Home Blog Page 3561

‘मुंगळा’ चित्रपटाचे संगीत प्रकाशन संपन्न

0

unnamed1

साई मोहन एन्टरटेनमेंट व गौरव भानुशाली निर्मित ‘मुंगळा’ हा मराठी चित्रपटाचे संगीत प्रकाशन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.पु. ल. देशपांडे अकादमी चे संचालक आशुतोष घोरपडे, मराठी चित्रपट महामंडळाचे सचिव व दिग्दर्शक संजीव नाईक यांच्या शुभ हस्ते संगीत प्रकाशन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध वकील विशाल भानुशाली उपस्थित होते. सदर सोहळ्याला चित्रपटातील सर्व कलाकार व तंत्रज्ञ उपस्थित होते. ‘मुंगळा’ चे दिग्दर्शक विजय देवकर यांनी केले असून कथा, पटकथा, तसेच संवादही त्यांचेच आहेत.

 

                          ‘मुंगळा’ चित्रपट प्रमुख भूमिकेत लोकेश गुप्ते प्रमुख भूमिकेत असून,गणेश यादव, जोती जोशी, सुहास पळशीकर, चेतन दळवी मुख्य भूमिकेत असून सोबत राम कदम, मृणाली जांभळे, हरी ठुमके, महेश फाळके,मुकेश जाधव, भूषण घाडी, दीपक करंजीकर, जनार्दन परब, वैजनाथ चौगुले, गौरी देशमुख, सविता हांडे, आदी कलाकारांच्या भूमिका आहेत.

 

 ‘मुंगळा’ चित्रपटात ३ गाणी आहेत. ‘मुंगळा’ चित्रपटात एक भन्नाट आयटम गाणे असून सारा श्रवण व बाळकृष्ण शिंदे ह्यांनी त्यावर दिलखेचक असे नृत्य सादर केले आहे. आयटम सॉंग अतुल लोहार यांनी संगीतबद्ध केले असून रचना त्यांनीच लिहिली आहे. हे गाणे त्यांच्यासोबत विभावरी सातर्डीकरने गायले आहे. सदर गाण्याला राजेश बिडवे चे नृत्य दिग्दर्शन लाभले आहे. इतर गाणी विजय गावंडे यांनी संगीतबद्ध केली असून मंदार चोळकर यांच्या रचना आहेत. आदर्श शिंदेने व नेहा राजपाल यांनी ‘सुम्बारन गा रे देवा’ हे सुंदर गीत म्हटले असून पावसाला गवसणी घालणारे ‘बरसरे’ हे गाणे आदित्य खांडवे याने म्हटले आहे.

 

ज्वलंत अस मुद्दा म्हणजे पाणी आणि वीज. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात पाणी पेटले आहे. ते कसे विझवायचे, या प्रश्नाचे उत्तर आगामी ‘मुंगळा’ चित्रपटातून देण्याच्या प्रयत्न असल्याचे दिग्दर्शक विजय देवकर यांनी सांगितले.

स्व. विजयालक्ष्मी जर्नादन श्रीगिरी यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न

0

श्री. बालाजी सोशल ग्रुपच्यावतीने स्व. विजयालक्ष्मी जर्नादन श्रीगिरी यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला . पुणे कॅम्प मधील बाबाजान चौकाजवळ राजेश्वर तरुण मंडळाच्या आवारात झालेल्या कार्यक्रमास सर्व धर्माचे धर्मगुरू यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे पूजन करून रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा पार पडला . यामध्ये फादर अंन्टनी , हरिद्वार मिश्रा , भन्ते असांग , मौलाना यासीर मोहम्मद , हरप्रित सिंग या धर्म गुरूंच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले . यावेळी  पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्षा डॉ. किरण मंत्री , नगरसेविका प्रियांका राजेश श्रीगिरी ,नगरसेवक विवेक यादव , राजेश श्रीगिरी , शशिधर पूरम , विनायक काटकर , देवेंद्र भाटीया , राजू मेहता , अनिल पवार , संजय सोनवणे , किशोर संघवी , राहुल गावडे , जितेंद्र म्हस्के , नरेश पडियार , शंकर सुर्वे , संजय लचके , आनंद श्रीगिरी , आरपन बुंदेला , जनसेवा सहकारी बँकेचे संचालक सचिन यादव , निरंजन शेट्टी , लक्ष्मीकांत त्रिवेदी , चरण राचलवार , केशव पवार , प्रविण श्रीमान , शाम श्रीमान आदी मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

या रुग्णवाहिकेच्या संपर्क क्रंमाक – ०२० – २६३५२९९९ असा असून , २४ तास हि रुग्णवाहिका उपलब्ध असणार आहे . अशी माहिती श्री. बालाजी सोशल ग्रुपचे अध्यक्ष राजेश श्रीगिरी यांनी दिली .        

विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी घटक पक्षांची वज्रमूठ – शिवसंग्राम आयोजित विद्यार्थी हक्क परिषदेला पुण्यात जोरदार प्रतिसाद

0
unnamed1 unnamed2
पुणे :
स्पर्धापरीक्षांमधून महाराष्ट्राचे ‘क्रीम आणि ड्रीम’ विद्यार्थी अडीअडणींचा सामना करीत असताना त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विशेषत: राहण्या-खाण्याची सोय करायला महाराष्ट्र सरकारकडे एक कोटी रुपये सुद्धा खर्ची टाकलेले नसणे गंभीर असून, तरुणाईचे सर्व प्रश्‍न  कोणत्याही परिस्थितीत हक्काने सोडविण्यासाठी सरकारकडून सोडविण्याचा निर्धार आज करण्यात आला.
‘शिवसंग्राम विद्यार्थी संघटना’ आयोजित ‘विद्यार्थी हक्क परिषद 2015’चे आयोजन युतीतील घटक पक्षांच्या सहभागाने पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात करण्यात आले होते. या परिषदेला जोरदार प्रतिसाद मिळाला. अध्यक्ष स्थानी शिवसंग्राम चे अध्यक्ष आमदार विनायक मेटे होते
परिषदेला पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, घटक पक्षांचे नेते  खासदार राजू शेट्टी, आमदार महादेव जानकर, सदाभाऊ खोत, अविनाश महातेकर, आमदार भारती लव्हेकर, रविकांत तुपकर उपस्थित होते.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देण्यासाठीची वयोमर्यादा 40 तर पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेची वयोमर्यादा 33 करावी, खासगी क्लासेसचा नियंत्रणाचा कायदा आणावा, स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी विभागीय स्तरावर वसतिगृहे सुरू करावीत, शासकीय अधिकार्‍यांच्या पाल्यांना शासकीय शाळेत पाठवावे, आठवीपर्यंतच्या परीक्षा पुन्हा सुरू कराव्यात, इत्यादी मागण्यांचे ठराव या परिषदेत मंजूर करण्यात आले.
unnamed3
शिवसंग्राम अध्यक्ष आमदार विनायक मेटे म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत या मागण्या सरकारकडून मान्य करून घेऊ अन्यथा नागपूर हिवाळी अधिवेशनावर भव्य मोर्चा नेऊ, 20 ऑक्टोबरला या मागण्यांच्या पाठपुराव्यासाठी औरंगाबाद येथे मेळावा आयोजित  करण्यात येणार आहे, असे त्यांनी जाहीर केले.
राजू शेट्टी म्हणाले, विद्यार्थ्यांच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. परिषदेने प्रश्‍न सुटले नाहीत तर रस्त्यावर उतरायची तयारी ठेवावी. साखर सम्राटांविरोधात लढल्यानंतर शिक्षणसम्राटांविरुद्ध लढायची वेळ आली आहे. शिक्षण संस्था धर्मादाय संस्था म्हणून जमिनी लाटल्या; पण गरीब विद्यार्थ्यांना प्रवेश दिले नाहीत. त्यांच्या मालमत्तांवर टाच आणली पाहिजे.
आमदार महादेव जानकर म्हणाले, ‘आम्ही सत्तेत आहोत की नाही, हे माहीत नाही, पण आम्ही शेतकरी विद्यार्थ्यांबरोबर आहोत. विद्यार्थ्यांनी देखील गरिबीचे भांडवल न करता मोठी स्वप्ने पाहावीत.’
सदाभाऊ खोत म्हणाले, खेड्यातील माणसे व्यवस्थेत जातील तेव्हा शासन व्यवस्थेला दु:ख कळेल. विद्यार्थी हा अंगार आहे, त्याच्या मागण्या मान्य करा, अन्यथा तो राख करेल.
अविनाश महातेकर म्हणाले, ‘सरकारने विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून धोरण ठरवावे. ते शिक्षण संस्थांच्या फायद्याचे नसावे.’
पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले, ‘राज लोकसेवा आयोगाचा कोटा वाढविण्याचा निर्णय लवकरच करू. शासन अभ्यासक्रम आणि गुणवत्ता यात ढवळा ढवळ करणार नाही. वयोमर्यादेचा प्रश्‍न मंत्रिमंडळात सोडविण्यासाठी आग्रही राहू. खासगी क्लासेसच्या फीचा कायदाही करू. गरीब विद्यार्थ्यांना त्यात आरक्षण देऊ. व्यावहारिक शिक्षण प्रणालीसाठी अभ्यासगट नेमू. मागच्या सरकारला दोष न देता जनहिताची कामे करून दाखवू.
शिवसंग्राम विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शैलेश सरकटे यांनी मागण्या सादर केल्या. 10 रुपयांत विद्यार्थ्यांना जेवण मिळाले पाहिजे असे त्यांनी आग्रहाने सांगितले.’
तुषार काकडे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी  शिवसंग्राम प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे ,डॉ. सुधाकर जाधवर, डॉ. उज्ज्वला हाके, श्रद्धा भातंब्रेकर, दशरथ राऊत,बाळासाहेब दोड्तले  इत्यादी उपस्थित होते.

अभिनय कट्ट्याच्या किरण नाकतीचे सिने दिग्दर्शन आणि निर्मितीत पदार्पण!!

