Home Blog Page 337

आगग्रस्तांसाठी आमदार बापूसाहेब पठारे यांचा मदतीचा हात

राहण्याची व जेवणाची सोय; पुनर्वसन करण्याची मागणी

पुणे: चंदननगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीत (२३ एप्रिल) घडलेल्या गॅस सिलेंडर स्फोटामुळे भीषण आग लागून मोठी हानी झाली. या दुर्घटनेत अनेक कुटुंबांचे संसार उघड्यावर आल्याने लोकजीवन पुरते ढवळून निघाले असल्याचे दिसून येते.

पहाटेच्या सुमारास वसाहतीत सिलेंडरचा स्फोट झाला. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले. आगीचा भडका इतका मोठा होता, की काही मिनिटांतच आजूबाजूची घरे आगीच्या विळख्यात सापडली. स्थानिक नागरिक व अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली गेली.

वडगावशेरी मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी परिस्थितीची गंभीरता ओळखून तातडीने मंडप उभारून आगग्रस्तांना तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करून दिली. तसेच कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून दोन वेळचे जेवण व नाश्त्याची सोय तत्काळ करण्यात आली. आजही ही व्यवस्था सुरू आहे.

पठारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार तसेच जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना आगग्रस्त कुटुंबांना नुकसान भरपाई मिळण्याबाबत निवेदनाद्वारे मागणी केली आहे. या दुर्दैवी दुर्घटनेमुळे संपूर्ण वसाहतीत शोककळा तसेच भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या कठीण प्रसंगी आमदार बापूसाहेब पठारे यांच्यासारखा मदतीचा हात मिळाल्याने नागरिकांमध्ये थोडासा दिलासा निर्माण झाला आहे.

“आगीच्या या दुर्दैवी घटनेमुळे फक्त घरे किंवा संसार जळाले नसून इथल्या रहिवाशांच्या स्वप्नांचीही राख झाली आहे. अतिशय वेदना देणारी घटना असून एक लोकप्रतिनिधी म्हणून इथल्या माणसांचे पुनर्वसन करण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्नशील राहणे माझे कर्तव्य आणि जबाबदारी आहे. या ओढावलेल्या संकटात मी या सर्वांच्या पाठीशी व सोबत आहे”, असे भावनिक मत आमदार बापूसाहेब पठारे यांनी व्यक्त केले.

रोजगार हमी योजनेंतर्गत काम करणार्‍या महिलांच्या मुलांची काळजी घेण्यासाठी प्रत्येक ठिकाणी एका महिलेची नियुक्ती करणे गरजेचे : उपसभापती नीलम गोऱ्हे

किडीलँड्स प्रीस्कूल शाळेचे उपसभापती नीलम गोऱ्हे आणि मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते उदघाटन

पुणे-मराठवाडा, नाशिक, जळगाव, तसेच पुणे जिल्ह्यातील पुरंदर, शिरुर, आंबेगाव या तालुक्यामध्ये रोजगार हमी योजनेंतर्गत काम सुरू असतात.त्या ठिकाणी काम करणाऱ्या महिलांची मुले देखील असतात,त्या महिलांची मुले सांभाळण्यासाठी प्रत्येक ठिकाणी एक महिला दिली पाहिजे,अशी मागणी रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांच्याकडे कार्यक्रमा दरम्यान शिवसेना नेत्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केली. हा निर्णय घेतल्यास राज्यभरातील महिला भगिनी आपल्या निश्चित आशीर्वाद देतील,अशी भावना देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.

वाघोली येथे किडीलँड्स प्रीस्कूल शाळेचे शिवसेना नेत्या आणि उपसभापती नीलम गोऱ्हे आणि रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले.शिवसेना पुणे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांच्यासह आजी माजी शिवसैनिक,नागरिक उपस्थित होते.तर या कार्यक्रमाचे आयोजन शिरूर लोकसभा महिला संपर्कप्रमुख सारिका पवार यांनी केले होते.तर यावेळी किडीलँड्स प्रीस्कूल शाळे च्या संस्थापिका सारिका पवार यांच्या आजवरच्या कार्याचा उल्लेख करीत पुढील वाटचालीसाठी नीलम ताई गोऱ्हे आणि ना.श्री. भरत गोगावले यांनी शुभेच्छा देखील दिल्या.

यावेळी नीलम गोऱ्हे म्हणल्या,या कार्यक्रमाच्या ठिकाणी येत असताना व्याघ्रेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि अंत्यत प्रसन्न वाटलं,तसेच माझे वडील दिवाकर गोऱ्हे यांनी याच वाघोली भागात काम केल,ती त्यांची कर्मभूमी होती असे सांगत त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत,ग्रामपंचायतीच्या बागेत मुलांसाठी झोके, सी-सॉ, बाक यांसारखी खेळणी तसेच महिलांसाठी चालण्यासाठी व खेळण्यासाठी सुविधा निर्माण करण्यासाठी आमदार निधीतून पाच लाख रुपये देण्याची घोषणा देखील त्यांनी यावेळी केली.

तसेच त्या पुढे म्हणाल्या, उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे साहेब कोणाचेही काम असो की कार्यक्रम असो त्या एकनाथ शिंदे हे जातात.त्या प्रमाणे भरत गोगावले आपण आला आहात, व्याघ्रेश्वराने तुमच्या अनेक इच्छा पुर्ण केल्या आहेत.पण तुमची एक ईच्छाही लवकर पूर्ण होवो,असे नीलम ताई गोऱ्हे म्हणाताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

नीलम ताईंनी बच्चे कंपनीशी साधला संवाद

या कार्यक्रमाच्या ठिकाणी लहान मुले मोठ्या प्रमाणावर आली होती.त्या मुलांकडे पाहत,नीलम ताई गोऱ्हे म्हणल्या,मी मराठी शाळेत शिकले.त्यावेळी आम्हाला आमच्या बाई किती किती म्हणायच्या आणि आम्ही छान छान असे म्हणत असायचो,अशी बालपणीची आठवण सांगत,नीलम ताईंनी बच्चे कंपनीशी संवाद देखील साधला.

कार्यक्रमात रामभाऊ दाभाडे (मा. जि.प. सदस्य व मा. सरपंच वाघोली), प्रमोद नाना भानगिरे (शिवसेना शहराध्यक्ष), जिल्हाप्रमुख उल्हास भाऊ तुपे, सहसंपर्कप्रमुख सौ. सुदर्शना त्रिगुणाईत, जिल्हाप्रमुख सौ. सिमा कल्याणकर, तालुका प्रमुख श्री. रामभाऊ सासवडे, श्री. विपुल शितोळे, जिल्हा प्रमुख सौ. मनीषा परांडे आणि जिल्हा प्रमुख (पंढरपूर) सौ. आरती बसवंती यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्पेन-पोर्तुगाल-फ्रान्समध्ये वीजपुरवठा खंडित:विमानतळ आणि मेट्रो, मोबाईल नेटवर्क बंद, युरोपमधील विद्युत ग्रिडमध्ये बिघाड

सोमवारी युरोपीय देश स्पेन, पोर्तुगाल आणि फ्रान्समध्ये वीजपुरवठा खंडित झाला. यामुळे लाखो लोकांना विजेशिवाय जगावे लागत आहे. वीज पुरवठ्यात खंड पडल्यामुळे मेट्रो, विमानतळ, रेल्वे आणि मोबाईल नेटवर्क ठप्प झाले आहेत. वृत्तानुसार, युरोपियन इलेक्ट्रिक ग्रिडमध्ये बिघाड झाल्यामुळे हे संकट उद्भवले आहे.

