Home Blog Page 35

पार्थ पवारचे होणार तरी काय ? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार कि नाही ? मंत्री चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले …

पुणे-

पार्थ पावरचे होणार तरी काय ? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार कि नाही ? मंत्री चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले …

बातमी अपडेट होते आहे …

विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा जड वाहन वाहतूक सुरक्षेबाबत गंभीर इशारा

0

राज्यभर विशेषतः नागरी भागात कठोर नियम अंमलबजावणीची मागणी

मुंबई, दि. २५ नोव्हेंबर २०२५ : राज्यातील महानगर क्षेत्रांमध्ये वाढत चाललेल्या जड वाहनांच्या (मिक्सर, ट्रक, डंपर) अनियंत्रित वाहतुकीमुळे नागरिकांच्या जीवनास निर्माण होणारा गंभीर धोका लक्षात घेऊन विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना तातडीने कठोर उपाययोजना राबविण्याचे आवाहन केले आहे. हिंजवडी, पुणे येथे २१ नोव्हेंबर २०२५ रोजी जड वाहनासोबत झालेल्या भीषण अपघातात युवती रिदा शेख हिचा मृत्यू झाल्याच्या दुःखद घटनेचा उल्लेख करून त्यांनी संपूर्ण राज्यातील नागरी भागातील वाहतूक सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे.

डॉ. गोऱ्हे यांनी पत्रात नमूद केले आहे की, पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक, नागपूर या महानगरांत जड वाहनांची बेफिकीर व नियमबाह्य वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असल्याने अपघातांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. १ जानेवारी ते ५ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत जड वाहनांमुळे पुणे व पिंपरी चिंचवड भागात तब्बल १,८४७ अपघात घडले असून २१२ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर राज्यातील इतर भागांमध्ये अपघातांची आकडेवारी पाहिल्यास ती अत्यंत भयावह आहे. त्यामुळे लाल दिवा उल्लंघन, वेगमर्यादा न पाळणे आणि अतिभार या कारणांमुळे शहरांमधील वाहतूक व्यवस्था धोक्यात येत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले.

राज्यात जड वाहन वाहतुकीवरील नियंत्रण अधिक प्रभावी करण्यासाठी २ डिसेंबर २०२५ रोजी पुण्यात त्यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती डॉ. गोऱ्हे यांनी दिली. या बैठकीत मिक्सर वाहतुकीचे व्यवस्थापन, नवले पुलावरील भीषण अपघात, तसेच राज्यातील जड वाहन सुरक्षेसाठी व्यापक धोरण ठरविणे यावर सविस्तर चर्चा होणार आहे. स्थानिक वाहतूक परिस्थितीचे विश्लेषण आणि आगामी सुरक्षात्मक उपाययोजना निश्चित करण्यासाठी ही बैठक निर्णायक ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शहरी भागातील जड वाहनांना निश्चित वेळेतच प्रवेश देण्याची सक्ती करणे, बांधकाम व औद्योगिक परवानगी प्रणाली काटेकोरपणे राबविणे, तसेच प्रमुख मार्गांवर जड वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग निश्चित करणे अत्यावश्यक असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले आहे. GPS-आधारित स्पीड लिमिटर अनिवार्य करणे, अतिभारावरील नियंत्रणासाठी डिजिटल वजनकाटे आणि ANPR कॅमेरे असलेली तपासणी केंद्रे मजबूत करणे, तसेच नियमभंग झाल्यास वाहन ताब्यात घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.

सिग्नल उल्लंघन व अतिवेग रोखण्यासाठी AI-आधारित RLVD कॅमेरे, स्पीड रडार, स्मार्ट सिग्नल प्रणाली बसविण्यासाठी राज्यस्तरावर आर्थिक तरतूद करण्याची मागणी त्यांनी केली आहे. दंड प्रक्रिया डिजिटल करून ती पारदर्शक ठेवणे व जड वाहन चालकांसाठी नियमित प्रशिक्षण आणि पुनर्प्रमाणन अनिवार्य करण्याची शिफारसही त्यांनी पत्रात केली आहे. अपघातप्रवण क्षेत्रांमध्ये २४ तास तपासणी पथके तैनात ठेवणे, रात्रीच्या वेळी जड वाहनांवर नियंत्रण वाढवणे आणि रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान राबविणे यावरही त्यांनी विशेष भर दिला.

राज्यातील नागरिकांचे प्राणरक्षण आणि सुरक्षित वाहतूक व्यवस्था उभारणे हे शासनाचे सर्वोच्च कर्तव्य असल्याचे सांगून डॉ. नीलम गोऱ्हे यांनी परिवहन विभागाने तातडीने आवश्यक आदेश व दिशा-निर्देश जारी करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या निवेदनाची प्रत परिवहन आयुक्त, जिल्हाधिकारी, तसेच पुणे व पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांना पाठविण्यात आली आहे.

राम म्हणजे आदर्श, राम म्हणजे शिस्त आणि राम म्हणजे जीवनातील सर्वोच्च चारित्र्य: पंतप्रधान

0
पंतप्रधानांनी केले अयोध्येतील श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवाला संबोधित

आज संपूर्ण देश आणि संपूर्ण जग प्रभू श्री रामाच्या भावनेने भरलेले आहे: पंतप्रधान

हा धर्म ध्वज केवळ एक झेंडा नाही, तर तो भारतीय सभ्यतेच्या पुनरुत्थानाचा ध्वज आहे: पंतप्रधान

अयोध्या ही अशी भूमी आहे जिथे आदर्शांचे रुपांतर आचरणात होते: पंतप्रधान

राम मंदिराचे हे दिव्य आवार भारताच्या सामूहिक शक्तीचे चेतनेचे ठिकाणही बनत आहे: पंतप्रधान

आमचे राम भेदांमधून नाही, तर भावनांमधून लोकांना जोडतात: पंतप्रधान

आपण एक सचेतन समाज आहोत आणि येणारी दशके आणि शतके लक्षात घेऊन दूरदृष्टीने काम केले पाहिजे: पंतप्रधान

राम केवळ एक व्यक्ती नाही, तर राम एक मूल्य, एक शिस्त आणि एक दिशा आहेत: पंतप्रधान

जर भारताला 2047 सालापर्यंत विकसित करायचे असेल आणि समाजाचे सक्षमीकरण करायचे असेल, तर आपण आपल्या आतमध्ये असलेले ‘राम’ जागृत केले पाहिजेत: पंतप्रधान

राष्ट्राने पुढे जाण्यासाठी, त्याने आपल्या वारशाचा अभिमान बाळगला पाहिजे: पंतप्रधान

येत्या दहा वर्षांत, भारताला गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्त करणे हे आपले ध्येय असले पाहिजे: पंतप्रधान

भारत ही लोकशाहीची जननी आहे आणि लोकशाही आपल्या डीएनए मध्ये आहेः पंतप्रधान

विकसित भारताच्या दिशेने असलेला प्रवास गतिमान करण्यासाठी, आपल्याला एका रथाची आवश्यकता आहे, ज्याची चाके शौर्य आणि संयम आहेत, ज्याचा ध्वज सत्य आणि उत्कृष्ट आचरण आहे, ज्याचे घोडे सामर्थ्य, विवेक, संयम आणि परोपकार आहेत आणि ज्याचे लगाम क्षमा, करुणा आणि समता आहेत: पंतप्रधान

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर 2025

देशाच्या सामाजिक-सांस्कृतिक आणि आध्यात्मिक भूमीत एका संस्मरणीय घटनेची नोंद करत, पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील अयोध्या येथील पवित्र श्री रामजन्मभूमी मंदिराच्या शिखरावर समारंभपूर्वक भगवा ध्वज फडकवला. ध्वजारोहण उत्सव मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्याचे आणि सांस्कृतिक उत्सव तसेच राष्ट्रीय एकतेच्या एका नव्या अध्यायाची सुरुवात झाल्याचे प्रतीक आहे. 

या प्रसंगी एका सभेला संबोधित करताना पंतप्रधानांनी सांगितले की, आज अयोध्या नगरी भारताच्या सांस्कृतिक चेतनेच्या आणखी एका शिखराचा अनुभव घेत आहे. “आज संपूर्ण भारत आणि संपूर्ण जग प्रभू श्री रामाच्या भावनेने भरलेले आहे,” असे मोदी यांनी नमूद केले, आणि प्रत्येक रामभक्ताच्या हृदयात एक अद्वितीय समाधान, अमर्याद कृतज्ञता आणि प्रचंड अलौकिक आनंद भरलेला असल्याचे अधोरेखित केले. शतकानुशतके कायम राहिलेल्या जखमा आता बऱ्या होत आहेत, शतकानुशतकांचा वेदनादायक काळ संपत आहे आणि शतकांचे संकल्प आज पूर्ण होत आहेत, यावर त्यांनी भर दिला. ही एका यज्ञाची सांगता आहे, ज्याचा अग्नी 500 वर्षे प्रज्वलित राहिला, एक असा यज्ञ जो श्रद्धेमध्ये कधीही डगमगला नाही आणि  एका क्षणाकरिताही विश्वास ढळला झाला नाही, अशी घोषणा त्यांनी केली. आज प्रभू श्री रामाच्या गाभाऱ्याची अनंत ऊर्जा आणि श्री राम परिवाराचे दिव्य वैभव या धर्म ध्वजाच्या रूपात सर्वात दिव्य आणि भव्य मंदिरात स्थापित झाले आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.

“हा धर्मध्वज केवळ एक ध्वज नाही;  तर भारतीय संस्कृतीच्या पुनर्जागरणाचा ध्वज आहे”, असे स्पष्ट करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भर दिला की, त्याचा भगवा रंग, त्यावर कोरलेले सूर्यवंशाचे वैभव, चित्रीत केलेले पवित्र ओम आणि कोरलेले कोविदार म्हणजेच कांचन  वृक्षाची आकृती, या सर्व गोष्‍टी   रामराज्याच्या महानतेचे प्रतीक आहेत. पंतप्रधान मोदी ध्‍वजाविषयी पुढे म्हणाले,हा ध्वज संकल्प आहे, हा ध्वज यश आहे, हा ध्वज संघर्षातून निर्मितीची गाथा आहे, हा ध्वज शतकानुशतके पुढे नेलेल्या स्वप्नांचे मूर्त स्वरूप आहे आणि हा ध्वज संतांच्या तपश्चर्येचा आणि समाजाच्या सहभागाविषयीची  अर्थपूर्ण पराकाष्ठा आहे.

येणारी शतकानुशतके आणि सहस्रकापर्यंत, हा धर्मध्वज भगवान रामांच्या आदर्शांचा आणि तत्त्वांचा उद्घोष करेल, असे घोषित करून पंतप्रधान  मोदी यांनी यावर भर दिला की, हा विजय केवळ सत्याचा आहे, असत्याचा नाही. त्यांनी अधोरेखित केले की,सत्य स्वतः ब्रह्माचे रूप आहे आणि सत्यातच धर्म स्थापित आहे. हा धर्मध्वजाच्या प्रेरणेने जे बोलले जाते ते पूर्ण केले पाहिजे, अशा संकल्पाला प्रोत्साहन मिळेल. ते पुढे म्हणाले की,जगात कर्म आणि कर्तव्याला प्राधान्य असले पाहिजे असा संदेश या धर्मध्‍वजामधून मिळत आहे. या धर्मध्‍वजाकडे कोणत्याही प्रकारचा   भेदभाव नाही  आणि दुःखापासून मुक्तता आहे त्याचबरोबर समाजात शांती आणि आनंदाचा भाव फुलला आहे. त्यांनी भर दिला की, या  धर्मध्वजाबरोबर एक संकल्प करायचा आहे, त्यानुसार  आपल्याला असा समाज निर्माण करण्याचा आहे की, जिथे गरिबी नाही आणि कोणीही दुःखी किंवा असहाय्य नाही.