0

unnamed

कट्टा म्हणजे चार चौघात रंगलेल्या बेसुमार गप्पा, पण कट्ट्याची हि व्याख्या बदलायला भाग पडणारा असा अभिनय कट्टा. एक चळवळ म्हणून सुरु केलेल्या या कलेच्या बिजांकूराचा आज वटवृक्ष झाला आहे तो फक्त मायेनं अन आस्थेनं सिंचन करत राहिलेल्या कट्ट्याच्या सुत्राधारांमुळे म्हणजेच किरण नाकती यांच्यामुळे. नाट्य व चित्रपट सृष्टीत पदार्पण करत असताना, एक नवोदित कलाकार म्हणून स्वत:च स्थान निर्माण करत असताना, येणारी सारी आव्हाने पेलत; मालिका, चित्रपट, आणि पडदयाआड कार्यभार सांभाळत एक यशस्वी व्यक्तित्व साकारले. पण ‘कुठेतरी या प्रवासाला किमान दुसऱ्यांसाठी सुकर करता आले तर….’ या प्रयत्नातून अभिनय कट्टा जन्माला आला.
दर रविवार न चुकता कलाकारांसाठी हक्काचं व्यासपीठ नि रसिक प्रेक्षकांसाठी उत्तमोत्तम कलाविष्काराची मेजवानी सादर करत ५९०० हूनही जास्त पात्रं रंगवत, २३५ कट्ट्याचा विक्रम या अभिनय कट्ट्याने केला. ठाणेकरांसमवेत संपूर्ण महाराष्ट्रातील रसिकांनी रविवारची एक सुखद संध्याकाळ अनुभवयाला सुरुवात केली. तसेच हा कट्टा पत्रकारांच्या लेखणीची पसंती बनला. प्रख्यात दिग्दर्शकांच्या नि सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या कौतुकाला पात्र ठरला. कलाकारांची पंढरी, मूल्यांना व संस्कुतीला जपत फक्त कलाकार नव्हे तर माणूस घडवणारी संस्था अशी ओळख अभिनय कट्ट्याने निर्माण केली.
अवघ्या पाच वर्षात नाट्य क्षेत्रात यशाच्या शिखरावर पोहचलेला कट्टा आता रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाला आहे. हे अभिनय कट्ट्याचे कलाकार फक्त थिएटर आर्टिस्ट न राहता सिने आर्टिस्ट बनणार आहेत कारण अभिनय कट्टा व कृपासिंधु पिक्चर्स यांच्या संयुक्त विद्यमाने साकारलेल्या ‘सिंड्रेला’ या आगामी सिनेमात जास्तीत जास्त कलाकार हे अभिनय कट्ट्याचे आहेत. यावेळी कट्ट्याचे हे विद्यार्थी फक्त पडद्यावरील कलाकार म्हणूनच नव्हे तर पडद्यामागेही यशस्वी भूमिका सांभाळताना दिसतील.
“सिंड्रेला” या वैशिष्ठ्यपूर्ण सिनेमाचे शिल्पकार हे किरण नाकती आहेत. हा सिनेमा फक्त अभिनय कट्ट्यालाच नवी ओळख देणार नसून, कट्ट्याचे लाडके संचालक, गुरु व सूत्रधार श्री किरण नाकती यांच्या व्यक्तित्वाचेही नवे पैलू समोर घेऊन येत आहे. कारण सदर सिनेमाची कथा,पटकथा व दिग्दर्शक या तिन्ही भूमिका त्यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने निभावल्या आहेत.
“सिंड्रेला” या नावातच या सिनेमाचे वेगळेपण दडलेले आहे. सिनेमाची कथा ही आपल्या सर्वांच्या जवळची असून ही “खरी कथा की परी कथा” हे जाणून घेण्यासाठी हा सिनेमा पहावा लागणार आहे. सिनेसृष्टीत पदार्पण करणाऱ्या रुपेश बने आणि यशस्वी वेंगुर्लेकर या बालकलाकारांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली असून त्यांचा हा पहिलाच सिनेमा आहे. अभिनेता मंगेश देसाईने एक  उत्तम व्यक्तिरेखा साकारली असून एका वेगळ्या
भूमिकेतून विनीत भोंडेच्या अभिनयाची जादू ही  आपल्याला पहायला मिळणार  आहे. याकुब सईद व जनार्दन परब यांच्याही सिनेमात महत्वपूर्ण भूमिका आहेत. सुप्रसिद्ध कॅमेरामन राजा फडतरे यांच्या नजरेतून या सिनेमाचे चित्रीकरण करण्यात आले असून येत्या ४ डिसेंबरला हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे

 

प्रगतीशील महिला बचत गटाच्या महिला सदस्यांना ” मोफत ब्लंकेट वाटप “

0

मातृदिनानिमित पुणे कॅम्पमधील पुलगेट येथील राजाभाऊ चव्हाण मित्र परिवाराच्यावतीने प्रगतीशील महिला बचत गटाच्या महिला सदस्यांना ”  मोफत ब्लंकेट वाटप ” करण्यात आले .  यावेळी प्रगतीशील महिला बचत गटाच्या अध्यक्षा रंजना सोनवणे , उपाध्यक्षा शीतल सोनवणे , सुनिता गोरे , फातिमा शेख , सुरेखा पाटोळे आदी महिला सदस्या उपस्थित होत्या.

