Home Blog Page 3554

जर्मन कंपन्यांनी राज्यात गुंतवणूक करावी- मुख्यमंत्री

0

इंडो-जर्मन चेंबर ऑफ कॉमर्सची बैठक संपन्न

मुंबई : ‘मेक इन इंडिया’, ‘मेक इन महाराष्ट्र’ या संकल्पनेच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या शाश्वत विकासासाठी जर्मन कंपन्यांनी योगदान द्यावे. जर्मन कंपन्यांनी औद्योगिक क्षेत्रात जास्तीत जास्त गुंतवणूक करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

हॉटेल ताज विवांता येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत इंडो-जर्मन चेंबर ऑफ कॉमर्सची 59 वी वार्षिक बैठक संपन्न झाली, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. भारतातील जर्मनीचे राजदूत डॉ. मार्टीन नाय, बॉश कंपनीचे व्यवस्थापकीय सहसंचालक सौमित्र भट्टाचार्य, आयजीसीसीचे अध्यक्ष तपन सिंघल आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, पंतप्रधानांच्या ‘मेक इन इंडिया’ या संकल्पनेच्या माध्यमातून जर्मन कंपन्यांनी देशात विविध क्षेत्रात गुंतवणूक केली आहे. जर्मन कंपन्यांनी महाराष्ट्रामध्ये ‘मेक इन महाराष्ट्र’ या संकल्पनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त गुंतवणूक करावी, असे सांगून ते पुढे म्हणाले की, आज भारत देश जागतिक पातळीवर आर्थिक महासत्ता बनू पाहत आहे. देशाची जवळजवळ 50 टक्के लोकसंख्या ही 25 वर्षाखालील आहे. या लोकसंख्येला मानव संसाधनात रुपांतरित केल्यास देश हा नक्कीच जागतिक पातळीवर आर्थिक महासत्तेचे शिखर गाठू शकेल, असा विश्वास श्री. फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

देशाच्या जीडीपीत राज्याचा वाटा 15 टक्के आहे. राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये कौशल्य विकास अभ्यासक्रमासाठी जर्मन कंपन्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

राज्यातील 10 शहरांची स्मार्ट सिटीसाठी निवड करण्यात आली आहे. या स्मार्ट सिटीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार असून स्मार्ट सिटीच्या निर्माण कार्यात जर्मन कंपन्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन श्री. फडणवीस यांनी यावेळी केले.

या बैठकीप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईतील पाण्याची समस्या सोडविण्याबाबत उपाययोजनांची ‘श्वेत पत्रिका’ प्रकाशित करण्यात आली.

स्वच्छ भारत अभियानासाठी स्वच्छ भारत कोष; मुख्यमंत्र्यांच्या उपगटाची शिफारस

0
नवी दिल्ली : स्वच्छ भारत अभियानासाठी केंद्र व राज्य पातळीवर ‘स्वच्छ भारत कोष’ निर्माण करण्यात यावा. स्वच्छ भारत दीर्घकालीन करमुक्त कर्ज रोखे उभारण्याबरोबरच देशातील वापरात नसलेली 1 कोटी 39 लाख शौचालये सुरु करण्यासाठी निधी देण्यात यावा, अशा शिफारशी स्वच्छ भारत अभियानांतर्गत तयार करण्यात आलेल्या दहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपगटाने केंद्र शासनास केल्या आहेत.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत मुख्यमंत्र्यांच्या उपगटाने या अभियानाच्या अंमलबजावणीसंदर्भात आर्थिक, तांत्रिक, लोकसहभाग, घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छताविषयक जनजागृती आदी विषयांवर एकत्रित अहवाल केंद्र शासनास बुधवारी सादर केला. निती आयोगाच्या सभागृहात या अहवालाचे सादरीकरण निती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सिंधुश्री खुल्लर यांनी केले.

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, हरयानाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरिश रावत, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, मिझोरामचे मुख्यमंत्री लाल थानवाला, महाराष्ट्राच्या नगरविकास खात्याच्या सचिव मनीषा म्हैसकर, मुख्यमंत्री फडणवीस यांचे सचिव मिलींद म्हैसकर यांच्यासह सिक्कीम, पश्चिम बंगाल, बिहार आणि दिल्ली आदी राज्याचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

स्वच्छता कराची सूचना
मुख्यमंत्र्यांच्या या उपगटाने स्वच्छ भारत अभियानासाठी १४ व्या वित्त आयोगांतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांना मुलभूत सेवा पुरविण्यासाठी मुबलक निधी देण्यात यावा असे सूचविले आहे. ज्या सेवांना कर आकारण्यात येतो अशा सेवांना स्वच्छ भारत कर लागू करण्यात यावा. कोळसा, अॅल्युमिनीयम, लोखंड निर्मिती तसेच जैविक कचरा, पेट्रोल व डिझेल याबरोबरच रासायनिक कंपन्या व टेली कम्युनिकेशन कंपन्यांवरही हा कर लावण्यात यावा. करातून मिळालेला निधी राज्यांच्या स्वच्छ भारत कोशामधे जमा करण्यात यावा.

पुढील तीन वर्षांसाठी केंद्र व राज्यांच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात यावी. स्वच्छ भारत अभियानाच्या यशस्वीतेसाठी केंद्र व राज्य शासनाने निधी उपलब्धतेसाठी उपाययोजना आखाव्यात. याचबरोबर राज्य व केंद्र शासनाच्या इतर योजनांचा निधी आवश्यकता भासल्यास स्वच्छ भारत अभियानासाठी वळविण्यात यावा. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटी (सीएसआर) च्या माध्यमातूनही निधी उभा करण्यात यावा. देणग्यांच्या स्वरूपात निधी घेण्यात यावा व अशा देणग्या पूर्णपणे करमुक्त करण्यात याव्यात. देशातील वापरात नसलेली 1 कोटी 39 लाख स्वच्छतागृहे उपयोगात आणण्यासाठी निधीची तरतूद करण्यात यावी. मानवाद्वारे मैला वाहतूक पद्धती पूर्णपणे बंद करण्यात यावी, अशा सूचनाही या उपगटाने केल्या आहेत.

