी चे असंख्य फोटो हि प्रसारित केले आहेत कमल हसन अभिषेक बच्चन, जया बच्चन, श्रीदेवी, बोनी कपूर, शत्रुघ्न सिन्हा, विवेक ओबेरॉय, प्रकाश राज  अशी दिग्गज मंडळी उपस्थित होती.तर दाक्षिणात्य सिनेमातील अभिनेता नागार्जुनने सहकुटुंब हजेरी लावली. याशिवायमोहन बाबू, डग्गुबती व्यंकटेश, राणा डग्गुबती, जयाप्रदा, खुशबू, तापसी पन्नू, तमन्ना भाटियासह अनेकांनी या पार्टीमध्येसहभाग नोंदविला चिरंजीवीचा जन्म 22 ऑक्टोबर 1955ला मोगलथुर, नारासापूरम, वेस्ट गोदावरी, आंध्रप्रदेशात झाला आहे

 

कमिन्स इंडिया कंपनीच्या वतीने डॉ दत्ता कोहिनकर यांचा गौरव

0

b1

पुणे-जीवन धकाधकीचे झाले असले तरी मनशांती मिळविणे अजिबात अवघड राहिलेले नाही जीवनातला काही वेळ मात्र त्यासाठी दिला पाहिजे असे इथे विश्वशक्ती इंटरनॅशनल फाउंडेशनचे प्रमुख विश्वस्त डॉ दत्ता कोहिनकर  यांनी सांगितले

विश्वशक्ती इंटरनॅशनल फाउंडेशनचे प्रमुख विश्वस्त डॉ दत्ता कोहिनकर यांना सामाजिक क्षेत्रातील फिनिक्स फाउंडेशनचा “जीवनगौरव 2015” पुरस्कार मिळाल्याबद्दल कमिन्स इंडिया कंपनीच्या वतीने  व्हि पी अश्वत्थराम यांच्या हस्ते युनियनच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात गौरवण्यात आले.
याप्रसंगी सतिश मुळे, सचिन घनपाठी, नवनाथ माने, गणेश घुगे, युनियनचे अध्यक्ष महेंद्र बालवडकर, राजेंद्र ढमाले यांची प्रमुख उपस्थिती होती.

आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयातील ‘राष्ट्रीय सेवा योजना’ (एनएसएस) च्या वतीने रक्तदान शिबिर

0

पुणे :

‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयातील ‘राष्ट्रीय सेवा योजना’ (एनएसएस) विभागाच्या वतीने नुकतेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे आयोजन हडपसर येथील ‘अक्षय ब्लड बँके’साठी केले होते. रक्तदान शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. शैला बुटवाला यांनी केले. या शिबिरामध्ये एकूण 40 रक्तदात्यांनी रक्तदान केले, अशी माहिती ‘आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालया’च्या प्रा. नुसरत एस.शेख यांनी दिली.

‘अक्षय ब्लड बँके’च्यावतीने आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयाला आणि रक्तदात्यांना प्रशस्तीपत्रक देण्यात आली तसेच रक्तदात्यांना ‘ब्लड ग्रुप कार्ड’ देण्यात आली. लायन्स क्लब, पुणे गॅलक्सी चे अध्यक्ष श्री. दिवेकर यांच्या वतीने रक्तदात्यांना भेटवस्तू देण्यात आली.

unnamed

माळी समाजाचा भव्य वधु वर मेळावा उत्साहात संपन्न

0

unnamed unnamed1

पुणे- जिल्हा माळी वधु वर सूचक मंडळातर्फे माळी समाजाचा भव्य वधु वर मेळावा उत्साहात संपन्न झाला . पर्वतीजवळील अरण्येशवर मधील मुक्तागन कॉलेजच्या सभागृहात झालेल्या या मेळाव्यामध्ये २९६ वधु तर २३१ वरांनी सहभागी होऊन आपला परिचय करून दिला . या मेळाव्याचे उदघाटन संत सावतामाळी यांच्या प्रतिमेस पुष्पहार उपस्थित वधु वरांच्या हस्ते अर्पण करून त्यांच्या पूजनाने करण्यांत आले . यावेळी पुणे जिल्हा माळी वधु वर सूचक मंडळाचे समन्वयक राम झगडे , सुदाम धाडगे , नाना कुदळे , रघुनाथ ढोक , शारदा लडकत , शिवाजीराव लोणकर , मालती माळी , उज्वला कांडपिळे , शंकुतला झगडे , कारभारी टिळेकर , चंद्रकांत जगताप , सिताराम गोरे व अन्य सदस्यांनी विशेष परिश्रम घेऊन मेळावा यशस्वीरीत्या पार पाडला .

