मुंबई – अभिनेत्री एनरा गुप्ता बर्थ डे पार्टी जोरात झाली . शिशा लोन्स मध्ये झालेल्या या पार्टीला इम्पा चे अध्यक्ष टी पी आगरवाल तसेच अभिनेतारवी किशन, मनोज तिवारी , परवेज यादव , बादशाह खान , योगेश भारद्वाज , कुणाल सिंग , असे असंख्य सिलेब्रीटी नी हजेरी लावली … पहा पार्टी चे फोटो …
संगमवाड़ी ते विश्रांतवाड़ी बीआरटी बससेवेचा शुभारंभ;मोफत योजनेचा फेरविचार करा -अजितदादा
पुणे – “”रेनबो बीआरटीचा प्रवास महिनाभर मोफत दिल्याने महापालिकेला आर्थिक बोजा सहन करावा लागणार असून, त्याचा बारकाईने अभ्यास करून योजनेचा फेरविचार करावा,‘‘ अशी सूचना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी रविवारी महापालिकेला केली. विश्रांतवाडी चौकातील अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करण्याची सूचनाही त्यांनी प्रशासनाला केली. पुणे महानगरपालिकेतर्फ आयोजित “हिंजेवाड़ी ते लोहगांव विमानतळ व कोथरूड ते लोहगाव विमानतळ वातानुकूलित नवीन बससेवेचा तसेच
संगमवाड़ी ते विश्रांतवाड़ी बीआरटी बससेवेचा शुभारंभ श्री.अजितदादा पवार, विधिमंडळ पक्षनेता, महाराष्ट्र राज्य विधिमंडळ यांच्ये हस्ते संपन्न झला.
येरवडा आळंदी रस्ता येथील बॉम्बे सौपर्स, चंद्रमा हॉटेलच्या नजीकच्या डेक्कन कॉलेज बीआरटीएस बस थांब्याचे उदघाटन केल्यानंतर बीआरटीएस बसमधून सर्व उपस्थित मान्यवरांनी बसमधून प्रवास केला.
बसमार्गावरील फुलेनगर येथील भारतरत्न मौलाना अब्दुलकलाम आझाद पादचारी उड्डाणपूलाची पाहणी करण्यात आली, व योजनेच्या संदर्भात त्यांनी संबंधित अधिकारी तसेच मा. महापौर दत्तात्रय धनकवड़े यांच्याशी चर्चा केली.
याप्रसंगी सौ.शकुंतला धराडे(महापौर, पिं.चिं.मनपा), सभागृह नेते शंकर केमसे, विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, डॉ.सिद्धार्थ धेंड़े, सुनिल गोगले, विजय देशमुख, संजय भोसले, .डॉ.विश्वजीत कदम, सौ.मिनल सरवदे, दत्तात्रय गायकवाड, .मुकरी अलगुडे, अभिषेक कृष्णा,.ओमप्रकाश बकोरिया,राजीव जाधव, श्रीमती मयूरा शिंदेकर, . सुनील बुरसे, . विवेक खरवडकर, ज्ञानेश्वर मोळक, शाम ढवळे व अन्य अधिकारी कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समाजाला पोलीस स्टेशन्सचा आधार वाटायला हवा- पालकमंत्री -विमाननगर स्टेशनचे उदघाटन
पुणे: पोलीस स्टेशन्स समाजातील सर्व घटकांना आधाराची केंद्र वाटायला हवीत, असे प्रतिपादन पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी येथे केले.
विमाननगर येथे विमाननगर पोलीस चौकी आणि पारपत्र पडताळणी कक्षाचे उदघाटन आज पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार जगदीश मुळीक, पोलीस आयुक्त के.के. पाठक, अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रकाश मुत्याळ, उपायुक्त पोलीस सुधीर हिरेमठ आदी उपस्थित होते.
