Home Blog Page 347

अन भारताच्या पाठीशी उभे राहिले अवघे विश्व ..पहा कोण काय म्हणाले…

अमेरिकेपासून रशियापर्यंत सर्व देश भारताच्या पाठिशी:
पहलगाम येथे काल झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, जगातील बहुतेक देशांनी भारताला पाठिंबा आणि पीडितांप्रती शोक व्यक्त केला आहे. यामध्ये अमेरिका आणि रशिया या महासत्तांचा तसेच भारताचे शेजारी पाकिस्तान आणि चीन यांचा समावेश आहे.प्राथमिक तपासात या हल्ल्यात ५ दहशतवादी सहभागी असल्याचे समोर आले आहे. यापैकी दोन स्थानिक आणि तीन पाकिस्तानी दहशतवादी होते. पोलिसांनी चौकशीसाठी अनेक लोकांना ताब्यात घेतले आहे. लष्कर-ए-तैयबाची प्रॉक्सी शाखा असलेल्या रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे..

पाकिस्तान- परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले की, जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात झालेल्या हल्ल्यात पर्यटकांच्या मृत्यूबद्दल आम्हाला चिंता आहे. आम्ही मृतांच्या कुटुंबियांबद्दल संवेदना व्यक्त करतो आणि जखमींच्या लवकर पुनर्प्राप्तीसाठी प्रार्थना करतो.

चीन: परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ जियाकुन म्हणाले की, आम्ही पीडितांबद्दल शोक व्यक्त करतो. चीन या हल्ल्याचा तीव्र निषेध करतो.

सौदी अरेबिया- काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याबद्दल क्राउन प्रिन्स सलमान यांनीही दुःख व्यक्त केले आणि सांगितले की सौदी अरेबिया भारतासोबत उभा आहे आणि या दुःखाच्या वेळी सर्वतोपरी मदत करेल.

इस्रायल- इस्रायली पंतप्रधान नेतन्याहू यांनी X वर लिहिले – माझे मित्र नरेंद्र मोदी, जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे मला खूप दुःख झाले आहे, ज्यामध्ये डझनभर निष्पाप लोक मारले गेले आणि जखमी झाले. आमच्या संवेदना आणि प्रार्थना पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत इस्रायल भारतासोबत उभा आहे.

रशिया- राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती मुर्मू यांना संदेश पाठवला आहे. पहलगाम हल्ल्यातील गुन्हेगारांना कठोर शिक्षा होईल, असे त्यात म्हटले आहे. आम्ही भारतासोबत आहोत. आमच्या संवेदना शोकाकुल कुटुंबांसोबत आहेत. सर्व जखमींच्या लवकर पुनर्प्राप्तीसाठी आम्ही प्रार्थना करतो.
अमेरिका- राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सोशल मीडियावर लिहिले की काश्मीरमधून खूप त्रासदायक बातमी आली आहे. दहशतवादाविरुद्ध अमेरिका भारतासोबत खंबीरपणे उभी आहे. मृतांच्या आत्म्यास शांती मिळो आणि जखमींच्या लवकर पुनर्प्राप्तीसाठी आम्ही प्रार्थना करतो.
युरोपियन युनियनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन यांनीही या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे आणि म्हटले आहे की – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आज शोक करणाऱ्या प्रत्येक भारतीयाप्रती माझी मनापासून संवेदना. तरीही मला माहित आहे की भारताचा आत्मा अतूट आहे. या कठीण काळात तुम्ही खंबीरपणे उभे राहाल आणि युरोप तुमच्या पाठीशी उभा राहील.

ब्रिटन- पंतप्रधान कीर स्टार्मर म्हणाले की काश्मीरमधील दहशतवादी हल्ला भयानक होता. माझ्या संवेदना पीडितांसोबत, त्यांच्या कुटुंबियांसोबत आणि भारतातील लोकांसोबत आहेत.

इटली – पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी म्हटले, भारतात झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे खूप दुःख झाले आहे, ज्यामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. इटली पीडितांच्या कुटुंबियांना, जखमींना, सरकारला आणि सर्व भारतीय जनतेला शोक व्यक्त करते.
फ्रान्स – राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनीही हल्ल्याचा निषेध केला आणि पीडितांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त केला. ते म्हणाले – भारतात एक भयानक हल्ला झाला आहे, ज्यामध्ये डझनभर लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. आम्हाला पीडित कुटुंबांचे दुःख समजते आणि त्यांच्याप्रती आमच्या संवेदना व्यक्त करतो.

