मंगळवारी दुपारी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू झाला. पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये मंगळवारी दुपारी २.४५ वाजता झालेल्या या हल्ल्यात २० हून अधिक लोक जखमी झाले.लष्कर-ए-तैयबाची शाखा द रेझिस्टन्स फ्रंट (TRF) ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. दरम्यान, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले की, या हल्ल्यात आमचा कोणताही हात नाही.मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की पर्यटकांवर गोळीबार करण्यापूर्वी दहशतवाद्यांनी त्यांची नावे विचारली आणि त्यांना कलमा म्हणायला लावला. त्यापैकी एक उत्तर प्रदेशातील शुभम द्विवेदी होता, ज्याला त्याचे नाव विचारल्यानंतर दहशतवाद्यांनी डोक्यात गोळी मारली. मृतांमध्ये उत्तर प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि ओडिशातील पर्यटकांचा समावेश आहे. नेपाळ आणि युएईमधील प्रत्येकी एक पर्यटक आणि दोन स्थानिक नागरिकांचाही मृत्यू झाला.हल्ल्यानंतर देशातील इतर शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी श्रीनगरमध्ये पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली. ते आता बेअर्सन व्हॅलीमध्ये पोहोचले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी सकाळी सौदी अरेबियाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावरून भारतात परतले. ते सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीची बैठक घेतील.१४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामा हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमधील हा सर्वात मोठा हल्ला आहे. पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर आत्मघातकी हल्ला झाला होता, ज्यामध्ये ४० जवान शहीद झाले होते. जैश-ए-मोहम्मदने याची जबाबदारी घेतली होती.
पहलगाम हल्ल्यातील संशयित दहशतवाद्यांचे स्केच जारी:गुप्तचर यंत्रणांनी सांगितले- लष्करचा दहशतवादी सूत्रधार पाकिस्तानात
रूपाली ठोंबरे पाटील पती, कुटुंबासह जम्मू काश्मीरमध्ये अडकल्या..
पुणे-अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रूपाली ठोंबरे या देखील केले जम्मू-काश्मीरला गेलेल्या आहेत. दहशतवादी हल्ला झाल्यानंतर त्यांनी आम्ही सर्वजण सुखरुप असल्याचे त्यांनी सांगितला आहे. तसेच अडकलेल्या पर्यटकांना महाराष्ट्र येण्यासाठी तात्काळ सोय करण्याची विनंती देखील त्यांनी सरकारकडे केली आहे.या संदर्भात रूपाली ठोंबरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधून आपण जम्मू-काश्मीरमध्ये असल्याचे सांगितले आहे. ही घटना घडली त्या ठिकाणी देखील आम्ही जाऊन आलो आहोत. त्यामुळे आम्ही सर्वजण खूप घाबरलेलो असल्याचे रूपाली ठोंबरे यांनी सांगितले. आमच्या सोबत नाशिक मधील देखील काही पर्यटक आहोत. मात्र, आम्ही सर्व सुरक्षित असलो तरी आम्हाला इथून निघण्यासाठी विमानाची व्यवस्था करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या ठिकाणची परिस्थिती आणि ज्यांच्यावर हल्ला झाला त्यांच्या परिस्थितीचा आम्ही विचारही करू शकत नाही. येथे हल्ला झाला असला तरी या ठिकाणी काम करणाऱ्या स्टाफ मध्ये अनेक मुस्लिम बांधव आहेतच. या दरम्यान आम्हाला आदील नावाच्या एका व्यक्तीने मोठी मदत केली आहे. ते आजही आम्हाला भेटण्यासाठी आले असल्याचे रूपाली ठोंबरे यांनी सांगितले. मात्र, सरकारने जी कारवाई करायची त्यांनी करावी. मात्र आधी पर्यटकांना त्यांच्या घरी तातडीने पोहोचवावे. येथील परिस्थितीत बिकट आहे, असे देखील रूपाली ठोंबरे यांनी म्हटले आहे.
आमच्या सोबत अनेक लहान मुले आहोत. आम्ही सर्वजण सेफ नाहीत. माझे या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी बोलत झाले आहे. मुरलीधर मोहोळ यांच्याशी बोलून त्यांनी विमानाची सोय करून द्यावी, अशी विनंती त्यांना केली आहे. तसेच ही सर्व मदत तातडीने करून पर्यटकांना लवकरात लवकर बाहेर काढणे गरजेचे असल्याचे ठोंबरे यांनी म्हटले आहे.
या संदर्भात रुपाली ठोंबरे म्हणाल्या की, माझ्या सर्व कुटुंबासह श्रीनगर जम्मू-काश्मीरला फिरायला आलो होतो. आजचा हल्ला झाला त्यानंतर आम्ही प्रचंड घाबरलेलो आहोत. काही पर्यटक आजच आलेले आहेत. तर काही जणांच्या परवा आणि त्यानंतरच्या फ्लाईटचे तिकीट आहे. माझे महाराष्ट्र शासन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना विनंती आहे. इथे पर्यटक अडकून पडले आहेत. त्यांना तात्काळ महाराष्ट्रात येण्याची व्यवस्था करण्यात यावी. इथे सर्वत्र प्रचंड दहशत पसरलेली आहे. सर्व पर्यटक आपल्याला लहान मुलांसोबत फिरायला आलेले असल्याचे देखील रूपाली ठोंबरे यांनी म्हटले आहे.
9370960061 पुण्यातील पर्यटकांसाठी प्रशासनाचा क्रमांक:264 पुणेकर पुलगावमध्ये अडकले; सर्वांना सुखरूप आणणार -मोहोळ
पुणे-जम्मू-काश्मिरातील अडकलेल्या सर्व पर्यटकांच्या आम्ही संपर्कात आहोत. आज संध्याकाळी किंवा जास्तीत जास्त उद्यापर्यंत सर्व पर्यटकांना मुंबई आणि पुण्यात आणण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. पर्यटकांनी काळजी करू नये, आम्ही त्यांच्यासोबत आहोत, असे देखील ते म्हणाले. यासाठी श्रीनगर येथील जिल्हाधिकाऱ्यांशी आमचे बोलणे झाले असून त्यासाठी एक मदत कक्ष क्रमांक देखील त्यांनी जाहीर केला. या सर्व पर्यटकांनी 9370960061 या किंवा 020-26123371 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
पुणे कलेक्टर ऑफिस ने सुरु केलेल्या हेल्प लाइनवर आतापर्यंत कश्मीर मध्ये अडकलेल्या 264 जणांनी संपर्क साधला आहे. हा आकडा आणखीन वाढू शकतो, अशी शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन भागातील जम्मू-काश्मीरच्या सहलीला गेलेल्या 67 पर्यटकांचा एक ग्रुप पुलगावमध्ये अडकले आहेत. यामध्ये महिला आणि मुलांचाही समावेश आहे. पर्यटकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सुरक्षित परतीसाठी आवाहन केले आहे. या संदर्भात प्रशासन देखील अडकलेल्या सर्व पर्यटकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे.
दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भीतीचे वातावरण आहे. आम्ही रात्रभर संपर्कात आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व महाराष्ट्रातील लोकांना परत आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी आज दुपारी व्हाया मुंबई पुण्याला एक स्पेशल विमान येणार असल्याचे मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. पुण्यातील तीन-चार मोठे ग्रुप तेथे अडकले आहेत. या सर्वांशी आम्ही संपर्कात असल्याचे मोहोळ यांनी सांगितले. या नागरिकांसाठी मुंबई मार्गे पुण्यात आणण्यासाठी स्पेशल विमान बुक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी देखील माहिती त्यांनी दिली.
