Home Blog Page 338

पहलगाम हल्ल्यावर CM ओमर म्हणाले- सुरक्षा माझी जबाबदारी होती,माझ्याकडे शब्द नाहीत, मी माफी कशी मागू?

श्रीनगर-सोमवारी जम्मू-काश्मीर विधानसभेत पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले – यजमान असल्याने सुरक्षेची जबाबदारी माझ्यावर होती. या लोकांच्या कुटुंबियांची मी कशी माफी मागू? माझ्याकडे शब्द नाहीत.जम्मू आणि काश्मीरची सुरक्षा ही लोकांनी निवडून दिलेल्या सरकारची जबाबदारी नाही, तर मुख्यमंत्री आणि पर्यटन मंत्री असल्याने मी त्यांना फोन केला होता, असे ओमर म्हणाले. यजमान असल्याने त्यांना सुरक्षितपणे पाठवण्याची जबाबदारी माझी होती पण मी ते करू शकलो नाही.

ओमर म्हणाले- ज्या मुलांना त्यांचे वडील रक्ताने माखलेले दिसले त्यांना मी काय सांगू? त्या नौदल अधिकाऱ्याच्या विधवेबद्दल मी काय सांगू, ज्याचे काही दिवसांपूर्वीच लग्न झाले होते. काही लोकांनी विचारले की आमची काय चूक होती. आम्ही पहिल्यांदाच सुट्टीसाठी काश्मीरमध्ये आलो. याचे परिणाम मला आयुष्यभर भोगावे लागतील.

ओमर अब्दुल्ला म्हणाले- मला विश्वास बसत नाही की काही दिवसांपूर्वी आपण या सभागृहात होतो आणि अर्थसंकल्प आणि इतर अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. सभागृह तहकूब होईपर्यंत, आम्हाला आशा होती की आपण पुन्हा श्रीनगरमध्ये भेटू. जम्मू आणि काश्मीरमध्ये अशी परिस्थिती निर्माण होईल की आपल्याला पुन्हा इथे भेटावे लागेल असे कोणी विचार केला असेल.मुख्यमंत्री अब्दुल्ला म्हणाले की, स्पीकर साहेब, तुमच्या आजूबाजूला असे लोक बसले आहेत ज्यांनी स्वतः त्यांच्या नातेवाईकांचे बळी जाताना पाहिले आहे. आपल्यापैकी असे बरेच लोक आहेत ज्यांच्यावर हल्ला झाला आहे. या सभागृहाच्या वतीने या हल्ल्याचा निषेध व्हावा अशी आमची इच्छा आहे. मृत्युमुखी पडलेल्या २६ लोकांच्या कुटुंबियांप्रति आम्ही सहानुभूती व्यक्त करू शकतो.

ओमर म्हणाले – अध्यक्ष महोदय, उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत संपूर्ण देश या हल्ल्याने प्रभावित झाला आहे. हा पहिला हल्ला नव्हता. आपण अनेक हल्ले होताना पाहिले आहेत. आपण अमरनाथ यात्रेवर हल्ले पाहिले, दोडामधील गावांवर हल्ले झाले, काश्मिरी पंडितांच्या वस्त्यांवर हल्ले झाले, शीख वस्त्यांवर हल्ले झाले.अब्दुल्ला म्हणाले की, दरम्यान असा काळ आला होता, बैसरन हल्ला २१ वर्षांनंतर इतका मोठा हल्ला आहे. हा हल्ला नागरिकांवरील सर्वात मोठा हल्ला आहे. हे आपले भविष्य नाही, ही आपल्या भूतकाळाची कहाणी आहे. आता पुढचा हल्ला कुठे होईल हे पाहणे बाकी आहे. मृतांच्या कुटुंबियांबद्दल काय बोलावे आणि कशी माफी मागावी हे ठरवण्यासाठी माझ्याकडे शब्द नव्हते.

विधानसभेत मंजूर झालेल्या ठरावात असे म्हटले आहे की असे दहशतवादी हल्ले ‘काश्मीर’, देशाची एकता, शांतता आणि सद्भावना यावर थेट हल्ला आहेत. विधानसभेने पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल तीव्र संवेदना व्यक्त केल्या आणि त्यांचे दुःख सामायिक करण्याचा संकल्प केला.हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरच्या लोकांनी दाखवलेल्या एकता, करुणा आणि धैर्याचे विधानसभेने कौतुक केले. या प्रस्तावात असेही म्हटले आहे की राज्यभर शांततापूर्ण निदर्शने झाली आणि लोकांनी पर्यटकांना पाठिंबा दिला.देशभरातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना काश्मिरी विद्यार्थी आणि नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्याचे आणि त्यांच्याविरुद्ध कोणत्याही प्रकारचा भेदभाव किंवा छळ रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे आवाहन विधानसभेने केले.

पहलगाम हल्ल्यावरील विधानसभेत मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचे हे पहिलेच भाषण होते. पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हे विशेष विधानसभा सत्र बोलावण्यात आले आहे. याआधी, हल्ल्याचा निषेध करणारा ठराव मंजूर करण्यात आला. विधानसभेच्या विशेष अधिवेशनात उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी यांनी हा प्रस्ताव मांडला.सत्राच्या सुरुवातीला, सदस्यांनी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या २६ जणांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दोन मिनिटे मौन पाळले. केंद्र सरकारच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या (सीसीएस) बैठकीत पाकिस्तानबाबत उचललेल्या पावलांनाही विधानसभेने पाठिंबा दिला आहे. त्याच वेळी, पर्यटकांना वाचवताना आपला जीव गमावलेल्या पोनी चालक सय्यद आदिल हुसेन शाह यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

सर्वोच्च न्यायालयाला कोणतीही निवडणूक रोखण्याचा अधिकारच नाही-स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांवर आंबेडकरांचा दावा

तारीख पे तारीख देणाऱ्या न्यायालयाला टोला: राजकीय पक्षांचे कार्यकर्ते हवालदिल
मुंबई-राज्यातील लांबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महायुती सरकार व निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. सर्वोच्च न्यायालयाला कोणतीही निवडणूक रोखण्याचा अधिकार नाही. पण निवडणूक आयोगाला निवडणूक घेण्यासाठी कणा नाही हे दुर्दैव आहे, असे आंबेडकर यांनी म्हटले आहे.

मागील 3 वर्षांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी ही टीका केली आहे. ते म्हणाले, राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर सर्वप्रथम कोर्टात भूमका मांडणे आवश्यक आहे. कारण, सुप्रीम कोर्टाला कोणतीही निवडणूक रोखण्याचा अधिकार नाही. पण दुर्दैव असे की निवडणूक आयोगाला निवडणूक घेण्यासाठी आवश्यक असणारा कणाच नाही. संविधानाने स्पष्टपणे सुप्रीम कोर्टाला निवडणूक रोखण्याचा अधिकार नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने हिंमत दाखवून निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला पाहिजे.

