Home Blog Page 3323

नित्या आणि नायशाचा बाबांसोबत ‘फादर्स डे’

0

विक्रम फडणीस निर्मित आणि दिग्दर्शित ‘हृदयांतर’ चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. ह्या ट्रेलरमधून चित्रपटातली मुख्य व्यक्तिरेखा शेखर जोशी ह्यांच्याकडे कामाच्या व्यापामूळे आपल्या नित्या आणि नायशा ह्या दोन मुलींसाठी वेळच नसतो, हे समोर आलंय.

‘हृदयांतर’ सिनेमातून मुंबईसारख्या मोठ्या शहरात राहणा-या, आणि आपल्या करीयरच्या मागे धावताना कामाच्या व्यस्ततेमूळे आपल्या मुलांना व्यवस्थित वेळ न देऊ शकणा-या अनेक ‘शेखर जोशीं’ची ही कथा म्हणायला हवी.

ही भूमिका साकारणा-या अभिनेता सुबोध भावेशी ह्यासंदर्भात चर्चा केल्यावर त्याने सांगितले, “काहीही म्हणा, पण ह्या सिनेमाच्या निमीत्ताने दोन गोड मुलींचा बाप बनण्याची माझी इच्छा पूर्ण झाली. कोणीही पून्हा पून्हा त्यांच्या प्रेमात पडाव्यात अशा ह्या मुली आहेत. ह्या दोन्ही मुली जेवढ्या लाघवी आहेत, तेवढ्याच समंजसही आहेत. त्यामूळे ह्यांच्यासोबत काम करणं नक्कीच सुखावह होतं.”

‘फादर्स डे’ निमीत्ताने सुबोधने नुकतीच त्याच्या दोन्ही ऑनस्क्रिन मुलींना ट्रीट दिली. त्यावेळीही दोन्ही मुलींची सुबोधशी असलेली बॉन्डिग दिसत होती.

यंगबेरी एन्टरटेन्मेट, इम्तियाज खत्री आणि विक्रम फडणीस प्रॉडक्शन आणि  टोएब एन्टरटेन्मेट निर्मित  ‘हृदयांतर’ चित्रपट ७ जुलै २०१७  रोजी प्रदर्शित होणाऱ आहे.  या चित्रपटात मुक्ता बर्वे, सुबोध भावे, आणि सोनाली खरे मुख्य भूमिका आहेत.

इस्लाम हा शांतीचा संदेश देणारा धर्म – अ‍ॅड. जफरयब जिलानी यांचे मत

0
डॉ. विश्‍वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे येथे व्याख्यान
पुणे :  ङ्ग धर्माबद्द्ल आस्था हा चार दिवसांचा किंवा तात्पुरता विषय नसतो. तो भावनेशी निगडित असतो आणि कायमस्वरुपी देखील. आपल्या सगळ्यांना एकाच निर्मात्याने बनविले असून एकमेकांसोबत वाद घालण्यात काहीच अर्थ नाही. इस्लाम हा नेहमीच शांतीचा, निष्ठेचा संदेश देतो, ङ्घ अशा भावना श्रीराम जन्म भूमी – बाबरी मस्जिद विवादास्पद जागेसंबधीचे प्रतिवादी व लखनौ येथील सुप्रसिद्ध कायदे पंडित, तसेच, इस्लामचे गाढे अभ्यासक अ‍ॅड. जफरयब जिलानी यांनी व्यक्त केल्या.
डॉ. विश्‍वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेतर्फे  विश्‍वशांतीचा पुरस्कार करण्यासाठी ङ्गआंतरपंथीय आणि आंतरधर्मीय सलोख्याची गरज ङ्घ या विषयावर ते बोलत होते.
यावेळी नवी दिल्ली येथील सुप्रसिद्ध विद्वान, उर्दू लेखक व पत्रकार फिरोज बख्त अहमद (मौलाना अबुल कलम आझाद यांचे नातू) हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. न्यूट्रॉन इलेक्ट्रॉनिक सिस्टीम प्रा. लि., मुंबईचे चेअरमन नानिक रुपानी व नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा.डॉ. एस. एन. पठाण हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड हे होते.
अ‍ॅड. जफरयब जिलानी म्हणाले, ङ्ग गेल्या काही वर्षांमध्ये मुस्लिम समुदायासाठी फारच कमी गोष्टी केल्या गेल्या आहेत. अगदी मुस्लिम अल्पसंख्याकांसाठी देण्यात येणारा फंड देखील कमीच होता.
राम मंदीर विषयावर बोलताना ते म्हणाले की,  राम जन्मभूमी-बाबरी मस्जिद हा विनाकरण उकरून काढण्यात आलेला वाद आहे. हा केवळ राजकारण्यांचा डाव आहे. दोन्ही पक्ष दोन ध्रुवांवर आहेत. त्यामुळेच ही समस्या निर्माण झाली आहे. आज एक फार मोठा समुदाय माध्यमांवर नियंत्रण ठेवून आहे. काही वर्षांपूर्वी जे लोक अत्यंत निर्भीडपणे लिखाण करायचे ते आज मूग गिळून गप्प बसले आहेत. ङ्घ
  फिरोज बख्त अहमद म्हणाले, ङ्ग जो पर्यंत एखाद्या व्यक्तीला चांगले शिक्षण मिळत नाही. तो पर्यंत ती व्यक्ती कधीच शांतीचा विचार करणार नाही. सोबतच एखादी व्यक्ती कितीही उंचीवर पोचली तरी त्याचे पाय जमिनीवरच रहायला हवेत. कारण पाय जमिनीवरच असतील तरच व्यक्ती अत्यंत उंचीचे काम करु शकते. त्या काळात सर सय्यद अहमद खान यांनी जे कार्य केले, त्याच स्वरुपाचे कार्य करण्याची आज गरज आहे. ङ्घ
प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड म्हणाले, ङ्ग इस्लाम नेहमीच शांतीचा संदेश देतो. आज आपण कोणत्याही जातीचे- धर्माचे असू. आपणा सर्वांना येथेच जगायचे आणि येथेच मरायचे आहे. आज या दोन्ही धर्मांमध्ये विश्‍वास असणे नितांत गरजेचे आहे. सोबतच एकमेकांसोबत सुसंवाद होणे देखील तितकेच गरजेचे आहे. जेव्हा तुमची वृत्ती चांगली असेल तेव्हा नक्कीच तुमचा सर्वांशी सलोखा होतो. ङ्घ
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. एस. एन. पठाण यांनी केले.  प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले व आभार प्रदर्शन केले.

