Home Blog Page 3318

बीआरटी हक्का साठी ठेवलेल्या दुभाजकावर खाजगी ट्रक ची चढाई …..

0

पुणे-खाजगी वाहनांची वर्षानुवर्षे गळचेपी करीत भर गर्दीत स्वतः मात्र निवांत मोकळ्या पहुडलेल्या बाप बीआरटी मार्गावर एका ट्रक ने पहा अशी चढाई केली ….

सोलापूर महामार्गावर भैरोबानाला येथे गणेश मंदिराजवळ शुक्रवारी सकाळी  बी आर टी साठी केलेल्या  दुभाजकावर मालट्रक चढला . या दुभाजकांवर लाल चमकणारी पट्टी नाहीच त्यामुळे हा मालट्रक  अपघाताने बी आर टी  दुभाजकावर चढला . हा मालट्रक सुमारे या दुभाजकावरून बरेच अंतर घासत गेला . या मार्गावरील दुभाजकावर वाहनाचे अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे .खरे तर हा उखडून सर्व  वाहनांना समान न्याय तत्वाने रस्ता खुला केला पाहिजे .पण इथल्या दुभाजकांना लाल चमकणारे पट्टे,दिवे लावून तरी वाहनांना समजेल अशी व्यवस्था करायला हवी पण … खाजगी वाहनांची काळजी घेणारे पुण्यात जन्माला यायचेत …. तो पर्यंत असेच चालणार ..हा  मालट्रक दुपारी एकच्या सुमारास या महामार्गावरील सर्व वाहतूक थांबवून क्रेनच्या साहाय्याने हटविण्यात आला . यावेळी मोठ्या संख्येने वाहतूक पोलिसानी हा मालट्रक बाजूला करण्यासाठी परिश्रम घेतले . यावेळी सर्व वाहतूक थांबवल्याने या भागात वाहतूक कोंडीचा सामना अनेक वाहन चालकांना करावा लागला . दुपारनंतर वाहतूक सुरळीत झाली .

पुणे परिमंडलातील 26 लाख वीजग्राहकांना व्याजापोटी 50 कोटींचा परतावा

0

पुणे : महावितरणकडे सुरक्षा ठेव म्हणून जमा असलेल्या रकमेवरील व्याजापोटी पुणे परिमंडलातील 25 लाख 90 हजार लघुदाब वीजग्राहकांना नियमानुसार 49 कोटी 69 लाख रुपयांचा परतावा देण्यात येत आहे. गेल्या एप्रीलपासून ते जून महिन्यातील वीजदेयकांत ही रक्कम समायोजीत करण्यात येत आहे.

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व वर्गवारीतील वीजग्राहकांनी महावितरणकडे सुरक्षा ठेव जमा करणे बंधनकारक आहे. या ठेवीवर कालावधीनुसार बँकेच्या बेस रेटनुसार व्याज देण्यात येते. त्यानुसार पुणे परिमंडलातील पुणे व पिंपरी चिंचवड शहर तसेच मंचर, राजगुरुनगर व मुळशी विभागातील लघुदाब वर्गवारीमधील घरगुती 21 लाख 65 हजार वीजग्राहकांना 31 कोटी 93 हजार रुपये, वाणिज्यिक 2 लाख 61 हजार ग्राहकांना 9 कोटी 5 लाख रुपये, औद्योगिक 37,461 ग्राहकांना 5 कोटी 12 लाख रुपये, कृषीपंपधारक 1 लाख 9 हजार ग्राहकांना 2 कोटी 41 लाख रुपये तसेच इतर 18 हजार ग्राहकांना 1 कोटी 18 लाख रुपयांचा परतावा देण्यात येत आहे.

यंदा पुणे परिमंडलात एकूण 5 लाख 14 हजार वीजग्राहकांना 72 कोटी रुपयांची अतिरिक्त सुरक्षा ठेव भरण्यासाठी एप्रिल/ मे महिन्याच्या देयकांसोबत अतिरिक्त सुरक्षा ठेव भरण्यासाठी स्वतंत्र देयक देण्यात आलेले आहे. त्यातील 1 लाख 9 हजार वीजग्राहकांनी 7 कोटी 70 लाख रुपयांचा भरणा केलेला आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या निर्देशानुसार आर्थिक वर्षातील एका महिन्याच्या सरासरी एवढे देयक सुरक्षा ठेव म्हणून जमा करावे लागते. वीजग्राहकांनी मूळ सुरक्षा ठेव याआधी जमा केली असली तरी वीजदर, वीजवापर आणि पर्यायाने देयकांची रक्कम वाढलेली आहे. त्यामुळे मूळ सुरक्षा ठेव आणि गेल्या आर्थिक वर्षातील एका महिन्याचे सरासरी वीजदेयक यातील फरकाच्या रकमेचे देयक अतिरिक्त सुरक्षा ठेव म्हणून ग्राहकांना देण्यात येते. अद्यापही ज्या ग्राहकांनी अतिरिक्त सुरक्षा ठेव भरलेली नाही त्यांनी सुरक्षा ठेव भरावी, असे आवाहन महावितरणने केले आहे. पुणे परिमंडलातील लघुदाब वीजग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवीच्या रकमेची माहिती तसेच ऑनलाईन पेमेंटची सोय महावितरणच्या अधिकृत www.mahadiscom.in या संकेतस्थळावर तसेच महावितरणच्या मोबाईल अ‍ॅपवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

