Home Blog Page 3280

दिव्यांग व्यक्तींसाठी होणाऱ्या शिबिरासाठी काटेकोर नियोजन करावे -खासदार अनिल शिरोळे

0

पुणे, दि. 16: केंद्र सरकारच्या ‘कृत्रिम अवयव वाटप कार्यक्रम’ योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव आणि सहायकारी यंत्र प्रदान करण्यासाठी पुण्यात एक दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिरात अधिकाधिक दिव्यांग व्यक्ती सहभागी व्हावेत आणि त्यांना याचा लाभ व्हावा, यासाठी संबंधित विभागांनी काटेकोर नियोजन करावे, अशी सूचना खासदार अनिल शिरोळे यांनी केली.

विकलांग प्रशिक्षण शिबिराच्या पूर्व नियोजन बैठकीत त्यांनी ही सूचना दिली. यावेळी जिल्हाधिकारी सौरभ राव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, अपंग कल्याण विभागाचे उपायुक्त नितीन ढगे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, तहसीलदार मीनल कळस्कर तसेच संबंधित विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी खासदार श्री. शिरोळे म्हणाले, केंद्र सरकारची ही योजना दिव्यांग व्यक्तींसाठी महत्वपूर्ण आहे. या योजनेचा लाभ गरजू दिव्यांगांना मिळवून देण्यासाठी विविध शासकीय यंत्रणांची मदत घ्यावी.

जिल्हाधिकारी श्री. राव म्हणाले, पुण्यात होणाऱ्या शिबिराचा लाभ जिल्ह्यातील अधिकाधिक दिव्यांग व्यक्तींना व्हावा, यासाठी या शिबिराची माहिती गरजूंपर्यंत पोहोचायला हवी. यासाठी दिव्यांग व्यक्तींसाठी कार्यरत जिल्ह्यातील विविध स्वयंसेवी संस्था, संघटना, लोकप्रतिनिधी, शासकीय विभाग तसेच पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची मदत घेवून पात्र दिव्यांग लाभार्थ्यांची अद्ययावत यादी करावी. याबरोबरच सूक्ष्म नियोजन करुन त्यानुसार कार्यवाही करावी.

उपायुक्त श्री. ढगे यांनी शिबिरामध्ये लाभ मिळू शकणाऱ्या दिव्यांग व्यक्तींसाठी पात्रतेच्या अटींबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित दिव्यांग व्यक्ती भारताचा नागरिक असावा, त्याच्याकडे 40 टक्के अपंगत्वाचे प्रमाणपत्र हवे, मागील 3 वर्षात या योजनेचा लाभ त्याने घेतला नसावा, उत्पन्न दरमहा 15 हजार पेक्षा जास्त नसावे. अशा अटी असून ओळखपत्राचा पुरावा आवश्यक आहे, असेही श्री. ढगे यांनी सांगित

संघर्षमय जीवन जगत केला राजकारणाचा प्रवास- माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे प्रतिपादन

0
पुणे : माझ्या ४० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत मी ८ मुख्यमंत्री पाहिले. अनेक खात्यांवरील विविध पदे भूषविली. मंत्रीपद असो वा नसो सतत काम करीत राहिलो. परंतु माझ्यावर अचानक आरोप झाले आणि तब्बल एक वर्षाच्या काळात माझ्या अनेक चौकश्या झाल्या, तो वाईट काळ मी अनुभविला. यात कोणतेही तथ्य नसल्याने काहीच सापडले नाही. त्यामुळे आता मी पुढील आरोपांची वाट पहात आहे, कारण त्यामध्ये देखील काही आढळणार नाही. जनतेच्या प्रेमापोटी मी राजकारणात जीवंत असून यापुढेही जनतेची सेवा करणार आहे. त्यामुळे मी ज्याप्रमाणे संघर्षमय जीवन जगत राजकारणाचा प्रवास केला, तसा विद्यार्थ्यांनीही जीवनात संघर्ष करायला हवा, असे प्रतिपादन राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केले.
न-हे मानाजीनगर येथील जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटस्च्या २२ व्या वर्धापनदिनानिमित्त प्रा.डॉ.सुधाकर जाधवर शैक्षणिक संकुलात सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यंदाचा जीवनगौरव पुरस्कार एकनाथ खडसे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी जनता दल (यु) चे मुख्य महासचिव व राष्ट्रीय प्रवक्ता तसेच राज्यसभेचे माजी खासदार के.सी.त्यागी, आमदार भीमराव तापकीर, संस्थेचे अध्यक्ष प्रा.डॉ.सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष अ‍ॅड. शार्दुल जाधवर आदी उपस्थित होते. जाधवर करंडक स्पर्धेपासून सुरु झालेल्या विविध उपक्रमांचा समारोप वर्धापनदिनाच्या मुख्य कार्यक्रमाने झाला.
सन्मानसोहळ्यात इन्स्टिटयूट आॅफ सायन्सचे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ एन.सी.जोशी यांना शैक्षणिक क्षेत्रातील पुरस्कार आणि सुदर्शन न्यूज चॅनलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुरेश चव्हाणके यांना पत्रकारिता क्षेत्रातील पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, ग्रंथ असे पुरस्कारांचे स्वरुप होते. कार्यक्रमात संस्थेच्या सामाजिक कार्याचा अहवाल असलेले उडान भाग ३ या पुस्तकाचे प्रकाशनही झाले. तसेच जाधवर शैक्षणिक संस्था संचलित पिअरसन टेÑनिंग सेंटरचे उद््घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले.
एकनाथ खडसे म्हणाले, जीवनगौरव पुरस्कार म्हणजे त्या क्षेत्रातून निवृत्ती असे अनेकांना वाटते. मात्र, हा पुरस्कार म्हणजे माझी निवृत्ती नसून नवी सुरुवात आहे. इतरांनी यामाध्यमातून माझ्या चांगल्या कामाचे मूल्यमापन केले असल्याने कष्टाचे फलित झाल्यासारखे वाटते. त्याकाळी प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाने व कष्टाने भाजपाचे सरकार आत्ता सत्तेत आले. आज गोपीनाथ मुंडे असते, तर राज्याच्या राजकारणाची दिशा बदलली असती.
ते पुढे म्हणाले, राजकारणात चांगल्या प्रवृत्ती व विचार येत नाहीत, तोपर्यंत स्वच्छ राजकारण होणार नाही. राजकारणात शब्दावर पक्के न राहणारे अनेक लोक मी अनुभविले आहेत. सध्या हिंदुस्थान हा एकमेव देश असा आहे की, ज्याची धर्मशाळा झाली आहे. बाहेरील देशातून येथे अनेकजण येतात, त्यांना नागरिकत्त्व दिले जाते. तेच लोक आपल्यायेथे बॉम्ब टाकतात. त्यामुळे अशांना देशाबाहेर काढायला हवे.
अ‍ॅड. शार्दुल जाधवर म्हणाले, विद्यार्थ्यांमध्ये बल, बुद्धी आणि सद््विचार रुजविण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे दरवर्षी शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तिंना पुरस्काराने गौरविण्यात येते. जाधवर परिवारात असलेल्या बावीस हजार विद्यार्थी व पालक आणि सातशेपेक्षा जास्त कर्मचा-यांना प्रेरणा मिळावी, याउद्देशाने सन्मान सोहळ्याचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांना परिपूर्ण शिक्षण देत त्यांना समाजातील प्रेरणादायी व्यक्तींचे मार्गदर्शन मिळावे, यादृष्टीने विविध उपक्रमांच्या माध्यमातून संस्थेचे प्रयत्न सुरु असतात, असेही त्यांनी सांगितले. के.सी.त्यागी, सुरेश चव्हाणके, भीमराव तापकीर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा.डॉ.सुधाकरराव जाधवर यांनी आभार मानले.