पालकमंत्री बापट म्हणाले, ‘पुणे शहर जागतिक स्तरावरील शहर होत आहे. शहराचा विस्तार होत आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होत आहेत. पण या आव्हानावर मात करण्यासाठी पोलिसांना आवश्यक त्या पायाभूत सुविधा पुरवण्यावर शासनाचा भर आहे.’
पोलीस स्टेशन्समध्ये येण्यास नागरिक उत्सुक नसतात. पण नागरिकांत पोलीस स्टेशन्सबाबतची ही प्रतिमा बदलायला हवी. पोलीस स्टेशन्स आधाराची आणि मदतीची केंद्रे वाटायला हवीत. नागरिकांना पोलीस स्टेशन्समध्ये येताना कोणत्याही प्रकारची साशंकता वाटता कामा नये. त्यांना आधार वाटायला हवा, असे पालकमंत्री बापट यांनी सांगितले.
पोलीस प्रशासनात स्मार्टनेस येत आहे. कामकाजात गतिमानता येण्यासाठी पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करायला हवा. व्हिजिबल पोलिसिंग संकल्पना पुण्यात रुजायला हवी. त्यासाठी आवश्यक मदत आणि सुविधा पोलिसांना दिल्या जातील, असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले.
आमदार जगदीश मुळीक यांनी ‘नव्या पोलीस स्टेशनमुळे नागरिकांची सोय होणार आहे. नागरिकांना पारपत्राच्या पडताळणीसाठी आता जवळच सुविधा निर्माण झाली आहे, असे सांगितले.
पोलीस आयुक्त के.के. पाठक यांनी पुणे शहरातील कायदा आणि सुव्यवस्था चोख राहील याकडे पुरेपूर लक्ष दिले जात आहे. गेल्या काही दिवसात साखळी चोरांविरुद्ध धडक मोहीम उघडली असल्याचे सांगितले.
पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक संजय कुरुंदकर यांनी प्रास्ताविक केले तर उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी आभार मानले.
केवळ सेल्फी काढून आणि भाषणात भाई और बहनो.. म्हणून महिलां-भगिनींची सुरक्षा होणार ?चित्रा वाघ
मुंबई – केवळ सेल्फी काढून आणि भाषणात भाई और बहनो असा उल्लेख करुन महिलां-भगिनींची सुरक्षा होणार काय ? असा सवाल नाही.राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केला आहे महिला सुरक्षेसाठी कठोर पाऊले उचलली गेली पाहिजेत.असे प्रतिपादन करीत या भावा-बहिणीच्या सणाच्या निमित्ताने राज्यातील महिलां-भगिनींच्या सुरक्षितेची जबाबदारी राज्यप्रमुख म्हणून मुख्यमंत्री व गृहराज्यमंत्र्यांनी घ्यावी यासाठी बहिणीच्या नात्याने या राख्यांची पाठविणी करीत आहे असे त्यांनी म्हटलेआहे
महिला सुरक्षेच्या या गंभीर प्रश्नाकडे राखीबंधनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री व गृहराज्यमंत्र्याचे लक्ष वेधण्यासाठी आज राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी भवन येथून त्यांना राख्यांची पाठवणी करण्यात आली.
या कार्यक्रमावेळी बोलताना राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ म्हणाल्या की आज राखी पोर्णिमा, भावा-बहिणीच्या पवित्र नात्याचा हा सण आहे. या निमित्ताने बहिण आपल्या भावाच्या हाताला राखी बांधते तर भाऊ बहिणीच्या रक्षणाचे वचन देतो. वर्षानु-वर्षे ही परंपरां सुरु आहे. परुंतु सध्या राज्यात महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या “एनसीआरबीच्या’ रिपोर्ट राज्यातील महिलांची स्थिती दर्शविण्यास पुरेसा आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आपण घेतो त्या शिवरायांनी देखील कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा साडी-चोळी देऊन सन्मान केला होता.या शिवरायांच्या भूमीत महिलांची सुरक्षिता धोक्यात आलेली आहे. ही बाब आपल्या पुरोगामी राज्याच्या दृष्टीने लाजीरवाणी आहे. केवळ सेल्फी काढून आणि भाषणात भाई और बहनो असा उल्लेख करुन महिलां-भगिनींची सुरक्षा होणार नाही. त्यासाठी कठोर पाऊले उचलली गेली पाहिजेत. या भावा-बहिणीच्या सणाच्या निमित्ताने राज्यातील महिलां-भगिनींच्या सुरक्षितेची जबाबदारी राज्यप्रमुख म्हणून मुख्यमंत्री व गृहराज्यमंत्र्यांनी घ्यावी यासाठी बहिणीच्या नात्याने या राख्यांची पाठविणी करीत आहे. या कार्यक्रमास राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्या मोठ्याप्रमाणात उपस्थित होत्या.
