पुणे, दि. 19 : पुणे जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक व माजी सैनिकांच्या विधवांनी ज्यांचे पाल्य सन 2016-2017 मध्ये 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवून इ. 10 वी, 12 वी व पदवी परीक्षा उत्तीर्ण होऊन पुढील शिक्षण घेत आहेत. सर्व माजी सैनिक व माजी सैनिकांच्या विधवांच्या पाल्यांना जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात येणार आहे. शिष्यवृत्तीचे अर्ज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात उपलब्ध असून संबंधीतांनी त्यांच्या पाल्यांचे अर्ज दि.15 ऑक्टोबर 2017 पूर्वी आवश्यक त्या कागदपत्रासह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात सादर करावे, अशी माहिती पुणे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी माजी मेजर मिलिंद तुंगार यांनी दिली आहे.
महापालिकेच्या मुख्य भवनातील तोतया कर्मचाऱ्याचा पर्दाफाश (व्हिडिओ) कॉंग्रेसच्या शिंदे आणि बागवेंची धडक ;मायमराठीचा दणका
पुणे- महापालिकेचा कर्मचारी नसताना महापालिकेच्या मुख्य भवनातील करसंकलन विभागात बसून कारभार हाकणाऱ्या तोतया कार्माच्याचा पर्दाफाश आज कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे आणि नगरसेवक अविनाश बागवे यांनी केलां आहे . मायमराठी डॉट नेट च्या प्रतिनिधींनी या तोतया कर्मचाऱ्याचा पर्दाफाश करण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका निभावली .
या प्रकरणाची हकीकत अशी कि, महापालिकेच्या शिवाजीनगर येथील मुख्य इमारतीत तळमजल्यावर करसंकलन विभागाचे कार्यालय आहे . येथे जाळ्या लावलेल्या एका विभागात हा तोतया येथील गणेश नावाच्या क्लार्क च्या खुर्चीवर बसून महापालिकेचा संगणकावर काम करताना आज सायंकाळी शिंदे आणि बागवे यांनी रंगेहाथ पकडला . याच्याकडे जॉईनिंग लेटर आणि ओळखपत्राची कॉपी मागितली असता , आपण महापालिकेचे कर्मचारी नसल्याचे त्याने सांगितले .
दरम्यान हा तरुण येथे अनेक महिन्यांपासून पालिकेच्या सेवेत नसतानाही बिनपगारी कार्यरत असल्याची खात्रीलायक माहिती मायमराठी ला मिळाली होती .या शिवाय याने स्वतःला सहायक म्हणून दरमहा काही पैसे वेतन म्हणून देवून एका तरुणीला आपल्याकडे कामास ठेवले होते .
पहा या घटनेचा प्रत्यक्ष पर्दाफाश करणारा हा व्हिडीओ…..
थिएटरचालकांनो इंदिराजींच्या बलिदानाची आठवण ठेवा
पुणे- इंदिराजींनी देशासाठी दिलेल्या बलिदानाची त्यागाची आठवण ठेवा ,आणि इंदिराजींच्या बदनामीचा प्रयत्न हाणून पाडा ..इंदू सरकार सिनेमागृहात प्रदर्शित करू नका ,या सिनेमाला सिनेमागृहात स्थान देवू नका असे आवाहन शहर कॉंग्रेस चे अध्यक्ष रमेश बागवे यांनी केले आहे . पहा आणि ऐका त्यांनी काय म्हटले आहे ……
झी मराठीची नवी मालिका ‘जाडूबाई जोरात’
वजन हा आपल्या शरीराचा भाग असतो परंतू वजन म्हणजेच पूर्ण शरीर नसतं किंवा ती आपली ओळखही नसते. असं असलं तरी आपल्याकडे एखाद्याची शारिरीक व्याधी, व्यंग किंवा वेगळेपणा हा त्याची ओळख बनतो. म्हणजे कुणाची उंची कमी असेल तर त्याला बुटका, ठेंगणा म्हणणं, कुणाचं वजन जास्त असलं तर जाड्या म्हणणं असे प्रकार आपण करतो. यामध्ये अनेकदा समोरच्याची मस्करी करण्याचा प्रयत्न असतो तर कधी कमी लेखण्याचा पण यामुळे त्या व्यक्तिच्या भावनाही दुखत असतील याचा विचार फार कमी जण करतात. अशाच कमी लेखण्यातून काय घडू शकतं ? याची गंमतीदार गोष्ट बघायला मिळणार आहे ‘जाडूबाई जोरात’ या झी मराठीच्या नव्या मालिकेमधून. येत्या २४ जुलैपासून सोमवार ते शनिवार दुपारी १ वा. ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. सायंकाळच्या प्राईम टाईममध्ये मालिकांच्या मनोरंजनानंतर आता दुपारच्या नव्या वेळेतही झी मराठी वाहिनी आपल्या प्रेक्षकांसाठी ही खास मालिका घेऊन येत आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री निर्मिती सावंत आणि किशोरी शहाणे या मालिकेत मुख्य भूमिकेत बघायला मिळणार आहेत.