राज्यस्तरीय मिशनची निर्मिती
स्वच्छ भारत अभियानासाठी केंद्र व राज्य स्तरावर राष्ट्रीय व राज्यस्तरीय मिशनची निर्मिती करण्यात येणार आहे. केंद्र शासन स्तरावर पंतप्रधानांच्या तर राज्य स्तरावर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यात येणार आहे. राज्यपातळीवर तयार करण्यात येणाऱ्या मिशनसाठी प्रकल्प संचालक, अंमलबजावणी यंत्रणा, कौशल्यवृद्धी केंद्र, स्वच्छ भारत कोष व माहिती शिक्षण व संवाद यंत्रणा निर्माण करण्याची सूचना या उपगटाने केली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती या अभियानासाठी स्थापन करण्यात येणार आहे. राज्य शासनाचे संबंधित विभाग हे या समितीचे सदस्य असणार आहेत. राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालीही उच्चाधिकार समितीसुद्धा स्थापन करण्यात यावी, ही समिती स्वच्छ भारत अभियानाच्या अंमलबजावणीसाठी कार्य करेल. जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली या अभियानासाठी अधिकाऱ्यांची स्वतंत्र यंत्रणा तयार करण्यात येणार आहे.

राज्यातील सर्व नगरपालिका व महानगरपालिकांमधे स्वच्छता व्यवस्थापन कक्ष निर्माण करण्यात यावा. या कक्षाच्या माध्यमातून घनकचरा व ओला कचरा व्यवस्थापनाचे कार्य करण्यात यावे. केंद्र स्तरावर राष्ट्रीय तांत्रिक मंडळ निर्माण करण्यात यावे व या मंडळाच्या माध्यमातून कचरा व्यवस्थापनासाठी तांत्रिक सहाय पुरविण्यात यावे, ज्यामुळे लोकसहभाग वाढविण्यास मदत होईल. नामांकित संशोधन संस्थांचा सहभाग स्वच्छ भारत अभियानात वाढविण्यात यावा जेणेकरून अभियान यशस्वितेसाठी प्रभावी तंत्रज्ञान विकसित करता येऊ शकेल.

शालेय अभ्यासक्रमात स्वच्छता विषयाचा समावेश
स्वच्छता अभियानाच्या जनजागृतीसाठी शालेय अभ्यासक्रमात स्वच्छता विषयाचा समावेश व्हावा. पदवी व पदव्युत्तर अभ्याक्रमात पर्यावरण, विज्ञान, आरोग्य अभियांत्रिकी, महापालिका अभियांत्रिकी यासारखे अभ्यासक्रम सुरु करण्यात यावेत. उच्च शिक्षण संस्थांमध्ये गुणवत्ता केंद्र निर्माण करण्यात यावे, ज्याद्वारे घनकचरा व्यवस्थापनाचे संशोधन करता येऊ शकेल. विदेशी विद्यापीठांच्या सहयोगाने कचरा व्यवस्थापन संशोधनास चालना देण्यात यावी अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांच्या या उपगटाने केल्या आहेत.
स्वच्छ भारत आठवडा साजरा करावा
वर्षातून एकदा स्वच्छ भारत आठवडा साजरा करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार ग्रामपंचायत, नगरपरिषद, जिल्हापरिषद, महानगरपालिका, राज्य व राष्ट्रीय पातळीवर या अभियानाचा आढावा घेण्यात यावा आणि उत्तम कार्य करणाऱ्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे. यावर सर्व मुख्यमंत्र्यांचे एकमत झाले. देशात ‘राष्ट्रीय स्वच्छ भारत अभियान ‍दिन’ साजरा करण्याबाबतही चर्चा झाली. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि निती आयोगाचे वरिष्ठ अधिकारी एकत्र बसून अंतिम निर्णय घेतील असे सांगण्यात आले. देशातील सर्व राज्य सरकार, केंद्र सरकारच्या नगरविकास आणि पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्रालय यांच्याशी चर्चा करून निती आयोग डिसेंबर २०१५ पर्यंत स्वच्छ भारत अभियानाचा मसुदा तयार करेल, अशी माहिती यावेळी निती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सिंधुश्री खुल्लर यांनी दिली.

यापूर्वी याचवर्षी ३० एप्रिल, १९ मे आणि २४ जून रोजी मुख्यमंत्र्यांच्या या उपगटाची बैठक पार पडली. त्यानंतर संबंधित राज्यांच्या विभागांचे वरिष्ठ अधिकारी, केंद्र सरकारच्या नगरविकास आणि पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्रालयाचे अधिकारी, निती आयोगाच्या अधिकाऱ्यांमध्येही बैठका पार पडल्या.

२०१७ पर्यंत महाराष्ट्र हागणदारी मुक्त करू- मुख्यमंत्री श्री. फडणवीस
महाराष्ट्र राज्य 2017 सालापर्यंत हागणदारी मुक्त करण्याचा निर्धार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत बोलून दाखविला. मुंबईमधील केंद्र शासनाच्या जागा व सागरी किनारपट्टी नियमन क्षेत्राच्या (सिआरझेड) जमिनीवर असलेल्या झोपडपट्ट्यांमध्ये स्वच्छतागृह बांधता येत नाहीत. त्यामुळे हागणदारीमुक्त झोपडपट्ट्या करण्यास अडचणी निर्माण होतात, तेव्हा अशा जागांवर स्वच्छतागृह उभारण्यास मंजुरी द्यावी, अशी सूचना श्री.फडणवीस यांनी यावेळी केली. काही विषयाबाबत स्पष्ट धोरण नसल्याने स्वच्छ भारत अभियानाच्या अंमलबजावणीत अडचणी येत असल्याने निती आयोगाकडून अशा विषयांबाबत स्पष्ट धोरण तयार करावे, अशी सूचनाही श्री.फडणवीस यांनी केली.

