Home Blog Page 3538

महावितरणला देशपातळीवरील ग्रीन ग्रीड व बेस्ट स्टेट पॉवर युटीलिटी अ‍ॅवार्ड

0

दिल्ली येथे नुकत्याच आयोजित नवव्या भारतीय ऊर्जा परिषदेत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीला पहिला क्रमांकाचा ग्रीन ग्रीड अ‍ॅवार्ड तर द्वितीय क्रमांकाचा बेस्ट स्टेट पॉवर युटीलिटी अ‍ॅवार्डने नुकतेच गौरविण्यात आले आहे.

केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या सहकार्याने आणि इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या वतीने आयोजित परिषदेत केंद्गीय विद्युत प्राधिकारणाचे अध्यक्ष श्री. मेजर सिंग, माजी अध्यक्ष     श्री. एच.एल. बजाज, ऊर्जा मंत्रालयाचे माजी सचिव श्री. अनिल राजदान व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत महावितरणचे संचालक (संचालन) श्री. अभिजीत देशपांडे, वीज खरेदी विभागाच्या मुख्य अभियंत्या श्रीमती रंजना पगारे, कार्यकारी अभियंते श्री. जितेंद्ग फुले व श्री. मकरंद कुलकर्णी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

महावितरणने विजेच्या मागणीचे व्यवस्थापन करण्यात लक्षणीय यश मिळविले आहे.  सिंगल फेजिंग आणि गावठाण फिडर सेप्रेशन यामुळे सुमारेᅠ 5000 मेगावॅट विजेच्या मागणीचे व्यवस्थापन करणे शक्य झाले आहे.  तसेच ऊर्जा बचतीसाठी एल.ई.डी बल्बच्या वाटपासह विविध अभिनव उपक्रम महावितरणने यशस्वीपणे राबविले त्यामुळे महावितरणला ग्रीन ग्रीड अ‍ॅवार्डच्या प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले.

महावितरणच्यावतीने ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत.  त्यात ग्राहकांसाठी सुविधा केंद्गे, तक्रार निवारणासाठी 247 ऑनलाईन सुविधा, ग्राहकाभिमुख विविध अत्याधुनिक सेवा, वीज बिल भरण्यासाठी मोबाईल अ‍ॅपसह वेगवेगळे उपयुक्त पर्याय उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. याशिवाय पायाभूत आराखडा अंतर्गत मोठया प्रमाणात विज वितरण प्रणालीची कामे झाली असल्यामुळे ग्राहक सेवेचा दर्जा उंचावला आहे.  या सर्व बाबींची दखल घेत महावितरणला द्वितीय क्रमांकाचा बेस्ट स्टेट पॉवर युटीलिटी अ‍ॅवार्ड प्रदान करण्यात आला.

राज्य शासनाच्या भरीव सहकार्यामुळे भविष्यात ग्राहकांना आणखी वाजवी दरात वीज, कृषिपंपांना मोठया प्रमाणात वीजजोडणी  व पायाभूत आराखडयाद्वारे वीज व्यवस्थेत आमूलाग्र सुधारणा करण्याचा प्रयत्न महावितरणद्वारे केला जात आहे, अशी प्रतिक्रिया संचालक (संचालन) श्री. अभिजीत देशपांडे यांनी या परिषदेत व्यक्त केली.

संस्कार आयुर्वेदचा मधुमेह मुक्त भारत अभियानाला प्रारंभ

0

( बाल मधुमेय दत्तक  योजनेला सुरवात  )

index1 index2

पुणे :  संस्कार ग्रुप आणि संस्कार आयुर्वेद याच्या संयुक्त विद्यमानाने  नुकतीच  ‘बाल मधुमेही’ दत्तक योजनेची सुरवात  करण्यात आली.  या प्रसंगी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात झाली. या वेळी  संस्कार उद्योगसमूहाचे अध्यक्ष मा. वैकुठ कुंभार, संस्कार आयुर्वेदचे मा. डॉ. रविंद्र नांदेडकर, मा. खासदार गजानन बाबर उपस्थित होते.  १ ते १८ या वयोगटातील बाल मधुमेही ( जुवेनाइल डायबेटिक ) या रुग्णांची  तसेच प्रौढ मधुमेही रुग्णांची  मोफत रक्तातील शर्करेची  तपासणी करून औषध उपचार करण्यात आले.  या वेळी मधुमेही रुग्णांबरोबरच नागरिक देखिल मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळ संस्कार उद्योगसमूहाचे वैकुठ कुंभार यांनी संस्थेच्या सामजिक उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती दिली आणि डॉ. नांदेडकर यांनी मधुमेहाच्या औषधा संदर्भात  अथक संशोधन करून नागरिकांना मधुमेहाच्या संदर्भात सविस्तर माहिती दिली. या वेळी मधुमेह मुक्त भारत अभियानाच्या योजनेला प्रारंभ झाला. या वेळी डॉ. नांदेडकर म्हणाले; आम्ही बालमधूमेहांसाठी विनामुल्य मोहीम हाती घेतली आहे. आम्हाला भारतातील बालमधूमेहांच्या रुग्णांच्या पालकांनी  संस्थेशी संपर्क साधल्यास त्यांची मोफत तपासणी व  औषध उपचार करू. आमच्या  संस्थेचे प्रतिनिधी दर सहा महिन्यांनी संबंधित बालमधुमेही यांच्या घरी जावून त्यांच्याशी संपर्क साधणार आहेत