उल्लेखनीय बाब म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 27 टक्के ओबीसी आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट असल्याने राज्यातील मुंबईसह 27 महानगरपालिका, 257 नगरपालिका, 26 जिल्हा परिषदा आणि 289 पंचायत समित्यांमध्ये प्रशासकीय कामकाज सुरू आहे. राज्यात शासन आणि प्रशासन यातील कामकाजाचा अनुभव घेऊन नेतृत्व विकसित करण्याच्या उद्देशाने स्थानिक स्वराज्य संस्था अतिशय महत्त्वपूर्ण ठरतात. पण वर्षानुवर्षे त्यांच्या निवडणुका न झाल्याने सध्या राजकीय पक्षांचे आणि सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते हवालदिल झाले आहेत.

पहलगाम हल्ल्यानंतर सरकारने काहीच केले नाही:दुसरीकडे, प्रकाश आंबेडकरांनी यावेळी पहलगाम हल्ल्यानंतर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारकडून देण्यात येणाऱ्या प्रत्युत्तरावरही रोखठोक भूमिका मांडली. पहलगाम हल्ल्यानंतर सरकारने थातूरमातूर कारवाई करून वेळ मारून नेण्याचे काम केले. व्हिसा घेऊन आलेल्यांना परत पाठवणे ही कारवाई होत नाही. ते परत जाणारच होते. त्यात काहीही नवीन नाही. भारतीय लष्कर कारवाई करण्यास तयार आहे. पण राजकीय नेतृत्व निर्णय घेण्यास घाबरत आहे. सरकारने या प्रकरणी निर्णयायक कारवाई करावी. त्याला संपूर्ण देश पाठिंबा देईल, असे ते म्हणाले.

खंडाळकर संगीत अकादमीतर्फे ‘ज्ञानदेव संगीत महोत्सवा’चे आयोजन

पुणे : अभिनव गंधर्व पंडित रघुनाथजी खंडाळकर संगीत कला अकादमी, पुणे यांच्यावतीने शनिवार दि. 3 आणि रविवार दि. 4 मे रोजी अभिजात भारतीय शास्त्रीय संगीतावर आधारित ‘ज्ञानदेव संगीत महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे.
महोत्सव पर्वती-विद्यानगरी येथील कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी अँड जी. के. पाटे (वाणी) इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या कै. दादासाहेब केतकर सभागृहात होणार आहे. महोत्सवाची सुरुवात सायंकाळी ५ वाजता होणार आहे.
राजस उपाध्ये यांच्या व्हायोलिन वादनाने शनिवारी (दि. 3) महोत्सवास प्रारंभ होईल. त्यानंतर प्रसिद्ध गायक धनंजय हेगडे यांचे शास्त्रीय गायन होईल. प्रसिद्ध तबलावादक पद्मश्री पंडित विजय घाटे यांचा ‘मेलोडीक रिदम’ हा कार्यक्रम होणार आहे. यात शीतल कोलवलकर (कथक), सुरंजन खंडाळकर (गायन), ओमकार दळवी (पखवाज), अमेय बिचू (संवादिनी), सागर पटोकार (पढंत) यांचा सहभाग असणार आहे.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी (दि. 4) पंडित रघुनाथ खंडाळकर यांचे शिष्य महेश कंटे आणि शंकर गिरी यांचे सहगायन होईल. त्यानंतर यशवंत वैष्णव यांचे एकल तबलावादन होणार असून त्यांना मिलिंद कुलकर्णी संवादिनी साथ करतील. कै. विप्रदास चंद्रकांत मेणकर (ज्येष्ठ उद्योजक, संगीतप्रेमी) स्मृती पुरस्काराने पद्मश्री पंडित विजय घाटे यांचा गौरव केला जाणार असून पुरस्काराचे वितरण प्रसिद्ध उद्योजक विलास जावडेकर यांच्या हस्ते होणार आहे. या प्रसंगी प्रसिद्ध वैद्य प्रशांत अनंत सुरू यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
महोत्सवाची सांगता विद्यालयाचे संस्थापक अभिनव गंधर्व पंडित रघुनाथ खंडाळकर, त्यांचे पुत्र व शिष्य सुरंजन आणि शुभम खंडाळकर यांच्या ‘कृष्णरंग’ या अनोख्या कार्यक्रमाने होणार आहे. त्यांना अमर ओक (बासरी), अजिंक्य जोशी (तबला), श्रेयस बडवे (निरूपण), पार्थ भूमकर (पखवाज), अमृता ठाकूरदेसाई (की-बोर्ड), विश्वास कळमकर (तालवाद्य) हे साथसंगत करतील. महोत्सवाच्या दोन्ही दिवसाचे निवेदन मंगेश वाघमारे करणार आहेत. कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य असून मोफत प्रवेशिक कार्यक्रम स्थळी मिळणार आहेत..

उच्च न्यायालयाने इन्फोसिसचे सह-संस्थापक क्रिस गोपालकृष्णन यांच्या विरोधातील एफआईआर फेटाळला.

  • तक्रार ‘कायदेशीर प्रक्रियेचा दुरुपयोग’ असल्याचे सांगितले.
  • तक्रारकर्त्याच्या विरोधात ‘ फौजदारी अवमान’ कार्यवाही सुरु करण्याचे स्वातंत्र्य दिले.

बंगलोर, २८ एप्रिल: कर्नाटक उच्च न्यायालयाने इन्फोसिसचे सह-संस्थापक क्रिस गोपालकृष्णन आणि इतरांच्या विरोधातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, १९८९ अंतर्गत दाखल करण्यात आलेला एफआयआर फेटाळला आहे. न्यायालयाने ही तक्रार म्हणजे “कायदेशीर प्रक्रियेचा दुरुपयोग” असल्याचे नमूद केले असून, तक्रारकर्त्याच्या विरोधात ‘ फौजदारी अवमान’ केल्याबद्दल कार्यवाही सुरु करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे.

न्यायाधीश हेमंत चंदनगौडर यांनी १६ एप्रिल रोजी आदेश दिला, त्यामध्ये त्यांनी असे निरीक्षण नोंदवले आहे की, ही तक्रार म्हणजे ‘याचिकाकर्त्यांना त्रास देण्याचा मनस्ताप देणारा प्रयत्न’ होता.

हा एफआयआर भारतीय विज्ञान संस्थेचे (आयआयएससी) के माजी फॅकल्टी सदस्य डी. सन्ना दुर्गाप्पा यांनी दाखल केलेल्या एका खाजगी तक्रारीवर आधारित होता, त्यांना २०१४ साली लैंगिक छळाच्या आरोपांवरील अंतर्गतफ चौकशीनंतर पदच्युत करण्यात आले होते.

न्यायालयाने सांगितले की, २०१५ मध्ये उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिले गेल्यानंतर टर्मिनेशनचे रूपांतर रेसिग्नेशनमध्ये करण्यात आले होते. त्यावेळी करण्यात आलेल्या समझोत्याचा एक भाग म्हणून दुर्गप्पा यांनी संस्था व तिच्या प्रतिनिधींच्या विरोधात सर्व तक्रारी व कायदेशीर कार्यवाही मागे घेण्याला सहमती दर्शवलेली होती.

असे असून देखील, त्यांनी आणखी दोन एफआयआर दाखल केले, त्यापैकी दोन २०२२ आणि २०२३ मध्ये रद्द करण्यात आले होते. माननीय न्यायालयाने सांगितले की, वर्तमान एफआयआरमध्ये देखील अशाच प्रकारचे आरोप आहेत आणि हा कायदेशीर, न्यायालयीन प्रक्रियेचा दुरुपयोग आहे.