‘जाडूबाई जोरात’ मालिकेची कथा आहे जुईची. मध्यमवर्गीय घरातील एक स्त्री जिची संसार आणि नोकरी सांभाळण्याची तारेवरची कसरत सुरु आहे. जिच्या गरजा, स्वप्न मर्यादीत आहेत आणि स्वभावही साधा आणि सरळ. घरातील इतरांचा विचार करताना स्वतःकडे दुर्लक्ष झालेली अशी ही जुई. म्हणजे अगदी सकाळी उरलेल्या चपात्या किंवा भात रात्रीच्या जेवणात आधी आपल्या ताटात घेणारी. कधी शिळं पाकं खाणारी तर अन्न वाया जाऊ नये म्हणून तेही आपल्या वाट्याला घेणारी. या सवयीमुळेच हे सगळं खाणं अंगाला लागलेली आणि त्यातच वजन वाढलेली जुई. घराचा हा डोलारा सांभाळताना ऑफिसच्या कामाचाही भार उचलणारी आणि तिकडेही सर्वांच्या कामात मदत करणारी. सर्वांसाठी सर्व काही करणं हा तिचा स्वभाव असला तरी तिचा विचार मात्र कुणीच करत नाही. उलट तिच्या वाढलेल्या वजनावरुन घरी आणि ऑफिसमध्येही टिंगल उडवली जाते. दुसरीकडे जुईच्या शेजारीच राहणारी मल्लिका ही तिच्या अगदी विरुद्ध स्वभावाची. स्वतःकडे लक्ष देणारी, फिटनेस जपणारी आणि महत्त्वाकांक्षा असणारी. जुईचं हे मध्यमवर्गीय वागणं आणि ते जगणं तिला अजिबात आवडत नाही आणि तिचा जाडेपणाही तिला खटकतो. हीच मल्लिका जुईला तिच्या वाढलेल्या वजनावरुन एकदा सुनावते ज्यामुळे जुईचा अहंकार दुखावला जातो आणि मग ही जाडूबाई एक आगळा वेगळा निर्धार करते. याच जाडूबाईची गोष्ट म्हणजे ही मालिका. आपल्या आगळ्या वेगळ्या विनोदी लेखनशैलीसाठी ओळखले जाणारे सुप्रसिद्ध लेखक राजेश देशपांडे यांच्या लेखनीतुन उतरलेली ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे.
या मालिकेत जुईच्या भूमिकेत निर्मिती सावंत तर मल्लिकाच्या भूमिकेत किशोरी शहाणे या दोन लोकप्रिय अभिनेत्री आहेत. याशिवाय आनंद काळे, विघ्नेश जोशी, संचिता कुलकर्णी, सिद्धार्थ खिरीद, प्रदीप जोशी, संजीवनी समेळ, जयंत सावरकर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील. ट्रम्प कार्ड प्रॉडक्शनने मालिकेची निर्मिती केली आहे.
सायंकाळनंतर सुरु होणा-या प्राईम टाईम मालिकांद्वारे प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलेल्या झी मराठी वाहिनीने आता दुपारच्या वेळेत ही खास मालिका आणली आहे
महावितरणच्या विशेष मोहिमेत 2 कोटींची वीजचोरी उघड
मुंबई :-
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या (महावितरण) विशेष पथकाने वीजचोरी विरोधात राबविलेल्या मोहिमेत सुमारे 2 कोटी 29 लाख रूपयांची वीजचोरी उघडकीस आणली असून संबंधितांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
महावितरणचे सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे कार्यकारी संचालक श्री. अरविंद साळवे (IPS) यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात वीजचोरी विरूध्द विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत मे. हिमलक्ष्मी आईस फॅक्टरीत रिमोटद्वारे वीजचोरी होत असल्याचे उघडकीस आले. त्यांनी एकूण 58 लाख 24 हजार 200 रुपयांची वीजचोरी केली. मे. वासीम आईस फॅक्टरीत 83 लाख 70 हजार 80 रूपयांची तर मे. वाजीद आईस फॅक्टरीत 87 लाख 96 हजार 308 रूपयांची वीजचोरी केल्याचे यावेळी आढळून आढळून आले. या तीनही आईस फॅक्टरीची वीजचोरीची एकूण रक्कम सुमारे 2 कोटी 29 लाख एवढी आहे.