त्यांची मुलगी असल्याचा अभिमान वाटतो

0
 
माझे बाबा एअरफोर्समध्ये होते. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांनी त्यांच्यातला परफेक्टशनीसपणा आमच्यावर बिंबवला आहे. माझ्या बाबांकडून मी अनेक गुण आत्मासात केले आहेत,  त्यापैकी
बाबांकडून मिळालेला पहिला गुण म्हणजे स्वावलंबीपणा. सेटवर असताना स्वतःची लहान मोठी कामे करणे दुसऱ्या व्यक्तीवर अवबंलून न राहण हे मी बाबांकडून शिकले आहे. बाबा नेहमी सांगतात प्रत्येकाने स्वतःची कामे शक्य तेवढी स्वबळावर करायला हवी. त्यांच्या सर्व शिकवणीचा आता मला खूप फायदा होतो आहे. लहानपणापासूनचं त्यांनी मला प्रत्येक गोष्टीचं स्वातंत्र्य दिलं आहे.  मग ते करिअर निवडण्यापासून असो ते आयुष्यातील महत्वाचे निर्णय घेण्याबाबतचे असो, बाबा नेहमी माझ्या पाठीशी खंबीर उभे असतात. दुसरा महत्त्वाचा गुण म्हणजे वक्तशीरपणा. वेळ हि एक आयुष्यातली महवाची गोष्ट असल्यामुळे ती पाळायलाच हवी असा अट्टाहास बाबांचा असतो, आणि मी देखील त्यांचा हा वारसास पुढे चालवते आहे. माझ्या शूटींगच्या ठिकाणी तसेच कुठे फंक्शन असेल, तर मी नियोजित वेळेच्या ५ मिनिटे आधीच तिथे पोहोचलेली असते. त्यामुळे अनेकदा माझे कौतुक देखील करण्यात आलं आहे. माझ्या आयुष्यातील प्रत्येक चांगल्या गोष्टींसाठी मी त्यांची खूप ऋणी आहे. मी त्यांची मुलगी आहे याचा मला अभिमान वाटतो.
रीना अगरवाल, अभिनेत्री

….आणि बाबांनी मला झेलले

0
 
माझे बाबा सुनील धबडगावकर म्हणजे प्रेमळ व्यक्तिमत्व. त्यांच्याबद्दल जेवढे काही बोलू तेवढे कमी आहे. माझ्या कामाचे कोडकौतुक त्यांना खूप असते. माझ्या आगामी ‘बसस्टॉप’ सिनेमाची एक्साईटमेंट माझ्यापेक्षा अधिक त्यांना आहे. मी लहानपणापासूनच शांत स्वभावाची मुलगी आहे. पण कधी कधी खूप अतरंगीपणा करायचे,  असे बाबाच बोलतात. फादर्स डे निमित्ताने एक गोष्ट मला शेअर करावीशी वाटते, माझ्या लहानपणीचा एक किस्सा त्यांनीच मला सांगितला होता. तो असा कि,  मी, आई आणि बाबा डोंबिवली स्टेशनला होतो, त्यावेळी खुप धो-धो पाऊस पडत होता.. रेल्वे स्थानकावर खुप गर्दी असल्यामुळे सर्वजण आपापली छत्री संभाळत चालत होते. पाऊस जास्त असल्यामुळे बाबांनी मला खादंयावर घेतलं होत, मात्र तिथे देखील मला स्टंटबाजी करायची शक्कल सुचली आणि बाबांच्या खांद्यावरुन भरपावसात मी उसळी मारली,  बाबांनी मला पकडण्याचा प्रयत्न केला पण मी सटकले, तेवढ्यात त्यांनी छत्री उलटी केली आणि मला छत्रीत झेलंल… अक्षरशः पडता पडता मी वाचले होते, त्यानंतर बाबांनी पुन्हा मला त्यांच्या खांदयावर पकडून बसवलं. खूप भन्नाट किस्सा होता तो. मात्र आता जसजशी मोठी होत गेली, स्वतःमध्ये बदल घडवत गेली. मागच्या चुका सुधारत गेली, आणि माझ्या या सर्व धडपडीच्या प्रवासात ते मला सांभाळत आले आहेत, आणि आज देखील तितक्याच तत्परतेने मला सांभाळत आहेत.
रसिका सुनील, अभिनेत्री

