Home Blog Page 3304

पुणे शहराला आरोग्य अधिकारी द्या; राष्ट्रवादीची मागणी

0

पुणे- शहरातील आरोग्यविषयक समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज महापालिका भवनासमोर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले.

पुणे महापालिकेला पूर्ण वेळ आरोग्य अधिकारी नाही. त्यामुळे शहरात साथीच्या रोगांनी थैमान घेतले असताना पालिका प्रशासन उपाय करण्यात कमी पडत आहे. त्यामुळे लवकरात लवकर अयोग्य अधिकाऱ्यांची नेमणूक करावी या मागणीसाठी राष्ट्रवादीकडून आज आंदोलन करण्यात आले. यावेळी विरोधी पक्ष नेते चेतन तुपे, नगरसेवक महेंद्र पठारे, सचिन दोडके, योगेश सासणे, भैयासाहेब जाधव, प्रिया गदादे, रवींद्र माळवदकर, नंदा लोणकर, वनराज आंदेकर, शैलेश बडदे आणि रुपाली चाकणकर, यांच्या इतर राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.

कोण संजय कानडे ? दणका,बिनका काही नाही ..फेरनिविदेचा निर्णय प्रशासनाचाच -कुणालकुमार (व्हिडीओ )

0

पुणे-कोण संजय कानडे ? सीबीआय कडे तक्रार करणारे समोर का येत नाहीत ? असा सवाल करीत विरोधी पक्षांचे आरोप धुडकारून लावत मुख्यमंत्र्यांचा या विषयावर आपल्याला काहीही दणका-बिनका बसलेला नसून २४ तास पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीच्या निविदा प्रक्रियेत रींग झालेली नाही मात्र पालिकेच्या हितासाठी फेरनिविदेचा निर्णय आपणच म्हणजे प्रशासनाने पदाधिकाऱ्यांशी बोलून घेतला असल्याचे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी येथे सांगितले .  पहा नेमके काय म्हणाले महापालिका आयुक्त कुणाल कुमार … व्हिडीओ

प्रेमा चित्रपटाचा म्युझिक लाँच सोहळा संपन्न

0

आजच्या तरुणाईला आवडतील असे कथाविषय मराठी सिनेमांमध्ये आवर्जून दिसू लागले आहेत. प्रेमाचे वेगळ रूप दर्शवणारा प्रेमा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मार्कंडेय फिल्म प्रस्तुत रमेश व्यंकय्या गुर्रम निर्मित प्रेमा या मराठी चित्रपटाचा म्युझिक लाँच सोहळा नुकताच मुंबईत कलाकार व तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत दिमाखदाररीत्या संपन्न झाला. अभिनेत्री मानसी नाईक हिच्या हस्ते या चित्रपटाची ध्वनीफित प्रकाशित करण्यात आली. याप्रसंगी चित्रपटाच्या ट्रेलर व गीताची झलक दाखवण्यात आली. सदानंद ज्ञानेश्वर इप्पाकायल यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून कथासुद्धा त्यांचीच आहे. तरुणाईच्या ओठावर सहज रुळतील अशी वेगवेगळ्या जॉनरची चार गीते यात असून हा युथफुल म्युझिक नजराणा प्रेक्षकांना निश्चित आवडेल असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला.

या चित्रपटातील गाणी शेखर आनंदे यांनी लिहिली असून त्यांनीच ती संगीतबद्ध केली आहेत. ‘मी गुलाबी नोट दोन हजाराची’ हे ठसकेबाज आयटम सॉंग रेश्मा सोनावणे यांनी तर ‘दुनियेच्या आईचा घो’ हे जोशपूर्ण गाणं अवधूत गुप्ते यांनी गायलं आहे. ‘प्रेम सिंधू’ तसेच ‘तुझी आठवण का येते’ या दोन हृदयस्पर्शी गीतांना स्वप्नील बांदोडकर यांचा स्वरसाज लाभला आहे. ‘मी गुलाबी नोट दोन हजाराची’ या आयटम सॉंगवर नृत्यतारका मानसी नाईक थिरकताना रसिकांना पहायला मिळणार आहेत. नृत्यदिग्दर्शन सिद्धेश पै, आतिष देवरुखकर यांनी केले आहे.

प्रेम जिंकण्यासाठी स्वत:मध्ये केलेला बदल व प्रयत्न यांची रोमहर्षक कथा म्हणजे प्रेमा. नारायण निर्वळ, शिल्पा ठाकरे, सचिन बत्तुल, प्रेम नरसाळे, करिश्मा साळवी, संस्कृती शिंदे, प्रकाश धोत्रे, राज नरवडे, शेखर केदारी, संतोष चोरडिया, कस्तुरी सारंग, मनीषा तांबे, महादेव झोळ, सुरेखा कुडची या कलाकारांनी या चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटाचे सहनिर्माते सचिन दत्तात्रेय बत्तुल असून कार्यकारी निर्माते मंगेश रामचंद्र जगताप व मारुती तायनाथ आहेत.

महावितरणच्या ग्राहकसंपर्क अभियानात 18 हजारांवर तक्रारी / अर्जांचे निराकरण

0

मुंबई :

महावितरण ग्राहकांच्या सेवेसाठी नेहमीच कटीबध्द असते. यासाठी सातत्याने महावितरण आपल्या दारीसारखे नवनवीन उपक्रम महावितरण राबवित असते. याचाच एक भाग म्हणून महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांनी राज्यभरातील ग्राहकांसाठी ग्राहकसंपर्क अभियान राबविण्याचे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे राज्यभरात राबविलेल्या ग्राहक संपर्क अभियानात सुमारे 18 हजार 555 ग्राहकांच्या तक्रारी व अर्जांचे तात्काळ निराकरण करण्यात आले.