नैऋत्य फ्रान्समधील अलारिक माउंटनवर आग लागली, ज्यामुळे पेर्पिग्नन आणि पूर्व नार्बोन दरम्यानच्या उच्च-व्होल्टेज वीज वाहिनीचे नुकसान झाले. पोर्तुगालच्या राष्ट्रीय वीज कंपनी आरईएनने म्हटले आहे की वीजपुरवठा खंडित होण्याचे हे एक संभाव्य कारण मानले जात आहे.

स्पेनची राजधानी माद्रिद आणि आसपासच्या परिसरात वीज टंचाईमुळे माद्रिद ओपन टेनिस स्पर्धा थांबवण्यात आली आहे. ही एक वार्षिक क्ले कोर्ट स्पर्धा आहे. माध्यमांनुसार, ब्रिटिश टेनिसपटू जेकब फर्नलीला कोर्ट सोडावे लागले. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे कोर्टवरील स्कोअरबोर्ड आणि कॅमेरे देखील काम करत नव्हते.

दूरसंचार सेवांसोबतच, स्पेन आणि पोर्तुगालमधील नागरिकांनीही मोबाईल नेटवर्कची उपलब्धता नसल्याची तक्रार केली आहे. याशिवाय, माद्रिदच्या बाराकास आंतरराष्ट्रीय विमानतळावरही वीज संकटाचा परिणाम झाला आहे. दरम्यान, या प्रदेशातील इतर अनेक विमानतळांनीही त्यांचे कामकाज थांबवले आहे.पोर्तुगाल-स्पेनमध्ये अनेक मेट्रो ट्रेन बोगद्यांमध्ये अडकल्या.

युरोन्यूज पोर्तुगालच्या मते, पोर्तुगाल आणि स्पेनच्या राजधान्यांमधील अनेक मेट्रो ट्रेन स्थानकांमधील बोगद्यांमध्ये अडकल्या आहेत. लोक या मेट्रोमध्ये अडकले आहेत. रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, पोर्तुगीज पोलिसांनी पुष्टी केली की गाड्या बंद होत्या, पोर्तो आणि लिस्बन दोन्ही ठिकाणी मेट्रो सेवा बंद होत्या आणि देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम झाला होता.

युरोन्यूज स्पेनने वृत्त दिले आहे की, स्पॅनिश सरकारने मोंक्लोआ येथे आपत्कालीन बैठक बोलावली आहे आणि परिस्थितीवर लक्ष ठेवणे सुरू आहे.

दूरसंचार सेवांसोबतच, स्पेन आणि पोर्तुगालमधील नागरिकांनीही मोबाईल नेटवर्कची उपलब्धता नसल्याची तक्रार केली आहे. याशिवाय, माद्रिदच्या बाराकास आंतरराष्ट्रीय विमानतळावरही वीज संकटाचा परिणाम झाला आहे. दरम्यान, या प्रदेशातील इतर अनेक विमानतळांनीही त्यांचे कामकाज थांबवले आहे.

सायबर हल्ल्याची चौकशी करतोय स्पेन-एका स्पॅनिश अधिकाऱ्याने सांगितले की, मोठ्या प्रमाणात वीजपुरवठा खंडित होण्यामागे सायबर हल्ला होता का? याचा तपास सुरू आहे. पण अद्याप कोणतेही ठोस पुरावे हाती आलेले नाहीत.स्पेनची राजधानी माद्रिद आणि आसपासच्या परिसरात वीज टंचाईमुळे माद्रिद ओपन टेनिस स्पर्धा थांबवण्यात आली आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे कोर्टवरील स्कोअरबोर्ड आणि कॅमेरे देखील काम करत नव्हते.

लोणावळा परिसरात येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने उपाययोजना कराव्यात-विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे, दि.२९: लोणावळा परिसरात येणाऱ्या पर्यटकांना सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यासोबतच त्यांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने उपाययोजना कराव्यात, असे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.

लोणावळा येथील महावितरण विश्रामगृह येथे पर्यटकांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे, महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रशांत गाडे, नायब तहसीलदार अमोल पाटील, शहर पोलीस निरीक्षक सुहास जगताप, ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शरण सोनावणे, नगर पालिका प्रशासन अधिकारी संतोष खाडे, पाणीपुरवठा अभियंता यशवंत मुंडे आदी उपस्थित होते.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, लोणावळा परिसरात थंड हवेची ठिकाणे, कार्ला लेणी, एकविरा देवीचे मंदीर आहेत, याठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. परिसरात अपघात, श्वानदंश, सर्पदंश, मधमाशी व वटवाघूळाचे हल्ले, अंमली पदार्थ व दारुचा पुरवठा, आदी बाबी सामोरे येताना दिसत आहेत. त्यामुळे या बाबी विचारात घेता प्रथमोपचार, पोलीस मदत, स्वच्छता, प्रदूषण, पर्यावरण रक्षणाच्या उपाययोजनांसोबतच अवैध गुटखा व अंमली पदार्थ वाहतूक विक्री करणाऱ्यावर प्रतिबंधात्मक कार्यवाही आदी गोष्टी प्राधान्याने कराव्यात.

एकविरा देवीच्या यात्रेवेळी मधमाशा निर्मूलन मोहीम राबवावी, मधमाशापासून बचाव करण्यासाठी संरक्षणात्मक मार्गदर्शिका तयार कराव्यात. जेणेकरून पर्यटकांना त्रास होणार नाही. करण्यात येणाऱ्या या उपाययोजनांची पर्यटकांना माहितीसाठी जनजागृती करण्यात यावी. आपत्कालीन परिस्थिती विचारात घेता आरोग्य विभागाने मुबलक प्रमाणात औषधे उपलब्ध राहतील, याबाबत दक्षता घ्यावी.

लोणावळा पोलिसांच्यावतीने पर्यटकांसाठी हेल्पलाईन सुविधा
लोणावळा पोलिसांनी पर्यटकांच्या मदतीच्यादृष्टीने शहरी भागासाठी ९८५०११२४०० आणि ग्रामीण भागासाठी ९१४६०३२९७१ असे हेल्पलाईन क्रमांक सुरु केले आहेत. पर्यटकांनी या क्रमांकाचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. गोऱ्हे यांनी केले आहे. पर्यटकांची गर्दी लक्षात घेता पोलिसांनी परिसरात अनुचित प्रकार घडणार नाही, पर्यायाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील यासाठी नेहमी दक्ष रहावे.