महाराष्ट्रातील जे नागरिक जम्मू-काश्मीरमध्ये अडकली आहेत त्या सर्व नागरिकांना परत आणण्याची व्यवस्था आपण करत आहोत. अडकलेल्या प्रवाशांमध्ये भीती आहे, ती आता निश्चितपणे कमी होत आहे. आम्ही त्या सर्व नागरिकांच्या संपर्कात आहोत, असे देखील मोहोळ यांनी सांगितले. यासंदर्भात पालकमंत्री अजित पवार आणि पुणे जिल्हाधिकारी यांच्याशी देखील चर्चा झाली असल्याची माहिती मुरलीधर मोहोळ यांनी दिली. आपले कोणी नातेवाईक किंवा मित्रपरिवार अडकलेले असतील तर त्यांनी तात्काळ नियंत्रण कक्षाच्या क्रमांकावर संपर्क साधण्याचा आवाहन मोहोळ यांनी केले आहे.
पुण्यातील असंख्य पर्यटक काश्मीर मध्ये अडकले, महाराष्ट्र सरकारकडे परतण्यासाठी आवाहन,पहा नावांची यादी
पुणे- पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, जम्मू-काश्मीरच्या सहलीला गेलेले सांख्य पर्यटक पुलगावमध्ये अडकले आहेत. यामध्ये महिला आणि मुलांचाही समावेश आहे. पर्यटकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सुरक्षित परतीसाठी आवाहन केले आहे.या शिवाय आदित्य जनार्दन खटाटे, हडपसर पुणे येथील रहिवासी असून त्यांनी सांगितले कि मी व इतर शिरूर दौंड इत्यादी ठिकाणातील रहिवासी असे एकूण ६५ लोक श्रीनगर येथे Hotel Mountain येथे आहोत.
आज दिनांक २२/०४/२०२५ रोजी पहेलगाम वरून श्रीनगर येथे सुखरूप पोहोचलो आहोत.
तरी आम्हाला श्रीनगर येथून सुखरूप आपल्या जिल्ह्यात म्हणजेच पुणे येथे पोहोचवावे हीच प्रशासनास विनंती.
आम्ही रहिवासी खालील प्रमाणे:
1. Jyoti Zurunge (9860596889)
2. Aditya Janardan Khatate (9552729057)
3. Janardan Baban Khatate
4. Manisha Janardan Khatate
5. Kajal Aditya Khatate
(Kajal Ramesh Pore)
6. Dnyaneshwar Jawalkar
7. Sadhana Jawalkar
8. Nilesh Umbarkar
9. Jyoti Umbarkar
10. Aarya Umbarkar
11. Bhumi Umbarkar
12. Prasad Sawant
13. Deepa D Sawant
14. Deepa P Sawant
15. Rakesh Takale
16. Ashwini Takale
17. Siddhant takale
18. Sunil Nikam
19. Rekha Nikam
20. Dipali Gaikwad
21. Vaishanavi Gaikwad
22. Tejashree Gaikwad
23. Manisha gaikwad
24. Nirmala Adak
25. Vaishali Dhagate
26. Kiran Wagmode
27. Samsher Shaikh
28. Shain Shaikh
29. Siddhik Shaikh
30. Shirish Deshmukh
31. Bhagyashree Deshmukh
32. Prajwal Kulal
33. Ashwini Futane
34. Nasir Shaikh
35. Vinod Yadav
36. Komal Yadav
37. Amol Hambir
38. Mona Hambir
39. Arohi Hambir
40. Govind Yadav
41. Jyoti Yadav
42. Kaivalya Yadav
43. Amol Mhaske
44. Swapnali Mhaske
45. Varsha Kanchan
46. Aarya Kanchan
47. Yuvraj Hole
48. Tejashree Hole
49. Tanishk Hole
50. Chitraksh Hole
51. Savita Lonkar
52. Satish Gaikwad
53. Darshana Gaikwad
54. Prrajwal kutwal
55. Sandhya Dedge
56. Shaunak Dedge
57. Rohini Gaikwad
58. Aditya Gaikwad
59. Prathamesh Zurunge
60. Shalini nagekar
61. Shraddha Kale
62. Sai Kale
63. Sheha Kulal 64. Alka kudale
65. Klapna gaykwad
66. Sushma shindi
67. Rupali tambe
68. Dipali lokhande










हाफिज सईदचा सहकारी सैफुल्ला खालिद पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार
पहलगाम हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ म्हणजेच ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ ने घेतली आहे. जी पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाची एक आघाडी आहे. जम्मू आणि काश्मीरमधील लष्कर आणि टीआरएफच्या दहशतवादी कारवायांमागे दहशतवादी
हाफिज सईदच्या खूप जवळचा
सैफुल्ला खालिद या हल्ल्यांचा सूत्रधार असल्याचे म्हटले जात आहे.
लष्कर-ए-तैयबाचा उपप्रमुख सैफुल्ला खालिद हा सैफुल्ला कसुरी या नावानेही ओळखला जातो. तो भारताचा सर्वात मोठा शत्रू हाफिज सईदच्या खूप जवळचा आहे. भारतातील अनेक मोठ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये त्याचे नाव घेतले गेले आहे. तो नेहमीच आलिशान गाड्यांमधून प्रवास करतो. लष्कराचे दहशतवादी नेहमीच त्याच्या संरक्षणासाठी अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज असतात. पाकिस्तानमधील त्याचा प्रभाव एवढा आहे कि त्याठिकाणचे लष्करी अधिकारीही त्याच्यावर पुष्पवृष्टी करतात. तो पाकिस्तानी सैन्याच्या सैनिकांना भडकवण्याचे काम करते.
ताज्या दहशतवादी हल्ल्याच्या फक्त दोन महिने आधी, सैफुल्ला खालिद पाकिस्तानातील पंजाबमधील कंगनपूर याठिकाणी पोहोचला होता, जिथे पाकिस्तानी सैन्याची एक मोठी बटालियन आहे. तिथे पाकिस्तानी सैन्याचे कर्नल जाहिद जरीन खट्टक यांनी त्यांना जिहादी भाषण देण्यासाठी आमंत्रित केले होते. तो त्याठिकाणी पोहोचल्यानंतर कर्नलने स्वतः त्याच्यावर फुले उधळली. यानंतर, त्यांनी पाकिस्तानी सैन्याला भारताविरुद्ध जोरदार चिथावणी दिली. त्याने असेही म्हटले की “जितके जास्त भारतीय सैनिक ते मारतील तितके जास्त अल्लाह त्यांना बक्षीस देईल.”
पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा याठिकाणी झालेल्या बैठकीत त्याने भारताविरुद्ध विष ओकले होते. त्यावर लिहिले होते, “मी वचन देतो की आज २ फेब्रुवारी २०२५ आहे.” २ फेब्रुवारी २०२६ पर्यंत आम्ही काश्मीर काबीज करण्याचा पूर्ण प्रयत्न करू. येणाऱ्या काळात आमचे मुजाहिदीन त्यांचे हल्ले तीव्र करतील. आम्हाला आशा आहे की २ फेब्रुवारी २०२६ पर्यंत काश्मीर मुक्त होईल.” ही बैठक आयएसआय आणि पाकिस्तानी लष्कराने संयुक्तपणे आयोजित केली होती. त्याचे ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने सशस्त्र दहशतवादी जमले होते.