   या मेळाव्यामध्ये राज्यभरातून माळी समाजातील वधु वरांनी सहभागी होऊन आपला परिचय करून दिला . या मेळाव्याचे सूत्रसंचालन संजय गिते व शीतल आल्हाट यांनी केले तर आभार महेश जांभुळकर यांनी मानले . या मेळाव्यानंतर सहभागी झालेल्या वधु वरांची माहिती पुस्तिका प्रकाशित करण्यात येणार असल्याची माहिती  पुणे जिल्हा माळी वधु वर सूचक मंडळाचे समन्वयक राम झगडे  यांनी दिली .

मंदिरानजीकच्या घाणेरड्या स्वच्छतागृहाची समस्या सोडविणार कोण ?

0

पुणे-महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट गणपती मंदिर येथे मागील बाजूस पादत्राणे ठेवण्याच्या जागेजवळ पुणे महानगर पालिकेचे पुरुषांसाठीचे स्वच्छता गृह आहे येथे कायम अस्वच्छता दुर्गंधी असते त्या मुळे भाविकांना  त्रास सहन करावा लागतो .स्वच्छता गृहाची हि जागा अत्यंत अयोग्य आहे . स्वच्छता गृहासाठी जवळपास योग्य जागा पाहून तिथे कायम कामगार ठेऊन स्वच्छता राखली जाईल दुर्गंधी येणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे याबाबत श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टचे अध्यक्ष अशोक  गोडसे व महेश सूर्यवंशी यांना मंडळाच्या महिला कार्यकर्त्यांनी निवेदन दिले  हिंद तरुण मंडळाच्या वतीने विनंतीचे पत्र देण्यात आल आहे .यावेळी मंडळाच्या महिला कार्यकर्त्या सौ अंजनी मोटाडू, अर्चना भोज, आशा गिरमकर, प्रिया भंडार, अर्चना दंडे, माधवी मेटेलू, संध्या संगनवार, जयश्री बानिया तसेच मंडळाचे पंचवार्षिक अध्यक्ष दिलीप गिरमकर, गणेश भोज, दिपक कुऱ्हाडे, विशाल ओहाळ उपस्थित होते.दरम्यान पुण्यात सर्वत्रच स्वच्छता गृहांचा अभाव आहे यामुळे पुरुष महिला मुले सारेच वर्षानुवर्षे कुचंबना सहन करीत आहेत . पण हि समस्या सोडविण्यासाठी अद्याप पुण्यातली कोणतीही सरकारी-निमसरकारी व स्वयं सेवी संस्था  किंवा कोणतेही मंडळ पुढे आलेले नाही…  येईल असे चित्रही नाही

महिलांमध्ये कायदेविषयक जागरुकता होणे ही काळाची गरज – डॉ. अनिता नेवसे

0

सातारा (जिमाका) :समाजविघातक गोष्टींना आळा घालण्यासाठी महिलांनी कायदेविषयक जागरुक होणे ही आज काळाची गरज बनली आहे. महिलांवरील अत्याचारास प्रतिबंध घालण्यासाठी महिलांनी स्त्री संरक्षण कादयाची माहिती करुन घेणे आवश्यक आहे. स्त्री संरक्षण कायदा हा स्त्रियांचे खरे कवचकुंडल आहे.महिलांविषयक कायदयाची जागरुकता झाल्यास निश्चितपणे महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण कमी होईल असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सदस्य सचिव व दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, सातारा डॉ.अनिता नेवसे यांनी केले.
कला व वाणिज्य महाविद्यालय, सातारा व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने महिला विधी साक्षरता शिबीराचे आयोजन कला व वाणिज्य महाविद्यालय, सातारा येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन आणि दिपप्रज्वलन करुन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे डॉ.नेवसे यांच्या हस्ते विद्यार्थीनी कल्याण मंडळाचे उद्घाटन करण्यात आले, तसेच “ओळख कादयाची” या पुस्तकाचे प्रकाशनही यावेळी प्रा.डॉ.यशवंत पाटणे यांच्या हस्ते करण्यात आले.
कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थीनींना महिलांविषयक कायदयाचे मार्गदर्शन करताना डॉ.अनिता नेवसे यांनी विविध कायदयांची माहिती देवून दिनांक 02 ऑक्टोबर 2013 पासून महाराष्ट्र शासनाने राज्यात लागू केलेल्या ‘मनोधैर्य योजना’ व ‘अर्थसहाय्य योजना’ या संबंधी सखोल माहिती दिली. ऍ़सिड हल्ला, बाल लैंगिक शोषण व महिलांवरील अत्याचाराच्या घटना यांना आळा घालण्यासाठी तसेच गुन्हेगारांना कडक शासन होण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकारणातर्फे मनोधैर्य योजनेअंतर्गत अर्थसहाय्य व विधीसहाय्य केले जाते याबाबत मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सद्य परिस्थितीमध्ये विद्यार्थीनींनी विविध कायदेविषयक माहिती करुन घेणे आवश्यक आहे, त्याचबरोबर विद्यार्थीनींनी आयुष्यामध्ये उच्चपदस्थ होण्याचे ध्येय आपल्या महाविद्यालयीन जीवनातच बाळगावे, त्या दृष्टीने त्यांची वाटचाल असावी, जी चांगली माहिती आपल्याला मिळते त्याची देवाणघेवाणही इतरांमध्ये करावी, विविध कायदयांची माहिती झाल्यास निश्चितपणे सक्षमता आणि निर्भयता लाभेल असे कथन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा.डॉ.मनिषा जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन कोमल बामरस यांनी केले. या शिबीरास ऍ़ड.संभाजीराव नलावडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे प्रभारी अधिक्षक आर.के.तागडे, व महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होत्या.