   यावेळी रेणुका महिला बचत गटाच्या अध्यक्षा छाया जाधव ,पुणे कॅंटोन्मेंट पुस्तक पतपेढीच्या संचालिका  उषा माळी , स्मिता मुळीक , हेमा खत्री , मंदाकिनी गायकवाड , शकिला आपा आदी महिला भगिनीच्या हस्ते मोफत ब्लंकेट वाटप करण्यात आले .

  या कार्यक्रमाचे संयोजन  राजाभाऊ चव्हाण, विकास कांबळे , अजित मोहिते , विकास भांबुरे , राजेद्न शहा , राहुल जगताप , सतीश कंट्रोल्लु , विनोद परदेशी , किसन तुपे, महेंद्र गायकवाड , मोनू सिंग  आदींनी विशेष परिश्रम घेतले . यावेळी उपस्थितांना महिला बचत गटाची सामाजिक कार्याची माहिती प्रगतीशील महिला बचत गटाच्या अध्यक्षा रंजना सोनवणे माहिती दिली .

” मोफत हृदयरोग निदान व उपचार शिबीर , गुडघे सांधे खुबे मोफत तपासणी , मेंदू विकार निदान शिबीर संपन्न

0

हिंद तरुण मंडळाच्यावतीने पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाचे नगरसेवक व मंडळाचे पंचवार्षिक अध्यक्ष दिलीप गिरमकर यांच्या वाढदिवसानिमित सह्याद्री हॉस्पिटलच्या सहकार्याने पुणे कॅंटोन्मेंट भागातील नागरिकासाठी ” मोफत हृदयरोग निदान व उपचार शिबीर , गुडघे सांधे खुबे मोफत तपासणी , मेंदू विकार निदान शिबीर संपन्न झाले

पुणे कॅम्प भागातील जान मोहम्मद स्ट्रीटवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनमध्ये झालेल्या या आरोग्य शिबिरामध्ये २६७ नागरिकांनी आपली आरोग्य तपासणी केली . यामध्ये ३६ रुग्णाची अनजोप्लास्टी , २४ रुग्णाची बायपास ओपन  हार्ट सर्जरी करण्यात येणार आहे , या सर्व शस्त्रक्रिया राजीव गांधी जीवनदायी योजनेअंतर्गत मोफत करण्यात येणार आहे . अशी माहिती सह्याद्री हॉस्पिटलचे  मुख्य जनसंपर्क अधिकारी  डॉ. अशोक घोणे यांनी दिली .

 या शिबिरासाठी सह्याद्री हॉस्पिटलचे हृदय रोग सर्जन डॉ महेंद्र बाफना , डॉ. स्वाती निकम , डॉ. अंजली काळे , अनुज बाबू , मेघना काळे , शरद काथवटे , मंगेश पाटील , दीपक कालीगंडा , टेक्नीशियन हिमानी पवार , अश्विनी फडणीस आदींनी विशेष परिश्रम घेतले . हिंद तरुण मंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिबीर यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले .

unnamed

” पर्युवशषन पर्व ” सुरु झाल्याने वीतराग जैन ग्रुपतर्फे चोवियार हाऊस

0

जैन धर्मियांचे सर्वात पवित्र असणारे ” पर्युवशषन पर्व ” सुरु झाल्याने वीतराग जैन ग्रुपतर्फे सालाबादप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील चोवियार हाऊस (सूर्यास्तपूर्वचे भोजन )सुरु केले आहे . पुणे लष्करमधील भोपळे चौकातील श्री जैन श्वेतांबर राजस्थान समाज ट्रस्टच्या राजस्थान भवनमध्ये  सुरु करण्यात आलेले चोवियार हाऊसचे सुरू करण्यात आले . यावेळी  वीतराग जैन ग्रुपचे अध्यक्ष सुरेश ओसवाल मनोज छाजेड , उमेश सिंघवी , गिरीष शहा , सुनील  रांका आदी मान्यवर उपस्थित होते . यावेळी चोवियार हाऊसमध्ये सूर्यास्तपूर्वचे भोजन करण्यासाठी येणारे जैन बांधवाना भोजनाचा लाभ घेतला . तसेच जैन बांधवानी भोसरी येथील पुणे पांजरपोळ ट्रस्टसाठी  जीवदया दान पेटीत सढळ हाताने आर्थिक मदत दिली .