सशस्त्र दलात 121 नवे वैद्यकीय अधिकारी दाखल: 97 लष्कर, 16 नौदल आणि 8 हवाई दलात रुजू

पुण्यातील एएफएमसीमध्ये दीक्षांत समारंभ

पुणे-सीमा भागातील लष्करी वैद्यकीय रुग्णालय अद्ययावत करण्यात येत आहेत. तसच श्रीनगर मधील लष्करी रुग्णालय उत्कृष्ट सेवा देत आहे, अशी माहिती लष्करी वैद्यकीय सेवा विभागाच्या महासंचालक व्हाइस ऍडमिरल आरती सरीन यांनी आज पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिली. पुण्यातील लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाच्या ५९ व्या तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा आज पार पडला. या संचलन सोहळ्यात १२१ वैद्यकीय सेवेचे छात्र सहभागी झाले होते. यामधील ९७ लष्करात, १६ नौदलात आणि ८ हवाई दलात दाखल होणार झाले.

या संचलनाच नेतृत्व सौरभ सिंग यादव याने केलं. सुरुवातीला छात्र कदमताल करत कॅप्टन देवाशीष शर्मा मैदानात दाखल झाले. संचलनाच्या प्रमुख पाहुण्या व्हाइस ऍडमिरल आरती सरीन यांचं मैदानात आगमन झालं आणि त्यांनी संकलनाची पाहणी केली. छात्रांच्या दिमाखदार संचलना नंतर छत्रांना सैन्यदलात अधिकारी म्हणून दाखल करून घेण्याचा सोहळा पार पडला आणि त्यांना लष्करी वैद्यकीय सेवेची शपथ देण्यात आली.

संचलन सोहळ्याला संबोधित करताना सरीन म्हणाल्या की, वैद्यकीय सेवेतील छात्र आज लष्करी सेवेत दाखल झाले असून तुम्ही आता फक्त डॉक्टर नाही तर गणवेशातील अधिकारी तसच समाजाचे मार्गदर्शक आहात. देशाला सर्वोच्च प्राधान्य देऊन जबाबदारी आणि निष्ठेने काम करावं अशी तुमच्याकडून अपेक्षा आहे. तुम्ही आता भारतीय सैन्य दलातील एक अधिकारी आहात ही एक मोठी जवाबदारी आहे. तुम्ही कसे वागता आणि काय निर्णय घेता यावरून तुमची सैन्य दलातील भुमिका स्पष्ट होते. विज्ञान आणि तंत्रज्ञानाने वैद्यकीय क्षेत्रात क्रांती घडवली आहे. मात्र वैद्यकीय सेवेतील मानवी सहभाग वगळता येणार नाही. यावेळी लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता आणि डेप्युटी कमांडंट मेजर जनरल गुरुराज सिंग, महाविद्यालयाचे संचालक आणि कमांडंट लेफ्टनंट जनरल पंकज पुरुषोत्तम राव उपस्थित होते.

या संचलन सोहळ्यात फ्लाइंग ऑफिसर पोईला घोष सहभागी झाली होती. लष्करती दाखल होणारी घोष परिवारातील ती तिसरी पिढी आहे. तिचे वडील निवृत्त कर्नल अजितकुमार घोष आणि कर्नल प्रतिभा मिश्रा हे पण लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. पोईला वैद्यकीय सेवेत दाखल झाली याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं.

पहलगाम येथे पर्यटकांवर भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ पुणे काँग्रेसच्या वतीने निषेध आंदोलन व श्रद्धांजली सभा.

  पुणे-   जम्मू काश्मिर येथील पहलगाम मध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी २६ पर्यटकांची निर्घण हत्या केली आणि अनेक पर्यटक जखमी केले. नागरिकांवर केलेल्या भ्याड हल्ल्यामुळे संपूर्ण देश हदरला. अनेक पर्यटकांनी आपले नातेवाईक गमावले. या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज झाशीची राणी पुतळा, बालगंधर्व चौक येथे पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले.      यानंतर उपस्थितांनी मेणबत्त्या पेटवून मृतांना श्रद्धांजली वाहिली.  