धार्मिक देहत्याग परंपरा गुन्हा ठरविणे दुर्दैवी .. जैन समाज एकवटला

0

1 2

पुणे – संथारा व्रत म्हणजे आत्महत्या .. असा निर्णय राजस्थान उच्च न्यायालयाने दिल्यानंतर सकाळ जैन समाज एकवटला आणि सर्व धर्मातील अशा रिती रिवाजांचे संरक्षण व्हावे अशी मागणी करीत पुण्यातील विधानभवनावर धडकला ऍड. एस. के. जैन ,डॉ. कल्याण गंगवाल, फत्तेचंद रांका अशा जैन समाजातील मान्यवरांसह हिंदू धर्म विद्वत्त्ते यांनी हि देहाचा त्याग हा स्वेच्छेने करणाऱ्या धार्मिक परंपरा जतन केल्या पाहिजेत अशी भूमिका घेतली आहे जैन धर्मात संथारा, सल्लेखना व्रत म्हणजे ब्रह्मलिन होणे आहे; परंतु संथारा व्रत ही आत्महत्या असल्याचा निर्णय राजस्थान उच्च न्यायालयाने दिला आहे. तो अत्यंत दुर्दैवी असल्याने, केंद्र सरकारने सर्वधर्मांतील पद्धतींचे व रीतिरिवाजांचे संरक्षण व्हावे म्हणून स्वतंत्र कायदा करावा, अशी मागणी सकल जैन समाजाने सोमवारी मूक मोर्चा काढून केली असून, न्यायालयाच्या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली.
ओसवाल बंधू समाज चौक येथून विधान भवनापर्यंत काढलेल्या मोर्चात हजारोंच्या संख्येने जैन समाजाबरोबरच अन्य धर्मीयांनी भाग घेतला. जैन समाजाने संथारा व्रत पवित्र मानले असून, ही अनेक वर्षांपासूनची पंरपरा आहे. त्याबाबत पंतप्रधान, केंद्रीय अल्पसंख्याकमंत्री व मुख्यमंत्र्यांनी या प्रश्‍नी लक्ष घालावे म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश जाधव यांच्याकडे निवेदन देण्यात आले. जैन धर्माचे साधू प.पू. मणिभद्र मुनीजी, प.पू. रमणिक मुनीजी, प.पू. सुरेश्‍वर म.सा., साध्वी अर्चना, साध्वी संतोष, साध्वी अनुपमा यांसह चार पंथांतील साधू-साध्वी, विजयकांत कोठारी, फत्तेचंद रांका, पोपटलाल ओस्तवाल, मिलिंद फडे, अचल जैन, ऍड. एस. के. जैन, चंद्रकांत छाजेड, अभय छाजेड, डॉ. कल्याण गंगवाल, महावीर कटारिया, प्रवीण चोरबेले, लक्ष्मीकांत खाबिया, महेंद्र पितळीया, अमितचंद संघवी, अशोक हिंगड, महेंद्र जैन, विपुल शहा मोर्चात सहभागी झाले होते.
डॉ. कल्याण गंगवाल म्हणाले, “”संथारा व्रत म्हणजे प्रतिष्ठेने मरण (डाईंग वुईथ डिग्निटी) असे आहे. अन्नत्यागातून देहत्याग करणे विज्ञानालाही मान्य आहे. अशा पद्धतीने आत्म्याशी लिन होऊन व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो, अशी शिकवण जैन धर्मात आहे, त्यामुळे संथारा व्रताला परंपरा आहे.‘‘
ऍड. एस. के. जैन म्हणाले, “”इच्छामरण हे धार्मिक संकल्पनेवर आधारित आहे. देहत्याग हा गुन्हा ठरविणे दुर्दैवी आहे. केंद्राने या कायद्यात बदल करावा. धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक परंपरेनुसार संथारा व्रत कायम ठेवावे.‘‘ फत्तेचंद रांका म्हणाले, “”भारतीय घटनेने संथारा व्रताला मान्यता दिली. मात्र, ती आत्महत्या नाही. विविध धर्मांतील परंपरांचे रक्षण होण्याची गरज असल्याने केंद्राने सर्वधर्मीयांबाबत स्वतंत्र कायदा करावा.‘‘
पं. वसंत गाडगीळ यांनी असे म्हटले आहे कि हा केवळ जैन समाजाचा मोर्चा नाही. देहाचा त्याग हा स्वेच्छेने करता येतो. आद्य शंकराचार्यांपासून ते संत ज्ञानेश्‍वरांपर्यंत अनेकांनी स्वतःहून ही परंपरा जपली. देहत्याग करणे म्हणजे परमेश्‍वराशी एकरूप होणे होय. त्यामुळे सरकारने भारतीय संस्कृतीचे जतन करावे.