कृषिग्राहकांच्या वीज वेळापत्रकात तात्पुरता बदल

0

मुंबई, दि. 16 सप्टेंबर 2017 :

          वीज निर्मिती केंद्रांना कोळशाच्या उपलब्धतेत पुरवठयामध्ये अडचणी येत असल्यामूळे राज्यात तात्पूरते भारनियमन करण्यात येत आहे. त्यामुळे विजेची उपलब्धता मागणी यांचे नियोजन करण्यासाठी कृषिग्राहकांच्या वीज उपलब्धतेच्या वेळापत्रकात तात्पुरता बदल करण्यात आला आहे.

राज्यात कृषिपंपासाठी ज्या ठिकाणी स्वतंत्र वाहिन्या उभारल्या आहेत ज्या ठिकाणी सिंगल फेजिंग योजना आहे अशा वाहिन्यांवर सद्यपरिस्थितीत दिवसा 8 तास रात्री 8 तास अशा दोन टप्प्यांमध्ये चक्राकार पध्दतीने रात्री 10 वाजल्यापासून ते सायंकाळी 7 वाजेपर्यन्त अखंडित वीजपुरवठा करण्यात येत आहे. विजेच्या उपलब्धतेत सुधारणा होताच कृषिपंपांना दिवसा 8 तास रात्री 10 तास वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येईल, असे महावितरणने स्पष्ट केले आहे.

          विजेची उपलब्धता वाढविण्यासाठी महावितरण सर्वतोपरी प्रयत्न करीत असून लघु निविदेद्वारे खुल्या बाजारातून वीज खरेदी करण्यात येत आहे. याशिवाय पॉवर एक्सचेंजमधूनही वीज खरेदीसाठीचे प्रयत्न सुरु आहेत. ऊर्जामंत्री ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे कोळसा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

अरविंद एज्युकेशन सोसायटीत महाराष्ट्र फुटबॉल मिशनला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
पुणे-जागतिक फुटबॉल महासंघाची (फिफा) 17 वर्षाखालील स्पर्धा येत्या ऑक्टोबर महिन्यात भारतात होत आहे. या पार्श्वभूमिवर राज्यातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये फुटबॉल खेळाविषयी आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘महाराष्ट्र फुटबॉल मिशन 1 मिलियन’ अंतर्गत जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या भारतीय विद्यानिकेतन विद्यालय व लिटल फ्लॉवर स्कूलमध्ये फुटबॉलचे आयोजन करण्यात आले होते.
              हा उपक्रम नवी सांगवीतील पीडब्ल्युडी मैदानावर घेण्यात आला. या उपक्रमाचे उद्घाटन माजी नगरसेवक अतूल शितोळे यांच्या हस्ते झाले. यावेळी दादा शितोळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, उपाध्यक्ष प्रणव राव, मुख्याध्यापिका गीता येरुणकर, हर्षा बाठिया, तेजल कोळसे पाटील उपस्थित राहत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. यामध्ये 17 वर्षाखालील मुले-मुली सहभागी झाले होते. क्रीडाशिक्षक रामेश्वर हराळे, जीवन सोलंकी, भटू शिंदे, योगेश जैन यांनी मुलांना फुटबॉल खेळातील बारकावे सांगितले.
          यावेळी अतुल शितोळे म्हणाले, लहान वयात मुलांना खेळाची आवड निर्माण व्हायला हवी. पालकांनी मुलांना खेळण्यासाठी मैदानावर पाठवावे. मोबाइलच्या जगातून बाहेर येऊन मुलांनीही मैदानावर घाम गाळावा. अधिकाधिक मुलांना फुटबॉलची आवड निर्माण व्हावी आणि खेळाडूंनी विविध स्पर्धांमध्ये आपल्या शहराचे, राज्याचे, देशाचे नाव उंचवावे.

