Home Blog Page 343

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बावधन पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचे लोकार्पण

पुणे, दि.२५: उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाअंतर्गत असलेल्या बावधन पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. राज्य शासन पोलीस विभागाला आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत आहे, असे ते यावेळी म्हणाले.
यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार भीमराव तापकीर, शंकर मांडेकर, पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त सुनील कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल विभुते आदी उपस्थित होते.

या नवीन वास्तूच्या कामाबाबत समाधान व्यक्त करत, पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या वास्तूमधून पारदर्शक कारभार करुन येणाऱ्या नागरिकांना समाधानकारक सेवा देण्याचे काम करावे, असेही श्री. पवार म्हणाले.

श्री. चौबे यांनी पोलीस ठाण्याविषयी माहिती दिली.
0000

दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांच्या कुटुंबियांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सांत्वन

पुणे, दि.२५: जम्मू काश्मीरमधील पहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे या पर्यटकांच्या कुटुंबियांची राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. राज्यशासन आपल्या दुःखात सहभागी असून आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहे, असा धीर त्यांनी दिला.

यावेळी स्व. संतोष जगदाळे यांच्या पत्नी प्रगती जगदाळे, मुलगी आशावरी जगदाळे, कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नी संगीता गणबोटे, मुलगा कुणाल गणबोटे आदी कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.
0000

दहशतवाद्यांनी हिंदू: मुस्लीम द्वेष वाढीच्या हेतूने भारतीयांना मारले : राहुल डंबाळे

नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटी तर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्या विरोधात कॅण्डल मार्च व निषेध सभा

पुणे : पहेलगाम येथे हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना हिंदूंना नव्हे तर भारतीयांना मारायचे होते , तसेच या घटनेच्या आधारे हिंदू मुस्लिम धृवीकरण करणारे यांचा व दहशतवाद्यांचा धर्म एकच असल्याची टीका नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी केली.

पुणे कॅम्प येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शेकडोंच्या उपस्थितीमध्ये पहेलगाम दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात कॅन्डल मार्च व निदर्शनाचे आयोजन नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीमध्ये निषेध सभा देखील घेण्यात आली व या सभेत या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवत हल्लेखोरांवर कठोर शिक्षा करावी तसेच दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानवर देखील कठोर निर्बंध लावावे यासाठी सरकारच्या भूमिकेसोबत सर्व भारतीय आहेत असा विश्वास सर्वांच्या वतीने डॉ. सिध्दार्थ धेंडे व रशिद शेख यांचेद्वारे व्यक्त करण्यात आला. तसेच या अनुषंगाने केंद्र सरकारने सुरक्षा संदर्भामध्ये चूक झाल्याचे मान्य केले असल्याने यातील दोषींवर देखिल कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली.

अंजुम इनामदार यांनी सांगितले की ” पाकिस्तानचा दहशतवाद कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतीय मुसलमान खपवून घेणार नाही. देशात आम्ही एकत्रित राहतो वेळप्रसंगी मुसलमान हिंदूंना तर हिंदू मुसलमानांना मदत करतात अशा पद्धतीच्या दहशतवादी कारवाई करून पाकिस्तानचा हेतू साध्य होणार नाही. “

याप्रसंगी पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक रशीद शेख, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे , माजी नगरसेवक राहुल तुपेरे , माजी नगरसेवक मुक्तार शेख , रिपब्लिकन पक्षाचे परशुराम वाडेकर , कारी इद्रीस , जाहीद शेख , मुनव्वर कुरैशी , जुबेर मेमण , सुफियान कुरैशी, अहमद सय्यद , सलिम मौला पटेल अंजुम इनामदार, खिसाल जाफरी, लुकस केदारी , सुवर्णा डंबाळे, स्नेहा माने , इब्राहीम यवतमाळवाला, सिध्दांत सुर्वे , राम डंबाळे , सत्यवान गायकवाड , शाकीर शेख , अश्पाक शेख , राहुल नागटिळक , स्वाती गायकवाड, अर्चना केदारी, वसिम पैलवान आदी मान्यवर उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे आयोजन नॅशनल फॉर मायनॉरिटीच्या स्नेहा माने , शहाबुद्दीन शेख , आसिफ शेख , प्रतिक डंबाळे यांनी केले होते.

पाणंदरस्ते, शिवरस्ते खुले करण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम राबविण्यात येणार-उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न

पुणे, दि. : 25: जिल्ह्यातील पाणंदरस्ते, शिवरस्ते खुले करण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. तलाव आणि पाणीसाठ्यातील गाळ काढण्याचे कामही वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. जिल्हा वार्षिक योजनेतील मंजूर कामांसाठी संबंधित यंत्रणांनी 31 मे पर्यंत प्रशासकीय मान्यता घेऊन डिसेंबरअखेर कामे पूर्ण करावीत, अशाही सूचना त्यांनी दिल्या.