महावितरणच्या राज्यभरातील 16 परिमंडलांत माहे जुलै 2016 मध्ये हे ग्राहकसंपर्क अभियान राबविण्यात आले. या अंतर्गत राज्यभरात 1,746 ग्राहक मेळावे घेण्यात आले. या ग्राहकसंपर्क अभियानात वीज ग्राहकांसाठी नवीन वीज जोडणी, नावात बदल, वीजभार बदलणे या अर्जांवर कार्यवाही करण्यात आली तसेच सदोष किंवा चुकीच्या वीजबिलांची दुरुस्ती, सदोष किंवा जळालेले मीटर बदलण्यासह इतरही तक्रारीही जागेवरच सोडविण्यात आल्या.

राज्यात या अभियानांतर्गत एकूण सुमारे 22 हजार 966 तक्रारी व अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी 18 हजार 555 तक्रारी/अर्जांचे तात्काळ निराकरण करण्यात आले. उर्वरित 4 हजार 411 प्रलंबित तक्रारी निर्धारित मुदतीत सोडविण्यात येत असून त्याची माहिती संबंधित वीजग्राहकांना देण्यात येत आहे. एकूण तक्रारींपैकी सर्वाधिक तक्रारी सदोष किंवा चुकीच्या वीजबिलींगबाबत असून त्यावर महावितरणकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. या संदर्भात वारंवार चुकीचे रिडिंग घेणाऱ्या एजन्सींवर फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश श्री. संजीव कुमार यांनी दिले आहेत.

महावितरणच्या ग्राहकसंपर्क अभियानाला संपूर्ण राज्यात वीज ग्राहकांनी मोठा प्रतिसाद दिला. तसेच या अभियानात नवीन वीजजोडणी, इतर वीजसेवेविषयकच्या तक्रारी तात्काळ सोडविण्यात आल्यामुळे वीज ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे.

नॉर्ड ड्राईव्ह सिस्टम्सची ‘एक्सट्रा माईल सर्व्हिस’चे अनावरण

पुणे पुण्यात मुख्यालय असलेल्या नॉर्ड ड्राईव्ह सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेडने नुकतेच आपल्या ‘एक्सट्रा माईल सर्व्हिस व्हेईकल’चे अनावरण केले. उत्पादनांचा टिकाऊपणा वाढविणे, ग्राहकांना घरपोच सेवा देण्याच्या दृष्टीने ह्या सेवेचे अनावरण करण्यात आले आहे.
नॉर्डने नव्याने लाँच केलेली ही व्हॅन सर्व प्रकारच्या आपत्कालीन व खास सेवा पुरवण्याचा दृष्टीने बनविण्यात आली आहे. नॉर्डची जागतिक पातळीवर विकली जाणारी सर्व उत्पादने भारतीय बाजारपेठेतदेखील उपलब्ध आहेत. नॉर्ड इंडियाच्या सर्व्हिस टीमने ९०% सर्व्हिस व नूतनीकरणाचे काम स्थानिक पातळीवर केले जात असल्याचा दावा केला आहे.
नॉर्ड ड्राईव्हसिस्टम्सचे एमडी पी.एल.मुथुसेकर म्हणाले की, “सिमेंट, स्टील, वस्त्र व खाद्य अशा विविध क्षेत्रांमधील आमचे ग्राहक उत्पादनांच्या गुणवत्ते बरोबर स्पर्धा करतात. आमच्या प्रतिसाद आणि सेवेच्या स्तरांवर गुणवत्ता ठरवली जाते. विश्वासार्ह यंत्रणा राखणे ही प्रत्येक ग्राहकाची गरज आहे, म्हणूनच नॉर्डच्या प्रत्येक उत्पादनासाठी त्वरित व कमीत-कमी वेळेत सर्व्हिस देऊन त्या उत्पादनांची शेल्फ लाईफ वाढविण्यासाठी आम्ही इथे तत्पर आहोत. आम्ही प्रत्येक ग्राहकाला आमच्या उत्पादनांसह एक अतिरिक्त मैल पुढे न्हेऊ इच्छित आहोत म्हणूनच आम्ही या सेवेला ‘एक्स्ट्रा माईल सर्व्हिस’ असे नाव दिले आहे”.
नॉर्डचे जनरल मॅनेजर अमित देवकुळे म्हणाले की, “आमच्या नवीन ‘एक्स्ट्रा माइल सर्व्हिस’द्वारे नॉर्ड ऊन व पावसाचा सामना करण्याची जोखीम उचलण्यास इच्छुक आहे. टोल फ्री नंबर किंवा ई-मेलद्वारे केव्हाही संपर्क केल्यास आम्ही आमच्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास सज्ज आहोत”.
ताज डेक्कन येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आंध्र प्रदेश सरकारच्या पब्लिक एन्टरप्रायझेसचे मुख्य सचिव ए. आर. सुकुमार व तेलंगणा सरकारच्या इंडस्ट्रीज व कॉमर्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेकट्रोनिक व टेलिकम्युनिकेशनचे मुख्य सचिव जयेश रंजन उपस्थित होते. हे अनावरण नुकतेच हैदराबाद येते झाले.