कॉसमॉस बँकेच्या कसबा पेठ शाखेच्या वर्धापन दिनानिमित मोफत नेत्र तपासणी शिबीर संपन्न

0

कॉसमॉस बँकेच्या कसबा पेठ शाखेच्या वर्धापन दिनानिमित मोफत नेत्र तपासणी शिबीर संपन्न झाले . कसबा पेठेतील सावतामाळी भवनमधील साभागृहात झालेल्या या नेत्र तपासणी शिबिराचे उदघाटन प्रसिध्द नेत्रविशारद डॉ परिक्षित गोगटे यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी  कॉसमॉस बँकेच्या कसबा पेठ शाखेच्या व्यवस्थापिका प्रमिला लांडे , उपव्यवस्थापक किशोरी बडदे , सावतामाळी भवनचे व्यवस्थापक संतोष रासकर , भूषण मोडक , सुधाकर शिंदे , मंजुषा दलाल , अश्विनी चव्हाण , धनंजय देशपांडे , तुळशीराम खळदकर , सुनिल ढोलेपाटील आदी मान्यवर उपस्थित होते .

  यावेळी नेत्र तज्ञ डॉ. मिनाज इनामदार , डॉ. जोसेफ एलिझाबेथ आदींनी नेत्र तपासणी केली . दोनशे जणांनी  नेत्र तपासणीचा लाभ घेतला . यावेळी बँकेचे खातेदार , नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली .

unnamed

पुरस्काराने जबाबदारी वाढली – अभिनेत्री वंदना भगत

0

सातारा – कलाकाराच्या कलेचे चीज होते, जेव्हा त्याच्या कलेला पुरस्कार स्वरुपात प्रोत्साहनाची थाप मिळते. नाशिक येथून मुंबईत आलेल्या वंदना भगत यांचा अभिनेत्री वंदना भगत यांचा अभिनेत्री वंदना भगत म्हणून प्रवास २०११ पासून सुरु झाला, नुकताच सातारा येथील प्रसिद्ध – समाज सेवा पार्टी (महाराष्ट्र) या संस्थेच्या वतीने त्यांना चित्रपटातील योगदानाबद्दल मानाचा पुरस्कार देण्यात आला.
मुंबईत २०११ मध्ये “शपथ तुला शंभुची” या लघुपटाने वंदना भगत यांचा अभिनयाचा प्रवास सुरु झाला, पुढे “भानामती”, “आमचा विचार करा ना”, “उधो उधो ग वालुंबाई”, “स्वामी” इ चित्रपटात विशेष भूमिका साकारत राजू मेश्राम लिखित- दिग्दर्शित “झरी” चित्रपटात वंदना भगत यांची लक्षवेधी भूमिका आहे. मुंबईच्या वेगवान जीवनात चित्रपटासोबत “मधू इथे चंद्र तिथे”, “लक्ष्य”, “कमला”, “सावधान इंडिया” सारख्या मालिकांमध्ये देखील वंदना यांनी आपल्या अभिनयाची चुणुक दाखवली आहे.
याबाबत त्या सांगतात की,” कलाकाराला त्याच्या कामाची दखल घेतली जाते यातच सर्व काही आहे, परंतु पुरस्काराने आता माझी जबाबदारी नक्कीच वाढली आहे”…….

