Home Blog Page 3278

हडपसर कचरा डेपो विरोधकांना पोलिसांकडून धमक्या -राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची तक्रार (व्हिडीओ)

0

पुणे -हडपसर रामटेकडी येथील कचरा डेपोला विरोध करता असताना आपल्याला पोलिसांकडून मावळ गोळीबाराची आठवण करून देत पोलीस धमकावत  असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नगरसेवकांकडून आज महापालिकेच्या मुख्य सभेत करण्यात आला .यावेळी महापौर मुक्ता टिळक यांनी यासंदर्भात आपण पोलीस आयुक्तांशी बोलून हा प्रश्न सोडवू असे आश्वासन दिले . 

हडपसरमध्ये रामटेकडी येथे महापालिकेच्या वतीने ७०० टनाचा मिश्र कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू केला जात आहे. त्याचे काम सुरू होताच हडपसर मधील स्थानिक नगरसेवकांनी नागरिकांच्या माध्यमातून या प्रकल्पाला विरोध सुरू केला आहे. याबाबत चेतन तुपे ,योगेश ससाणे, शिवसेनेचे नगरसेवक नाना भानगिरे व अन्य नगरसेवकांनी आंदोलने जाहीर केली  होती , मात्र सोमवारी रात्रीच पोलिसांनी योगेश ससाणे यांच्याकडे चौकशी सुरू केली. काय करणार, कसे करणार, अशी विचारणा करीत आंदोलन करू नका असे त्यांना सांगण्यात आले.

आज मुख्यसभेला सुरूवात करताच ससाणे व हडपसरमधील अन्य नगरसेवकांनी महापौरांच्या समोर समोर येऊन आवाज उठविला   .. हेमलता मगर, भैय्या जाधव, प्राची आल्हाट आदी नगरसेवकया वेळी येथे होते

योगेश ससाणे म्हणाले, ” आमचा विरोध लक्षात घ्या व तिथे प्रकल्प सुरू करणे रद्द करा. प्रकल्पापासून थोड्याच अंतरावर शाळा आहे. तेथील विद्यार्थी बरोबर घेऊन रेल्वे रूळांवर बसून आंदोलन करू” पोलिसांना कल्पना देऊन कायदेशीर आंदोलन केले तरीही पोलीस दडपशाही करीत असतील तर ती सहन केली जाणार नाही असा इशारा ससाणे यांनी दिला.

तर सुभाष जगताप यांनी हडपसर येथे कचरा डेपो साठी बेकायदेशीर कार्यवाही सुरु असल्याचा आरोप केला . आणि चेतन तुपे पाटील यांनी कोथरूडकरांना  दिला तो न्याय हडपसर वासियांना हि द्या अशी मागणी केली .

दरम्यान आज मुख्य सभेत पुणे महापालिका हददीत नव्याने समाविष्ट झालेल्या येवलेवाडी गावच्या विकास आराखडयास ( डीपी ) आज ,मुख्यसभेच्या बैठकीत  विरोधकांच्या मागण्या धुडकारून लावत मंजुरी देण्यात आली.

शहराच्या जुन्या हद्दीचा आणि 23 गावांचा डीपी तयार करण्यात आला आहे. त्यानंतर पुणे महापालिकाहद्दीत येवलेवाडी या गावाचा समावेश झाला. त्यामुळे या गावाचा स्वतंत्र डीपी पालिका प्रशासनाने तयार केला. हा डीपी शहर सुधारणा समितीकडे मान्यतेसाठी पाठविला होता . या डीपीवर शहर सुधारणा समितीमध्ये सातत्याने चर्चा झाली. अखेर या डीपीला काही दिवसापूर्वी उपसूचना देऊन एकमताने मंजुरी देण्यात आली. या नंतर आज तो मुख्यसभेपुढे ठेवण्यात आला होता

(मुख्य सभा  लाइव्ह व्हिडीओ https://www.facebook.com/MyMarathiNews/ या पेजवर पाहावेत )

कोथरूड मधील शिवसृष्टीच्या आणि मेट्रोच्या जागेबाबत प्रशासनाने अहवाल द्यावा -पालकमंत्री

0
पुणे  :- शिवसृष्टीसाठी कोथरुड कचरा डेपोची जागा देणे शक्य न झाल्यास शेजारील बीडीपीची जागा अधिग्रहित करावी काय व त्याचा मोबदला कशाप्रकारे द्यावा याची माहिती तयार करून द्या, असा आदेश पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज दिला. या विषयावर आज विधानभवनात बैठक पार पडली त्यावेळी ते बोलत होते.
आयुक्त कुणाल कुमार, मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, संकल्पना तयार करणारे नितीन देसाई, यांनी एकत्रित चर्चा करुन शिवसृष्टीला किती जागा लागेल व त्यासाठी किती बांधकाम करावे लागेल याची विस्तृत माहिती द्यावी, असेही निर्देश श्री.बापट यांनी दिले.
यावेळी महापौर मुक्ता टिळक, आमदार मेधा कुलकर्णी. भीमराव तापकीर, स्थायी समिती अध्यक्ष मुरली मोहोळ, नगर विकास सचिव नितीन करीर, मेट्रोचे कार्यकारी संचालक रामनाथ, भाजप गटनेते श्रीनाथ भिमाले,  काँग्रेसचे अरविंद शिंदे, दीपक मानकर आदी उपस्थित होते.
या जागेशेजारी वनविभागाची जागा आहे. ती पालिकेने ताब्यात घेऊन वन विभागास अन्यत्र जागा देता येईल काय ही शक्यता तपासून पाहण्याची सूचना बापट यांनी केली. त्यानुसार लवकरच अहवाल सादर केला जाईल, असे प्रशासनावर सांगितले.