आपल्या धर्मग्रंथांची आठवण करून देताना पंतप्रधान नरेंद्र  मोदी म्हणाले की,  जे लोक कोणत्याही कारणास्तव मंदिरात येऊ शकत नाहीत परंतु त्याच्या ध्वजापुढे नतमस्तक होतात त्यांनाही समान पुण्य प्राप्त होते. हा धर्मध्वज मंदिराच्या उद्देशाचे प्रतीक आहे आणि दूरवरून तो भगवान श्री रामांच्या आज्ञा आणि प्रेरणा मानवतेला युगानुयुगे घेऊन जात असताना राम लल्लाच्या जन्मस्थानाचे दर्शन देईल. या अविस्मरणीय आणि अद्वितीय प्रसंगी त्यांनी जगभरातील कोट्यवधी रामभक्तांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्यांनी सर्व भक्तांना नमन केले आणि राम मंदिराच्या बांधकामात योगदान देणाऱ्या प्रत्येक दात्याचे आभार मानले. त्यांनी मंदिराच्या बांधकामाशी संबंधित प्रत्येक कामगार, प्रत्येक कारागीर, प्रत्येक योजनाकार आणि प्रत्येक वास्तुविशारदाला वंदन केले.

“अयोध्या ही अशी भूमी आहे जिथे आदर्श हे  आचरणामध्‍ये  रूपांतरित होतात”, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. श्री रामांनी आपल्या जीवनाचा प्रवास जिथून सुरू केला ते हे शहर आहे. अयोध्येने जगाला दाखवून दिले की,  समाजाच्या ताकदीद्वारे आणि त्याच्या मूल्यांद्वारे एक व्यक्ती पुरुषोत्तम कशी बनते. त्यांनी आठवण करून हदिली की जेव्हा श्री राम अयोध्या सोडून वनवासासाठी गेले त्यावेळी  ते युवराज राम होते, परंतु ज्यावेळी  ते परतले तेव्हा ते ‘मर्यादा पुरुषोत्तम’ म्हणून परतले. श्री रामांच्या मर्यादा पुरुषोत्तम बनण्यात महर्षी वसिष्ठांचे ज्ञान, महर्षी विश्वामित्रांची दीक्षा, महर्षी अगस्त्य यांचे मार्गदर्शन, निषादराजांची मैत्री,माता  शबरीचा स्नेह आणि भक्त हनुमानाची भक्ती या सर्वांनी महत्त्वपूर्ण  भूमिका बजावली.

विकसित भारताच्या उभारणीसाठी समाजाची सामूहिक शक्ती आवश्यक आहे, यावर भर देत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला की, राम मंदिराचे भव्य- दिव्य प्रांगण- परिसर हे  भारताच्या सामूहिक शक्तीचे चेतनास्थळ बनत आहे. त्यांनी अधोरेखित केले की,येथे सात मंदिरे बांधली गेली आहेत, ज्यात आदिवासी समुदायाचे प्रेम आणि  त्याच्या आदरातिथ्य परंपरांचे प्रतीक असलेल्या माता शबरीच्या मंदिराचाही समावेश आहे.

पंतप्रधानांनी निषादराज मंदिराचाही उल्लेख केला, जे साधनांची नव्हे तर उद्देशाची आणि त्याच्या भावनेची पूजा करणाऱ्या मैत्रीचे साक्षीदार आहे. इथे  एकाच  ठिकाणी माता अहिल्या , महर्षी वाल्मिकी, महर्षी वशिष्ठ, महर्षी विश्वामित्र, महर्षी अगस्त्य आणि संत तुलसीदास आहेत जे  राम लल्ला यांच्यासोबत भक्तांना दर्शन देतात असे त्यांनी नमूद केले. त्यांनी जटायू जी आणि खारीच्या पुतळ्यांचा देखील उल्लेख केला, जे महान संकल्प साध्य करण्यासाठी अगदी छोट्यातील छोट्या  प्रयत्नांचेही महत्त्व दर्शवतात. त्यांनी प्रत्येक नागरिकाला आवाहन केले की जेव्हा कधी  ते राम मंदिराला भेट देतील तेव्हा त्यांनी या सात मंदिरांनाही भेट द्यावी . त्यांनी अधोरेखित केले की ही मंदिरे आपली श्रद्धा बळकट करण्यासोबतच मैत्री, कर्तव्य आणि सामाजिक सौहार्दाच्या मूल्ये  देखील सक्षम बनवतात .

“आपले प्रभू श्रीराम मतभेदातून नव्हे तर भावनांद्वारे जोडले जातात “, असे सांगत  मोदींनी श्रीरामांसाठी वंशापेक्षा व्यक्तीची भक्ती महत्त्वाची आहे, वंशापेक्षा मूल्ये प्रिय आहेत आणि  केवळ ताकदीपेक्षा सहकार्य श्रेष्ठ आहे यावर भर दिला. ते म्हणाले की आज आपणही त्याच भावनेने पुढे जात आहोत. गेल्या 11 वर्षांमध्ये महिला, दलित, मागासवर्गीय, आदिवासी, वंचित, शेतकरी, कामगार आणि तरुण – समाजातील प्रत्येक घटकाला विकासाच्या केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे यावर त्यांनी भर दिला. जेव्हा प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक वर्ग आणि देशातील प्रत्येक प्रदेश सक्षम होईल, तेव्हा प्रत्येकाचे प्रयत्न संकल्प पूर्ण करण्यात योगदान देतील  आणि या सामूहिक प्रयत्नांद्वारेच  2047 पर्यंत विकसित भारताची उभारणी  होईल.

रामलल्ला यांच्या प्राणप्रतिष्ठेच्या ऐतिहासिक प्रसंगाचे स्मरण करताना पंतप्रधानांनी राष्ट्राचा संकल्प भगवान रामांशी जोडण्याबद्दल म्हटले होते आणि पुढील  हजार वर्षांसाठी भारताचा पाया भक्कम  केला पाहिजे याची आठवण करून दिली होती. जे फक्त वर्तमानाचा विचार करतात ते भविष्यातील पिढ्यांवर अन्याय करतात यावर त्यांनी भर दिला आणि आपण केवळ आजचाच नाही तर भावी पिढ्यांचाही विचार केला पाहिजे, कारण हे राष्ट्र आपल्या आधीपासून अस्तित्वात होते आणि आपल्या नंतरही राहील. एक चैतन्यशील समाज म्हणून आपण येणाऱ्या दशके आणि शतके यांचा विचार करून दूरदृष्टीने काम केले पाहिजे यावर त्यांनी भर दिला आणि यासाठी आपण भगवान रामांकडून शिकले पाहिजे – त्यांचे व्यक्तिमत्व समजून घेतले पाहिजे, त्यांचे आचरण आत्मसात केले पाहिजे आणि लक्षात ठेवले पाहिजे की राम आदर्श, शिस्त आणि जीवनाचे सर्वोच्च चरित्र यांचे प्रतीक आहेत . राम म्हणजे सत्य आणि शौर्याचा संगम, धर्माच्या मार्गावर चालण्याचे मूर्त स्वरूप, लोकांच्या आनंदाला सर्वांपेक्षा वरचे स्थान देणारे ,  संयम आणि क्षमा यांचा महासागर, ज्ञान आणि बुद्धीचे शिखर, सौम्यतेतील दृढता, कृतज्ञतेचे सर्वोच्च उदाहरण, उदात्त संगतीची निवड करणारा, महान शक्तीतील नम्रता, सत्याचा अढळ संकल्प आणि दक्ष , शिस्तबद्ध आणि प्रामाणिक मन होय. रामाचे हे गुण आपल्याला एक मजबूत, दूरदर्शी आणि चिरंतन  भारत निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन करतील असे ते म्हणाले.

“राम ही केवळ एक व्यक्ती नाही तर एक मूल्य, एक शिस्त आणि एक दिशा आहे”, असे प्रतिपादन मोदी यांनी केले. जर  2047 पर्यंत भारताला विकसित बनवायचे असेल आणि समाजाला सक्षम बनवायचे असेल, तर आपल्या प्रत्येकाच्या आतील  राम जागृत झाला पाहिजे, आपल्या स्वतःच्या हृदयात पवित्र झाला पाहिजे. असा संकल्प करण्यासाठी आजच्यापेक्षा चांगला दिवस असू शकत नाही यावर त्यांनी भर दिला. 25 नोव्हेंबर हा दिवस आपल्या वारशात अभिमानाचा आणखी एक असाधारण क्षण घेऊन आला आहे, ज्याचे प्रतीक धर्मध्वजावर कोरलेले कोविदार वृक्ष आहे असे त्यांनी नमूद केले. त्यांनी स्पष्ट केले की कोविदार वृक्ष आपल्याला आठवण करून देतो की जेव्हा आपण स्वतःला आपल्या मुळांपासून तोडतो  तेव्हा आपले वैभव इतिहासाच्या पानांमध्ये गाडले जाते.

भरत आपल्या सैन्यासह चित्रकूटला पोहोचतो आणि लक्ष्मण दुरूनच अयोध्येचे सैन्य ओळखतो, त्या प्रसंगाची आठवण  पंतप्रधानांनी करून दिली. वाल्मिकी ऋषींनी केलेल्या वर्णनाचा उल्लेख पंतप्रधानांनी केला,  लक्ष्मणाने रामाला सांगितले की एका मोठ्या वृक्षासारखा दिसणारा तेजस्वी, उंच ध्वज अयोध्येचा आहे, ज्यावर रक्तकांचनाचे   शुभ चिन्ह आहे. पंतप्रधानांनी  यावर भर दिला की आज, रक्तकांचन  पुन्हा एकदा राम मंदिराच्या प्रांगणात प्रतिष्ठापित होत असून हे  केवळ एका वृक्षाचे पुनरागमन नाही तर ते स्मृतीचे पुनरागमन, अस्मितेचे पुनर्जागरण  आणि अभिमानास्पद संस्कृतीचा उद्घोष आहे. रक्तकांचन आपल्याला आठवण करून देते की जेव्हा आपण आपली ओळख विसरतो तेव्हा आपण स्वत्व गमावतो, परंतु जेव्हा ओळख पुन्हा प्राप्त होते  तेव्हा राष्ट्राचा आत्मविश्वास देखील परत येतो.  देशाला पुढे जाण्यासाठी, आपल्या वारशाचा अभिमान बाळगणे आवश्यक आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. 