पुण्याच्या विकासात इस्राईलची सहकार्याची तयारी ; इस्राईलचे प्रतिनिधी मंडळासोबत पालकमंत्र्यांची चर्चा

0

पुणे : सर्वच क्षेत्रात अग्रेसर असणारे पुणे स्मार्ट नसून ते स्मार्टेस्ट शहर आहे. पुण्याने केलेल्या प्रगतीमुळे  या शहराची भारतात एक वेगळी ओळख निर्माण होत आहे. इस्राईली  तंत्रज्ञानामुळे या शहराचा आणखी वेगाने विकास होण्यास मदत होईल. यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी इस्राईलचे राजदूत डॅनिएल कारमॉन यांनी दर्शवली. पुणे भेटीवर आलेल्या इस्राईलच्या शिष्टमंडळाने आज शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री गिरीश बापट यांची भेट घेतली. या  शिष्टमंडळात डॅनिएल कारमॉन यांच्यासह  इस्राईलचे वाणिज्य राजदूत (कॉंन्सुलेट जनरल) डेव्हिड अकोव इस्त्राईलच्या दिल्ली दुतावासातील राजकीय सल्लागार अदवा विलचिंस्की यांचा सहभाग होता.

या भेटी दरम्यान पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासह महापौर मुक्ता टिळक,सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी पुण्याच्या सर्वांगीण विकासाबद्दल या प्रतिनिधी मंडळासोबत विस्तृत चर्चा केली.

श्री. बापट यांनी या प्रतिनिधी मंडळाचे स्वागत करून त्यांना पुण्याच्या सुरु असलेल्या विविध विकास कामांबद्दल माहिती दिली. पीएमआरडीए मार्फत पुण्याचा विकास करण्यात येणार आहे.यामध्ये इस्राईलचे तंत्रज्ञान वापरता आले तर अधिक चांगल्या पद्धतीने हा विकास साधता येईल.  पुण्याला  २४ तास पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. यासाठी वाढत्या लोकसंख्येचा विचार करता  भविष्यात पाण्याची साठवण करताना अडचणी येणार असून यासाठी प्रगत तंत्रज्ञान वापरावे लागेल.  तसेच शेती विषयक तंत्रज्ञान, तसेच घनकचरा व्यवस्थापन  या विषयात इस्राईल तंत्रज्ञानाची सहाय्य  होईल. तसेच पुणे शैक्षणिक आणि औद्योगिक केंद्र म्हणून ओळखले जात असल्याने या क्षेत्रातही इस्त्राईलच्या ज्ञानाची मदत होईल असे मत व्यक्त केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारताचा झपाट्याने विकास होत आहे. भारतातील प्रमुख शहरात पुण्याचा उल्लेख केला जातो. फक्त शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातच नव्हे तर सर्वच क्षेत्रात पुण्याने केलेली प्रगती कौतुकास्पद आहे.पुणे शिक्षणाचे माहेर घर असल्याने शेती, अभियांत्रिकी तसेच औद्यागिक क्षेत्रात नवनवीन संशोधन होत आहेत. या संशोधनात इस्त्राईलचे प्रगत तंत्रज्ञान वापरल्यास निश्चितच चांगले परिणाम दिसतील. असे मत डॅनिएल कारमॉंन यांनी व्यक्त केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील महिन्यात इस्राईल दौऱ्यावर जाणार आहेत यावेळी पाण्याविषयी जनजागृती करण्याचा महत्वपूर्ण करार दोन्ही देशांदरम्यान  करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.  त्याचबरोबर  स्टार्ट अप कंपन्यांना मार्गदर्शन तसेच त्यांच्या कौशल्य विकास करण्यासाठी मदत करण्याची ग्वाही देवून त्यांनी श्री. बापट यांना इस्राईल भेटीचे निमंत्रणही दिले.

डेव्हिड अकोव यांनी पाणी टंचाई वर मात करण्यासाठी आमचा पाण्याच्या पुनर्वापरावर जादा भर असल्याचे  सांगितले. त्यामुळे औद्यागिक सांडपाण्याच्या पुनर्वापराबाबत पुण्यात प्रकल्प उभा करण्याची इच्छा व्यक्त केली.

‘लागिरं झालं जी’मध्ये साजरी होणार रमजान ईद

0

 

 

आजवर झी मराठीने प्रत्येक सणाचा आनंद आपल्या प्रेक्षकांसोबत साजरा केलाय. दसरा असो की दिवाळी… गणपती असो की गुढीपाडवा सर्वच सणांचं सेलिब्रेशन इथे आनंदात होताना बघायला मिळतं. आता झी मराठीच्या मालिकेत रमजान ईदचा उत्सव आणि उत्साह बघायला मिळणार आहे ‘लागिरं झालं जी’ या मालिकेत. सातारा जिल्हा आणि भारतीय सैन्याचं असलेलं नातं, तेथील तरुणांची स्वप्न आणि ती पूर्ण करण्यासाठीची त्यांची धडपड याची गोष्ट सांगणारी ‘लागिरं झालं जी’ ही मालिका झी मराठीवर नुकतीच सुरु झाली आहे. कमी वेळातच या मालिकेला प्रेक्षकांची पसंतीची पावती मिळाली आहे. विशेषतः मुख्य भूमिकेत असलेले अजिंक्य आणि शीतल हे कमालीचे लोकप्रिय झाले आहेत आणि राहूल, विकी, यास्मिन, हर्षवर्धन हे सहकलाकारही तेवढीच लोकप्रियता मिळवत आहेत. ग्रामिण पार्श्वभूमी, तिकडे घडणा-या गमती जमती, अज्या- शीतलीने खोड्या काढत एकमेकांवर कुरघोडी करणे या गोष्टी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. याच मालिकेत आता प्रेक्षकांना ईद साजरी होताना बघायला मिळणार आहे. शीतलची मैत्रीण असलेली यास्मिनच्या घरी सर्व जण रमजान ईदनिमित्ताने एकत्र येणार असून ईद मुबारक म्हणत शिरखुर्माचा आस्वादही घेणार आहेत. येत्या २६ जूनला रमजान ईदच्या दिवशी ‘लागीरं झालं जी’ चा  हा विशेष भाग सायंकाळी ७ वा.  प्रेक्षकांना झी मराठीवर बघायला मिळणार आहे.