एका गुप्तचर अहवालानुसार, गेल्या वर्षी शेकडो पाकिस्तानी मुलांनी अबोटाबादच्या जंगलात आयोजित केलेल्या दहशतवादी छावणीत भाग घेतला होता. हे लष्कर-ए-तैयबाच्या राजकीय शाखा पीएमएमएल आणि एसएमएलने आयोजित केले होते. यामध्ये सैफुल्लाह कसुरी देखील उपस्थित होता. त्याने या छावणीतील मुलांना दहशतवादी हल्ल्यांसाठी निवडले होते, ज्यांना नंतर लक्ष्य हत्या करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. इथेही सैफुल्लाहने भारताविरुद्ध भडकाऊ भाषण देऊन तिथे उपस्थित असलेल्या मुलांना भडकवले होते.
या मुलांना दहशतवादी प्रशिक्षण दिल्यानंतर, पाकिस्तानी सैन्याच्या मदतीने त्यांना सीमेपलीकडून घुसखोरी करण्यास भाग पाडले जात असल्याचेही समोर आले. ५ ऑगस्ट २०१९ रोजी संविधानात सुधारणा करून जम्मू आणि काश्मीरमधून कलम ३७० आणि ३५ अ रद्द करण्यात आले. यानंतर, आयएसआयने पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद यांना कव्हर करण्यासाठी टीआरएफ म्हणजेच ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ ची स्थापना केली. पाकिस्तानी सैन्य या दहशतवादी संघटनेला मदत करते. लष्कराच्या निधीच्या माध्यमांचा वापर केला जातो.
गृह मंत्रालयाने राज्यसभेत असेही सांगितले होते की, “द रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) ही लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेची एक आघाडी संघटना आहे.” टीआरएफ २०१९ मध्ये अस्तित्वात आला. तेव्हापासून ते जम्मू आणि काश्मीरमध्ये सतत दहशतवादी हल्ले करत आहे. टीआरएफचे ‘हिट स्क्वॉड’ आणि ‘फाल्कन स्क्वॉड’ येत्या काळात काश्मीरमध्ये मोठे आव्हान निर्माण करू शकतात. या दहशतवादी मॉड्यूलला लक्ष्य हत्या करण्याचे आणि जंगलात आणि उंच भागात लपण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
मोदींबाबत अपशब्द वापरत गोळीबार
दहशतवाद्यांच्या भीतीने आम्ही तंबूत शिरलो. त्यांनी माझे ५४ वर्षीय वडील संतोष यांना बाहेर बोलावून कुराणातील ओळी (कलमा) म्हणण्यास सांगितले. त्यांनी जेव्हा म्हटल्या नाहीत तेव्हा त्यांना डोक्यात, पाठीत व कानात गोळ्या घातल्या असे २६ वर्षीय आसावरी जगदाळे यांनीPTI या वृत्तसंस्थेला हल्ल्याच्या वेळचा अनुभव सांगितला.तसेच तुम्ही मोदींना पाठिंबा देता असे सांगत गोळ्या झाडल्याचे त्यांनी नमूद केले.
पुण्यातील उद्याोजक संतोष जगदाळे यांच्या कुटुंबाला या घटनेने धक्का बसला. वडील जमिनीवर कोसळल्यावर त्यांच्या शेजारी असलेल्या काकांनाही गोळ्या घातल्या. आम्ही पाच जण होतो. आसावरी या मनुष्यबळ विकास संसाधन क्षेत्रात कार्यरत आहेत. स्थानिक पोलिसांप्रमाणे हल्लेखोरांचा वेश होता. संरक्षणासाठी आम्ही शेजारच्या तंबूत गेल्याचे आसावरी यांनी नमूद केले. आमच्याप्रमाणे सहा ते सात पर्यटक देखील पडून राहिले. आम्हाला सुरुवातीला दहशतवादी व सुरक्षारक्षक यांच्यात ही चकमक सुरू आहे असे वाटले. दहशतवाद्यांच्या गटाने सुरुवातीला शेजारच्या तंबूत येत गोळीबार केला. त्यानंतर आमच्या तंबूकडे येत माझ्या वडिलांना चौधरी तू बाहर आ जा असे दरडावल्याचे आसावरी यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देत असल्याबद्दल शेरेबाजी केली. पाठोपाठ काश्मिरी दहशतवादी निरपराध महिला व मुलांना ठार नाहीत असा दावा केला. नंतर माझ्या वडिलांना कुराणातील ओळी (कलमा) म्हणण्यास सांगितले. त्यात अपयश आल्यावर तीन गोळ्या त्यांच्यावर झाडल्या. अनेक पुरुषांना त्यांनी गोळ्या घातल्या. तेथे मदतीसाठी कोणीही नव्हते. पोलीस किंवा लष्कराचे जवान २० मिनिटांनी आल्याचे आसावरी यांनी सांगितले.
ज्या व्यक्ती आम्हाला तेथे घेऊन गेल्या त्यांनी आम्हाला परतण्यास मदत केली. आमची वैद्याकीय तपासणी करण्यात आली. आम्हाला पहेलगाम क्लब येथे हलविण्यात आले. दुपारी साडेतीन वाजता हल्ला झाला. मात्र पाच तासांनंतर माझे वडील किंवा काकांबद्दल काहीही माहिती देण्यात आली नाही, असे आसावरी यांनी सांगितले.पनवेल येथील निसर्ग ट्रॅव्हल्स कंपनीच्या माध्यमातून ३९ पर्यटकांचा एक चमू पहेलगाम येथील दहशतवाद्यांच्या गोळीबारात सापडला. यात नवीन पनवेल येथे राहणारे दिलीप देसले यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच सुबोध पाटील आणि त्यांच्या पत्नी माणिक हे दाम्पत्यदेखील जखमी झाले आहे. माणिक यांची प्रकृती खालावल्याने त्यांना श्रीनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जा मोदींना जाऊन सांग,शिवमोग्गाच्या मंजुनाथ यांना मारल्यावर त्यांच्या पत्नीला आतंकवादी म्हणाला…
काश्मीरचे विभागीय आयुक्त विजयकुमार बिदरी यांनी सांगितले कि,’, महाराष्ट्रातील दोन पर्यटकाचा मृत्यू झाला असून, त्यात दिलीप डिसले, अतुल मोने असे दोघे आहेत. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील 2 जण जखमी झाले आहेत. त्यातील एक माणिक पटेल हे पनवेलचे आहेत. एस. भालचंद्रराव हे दुसरे जखमी आहेत. सुदैवाने दोघांचीही प्रकृती स्थिर आहे.
नवी दिल्ली- मंगळवारी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात कर्नाटकातील शिवमोगा जिल्ह्यातील एका ४७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. मंजुनाथ राव असे या पीडितेचे नाव आहे. ते त्यांची पत्नी पल्लवी आणि त्यांचा मुलगा अभिजेय यांच्यासोबत कुटुंबासह सुट्टीवर गेले होते. मंजूनाथ यांची पत्नी पल्लवी यांनी या दहशतवादी हल्ल्याचा थरकाप उडवणारा प्रसंग कथन केला. आम्ही तिघे म्हणजे मी, पती आणि आमचा मुलगा तिघेही काश्मीर फिरायला गेलो होतो. साधारण दुपारचे दीड वाजले असतील. आम्ही त्यावेळी पहलगाममध्ये होतो. अचानक एका गटानं गोळ्या झाडायला सुरुवात केली. माझ्या नवरा माझ्या डोळ्यांसमोर मरण पावला. हे सगळं माझ्यासाठी दुस्वप्न आहे, असं पल्लवी यांनी सांगितलं.….पल्लवी यांनी सांगितलं.