राष्ट्रवादी महिला काँग्रेसने आयोजित केलेल्या रक्षाबंधन कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ.सुनील तटकरे उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी महिला कार्यकर्त्यांनी आ.सुनील तटकरे यांना राख्या बांधून राखीबंधन साजरे केले.
नागपूरमध्ये २८९ एकर जागेत ‘धीरुभाई अंबानी एअरोस्पेस पार्क’…
नागपूर -नागपूरमध्ये २८९ एकर जागेत ‘धीरुभाई अंबानी एअरोस्पेस पार्क’सुरु होत आहे यानिमित्ताने झालेल्या येथील समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कि , संरक्षण उत्पादन क्षेत्रातील देशातील पहिला प्रकल्प ‘धीरुभाई अंबानी एअरोस्पेस पार्क’ हा नागपूर येथील मिहानमध्ये सुरु होत असल्याचा मला आनंद वाटतो. रिलायन्स गुप्रच्या या महत्वकांक्षी प्रकल्पासाठी श्री अनिल अंबानी यांनी मिहानची व महाराष्ट्राची निवड केल्याबद्दल मी त्यांचे विशेष अभिनंदन करतो. या हबमुळे मिहानमध्ये जगातील उद्योजक गुंतवणूक करण्याची सुरुवात झाली असून उद्योजकांना संपूर्ण सहकार्य देण्यात येईल. या करिता ६५०० कोटी रुपयांची गुंतवणूक असून जवळपास 2 लाख रोजगार(प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष) निर्मिती होणार. केवळ १६ दिवसात सर्व प्रक्रिया पूर्ण करून जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल मी अधिकाऱ्यांचे अभिनंदन करतो. एअरोस्पेश पार्कसाठी रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष श्री अनिल अंबानी यांना मिहानमध्ये २८९ एकर जमीन उपलब्ध करुन देण्यासंदर्भात संमती पत्राचे हस्तांतरण, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. उद्योग मंत्री सुभाष देसाई, ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, येथील खासदार, आमदार व अधिकारीही उपस्थित होते.