आपल्या वारशाच्या अभिमान बाळगण्याबरोबरच गुलामगिरीच्या मानसिकतेपासून संपूर्ण  मुक्तीदेखील तितकीच महत्त्वाची आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला. 190 वर्षांपूर्वी 1835 मध्ये मॅकॉले नावाच्या एका ब्रिटिश संसद सदस्याने भारताला मुळापासून उपटून टाकण्याचे बीज पेरले होते आणि मानसिक गुलामगिरीचा पाया रचला होता याची आठवण त्यांनी करून दिली. सन 2035 मध्ये, त्या घटनेला दोनशे वर्षे उलटून जातील असे त्यांनी नमूद केले आणि पुढील दहा वर्षे भारताला या मानसिकतेपासून मुक्त करण्यासाठी समर्पित करावीत असे आवाहन केले. त्यांनी दुःख व्यक्त केले की सर्वात मोठे दुर्दैव म्हणजे मॅकॉलेच्या विचारांचा खूप मोठा परिणाम झाला – भारताला स्वातंत्र्य मिळाले, परंतु न्यूनगंडातून मुक्तता मिळाली नाही.  जे जे परदेशी ते सर्वकाही श्रेष्ठ मानण्याची  तर आपल्या स्वतःच्या परंपरा आणि व्यवस्थेत केवळ दोष पाहण्याची विकृती निर्माण झाली, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. 

पंतप्रधान मोदी यांनी पुढे सांगितले की,गुलामगिरीच्या मानसिकतेने सतत या समजाला बळकटी दिली की भारताने लोकशाहीची संकल्पना परदेशातून घेतली आहे आणि संविधानदेखील परदेशापासून प्रेरित आहे. मात्र सत्य हे आहे की भारत लोकशाहीची जननी आहे आणि लोकशाही आपल्या डीएनएमध्ये आहे. त्यांनी उत्तर तामिळनाडूमधील उत्तिरमेरूर या गावातील एक हजार वर्ष जुन्या शिलालेखाकडे लक्ष वेधले.  त्या काळातही लोकशाही पद्धतीने शासन कसे चालवले जात होते आणि लोकांनी त्यांचे शासक कसे निवडले, याचा उल्लेख शिलालेखात आहे.  त्यांनी नमूद केले की मॅग्ना कार्टाची मोठ्या प्रमाणात प्रशंसा केली गेली, मात्र भगवान बसवण्णांच्या अनुभव मंटपाविषयीचे  ज्ञान मर्यादित ठेवण्यात आले. अनुभव मंटप हा एक असा मंच होता जिथे सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक मुद्द्यांवर सार्वजनिकरित्या चर्चा केली जात होती आणि सामूहिक सहमतीने निर्णय घेतले जात होते. गुलामगिरीच्या मानसिकतेमुळे, भारतातील पिढ्या त्यांच्या स्वतःच्या लोकशाही परंपरांबद्दलच्या ज्ञानापासून वंचित राहिल्याबद्दल पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले.

गुलामगिरीची मानसिकता आपल्या व्यवस्थेत ठायीठायी वसली गेली, असे निरीक्षण पंतप्रधानांनी नोंदवले.शतकानुशतके भारतीय नौदलाच्या ध्वजावर अशी चिन्हे होती ज्यांचा भारताच्या संस्कृतीशी, सामर्थ्याशी किंवा वारशाशी काहीही संबंध नव्हता. आता नौदलाच्या ध्वजावरून  गुलामगिरीचे प्रत्येक प्रतीक काढून टाकण्यात आले आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा स्थापित झाला आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.हा केवळ प्रतिमेतील बदल नव्हता  तर मानसिकतेतील परिवर्तनाचा क्षण होता, भारत यापुढे इतरांच्या वारशातून नव्हे तर स्वतःच्या प्रतीकांद्वारे आपली शक्ती परिभाषित करेल, ही घोषणा होती, असे पंतप्रधान म्हणाले. 

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की हेच परिवर्तन आज अयोध्येत दिसून येत आहे. याच गुलामगिरीच्या मानसिकतेने गेली अनेक वर्षे रामत्वाच्या या भावनेला नाकारले यावर त्यांनी अधिक भर दिला. भगवान राम हे स्वतःच एक संपूर्ण मूल्य प्रणाली आहेत – ओरछा मधील राजा रामापासून रामेश्वरमच्या भक्त रामापर्यंत, शबरीच्या प्रभू रामांपासून मिथिलेच्या पाहुणा रामजी यांच्यापर्यंत सर्वस्वरूपांमध्ये राम आहे हे मोदी यांनी अधोरेखित केले. देशातील प्रत्येक घरात, प्रत्येक भारतीयाच्या हृदयात आणि भारताच्या प्रत्येक कणाकणात राम वसलेला आहे, तरीही गुलामीची मानसिकता इतकी वरचढ झाली की भगवान रामाला देखील कल्पनेतील व्यक्तिरेखा म्हणून जाहीर करण्यात आले.

जर आपण येत्या 10 वर्षांत गुलामीच्या मानसिकतेमधून स्वतःला संपूर्णपणे मुक्त करण्याचा निर्धार केला तर अशा आत्मविश्वासाच्या ज्वाला प्रज्वलित होतील  ज्यांतून कुठलीही शक्ती 2047 पर्यंत विकसित भारत उभारण्याचे स्वप्न साकारण्यापासून रोखू शकणार नाही हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. आगामी दशकात मेकॉलेचा मानसिक गुलामगिरीचा प्रकल्प संपूर्णपणे उध्वस्त झाला तरच येती हजारो वर्षे भारताचा पाया मजबूत राहील यावर त्यांनी अधिक भर दिला. अयोध्येतील राम लल्ला मंदीर संकुल दिवसेंदिवस अधिकाधिक भव्य होत जात आहे आणि अयोध्येच्या सौंदर्यीकरणाचे कार्य वेगाने सुरु आहे हे त्यांनी ठळकपणे नमूद केले. अयोध्या ही पुन्हा एकदा अशी नगरी म्हणून आकाराला येत आहे जी जगासाठी एक उदाहरण म्हणून काम करेल. त्रेतायुगात अयोध्येने मानवतेला एक आदर्श आचारसंहिता दिली आणि आता 21 व्या शतकात अयोध्या मानवतेला विकासाचे एक नवे मॉडेल देऊ करत आहे. ते पुढे म्हणाले की एकेकाळी अयोध्या ही मर्यादा  केंद्र होती आणि आता अयोध्या हे विकसित भारताचा कणा म्हणून उदयाला येत आहे.

जेथे शरयू नदीचा प्रवाह आणि विकासाचा ओघ एकत्रितपणे वाहतील अशा परंपरा आणि आधुनिकतेचा मिलाफाचे मूर्त रूप म्हणून पंतप्रधानांनी अयोध्येची परिकल्पना मांडली. अयोध्या शहर अध्यात्मिकता आणि कृत्रिम बुद्धीमत्ता यांच्या दरम्यान सुसंवादाचे दर्शन घडवेल यावर त्यांनी अधिक भर दिला. राम पथ, भक्ती पथ आणि जन्मभूमी पथ हे एकत्र येऊन नव्या अयोध्येचे चित्र सादर करतात असे त्यांनी नमूद केले. येथील भव्य विमानतळ आणि आकर्षक रेल्वे स्थानक तसेच वंदे भारत आणि अमृत भारत एक्स्प्रेस गाड्या या सर्व सुविधा अयोध्येला देशाशी जोडत आहेत हे त्यांनी अधोरेखित केले. अयोध्येतील जनतेला सुविधा पुरवण्यासाठी आणि त्यांच्या जीवनात समृद्धता आणण्यासाठी सातत्याने काम सुरु आहे हे सांगण्यावर त्यांनी भर दिला. प्राण प्रतिष्ठा झाल्यापासून तबल 45 कोटी भाविकांनी या मंदिराला भेट दिली आहे आणि त्यामुळे अयोध्या आणि परिसरातील लोकांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे याकडे त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. एकेकाळी अयोध्या हे शहर विकासविषयक निकषांच्या बाबतीत मागे पाडले होते मात्र आज हे शहर उत्तर प्रदेशातील एक महत्त्वाचे शहर म्हणून उदयाला येत आहे असे ते म्हणाले.

21 व्या शतकाचे आगामी युग अत्यंत महत्त्वाचे आहे हे अधोरेखित करत, पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, भारताच्या  स्वातंत्र्यप्राप्तीला 70 वर्षे झाल्यानंतर भारत हा जगातील 11 व्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था झाला, तर  केवळ  गेल्या 11 वर्षांत भारत पाचव्या क्रमांकाची जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था झाला आहे हे त्यांनी अधोरेखित केले. ते म्हणाले की आता तो दिवस दूर नाही जेव्हा भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था झालेला असेल. आगामी काळ हा नव्या संधी आणि नव्या शक्यतांचा आहे आणि या महत्त्वाच्या कालावधीत भगवान रामाचे विचार देशाला प्रेरित करत राहतील.

पंतप्रधानांनी स्पष्ट केले की जेव्हा भगवान श्रीरामांनी रावणावर विजय मिळवण्याच्या मोठ्या आव्हानाचा सामना केला तेव्हा त्यांच्या रथाला शौर्य आणि संयम ही चाके होती, त्याचा ध्वज सत्य आणि सदाचार होता, त्याचे घोडे शक्ती, ज्ञान, संयम आणि परोपकार होते आणि त्याचा लगाम क्षमा, करुणा आणि समता या मुल्यांची होती, ज्यामुळे रथ योग्य दिशेने धावत होता.

विकसित भारताच्या प्रवासाला गती देण्यासाठी, अशाच रथाची आवश्यकता आहे ज्याची चाके शौर्य आणि संयमाची आहेत, म्हणजेच आव्हानांना तोंड देण्याचे धैर्य आणि परिणाम दिसून येईपर्यंत स्थिर राहण्याची चिकाटी त्याच्या ठायी असेल, असे पंतप्रधान म्हणाले. या रथाचा ध्वज सत्य आणि सदाचरणाचा असावा, जेणेकरून धोरण, हेतू आणि नैतिकतेशी कधीही तडजोड केली जाणार नाही, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. या रथाचे घोडे शक्ती, ज्ञान, शिस्त आणि परोपकार रुपी असले पाहिजेत, ज्यामुळे शक्ती, बुद्धी, संयम आणि इतरांची सेवा करण्याची भावना जागृत राहील, असे ते म्हणाले. या रथाचे लगाम क्षमा, करुणा आणि समानतारुपी असले पाहिजेत, म्हणजेच अपयशातही यशात अहंकार असणार नाही आणि अपयशात इतरांचा अनादर केला जाणार नाही, हे त्यांनी स्पष्ट केले. हा क्षण खांद्याला खांदा लावून उभे राहण्याचा, वाढत्या गतीचा आणि रामराज्याने प्रेरित भारताच्या उभारणीचा आहे, असे पंतप्रधानांनी आदरपूर्वक सांगितले. जेव्हा राष्ट्रीय हित स्वहितापेक्षा श्रेष्ठ मानले जाईल तेव्हाच हे शक्य होईलअसे सगुण त्यांनी समारोप केला.त्यांनी पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून अभिनंदन केले आणि सर्वांना शुभेच्छा दिल्या.

उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

पार्श्वभूमी

हा कार्यक्रम मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी या शुभदिनी होत आहे, जो श्रीराम आणि सीतेच्या विवाह पंचमीच्या अभिजित मुहूर्ताशी जुळतो, जो दैवी मिलनाचे प्रतीक आहे. हाच दिवस शिखांचे नववे गुरु, गुरु तेग बहादूर जी यांचा शहीद दिवस देखील आहे, ज्यांनी 17 व्या शतकात अयोध्येत 48 तास अखंड ध्यान केले होते, ज्यामुळे या दिवसाचे आध्यात्मिक महत्त्व आणखी वाढते.