महाराष्ट्र बिर्याणी हाऊस व जाऊस चायनीज कबाब कॉर्नरचे उदघाटन

0

 पुणे- भवानी पेठ येथे जुना मोटार स्टॅन्ड चौकात महाराष्ट्र बिर्याणी हाऊस व जाऊस चायनीज कबाब कॉर्नरचे उदघाटन स्थानिक नगरसेविका मनिषा संदीप लडकत यांच्याहस्ते फीत कापून करण्यात आले . यावेळी शिवसेना पुणे शहर संघटक अजय भोसले , नगरसेवक विशाल धनवडे , माजी नगरसेवक संदीप लडकत , माजी नगरसेवक उद्यकांत आंदेकर , तुषार पाटील , गजानन पंडित , मनिष सोनिग्रा , भारत कांबळे  , रियाझ नदाफ आदी मान्यवर उपस्थित होते .

       महाराष्ट्र बिर्याणी हाऊस व जाऊस चायनीज कबाब कॉर्नरचे संचालक जावेद खान यांनी सांगितले कि , महाराष्ट्र बिर्याणी हाऊस व कबाब कॉर्नरमध्ये खास खवैय्यासाठी दम बिर्याणी , चिकन बिर्याणी व मटण बिर्याणी हा खास मेनू असणार आहे .तसेच शाकाहारी खवैय्यांना व्हेज चायनीज असणार आहे . तसेच मोगलाई फूड देखील असणार आहे . सर्व प्रकारचे सूप मिळणार आहे .

  भवानी पेठ येथे जुना मोटार स्टॅन्ड चौकात महाराष्ट्र बिर्याणी हाऊस व जाऊस चायनीज कबाब कॉर्नरचे उदघाटन स्थानिक नगरसेविका मनिषा संदीप लडकत यांच्याहस्ते फीत कापून करण्यात आले . यावेळी शिवसेना पुणे शहर संघटक अजय भोसले , नगरसेवक विशाल धनवडे , माजी नगरसेवक संदीप लडकत , माजी नगरसेवक उद्यकांत आंदेकर , तुषार पाटील , गजानन पंडित , मनिष सोनिग्रा , भारत कांबळे  , रियाझ नदाफ आदी मान्यवर उपस्थित होते .

       महाराष्ट्र बिर्याणी हाऊस व जाऊस चायनीज कबाब कॉर्नरचे संचालक जावेद खान यांनी सांगितले कि , महाराष्ट्र बिर्याणी हाऊस व कबाब कॉर्नरमध्ये खास खवैय्यासाठी दम बिर्याणी , चिकन बिर्याणी व मटण बिर्याणी हा खास मेनू असणार आहे .तसेच शाकाहारी खवैय्यांना व्हेज चायनीज असणार आहे . तसेच मोगलाई फूड देखील असणार आहे . सर्व प्रकारचे सूप मिळणार आहे .

दलित पँथर अप्पर सुपर येथे दोन शाखेच्या नामफलकाचे अनावरण

0

पुणे-  बिबवेवाडी जवळील अप्पर सुपर येथे दलित पँथरच्या दोन शाखेच्या नामफलकाचे अनावरण दलित पँथर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुखदेव सोनवणे यांच्याहस्ते फित कापून करण्यात आले .

    यावेळी दलित पँथर पुणे शहर अध्यक्ष प्रकाश साळवे , महिला अध्यक्ष सुनिता सूर्यवंशी , महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी आघाडी अध्यक्ष शुभम सोनवणे, पुणे जिल्हा अध्यक्ष विशाल चव्हाण , आरती बाराथे , पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण रणदिवे , पुणे शहर माथाडी कार्याध्यक्ष मछिंद्र पाटोळे , पुणे शहर माथाडी कामगार अध्यक्ष सूरज तुपे , सोमनाथ पाटोळे , गौतम शिंदे , विलास गायकवाड , हमिदा शेख, माया आल्हाट , रुबिना शेख ,  दलित पँथर अप्पर सुपर शाखा अध्यक्ष  महेश वाल्हेकर  , सोमनाथ पाटोळे , अजय वाल्हेकर , सागर नागटिळक , सूर्या कांबळे , सनी शेंडगे , सुधीर घोलप , ओंकार माने , सचिन आरखडे , रोहित वाल्हेकर , सौरभ म्हस्के , तेजस मिसाळ , आकाश लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते .

यावेळी दलित पँथर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुखदेव सोनवणे यांनी सांगितले कि , सर्व जाती धर्मातील बांधवाना बरोबर घेउन दलित पँथर हि सामाजिक संघटना आजपर्यंत कार्यरत आहेत यापुढील देखील दलित पँथरच्या शाखांच्या माध्यमातून अन्याय अत्याचार विरोधात आवाज उठवून न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत राहणार , संघटनेच्या माध्यमातून युवकांसाठी रोजगार निर्मिती साठी देखील काम करणार आहे. महिलांच्या संरक्षणासाठी दलित पँथर काम करणार आहे . 