यावेळी माजी गृहराज्य मंत्री रमेश बागवे,प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी, प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड,कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष  अरविंद शिंदे ,युवक अध्यक्ष सौरभ अमराळे,माजी स्थायी समिती अध्यक्षा नीता परदेशी,माजी नगरसेवक रफिक शेख, अजित दरेकर, मुख्तार शेख, राजेंद्र शिरसाट, मेहबुब नदाफ, नितीन परतानी, प्राची दुधाने, ॲड. राजश्री अडसूळ, स्वाती शिंदे, उषा राजगुरू, प्रियंका मधाळे, अनिता धिमधिमे, सुंदर ओव्‍हाळ, कांचन बालनायक, सोशल मिडीया अध्यक्ष गुलामहुसेन खान, इंटक अध्यक्ष चेतन आगरवाल, रवि पाटोळे, ब्लॉक अध्यक्ष राजू ठोंबरे, संतोष पाटोळे, अजित जाधव, रमेश सोनकांबळे, विशाल जाधव, रविंद्र माझीरे, हेमंत राजभोज, अक्षय माने, रमेश सकट, द. स. पोळेकर, गणेश गुगळे, राज जाधव, राजेंद्र भुतडा, सतिश पवार, ॲड. फैय्याज शेख, अविनाश अडसूळ, यासीन शेख, सचिन सावंत, अभिजीत महामुनी, सद्दाम शेख, हर्षद हांडे, वैभव डांगमाळी, लतेंद्र भिंगारे, मनोहर गाडेकर, कृष्णा सोनकांबळे, मंदा जाधव, कल्पना शंभरकर आदी उपस्थित होते.  

     यावेळी बोलताना कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘अतिशय नियोजनबध्द अतिरेक्यांतर्फे हा हल्ला करण्यात आलेला आहे. काश्मिर खोऱ्यामध्ये पुन्हा अतिरेक्यांच्या हालचाली वाढल्या आहेत. ज्या ठिकाणी पर्यटक गेले होते तेथे सुरक्षा व्‍यवस्था नव्‍हती, याचाच फायदा अतिरेक्यांनी घेतला. पंतप्रधानांनी आणि गृहमंत्र्यानी या हल्ल्यामागच्य सूत्रधारांवर कठोर कारवाई केली पाहिजे. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पुणे शहरातील जे पर्यटक व इतर पर्यटक या अतिरेक्यांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडले त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली.’’

पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाचा तीव्र निषेध, दहशतवाद्यांना स्वारगेट चौकात प्रतीकात्मक फाशी

पुणे, दि. २३ एप्रिल २०२५ –जम्मू-काश्मीरमधील पहलगाम परिसरात पाकिस्तान धार्जिण्या अतिरेक्यांनी पर्यटकांवर धर्म विचारून केलेल्या भ्याड हल्ल्याच्या तीव्र निषेधार्थ पुणे शहर शिवसेनेच्यावतीने आज स्वारगेट चौकात जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले.या निषेध आंदोलनात पाकिस्तानच्या दहशतवादी प्रवृत्तीचा निषेध करत त्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी देण्यात आली. ‘दहशतवाद असाच संपविला जातो!’ असा ठाम संदेश शिवसेनेच्यावतीने जनतेसमोर मांडण्यात आला.

शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे म्हणाले की, “हा हल्ला फक्त भारतातील काही पर्यटकांवर नव्हे, तर भारतीय माणुसकीवर झालेला घात आहे. आम्ही आज शांत बसणार नाही. पाकिस्तान आणि त्यांच्या सहकार्‍यांना, जे धर्माच्या नावावर निर्दोष लोकांवर हल्ले करतात, त्यांना कडक उत्तर दिलं जाईल. या भ्याड कृत्याचा बदला पाकिस्तानच्या हद्दीतच घेतला जाईल!”

शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, युवासेना, महिला आघाडी व इतर अंगिकृत संघटनांचे कार्यकर्ते प्रचंड संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. स्वारगेट चौकात आंदोलनावेळी घोषणाबाजी, देशभक्तीपर नारे, आणि ‘भारत माता की जय’च्या जयघोषात परिसर दुमदुमून गेला होता.

शिवसेनेने केंद्र सरकारकडे अशी मागणी केली की, “या हल्ल्याचा योग्य आणि ठोस बदला घेतला जावा, आणि भविष्यात अशा दहशतवादी हल्ल्यांना आळा बसावा यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानविरुद्ध कठोर भूमिका घेतली जावी.”