या प्रकरणी संबंधित तीनही व्यावसायिकांवर विद्युत अधिनियमाच्या कलम 135 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. कार्यकारी संचालक श्री अरविंद साळवे (IPS) तसेच कोंकण परिक्षेत्राचे उपसंचालक सुमित कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त कार्यकारी अभियंते सुनिल कळमकर व आर. व्ही. देठे यांच्या विशेष पथकाने ही कार्यवाही केली. यापुढे वीजचोरी विरुध्दची मोहिम तीव्र करणार असल्याचे अरविंद साळवे यांनी सांगितले आहे.
रशियातील फेडरल गव्हर्नमेंट मेडिकल युनिव्हर्सिटीत एमबीबीएस शिका
पुणे-भारत आणि रशिया यंदा परस्परांतील राजनैतिक संबंधांचा ७० वा वर्धापनदिन साजरा करत आहेत. रशिया हा भारताचा अत्यंत विश्वसनीय आणि काळाच्या कसोटीवर सिद्ध झालेला मित्र आहे. हा पैलू लक्षात घेऊनच भारतीय विद्यार्थी सन १९५० पासून शिक्षणासाठी रशियात स्थलांतरित होत आहेत.
भारतीय विद्यार्थ्यांकडून रशियात शिक्षणासाठी सर्वाधिक पसंतीचे क्षेत्र म्हणजे वैद्यकीय विद्याशाखा. आधीच्या भारतीय विद्यार्थ्यांनी रशियातील छोट्या शहरांत शिक्षण घेतले आहे, परंतु तेथील पायाभूत सुविधांची कमतरता आणि क्लिनिकल प्रॅक्टिसला असणारा कमी वाव यामुळे त्यांचे एमसीआय स्क्रिनिंग टेस्ट्समध्ये नुकसान होत होते आणि त्यांना वैद्यकीय शाखेतील शिक्षण पूर्ण केल्यावर मार्गही बदलावा लागत होता. यामुळे पालक सतर्क झाले आणि त्यांना जाणवू लागले, की केवळ किफायतीपेक्षाही शिक्षणाच्या गुणवत्तेला अधिक महत्त्व आहे.
रशियामध्ये ९७० स्टेट युनिव्हर्सिटी असून त्यातील केवळ दहा विद्यापीठांना फेडरल युनिव्हर्सिटीचा दर्जा आहे. या फेडरल युनिव्हर्सिटींनाच केंद्र सरकारची मान्यता आहे. रशियन फेडरल युनिव्हर्सिटीज जागतिक दर्जाच्या असून त्यांना जगभर, तसेच शिक्षणाच्या बाजारपेठेत ठळक स्थान आहे. तेथील अभ्यासक्रम सहा वर्षांचा असून त्याला ‘मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया’ची मान्यता आहे. प्रवेशासाठी कोणतेही डोनेशन नसते. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (एचएससी) परीक्षेत ५० टक्के गुण व एनईईटी परीक्षेतील गुण इतकीच पात्रता असते.
फेडरल युनिव्हर्सिटींकडे सिम्युलेशन सेंटर्ससारख्या आधुनिक पायाभूत सुविधा असलेली स्वतःची रुग्णालये आहेत, जेथे विद्यार्थ्यांना गुंतागुंतीच्या केसवर काम करावे लागते आणि ॲनॉटॉमी थिएटर्समध्ये मानवी शरीराचा त्रिमितीत व चार मितींमध्ये अभ्यास करण्याची संधी मिळते. फेडरल युनिव्हर्सिटीचे स्वतःचे निदान केंद्रही आहे, जे विद्यार्थ्यांना निदान व उत्तम शुश्रूषा करण्यात मदत करते.