या वेळी डायबेटिक जीवनावरचं शुगर फ्री नाटक  ‘साखर खाल्लेला माणूस ’ सादर करण्यात आले. तसेच  आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मधुमेह संशोधक व राष्ट्रीय पुरस्कार विजेते डॉ. रविंद्र नांदेडकर यांनी मधुमेह संबंधीचे  बहुमुल्य मार्गदर्शन उपस्थित असणाऱ्या नागरिकांना केले. भारत हि जागतिक मधुमेह रुग्णांची राजधानी होत असताना यावर  संस्थेने विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

धनगरवाडा – समाजासमोर कधीही न आलेलं दाहक वास्तव

0

देशाला स्वातंत्र्य मिळून आज 68 वर्षांचा काळ लोटला. विज्ञान-तंत्रज्ञानाने आकाश गाठले. पण जाती-पातीचे राजकारण, रुढी-परंपरांना चिटकलेला, जातपंचायतीसारख्या समांतर न्यायव्यवस्थेला बळी पडलेला धनगर समाज आजही उपेक्षित, दुर्लक्षित आणि सोशिक राहिला आहे. एकेकाळी धनगर समाजात जन्मलेल्या महापुरुषांनी आपल्या कर्तृत्वाने महाराष्ट्र गाजवला. पण, होळकर घराण्यातील शुरवीरांचे रक्त वाहत असलेल्या ह्या धनगर समाजाला आज ग्लानी आली आहे. एकूण बावीस पोटजातीत विभागलेला निमभटका धनगर समाज आपल्या शेऴ्यामेंढ्यांसह डोंगरकपाऱ्यांत वास्तव्य करून आहे. परंतु आजही प्रशासन आणि तथाकथित उच्चवर्णीय तसंच सावकारांकडून होणारे अमानवी अत्याचार मेंढरांप्रमाणे मुकाट सहन करीत आहे. अशा अन्यायाला वाचा फोडणारा राम-लक्ष्मण प्रॉडक्शन निर्मित ‘धनगरवाडा’ हा सिनेमा येत्या 27 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.

index1index2

कथालेखक विजयकुमार दळवी यांच्या ‘धनगरवाडा’ या गाजलेल्या कादंबरीवर आधारीत ह्या सिनेमात ज्येष्ठ अभिनेते स्व. सदाशिव अमरापूरकर यांनी ‘झिमू’ या जातपंचायतीच्या प्रमुखाची भूमिका साकारली आहे. धनगरवाडा हा त्यांचा अभिनय केलेला शेवटचा सिनेमा. प्रकृती साथ देत नसतानाही त्यांनी कठीण परिस्थितीत चित्रीकरण पूर्ण केले. सिनेमाची गोष्ट महाराष्ट्रातील डंगे धनगर समाजाची आहे.

सदाशिव अमरापुरकर यांच्यासोबत वरद विजय चव्हाण, पल्लवी पाटील, मिलिंद गवळी, गणेश यादव, माधव अभ्यंकर, सहासिनी देशपांडे, पूजा पवार, जयवंत वाडकर आणि गणेश आगलावे यांच्या प्रमुख भूमिका आहे. यंदाच्या राज्य चित्रपट पुरस्कारात ह्या सिनेमाचे संगीत दिग्दर्शक परिक्षीत भातखंडे यांना सर्वोत्कृष्ट संगीतकार आणि अभिनेत्री पल्लवी पाटील यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- प्रथम पदार्पण आदी पुरस्काराने गौरविण्यात आले. गीतकार बाबा चव्हाण यांची मधूर गीतरचना आणि पटकथा-संवाद अनिल सपकाळ यांनी लिहीले आहेत.

अडीचशेहून अधिक चित्रपटांचं छायांकन केलेले ख्यातनाम सिनेमॅटोग्राफर समीर आठल्ये यांनी धनगरवाडाच्या निमित्ताने दिग्दर्शन क्षेत्रात पहिलं पाऊल टाकले आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील चंदगड तालुक्यातील उंच डोंगरमाथ्यावर घनदाट जंगलात वसलेल्या एका धनगरपाड्यावर या चित्रपटाचं शुटींग पूर्ण झाले. त्यामुळे चित्रपटाला लाभलेला एक वेगळाच नैसर्गिक ताजेपणा डोळ्यांना नक्कीच सुखावेल, असं समीर आठल्ये यांनी सांगितले.

अलका कुबल-आठल्ये – शिल्पा मसुरकर प्रस्तुत आणि विजयकुमार दळवी – प्रकाश मसुरकर निर्मित धनगरवाडा हा सिनेमा २७ नोव्हेंबर पासून महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे. पुढे वर्षभर महाराष्ट्रात आणि सीमाभागातील धनगर समाजाच्या जवळपास सव्वाशे जत्रांमध्ये दाखवला जाणार आहे.

अडीचशे कोटी झाले, अजून २५० कोटी यायचेत … सुरज बडजात्या … हॉलीवूड मध्ये रस नाही … सलमान

0

2 3 4 5 6 7

मुंबई -प्रेम रतन धन पायो या चित्रपटाला रसिकांनी प्रचंड प्रतिसाद दिल्यानंतर  काल  सलमान खान आणि सुरज बडजात्या तसेच सोनं कपूर यांनी सबर्बन स्टुडीओमध्ये पत्रकार परिषद घेतली आणि रसिकांचे आभार मानले .

