Home Blog Page 3298

“द ग्रेट पुणेरी कुक-ऑफ” ६० शेफ मध्ये रंगणार स्पर्धा अमनोरा मॅाल मध्ये स्पर्धेचे आयोजन

0

पुणे, १६ ऑगस्ट, २०१७: “द ग्रेट पुणेरी कुक-ऑफ” या अंतिम पाककृती स्पर्धेचे आयोजन अमनोरा मॉलच्या फूड कोर्ट येथे होणार असून या स्पर्धेत एका पेक्षा एक सरस असे ६०  शेफ भाग घेणार असून ‘सेलिब्रिटी टेस्ट बड्स’ ही पदवी जिंकण्यासाठी त्यांच्यात स्पर्धा होईल. या स्पर्धेचे आयोजन येत्या १९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ६ च्या दरम्यात करण्यात येणार आहे.

या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांना थेट स्वयंपाकघरातील उत्कृष्ट पाककला पहावयास मिळेल. ही रोचक स्पर्धा अनुभवतानाच या स्पर्धेचे परीक्षक सेलिब्रिटी शेफ शैलेंद्र यांच्याकडून उपस्थितांस पाककृतीतील काही टिपा सुद्धा मिळणार आहेत.

पुणेकरांच्या पसंतीचे शॉपिंग डेस्टिनेशन असणाऱ्या अमनोरा मॉल येथे “द ग्रेट पुणेरी कुक-ऑफ” येथे स्पर्धकांना प्रेरित करण्यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यातआहे.

Lucknow Central’s band performed at Yerwada Jail for a special event

The team of ‘Lucknow Central’ celebrated Independence day by performing at the Yerwada jail in Pune.

‘Lucknow Central’ starring Farhan Akhtar, Gippy Grewal, Deepak Dobriyal, Diana Penty, Rajesh Sharma, Inaam-ul-Haq and Ronit Roy is a story of a group of prisoners forming a music band to escape. Captivating the essence of the film, the team of ‘Lucknow Central’ organized a special event at Yerwada jail, Pune.

The film depicts the journey of an innocent man who aspired to be a singer but is caught in the wrath of fate, wherein he lands in Lucknow Central jail after falsely being accused of a murder. There he, along with his fellow in mates, drafts a plan to escape the jail in the disguise of a music band.
The entire cast of the film, including Farhan Akhtar, Diana Penty, Ravi Kishan, Ronit Roy, Deepak Dobriyal, Rajesh Sharma, Inaam-ul-Haq were present at the event along with director Ranjit Tiwari and composers Arjunna Harjie and Rochak Kohli.
The event was also graced by the presence of Dr. Bhushan Upadhay- Additional Director General of Police, Swati Sathe- DIG prisons, UT Pawar- Superintendent of Prison, Yerwada Central Prisons. Along with the film’s team, the stage also saw Nitin Arole, an inmate, Prabhakar Mali- Male constable and female constable Pratibha, performing on stage.
While every year the jail inmates have a special function to celebrate the Independence day, the team of ‘Lucknow Central’ surprised the in mates by paying a visit this year. It was for the first time that an event on such a large scale was organised for the jail in mates.
The film stars Farhan Akhtar playing the role of an aspiring singer Kishen Mohan Girhotra whose life turns upside down when he gets wrongly charged with a murder, and is sent to Lucknow Central jail.
‘Lucknow Central’ being so heavily inclined towards music, the makers hit the right chord by organizing a special event at Yerwada, where in the cast performed on songs like a professional band.
Produced by Viacom18 Motion Pictures and Emmay Entertainment and Motion Pictures, the film is directed by Ranjit Tiwari and is slated to release on 15th September 2017.

वीर गोगादेव जन्मोत्सवानिमित्त लष्कर भागात २८ निशाणाची मिरवणूक उत्साहात संपन्न

0

पुणे-वीर गोगादेव जन्मोत्सवानिमित्त लष्कर भागात २८ निशाणाची मिरवणूक उत्साहात संपन्न झाली . वीर गोगादेव जन्मोत्सव समितीच्यावतीने नवा मोदीखाना येथून अशोक भगत संघेलिया या निशाणाची पूजा करून या मिरवणुकीस प्रारंभ परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त डॉ. प्रविण मुंढे यांच्याहस्ते करण्यात आला . हि मिरवणूक नवा मोदीखाना , सेंटर स्ट्रीट , भोपळे चौक , साचापीर स्ट्रीट , महावीर चौक , महात्मा गांधी रस्ता , संत नामदेव चौक , मोहम्मद रफी चौक , वीर गोगादेव चौक , पंधरा ऑगस्ट चौक , वजीर भगत संघेलिया चौकाजवळील गोगामेढी येथे मिरवणुकीची सांगता झाली .या मिरवणुकीमध्ये पारंपरिक वाद्ये , बॅण्डपथक , लेझीम आदी पथके सहभागी झाली होती . तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभुषेत श्याम बोत्रे यांनी तलवारीची प्रात्यक्षिके करून दाखविली . 