२४ तास पाणीपुरवठा योजनेतील २२०० कोटीची निविदा रद्द ..जल्लोष व्हिडीओ

0

पुणे- महापालिकेतील विरोधी पक्षांकडून २४ तास  पाणी पुरवठा योजनेच्या निविदा काढताना संगनमताने  मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे वारंवार आरोप होत होते . तसेच त्याची फेर निविदा काढण्याची मागणी देखील करण्यात येत होती. दरम्यान आज फेरनिविदा काढण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजताच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी  महापालिका भवनासमोर फटाके फोडून जल्लोष केला.

२४ तास पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीच्या निविदा प्रक्रियेत रींग झाल्याचा आरोप  काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी केला होता. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसनेही पत्रकार परिषद घेऊन महापालिकेला ४००  कोटींचा फटका बसणार आहे, असे  सांगितले होते. तर शिवसेनेनेही योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. सीबीआय चे या संदर्भात आलेले पत्र , खासदार संजय काकडे यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलेला हा विषय या पार्श्वभूमीवर अखेर गुरुवारी आयुक्त कुणालकुमार यांनी या निविदा रद्द करण्याचे जाहीर केल्यावर या पक्षांनी जल्लोष केला  .
पहा हा जल्लोष आणि यावेळी काय म्हणाले कॉंग्रेस चे गट नेते अरविंद शिंदे आणि विरोधी पक्ष नेते चेतन तुपे पाटील … पहा हा व्हिडीओ

क्रांतिसिंह नाना पाटील यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन

0

पुणे: जिल्हा प्रशासनातर्फे क्रांतिसिंह नाना पाटील यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात झालेल्या या कार्यक्रमात, सामान्य प्रशासन विभागाच्या  उपायुक्त कविता द्विवेदी यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी, महसूल शाखेचे उपजिल्हाधिकारी प्रताप जाधव, तहसिलदार मीनल मिरजकर,तसेच विभागीय आयुक्त कार्यालय,जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महिला बालकल्याण समिती करणार पितृत्वावर अन्याय …?

0

पुणे- केंद्र आणि राज्य शासनाच्या धोरणानुसार आता पुणे महापालिकेत देखील मूल दत्तक घेणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना 6 महिने ते 1 वर्षापर्यंत पगारी रजा देण्याचा निर्णय पालिकेतील महिला बाल  कल्याण समिती घेणार असून त्या दृष्टीने तशा हालचालींना प्रारंभ झाला आहे . मात्र या संदर्भातील पालिका प्रशासनाकडून करवून घेण्यात आलेल्या प्रस्तावात  एखाद्या पुरुष कर्मचाऱ्यास मुल दत्तक घेताना कोणत्याही प्रकारची सुट्टी रजा देण्याची तरतूद ठेवण्यात आलेली नाही .किंवा दांपत्याने मूल  दत्तक घेतल्यास पित्याला रजेची कोणतीही तरतूद ठेवण्यात आलेली नाही . त्यामुळे 50 टक्के आरक्षण घेवून पुढे मार्गाक्रमण करणाऱ्या महिला ‘मातृदेवोभव ..हि उक्ती जाणून असल्या तरी त्यासोबत जोडली जाणारी ‘पितृदेवोभाव’ या वाक्याशिवाय हि उक्ती पूर्ण  होऊ शकत नाही . हे स्मरणात ठेवणार कि नाही हे याच आठवड्यात स्पष्ट होणार आहे .
आई ची महती मोठीच आहे .पण म्हणून पित्याच्या प्रेमाकडेही दुर्लक्षून चालणार नाही .याची जाणीव महिला बळ कल्याण समितीने ठेऊनच या प्रकरणी आप्लुअपुधे आलेला प्रस्ताव मान्य करावा अशी मागणी होत आहे .
या प्रकरणाची हकीकत अशी कि , महिला बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा असलेल्या राणी भोसले या नवनवीन प्रकल्प राबविण्यास प्रचंड उत्साही आहेत. त्यासाठी त्यांनी बड्या बड्या कल्पना काही त्यांना बडी मंडळी भासणाऱ्या बड्या व्यक्तींकडून घेण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशभर सातत्याने स्वच्छता अभियान राबविण्यासाठी विविध क्लुप्त्या अवलंबत असताना , पुण्यात मात्र कुठेही नवीन मुताऱ्या,स्वच्छतागृहे बांधण्यात अग्रेसर रहाण्याऐवजी आहे ती पाडण्याचेच मनसुबे रचले जात आहेत .यात लक्ष घालून यश मिळत नाही असे दिसल्यावर अध्यक्ष महोदया यांनी त्यांच्याकडे  आलेल्या कल्पनेनुसार प्रशासनाला हा दत्तक पुत्र घेणाऱ्या महिलांना पगारी रजा देणारा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या . आणि प्रशासनाने तसा प्रस्ताव हि तयार केला .
अर्थात केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिल्या  जाणाऱ्या सुविधांप्रमाणेच हा प्रस्ताव आहे असे सांगितले जात असले तरी यात काही बदल आहेत. या प्रस्तावाला शासनाचे जीआर देखील जोडले आहेत . या प्रस्तावानुसार ज्यांना 2 हून कमी अपत्य आहे अशा पालिकेतील महिला कर्मचाऱ्याने दत्तक मूल(1 महिना वयाच्या आतील )घेतल्यास तिला 1 वर्षाची पगारी रजा देण्यात येईल .7 महिन्यापर्यंत चे मुल दत्तक घेतल्यास 6 महिने तर त्यापुढे  १०  महिन्यापर्यंतच्या  वयाचे मुल दत्तक घेतल्यास 3 महिन्याची पगारी रजा देण्यात येईल .असा हा प्रस्ताव आहे .
शासन निर्णय मात्र याहून वेगळा आहे . मुळात यासाठी जो निर्णय मार्च २०१७ ला घेण्यात आला त्यास शासन निर्णय २६ ऑक्टोबर १९९८ चा संदर्भ देवून घेण्यात आला आहे .1 वर्षांच्या आतील वयाचे आतील्वयाचे मुल घेतल्यास सहा महिने आणि त्याहून मोठे मुल 3 वर्षापर्यंत चे दत्तक घेतले तर 3 महिने रजा देण्यात यावी असा शासन निर्णय राज्यसरकारी महिला कर्मचाऱ्याना लागू झालेला आहे .
निर्णय महिला वर्गासाठी आणि एकंदरीतच येथे नौकरी करणाऱ्या महिलांसाठी चांगला आहे. मात्र याकडे पाहताना स्त्री पुरुष समानता आणि आई चे प्रेम वात्सल्य..आणि  पित्याचे देखील प्रेम वात्सल्य अशा दृष्टीकोनातून पाहिला तर हा निर्णय एकांगी ठरतो .आणि पितृत्वावर अन्यायकारक आहे . असे वाटल्याखेरीज रहात नाही . त्यामुळे महिला बाल  कल्याण समितीच्या अध्यक्षांनी पितृत्वाचा सन्मान होईल पितृत्वाला  देखील न्याय मिळेल अशा पद्धतीनेच हा प्रस्ताव मान्य करावा अशी मागणी  होते आहे .