सध्या सर्वत्र रमजानचा माहौल आहे. मुस्लिम बांधवांसाठी रमजानचा सण सर्वात पवित्र असा सण असतो. रोजाच्या माध्यमातून करण्यात येणारी खुदाची इबादत आणि रमजानचा चॉंद बघण्याची उत्सुकता या काळात बघायला मिळते. असंच काहीसं वातावरण लागिर झालं जी या मालिकेतसुद्धा बघायला मिळणार आहे. शीतलीची मैत्रीण असलेली यास्मिन आणि तिच्या कुटुंबियांसोबत सर्व जण ईद साजरी करणार आहेत. तिथे नेमकं काय घडणार आणि ईदचा आनंद हे सर्वजण कसे लुटणार हे येत्या २६ जूनच्या भागात बघायला मिळणार आहे.

कोण होईल महाराष्ट्राचा पहिला “संगीत सम्राट “?

0

संगीत अर्थात सूर, लय आणि ताल यांचा सुरेख संगम. संगीताची ही किमया महाराष्ट्राच्या संस्कृतीचा गाभा आहे. महाराष्ट्राला संगीत परंपरेचा मोठा वारसा लाभला आहे. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात संगीत व्यापून राहिले आहे. किंबहुना माणसाच्या आयुष्यातील प्रत्येक भावना तो संगीताच्या सोबतीने अनुभवतो…जगतो. अश्या संगीतावर भरभरून प्रेम करणाऱ्या  मराठी प्रेक्षकांसाठी झी युवा ही वाहिनी “संगीत सम्राट हा एक अनोखा  संगीतमय कार्यक्रम  घेऊन आली आहे . महाराष्ट्राच्या मातीत रुजलेले अनेक गायक , वादक आणि ज्यांच्या श्वासात संगीत आहे असे अनेक कलावंत संगीत सम्राटाच्या व्यासपीठाद्वारे  मराठी रसिकांसमोर त्यांची कला सादर करणार आहेत . महाराष्ट्राचा आघाडीचा गायक आदर्श शिंदे सूर ताल आणि लय या मुद्द्यांद्वारे कलाकारांचे  परीक्षण करणार  आहेत  तर मराठी चित्रपट सृष्टीतील  आघाडीची नायिका क्रांती रेडकर वानखडे कलाकारांच्या परफॉर्मन्स किती मनोरंजनात्मक आहेत याचे  परीक्षण करणार आहेत . त्याच प्रमाणे  तरुणाईचा लाडका गायक रोहित राऊत आणि अभिनेत्री उर्मिला निंबाळकर यांनी निवेदनाची भूमिका सांभाळली आहे . प्रेक्षकांना हा कार्यक्रम २६ जून पासून सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता झी युवावर पाहण्याची पर्वणी मिळणार आहे

कलाकाराच्या कलेचे चीज करणारी पारख नजर असेल तर समाजातील कोणताही कलाकार रसिकांसमोर येऊ शकतो या विश्वासातून झी युवाने “संगीत सम्राट” या संगीतावर आधारीत वेगळ्या संकल्पनेला आकार दिला आहे.  झी युवा आणि झी टॉकीज चे व्यवसाय प्रमुख ‘बवेश जानवलेकर’ यांनी “संगीत सम्राट” या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगितले की, “मराठी प्रेक्षकांची संगीत क्षेत्रातील आवड लक्षात घेऊन फार कमी कार्यक्रम आजवर छोट्या पडद्यावर आले आहेत . छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना तो आनंद आजवरअनुभवायला मिळाला नाही. सर्वसामान्यांमध्ये दडलेला आणि संगीताशी नाळ जोडलेला कलाकार समाजासमोर यावा, त्याचप्रमाणे कलाकारांसोबत चांगला श्रोता घडावा या हेतूने,  झी युवाने गेल्या महिन्याभरापासून महाराष्ट्राचा कानाकोपरा पिंजून काढला. त्यात झी युवा ने आणलेल्या या संधीच सोनं करत संगीत कलाकारांनी महाराष्ट्रातील ६ शहरांमध्ये घडलेल्या निवडचाचणी मध्ये हजारोंच्या संख्येने उपस्थिती लावली . कुणी ढोल वाजवून तालाशी समरस झालेला तर कुणी गाण्यातील प्रयोगशील सुरांमध्ये रमलेला, कुणी पारंपरिक वाद्यातून नवे झंकार देणारा तर कुणी हाताला येईल ते काहीही वाजवून कान तृप्त करणारे कलाकार मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद आणि नाशिक  या शहरांमधून कलाकार शोधून काढले .  ज्यांच्या श्वासात संगीत आहे अश्या कलाकारांसाठी  झी युवा एक नवीन व्यासपीठ घेऊन आले आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राला खणखणावून एकच प्रश्न विचारत आहे की  “कोण होईल महाराष्ट्राचा पहिला  “संगीत सम्राट “?”