हल्ल्यानंतर काही स्थानिक माझ्या मदतीसाठी धावले. तीन जणांनी मला वाचवलं, असंही पल्लवी यांनी सांगितलं. पल्लवी यांच्या म्हणण्यानुसार, हल्लेखोर हे हिंदूंना टार्गेट करत असल्याचे त्यांच्या बोलण्यावरून दिसत होते. तीन ते चार जणांनी आमच्यावर हल्ला केला. माझ्या पतीची गोळ्या झाडून हत्या केली. माझ्या डोळ्यांदेखत त्यांनी जीव सोडला. तुम्ही माझ्या नवऱ्याला आधीच मारलं आहे. मलाही मारून टाका, असं मी त्यांना सांगितलं. त्यावर आम्ही तुला मारू शकत नाही. जा, जाऊन मोदींना सांग, असं त्यातील एक हल्लेखोर म्हणाला.
अनंतनाग जिल्ह्यातील बैसरन व्हॅली परिसरात हा हल्ला झाला, जिथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला, ज्यामध्ये अनेक जण जखमी झाले आणि अनेक जणांचा मृत्यू झाला.कर्नाटक पोलिस जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या संपर्कात आहेत
दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास पहलगाममधील बैसरन व्हॅलीतील डोंगरावरून दहशतवादी खाली आले आणि त्यांनी पर्यटकांवर गोळीबार सुरू केला, जे या ठिकाणी वारंवार येतात, कारण हिरव्यागार कुरणांमुळे ते ‘मिनी स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखले जाते.या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून, भारतीय लष्कराच्या व्हिक्टर फोर्ससह सुरक्षा दलांनी परिसरात शोध मोहीम सुरू केली आहे.
अमित शाह श्रीनगरला आहेत,दरम्यान, पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह श्रीनगरला रवाना झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याशी बोलून केंद्रशासित प्रदेशाला भेट देण्यास सांगितल्यानंतर लगेचच शाह खोऱ्यात रवाना झाले.
शाह यांनीही या हल्ल्याचा निषेध केला आणि ‘एक्स’ वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की त्यांनी पंतप्रधानांना या घटनेची माहिती दिली आहे आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबंधित अधिकाऱ्यांशी बैठक घेतली आहे.मृतांचा आकडा अद्याप निश्चित केला जात आहे, असे जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सांगितले, तर दहशतवादी हल्ला “अलिकडच्या वर्षांत नागरिकांवर केलेल्या कोणत्याही हल्ल्यापेक्षा खूप मोठा” असल्याचे वर्णन केले.अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स भारत दौऱ्यावर असताना हा हल्ला दुपारी ३ वाजताच्या सुमारास झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. फेब्रुवारी २०१९ मध्ये पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती हल्ल्यात ४७ सीआरपीएफ जवान शहीद झाल्यानंतर काश्मीरमधील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला असू शकतो.

पत्नी मुलांसमोरच दहशत वाद्यांनी घातल्या IB अधिकाऱ्याला गोळ्या
नवी दिल्ली-
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात महाराष्ट्रातील दोन पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. तर कर्नाटकमधील जोडप्यातील पतीला त्याच्या पत्नीसमोरच गोळ्या घालण्यात आल्या.मात्र आता या हल्ल्या संदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे. या हल्ल्यामध्ये केंद्रीय गुप्तचर संघटना म्हणजे IB मध्ये काम करणाऱ्या एका अधिकाऱ्यालाही गोळ्या घालण्यात आल्या आहेत. हा अधिकारी मूळचा हैदराबादचा असून कुटुंबासमोरच त्याची हत्या करण्यात आली आहे.
गुप्तचर संघटनेत काम करणारा हैदराबादचा हा अधिकारी कुटुंबासोबत काश्मीरमध्ये गेला होता. त्यावेळी तो एक रील शूट करत होता. त्या दरम्यान त्याला गोळ्या घालण्यात आल्या. त्याच्या कुटुंबासमोरच दहशतवाद्यांनी त्याला गोळ्या घातल्या. यावेळी त्या अधिकाऱ्याची पत्नी आणि मुले समोर होती अशी माहिती आहे.
गेल्या काही दिवसात ते काश्मीरमध्ये कार्यरत होते. या दरम्यान ते पहेलगाममध्ये कुटुंबासोबत फिरायला गेले. त्याचवेळी त्याची हत्या करण्यात आली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये आतापर्यंत 28 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामध्ये दोन परदेशी नागरिकांचा समावेश आहे. कलम 370 हटवल्यानंतर हा एक मोठा हल्ला आहे. या हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ संघटनेने जबाबदारी स्वीकारली आहे.
देश विदेशातून हल्ल्याची गंभीर दखल,मेहबूबा मुफ्तींकडून काश्मीर बंदचे आवाहन.
अनुपम खेर म्हणाले,’ दहशतवाद्यांना असा धडा शिकवायला हवा की पुढच्या सात जन्मात असे कृत्य करण्याचे त्यांचे धाडस होणार नाही
मुंबई- पहलगाम येथी पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याची देशातूनच नव्हे तर विदेशातूनही गंभीर दखल घेतली जात असून अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हॅन्स यांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध केला आहे.
भारताच्या दौऱ्यावर असलेले अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हॅन्स यांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध केला. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले- उषा (पत्नी) आणि मी भारतातील पहलगाम येथे झालेल्या विनाशकारी दहशतवादी हल्ल्यातील बळींबद्दल शोक व्यक्त करतो. गेल्या काही दिवसांपासून, या देशाचे आणि त्याच्या लोकांच्या सौंदर्याने आपण भारावून गेलो आहोत. या भयानक हल्ल्यात आमच्या संवेदना आणि प्रार्थना त्यांच्यासोबत आहेत.
काश्मीरच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी उद्या काश्मीर बंदचे आवाहन केले आहे. मात्र यावेळी येथे असलेल्या पर्यटकांची गैरसोय होता कामा नये असेही त्यांनी म्हटले आहे. पर्यटकांवरील भयानक दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ जम्मूच्या चेंबर अँड बार असोसिएशनने उद्या संपूर्ण बंदचे आवाहन केले आहे. पहलगाममधील क्रूर हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप जीवांच्या सन्मानार्थ या बंदला पाठिंबा देण्यासाठी मी सर्व काश्मिरींना एकजुटीने एकत्र येण्याचे आवाहन करतो.हा केवळ काही निवडक लोकांवर हल्ला नाही तर तो आपल्या सर्वांवर हल्ला आहे.आम्ही दुःख आणि संतापाच्या भावना व्यक्त करतो आणि निष्पापांच्या हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी या बंदला जोरदार पाठिंबा देतो.
अभिनेता आणि PM नरेंद्र मोदी यांचे स्नेही अनुपम खेर
दहशतवाद्यांना असा धडा शिकवायला हवा की पुढच्या सात जन्मात असे कृत्य करण्याचे त्यांचे धाडस होणार नाही
आरएसएसने म्हटले— हा देशाच्या एकता आणि अखंडतेवर हल्ला
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) पहलगाम हिंसाचारावर शोक व्यक्त केला आहे. संघाने पोस्टमध्ये म्हटले आहे- जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेला क्रूर दहशतवादी हल्ला अत्यंत निंदनीय आणि वेदनादायक आहे. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सर्वांना आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो आणि जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो. हा हल्ला देशाच्या एकता आणि अखंडतेवर हल्ला करण्याचा प्रयत्न आहे. सर्व राजकीय पक्ष आणि संघटनांनी सर्व मतभेदांच्या पलीकडे जाऊन याचा निषेध केला पाहिजे. सरकारने सर्व पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी आवश्यक व्यवस्था करावी. आणि या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांना शिक्षा करण्यासाठी सरकारने लवकरच योग्य ती पावले उचलावीत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी-जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याप्रती मी संवेदना व्यक्त करतो. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो. पीडितांना सर्वतोपरी मदत केली जात आहे. या घृणास्पद कृत्यामागील लोकांना न्याय मिळवून दिला जाईल… त्यांना सोडले जाणार नाही! त्यांचा दुष्ट अजेंडा कधीही यशस्वी होणार नाही. दहशतवादाविरुद्ध लढण्याचा आमचा निर्धार अढळ आहे आणि तो आणखी मजबूत होईल.