विधानभवन येथे आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष आण्णा बनसोडे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, दिलीप वळसे पाटील, विजय शिवतारे, भीमराव तापकीर, राहुल कुल, सुनील कांबळे, सुनील शेळके, सिद्धार्थ शिरोळे, महेश लांडगे, शरद सोनवणे, ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके, बापूसाहेब पठारे, बाबाजी काळे, शंकर मांडेकर, हेमंत रासणे, शंकर जगताप, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर आदी यावेळी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, जिल्ह्यातील लोकप्रतिनिंधी विकास कामांची माहिती 15 मे पर्यंत प्रशासनाकडे सादर करावी. सर्व संबंधित यंत्रणांनी 31 मे अखेर प्रशासकीय मान्यता घेवून पुढील कार्यवाही डिसेंबरअखेर पूर्ण करावी. जिल्हा नियोजन समितीमध्ये मंजूर कामाचा आढावा घेतला जाणार असून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी विकासकामे वेळेत, दर्जेदार, गुणवत्तापूर्वक होईल याकडे लक्ष द्यावे. गडकिल्ले, पर्यटनस्थळे आदी ठिकाणे पर्यटकांना सुरक्षित वाटली पाहिजे, याकरीता आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.

जिल्ह्यात पुणे मॉडेल स्कूल अर्थात आदर्श शाळांचा उपक्रम राबविण्याचे निर्देश देण्यात आले असून त्या अंतर्गत प्रत्येक तालुक्यातील केंद्र शाळा स्तरावर एका मोठ्या शाळेचा भौतिक तसेच दर्जात्मक विकास करण्यात येणार आहे. भौतिक सुविधांसोबतच शिक्षणाचा दर्जा कसा वाढेल याकडे लक्ष द्यावे.

नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करुन द्यावे. लोकप्रतिनिधी सूचित केलेल्या सूचना, तक्रारीचे दखल घेत त्यांना विश्वासात घेवून त्या निकाली काढाव्यात. जिल्ह्यातील सर्व तालुक्यात एकसारखा निधी दिला जाईल, याबाबत दक्षता घ्यावी. रुग्णालयात विविध आजाराकरीता उपचारासाठीची लागणारी पुरेशी औषधे उपलब्ध ठेवावीत. धर्मादाय रुग्णालयांनी रुग्णांकडून अनामत रक्कम घेऊ नये असा निर्णय घेण्यात आला आहे. या नियमांचे उल्लघंन करणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कारवाई करण्यात येईल, याकामी जिल्हाप्रशासन, महानगरपालिका आयुक्त आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे,असेही श्री. पवार म्हणाले.

यावेळी मंत्री श्री. पाटील, मंत्री श्री. भरणे, राज्यमंत्री श्रीमती मिसाळ, श्रीमती गोऱ्हे यांच्यासह आमदार यांनी विविध सूचना केल्या.

यावेळी जिल्ह्यासाठी सन २०२५- २६ च्या सर्वसाधारण योजनेसाठी १ हजार ३७९ कोटी रुपये, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी १४५ कोटी रुपये आणि आदिवासी घटक कार्यक्रमासाठी ६५ कोटी ४६ लाख रुपये या प्रमाणे एकूण १ हजार ५८९ कोटी ४६ लाख रुपयांच्या जिल्हा वार्षिक योजना आराखड्यास राज्य शासनाने मान्यता दिली असल्याचे माहिती जिल्हाधिकारी श्री. डूडी यांनी दिली.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनीही प्रस्तावित योजना व तरतुदींच्या अनुषंगाने सादरीकरण केले.

यावेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या उपस्थितीत पुणे जिल्हा परिषद आणि आयुका संस्थेत जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना आयुका, नासा व इस्त्रो या संस्थेस भेटीबाबत मदत करण्यासोबतच तेथील कामकाजाबाबत माहिती व शास्त्रज्ञाच्या भेटीबाबत सामंजस्य करार करण्यात आला. तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिका व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या ‘वॉर्ड हेल्थ ॲक्शन प्लॅन’चे प्रकाशन करण्यात आले.

बैठकीत सन २०२४-२५ च्या जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत झालेल्या खर्चास मान्यता देण्यात आली.

बैठकीस जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, विविध कार्यान्वयन यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
0000

डॉ.किरण मोघे माहिती उपसंचालक पदी रुजू

0

पुणे, दि. २५ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे यांची माहिती उपसंचालक पदी पदोन्नती झाल्याने त्यांनी पुणे विभागीय माहिती उपसंचालक पदाचा कार्यभार स्विकारला. प्रभारी उपसंचालक श्रीमती वर्षा पाटोळे यांच्याकडून त्यांनी उपसंचालक पदाचा पदभार स्विकारला.

डॉ. मोघे हे यापूर्वी मुख्यमंत्री सचिवालयात जनसंपर्क अधिकारी तथा माहिती अधिकारी म्हणून तर नांदेड, रत्नागिरी, नंदूरबार, अहिल्यानगर, नाशिक तसेच पुणे येथे जिल्हा माहिती अधिकारी पदावर कार्यरत होते. त्यांच्याकडे नाशिक विभागीय माहिती उपसंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभारही देण्यात आला आहे.

प्रभारी उपसंचालक श्रीमती पाटोळे यांनी प्रभारी उपसंचालक म्हणून चांगले काम केल्याचे यावेळी उपसंचालक डॉ. मोघे यांनी नमूद केले. सामुहीक प्रयत्नातून सर्वांनी कार्यालयाचे कामकाज अधिक चांगले होईल असे प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले.

श्रीमती पाटोळे आणि कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी डॉ.मोघे यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी जिल्हा माहिती अधिकारी डॉ.रविंद्र ठाकूर, माहिती अधिकारी सचिन गाढवे,प्रदर्शन सहायक विलास कसबे, वरिष्ठ लिपिक सचिन बहुलेकर, वैशाली रांगणेकर, स्वाती साळुंके, सुहास सत्वधर, सुवर्णा पालकर, आराध्या लोंढे, रावजी बांबळे, वर्षा कोडलिंगे आदी उपस्थित होते.