बाबांचा आदर्श घेऊन माझे व्यक्तिमत्व घडवते

0
 
माझे बाबा मुंबई पोलीस खात्यात असल्यामुळे, मला त्यांच्यासोबत जास्त वेळ व्यतीत करता येत नाही. पण जेव्हा ते फ्री असतात तेव्ह्या जास्तीतजास्त वेळ त्यांच्याबरोबर घालवणे मी पसंत करते. माझ्या बाबांबद्दल सांगायला गेले तर भरपूर काही आहे. खरं तर… अभिनयक्षेत्रात येण्याचे प्रोत्साहन मला बाबांकडूनच सर्वातआधी मिळाले. आमच्या घरात याआधी कोणीच या क्षेत्रात वळले देखील नव्हते. पण बाबांनी माझी आवड लक्षात घेत, यात काम करण्याची मुभा दिली. आईपेक्षा बाबांसोबत माझी जास्त बॉन्डीग आहे. त्यांच्याशी मी प्रत्येक गोष्ट शेअर करत असते, ते सतत माझ्यासोबत असावेत असे मला वाटते, कधी कधी तर ते वेळ देत नाही म्हणून मी त्यांच्यावर रागावते देखील. पण तो अबोला काही वेळापुरताच असतो. माझ्या आगामी ‘अंड्या चा फंडा’ या चित्रपटाच्या शुटींगमध्ये ते माझ्यासोबत असावेत असे मला वाटत होते, पण ते प्रत्येकवेळी शक्यच होईल असे नाही, याची जाणीव मला होती. बाबांशी बोलल्याखेरीज मला समाधान लाभत नाही. माझे बाबा मुंबई पोलिस खात्यात असल्याचा मला फार अभिमान असून त्यांच्या कामिगिरीचा आदर्श घेऊन मी माझं व्यक्तिमत्त्व घडवण्याचा प्रयत्न करते आहे.
मृणाल जाधव, बालकलाकार

बाबा माझे आधार

0
 
प्रत्येक मुलीसाठी तिचे बाबा स्ट्राँगमॅन असतात. जेव्हा कधी भीती वाटली कि तिला पहिले तिचे बाबा आठवतात. माझे देखील अगदी तसेच आहे. गम्मत म्हणजे माझा आगामी ‘लपाछपी’ सिनेमा भुताचा आहे. त्यामुळे सिनेमा पाहताना भीती ही वाटणारच! असो. हा निव्वळ योगायोग असला तरी, बाबा जवळ असले की कसलीच भीती वाटत नाही. मी जेव्हाही खचते तेव्हा माझा पहिला फोन हा बाबांनाच असतो. मला लहानपणापासून जेव्हाही एकटेपणा वाटला तेव्हा त्यांनीच मला आधार दिला आहे. आजही एखादी गोष्ट अडखळली कि मी लगेच बाबांकडे धाव घेते. त्यांच्या मार्गदर्शनाने माझा आत्मविश्वास वाढीस लागतो, ते नेहमीच मला प्रोत्साहन देण्याचे काम करतात. ते स्वभावाने मितभाषी आहेत, त्यामुळे कोणाबरोबर जास्त बोलणे पसंत करत नाहीत. आमच्यातलं बाबा आणि मुलीचं नातं हे अबोल जरी असलं तरी खूप छान आणि गोंडस आहे.
पूजा सावंत, अभिनेत्री

जीटीपीएल हॅथवे लिमिटेड– प्रारंभी समभाग विक्रीला

बुधवार, 21 जून 2017 रोजी सुरुवात होणार आणि शुक्रवार, 23 जून 2017 रोजी विक्री बंद होणार