फेडरल युनिव्हर्सिटी रशियाच्या महानगरांत म्हणजेच ७३ टक्के लोकसंख्या राहात असलेल्या क्षेत्रात वसलेल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना तेथील युनिव्हर्सिटी हॉस्पिटल्समध्ये किरकोळ ते गंभीर आजाराच्या विविध रुग्णांवर उपचारांचा प्रत्यक्ष अनुभव मिळतो. फेडरल युनिव्हर्सिटींची गणना विद्यापीठांच्या जागतिक मानांकन यादीत झाली असल्याने भारतीय विद्यार्थ्यांना अत्यंत दर्जेदार शिक्षण आणि मान्यताप्राप्त पदवीचा लाभ होतो.
या युनिव्हर्सिटींमधील वसतिगृहे सर्व आधुनिक सुविधायुक्त व सुशोभित आहेत. जगभरातील ७० देशांतील विद्यार्थी या परिसरांत अध्ययन करतात.
या युनिव्हर्सिटींच्या ग्रंथालयात भारतीय पुस्तके व प्रश्न संच पुरवले जातात ज्यामुळे विद्यार्थ्यांना एमसीआय परीक्षेच्या तयारीसाठी मदत होते. येथे विद्यार्थ्यांना ऑक्स्फर्ड व केंब्रीज विद्यापीठांती ईबुक्सही वाचता येतात. येथील अध्यापन पद्धती प्रात्यक्षिक आणि सैद्धांतिक आधारित आहे.
‘ए. के. एज्युकेशनल कन्सल्टंट्स’चे संचालक डॉ. अमित कामले, एम.डी.(रशिया) हे रशियन मेडिकल युनिव्हर्सिटींचे भारतातील अधिकृत प्रतिनिधी असून ते रशियासमवेत सहयोगाने गेली १८ वर्षे काम करत आहेत. ते म्हणाले, “फेडरल युनिव्हर्सिटींनी भारतीय विद्यार्थ्यांसाठी त्यांची दारे उघडल्याचा मला खूप आनंद झाला आहे. फेडरल युनिव्हर्सिटी ही रशियातील अत्युच्च विद्यापीठे असल्याने भारतीय विद्यार्थ्यांना तेथील विविधतापूर्ण संस्कृती व पदवीचा लाभ होईल. या विद्यापीठांची निवड प्रक्रिया अन्य विकसनशील देशांप्रमाणे नसते. तेथे प्रवेशेच्छुक विद्यार्थ्यांचे जीवशास्त्र व रसायनशास्त्राचे मूलभूत ज्ञान तपासले जाते आणि त्यातील सर्वोत्तम विद्यार्थ्यांनाच शिक्षणासाठी कॅम्पसमध्ये प्रवेश मिळतो. ही सर्व प्रक्रिया केवळ गुणवत्तेवर आधारित असते. त्यामुळे आपला पाल्य दुय्यम दर्जाच्या संस्थेत शिकत असल्याची काळजी करण्याचे पालकांना कारण नाही.”
फेडरल युनिव्हर्सिटींमध्ये शिकताना वैद्यकीय समस्या सोडवण्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळण्यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षकांशी, तसेच कार्यपद्धतीशी कधीही संपर्क साधता येतो. फेडरल युनिव्हर्सिटी अमेरिका, युके, युरोप, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड आदी जागतिक नामवंत विद्यापीठांसमवेत स्टुडंट एक्स्चेंज प्रोग्रॅम राबवत असल्याने भारतीय विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाच्या प्रत्येक पैलूतील सर्वोत्तम गोष्टींची प्राप्ती होते.
रशियातील फेडरल युनिव्हर्सिटींनाही महाराष्ट्रातील विद्यापीठांशी सहयोगाची इच्छा आहे. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय देशमुख व पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांची भेट घेतल्यानंतर “या नामवंत विद्यापीठांशी सहयोग करायला आम्हाला आवडेल,” अशी प्रतिक्रिया रशियातील ‘इमॅन्युएल कान्ट बाल्टिक फेडरल युनिव्हर्सिटी’च्या कुलगुरु डॉ. एल्मिरा झिल्बर यांनी व्यक्त केली आहे.
“भारतीय विद्यार्थी अत्यंत बुद्धिमान असतात आणि आमच्या कॅम्पसमध्ये त्यांचे स्वागत आहे,” या शब्दांत कझान फेडरल युनिव्हर्सिटीच्या कुलगुरु प्रा. इल्शात गाफुरोव्ह यांनीही प्रशंसा केली.