निर्णयावर प्रतिक्रिया देताना, क्रिस गोपालकृष्णन यांनी सांगितले, “आपली न्यायालये आणि न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे. या निकालावरून हे सिद्ध होते की निष्पक्ष आणि न्याय्य व्यवस्थेत कायदेशीर तरतुदींचा गैरवापर करण्याला कोणतेही स्थान नाही. माननीय उच्च न्यायालयाने खोटेपणा ओळखला आणि सत्याला मान्यता दिली याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.”

न्यायालयाने पुढे म्हटले की, हे आरोप अनुसूचित जाती/जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत कोणत्याही गुन्ह्यात मोडत नाहीत, हे निदर्शनास आणून दिले की हा खटला मुळात दिवाणी स्वरूपाचा होता परंतु चुकीच्या पद्धतीने त्याला गुन्हेगारी रंग देण्यात आला होता.

उच्च न्यायालयाने क्रिस गोपालकृष्णन आणि इतर याचिकाकर्त्यांना दुर्गाप्पाविरुद्ध फौजदारी अवमानना ​​कार्यवाही सुरू करण्यासाठी अॅडव्होकेट जनरलकडे जाण्याची परवानगी दिली आहे.    

MHT-CET परिक्षेतील घोटाळ्याची चौकशी करा, पेपरमधील चुकांचे गुण विद्यार्थ्यांना द्या.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून मागणी.

विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई करा.

मुंबई, दि. २८ एप्रिल २०२५
महाराष्ट्र सरकारने राज्य सामाईक परिक्षा (MHT-CET) सेल यांच्या माध्यमातून रविवार दिनांक २७ एप्रिल २०२५ रोजी परीक्षा घेतली. पण या परिक्षेतील घोळामुळे विद्यार्थी व पालकांची चिंता वाढवली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील केंद्रावर ५० गुणांच्या गणिताच्या पेपरमध्ये २० ते २५ प्रश्नांसाठी उत्तराचे पर्याय चुकीचे होते अशी तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. हा अतिशय गंभीर प्रकार असून विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान न करता त्यांना या प्रश्नांचे गुण द्यावेत, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणतात की, गणिताच्या ५० प्रश्नांमधील २० ते २५ प्रश्नांच्या उत्तराचे पर्याय चुकीचे होते, काही प्रश्नांचे चारही पर्याय चुकीचे होते पण विद्यार्थ्यांना सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक असल्याने त्यांना नाईलाजाने चुकीचे पर्याय निवडावे लागले. याबाबत विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राकडे तक्रार केली असता त्यांची साधी दखलही घेतली नाही. अशाच प्रकारचा घोळ राज्यातील इतर परीक्षा केंद्रावर झाल्याच्या तक्रारी आहेत. काही परीक्षा केंद्रावर सर्व्हर डाऊन झाल्याच्या तक्रारीही आल्या आहेत पण परिक्षा केंद्राकडून समाधानकारक उत्तरे मिळाले नाहीत.

अभियांत्रिकी प्रवेशासाठी ही परीक्षा महत्वाची असून तब्बल २० ते २५ प्रश्नांचे पर्यायच चुकीचे दिले असतील तर विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते, याला जबाबदार कोण? पेपर काढणे व परिक्षा घेण्याची जबाबदारी असलेल्या संस्था वा कंपनीच्या चुकीची शिक्षा विद्यार्थ्यांनी का भोगायची? हा विषय केवळ काही प्रश्नांचा नसून हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा आहे. राज्य सरकारने हे प्रकरण गांभिर्याने घ्यावे व ज्यांना हे काम होते त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. ज्या संस्थेला पेपर काढता येत नाही, परिक्षांचे नियोजन व्यवस्थित करता येत नाही अशांना पुन्हा कोणत्याही परिक्षेचे काम देऊ नये, त्यांना काळ्या यादीत टाकावे. कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची सर्व जबाबदारी राज्य सरकारची आहे. राज्य सरकारने यावर आपली भूमिका स्पष्ट करून विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

आता संपूर्ण महाराष्ट्रासाठी ‘महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल’

पर्यटन क्षेत्रात रु. १ लाख कोटींची खासगी गुंतवणूक आणि १८ लाख प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट


मुंबई, दि. 28 :- पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी राज्य शासनाने ‘महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल (पर्यटन मित्र)’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यटन क्षेत्रातील वाढत्या संधी, नैसर्गिक, सांस्कृतिक विविधतेचा विचार करता या सुरक्षा दलाच्या माध्यमातून पर्यटकांना सुरक्षित पर्यटनाचा अनुभव देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
पर्यटन मंत्री देसाई म्हणाले की, राज्यातील पर्यटन स्थळे, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा यांची माहिती पुरविणे हा या पर्यटन सुरक्षा दलाचा मुख्य उद्देश असणार आहे. १ ते ४ मे, २०२५ दरम्यान पार पडणाऱ्या सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर महोत्सवात ‘महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल’ प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात येणार आहे.
राज्यात येणाऱ्या पर्यटकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, तसेच राज्यातील संस्कृती, इतिहास, पर्यटनस्थळे, कायदा, नियम, पर्यटनाविषयी आवश्यक माहिती देण्यासाठी राज्यात पर्यटन स्थळावर पर्यटकांच्या सेवेसाठी पर्यटन पोलिसांची कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी राज्य सुरक्षा मंडळाने व मेस्कोने त्यांच्याकडे असलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती लवकरात लवकर सादर करण्याचे निर्देश पर्यटन विभागाने दिले आहेत. ‘पर्यटन पोलीस’ या संकल्पनेमुळे पर्यटन स्थळावरील शाश्वत पर्यटन पद्धती टिकवून ठेवण्यासाठी व शाश्वत पर्यटनच्या संवर्धनासाठी प्रयत्न करतील.
पर्यटन मंत्री देसाई म्हणाले की, पर्यटन सुरक्षा दलाच्या नव्याने सुरूवातीमुळे राज्यातील पर्यटनाला नवसंजीवनी मिळेल. हे दल पर्यटकांच्या सुरक्षेसाठी तैनात असेल, ज्यामुळे देश-विदेशातील पर्यटकांचा विश्वास वाढेल. स्थानिक ठिकाणी रोजगाराच्या संधी निर्माण होतील. दलातील कर्मचारी विशेष प्रशिक्षण घेतील, जेणेकरून ते पर्यटकांना मार्गदर्शन आणि संरक्षण देऊ शकतील. पर्यटन स्थळांवर सीसीटीव्ही, हेल्पलाईन आणि तत्काळ प्रतिसाद यंत्रणा यासारख्या सुविधा उपलब्ध होतील.
आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षा दल ठरेल वरदान
प्रधान सचिव अतुल पाटणे म्हणाले की, पर्यटकांसाठी सुरक्षाकवच निर्माण करण्याच्या दृष्टीने पर्यटन विभागाचे हे पाऊल अत्यंत सकारात्मक आहे. यामुळे पर्यटनस्थळांवर विश्वासार्ह वातावरण निर्माण होईल. तसेच पर्यटकांचा पर्यटनाकडे ओघ वाढेल आणि स्थानिक समुदायांना आर्थिक लाभ मिळेल. दलामध्ये प्रशिक्षित कर्मचारी, आधुनिक तंत्रज्ञान आणि समन्वित यंत्रणा असेल, जी आपत्कालीन परिस्थितीत त्वरित कारवाई करेल. पर्यटकांसाठी हेल्पलाइन, माहिती केंद्र आणि डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे सुलभ सेवा उपलब्ध होतील. याशिवाय, स्थानिक पोलिस आणि प्रशासनाशी समन्वय साधून सुरक्षा व्यवस्था बळकट केली जाईल. पर्यटन विभाग पर्यटकांच्या गरजा समजून त्यांच्या अपेक्षांनुसार सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहे. या उपक्रमामुळे महाराष्ट्र पर्यटनाच्या जागतिक नकाशावर आणखी मजबूत होईल.
प्रायोगिक तत्त्वावर ‘महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल’
१ ते ४ मे २०२५ दरम्यान पार पडणाऱ्या महाबळेश्वर महोत्सवात ‘महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल’ प्रायोगिक तत्त्वावर कार्यान्वित होणार आहे. सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून २५ जवानांची नियुक्ती करण्यात येईल. या जवानांना पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आणि महोत्सवाच्या नियोजनानुसार आवश्यक प्रशिक्षण देण्यात येईल. हे दल २५ एप्रिल ते ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत कार्यरत राहील. या दलासाठी आवश्यक वाहन व्यवस्था आणि अन्य सुविधा पुरविल्या जातील. जवानांकडून योग्य कर्तव्ये पार पाडण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती सातारा जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून केली जाईल. या उपक्रमासाठी होणारा खर्च महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ आणि सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्याशी समन्वय साधून अदा केला जाईल.
महाबळेश्वर महोत्सवातील प्रायोगिक तत्त्वावरील यशस्वी अंमलबजावणीनंतर, संपूर्ण महाराष्ट्रासाठी ‘महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल’ स्थापन केले जातील. या उपक्रमांतर्गत पर्यटन क्षेत्रात रु. १ लाख कोटींची खासगी गुंतवणूक आणि १८ लाख प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.