यावेळी सुरज बडजात्या यांनी सांगितले आतापर्यंत या चित्रपटाचे कलेक्शन २५० कोटी झाले असून अजून २५० कोटी येणे अपेक्षित आहे . आपण अद्यापही नाराज असल्याच्या सलमानच्या सुरात सूर यावेळी त्यांनी मिसळला .

तर सलमान म्हणाला , हॉलीवूड मध्ये काम करण्याची उत्सुकता मला नाही . हिंदी फिल्म याच हॉलीवूडच्या पुढे गेल्या पाहिजेत असे म,आला वाटते . आपण केवळ नाव . इज्जत कमाविण्यासाठी काम करतो . इज्जत कमवायला खूप वर्षे लागतात असेही तो म्हणाला .

ओम साई सेवा संस्थेच्यावतीने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

0

भवानी पेठमधील टिंबर मार्केटजवळ ओम साई सेवा संस्थेच्यावतीने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . यानिमित मंदिरात ओम साई सेवा संस्थेचे अध्यक्ष भीमराव रणदिवे यांच्याहस्ते महापूजा करण्यात आली . यावेळी आरती करण्यात आली . त्यानंतर महाप्रसादाचा लाभ घेण्यात आला . यावेळी मधुकर चांदणे , रवि देवकुळे , राजू शेडंगे , परशुराम जाधव , अजय भिसे , किशोर मोरे , अतिश चव्हाण , रितेश मोहिते , रोहित रणदिवे , धनंजय अवघडे , शशिकांत जाधव , बाबा कदम , संतोष पाटोळे , सुरज कांबळे आदी साई भक्तांनी विशेष परिश्रम घेतले . सायंकाळी दिपोत्सवचे आयोजन करण्यात आले होते .

 या धार्मिक कार्यक्रमासाठी तुलसी पटेल , कैलास पटेल , तुषार ओसवाल , गिरीष पटेल , रतन किराड , शंकर पटेल यांनी विशेष सहकार्य केले .

कार्तिकी एकादशी निमित्ताने ‘भजन रंग’ कार्यक्रमाचे आयोजन

0

पंडित शौनक अभिषेक राजेश दातार  (1)

( सुप्रसिद्ध गायक राजेश दातार, पं. शौनक अभिषेकी, पं. श्रीनिवास जोशी यांचे गायन )

                             श्री संत दर्शन मंडळ आयोजित व  सर्वोत्कर्ष  पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने कार्तिकी एकादशीचे औचित्य साधून येत्या २१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५:३० वा आण्णाभाऊ साठे सभागृह, पद्मावती  येथे ‘भजन रंग ’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा भक्तिगीतांचा हा कार्यक्रम विनामुल्य असणार आहे.  

                             सुप्रसिद्ध गायक राजेश दातार, पं. शौनक अभिषेकी, पं. श्रीनिवास जोशी अशा दिग्गज गायकांचे गीते रसिक प्रेक्षकांना ऐकण्याची संधी लाभणार आहे. भक्तिमय गीते यात गायली जाणार असून समस्त पुणेकरांनी या कार्यक्रमला आवर्जून हजेरी लावावी असे आवाहन सर्वोत्कर्ष पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष राजेश दातार यांनी केले आहे.

‘बाजीराव मस्तानी’ चे पहा हे गाणे …

0

Watch as Kashibai welcomes the warrior empress Mastani in a spectacular night of dance and celebration. Enjoy the new song from Bajirao Mastani ‘Pinga’ featuring Deepika Padukone and Priyanka Chopra

१०० वा माहिती अधिकार कट्टा संपन्न …

0

पुणे-१०० वा माहिती अधिकार कट्टा काल मॉडेल कॉलनीतील चित्तरंजन वाटीका येथे पार पडला.दोन वर्षांपूर्वी म्हणजे ४ जानेवारी २०१३ रोजी माहिती अधिकार कट्टा सुरू करण्यात आला होता. माहिती अधिकाराच्या अधिकाधिक प्रचार प्रसारासाठी आणि सामान्य माणसाला या कायद्याचा  वापर करताना आवश्यक ते मार्गदर्शन व माहिती सहजपणे मिळावी, कोणावरही अवलंबून न रहाता परस्पर सहका-याने माहिती अधिकाराचा व्यापक  प्रचार – प्रसार व्हावा तसेच प्रत्येक सामान्य माणूस माहिती अधिकाराच्या बाबतीत सबल – आत्मनिर्भर व्हावा हा या कट्ट्यामागचा उद्देश होता. या ठिकाणी कोणीही येउन आपली माहिती अधिकार विषयक अडचणी मांडू शकतो आणि त्यावर उपस्थितांपैकी कोणीही आपले मत मत व्यक्त करू शकतो किंवा उत्तर देऊ शकतो.

मागील १०० आठवडे एकही सुट्टी न घेता कट्टा दर रविवारी अव्याहतपणे सुरू आहे.यावेळी उपस्थितांनी माहिती अधिकारासंदर्भातील आपले प्रश्न व अडचणी मांडुन त्यावर चर्चा केली  आजपर्यंत समाजाच्या सर्व स्तरातील लोकांनी तसेच आज माजी अधिका-यांनी कट्ट्यावर उपस्थिती लावली आहे.इथे कुणीही मार्गदर्शकाच्या भूमिकेत नसल्याने सर्वजण एकाच पातळीवर चर्चा करतात. त्यामुळे प्रश्न कितीही गंभीर असला तरी चर्चा मात्र खेळी मेळीच्या वातावरणात होते .