मुंबई विद्यापीठाचे निकाल वेळेत न लागण्याला सर्वस्वी कुलगुरू संजय देशमूख व शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि रवींद्र वायकर जबाबदार, त्यांनी राजीनामा द्यावा – संजय निरुपम

0

 

 

मुंबई -विद्यापीठाचे निकाल वेळेत न लागल्यामुळे मुंबई काँग्रेसतर्फे आज कालिना येथील मुंबई विद्यापीठावर निषेध मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी मागणी केली की या प्रकरणाला कुलगुरू संजय देशमुख आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे व रवींद्र वायकर जबाबदार आहेत. त्यामुळॆ त्यांनी तांबडतोब राजीनामा दिला पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात त्वरित या तिघांचा राजीनामा घ्यावा व या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. परंतु ते असे करत नाही आहेत त्यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) चा दबाव आहे. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत की आरएसएसचे हेच कळत नाही आहे. संजय देशमुख आणि विनोद तावडे हे आरएसएसशी संलग्न असल्यामुळेच त्यांच्यावर कारवाई होत नाही आहे.    

संजय निरुपम पुढे म्हणाले की आमच्या शिष्टमंडळाने कुलगुरू संजय देशमुख यांची भेट घेतली तेव्हा आम्ही त्यांना म्हणालो कि तुम्ही या संपूर्ण प्रकरणाची नैतिक जबाबदारी घेऊन तुम्ही स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे, परंतु आम्हाला तुमचा राजीनामा मागावा लागत आहे. आम्ही त्यांना ठणकावून सांगितलॆ कि तुम्ही तुमचे काम करण्यास संपूर्णतः नापास झालेले आहात. तुमच्यापेक्षा अनेक विद्वान या जागेसाठी उपलब्ध आहेत. ते या जागेवर बसून चांगले काम करू शकतात. तुम्ही त्वरित राजीनामा द्यावा. विद्यार्थी आणि पालक अजून हि संभ्रमात आहेत की सर्व निकाल कधी लागणार आहेत. मुख्यमंत्री ५ ऑगस्ट सांगत आहेत आणि कुलगुरू आता १५ ऑगस्ट सांगत आहेत. त्यामुळे आम्ही सर्व जण संभ्रमात आहोत. आमची अशी मागणी आहे की कुलगुरूंनी त्वरित या संपूर्ण निकालांची आत्तापर्यंतची खरी माहिती विद्यार्थी, पालक आणि मीडिया समोर जाहीर करावी. किती निकाल तयार आहेत ? किती निकाल बाकी आहेत? किती पेपर तपासायचे शिल्लक आहेत. खरंच १५ ऑगस्ट पर्यंत सर्व निकाल लागणार आहेत कि नाही ? 

ते पुढे म्हणाले की ज्या पद्धतीने मुंबई विद्यापीठाचे काम सुरु आहे त्यावरून आम्हाला वाटत नाही कि १५ ऑगस्ट पर्यंत सर्व निकाल लागतील, त्यामुळे आमची मागणी आहे कि कुलगुरू संजय देशमुख, शिक्षण मंत्री विनोद तावडे व रवींद्र वायकर यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा. शिवसेनेच्या भूमिकेबद्दल बोलताना ते म्हणाले कि शिवसेना सत्तेत असून हि आंदोलनाचे नाटक करीत आहे. शिवसेनेला विद्यार्थ्यांची काळजी असेल तर त्यांनी त्यांचे मंत्री रवींद्र वायकर यांचा राजीनामा घ्यावा. शिवसेना लोकांची फसवणूक करत आहे. सत्तेत हि राहते आहे आणि विरोध हि करत आहे. ते त्यांची भूमिका स्पष्ट करत नाही आहेत. 