या मिरवणुकीमध्ये महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे , महापौर मुक्ता टिळक ,पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष अतुल गायकवाड , खासदार वंदना चव्हाण , पुणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे , माजी आमदार मोहन जोशी , बाळासाहेब शिवरकर , बापूसाहेब गानला , बाप्पुसाहेब भोसले ,नगरसेवक दिलीप गिरमकर , नगरसेवक सुनिल कांबळे , नगरसेवक रफिक शेख , नगरसेविका मनिषा लडकत ,  नगरसेविका लता राजगुरू , डॉ. पनीकर सुधाकर  दास , कविराज संघेलिया , सुरेश मकवानी , विक्रम गोहेर ,किशोर संघेलिया ,  रणजित परदेशी , मन्नू कागडा , शैलेश म्हेत्रे ,  विनोद निनारिया , भिकाचंद मेमजादे , नरोत्तम चव्हाण , डॉ. अनुप बेगी , शैलेंद्र जाधव , दीपक उमंदे , मेघराज पवार आदी मान्यवर सहभागी झाले होते .

या मिरवणुकीमधील निशाणप्रमुखांचे स्वागत पुणे कॅन्टोन्मेंट शांतता समितीच्यावतीने श्रीफळ  व पुष्पहार देउन बाप्पुसाहेब गानला , दिलीप भिकुले , विकास भांबुरे , विजय भोसले , बलबीरसिंग कलसी यांनी केले . तसेच भारतीय जनता पार्टी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाच्यावतीने उभारण्यात आलेल्या स्वागत कक्षात जयप्रकाश पुरोहित व संतोष इंदूरकर यांनी निशाणप्रमुखांचे स्मृतीचिन्ह देयून स्वागत केले . तसेच  पुणे महापालिकेच्या वतीने महापौर मुक्ता टिळक यांनी निशाण प्रमुखांचे स्मृतींचिन्ह देयून स्वागत केले .  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व स्वराज्य निर्माण सेनेच्यावतीने देखील स्वागत करण्यात आले . या मिरवणुकीमध्ये पुणे लष्कर , हरकानगर , मंगळवार पेठ , मोहम्मदवाडी , खडकमाळ आळी , ससून कर्मचारी वसाहत , येरवडा , कोरेगाव पार्क बर्निंग घाट , घोरपडी , रामटेकडी , वानवडी व फुलेनगर आदी भागामधील निशाण सहभागी झाले होते . यावेळी वीर गोगादेव स्पोर्ट्स संस्थेच्यावतीने देशभक्तीपर तसेच धार्मिक संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . यावेळी संस्थेच्यावतीने भाविकांना महाप्रसादाचे आयोजन केले होते . या कार्यक्रमाचे आयोजन  वीर गोगादेव स्पोर्ट्स संस्थेचे अध्यक्ष योगेश चव्हाण आणि जयकुमार राघवचारी यांनी केले होते . गोगामेढी येथे सर्व निशाण एकत्रित येऊन निशाणाची पूजा करून आरती करण्यात येऊन या मिरवणुकीची सांगता झाली . यावेळी गोगामेढीला एल इ डीची आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती .

विश्वशांतीसाठी सुमारे ९०० लहान मुलांची सामूहिक प्रार्थना

0

पुणे -नवकार फ्रेंड्स सर्कलच्यावतीने विश्वशांतीसाठी सुमारे ९०० लहान मुलांनी सामूहिक प्रार्थना  केली .गुरुवार पेठमधील श्री नाकोडा भैरव जैन धर्मशाळेमध्ये सामूहिक  प्रार्थना झाली . हि  उत्तरप्रदेशमध्ये मृत्युमुखी पडलेल्या लहान मुलासाठी देखील हि  प्रार्थना करण्यात आली . प. पू. आचार्यदेव श्री शांतीचंद्र सुरीश्वरजी म. सा. यांच्या मार्गदर्शनाखाली हि  प्रार्थना करण्यात आली . नवकार फ्रेंड्स सर्कलला २१ वर्ष पूर्ण झाले आहे.त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .अशी माहिती नवकार फ्रेंड्स सर्कलचे संस्थापक हिराचंद राठोड यांनी दिली .