या आंदोलनाच्या निमित्ताने पुणेकरांनी शिवसेनेच्या या देशभक्तीपर पवित्र्याला जोरदार प्रतिसाद दिला आणि दहशतवादाच्या विरोधात एकजूट दर्शविली. यावेळी शिवसेना पुणे शहर प्रमुख नाना भानगिरे, उपजिल्हाप्रमुख अमर घुले,अमर घुले,पंकज कोद्रे,सुदर्शना त्रिगुणाईत,आनंद गोयल, लक्ष्मण आरडे,सुनील जाधव, सुधीर कुरुमकर,विकी माने,गौरव साईनकर,विकास भांबुरे,दत्ता खवळे,नवनाथ निवंगुणे,अभिजीत बोराटे, गणेश काची,शंकर संगम,संदीप शिंदे,दीपक कुलाळ,आकाश रेणुसे, सुरेखा पाटील,महेंद्र जोशी,निलेश जगताप,तुषार मरळ,अक्षय तारु,उद्धव कांबळे, संदेश पावसकर,गडकरी सर,प्रशांत डाबी,नागेश अडसूळ,अकबर शेख, विशाल सरवदे, प्रणव थोरात, व असंख्य शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्रातील मृतकांचे पार्थिव मुंबई विमानतळावर दाखल:कुटुंबीयांना अश्रू अनावर

मुंबई- पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात आता त्यांचे मृतदेह आणण्यात येत आहेत. यातील मृतक दिलीप देसले यांचे मृतदेह पनवेल येथे त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. यावेळी कुटुंबीयांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. याचसोबत डोंबिवली येथील संजय लेले यांचे पार्थिव देखील महाराष्ट्रात आणण्यात आले आहे. यावेळी मंत्री आशिष शेलार तसेच भाजपचे नेते रवींद्र चव्हाण उपस्थित होते.

मुंबईच्या विमानतळावर मृतदेह आणण्यात येत आहेत. डोंबिवली येथील संजय लेले आणि पनवेल येथील दिलीप देसले यांचे पार्थिव मुंबई विमानतळावर आणण्यात आले. महाराष्ट्र सरकारतर्फे त्यांच्या नातेवाईकांची विमानतळावर भेट घेऊन सांत्वन केले. तसेच दिलीप देसले आणि संजय लेले यांच्या पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली, अशी माहिती आशिष शेलार यांनी दिली आहे.

पनवेल येथील मृतक दिलीप देसले यांच्या निवासस्थानी मोठा पोलिस बंदोबस्त करण्यात आला होता. तसेच या ठिकाणी आता शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे दिलीप देसले यांच्या अंत्यविधीसाठी दाखल झाले होते. दरम्यान, डोंबिवली येथील मृतक संजय लेले, अतुल मोने व हेमंत जोशी यांचे पार्थिव डोंबिवलीत दाखल करण्यात येणार आहे. हे तिघेही मित्र होते. डोंबिवलीकरांना त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेता यावे, यासाठी त्यांचे पार्थिव सायंकाळी 7 वाजता भागशाळा मैदान येथे आणण्यात येणार आहे, अशी माहिती भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे.

पुण्यातले तब्बल ५२० पर्यटक काश्मीरात ,यादी आली समोर

पुणे- सकाळी २६४ लोकांची यादी समोर आली होती ज्यात पुण्यातील प्रय्त्क जे काश्मिरात अडकलेत त्यांची नावे होती . पण आता संध्याकाळी मात्र तब्बल ५२० पर्यटकांची नावे आली आहेत . हे ५२० पुणेकर काश्मिरात सुट्टी एन्जोय करायला गेले होते . आणि पहलगाम च्या आतंकी हल्ल्यामुळे परत निघालेत पण त्यांची येण्याची व्यवस्था होऊ न शकल्याने त्यांनी सह्स्नाकडे संपर्क साधला आहे .. पहा हि यादी

मुळा मुठा नद्यांमधील जलपर्णी तातडीने हटविली जाईल

-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे – मुळा आणि मुठा नद्यांमधील बोपोडी आणि येरवडा भागातील जलपर्णी तातडीने हटविली जाईल, असे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज (बुधवारी) सांगितले.

छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील मुळा आणि मुठा नदीत येरवडा, बोपोडी भागात जलपर्णीचा उद्रेक झाला आहे. ती हटविण्यासाठी आमदार शिरोळे यांनी महापालिकेचे पर्यावरण संवर्धन अधिकारी मंगेश दिघे यांच्या समवेत बैठक घेतली. जलपर्णी हटविण्यासाठी १५ मार्च रोजी ठेकेदार नेमण्यात आले आहेत. त्या ठेकेदारांमार्फत भाऊ पाटील रोड एकता सोसायटी आणि येरवडा येथे फोफावलेली जलपर्णी तातडीने हटविली जाईल, असे आश्वासन महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना दिले. तसेच होळकर पूल येथील पुलाखालील नदीतील जलपर्णी हटविण्याचे काम खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून करण्यात येत आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.

औंध जलतरण तलाव लवकर खुला करणार-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे – नागरिकांच्या मागणीनुसार औंध येथील जलतरण तलाव लवकरच खुला केला जाईल, असे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज (बुधवारी) सांगितले.छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघातील औंध भागातील महापालिकेचा जलतरण तलाव बंद आहे, अशी तक्रार औंध मधील नागरिकांनी वारंवार केली होती. तसेच तलाव बंद असल्याने जलतरणाचा सराव करता येत नाही, त्यामुळे गैरसोय होते, असे खेळाडूंचे म्हणणे होते. त्याची दखल घेऊन महापालिकेच्या क्रीडा विभागाच्या उपायुक्त किशोरी शिंदे यांच्या समवेत आमदार शिरोळे यांनी बैठक घेतली. त्या बैठकीत छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील जलतरण तलावांच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला.

औंध येथील जलतरण तलाव लवकरात लवकर सुरू करण्यात यावा, अशी मागणी आमदार शिरोळे यांनी केली. जलतरण तलावाचा डागडुजीचा आढावा घेतला व किरकोळ कारणामुळे बंद असलेले अन्य तलाव लवकरात लवकर सुरू करावेत, असे आमदार शिरोळे यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

जलतरण तलावात शिकण्यासाठी येणाऱ्या किंवा सरावासाठी येणाऱ्यांच्या सुरक्षेकरीता लाईफ गार्ड किती आहेत, तसेच पाण्याची स्वच्छता आणि अन्य उपाययोजना या विषयीची माहिती आमदार शिरोळे यांनी घेतली.

हॉस्पिटल्स चालविण्याबाबत महापालिकेने धोरण ठरवावे:-आमदार सिद्धार्थ शिरोळे

विशेष वैद्यकीय तज्ज्ञ नेमावेत

पुणे – महापालिकेची हॉस्पिटल्स सुसज्ज यंत्रणेनिशी सुरळित चालविली जावीत, यासाठी निश्चित धोरण ठरविले जावे, हॉस्पिटल्समध्ये वैद्यकीय तज्ज्ञ (स्पेशल डॉक्टर्स) नेमले जावेत, अशा सूचना आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज (बुधवारी) आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या.महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या प्रमुख नीना बोराडे आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या समवेत आमदार शिरोळे यांनी बैठक घेतली आणि छत्रपती शिवाजीनगर मतदार संघातील महापालिकेच्या हॉस्पिटल्समध्ये सुधारणा होण्याच्या दृष्टीने चर्चा केली.

या बैठकीत होमी भाभा हॉस्पिटल, बोपोडीतील संजय गांधी हॉस्पिटल, खेडेकर हॉस्पिटल, शेवाळे हॉस्पिटल आणि दळवी हॉस्पिटल येथील सुधारणांसंदर्भात चर्चा झाली. होमी भाभा हॉस्पिटलच्या नूतनीकरणाचे काम येत्या जुलै महिन्यापर्यंत पूर्ण झाले असेल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी आमदार शिरोळे यांना दिली.

महापालिकेच्या संजय गांधी हॉस्पिटल मधील मॅटर्निटी वॉर्ड लवकर सुरू व्हावा, अशी आग्रही मागणी आ.शिरोळे यांनी केली. तसेच दळवी हॉस्पिटल मधील अडचणी सोडवून तेथील मॅटर्निटी वॉर्डही सुरळीत चालावा याबाबतही चर्चा करण्यात आली. या खेरीज खेडेकर हॉस्पिटल आणि शेवाळे हॉस्पिटल येथील अडचणी सोडविण्यासाठी चर्चा करून त्यावरच्या उपाययोजना निश्चित करण्यात आल्या आहेत, असे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी सांगितले.
आरोग्य प्रमुख तसेच आरोग्य अधिकारी डॉ .नीना बोरुडे, डॉ.कल्पना बळीवंत, डॉ. संजीव वावरे,डॉ कोलते मॅडम, हे अधिकारी उपस्थित होते.तसेच दत्ता खाडे, शैलेश बडदे, सुनील पांडे,सचिन वाडेकर, सुनीता वाडेकर, आनंद छाजेड, वसंत जुनवणे, प्रकाश सोळंकी, अपर्णा कुऱ्हाडे, सुजित गोठेकर, बंडू ढोरे, सुप्रीम चोंधे, रविराज यादव, बिरू खोमणे, अनिल भिसे, नीलिमा खाडे, सूरज शिंदे, हे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