मुंबई काँग्रेसच्या या निषेध मोर्चाला काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व एनएसयूआयचे पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी संजय देशमुख व विनोद तावडे यांचे पोस्टर्स जाळण्यात आले तसेच डॉ. आंबेडकर भवन येथील कुलगुरूंच्या कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले, त्यानंतर एका शिष्टमंडळाने संजय देशमुख यांची भेट घेऊन त्यांचा राजीनामा मागितला. 

” स्मार्ट सिटीत” राहतोय का एखाद्या दुर्गम भागातील पाड्यावर ? संदीप खर्डेकरांचे आयुक्तांना पत्र( -जसेच्या तसे …): कैलास स्मशानभूमीतील डिझेल दाहिनीची दुरावस्था…पहा फोटो ….

0

प्रती,

मा कुणालकुमार,
आयुक्त,पुणे मनपा.
विषय – कैलास स्मशानभूमीच्या दुरावस्थेबाबत –
मा महोदय,
आज कैलास स्मशानभूमीस भेट दिली असता तेथील दुरावस्था बघुन शब्दशः प्रशासनाच्या गलथान कारभाराची कीव करावी वाटली व आपण एका ” स्मार्ट सिटीत” राहतोय का एखाद्या दुर्गम भागातील पाड्यावर असे वाटावे इतकी येथील अवस्था वाईट आहे.येथील डिझेलदाहिनी २००४ साली उभारण्यात आली असुन नियमित देखभालीअभावी त्याची अवस्था दयनीय आहे.एकीकडे पर्यावरण रक्षणासाठी सर्वजण झटत असताना आणि वैकुंठ विद्युतदाहिनीत अंत्यविधी करणाऱ्याची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना येथील दयनीय अवस्था बघता नागरिक येथे अंत्यविधीस धजावत नाहीत.
दुरावस्थेची काही उदाहरणे…
१) डिझेलदाहिनी कालबाह्य झाली असुन त्यातुन दुर्गंधी पसरते व मृतदेहातील पाणी (ड्युपाँट) बाहेर येते.सर्वत्र घाणीचे साम्राज्य आणि धूर व धुरामुळे काजळी.
२) भिंतीला तडे गेलेले असुन,बेसीनला पाणी नाही व त्यास पाईपची जोडणीच नाही असे दिसून आले.
३) लाईट फिटींग ही निखळल्या असून सीमाभिंतीला ही तडे गेले असुन ही भिंत कधीही पडेल अश्या अवस्थेत आहे.
४) तेथेच असलेली बायो गॅस वरील दाहिनी बंद असून तेथील यंत्रणा बंद अवस्थेत आहे.
५) येथे डिझेलदाहिनीला लागूनच महिन्याभरापूर्वी खोदाई केलेली असून तेथे म्हणे चिमणी उभारण्यात येणार होती / तूर्त सगळे थंड आहे.
६) ही दाहिनी बसविलेल्या चिरंतन कंपनीचे तीन वर्षापूर्वी देखभालीचे कंत्राट अचानक रद्द करण्यात आले व अन्य एका कंपनीस वार्षिक १६ लाख रुपये येवढ्या मोबदल्याचे देखभालीचे कंत्राट देण्यात आले.सदर कंत्राट एकच वर्षासाठी होते व तद्नंतर त्या कंपनीस विनंती करुन देखभाल करण्यास सांगण्यात आले.या भानगडीतच दाहिनीची दुरावस्था झाल्याचे लक्षात येते.त्यामुळे याची चौकशी होणे व दोषींवर कारवाई करणे गरजेचे आहे.
७) स्मशानभूमीच्या आवारातच एक मोठा खड्डा खण्णयात आला असुन या खड्ड्यात अस्थी विसर्जनानंतर उरलेली राख टाकण्यात येते.हे ही गैर असून त्याची पर्यायी व्यवस्था केली जावी.
तसेच सर्वत्र पडलेले भंगार ही उचलण्यात यावे अशी आग्रही मागणी करत आहे.
आपला,
संदीप खर्डेकर.
अध्यक्ष क्रीएटिव्ह फौंडेशन.
मो ९८५०९९९९९५

द रिअल हिरो कथा समृद्धीच्या या कार्यक्रमात रवी बापटले

0

एचआयव्हीबद्दल बरीच जागृती होत असली तरी एचआयव्ही बाधितांचे प्रश्न आजही कायम आहेत. एड्सच्या संदर्भात लोकांच्या मनात रुतून बसलेले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करत एचआयव्हीबाधितांना आधार  देण्याचे काम रवी बापटले हा अवलिया अविरतपणे करतोय. एड्सग्रस्तांना मानाने जगता यावं यासाठी त्यांची धडपड सुरु आहे. ‘ना मुंह छुपाके जियो, और ना सर झुकाके जियो, गमों का दौर भी आये तो मुस्कुराके जियो’ असं सांगत रवी यांचा लढा आजही सुरुच आहे. रवी बापटले यांच्या या लढ्याची कहाणी जाणून घ्यायची संधी येत्या रविवारी ६ ऑगस्टला सकाळी ११.३० वा. झी मराठी वाहिनीवरील द रिअल हिरो कथा समृद्धीच्या या कार्यक्रमात मिळणार आहे. अल्पावधीतच या कार्यक्रमाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