unnamed

पुष्परचना कार्यशाळेस महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0

पुष्परचना कार्यशाळेस महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे: फुले, पाने, छोट्या डहाळया आदींच्या सहाय्याने केलेली आकर्षक

पुष्परचना पद्धत ‘इकेबाना’ च्या पुष्परचनाशास्त्राच्या प्रमाणित प्रशिक्षक सरोज

जोशी यांनी  ‘ज्योती कुलकर्णी रिसर्च फाउंडेशन’ तर्फे आयोजित कार्यशाळेमध्ये

महिलांना शिकविले. यामध्ये ग्लेडीओला, जर्बेरा, एस्टर, ऑर्किड ही फुले व तसेच काही

पानांचा उपयोग करून घरगुती पद्धतीने किती आकर्षक पुष्परचना करता येईल हे

शिकविण्यात आले.

पिन होल्डर, फ्लोरल फोम, जाळी तसेच कॉफीचा मग, उभा फ्लॉवर पॉट, पसरट

काचेचे भांडे या घरगुती सामग्रीं वापरून तांत्रिकपद्धतीने त्याचा उपयोग

पुष्परचनेसाठी कसा करता येतो हे या कार्यशाळेमध्ये शिकविले. तसेच पाणी हे

फुलांचे जीवन असल्याचेही या कार्यशाळेत सांगण्यात आले. ‘इकेबाना’ ही जपानी

पुष्परचना पद्धत गेल्या ६०० वर्षांपासून प्रचलित आहे तसेच ती निसर्गाच्या अत्यंत

जवळ आहे असे प्रशिक्षक सरोज जोशी यांनी त्यावेळी सांगितले. यापद्धतीमध्ये

फुलांच्या रंगसंगतीचा तसेच पानांचा अधिक उपयोग कसा गेला जाऊ शकतो हेच

महत्वाचे असते आणि पुष्परचना ही कला आपल्याकडे जपान आणि युरोप मधून

आली.असेही यावेळी त्या म्हणाल्या.

“सध्या सणासुदीच्या दिवसांमध्ये फुलांची आवक चांगली असते. तसेच महिलांना

शास्त्रीय पद्धतीने शिकविण्यात आलेल्या पुष्परचनेचा नक्कीच फायदा होईल”, असे

मत ‘ज्योती कुलकर्णी रिसर्च फाउंडेशन’च्या विश्वस्त अश्विनी देशपांडे यांनी व्यक्त

केले.

‘ज्योती कुलकर्णी रिसर्च फाउंडेशन’ हे महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी सतत

कार्यरत असते. तसेच या फाउंडेशन तर्फे महिलांना उपयोगी पडेल असे अनेक

कार्यक्रमांचे आयोजनही केले जाते.

रात्रीची मंडई …झळाळणार अशी ….

0

3 - Copy11889420_937602372964246_6214652575690219366_n11891245_937602436297573_9117289230476254084_n11904110_937602392964244_4569238628200364230_n11960102_937602472964236_6662747125530602559_n

पुणे- चांगल्या वाईट अशा साऱ्या इतिहासाची साक्षीदार असलेली तब्बल सव्वाशे वर्षे जुनी असलेली पुण्यातील मंडई  रात्री रंगीबेरंगी दिव्यांच्या झगमगाटाने उजळून निघाली .
महापालिकेतर्फे “मंडई‘च्या नूतनीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यानुसार “मंडई‘वरील आकर्षक प्रकाशयोजनेचे उद्‌घाटन महापौर दत्तात्रेय धनकवडे यांच्या हस्ते रविवारी झाले. त्यानंतर “मंडई‘चे बदललेले रूप अनेकांना आपल्या डोळ्यांत साठवता आले. या वेळी उपमहापौर आबा बागूल, “अखिल मंडई मंडळा‘चे अण्णा थोरात, माजी महापौर मोहनसिंग राजपाल, सभागृह नेते शंकर केमसे, नगरसेविका रूपाली पाटील, नगरसेवक दिलीप काळोखे, अशोक येनपुरे आदी उपस्थित होते.”पुणे टुरिस्ट हब‘अंतर्गत “मंडई‘च्या दुरुस्तीची कामे यंदा प्रथमच हाती घेण्यात आली. या अष्टकोनाकृती इमारतीवरील कौले बदलण्यात आली आहेत. स्पेनमधील हर्मनोस डियाज रेडोन्डो ग्रुप या कंपनीतून मूळ दर्जाशी साधर्म्य साधणारी कौले मिळाल्याने मंडईच्या इमारतीची शोभा आणखी वाढली आहे. याबरोबरच कौलांच्या ठिकाणी रंग बदलणारे आकर्षक एलईडी दिवे (मल्टिकलर लायटिंग) लावण्यात आले आहेत, त्यामुळे ही वास्तू झगमगली आहे. टोल वाजविणाऱ्या शाळकरी मुलाची प्रतिकृती आणि घड्याळाचे लोकार्पणही या वेळी करण्यात आले.

t

मनपाच्या सर्व 136 शाळान्मधे व्रुक्षारोपणाचे व वृक्ष संवर्धनाचे कार्यक्रम घेणार – शिक्षण मंडळ सदस्य सौ.मंजुश्री खर्डेकर यांचा निर्धार.