राहुल गांधी -जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात पर्यटकांचा मृत्यू आणि अनेक जण जखमी झाल्याची बातमी अत्यंत निंदनीय आणि हृदयद्रावक आहे.
मी शोकाकुल कुटुंबांप्रती माझ्या मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो आणि जखमींच्या लवकर पुनर्प्राप्तीची आशा करतो.संपूर्ण देश दहशतवादाविरुद्ध एकजूट आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये परिस्थिती सामान्य असल्याचे पोकळ दावे करण्याऐवजी, सरकारने आता जबाबदारी घेतली पाहिजे आणि भविष्यात अशा क्रूर घटना घडू नयेत आणि निष्पाप भारतीयांना अशा प्रकारे आपले प्राण गमवावे लागू नयेत यासाठी ठोस पावले उचलली पाहिजेत.
नावे विचारून घातल्या गोळ्या,महाराष्ट्र आणि पुण्यातील पर्यटकांवर देखील हल्ला
पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. जे लोक मृत्यूमुखी पडले, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीयांच्या, आप्तस्वकियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. या घटनेत जे जखमी झाले, त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. जम्मू-काश्मीर प्रशासनातील वरिष्ठांच्या आम्ही संपर्कात आहोत. पहलगाम ज्यांच्या अखत्यारीत येते, ते काश्मीरचे विभागीय आयुक्त विजयकुमार बिदरी यांनाही फोन करुन माहिती घेतली. महाराष्ट्रातील दोन पर्यटकाचा मृत्यू झाला असून, त्यात दिलीप डिसले, अतुल मोने असे दोघे आहेत. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील दोन जण जखमी झाले आहेत. त्यातील एक माणिक पटेल हे पनवेलचे आहेत. एस. भालचंद्रराव हे दुसरे जखमी आहेत. सुदैवाने दोघांचीही प्रकृती स्थिर आहे–देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
#WATCH | Mumbai: On Pahalgam terror attack, Maharashtra CM Devendra Fadnavis says, "We condemn this attack… This attack was attempted at stopping J&K's journey towards development… Our Prime Minister has taken cognisance. Home Minister Amit Shah is reaching there, and strict… pic.twitter.com/q5Uq3fXX5R
— ANI (@ANI) April 22, 2025
पहलगाम : जम्मू-काश्मीरच्या अति-पर्यटन स्थळांपैकी एक असलेल्या पहलगाममध्ये मंगळवारी दुपारी भीषण दहशतवादी हल्ला झाला. द रेसिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्यात किमान २७ पेक्षा अधिक पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र आणि पुण्यातील पर्यटकांवर देखील हल्ला झाला असून पुण्यातील कर्वेनगरमधील दोन कुटुंबातील पुरुषांना गोळ्या चाटून गेल्या आहेत, त्यामुळे ते जखमी झाल्याचे वृत्त आहे . गनबोटे आणि जगदाळे कुटुंबाची माहिती समोर आली आहे. दरम्यान, पुणे आणि महाराष्ट्रातील पर्यटकांचे नातेवाईक प्रचंड काळजीत पडले असून आपापल्या कुटुंबियांशी संपर्क साधण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू होते.
आसावरी जगदाळे, प्रगती जगदाळे, संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गनबोटे, संगीता गनबोटे यांच्यावर हा हल्ला झाला आहे. ही कुटुंब मुळची बारामती तालुक्यातील असून सध्या पुण्यात कर्वेनगरमध्ये वेदान्त नगरीजवळ राहात असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. यातील संतोष आणि कौस्तुभ यातील एकाच्या अंगाला गोळ्या लागल्या आहेत. हल्ला दुपारी १२ वाजेच्या सुमारास ‘बैसारन’ नावाच्या हिरव्यागार कुरणाजवळ झाला. येथे देशाच्या विविध भागांतील पर्यटक फिरण्यासाठी आले होते. अचानक अज्ञात बंदूकधाऱ्यांनी पर्यटकांवर बेधुंद गोळीबार सुरू केला. आधी पर्यटकांना नाव आणि धर्म विचारण्यात आले. त्यानंतर त्यांना गोळ्या घालण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले. गोळ्यांच्या आवाजाने परिसरात एकच गोंधळ उडाला आणि लोकांनी पळापळ सुरू केली. जखमींना तात्काळ अनंतनाग व श्रीनगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सुरक्षा दलांनी परिसर सील करून शोधमोहीम सुरू केली आहे.मृतांमध्ये महाराष्ट्रातील पुणे आणि मुंबईमधील पर्यटक असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून काही पर्यटक गुजरातमधील सूरतमधील आहेत. तर, उर्वरित पर्यटक हरियाणा आणि दिल्ली येथून आले होते, असे यंत्रणांकडून सांगण्यात आले. जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला आहे आणि जखमींना शक्य तेवढी वैद्यकीय मदत देण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तातडीने जम्मू काश्मीरला रवाना झाले आहेत. सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शाह यांच्याशी फोनवर चर्चा करून तात्काळ पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
दरम्यान, बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक्सवर पोस्ट करीत ओमर अब्दुल्ला यांना याविषयी आवश्यक असलेली सर्वतोपरी मदत करण्याचे आवाहन केले. तसेच, जगदाळे आणि गणबोटे कुटुंबावर हल्ला झाल्याची माहिती दिली.
Requesting @OmarAbdullah for providing immediate medical aid and support to the following people hailing from Pune who have suffered injuries in the Pahalgham firing incident today: Asawari Jagdale, Pragati Jagdale, Santosh Jagdale (gunshot wound), Kaustubh Ganbote (gunshot…
— Supriya Sule (@supriya_sule) April 22, 2025
टीआरएफ ही लष्कर-ए-तोयबाची संलग्न दहशतवादी संघटना असून गेल्या काही वर्षांत या संघटनेने अनेक नागरिकांवर आणि बाहेरून आलेल्या कामगारांवर हल्ले केले आहेत. धर्माच्या आधारे पर्यटकांवर थेट हल्ला होणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे आणि यामुळे पर्यटन व्यवसायाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करतो. जगदाळे आणि गनबोटे कुटुंबाच्या मी संपर्कात आहे. यासोबतच महाराष्ट्रातील पर्यटकांच्या सुरक्षेच्या आणि मदतीच्या अनुषंगाने आमचे प्रयत्न सुरू आहेत. कौस्तुभ यांच्या मुलीशी माझा संपर्क झाला आहे. त्यांना आवश्यक असलेली वैद्यकीय व अन्य मदत, उपचार दिले जात आहेत. या मुलीसमोरच तिच्या वडिलांना गोळ्या घालण्यात आल्या आहेत. मदतकार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील कडक शब्दांत याची निंदा केली आहे. आवश्यक ती सर्व कडक कारवाई केली जाणार आहे. गृहमंत्री अमित शाह तातडीने काश्मीरमध्ये रवाना झाले आहेत. महाराष्ट्रातील पर्यटकांसाठी आम्ही काळजीने सर्व गोष्टी करीत आहोत.
- मुरलीधर मोहोळ, केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री
मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला-पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्याबद्दल मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी तीव्र दुःख आणि दुःख व्यक्त केले आहे.