0000

सरहद शौर्याथॉन‌’ स्पर्धेच्या बोधचिन्ह आणि संकेतस्थळाचे अनावरण

सरहद शौर्याथॉन‌’मधून शांती, एकात्मता, सद्भावनेचा संदेश : अजित पवार
22 जून 2025 रोजी झोजी ला वॉर मेमोरिअल ते कारगिल वॉर मेमोरिअल दरम्यान आयोजन
यंदाची स्पर्धा पहलगाम येथे शहीद झालेल्या नागरिकांना समर्पित : संजय नहार

पुणे : कारगील युद्धात भारतीय सेनेने दाखविलेले धैर्य, साहस आणि बलिदान याच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी आयोजित करण्यात येत असलेली आंतरराष्ट्रीय ‌‘सरहद शौर्याथॉन‌’ ही फक्त क्रीडा स्पर्धा नसून भारतातील सर्व धर्मीयांना व संस्कृतींना एकत्र आणण्याचा मोलाचा उपक्रम करीत आहे. या स्पर्धेद्वारे शांती, एकात्मकता आणि सद्भावनेचा संदेश दिला जात आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
झोजी ला युद्ध विजय अमृत महोत्सव आणि कारगील युद्ध विजय रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने 13 जे. के. रायफल्स आर्मी युनिट, द्रास टाऊन, कारगिल डिस्ट्रिक, लडाख यु. टी. यांचे युनिट, सरहद, पुणे आणि अर्हम्‌‍ फाऊंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 22 जून 2025 रोजी लडाख येथील झोजी ला वॉर मेमोरिअल ते कारगिल वॉर मेमोरिअल दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय ‌‘सरहद शौर्याथॉन‌’ 2025 स्पर्धेच्या बोधचिन्ह आणि संकेतस्थळाचे अनावरण अजित पवार यांच्या हस्ते आज (दि. 25) व्हीव्हीआयपी शासकीय विश्रामगृह येथे झाले. त्या वेळी पवार बोलत होते. क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, सरहद, पुणेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार, अर्हम्‌्‌‍ फाऊंडेशन, पुणेचे अध्यक्ष डॉ. शैलेश पगारिया, रेस डायरेक्टर सुमंत वाईकर, टेक्निकल रेस डायरेक्टर वसंत गोखले, सरहदचे विश्वस्त शैलेश वाडेकर, अनुज नहार, लेशपाल जवळगे, संतोष बालवडकर, अर्हम्‌्‌‍ फाऊंडेशन, पुणेचे विश्वस्त स्वराज पगारिया आदी उपस्थित होते. दिनेश कोल्हे यांनी संकेतस्थळाची निर्मिती केली आहे.
काश्मीरमध्ये सरहद संस्था करीत असलेल्या कार्याचे कौतुक करून अजित पवार पुढे म्हणाले, युद्धात शहीद झालेल्या सैनिकांच्या स्मरणाप्रित्यर्थ 2017 पासून ‌‘सरहद शौर्याथॉन‌’चे आयोजन करण्यात येत असून स्पर्धा देशवासीयांसाठी प्रेरणादायी आहे.
पहलगाम येथे झालेल्या नुकत्याच झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध करून अजित पवार म्हणाले, या घटनेचा भारतातूनच नव्हे तर जगभरातून तीव्र निषेध नोंदविला जात आहे. प्रत्येक भारतीयाच्या मनात बदल्याची भावना आहे. सर्व जण पेटून उठले आहेत. पंतप्रधानांनी तातडीने पावले उचलली आहेत.
स्पर्धेविषयी माहिती देताना सुमंत वाईकर म्हणाले, जगाच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील धावपटू या स्पर्धेत सहभागी होतात. या वर्षी अडीच ते तीन हजार स्पर्धक सहभागी होणार आहेत. स्त्री व पुरुष विभागासाठी पाच, दहा आणि 21 किमी तर मुली आणि मुलांसाठी तीन किमीची स्पर्धा आयोजित करण्यात येते. स्पर्धेतील विजेत्यांना भरघोसे बक्षीस देऊन गौरविले जाते. स्पर्धेसाठी 13 जे. के. रायफल्स आर्मी युनिट, द्रास टाऊन, कारगिल डिस्ट्रिक्ट, लडाख यु. टी. युनिटचे मुख्य अधिकारी कर्नल राजेश बांदे यांचे सहकार्य लाभले आहे. वर्ल्ड ॲथेलेटिक आणि इंडियन ॲथेलेटिक यांच्या नियमानुसार ही स्पर्धा होत आहे.
पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यानंतर सरहद संस्थेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कार्याची माहिती देताना संजय नहार म्हणाले, काश्मीरमधील युवकांच्या सहकार्याने अडकलेल्या पर्यटकांना निवास, भोजनासह अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. दहशतवादी हल्ला झाल्यानंतर समाजमाध्यमांद्वारे काश्मीरमधील सामाजिक स्थितीबाबत अयोग्य माहिती पसरविली जात आहे. पण सरहदच्या माध्यमातून पुण्यात शिक्षण घेऊन परतलेल्या काश्मिरी युवकांनी केलेल्या मदतीमुळे लोकभावना बदलली असून सकारात्मकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यंदाची स्पर्धा पहलगाम येथे शहीद झालेल्या नागरिकांना समर्पित करण्यात आली आहे.