उपगटात सहभागी सर्वच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी अतिशय चांगले काम केले असून त्यांच्या सूचनानंतर तयार होणाऱ्या आराखड्यातून ‘स्वच्छ भारत’ व ‘स्वच्छ महाराष्ट्र अभियान’ प्रभावीपणे राबविले जाणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

ठळक शिफारशी :-

• शौचालय निर्मितीस सर्वोच्च प्राधान्य.
• प्रभावी संवाद यंत्रणा.
• स्वच्छता, पर्यावरण व सार्वजनिक आरोग्यविषयक अभ्यासक्रमांचा समावेश.
• विदेशी विद्यापीठांचे घनकचरा व्यवस्थापनासाठी सहकार्य.
• जनजागृतीसाठी स्वतंत्र निधी.
• शौचालय निर्मितीसाठी 12 हजार रुपये अनुदान
• अतिदुर्गम भागात शौचालय निर्मितीसाठी विशेष भर.
• स्वच्छ भारत अभियानासाठी राष्ट्रीय स्तरावर तांत्रिक मंडळ.
• केंद्र, राज्य, जिल्हास्तरावर स्वच्छ भारत अभियानासाठी स्वतंत्र यंत्रणा.
• नगरपालिका व महापालिकांमध्ये स्वच्छता व्यवस्थापन कक्ष.
• नामांकित संशोधन संस्थांचा सहभाग.
• कचऱ्यापासून वीज निर्मितीस चालना.
• शहरी भागात सशुल्क शौचालयाची निर्मिती.
• झोपडपट्टी भागात शौचालय निर्मिती.
• मानवाद्वारे मैला वाहतूक पद्धत पूर्णपणे बंद करणे.

 

विसर्जनासाठी धरणातून पाणी सोडण्याचे अधिकार मला नाहीत .. जिल्हाधिकारी

0
 पुणे –
शासनाने अपुऱ्या पाणीसाठ्यांमुळे धरणांतील पाणी पिण्यासाठी राखून ठेवण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. परंतु, पिण्याव्यतिरिक्‍त धरणांतून पाणी सोडण्याचे अधिकार मला नाहीत. त्यामुळे गणेश विसर्जनासाठी नदीत पाणी सोडायचे झाल्यास त्यासाठी विभागीय आयुक्तांची परवानगी घ्यावी लागणार आहे, असे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगितलेत्याचबरोबर .गणेश विसर्जनासाठी अनंत चतुदर्शीला (रविवारी) खडकवासला धरणातून मुठा नदीत पाणी सोडण्याची आवश्‍यकता आहे का, या संदर्भातील स्पष्ट अहवाल जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी पुणे महापालिकेला मागितला आहे.
पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. त्यामुळे धरणांतील सर्व पाणी पिण्यासाठी राखीव ठेवले आहे. पाणीवापरामध्ये काटकसर केली जात असताना गणपती विसर्जनासाठी मुठा नदीत पाणी सोडण्याविरोधात राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणासमोर याचिका दाखल झाली आहे. त्यावर बाजू मांडण्याचे आदेश प्राधिकरणाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. या संदर्भात गुरुवारी (ता. 24) जिल्हाधिकारी बाजू प्राधिकरणासमोर मांडणार आहेत.
दरम्यान, या पार्श्‍वभूमीवर जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाणी सोडण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. गणेशोत्सवामध्ये पाचव्या, सातव्या आणि विसर्जनादिवशी धरणांतून पाणी सोडण्यात येते. यंदा पाणीसाठ्याची स्थिती बिकट आहे. गणपती विसर्जनासाठी साधारणतः 168 दशलक्ष घनफूट पाणी नदीत सोडावे लागणार आहे. हे पाणी शहराला दोन दिवस पुरेल एवढे आहे, असे पत्रात म्हटले आहे. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांना पत्र दिले आहे. गणेश विसर्जनासाठी शहरात किती ठिकाणी विसर्जन हौदांची व्यवस्था केली आहे. अजून कितीची गरज आहे, याचे मूल्यमापन करावे, तसेच खडकवासला धरणातून मुठा नदीमध्ये खरोखर पाणी सोडण्याची आवश्‍यकता आहे का, यासंबंधीचा अहवाल देण्यात यावा, असे पत्रात म्हटले आहे. अहवाल एक दिवसात द्यावा, अशीही सूचना केली आहे. 
 

विसर्जन काळात वीजयंत्रणेपासून नागरिकांनी सतर्क रहावे..