नगरपरिषदेने शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रयत्नशील राहावे

लोणावळा नगर परिषदेने शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रयत्न करावे. जलपुनर्भरण, सौर ऊर्जा निर्मिती, तसेच पर्यावरणाबाबत जनजागृती करण्यासोबत प्रदूषण होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. डेंग्यू आजारावर प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्यादृष्टीने डास निर्मूलन मोहीम आयोजित करावी. नागरिकांच्या आरोग्याच्यादृष्टीने घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापन करावे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने शासकीय इमारती, विश्रामगृहातील कक्षांच्या खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात. महसूल विभागाने तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करुन नागरिकांच्या अधिकाधिक अडीअडचणी निकाली काढाव्यात, असे निर्देशही डॉ. गोऱ्हे यांनी दिले.

पॅराग्लायडींग, ग्रॅन्डसायकलिंग, हॉटएअर बलून फेस्टीव्हलचा समावेश असलेल्या पुणे जिल्हा पर्यटन विकास आराखड्याचे अजित पवार यांच्या बैठकीत सादरीकरण

पुणे जिल्ह्यातील पर्यटकांची संख्या पाच वर्षात एक कोटींवर,
50 हजार थेट तर, पाच लाख अप्रत्यक्ष रोजगारनिर्मितीचे ध्येय
श्रीक्षेत्र भीमाशंकर विकास व सिंहगड किल्ला परिसर
विकास आराखड्याचाही अजित पवारांकडून आढावा

प्रतापगड पायथा परिसरातील जिवाजी महाले यांच्या
पुतळा आणि स्मारकाचे काम तातडीने पूर्ण करावे
–उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

मुंबई, दि. 28 :- पुणे जिल्ह्यातील मुळशी येथे जागतिक पॅराग्लायडींग स्पर्धेचे आयोजन, जिल्ह्याच्या सर्व तालुक्यांमधून जाणारी ग्रॅन्डसायकलिंग चॅलेंज स्पर्धा, बारामती व इंदापूरला हॉटएअर बलून फेस्टीव्हल, पवना धरणक्षेत्रात जलक्रीडा पर्यटनाच्या सुविधा, ऐतिहासिक गडकिल्ले, प्राचीन मंदिरे, निसर्गरम्य घाटांचा पर्यटनाच्यादृष्टीने विकास, जिल्ह्यातील कलावंताचा सहभागातून गायन, वादन, नाटक, साहित्य, काव्य, कथावाचनासारख्या सांस्कृतिक महोत्सवांचं आयोजन, पर्यटकांना पर्यटनस्थळे पाहण्याचा आनंद देण्याबरोबरंच साहसी खेळांचा प्रत्यक्ष अनुभव देणाऱ्या ‘मोटरबोटींग’, ‘झिपलाईन’सारख्या साहसी खेळ सुविधांची निर्मिती अशा अनेक उपक्रमांचा समावेश असलेल्या, शाश्वत अशा पुणे जिल्हा पर्यटन विकास आराखड्याचे सादरीकरण उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत करण्यात आले.

पुणे जिल्ह्यातील गडकिल्ले, प्राचीन मंदिरे, लोककला, लोकसंस्कृतीचा समृद्ध वारसा, पर्यटनवाढीची अमर्याद संधीचा उपयोग करुन पुणे जिल्ह्याचे देशाच्या पर्यटन नकाशावर स्वतंत्र स्थान निर्माण करण्याचा निर्धार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला असून त्याअनुषंगाने जिल्ह्याचा सर्वसमावेशक पर्यटन विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्याच्या पर्यटन विकास आराखड्याचा प्राथमिक मसूदा तयार करण्यात आला असून त्याचे सादरीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील विशेष बैठकीत आज मंत्रालयात करण्यात आले. बैठकीला उपमुख्यमंत्र्याचे सचिव डॉ. राजेश देशमुख, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आदींसह मंत्रालय आणि पुणे जिल्ह्यातील संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, आपल्या राज्यात येणाऱ्या विदेशी पर्यटकांपैकी 79 टक्के पर्यटक मुंबईला भेट देतात तर अवघे 14 टक्के पर्यटक पुण्याला येतात. पुणे जिल्हा पर्यटन विकास आराखड्याच्या यशस्वी आणि सातत्यपूर्ण अंमलबजावणीतून येत्या तीन वर्षात जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या चाळीस लाखांवर तर पुढील पाच वर्षात एक कोटींवर नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यातून जिल्ह्याच्या जीडीपीत दहा ते पंधरा हजार कोटींची वाढ होईल. पन्नास हजार थेट रोजगार तर पाच लाख अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील अशी अपेक्षा आहे. जिल्ह्याच्या पर्यटनवाढीसाठी हाती घेतलेले सर्व उपक्रम हे कायम सुरु राहतील. पॅराग्लायडींग स्पर्धा, ग्रॅन्डसायकलिंग चॅलेंज स्पर्धा, हॉटएअर बलून फेस्टीव्हल, सांस्कृतिक महोत्सवांचे आयोजन दरवर्षी विशिष्ट कालावधीत नियमितपणे केले जाईल. त्यातून जिल्ह्याच्या पर्यटनक्षेत्राला नवी ओळख मिळेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही यंदाच्या अर्थसंकल्पात पर्यटनवाढीला महत्व आणि भरीव निधी दिला असून हा मुद्दा त्यांच्या सर्वोच्च प्राधान्ययादीत आहे. पर्यटनविकासासाठी राज्यांना संपूर्ण सहकार्य करण्याचे धोरण केंद्र सरकारने स्विकारले आहे. याचा फायदा महाराष्ट्राला करुन घेत असताना पुणे जिल्ह्यानंही पर्यटनविकासात आघाडीवर असलं पाहिजे. त्यासाठी जिल्ह्याचा पर्यटन विकास आराखडा महत्वाचा आहे. यातून जागतिक पर्यटनाच्या नकाशावर पुणे जिल्ह्याचं स्वतंत्र स्थान निर्माण होईल. त्यसाठी जिल्ह्याच्या स्वतंत्र पर्यटन लोगो, स्वतंत्र घोषवाक्य असेल. यातून स्वतंत्र ब्रँन्ड निर्माण होईल शिवाय जागतिक ओळख आणि लोकप्रिय व्यक्तिमत्वं असलेला ‘ब्रॅन्डअॅम्बॅसॅ़डर’ नियुक्त करण्याचा प्रयत्न करु, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