       यावेळी  सामूहिक  प्रार्थनामध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक मुलाला बॅग भेट देण्यात आली . तसेच तीन मुलांना लकी ड्रा काढण्यात आला . यामध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस वैजन ओसवाल , व्दितीय क्रमांकाचे बक्षीस तीर्थ ओसवाल तर तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस वीरेन ओसवाल यांनी जिंकले . या तिघांना गांधी ज्वेलर्सचे प्रकाश हुकूमचंद गांधी यांनी सायकल व बॅग बक्षीस दिली. तर रवीनंदा ग्रुपच्यावतीने सर्व मुलांना  बॅग भेट देण्यात आल्या .

      या सामूहिक प्रार्थनेचे आयोजन नवकार फ्रेंड्स सर्कलचे अध्यक्ष हस्तीमल पालेशा , उपाध्यक्ष मनोज ओसवाल , सचिव धनपाल जैन , खजिनदार हितेश जैन , जॅकी जैन , जितेन्द्र राठोड , प्रविण गुंदेशा , विमल ओसवाल , सुनिल जैन , महेंद्र पुनमिया , जयेश जैन , निखिल जैन , प्रविण बाफना , विपुल शहा , पियुष जैन , कमलेश जैन , चेतन ओसवाल , नितेश जैन , निखिल मेहता आदींनी विशेष परिश्रम घेतले .

स्वातंत्र्यदिन सुराज्यासाठी सर्वाधिक उत्साह देणारा सण – आबा बागुल

0

पुणे- स्वराज्य मिळवून देणारा स्वातंत्र्यदिनाचा सण खरा.. तोच सर्वाधिक उत्साह देणारा आणि आपल्या देशवासियांमध्ये रमून सुराज्याची वाटचाल सुकर करण्यासाठी प्रेरणा देणारा असा सन आहे असे येथे माजी उपमहापौर आबा बागुल यांनी सांगितले .
पहा त्यांनी काढलेल्या स्वातंत्र्यदिन रॅलीची एक अल्पशी व्हिडीओ झलक

शनिवारवाड्यावर जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या हस्ते ध्वजारोहण

0

 

पुणे, दि.15- स्वातंत्र्य   दिनाच्या  70 व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारवाड्यावर सकाळी 7.30 वाजता जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.

याप्रसंगी अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, उपजिल्हाधिकारी सर्वश्री, शंकरराव जाधव, मोनिका सिंग, दिनेश भालेदार, ज्योती कदम, महसूल आणि इतर विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी तसेच नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री गिरीश बापट यांच्याहस्ते पुण्यात मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न

0

पुणे, दि. १५ –  भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापना दिनानिमित्त पालकमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्याहस्ते आज विधान भवनाच्या प्रांगणात उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजवंदन झाले. विधान भवन परिसरात सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी ध्वजवंदनाचा शानदार समारंभ पार पडला.

पालकमंत्री गिरीश बापट यांचे सकाळी नऊ वाजता विधानभवन येथे आगमन झाले. विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांनतर पालकमंत्र्यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजवंदनानंतर पालकमंत्री गिरीश बापट यांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, प्रशासकीय अधिकारी आणि नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकांसह महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, खासदार अमर साबळे, आमदार भिमराव तापकीर, आमदार माधुरी मिसाळ, आमदार शरद रणपिसे, आमदार जयदेव गायकवाड, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, जिल्हाधिकारी सौरभ राव,अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, पदाधिकारी, नागरिक, पत्रकार मोठया संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्र्यांनी ध्वजारोहण करू नये म्हणू आंदोलन , बाबा आढाव यांच्यासह आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

0

पुणे-शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी पुण्यात मंगळवारी सुकाणू समितीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. पालकमंत्र्यांना ध्वजारोहण करु देणार नाही, असा पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतला होता. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हा शेतकरी संघटनेच्या सुकाणू समितीचे कार्यकर्ते सकाळी रस्त्यावर उतरले. पुणे स्टेशन येथील साधू वासवानी चौकात सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अनुचित प्रकार टाळण्यासाठी बाबा आढाव यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