0

पुणे, : गणेश विसर्जनाच्या कालावधीत सार्वजनिक ठिकाणी असलेल्या वीजयंत्रणेपासून नागरिकांनी सतर्क

राहण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत वीजसेवेबाबत काही अडचणी, तक्रारी किंवा अन्य घटनांची माहिती देण्यासाठी

नागरिकांनी किंवा गणेश मंडळांच्या सदस्यांनी 24 तास सुरु असणार्‍या कॉलसेंटरच्या 18002003435 किंवा

18002333435 या टोलफ्री क्रमांकावर संपर्क साधावा. शहरातील महत्वाच्या लक्ष्मी रोड व टिळक रोडवरील गणेश

विसर्जन मिरवणुकीसाठी लक्ष्मी रोड येथे तात्पुरता नियंत्रण कक्ष सुरु करण्यात येत आहे. मिरवणुक संपेपर्यंत सुरु

राहणार्‍या या नियंत्रण कक्षात सहाय्यक अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

गणेश मंडळांनी विसर्जनाच्या कालावधीत मिरवणुकीतील वाहने, देखावे आदी उच्च व लघुदाब वाहिन्या, रोहित्र,

फिडर पिलर आदी यंत्रणेपासून सुरक्षित अंतरावर राहतील याची काळजी घ्यावी. तसेच नागरिकांनी मिरवणूक

पाहण्यासाठी वीजयंत्रणा किंवा फिडर पिलरवर चढू नये किंवा त्याचा आधार घेऊ नये. कोणी असा प्रयत्न करीत असेल तर

वीजयंत्रणेपासून सुरक्षीत अंतरावर जाण्यास भाग पाडावे असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, पुणे परिमंडलातील गणेश विसर्जनाच्या कालावधीत मोबाईल व्हॅनसह महावितरणचे अभियंता व कर्मचार्‍यांचे

पथक उपलब्ध राहणार आहे. गणेश विसर्जनाच्या कालावधीत विद्युत सेवेबाबत काही अडचणी आल्यास किंवा अन्य घटनांची

माहिती द्यावयाची असल्यास महावितरणच्या टोल फ्री 18002003435 किंवा 18002333435 क्रमांकावर संपर्क

साधण्याचे आवाहन केले आहे.

प्लॅस्टिक कॅरीबॅग व्यावसायिकांविरुध्द कारवाई

0

पुणे महानगरपालिकेच्या औंध, वारजे कर्वेनगर, बिबवेवाडी, हडपसर, घोलेरस्ता, कोंढवा वानवडी, कसबा विश्रामबागवाडा, कोथरुड, कै. बा.स. ढोलेपाटील, धनकवडी या क्षेत्रिय कार्यालयांच्या परिसरा अंतर्गत ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक कॅरीबॅग विक्री, साठवणूक व वाहतूक करणाऱ्या व्यावसायिक विक्रेत्यांविरुध्द  कारवाई करण्यात आली.

सदरची कारवाई प्लॅस्टिक विरोधी मोहिम पथक व क्षेत्रिय कार्यालया अंतर्गत विभागीय आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक यांच्या सहाय्याने कारवाई पूर्ण करणेत आली.

कारवाई अंतर्गत ५३ व्यावसायिक, विक्रेते यांच्यावर कारवाई करण्यात येऊन ११८ किलो प्लॅस्टिक कॅरीबॅग जप्त करण्यात आल्या व प्रशासकीय शुल्कापोटी र.रु. १,३६,५००/- (र.रु.एक लाख छत्तीस हजार पाचशे पन्नास फक्त) वसूल करण्यात आले.

विभागीय आरोग्य निरीक्षक दिपक ढैलवान, प्लॅस्टिक विरोधी मोहिम पथक प्रमुख ईसाक शेख, सुर्यभान शिक्रे, आनंद नाईक, राजेश दरेकर, ललीता तमनर, आनंद चंदाले, श्री. खिरीड, अजित कुंटे, मंद्रुपकर, सिमा पुजारी, नवले, भरत लाखे, प्रियंका कंक, विक्रम काथवटे, राजेश थोरात, कारकुड, इनामदार यांनी कारवाई पूर्ण केली.

पुरूषाच्या संघर्षाची आणि बाईच्या अंतरंगाची आगळी वेगळी कथा -माझे पती सौभाग्यवती

0

२८ सप्टेंबरपासून रात्री ८.३० वा. झी मराठीवर    

प्रत्येक पुरूषामध्ये एक बाई दडलेली असते आणि प्रत्येक स्त्रीमध्ये एक पुरूष. ही दडलेली व्यक्ती कधी स्वभावातून समोर येते तर कधी एखाद्या गुणामधून. त्यामुळेच आपण अनेकदा एखाद्या स्त्रीच्या साहसी वृत्तीसाठी मर्दासारखी लढलीस अशी उपमा देतो तर हळव्या झालेल्या पुरूषाला बायकांसारखा रडला असंही म्हणतो. खरं तर स्त्रीसाठी देण्यात आलेली पुरूषी उपमा ही तिच्या कर्तृत्वाची पावती असते परंतू पुरूषांना बायकी संबोधन वापरून एक प्रकारे कमीच लेखण्यात येतं. हे कमी लेखणं त्याच्या वागण्याला असतं की स्त्रीपणाला हा खरा कळीचा मुद्दा. स्त्रीच्या अशा हळव्या वृत्तीला कमी समजणा-या अनेकांना तिचं दुःख कळत नाही त्यामुळेच बाईचं दुखणं समजून घेण्यासाठी बाईच व्हावं लागतं असंही म्हटलं जातं. बाईच्या मनातील हेच दुखणं समजून घेण्याची एक आगळी वेगळी कथा प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे झी मराठीच्या आगामी ‘माझे पती सौभाग्यवती’ या मालिकेतून. येत्या २८ सप्टेंबरपासून रोज रात्री ८.३० वा. ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.  0 1 5