पुणे जिल्हाचा पर्यटन विकास आराखडा तयार करताना अन्य राज्यांचाही अभ्यास करण्यात आला आहे. गुजरात राज्याने कच्छच्या वाळवंटात ‘रणउत्सव’, अरुणाचल प्रदेशने झिरो व्हॅलिमध्ये ‘झिरो फेस्टीव्हल’, राजस्थानमध्ये जयपूरला ‘साहित्य महोत्सव’, नागालॅन्डमध्ये ‘हॉर्नबिल महोत्सव’सारखे सुरु केलेले उपक्रम अपेक्षेपेक्षा यशस्वी ठरले. त्यातून त्या राज्यांच्या पर्यटनाला स्वतंत्र ओळख मिळाली. आर्थिक उलाढाल वाढली. महसूल वाढला. प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती झाली. पर्यटनस्थळांच्या मार्गावरील गावांचा, शहरांचा विकास होण्यासही मदत झाली. पुणे जिल्ह्याच्या पर्यटन विकास आराखड्यातूनही आपलीही उद्दीष्टे पूर्ण होतील. त्यासाठी जिल्ह्यातील पर्यटनाशी संबंधित नामांकित, तज्ञ व्यक्ती, संस्था, संघटनांचे सहकार्य घ्यावे. पुणे जिल्ह्याचा पर्यटनविकास आराखडा राबवताना तो सर्वांच्या सहकार्याने, मदतीने राबवावा. शक्य तिथे खासगी संस्था, संघटनांची मदत घ्यावी. राज्य शासनाकडून यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करण्यात येईल. निधीची कमी भासू दिली जाणार नाही, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत दिला.

श्रीक्षेत्र भीमाशंकर आणि सिंहगड किल्ला परिसर विकास आढावा
श्रीक्षेत्र भीमाशंकर विकास आराखडा आणि सिंहगड किल्ला समर्ग संवर्धन विकास आराखड्याचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. श्रीक्षेत्र भीमाशंकर आणि सिंहगड किल्ल्याचे आध्यात्मिक, ऐतिहासिक महत्व लक्षात घेऊन नवीन विकासकामे करण्यात यावी. हे करताना मंदिर आणि किल्ला परिसराचे ऐतिहासिक, प्राचीन सौंदर्य कायम राहील, याची पूर्ण काळजी घ्यावी, अशा सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवारा यांनी दिल्या.

जिवाजी महालेंच्या स्मारकाचे काम तातडीने पूर्ण करावे
किल्ले प्रतापगडाखाली छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान यांच्या ऐतिहासिक भेटीच्यावेळी अतुलनीय शौर्य, साहस आणि निष्ठेचे दर्शन घडविणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे, जिवाजी महाले यांच्या प्रतापगड पायथा परिसरातील पुतळा आणि स्मारकाचे काम तातडीने पूर्ण करावे, अशा सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

पुणेकरांची वाहतुक कोंडीतून सुटका करण्यासाठी पायाभूत सुविधांच्या कामाचा वेग वाढवा-उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

मुंबई, दि. 28 :- पुणे शहरासह उपनगरात वाहतुक कोंडीची समस्या गंभीर असून ती सोडविण्यासाठी प्राधान्य देण्यात द्यावे. पुणे शहर आणि उपनगरांची वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी पुणे रिंग रोडसह मेट्रो, उड्डाणपूल, रिंग रोड तसेच सुरु असणाऱ्या सर्व पायाभूत सुविधांच्या कामांचा वेग वाढविण्यात यावा. यासाठी या प्रकल्पांशी संबंधित सर्व विभागाने योग्य समन्वय आणि ताळमेळ राखत पुणेकरांची वाहतुक कोंडीतून सुटका करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात, उपमुख्यमंत्र्यांच्या प्रकल्प सनियंत्रण कक्षाची (प्रोजेक्ट मॉनिटरिंग युनीटच्या) बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, परिवहन व बंदरे विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरजकुमार, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे विभागाचे मुख्य अभियंते अतुल चव्हाण उपस्थित होते. तर दूरदृश्य प्रणालीवर पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, ‘महामेट्रो’चे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंग, महानगर आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश म्हसे, यांच्यासह पुणे मेट्रो, पीएमआरडीए, संबंधित जिल्ह्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीचे संचालन उपमुख्यमंत्री कार्यालयाचे उपसचिव विकास ढाकणे यांनी केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राज्यात सुरु असणाऱ्या विकासकामांची गती राखण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. विलंबामुळे प्रकल्पांच्या किंमतीत वाढ होऊन राज्याचे दीर्घकालीन नुकसान होते, ते टाळण्यासाठी नियोजित वेळेत विकास प्रकल्प मार्गी लावण्यावर भर द्यावा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी लोणावळा येथील नियोजित स्काय वॉक, टायगर पॉईंट, पुणे नाशिक ग्रीन फिल्ड सेमी हायस्पीड रेल्वे, ‘सारथी’संस्थेच्या नाशिक, कोल्हापूर, नागपूर, खारघर, संभाजीनगर, अमरावतीच्या विभागीय उपकेंद्रांचे बांधकाम, सातारा येथील वैद्यकीय महाविद्यालय, सातारा सैनिक स्कूल, रेवस ते रेड्डी सागरी महामार्ग, वडाळा येथील जीएसटी भवन, रेडिओ क्लब मुंबई, रत्नागिरीचे मिरकरवाडा बंदर, वढू व तळापूर येथील स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज स्मारक, पुणे येथील वीर वस्ताद लहूजी साळवे स्मारक, कृषीभवन, कामगार कल्याण भवन, सहकार भवन, पुरंदर विमानतळ आदी प्रकल्पांच्या प्रगतीचा देखील आढावा घेतला.

अन्न व नागरी पुरवठा विभागातील विसंगत व कालबाह्य झालेले सर्व जुने आदेश तातडीने रद्द करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

आदिवासी शेतकऱ्यांना ‘टीडीसी’सह व्यापाऱ्यांना धान विक्रीचे दोन्ही पर्याय खुले करावेत;
धान हाताळणी प्रक्रीयेत होणारे नुकसान टाळण्यासाठी राज्यभर जिल्हा जोडणी प्रक्रीया राबवा
-उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

मुंबई, दि. 28:- राज्यात धान खरेदी, भरडाई, साठवण व वाहतूक प्रक्रियेत शासनासह शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी या प्रक्रीयेत सुधारणा करुन घ्यावी. आदिवासी शेतकऱ्यांना आपले धान महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ (टीडीसी) अथवा व्यापाऱ्यांना विकण्याचे दोन्ही पर्याय खुले करुन देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. तसेच वाहतुकीसह योग्य साठवणुकीअभावी होणारे धानाचे नुकसान टाळण्यासाठी तातडीने राज्यभर जिल्हा जोडणी पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले.

मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात विदर्भातील धान खरेदी व्यवस्थापनासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यांतील धान खरेदी, भरडाई व साठवण प्रक्रियेसंदर्भात सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे राज्यमंत्री योगेश कदम, माजी केंद्रीय मंत्री खासदार प्रफुल्ल पटेल, आमदार विनोद अग्रवाल, आमदार नरेंद्र भोंडेकर, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या प्रधान सचिव विनीता वेद सिंगल, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, दूरदृश्य प्रणालीद्वारे गोंदियाचे जिल्हाधिकारी प्रजित नायर, भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी संजय कोलते, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविशांत पंडा, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा, महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक श्रीधर दुबे-पाटील, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांच्यासह अन्न व नागरी पुरवठा विभाग, आदिवासी विकास विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला धानाचा साठा प्रायमरी सोसायट्यांकडे तीस दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी राहू नये, यासाठी ठोस नियमावली तातडीने तयार करून ती लागू करावी. साठवणुकीसाठी आवश्यक गोदामांच्या सुविधांचा अभाव असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर धान उघड्यावर राहत असून त्यातून होणारे नुकसान टाळण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी एकमुखाने केलेली राज्यभर जिल्ह्यांची तातडीने जोडणीची मागणी पूर्ण करावी असे निदेश देण्यात आले.

धान विक्रीबाबत आदिवासी शेतकऱ्यांना महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ किंवा व्यापाऱ्यांना धान विक्री करण्याचा पर्याय खुला ठेवण्यात यावा. या प्रक्रियेसाठी अन्न व नागरी पुरवठा विभाग आणि आदिवासी विकास विभाग यांच्यात समन्वय साधून आवश्यक निर्णय घेण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिल्या. विदर्भातील धान गिरण्यांची कार्यक्षमता लक्षात घेऊन छोट्या गिरणीधारकांना देखील धान प्रक्रिया करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, मात्र शासनाच्या आर्थिक हिताला बाधा पोहचणार नाही याची जिल्हाधिकाऱ्यांनी योग्य काळजी घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. धान साठवणुकीसाठी आवश्यक गोदाम उभारणीसाठी उपलब्ध निधीचा तातडीने उपयोग करावा व गोदाम उभारणीचा अधिकार जिल्हाधिकारी पातळीवर प्रदान करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

धान खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी शेतकऱ्यांची नोंदणी केवळ ‘एनईएमएल’ पोर्टलवरच करण्यात यावी, अशीही स्पष्ट सूचना करण्यात आली. शेतकऱ्यांच्या अडचणी वाढवणारे, विसंगत व कालबाह्य झालेले सर्व जुने आदेश तातडीने रद्द करून आवश्यकतेनुसार नव्याने आदेश निर्गमित करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

पुण्यातील ४ आंबा महोत्सवात ४ कोटी रुपयांची उलाढाल, ४५ हजार डझन आंब्याची विक्री

पुणे 28: महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळामार्फत मार्केटयार्ड तसेच गांधी भवन-कोथरूड, मगरपट्टा-हडपसर आणि खराडी या चार ठिकाणी ‘आंबा महोत्सव २०२५’ आयोजित करण्यात आला आहे. हा आंबा महोत्सव ३१ मे २०२५ पर्यंत सुरू राहणार असून आतापर्यंत ४५ हजार डझन आंब्याची विक्री झाली असून सुमारे ४ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचे कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम कळविले आहे.

या महोत्सवामध्ये रत्नागिरी, सिंधुदूर्ग, रायगड, पालघर आणि ठाणे या पाच जिल्ह्यातील भौगोलिक मानांकन (जीआय) मिळालेला हापूस आंबा तसेच राज्यातील केशर, पायरी तसेच इतर वाणांचा आंबा उपलब्ध आहे. कोकणातल्या हापूसच्या नावावर परराज्यातून आलेल्या आंब्याची सर्रास विक्री होते. पण आता जीआय मानांकनामुळे हापूसच्या नावे होणारी फसवणूक टाळली जाणार आहे. ही बाब विचारात घेऊन, या महोत्सवातदेखील जीआय मानांकन प्राप्त झालेल्या शेतकऱ्यांचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला.

आंबा महोत्सवामध्ये मार्केटयार्ड येथे ६० स्टॉल तसेच गांधी भवन-कोथरूड, मगरपट्टा-हडपसर आणि खराडी या ठिकाणी प्रत्येकी २० असे एकूण १२० स्टॉल्स १५० उत्पादकांना आंबा विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. जीआय व युआयडी टॅग लावलेला आंबा ग्राहकांना विक्री केला जात आहे. यामुळे उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत आहे. त्यात हापूस, केशर, पायरी आणि बिटकी (लहान) आंब्याचा समावेश आहे. महोत्सवामध्ये साधारणत: १७५ ते ३०० ग्रॅम वजनाच्या आंब्याची विक्री करण्यात येत असून ४०० ते ८०० रुपये प्रति डझन दर आहे, अशी माहिती देखील श्री. कदम यांनी दिली आहे.

“जखमांवर मात, जीवनाला हात : ज्युपिटर हॉस्पिटलच्या तज्ज्ञांच्या समन्वित उपचारामुळे वाचला ६ वर्षांचा जीव”

पुणे, 28 एप्रिल 2025 : एका भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या सहा वर्षांच्या चिमुकल्याला ज्युपिटर हॉस्पिटल, बाणेर, पुणे येथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या कौशल्यपूर्ण आणि बहुवैद्यकीय (मल्टिडिसिप्लिनरी) उपचार पद्धतीमुळे नवे जीवन मिळाले आहे. श्रीरामपूरहून अतिगंभीर स्थितीत व्हेंटिलेटरवर आणलेल्या या मुलावर काही आठवड्यांत अनेक क्लिष्ट शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
या अपघातात मुलाचा उजवा हात पूर्णपणे गमावला, पोटाची भिंत फाटली, यकृत व मूत्रपिंडावर (लिव्हर व किडनी) गंभीर इजा झाली आणि दोन्ही मांडीच्या हाडांना फ्रॅक्चर झाले होते. जीव वाचवण्यासाठी त्वरीत आणि योग्य उपचारांची गरज होती. मुलाला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर पहिल्या सहा तासांतच शस्त्रक्रिया करण्यात आली, ज्यामुळे संक्रमणाचा धोका कमी करण्यात मदत झाली.

डॉ. तेजस हम्बीर, कन्सल्टंट – पीडियाट्रिक्स व निओनेटल इंटेंसिव्हिस्ट, यांनी सांगितले, “मुलाची अवस्था फारच गंभीर होती, पण आम्ही त्वरीत ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन त्याच्यावर प्राथमिक शस्त्रक्रिया केली. यामुळे त्याला सावरायला मदत झाली आणि पुढील टप्प्यांसाठी आम्ही त्याला तयार करू शकलो.”
डॉ. स्वप्ना आठवले, कन्सल्टंट – प्लास्टिक सर्जरी, म्हणाल्या, “तत्काळ सर्जरी व अँटिबायोटिक उपचारामुळे संसर्ग टाळण्यात यश आले. पोटाची भिंत आणि हाताचा भाग पूर्णपणे दूषित होता, पण योग्य व्यवस्थापनामुळे आम्ही संसर्ग आटोक्यात ठेवू शकलो.”