विधान भवनात पालकमंत्री गिरीश बापट यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यापेक्षा एखाद्या शेतकरी किंवा शहीद जवानाच्या कुटुंबीयांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात यावे, अशी मागणी सुकाणू समितीच्या कार्यकर्त्यांनी केली. यावेळी बाबा आढाव म्हणाले की, शेतकयांना न्याय देण्यात हे सरकार अपयशी ठरले असून आज स्वातंत्र्य दिनी या अपयशी सरकारमधील कोणत्याही मंत्र्यांनी ध्वजारोहण करता कामा नये, अशी मागणी केली. तसेच शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत. तोपर्यंत हा लढा चालू राहणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

पोलीस दलाच्या पुण्यातील 13 अधिकारी व कर्मचा-यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर

0

पुणे पोलीस, ग्रामीण व लोहमार्ग पोलीस दल तसेच कारागृहातील 13 अधिकारी व कर्मचा-यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे. 

पदक जाहीर झालेल्या पोलिसांची नावे व पद

बाळशीराम गणपथ गायकर (पोलीस उपायुक्त, मुख्यालय एक, पुणे शहर), विवेक वसंत मुगळीकर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पिंपरी),  कैलास शंकर मोहोळ (सहाय्यक फौजदार, सिंहगड पोलीस ठाणे), राजकुमार दौलत माने (सहाय्यक फौजदार, मोटार परिवहन विभाग, पुणे शहर), सुरेश रामचंद्र जगताप (सहाय्यक फौजदार, वाहतूक शाखा), चंद्रकांत किसन रघतवान (सहाय्यक फौजदार, वारजे पोलीस ठाणे), प्रकाश केशव लंघे (पोलीस हवालदार, कोरेगाव पार्क), पुणे ग्रामीण पोलीस दलातील सर्जेराव बाजीराव पाटील (पोलीस निरीक्षक, लोणीकंद पोलीस ठाणे), राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक एक व दोनमधील प्रकाश पांडुरंग नाईक (सहाय्यक फौजदार गट क्रमांक 1) व सदशिव प्रभु शिंदे (सहाय्यक फौजदार गट क्रमांक 2)

तर येरवडा खुले जिल्हा कारागृहात कार्यरत तुरुंग अधिकारी प्रकाश बाबुराव उकरंडे व कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहाचे पोलीस हवालदार रमेश परशुराम धुमाळ यांना महाराष्ट्र कारागृह विभागातील गुणवत्ता सेवेबाबतचे सुधारसेवा पदक जाहीर झाले आहे.

वंदेमातरम चां प्रस्ताव कोणी , का ढकलला पुढे ?

0

पुणे- महापालिकेच्या शाळेत वंदेमातरम गीत व्हायला हवे असा शिवसेनेच्या 3 नगरसेवकांनी आज महापालिकेच्या पक्ष नेत्यांच्या सभेपुढे ठेवलेला प्रस्ताव पुढे ढकलण्यात आला आहे  या संदर्भात शिवसेनेचे गट नेते संजय भोसले यांनी काय सांगितले ऐका …

आता तुकाराम मुंडे चुकले, आता त्यांना करा सस्पेंड ..अरविंद शिंदेंची मागणी

0

पुणे- अनेक कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावर थेट निलंबनाची  कारवाई करणाऱ्या पीएमपीएमएल चे अध्यक्ष  व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंडे यांनी हि शासकीय नियमावलीचा भंग केला आहे ,आता त्यांना सस्पेंड करा .. अशी मागणी कॉंग्रेसचे गट नेते अरविंद शिंदे यांनी केली आहे . ..पहा त्यांनी नेमके काय म्हटले आहे .