कट्याच्या माध्यमातून अनेकांचे प्रश्न मार्गी लागले असले, अनेकांचा  माहिती मिळवण्याचा मार्ग सुकर झाला असला तरी सर्वात महत्वाचे म्हणजे कट्ट्यामूळे शासकीय कामकाजाबद्दल किंवा अधिकारी कर्मचा-यांबाबत वाटणारी भिती नाहीशी झाली आणि एक प्रकारचे धैर्य निर्माण झाले अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.आगामी काळातही हा कट्टा असाच सुरू रहाणार आहे.

‘संवाद, पुणे’ ची मंत्रमुग्ध दिवाळी पहाट संपन्न

0

पुणे-‘संवाद, पुणे’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘दिवाळी पहाट’ कार्यक‘मात आशालता वाफगावकर, फैय्याज आणि नयना आपटे या अभिनयाचा सुवर्ण महोत्सव साजरा करणार्‍या महाराष्ट्राच्या सुवर्णकन्यांनी गेल्या पन्नास वर्षांतील सिने-नाट्य सृष्टीचा प्रवास प्रेक्षकांसमोर सादर केला. या अभिनेत्रींनी सादर केलेले अनुभव, प्रवेश आणि विविध गीतांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
आशालता वाफगावकर यांनी ‘मत्स्यगंधा’ नाटकातील गीत, पु. ल. देशपांडेंच्या ‘वार्‍यावरची वरात’मधील कवडेमामी आणि अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, शत्रुघ्न सिन्हा या अभिनेत्यांबरोबरचे अनुभव सादर केले.
पार्श्‍वगायीका फैय्याज यांनी ‘तो मी नव्हेच’ मधील चंनम्मा ही व्यक्तिरेषा आणि ‘ईच्छा माझी पुरी करा’मधील लावणी सादर केली. दादा कोंडके, आशा भोसले यांचे आठवणीतील किस्से सांगितले.
नयना आपटे यांनी ‘संगीत सौभद्र’ आणि ‘एकच प्याला’मधील पदे आणि प्रवेश सादर केले. त्यांनी सादर केलेल्या विनोदी प्रवेशांनी प्रेक्षकांचे मनोरंजन झाले. सुधीर गाडगीळ यांनी या तिघींना बोलते केले. ‘संवाद’चे अध्यक्ष सुनील महाजन यांच्या संकल्पनेतून कार्यक‘म आयोजित करण्यात आला होता.
८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते या अभिनेत्रींचा विशेष गौरव करण्यात आला. साहित्यिका डॉ. माधवी वैद्य, उल्हासदादा पवार, भारत देसडला यांची प्रमुख उपस्थिती होती. निकिता मोघे यांनी आभार प्रदर्शन केले. केतकी महाजन यांनी संयोजन केले. ‘संवाद’च्या वतीने गेली २२ वर्षे या कार्यक‘माचे आयोजन करण्यात येते.

कृषिसंजीवनी योजनेस मार्च 2016 पर्यंत मुदतवाढ

0

पुणे, : महावितरणकडून राबविण्यात येणाऱ्या कृषिसंजीवनी योजनेस येत्या 31 मार्च 2016 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्याचे उर्जामंत्री ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच याबाबत घोषणा केली आहे.

कृषिसंजीवनी योजनेअंतर्गत कृषीपंपधारक शेतकऱ्यांकडे दि. 31 मार्च 2014 अखेर असलेल्या मूळ थकबाकीची 50 टक्के रक्कम एकरकमी किंवा तीन मासिक हप्त्यांमध्ये भरल्यास मूळ थकबाकीची उर्वरित 50 टक्के रक्कम माफ होणार आहे. ही रक्कम राज्य शासनाकडून महावितरणला अनुदान स्वरुपात देण्यात येणार आहे. तसेच दि. 31 मार्च 2014 ला शेतकऱ्यांकडे असलेल्या मूळ थकबाकीच्या रकमेवरील व्याज व दंड महावितरणकडून माफ करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना जून 2014 नंतर आलेली चालू वीजबिले भरणे आवश्यक आहे.

कृषिसंजीवनी योजनेच्या धर्तीवरच राज्यात पाणीपुरवठा संजीवनी योजना 2015 सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे उर्जामंत्री श्री. बावनकुळे यांनी दिली.  पाणीपुरवठा योजनांच्या जून 2015 अखेर असलेल्या वीजबिलांच्या मूळ थकबाकीपैकी 50 टक्के रक्कम एकरकमी किंवा दहा समान हप्त्यांत भरावयाची आहे. या मूळ थकबाकीची उर्वरित 50 टक्के रक्कम आणि व्याज व दंडाची 50 टक्के रक्कम महावितरणला राज्य शासनाकडून अनुदान स्वरुपात देण्यात येईल. तर महावितरणकडून 50 टक्के व्याज व दंडाची रक्कम माफ करण्यात येणार आहे. पाणीपुरवठा योजनांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी जुलै 2015 पासूनची चालू वीजबिले भरणे आवश्यक आहेत.