या मालिकेची कथा आहे वैभव मालवणकर या स्ट्रगलर अभिनेत्याची. अभिनयाची आवड ज्याच्या मनातच नाही तर रक्तात भिनली आहे असा हा अभिनेता. एक मोठा नट बनण्याचं स्वप्न घेऊन तो या मुंबईत आलाय. अनेक वर्षे संघर्ष करूनही मनासारखं काम तर मिळालच नाही उलट वाट्याला आली ती अपमानास्पद वागणूकच. याही परिस्थितीत मात्र खचून न जाता तो आपलं स्वप्न उराशी बाळगून या स्वप्ननगरीत रोज धक्के खातोय. त्याच्या या संघर्षामध्ये त्याच्या प्रत्येक पावलावर त्याची मनोभावे साथ देतेय ती त्याची पत्नी लक्ष्मी. आपल्या पतीने खूप नाव कमावावं आणि मोठा अभिनेता व्हावं हे तिचंही स्वप्न. त्याच्या या स्वप्नपूर्तीसाठी काटकसरीचा संसार ती मोठ्या नेटाने चालवतेय. याच दरम्यान वैभवच्या आयुष्यात एक अशी घटना घडते ज्याद्वारे अभिनयाच्या संधीचं एक मोठं दार उघडतं. पण संघर्ष हा जणू त्याच्या जगण्याचा अविभाज्य भागच बनलाय त्यामुळे या संधीसोबतच येतो एक आगळा वेगळा संघर्ष तो म्हणजे स्वतःची मूळ ओळख लपविण्याचा. हाडाचा अभिनेता असलेल्या या नटाला जी मोठी भूमिका मिळते ती असते एका स्त्री पात्राची. अभिनेता म्हणून ओळख कमवायला आलेल्या वैभवला पहिल्यांदाच एक मोठी भूमिका मिळते पण तीही स्वतःची ओळखच मिटवून टाकणारी.  पण हे आव्हान स्वीकारून स्वतःच्या अभिनेता या ओळखीबरोबरच या पात्राची नवी ओळख निर्माण करतो का ? आपल्या दैनंदिन आयुष्यात बाईचं अस्तित्व दुर्लक्षित करू पाहणाऱ्या त्याच्या आयुष्याला या कामामुळे कलाटणी मिळते का? त्याच्या स्वप्नांची पूर्तता होते का ? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील ‘माझे पती सौभाग्यवती’ या मालिकेतून.

3 4

झी मराठीच्या मनोरंजनाच्या ताफ्यात या मालिकेद्वारे आणखी एका उत्कंठावर्धक मालिकेची भर पडणार आहे. ‘होणार सून मी ह्या घरची’ या लोकप्रिय मालिकेचे निर्माते आणि दिग्दर्शक असलेल्या मंदार देवस्थळी यांच्या अल्ट्रा क्रिएशन्स या संस्थेने या मालिकेती निर्मिती केली आहे. ज्यामध्ये सुप्रसिद्ध अभिनेते वैभव मांगले हे वैभव मालवणकरच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहेत तर पत्नी लक्ष्मीच्या भूमिकेत नंदिता धुरी ही अभिनेत्री बघायला मिळणार आहे. याशिवाय अशोक शिंदे, रमेश भाटकर, उदय सबनिस, स्नेहा माजगावकर, अद्वैत दादरकर असे अनेक लोकप्रिय कलाकारही या मालिकेत असणार आहेत.

केवळ बाईचं मन समजून घेण्याचा नाही तर तिच्या अंतरंगात डोकावण्याचा अतिशय वेगळा प्रयत्न ‘माझे पती सौभाग्यवती’ या मालिकेमधून होणार आहे. येत्या २८ सप्टेंबरपासून सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वा ही मालिका प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे फक्त झी मराठीवर.  

कांचन मुसमाडेने पटकावला मिस पुणे फेस्टीव्हलचा बहुमान

0

 

पुणे – २७व्या पुणे फेस्टीव्हलमध्ये झालेल्या सौंदर्य – व्यक्तीमत्व स्पर्धेत मिस पुणे फेस्टीव्हल

होण्याचा बहुमान कांचन मुसमाडे हिने पटकावला. फर्स्ट रनरअप वृषाली यादव आणि सेकंड

रनरअप चैत्राली घोडके ठरली. मिस पुणे फेस्टीव्हलसाठी कांचन मुसमाडेचे नाव पुणे फेस्टीव्हलचे

अध्यक्ष सुरेश कलमाडी यांनी जाहीर केल्यावर तिला ऑनलाईन बिनलाइन फेम अभिनेत्री ऋतुजा

शिंदे आणि रेगे फेम अभिनेता आरोह वेलणकर यांनी मुकुट प्रदान केला. यावेळी पुणे फेस्टीव्हलचे

मुख्य संयोजक कृष्णकांत कुदळे, स्पर्धेच्या संयोजिका सुप्रिया ताम्हणे, अविष्कार नृत्य

अकादमीची जुई सुहास आणि परिक्षक आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

मिस पुणे फेस्टीव्हलसाठी एकूण ५० जणींची ऑडिशन घेण्यात आली होती. अंतिम फेरीसाठी

त्यातून २० जणींची निवड करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी दोन भाग करण्यात आले होते.

पहिल्या भागाची संकल्पना आम्रपालीची सन्यासी लुकमधील तर दुस-या भागाची संकल्पना

अमेरिकन स्ट्रीट वेअरची होती. त्यामुळे दोन टोकाच्या दोन वेगवेगळ्या लुकमध्ये आपले

व्यक्तीमत्व दाखवण्याची संधी स्पर्धकांना मिळाली. स्पर्धकांचा आत्मविश्वास, रॅम्पवर चालण्यातील

आत्मविश्वास, स्टाइल, त्यांचे हास्य, सर्वसमान्यज्ञान, हजरजबाबीपणा, समाज व कुटुंबाबद्दलचा

दृष्टीकोन अशा विविध प्रकारात स्पर्धकांची परिक्षा केली गेली.