दहा फूट उंची आणि वीस फूट लांबीच्या या त्रिकोणी ध्वजावर भगवान श्रीरामांच्या तेजाचे आणि शौर्याचे प्रतीक असलेल्या तेजस्वी सूर्याची प्रतिमा आहे, ज्यावर ‘ॐ’ आणि रक्तकांचन  वृक्षाची प्रतिमा कोरलेली आहे. हा पवित्र भगवा ध्वज रामराज्याच्या आदर्शांना मूर्त रूप देणारा असून, सन्मान, एकता आणि सांस्कृतिक सातत्य यांचा संदेश देणारा आहे.

हा ध्वज पारंपरिक उत्तर भारतीय नागर स्थापत्य शैलीत बांधलेल्या शिखरावर हा ध्वज विराजमान आहे, तर त्याच्याभोवती दक्षिण भारतीय स्थापत्य परंपरेनुसार डिझाइन केलेले 800 मीटरचा परकोटा उभारण्यात आला आहे, जे मंदिराच्या स्थापत्य विविधतेचे प्रदर्शन घडवते. 

मंदिर संकुलात मुख्य मंदिराच्या बाहेरील भिंतींवर वाल्मिकी रामायणावर आधारित भगवान श्रीरामांच्या जीवनातील 87 प्रसंग दगडावर कोरण्यात आले असून  परिसरातील   भिंतीवर भारतीय संस्कृतीतील 79 प्रसंग दाखवले आहेत. हे सर्व घटक एकत्रितपणे सर्व पर्यटकांना एक अर्थपूर्ण आणि शैक्षणिक अनुभव प्रदान करतात, ज्यातून भगवान श्रीरामांच्या जीवनाची आणि भारताच्या सांस्कृतिक वारशाची सखोल माहिती मिळते.

सांते स्पा क्युझीनच्या 10 वर्षांचा उत्सव

0

With Love NGO च्या सहकार्याने साजरा केलेली मनाला स्पर्श करणारी सामुदायिक पहल

पुणेनोव्हेंबर 2025:

२४ नोव्हेंबर रोजी कोरेगाव पार्कमध्ये स्थित सांते स्पा क्युझीन—जे वेलनेस, सजग आहार आणि mindful living यासाठी प्रसिद्ध आहे – यांनी आपला 10 वा वर्धापन दिन एका अर्थपूर्ण आणि संवेदनशील सामुदायिक उपक्रमासह साजरा केला. संस्थापक आणि मालक सोनल बर्मेचा यांच्या पुढाकाराने, सांते स्पा क्युझीन, With Love NGO आणि Aashray Retreats × Arty Aura यांनी मिळून एपीफनी स्कूलमधील 30 मुलांना एक अविस्मरणीय अनुभव दिला.

एपीफनी स्कूलमध्ये शिकणारी ही मुले पुण्यातील अत्यंत वंचित समुदायांमधून येतात — गरीबी, गुन्हेगारी, मद्यपान आणि अस्थिर घरगुती परिस्थितींमध्ये वाढणारी मुले. या कठीण परिस्थिती असूनही, ही मुले दररोज शाळेत आशा आणि जिद्द घेऊन येतात.

उत्सवाच्या निमित्ताने, या मुलांना त्यांच्या आयुष्यात प्रथमच रेस्टॉरंटमध्ये जेवण्याचा अनुभव देण्यात आला. सांते स्पा क्युझीनने अतिशय ऊब आणि आनंदाने त्यांचे स्वागत केले. त्यांना खास साउथ इंडियन बुफे देण्यात आला, तसेच रेस्टॉरंटचा मार्गदर्शित फेरफटका आणि संपूर्ण टीमसोबत संवाद साधण्याची संधी मिळाली.

कार्यक्रमाचा मुख्य आकर्षण होता सात चक्रांवर आधारित टोट-बॅग पेंटिंग वर्कशॉप, ज्याचे आयोजन Aashray Retreats × Arty Aura यांनी केले. ही सर्जनशील कृती सांतेच्या तत्त्वज्ञानाचे – inner balance, wellness, mindfulness आणि energy alignment – सुंदर प्रतिबिंब होती.

सांते स्पा क्युझीनच्या संस्थापक सोनल बर्मेचा म्हणाल्या: “चक्र हे आपल्या अंतर्मनातील ऊर्जा केंद्र आहेत. जेव्हा ही ऊर्जा संतुलित असते, तेव्हा जीवन प्रतिकारापासून प्रवाहाकडे सरकते – स्पष्टता वाढते, अंतर्ज्ञान तीव्र होते आणि इच्छित गोष्टी सहज साकार होतात. सांतेमध्ये inner balance आमच्या प्रत्येक कृतीचे केंद्रस्थान आहे. हा महत्त्वाचा टप्पा अशा मुलांसह साजरा करणं, जे प्रेम, सन्मान आणि आनंदाचे खरे हकदार आहेत –  आमच्यासाठी अत्यंत अर्थपूर्ण होतं.”

दिवस अधिक खास करण्यासाठी, सोनल यांनी सर्व मुलांना शाळेसाठी आवश्यक वस्तू भेट दिल्या – ज्यामुळे मुलांच्या चेहऱ्यावर अपार आनंद आणि उत्साह दिसला. एपीफनी स्कूलच्या प्राचार्या संगीता कदम यांनी या अनुभवासाठी मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

With Love NGO च्या संस्थापक डिंपल सोमजी म्हणाल्या: “आमची संस्था म्हणजे हृदयांना जोडणारा पूल – देणारे आणि घेणारे, करुणा आणि कृती यांना एकत्र आणणारा. पूल बनून काम करणे हे फक्त मेहनत नाही; ते heart-work आहे.”

या सहकार्याद्वारे, सांते स्पा क्युझीनने पुन्हा एकदा सिद्ध केले की ते केवळ आरोग्यदायी अन्न आणि वेलनेसपुरते मर्यादित नाही, तर समावेशकता, करुणा आणि समाजउन्नतीच्या कार्यातदेखील तितक्याच निष्ठेने बांधील आहे.

पुण्यातील केईएम हॉस्पिटल मध्ये नवीन HPLC मशीनच्या सहाय्याने हिमोग्लोबिन विकारांच्या निदान सेवांचा होणार विस्तार

0

फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि मुकुल माधव फाउंडेशनकडून मिळाली नवीन HPLC मशीन

पुणे: 25 नोव्हेंबर 2025: पुण्यातील केईएम हॉस्पिटल येथे 24 नोव्हेंबर 2025 रोजी नव्याने स्थापित करण्यात आलेल्या HPLC Variant II Machine चा हस्तांतरण समारंभ यशस्वीपणे पार पडला. हे अत्याधुनिक निदान उपकरण यंत्रणा फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि मुकुल माधव फाउंडेशन (MMF) यांनी दिलेल्या देणगीतून उभारण्यात आली असून यामुळे रुग्णालयाच्या हिमोग्लोबिनोपॅथी आणि थॅलेसीमियाच्या निदान सेवा आणखी बळकट होणार आहेत.  

हिमोग्लोबिन विकार हे भारतातील एक गंभीर सार्वजनिक आरोग्य आव्हान आहे. याचा परिणाम  बालक, मुले, किशोरवयीन मुली आणि गर्भवती महिला यांच्यावर होताना दिसून येत आहे. लवकर निदान आणि वेळेवर उपचार शक्य होण्यासाठी केईएम हॉस्पिटलमधील पॅथॉलॉजी विभाग गेल्या दोन दशकांपासून परवडणाऱ्या दरात हिमोग्लोबिन इलेक्ट्रोफोरेसिस तपासण्या करत आहे.

पुण्यातील केईएम हॉस्पिटलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीन वाडिया म्हणाल्या,
“HPLC Variant II Machine ची जोडणी हे हिमोग्लोबिन विकारांशी लढण्याच्या आमच्या मिशनमधील एक महत्त्वाचे पाऊल आहे. फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि मुकुल माधव फाउंडेशन यांच्या उदार पाठबळामुळे आता आम्ही गरजूंना अधिक वेळेत, अचूक आणि परवडणाऱ्या वाजवी किंमतीत निदान करण्यासाठी सज्ज आहोत.”

त्यांनी पुढे सांगितले की फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि MMF हे गेली दोन दशके केईएम हॉस्पिटलचे विश्वासू आणि मौल्यवान भागीदार आहेत. दिवंगत डॉ. आनंद पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी बालरोग, OPD, नवजात शिशू सेवा आणि इतर अनेक विभागांमध्ये सातत्याने मदत केली आहे. MMF च्या दीर्घकालीन बांधिलकीने आणि वेळेवर दिलेल्या पाठिंब्यामुळे केईएम हॉस्पिटलच्या सेवांचा दर्जा सातत्याने उंचावण्यास मोठी मदत झाली आहे. त्याचा फायदा दरवर्षी हजारो रुग्णांना होत आहे.

केईएम हॉस्पिटल मधील हेमॅटोलॉजिस्ट डॉ. रमा मंचंदा म्हणाल्या, “हिमोग्लोबिनोपॅथीचे निदान करण्यास मदत केल्याबद्दल आम्ही MMF चे अत्यंत आभारी आहोत. या मशीनच्या मदतीने आम्हाला थॅलेसीमिया सारख्या विकारांचे वाहक अधिक प्रभावीपणे ओळखता येतील. यामुळे थॅलेसीमिया मेजर असलेल्या बालकांच्या जन्माला प्रतिबंध होऊ शकतो आणि कुटुंब व समाजावरचा सामाजिक-आर्थिक भारही कमी होऊ शकतो.”

मुकुल माधव फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त ऋतु प्रकाश छाब्रिया म्हणाल्या,
“कोणतीही पार्श्वभूमी असली तरी दर्जेदार आरोग्यसेवा प्रत्येकापर्यंत पोहोचवणे हे नेहमीच आमचे ध्येय राहिले आहे. हे योगदान असंख्य कुटुंबांसाठी अधिक निरोगी भविष्याकडे जाणारे महत्त्वाचे पाऊल आहे. FIL–MMF ने दर महिन्याला 300 हून अधिक थॅलेसीमिया ग्रस्त मुलांना वैद्यकीय फिल्टर्स, औषधे आणि सातत्यपूर्ण देखभाल पुरवून मदत केली आहे. तसेच महाराष्ट्र आणि गुजरातमधील महाविद्यालयांमध्ये थॅलेसीमिया आणि डायबेटीस जागरूकता उपक्रम राबवून प्रतिबंधालाही आमचे प्राधान्य आहे. प्रगत निदान आणि सातत्यपूर्ण समाज जागृतीच्या एकत्रित प्रयत्नांमुळे आम्ही आनुवंशिक विकारांचा प्रसार कमी करण्याचे आणि पुढील पिढीला ज्ञान व वेळेवर हस्तक्षेपाने सक्षम करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.”