डेबिट कार्ड धोखाधड़ी: सचेत रहें.. डेबिट कार्ड धोखाधड़ी का पता कैसे लगाएं?सुरक्षा के कुछ आसान तरीके…

0

डेबिट कार्ड धोखाधड़ी: सचेत रहें

डेबिट कार्ड धोखाधड़ी तब होती है जब साइबर अपराधी, अनधिकृत लेन-देन के लिए इसके शिकार होनेवाले व्यक्ति के कार्ड नंबर और पिन पर गैरकानूनी ढंग से कब्जा कर लेता है। पीड़ित की जानकारी हासिल करने के ढेर सारे तरीके हैं, रीटेलर के असुरक्षित कंप्यूटर से गैरकानूनी ढंग से डेटा हासिल करने में धोखेबाज कर्मचारी से लेकर हैकर तक लगे हुए हैं। कपटपूर्ण लेनदेन के बाद एक बार जब खाते से धन की निकासी हो जाती है, तो यह की हुई गड़बड़ी मिटाने के लिए शिकार व्यक्ति को अनपेक्षित औपचारिकताओं के माध्यम से परख सकता है और धन पुनः खाते में जमा कर सकता है।

डेबिट कार्ड धोखाधड़ी का पता कैसे लगाएं?

डेबिट कार्ड धोखाधड़ी का पता लगाने के लिए किसी विशेष दक्षता की कोई आवश्यकता नहीं। समस्याओं को जल्दी खोजने का सबसे आसान तरीका ऑनलाइन बैंकिंग के लिए साइन अप करना है। इसमें उपयोगकर्ता खाते के शेष और रोजाना हुए लेनदेनों की जांच कर सकता है। अगर इसमें कोई अस्वाभाविक लेनदेन हुआ है, तो पीड़ित व्यक्ति को तुरंत बैंक को कॉल करना चाहिए। डेबिट कार्ड लेनदेनों की रसीद का एक रिकार्ड रखना हमेशा एक सुरक्षित तरीका है, जिससे उन्हें बाद में ऑनलाइन लेनदेनों के साथ मिलाकर देखा जा सके।

वैकल्पिक रूप से, उपयोगकर्ता फोन बैंकिंग के जरिए सभी लेनदेनों पर नजर रख सकते हैं। कम से कम, बैंक के मासिक विवरण की बारीकी से ब्योरेवार समीक्षा की जानी चाहिए और खाते की शेष राशि की जांच नियमित रूप से होनी चाहिए।

सुरक्षा के कुछ आसान तरीके

यह तो शायद संभव नहीं होगा कि हैकरों और अन्य चोरों पर कोई काबू पाया जा सके, लेकिन ऐसे कई तरीके हैं जिनसे स्वयं को शिकार बनने से बचा जा सकता है।

बैंकिंग एलर्ट लें: वर्तमान परिस्थितियों में बैंकिंग एलर्ट के लिए साइन अप करना बहुत महत्वपूर्ण है। अगर खाते में कोई ऐसी संदेहास्पद गतिविधि होती है, जैसे निर्दिष्ट राशि से ज्यादा राशि निकालना या पते में कोई परिवर्तन करना तो बैंक पीड़ित व्यक्ति से ईमेल या टेक्स्ट संदेश द्वारा संपर्क कर सकता है।

कागज-रहित (पेपरलेस) लेन-देन करें: कागजरहित बैंक विवरण के लिए साइनिंग अप करने से आपके मेलबॉक्स से संवेदनशील बैंक खाते संबंधी जानकारियों के चोरी होने की संभावनाएं पूरी तरह समाप्त हो सकती हैं। अगर आप अपने कूड़ेदान में मौजूद बैंक विवरणों तथा डेबिट कार्ड की रसीदों को तेज धार वाली कतरनी से काट कर छोटे-छोटे टुकड़े कर देते हैं तो इससे आपके बैंक खाते की सूचनाएं चोरी होने की संभावनाएं बहुत कम हो जाती हैं।

डेबिट कार्ड से खरीदारी के दौरान सतर्कता: डेबिट कार्ड के माध्यम से किसी भी खरीदारी के दौरान प्रत्येक उपयोगकर्ता के लिए आवश्यक सतर्कता बरतना बेहद जरूरी है।

बैंक के एटीएम का इस्तेमाल ज्यादा करें: सुविधात्मक दुकानों, रेस्टोरेंटों और अन्य स्थानों पर अवस्थित एटीएम मशीनों की बजाय बैंक के एटीएम में सुरक्षा की बेहतर व्यवस्था (वीडियो कैमरा) की संभावना रहती है। इसके अलावा, बैंक की कार्यावधि के बाद बैंक के एटीएम के इस्तेमाल से सतर्कतापूर्वक परहेज करना चाहिए।

पुराने डेबिट कार्ड नष्ट कर दें: धोखाधड़ी से बचने का यह भी एक बुद्धिमान तरीका है। यद्यपि, बहुत से बैंक अब ‘चिप तथा पिन’ कार्ड मुहैया कराते हैं। जब भी उपयोगकर्ता एक नया कार्ड प्राप्त करता है और अपना पहला लेनदेन करता है, तो बैंक यह सुनिश्चित कर देते हैं कि पुराने डेबिट कार्ड की वैधता स्वतः निरस्त हो जाए और उपयोगकर्ता किसी भी बैंकिंग धोखाधड़ी से सुरक्षित रहे।