“संगीत सम्राट “या मालिकेच्या निमित्ताने मराठी प्रेक्षकांना अश्या अनेक कलाकारांना भेटायला मिळणार आहे ज्यांच्या संगीतमय आयुष्याचा  प्रवास प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरू शकेल . यात असे कलावंत आहेत जे अगदी हलाखीच्या परिस्थितीतही आपली संगीत साधना जोपासली आहे. तर काही स्पर्धकांच्या जवळच्या लोकांनी कलेच्या यशासाठी केलेले त्याग थक्क करणारे आहेत. आपल्याला सर्वज्ञात नसलेली नानाविध वाद्य या कार्यक्रमाच्या निमित्ताने ओळखीची होतील.  आधुनिक आणि पारंपरिक संगीताचा अनोखा  मेळ या कार्यक्रमामुळे रसिक प्रेक्षकांना पाहण्याची पर्वणी झी युवाच्या “संगीत सम्राट” या कार्यक्रमामुळे  मिळणार आहे .

“जग्गा जासूस” का तीसरा गाना रिलीज हुआ!

0

रणबीर और कटरीना की बहुप्रतीक्षित फ़िल्म “जग्गा जासूस” का तीसरा गाना “जुमरीतलैया” रिलीज हो गया है। इस गाने में रणबीर और कटरीना एक बड़ा ही प्यारा सा रिश्ता साझा करते हुए नज़र आ रहे है।

अरजीत सिंह और मोहन कनन ने “जुमरीतलैया” के इस खूबसूरत गीत को अपनी आवाज़ दी है तो वही संगीत प्रीतम द्वारा दिया गया है। और अगर बोल की बात की जाए तो उसे नीलेश मिश्रा ने अपने शब्दों में उतारा है।

इससे पहले आये फ़िल्म दो गीतों को दर्शको ने अपना पूरा सहयोग दिया और गानों को खूब पसंद किया गया। वही अब तीसरे गाने को भी प्रसंशको का खूब प्यार मिल रहा है और रणबीर और कैट के इस गाने को भी खूब पसंद किया जा रहा है।

अब तो बस इंतेज़ार ही कर सकते है जग्गा की इस रोमांच से भरी दुनिया को एक नज़रभर देखने के लिए! और इंतेज़ार हो भी क्यों ना, क्योंकि जग्गा की ये दुनिया है ही इतनी निराली।

अनुराग बसु द्वारा निर्देशित, डिज़नी और पिक्चर शुरू प्रोडक्शन की जग्गा जासूस 14 जुलाई 2017 को नज़दीकी सिनेमाघरों में दस्तक देने के लिए तैयार है। फ़िल्म में रणबीर कपूर और कटरीना कैफ प्रमुख भूमिका में नज़र आएंगे।

‘भेटली तू पुन्हाचे पोस्टर प्रदर्शित!

0

असं म्हणतात सोबत चांगली असली की प्रवासपण चांगला होतो. लांबचा प्रवास, खिडकी जवळची जागा, खिडकीतून दिसणारा पाऊस आणि चांगली सोबत असणं म्हणजे एका परफेक्ट प्रवासाचं परफेक्ट वर्णन. या प्रवासादरम्यान अनेक कथा सुरु झाल्या, काही हुरहूर लावणाऱ्या तर काही आयुष्यभराची सोबत करणाऱ्या! ‘भेटली तू पुन्हा’ या चित्रपटाचे पोस्टर पाहिले की प्रत्येकालाच आपापल्या हुरहूर लावणाऱ्या, नॉस्टॅल्जिक करणाऱ्या आठवणी आठवतील.

स्वरूप रिक्रिएशन अँड मिडिया प्रा. लि. प्रस्तुत आणि चंद्रकांत कणसे दिग्दर्शित ‘भेटली तू पुन्हा’ या चित्रपटाच्या पोस्टरवरून ‘बबली गर्ल’ भासणाऱ्या पूजा सावंत आणि ‘टॉल अँड हँडसम’ वैभव तत्ववादी यांची नवीन खुमासदार जोडी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे हे कळते. पोस्टरमध्ये दाखवलेला रेल्वे प्लॅटफॉर्म, रोमँटिक पाऊस, इंद्रधनुष्याचा फील देणारा पूजाचा स्कर्ट आणि पूजा व वैभव यांच्या चेहऱ्यावरचे मिश्कील भाव यामुळे त्यांच्या या प्रवासाबद्दलची उत्सुकता वाढत आहे.

पहिल्या नजरेत होणारे प्रेम आता खूप टिपिकल झाले आहे, दुसऱ्या भेटीत फुलत जाणारे प्रेम अनुभवायचे असेल तर मग येत्या २८ जुलैला ‘भेटली तू पुन्हा’प्रदर्शित होत आहे .

राष्ट्रपतीपदासाठी काँग्रेसकडून मीराकुमार यांना उमेदवारी

0
नवी दिल्ली –राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्या विरोधात विरोधकांनी मीरा कुमार यांना उमेद्वारी जाहीर केली  आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या घरी गुरुवारी संध्याकाळी झालेल्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले  आहे.
  सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस 17 विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, शरद पवार, लालू प्रसाद यादव, गुलाम नबी आझाद, बसपचे सतिश मिश्रा, तृणमूलचे डेरेक ओ ब्रायन, समाजवादी पक्षातर्फे रामगोपाल यादव आणि नॅशनल काँफ्रेन्सचे उमर उब्दुल्ला यांच्यासह दक्षिण भारतातील अनेक दिग्गज विरोधकांचा सहभाग होता.