महिंद्रा ट्रिंगोमुळे शेतकऱ्यांच्या फ्लोमध्ये 60 टक्क्यांची वाढ
50,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना यशस्वीपणे फायदा, या क्षेत्रात 40,000 तासापेक्षा
जास्त काम
5,000 गावांमधील 1 लाख शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर्ससह सध्या 5 राज्यांमध्ये जास्त
प्रक्रिया उपलब्ध
पुढील वर्षी 1 दशलक्ष शेतकऱ्यांना मूल्य सेवा देण्याचे ध्येय
मुंबई : ट्रिंगो, या भारतातील सर्वात संघटित, ट्रॅक्टर्स आणि शेतकी सामग्रीसाठी
रेंटल सेवा देणारी, तसेच 19 अब्जावधी डॉलर्सच्या महिंद्रा ग्रूपचा भाग असलेल्या कंपनीने,
आज शेतकऱ्यांच्या फ्लोमध्ये आर्थिक वर्ष 2018च्या पहिल्या तिमाहीत 60 टक्के वाढ
झाल्याचे जाहीर केले आहे, आर्थिक वर्ष 2017पेक्षा ही वाढ जास्त आहे. पुढील एका वर्षात 1
दशलक्ष शेतकऱ्यांना मूल्याधिष्ठित सेवा देण्याचे ट्रिंगोचे पुढील टप्प्यातील ध्येय असेल.
यंदाच्या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत, ट्रिंगोने 50,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांपर्यंत
पोचली आहे, भारतात या क्षेत्रातील 40,000 तास यासाठी देण्यात आले आहेत. मार्च
2016च्या स्थापनेपासून ट्रिंगोने कर्नाटक, महाराष्ट्र, गुजराथ, राजस्थान आणि मध्य प्रदेश
अशा पाच राज्यांत विस्तार केला आहे आणि 5,000 गावांतील तब्बल 1 लाख शेतकऱ्यांना
ट्रॅक्टर्स उपलब्ध करून दिले आहेत.
ट्रिंगोच्या यशाबद्दल, ट्रिंगोच्या प्रक्रियांचे प्रमुख अरविंद कुमार म्हणाले की, “आर्थिक वर्ष
2018मध्ये प्रवेश करताना, आमच्याकडे शेतकऱ्यांच्या फ्लोमध्ये तब्बल 60 टक्क्यांची वाढ
जमा आहे, आमच्या प्रवासातील हा लक्षणीय टप्पा आहे. स्थापनेपासून ट्रिंगोने तीनपटीत
योगदान दिले आहे, सर्व शेतकऱ्यांसाठी शेतकी यंत्रणा उपलब्ध करून दिल्या, ट्रॅक्टर
ऑपरेटरसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करून दिल्या आणि ग्रामीण व्यावसायिकांसाठी
व्यवासायाच्या संधी उपलब्ध करून दिल्या. ट्रिंगोद्वारे उत्पादकता अधिक वाढावी अशी आमची
इच्छा आहे आणि याद्वारे शेतकऱ्यांसाठी दरात घट होऊन, आमच्या ग्राहकांना अधिक मूल्य
देऊन, अत्याधुनिक शेतकी उपकरणांसह शेतकऱ्यांचे सबलीकरण करता यायला हवं, असंही
आम्हाला वाटतं. याशिवाय आमचा आधार विस्तारायचा असून, अधिकाधिक शेतकऱ्यांना
लक्षणीय मूल्य देता यावे यावर लक्ष केंद्रित करायचे आहे.’’