प्रति इक्विटी शेअर किंमतपट्टा 167 ते 170 रुपये निश्चित

पुणे: जीटीपीएल हॅथवे लिमिटेडने (“कंपनी” वा “इश्यूअर”) प्रत्येकी 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेअर्सची (“इक्विटी शेअर्स”) बुधवार, 21 जून 2017 पासून रोख पद्धतीने (शेअर प्रीमिअमसह) प्रारंभी समभाग विक्री करायचे ठरवले आहे (“ऑफर”). यामध्ये 2400 दशलक्ष रुपयांपर्यंतच्या इक्विटी शेअर्सच्या फ्रेश इश्यूचा (“फ्रेश इश्यू”) व कंपनीच्या सेलिंग शेअरहोल्डरकडून 14,400,000 पर्यंतच्या इक्विटी शेअर्सच्या ऑफर फॉर सेलचा समावेश आहे (“ऑफर फॉर सेल”). सेलिंग शेअरहोल्डरमध्ये समाविष्ट आहेत – अनिरुद्धसिंहजी यांच्यातर्फे 1,136,000 पर्यंत इक्विटी शेअर्स, कनकसिंह राणा यांच्यातर्फे 440,000 पर्यंत इक्विटी शेअर्स, गुजरात डिजी कॉम प्रायव्हेट लिमिटेडतर्फे 5,480,000 पर्यंत इक्विटी शेअर्स, हॅथवे केबल अँड डाटाकॉम लिमिटेडतर्फे 7,200,000 पर्यंत इक्विटी शेअर्स आणि अमित शहा यांच्यातर्फे 144,000 पर्यंत इक्विटी शेअर्स. बिड/ऑफर शुक्रवार, 23 जून 2017 रोजी बंद होणार आहे. ऑफरसाठी प्रति इक्विटी शेअर किंमतपट्टा 167 रुपये ते 170 रुपये निश्चित केला आहे. किमान बोलीचे प्रमाण 88 इक्विटी शेअर्स आहे आणि त्यानंतर 88 इक्विटी शेअर्सच्या पटीत. ऑफरसाठी सोल बुक रनिंग लीड मॅनेजर (“बीआरएलएम”) आहेत – जेएम फिनान्शिअल इन्स्टिट्यूशनल सिक्युरिटीजलिमिटेड, बीएनपी पॅरिबा, मोतिलाल ओस्वाल इन्व्हेस्टमेंट अॅडव्हॉयजर्स लिमिटेड आणि येस सिक्युरिटीज (इंडिया) लिमिटेड.सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (इश्यू ऑफ कॅपिटल अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, 2009 नुसार (“सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्स” असा बदल) कंपनी बुक रनिंग लीड मॅनेजरच्या सल्ल्याने अँकर इन्व्हेस्टरच्या सहभागाचा विचार करू शकेल (“आयसडीआर रेग्युलेशन्स”). अँकर इन्व्हेस्टरसाठी बोली/ऑफरचा कालावाधी ऑफर सुरू होण्यापूर्वी एक वर्किंग दिवस अगोदर, म्हणजे मंगळवार, 20 जून 2017 रोजी असेल. आरएचपीमार्फत दिले जाणारे इक्विटी शेअर्स बीएसई लिमिटेड (“बीएसई”) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“एनएसई”) येथे सूचिबद्ध केले जाणार आहेत.

सावधान ..पहा हा खंबाटकी घाट…

0

पुणे- खंबाटकी घाट परिसरात काल (शुक्रवार) संध्याकाळी जोरदार पाऊस झाल्याने पावसाचे पाणी घाट वळणावरुन रस्त्यावर वेगाने मोठ्या लोंढ्या च्या स्वरूपात आल्याने काहीकाळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. पाण्याचे हे रौद्र स्वरूप पाहून अनेकांना धडकी भरली . तर अनेकांनी याचा सामना करत पुढे वाटचाल सुरु ठेवली . पण हि धोकादायक परीस्थिती आहे . त्याबाबत वाहचालाकांनी रिस्क घेवू नये …

स्मार्ट सिटी गुंडाळावी लागेल .. चेतन तुपे

0

पुणे- पंतप्रधान यांनी देशभर मोठा गाजावाजा करून आणलेली स्मार्ट सिटीची योजना आता कंपनी कायद्याप्रमाणे कार्यवाही न झाल्याने गुंडाळावी लागेल अशी शक्यता महापालिकेतील विरोधीपक्ष नेते चेतन तुपे यांनी व्यक्त केली आहे पहा आणि ऐका याबाबत नेमके तुपे पाटील काय म्हणाले ….

विठुरायाच्या नामघोषात संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान(पहा फोटो )

0
देहू-   तुतारी, टाळ मृदंगाचा निनाद, विण्याचा झंकार करीत ज्ञानोबा तुकाराम या मंत्राचा गजर करीत, विविध खेळ खेळत पावले आणि जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या 332 व्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान लाखो वैष्णव भाविकांच्या साक्षीने शुक्रवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास झाले. पालखी सायंकाळी येथील इनामदार वाड्यात पहिल्या मुक्कामासाठी विसावली.
तुका म्हणे ऐसे अर्त ज्याचे मनी | त्याची चक्रपाणी वाट पाहे || या अभंगाच्या रचनेप्रमाणे खांद्यावर भगवी पताका, डोक्यावर तुळशी वृंदावन व पाण्याचे कलश, मुखी हरिनामासह ‘‘तुकाराम तुकाराम’’ जयघोष करीत हा सोहळा पंढरीच्या वाटेला लागला.

या प्रसंगी सारा आसमंत टाळ वाजे, मृदंग वाजे, वाजे हरीची वीणा माऊली तुकोबा निघाले पंढरपुरा, हे बोल गातच सारा देऊळवाडा व परिसर दणाणून गेला होता. घामाच्या धारांचा अभिषेक घालत उन्हाची तमा न बाळगता आपल्या लाडक्या पांडुरंगाला भेटण्यासाठी व मनोहारी रुप पाहण्यासाठी उपस्थित जनसागर पंढरपूरच्या वाटेवरील पहिल्या मुक्कामासाठी इनामदार वाड्याकडे रवाना झाला.

आज पालखीचे प्रस्थान असल्याने येतील मुख्य मंदिर, वैकुंठगमन मंदिर परिसरातील इंद्रायणी नदी काठ सकाळपासून फुललेला असतानाच हा पालखी सोहळा आपल्या डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न करीत जीवनाचे सार्थक झाले यात धन्यता मानत होता.