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांचा 115 वा जयंतीदिन समारंभ मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संपन्न
लोणी – पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या 115 व्या जयंतीदिन समारोहाला आज मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरानगर येथे उपस्थित होते. डॉ. सुधीर रसाळ यांना साहित्य सेवा जीवन गौरव पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, याशिवाय इतरही अनेक मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यानिमित्ताने आयोजित एका कृषी प्रदर्शनीलाही मुख्यमंत्र्यांनी भेट दिली. प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाच्या डॉ. कलाम पदव्युत्तर इमारतीचे उद्घाटन सुद्धा यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
सिंहस्थ . कुंभमेळ्यातील पहिले शाहीस्नान संपन्न
सिंहस्थ . कुंभमेळ्यातील पहिल्या पर्वणी शाहीस्नानाला आज पहाटे सुरुवात झाली, गोदावरी नदीवरील त्र्यंबकक्षेत्री कुशावर्त तीर्थावर सर्वप्रथम साधू-महंतांनी या शाहीस्नानाला सुरुवात केली. ब्रह्ममुहूर्तावर सकाळी ४ वाजून १६ मिनिटांनी जुना, अग्नी आणि आवाहन आखाड्याचे साधू-महंतांनी प्रथम शाहीनास्नान केले. त्यानंतर निरंजन, आनंद, अटल, महानिर्वाण व निर्मोही या आखाड्यातील साधूंनी शाहीस्नान केले. स्नानानंतर सर्व आखाड्याच्या साधूंनी त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले. त्र्यंबकेश्वरमध्ये शाहीमार्गावर भाविकांनी रांगोऴ्यांच्या पायघड्यानी साधू-महंतांचे स्वागत केले. कुशावर्त तीर्थावर प्रस्थान करताना नागा साधूंच्या मिरवणूका काढण्यात आल्या. पहाटे महापौर अशोक मुतर्डक, उपमहापौर गुरमित बग्गा, त्यांच्यापाठोपाठ सहकार राज्यमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि कॉंग्रेसचे नेते रामतीर्थावर दाखल झालेत. निर्वाणी आखाड्याची शाहीस्नान मिरवणूक पोचण्यापूर्वीच पालकमंत्री गिरीश महाजन इथे पोचले. निर्वाणी आखाड्यातील साधू-संत-महंतांचे दुतोंड्या मारुतीजवळ जात पालकमंत्र्यांनी स्वागत केलं. गोदामाईच्या स्नानाची आस लागलेले साधू-संत धावत रामतीर्थापर्यंत पोचले अन् “जय बजरंग बली‘, “सियावर रामचंद्र की जय‘, अशा जयघोषानं रामतीर्थ दुमदुमून गेलं. आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास महाराज रामतीर्थावर पोचले. तद्नंतर पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल आणि इतर पुरोहितांनी गंगापूजन, सिंहस्थ स्नान पूजन, गंगाभेट, इष्टदेवता-ध्वज-निशाणपूजन, तीर्थपूजन असे विधी केलेत. मग पुन्हा “सियावर रामचंद्र की जय‘, “जय बजरंग बली‘, असा जयघोष झाला. निशाण-ध्वज-इष्टदेवतांचे स्नान होताच, महंत ग्यानदास महाराजांनी डुबकी मारली. निर्वाणी आखाडा पुढे निघताच, गौरी पटांगणावर थांबलेला दिगंबर आखाडा रामतीर्थावर पोचला. दिगंबर आखाड्याचे स्नान लांबते म्हटल्यावर सुरक्षा विभागातर्फे साधू-संत-महंतांना स्नान आटोपल्यावर रामतीर्थ सोडण्याची विनंती करण्यात आली. हे स्नान आटोपताच अखेरचा निर्मोही आखाडा दाखल झाला. या आखाड्याची स्नान उरकताच, सकाळी साडेदहाला यशवंत महाराज पटांगणावरील बॅरेकेटसची तटबंदी ओलांडून रामतीर्थावर प्रवेश केला. गर्दी होते म्हटल्यावर पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन् यांनी दोरखंडाच्या माध्यमातून गर्दी व्यवस्थापन करण्यास सुरवात केली. या मार्गावरुन येणाऱ्या भाविकांची अडचण होते म्हटल्यावर पालकमंत्री इथे पोचले आणि गर्दी व्यवस्थापनात त्यांनी स्वतः दोरखंड धरत, भाविकांना विनंती केली.त्र्यंबकेश्वर येथे ‘बम बम भोले’, ‘हर हर महादेव’, ‘नमो पार्वतेपतये हर हर महादेव’, ‘श्रीचंद्रदेव भगवान की जय’, ‘बोले सो निहाल, सत् श्री अकाल’, अशा घोषणांनी त्र्यंबकेश्वरचा परिसर दुमदुमून गेला. मध्यरात्र सरत असतानाच पहाटेच दहाही आखाड्यांमध्ये शाहीस्नानाच्या मिरवणुकीसाठी तयारी करण्यात आली होती. सजलेले नागा साधू, फुलांच्या माळांनी सजलेले रथ, शस्त्रधारी साधूंच्या कसरती यांच्या जोडीला आसमंत भेदत जाणाऱ्या ‘बम बम भोले’ आणि ‘हर हर महादेव’चा जयघोष करत भाविकांनी शाहीस्नानातील रंगत वाढवली. नाशिकच्या तुलनेमध्ये भाविकांची संख्या खूपच कमी होती; मात्र उत्साहात काहीही कमतरता जाणवत नव्हती.