एनडीएकडे राष्ट्रपती निवडणूक जिंकण्यासाठी सध्या 5 लाख 32 हजार मतं आहेत. ओडिशातील सत्ताधारी पक्ष बीजेडीनेही रामनाथ कोविंद यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे. बीजेडीकडे 37 हजार 257 मतं आहेत. एनडीएला दक्षिणेकडील दोन प्रमुख पक्ष वायएसआर काँग्रेस आणि टीआरएसनेही पाठिंबा दिला आहे. तर नितीश कुमार यांची 20 हजार 779 मतंही एनडीएच्या खात्यात जमा झाले आहेत. म्हणजेच एनडीएकडे एकूण 6 लाख 29 हजार 658 मतं आहेत. तर निवडणूक जिंकण्यासाठी 5 लाख 49 हजार 422 मतांची गरज आहे. म्हणजेच एनडीएकडे बहुमतापेक्षाही जास्त मतं आहेत

 मीरा कुमार यांची माहिती …

मीरा कुमार 1973 मध्ये भारतीय विदेश सेवेत रुजू

माजी उपपंतप्रधान जगजीवन राम यांच्या कन्या.

1985 मध्ये राजकीय कारकीर्द सुरु, लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा खासदारपदी

1990 मध्ये काँग्रेसच्या कार्यकारणी समिती सदस्य होत्या

1996 आणि 1998 या दोन्ही लोकसभा निवडणुकीत विजयी

2004 च्या लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर सामाजिक न्याय मंत्री पदाची सुत्रे

2009 मध्ये लोकसभा अध्यक्षा. देशाच्या पहिल्या महिला लोकसभा अध्यक्षा.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. नितीश कुमार यांचा जेडीयू म्हणजे जनता दल युनायटेड पक्ष विरोधकांपैकी एक महत्वाचा पक्ष आहे. पण नितीश कुमार यांनी विरोधकांना पाठ दाखवल्याने विरोधकांमध्येच फूट पडल्याचं चित्र आहे.

काँग्रेसनं मीरा कुमार यांचं नाव घोषित केलं असलं तरी एनडीएकडे स्पष्ट बहुमत असल्यानं कोविंद यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

 

 

कृषी – यंत्रमाग ग्राहकांनावीजदरात सवलत 400 कोटी महावितरणला समायोजित करण्यास शासनाची मंजुरी

0

मुंबई-

कृषी आणि यंत्रमाग ग्राहकांना 2017-18 या आर्थिक वर्षात वीज दरात दिलेल्या सवलतीसाठी महावितरण कंपनीला देय असलेली 400 कोटी अनुदानाची रक्कम समायोजनाने वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.

कृषी व यंत्रमाग ग्राहकांना शासनाच्या धोरणानुसार सवलती देण्यासाठी महावितरणला 4500 कोटी रक्कम मंजूर करण्यात आली. यापैकी 400 कोटी समायोजनाने वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. समायोजनेद्वारे वितरित करावयाची रक्कम महावितरण कंपनीस रोख न देता विजेवरील कर व खर्चापोटी फेब्रुवारी 2017 पर्यंत समायोजन करण्यात आली असून मार्च 2017 ची 400 कोटी  शासनास येणे असलेली रक्कम वसूल करण्यात यावी.

सन 2016-17 मधील विद्युत शुल्कापोटी समायोजित करावयाची रक्कम 350 कोटी व  सन 2016- 17 मधील विजेच्या विक्रीकारावरील समायोजित करावयाची रक्कम 50 कोटी रुपये. या रकमेचे पुस्तकी समायोजन महालेखापाल मुंबई यांचे अखत्यारीत व अधिकारात करण्यात येत असल्याने 400 कोटी रकमेचे देयक तयार करु नये, असेही शासनाने आपल्या आदेशात म्हटले आहे.

भाजपने पुणेकरांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा समारंभपूर्वक ठेवला – कॉंग्रेस,राष्ट्रवादीचा आरोप

0

पुणे – महापालिकेतर्फे उभारण्यात येत असलेल्या कर्जरोख्यांचा प्रारंभ आज मुंबई शेअर बाजारात  समारंभ पूर्वक होत असताना ,पुणेकरांच्या डोक्यावर कर्ज करण्याचा सोहळा करता काय ? असा सवाल करीत कर्जाला विरोध करत कॉंग्रेस राष्ट्रवादीने आज मंडई तील टिळक पुतळ्यासमोर जोरदार आंदोलन केले. भाजपने  पुणेकरांना कर्जाच्या खाईत ढकलल्याचा आरोप यावेळी  कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून करण्यात आला .चेतन तुपे,अरविंद शिंदे ,अभय छाजेड  ,अविनाश बागवे,सुभाष जगताप ,रवींद्र माळवदकर,अजित दरेकर, काका धर्मावत ,सुजाता शेट्टी, वनराज आंदेकर, चंद्रशेखर कपोते ,रुपाली चाकणकर ,गोपाळ तिवारी आदी या आंदोलनात सहभागी झाले होते .