0

unnamed1

पुणे-पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी वृक्षरोपण व वृक्षसंवर्धानाचे आवाहन केले आहे,त्यास अनुसरुन पुणे महानगरपालिकेच्या इमारती असलेल्या सर्व 136 शाळानमधे वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेणार असुन त्याची सुरुवात कोथरुड पासुन करत आहे असे शिक्षण मंड्ळ सदस्य सौ.मंजुश्री खर्डेकर यानी सांगितले

.मनपा च्या ज्या ज्या शाळान्मधे मैदाने आहेत व जेथे मोकळी जागा उपलब्ध आहे तेथे व्रुक्ष लागवड करण्यात येइल असे ही त्या म्हणाल्या.पौड फाट्यावरील पंडित दीनदयाळ उपाध्याय शाळेत व्रुक्षारोपणाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.सम्राट अशोक विध्यालया पाठोपाठ दीनदयाळ विध्यालयात आयोजित कार्यक्रमात विध्यार्थी,पालक व रिक्षेवाले काकांच्या हस्ते रोप लागवड करण्यात आली.मनपाच्या उधान विभागाचे कर्मचारी ही यावेळी उपस्थित होते.मोठ्या प्रमाणावर व्रुक्षांची कत्तल होत असल्याने पर्यावरणाची हानी होत असुन मुलानी व्रुक्ष लागवड व संवर्धनाचे महत्व समजुन घ्यावे व आज लावलेल्या रोपांची निगा राखावी असे ही सौ.खर्डेकर म्हणाल्या.यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका एलिझाबेथ काकडे,क्रीडा शिक्षक बहिरामे  सर,शाळा समिती च्या सदस्या सौ.गौरी करंजकर,राज तांबोळी,निलेश गरुडकर,भारत कदम,पोपट बालवडकर,सुधीर फाटक,सुमीत दिकोंडा,जयेश सरनौबत,रामदास गावडे,श्रीक्रुष्ण गोगावले,जगदीश देडगे व इतर मान्यवर व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘चेहरे’ मध्ये पाहायला मिळणार ‘सायको थ्रीलर’ चे विलक्षण नाट्य

0

‘चेहरे’ या आगामी हिंदी चित्रपटात ‘सायको थ्रीलर’ चे विलक्षण नाट्य प्रेक्षकांना पाहायला मिळेल असे या चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक रोहित कौशिक यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत  पत्रकारांशी बोलताना सांगितले. याप्रसंगी या चित्रपटात महत्वाची भूमिका निभावणारी अभिनेत्री हर्षिता भट्ट तसेच अभिनेत्री गीता विज उपस्थित होत्या.

जैकी श्रॉफ. मनीषा कोईराला, गुलशन ग्रोव्हर, दिव्या दत्ता, राकेश बेदी, हर्षिता भट्ट, आर्य बब्बर अशी तगडी स्टारकास्ट असणारा ‘चेहरे’ हा चित्रपट येत्या २८ ऑगस्टला संपूर्ण भारतात प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्त पत्रकारांशी संवाद साधताना या चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक रोहित कौशिक म्हणाले की,  ‘सायको थ्रीलर असलेल्या या चित्रपटाची कथाच अशी विलक्षण आहे की, हा चित्रपट साथ टक्के रंगीत तर चाळीस टक्के कृष्णधवल आहे. मुकपटाच्या जमान्यात काम करणाऱ्या ‘तराना’ नावाच्या एका प्रसिध्द अभिनेत्रीची ही विलक्षण कथा आहे. मुकपटाच्या जमान्यात काम करणाऱ्या या प्रसिद्ध अभिनेत्रीला त्यानंतरच्या बोलपटाच्या जमान्यात हवे तसे ‘स्थान’ मिळत नाही त्यामुळे तिच्या होणाऱ्या मानसिक घुसमटीची आणि त्यातून निर्माण होणाऱ्या  अनेक नाट्यपूर्ण प्रश्नांची मालिका या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. कथेचा प्रारंभ १९५२ साली इंग्लंडमध्ये घडलेल्या एका घटनेने होतो. फ़्लैशबैक तंत्राचा वापर करून सादरीकरण केलेल्या  या कथेत १९३० ते १९४० या दशकाचेही चित्रीकरण करण्यात आले असून ते पूर्ण कृष्णधवल स्वरुपात पाहायला मिळणार आहे असेही त्यांनी सांगितले.