स्पर्धेच्या सुरूवातीलाच ज्येष्ठ निर्माता- दिग्दर्शक गजेंद्र अहिरे आणि सिनेमॅटोग्राफर विशाल जैन

त्यांच्या नविन चित्रपटासाठी कदाचित नवी हिरोइन मिळेल या दृष्टीने परिक्षण करणार असल्याचे

जाहीर केले. मुख्य तीन विजेत्यांशिवाय एव्हलीनची मिस फेव्हरीट, सृष्टी ढोलेपाटीलची बेस्ट

फोटोजनिक, नम्रता बालसेची बेस्ट स्माइलचे, कांचन मुसमाडेची बेस्ट टॅलंट, शिवानी जाधवची

बेस्ट हेअरसाठी निवड करण्यात आली. या स्पर्धेसाठी गजेंद्र आहिरे, विशाल जैन आणि मॉडेल

माएशा अय्यर यांनी परिक्षक म्हणून काम बघितले. त्यांचा सत्कार मीरा कलमाडी यांनी करकेला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन चेतन आग्रवाल आणि निकू भाटिया यांनी केले. कार्यक्रमाची सुरूवात

गणेश वंदनाने झाली. अविष्कारच्या कलाकारांनी नृत्ये सादर केली. या शिवाय मिस पुणे

फेस्टीव्हलमधील माजी स्पर्धकांनीही एकत्रित नृत्याविष्कार सादर केला. रॅम्पवॉक आणि स्पर्धेतील

नृत्याविष्कार सई सुहास यांनी केली होती. या स्पर्धेसाठी झी टीव्हीचे राजेश वैराट, लॅक्मे फॅशन

आणि फॅशन टीव्हीचे रोहन यांगली खास उपस्शित होते. या स्पर्धेसाठी ब्लेझ ब्युटी अकॅडमी,

डिव्हाइन लव्ह, मीरा फोटो फिल्म्स आणि फ्रँगनन्स ब्युटिक आणि बॉडी केअर यांचा सहयोग

लाभला होता. त्या सर्वांच्या सत्कार पुणे फेस्टीव्हलतर्फे करण्यात पुणे फेस्टीव्हलचे मुख्य संयोजक

कृष्णकांत कुदळे, सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे काका धर्मावत यांच्या हस्ते करण्यात आला.

कलर्स मराठी वाहिनी ही यंदाच्या पुणे फेस्टीव्हलची मुख्य प्रायोजक आहे.

श्री.बालाजी मंदीर नारायण पेठ महिला मंडळाची गणपती विसर्जन मिरवणुकीत मोफत (मिनरल) जलसेवा आणि लिंबू सरबत वाटप सेवा

0

rsz_1logo-for-portal

पुणे:
गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान श्री.बालाजी मंदीर, नारायण पेठ महिला मंडळाच्या वतीने रविवार, दिनांक 27 सप्टेंबर 2015 रोजी विजय थिएटर, लक्ष्मी रोड, नारायण पेठ येथे दुपारी एक वाजता ‘नि:शुल्क मोफत जलसेवा आणि लिंबू सरबत वाटप सेवा’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे यंदाचे हे तिसरे वर्ष आहे, अशी माहिती मंडळाच्या अध्यक्षा शारदा भागीरथ राठी यांनी दिली.
या उपक्रमाचे उद्घाटन आमदार गिरीष बापट, महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी खा.अनिल शिरोळे, माजी आमदार विनायक निम्हण, मोहन जोशी, नगरसेवक हेमंत रासने, दिलीप काळोखे, मुक्ता टिळक, मंडळाचे सर्व पदाधिकारी, माहेश्‍वरी समाजातील प्रतिष्ठित व्यापारी आदी मान्यवर, महिलावर्ग व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
या उपक्रमातंर्गत गणेशभक्त, पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना मोफत शुद्ध फिल्टर मिनरल पाण्याचे वाटप तसेच मसाला लिंबू सरबताचे वाटप करण्यात येणार आहे. विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत हा उपक्रम सुरू राहणार आहे.
जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण यांनी घेतली आयुक्तांबरोबर बैठक -नदीसुरक्षा, स्वच्छता, कचरा प्रश्‍नावर आयुक्तांचा सकारात्मक प्रतिसाद

0
पुणे :
महापालिका प्रशासनाकडे प्रलंबित असलेल्या नदीसुरक्षा, स्वच्छता, कचरा प्रश्‍न आणि नागरी प्रश्‍नांबाबत आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा, खासदार, अ‍ॅड. वंदना चव्हाण यांनी आयुक्त कुणाल कुमार यांच्याबरोबर बैठक घेतली. विभागीय आयुक्त कार्यालयात ही बैठक झाली. या बैठकीला महापौर दत्तात्रय धनकवडे, सभागृह नेते बंडू केमसे, अधिकारी वर्ग उपस्थित होता.
प्रलंबित प्रश्‍नाबाबतचे पत्र खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण यांनी आयुक्तांना दिले. जानेवारी 2015 मध्ये प्रशासनाने स्वच्छतागृहांची स्वच्छता विषयक काम मे महिन्यांपर्यंत पूर्ण होईल, असे सांगितले होते. परंतु नदीपात्रात अतिक्रमण, राडारोडा टाकणे अजून थांबलेले नाही. त्यामुळे सुरक्षारक्षक नेमावेत. नदीस्वच्छतेसाठी प्रयत्न करावेत.
शहर कंटेनर मुक्त करताना प्रशासनाने कंटेनर हलविले आहेत. मात्र, पर्यायी व्यवस्था केली नाही. 21 प्रभागात शून्य कचरा प्रकल्प राबविताना उर्वरित सर्व प्रभागातील प्रश्‍नही सोडविणे महत्त्वाचे आहे.
सार्वजनिक भिंतीवर पोस्टर्स लावून शहर विद्रुप केले जात आहे. त्यांच्यावर कारवाईची मागणीही खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण यांनी केली.
बैठकी दरम्यान आयुक्तांनी शहरातील विविध समस्या सोडविण्याबाबत सोयी करण्यात येणार असल्याची माहिती दिली. यामध्ये स्वच्छता गृहांमध्ये 15 मशिन गाड्यांद्वारे यांत्रिक स्वच्छता करण्यात येणार आहे,  ही स्वच्छता दोन शिफ्ट्समध्ये केली जाईल. यासाठी एक स्वच्छता समिती तयार करण्यात येणार आहे. स्वच्छतागृहात लाईट व्यवस्था, महिला स्वच्छतागृहात महिलांसाठी विविध सोयीसुविधा करण्यात येणार असल्याचे सांगितले.
शहरातील मोठ्या प्रमाणातील कचरा समस्या यावर उपाय म्हणून प्रभाग अधिकार्‍यांमध्ये स्पर्धा घेण्यात यावी जेणेकरून कचरा साचण्यावर प्रबंध येतील ही खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण यांची मागणी आयुक्तांकडून मान्य करण्यात आली.
पर्यटन वाढण्यासाठी पालिकेने स्वतंत्र अधिकारी नियुक्त केला पाहिजे. मात्र, अनेक विभाग त्यावर स्वतंत्रपणे काम करीत आहेत. पर्यटन वृद्धी हा एकात्मिकपणे पुढे नेण्याचा उपक्रम आहे. त्यासाठी एक स्वतंत्र बैठक आयोजित करावी असे, खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण यांनी सुचविले आहे.