पुणे रेल्वे स्थानक :अधिक कडक सुरक्षा उपाययोजना राबवण्यास प्रारंभ

पुणे:पुणे विभाग, मध्य रेल्वेने प्रवाशांची व रेल्वे मालमत्तेची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सध्याच्या काळात नव्याने निर्माण होणाऱ्या सुरक्षेच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा उपाययोजना अधिक बळकट केल्या आहेत. विशेषतः पुणे स्थानकास संवेदनशील स्थानक म्हणून घोषित करण्यात आले असून खालील उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत.

महत्त्वाच्या उपाययोजना:

  • पुणे स्थानकावर संध्याकाळी अतिरिक्त निरीक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून नियमित आकस्मिक तपासणी केली जात आहे.
  • सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर नियमितपणे बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
  • जीआरपी अधिकाऱ्यांसोबत समन्वय बैठकांचे आयोजन केले जात आहे.
  • श्वान पथकांच्या मदतीने तपासणी करण्यात येत आहे.
  • सर्व शिफ्ट इनचार्ज व ड्युटी ऑफिसर्स आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या सर्क्युलेटिंग क्षेत्रात शस्त्रासह ड्युटी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
  • स्थानक परिसरात अतिरिक्त तपासणी व गस्त वाढविण्यात आली आहे.
  • कर्मचाऱ्यांना अगदी कमी कालावधीत सूचना मिळताच तातडीने आवश्यक जागी जमा होण्यासाठी तयार राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
  • ताडीवाला रोड, पुणे येथे प्रत्येकी 30 खाटांच्या दोन बरॅक्स तयार करण्यात आल्या आहेत.
  • जवळ राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी DSCR पुणे येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे.
  • त्वरित माहिती प्रसारित करण्यासाठी एक आपत्कालीन व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आला आहे.
  • प्रत्येक पाळीत एक अधिकारी व दोन कर्मचारी यांचा सशस्त्र पथक गस्त घालत आहे.
  • पुणे विभागातील सुमारे 24 महत्वाच्या गाड्यांमध्ये एस्कॉर्टिंग व्यवस्था आहे.
  • निरीक्षक आपल्या कार्यक्षेत्रातील गाड्यांमध्ये गस्त घालत आहेत व स्थितीची देखरेख करत आहेत.
  • रात्रीच्या वेळी एक निरीक्षक ड्यूटी स्टेशन कंट्रोल रूमशी समन्वय साधून परिस्थितीवर लक्ष ठेवत आहे.
  • साध्या वेशातील विशेष पथके स्थानके व गाड्यांमध्ये माहिती संकलनासाठी तैनात आहेत.
  • ‘रेल मदत’ या मंचावर प्राप्त होणाऱ्या तक्रारींची नियमितपणे देखरेख केली जात आहे.
  • गुप्तचर माहिती संकलनासाठी SIB युनिटसोबत समन्वय साधला जात आहे.

पुणे विभाग प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सदैव वचनबद्ध असून प्रवाशांना सुरक्षित प्रवासाचा अनुभव देण्यासाठी कटिबद्ध आहे.