चंदननगरमधील झोपडपट्टीत भीषण आग:10 गॅस सिलिंडरचा स्फोट

पुणे- नगर रस्त्यावरील चंदननगर भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीत बुधवारी पहाटे भीषण आग लागली. पहाटे पाचच्या सुमारास लागलेल्या या आगीची माहिती मिळताच रहिवासी तात्काळ बाहेर पळाले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली.अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला माहिती मिळताच 15 बंब आणि टँकर घटनास्थळी पोहोचले. आगीदरम्यान झोपड्यांमधील दहा गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटामुळे आग अधिक भडकली. अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख देवेंद्र पोटफोडे यांच्या नेतृत्वाखाली 80 जवानांनी दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली.

आगीत 50 पेक्षा जास्त झोपड्या जळून खाक झाल्या. वसाहतीतील रस्त्यावर उभ्या असलेल्या चार-पाच दुचाकीही जळाल्या. जवानांनी झोपड्यांमधून 100 पेक्षा जास्त गॅस सिलिंडर बाहेर काढले. त्यामुळे आणखी मोठी दुर्घटना टळली.या घटनेत कोणीही जखमी झाले नसले तरी अनेक कुटुंबांचा संसार जळून खाक झाला. आगीत झोपड्यांमधील सर्व गृहोपयोगी वस्तू जळाल्या. डोळ्यादेखत संसार जळाल्याने रहिवाशांचे अश्रू अनावर झाले. आगीचे निश्चित कारण अद्याप समजू शकलेले नाही.

छत्रपती शिवाजी रस्त्यावरील लाकडी वाड्याला आगछत्रपती शिवाजी रस्त्यावरील लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिराशेजारी असलेल्या जुन्या लाकडी वाड्याला मध्यरात्री एकच्या सुमारास आग लागली. लाकडी वाडा पेटल्याने परिसरात मोठ्या प्रमाणावर धूर झाल्याने भीती पसरली. या घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाचे दहा बंब घटनास्थळी दाखल झाले. आग भडकल्यानंतर शेजारी असलेल्या काका हलवाई मिठाईच्या दुकानातून जवानांनी प्रवेश करून इमारतीतून पाण्याचा मारा केला. लाकडी वाड्याच्या तळमजल्यावर दोन दुकानांनी आगीच झळ पाेहोचली.जुन्या वाड्यातील आठ ते दहा रहिवासी आग लागल्यानंतर बाहेर पडल्याने बचावले. 50 जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली. आग लागल्यानंतर घटनास्थळी गर्दी झाली होती. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी या परिसरातील विद्युत पुरवठा खंडीत केला हाेता. तासाभराच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली.

वाहन मालकांना अटकावून ठेवलेली वाहने सोडवून घेण्याची शेवटची संधी

पुणे, दि. २३: पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकाने थकीत कर वसुलीसाठी मोटार वाहन कायद्यातील गुन्ह्यातंर्गत कार्यालयाच्या आवारात वाहन मालक किंवा चालक यांच्या जबाबदारीवर अटकावून ठेवलेली वाहने वाहन मालकांनी तडजोड शुल्क, मोटार वाहन कर, पर्यावरण कर भरुन लिलावाच्या तारखेपर्यंत सोडवून घ्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मोटार वाहन थकीत कराच्या वसुलीसाठी अटकावून ठेवलेल्यांपैकी १४८ वाहनांच्या प्रकरणांमध्ये वाहन मालक, चालक किंवा वित्तदात्यांनी कार्यालयाशी संपर्क साधून वाहने सोडवून घ्यावीत. या वाहनांच्या जाहीर लिलावाची प्रक्रिया बुधवार, ३० एप्रिल आणि शुक्रवार, २ मे २०२५ होणार आहे. या वाहनांची यादी प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड, संत नगर, मोशी प्राधिकरण, पिंपरी-चिंचवड कार्यालय आणि तळेगाव व राजगुरुनगर (खेड) एसटी आगाराच्या कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रदर्शित केलेली आहे.