आव्हानाचे प्रमाण आणि हे मशीन कसा बदल घडवून आणते

• हिमोग्लोबिन विकार भारतात सर्वत्र आढळतात. 3–4% लोकसंख्या β- थॅलेसीमियाचे वाहक असून याचा अर्थ 35–45 दशलक्ष वाहक phoindia.org+2cmhrj.com+2

• दरवर्षी भारतात 10,000–15,000 बालके गंभीर हेमोग्लोबिनोपॅथीसह जन्माला येतात. त्यात थॅलेसीमिया मेजरचा समावेश आहे. phoindia.org+2eHealth Magazine+2
• महाराष्ट्रातील काही समूहांमध्ये β- थॅलेसीमिया वाहक दर अंदाजे 2.55–3.48% आढळला आहे. ansi.gov.in

• या आकडेवारीनुसार, HPLC Variant II मशीन आपल्या कार्यकाळात मोठ्या संख्येने वाहक आणि रुग्ण ओळखू व त्यांचे निरीक्षण करू शकते. त्यामुळे वेळीच उपचार करता येतात आणि रोग लक्षणीय अवस्थेत जाण्याचा धोका कमी होतो आणि गंभीर आनुवंशिक विकारांचा वारसा रोखण्यास मदत होते.

हा उपक्रम केईएम हॉस्पिटल, फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि MMF यांच्या समाज आरोग्य कल्याण सुधारण्याच्या आणि महत्त्वाच्या वैद्यकीय सेवांपर्यंत पोहोच वाढवण्याच्या सामायिक बांधिलकीला बळ देतो. तसेच आरोग्यसेवा पायाभूत सुविधा उभारणे, निदान व उपचार क्षमता वाढवणे आणि उच्च दर्जाची तसेच परवडणारी सेवा समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याच्या त्यांच्या उद्दिष्टाचे प्रतिबिंबही यात दिसून येते.

मलबार गोल्ड अँड डायमंड्सकडून ‘ब्राइड्स ऑफ इंडिया’ अभियानाच्या 15व्या आवृत्तीचे भव्य अनावरण

भारताच्या वैविध्यपूर्ण लग्न समारंभाचा उत्सव

नोव्हेंबर 25, 2025: 

प्रत्येक भारतीय वधू तिच्यासोबत भावनांचे एक जग घेऊन जाते. त्यात तिच्या स्वतःच्या अनेक आठवणी असतात. ती ज्या रीतिरिवाजांना बघत मोठी झाली, ती ज्या संस्कृतीशी संबंधित आहे, ज्या आठवणी तिने हृदयाच्या जवळ जपल्या आहेत आणि तिच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या दिवसांपैकी एकाची ओळख ठरतील असे दागिने, या सगळ्या गोष्टी त्यात असतात. जगातील सर्वात मोठ्या सोने आणि हिऱ्यांच्या रिटेल चेनपैकी एक असलेल्या मलबार गोल्ड अँड डायमंड्सने भारतातील समृद्ध, सांस्कृतिक वारशातील वधूच्या दागिन्यांचे महत्त्व फार पूर्वीपासून समजून घेतले आहे. वधूच्या श्रेणीतील दागिन्यांमध्ये मलबार गोल्ड अँड डायमंड्सने विचारपूर्वक क्युरेट तसेच विकसित केलेले डिझाइन एकत्र आणले आहेत. ज्यामुळे प्रत्येक वधूच्या परंपरांचा आदर करणारे शुद्धता, हेतू आणि कारागिरीने तयार केलेले दागिने सुनिश्चित होतात. वधूच्या कारागिरीतील सखोल कौशल्यासह, ब्रँडने देशभरातील वधूंच्या विशिष्ट परंपरांचा आदर करणारे डिझाइन तयार करण्याचा एक अतुलनीय वारसा निर्माण केला आहे. 

एक महत्त्वाचा टप्पा गाठत, मलबार गोल्ड अँड डायमंड्सने आज त्यांच्या प्रमुख ब्राइड्स ऑफ इंडिया अभियानाच्या 15व्या आवृत्तीचे अनावरण केले, जी भारतातील सर्वात मोठ्या आणि सर्वात अपेक्षित ब्राइडल प्रॉपर्टींपैकी एक म्हणून ओळखली जाते. या वर्षीच्या आवृत्तीत 22 वधू आणि 10 सेलिब्रिटी एकत्र आले आहेत – प्रार्थना बेहेरे, आलिया भट्ट, करीना कपूर खान, एनटीआर, कार्ती, अनिल कपूर, श्रीनिधी शेट्टी, रुक्मिणी मैत्र, सब्यसाची मिश्रा आणि मानसी पारेख, हे सर्व या मोहिमेचा विस्तार, वैविध्य तसेच भावनिक खोली दर्शवते. 

शुभजीत मुखर्जी यांनी संगीतबद्ध केलेल्या या जाहिरातीचे दिग्दर्शन अभिषेक वर्मन यांनी केले आहे. या जाहिरातीत भारताच्या वेगवेगळ्या भागातील वधू संस्कृतींचे सार टिपणारे तसेच प्रत्येक वधूच्या कथेला आकार देणाऱ्या विधि, भावना तसेच वारसा साजरे करणारे दृश्य आणि संगीतमय कथानक एकत्र आणले आहे. 

15व्या आवृत्तीच्या महत्त्वाबद्दल विचारले असता, मलबार गोल्ड अँड डायमंड्सचे अध्यक्ष श्री. एम.पी. अहमद म्हणाले: “दरवर्षी आयोजित करण्यात येत असलेला ब्राइड्स ऑफ इंडिया उपक्रम म्हणजे या देशातील वधूंप्रति आमची कृतज्ञता आहे. आणि हे 15वे वर्ष तर आमच्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. स्वतःचे स्वातंत्र्य जपतानाच वधू परंपरेचा देखील कसा आदर करतात हे आम्ही अनेकदा अधोरेखित केले आहे. ही आवृत्ती त्या परंपरांची खोली दर्शवते – आठवणीविधि आणि नातेसंबंध जे तिची ओळख आहे. पारदर्शकता आणि गुणवत्ता हमीसाठी मलबारची असलेली वचनबद्धता लक्षात घेताप्रत्येक कुटुंबाला अर्थपूर्ण आणि विश्वासार्ह दागिने निवडण्याचा आत्मविश्वास वाटावा अशी आमची इच्छा आहे.”

उत्सव भारताच्या विविधतेचा: 
भारतीय वधूच्या वैविध्यपूर्ण परंपरांचा मलबार गोल्ड अँड डायमंड्स ब्राइड्स ऑफ इंडियाने नेहमीच सन्मान केला आहे आणि या आवृत्तीत देशातील वैविध्यपूर्ण श्रेणीला केंद्रस्थानी आणले आहे. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत प्रत्येक भागात हे कलेक्शन आहे. विशेष म्हणजे यात प्रत्येक सांस्कृतिक ओळख जपणारे दागिने आहेत. यामध्ये राजस्थानची राजेशाही पोल्की कारागिरी, तामिळनाडूची मंदिर-प्रेरित सुवर्ण कलाकृती, केरळची पारंपरिक कसावू-प्रेरित सोन्याचे दागिने आणि बंगाली दागिन्यांच्या वारशाची व्याख्या करणारे गुंतागुंतीचे आकृतिबंध यांचा समावेश आहे.

देशभरात उपलब्ध असलेलं वैविध्यपूर्ण दागिने: 
या संग्रहाला आणखी खास बनवणारी गोष्ट म्हणजे त्याची संपूर्ण भारतात असलेली उपलब्धता. यामुळे देशाच्या कोणत्याही भागातील वधूला, कुठेही, कोणत्याही सांस्कृतिक शैलीतील दागिने निवडण्याची संधी मिळते. चेन्नईमधील वधू राजस्थानी पोलकी सेट निवडू शकते, त्याचप्रमाणे दिल्लीतील वधू दक्षिणेतील प्रसिद्ध टेम्पल ज्वेलरी घालू शकते. मलबारचा विस्तृत डिझाइन संग्रह आणि कस्टमायझेशन कौशल्याचे हे प्रतिबिंब आहे.

2025च्या आवृत्तीत मलबारच्या खास वधूसाठी असलेल्या कलाकृती एकत्र आणल्या आहेत, ज्यात भारतीय वारसा आणि मंदिर कलेपासून प्रेरित असलेला संग्रह, माणिक, पन्ना आणि नीलम रत्नांनी समृद्ध प्रेशिया संग्रह आणि समकालीन तरीही परंपरागत हिऱ्यांचा संग्रह समाविष्ट आहे जो भारताच्या सांस्कृतिक परिदृश्यातून काढलेल्या आकृतिबंधांसह तेजस्वी हिऱ्यांचे मिश्रण करतो. एकत्रितपणे, हे संग्रह भारतीय वधूच्या ओळखीची एक ठळक टेपेस्ट्री तयार करतात आणि गेल्या 15 वर्षांत ब्राइड्स ऑफ इंडियाने उभारलेला समृद्ध वारसा पुढे चालू ठेवतात. 

वधूच्या श्रेणीतील प्रत्येक वस्तू मलबार गोल्ड अँड डायमंड्सच्या कुशल कारागिरांनी डिझाइन, क्युरेट आणि घडवली आहे, ज्यामुळे तिच्या संस्कृतीचा, तिच्या विधिंचा आणि तिच्या लग्नातील शुभ क्षणांचा सन्मान करणारे दागिने निश्चित ठरवले जातात.

महाराष्ट्रीयन वधू शतकानुशतकांच्या जुन्या परंपरेला आधुनिकतेशी जोडते. खेळकर पण शांत, आनंद आणि गांभीर्य यांचे अनोखे मिश्रण त्यात दिसते. तिचा वारसा ती आत्मविश्वासाने पुढे नेत असते. मलबार गोल्ड अँड डायमंडचे दागिने तिच्या याच वेगळ्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब आहेत – तेजस्वी, भावपूर्ण आणि मराठी वधूच्या कालातीत ओळखीचा सन्मान करण्यासाठी डिझाइन केलेले.

प्रार्थना बेहेरे म्हणाली, “महाराष्ट्रीयन विवाह हे अर्थपूर्ण प्रतीकांनी परिभाषित केले जातात – नथ, मुंडावळ्या, हिरव्या बांगड्या, हे अलंकार आयुष्यातील एका नवीन अध्यायाचे प्रतीक आहेत. या तपशीलांमध्ये सांस्कृतिक अभिमान आहे. हे सगळे तपशील ब्राइड्स ऑफ इंडियामध्ये अगदी बारकाईने उतरतात, आपल्या परंपरांचे सार अधोरेखित करते आणि आजच्या वधूशी नैसर्गिकरित्या जोडले जाऊ शकतील अशा डिझाइन सादर करते.”

आलिया भट्ट म्हणाली,”लग्नात प्रत्येक वधू स्वतःचे व्यक्तिमत्त्व जपण्याचा प्रयत्न करते, कोणतीही परंपरा तिच्या नजरेतून कशी दिसते, त्या पद्धतीने ती व्यक्त करते. ब्राइड्स ऑफ इंडिया याचेच प्रतिनिधित्व करते. दागिन्यांच्या माध्यमातून मलबार हेच सुंदरपणे टिपते जे अर्थपूर्ण, समकालीन आणि तिच्या स्वतःच्या कथेशी जोडलेले आहे, असे तिला वाटते.” 