पहलगाम हल्ल्यामागील हेतू समाज तोडणे,एकाच घरातील भावाला भावाविरुद्ध लढवणे

श्रीनगर – पहलगाम हल्ल्यानंतर राहुल गांधी जम्मू आणि काश्मीरला पोहोचले. त्यांनी येथे जखमींची भेट घेतली.त्यांनी मुख्यमंत्री ओमार अब्दुल्ला आणि स्थानिक नेते कार्यकर्ता आणि नागरिकांशी भेटी गाठी करण्याचा प्रयत्न सुरु ठेवला आहे यावेळी ते म्हणाले , आम्ही नफरत आणि आतंकवादाच्या विरोधातच आहोत त्यासाठी सरकार जी जी कार्ये करेल त्या त्या कार्यांच्या सोबत आम्ही राहू .. त्यासोबत हेही लक्षात घ्यायला हवे कि,आज पर्यंत इथे कधीही नागरिक अथवा पर्यटक यांच्यावर आतंकी हल्ला झाला नव्हता पहलगाम चा जो हल्ला पर्यटकांवर झाल्या तो सामाजिक एकता तोडणे आणि एकाच घरात राहणाऱ्या भावा भावात दुष्मनी निर्माण करण्याच्या हेतूने झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

ही एक भयानक दुर्घटना आहे. मी येथे काय चालले आहे हे जाणून घेण्यासाठी आणि मदत करण्यासाठी आलो आहे. जम्मू आणि काश्मीरच्या संपूर्ण लोकांनी या भयानक कृत्याचा निषेध केला आहे आणि यावेळी देशाला पूर्ण पाठिंबा देत आहेत. जखमी झालेल्यांपैकी एकाला मी भेटलो.
माझे प्रेम आणि आपुलकी प्रत्येकाला आहे ज्यांनी कुटुंबातील सदस्य गमावले आहेत. मी सर्वांना हे कळावे असे वाटते की देश त्यांच्यासोबत एक आहे. काल आम्ही सरकारसोबत बैठक घेतली आणि संपूर्ण विरोधी पक्षाने या कृतींचा निषेध केला आणि सरकार जे काही कारवाई करेल त्याला पूर्ण पाठिंबा दर्शविला.


जे घडले त्यामागील कल्पना म्हणजे समाजात फूट पाडणे आणि प्रत्येक भारतीयाने एकत्र येऊन दहशतवादी जे करण्याचा प्रयत्न करत आहेत त्याचा पराभव करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. काही लोक काश्मीर आणि देशातील माझ्या बंधू आणि भगिनींवर हल्ला करत आहेत हे पाहून दुःख होते. या घृणास्पद कृत्याशी लढण्यासाठी आणि दहशतवादाला कायमचा पराभूत करण्यासाठी एकजूट आणि एकत्र उभे राहणे आवश्यक आहे.
मी मुख्यमंत्री आणि उपराज्यपालांनाही भेटलो. त्यांनी मला घडलेल्या घटनेची माहिती दिली आणि मी दोघांनाही आश्वासन दिले की मी आणि आमचा पक्ष त्यांना पूर्ण पाठिंबा देऊ.

राहुल म्हणाले- अतिरेक्यांनी काहीही केले, तरी आपण त्यांना हरवू

श्रीनगर -काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी श्रीनगरमध्ये पहलगाम हल्ल्यातील जखमींची आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी सांगितले की, दहशतवाद्यांनी कितीही प्रयत्न केले तरी आम्ही त्यांना पराभूत करू. प्रत्येक भारतीय एकत्र आहे.

तत्पूर्वी, गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. त्यांनी मुख्यमंत्र्यांना त्यांच्या संबंधित राज्यातील पाकिस्तानी नागरिकांना ओळखून परत पाठवण्याचे आवाहन केले.

हल्ल्यानंतर 3 दिवसांनी लष्कराने मोठी कारवाई केली. जम्मू-काश्मीरच्या त्राल आणि अनंतनागच्या बिजबेहरा येथे लश्कर ए तय्यबाच्या २ दहशतवाद्यांच्या घरांवर शोध मोहीम राबवण्यात आली. या कारवाईदरम्यान, दोघांच्याही घरात ठेवलेली स्फोटके फुटली. स्फोटात आसिफ शेख आणि आदिल ठोकर यांची घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली.

येथे, बांदीपोरा येथे शोध मोहिमेदरम्यान सुरू झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला ठार मारले आहे. २ सैनिकही जखमी झाले आहेत. २२ एप्रिल रोजी दुपारी पहलगामच्या बैसरन खोऱ्यात दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. तर १० हून अधिक जण जखमी झाले होते.

सुनील काकडे महावितरणच्या पुणे परिमंडल मुख्य अभियंतापदी रुजू

पुणे, दि. २५ एप्रिल २०२५ : महावितरणच्या पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता म्हणून श्री. सुनील काकडे यांनी शुक्रवार (दि. २५) कार्यभार स्वीकारला. याआधीचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार संचालक (मानव संसाधन) म्हणून भरती कार्यक्रमातून निवड झाली आहे. त्यांच्या खाली जागी भांडूप परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. काकडे पुणे येथे बदली आहे.