प्रथेनुसार प्रस्थान सोहळ्याच्या निमित्ताने पहाटे साडेचारला शिळा मंदिरात सुनील मोरे व विठ्ठल मोरे यांच्या हस्ते सुरुवात झाली. पहाटे पाच वाजता विठ्ठल रुक्मिणी मंदिरात संस्थानचे अध्यक्ष पंढरीनाथ मोरे व अभिजित मोरे यांच्या हस्ते, सहा वाजता जालिंदर मोरे, अशोक मोरे यांच्या हस्ते वैकुंठगमन मंदिरात विश्वस्त मंडळाच्या यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. सात वाजता तपोनिधी पालखी सोहळ्याचे जनक नारायण महाराजांच्या समाधीची महापूजा सकाळी दहा वाजता पहाती गवळणी तवती पालथी दुधानी | म्हणती नंदाचीया पोरे आजी चोरी केली खरे या अभंगाचे निरूपण करीत पालखी सोहळ्याच्या काल्याचे कीर्तन संभाजी महाराज मोरे देहूकर यांनी केले. या कीर्तनाने या अखंड हरिनाम सोहळ्याची सांगता झाली. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास म्हसलेकर मंडळी श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका घोडेकर सराफांच्या भालचंद्र घोडेकर व त्यांच्या कुटुंबीयांनी  चकाकी दिलेल्या पादुका आणण्यासाठी म्हातारबुवा दिंडी व मानकरी गंगा म्हसलेकर हे घोडेकर यांच्या वाड्यात दाखल झाले, येथे अभंग आरती झाल्यानंतर  म्हसलेकरांनी या पादुका डोक्यावर घेऊन इनामदार वाड्यात आणल्या येथे पादुकांची विधीवत पूजा दिलीप महाराज मोरे गोसावी यांच्या हस्ते करण्यात आली. काल्याचे कीर्तन झाल्यानंतर इनामदार वाड्यातील पूजा उरकल्यानंतर पादुका पालखीचे मानकरी गंगा म्हसलेकर मंडळींच्या ताब्यात देण्यात आल्या. म्हतारबा दिंडीसह ह्या पादुका डोक्यावर घेऊन टाळ मृदंगाच्या तालावर भक्तीमय वातावरणात वाजत गाजत मुख्य मंदिरात आणल्या येथे मंदिराला प्रदक्षिणा घालून भजनी मंडपात आणल्या.

दरम्यानच्या काळात प्रस्थान सोहळ्याला आलेल्या दिंड्या व फडकरी आपआपल्या क्रमाने मुख्यमंदिरात प्रवेश करीत होत्या. या सोहळ्यासाठी मानाच्या दिंड्या, फडकरी व विणेकरी यांनी महाद्वारातून मंदिराच्या आवारात येऊन भजन म्हणत आपला शीण भाग घालवत पावले खेळत मंदिर प्रदक्षिणा घालत होते व उत्तर दरवाजाने बाहेर पडत होत्या. भजनी मंडपात दुपारी पावणेतीन वाजता प्रस्थान सोहळ्याला सुरूवात झाली. या वेळी ग्रामोपाध्याय सुभाष टंकसाळे यांनी ही धरती, वायू, अग्नी, जल, आकाश यांच्यासह पाद्य पूजा व कलशपूजा करण्यात आली. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुकांची विधीवत पूजा करण्यात आली. यानंतर श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची महापूजा सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी सपत्नीक, खासदार श्रीरंग बारणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार संजय भेगडे त्यांच्या पत्नी सारिका यांच्या हस्ते करण्यात आली.

यावेळी माजी मंत्री बबनराव पाचपुते, प्रा. विश्वनाथ कराड, प्रांताधिकारी ज्योती कदम, तहसिलदार गीतांजली शिर्के, पंचायत समिती सदस्य हेमलता काळोखे, सरपंच सुनीता टिळेकर, सभापती गुलाब म्हाळसकर, प्रशांत ढोरे, बाळासाहेब काशिद, विजय लांडे, सुहास गोलांडे,  कांतीलाल काळोखे, हेमा मोरे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, विविध अधिकारी व दिंड्याचे विणेकरी आदी मान्यवर उपस्थित होते. पालखी सोहळा प्रमुख अभिजित मोरे, सुनील दिगंबर मोरे व जालिंदर महाराज मोरे, संस्थानचे अध्यक्ष पंढरीनाथ मोरे, विश्वस्थ अशोक निवत्ती मोरे, विठ्ठल मोरे, सुनील दामोदर मोरे, दिलीप महाराज मोरे गोसावी आदी उपस्थित होते.

पूजेनंतर चोपदार नामदेव निवृत्ती गिराम यांनी आरती म्हणत कार्यक्रमाला प्रस्थान कार्यक्रमास सुरूवात झाली. मानकऱ्यांचा व दिंडीकऱ्यांचा नारळ प्रसादाने सन्मान केला. चोपदार नामदेव गिराम कानसुलकर, नारायण खैरे, देशमुख चोपदार व सेवेकरी तानाजी कळमकर, कांबळे यांच्यासह सर्व मानकऱ्यांना व सेवेकरी मंडळींना संस्थानच्या वतीन नारळ प्रसाद देऊन सत्कार करण्यात आला.