बाणेर: ३० एप्रिलला भैरवनाथ महाराजांचा पालखी सोहळा

0

पुणे:
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी बाणेर गावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज यांचा उत्सव साजरा होणार आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून दि.३० एप्रिल रोजी श्री भैरवनाथ महाराजांची पालखी सोहळा होणार आहे त्याचप्रमाणे रात्री ९ वाजता गौतमी पाटील यांचा सीमा पार्क, धनकुडे फॉर्म हाउस जवळ, सावतामाळी मंदिरा समोर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.
तसेच दि.१ मे रोजी सकाळी ९ वाजता बाणेर येथील कै.सोपानराव बाबुराव कटके विद्यालयातील मैदानावर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेच्या मान्यतेने व पुणे शहर कुस्तीगीर संघटनेच्या सहकार्याने मॅटवरील बाणेर केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित केली असून या स्पर्धेचे उद्घाटन समारंभ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते त्याचप्रमाणे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह बाबुराव चांदेरे, बाणेरचे प्रथम नगरसेवक ज्ञानेश्वर ता पकीर, बाणेर नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक दिलीप मुरकुटे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेला आहे .
या स्पर्धे मध्ये खालील प्रमाणे गटवारी केली असून त्यांची बक्षिसे पुढील प्रमाणे देण्यात येणार आहेत.
खुला गट =
प्रथम क्रमांक – २,५०,०००/- द्वितीय क्रमांक – २,००,०००/- तृतीय क्रमांक – १,५०,०००/- चतुर्थ क्रमांक – १,००,०००/-
८६ किलो गट =
प्रथम क्रमांक – २,००,०००/-
द्वितीय क्रमांक – १,५०,०००/-
तृतीय क्रमांक – १,००,०००/-
चतुर्थ क्रमांक – ७५,०००/-
७९ किलो गट =
प्रथम क्रमांक – १,५०,०००/-
द्वितीय क्रमांक – १,००,०००/-
तृतीय क्रमांक – ७५,०००/-
चतुर्थ क्रमांक – ५०,०००/-
७४ किलो गट =
प्रथम क्रमांक – १,००,०००/-
द्वितीय क्रमांक – ७५,०००/-
तृतीय क्रमांक – ५०,०००/-
चतुर्थ क्रमांक – २५,०००/-
७० किलो गट =
प्रथम क्रमांक – ७५,०००/-
द्वितीय क्रमांक – ५०,०००/-
तृतीय क्रमांक – २५,०००/-
चतुर्थ क्रमांक – १५,०००/-
६६ किलो गट =
प्रथम क्रमांक – ५०,०००/-
द्वितीय क्रमांक – २५,०००/-
तृतीय क्रमांक – १५,०००/-
चतुर्थ क्रमांक – १०,०००/-
६१ किलो गट =
प्रथम क्रमांक – ४०,०००/-
द्वितीय क्रमांक – ३०,०००/-
तृतीय क्रमांक – २०,०००/-
चतुर्थ क्रमांक – १०,०००/-
५७ किलो गट =
प्रथम क्रमांक – ३०,०००/-
द्वितीय क्रमांक – २०,०००/-
तृतीय क्रमांक – १५,०००/-
चतुर्थ क्रमांक – १०,०००/-
५२ किलो गट =
प्रथम क्रमांक – २५,०००/-
द्वितीय क्रमांक – २०,०००/-
तृतीय क्रमांक – १५,०००/-
चतुर्थ क्रमांक – १०,०००/-
४८ किलो गट =
प्रथम क्रमांक – २०,०००/-
द्वितीय क्रमांक – १५,०००/-
तृतीय क्रमांक – १०,०००/-
चतुर्थ क्रमांक – ५,०००/-
४१ किलो गट =
प्रथम क्रमांक – १५,०००/-
द्वितीय क्रमांक – १२,०००/-
तृतीय क्रमांक – ९,०००/-
चतुर्थ क्रमांक – ५,०००/-
अशाप्रकारे गटवारी असून वरील प्रमाणे रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत.
यावेळी महिला कुस्तीचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे यामध्ये कुमारी ज्ञानेश्वरी पायगुडे विरुद्ध कुमारी संजना दिसले आणि कुमारी सिद्धी ढमढेरे विरुद्ध कुमारी आर्पिता गोळे अशी या महिलांची कुस्तीचे सामने रंगणार आहेत .
या स्पर्धेतील बक्षीसास पात्र न ठरणाऱ्या सर्व पराभूत कुस्ती पैलवानांना बाणेरचे प्रथम नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबुराव चांदेरे, बाणेर नागरी सहकारी पतसंस्थाचे संस्थापक अध्यक्ष दिलीप मुरकुटे, उद्योजक रामदास मुरकुटे, उद्योजक चंद्रकांत जाधव, माजी उपसरपंच सत्यवान विधाते, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष दत्तात्रय कळमकर, उद्योजक रामदास धनकुडे, उद्योजक खंडूजी मांडेकर यांच्याकडून मानधन दिले जाणार आहे.
त्याचप्रमाणे या बाणेर केसरी कुस्ती स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ रात्रौ ८:३० वाजता .मुरलीधर अण्णा मोहोळ (खासदार, केंद्रीय राज्यमंत्री, भारत सरकार), .चंद्रकांतदादा पाटील (उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र राज्य),मेघा कुलकर्णी (खासदार – राज्यसभा), चंद्रकांत मोकाटे (माजी आमदार कोथरूड विधानसभा मतदारसंघ), चंद्रशेखर सावंत (पोलीस निरीक्षक – बाणेर पोलीस स्टेशन), राजकुमार केंद्रे (पोलीस निरीक्षक – बाणेर), मिनल पाटील( पोलीस निरीक्षक), नवनाथ जगताप (वरिष्ठ पोलीस निरीक्षक – बाणेर पोलीस स्टेशन) यांच्या .हस्ते संपन्न होणार आहे.
या पत्रकार परिषदेकरीता स्थायी समितीचे माजी अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह बाबुराव चांदेरे, बाणेर नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप मुरकुटे, गुलाबराव तापकीर, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष दत्तात्रय कळमकर, माणिक गांधीले, माजी सरपंच जंगल रणावरे , अर्जुन शिंदे, रामदास धनकुडे, मल्हारी सायकर, नासिर सय्यद, राजेंद्र कळमकर, जगन्नाथ धनकुडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धे करीता खेळाडूंचे वजन बुधवार दि.३० एप्रिल रोजी सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत कै. सोपानराव बाबुराव कटके,मनपा शाळा, बाणेर येथे घेण्यात येणार आहे.

बारामती आरटीओ मधील भ्रष्टाचार विरोधात उपोषण १ मे पासून.

पुणे (दि.२८) बारामती आरटीओ मधील भ्रष्टाचार विरुद्ध निषेध करण्यासाठी १ मे पासून उपोषण करण्यात येईल. बहुउद्देशीय वाहतूक चालक मालक माथाडी मंडळ,ऑल इंडिया वाहन चालक मालक महासंघ,अण्णाभाऊ साठे युवा प्रतिष्ठान,वंचित वाहतूक शिखर परिषद महासंघ(भरत),या संघटनांच्या वतीने हे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालय व बारामती आरटीओ येथे होणार आहे. अजय मखरे(महाराष्ट्र सचिव),हसन मुलाणी( जिल्हाध्यक्ष),साहिल पवार(जिल्हा उपाध्यक्ष) हे व अन्य सहकारी उपोषण करणार आहेत. यास ज्येष्ठ संघटक आबासाहेब निकाळजे,व डॉ एल जी पांडूळे माजी उपसंपादक.यांचा सक्रीय पाठींबा आहे. असे प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

विविधतेतील एकता हीच ताकद’ या विषयावरील  परिसंवादास चांगला प्रतिसाद 

पुणे:

समाजात सौहार्द,समजूतदारपणा आणि शांतता वाढवण्याच्या उद्देशाने जमात-ए-इस्लामी हिंद (कॅम्प,पुणे) यांच्या वतीने आयोजित ‘विविधतेतील एकता हीच ताकद’ या विषयावरील सर्वधर्मीय परिसंवाद दि. २७ एप्रिल २०२५ रोजी पुण्यातील ऑर्बिट हॉटेल, आपटे रस्ता, डेक्कन जिमखाना येथे मोठ्या उत्साहात पार पडला.या परिसंवादात विविध धर्मांचे मान्यवर अभ्यासक सहभागी झाले होते.’जमात-ए-इस्लामी हिंद’चे उपाध्यक्ष सलीम इंजिनिअर(नवी दिल्ली),बुद्धिस्ट कल्चर स्टडी सेंटर(पुणे) येथील झेन मास्टर भंते सुदस्सन,व्हीआयटी कॉलेज(पुणे)चे संचालक आणि इस्कॉन पुणेचे उपाध्यक्ष राजेश जालनेकर तसेच इग्नाशियस चर्च (खडकी) चे सहायक पाद्री फादर डेनिस जोसेफ (पुणे डायसिस) यांनी आपले मते मांडली.चर्चेचे संचालन डॉ.सलीम खान(मुंबई) यांनी प्रभावीपणे केले.करीमुद्दीन शेख यांनी प्रास्ताविक केले. 