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या शिबिरात १५० जणांचे रक्तदान …
पुणे- राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्यावतीने डेक्कन जिमखाना येथील खंडूजी बाबा मंदिरात भव्य रक्तदान शिबीर घेण्यात आले . या शिबिराचे उदघाटन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष अजित बाबर यांच्या हस्ते करण्यात आले . या शिबिरात सुमारे १५० जणांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन रक्तदान केले . या शिबिरातील रक्तदात्यांना प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देण्यात आले . या शिबिराचे आयोजक राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पुणे शहर उपाध्यक्ष मधुर बाळासाहेब आमले यांनी आयोजन केले होते. स्थानिक नगरसेवक बाळासाहेब बोडके , नगरसेवक विकास दांगट पाटील , उद्योगपती बाळासाहेब आमले , व नवचैतन्य मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते . या रक्तदान शिबिरासाठी छत्रपती शाहू महाराज प्रतिष्ठानच्या आधार रक्त पेढीच्या वैद्यकीय पथकाने विशेष परिश्रम घेतले .
पोलिसांना बांधल्या राख्या …
पुणे-
रक्षाबंधनानिमित पुणे कॅम्पमधील लष्कर पोलिस ठाण्याच्या आवारात लष्कर भागातील महिलांनी पोलिस बांधवाना राखी बांधली . पोलिस हे समाजाचे रक्षक आहे त्याच प्रमाणे आज रक्षाबंधनानिमित पोलिस बांधवांचे ऋण व्यक्त करण्यासाठी महिलांना सुरक्षतेचे वातावरण वावरू शकतात त्यामुळे आज पोलिस बांधवाना राख्या बांधण्यात आल्या . यावेळी लष्कर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीषक बरकत मुजावर , गुन्हे शाखा पोलिस निरीषक अनिल ताडे , पोलिस उपनिरीषक विलास गुजर , वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलिस फौजदार शहाजी ओंबासे व अन्य पोलिस बांधवाना राख्या बांधण्यात आल्या . यावेळी छाया जाधव , मोना राठोड , भारती अंकलेल्लू , निकिता जाधव , सुवर्णा यादव , ज्योती काटेल्लू , उमा काटेल्लू आदी मान्यवर सहभागी झाले होते .
या कार्यक्रमाचे संयोजन निलेश कणसे , विकास भांबुरे , मनजितसिंग विरदी , महेश जांभुळकर , महेंद्र गायकवाड आदींनी केले होते .
शेतकरी दिनानिमित पदमश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन
पुणे- पदमश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांची जयंती म्हणजेच शेतकरी दिन , त्या निमित पुणे शहर कॉंग्रेस कमिटी आणि पिंपरी चिंचवड कॉंग्रेस कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजीनगर मधील साखर संकुल आवारातील पदमश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले . यावेळी माजी राज्यमंत्री चंद्रकांत छाजेड , पिंपरी चिंचवड कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन साठे , महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे निरीषक बाळासाहेब साळवे , नगरसेवक अविनाश बागवे , विठ्ठल थोरात , अरुण गायकवाड , दयानंद अडागळे , पिंपरी ब्लॉक कॉंग्रेस अध्यक्ष गणेश लंगोरे , वीरेंद्र गायकवाड , आनंद पाटोळे , कुंदन कसबे ,खुर्शीद शेख , नारायण पाटोळे , विलास कांबळे , माउली साठे , शोभाकर तेलोरे आदी मान्यवर उपस्थित होते .