  येत्या १६ सप्टेंबर २०१५ पर्यंत चोवियार हाऊस (सूर्यास्तपूर्वचे भोजन )सुरु राहणार आहे . यामध्ये जैन बांधवाना सात्विक भोजन जैन शास्त्राप्रमाणे देण्यात येणार आहे अशी माहिती उमेश  सिंघवी यांनी दिली . यावेळी जैन बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सूर्यास्तपूर्वचे भोजन केले .

unnamed

महिला व बालविकास विभागाकडील पुरस्कारांसाठी प्रस्ताव सादर करावेत – एस.व्ही. शिंदे

0

सातारा (जि.मा.का.): राजीव गांधी मानव सेवा पुरस्कार-2015, राष्ट्रीय बाल कल्याण पुरस्कार-2014 व 2015 आणि विशेष नैपुण्य राष्ट्रीय बाल पुरस्कार 2015 साठी इच्छूक व्यक्ती व संस्थांनी 18 सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी एस.व्ही. शिंदे यांनी केले आहे.
शारीरिक व मानिसक दृष्टया अपंगत्व असलेल्या बालकांचा विकास, संरक्षण व कल्याणासाठी कोणतेही वेतन अथवा मानधन न घेता उदात्त दृष्टीकोनातून सलग 10 वर्षे वैशिष्ट्यपूर्ण व अद्वितीय असे काम करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस राजीव गांधी मानव सेवा पुरस्कार केंद्र शासनामार्फत प्रदान केला जातो. या पुरस्काराचे स्वरुप व्यक्तीगत 1 लाख रुपये प्रशस्तीपत्रक असे आहे.
बाल कल्याण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करण्याच्या दृष्टीने केंद्र शासनामार्फत राष्ट्रीय बाल कल्याण पुरस्कार प्रदान करण्यात येतो. व्यक्तीगत 1 लाख रुपये रोख, मानचिन्ह असा पुरस्कार व राज्यस्तरीय पाच संस्थांसाठी प्रत्येकी 3 लाख रुपये, स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
शिक्षण कला, सांस्कृतिक कार्य व खेळामध्ये दाखविलेल्या विशेष नैपुण्यासाठी या क्षेत्रामध्ये अद्वितीय क्षमता किंवा विशेष कुशलता दाखविलेल्या 4 ते 15 वयोगटातील मुलांना केंद्र शासनामार्फत पुरस्कार प्रदान करण्यात येतो. प्रथम पुरस्कारासाठी 20 हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व सुवर्णपदक इतर पुरस्कारांसाठी चांदीचे पदक, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि 10 हजार रुपये रोख असा केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत देण्यात येतो.
या पुरस्कारांच्या अधिक माहितीसाठी केंद्र शासनाच्या www.wcd.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. या पुरस्कारांचे प्रस्ताव व्यक्ती व संस्थांनी 5 प्रतीत विहित नमुन्यात जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, नवीन प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, एस.टी. स्टॅण्डजवळ, सातारा या पत्त्यावर दि.18 सप्टेंबरपर्यंत सादर करावेत. मुदतीतनंतर आलेल्या प्रस्तावांचा विचार केला जाणार नाही, असेही प्रसिद्धी पत्रकान्वये कळविण्यात आले आहे.

rsz_1logo-for-portal

11 सप्टेंबर रोजी घटकपक्षांची पुण्यात ‘विद्यार्थी हक्क परिषद’

0
पुणे :
‘स्वाभिमानी शेतकरी संघटना’, ‘राष्ट्रीय समाज पक्ष’, ‘रिपाई’ आणि ‘शिवसंग्राम’ हे भाजपचे घटक पक्ष एकत्रितपणे पुण्यात शुक्रवार, दिनांक 11 सप्टेंबरला (11 वाजता  ) ‘विद्यार्थी हक्क परिषद’ घेणार असल्याचे शिवसंग्राम विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष  शैलेश सरकटे  आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रवक्ते दीपक बिडकर यांनी सांगितले.’
 ‘स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांच्या वयाची अट 40 वर्षे करावी, ही प्रमुख मागणी या परिषदेत केली जाणार आहे .   आरक्षित वर्गातील विद्यार्थ्यांकरिता 37 वर्षांपर्यंत परीक्षा देता येतात. देशातील 9 राज्यांमध्ये सर्वसाधारण वर्गातील विद्यार्थ्यांना 42 वर्षांपर्यंत परीक्षा देता येतात; परंतु राज्यात खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांना 33 व्या वर्षातच थांबावे लागते. ही वयोमर्यादा सर्व वर्गांतील विद्यार्थ्यांसाठी 40 वर्षे करावी, यासाठी घटक पक्षांचे सर्व नेते पुण्यात एकत्रितपणे या परिषदेला उपस्थित राहणार आहेत,
घटक पक्षांच्या पुणे शहराध्यक्षांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेवून विद्यार्थी हक्क परिषदेची माहिती दिली . या परिषदेला विनोद तावडे (शिक्षणमंत्री), परिषदेचे अध्यक्ष विनायक मेटे (राष्ट्रीय शिवसंग्राम, अध्यक्ष,शिवस्मारक समिती), गिरीश बापट (पालकमंत्री), खासदार राजू शेट्टी (स्वाभिमानी शेतकरी संघटना), महादेव जानकर (अध्यक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष), भारती लव्हेकर (आमदार, शिवसंग्राम), अविनाश महातेकर (आरपीआय), सदाभाऊ खोत (स्वाभिमानी शेतकरी संघटना), अजिंक्य पाटील (डी. वाय. पाटील विद्यापीठ), डॉ. सुधाकर जाधवर (शिक्षणतज्ज्ञ), तानाजी शिंदे (प्रदेश अध्यक्ष), आयोजक शैलेश सरकटे (विद्यार्थी आघाडी महाराष्ट्र राज्य) इत्यादी प्रमुख नेते उपस्थित होते.
प्रचलित शिक्षण पद्धती बदलून व्यावहारिक शिक्षण प्रणाली तयार करणे * महाराष्ट्र लोकसेवा आयोग (चझडउ) किंवा तत्सम स्पर्धा परीक्षेसाठी वयोमर्यादा 40 वर्षे करावी. * आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या मुलांचे संपूर्ण शिक्षण मोफत करावे. (प्राथमिक, माध्यमिक,  उच्च व तंत्रशिक्षण). * ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनीकरिता मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर इत्यादी मोठ्या शहरात वसतिगृहे उभी करावीत.* पोलीस उपनिरीक्षक परीक्षेची वयोमर्यादा वय 28 वरून 33 वर्षे करावी. * खासगी कोचिंग क्लासेस नियंत्रणात ठेवणारा कायदा करावा. या मागण्या करण्यात येणार आहेत
तुषार काकडे (शिव संग्राम), भरत लगड (शिव संग्राम), देवेंद्र धायगुडे (रासप), महेंद्र कांबळे (आरपीआय), अ‍ॅड. योगेश पांडे (स्वाभिमानी), शेखर पवार (शिवसंग्राम), मंदार जोशी (आरपीआय) हे नेते परिषदेला उपस्थित राहणार आहेत
Shivsangram 3 X 5