शहर विकासासाठी पुणे महापालिकेचा देशातील पहिला बॉण्ड गुंतवणुकीसाठी खुला

0

प्रधानमंत्र्यांच्या संकल्पनेतील ‘म्युनिसिपल बॉण्ड मार्केट’चा पाया पुणे महापालिकेने रचला – मुख्यमंत्री

 

                                  मुंबई, दि. 22 : ‘म्युनिसिपल बॉण्ड मार्केट’ ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची संकल्पना पुणे महापालिकेने प्रत्यक्षात आणली आहे. शहरांच्या पायाभुत सुविधांच्या विकासासाठी अशा प्रकारच्या बॉण्ड्‌सच्या माध्यमातुन निधी उभारला जाणार आहे. त्याचा पाया पुणे महापालिकेने रचला आहे. देशातील सर्वोत्तम शहर म्हणून पुण्याचा नावलौकीक राहील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला.

पुणे महापालिकेचा देशातील पहिला बॉण्ड गुंतवणुकीसाठी खुला करण्याचा शुभारंभ मुंबई शेअर बाजारमधील इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटरमध्ये झाला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू, पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट, केंद्रीय वित्त राज्यमंत्री अर्जूनराम मेघवाल, राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, सेबीचे अध्यक्ष अजय त्यागी, राज्याचे मुख्य सचिव सुमित मल्लिक, स्टेट बँकेच्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविण परदेशी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री व श्री. नायडू यांच्या हस्ते शेअर बाजाराच्या परंपरेप्रमाणे बेल वाजवून पुणे महापालिकेचा बॉण्ड गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, पुणे महापालिकेसह राज्यासाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. नागरी प्रशासनाच्या कामात परिवर्तन होताना दिसत आहे. विविध पायाभुत सुविधांच्या विकास प्रकल्पांना वित्तीय पुरवठा करण्यासाठी नवीन साधनांची गरज भासते. अशावेळेस प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आवाहन केले की, महापालिकेन स्वत:चा निधी उभारण्यासाठी शेअर बाजारात बॉण्ड आणावेत. या आवाहनाला सकात्मक प्रतिसाद देत 2264 कोटी रुपयांच्या बॉण्ड पुणे महापालिकेने गुंतवणुकीसाठी दाखल केले आहेत. पुणे ही देशातील पहिली महापालिका ठरली असून या बॉण्डच्या माध्यमातून जो निधी उभारला जाईल त्याद्वारे स्मार्ट पुणे शहर निर्माण होईल. पुणेकरांना 24 तास पिण्याचे शुद्ध पाणी, चांगले रस्ते, उत्तम घनकचरा व्यवस्थापन अशा सुविधा निर्माण होण्यास मदत होणार आहे.

दृष्टीकोन बदलून शहर विकासाचे प्रकल्प तयार करावेत आणि कार्यक्षम व पारदर्शक पद्धतीने नागरिकांना सेवा द्यावी. त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यास कार्यक्षमतेत अधिकच भर पडणार आहे. देशात म्युनिसिपल बॉण्ड मार्केट विकसित होत आहे. त्याचा पाया पुणे शहराने रचला याचा अभिमान वाटतो, असे गौरवोद्‌गार मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले. राज्यात शहरीकरण वेगाने होत आहे. अशावेळेस नागरिकांना अधिक चांगल्या सोयी देण्यासाठी नागरी प्रशासनात महाराष्ट्र देशामध्ये अग्रेसर राहील, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

येत्या दोन ते तीन वर्षात पुणे शहरामध्ये घनकचऱ्याचे विलगीकरणाचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. शहरातील सांडपाण्याचा प्रत्येक थेंबावर प्रक्रिया केली जाईल. मेट्रो आणि सार्वजनिक दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम करण्यात येत आहे. पुणेकरांना 24 तास पाणी पुरवठा केला जाईल. जलवाहिन्यांसोबत फायबर नेटवर्कचे जाळे निर्माण करण्यात येणार आहे. यामुळे पुणे देशातील सर्वोत्तम शहर म्हणून ओळखले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

देशातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी पुणे मॉडेलचा आदर्श घ्यावा

– केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू

केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू म्हणाले की, आज शेअर बाजारात घंटी वाजवून पुणे महापालिकेचा बॉण्ड गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला. या घंटीतून निघालेला नागरी सुधारणेचा प्रतिध्वनी देशभर घुमण्यास मदत होणार आहे. देशातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी पुणे मॉडेलचा आदर्श घ्यावा, असे आवाहन करुन श्री. नायडू म्हणाले की, शहरे ही विकासाचे इंजिन आहेत. त्यामुळे नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी महापालिकांनी महत्त्वपूर्ण प्रकल्प हाती घ्यावेत. केंद्र शासनातर्फे देशभरात शहर विकासाकरीता 4.13 लाख कोटी रुपयांचा निधी वितरीत केला जातो. विकास प्रकल्पांना वित्तीय सहाय मिळाल्यावर त्याची गती निश्चितच वाढेल. शहर विकासाचा आराखडा तयार करताना स्थानिक नागरिकांनी त्यात सहभाग दिला पाहिजे. त्याचबरोबर शहरांनी आणि त्याचे व्यवस्थापन पाहणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी स्वत:चा निधी उभारणे आवश्यक आहे. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून शहरांच्या सुधारणांवर भर देण्यात येत आहे. जी शहरे अधिक चांगल्या पद्धतीने विकासाची कामे करतील त्यांना प्रोत्साहन म्हणून 20 टक्के निधी देण्यात येईल.