या मुलाच्या उपचारात विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी सहभाग घेतला –
डॉ. राजीव निरवणे (पीडियाट्रिक ऑर्थोपेडिक्स), डॉ. अभिजीत बेनारे (पीडियाट्रिक सर्जरी), डॉ. सुजाता (इन्फेक्शस डिसीजेस), डॉ. शिवहर सोनवणे (पीडियाट्रिक्स व निओनेटल इंटेंसिव्हिस्ट), डॉ. भाग्यश्री अर्भी (अ‍ॅनेस्थेशिया) – यांनी परिपूर्ण समन्वय साधत उपचार केले.

ज्युपिटर फाऊंडेशन आणि मुख्यमंत्री निधीतून आर्थिक मदत देखील दिली गेली, ज्यामुळे कुटुंबावरचा आर्थिक ताण कमी झाला.
तीन आठवडे रुग्णालयात उपचार घेऊन आणि चार मोठ्या शस्त्रक्रियांच्या नंतर, हा चिमुकला बिनधोक घरी परतला – चेहऱ्यावर हास्य आणि मनात जिंकण्याची उमेद घेऊन! त्याची संघर्षशीलता आणि धैर्य हे अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.
ही कहाणी केवळ वैद्यकीय कौशल्याची नाही, तर माणुसकीच्या भावनेने प्रेरित झालेल्या उपचारांची आहे – आणि अशा सेवाभावातूनच खरं आरोग्यसंपन्न समाज घडतो!

ग्रंथालयांच्या अडचणी सोडण्यासाठी शासन प्रयत्नशीलउच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे दि – 28 जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रंथालयांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी, शासन प्रयत्न करीत असून या निधीच्या माध्यमातून ग्रंथालये अद्यावत करण्यात येणार आहे तसेच राज्यातील शासकीय व सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्व अडचणी सोडण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले.

उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय शासकीय विभागीय ग्रंथालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने श्री संत गाडगे महाराज अकुल धर्मशाळा सोमवार पेठ येथे आयोजित राजा राम मोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकत्ता यांच्या अर्थसाहयाच्या विविध योजना विषयी माहिती देण्यासाठी दोन दिवशीय विभागस्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी श्री पाटील बोलत होते.

कार्यक्रमाला संचालक उच्च शिक्षण शैलेंद्र देवळाणकर राजा राम मोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकत्ता चे महासंचालक प्रा. अजय प्रतापसिंह प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, माजी ग्रंथालय संचालक किरण धांडोरे,महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष गजानन कोटेवार, प्रमुख कार्यवाहक सोपानराव पवार, कार्याध्यक्ष गुलाबराव पाटील, विभागीय ग्रंथालय संघाचे अध्यक्ष विजय कोलते, ग्रंथमित्र रमेश सुतार आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री पाटील म्हणाले,समाज माध्यमांच्या युगात वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी शासन विविध उपक्रम राबवत असून शासकीय व खाजगी ग्रंथालयांचे डिजिटलायझेशन करून वाचकांना ऑनलाइन पुस्तके उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करावेत यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली
ग्रंथालयांचे अनुदान वाढवण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. राज्यात ११,१५० ग्रंथालये कार्यरत असून ग्रंथालयाच्या कामात सुसूत्रता आणण्यासाठी संगणकीय प्रणाली द्वारे ग्रंथांचे आद्यवतीकरण कसे करता येईल यासाठी प्रयत्न करावेत. सांताक्रुज कलिना कॅम्पस येथे राज्याचे शिखर ग्रंथालय राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाची अतिशय देखणी इमारत तयार होत असून, या ठिकाणी सुद्धा वाचकांसाठी पुस्तके ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. खासदार व आमदार निधीतून काही पुस्तक खरेदी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत असे त्यांनी सांगितले.
ग्रंथालयांना देण्यात येणाऱ्या अर्थसाहयाच्या विविध योजनांच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन मंत्री श्री पाटील यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.

कार्यशाळेच्या प्रास्ताविकात श्री गाडेकर म्हणाले, ग्रंथालय आधुनिक झाली पाहिजे यासाठी विभाग प्रयत्न करीत आहे. शासकीय ग्रंथालयाप्रमाणे शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयात सुद्धा आज्ञावलीत ग्रंथांची नोंद घेण्याचे काम सुरू करत आहोत शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाच्या सोयी सुविधांमध्ये वाढ होण्यासाठी सहाय्यभूत ठरणाऱ्या व एकूणच त्यांच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या राजा राममोहन राय ग्रंथालय प्रतिष्ठान व ग्रंथालय संचालनालय यांच्या अर्थसाहयाच्या विविध योजनांविषयीची माहिती पुणे विभागातील सर्व शासन मान्य ग्रंथालयांना व्हावी या उद्देशाने, दोन दिवशीय विभागस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. असे ते म्हणाले.
या दोन दिवशी कार्यशाळेत शासनमान्य ग्रंथालयातील कामकाजासंदर्भात चर्चा करण्यात येणार असून अनेक मान्यवर वक्त्यांचे विविध विषयावर व्याख्यान होणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथ मित्र दिलीप भिकुले व सहाय्य्क ग्रंथालय संचालक सुनील हुसे यांनी तर आभार प्रदर्शन ग्रंथपाल सुरेश रिद्धीवाडे यांनी केले.
याप्रसंगी जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रेया गोखले,अपर्णा वाईकर,अमित सोनवणे,श्रीनिवास मंगलपल्ली यांच्यासह ग्रंथमित्र धोंडीबा सुतार पुणे जिल्हा ग्रंथालय संघाचे मोहन महाराज शिंदे कोल्हापूरचे डॉ. सुशांत मगदूम आदीसह सर्व जिल्हा ग्रंथालय संघाचे पदाधिकारी व विभागातील शासन मान्य सार्वजनिक ग्रंथालयाचे पदाधिकारी कर्मचारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोहगावात २०० आणि ५०० च्या बनावट नोटा छापून त्या चलनात आणणाऱ्या टोळीचा शिवाजीनगर पोलिसांनी केला पर्दाफाश