मुख्य अभियंता श्री. सुनील काकडे पासवर्डचे संभाजीनगर येथील रहिवासी आहे. विद्युत अभियांत्रिकी पदवीधर असलेले श्री. काकडे १९९७ मध्ये म. रा. विद्युत मंडळ सहायक अभियंता म्हणून रूजू. सन २००६ मध्ये भरती परिणाम त्यांची कार्यप्रणाली अभियंता पदी निवड. या पदावर त्यांनी चाळीसगाव, नाशिक, भुसावळ, संभाजीनगर येथे काम केले. तर २०१७ पासून पदोन्नतीने अधीक्षक अभियंता म्हणून त्यांनी कल्याण, अहिल्यानगर, भांडूप येथे काम केले. श्री. काकडे अभियंता डिसेंबर २०२२ मध्ये मुख्यंता म्हणून पदोन्नती. ते भांडूप परिमंडलात कार्यरत होते. आता पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता म्हणून त्यांची बदली आहे.

पुणे परिमंडल ‘इझ ऑफ लिव्हिंग’नुसार तत्पर ग्राहक सेवा तसेच सुरळीत दर्जेदार वीजपुरवठिकाणच्या व वाढीला सर्वाधिक प्राधान्य दिले जाईल, असे मुख्य अभियंता श्री. सुनील काकडे यांनी सांगितले.

राजेंद्र पवार महावितरणच्या संचालक (मानव संसाधन) पदी रुजू

मुंबई, दि. २५ एप्रिल २०२५ : महावितरण कंपनीचे संचालक (मानव संसाधन) म्हणून श्री. राजेंद्र पवार यांनी शुक्रवार (दि. २५) कार्यभार स्वीकारला. त्यांची या पदावर भरती निवडणूक झाली आहे. याआधी ते पुणे परिमंडल मुख्य अभियंता म्हणून कार्यरत होते.

महावितरणमधील ३६ वर्षांचा अनुभव अनुभवे नवनियुक्त संचालक (व संसाधन) श्री. राजेंद्र पवार हे गोंधळाचे भाऊर (ता. देवळा, जि. नाशिक) येथील रहिवासी आहे. त्यांनी विद्युत अभियांत्रिकी पदवी राज्य अभियांत्रिकी दूर (सीओ विशेष प्राविह्य केली आहे. सुरू १९८९ मध्ये मी. रा. विद्युत मंडळात कनिष्ठ अभियंता म्हणून वाशी (ता. पेण) येथे रुजूड. नंतर पदोन्नतीवर त्यांनी सहायक अभियंता, उपकार्यकारी अभियंता पदी काम केले आहे. सन २०११ मध्ये भरती परिणाम त्यांची कार्यप्रणाली अभियंता पदी निवड. या त्यांनी पेण, कळवण, नाशिक, पनवेल, कल्याण येथे काम केले आहे. तसेच अधीक्षक अभियंता म्हणून नागपूर व पुणे येथे काम केले आहे. गेल्या सव्वादोन श्री. पवार पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता कार्यरत होते.

संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांनी आधिकारी सेवेत लोकाभिमुख प्रशासक, ग्राहक सेवा आणि मानव संसाधन व्यवस्थापन विधी केली आहे. पुणे परिमंडल मुख्य अभियंता म्हणून त्यांनी उत्पादन वाढ, नवीन वीजजोडण्या, छतावरील सौर ऊर्जा आयुक्तांमध्ये विक्रमी व्यवस्था केली आहे. कर्मचारीच कर्मचारी प्रशिक्षण व कार्यशाळा, कर्मचारी प्रोत्साहनपर विविध उपक्रम, कर्मचारी अनुकंपा तत्त्वे भरती प्रक्रियांना मोठा वेग दिला. त्यांच्या नेतृत्वात प्रशिक्षण व विविध उपक्रम पुणे लघुला तीन वर्ष प्रशिक्षण प्रथम क्रमांकाचे नाव आहे. त्यापूर्वी श्री. पवार यांनी स्वतः ‘ऑन फिल्ड’ मुंबईचा महापूर राहतात, ‘तौक्ते’, ‘निसर्ग चक्रीवादळे, ‘कोना’ संकटात आपत्ती व्यवस्थापनाचे नेतृत्व केले आहे.

श्री. राजेंद्र पवार, संचालक (मानव संसाधन) – ‘महावितरणच्या सर्व श्वासोच्छवासासाठी मानव संसाधन एक आकस्मिक व्यवस्थापन सदैव उपलब्ध आहे. कंपनी व हिताला प्राधान्य देत अंतर्गत प्रशासकीय कर्मचारी अधिकमान करण्यास सक्षम आहे.

संत निरंकारी मिशनद्वारा आयोजित भोसरी येथे रक्तदान शिबिरामध्ये ६९७ रक्तदात्यांचे रक्तदान…