केंद्रीय वित्त राज्यमंत्री श्री. मेघवाल म्हणाले की, 2017 हे वित्तीय सुधारणांचे वर्ष म्हणून ओळखले जाणार आहे. देशातील व्यवहार डिजीटल फ्लॅटफॉर्मवर आले आहे. देशामध्ये 91 लाख नवीन करदात्यांची यामुळे भर पडली आहे.

श्री. बापट म्हणाले की, नगरविकासाच्या क्षेत्रात पुणे महापालिकेने नवीन विक्रम केला आहे. बॉण्डच्या माध्यमातून निधी उभारण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. पुणे देशातील पहिल्या क्रमाकांचे शहर बनविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी श्रीमती भट्टाचार्य, ‘सेबी’चे अध्यक्ष श्री. त्यागी, मुंबई शेअर बाजारचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष चौहान, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांची भाषणे झाली. पुणे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी प्रास्ताविक केले.

या बॉण्डच्या माध्यमातून 2264 कोटी रुपये पुणे महापालिका उभारणार असून या द्वारे उभारलेल्या निधीतून 24×7 पिण्याचा पाणी पुरवठ्याचा प्रकल्प सुरु करण्यात येणार आहे. पुढील 30 वर्ष पुणेकरांना शुद्ध, स्वच्छ पाणी यामाध्यमातून उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर रस्ते, सांडपाणी प्रकल्प, जलवाहिन्या आदी कामे केली जाणार आहे.

या सोहळ्यास पुणे शहरातील स्थानिक लोकप्रतिनीधी, वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पवारांच्या ‘ब्राम्हण’ विरोधी राजकारणाचा चेहरा उघड ?

0

पुणे– तथाकथित ब्राम्हण लेखक, शाहीर यांच्या विरोधात लिखाण करणारे आणि एकूणच आपल्या अनेक पुस्तकातील लेखनाने, वक्तव्याने वादग्रस्त असा चेहरा लाभलेले  इतिहासकार श्रीमंत कोकाटे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन काल राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या हस्ते झाले .. यावेळी पवार यांनी केलेले भाषण राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात लक्षवेधी  असे ठरत  आहे . या निमित्ताने अनेक प्रश्न हि पवार यांच्या राजकारणावर उपस्थित होत आहेत . पण या भाषणाने ने आता पवारांचा ब्राम्हण विरोधी राजकारणाचा खरा चेहरा उघड झाल्याचे मानले जात आहे काय ?  एक छोटेशे व्हिडीओ विश्लेषण..बोलके आणि अबोलके ..असे ..

 

आदेश्वर दादा जैन टेम्पल ट्रस्टचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

0

पुणे-वानवडी गावामधील आदेश्वर दादा जैन टेम्पल ट्रस्टचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला . या वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . यामध्ये मंदिरात सकाळी अठरा अभिषेक , देवाचे नवीन पाच ध्वज मंदिराच्या कळसावर चढवून ध्वजारोहण करण्यात आले . त्यानंतर जांभुळकर गार्डनमध्ये स्वामी वात्सल्य म्हणजेच महाप्रसादाचा कार्यक्रम झाला .

यावेळी रशमीन शहा यांनी सांगितले कि , आदेश्वर भगवानजी स्थापना खूप वर्षांपासूनची आहे . या देवळातील देवाची मूर्ती जैन समाजातील संप्रती महाराज यांच्याहस्ते करण्यात आली आहे . त्यांनी अनेक ठिकाणी देवळांची उभारणी केली आहे . मंदिराच्या ठिकाणी पूर्वी वाण्यांची दुकाने मोठ्या प्रमाणात होती  . या भागाला वाण्यांची बोळ म्हणत . त्यामुळे या वाण्यांच्या बोळपासून या भागाला वानवडी असे म्हणू लागले . या मंदिराचे देखरेख गोडीजी पार्श्वनाथ टेम्पल ट्रस्टच्या माध्यमातून होते .

या कार्यक्रमांमध्ये अनिल गांधी , रमेश मणिलाल शहा , रशमीन शहा , जयेश शहा , हेमंत शहा , पंकज शहा , भूपेंद्र शहा व शशिकांत मणियार आदी मान्यवर आणि जैन श्वेतांबर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .

म. गांधी आणि आंबेडकर यांच्यात दरी निर्माण करण्याचा प्रयत्न अयोग्य -भाई वैद्य

0

पुणे- महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याबद्दल खंत व्यक्त करून शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे जागतिकीकरणाचे परिणाम असल्याचे मत ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांनी येथे व्यक्त केले.माझे वडील आणि एस. एम. जोशी या दोन ‘अण्णां’मुळे मी घडलो, अशी भावना देखील यावेळी वैद्य यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा आणि संवाद पुणेतर्फे राष्ट्रवादीचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते ९० व्या वर्षांतील पदार्पणानिमित्त भाई वैद्य यांचा कृतज्ञता सन्मान करण्यात आला. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, डॉ. पी. डी. पाटील, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, माजी महापौर अंकुश काकडे, सभेचे अध्यक्ष उद्धव कानडे, सचिन इटकर आणि सुनील महाजन या वेळी उपस्थित होते.