स्वप्नील-लीना जोडीने केले ‘तुला कळणार नाही’ सिनेमाचे टायटल सॉंग लॉंच

0

नवरा – बायकोच्या नात्यात एक अजब रसायन असते. ज्यात प्रेमाचा गोडवा, नात्याचा ओलावा आणि जबाबदारीचा तीखटपणादेखील असतो. संसारातील स्वानुभवातून तयार झालेले हे रसायन इतरांना कळेलच असे नाही! अश्या या गोंडस नात्याची गुजगोष्ट मांडणारा ‘तुला कळणार नाही’ हा सिनेमा येत्या ८ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच या सिनेमाच्या पोस्टरचे आणि शीर्षक गीताचे संताक्रुझ येथील लाईटबॉक्समध्ये अनावरण करण्यात आले.
वैवाहिक दाम्पत्यांवर आधारित हा सिनेमा असल्यामुळे, चित्रपटाच्या संपूर्ण स्टारकास्टच्या उपस्थितीत स्वप्नील आणि लीना या जोशी दाम्पत्यांनी सिनेमाचे शीर्षक गीत लॉंच केले. सक्षम फिल्म्स आणि जीसिम्स प्रस्तूत तसेच सिनेकोर्न इंडियाचे सौजन्य लाभलेला हा सिनेमा स्वप्ना वाघमारे जोशी यांनी दिग्दर्शित केला आहे. सुबोध भावे आणि सोनाली कुलकर्णीची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाचा पोस्टरदेखील यावेळी सादर करण्यात आला. ‘मोडीत निघालेल्या ओढीची… गोष्ट वेड्या जोडीची…’ असे सबटायटल असलेल्या या पोस्टरवर सुबोध आणि सोनालीला बांधले असल्याचे दिसून येत असून, प्रत्येक घराघरातील नवरा बायकोची केमिस्ट्री आपल्याला यात पहायला मिळते. या सिनेमाच्या शीर्षकगीतामध्येदेखील हीच केमिस्ट्री दिसून येते. रोमेंटिक बाज असलेल्या या शीर्षकगीताचे बोल क्षितीज पटवर्धन यांनी लिहिले असून, संगीतदिग्दर्शन अमितराज यांनी त्याला चाल दिली आहे. स्वप्नील बांदोडकर आणि नेहा राजपाल या गोड गळ्याच्या
गायकांचा आवाज लाभला आहे. नवरा-बायकोच्या नात्यातील अबोल प्रेम दाखवणारे हे गाणे, विवाहित दाम्पत्यांसाठी खास असणार आहे.
विशेष म्हणजे, या कार्यक्रमाची सुरुवातच सुबोध आणि सोनालीच्या जुगलबंदीने झाली. नवरा बायकोत उडणारे हलके फुलके खटके अगदी गमतीदार पद्धतीने मांडत त्यांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली. या सिनेमाद्वारे स्वप्नील जोशी निर्मात्याच्या भूमिकेतून लोकांसमोर येत असून, अनेक सुपरहिट सिनेमांचे वितरक आणि निर्माते असलेल्या जीसिम्ससोबत तो या पुढील प्रवासातदेखील निर्माता म्हणून कायम राहणार आहे. श्रेया योगेश कदम, अर्जुन सिंग बरन आणि कार्तिक निशानदार यांची निर्मिती आणि निरव शाह, इलाची नागदा आणि जयेश मुझुमदार यांची सहनिर्मिती असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना मनोरंजनाची खुमासदार मेजवानी देण्यास येत आहे.

खासदार अनिल शिरोळे यांच्या विकास निधीतून नुमविला २० संगणक भेट

0

पुणे- शिक्षण प्रसारक मंडळी च्या बाजीराव रस्त्यावरील नू. म. वि मुलांची शाळेस आज खासदार अनिल शिरोळे ह्यांच्या स्थानिक विकास निधीतून २० संगणक आणि २ प्रिंटर भेट देण्यात आले. तंत्रद्यानाच्या वापरातून संगणक साक्षरतेच्या मदतीने मुलांनी अधिकाधिक प्रगति करावी असे आवाहन शिरोळे ह्यांनी ह्या प्रसंगी बोलताना केले. ह्या कार्यक्रमास संस्थेच्या नियमक मंडळाचे उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे, सदस्य रघुनाथ देसाई, पी पी कुलकर्णी, अशोक वझे, मुख्याध्यापिका संजीवनी ओमासे, धनंजय देशमुख, पालक प्रतिनिधी मच्छिंद्र सातव आदि उपस्थित होते.