भोसरी ,पुणे, एप्रिल २४, २०२५:-
प्रेम आणि बंधुभावना जागविणारा ‘मानव एकता दिवस’, संत निरंकारी मिशन द्वारे दरवर्षी २४ एप्रिल रोजी बाबा गुरबचनसिंहजी यांच्या पावन स्मृतिप्रित्यर्थ श्रद्धा आणि भक्तिभावनेने परिपूर्ण वातावरणात आयोजित केला जातो. हा दिवस केवळ पुण्यस्मरण करण्याचा प्रसंग नसून मानवता, सौहार्द आणि एकत्वाच्या भावनांचा एक आत्मिक संगम आहे.
मानव एकता दिवसाच्या या प्रसंगी मिशन कडून देशभर रक्तदानाच्या एका प्रेरक श्रृंखलेचा शुभारंभ होतो जी नि:स्वार्थ सेवाभावनेच्या सामूहिक जागृतीचे स्वरूप बनून संपूर्ण वर्षभर समाजामध्ये प्रवाहित होत राहते. त्याचबरोबर सत्संग कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रेम, शांती आणि समरसतेचा प्रकाश देखील जनसामान्यांपर्यंत पोहचविला जातो.
यावर्षी सुद्धा संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन मार्फत पूर्ण भारतवर्षात सुमारे ५००हून अधिक शाखांमध्ये भव्य रक्तदान शिबिरांची अखंड श्रृंखला आयोजित करण्यात आली. संत निरंकारी सत्संग भवन, दिघी रोड, भोसरी येथे २४ एप्रिल २०२५ रोजी करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये ६९७ मिशनच्या अनुयायांनी निस्वार्थ भावनेने रक्तदान केले त्याचबरोबर समाजातील अनेक सज्जनांनी उत्साह आणि समर्पण भावनेने स्वेच्छा रक्तदान करुन मानवकल्याणामध्ये आपला सहयोग दिला. वाय.सी.एम. रुग्णालय रक्तपेढी यांनी २१६ युनिट, ससून रुग्णालय रक्तपेढी यांनी १०१ युनिट, संत निरंकारी रक्तपेढी यांनी ३८० युनिट रक्त संकलन करण्याचे कार्य केले.
युगप्रवर्तक बाबा गुरबचनसिंहजी यांनी सत्यबोधाच्या माध्यमातून समाजाला समाज अंधश्रद्धा व अनिष्ठ प्रथांपासून मुक्त करुन नशमुक्ती, साधे विवाह आणि युवावर्गाला सकारात्मक विचारांशी जोडणे यांसारख्या लोककल्याणकारी अभियानाची प्रेरक सुरवात केली. त्यांचे पावन मार्गदर्शन पुढे चालवत बाबा हरदेवसिंहजी यांनी “रक्त नाड्यांमध्ये वाहावे, नाल्यांमध्ये नको” हा अमर संदेश देऊन रक्तदानाला मिशनच्या आध्यात्मिक सेवेचे अभिन्न अंग बनवले. हा संदेश आजदेखील प्रत्येक निरंकारी भक्ताच्या हृदयामध्ये सेवा आणि समर्पणाची प्रेरक ज्योत बनून तेवत आहे.
हा दिवस चाचा प्रतापसिंहजी यांच्यासह त्या सर्व समर्पित बलिदानी संतांच्या पुण्य स्मृतिचे प्रतीक आहे, ज्यांनी मानव एकता, निःस्वार्थ सेवा आणि आध्यात्मिक जागृतीच्या मार्गावर चालत असताना आपले संपूर्ण जीवन समर्पित केले. मानव एकता दिवस त्याच संतांचा दृढविश्वास व दृढसंकल्पाची प्रेरणा जिवंत करतो.
आरोग्य तपासणी, स्वच्छतेची विशेष काळजी आणि रक्तदात्यांसाठी उत्तम जलपान व्यवस्था या बाबींनी या सेवेला आणखी व्यवस्थित व कौतुकास्पद बनवले. हे महाअभियान केवळ रक्तदान नसून सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांचा करुणा, सेवा आणि एकत्वाचा संदेश जीवनात उतरविण्याचे सजीव माध्यम आहे जे आम्हाला शिकवते, की मानवता हाच सर्वोच्च धर्म होय. याच प्रेरणेने युक्त संत निरंकारी मिशन, सेवा आणि समर्पणाच्या पथावर निरंतर मानवतेचा मार्ग प्रशस्त करत आहे.

वारज्यातील भीम फेस्टिव्हल व्हेलला मोठा प्रतिसाद

पुन्हे :

वंचित बहुजनडी (पुणे शहर आणि आदर्श प्रकाशमय सामाजिक सेवा सेवा माथा भीम जयंती आयोजित  पाच दिवस भीम फेस्टिव्हलचा मोठा प्रश्न. वारजे महामार्ग पुल उभारणी मंचावर दि.२० ते २५ एप्रिल २०२५ दरम्यान हा उत्सव पार. मुख्य आयोजक महाराष्ट्र राज्य वंचित बहुजन माथाडी पुणे शहराध्यक्ष अजय भालशंकर, उत्सव प्रमुख सचिन गजरमल, कार्याध्यक्ष दत्ता शेंडगे यांनी संयोजन केले.

प्रबोधनकार आणि रुद्ध वनकर यांच्या गटात पाचचा भीम गीतांचा कार्यक्रम पार पडला. आवडते वसंत वसंत सावे, वंचित बहुजन माथाडी राज्य सरचिटणीस मोहिते, उद्योजक लक्ष्मी जगदाळे, पंथर महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष गायकवाड, वंचित सुरेश स्थान शहराध्यक्ष एड.अरविंद तायडे, वंचित बहुजन जय पुणे शहर एड.कि. कदम, वंध्य अध्यक्ष बहुजन परिस्थितीक परिस्थिती भेचित अध्यक्ष सागर अल्हाट, राजा कांबळे, नितीन गायकवाड, उद्यो सुरेखा गायकवाड, विकासगडे- पाटील, स्नेहा गायकवाड, रोहन गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर भोरकडे, प्रभाकर सरोदे, सतीश रणवरे, योगेश राजापूरकर, दीपक आणि सर्व क्षेत्र मान्यवर उपस्थित होते .