 

गावात एका एचआयव्हीबाधित मुलाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्यावर कोणी अत्यंविधीही करीत नव्हते. त्या मृतदेहाची अवस्था  पाहिल्यावर हेलावलेल्या रवी बापटले यांनी जन्मतः एचआयव्ही बाधित निष्पाप मुलांसाठी पूर्णवेळ कार्य करण्याचे ठरवले. त्यानंतर अथक प्रयत्नांनी त्यांनी एड्सग्रस्तांसाठी ‘हॅप्पी इंडियन व्हिलेज’ची स्थापना केली. या माध्यमातून एचआयव्ही बाधितांना आधार देण्याचे व मुलांना शिक्षणाची कवाडे खुले करण्यासाठी रवी बापटले यांनी पुढाकार घेतला. एचआयव्ही बाधितांच्या मुलांना शाळेत प्रवेश देण्यासाठी रवी बापटले यांनी प्रयत्न केले तेव्हा प्रथम त्यांना विरोध दर्शवला, मात्र हार न मानता रवी बापटले यांनी आपले कार्य सुरूच ठेवत या बालकांसाठी त्यांनी आपले आयुष्य समर्पित केले आहे. या सगळ्यासाठी आपलं घरदार सोडणाऱ्या रवी बापटले यांचा प्रवास हा प्रत्येकासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.

 

प्रसारण–  झी मराठी वाहिनीवर ६ ऑगस्ट सकाळी ११.३० वा.

अहिंसेसाठी देखील क्रांतीची गरज असते- आचार्य बालकृष्ण

0

पुणे : “तुमचा संकल्प, तुमचे लक्ष्य तुम्हाला स्वत:लाच पूर्ण करावे लागते. त्यासाठी दुसरा कोणी येणार नाही. आपल्या दुखर्‍या बाजू आपल्याला आपल्या ध्येयापासून विचलित करतात. तसे व्हावयाचे नसेल तर त्यासाठी अधात्माचा आधार घावा. अधात्म्य आपल्याला अहिंसा शिकविते पण शेवटी अहिंसेसाठी देखील क्रांतीचीच गरज असते.” असे मत हरीद्वार येथील पतंजली योगपीठाचे सहसंस्थापक आणि पतंजली आयुर्वेद लि.चे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण यांनी काढले. डॉ. विश्‍वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी तर्फे विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी डॉ. विश्‍वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड, विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड, कुलगूरू डॉ. जय गोरे, पतंजली योगपीठाचे ज्येष्ठ कार्यकारिणी सदस्य रामकुमार राठी, हरीद्वार येथील पतंजली योगपीठाच्या कार्यकारिणीचे सदस्य व औद्योगिक विषयांचे मुख्य केंद्रीय समन्वयक हरिभाई शाह, आघाडीचे स्थापत्य विशारद पद्मभूषण हाफीज कॉन्ट्रॅक्टर, प्रा.डी.पी. आपटे हे उपस्थित होते.
आचार्य बालकृष्ण म्हणाले, “आपला देश हे प्रतिभासंपन्न राष्ट्र आहे. मात्र येथे विकृती असणारेही लोक आहेत. शेवटी आपणच ठरवायचे की आपण कशाचा स्वीकार करायचा. आपले जीवन हे एका इमारतीसारखे असते. या इमारतीमध्ये अडचणरूपी किंवा विकृतीरुपी एखादी वीट असते जी तुमची संपूर्ण इमारत ढासळण्यासाठी कारणीभूत होऊ शकते. त्यामुळे आपल्या आयुष्यात अशा विटा राहणार नाहीत याची काळजी घ्या. ”
“दान करणे ही आपली संस्कृती आहे. मात्र पाश्‍चात्यांचे अनुकरण करून आपणही मला काय मिळणार, अशी धारणा करून घेतली आहे. स्व-सामर्थ्याच्या जोरावर आपण समाजाला काहीतरी देण्यासाठी झटले पाहिजे. जगाच्या उन्नतीसाठी आपण प्रयत्न करणे गरजेचे आहे. प्रतिकूलतेचा सामना करण्यासाठी सहनशीलता, धैर्य हे गुण आवश्यक आहेत मात्र हे गुण कोणत्याही पाठ्यपुस्तकात शिकविले जात नाहीत. त्यासाठी अध्यात्माचाच आधार घ्यावा लागतो.”
प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड म्हणाले, “विज्ञान आणि अध्यात्म यांच्या समन्वयानेच विश्‍वशांती नांदेल हे स्वामी विवेकानंदांचे वचन शिरोधार्य मानून मूल्याधिष्ठित वैश्‍विक शिक्षणपद्धतीची जगाला गरज आहे.”
प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड यांनी प्रास्ताविक केले. प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचलन केले. प्रा. डी.पी. आपटे यांनी आभार मानले.
जनसंपर्क विभाग,
माईर्स एमआयटी, पुणे.