आपले जीवन जगताना माणसाला अनेकदा खोट्या मुखवट्याचा आधार घ्यावा लागतो. या प्रत्येक मुखवट्यामागे एक कथा असू शकते म्हणूनच माणसांचे हे ‘चेहरे’ तपासण्याची गरज असते. अशाच चेहऱ्यांची या चित्रपटात कहाणी आहे असे सांगून रोहित कौशिक पुढे म्हणाले,  या चित्रपटात जुन्या काळाचे चित्रीकरण असले तरी प्रेक्षकांना अजूनही गतकाळाचे वैभव पाहायला आवडते. त्यामुळेच नव्या वातावरणातही जुने काळ दर्शविणारे चित्रपट चालू शकतात असे ते म्हणाले.

या चित्रपटात आपली अतिशय वेगळी भूमिका असून ती आव्हानात्मक आहे असे सांगून हर्षिता भट्ट म्हणाली की, माझ्या व्यक्तिरेखेचे लेखनच इतके परफेक्ट होते की मला त्या भूमिकेचा अभ्यास करण्याची फारशी गरज पडली नाही. अभिनेत्री गीता विज हिने आर्य बब्बरच्या प्रेमिकेची भूमिका असून या चित्रपटातील माझा अनुभव खूपच चांगला होता असे तिने सांगितले.  जैकी श्रॉफ यांनी या चित्रपटात एका निर्माता-दिग्दर्शकाची भूमिका केली असून गुलशन ग्रोव्हर डॉक्टरांच्या भूमिकेत चमकले आहेत. तर ‘तराना’ ची मध्यवर्ती भूमिका मनीषा कोईराला हिने केली आहे. या चित्रपटात चार गाणी असून ती संगीतकार जयदीप चौधरी यांनी स्वरबद्ध केली आहेत. कथेला अनुकूल अशा जुन्या साजातील ही गाणी श्रवणीय आहेत.

1 2

डीएसके विश्व ‘मेघमल्हार’गृहप्रकल्पातील फेज -2 चा हस्तांतर सोहळा उत्साहात संपन्न

0

पुणे :- पुण्यातील पहिली भव्य टाऊन शिप म्हणून ओळखल्या

जाणार्‍या डीएसके विश्वच्या  मेघमल्हार या प्रकल्पाच्या  फेज -२

मधील सदनिकाधारकांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार

पडला.  यावेळी गृहप्रकल्प निर्मितीत सहकार्य लाभलेल्या तसेच

मेघमल्हार येथील सर्व सदनिकाधारकांचा सत्कार तुळशीचे रोप आणि

भेटवस्तू देऊन करण्यात आला. सोबतच ‘मल्हार धून’ या संगीत

कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते

यावेळी  डी. एस. के समूहाचे अध्यक्ष डी. एस. कुलकर्णी , सौ. हेमंती

कुलकर्णी,  ब्रिगेडियर शर्मा, भाग्यश्री कुलकर्णी, अमित कुलकर्णी व

प्रसिद्ध मुलाखतकार राजेश दामले आदी उपस्थित होते.

६००० उंबऱ्याचे मॉडर्न गाव म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या डीएसके विश्व

मधील ‘मेघमल्हार या प्रकल्पाच्या फेज २’  बद्दल  अधिक माहिती

देताना सौ. कुलकर्णी म्हणाल्या, सिंहगड रस्ता परिसरातील निसर्गाच्या

सानिध्यात असणारा, सुप्रसिद्ध आर्किटेक हाफिज कॉट्रॅक्टर यांच्या

डिझाईन मधून साकारलेला हा दर्जेदार गृहप्रकल्प आहे. सर्व सोयी-

सुविधांनी परिपूर्ण अशा ह्या प्रकल्पामध्ये खास स्पॅनिश वास्तुशैलीचा

उपयोग करून घरांची रचना करण्यात आली आहे. सव्वा लाख स्क्वेअर

फुटाचे पोडीयम गार्डन, लहान मुलांना खेळण्यासाठी प्रशस्त आणि

ऐसपैस जागा, कम्युनिटी हॉल, जिमनेशियम, कार्यक्रम अथवा

समारंभासाठी प्रशस्त पार्टी लॉन यांसारख्या सुखसोयी खास

ग्राहकांसाठी आम्ही येथे उपलब्ध करून दिल्या आहेत. शिवाय एका

उत्तम गृहप्रकल्पासाठी लागणार्‍या स्केटिंग रिंग,  बास्केट बॉल कोर्ट,

सिटीझन प्लाझा, हर्बल गार्डन आदि अत्याधुनिक सुखसोयी देखील येथे

आहेत. १, २ व ३ बी एच के आणि रो हाउसेस या प्रकल्पात आहेत.