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची १२८वी जयंती

0

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची १२८वी जयंतीनिमित रयत शिक्षण संस्थेच्यावतीने स्वारगेटजवळील होल्गा चौकातील त्यांच्या पुतळ्यास महापौर दत्ता धनकवडे याच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले . यावेळी रयत शिक्षण संस्थेचे पश्चिम विभागाचे अध्यक्ष राम कांडगे , नगरसेवक चेतन तुपे , स्थानिक नगरसेवक अशोक हरणावळ , पुणे शहर राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर , पथारी श्रमिक संघटनेचे अध्यक्ष मनोहर परदेशी , विभागीय अधिकारी चंद्रकांत जाधव , डॉ. अरविंद बुरुंगले , सहाय्यक विभागीय अधिकारी अशोक जगदाळे , किसन रत्नपारखी , प्रा. संजय मोहिते , डॉ. मंजूताई बोबडे , प्रा. पुष्पाताई देशमुख , मुख्याध्यापक संजय देवडे , शामराव वंडकर , माजी निरीषक एम. पी. संकुंडे आदी मान्यवर व विद्यार्थी , शिक्षकशिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते .

   यावेळी महापौर दत्तात्रय धनकवडे  यांनी सांगितले कि , कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ज्ञानाची दरवाजे खुली करून दिली , त्यामुळे ज्ञानाच्या गंगेमध्ये सर्वांनी शिक्षण घेतल्यामुळे आज रयत शिक्षण संस्थेचे विद्यार्थी सर्व क्षेत्रात चमकत आहेत . त्यामुळे कर्मवीरांचे स्मरण करून त्यांच्याबद्दल कृतज्ञतेची भावना ठेवली पाहिजे . कर्मवीरांच्या पुतळ्यास विविध संस्था , संघटना व रयतच्या शाखा यांनी अभिवादन केले . 

  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुहास निंबाळकर यांनी केले .

पुणे शहर ‘राष्ट्रवादी काँग्रेस’च्या वतीने दुष्काळग्रस्तांना मदत दिलेल्या गणपती मंडळांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

0
पुणे :
पुणे शहर ‘राष्ट्रवादी काँग्रेस’च्या वतीने दुष्काळग्रस्तांना मदत दिलेल्या, तसेच गणेशोत्सवात पर्यावरणपूरक आणि नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करणार्‍या मंडळांचा प्रशस्तीपत्रके देऊन सत्कार करण्यात येणार आहे. खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण यांच्या हस्ते निवड झालेल्या मंडळांना प्रशस्तीपत्रके देण्यात येणार आहेत. हा कार्यक्रम दिनांक 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता पक्ष कार्यालय, गिरे बंगला, हिराबाग, टिळक  रोड येथे होणार आहे. यावेळी चहापानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रदेश सरचिटणीस अशोक राठी यांच्या मार्गदर्शनाखालील समिती या मंडळांचे सर्वेक्षण करणार आहे. या सर्वेक्षण समितीमध्ये   शंकर शिंदे, प्रशांत गांधी, अ‍ॅड.घनश्याम खलाटे, शिल्पा भोसले, डॉ. सुनीता मोरे यांचा समावेश आहे.
rsz_1logo-for-portal

महापौरांचा सत्कार

0

कानिफनाथ मित्रमंडळ , धनकवडी येथे  गणपतीची  आरती पुण्यनगरीचे लाडके महापौर दत्ता धनकवडे यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी मंडळाचे अध्यक्ष सागर भागवत व महाराष्ट्र टाईम्सचे पत्रकार  पांडुरंग मरगजे यांच्या हस्ते महापौरांचा शाल, श्रीफल व पुष्यगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला

स्मार्ट सिटी नागरी सहभागाकरिता विविध संघटना सहभागी

0

 

स्मार्ट सिटी अभियाना अंतर्गत पुणे नं. १ करण्यासाठी व शहरातील नागरिकांची मते लिखीत स्वरुपात मोठ्या प्रमाणावर संकलित करण्यासाठी शहरातील विविध संघटना, स्वयंसेवी संस्था, बांधकाम व्यावसायिक, रिक्षा संघटना, हमाल पंचायत, अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समिती, रिक्षा पंचायत, नेहरु युवा केंद्र, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ आर्किटेक्ट्स, क्रेडाई माहेर चितपावन संघ, स्वच्छ भारत, कागद काच पत्रा संघटना, पुणे शहर रिक्षा फेडरेशन, सावकाश रिक्षा संघ, नंदन बिल्डकॉन अशा विविध संघटना आपल्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह सहभागी होऊन पुणे नं. १ करण्यासाठी सहभागी होणार असल्याचे जाहीर केले.