करीना कपूर खान म्हणाली, “प्रत्येक वधू ज्या परंपरांसोबत वाढते त्याच परंपरा जपते आणि लग्नाच्या प्रत्येक विधितून आणि क्षणातून तो वारसा जिवंत करते. ब्राइड्स ऑफ इंडियाबद्दल मला जे आवडते ते म्हणजे, वधूला केंद्रस्थानी ठेवून मलबार या कथांना एका सांस्कृतिक छत्राखाली एकत्र आणते. या मोहिमेचा भाग असणे मला नेहमीच खास वाटले आहे कारण ते आपले मूळ विसरत नाहीत आणि प्रामाणिकपणा तसेच अभिजाततेने ते साजरे करतात.”

अनिल कपूर म्हणाले, “भारतातील लग्नसमारंभ हे उर्जेने भरलेले असतात – संगीत आणि सर्वांना एकत्र आणणारे उत्सव. पण यात एक भावनिक क्षण देखील दडलेला असतो. आपल्या आसपास असलेल्या लोकांच्या भाव-भावनांमधून वधूला आपले जीवन बदलणार असल्याचे जाणवते. ब्राइड्स ऑफ इंडियाबद्दल मला आवडणारी गोष्ट म्हणजे संतुलन: उत्सवांची भव्यता आणि वधूचा जीवन बदलणारा एक प्रवास. या दागिन्यांमध्ये हे दोन्ही बारकावे अत्यंत सुंदरतेने प्रतिबिंबित होतात.”

मलबार गोल्ड अँड डायमंड्स 15व्या आवृत्तीसह भारतातील आघाडीचे वन-स्टॉप ब्राइडल डेस्टिनेशन म्हणून आपले स्थान अधिक मजबूत करत आहे, जे सोने, हिरे, प्लॅटिनम तसेच रत्नजडित दागिन्यांमध्ये संस्कृती जपत आणि समकालीन डिझाइन ऑफर करते. त्याची अनोखी डिझाइन आणि जपलेली सांस्कृतिकता यामुळे आपले वाटतील अशा दागिन्यांच्या शोधात असलेल्या कुटुंबांना मलबार सेवा देत आहे. मलबार गोल्ड अँड डायमंड्स वधूंना त्यांचा वारसा, त्यांची ओळख आणि ते जपून ठेवतील अशा आठवणी प्रतिबिंबित करणारे दागिने एक्सप्लोर करण्यासाठी आमंत्रित करते.

खासदार क्रीडा महोत्सवाचा गुरुवारी समारोप

सुपरस्टार अक्षयकुमारची विशेष उपस्थिती
दोन आठवडे सुरू असलेल्या स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा होणार गौरव

पुणे, ता. २५ : पुण्याचे खासदार आणि केंद्रीय सहकार व नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने आयोजित खासदार क्रीडा महोत्सवाचा येत्या गुरुवारी (२७ नोव्हेंबर रोजी समारोप होणार आहे. खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत दोन आठवडे विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. बालगटापासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत आणि महिलांपासून दिव्यांगांपर्यंत अशा सर्वांचा मोठा प्रतिसाद या स्पर्धेला लाभला. पुणे शहरातील २९ मैदाने आणि क्रीडा संकुलांमध्ये ३७ खेळांच्या विविध स्पर्धा या खासदार क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आल्या. त्यामध्ये तब्बल ४० हजारांहून अधिक आबालवृद्ध, दिव्यांग खेळाडूंनी सहभाग घेतला. आता हा महोत्सव अंतिम टप्पाकडे आला आहे.
या स्पर्धेतील विजेत्यांसाठी, त्यांचा कौतुकसोहळा आयोजित करण्यात आला आहे. गणेश कला क्रीडामंच येथे गुरुवारी सायंकाळी पाच वाजता या समारोप सोहळा पार पडणार आहे. या वेळी प्रसिद्धी कलाकार अक्षय कुमार उपस्थित राहणार आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार असल्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
या वेळी खेलरत्न पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय नेमबाज अंजली भागवत, मुख्य समन्वयक मनोज एरंडे, ऑलिम्पियन रेखा भिडे, माजी कबड्डीपटू शांताराम जाधव, ऑलिम्पियन बॉक्सर मनोज पिंगळे, तेनसिंग नोर्गे पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे, माजी कबड्डीपटू शकुंतला खटावकर, ध्यानचंद पुरस्कार प्राप्त टेनिसपटू नितीन कीर्तने, सुरेखा द्रविड, श्रीरंग इनामदार या आजी-माजी खेळाडूंसह प्रकाश जावडेकर, धीरज घाटे, खा. मेधा कुलकर्णी, आ. भीमराव तापकीर, आ. सुनील कांबळे, आ. सिद्धार्थ शिरोळे, आ. हेमंत रासने, राजेश पांडे आदी नेते उपस्थित राहणार आहे.

या स्पर्धेत एकूण ३७ खेळांचा सहभाग करण्यात आला होता. यात क्रिकेट, फुटबॉल, खोखो, कबड्डी अशा सर्व खेळांचा समावेश होता. गेल्या महिन्याभरापासून शहरातील विविध मैदानांवर या स्पर्धा सुरू होत्या. विजेत्या प्रत्येक खेळाडूला रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. आता या विजेत्या खेळाडूंच्या पाठीवर कौतुकाची छाप द्यावी. त्यांचा कौतुक सोहळा पाहून इतरांनाही खेळाची प्रेरणा मिळावी, या उद्देशाने समारोप सोहळा आयोजित करण्यात आला आहे, असे खासदार मोहोळ म्हणाले.

गेल्या महिन्याभरापासून स्पर्धा सुरू होत्या. खेळाडूंना एक चांगले व्यासपीठ मिळाले. नवोदित खेळाडूंना अनुभवी खेळाडूंचे मार्गदर्शन मिळाले. अनेक स्पर्धा चुरशीच्या झाल्या. अतिशय नेटके नियोजन या स्पर्धेचे करण्यात आले होते. आता या खेळाडूंचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या वर्षी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यातील विजेते उद्या आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करतील, तर आश्चर्य वाटायला नको. या स्पर्धा दरवर्षी आयोजित करण्याचा प्रयत्न करावा, अशी अपेक्षा अंजली भागवत यांनी व्यक्त केली.

महिला सुरक्षिततेसाठी ‘विवाहपूर्व समुपदेशन’ धोरणाचा प्रस्ताव; डॉ. नीलम गोऱ्हे यांचा पुढाकार

0

डॉ. गौरी पालवे-गर्जे मृत्यू प्रकरण : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची मुख्यमंत्र्यांकडे स्वतंत्र चौकशीसह महिला सुरक्षिततेसाठी दीर्घकालीन उपाययोजनांची मागणी

पालवे कुटुंबियांची लवकरच भेट घेणार

मुंबई, दि. २५ नोव्हेंबर २०२५ : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी डॉ. गौरी पालवे-गर्जे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात उच्चस्तरीय, निष्पक्ष आणि दबावमुक्त चौकशीची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठविलेल्या निवेदनात त्यांनी या प्रकरणाचा अभ्यासपूर्ण आढावा घेत राज्यातील महिला सुरक्षितता आणि मानसिक आरोग्याच्या प्रश्नांवर ठोस उपाययोजना राबविण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे.

डॉ. गोर्‍हे म्हणाल्या की, या प्रकरणातील संवेदनशीलता, कुटुंबियांवरचे मानसिक परिणाम आणि आरोपांच्या गांभीर्यामुळे तपास पूर्णपणे स्वतंत्र व पारदर्शक असणे अत्यावश्यक आहे.

निवेदनात त्यांनी प्रथम, वरिष्ठ पोलीस अधिकारी, महिला संस्थांचे प्रतिनिधी, मनोवैज्ञानिक आणि कायदेतज्ज्ञांचा समावेश असलेली विशेष चौकशी समिती (SIT) तत्काळ नेमण्याची मागणी केली. चौकशीदरम्यान कोणताही राजकीय किंवा प्रशासकीय हस्तक्षेप होऊ नये, तसेच तपास यंत्रणा पूर्णपणे स्वतंत्रपणे कार्यरत राहील याची खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

तसेच पीडित कुटुंबावर कोणत्याही प्रकारचा दबाव, धमकी किंवा छळ होऊ नये यासाठी त्वरित प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि सुरक्षा उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली. मृत डॉक्टरांच्या कुटुंबीयांना राज्याच्या माध्यमातून मोफत आणि उच्च दर्जाची कायदेशीर मदत, अधिकृत मनोवैज्ञानिक सल्ला तसेच आवश्यकतेनुसार आर्थिक सहाय्य देण्यावरही त्यांनी भर दिला.

या प्रकरणाचा तपास करण्याची मागणी करताना, ३० दिवसांत प्राथमिक अहवाल आणि ९० दिवसांत अंतिम अहवाल सादर करण्याचे निर्देश देणे आवश्यक असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.

विशेष म्हणजे, विवाहपूर्व समुपदेशन राज्यभर अनिवार्यपणे राबविण्याची त्यांनी महत्त्वाची शिफारस केली. उच्चशिक्षित मुलींसाठी महाविद्यालयीन स्तरावर विवाहपूर्व समुपदेशन, प्रशिक्षित समुपदेशकांची नियुक्ती, गोपनीय तक्रार नोंद प्रणाली, भावनिक सक्षमीकरण सत्रे आणि मानसिक तणाव हाताळणी, नातेसंबंध कौशल्ये, कौटुंबिक तणाव व्यवस्थापन, कायदेशीर हक्क अशा विषयांचा अभ्यासक्रमात समावेश करण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला.

डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नमूद केले की, “डॉ. गौरी पालवे-गर्जे यांचा मृत्यू हा एका कुटुंबाचा व्यक्तिगत शोक नसून, राज्यातील महिलांच्या सुरक्षितता, मानसिक आरोग्य व न्यायप्रणालीवरील विश्वास यांचा गंभीर प्रश्न आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी सरकारने तातडीने आणि ठोस पावले उचलणे काळाची गरज आहे.”

या सर्व प्रक्रियेच्या पारदर्शकतेसाठी आणि कुटुंबाला मानसिक बळ देण्यासाठी डॉ. नीलम गोऱ्हे लवकरच डॉ. गौरी यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांच्या भावना जाणून घेणार आहेत.

अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य गोरक्ष लोखंडे यांनी घेतला विविध प्रकरणांचा आढावा

पुणे, दि. २५: महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य गोरक्ष लोखंडे यांनी आज पुणे येथे विविध प्रकरणात सुनावण्या घेतल्या. लाड पागे समिती शिफारसी प्रकरणे, अनुसूचित जाती घटकातील अनुकंपा, बढती प्रकरणे आदींबाबत सुनावण्या तसेच भारतीय संविधानाच्या प्रचारासाठीच्या ०.५ टक्के निधीबाबतचा आढावाही त्यांनी घेतला.