गुळवणी महाराज पथाच्या काँक्रिटीकरणाचे काम सोमवार पासून सुरु होणार

0
नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी मार्ग वापरण्याची सूचना
-नगरसेविका मंजुश्री खर्डेकर व नगरसेवक दीपक पोटे यांच्याकडून पर्यायी व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी….
पुणे-एरंडवण्यातील गुळवणी महाराज पथाचे (मेहेंदळे गेरेज चौक ते स्वप्नशिल्प कोपरा ) सिमेंट काँक्रिटीकरणाचे अर्धवट राहिलेले काम सोमवार पासून पुन्हा सुरु होणार आहे,पहिल्या टप्प्यात स्वप्नशिल्प ते पवित्रा हॉटेल चौकापर्यंतचे काम पूर्ण झाले असून सोमवारपासून पवित्रा हॉटेल ते सी डी एस एस चौकाचे काम केले जाणार आहे,यासाठी सदर रस्त्याची एक बाजू वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे,यामुळे वाहनचालकांना व स्थानिक रहिवाश्यांना त्रास होऊ नये यासाठी पर्यायी व्यवस्थेची पाहणी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर व नगरसेवक दीपक पोटे यांनी आज केली व योग्य सूचना ही केल्या,नागरिकांना समजेल अश्या पद्धतीने दिशादर्शक फलक लावावेत,रात्रीच्या वेळी अपघात टाळण्यासाठी फ्लोरेसेन्ट फलक लावावेत अश्या विविध सूचना हे त्यांनी केल्या.काम सुरु असण्याच्या कालावधीत नागरिकांनी पटवर्धन बागेतील गल्लीचा वापर करावा असे आवाहन सौ खर्डेकर व श्री दीपक पोटे यांनी केले आहे.

महापालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या कामावर पालकमंत्र्यांचा अहवाल-व्हिडीओ

0

पुणे- महापालिकेत सत्ता येवून सहा महिने झाले , महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी आणि सहकारी नगरसेवकांनी केलेल्या कामाबाबत पत्रकारांनी पालकमंत्री गिरीश बापट यांचा अहवाल घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा … त्यांच्या तुलनेने त्यांनी खूप काम केले … असे बापट यांनी सांगितले .. नेमके यावेली बापट यांनी कसा अहवाल दिला तो जाणून घ्या ..पहा हा व्हिडीओ

पुण्यात जलवाहतूक -१५ दिवसात मुंबईत बैठक (व्हिडीओ)

0


पुणे- कधीकाळी खडकवासला ते बंडगार्डन अशा नदीपात्रावर जलवाहतुकीचा प्रस्ताव पुण्यातील ख्यातनाम बांधकाम व्यावसायिक डीएसके यांनी ठेवला होता . कॉंग्रेसच्या राजवटीत त्याकडे लक्ष दिले  गेले नाही .पण आता डीएसके यांचे नाव न घेता अगर त्यांना श्रेय न देता हाच प्रस्ताव मनसे चे राज ठाकरे आणि भाजपचे केंदीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढे आणण्याचे ठरविले असावे. अर्थात मूळ कल्पना कोणाची?हा वाद नाहीच इथे .पण जलवाहतुकीचा   सुरेख प्रयत्न पुण्यात होऊ पाहतो आहे . किमान त्या कल्पनेला आता चालना मिळते आहे असे स्पष्ट होऊ लागले आहे .
आज पालकमंत्री गिरीश बापट यांनी पत्रकारांशी बोलताना जलवाहतुकी बाबत पहा आणि ऐका नेमके काय म्हटले आहे .

दिवंगत उपमहापौर नवनाथ कांबळे यांच्या २३ वर्षीय कन्येला उमेदवारी

0

निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न- गिरीश बापट

पुणे– उपमहापौर नवनाथ कांबळे यांच्या निधनामुळे मुंढवा घोरपडी येथील प्रभाग क्रमांक 21मधील रिक्त झालेल्या जागेसाठी भाजप अणि रिपाई युती कडून नवनाथ कांबळे यांची मुलगी हिमाली हिला उमेदवारी देण्यात आली असून याबाबतची माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार योगेश टिळेकर, रिपाईचे शहराध्यक्ष महेंद्र कांबळे उपस्थित होते. या जागेसाठी ११ ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे.

नवनाथ कांबळे हे प्रभाग क्रमांक 21 मधून निवडून आले होते. त्यांच्या जागी आता त्यांची कन्या हिमाली यांना भाजप अणि रिपाई युती कडून नगरसेवकपदाची उमेदवारी देण्यात आली आहे. हिमाली या सध्या बीकॉमच्या शेवटच्या वर्षाला असून निवडणुकीसाठी आवश्‍यक असलेले वय त्यांनी नुकतेच पूर्ण केले आहे. त्यामुळे उच्चशिक्षित तरुणी म्हणून त्यांना संधी द्यावी, असे कार्यकर्त्यांनी नेत्यांना सुचविले होते. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे महेंद्र कांबळे यांनी सांगितले. ही निवडणूक बिनविरोध करावी, असाही प्रयत्न सुरू असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याशी देखील चर्चा करणार असल्याचे बापट यांनी सांगितले⁠⁠⁠⁠

पुणे महापालिकेसह बृहन्मुंबई, नागपूर महानगरपालिकेच्या प्रत्येकी एका आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या दोन रिक्तपदांच्या पोट निवडणुकांसाठी 11 ऑक्टोबर 2017 रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी 12 ऑक्टोबर 2017 रोजी होईल.

पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने ‘जाबनामा आंदोलन’ (व्हिडीओ)

0
पुणे :
पुणे महानगर पालिकेतील भाजपा सत्तेला आज सहा महिने पूर्ण झाले आहेत. या सहा महिन्याच्या काळात भाजप ने जाहीरनाम्यात दिलेल्या कोणत्याही कामांची पूर्तता केलेली नाही, या विषयीचा जाब विचारण्यासाठी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने  ‘जाबनामा’ आंदोलनाचे आयोजन केले होते. हे आंदोलन शुक्रवारी पुणे महानगर पालिका भवन समोर करण्यात आले.
या आंदोलनात पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष खा. वंदना चव्हाण, विरोधी पक्षनेते चेतन तुपे, प्रकाश कदम, सुभाष जगताप,  भय्यासाहेब जाधव, योगेश ससाणे,अशोक राठी, वैशाली बनकर, चंचला कोद्रे, रुपाली चाकणकर, रेखा टिंगरे, लक्ष्मी दुधाने, शिल्पा भोसले, इकबाल शेख, मिलिंद वालवाडकर, काका चव्हाण, विपुल म्हैसूरकर, सिद्धार्थ जाधव, वनराज आंदेकर, शांतीलाल मिसळ, युवराज बेलदरे, युसूफ शेख, विक्रम मोरे,  नगरसेवक, सेलचे अध्यक्ष आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना खा. वंदना चव्हाण म्हणाल्या, ‘सहा महिन्याच्या काळात भाजप ने जाहीरनाम्यात दिलेल्या कोणत्याही कामांची पूर्तता केलेली नाही, मागील १० वर्षांच्या कालखंडात महानगर पालिकेत घेण्यात येणाऱ्या विविध राज्यस्तरीय स्पर्धामध्ये पुणे शहराने कायम प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले होते. परंतु गेल्या सहा महिन्यामध्ये पुणे शहराची अधोगती झाली आहे. पालिकेचे नवीन पदाधिकारी, नगरसेवक, दिशाहीन आहेत, त्यांना योग्य दिशा देणारे नेतृत्व नाही. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, नेते अजित पवार यांनी आमच्या पक्षाला योग्य नेतृत्व दिले, म्हणून आम्ही चांगल्या पद्धतीने काम करू शकलो. एक पुणेकर म्हणून या सहा महिन्यातील पुण्याची अधोगती झालेली पाहून वाईट वाटते. शहरात विविध राज्यातून, देशातून नागरिक येत असतात त्यामुळे पुणे शहर हे एक नंबरचे शहर म्हणून बनले पाहिजे अशी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा आहे. परंतु कर्ज रोखे घेतले जात आहेत, स्मार्ट सिटीमध्ये पारदर्शकता नाही, कोणत्याही नवीन योजना नाहीत, कचऱ्याच्या प्रश्नावर तोडगा नाही या पद्धतीने कामकाज चालू राहिले तर पुणे शहर मागासलेले शहर म्हणून पाहायला मिळेल.
चेतन तुपे म्हणाले, पुणे हे देशातील वेगाने वाढणारे शहर होते. पालिकेच्या सहा महिन्याच्या कामकाजात बीआरटीची एकही नवीन सेवा चालू केली नाही,  बस सवलती बंद केल्या, शिक्षण मंडळ बरखास्त केलं, परंतु अद्यापही नवीन शिक्षण मंडळ नेमले नाही. पुणेकर जाणकर आहेत, तेच योग्य ठरवतील. देशामध्ये सर्वांत जास्त शिक्षण घेणारे विद्यार्थी पुणे शहरामध्ये आहे. परंतु विद्यार्थ्यांना योग्य सोयी सुविधा नाहीत. पुणे शहर देशामध्ये एक नंबर होते ते भाजपाच्या सत्तेत अधोगतीला जात आहे.
रुपाली चाकणकर म्हणाल्या, ‘निवडणुकीपूर्वी भाजपा ने जी आश्वासने दिली होती त्यामुळे सामान्य महिलांना दिलासा मिळाला होता. परंतु केंद्रात, राज्यात, पुणे महानगरपालिकेत महिलांची दिशाभूल झाली आहे. सार्वजनिक क्षेत्रात पुण्यातील महिला पुढे येण्याचा प्रयत्न करीत आहेत परंतु त्यांच्या सुरक्षिततेसाठी पालिकेने कोणताही पुढाकार दाखविला नाही. सामान्य पुणेकरांचे प्रश्न सोडविण्यात भाजपाला यश आले नाही, हे सहा महिन्याच्या कामकाजातून दिसून येते. भाजपा ने पुणेकरांची फसवणूक थांबविली पाहिजे.’

लग्नानंतर सरलेल्या प्रेमाची उरलेली गंमतीदार गोष्ट तुझं माझं ब्रेक अप

0

१८ सप्टेंबरपासून सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वा.  झी मराठीवर

प्रेमविवाहाच्या गाठी या प्रेमानेच बांधल्या जातात पण काही काळ लोटला की यातील केवळ विवाह एवढाच शब्द उरतो आणि प्रेमाचा गोडवा हळू हळू ओसरु लागतो. लग्नाआधी एकमेकांशी कायम प्रेमाने वागण्याच्या, कायम सोबत देण्याच्या, कधीही न भांडण्याच्या आणाभाका हवेत विरुन जातात आणि कोणत्या गोष्टीवरुन भांड्याला भांडं लागतं याचा पत्ताही लागत नाही. थोडक्यात काय प्रेमविवाह झालेल्यांच्या घरोघरी या समस्याच्या चुली पेटलेल्या दिसतातच आणि त्यातून वादाचा धूरही निघताना आपण कायम बघतो. प्रेमावर वाद कुरघोडी करतात आणि तेच नात्याच्या आड येतात. अर्थात हे वाद अतिशय छोट्या छोट्या गोष्टींवरुन असतात पण राईचा पर्वत कधी होतो ते दोघांनाही कळत नाही. अशाच काही हलक्या फुलक्या वादांची आणि प्रेमाच्या नात्याची गोष्ट प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे झी मराठीच्या आगामी तुझं माझं ब्रेक अप या मालिकेमधून. येत्या १८ सप्टेंबरपासून सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वा. ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