माता वेलांगणी जन्मोत्सवानिमित भव्य सर्व धर्मीय मिरवणूक

0

पुणे कॅम्प भागातील दस्तूर मेहेर रोडवरील नवनिर्माण मंडळाच्यावतीने   माता वेलांगणी जन्मोत्सवानिमित भव्य मिरवणूक काढण्यात आली . या मिरवणुकीत सर्व धर्मीय सहभागी झाले होते . जरबेरा फुलांच्या सजावटीत माता वेलांगणी यांची  मूर्ती ठेवण्यात आली होती .  यावेळी मेहेर मोहल्ला येथून ख्रिचन महिला भगिनींनी प्राथना केली . त्यानंतर महिलानी हातामध्ये मेणबत्ती धरून माता वेलांगणी भव्य मिरवणूक काढण्यात आली . हि मिरवणूक मेहेर मोहल्ला , दस्तूर मेहेर रोड , जे जे गार्डन चौक , बुटी स्ट्रीट , सिनेगॉग स्ट्रीट , पारशी अग्यारी , साचापीर स्ट्रीट , शरबतवाला चौक येथे मिरवणुकीचा शेवट झाला . या मिरवणूक मार्गावर भक्तांनी पुष्प वाहून स्वागत केले . या उत्सवानिमित महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते .

   या जन्मोत्सवाचे आयोजन नवनिर्माण मंडळाचे अध्यक्ष रेबॉय फेर्नाडिस , परेश गायकवाड , उमेश फडतरे , जेम्स आऱर्नोल्ड , नाईलेज राव , स्टेनली फ्रान्सिस , रुपेश बांदोडकर , खोदु पूनावाला , अनुज  रोकडे , अनिरुद्ध शिंदे , मरिना फ्रान्सिस , रिटा सत्यनेसम , वायलेट फर्नाडिस , लिडिया फ्रान्सिस , रविता रेबेला आदीनी केले होते . यावेळी माता वेलांगणीची पूजा करण्यात आली . यावेळी माता वेलांगणीची दर्शनासाठी गर्दी केली होती . यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते .

४२ शाळांमधील शिक्षकांचा ” आदर्श शिक्षक पुरस्कार ” देऊन सन्मानित

0

द मुस्लिम वेल्फअर एज्युकेशन सोसायटीच्यावतीने शिक्षक दिनानिमित पुणे शहरातील ४२ शाळांमधील शिक्षकांचा ” आदर्श शिक्षक पुरस्कार ” देऊन सन्मानित करण्यात आले . पुणे कॅम्प भागातील नेहरू मेमोरिअल हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक आय. टी. खान , प्रमुख पाहुणे पुणे शहराचे उपमहापौर आबा बागुल , पुणे जिल्हा परिषद प्राथमिक विभागाचे शिक्षण अधिकारी मुश्ताक शेख , कार्यक्रमाचे संयोजक द मुस्लिम वेल्फअर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष वाहिद बियाबानी , हाजी गुलाम ट्रस्टचे अध्यक्ष मुन्नवर पीरभाई,   माजी नगसेवक अड. आयुब शेख , प्रसिध्द इस्लाम धर्माचे अभ्यासक अनिस चिस्ती , हाजी कासम बियाबानी , मुस्लिम को ऑप बँकेचे संचालक अली इनामदार , बीना एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष हाजी इकबाल खान , अड. सलीम शेख , सिकंदर शेख , रुख्सार वाहिद बियाबानी , मुबारक जमादार , मोहम्मद मुत्तलिब , अहमद बागवान , अब्दुल गनी सर आदी मान्यवर उपस्थित होते .