यावेळी चंद्रकांत छाजेड यांनी सांगितले कि , पदमश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी आशिया खंडातील पहिला साखर कारखाना सुरु केला , कृषी क्षेत्राला त्यांनी वाव दिला , त्यातून चांगले शेतकरी निर्माण केला . त्यामुळे आज शेतकरी हा प्रगतीशील शेतकरी झाले . शेतकरी बांधवांच्या मुलांसाठी त्यांनी प्रवरा शिक्षण संस्थेची स्थापना केली . असे महत्वपूर्ण काम पदमश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी केले .
पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे मुंबई सुद्धा लवकरच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला बनेल. – सुनील तटकरे
मुंबई-
पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे मुंबई सुद्धा लवकरच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला बनेल. असा विश्वास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केला. बोरीवली येथे कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. गेल्या नऊ महिन्यात महाराष्ट्रातल्या महिलांचे जीणे मुश्किल झाले आहे. आबा गृहमंत्री असातना महिला सुरक्षेच्या बाबतीत त्यांनी कधी तडजोड केली नाही. मुंबई शहरात पुन्हा सामाजिक समता, सर्वधर्मसमभाव हा विचार जोपसण्याचे काम राष्ट्रवादीला करायचे आहे. असेही ते म्हणाले.
मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी मुंबईतील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी आणि नवनियुक्त जिल्हाध्यक्षांना बळ देण्यासाठी मुंबईच्या सहा जिल्ह्यात कार्यकर्ता मेळाव्यांचे आयोजन केले होते. त्याची सांगता आज उत्तर मुंबई जिल्हा, बोरीवली येथे झाली. जिल्हाध्यक्ष इंद्रपाल सिंह, नगरसेविका संध्या जोशी, सिरिल डिसुजा आणि रिद्धी खुरसंगे याप्रसंगी उपस्थित होते.
कार्यकर्ता मेळाव्याची सांगता दर्जेदार पद्धतीने होत आहे, याचा मला आनंद आहे. मुंबई प्रदेशच्या पाठीमागे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठामपणे उभा राहणार आहे. मुंबईच्या प्रत्येक आंदोलनामध्ये राज्य पातळीवर सर्व नेते उभे राहतील. या मेळाव्यानिमित्त पक्षप्रवेश करणाऱ्या सर्वच कार्यकर्त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो. चला उठूया आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊया, अशी गर्जना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली.
नेपोलियन बोनापार्ट जसजसा पुढे चढाई करत गेला तसतसा मागचा प्रदेश गमावत गेला. आज तीच अवस्था मोदींची झाली आहे. ते गुजरातेहून दिल्लीत गेले आणि आज गुजरात अस्वस्थ आहे. त्याचप्रमाणे ते दिल्ली सोडून आता जगभर फिरत आहेत. एके दिवशी दिल्लीही जाईल. अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुंबई प्रभारी आणि मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी या प्रसंगी केली.
शरद पवार कृषिमंत्री असताना देशातील कृषी उत्पादनाची आधीच माहिती देऊन भाव नियत्रिंत करत होते. पण मोदीजींचे सरकारपासून जनतेला दाल-रोटीही महाग झाली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहेत. दुष्काळाचे सावट मराठवाड्यावर असतांना मराठवाड्यात दुष्काळ दौरा करायला सरकारला वेळ मिळाला नाही. मात्र सरसंघचालकांनी संघाचा कार्यक्रम मराठवाड्यात लावला आणि १९ मंत्र्यांनी तिथं हजेरी लावली. असेही ते म्हणाले.
आज आपण सत्तेत नाही. विरोधी पक्षात आहोत पण अशावेळी जो कार्यकर्ता पक्षा सोबत राहील तोच सत्ता आल्यावर त्यात सहभागी असेल. गट तट न पाहता आता सर्व जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र यावे. असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी केले.