तुझं माझं ब्रेक अप मालिकेची कथा आहे समीर आणि मीराची. एकाच महाविद्यालयात शिकणारे हे दोघे जण. वर्गातील बाकावरुन बागेतील बाकावर यांचं प्रेम कधी पोहचलं हे त्यांनाही कळालं नाही. समीर हा धनाड्य देसाई कुटुंबाचा एकुलता एक लाडका सुपुत्र. विशेषतः आईचा लाडका. हवं ते हवं तेव्हा हातात मिळतंय त्यामुळे वेगळ्या कष्टाची आणि शिस्तीची त्याला कधीच सवय लागली नाही. तर दुसरीकडे मीरा एका मध्यमवर्गीय कुटुंबातील शिस्तबद्ध मुलगी. स्वतःचं काम स्वतः करणारी आणि कुणी काम करतांना पसारा केला की त्याला धारेवर धरणारी. असे हे भिन्न स्वभावाचे दोन जीव एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि त्यात आकंठ बुडतातही. असं म्हणतात की प्रेम हे आंधळं असतं आणि लग्नानंतर डोळे उघडतात तसंच काहीसं यांच्या बाबतीतही होतं. लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस प्रेम आणि आनंदात पार पडतात पण त्याचा गोडवा ओसरला की मग सुरु होते संसाराची तारेवरची कसरत. लग्नाआधी एकमेकांच्या अवगुणांवर पडदा टाकणारे हे दोघे लग्नानंतर कोणताही आडपडदा न ठेवता एकमेकांच्या चुका काढायला लागतात आणि भांडायलाही लागतात. लग्नाआधी एकमेकांचा दुरावा एक क्षणही सहन न करणारे आता एकमेकांनाच सहन करतायत की असं चित्र निर्माण होतं. आणि बघता बघता हे भांडण एवढ्या टोकावर जातं की ते दोघे वेगळं होण्याचाही निर्णय घेतात. लग्नानंतर वर्षभरातच वेगळं झाल्यानंतर त्यांना एकमेकांची उणीव भासायला लागते आणि प्रेमाची जाणीवही व्हायला लागते आणि मग ते दोघे पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतात. पण हा निर्णय त्यांच्या घरच्यांना मान्य होईल का ? पुन्हा एकत्र येतांना आधी केलेल्या चुकांना टाळण्यासाठी दोघांना काय कसरत करावी लागेल ? आणि प्रेमाचा गोडवा हरवलेला हा संसार पुन्हा गोडी गुलाबीचा संसार बनेल का ? याचीच गोष्ट म्हणजे ही मालिका. घाईने प्रेमात पडणा-या आणि घाईने लग्नाच्या गाठी जोडणा-या जोडप्यांच्या सुखी संसाराची स्वप्नं अपेक्षांच्या कसोटीवर खरी उतरतात का ? याची ही मजेदार गोष्ट प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे.

तुझं माझं ब्रेक अप या मालिकेत समीरची भूमिका सायंकित कामत हा अभिनेता साकारत आहे तर मीराच्या भूमिकेत केतकी चितळे ही अभिनेत्री आहे. याशिवाय मालिकेत रोहिणी हट्टंगडी, उदय टिकेकर, विजय निकम, राधिका हर्षे, संयोगिता भावे, रेश्मा रामचंद्र, उमेश जगताप, मधुगंधा कुलकर्णी आदी अनुभवी कलाकारांची फौजही बघायला मिळणार आहे. सोमील क्रिएशन्सची निर्मिती असलेल्या या मालिकेचं दिग्दर्शन हेमंत देवधर यांचं आहे.  मालिकेची कथा शेखर ढवळीकर यांची असून पटकथा चिन्मय मांडलेकर यांची आहे तर संवाद मुग्धा गोडबोलेंचे आहेत.

चतुःशृंगी देवी १५ लाखाचे मंगळसूत्र अर्पण …नवरात्रौत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