प्रथेप्रमाणे संत तुकाराम महाराजांच्या पादुका उपस्थितांच्या हस्ते फुलांनी सजविलेल्या पालखीत ठेवण्यात आल्या. महाराजांच्या पादुका पालखीत ठेवल्यानंतर सेवेकरी व मानकऱ्यांनी आपली सेवा बजावली. मानाचे पालखीचे भोई तानाजी कळंबकर, कांबळे यांच्यासह भाविकांनी खांदा दिला. याच वेळी तुतारीधारक पोपट तांबे यांनी तुतारी फुंकली. यावेळी भाविकांनी उपस्थित वारकऱ्यांनी एकच जल्लोष करीत ज्ञानेश्वर माऊली तुकाराम नामाचा जयघोष करण्यास सुरूवात केली. या जयघोषाने आसमंती गजर करीत पताका उंचावून शंख नादात चौघडा व ताशांच्या गजर केला.

भजनी मंडपातून पालखी बाहेर येताच दिंड्यांत सहभागी असलेल्या वारकऱ्यांमध्ये उत्साह भरला, त्यांच्या मुखातुन आपोआपल अभंगाचे बोल बाहेर पडत होते.  हातातील टाळ विणा मृदंगाच्या तालावर पावले थिरकत होती, ही पावले कोट प्रकारात आपले खेळ करीत भक्तीरसात न्हाऊन निघाली होतीे. सर्व वारकरी वातावरणात दंग झाले होते.  वारकऱ्यांमध्ये फुगड्यांचा खेळ रंगू लागला होता, सारी देहूनगरी भक्तीमय झाली होती. याच वेळी चौघड्याचे मानकरी पांडे, यांनी चौघडा व रियाझ मुलाणी यांनी ताशा वाजविण्यास सुरवात करताच उत्साही वातावरणात पालखीवर दत्ता याने छत्री धरली, माणिक अवघडे यांनी जरी पट्टा, नितीन अडागळे यांनी गरूड टक्के, भाईसाहेब कोरे व विठ्ठल धनवे वांगी बिटरगाव करमाळा सोलापूर यांनी चांदीची अब्दागिरी, पताका मारूती लांबकाने यांनी घेत वारीच्या मार्गावर चालू लागले.  चोपदार नामदेव गिराम काका यांच्यासह देशमुख व नारायण खैरे चोपदार व  कानसुलकर चोपदार आपआपल्या जबाबदाऱ्या घेत पालखी राजवैभवात भजनी मंडपातून बाहेर आणली.

दरम्यान बाभूळगावकर आणि अकलूजच्या विजयसिंह मोहिते पाटील यांच्या अश्वांसह शाही थाटात पालखी देऊळवाड्यातील मुख्य मंदिरासह शिळा मंदिराला प्रदक्षिणेस बाहेर पडली. मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर पालखी मोठ्या भक्तीमय वातावरणात मंदिराच्या आवारातून साडेपाचच्या सुमारास मंदिराच्या बाहेर पडली व पहिल्या मुक्कामासाठी वाजत गाजत इनामदार वाड्याकडे गेली.

ज्ञानप्रभात विद्यामंदि​​र​ ​ ​ शाळेला ​एक लाखाची ​ आर्थिक मदत

0
पुणे : “मृत्युनंतर काय होते याचा विचार करण्यापेक्षा प्रत्येकाने स्वत: सामाजिक कार्य करून समाजासाठीचे कर्तव्य पार पाडले पाहिजे. हा विचार बुद्धांनी सांगितला आहे, तो अंगीकारला पाहिजे.” असे मत विभागीय पासपोर्ट अधिकारी अतुल गोतसुर्वे यांनी व्यक्त केले.
संघमित्रा ढावरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त तळवडे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले ट्रस्टच्या

​​ज्ञानप्रभात विद्यामंदिर शाळेला​ एक लाख रुपयांची ​आर्थिक मदत करण्यात आली.
​अतुल ​गोतसुर्वे यांच्या हस्ते संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल गवळी यांच्याकडे एक लाख रुपयांचा धनादेश सुपुर्द करण्यात आला. यावेळी माजी प्रशासकीय अधिकारी पंजाबराव वानखेडे, सहकार खात्याचे माजी सहसचिव एस.बी.पाटील, मुख्याध्यापिका प्रज्ञा सोनवणे, निवेदक दीपक म्हस्के, राहुल काकडे, भिक्कुनी  आर्य सुमना, आम्रपाली गायकवाड, सचिन गायकवाड, प्रणाली ढावरे उपस्थित होत्या.
गोतसुर्वे म्हणाले, “समाजातील उपेक्षित व वंचित घटकाच्या शैक्षणिक उन्नतीसाठी  ढावरे कुटुंबीयांनी आर्थिक मदत करण्यासाठी उचललेले पाउल महत्वाचे आहे. अशा उपक्रमांची गरज आहे. या संस्थेतील मुलांचा कल लक्षात घेऊन त्यांना शिक्षण दिले पाहिजे.”
वानखेडे म्हणाले, “संघमित्रा ढावरे यांच्या अकाली जाण्याने त्यांच्या कुटुंबीयांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याहीपेक्षा समाजाचे खुप मोठे नुकसान झाले आहे. त्यांनी गरीब व गरजु महिलांना बचत गटाचा आधार देत त्यांचे सक्षमीकरण केले. महिला उद्योजिका निर्माण करण्यास त्यांनी प्राधान्य दिले. त्यांनी आपल्या कार्याद्वारे बुद्धांचा मानवतावादी विचार प्रत्यक्षात उतरविला.”प्रास्ताविक डॉ.भागवत ढावरे यांनी केले. सुत्रसंचालन दीपक म्हस्के यांनी केले.
“ज्ञानप्रभात विद्यामंदिर ही शाळा समाजातील गरीब, गरजु, उपेक्षित व वंचित मुलांच्या शैक्षिणिक उन्नतीसाठी चालविन्यात येते. या शाळेत साडेसातशे विद्यार्थी सध्या शिक्षण घेत आहेत,”अशी माहिती गवळी यांनी दिली.