रोजच्या जगण्यासाठी जे काही लागते ते सर्व एकाच ठिकाणी उपलब्ध

करून द्यायचे या हेतूने आम्ही डीएसके विश्व या महाराष्ट्रातील पहिल्या

भव्य टाऊनशिपची उभारणी केली असल्याची भावनाही  त्यांनी

यावेळी बोलून दाखवली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश दामले यांनी केले.

महासत्ता होताना गुणवत्तापूर्ण शिक्षणाकडे लक्ष देण्याची गरज : डॉ.शां ब मुजुमदार

0
पुणे:
‘ समाजातील सर्व काळजी करण्यासारख्या घटनांचे मूळ शिक्षणातील कमतरतेकडे असल्याने भारत महासत्ता होण्यासाठी  गुणवत्तापूर्ण शिक्षणाकडे प्राणवायूप्रमाणे लक्ष देण्याची गरज आहे,तसेच लायन्स क्लब इंटरनॅशनल ह्या जगातील सर्वात मोठ्या सेवाभावी संस्थेतर्फे मुलींच्या शिक्षणासंदर्भात प्रकल्प हातात घ्यावेत ’ असे प्रतिपादन सिंबॉयोसिस विश्‍व विद्यापीठाचे कुलपती पद्मविभूषण डॉ.शा ंब मुजुमदार यांनी रविवारी केले.
‘लायन्स क्लब 323 -डी 2’ च्या वतीने आयोजित ‘आगाज- एक नई शुरूवात’ या कार्यक्रमातंर्गत सिम्बायोसिस महाविद्यालयाचे संस्थापक संचालक, कुलपती पद्मभूषण डॉ. शां.ब.मुजुमदार यांना ‘लायन्स एक्सलन्स पुरस्कार’ देऊन गौरविण्यात  आले.त्यावेळी ते बोलत होते.या कार्यक्रमात लायन्सच्या नूतन पदाधिकार्‍यांचा पदग्रहण समारंभ पार पडला.
ते म्हणाले,‘माझ्या रुपाने एका शिक्षकाचा गौरव लायन्स क्लब करीत आहे.म्हणून शिक्षण क्षेत्राच्या वतीने मी कृतज्ञता व्यक्त करतो.समाजातील चांगल्या बदलासाठी शिक्षण हेच महत्वाचे माध्यम आहे.ज्या चिंताजनक घटना समाजात घडत आहेत त्याचे मूळ शिक्षणातील कमतरतेकडे असल्याने भारत महासत्ता होण्यासाठी  गुणवत्तापूर्ण शिक्षणाकडे प्राणवायूप्रमाणे लक्ष देण्याची गरज आह त्यातून देश संपन्नतेकडे आणि समृध्दीकडे जाईल.लायन्स क्लबने त्यात योगदान म्हणून मुलींच्या शिक्षणासाठीचे प्रकल्प हाती घ्यावेत
 महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त ,आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबाना ,विद्यार्थ्यांना दत्तक घेण्याचा उपक्रम शैलेश शहा आणि डॉ.सतीश देसाई यांनी  यावेळी जाहीर केला.उस्थ्थितांनी लगेच या प्रकल्पासाठी देणग्या जाहीर केल्या.
शतकमहोत्सवी वर्षानिमित्त जगातील 210 देशात विविध उपक्रम सादर केले जाणार आहेत. पुणे, अहमदनगर, नाशिक याभागात पसरलेल्या प्रांत 323 डी-2 चे प्रांतपाल लायन श्रीकांत सोनी यांच्या मार्गदर्शनानुसार पदग्रहण समारंभ पार पडला  हा सोहळा रविवार दि. 23 ऑगस्ट रोजी बालगंधर्व रंग मंदिराच्या सभागृहात सकाळी 9 ते दुपारी 2 यावेळेत झाला
यावेळी   डॉ.सतीश बत्रा ,प्रांतपाल श्रीकांत सोनी, नरेश अगरवाल, नरेंद्र भंडारी,प्रेमचंद बाफना ,डॉ. विक्रांत जाधव,गिरीश मालपाणी,सरला सोनी होते.द्वारका जालान यांनी सूत्रसंचालन केले