0

पुणे, ता. १५ – चतुःशृंगी देवीच्या शारदीय नवरात्रौत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती श्री देवी चतुःशृंगी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. गंगाधर अनगळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. कार्यकारी विश्‍वस्त सुहास अनगळ, सुहास प्रभाकर अनगळ, नरेंद्र अनगळ, श्रीरंग अनगळ उपस्थित होते.एका भाविकाने देवीसाठी सोन्याचे हाररुपी मंगळसूत्र अर्पण केले आहे. त्याची अंदाजे किंमत पंधरा लाख रुपये असून वजन ४४३.४०० ग‘ॅम इतके आहे
या वर्षीचा नवरात्रौत्सव गुरुवार दिनांक २१ सप्टेंबर रोजी सुरू होत असून मंदिरात सकाळी ९ वाजता घटस्थापना करण्यात येणार आहे. सकाळी सहापासून अभिषेक, रुद्राभिषेक, महापूजा, महावस्त्र अर्पण करणे हे धार्मिक विधी होणार आहेत. या वर्षीचे सालकरी रवींद्र अनगळ असून नारायण कानडे गुरुजी पौरोहित्य करणार आहेत.
उत्सव काळात मंदिर २४ तास खुले राहणार आहे. गणपती मंदिरात रोज दुपारी सहा भजने होणार आहेत. शनिवार दिनांक २४ सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता सुयोग मित्र मंडळाच्या वतीने वृध्दाश्रमातील महिलांसाठी आजीबाईंचा भोंडला होणार आहे.
शुक‘वार दिनांक २९ सप्टेंबर रात्री ८ पासून नवचंडी होम होणार आहे. शनिवार दिनांक ३० सप्टेंबर विजयादशमीनिमित्त दुपारी ५ पासून सीमोल्लंघनाची मिरवणूक मंदिरापासून सावित्रीबाई ङ्गुले पुणे विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापर्यंत काढण्यात येणार आहे. बँड, ढोल, लेझीम, नगारा, चौघडा, भुते, वाघ्या, मुरळी, देवीचे सेवेकरी यांचा मिरवणुकीत समावेश असून, हेलिकॉप्टरमधून देवीच्या पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.
यात्रेमध्ये पूजा व प्रसाद साहित्याचे सात स्टॉल आणि अन्य ३० स्टॉल असणार आहेत. पोलीस, होमगार्ड, खाजगी सुरक्षा रक्षक, मंदिरात बंदुकधारी सुरक्षा रक्षकांची सुरक्षिततेसाठी तैनात करण्यात येणार आहे. व्यवस्थापन सहाय्यासाठी अनिरुध्द सेवा केंद्राचे १५० स्वयंसेवक मदत करणार असून, सुरक्षितेसाठी २० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
महापालिकेतर्ङ्गे किटकनाशकांची ङ्गवारणी, कचरा उचलण्यासाठी जादा कंटेनर, पाणी निर्जंतुकीकरण करणे, ग‘ीन हिल्स ग‘ुपच्या सहकार्याने निर्माल्याचे खत निर्माण करण्याचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.
सुयोग मित्र मंडळाच्या वतीने तातडीचे वैद्यकीय मदत केंद्र व रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली असून, अग्निशामक दलाची गाडी २४ तास उपलब्ध होणार आहे. पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या मैदानावर विनामूल्य पार्किंगची सुविधा देण्यात येणार आहे. दर्शन घेऊन भाविकांना लवकरात लवकर बाहेर पडता यावे यासाठी बॅरिगेटसची व्यवस्था करण्यात आली आहे.
मंदिर परिसरात रंगरंगोटीची कामे करण्यात आली असून, मंदिरावर विद्युत रोषणाई, वीज गेल्यास जनरेटरची सोय करण्यात आली आहे. सर्व भाविकांना यात्रेसह संपूर्ण वर्षाचा मंदिराच्या परिसरात २ कोटी रुपयांचा विमा उतरवण्यात आला आहे. रांगेत उभे राहाणार्‍या भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची विनामूल्य व्यवस्था करण्यात आली आहे.

एनपीसीआयद्वारे विद्यार्थ्यांसाठी `कॅम्पस कनेक्ट’च्या माध्यमातून वित्तीय साक्षरता

0

मुंबई : नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय), या देशातील रिटेल पेमेंटच्या यंत्रणेत अग्रणी असलेल्या प्रमुख संस्थेने संपूर्ण भारतभरात `कॅम्पस कनेक्ट’ या उपक्रमातून वित्तीय साक्षरता कँपेनचे आयोजन केले आहे.

एनपीसीआयच्या ह्युमन रिसोर्सेसचे उपाध्यक्ष आणि प्रमुख श्री. नीतिश चर्तुवेदी म्हणाले की, “जागतिक साक्षरता दिन साजरा करताना लेस कॅश सोसायटीबद्दल जागरुकता करणे हाच याचा प्रमुख उद्देश आहे. एनपीसीआयच्या कॅम्पसमधून नोकरीसाठी निवडीच्या भेटीपूर्वी प्री-प्लेसमेंट संवाद घडवून आणणे हाही याचा उद्देश आहे.’’

वित्तीय साक्षरता कार्यशाळा प्रामुख्याने एनपीसीआयच्या ह्युमन रिसोर्सेसद्वारे राबवल्या जातात, ऑगस्टपासून त्यांचे आयोजन केले जात आहे, याअंतर्गत देशभरातील कॅम्पसमध्ये डिजिटल पेमेंट एकीकृत करण्यात आली आहेत. पुणे, हैदराबाद, बंगळुरू, चेन्नई आणि मुंबई यासारख्या ख्यातनाम व्यवस्थापन संस्थांमध्ये 35 युनिव्हर्सिटीतून 3000 मुलांसाठी आयोजन केले जाणार आहे, याअंतर्गत युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) / भारत इंटरफेस फॉर मनी (भिम) यासारख्या वित्तीय उत्पादनांची ओळख करून दिली जाणार आहे.

पुण्याचे इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, डी वाय पाटील, विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट/इंजिनिअरिंग, श्री बालाजी सोसायटी यासारख्या व्यवस्थापन संस्था आणि मुंबईच्या एनएमआयएमएस, डी वाय पाटील, चेतनाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, एन एल दालमिया, के. जे. सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडिज आणि रिसर्च आणि आयटीएम यासारख्या ख्यातनाम संस्था कॅम्पस कनेक्टमध्ये सहभागी होणार आहेत.

याशिवाय, त्यांना `एनपीसीआय आयडिथॉन’मध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे – यूपीआय / भिम अॅपमध्ये सुधारणा करण्यासाठी नव्या संकल्पना सादर करण्यासाठीचे हे सत्र असणार आहे.