रीमा स्मृती-सोहळा

0

२१ जून नाटक, मालिका आणि चित्रपट या तीन ही माध्यमात आपल्या चतुरस्त्र अभिनयाने स्व:ताचे वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण करणारी ज्येष्ठ अभिनेत्री रीमा यांचा जन्मदिवस. त्यांचे कुटुंबीय-मित्रमंडळी दरवर्षी हा दिवस आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा करत असत. ही प्रतिभावान कलावती १८ मे रोजी अत्यंत आकस्मिकपणे काळाच्या पडद्याआड गेली. या पार्श्वभूमीवर बुधवार २१ जून रोजी त्यांच्या आठवणींना उजाळा देणारा एक विशेष स्मृती सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

रीमाजींच्या सुमारे ४० वर्षाच्या कारकिर्दीतील अनेक महत्वाचे साथीदार, साक्षीदार, कुटुंबीय, लेखक, दिग्दर्शक, सहकलाकार,मित्र-मैत्रिणी या स्मृती सोहळ्याच्या निमित्ताने रीमाजींच्या आपल्या सहवासाच्या, सहप्रवासाच्या आठवणी जागवणार आहेत. मराठी आणि हिंदी नाट्यचित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर कलावंत या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहणार आहेत. रीमाजींवर मनापासून प्रेम व्यक्त करणाऱ्या रसिक प्रेक्षकांसाठी हा कार्यक्रम खुला आहे.

स्थळ- वीर सावरकर प्रतिष्ठान सभागृह – शिवाजीपार्क – दादर

दिनांक – बुधवार २१ जून

वेळ – सायंकाळी ७.३०वा.

कार्यक्रमास प्रवेशमूल्य नाही.

योगासनांची मालिका शिल्प स्वरूपात

0
 
 
पुणे – सूर्यनमस्कार, वक‘ासन, उत्कटासन, वीरभद्रासन, अधोमुखासन, दंडासन, पर्वतासन, पश्‍चिमोत्तासन, शिर्षासन, सर्वांगासन, हलासन, नावासन, धनुरासन, पद्मासन आदी योगासनांची ब‘ांझमधील शिल्पांची मालिका भोसलेनगरमधील इंडियाआर्ट गॅलरीत प्रदर्शित करण्यात येणार आहे. मिलिंद साठे यांच्या संकल्पनेतून शिल्पकार भूषण पाठारे यांनी ही शिल्प साकारली आहेत. जागतिक योगदिनानिमित्त १७ ते २३ जून या कालावधीत सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे. 

१८ दिवसांच्या वारीत १८ दोष दूर करा – वारकर्‍यांना ह.भ.प. आसाराम महाराज बडे यांचे आवाहन

0

– पालखी सोहळ्यानिमित्त लोकशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन

पुणे  : “ भक्तीच्या उत्कटतेचे प्रतीक म्हणजे शुद्ध हेतूने वारीत सहभागी होणे. त्यामुळे १८ दिवसाच्या वारीत प्रत्येक वारकर्‍याने रोज एक या प्रमाणे स्वतमधील १८ दोषांना दूर करण्याचा संकल्प करावा,”असे आवाहन आळंदी देवाची येथील ह.भ.प.श्री आसाराम महाराज बडे यांनी केले.”
विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे व श्री क्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दि. १५ जून २०१७ ते शनिवार, दि. १७ जून २०१७ या दरम्यान श्री संत ज्ञानेश्‍वर-तुकाराम ज्ञानतीर्थ, विश्‍वरूप दर्शन मंच, श्री क्षेत्र आळंदी येथे पालखी सोहळ्यानिमित्त युनेस्को अध्यासना अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या लोकशिक्षणपर कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.एस.एन.पठाण, मुंबई येथील वारकरी प्रबोधन महासमितीचे अध्यक्ष ह.भ.प.श्री रामेश्‍वर महाराज शास्त्री, सौ. उषा विश्‍वनाथ कराड, श्री. बाळासाहेब रावडे, डॉ. सुदाम महाराज पानेगांवकर, पं.उद्धवबापू आपेगांवकर, श्री.गणपतराव कुर्‍हाडे पाटील, डॉ.जायभाये व इतर मान्यवर उपस्थित होते.
ह.भ.प.श्री आसाराम महाराज बडे म्हणाले,“ वारी म्हणजे प्रहार-वार आहे. त्यामुळे सदगुणांच्या विचारांनी दोषांवर वार करा. आपल्यातील जे चांगले गुण आहेत, त्यांचा योग्य वापर केल्याने दोष संपतील. भक्तीमध्ये प्रेम क्षणा क्षणाला वाढते. भक्तीत कामना, रजो व तमोगुण नसावे. या संसारात जी गोष्ट आपली नाही, ती आपली मानणे हे चुकीचे आहे. तो गुन्हा आहे. या संसारात दोष पुढे चालतो तर गुणांना दाबले जाते. हरी भक्तीमध्ये दोषांवर संख्यात्मक विचार नाही तर गुणात्मक विचार करावा. मनुष्याने व्यसन आणि विकृतीला सोडावे. ज्ञानेश्‍वरी ग्रंथ हा माऊलीचे हदय आहे. त्यामुळे ज्ञानेश्‍वरीतील शिकवण आचरणात आणावी.”
प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड म्हणाले,“आषाढी वारीचा सोहळा हा लोकशिक्षणाचा सोहळा आहे. माऊलीचा ७०० वा संजीवन समाधी सोहळा १९९६ मध्ये झाला. त्यावेळीच विश्‍वशांती विद्यापीठाची कल्पना मनात रूजली गेली आणि ती आज साकार झाली. आता भविष्यात आळंदी- देहू हे विश्‍वशांतीचे केंद्र बनेल. कालानुरूप वारकरी संप्रदायाचे कार्य हे जगभर पसरेल. इंद्रायणी नदीवर घाट निर्मिती आणि विश्‍वशांती कार्याच्या कामाची दिशा त्यागमूर्ती प्रयागअक्कांनी दिल्याचे त्यांनी सांगितले.”
डॉ. एस.एन.पठाण म्हणाले,“या तीर्थक्षेत्राला ज्ञानतीर्थक्षेत्राची ओळख करून देण्याचे अमूल्य योगदान डॉ. विश्‍वनाथ कराड यांचे आहे. सर्व जातीधर्माचे लोक वारीमध्ये सहभागी होतात, ही एक मोठी गोष्ट आहे. या ठिकाणी जातीभेद केला जात नाही. आपण सर्व एकाच ईश्‍वराची लेकरे आहोत. त्यामुळे वारी म्हणजे एक मोठी चळवळच आहे. प्रार्थना, ध्यान,धारणा आणि योग यांच्या माध्यामातूनच सुख, शांती व समाधान मिळू शकते. ”

यानंतर ह.भ.प. श्री. रामेश्‍वर महाराज शास्त्री यांचे कीर्तन झाले. पं.जितेंद्र अभिषेकी यांचे ज्येष्ठ शिष्य पं.रमेश रावेतकर, ओंकार गु्रप प्रस्तुत भक्तीरंग हा भक्तीसंगीताचा सुरेल कार्यक्रम झाला. या सर्व कार्यक्रमाचा लाभ इंद्रायणी नदीच्या दोंन्ही तीरावरील हजारो वारकर्‍यांनी घेतला.

 

ताराचंद हॉस्पिटल गरीबांचा आधारवड : पालकमंत्री गिरीश बापट

0

पुणे ता.१६  : रुग्णांसाठी अल्प दरात सेवा उपलब्ध करून देणारे ताराचंद हॉस्पिटल हे गरीबांचा आधारवड असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले. शेठ ताराचंद रामचंद्र धर्मार्थ रुग्णालयामधील श्री रसिकलाल धारिवाल बाह्यरुग्ण विभाग व लोकनेते यशवंतराव चव्हाण सुविधा केंद्राचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते.

यावेळी महापौर मुक्ता टिळक, प्रसिद्ध उद्योजक रसिकलाल धारिवाल, रुग्णालयाचे अध्यक्ष दत्ताजीराव गायकवाड,विश्वस्त डॉ.सुहास परचुरे,अधीक्षक डॉ. सदानंद देशपांडे आदि मान्यवर उपस्थित होते.

ते म्हणाले, पुण्यात अनेक चांगली रुग्णालये आहेत पण अल्पदरात रुग्णांना सेवा पुरवणारे रुग्णालय म्हटले तर ताराचंद रुग्णालयाचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. या रुग्णालयाला गेल्या ९० वर्षांची परंपरा आहे. व्यापारीकरणाच्या या काळात गरीब रुग्णांना हे रुग्णालय ५० टक्के सवलतीच्या दरात सेवा उपलब्ध करून देते, हे अतिशय कौतुकास्पद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगती करत आहे. केंद्र आणि राज्य सरकार गरीबांसाठी अनेक चांगल्या योजना राबवत आहेत. याच धोरणाचा भाग म्हणून आम्ही हृदय विकारांसाठी लागणाऱ्या स्टेंट अत्यल्प दरात उपलब्ध करून दिल्या आहेत. केंद्र आणि राज्य सरकार हे सर्वसामन्यांचे सरकार आहे. त्यामुळे भविष्यकाळात सरकार, समाज आणि संस्थांच्या माध्यमातून या रुग्णालयाला सर्वोतोपरी मदत देण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

गरीब रुग्णांसाठी कार्यरत असणाऱ्या या रुग्णालयाला सहकार्य करताना आम्हाला गरिबांसाठी सेवा करण्याची संधी मिळत असल्याचे सांगत भविष्यात या रूग्णालयाला लागेल ते सहकार्य महानगरपालिकेकडून देण्याचे आश्वासन देखील महापौर मुक्ता टिळक यांनी यावेळी दिले. प्रास्ताविक रुग्णालयाचे अध्यक्ष दत्ताजीराव गायकवाड यांनी तर आभार डॉ. राजेंद्र हुपरीकर यांनी मानले.