दत्ता कोहीनकर यांनी दिला आदर्श जीवनशैलीविषयी यशाचा कानमंत्र

0

पुणे-‘सूर्यदत्ता एज्युकेशन फाऊंडेशन’चे संस्थापक व अध्यक्ष डॉ. प्रा. संजयजी चोरडिया व उपाध्यक्ष तथा सचिव सौ. सुषमाजी चोरडिया यांच्या नेतृत्वाखाली वाटचाल करणाऱ्या ‘बन्सी-रत्न चॅरिटेबल ट्रस्ट’च्या वतीने ‘आदर्श माता-पिता राष्ट्रीय पुरस्कार २०१७’ सोहळा  पुण्यातील महावीर प्रतिष्ठान येथे संपन्न झाला. याप्रसंगी श्री. दीपचंदजी पारख व सौ. सुदर्शनाजी पारख यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष ‘अँटी इंडिया अँटी टेररिस्ट फ्रंट’चे (एआयएटीएफ) अध्यक्ष श्री. एम. एस. बिट्टाजी यांच्या हस्ते ‘बन्सी-रत्न चॅरिटेबल ट्रस्ट आदर्श माता-पिता राष्ट्रीय पुरस्कार २०१७’ देऊन गौरवण्यात आले.कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते व पुण्यातील विपश्यना सेंटरचे अध्यक्ष डॉ. दत्ता कोहीनकर यांनी प्रेक्षकांना जीवनावश्यक मूल्यांबाबत मार्गदर्शन केले आणि पूर्वजांनी जपलेल्या संस्कारांचे अवलोकन करण्याची विनंती केली.

श्री. दीपचंदजी पारख नामवंत उद्योजक म्हणून प्रसिद्ध आहेत. सामाजिक कार्यकर्ते आणि आदर्श व्यक्तीमत्व ही त्यांची अजुन एक ओळख आहे. त्यांनी आपल्या कारकीर्दीचा प्रवास खेडेगावातील एका लहानशा किराणा माल दुकानापासून सुरु केला आणि आज ते देशातील नावाजलेल्या उद्योजकांपैकी एक आहेत. प्रामाणिकपणा, ग्राहकांचे समाधान होईपर्यंत सेवा देण्याचा सकारात्मक दृष्टीकोन दूरदृष्टी, सामाजिक संवेदनशीलता आदी गुणांच्या जोरावर त्यांनी उद्योजकतेच्या वाटेवरील प्रवास सफल करुन दाखवला.

दीपचंदजींना संसारात तितकीच समर्थ साथ पत्नी सौ. सुदर्शनाजी पारख यांनी दिली. सौ. सुदर्शनाजींच्या आदर्श तत्त्वांची प्रतिमा दीपचंदजींच्या जीवनातही जाणवल्यावाचून राहात नाही. अतिशय निःस्वार्थी व प्रेमळ साथ सौ. सुदर्शनाजी यांनी केवळ दीपचंदजींनाच नव्हे, तर संपूर्ण कुटूंबाला दिली आहे.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना दीपचंदजी पारख म्हणाले, “नामवंत शिक्षण संस्थेकडून मला मिळालेला हा पहिला पुरस्कार आहे. मी डॉ. संजयजी चोरडिया व त्यांच्या कुटूंबियांचे आभार मानतो आणि आपणा सर्वांचा ऋणी राहून यापुढेही समाजसेवेत सतत कार्यरत राहण्याची ग्वाही देतो.”

दीपचंदजी व सौ. सुदर्शनाजी यांच्या स्नुषा सौ. राजश्री पारख यांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त करुन उभयतांबद्दलचे प्रेम, आदर, प्रेरणा व जिव्हाळा व्यक्त केला.

याप्रसंगी डॉ. प्रा. संजयजी चोरडिया म्हणाले, “कै. श्री. बन्सीलालजी चोरडिया आणि कै. सौ. रतनबाईजी चोरडिया यांनी पालक म्हणून खऱ्या अर्थाने माझ्या आयुष्यात प्रेरणा जागृत केली. माझे वडील अतिशय शिस्तप्रिय, सामाजिक जाणीव असलेले, प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ व आदर्श पिता होते. आई-वडिलांच्या आठवणीप्रीत्यर्थ व त्यांना आदरांजली म्हणून दरवर्षी आदर्श माता-पिता राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्याचे आम्ही ठरवले. या पुरस्काराच्या माध्यमातून गौरवलेल्या आदर्श माता-पित्यांमध्ये मी माझ्या आई-वडिलांची प्रतिमा बघतो.”

कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील व्यक्ती, शिक्षण, उद्योग व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी, पालक, पुरस्कारार्थींचे नातेवाईक, मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी कार्यक्रमाला मनापासून शुभेच्छा दिल्या.

महापालिकेतील अमर अकबर अँथोनी चे आंदोलन कशासाठी पहा (व्हिडीओ)

0

पुणे- महापालिकेतील नगरसेवकांचे एक त्रिकुट फारच गाजते आहे .ज्यांना आता अमर अकबर अंथोनी म्हटले जावू लागले आहे . सभागृहात एकत्र ,पालिकेत एकत्र , समस्यांवर भांडण्यासाठी एकत्र असलेले हे 3 नगरसेवक अर्थात आंदोलनेही एकत्रच करीत आले आहेत . आज त्यांनी महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात येणारे शालेय गणवेश परिधान करून पालिकेत प्रवेश केला आणि स्थायी समितीच्या बैठकीत अचानक जावून हे आंदोलन केले .पहा कशासाठी कसे केले हे आंदोलन ….कोण आहेत हे नगरसेवक ….