अनिता प्रेरणा,प्रवीण चौधरी,अमोल काळे,वर्षा जाधव,प्रतिक रणसौरे,रोहन चतुर,मंथन भालशंकर,आदर्श भालशंकर यांनी स्वागत केले .सर्व दिवस मोठ्या जल्लोषात संयुक्त भीम जयंती फेस्टिवल ला नागरिकांनी प्रतिसाद दिला.आज समारोप करण्यात आला.

प्राधिकरणाची अनाधिकृत होर्डिंगवर धडक कारवाई,अन पीएमआरडीएच्या तिजोरीत ४८ लाखाची भर

पुणे (दि.२५) : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील अनधिकृत होर्डिंगवर सोमवारपासून (दि.२१) कारवाई करण्यात येत आहे. यात हवेली आणि मुळशी तालुक्यात तीन ठिकाणी एकाच वेळी अनधिकृत होर्डिंगवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. त्यामुळे संबंधितांनी पुढील कारवाई टाळण्यासाठी प्राधिकरणाकडे ४८ लाखांची रक्कम जमा केली आहे.

हवेली तालुक्यातील वडकी, मुळशी तालुक्यातील हिंजवडी येथून कारवाईस सुरूवात करण्यात आली. या कारवाईमुळे होर्डींगधारक व ॲडव्हरटायझिंग कंपनी यांनी धसका घेतला असून प्राधिकरणाच्या विकास परवानगीकडे अंतिम चलणे भरण्यास सुरुवात झाली आहे. २२ एप्रिलपर्यंत एकूण १० होर्डींगधारकांनी अंतिम चलणाची रक्कम ४८ लाखांपेक्षा अधिक रक्कम जमा केली आहे. संबंधित कारवाई पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, अतिरिक्त महानगर आयुक्त दिपक सिंगला, पोलिस अधिक्षक तथा दक्षता अधिकारी अमोल तांबे, सह आयुक्त डॉ. दिप्ती सुर्यवंशी-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. कारवाईवेळी तहसीलदार रविंद्र रांजणे, तहसीलदार सचिन मस्के, अभियंता विष्णू आव्हाड, दिप्ती घूसे, प्रशांत चौगले, ऋतुराज सोनवणे, गणेश जाधव, तेजस मदने यांच्यासह स्थानिक बंदोबस्त तैनात होता.

प्राधिकरण क्षेत्रात अवकाळी पाऊस, वादळी वारे आदीमुळे होर्डीगपासून धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे याची दखल घेऊन यापुढे नियमित अनधिकृत होर्डींगवर कारवाई करण्यात येणार आहे. वर्दळीच्या व रहदारीच्या ठिकाणाचे धोकादायक, मर्यादितपेक्षा उंचीचे, दुबार संरचना होर्डिंग काढून घ्यावेत. तसेच होर्डींगधारकांनी अनधिकृत होर्डींगला परवानगी घेण्यात घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अन्यथा एकतर्फी निष्कासन कारवाई करण्यात येणार आहे. तसेच प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय कोणतेही नवीन आकाशचिन्ह उभारले जाणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन प्राधिकरणाच्या सहआयुक्त (प्र) डॉ. दिप्ती सुर्यवंशी-पाटील यांनी केले आहे.

पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ प्रभात तरुण मित्र मंडळ आणि डेक्कन जिमखाना नागरिक मंचच्या वतीने निदर्शने

पुणे : पहलगाम येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात निष्पाप पर्यटक हिंदू बंधवांना गोळ्या घालून ठार केले गेले. या निर्दयी भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ अपूर्व सोनटक्के, केतकी देशपांडे, बाळासाहेब गिराम यांच्या पुढाकाराने प्रभात तरुण मित्र मंडळ आणि डेक्कन जिमखाना नागरिक मंच च्या वतीने कमला नेहरू पार्क, प्रभात रस्ता येथे तीव्र निदर्शने करण्यात आली.

काश्मीर, पहलगाम येथिल हिंदु पर्यटकांवरील इस्लामी दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यासाठी पाक पंतप्रधान शहाबाज शरीफ आणि पाक लष्कर प्रमुख असिम मुनीर व पाकिस्तानच्या झेंड्याचे दहन करुन त्यांच्या विरोधात जोरदार घोषणा देत निदर्शने करण्यात आले.

या मध्ये महिलांनी उस्फूर्त सहभाग घेतला. आणि स्त्री शक्तीचे संगठन दिसून आले. केतकी देशपांडे, सुवर्णा ऋषि, रंजना नाईक, किमया ढेकणे ,अलका पेशवे ,भक्ती साठे ,माधवी अगरवाल, अपूर्व सोनटक्के, बाळासाहेब गिराम ,विवेक देव,हर्षल मोरे,योगेश जोगळेकर अजिंक्य मेहता, प्रदीप देशपांडे, मिलिंद टकले, पुष्कर लिमये तसेच कामाला नेहरू पार्क मधील नागरिकांचा सहभाग दिसून आला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते राज्य कुटुंब कल्याण भवन व प्रशिक्षण केंद्र इमारत भूमिपूजन

सर्वांगीण निरोगी महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्यशासन कटीबद्ध- उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि. 25: निरोगी नागरिक हाच राज्याच्या प्रगतीचा पाया असून, आरोग्य सेवेचा दर्जा सुधारण्यासोबतच सर्वांगीण निरोगी महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्यशासन कटीबद्ध असून याकरीता सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.