 पुणे शहरातील मराठी , उर्दू व  इंग्रजी शाळांमधील तसेच पुणे महापालिका शाळामधील शिक्षकांना पुणे शहराचे उपमहापौर आबा बागुल यांच्याहस्ते सन्मानचिन्ह , प्रमाणपत्र , शाल व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले . तसेच , डॉ. ए. आर. शेख यांना ए.पी. जे. अब्दुल कलाम जीवन गौरव पुरस्कार आणि स्व. अब्दुल्ला मलिक साहब यांच्या स्मरणार्थ पाचहजार सातशे श्याऐंशी रुपये रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले .  प्रसिध्द इस्लाम धर्माचे अभ्यासक अनिस चिस्ती यांना मौलाना अबुल कलाम आझाद जीवन गौरव पुरस्कार , बीना एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष हाजी इकबाल खान  यांना सर सय्यद अहमद खान जीवन गौरव पुरस्कार , नोबल असोसिएशनचे अध्यक्षा सौ. फरीदा सुंडके यांना सावित्रीबाई फुले जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले . तसेच , न्यू ग्रेस इंग्लिश हायस्कूलचे अध्यक्ष जकी शेख यांना शाळेच्या दहावीचा १०० टक्के निकाल लावल्याबद्दल यांना उत्कृष्ट शाळेचा प्रथम  पुरस्कार , तसेच आल्जदित उर्दू हायस्कूल द्वितीय पुरस्कार आणि पुणे महापालिकेच्या हकीम आजमल खान उर्दू हायस्कूल यांना तृतीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले .

  या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये पुरस्काराथी शिक्षकामधून  लकी ड्रा काढण्यात आला , त्यामध्ये आयडीयल इंग्लिश प्रायमरी स्कूलच्या शिक्षिका कपिला शेलार यांना सालाबादप्रमाणे सोन्याची अंगठी उपमहापौर आबा बागुल यांच्या हस्ते देण्यात आली . यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले .

  या कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक द मुस्लिम वेल्फअर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष वाहिद बियाबानी यांनी केले तर सूत्रसंचालन  शहबाज शहा   यांनी केले तर आभार रुकसार वाहिद शेख यांनी मानले .

मेट्रो प्रकल्पाला गती द्या : राष्ट्रवादी शिष्ट मंडळाची व्यंकय्या नायडूंच्या भेटीत मागणी

0
 
पुणे :
‘पिंपरी चिंचवड चा स्मार्ट सिटी योजनेत समावेश व्हावा आणि पुणे मेट्रो प्रकल्पाला गती मिळावी’, या मागणीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने दिल्लीत शहर विकासमंत्री व्यंकय्या नायडू यांची भेट घेतली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार, खासदार वंदना चव्हाण, पिंपरी चिंचवड मनपा महापौर शकुंतला धराडे, उपमहापौर प्रभाकर वाघीरे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, पुणे मनपा महापौर दत्तात्रय धनकवडे, सभागृह नेते बंडू केमसे, विरोधी पक्षनेते विनोद नढे, सत्तारुढ पक्षनेत्या मंगला कदम, नगरसेवक अजित गव्हाणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
अमृत योजनेतुन पीएमपीएमएल ला 500 बसेससाठी अनुदान मिळावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
DL26M093010

पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षपदी राजा माने यांची निवड

0

पुणे (वि.मा.का.): पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीच्या बैठकीत अध्यक्षपदी राजेंद्र ज्ञानदेव माने उर्फ राजा माने यांची आज सर्वानुमते निवड करण्यात आली.
पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्ष निवडीसाठी आज विभागीय माहिती कार्यालय,पुणे येथे बैठक पार पडली. या बैठकीस समितीचे सदस्य सुभाष गजानन भारद्वाज, राजेंद्र ज्ञानदेव माने उर्फ राजा माने, स्वप्नील बापट, विठ्ठल दत्तात्रय जाधव, सचिन घाटपांडे, पुणे विभागाचे उपसंचालक (माहिती) तथा समितीचे सदस्य सचिव यशवंत भंडारे आदी उपस्थित होते.
प्रारंभी श्री. भंडारे यांनी सर्व सदस्यांचे स्वागत केले. बैठकीचे आयोजन अध्यक्ष निवडीसाठी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या प्रसंगी सर्व सदस्यांनी सर्व सहमतीने अध्यक्ष म्हणून राजेंद्र ज्ञानदेव माने उर्फ राजा माने यांची निवड केली. त्यानुसार राजा माने यांची निवड अध्यक्ष म्हणून करण्यात आल्याचे सदस्य सचिवांनी जाहीर केले. श्री. माने हे दैनिक लोकमतच्या सोलापूर आवृत्तीचे संपादक आहेत.
बैठकीनंतर श्री. माने यांचे तसेच समितीच्या सर्व सदस्यांचे श्री. भंडारे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी राज्य अधिस्वीकृती समितीचे सदस्य एस. एम. देशमुख, प्रकाश कुलथे यांच्यासह श्रीनिवास नागे, अशोक पाटील, विनोद कुलकर्णी, सहायक संचालक (माहिती) गो. धों. जगधने तसेच माहिती सहायक सचिन गाढवे उपस्थित होते.