पुणे महानगरपालिकेच्या वतीने शहरातील विविध संघटनांच्या बैठकीचे आयोजन पुणे महापालिकेतील महापालिका आयुक्त कार्यालय सभागृहात करण्यात आले होते.

याप्रसंगी मा. अनिल पवार (उपायुक्त) यांनी स्मार्ट सिटी अभियाना संदर्भात संगणकीय सादरीकरणाद्वारे माहिती दिली. शहराच्या विकासाच्या दृष्टीने असलेल्या समस्या याबाबत करावयाच्या उपाय योना, कोणते क्षेत्र आहेत, काय सुधारणा केल्या पाहिजेत त्यांचा प्राधान्यक्रम ठरविण्यासाठी नागरिकांच्या मतांनुसार प्रस्ताव करणे याकरिता वाहतुक आणि गतिशीलता, गृहनिर्माण उपाय, पाणीपुरवठा आणि मलनि:स्सारण, उर्जा, कचरा आणि स्वच्छता, सुरक्षितता आणि संरक्षण, अर्थव्यवस्था आणि रोजगार, ई-गव्हर्नन्स आणि डिजीटल, शिक्षण, आरोग्य काळजी आणि प्रसुतीविषयक, संस्कृती-मनोरंजन आणि पर्यटन, पर्यावरणीय लेखी फॉर्ममध्ये नमूद करुन संकलन करावयाचे आहे. याकरिता मनपाचे कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजना, महिला बचत गट, तनिष्का महिला गट अशा विविध स्तरावरुन नागरिकांशी संपर्क साधून सविस्तर माहिती संकलित करीत असल्याचे सांगितले. तसेर्च www.punesmartcity.in   यावरही संपर्क साधता येईल.

विविध कंपन्या, माहिती तंत्रज्ञान कंपन्या सहभागी झालेल्या असून याकामी बहुमुल्य मदत होत आहे. झेन्सार, फिक्की, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीज, प्रसारमाध्यमे, डिलीव्हरी चेंज फाऊंडेशन, मगरपट्टा सिटी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व महाविद्यालयातील विद्यार्थी अशा वैविध्यपूर्ण स्तरांवरुन नागरिक सहभाग वाढत असून उच्चांकाच्या दिशेने मार्गक्रमण करीत असल्याचे सांगितले. तसेच याकामी नागरवस्ती विभागा अंतर्गत असलेले सुमारे ५३०० शेजार समुह गट, ९५ समुह संघटिकांचे गट अशा मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याचे त्यांनी सांगितले. हडपसर मगरपट्टा सिटीतील सुमारे ३०००० रहिवासी व ५०००० कर्मचाèयांनी सहभागी होण्याकरिता मगरपट्टा सिटीचे अध्यक्ष मा. सतिश मगर यांनी आवाहन केले आहे.

बैठकीप्रसंगी उपस्थितांनी विचारणा केलेल्या शंका, प्रश्नांचे व कशा पध्दतीने ऑनलाईन- ऑफ लाईन काम करावयाचे आहे. याबाबत अध्यक्षस्थानी असलेले मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश बकोरिया, अतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट) राजेंद्र जगताप, उपायुक्त अनिल पवार यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

याप्रसंगी रिक्षा संघटनांचे वतीने संपूर्ण शहरात ४५००० रिक्षाचालक सहभागा होऊन प्रवाशांचे ही फॉर्म भरणार असल्याचे सांगण्यात आले.

१२ क्षेत्रांपैकी पर्यावरण विषयावर योगदान देणार असल्याचे क्रेडाईचे संजय देशपांडे यांनी सांगितले. तसेच पाणीपुरवठा व मल:निस्सारण क्षेत्राकरिता योगदान देण्याचे इंडियन इन्स्टिट्युट ऑफ आर्किटेक्ट्सच्या श्रीमती ज्योती पानसे यांनी सांगितले.

याप्रसंगी क्रेडाई संस्थेच्या वतीने संजय देशपांडे, आय. पी. इनामदार, तेजराज पाटील, डॉ. अभ्यंकर, अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समिती, हमाल पंचायत, रिक्षा पंचायतीच्या वतीने नितीन पवार, अ‍ेईएसए च्या वतीने संजय तासगांवकर, पुष्कर कानविंदे व अध्यक्ष दिवाकर निमकर, नेहरु युवा केंद्राचे वतीने भारत गांधी, विनीत मलापुरे, माहेर चितपावन संघाचे वतीने अ‍ॅड. बळवंत रानडे, स्वच्छ भारत संस्थेच्या वतीने लायन अनिल मंद्रुपकर, कागद काच पत्रा संघटनेचे हर्षद बर्डे, रिक्षा संघटनांचे बाबा शिंदे पुणे शहर रिक्षा फेडरेशनचे सुर्यकांत जगताप, सावकाश रिक्षा संघाचे प्रदीप भालेराव, रिक्षा पंचायतीचे रावसाहेब कदम, नंदन बिल्डकॉनचे शामकांत कोटकर व अन्य पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रास्ताविक स्वागत पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे यांनी केले तर आभार प्रदर्शन अतिरिक्त महापालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी केले.

rsz_1logo-for-portal