आशिया-पॅसिफीक रॅली मालिका 2017 मलेशियन रॅलीत संजय टकलेंची बाजी …

0
पुणे ः पुण्याचा आंतरराष्ट्रीय रॅली ड्रायव्हर संजय टकले याने आशिया-पॅसिफीक रॅली मालिकेतील मलेशियन रॅलीत दुसरा आणि आशिया करंडक गटात चौथा व एकुण क्रमवारीत सहावा क्रमांक मिळविला. पहिल्या दिवशी केवळ दोन किलोमीटर बाकी असताना कार भरकटल्यानंतर त्याने दुसऱ्या दिवशी रीस्टार्ट करीत रॅली पूर्ण केली.
मलेशियातील जोहोर बारू प्रांतात ही रॅली शनिवारी-रविवारी पार पडली. संजयने एम्पार्ट या नव्या संघाचे प्रतिनिधीत्व केले. जपानची नोरीको ताकेशिता त्याची नॅव्हीगेटर होती. संजयने मित्सुबिशी मिराज आर 5 ही जास्त वेगवान आणि शक्तीशाली कार चालविली. टेस्टींग आणि सरावाशिवाय त्याला रॅली सुरु करावी लागली. शुक्रावारी सकाळी त्याला शेकडाऊनमध्येही भाग घेता आला नव्हता.
शनिवारी संजयची कार सातव्या स्टेजमध्ये उजव्या वळणावर भरकटली. वेगामुळे टायरची आतील बाजूची ग्रीप कमी झाली. त्यातून सावरण्याच्या प्रयत्नात बाजूला खणलेल्या जागेत दोन्ही चाके गेली. ही जागा खोल असल्यामुळे संजयला कार बाहेर काढता आला नाही. पहिल्या दिवसातील ही शेवटची स्टेज होती. ती संपण्यास केवळ दोन किलोमीटर बाकी असताना हे घडले. त्यामुळे संजयला सुपर रॅलीमध्ये भाग घ्यावा लागला. त्याला रीस्टार्ट करावे लागले. अखेरच्या स्पर्धकाच्या पेनल्टीमध्ये एका तासाची भार घालून त्याला तसे करण्याची परवानगी मिळाली. शेवटची स्टेज पूर्ण न केलेल्या स्पर्धकाला अशी पेनल्टी बसते. त्यावेळी संजय मलेशियन रॅलीत चौथा, तर एपीआरसीमध्ये सहावा होता. रविवारी दुसऱ्या दिवशी त्याने सहावा क्रमांक कायम राखला, तर मलेशियन रॅलीत दुसऱ्या क्रमांकापर्यंत मजल मारली.
गेली काही वर्षे एपीआरसी पातळीवर पूर्ण मालिकेत सहभागी होणाऱ्या संजयने या मोसमात पॅसिफीक विभागातील न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया येथील फेऱ्यांत भाग घेतला नाही. गेल्या मोसमापर्यंत तो जपानच्या कुस्को रेसिंग संघाचे प्रतिनिधीत्व करीत होता. यंदा त्याने एम्पार्ट संघाशी करार केला. त्याने मित्सुबिशी मिराज आर 5 ही नवी कार खरेदी केली. त्यादृष्टिने पूर्वतयारीवर भर देण्याकरीता त्याने केवळ आशिया करंडक फेरीमध्येच भाग घेतला आहे. त्याला सात बोनस व 12 असे एकूण 19 गुण मिळाले. या गटात तो चौथ्या स्थानावर आहे.
 
वेगवान कार चालविण्याविषयी संजय म्हणाला की, ही कार चालविण्याचा अनुभव विलक्षण होता. इतकी वेगवान कार मी कारकिर्दीत पहिल्यांदाच चालविली. कार रॅलीच्या आदल्यादिवशीच स्वीडनहून मलेशियात आणण्यात आली. त्यामुळे टेस्टींग करता आले नव्हते, तसेच सरावही होऊ शकला नाही.
ही रॅली अत्यंत खडतर असल्याची प्रतिक्रिया विजेत्या ओले ख्रिस्तीयन याने व्यक्त केली. संजयचा सहकारी यारी केटोमा याने माँटे कार्लोपेक्षा या रॅलीचा मार्ग निसरडा असल्याचे मत व्यक्त केले. अशा परिस्थितीत इतकी वेगवान कार चालविण्याचे आव्हान पेलावे लागले. या कारची क्षमता जास्त आहे.
आधीच्या सुबारू इम्प्रेझा कारच्या तुलनेत तीन पट जास्त वेगाने आम्ही पुढील वळणावर येतो. साहजिकच कार चालविताना जास्त एकाग्रता साधावी लागते. मुख्य म्हणजे त्यासाठी वेगाने विचार करावा लागतो आणि निर्णयही तसाच घ्यावा लागतो. दुसरीकडे नॅव्हीगेटरला सुद्धा जास्त वेगाने पेस नोट्स वाचाव्या लागतात. मला त्याचे आकलन करून तशी कार चालवावी लागते. इतकी वेगवान कार चालविणे अनोखे तसेच काहीसे दडपण आणणारे सुद्धा आहे. त्यासाठी धाडसाने धोका पत्करावा लागतो. मी आणखी सराव करून अशी वेगवान कार चालविण्याचे कौशल्य आत्मसात करावे लागेल.
ही रॅली एमआरएफ संघाच्या ओले ख्रिस्तीयन व्हिबे याने जिंकली. त्याचा भारतीय सहकारी गौरव गील दुसरा आला.
यानंतरची फेरी 15 ते 17 सप्टेंबरदरम्यान जपानमध्ये होईल. मालिकेची सांगता 24 ते 26 नोव्हेंबर दरम्यान भारतात होईल.