परिसंवादात धर्मांमधील परस्परसंबंध,ईश्वराच्या संकल्पना,विविधतेतील सौंदर्य,धार्मिक नेत्यांची भूमिका आणि सध्याची सामाजिक आव्हाने यावर सखोल चर्चा झाली.सर्व वक्त्यांनी एकमुखाने विविधतेतील एकतेचे महत्त्व अधोरेखित केले आणि परस्पर सन्मान,संवाद व सहकार्याच्या भूमिकेची गरज प्रतिपादन केली.विविध धर्मीय नागरिक,युवा आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.पहलगाम हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तसेच हल्ल्याचा निषेध करण्यात आला.कार्यक्रमाची सांगता सर्व धर्मांच्या प्रतिनिधींनी एकतेचा संदेश देत केली.उपस्थितांनी असे उपक्रम अधिक नियमितपणे होण्याची अपेक्षा व्यक्त केली.ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अन्वर राजन,सुभाष वारे,डॉ.प्रवीण सप्तर्षी,प्रा.रमा सप्तर्षी,संदीप बर्वे,प्रा.नीलम पंडित,इब्राहिम खान आदी उपस्थित होते.

भन्ते सुदसन्न म्हणाले,’आपल्या मनाची अवस्था आणि दैनंदिन कामातून सर्व गोष्टी घडतात.मानवतेसाठी हे कार्य होईल,याची काळजी घेतली पाहिजे.केवळ करुणा व्यक्त करून उपयोग नाही.सलीम इंजिनियर म्हणाले,’ईश्वर सर्वव्यापी,सर्वशक्तिमान आहे.आपण जे काही करतो,त्याची नोंद होत असते,हे लक्षात घेतले पाहिजे.एकता ही ईश्वराची देणगी आहे.अन्याय,भेदभाव नष्ट व्हावेत,हेच धर्माचे उद्दिष्ट असते’.जालनेकर म्हणाले,’सृष्टी तयार करूनही परमेश्वराने स्वतःचे अस्तित्व प्रकट केलेले नाही.प्रेम,स्नेहाची देवाण घेवाण हाच ईश्वरप्राप्तीचा मार्ग आहे.फादर डेनिस जोसेफ म्हणाले,’एकमेकांना समजून घेणे हीच ईश्वराची शिकवण आहे.क्षमाशीलता असणे महत्वाचे आहे’.

आजच्या बाजारपेठेत रिटेल गुंतवणूकदारांसाठी फ्लेक्सी कॅप फंड हा एक स्मार्ट पर्याय असू शकतो.

पुणे, : आज भारतीय शेअर बाजार एका रोमांचक वळणावर उभा आहे. जगभरात सुरू असलेली टॅरिफ युद्धे आणि मॅक्रो इकॉनॉमिक आव्हानांमुळे, जागतिक बाजारपेठा अत्यंत अस्थिर आहेत आणि भारतही त्याला अपवाद नाही. अस्थिरतेचे मापन करणारा इंडिया VIX (अस्थिरता निर्देशांक) सध्या १५.४७ वर आहे (१७ एप्रिल २०२५ पर्यंत), ही बाब सूचित करते की गुंतवणूकदारांनी नजीकच्या भविष्यात किमतीतील महत्त्वपूर्ण चढउतारांसाठी तयार असले पाहिजे.

अशा वातावरणात, किरकोळ गुंतवणूकदार वाढ आणि विविधीकरण यांचा मेळ घालणाऱ्या धोरणांचा शोध घेऊ शकतात. फ्लेक्सी कॅप फंड हे एक आकर्षक उपाय म्हणून उदयास येत आहेत. हे अद्वितीय इक्विटी म्युच्युअल फंड कोणत्याही निर्बंधांशिवाय लार्ज-कॅप, मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात. या अंगभूत चपळतेमुळे निधी व्यवस्थापकांना बाजार चक्र, व्यापक आर्थिक संकेत आणि क्षेत्रातील विकासाच्या आधारावर वेगाने मालमत्ता वाटप करण्याची परवानगी मिळते. जेव्हा स्थिरतेची आवश्यकता असते तेव्हा ते लार्ज-कॅपमध्ये जाऊ शकतात. जेव्हा जोखीम-रिवॉर्ड अनुकूल असते, तेव्हा ते उच्च-वाढीच्या मिड-आणि स्मॉल-कॅप्सकडे झुकू शकतात.

मालमत्तेचे पुनर्वाटप करण्याची ही अंगभूत लवचिकता बाजारातील विशिष्ट विभागांची कामगिरी कमी असतानाही पोर्टफोलिओला लवचिक ठेवण्यास मदत करते. आर्थिक वर्ष २५ मध्ये पुण्यातून टाटा फ्लेक्सी कॅप फंडमध्ये १३२७ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. (स्रोत: टाटा एमएफ अंतर्गत डेटा) एकूणच, या श्रेणीतील म्युच्युअल फंड उद्योग स्तरावर एयूएम (व्यवस्थापनाखालील मालमत्ता) फेब्रुवारी २०२५ मध्ये ४,०६,४२९.७५ कोटी रुपयांवरून मार्च २०२५ मध्ये ४,३५,५०८.९७ कोटी रुपयांपर्यंत वाढले, म्हणजेच ७% मासिक वाढ नोंदवली गेली. (स्रोत: एएमएफआय)

टाटा अ‍ॅसेट मॅनेजमेंटचे सीआयओ-इक्विटीज श्री. राहुल सिंग म्हणाले, “सध्याच्या परिस्थितीत, जिथे लार्ज-कॅप्स, मिड-कॅप्स आणि स्मॉल-कॅप्समध्ये व्हॅल्युएशन कम्फर्टमध्ये मोठी तफावत आहे, तिथे फ्लेक्सी कॅप्समध्ये गुंतवणूक करणे हा अधिक विवेकपूर्ण पर्याय असू शकतो. अनिश्चित बाजारपेठेत काम करणाऱ्या किरकोळ गुंतवणूकदारांसाठी, फ्लेक्सी कॅप फंड विविधता आणि चपळतेचे आकर्षक मिश्रण देऊ शकतात. अनिश्चिततेच्या काळात, लवचिकता हा केवळ एक गुण नाही – तर एक रणनीती असू शकते.”

श्री. सिंग पुढे म्हणाले, “टाटा फ्लेक्सी कॅप फंड दुहेरी गुंतवणूक तत्वज्ञानाचे पालन करतो: सेक्टर रोटेशन, जिथे आम्ही कमी मूल्यांकित सेक्टर खरेदी करतो आणि जास्त मूल्यांकित सेक्टर विकतो, आणि बॉटम-अप दृष्टिकोन जो उच्च वाढीची क्षमता, शाश्वत व्यवसाय मॉडेल आणि कमी कर्ज असलेल्या कंपन्यांची निवड करण्यावर लक्ष केंद्रित करतो. या धोरणांचे संयोजन करून, आम्ही जोखीम-समायोजित परतावा ऑप्टिमाइझ करण्याचे उद्दिष्ट ठेवतो.”