महिला सक्षमीकरणात महाराष्ट्र देशात अग्रेसर – मुख्य सचिव

0

स्त्री-पुरुष समानतेवरील राष्ट्रीय परिषदेचा मुख्य सचिवांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई :
महाराष्ट्र हे महिला सबलीकरण आणि स्त्री-पुरुष समानतेच्या कार्यात देशात अग्रेसर राज्य आहे. महिला सक्षमीकरणासाठी आणि मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी राज्य शासनातर्फे महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. पोलीस सेवेत महिलांना 30 टक्के आरक्षण देणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे, असे प्रतिपादन मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी केले.

बॉम्बे टिचर्स ट्रेनिंग कॉलेजतर्फे स्त्री-पुरुष समानता विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या शायना एन.सी, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मिन्‍टु सिंन्हा, ॲड. ऑड्रे डिमेलो, डॉ. मौलि कुरुविला, डॉ. अंजली मॉन्टेरिओ, डॉ. के.पी. जयशंकर उपस्थित होते.

मुख्य सचिव म्हणाले, भारतात पुरुषांच्या बरोबरीनेच महिलांना रोजगाराची संधी मिळाल्यास देशाचे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) 27 टक्क्यांपर्यंत जाईल असा‍ निष्‍कर्ष आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र महिला सक्षमीकरणाच्या चळवळीमध्ये नेहमीच अग्रेसर राहिला आहे. या राज्यातील गोपाळ गणेश आगरकर, न्या. महादेव गोविंद रानडे, महात्मा फुले, धोंडो केशव कर्वे यांच्या सारख्या समाज सुधारकांनी स्त्री शिक्षण आणि सक्षमीकरणाच्या कार्यात मोलाचे योगदान दिले आहे.

मुलगा हवा मुलगी नको या विचाराला छेद देण्यासाठी पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी बेटी बचाव बेटी पढाओ हे अभियान सुरु केले आहे. सुकन्या समृद्धी योजना तसेच महिलांसाठी स्वतंत्र बँक असे महत्त्वाचे निर्णय महिलांच्या विकासासाठी केंद्र सरकारने घेतले आहेत. पुरोगामी असलेल्या महाराष्ट्रात देखील महिलांच्या कल्याणासाठी अनेक अभिनव योजना सुरु केलेल्या आहेत. राज्यातील बचत गटांच्या चळवळीला सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. माझी कन्या भाग्यश्री ही योजना राज्य शासनातर्फे सुरु करण्यात येणार असून त्याअंतर्गत मुलीला जन्म देणाऱ्या मातेला आर्थिक सहाय्य तसेच तिच्या आरोग्य संवर्धनाबरोबर त्या मुलीला एक लाख रुपयांचे अर्थसहाय्य आणि मुलीच्या आजीला सोन्याचं नाणं तसेच मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणाऱ्या गावाला देखील बक्षीस या योजनेंतर्गत देण्यात येणार आहे. या दोन दिवसीय परिषदेत आपण या योजनेसंदर्भात चर्चा करावी आणि त्या संदर्भातील काही सूचना असल्यास राज्य शासनाला कराव्यात. जेणे करुन महिला विकासाच्या योजना राबविताना त्यात अधिक सुलभता येईल, असेही मुख्य सचिवांनी सांगितले.

यावेळी विविध अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. प्राचार्या मिन्टु सिंन्हा यांनी प्रास्ताविक केले.

रायगड भूषण पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न

0

11228112_877818252271973_1753187009755415721_n 11953265_877818248938640_3979622456601145529_n 12004928_877818238938641_8536983534234326394_n

कर्जत -श्रीराम पुरोहित, शुभांगी झेमसे आणि लहानगा अमित पवार यांना रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने दरवर्षी रायगड भूषण पुरस्कार देण्यात येतात. जेष्ठ निरुपणकार डॉ. नानासाहेब धर्माधिकारी, परमपूज्य पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या पासून पुरस्कारांना सुरुवात झाली. यंदा हे पुरस्कार राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले
रायगड जिल्ह्याचा इतिहास मोठा आहे. येथील परंपरा, भाविकता, अध्यात्मिकता, परमार्थ तसेच राजकारणही मोठे आहे. रायगडामध्ये नवरत्नांची कमी नाही. नव्या पिढी पुढे चांगले आदर्श ठेवावेवा यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या जिल्ह्यातील नद्या रासायनिक कारखान्याने प्रदूषित होतील, पाणी प्रदूषित होईल परंतु येथील माणसांची मने कधीही प्रदूषित होणार नाहीत, याची मला खात्री आहे असे यावेळी तटकरे यांनी सांगितले .
यंदा या पुरस्कारांचे वितरण कर्जत तालुक्यात आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी आमदार सुरेश लाड, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेशदादा टोकरे, उपाध्यक्ष अरविंद म्हात्रे, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पंढरपट्टे, शिक्षण सभापती मनोहर पाशिलकर, समाजकल्याण सभापती गीताताई जाधव, अर्थ व बांधकाम सभापती चित्राताई पाटील, वसंत ओसवाल, सभापती सुवर्णा बांगारे, उपसभापती मनोहर थोरवे आदींसह जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.