यावेळी शरद पवार म्हणाले ,जनसंघ आणि समाजवादी यांना बरोबर घेऊन स्थापन केलेल्या पुरोगामी लोकशाही दल सरकारमध्ये भाई वैद्य गृहराज्यमंत्री होते. आमचे मंत्रिमंडळ मोठे गमतीचे असले तरी अडीच वर्षांत अनेक महत्त्वाचे निर्णय त्या काळात झाले. गृह खात्याबरोबरच सामान्यांच्या हिताचे धोरणात्मक निर्णय घेतले जातात की नाही याकडे भाईंचा कटाक्ष असायचा. अनेक वर्षे मंत्री राहण्यापेक्षा अल्पकाळच्या मंत्रिपदामध्ये भाईंनी आपल्या कर्तृत्वाचा आणि दृष्टीचा ठसा उमटविला,

ते पुढे म्हणाले ,न आक्रमणाच्या काळात जनतेमध्ये जागृती घडविण्याबरोबरच सामाजिक ऐक्यासाठी महाविद्यालयीन युवकांच्या समितीचे भाई अध्यक्ष होते आणि मी सचिव. माझे सामाजिक कामाचे पहिले पाऊल भाईंच्या नेतृत्वाखालीच पडले, अशी आठवण सांगून पवार म्हणाले, समाजवादी असल्याने त्यांच्या बैठका काकाकुवा मॅन्शनमध्ये चालायच्या, तर आमच्या काँग्रेस भवनमध्ये. एस. एम. जोशी यांचा प्रभाव असलेले भाई तत्त्वाने चालणारे, तर लोकांचे काम करण्यासाठी खुर्चीकडे आमचे लक्ष असायचे. पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभार कसा करायचा हे भाईंच्या महापौरपदाच्या काळात पुणेकरांनी अनुभवले. राज्याच्या सत्तेमध्ये बदल झाला तेव्हा उत्तमराव पाटील, निहाल अहमद, हशू आडवाणी असे सहकारी होते. आपण कधी मंत्री होऊ हे त्यांना स्वप्नातही वाटले नसते. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू झाल्यानंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे संप होत असत. आम्ही केंद्राप्रमाणेच वेतन आयोग लागू केल्यामुळे १९७८ पासून राज्यातील कर्मचाऱ्यांचा कधी संप झालेला नाही.

एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, मधू दंडवते यांच्याबरोबर भाईंनी दीर्घकाळ काम केले. चंद्रशेखर यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेचे नियोजन भाईंनी केले होते. जगामध्ये समाजवादी विचारांचे पतन झाले असले तरी भाईंची विचारांची निष्ठा ढळली नाही. स्वच्छ, उत्तम चारित्र्य, विविध समाज घटकांविषयी आस्था आणि व्यापक समाजहिताचा निर्णय करणारा नेता म्हणजे भाई वैद्य. उपेक्षितांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी भाईंचे प्रयत्न अविरत सुरू राहतील, अशी भावना पवार यांनी व्यक्त केली.

 

महापौर टिळक यांचा निषेध करीत सेना कॉंग्रेसचा सभात्याग (व्हिडीओ)

0

 

पुणे- भिडे गुरुजी प्रकरण  वारीत घडल्यानंतर आता जणू त्याचे राजकीय पडसाद हि उमटू लागले आहेत . वारकऱ्यांनी या कार्यकर्त्यांना वारीत आपले बस्तान बांधू  न दिल्याने भाजपची काही मंडळी संतापली आणि त्यांनी राजकारण करीत पालिकेच्या सोयीसुविधांवर त्याचा राग काढला असा सूर आवळत भाजपविरोधी पक्षांनी उचल खाण्याचा प्रयत्न आज केला तर भाजपच्या वतीने मात्र हे विरोधकांचे राजकारण अयोग्य असल्याचा दावा करीत अशा राजकीय खेळ्या असभ्य असल्याचा दावा हि करण्यात आला आहे .

नेमके काय घडले पाहू या …

 शहरात संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराज या दोन्ही पालखींचे पुणेकर नागरिकांनी उत्साहात स्वागत केले. मात्र शहरातील पालखी मुक्कामी महापालिका प्रशासनाच्यावतीने मंडप आणि पाण्याची व्यवस्था केली नाही. या मुद्यावरुन पुणे महापालिकेच्या मुख्य सभेत निषेधकरत  शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांनी महापौर मुक्ता टिळक या प्रशासनास पाठीशी घालत आहेत, असा आरोप करत  सभा त्याग केला. याप्रकरणी राष्ट्रवादीनेही सत्ताधाऱ्यांविरोधात नाराजी व्यक्त केली.

सत्ताधारी भाजपकडून यंदाच्या पालखी सोहळ्यासाठी केवळ ५६ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पालिकेने पालखीच्या काळात केलेले नियाजन अपुरे आहे, असे सांगत शिवसेना गटनेते संजय भोसले आणि कॉग्रेस गटनेते अरविंद शिंदे यांनी सभात्याग करणे पसंत केले. यावेळी राष्ट्रवादीकडूनही निषेध नोंदवण्यात आला. या सर्वसाधारण सभेनंतर विरोधी पक्ष नेते चेतन तुपे म्हणाले की, पालखी सोहळयापूर्वी दरवर्षी बैठक घेतली जाते. मात्र यंदा महापौरांनी तसे काही केले नाही. पालखी शहरात येण्यापूर्वी एक दिवस बैठक घेतली. हे केवळ दाखवण्यासाठी केले. महापौर आणि पालिका प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे वारकरी भाविकांना त्रास सहन करावा लागला.
प्रत्यक्षात आपण हि मुख्यसभा फेसबुक वरील मायमराठी च्या पेजवर पाहू शकाल जशीच्या तशी …
इथे
यासंदर्भात पहा हा एक व्हिडीओ रिपोर्ट