लार्ज-कॅपमधील स्थिरता आणि मिड व स्मॉल-कॅप्समध्ये वाढीच्या संधींचे मिश्रण एक संतुलित, जोखीम-समायोजित परतावा प्रोफाइल तयार करते जे लवचिकता आणि वृद्धी या दोन्ही गोष्टी शोधणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक आदर्श पर्याय असू शकते. अस्थिर वातावरणात, फ्लेक्सी कॅप फंड हे एक-स्टॉप सोल्यूशन म्हणून काम करू शकतात, जिथे अनुकूलता महत्त्वाची असते.

लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिरात वासंतिक पुष्पोत्सवानिमित्त २५ लाख फुलांची आरास

पुणे : रंगीबेरंगी फुलांनी सजलेला सभामंडप… शोभिवंत फुलांची आरास…   सुवासिक फुलांनी साकारलेले विविध हार… मोग-याच्या फुलांचा पोशाख आणि गुलाब, झेंडू, चाफा यांसारख्या तब्बल २५ लाख फुलांची सजावट बुधवार पेठेतील लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात करण्यात आली. वासंतिक पुष्पोत्सवानिमित्त सत्तू अमावस्येला करण्यात येणारी फुलांची आरास पाहण्याकरिता पुणेकरांनी मोठी गर्दी केली.

कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे संस्थापिका लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुष्पोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यावेळी दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र बलकवडे, कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड. प्रताप परदेशी, खजिनदार अ‍ॅड. रजनी उकरंडे, उत्सव प्रमुख सुनिल रुकारी, उत्सव उप प्रमुख अक्षय हलवाई, विश्वस्त महेंद्र पिसाळ, अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार, डॉ. पराग काळकर, युवराज गाडवे आदी उपस्थित होते. चैत्र महिन्यातील विशेष प्रसाद म्हणून कैरीची डाळ, पन्हे वाटप करण्यात आले. हलवाई परिवारातर्फे पारंपरिक लघुरूद्र करण्यात आले. 

पुष्पोत्सवाबाबत माहिती देताना अध्यक्ष राजेंद्र बलकवडे म्हणाले, मंदिरात यंदा २५ लाख फुलांची आरास करण्यात आली आहे. त्यामध्ये १२५ किलो मोगरा, २०० किलो झेंडू, १०० किलो गुलाब, गुलछडी, लिली फुले, ५० हजार चाफा फुले, जाई-जुई आणि पासलीच्या पानांनी पुष्पोत्सवात सजावट करण्यात आली. सरपाले फ्लॉवर्सचे सुभाष सरपाले आणि ५० सहका-यांनी ही आरास साकारली.

श्रीपाद श्रीवल्लभ, नृसिंह सरस्वती, श्रीमत् वासुदेवानंद टेंभेस्वामी महाराज, श्रीमाणिकप्रभू महाराज या दत्तमहाराजांच्या चार अवतारांच्या प्रतिमा आणि कै.लक्ष्मीबाई  आणि दगडूशेठ हलवाई यांच्या प्रतिमा देखील फुलांनी सजविण्यात आल्या आहेत. सोमवार, दि.२८ एप्रिल पर्यंत ही आरास भाविकांना पाहण्यास खुली आहे. 

जय परशुराम… च्या जयघोषात मध्य पुण्यात भव्य शोभायात्रा 

पुणे : भगवान परशुराम की जय… जय परशुराम.. सियावर रामचंद्र की जय.. जय श्रीराम… च्या जयघोषात आणि ढोल-ताशा, टाळ-मृदूंगाच्या गजरात हिंदूंचे आराध्य दैवत व भगवान विष्णूंचे सहावे अवतार श्री भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त मध्य पुण्यात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. सर्व हिंदू समाजाला सोबत घेऊन ही शोभायात्रा काढण्यात आली असून यामध्ये सर्व जाती बांधव सहभागी झाले होते. 

भगवान परशुराम जन्मोत्सव समिती पुणे च्या वतीने श्री भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त केसरी वाडा ते शनिवारवाडा अशी शोभायात्रा काढण्यात आली. केसरीवाडा येथून शोभायात्रेचा प्रारंभ झाला. यावेळी खासदार मेधा कुलकर्णी, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राजेश पांडे, रोहित टिळक, शैलेश टिळक, संदीप खर्डेकर, समितीचे प्रमुख पदाधिकारी भालचंद्र कुलकर्णी, विश्वजीत देशपांडे, मकरंद माणकीकर यांसह चैतन्य जोशी, मनोज पंचारिया, मयुरेश अरगडे, विश्वनाथ भालेराव, श्रीकांत जोशी, श्यामराव कुलकर्णी आदी उपस्थित होते.

शोभायात्रेत अग्रभागी चौघडा रथ त्यापाठोपाठ जगदंब वाद्य पथक, बाल व युवा वारकऱ्यांचे पथक, पारंपरिक वेशातील महिला आणि मुख्य भगवान श्री परशुराम रथ सहभागी झाला होता. ठिकठिकाणी शोभायात्रेचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आले. संपूर्ण शोभायात्रा मार्गावर रांगोळी व पायघड्या घालण्यात आल्या होत्या. 

मेधा कुलकर्णी म्हणाल्या, हिंदूंनी एक झाले पाहिजे. जातीभेदाच्या भिंती तोडून आपण एकत्र यायला हवे. पहलगाम सारख्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने सर्तक राहायला हवे. आपल्यातील जाती विसरून आपण हिंदू आहोत हे लक्षात ठेवले पाहिजे. देशासाठी आपण एकत्र येण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. 

चंद्रकांत पाटील म्हणाले, नुकत्याच झालेल्या दुर्देवी घटनेमुळे आपण एकत्र राहिलो तर सुरक्षित राहू हा भाव सगळ्यांमध्ये येत आहे. जात माना हे कुठेही म्हटलेलं नाही. आपण सगळे एकत्र आलो, तर आपल्याकडे पाहण्याची कोणाचीही हिमंत होणार नाही, असेही ते म्हणाले.   

भगवान परशुराम जन्मोत्सव समिती पुणे च्या अंतर्गत ३० हून अधिक संस्था व संघटना यामध्ये सहभागी झाल्या. त्यामध्ये महाराष्ट्र ब्राह्मण सभा, देवस्था ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्था, शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था (नाशिक) पुणे केंद्र, परशुराम हिंदू सेवा संघ, आम्ही सारे ब्राह्मण, ब्राह्मण व्यावसायिक पत्रिका, ब्राह्मण जागृती सेवा संघ, ब्राह्मण महासंघ, ब्राह्मण सेवा संघ वाघोली, याज्ञवल्क्य आश्रम, सर्व शाखीय ब्राह्मण महासंघ पुणे, चित्पावन अस्तित्व संस्था, क-हाडे ब्राह्मण महासंघ/ संघ, महाराष्ट्र चित्पावन संघ, कृष्ण यजुर्वेदी तैतरीय संघ, चित्पावन कट्टा, याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियान, अखिल ब्राह्मण संघ, राष्ट्रीय सेवा संघ, पौरोहित्य पुरोहित फाऊंडेशन, विप्र फाऊंडेशन, गौड ब्राह्मण संघ, गौडा सारस्वत ब्राह्मण संघ, चित्पावन मित्र असोसिएशन, श्री राजस्थानी छ:न्याति विप्र मंडल पुणे, विप्र फाऊंडेशन १२ बी झोन पुणे, अखिल भारतीय पेशवा संघटना यांसह अनेक संस्था व संघटनांचा सहभाग होता.