अधिक माहितीकरीता https://eauction.gov.in आणि www.mstcindia.co.in या संकेतस्थळावर भेट द्यावी. तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड, संत नगर, मोशी प्राधिकरण, पिंपरी-चिंचवड ०२०-२७२३२८२८ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन उप प्रादेशिक अधिकारी राहुल जाधव यांनी केले आहे.
0000

परवानाधारक ऑटोरिक्षा व टॅक्सी चालकांनी गणेश परिधान करणे अनिवार्य

पुणे, दि. 23: महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ नुसार परवानाधारक ऑटोरिक्षा व टॅक्सी चालकांनी व्यवसाय करीत असतांना ‘पांढऱ्या रंगाचा शर्ट (बुश शर्ट) व खाकी रंगाची पँट’ असा गणवेश परिधान करण्यासोबतच ओळखपत्र प्रदर्शित करणे अनिवार्य आहे, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी स्पष्ट केले आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत ऑटोरिक्षा, टॅक्सी विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. ऑटोरिक्षा, टॅक्सी परवानाधारकांच्या वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाचे कामकाजासह मोटर तपासणीचे कामकाज करताना गणवेश परिधान करुन आपली गैरसोय टाळावी.

ऑटोरिक्षा, टॅक्सी परवानाधारक वाहनचालकांनी आपल्या वाहनाची वैध कागदपत्रे सोबत बाळगावीत. तपासणीमध्ये दोषी आढळणाऱ्या चालकांवर मोटार वाहन कायदा व प्राधिकरणाने विहित कलेल्या तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असेही श्री. भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
0000

सुरक्षा ठेवीची अतिरिक्त रक्कम भरण्याचे महावितरणचे आवाहन

पुणे, दि. २३ एप्रिल २०२५: महावितरणच्या पुणे परिमंडलातील वीजग्राहकांना माहे एप्रिल / मे महिन्याच्या वीजबिलांसोबत सुरक्षा ठेवीची अतिरिक्त रक्कम भरण्यासाठी स्वतंत्र बिल देण्यात येत आहे. या सुरक्षा ठेवीच्या अतिरिक्त रकमेचा वीजग्राहकांना भरणा करावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आला आहे.

मा. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या विद्युत पुरवठा संहिता २०२१ च्या विनिमय १३.१ नुसार वीजग्राहकांकडून सुरक्षा ठेव आकारण्यात येते. दरवर्षी सुरक्षा ठेवीची पुनर्गणना करण्यात येते व त्यानुसार आर्थिक वर्ष संपल्यानंतर ग्राहकांच्या मागील एका वर्षातील सरासरी वीजवापराच्या आधारे नवीन सुरक्षा ठेवीची रक्कम निश्चित करण्यात येते. वीजग्राहकांची सुरक्षा ठेव ही मासिक बिल असेल तर तेथे सरासरी मासिक बिलाच्या दुप्पट आणि त्रैमासिक असेल तेथे सरासरी त्रैमासिक बिलाच्या दीडपट घेण्याची तरतूद मा. आयोगाकडून करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विनिमय १३.११ नुसार ग्राहकाने भरलेल्या सुरक्षा ठेव रकमेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या दराच्या सममूल्य दराने व्याजाची रक्कम वीजबिलाद्वारे समायोजित करून वीजग्राहकांना अदा करण्यात येते.

उदाहरणार्थ वीजग्राहकाचे वार्षिक सरासरी वीजबिल ५०० रुपये असल्यास त्याच्या दुप्पट म्हणजे एक हजार रुपयांची सुरक्षा ठेव असणे बंधनकारक आहे. मात्र प्रत्यक्षात सुरक्षा ठेवीचे ८५० रुपये जमा असल्यास संबंधित ग्राहकास १५० रुपयांचे अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे स्वतंत्र बिल देण्यात येत आहे. तसेच जमा असलेल्या सुरक्षा ठेवीची रक्कम वीजबिलात दरमहा नमूद करण्यात येत आहे.  