या हल्ल्याला “घृणास्पद” असे वर्णन करून, मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की निष्पाप पर्यटकांना लक्ष्य करणे हे क्रूरता आणि अमानुषतेचे कृत्य आहे.”आमच्या पर्यटकांवर झालेला हा हल्ला घृणास्पद आहे. या हल्ल्याचे गुन्हेगार प्राणी आहेत – अमानवी आणि तिरस्कारास पात्र आहेत. निषेधाचे कोणतेही शब्द पुरेसे नाहीत,” असे मुख्यमंत्री यांनी एका कडक शब्दात म्हटले आहे.
मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना सहानुभूती व्यक्त केली आणि जखमींच्या जलद पुनर्प्राप्तीसाठी प्रार्थना केली.मुख्यमंत्री वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात आहेत आणि आरोग्यमंत्री सकिना इटू यांच्याशी बोलले आहेत, ज्या जखमींवर उपचार आणि व्यवस्थेचे निरीक्षण करण्यासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल झाल्या आहेत.
त्यांनी पुढे जाहीर केले की ते परिस्थितीचे वैयक्तिकरित्या निरीक्षण करण्यासाठी आणि पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबियांना सर्व शक्य ती मदत मिळावी यासाठी तात्काळ श्रीनगरला परतणार आहेत.”मी माझ्या सहकाऱ्याशी बोललो आहे
@sakinaitooआणि ती जखमींच्या व्यवस्थेची देखरेख करण्यासाठी रुग्णालयात गेली आहे. मी ताबडतोब श्रीनगरला परत जाईन,” असे ते म्हणाले.तसेच, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पहलगाम पर्यटन रिसॉर्टमधील दुःखद घटनेबद्दल मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी फोनवर बोलले.
काश्मीरात पुलवामानंतर सर्वात मोठा हल्ला, 26 मृत्यू:अतिरेक्यांनी पर्यटकांना नाव विचारून गोळी घातली;महाराष्ट्रासह इस्रायल- इटलीचे पर्यटक होते
पोलिसांच्या वेशात दहशतवादी.
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशवाद्यांनी (Terrorist) पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार केला. दहशतवाद्यांच्या या हल्ल्यात 27 पर्यटकांना आपला जीव गमवावा लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. येथे शस्त्रधारी दोन ते तीन दहशतवाद्यांनी पर्यटकांच्या एका ग्रुपवर भ्याड हल्ला केला. त्यामध्ये, अनेक पर्यटकांचा जीव गेला असून काही गंभीर जखमी देखील झाले आहेत. दहशतवाद्यांनी 40 राऊंड फायर केल्याचे सांगण्यात येते. या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री यांच्याच फोनवरुन बोलणे झाले. त्यानंतर, गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) तातडीने श्रीनगरकडे रवाना झाले आहेत.२०१९ च्या पुलवामा हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमधील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. मंगळवारी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला, ज्यामध्ये २६ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एक इटालियन आणि एक इस्रायली पर्यटक आणि दोन स्थानिक नागरिकांचा समावेश आहे. उर्वरित पर्यटक गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि ओडिशातील आहेत.
VIDEO | Jammu and Kashmir: Visuals of firing incident in Pahalgam, several are feared injured in terrorist attack. More details awaited.#Pahalgam #terrorist
— Press Trust of India (@PTI_News) April 22, 2025
(Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/TpAvAooYDm
जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याने आपण व्यथित झालो आहोत. मृतांच्या कुटुंबियांप्रती माझ्या सहवेदना आहेत. या भ्याड दहशतवादी हल्ल्यातील दहशतवाद्यांना सोडणार नाही, त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करू, असा इशाराच गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विटरवरुन दिला आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींना देखील त्यांनी या घटनेची माहिती दिली. त्यानंतर, संबंधित अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली असून श्रीनगरला गेल्यावर सर्व सुरक्षा एजन्सींसोबत तातडीची सुरक्षा आढावा बैठक घेण्यात येणार आहे. त्यासाठी, आपण श्रीनगरला रवाना होत असल्याचेही अमित शाह यांनी ट्विटरवरुन सांगितले. दरम्यान, अमित शाह दिल्लीतून श्रीनगरला रवाना झाले आहेत.
जखमींची नावे १. विनो भट्ट, गुजरात २. एस बालचंद्रू, महाराष्ट्र ३. अभिजवन राव, कर्नाटक ४. संतरू, तामिळनाडू ५. साहसी कुमारी, ओडिशा ६. डॉ. परमेश्वर ७. माणिक पाटील ८. रिनो पांडे
पहलगाममध्ये पोलिसांच्या वेषात आलेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांना आपला निशाणा बनवला. पर्यटकांची नावे विचारून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या वेळी एक नवविवाहित जोडपेदखील दहशतवाद्यांच्या हल्लातून सुटले नाही. या जोडप्यातील पुरुषाला आधी त्याचा धर्म विचारला आणि मग त्याला गोळ्या घालण्यात आल्याचं त्याच्या पत्नीने सांगितलं. ही महिला आपल्या पतीला वाचवण्यासाठी लोकांना आवाहन करत होती. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. शेवटी खिन्न मनाने ती मृत पतीच्या शेजारी बसली.
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील पर्यटकांवर देखील मोठं संकट ओढवलं आहे. एकूण जखमी पर्यटकांमध्ये महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा समावेश आहे. माणिक पाटील आणि एस भालचंद्र अशी दोघांची नाव समोर आली आहेत. दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांचा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे
पोलिसांकडून काश्मीरमधील पर्यटकांसाठी 24 तास मदत सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अनंतनाग येथील पोलीस कंट्रोल रुममधून ही सेवा पुरविण्यात आली असून व्हॉट्सअप आणि टेलिफोन नंबरही जारी करण्यात आले आहेत. पर्यटकांनी खालील नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मो – 9596777669
01932225870
व्हॉट्सअप – 9419051940
काश्मीर मधील नागरिकांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला असून हा भ्याड हल्ला असल्याचे म्हटले आहे. आम्ही प्रथम हिंदुस्थानी नंतर काश्मिरी असल्याचे त्यांनी म्हटले आहे आणि हल्लेखोरांना तातडीने पकडण्यात यावे असे सांगून कॅण्डल मार्च काढून हल्ल्यात बळी पद्लेलेया पर्यटकांना श्रद्धांजली वाहिली , कोणताही काश्मिरी नागरिक या हाल्लेखोरांना मदत करणार नाही असेही म्हटले आहे.
काँग्रेस नेत्यांनी महापालिकेने जमीनदोस्त केलेल्या विलेपार्लेतील जैन मंदिर परिसराला दिली भेट.
विलेपार्लेतील दिगंबर जैन मंदिर पाडून भाजपा सरकारने जैन बांधवांच्या भावना पायदळी तुडवल्या: हर्षवर्धन सपकाळ.