शासकीय विश्राम गृह पुणे येथे आयोजित विविध सुनावणी व बैठकांबाबत माहिती देताना ते बोलत होते. भारतीय संविधानाला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने प्रत्येक जिल्ह्याच्या वार्षिक योजनेतून ०.५ टक्के निधी संविधानाच्या प्रचारासाठी राखीव ठेवण्यास यावर्षीच्या महाराष्ट्र शासनाच्या अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार जिल्ह्यांमध्ये विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

संविधानाच्या प्रचारासाठीच्या ०.५ टक्के निधीच्या विनियोगाबाबत जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील अनुसूचित जाती घटकातील अनुकंपा प्रकरणे, लाड- पागे समितीच्या शिफारसीनुसार सफाई कामगारांच्या प्रकरणात कार्यवाही आदींबाबत आढावा तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा, १९८९ च्या दाखल प्रकरणांचा आढावा तसेच सुनावण्या घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

नागरिकांना आपल्या समस्यांसाठी मुंबई येथे आयोगाच्या कार्यालयात येणे अडचणीचे होते, यासाठी जिल्ह्यांच्या ठिकाणी जाऊन तेथील प्रश्न सोडविणे, सुनावणी घेणे या उद्देशाने राज्यात जाऊन आयोग सुनावण्या, बैठका घेत आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

फुले दांपत्य भारतीय स्त्रीवादाचे जनक: संगीता झिंजुरके

संविधान दिनानिमित्त एक दिवसीय ‘आम्ही सावित्रीच्या मायलेकी’ महाकाव्य संमेलनाचे उद्घाटन

पुणे: “सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी महिलांना शिक्षणाची दारे खुली करून स्त्रीजातीचा उद्धार केला. जात-धर्मापलीकडे जाऊन प्रगतीच्या वाटेवर घेऊन जाणारे फुले दाम्पत्य भारतीय स्त्रीवादाची जनक आहेत,” असे प्रतिपादन ज्येष्ठ कवयित्री संगीता झिंजुरके यांनी केले.

विश्वबंधुता मूल्यसंवर्धन समिती, काषाय प्रकाशन आणि बंधुता प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनानिमित्त आयोजित ‘आम्ही सावित्रीच्या मायलेकी’ या महाकाव्य संमेलनाच्या उद्घाटनावेळी संगीता झिंजुरके संमेलनाध्यक्ष म्हणून बोलत होत्या. नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात झालेल्या या संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ कवियित्री प्रा. डॉ. सविता पाटील यांच्या हस्ते झाले. प्रसंगी विश्वबंधुता साहित्य परिषदेचे संस्थापक बंधुताचार्य प्रकाश रोकडे, प्रसिद्ध कवी प्रा. चंद्रकांत वानखेडे, स्वागताध्यक्ष सीमा गांधी, प्रा. भारती जाधव, पौर्णिमा वानखेडे आणि प्रा. सायली गोसावी आदी उपस्थित होते.

संगीता झिंजुरके म्हणाल्या, “सावित्रीबाईंच्या साहित्यामधून स्त्रीच्या उद्धारासाठी फुले दाम्पत्याने केलेले कार्य अधोरेखित होते. त्यांनी दिलेला विचार, संविधानाचे कवच यामुळे आज स्त्रीला स्वाभिमानाने जगण्याची संधी मिळत आहे. अनेक क्षेत्रात ती उंच भरारी घेत आहे. शिक्षण हे परिवर्तनाचे साधन आहे. स्त्री ही परिवर्तनाची वाहक असल्याने तिने विवेकी राहत परिवर्तनाचा विचार अंगिकारला पाहिजे. संविधानाच्या मार्गावर चालायला हवे.”

प्रा. डॉ. सविता पाटील म्हणाल्या, “बाईमाणूस मिळालेल्या संधीचे सोने करत असते. संधी मिळण्यासाठी संघटित असणे महत्त्वाचे आहे. समाजाला एकसंघ ठेवण्यासाठी स्त्रीवादाचा विचार मोलाचा आहे. स्त्री शिकली, तर दोन कुटूंब सुधारत असते. सावित्रीबाईंचा त्याग, त्यांनी असंख्य समस्यांना दिलेले तोंड यामुळेच आजची स्त्री मुख्य प्रवाहात मुक्तपणे वावर करू शकत आहेत.” 

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले साहित्य पुरस्कार डॉ. संगीता शिंदे, रंजना बोरा, शशिकला गुंजाळ, निर्मला शेवाळे, शरयू पवार, पंचवटी गोंदले, जयश्री श्रोत्रीय, जया राव, आरती डोंगरे, प्रतिमा साळुंखे, रेवती साळुंखे यांना, तर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार मुस्कान इब्राहिम, देवश्री लव्हे, शुभांगी जाधव, वैष्णवी भोसले, कावेरी कोळी, मानसी तटकरे, दीपाली पुजारी, संध्या बल्लाळ, साक्षी नारायण, रसिका सणस यांना प्रदान करण्यात आला. 

संमेलनाचे सुरुवात बंधुता गीत व दीपप्रज्वलनाने झाली. सीमा गांधी यांनी स्वागत केले. प्रा. भारती जाधव यांनी प्रास्ताविक केले. प्रा. सायली गोसावी यांनी सूत्रसंचालन केले. पौर्णिमा वानखेडे यांनी आभार मानले.

कात्रज मध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई

पुणे- पुण्याचे दक्षिण द्वार कात्रज मध्ये राजकीय आणि शासकीय अशा आशीर्वादाने अनधिकृत बांधकामांचे जंगल उभे राहिले असून त्याचबरोबर शेकडो नागरिकांनी अतिक्रमणे करून रस्त्यांच्या बाजूला दुकाने थाटली आहेत आणि या परिसरातील नागरी सुविधांचे तीन तेरा वाजवून ठेवले आहेत . डोंगर फोड , अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमनांसह दारू धंदे व गुन्हेगारी बाबत सातत्यने नाव येऊ लागलेल्या कात्रज परिसरात आता महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम निर्मुलन आणि अतिक्रमण विभाग या दोहोंनी नजर वळविली असून कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाला उडवून लावायची तयारी ठेवत कारवाई सुरु केली आहे.

बांधकाम विकास विभाग दोन क्रमांक दोन अंतर्गत कात्रज परिसरातील माऊली नगर सुखसागर नगर येथे जवळपास 4500 चौरस फूट क्षेत्रावर अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली सदर कारवाई मध्ये दोन जेसीबी ब्रेकर पोलीस एम एस एफ व बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

स.प.महाविद्यालय, मुख्य इमारत शताब्दी निमित्ताने, माजी विद्यार्थी सनदी अधिकारी मेळावा

शिक्षण प्रसारक मंडळी च्या पुढाकाराने आयोजन
पुणे : सर परशुरामभाऊ महाविद्यालयाने प्रशासकीय सेवेत अधिकारी असणाऱ्या आपल्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा शनिवार, दिनांक २९ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता लेडी रमाबाई सभागृहामध्ये आयोजित केला आहे. शिक्षण प्रसारक मंडळीच्या पुढाकारातून हा मेळावा संपन्न होत आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश मोहरील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला स.प.महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष केशव वझे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश मोहरील आणि डॉ. संज्योत आपटे उपस्थित होते.

शिक्षण प्रसारक मंडळीने मागील वर्षापासून बी.ए, सिव्हिल सर्विसेस हा नवीन अभ्यासक्रम सुरू केला आहे. महाविद्यालयाच्या ऐतिहासिक वारसा सांगणाऱ्या इमारतीचे हे शताब्दी वर्ष आहे. त्याचप्रमाणे केंद्रीय लोकसेवा आयोगाचे ही हे शताब्दी वर्ष आहे. या सर्व गोष्टींचा संगम साधून महाविद्यालयाने हा मेळावा आयोजित केला आहे. सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत महाविद्यालयाच्या प्रांगणात हा मेळावा असेल.

लेडी रमाबाई सभागृहामध्ये सकाळी ११ वाजता  शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष सदानंद फडके, शिक्षण प्रसारक मंडळीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष ॲड.एस.के.जैन, नियामक मंडळाचे उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष केशव वझे, सचिव डॉ. राधिका इनामदार व शिक्षण प्रसारक मंडळीच्या नियामक मंडळाच्या सर्व सदस्यांच्या उपस्थितीत या मेळाव्याचे उद्घाटन होईल.  

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश मोहरील म्हणाले, संसदेचे माजी सदस्य, सिक्कीमचे माजी राज्यपाल, प्रशासकीय सेवेतून निवृत्त झालेले आय.ए.एस अधिकारी व महाविद्यालयाचे ज्येष्ठ माजी विद्यार्थी  श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन होईल. या उद्घाटन समारंभात महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असणारे असे प्रशासकीय सेवेतील पन्नासहून अधिक अधिकारी सहभागी होतील. या सर्वांचे स्वागत व सत्कार या समारंभात करण्यात येईल.

उद्घाटन समारंभानंतर नागरी सेवेत काम करण्यास इच्छुक असणाऱ्या व त्यासाठी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या विविध गटांमध्ये प्रशासकीय अधिकारी सहभागी होतील. त्यांच्या तेथील व्याख्यानांमधून ते विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवेबाबत मार्गदर्शन करतील. महाविद्यालयाचे विद्यार्थी यावेळेस या अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधतील. या संवादातून सध्याच्या या विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवेतील विविध संधींची माहिती मिळेल, ते प्रेरित होतील, राष्ट्रहित,राष्ट्राचा विकास, सामाजिक बांधिलकी यासाठी ते जागरूक होतील, अशी आशा आहे.

यानंतर विद्यार्थ्यांसमवेत हे अधिकारी महाविद्यालयाच्या परिसरात फिरतील. त्यांच्या काळात कार्यरत असणाऱ्या महाविद्यालयाच्या माजी शिक्षकांशी त्यांच्या भेटीगाठी होतील. जुने ऋणानुबंध पुन्हा जागे होतील व या अधिकाऱ्यांच्या महाविद्यालयातील आपल्या स्मृतींना उजाळा मिळेल. महाविद्यालयाशी असणारा त्यांचा अनुबंध घट्ट होईल. यानंतर महाविद्यालयातील कला मंडळाच्या विद्यमान विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने मेळाव्याचा समारोप होईल. मेळाव्यात आय.ए.एस, आय.पी.एस, आय.आर.एस व इतर प्रशासकीय सेवेतील अधिकारी त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या विविध संवर्ग सेवेतील अधिकारी या मेळाव्यात सहभागी होत आहेत.

*स.प. महाविद्यालय इमारतीच्या शताब्दी वर्षात विविध कार्यक्रम
शिक्षण प्रसारक मंडळीने सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या ऐतिहासिक वारसा असणाऱ्या इमारतीच्या या शताब्दी वर्षात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे निश्चित केले आहे. राष्ट्र बांधणी व देशाचा विकास, सामाजिक बांधिलकी व सामाजिक कार्यात विद्यार्थ्यांचा सहभाग ही उद्दिष्टे निश्चित करून विविध कार्यक्रमांचे आयोजन शिक्षण प्रसारक मंडळी वर्षभर करणार आहे. नागरी सेवेत अधिकारी असणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा हा यातील पहिला कार्यक्रम आहे. विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्यासाठी प्रेरणादायी ठरेल.