पुणे- बनावट नोटा छापणा-या टोळीचा शिवाजीनगर पोलीस स्टेशनकडील सायबर पथकाकडून पर्दाफाश करण्यात आला असून मोठ्या प्रमाणात बनावट नोटा व नोटा छापण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
शिवाजीनगर पोलिसांच्या सायबर पथकाने बनावट नोटा छापणार्‍या टोळीचा पर्दाफाश करत दोन महिलांसह पाच जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 28 लाख 66 हजार रुपये किमतीच्या बनावट, तर दोन लाख चार हजार रुपयांच्या खर्‍या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.
तसेच, नोटा छापण्याचे प्रिंटर, शाई, कोरे कागद, मोटार असे साहित्य देखील मिळून आले आहे. दरम्यान, या टोळीची व्याप्ती मोठी आहे. परराज्यांपर्यंत त्याचे धागेदोरे असून, रॅकेटमध्ये आणखी काही आरोपी असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
मनीषा स्वप्निल ठाणेकर (वय 35, रा. नागपूर चाळ, येरवडा), भारती तानाजी गावंड (वय 34, रा. केशवनगर, चिंचवड), सचिन रामचंद्र यमगर (वय 35, रा. गहुंजे), नरेश भीमाप्पा शेट्टी (वय 42, रा. लोहगाव) आणि प्रभू गुगलजेड्डी (वय 38,
रा. चिंचवड) ही अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत
. तपासासाठी त्यांना पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. पोलिस उपायुक्त संदीपसिंह गिल यांनी ही माहिती सोमवारी (दि. 28) पत्रकार परिषदेत दिली.
.असा झाला रॅकेटचा पर्दाफाश
शिवाजीनगर परिसरातील एका नामांकित बँकेत 17 एप्रिल रोजी 200 रुपयांच्या बनावट चलनी नोटा जमा झाल्या असल्याचे तेथील कर्मचार्‍यांच्या निदर्शनास आले. व्यवस्थापकांनी या संदर्भात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बाळकोटगी, तत्कालीन पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू करण्यात आला.बँकेत कोणत्या खात्यात ही रक्कम भरली गेली तिथून तपासाला सुरुवात झाली. संबंधित खातेधारकाने या नोटा खर्‍या असल्याचे समजून त्या खात्यात भरल्या होत्या. त्या व्यक्तीला ही रक्कम आरोपी मनीषा ठाणेकर हिने दिल्या असल्याचे चौकशीत उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतल्यावर या टोळीचा छडा पोलिसांना लागला.

ठाणेकर ही खासगी बँकेतून कर्ज मिळवून देण्याचे व तत्सम आर्थिक व्यवसाय करते. तिच्याकडून पोलिसांनी दोनशे रुपयांच्या बनावट शंभर नोटा जप्त केल्या. तिच्या चौकशीत आरोपी भारती गावंड हिचे नाव उघडकीस आले. तिच्याकडून दोनशे रुपयांच्या तीनशे नोटा पोलिसांनी जप्त केल्या. तिच्या चौकशीत पुढे आलेल्या माहितीनुसार पोलिसांनी सचिन यमगर याला ताब्यात घेतले.

या तिघांनी कोल्हे नावाच्या व्यक्तीकडून या बनावट नोटा मिळवल्या असल्याचे स्पष्ट झाले. प्रत्यक्ष तपासात कोल्हे हे नाव आरोपी शेट्टी धारण करत असल्याचे निष्पन्न झाले. लोहगावमधील त्याच्या घरावर छापा टाकल्यावर पोलिसांना तिथे चार लाख रुपये मूल्य असलेल्या दोनशे रुपयांच्या नोटा आढळल्या.

त्याच्याकडे नोटा छापायचा प्रिंटर, शाई, कागद व खरे दोन लाख रुपये मिळाले. त्याच्याकडील दोनशे व पाचशे रुपयांच्याही नोटा मिळाल्या. काही नोटा एका बाजूने छपाई झालेल्या होत्या. या टोळीमध्ये प्रभू गुगलजेड्डी हाही सामील असल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांनी त्यालाही अटक केली.

एक लाखाला दोन लाखांच्या बनावट नोटा

या टोळीने यापूर्वी कोणाला बनावट नोटा दिल्या आहेत, त्यासाठी लागणारा कागद त्यांनी कोठून विकत घेतला व त्याबाबतचे तंत्रज्ञान त्यांना कोणी दिले, याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. एक लाख रुपयांना बनावट दोन लाख रुपयांच्या नोटा ही टोळी देत असल्याची माहिती तपासात निष्पन्न झाली आहे.

त्याचबरोबर या टोळीमध्ये सामील असलेल्या अन्य आरोपींचीही माहिती पुढे आली असून, त्यांच्या तपासासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहे.तपासाची हि कामगिरी पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, प्रविण पाटील, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-१, संदिपसिंह गिल्ल, सहा पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे, विश्रामबाग विभाग यांचे मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलीस निरीक्षक (गुन्हे), चंद्रकांत सुर्यवंशी, सहा पोलीस निरीक्षक के बी डावेराव, पोलीस उपनिरीक्षक अजित बडे, पोलीस अंमलदार नलिनी क्षिरसागर, आदेश चलवादी, तेजस चोपडे, गणेश जाधवर, श्रीकृष्ण सांगवे, प्रविण दडस, रुचिका जमदाडे, स्वालेहा शेख (एटीसी) यांनी केली आहे

त्रिशुंड गणपतीपासून लाल महालापर्यंत – वर्ल्ड हेरिटेज डे निमित्त रेडिओ मिर्ची पुणेची खास हेरिटेज वॉक

पुणे, २८ एप्रिल २०२५:
वर्ल्ड हेरिटेज डे (१८ एप्रिल) आणि रेडिओ मिर्ची पुणेच्या २३ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने, पुणेकरांसाठी एक खास हेरिटेज वॉक आयोजित करण्यात आला — ज्याला पुणेकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शनिवार सकाळी, हा वॉक त्रिशुंड गणपती, जुना किल्ला, गुंडाचा गणपती, कसबा गणपती मार्गे लाल महाल येथे संपन्न झाला. प्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ प्रसाद तारे आणि त्यांच्या टीमने हा वॉक मार्गदर्शित केला आणि पुण्याच्या समृद्ध इतिहासातील अनेक अदमास न लागलेली माहिती उलगडून दाखवली. या हेरिटेज वॉकमध्ये सुमारे ३५ पुणेकरांनी सहभाग घेतला आणि पुण्याचा ऐतिहासिक वारसा नव्याने नुभवला.
भाग घेणाऱ्या काही पुणेकरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या:

  • अमित चव्हाण म्हणाले, “मी जन्माने पुणेकर आहे पण कसबा पेठेत किल्ला आहे हे मला आजवर माहीतच नव्हतं. एकदम डोळे उघडणारा अनुभव!”
  • राहुल बुलबुले, एक अनुभवी प्रवासी, म्हणाले, “इथे वाढलो तरी आज अनेक नवीन गोष्टी कळल्या.”
  • श्रावणी, एक विद्यार्थीनी, म्हणाली, “पाठ्यपुस्तकात जे वाचलं होतं ते आज खरंखुरं अनुभवता आलं!”
    ही संपूर्ण संकल्पना आरजे उत्सवी आणि आरजे निधी यांनी पुढाकाराने राबवली, ज्यांना मिर्ची टीमचे दर्शन, केतन आणि रक्षित यांनी साथ दिली.

शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेचे आयोजन

पुणे, दि. २८: महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या तसेच महाराष्ट्र शासनाच्या इतर विभागांच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरतीसाठी शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) – २०२५ परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविली आहे.

इच्छुक उमेदवारांना १० मे पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येईल. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असेही श्रीमती ओक यांनी कळविले आहे.

अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलां-मुलींच्या निवासी शाळेत प्रवेश घेण्यासाठी आवाहन

पुणे, दि. २८: जिल्ह्यात अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा दिवे ता. पुरंदर, तरंगवाडी ता. इंदापूर, पेठ ता. आंबेगाव तसेच मुलींची शासकीय निवासी शाळा चांडोली ता. खेड येथे २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या शाळा ६ वी ते १० वीपर्यंत कार्यरत आहेत. निवासी शाळांमध्ये अनुसूचित जातींसाठी ८० टक्के, अनुसूचित जमाती १० टक्के, विमुक्त जमाती व भटक्या जमाती- ५ टक्के, विशेष मागास प्रवर्ग- २ टक्के अणि दिव्यांगांसाठी ३ टक्के जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.

प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना निवासी शाळांमध्ये ई-लर्निंग अध्यापन सुविधा, अनुभवी व तज्ज्ञ शिक्षक, सेमी इंग्रजी व मराठी माध्यम अशा दोन्ही माध्यमामध्ये विद्यार्थ्यांना शिकविले जाते, तसेच मोफत भोजन व निवासाची सोय, स्वच्छ वातावरण व ३ मजली इमारत, विविध खेळ व स्पर्धा मार्गदर्शन, स्वतंत्र भव्य क्रीडांगण, स्वतंत्र प्रयोगशाळा व ग्रंथालय, २४ तास वीज व पाणी सुविधा, ३ हजार पुस्तकांचे भव्य ग्रंथालय व वाचनालय, दरवर्षी स्नेहसंमेलन, क्रीडा स्पर्धा व सहलीचे आयोजन, ई लायब्ररी व विज्ञान केंद्र, डिजीटल क्लासरुम आदी मोफत सोयीसुविधा शासनामार्फत देण्यात येतात, असे समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त प्रसाद खैरनार यांनी कळविले आहे.
0000

पुणे विमानतळावर आता १० रुपयांत चहा, २० रुपयांत वडापाव !

  • पुणे विमानतळावर उडाण यात्री कॅफेचे उद्घाटन
  • लवकरच मुंबई विमानतळावरही सेवा सुरु होणार
  • केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ
  • २० रुपयात कॉफी, समोसा, मिठाई

पुणे, –
उडान याेजनेच्या माध्यमातून छाेटी व माेठी शहरे एकमेकांशी जाेडली जात अाहे. या याेजनेच्या माध्यमातून दीड काेटी नागरिकांनी मागील दाेन ते अडीचवर्षात प्रवास केला अाहे. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी याबाबत पुढाकार घेतल्याने विमान प्रवास सर्वसामान्यांचे अावाक्यात अाला अाहे. केंद्राचे अर्थसंकल्पात अर्थमंत्री यांनी उडाण याेजना पुढील दहा वर्ष कायम ठेवणार अाहे. पुढील पाच वर्षात चार काेटी लाेक या याेजनेतून प्रवास करतील. विमानतळावर सर्वसामान्य प्रवाशांना खाद्य पदार्थ महाग मिळतात अशा तक्रारी येत हाेत्या. त्यानुसार उडाण याेजने प्रमाणे उडाण यात्री कॅफे सुरु करण्यात अाले. कलकत्ता, चेन्नई, अहमदाबाद, याठिकाणी हे कॅफे सुरु झाले असून अाता प्रवाशांना याचा लाभ पुणे विमानतळावर देखील मिळणार अाहे. २० रुपयात काॅफी, सामाेसा, मिठाई , दहा रुपयात चहा, पाणी बाॅटल प्रवाशांना उपलब्ध हाेईल अशी माहिती केंद्रीय नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर माेहाेळ यांनी साेमवारी पत्रकार परिषदेत दिली. लवकरच ही याेजना मुंबई विमानतळावर देखील सुरु हाेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

माेहाेळ म्हणाले, देशात दहा वर्षापूर्वी ७४ विमानतळ हाेते ती संख्या अाज १६० पर्यंत वाढलेली अाहे. पूर्वी लाेक एसटी, रेल्वे मागणी करत हाेते अाज विमान मागतात हा बदलत्या भारताचा अाणि विकासाच्या दिशेने वाटचाल करण्याचा संकेत अाहे. २०४७ चा विकसित भारत संकल्प पंतप्रधान यांनी देशासमाेर ठेवला असून यात विमान क्षेत्राचा वाटा माेठा असणार अाहे. ४०० विमानतळे विकसित करण्याचा संकल्प अाहे. पुणे विमानतळ मध्ये माेठा बदल झाला अाहे. पुण्यात दरराेज २०० विमाने ये-जा करत अाहे. ५२ हजार चाैरस मीटर नवीन टर्मनिल झाले असून दरवर्षी ९० लाख लाेक या विमानतळावरुन प्रवास करत अाहे. ३४ चेकिंग काऊंटर निर्माण झाली. २५ डीजी यात्रा सुरु झाले अाहे. जुने टर्मिनल देखील पुर्नविकास हाेणार असून १४ नवीन काऊंटर निर्माण हाेतील त्यामुळे अधिक १० ते १५ लाख प्रवासी प्रवास करु शकतील. १०.६६ टक्के प्रवासी क्षमता वाढ, ६० टक्के प्रवासी वाढ, कार्गे वाहतूक ८.४५ टक्के वाढली असल्याने अामूलाग्र बदल पुणे विमानतळावर दिसून येत अाहे. पुणे- भाेपाळ, त्रिवेंद्रम, चेन्नई, इंदाैर, डेहराडून विमानसेवा नव्याने सुरु झाली अाहे. विमानतळ धावपट्टी विस्तारीकरणबाबत सातत्याने बैठक सुरु अाहे. २०० एकरपेक्षा अधिक जागा ताब्यात घेण्याचे सुत्र ठरले अाहे. विमानतळ विस्तारीकरणसाठी राज्यशासन भूसंपादन करेल. कार्गाेसाठी प्राेत्साहन देण्यात येणार अाहे.

पुणे विमानतळ मेट्राे मार्गशी जाेडणार
खडकवासला ते खराडी हा मेट्राे मार्ग पुणे विमानतळाला जाेडण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी बैठक व चर्चा झाल्या अाहे. महा मेट्राे, मनपा यांच्याशी संबंधित विषय असून मनपा अाणि मेट्राे याबाबत डीपीअार करण्यासाठी प्रयत्न करेल. पुण्यातील चार मेट्राे मार्ग निगडी ते स्वारगेट, हिंजवडी ते शिवाजीनगर, वनाज ते रामवाडी ,खडकवासला ते खराडी हे सर्व मेट्राे मार्ग विमानतळाशी मेट्राेने थेट जाेडण्याचे नियाेजन सुरु अाहे. पुणे शहराची लाेकसंख्या ६० लाख तर जिल्हामिळून एक काेटीपेक्षा अधिक अाहे. त्यामुळे पुढील ५० वर्षाचा विचार करता अधिकाधिक सेवा देण्याचा प्रयत्न राहिली असे माेहाेळ यांनी सांगितले.