मुंबई, दि. २२ एप्रिल २०२५
भाजपाच्या राज्यात मंदिर तोडले जात असताना सरकार मात्र मूग गिळून गप्प बसते ही लाजीरवाणे आहे. मंदिर पाडण्यास एकीकडे न्यायालय स्थगिती देत असताना दुसरीकडे महापालिकेचे अधिकारी मंदिर पाडतात, हे शासनाचे अपयश आहे. जैन मंदिर पाडून भाजपा सरकारने जैन बांधवांच्या भावना पायदळी तुडवल्या आहेत, असा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जमीनदोस्त केलेल्या विलेपार्लेतील जैन मंदिर परिसराला भेट देऊन जैन बांधवांकडून संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली. यावेळी त्यांच्यासोबत विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, प्रदेश कार्याध्यक्ष व CWC सदस्य नसीम खान, प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड, ब्रिज दत्त, श्रीरंग बर्गे, विश्वजीत हाप्पे, आनंद सिंह, श्रीकृष्ण सांगळे आदी उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, जैन मंदिरात स्त्री पुरुष आराधना करत असताना तथाकथित महाराज आणून मंदिरातील मूर्ती काढून घेतल्या, यावेळी काही मूर्तींची तोडफोड झाली. राज्यात धार्मिक स्थळांवर कारवाईची शृंखला सुरु असताना जैन मंदिरही यात आले असून सरकार हे जाणीवपूर्वक करत आहे का? असा सवाल करत भाजपा सरकार संस्कृती बुडवायला निघाले आहे, पण मंदिर पाडणे खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा देत काँग्रेस पक्ष या घटनेचा निषेध करत आहे असेही सपकाळ म्हणाले. मंदिर पाडले जात असताना जैन बांधवांनी शांतता पाळली. महात्मा गांधी यांच्या सत्य व अहिंसेच्या मार्गाने मंदिराचे सत्य घेऊन पुढे जाऊ असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
डॉ. घैसास व मंगेशकर हॉस्पिटलवर महिलेच्या मृत्यूप्रकरणी अॅट्रॉसिटी कायदा आणि खुनाचा प्रयत्न या कलमांखाली गुन्हा दाखल करा – अॅड. तौसिफ शेख
पुणे | २२ एप्रिल २०२५
तनिशा ऊर्फ इश्वरी सुशांत भिसे या अनुसूचित जातीतील गर्भवती महिलेचा दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, पुणे येथे आपत्कालीन वैद्यकीय उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला. तनिशा ही जुळ्या मुलींच्या गर्भवती अवस्थेत गंभीर स्थितीत असताना हॉस्पिटलने केवळ आगाऊ रक्कम भरली नाही म्हणून तिला दाखल करण्यास नकार दिला. एका बाळासाठी १० लाख रुपये, म्हणजे एकूण २० लाख रुपये भरल्याशिवाय उपचार केले जाणार नाहीत, अशी अट टाकण्यात आली होती. या अमानवीय आणि बेजबाबदार वागणुकीमुळे तनिशाचा मृत्यू झाला आणि दोन नवजात मुलींना आईविना जगावे लागणार आहे.
इतके गंभीर प्रकरण असताना देखील, अलंकार पोलीस स्टेशन, पुणे येथे या प्रकरणी एफआयआर क्रमांक ६५/२०२५ नोंदविण्यात आला असला, तरी तो केवळ भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०६(१) – निष्काळजीपणामुळे मृत्यू – अंतर्गत दाखल करण्यात आला आहे.
अॅड. तौसिफ शेख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून सदरील प्रकरण हे केवळ निष्काळजीपणाचे नसून, एक सामाजिक भेदभाव आणि गुन्हेगारी हेतूने झालेली दुर्लक्षाची घटना आहे. मुख्य आरोपी डॉ. सुश्रुत घैसास हे उच्चवर्णीय असून, पीडिता ही अनुसूचित जातीतील असल्यामुळे हे प्रकरण अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा, १९८९ अंतर्गत सखोल चौकशीस पात्र आहे.
अॅड. तौसिफ शेख यांनी एफआयआरमध्ये पुढील कलमे त्वरित समाविष्ट करण्याची मागणी केली आहे: कलम १०५ – ठार मारण्याचा दोष except murder (culpable homicide not amounting to murder) कलम १०९ सह कलम ६२ – खुनाचा प्रयत्न कलम ९१ – बाळ जिवंत जन्माला येऊ नये याचा हेतू कलमे १२५, ४९, ६१ – जीवितास धोका, सहभाग व कटकारस्थान त्याचबरोबर, डॉ. घैसास यांचा वैद्यकीय परवाना तत्काळ रद्द करावा, तसेच संबंधित हॉस्पिटलमधील सर्व वैद्यकीय कर्मचारी व प्रशासनाविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
त्यांनी पुढे म्हटले की, “वैद्यकीय क्षेत्र हे सेवा भावी क्षेत्र असताना, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने फक्त रुग्णांच्या मजबुरीचा गैरफायदा घेत, केवळ खंडणी व पैशाची लूटमार केली. पैसे भरले नाहीत म्हणून रुग्णाला मृत्यूकडे ढकलणे — हे मानवतेला काळीमा फासणारे आहे. तनिशा भिसे यांचा मृत्यू ही फक्त एक घटना नाही — ही सामाजिक न्याय, वैद्यकीय नीतिमत्ता, आणि सर्वांना, विशेषतः वंचित व दुर्बल घटकांना, आपत्कालीन आरोग्यसेवा मिळावी याचा गंभीर प्रश्न आहे.” तसेच डॉ. सुश्रुत घैसास यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.अॅड. तौसिफ शेख यांनी स्पष्ट केले आहे की, जर त्वरित कारवाई झाली नाही, तर सर्व जबाबदार व्यक्तींविरुद्ध कोर्टात कायदेशीर कार्यवाही केली जाईल.
आळंदीत महात्मा गांधीजीच्या रक्षा विसर्जन स्तंभास धोका-तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमातून सांडपाणी वाहिनीसाठी दगडी घाटाची तोडफोड
पुणे 22 एप्रिल : तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमातून आळंदीच्या इंद्रायणी नदीवर बांधण्यात आलेल्या दगडी घाटाची जेसीबीच्या मदतीने सरळ बे्रकर लावून खोदकाम सुरू आहे. आळंदी शहरातील सांडपाणी बंदिस्त नाल्यातून नेण्यासाठी सुरू असलेल्या या कार्यामुळे पावसाळ्यात महापूराच्या स्थितीमध्ये संपूर्ण घाटास धोका निर्माण होऊ शकतो. तसेच येथील राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या रक्षा विसर्जन स्तंभास ही धोका निर्माण होऊ शकतो. यासाठी प्रशासनाने हे कार्य थांबवून योग्य नियोजन करावे. अशी मागणी येथील ग्रामस्थ व वारकर्यांनी केली आहे.
माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूह, पुणे, श्रीक्षेत्र आळंदी देहू परिसर विकास समिती आणि विश्वशांती केंद्र आळंदी यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीक्षेत्र आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या दोन्ही तीरावर करोडो रुपये खर्च केले. त्यामाध्यमातून सार्वजनिक हितासाठी पर्यावरण सुधार आणि प्रदूषण नियंत्रण या दृष्टीकोनातून नियोजन बद्ध दगडी घाट बांधण्यात आले आहे. या घाटाच्या खालून सांडपाणी वाहून जाण्याकरिता स्वतंत्र भूमिगत गटरचे नदीपात्राच्या कडेने बांधकाम करण्यात आले आहे. असे असतांना संस्था किंवा संस्थेचे अधिकारी यांच्याशी चर्चा न करता रात्रीच्या वेळी या घाटाचे बांधकाम जेसीबी मशीन ने तोडफोड व खोदकाम केले आहे.

आळंदी शहरातील सांडपाणी पुंडलिक मंदिरालगत उघड्यावार वाहत होते. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून ते बंदिस्त करण्याचे कार्य सुरू आहे. ही सांडपाणी वाहिनी पुढे एसटीपी प्रकल्पास जोडली जाणार आहे. परिणाम सांडपाणी नदीत मिसळणार नाही. त्यामुळे सांडपाणी वाहिनीचे काम झाल्यावर घाटाचे काम पूर्ववत नगरपरिषदेकडून केले जाईल.
या संदर्भात माईर्स एमआयटीचे संचालक डॉ. महेश थोरवे यांनी असे सांगितले की, संस्थेने ज्या पद्धतीने दगडी घाट बांधकाम केले आहे. तसे न झाल्यास पावसाळ्यात महापूराच्या स्थितीमध्ये संपूर्ण घाटास धोका होऊ शकतो. यामुळे घाट खचून जीवितहानी होण्याची भिती आहे. तसेच या ठिकाणी राष्ट्रपिता म. गांधीजी यांचे रक्षा विर्सजन स्तंभास धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे हे खोदकाम थांबवून पर्यायी मार्ग काढावा.