कुटुंब कल्याण भवन येथे आयोजित राज्य कुटुंब कल्याण भवन व प्रशिक्षण केंद्र इमारत भूमिपूजन आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत राज्यातील नवीन ४३ आपला दवाखान्यांचे लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, राज्याचे आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे व्यवस्थापकीय संचालक अमगोथू श्री रंगा नायक, आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी आदी उपस्थित होते.

राज्य कुटुंब कल्याण भवन व प्रशिक्षण केंद्र इमारत आणि नवीन ४३ आपला दवाखान्यांच्या माध्यमातून नव्याने भर पडणाऱ्या आरोग्य सुविधांमुळे राज्यातील आरोग्य सेवा अधिक बळकट, सक्षम आणि गतिमान होईल, असे सांगून उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात वेळेत उपचार न मिळाल्यामुळे एका गरोदर महिलेला जीव गमवावा लागल्याच्या प्रकरणात चौकशी होऊन दोषींवर निश्चित कठोर कारवाई केली जाईल. अशा घटना पुन्हा घडू नये, अशी प्रणाली आणि कठोर नियम सर्व रुग्णालयांना लागू करण्यासाठी राज्य शासन एक नवे धोरण लवकरच राज्यात लागू करणार आहे. या धोरणानुसार कोणतेही रुग्णालय नागरिकाला अत्यावश्यक आरोग्य सेवेपासून वंचित ठेवणार नाही. गरजू नागरिकांना वैद्यकीय मदत मिळालीच पाहिजे, अशी राज्य शासनाची भूमिका असून लवकरच राज्यात रुग्णालयांसाठी ‘नो डिनायल पॉलिसी’ लागू करणार आहे. राज्य शासन रुग्णालयांना जागेसह सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देते.

जागतिक हिवताप दिनानिमित्त चांगले काम करण्याच्या वैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देऊन श्री. पवार म्हणाले, अधिकारी, कर्मचाऱ्यासह नागरिकांनी नियमित व्यायाम केला पाहिजे. संतुलित आहार घेतला पाहिजे. आपले मानसिक आरोग्य चांगले राखून निरोगी नागरिक हाच राज्याच्या प्रगतीचा पाया आहे या विचाराने सर्वांनी काम करावे, नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा दिली पाहिजे. असेही श्री. पवार म्हणाले.

आरोग्य मंत्री श्री.आबिटकर म्हणाले, आरोग्य सेवा पुरविण्यासाठी पुणे हे राज्यातील दुसरे सर्वात महत्त्वाचे ठिकाण आहे. पुण्यात आरोग्य विभागाची अनेक राज्यस्तरीय कार्यालये आहेत. राज्य कुटुंब कल्याण भवन व प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीमुळे आरोग्य विभागाची एकाच छताखाली येणार आहेत. यामुळे आरोग्य विभागाची सर्व कार्यालय एकाच ठिकाणी आल्यानंतर प्रशासकीय कामांमध्ये गतिमानता आणि दर्जेदार पायाभूत सुविधा आणि आरोग्य सुविधा देण्यास मदत होणार आहे.

अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज या इमारतीमध्ये प्रशिक्षण हॉल, व्हिडिओ कॉन्फरन्स हॉल, अभिलेख कक्ष, वाहनतळ, आदी पायाभूत सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे, या इमारतीचे काम नियोजित वेळेत पूर्ण करावे. आज लोकार्पण करण्यात आलेल्या नवीन आपला दवाखान्यांपैकी पुणे शहरात सात दवाखाने आहेत. या दवाखान्यांच्या माध्यमातून शहरी भागात झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या गरीब नागरिकांना अधिक गतिमान आणि दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होतील, असे श्री. आबिटकर म्हणाले.

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, सार्वजनिक आरोग्य विभागाचे काम समाजाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. आरोग्य विभागाने आतापर्यंत विविध महत्त्वाच्या मोहिमा यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत. ग्रामीण आणि दुर्गम भागातही आपल्या सेवा पुरविल्या आहेत. या पुढील काळातही आरोग्य विभाग चांगली कामगिरी करून लोकांना दर्जेदार आरोग्य सेवा पुरवेल, असा विश्वास डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमानंतर जागतिक हिवताप दिनानिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीला हिरवा झेंडा दाखवून आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर त्यात सहभागी झाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्याचे आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे व्यवस्थापकीय संचालक अमगोथू श्री रंगा नायक यांनी केले.

यांत्रिक वस्त्र धुलाई सेवा केंद्र आणि रेण्वीय निदान प्रयोगशाळा सुरु करण्याची आरोग्यमंत्र्यांची घोषणा
सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने रुग्णालयांमध्ये स्वच्छता, आहार आणि रुग्णालयात वापरल्या जाणाऱ्या वस्त्रांची स्वच्छता हे अत्यंत महत्त्वाचे विषय आहेत. त्यामुळे राज्यातील ८ परिमंडळातील ५९३ आरोग्य संस्थांमध्ये यांत्रिक वस्त्र धुलाई सेवा केंद्र लवकरच सुरु करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे राज्यामध्ये साथरोग उद्रेक काळात जीवाणू व विषाणू चाचणी जलद गतीने करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, पुणे येथे रेण्वीय निदान प्रयोगशाळा उभारणार असल्याची घोषणा आरोग्य मंत्री श्री. आबिटकर यांनी केली.