पारंपारिक ज्ञानाला नवनिर्मितीची जोड द्या! डॉ. फुरकन कमार यांचे मत

0
पुणे, दि. 1 ऑगस्ट  : “आपण अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असतो. परंतू फक्त पुस्तकी ज्ञान घेऊन पदवी संपादन करतो. एवढ्यावरच न थांबता नवनिर्मिती करणे गरजेचे आहे. पारंपारिक ज्ञानाला नवनिर्मितीची जोड दिल्यास जीवनामध्ये आपण यशस्वी होऊ शकतो,” असे मत भारतीय विद्यापीठ संघाचे महासचिव डॉ. फुरकन कमार यांनी व्यक्त केले.  राजबाग, लोणी-काळभोर येथील एमआयटी आर्ट, डिझाईन अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या एमआयटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंगच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी एमआयटी आर्ट, डिझाईन अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड हे होते.
साऊथ आशियाच्या ग्लोबल सप्लाय चेनच्या मनुष्यबळ विभागाचे संचालक श्री. कंदी सिताराम व इकोले सॉलिटिअरचे संस्थापक संचालक श्री. मिनोचर पटेल हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी माईर्स एमआयटीचे संस्थापक सहविश्‍वस्त प्रा.पी.बी.जोशी, माईर्स एमआयटीचे अधिष्ठाता प्रा.शरद्चंद्र दराडे-पाटील, सौ. उषा विश्‍वनाथ कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश तु. कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. सुनिल राय, डॉ. सुनिल कराड, प्रा. सौ. सुनिता मंगेश कराड, प्रा.सौ.स्वाती चाटे, सौ. ज्योति ढाकणे व एमआयटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. किशोर रावंदे हे उपस्थित होते.
डॉ. फुरकन कमार म्हणाले, “पूर्वीच्या काळी उच्च शिक्षणात मुलींचे प्रमाण फार कमी होते. परंतू आजची परिस्थिती पाहता मुलांच्याबरोबर मुली उच्चशिक्षण घेत आहेत ही गोष्ट समाजाच्या व देशाच्या हिताची आहे. पण आज संपूर्ण भारतातील उच्च शिक्षण देणार्‍या संस्था मोठ्याप्रमाणावर आहेत. त्याचप्रमाणे आठशेच्या आसपास विद्यापीठेही आहेत. यामध्ये 40 हजारांहून अधिक महाविद्यालये असून या महाविद्यालयाच्या पटसंख्येचा विचार केला असता, याचे मूळ शोधत असताना असे लक्षात येते की, काही महाविद्यालयांत गुणवत्ता नाही  व काहींकडे अनुभविक प्राध्यापक नाहीत. व काही महाविद्यालयांकडे पायाभूत सुविधा नाहीत. त्यामुळे इंजिनिअरिंग व मेडिकलमधील जागा रिकाम्या आहेत. भविष्यात गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण देणारी महाविद्यालयेच टिकू शकतील.”
कंदी सिताराम म्हणाले, “आपण चार वर्षे या महाविद्यालयात शिक्षण घेणार आहात. त्यामुळे आपण पुस्तकी ज्ञान तर मिळवाच, परंतू त्याबरोबर खेळ, सामाजिक बांधिलकी या ही गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत. आज तंत्रज्ञानाची झापाट्याने वाढ होत आहे. ते तंत्रज्ञानही आत्मसात करून आपले ज्ञान वाढविण्याची आवश्यकता आहे. नव नविन कल्पनेचा वापर करून छोटे छोटे प्रकल्प तयार करणे गरजेचे आहे. त्यातूनच आपला सर्वांगीण विकास होईल.  उद्योगधंद्याला लागणारे कुशल मनुष्यबळ एमआयटी एडीटी या विद्यापीठातून निर्माण होणार आहे. ते शिक्षणसंस्था आणि उद्योगधंद्यांमधील दरी भरून काढण्याचे कामकरीत आहे.”
मिनोचर पटेल म्हणाले, “भारत हा जगात सुपरपॉवर होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. अशा वेळी आपण उच्च शिक्षण घेत आहात. सर्वप्रथम तुम्ही स्वतःला विकसित करा. त्याचबरोबर बौध्दिक कौशल्य, कल्पना, परिश्रम व गुणवत्ता हे गुण  आत्मसात करा. बुध्यांक, भावनांक, नितीमत्तांक व आत्मांक या चार बाबी आपल्या जीवनात उतरविण्याची आवश्यकता आहे.”
प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड म्हणाले,“चारित्र्य, शिस्त आणि स्वच्छता या गोष्टींकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. विज्ञान, अध्यात्म आणि तंत्रज्ञानाची जोड देऊन विद्यार्थी घडविण्याचे काम या विद्यापीठामार्फत केले जात आहे. भारतीय संस्कृती, परंपरा व तत्त्वज्ञान आपल्याला माहित असणे आवश्यक आहे. या अभ्यासक्रमाबरोबरच थोर महापुरूष, संत व तत्त्वज्ञान्यांच्या चरित्राचा अभ्यास करावा.”
प्रा.डॉ. मंगेश तु. कराड म्हणाले,“या विद्यापीठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी आम्ही नवीन तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रम तयार केला असून, उद्योगधंद्याला लागणारे कुशल मनुष्यबळ निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
डॉ.सुनिल राय यांनी प्रास्ताविक केले.
 प्रा.स्वप्निल शिरसाट व प्रा.पायल शहा यांनी सूत्रसंचालन केले.
डॉ. किशोर रवंदे यांनी आभार मानले.
विश्‍वशांती प्रार्थनेने कार्मक्रमाची सुरुवात होऊन राष्ट्रगीताने सांगता झाली.