आजच्या घडीला शेतकरी समाज ट्रिंगोला प्राधान्य देतो, शेतकऱ्यांपर्यंत थेट पोचलेले आणि
यंत्रांच्या तंत्रज्ञानाची तैनात करणारे हे उत्पादन कुठल्याही संपत्तीच्या गुंतवणुकीशिवाय
वापराच्या आधारावर देयके देऊन चुकवता येते. या उत्पादनाने नेहमीच गरज आणि
उपलब्धता यांच्यातील अंतर सांधले आहे, शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या ट्रॅक्टर्सची श्रेणी आणि
इतर शेती उपकरणे सुलभपणे उपलब्ध करून दिली आहेत. ट्रिंगोची टॅगलाइन आहे `अब ट्रॅक्टर
कॉल करो’ – म्हणजेच `1800 266 266 8’ या क्रमांकावर (टोल फ्री नंबर) शेतकरी ट्रिंगोच्या
कॉलसेंटरशी जोडला जातो. शेतकऱ्यांच्या गरजेनुसार ट्रॅक्टर आणि उपकरणांसाठी योग्य त्या
सेवा सर्वात जवळच्या ट्रिंगोसह दिल्या जातात. भारतातील शेतकरी ट्रिंगोसह ट्रॅक्टर ऑर्डर
करणे, असंघटित बाजारपेठीतील ऑर्डर केलेल्या ट्रॅक्टरमध्ये आधी आलेल्या अडचणींची तुलना
करणे आदी कार्ये करण्यासाठी सक्षम झाला आहे. ट्रिंगोचे ब्रँड प्रपोझिशन `घर बैठे ट्रॅक्टर
मंगवाना आपका हक है’ हे असून, शेतकऱ्यांना यंत्रणेचा हक्क असल्याची खात्री देते.
ट्रिंगोच्या मार्ग प्रमुख तीन आधारस्तंभांवर आधारित आहे : ट्रॅक्टर्स आणि शेतकी उपकरणांचा
विश्वासार्ह पुरवठा, आकर्षक मागणी आणि दर्जात्मकतेच्या अनुभवाची खात्री.
कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
पुणे-क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळाचा ६० वा वर्धापनदिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करून उत्साहात साजरा करण्यात आला . बुधवार पेठमधील सावतामाळी भवनमध्ये झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष रवी चौधरी , माजी आमदार कमल ढोलेपाटील ,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या अध्यक्षा शारदा लडकत ,उपाध्यक्षा शशिकला ढोलेपाटील , मंगल जगताप , अनुप्रिता कलावंत , सचिव निलिमा कलावंत , सहसचिव प्रतिभा काटे , नूतन बनकर , नगरसेविका मनिषा लडकत , अनिता डोमाळे आदी मान्यवर उपस्थित होते .
या कार्यक्रमामध्ये उषा भगत याना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . तर श्रध्दा राजेंद्र गायकवाड यांनी चार मुलींचे पालकत्व स्वीकारल्यामुळे त्यांचा शाल , श्रीफळ व पुष्पगुछ देउन सन्मान करण्यात आला . तसेच स्वयं उद्योजिका असलेल्या भारती अंकेलेल्लू यांचा शाल , श्रीफळ व पुष्पगुछ देउन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमामध्ये उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्तविक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या अध्यक्षा शारदा लडकत यांनी केले तर सूत्रसंचालन उषा भगत यांनी केले तर आभार प्रतिभा काटे यांनी मानले .
या कार्यक्रमास रुक्मिणी ढोले , सत्यभामा लडकत , वत्सला वायकर , रजनी घोलप , रेखा घुले , साधना लोखंडे , उमा शिंदे , सिंधू भूमकर , वत्सला पांढरे , वंदना थेऊरकर , उज्वला कांडपिळे , मालती अनाप क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या महिला सदस्या उपस्थित होते .
नामदेव संजीवन समाधीदिनानिमित्त कार्यक्रम
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना स्मृतीदिनानिमित्त अभिवादन
पुणे-
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीदिनानिमित्त पुणे शहर जिल्हा मातंग समाजाच्यावतीने सारसबाग येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री रमेशदादा बागवे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले . यावेळी समितीचे स्वागताध्यक्ष हनुमंत साठे , सचिव प्रकाश वैराळ , अंकल सोनवणे , विष्णू कसबे , अशोक लोखंडे , विठ्ठल थोरात , राजू धढे , नाना फासगे , रवी आरडे , गणेश जाधव , दत्ता गायकवाड , सुरेखा खंडागळे , सुनिल खंडाळे ,सुनिल खंडाळे , श्रीधर कसबेकर , संतोष देवकुळे , अजित इंगळे , निरंजन गायकवाड , ऍड. एकनाथ सुगावकर , शैलेश आवळे , सुरेश अवचिते , राजेंद्र पाटील , अरविंद वाघमारे , मामा केंदळे, दीपक आवळे आदी मान्यवर उपस्थित होते . यावेळी रमेशदादा बागवे , हनुमंत साठे , अशोक लोखंडे , राजेंद्र पाटील , अशोक लोखंडे आदी मान्यवरांनी मार्गदर्शनपरर भाषणे केली . या अभिवादन सभेचे सूत्रसंचालन प्रकाश वैराळ यांनी केले तसेच आभार प्रदर्शन अनिल हातागळे यांनी मानले .