बीएचआयएम / यूपीआयबद्दल थोडेसे : भारत इंटरफेस फॉर मनी (बीएचआयएम) हे एक सुलभ, सोपे आणि युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय)च्या साहाय्याने त्वरीत देयकांचे हस्तांतरण करणारे व्यासपीठ आहे. यामुळे एका बँकेतून दुसऱ्या बँकेत थेट व तातडीने पैशांचे हस्तांतरण करता येते आणि मोबाइल क्रमांक किंवा देयकांचे पत्तेही गोळा करू शकता येतात. ही देयकांची अनोखी उपाययोजना असून, यामुळे वैयक्तिकस्तरावर तातडीने पैसे पाठवणे आणि त्यासाठीची रिक्वेस्ट प्राप्त करणे शक्य होते.

एनपीसीआयबद्दल थोडेसे :

भारतातील रिटेल देयक यंत्रणांसाठी केंद्रीय पायाभूत सुविधा म्हणून नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय)ची स्थापना 2009 साली करण्यात आली आणि देशातील सर्व प्रकारच्या बँकांसाठी देयकांच्या वापरासाठी रिझर्व्ह बँकेने ही संकल्पना अमलात आणली.

मध्य प्रदेश टुडे मीडिया लि.च्या प्रारंभी समभाग विक्रीला 19 सप्टेंबर, 2017 रोजी सुरुवात

0

मुंबई, सप्टेंबर 15, 2017. मध्य प्रदेश टुडे मीडिया लि. या 13 आवृत्त्या असलेल्या व मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, दिल्ली व उत्तर प्रदेश येथे अंदाजे 20 वितरण असलेल्या आघाडीच्या दैनंदिन वृत्तपत्राने 19 सप्टेंबर 2017 रोजी प्रारंभी समभाग विक्री (आयपीओ) सुरू करण्याचे ठरवले आहे. कंपनीच्या आयपीओमध्ये प्रत्येकी 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या, प्रति इक्विटी शेअर 66 रुपये किंमत असलेल्या एकूण 1416.69 लाख रुपयांच्या 21,46,500 इक्विटी शेअर्सचा समावेश असेल. विक्रीनंतरच्या कंपनीच्या इक्विटी भागभांडवलामध्ये या विक्रीचे योगदान 47.01% असेल. शेअर्सची नोंदणी एनएसई इमर्ज येथे केली जाणार आहे आणि आयपीओ 21 सप्टेंबर 2017 रोजी बंद होणार आहे. विक्रीसाठी मार्क कॉर्पोरेट अॅडव्हॉयजर्स प्रायव्हेट लिमिटेड ही एकमेव लीड मॅनेजर आहे.

विक्रीतून मिळणाऱ्या रकमेचा वापर मध्य प्रदेश व छत्तीसगडमधील विविध शहरांतील युनिट ऑफिसेसमध्ये सुधारणा करून व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी, खेळत्या भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठी, कंपनीच्या सर्वसाधारण खर्चांसाठी व इश्यूच्या खर्चासाठी केला जाणार आहे.

मध्य प्रदेश टुडे मीडिया लि.तर्फे ‘प्रदेश टुडे’ या नावाने भोपाळ, इंदूर, ग्वाल्हेर, जबलपूर, रेवा, काटनी, सागर, उज्जैन, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, छिंदवाडा व रायपूर येथून दैनिक वृत्तपत्राच्या 13 आवृत्त्या, तसेच भोपाळ व जबलपूर येथून दोन संध्याकाळच्या आवृत्त्या प्रकाशित केल्या जातात. कंपनीचे  www.pradeshtoday.com हे ऑनलाइन पोर्टलही आहे. प्रदेश टुडे 2010 मध्ये मध्य प्रदेशात प्रथम सुरू झाले.

मध्य प्रदेश टुडे मीडिया लि.ने 2017, 2016 व 2015 या आर्थिक वर्षांमध्ये अनुक्रमे 192,755,007 रुपये, 152,425,146 रुपये व 154,115,764 रुपये उलाढाल केली आहे आणि अनुक्रमे 23,302,760 रुपये, 6,521,908 रुपये व 4,199,171 रुपये नफा कमावला आहे. गेल्या वर्षी, 90% उत्पन्न जाहिरातीतून मिळाले, तर उरलेले वृत्तपत्राच्या प्रतींच्या विक्रीतून मिळाले.

भारतातील प्रिंट उद्योग 2014 मधील 263 अब्ज रुपयांवरून 2015 मध्ये 283 अब्ज रुपयांपर्यंत, म्हणजे 7.60 टक्क्यांनी वाढले. 2015 मध्ये झालेल्या 7.30 टक्के वाढीमध्ये प्रिंट जाहिरातीतून मिळालेले उत्पन्न 189 अब्ज रुपयांपर्यंत वाढले. 2010 ते 2015 या दरम्यान जाहिरातींचे उत्पन्न दरवर्षी 8.50 टक्के वाढले आहे, तर याच कालावधीत वितरणात वार्षिक 7.1 टक्के वाढ झाली. जाहिरात हा प्रिंट उद्योगाचा कणा असून त्याचे एकूण उत्पन्नामध्ये योगदान 66 टक्क्यांहून अधिक आहे, तर उर्वरित उत्पन्न वितरणातून मिळते.

वाचकवर्ग देशातील महानगरे व टिअर-I शहरांपुरता मर्यादित असून, कंपन्यांचे जाहिरातींसाठीचे बजेट इंग्रजी भाषेतील वृत्तपत्रांवर प्रामुख्याने खर्च केले जाण्याचे प्रमाण हळूहळू कमी होत आहे. जाहिरातदार आता हिंदी व मातृभाषेतील प्रिंट मीडियाला अधिक प्राधान्य देऊ लागले आहेत, कारण ही माध्यम्ये देशातील झपाट्याने विकसित होणाऱ्या टिअर-II व टिअर-III शहरांतील ग्राहकांपर्यंत थेट पोहोचतात.