वीजग्राहकांना माहे एप्रिल / मे महिन्याच्या वीजबिलांसोबत सुरक्षा ठेवीतील फरकाची अतिरिक्त रक्कम भरण्यासाठी स्वतंत्र बिल देण्यात येत आहे. आतापर्यंत पुणे परिमंडलामध्ये आतापर्यंत १४ लाख ३९ हजार लघुदाब वीजग्राहकांना ३९० कोटी ३८ लाख रुपयांच्या अतिरिक्त सुरक्षा ठेवीची स्वतंत्र बिल देण्यात आले आहे. ही रक्कम भरण्यास महावितरणकडून जास्तीत जास्त सहा समान मासिक हप्त्यांची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

लघुदाब वीजग्राहकांना सुरक्षा ठेवीची अतिरिक्त रक्कम घरबसल्या भरण्यासाठी महावितरणच्या www.mahadiscom.in ही वेबसाईट व महावितरण मोबाईल अॅपद्वारे सोय उपलब्ध आहे. वीजग्राहकांनी अतिरिक्त सुरक्षा ठेवीच्या बिलाची रक्कम भरून सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

वर्ल्डबुक अँड कॉपीराईट डे  उत्साहात साजरा….

पुणे- अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च पर्वती पुणे महाविद्यालयात ग्रंथालय विभागाच्या वतीने वर्ल्डबुक अँड कॉपीराईट डे  साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरवात जगप्रसिद्ध साहित्यिक विल्यम शेक्सपिअर यांचे प्रतिमा पूजनाने झाली. ग्रंथपाल प्रा.तानाजी माळी यांनी या प्रसंगी  वर्ल्डबुक अँड कॉपीराईट दिवसाचा इतिहास, महत्व सांगून जगप्रसिद्ध साहित्यिक विल्यम शेक्सपिअर यांचे साहित्याविषयी मार्गदर्शन केले. या दिनाचे औचित्य साधून ग्रंथपाल प्रा. तानाजी माळी यांनी  डिजिटल लायब्ररी च्या माध्यमातून सर्व विद्यार्थी व शिक्षकांना वाचनासाठी मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील पुस्तके ऑनलाईन उपलब्ध करून दिली. वर्ल्डबुक अँड कॉपीराईट दिनाची विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी म्हणून ऑनलाईन प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आली. ग्रंथालयात आलेल्या नवीन पुस्तकांचे ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात आले होते.सदर कार्यक्रमासाठी अंतर्गत गुणवत्ता कक्षाचे समन्वयक प्रा.गणेश कोंढाळकर,ग्रंथपाल प्रा.तानाजी माळी, सर्व  विभाग प्रमुख, शिक्षक, विद्यार्थी  उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे नियोजन  ग्रंथपाल प्रा. तानाजी माळी यांनी केले. महाविद्यालयाने हा उपक्रम राबविल्या बद्दल अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या सरचिटणीस सौ.प्रमिला गायकवाड यांनी सर्वांचे अभिनंदन केले. 

पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांच्या कुटुंबियांना १० लाखांची मदत,अमित शाह म्हणाले,बदला लिया जायेगा …

0

जम्मू आणि काश्मीर सरकारने पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच, गंभीर जखमींना २ लाख रुपये आणि किरकोळ जखमींना १ लाख रुपये देण्यात येतील.गृह मंत्री अमित शाह म्हणाले,-भ्याड दहशतवादी हल्ल्यातील गुन्हेगारांना सोडले जाणार नाही.
आज त्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांना जड अंतःकरणाने श्रद्धांजली वाहिली. भारत दहशतीसमोर झुकणार नाही. या भ्याड दहशतवादी हल्ल्यातील गुन्हेगारांना सोडले जाणार नाही.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याच्या प्राथमिक तपासात अनेक महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत. तपासात असे दिसून आले आहे की चार दहशतवादी सैन्यासारखा गणवेश (कॅमफ्लाज ड्रेस) घालून बैसरन व्हॅलीमध्ये पोहोचले होते. त्यांच्याकडे अमेरिकन एम४ कार्बाइन रायफल आणि एके-४७ सारखी धोकादायक शस्त्रे होती. मंगळवारी संध्याकाळपर्यंत घटनास्थळावरून ५० ते ७० गोळीबाराचे काडतुसे जप्त करण्यात आले. पीडित आणि प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, दहशतवाद्यांनी प्रथम पर्यटकांना बंदुका दाखवून थांबवले. त्यांनी महिला आणि मुलांना बाजूला होण्यास सांगितले. त्यानंतर लोकांना त्यांची ओळख विचारल्यानंतर त्याने जवळून गोळ्या झाडल्या आणि नंतर अंदाधुंद गोळीबार सुरू केला.