बँकॉकमध्ये पहलगाम पीडितांसाठी अनिवासी भारतीयांनी घेतली शोकसभा

बँकॉक, थायलंड – – भारतातील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दुःखद घटनेत बळी पडलेल्या लोकांच्या आठवणी आणि शोक व्यक्त करण्यासाठी बँकॉकमधील भारतीय डायस्पोरानी आज एक शोकसभा आयोजित केली होती.
इंडो-थाई चेंबर ऑफ कॉमर्सच्या परिसरात झालेल्या या शोकसभेत समुदायातील सदस्य, स्थानिक मान्यवर आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते आणि त्यांनी पीडित कुटुंबांसोबत एकता व्यक्त केली आणि मृतांसाठी प्रार्थना केली.
विश्व हिंदू परिषद, थायलंड कार्यकारी पथक आणि त्यांच्या अध्यक्षा श्रीमती वैशाली तुषार उरूमकर आणि अनेक सदस्य उपस्थित होते.
या गंभीर कार्यक्रमात एक क्षण मौन पाळण्यात आले आणि समुदायाच्या सामायिक दुःखावर आणि सहनशीलतेवर मते व्यक्त करण्यात आली. भारतीय डायस्पोरा नेत्यांनी कठीण काळात एकतेचे महत्त्व अधोरेखित केले आणि शोकग्रस्त कुटुंबांप्रती तीव्र संवेदना व्यक्त केल्या.
“या दुर्घटनेचा आपल्या सर्वांवर, जगात कुठेही असलो तरी खोलवर परिणाम झाला आहे,” असे उपस्थित थायलंडमधील भारताचे राजदूत श्री. नागेश सिंह म्हणाले. “आमचे विचार आणि प्रार्थना , पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत आणि आम्ही त्यांच्या दुःखात त्यांच्यासोबत आहोत.”
उपस्थित असलेल्यांनी प्रभावित झालेल्यांच्या पाठीशी उभे राहण्याची आणि जागतिक स्तरावर त्यांचे आवाज ऐकले जातील याची खात्री करण्याची प्रतिज्ञा केली. प्रत्यक्षदर्शींच्या अहवालांची आठवण करून देण्यात आली आणि काश्मीरमध्ये पूर्वी झालेल्या हत्याकांडांची कठोर वास्तवे उघड झाली, जी दहशतवाद्यांच्या अमानवी मानसिकतेचे आणि क्रूरतेचे दर्शन घडवते, तेव्हा अनेकांचे डोळे पाणावले .
डायस्पोरा एकजुटीने एकत्र येत असताना, ही शोकसभा सीमेपलीकडील भारतीय समुदायाच्या अतूट भावनेची आणि कठीण काळात एकमेकांना पाठिंबा देण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेची आठवण करून देते.

प्रशासन व राजकारणी या दोहोंनी योग्य पावले उचलली तरच चांगल्या शहरांचे स्वप्न पूर्ण होते- प्रशांत वाघमारे

प्रशांत वाघमारे, डॉ शैलेश पुणतांबेकर,प्रविण निकम,राम बांगड यांचा पुरस्काराने गौरव

पुणे – एका चाकावर संसार चालत नाही, कोणतेही वाहन चालत नाही तसे स्वप्नातील शहरही निर्माण होत नाही , प्रशासन व राजकारणी नेत्यांनी या दोहोंनी योग्य पाऊले उचलली तरच चांगली शहरे निर्माण होतात असे मत पुणे महापालिकेचे नगर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी येथे व्यक्त केले.

पुणे महापालिकेचे नगर अभियंता प्रशांत वाघमारे, डॉ शैलेश पुणतांबेकर, रोशनी फाउंडेशनचे संस्थापक प्रविण निकम, व रक्ताचे नाते या संस्थेचे राम बांगड यांचा पुरस्कार देऊन श्री कोल्हापूरचे महाराज श्री सचिन महाराज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. अक्कलकोट स्वामीची कृपासिंधू मूर्ती, पुणेरी पगडी, शाल, व पुष्पहार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.भवानी पेठेत श्री अक्कलकोट स्वामी समर्थ, ट्रस्ट, पुणे यांच्यातर्फे श्री अक्कलकोट स्वामी समर्थ बाल उद्यानात श्री अक्कलकोट स्वामी समर्थ यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या अक्कलकोट स्वामी यांच्या मंदिराच्या 30 व्या वर्धापनदिनानिमित्त सांस्कृतिक महोत्सवाचे उदघाटन उल्हास पवार यांच्या हस्ते झाले. या सांस्कृतिक महोत्सवाचे यंदा 30 वे वर्ष आहे. या सांस्कृतिक महोत्सवाच्या उदघाटनाच्या कार्यक्रमास कोल्हापूरचे प्रसिद्ध महाराज सचिन, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी, माजी नगरसेवक आबा बागुल, माजी नगरसेवक संजय बालगुडे, अविनाश साळवे, डॉ सत्यशिल नाईक, डॉ सतीश देसाई, सुनिल रुकारी, अनिल गाडवे, माजी नगरसेवक सदानंद शेट्टी, गुरुजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रवीणसिंग परदेशीं, रविंद्र माळवदकर,विपीन गुपचूप आदी मान्यवर उपस्थित होते.

सेवाभावी संस्था समाजात सामाजिक कार्य करताना माणसे जोडण्याचे कार्य करतात. या सेवाभावी संस्थामुळे माणुसकी जिवंत आहे. असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व सामाजिक कार्यकर्ते श्री उल्हास पवार यांनी यावेळी व्यक्त केले. उल्हास पवार म्हणाले की, सामाजिक संस्था माणसाचे विकास आणि प्रगती डोळ्यासमोर ठेऊन कार्य करतात. मानवधर्म हाच आपला खरा धर्म हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन ते सामाजिक कार्य करतात. म्हणूनच समाजात माणुसकी जिवंत आहे.प्रशांत वाघमारे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, प्रशासन व राजकारणी नेत्यांनी शहराच्या विकासाला चालना देताना योग्य पाऊले उचलली पाहिजेत. तरच चांगली शहरे निर्माण होतील.या उदघाटनाच्या कार्यक्रमात सत्कारमूर्ती प्रविण निकम, राम बांगड व डॉ शैलेश पुणतांबेकर यांचीही सत्काराला उत्तरे देणारी भाषणे झाली.

या कार्यक्रमात उपस्थित नागरिक व भाविकांचे स्वागत या महोत्सवाच्या संयोजक सौ. प्रियंका किराड सागर यांनी केले. ट्रस्टचे अध्यक्ष व स्वागतोत्सुक वीरेंद्र किराड यांनी प्रास्ताविक केले. विश्वस्त नितीन शहा यांनी उपस्थितांचे आभार मानले. प्राजक्ता जोगळेकर श्रावणे यांनी सूत्रसंचालन केले.