अपनी सभी धनराशि एक ही स्थान पर न रखें: हालांकि यह जाहिरा तौर पर एक बुद्धिमत्तापूर्ण काम तो नहीं लगेगा, लेकिन उपयोगकर्ता की वित्तीय आवश्यकताओं के लिहाज से यह एक बेहतर तरीका है। अगर उपयोगकर्ता का खाता किसी तरीके से गड़बड़ी का शिकार हो गया हो तो, वह इसके माध्यम से कम से कम उस समय तक तो अपनी वित्तीय जरूरतों को पूरा कर सकता है, जबतक समस्या का समाधान नहीं हो जाता है। आपातकालीन बचत खाते को अन्य खातों से लिंक करना भी एक बेहतर तरीका है।

अपना पिन नियमित रूप से बदलते रहें: साइबर अपराधी अब बहुत होशियार हो गए हैं। इसके लिए एटीएम पिन को हर माह बदलने की आदत एक सरल और विश्वसनीय तरीका है। ज्यादातर बैंकों में इसका प्रावधान है, जिससे उपयोगकर्ताओं को किसी तरह की परेशानी न हो।

अपने फोन में अपना पिन न रखें: कभी-कभी भुलक्कड़ किस्म के लोग अपना पिन अपने मोबाइल में सेव कर लेते हैं जो किसी भी तरह सुरक्षित नहीं है। चोर आपके फोन में सुरक्षित की हुई जानकारियों तक पहुंचने के लिए आपके फोन में सेंध लगा सकते हैं। अगर वे इस प्रकार की संवेदनशील सूचनाएं जानने में सफल हो गए, तो पहचान की चोरी की संभावना बढ़ जाती है।

फिशिंग धोखाधड़ी से सावधान रहें: ई-मेल चेक करते हुए, उपयोगकर्ता को हमेशा ई-मेल के स्रोत/ प्रेषक की जांच करनी चाहिए। संदेहास्पद/ अनजान स्रोतों से आनेवाले ई-मेल तुरंत नष्ट कर दिए जाने चाहिए।

अपने कंप्यूटर को सुरक्षित करें: ई-स्कैन जैसे अनुशंसित एंटी-वायरस तथा एंटी-स्पाईवेयर सॉफ्टवेयर के उपयोग से कंप्यूटर, लैपटॉप तथा अन्य उपकरणों को मेलवेयर के हमले से सुरक्षित किया जा सकता है। इसे नियमित रूप से अद्यतन करते रहने से किसी भी तरह की गड़बड़ी होने की संभावना को समाप्त किया जा सकता है।

सुरक्षित नेटवर्क का इस्तेमाल करें: जब ऑनलाइन वित्तीय लेनदेन करना हो, तो उपयोगकर्ता को सतर्क रहना चाहिए कि यह किसी सार्वजनिक स्थान या किसी असुरक्षित नेटवर्क के जरिए न किया जाए। जिससे उपयोगकर्ता परिचित हो, ऐसे सुरक्षित नेटवर्क के इस्तेमाल से किसी भी तरह की धोखाधड़ी की संभावना से बचा जा सकता है।

अगर यह आपके साथ घटित हो तो क्या करना चाहिए?

अगर किसी के डेबिट कार्ड की सूचनाएं चोरी हो जाएं, तो चोर द्वारा होनेवाली हानि को कम से कम करने के लिए, बैंक से तुरंत संपर्क किया जाना चाहिए। इसके बाद की कार्रवाई के तौर पर एक विस्तृत पत्र लिखा जाना चाहिए, जिसमें बैंक के उस कर्मचारी का पूरा विवरण दिया गया हो जिसके साथ जालसाजी वाले लेनदेन पर चर्चा की गई थी। बैंक से ऐसे किसी भी एनएसएफ शुल्क को माफ करने का अनुरोध भी किया जाना चाहिए, जो किसी धोखाधड़ी तथा निकासी की गई राशि को खाते में वापस लाने के लिए आरोपित किया जा सकता है।

अगर बैंक का रुख सहयोगात्मक नहीं है, तो उपयोगकर्ता किसी वैध उपभोक्ता हिमायती समूह की मदद ले सकते हैं, यद्यपि यह संबंधित बैंक के प्रकार पर निर्भर करता है। उन्हें धोखाधड़ी के बारे में सूचना और जानकारी दी जानी चाहिए, जिससे आवश्यक कदम उठाए जा सकें। भुगतानों के पुनर्निर्धारण से पीड़ित को थोड़ी राहत मिल सकती है। ऊपर वर्णित सभी एहतियाती उपायों से खाते की सुरक्षा होगी और किसी डेबिट कार्ड धोखाधड़ी का शिकार बनने की संभावनाएं कम से कम होंगी।

 

Mr. Govind Rammurthy, MD & CEO, eScan

sujata.bk@changeagents.in

चतुःशृंगी मंदीरात दीपोत्सव

0

पुणे ः राष्ट्रीय कला अकादमी आणि चतुःशृंगी देवस्थान ट्रस्टच्या वतीने दीपावलीनिमित्त चतुःशृृंगी मंदिर परिसरात रांगोळी रेखांकन आणि दीपोत्सव करण्यात आला. हजारो पणत्यांनी मंदिराचा परिसर उजळून गेला होता. छत्रपती शिवाजी महाराज शिवलिंगाचे दर्शन घेत असल्याची त्रिमिती रांगोळी आणि जय मल्हार या रांगोळ्या भाविकांचे आकर्षण ठरले. आमदार माधुरी मिसाळ यांच्या हस्ते दीपोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. कला अकादमीचे अध्यक्ष मंदार रांजेकर, अमोल मारणे, सुभाष धडफळे, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष अनगळ, कार्यकारी विश्‍वस्त नंदकुमार अनगळ यांनी संयोजन केले. डॉ. नितीन उनकुले, मकरंद टि‘ू यांची प्रमुख उपस्थिती होती. दीपोत्सवाचे हे १४ वे वर्ष आहे.