सन्माननीय खासदार संजय काकडे साहेब वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छ्या
सन्माननीय खासदार संजय काकडे साहेब
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छ्या
‘एमसीसीआयए’च्या सहाय्याने पीएमआरडीएचा विकास आराखडा तयार करण्यास मान्यता
पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणाची (पीएमआरडीए) सभा पालकमंत्री तथा अध्यक्ष गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली झाली. प्राधिकरणाच्या आकुर्डी येथील कार्यालयात झालेल्या या सभेत वरील प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. सभेला पुण्याचे महापौर दत्तात्रय धनकवडे, पिंपरी-चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, मुख्य कार्यकारी अधिकारी महेश झगडे यांच्यासह प्राधिकरणाचे सदस्य उपस्थित होते.
पीएमआरडीएच्या 29 मे 2015 रोजी झालेल्या सभेत पुणे महानगर प्रदेश क्षेत्राचा सर्वंकष आर्थिक विकास आराखडा तयार करण्याबाबत चर्चा झाली होती. त्यानुसार अनेक संस्थांबरोबर चर्चा करण्यात आली. त्यावर मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर (एमसीसीआयए) यांनी तयारी दर्शवली आहे. त्यानुसार ई-टेंडर मागवून संस्थेची नियुक्ती करणे, त्यातून संस्थेची नियुक्ती करून आर्थिक विकास आराखडा अंतिम करण्यात यावा, अशा प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. यानुसार आराखडा तयार करण्यासाठी सहा कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यापैकी सुमारे साडेपाच कोटी रुपये मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर देणार असून उर्वरित 50 लाख रुपये प्राधिकरणाने द्यावे, असे प्रस्तावात म्हटले आहे. त्यास मंजुरी देण्यात आली असून हा आराखडा तयार करण्यासाठी एमसीसीआयएच्या सदस्यांची एक समिती नियुक्त करण्यात येणार असून त्यामध्ये प्राधिकरणाचे दोन सदस्य असावेत, अशा प्रस्तावासही मान्यता देण्यात आली.
शिवाजीनगर ते हिंजवडी दरम्यानच्या मेट्रो रेल्वेचा प्रकल्प पीएमआरडीने करावा याबाबतच्या प्रस्तावावरही सभेत चर्चा झाली. हिंजवडीकडे जाण्यासाठी एकच रस्ता असून त्यावर प्रचंड वाहतूककोंडी होते. त्यामुळे तेथे गुंतवणूक करण्यासाठी नवे उद्योजक येण्यासाठी मेट्रोचा प्रकल्प होणे आवश्यक आहे, असे श्री. बापट यांनी सांगितले. त्यामुळे हा प्रकल्प पीएमआरडीएने राबवावा, असा प्रस्ताव आहे. याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविणे, त्याकरिता येणाऱ्या खर्चास, तसेच सल्लागाराच्या नियुक्ती करणे आवश्यक असल्याचे श्री.बापट यांनी सांगितले. त्यानुसार या प्रस्तावासही मंजुरी देण्यात आली.
सभेत प्रचलित विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावलीसंदर्भात सुरक्षा अनामत रक्कम ठरविणे, झोन दाखला आणि भाग नकाशा देण्यासाठी आवश्यक ते शुल्क आकारणे, बांधकाम परवानगी प्रकरणात सध्याच्या छानणी शुल्कात वाढ करणे, कार्यालयासाठी पुणे महानगरपालिकेच्या औंध येथील महाराजा सयाजीराव गायकवाड उद्योग भवन येथील जागा भाड्याने घेणे, भाड्याच्या दरास मान्यता देणे आदी प्रस्तावावर चर्चा झाली.
यावेळी जिल्हाधिकारी सौरभ राव, जमाबंदी आयुक्त संभाजी कडू-पाटील, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता डी.वाय. पाटील, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता विनायक जाधव आदी उपस्थित होते.