श्रीक्षेत्र आळंदी परिसर विकास समितीच्या माध्यमातून साधारण ३५ ते ४० वर्षापासून आजपर्यंत संस्थेने अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने नदीच्या पूराचे पाणी व सांडपाण्याचे योग्य पद्धतीने नियोजन करून इंद्रायणी नदीच्या तीरावर कोटी रूपये खर्च करून न सार्वजनिक हितासाठी पर्यावरण सुधार आणि प्रदूषण नियंत्रण या दृष्टीकोनातून नियोजन बद्ध दगडी घाट बांधण्यात आले आहेत. या दगडी घाटाच्या खालून सांडपाणी वाहून जाण्याकरिता स्वतंत्र भूमिगत गटरचे नदीपात्राच्या कडेने बांधकाम करण्यात आले आहे. असे असतांनाा संस्था किंवा संस्थेचे अधिकारी यांचेशी चर्चा न करता रात्रीच्या वेळेसे जेसीबीच्या मदतीने दगडी घाटाचे बांधकाम फोडण्याचे काम चालू केले आहे.

या घाटावर संस्थेतर्फे असलेल्या सुरक्षारक्षक व सुपरवायझर यांनी नगरपरिषदेचे कर्मचारी यांच्याकडे विचारणा केली. त्यावेळी हे लक्षात आले की एका खाजगी बांधकाम कंपनीतर्फे हे कार्य सुरू आहे. गेल्या ३५ वर्षापासून या घाटाचे बांधकाम करीत असतांना याबाबत काहीही कल्पना न देता अंधारात रात्रीच्या वेळी घाटाचे दगडी बांधकाम फोडण्याचे काम चालू केले. संस्थेच्या सुरक्षा रक्षकांनी सदरचे काम रात्रीच्या वेळी त्वरीत बंद करणेबाबत त्यांना विनंती केली. तथापि दुसर्या दिवशीही पुन्हा रात्रीच्याच वेळी घाटाचे बांधकाम जेसीबी मशीनने तोडण्याचे सत्र सुरूच ठेवले आहे.
आळंदी-देहू परिसर विकास समितीचे अध्यक्ष डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी देणगी गोळा करून आळंदीत इंद्रायणी नदीच्या दोन्ही तीरावर दगडी घाटाचे बांधकाम केले व आळंदीचे सौंदर्य उजळले. त्यातच तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमातून घाटावर शनि मंदिर ते पुंडलिक मंदिर परिसरात सांडपाणी वाहनू नेणार्या वाहिनीच्या कामासाठी खोदकाम सुरू केले आहे. येथे राजस्थान येथून आणलेला लाल दगड आणि संगरमवरी दगडाची तोडफोड करण्यात आली आहे.
भागिरथी नाल्याचे सांडपाणी वाहून नेणारी मोठी जमिनीखालची वाहिनी असताना शेजारीच अन्य सांडपाणी वाहून नेणारी वाहिनी तयार केली जात आहे. यासाठी इंद्रायणी काठचा दगडी घाट तोडला आहे. यामुळे वारकर्यांमध्ये नाराजी आहे. एखाद्या स्वयंसेवी संस्थेने चांगला घाट बांधून दिला. त्याची निगा राखण्याऐवजी तो अधिकाधिक दुरावस्थेत कसा राहू शकतो. असा प्रयत्न नगरपरिषदेकडून चालला असल्याची चर्चा आळंदीत होत आहे.
वक्फ कायद्यामुळे गरीब, गरजू मुस्लिमांना न्याय मिळेल
केंद्रीय अल्पसंख्याक, संसदीय कार्य मंत्री किरण रिजिजू यांची ग्वाही
मुंबई- वक्फ (सुधारणा) कायदा 2025 चा मूळ उद्देशच पूर्वीच्या कायद्यातील त्रुटी दूर करून वक्फ बोर्डाची कार्यक्षमता वाढवणे हा आहे. ‘वक्फ मालमत्तां’च्या नियमन आणि व्यवस्थापनातील समस्या आणि आव्हाने दूर करण्यासाठी हा कायदा करण्यात आला आहे. या कायद्यामुळे कोणाच्याही अधिकारांचे हनन होणार नाही. सर्व गरीब गरजू मुस्लिमांना न्याय मिळेल, अशी ग्वाही केंद्रीय अल्पसंख्याक, संसदीय कार्य मंत्री किरण रिजिजू यांनी मंगळवारी दिली. मुंबईमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी खा. मेधा कुलकर्णी, भाजपा प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक आणि प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्य़े, भाजपा प्रदेश अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष इद्रीस मुलतानी आदी उपस्थित होते. नोंदणीकृत वक्फ मालमत्ता किंवा अधिसूचनेद्वारे घोषित वक्फ मालमत्ता यांना हात लावणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
वक्फ बोर्डातील गैर-मुस्लिम सदस्यांच्या समावेशाबद्दल टीका करणाऱ्यांच्या एक लक्षात आणून देऊ इच्छितो की प्रयागराज येथील कुंभमेळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आझम खान हे मुस्लीम होते. पण आम्ही कधीही असा विचारच केला नाही अशी खोचक टिप्पणी श्री. रिजीजू यांनी केली. या वक्फ (सुधारणा) कायदा 2025 मुळे आता वक्फ बोर्डांना मनमानीपणे कुठल्याही मालमत्ता वक्फ म्हणून घोषित करता येणार नाहीत. साहजिकच हा कायदा संपूर्ण गावेच्या गावे ‘वक्फ’ म्हणून घोषित करण्यासारख्या गैरवापरांना प्रतिबंध करणार आहे. या कायद्याचे अनेक गरीब मुस्लिम बांधव आणि गटांनी समर्थन केले आहे. हा कायदा मंजूर केल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे पसमंदा, बोहरा, अहमदिया यांसारख्या समाजांनी आभार मानले आहेत. या समुदायाच्या मुख्य मागण्या या कायद्यात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. या कायद्यामुळे मुस्लिमांच्या धार्मिक बाबींमध्ये हस्तक्षेप केला जाईल या मतपेढीच्या राजकारणासाठी विरोधक पसरवत असलेल्या केवळ अफवा आहेत त्यामध्ये तथ्य नाही असेही त्यांनी नमूद केले.
खासगी मालमत्तांना ‘वक्फ मालमत्ता’ म्हणून घोषित करण्यासाठी ‘वक्फ कायद्या’च्या ‘कलम 40’चा मोठ्या प्रमाणात गैरवापर केला जात होता. आता ‘वक्फ’ मालमत्तेचे निष्पक्ष आणि पारदर्शक प्रशासन सुनिश्चित करण्यासाठी ‘वक्फ कायद्या’तील ‘कलम 40’ रद्द केले जात आहे असे श्री. रिजीजू यांनी स्पष्ट केले. श्री. रिजीजू यांनी सांगितले की, नियमानुसार आता मुतवल्लींना सहा महिन्यांच्या आत केंद्रीय पोर्टलवर मालमत्तेची माहिती नोंदवावी लागेल. पोर्टलद्वारे ‘वक्फ मालमत्ता’ व्यवस्थापन स्वयंचलित करेल, ज्यामध्ये नोंदणी, ऑडिट, खटले यांचा समावेश असेल, ज्यामुळे व्यवस्थेत पारदर्शकता येणार आहे. कोणत्याही स्वरुपांच्या वादांचे निराकरण जिल्हाधिकारी करतील, जे राज्याला अहवाल देणार आहेत.