‘सुरोत्सावा’ची नजाकतदार जुगलबंदी संतोष पोतदार इवेन्ट्सचा एक अद्वितीय कलाविष्कार

0

भारतीय परंपरेतील दिवाळी या अतिशय मंगलमयी, पवित्र आणि आनंदाची भरभराट करणारा सण. दिवाळी पहाटेचे औचित्य साधून संतोष पोतदार इवेन्ट्स यांनी ‘सुरोत्सव’ कार्यक्रमाचे आयोजन यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये सकाळी साडेपाच वाजता केले होते. संतोष पोतदार इवेन्ट्स या संस्थेचे यंदाचे १५ वे वर्ष असून.पं.विश्वमोहन भट, पं. संजीव शंकर – पं. अश्विनी शंकर,  आणि पं. डॉ. अरविंदकुमार आझाद  अश्या चार दिग्गज कलाकारांचा समावेश होता.

मैफिलीच्या सुरुवातीला पं. संजीव शंकर – पं. अश्विनी शंकर यांनी शहनाई या अतिशय मंगलमयी वाद्यावर ‘ललत’ राग वाजविला. त्यामध्ये आलाप, जोड, नंतर विलंबित एकतालातील ख्याल आणि त्याला जोडून  द्रुत तीन तालातील गत सादर केली. गंभीर  रागातील संथ आलापी, लयकारी, ‘झाल्या’चे प्रकार,जलद तान अशी काही  वैशिष्ठ्ये पं. संजीव शंकर – पं. अश्विनी शंकर यांच्या शहनाई बद्दल सांगता येतील.त्यानंतर पं. विश्वमोहन भट यांनी मोहनवीणा या वाद्यावर ‘नटभैरव’ हा राग छेडला. ‘नटभैरव’ हा राग ‘भगवान शिव’ यांनी  निर्माण केलेला राग असून आलापिंमधून शिव-तांडव ची अनुभूती पं.विश्वमोहन भट यांनी रसिक श्रोत्यांना दिली.’मोहनविणा’ हे वाद्य स्वत: पंडितजींनी निर्माण केले असून अतिशय मधुर नाद निर्माण होणारे वाद्य आहे.’नटभैरव’ या रागामध्ये  संथ आलापी, जोड, झाला, मध्यलय तीन ताल आणि द्रुत तीन तालातील रचना सादर केल्या.

उत्तरार्धाची सुरुवात ‘शहनाई’ आणि ‘मोहनविणेच्या’ ‘जुगलबंदीने झाली.’वैष्णवजन तेने कहिये’ या अतिशय प्रसिद्ध अश्या भजनाने सुरुवात करून असंख्य  स्वरसंगतींनी त्यांना नटविले गेले.त्यानंतर ‘भैरवी’ रागातील पं. भीमसेन जोशी यांनी अजरामर करून ठेवलेले ‘जो भजे हरी को सदा’ या भजनाची धून त्यांनी वेगळ्या पद्धतीने सादर केली. तबल्यावर बनारस घराण्याचे  सुप्रसिद्ध  तबलावादक पं. अरविंदकुमार आझाद साथीला असल्यामुळे अलौकिक स्वर-तालाची अनोखी संगत रसिकांना अनुभवता आली.  शिरीष कुलकर्णी यांनी निवेदन केले . मैफिलीची सांगता

‘ वन्दे मातरम’ आणि ‘अतिशय मोहक रीतीने नटविलेल्या राष्ट्रगीताने करण्यात आली.

इफ्फी २०१५ आणि युनेस्कोच्या फेलिनी प्राईझच्या स्पर्धेत ‘कट्यार काळजात घुसली’

0

गोव्यात दरवर्षी रंगणा-या मानाच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील इंडियन पॅनोरमा विभागात ‘कट्यार काळजात घुसली’ची निवड झाल्यानंतर या चित्रपटाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेलाय. इफ्फी २०१५ आणि इंटरनॅशनल कॉन्सिल फॉर फिल्म, टेलिव्हिजन अॅंड ऑडिओ व्हिज्युअल कम्युनिकेशन (ICFT), पॅरिस आणि युनेस्को यांच्या मानाच्या फेलिनी पुरस्काराच्या स्पर्धेसाठी ‘कट्यार काळजात घुसली’ चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. या पुरस्कारांचे भारतातील हे पहिले वर्ष असून इफ्फी २०१५ मधील एकूण ११ आंतरराष्ट्रीय चित्रपटांची यासाठी निवड करण्यात आलीये ज्यात ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटाचा समावेश आहे.