*संस्था व महाविद्यालयाविषयी
शिक्षण प्रसारक मंडळी ही पुण्यातील एक नामवंत अग्रगण्य शैक्षणिक संस्था आहे. या संस्थेला शंभर वर्षांहून मोठी उज्ज्वल परंपरा आहे. या संस्थेकडून १९१६ मध्ये पुण्यात सर परशुरामभाऊ महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. आज हे महाविद्यालय अधिकार प्रदत्त स्वायत्त महाविद्यालय आहे. मोठी परंपरा व वारसा असणाऱ्या या महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या अनेक पिढ्या घडविल्या आहेत. या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, प्रशासन अशा विविध क्षेत्रांत आपला स्वतंत्र ठसा उमटवला आहे. आज हे विद्यार्थी समाजामध्ये प्रतिष्ठित नागरिक आहेत. आम्ही सर परशुरामभाऊ महाविद्यालयाचे विद्यार्थी आहोत; हे ते अभिमानाने सांगतात. महाविद्यालयाबरोबरचे त्यांचे बंध भक्कम राहिले आहेत. महाविद्यालयातील अनेक कार्यक्रमांमध्ये ते सहभागी होत असतात. मूल्यात्मक शिक्षण, राष्ट्रहित व राष्ट्राचा विकास हे महाविद्यालयाचे नेहमीच धोरण राहिले आहे. उज्ज्वल परंपरा, वर्तमानाचे भान व भविष्याचा वेध घेत हे महाविद्यालय आपली शतकोत्तरी वाटचाल करीत आले आहे.

रामायण ही केवळ कथा नसून आदर्शाचा मार्ग  

प्रख्यात निरुपणकार डॉ. धनश्री लेले यांचे मत ; ग्रंथ पारायण दिंडी पुणे च्यावतीने अयोध्या येथे झालेल्या रामरक्षा पठण वर्षपूर्ती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन
पुणे : रामायण हा प्रभू श्रीरामाच्या जीवनाचा प्रवास नसून, सदाचार, कर्तव्यभावना आणि सत्याच्या मार्गावर चालण्याचा संदेश देणारा जीवनमार्ग आहे. आजच्या काळातील पिढीला रामायण ही फक्त प्रभू श्रीरामाची गोष्ट वाटते. मात्र रामायण म्हणजे केवळ कथा नसून श्रीरामाने आचरणात आणलेला आदर्श मार्ग आहे, असे मत निरुपणकार डॉ. धनश्री लेले यांनी व्यक्त केले.

ग्रंथ पारायण दिंडी पुणे च्यावतीने अयोध्या येथे झालेल्या रामरक्षा पठण वर्षपूर्ती, चातुर्मासातील व्रताची सांगता आणि घरोघरी रामरक्षा स्तोत्र पठाणाच्या संकल्पपूर्ती निमित्त सदाशिव पेठेतील गीता धर्म मंडळ येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले, रा.स्व.संघ कसबा भाग संघचालक प्रशांत यादव, डाॅ. संजीव डोळे, संस्थेचे विरेंद्र कुंटे, नंदकुमार देव आदी उपस्थित होते. यावेळी देव, देश आणि धर्मासाठी कार्य करणाऱ्या संस्था आणि शालेय संस्थांचा सन्मान करून त्यांना मदतनिधी प्रदान करण्यात आला. श्री यशोधन नागरी सहकारी पतसंस्था पुणे व चौफेर प्रतिष्ठान यांचे सहाय्य लाभले.

डॉ. धनश्री लेले म्हणाल्या, जीवनात वेळेचे खूप महत्व सांगितले आहे. जर आपण ठराविक वेळेनुसार आहार घेतला तर शरीरात जैविक घड्याळे तयार होतात आणि त्या विशिष्ट वेळीच आपल्याला भूक लागते. म्हणून उपासना देखील ठराविक वेळेला केल्यास मनालाही त्या वेळेची सवय लागते आणि उपासनेची भूक निर्माण होते. ज्या वेळेला आपण नियमित उपासना करतो, त्या वेळेला परमेश्वरही आपल्या भक्तीची वाट पाहतो. आपण त्यावेळेला उपासना न केल्यास परमेश्वरच आपल्या नावाने हाक मारतो, असेही त्यांनी सांगितले.

प्रशांत यादव म्हणाले, आपल्या ग्रंथांमध्ये कर्तव्याचा स्पष्ट उपदेश देण्यात आला आहे. देव, देश आणि धर्म ही जीवनशैली प्रत्येकाने मनापासून स्वीकारली पाहिजे आणि ती दैनंदिन व्यवहाराचा भाग झाली पाहिजे. जर प्रत्येकाने या मूल्यांचे पालन केले तर भारताला महासत्ता होण्यापासून जगातील कोणतीही शक्ती रोखू शकत नाही, असेही त्यांनी सांगितले. कृषीकेश रावले म्हणाले, या अशा संस्थांच्या कार्याची प्रेरणा घेवून प्रत्येकाने खारीचा वाटा उचलून काम केले पाहिजे. मी देखील पुणे शहरासाठी काम करताना तुमच्याकडून येणाऱ्या सूचनांचा स्विकार करून काम करीन, असेही त्यांनी सांगितले.

विरेंद्र कुंटे म्हणाले, अयोध्या येथे झालेल्या रामरक्षा पठण वर्षपूर्ती, चातुर्मासातील व्रताची सांगता आणि घरोघरी रामरक्षा स्तोत्र पठाणाच्या संकल्पपूर्ती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त प्रत्येक घरात रामरक्षा पठण झाले पाहिजे या संकल्पाची पूर्ती झाली असली तरी देखील पुढे देखील ते कार्य असेच सुरू रहावे व जास्तीत जास्त नागरिक या संकल्पात जोडले जावेत असे प्रयत्न करू असेही त्यांनी सांगितले. अलका विंझे यांनी सूत्रसंचालन यांनी केले. विरेंद्र कुंटे यांनी आभार मानले.

प्रिंट तिकीट बंद, डिजिटल तिकिटाचा मेट्रोहट्ट: वृद्धेची आबाळ, ‘आप’ संतापली, मेट्रोला शहाणी हो, म्हणाली…

पुणे- डिजिटल इंडिया होत असताना पुण्यात काही अधिकारी एकीकडे निवडणूक आयोगाच्या नावाने डिजिटल मिडीयाला विरोध करत आहेत आणि प्रिंट ला पायघड्या घालीत आहेत तर दुसरीकडे मेट्रोने काल अचानक येरवडा मेट्रो स्टेशन वर प्रिंट तिकीट देणे बंद केले आणि डिजिटल म्हणजे मोबाईलवर तुमच्या डिजिटल तिकीट घेण्याचा आग्रह सुरु केला यामुळे अत्यंत साधा मोबाईल असलेल्या एका आजीबाईंची मोठ्ठी पंचाईत झाली पण इथे मात्र मेट्रोने डिजिटल इंडिया चा धोशा लावला आणि तुमच्या मोबाईल वर वॉट्सअ‍ॅपवर २ तिकिटे पाठविल्याचे सांगून त्यांची बोळवण करण्याचा प्रयत्न केला . आज्जीबाई कडे ना whatsaap ना इन्टरनेट , साधा मोबाईल … त्यांनी पेपर तिकीट देण्याची विनंती केली असता, उपस्थित कर्मचारी भूषण शिंदे, रणजीत तावडे, जितेंद्र रामटेके, प्रवीण इंगळे यांनी तिकीट देण्यास नकार देत अवमानकारक वर्तन केले.या घटनेने आम आदमी पार्टीने संताप व्यक्त केला असून …. जिथे प्रिंट तिकीट देणे आवश्यक आहे तिथे असला शहाणपणा चालणार नाही असा इशारा आम आदमी पार्टीने यावेळी दिला

राज्य समन्वयक अमित म्हस्के,शहर उपाध्यक्ष श्रद्धा शेट्टी,शहराध्यक्ष, कामगार आघाडी संजय कोनेसंघटन सह-मंत्री मनोज शेट्टी,युवा आघाडी सचिव ॲड. रवी वडमारे,सदस्य अरुण केदारी यांनी येथे धाव घेतली आणि मेट्रोला सुनावले आहे.

या प्रकरणी ते म्हणाले,दिनांक २४/११/२०२५, सोमवार रोजी सायंकाळी ५ वाजता, पक्षाचे संघटन सहमंत्री मनोज शेट्टी यांच्या आई व आज्जी पुणे मेट्रोने प्रवास करण्यासाठी येरवडा मेट्रो स्टेशन येथे तिकीट काढण्यासाठी गेल्या असता अत्यंत गंभीर अशी घटना घडली.तिकीट काउंटरवर असताना एका महिला कर्मचारीने त्यांच्या मोबाईलवर डिजिटल पद्धतीने वॉट्सअ‍ॅपवर दोन प्रवासी तिकीट डाउनलोड करून दिले.
मात्र संबंधित प्रवासी निरक्षर आणि वयवृद्ध असल्याने त्यांच्याकडे फिचर फोन (साधा मोबाईल) होता व डिजिटल तिकीट वापरणे त्यांना शक्य नव्हते. त्यामुळे पुढील प्रवास कसा करायचा, असा प्रश्न शेट्टी यांनी कर्मचाऱ्यांना विचारला.पेपर तिकीट सुविधा बंद असल्यामुळे हा त्रास निर्माण झाला असून पुणेकरांना डिजिटल तिकीटाच्या नावाखाली होणारा त्रास असह्य आहे.यामुळे आम आदमी पार्टीने पुणेकरांच्या सोयीसाठी आणि विशेषतः वरिष्ठ नागरिक,निरक्षर प्रवासी,फिचर फोन वापरणारे नागरिक आणि ज्यांना हवे त्यांना सर्व मेट्रो स्टेशनवर पेपर तिकीट तात्काळ सुरू करावे.अन्यथा…पेपर तिकीट सुरू न झाल्यास आम आदमी पार्टी च्या वतीने मेट्रो रोको आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा दिला आहे.

संविधान दिनानिमित्त राज्यातील शाळांमध्ये मूल्याधारित उपक्रम राबविण्याचे आवाहन

पुणे दि. 25 : दरवर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस २०१५ पासून संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय संविधान स्वीकारल्याच्या स्मरणार्थ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील मसुदा समितीच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी हा दिवस विशेषत्वाने पाळला जातो. यावर्षीही २६ नोव्हेंबर रोजी राज्यातील सर्व शाळा मध्ये संविधान दिन साजरा करण्याच्या सूचना श्री. राहुल रेखावार,संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांनी केल्या आहेत.
२६ नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त राज्यातील सर्व शाळांनी मूल्यवर्धन कार्यक्रमाशी सुसंगत पुढीलप्रमाणे उपक्रम राबवावेत. यात संविधान प्रभात फेरी, संविधान व्याख्यानमाला- सेमिनार, संविधान विषयक चित्रकला पोसटर स्पर्धा, संविधानावर आधारित प्रश्नमंजुषा, संविधान विषयक पथनाट्य, पोवाडा-गणी सादरीकरण, मानवी साखळी निर्मिती, हस्तकला स्पर्धा आदि स्पर्धात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावेत. तसेच संवैधानिक मूल्यांवर शपथवाचन,संविधान प्रस्तावनेचे वाचन,लोकशाही मूल्यांवरील चित्रकला, निबंध, घोषवाक्य स्पर्धा,संविधान विषयक व्याख्यान, परिसंवाद,न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुता याबाबत चर्चा सत्रे इ. उपक्रम राबवावेत.

अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नागरिकत्वाची जाणीव, सामाजिक जबाबदारी, सहकार्य, सामाजिक संवेदनशीलता आणि लोकशाही मूल्यांची दृढ स्थापना होईल. परिणामी संविधान दिन हा मूल्याधिष्ठित शिक्षणाचा अनुभव देणारा प्रभावी दिवस ठरेल असे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, यांनी आपल्या परिपत्रकात नमुद केले आहे.