पुनर्वसित प्रत्येक गावाचा पुन्हा आराखडा तयार करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
बेंबळा सिंचन प्रकल्पाचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी बेंबळा प्रकल्पग्रस्तांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री संजय राठोड, आमदार सर्वश्री अशोक ऊईके, मदन येरावार, राजु तोडसाम, संजीवरेड्डी बोदकुरवार, राजु नजरधने, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, अमरावतीचे जिल्हाधिकारी किरण गित्ते आदी उपस्थित होते.
पुनर्वसित गावातील पायाभूत सुविधांचा एक महिन्यात आराखडा तयार करा. त्याप्रमाणे गावांचे अंदाजपत्रक करुन निधी उपलब्ध करुन देऊ. पुनर्वसित गावात पाणी, रस्ते, नाल्या, वीज आदी सुविधा चांगल्या पद्धतीने निर्माण केल्या जातील. सुविधा निर्माण झाल्यानंतर त्याची पाहणी केली जाईल. अपूर्ण व निकृष्ट सुविधा दिल्यास संबंधीत अधिकाऱ्यास दोषी धरण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
धामक गाव शंभर टक्के पुनर्वसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन जागेत या गावाचे पुनर्वसन केले जाईल. सदर गाव मॉडेल गाव करण्याचा प्रयत्न आहे. घुईखेड येथील पिण्याच्या पाण्याची समस्या तातडीने सोडविण्यासोबतच पुनर्वसित गावांना परिपूर्ण पायाभूत सुविधा पुरविण्याबाबत आग्रह राहणार आहे. बेंबळा प्रकल्पाचे काम तीन वर्षात नियोजित पद्धतीने पूर्ण करु. पाटचऱ्या झाल्याशिवाय शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचणार नाही. त्यामुळे बेंबळा प्रकल्पांतर्गत पाटचऱ्याचे जाळे निर्माण करण्यावर भर राहणार आहे.
शासनाने गेल्या काही दिवसात जिल्ह्यात हजारावर सिंचन विहीरी पूर्ण केल्या आहेत. शेततळ्याचे काम यापुढे मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात येईल. यातून शेतकऱ्यांना संरक्षीत सिंचन उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न आहे. शासनाने शेती स्वावलंबन मिशन अंतर्गत अन्न, आरोग्य, शिक्षण यावर भर देण्याचा निर्णय घेतला असून येत्या काही दिवसात प्रत्येकास प्रत्येक शासकीय योजनेचा लाभ मिळेल, असे नियोजन असून त्यासाठी योग्यप्रकारे निधीचे वाटप केले जाईल.
शासनाने प्रकल्पग्रस्तांना नोकरीत पाच टक्के आरक्षणाची तरतूद केली होती. परंतू या प्रमाणात नोकऱ्या मिळाल्या नाही. याबाबत शासन अभ्यास करीत असून प्रकल्पग्रस्तांना नोकरी, व्यवसाय किंवा अन्य कुठल्या मार्गाने दिलासा देता येईल, याचा प्रयत्न सुरु आहे. शासन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहे. या माध्यमातून निश्चितच दिलासा मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या करु नये, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी याप्रसंगी केले.
राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदी चित्रा वाघ यांची निवड
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षपदी माजी राज्यमंत्री फौजिया खान आणि महिला प्रदेशाध्यक्षपदी चित्रा वाघ यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. पत्रकार परिषदेला माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, कोषाध्यक्ष हेमंत टकले आणि माजी सिडको अध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांची उपस्थिती होती.
चित्रा वाघ यांनी आपल्या कामाची सुरुवात वॉर्ड स्तरापासून केली होती. त्यानंतर जिल्हा आणि मुंबई अध्यक्ष अशा वेगवेगळ्या पदांवर काम करून त्यांनी पक्ष वाढीसाठी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
आदरणीय पवार साहेब, अजितदादा पवार आणि सुप्रियाताईंनी सोपवलेली ही नवी जबाबदारी आपण पार पाडू, अशा विश्वास नवनियुक्त महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी यावेळी व्यक्त केला.