या निवडीबाबत दिग्दर्शक सुबोध भावे म्हणाले की, “अशा प्रकारच्या आंतरराष्ट्रीय पुरस्काराच्या स्पर्धेत कट्यारची निवड होणे ही निश्चितच आनंदाची बाब आहे. हा केवळ या चित्रपटाचा सन्मान नसून तो भारतीय शास्त्रीय संगीताचा, नाट्यसंगीताचा त्याचबरोबर पुरुषोत्तम दारव्हेकर, पंडित जितेंद्र अभिषेकी, डॉ. वसंतराव देशपांडे, प्रभाकर पणशीकर या दिग्गजांच्या कार्याचा सन्मान आहे. या निवडीचं श्रेय मी या चित्रपटासाठी दिवसरात्र मेहनत घेणा-या माझ्या सर्व कलावंत, तंत्रज्ञ आणि सहका-यांना देतो.”

कट्यारचे निर्माते आणि झी स्टुडिओज् मराठी विभागाचे बिझनेस हेड निखिल साने म्हणाले की, “आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अतिशय मानाच्या या पुरस्काराच्या स्पर्धेत कट्यार..ची निवड होणे ही मराठी आणि भारतीय चित्रपटांसाठी अभिमानाची बाब आहे. फेलिनीसारखा पुरस्कार ११९५ पासून ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’मध्ये दिला जातो. आता युनेस्कोने पुढाकार घेत हा पुरस्कार भारतात आणला आहे आणि ज्याची सुरूवात इफ्फी २०१५ पासून होतेय. इफ्फी २०१५ मध्ये दाखल झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपटांमधून ११ चित्रपटांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आलीय. यामध्ये ‘कट्यार..’ हा मराठी चित्रपट आहे त्यामुळे हा चित्रपट आता आंतरराष्ट्रीय पातळीवर मराठीचं आणि भारताचं प्रतिनिधीत्व करणार ही अभिमानाची गोष्ट आहे. या पुरस्कारासाठी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे परीक्षक सर्वोत्कृष्ट चित्रपटाची निवड करतील. यानिमित्ताने आंतरराष्ट्रीय समीक्षकांकडूनही कट्यार..ची दखल घेतली जाईल हे विशेष. या चित्रपटाच्याया निवडीचं श्रेय मी माझ्या आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमला देतो.”

 

यंदाच्या दिवाळीत प्रदर्शित झालेल्या ‘कट्यार काळजात घुसली’ चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय. महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी हाऊसफुल सुरूवात करत या चित्रपटाने ही दिवाळी सुरमयी बनवली आहे. विशेषतः तरूण वर्गातूनही या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळतोय. तिकीटबारीवर आणि समिक्षकांकडूनही अशा प्रकारचा उदंड प्रतिसाद मिळत असतानाच फेलिनी पुरस्कारासाठी झालेली निवड या आनंदात अधिक भर घालणारी आहे.

‘दगडी चाळ’च्या यशानंतर निर्मात्या संगीता अहिर घेऊन येत आहेत दगडी चाळ – 2

0

 

‘दगडी चाळ’ ला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतरमंगलमूर्ती फिल्म्स लवकरचं बनवणार आहे

दगडी चाळ – 2…कलाकारांचा उत्तम अभिनय, सुमधूर संगीत, सुनियोजित दिग्दर्शन,

रोमांचकारी कथानक या सगळ्याच पार्श्वभूमीवर प्रेक्षकांनी दगडी चाळ हा चित्रपट डोक्यावर

उचलून धरला. या चित्रपटानंतर त्याच ताकदीचा दगडी चाळ – 2 प्रेक्षकांसमोर सादर

करण्याचा निर्मात्या संगीता अहिर यांचा मानस आहे. त्याच्या कथेवर सध्या काम सुरू आहे.

आपण दगडी चाळ – 2 मधून मकरंद देशपांडेला पुन्हा डॅडी च्या भूमिकेत पाहणार आहोत.

इतर कलाकारांच्याबाबतीत अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र हा चित्रपट 2016 मध्ये

प्रदर्शित होईल हे मात्र नक्की…

महाराष्ट्रात ‘दगडी चाळ’वर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. आता संपूर्ण भारत आणि

भारताबाहेरही हा चित्रपट नेण्याचा विचार असल्याचे संगीता अहिर म्हणाल्या. यानिमित्ताने

दुबई, लंडन, सिंगापूर याठिकाणी राहणाऱ्या मराठी माणसांपर्यंत हा चित्रपट पोहोचणार आहे.

कॅलेंडर गर्ल्स, गुड्डू रंगीला, सिंह साहेब दि ग्रेट, अपने, लाईफ हो तो ऐसी, यासारख्या हिंदी

चित्रपटांच्या निर्मितीचं शिवधनुष्य लिलया पेलल्यानंतर दगडी चाळच्या निमित्ताने त्यांनी

मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. एका उत्तम चित्रपटाच्या निर्मितीसाठी महत्त्वाच्या गोष्टी

आणि निर्मितीमूल्यांचं गणित कसे मांडावे याविषयी बोलताना मराठी चित्रपटांचे मार्केटिंग होत

नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. यावर तोडगा म्हणून मराठी चित्रपटांच्या मार्केटिंगचं

मार्केट होण्याची गरज असल्याचं त्या म्हणाल्या आणि यासाठी त्या नेहमीचं प्रयत्नशील

असतील असे आश्वासनही त्यांनी दिले आहे. येत्या काळात मंगलमूर्ती फिल्म्स

प्रोडक्शनबरोबरच डिस्ट्रिब्युशनच्या क्षेत्रातही उतरणार आहे.