“ जय वैभव लक्ष्मी पुरस्कार “ पुण्यधाम आश्रमाच्या प्रमुख श्रीमती कृष्णा कश्यप (माताजी )याना प्रदान

0

पुणे-जय वैभव लक्ष्मी फाऊंडेशनच्यावतीने यंदाचा “ जय वैभव लक्ष्मी पुरस्कार “ पुण्यधाम आश्रमाच्या प्रमुख श्रीमती कृष्णा कश्यप (माताजी )याना महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याहस्ते देण्यात आला . या पुरस्कारांमध्ये स्मृतिचिन्ह , कोंढवा येथील पुण्यधाम आश्रमाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात नालंदा विद्यापीठाचे कुलगुरू पदमभूषण डॉ. विजय भटकर , जय वैभव लक्ष्मी फाऊंडेशनचचे अध्यक्ष उल्हासदादा पवार , उपाध्यक्ष ऍड. शशिकांत पागे , सचिव प्रा. व्ही. एस. अंकलकोटे पाटील , विश्वस्त श्रीमती आशा काळे , डॉ. स्वरूप एकलुरे , मिथुन गुरव , सौरभ व्ही. अंकलकोटे पाटील , माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर नगरसेविका स्मिता वस्ते , नगरसेविका संगीता ठोसर , पुण्यधाम आश्रमचे विश्वस्त दीपक पायगुडे , घनश्याम झंवर , रमेश झंवर आदी मान्यवर उपस्थित होते .

यावेळी महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी सांगितले कि , पुण्यधाम आश्रम हे माझे आजोळ आणि घर आहे . त्यांचा भगवान शिवजींचा आशीर्वाद आहे . माताजींचे प्रत्येक कार्यपणे पुण्यधाम आश्रमात सेवा करणारी देवता आहे . त्यांच्याकडून प्रत्येकाला काम करण्याची प्रेरणा मिळते . त्यांच्या कार्याला आपण सर्वजण वंदन करू या .

यावेळी पुण्यधाम आश्रमाच्या प्रमुख श्रीमती कृष्णा कश्यप (माताजी )यांनी सांगितले कि , जीवनात आपण खूप दुःख सहन केले त्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी आपण या पुण्यधाम आश्रमाची स्थापना केली . विश्व जागृती मिशन ट्रस्टचे कार्य या आश्रमात सुरु केले . पाहता पाहता हा सामाजिक कार्याचा वटवृक्ष बहरू लागला . या माझ्या कार्याला सर्वानी प्रेम दिले . असेच काम करण्याची प्रेरणा आपल्याला ईश्वराकडून मिळो अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली .

यावेळी नालंदा विद्यापीठाचे कुलगुरू पदमभूषण डॉ. विजय भटकर यांनी देखील पुण्यधाम आश्रमाच्या प्रमुख श्रीमती कृष्णा कश्यप (माताजी ) यांच्या कार्याचे कौतुक आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले .

या कार्यक्रमाचे प्रास्तविक आणि उपस्थितांचे स्वागत  जय वैभव लक्ष्मी फाऊंडेशनचचे अध्यक्ष उल्हासदादा पवार  यांनी केले तर सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले तर आभार जय वैभव लक्ष्मी फाऊंडेशनचे सचिव प्रा. व्ही. एस. अंकलकोटे पाटील यांनी मानले . या कार्यक्रमाची वंदेमातरमने सांगता झाली .