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीदिनानिमित्त दलित पँथर पुणे शहरच्यावतीने सारसबाग येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास दलित पँथर पुणे शहराध्यक्ष प्रकाश साळवे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले . यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुखदेव सोनवणे , विशाल खिलारे , संगीता दिवटे ,आरती बाराथे , राहुल सोनवणे , शुभम सोनवणे , रुपेश सोनवणे , शबनम शेख , रुबिना शेख , विठ्ठल केदारी आदी मान्यवर उपस्थित होते .
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीदिनानिमित्त रमाबाई महिला विकास संस्थेच्यावतीने सारसबाग येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास संस्थेच्या अध्यक्षा मायावती चित्रे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले . यावेळी झाकीर शेख , रेखा वाघमारे , निर्मला त्रिभुवन , श्रध्दा खरात , मीरा प्रभू , यास्मिन कुरेशी , आयेशा कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते .
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीदिनानिमित्त महाराष्ट्र जोशी समाज संघटनेच्यावतीने सारसबाग येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास संघटनेचे अध्यक्ष कैल्लास हेंद्रे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले . यावेळी पुणे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब भोसले , महिला अध्यक्षा सुरेखा हेंद्रे , रामदास सर्वे , तानाजी सुर्वे , अण्णा माळी आदी मान्यवर उपस्थित होते .
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीदिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्यावतीने सारसबाग येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुणे शहर उपाध्यक्ष आनंद सवाणे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले . यावेळी अनिल पाटील , महेंद्र कांबळे , हनुमंत मनोहरे , हर्षद शेख , सचिन पारधे , जितेंद्र कांबळे आदी उपस्थित होते .
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीदिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्यावतीने सारसबाग येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुणे शहर उपाध्यक्ष आनंद सवाणे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले . यावेळी अनिल पाटील , महेंद्र कांबळे , हनुमंत मनोहरे , हर्षद शेख , सचिन पारधे , जितेंद्र कांबळे आदी उपस्थित होते .
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीदिनानिमित्त सारसबाग येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मिशन ऑफ आंबेडकर सामाजिक संघटनेच्या वतीने संघटनाचे संस्थापक अध्यक्ष अरुण भालेराव यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले . यावेळी अनिल पाटील , महेंद्र कांबळे , हनुमंत मनोहरे , हर्षद शेख , सचिन पारधे , जितेंद्र कांबळे आदी उपस्थित होते .
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीदिनानिमित्त सारसबाग येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास समता सामाजिक संस्थेच्यावतीने समता सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विजय भोसले यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले . यावेळी समता सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विजय भोसले , ग्रंथपाल दिलीप भिकुले , विकास भांबुरे , अक्रम शेख , भगवान वायाळ, संजय गायकवाड , आयुब खान , अभिषेक भोसले , अनिकेत भोसले आदी मान्यवर उपस्थित होते .
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीदिनानिमित्त सारसबाग येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास लोहियानगर येथील अजिंक्य मित्र मंडळाच्यावतीने मंडळाचे अध्यक्ष मधुकर चांदणे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले . यावेळी रमेश चांदणे , विलास कसबे , बाळू कसबे , पप्पू माने , अनिल भोसले आदी मान्यवर उपस्थित होते .
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीदिनानिमित्त सारसबाग येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मातंग समाज पुणे शहरच्यावतीने महाराष्ट्र राज्याचे माजी गृह राज्यमंत्री व पुणे शहर जिल्हा कमिटीचे अध्यक्ष रमेशदादा बागवे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले . यावेळी नगरसेवक अविनाश बागवे , ऍड. एकनाथ सुगावकर , मधुकर चांदणे , विष्णू कसबे ,अनिल हातागळे , राजू धडे , विठ्ठल थोरात , प्रकाश वैराळ , विलास कसबे , रमेश चांदणे , अंकल सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते .
मारूती सुझुकी दक्षिण डेअर रॅली महाराष्ट्रात प्रवेशासाठी सज्ज
बजेटमधील ५०० कोटींच्या तरतुदीचा विनियोग करा ;मग कर्ज उचला-माजी उपमहापौर आबा बागुल यांची मागणी
मला काहीच प्रॉब्लेम नाही..रिलीज डेट पुढे ढकलली
२८ जुलै २०१७ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणारा फिल्मी किडा निर्मित,मला काहीच
प्रॉब्लेम नाही; हा आगामी मराठी चित्रपट आता येत्या ११ ऑगस्ट २०१७ रोजी प्रदर्शित होणार आहे. २८
जुलै ला प्रदर्शित होणाऱ्या चार हिंदी व दोन मराठी चित्रपटांमुळे प्रेक्षकांना मला काहीच प्रॉब्लेम नाही
बघताना काही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून या चित्रपटाची रिलीज डेट ११ ऑगस्ट करण्यात आलेली आहे.
११ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या 'मला काहीच प्रॉब्लेम नाही; या
चित्रपटाद्वारे स्पृहा जोशी, गश्मीर महाजनी, निर्मिती सावंत, कमलेश सावंत, विजय निकम,
मंगल केंकरे, साहील कोपर्डे, सीमा देशमुख, आरश गोडबोले, स्नेहलता वसईकर व सतीश
आळेकर यांसारखे नामवंत कलाकार आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर बेला शेंडे,
अभय जोधपूरकर, प्रियांका बर्वे, आनंदी जोशी आणि श्रृती आठवले आणि यांच्या आवाजाने
सजलेली एकापेक्षा एक गाणी ऋषिकेश, सौरभ आणि जसराज यांनी संगीतबद्ध केलेली आहेत.
जसराज ने संगीत दिग्दर्शनाबरोबरच या चिपटात दोन गाण्यांना आवाजही दिला आहे. ज्याचा
आस्वाद ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ या चित्रपटातून घेता येणार आहे.
प्रत्येक नातं टिकविण्यासाठी ते वेळोवेळी फुलवतं ठेवावं लागतं. आपल्या आधीची एक पिढी आणि
आपली पिढी यांच्या विचारांचा आणि तत्वांचा हा प्रवास समीर विद्वांस दिग्दर्शित 'मला काहीच प्रॉब्लेम
नाही’ चित्रपटाद्वारे येत्या ११ ऑगस्टला आपणास पाहायला मिळणार आहे.
बोला मधुर भांडारकर बोला …(व्हिडीओ)
पुणे- मधुर भांडारकर यांच्या लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘इंदू सरकार’ या सिनेमाचे प्रमोशन कॉंग्रेस कडून हाणून पाडण्याचे प्रयत्न होत असताना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत . यापैकी काही प्रश्नांचा हा अल्पसा व्हीडीओ …अर्थात कोणत्याही माध्यमातून का होईनात सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी उत्तरे मिळण्यासाठी … सिनेमात प्रत्यक्षात चांगलेच सर्व काही असो , कोणाचीही नाहक बदनामी करणारा ..चुकीचा इतिहास मांडणारा ,अर्धसत्य मांडून गैरसमज पसरविणारा ..नसो हीच अपेक्षा बाळगून …
सेंट अँड्रयूज मुलींच्या शाळेतील विद्यार्थिनींना क्रीडा व शालेय साहित्य वाटप
पुणे-युनिटी फ्रिडम फॉर फाऊंडेशनवतीने पुणे कॅम्पमधील सेंट अँड्रयूज मुलींच्या शाळेतील विद्यार्थिनींना क्रीडा व शालेय साहित्य वाटप प्रसिध्द क्रीडा खेळाडू श्याम सहानी यांच्याहस्ते करण्यात आले . यावेळी युनिटी फ्रिडम फॉर फाऊंडेशनचे अध्यक्ष भगवान वायाळ ,फाउंडेशनच्या सचिव प्रतिभा वायाळ , महेश जांभुळकर , कर्तव्य फाऊंडेशनचे अध्यक्ष विकास भांबुरे , ससून रुग्णालयांमधील सामाजिक कार्यकर्ते हसन रंगरेज , बजमे रहेबर कमिटीचे अध्यक्ष अक्रम शेख आदी मान्यवर उपस्थित होते .
यावेळी सेंट अँड्रयूज मुलींच्या शाळेच्या मुख्याध्यापिका निता बोर्डे यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर सुत्रसंचालन सुधीर साळुंके यांनी केले तर आभार भगवान वायाळ यांनी मानले .