महापलिकेची ‘अदृश्य तिजोरी’ रंग उधळणार काय ? (व्हिडीओ)

0

पुणे-पालिकेच्या तिजोरीतील रकमेचा भ्रष्टाचार अपव्यवहार होऊ शकतो हे मान्य करता येईल ,पण जे पैसे पालिकेच्या तिजोरीतच पोहोचले नाहीत त्याचा बाहेरच्या बाहेर ही अपव्यय किंवा भ्रष्टाचार होऊ शकतो अशी नवीन बाब आता चर्चेला येते आहे . असे कोणते पैसे ,जे पालिकेच्या तिजोरीत न येता , त्यांची परस्पर बाहेरच्या बाहेर वासलात लावली जावू शकते ? असा प्रश्न यामुळे मनात निर्माण होईल . याचे उदाहरण द्यायचे झाल्यास सीएसआर चे देता येईल . काय आहे सीएसआर हे सामान्य माणसाला ठाऊक नसेल कदाचित .. सीएस आर म्हणजे ज्यांचा  वार्षिक निव्वळ नफा  5 कोटी च्या वर आहे अशा करोडो किंवा अब्जोपती कडून त्यांच्या एकूण नफ्याच्या उत्पन्नाच्या 2 टक्के रक्कमेची नागरी समाजोपयोगी कामे पालिकेच्या हद्दीत करणे . आता हि रक्कम कायद्याप्रमाणे पालिकेच्या तिजोरीत जमा होणे अपेक्षित असताना ती होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आणि तीच धनाढ्य माणसे परस्पर या रकमेची कामे केल्याचे दाखवितात . अर्थात खरोखर हि कामे होतात काय ? हे तपासणारी यंत्रणाही पालिकेकडे नाही . आणि पालिका हि रक्कम तिजोरीत जमा करून घेते नंतर विकास कामांना वापरते असे ही आजतागायत कोणी स्पष्ट केलेले नाही. म्हणूनच अशा सीएसआर रकमेचा आणि कामांचा अहवाल 5 महिन्यांपूर्वी नगरसेवक अविनाश बागवे यांनी महापालिका मुख्य सभेत मागितला जो आजतागायत त्यांना आणि सभागृहाला प्राप्त झालेला नाही . आता अशी स्थिती असताना महापालिकेच्या स्थायी समितीने सोमवारी एक विषय मंजूर केला . हा विषय वाचून सामान्य आणि हुशार म्हणविल्या जाणाऱ्या व्यक्तीला ही समजणार नाही अशा शब्दात मांडला आहे . यावर अविनाश बागवे यांनी म्हटले आहे कि, या विषयाला आमचा विरोध होता . काय आहे हा विषय … तर अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात एक रॉकफिलर फौन्डेशन नावाची संस्था आहे . हि संस्था अर्थातच थेट महापालिका आयुकतांच्या संपर्कात ईमेल द्वारे होती असे समजते . शहराच्या आणि महापालिकेच्या नैसर्गिक किंवा अनैसर्गिक आपत्तीवर अशा आपत्तीतून बाहेर पडून मूळ स्वरुपाप्रत पुन्हा कसे पोहोचायचे याबाबतचे मार्गदर्शन स्वखर्चाने हि संस्था करणार असा हा प्रस्ताव आहे . अर्थात यामध्ये महापालिकेला कोणताही खर्च येणार नाही असे म्हटले आहे .यासाठी महापलिकेत स्वतंत्र कक्ष उभारणे , तसेच या संस्थेच्या पगारातून आलेली सीआरओ आणि डेप्युटी सीआरओ अशा 2 अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे आणि तांत्रिक ज्ञान असले अन्य दोघे नेमणे अशा प्रस्तावास स्थायी समितीने मान्यता दिली आहे . या शिवाय १०० रीजीलंट सिटीज नावाचा करार या संस्थेशी करणे यास हि मान्यता देण्यात आली आहे . याबाबतचे सर्व अधिकार महापालिका आयुक्तांना स्थायी समितीने दिले आहेत . इमेल द्वारे कराराची कॉपी आली ती विधी अधिकारी यांनी तपासून घेतली असे हि प्रस्तावात म्हटले आहे . कदाचित हा विषय सामन्यांच्या डोक्यावरून जाईल . पण बागवे यांचे असे म्हणणे आहे कि , हे अधिकारी जे येणार आहेत त्यांना महापालिकेची सर्व दप्तरे ,कागद पत्रे त्यांना हवे तेव्हा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत . अर्थात त्याचमुळे ते आपत्तीला तोंड कसे द्यायचे हे सांगणार असावेत . हि संस्था किती खर्च करणार , हा पैसा देखील पालिकेच्या तिजोरीत जमा करून नंतर तो हवा तसा योग्य मार्गाने खर्च का करता येणार नाही ? हे प्रश्न आहेतच . पण या प्रस्तावामुळे सध्या तरी एक स्पष्ट होते आहे ते म्हणजे , आपत्तीविषयक मोफत सल्ल्यासाठी पालिका हे दालन उघडून देत आहे . अमेरिकेतील या संस्थेचा उद्देश चांगला असेल पण या संस्थेने पालिकेच्या; शहराच्या भल्यासाठी पाठविलेला पैसा योग्य मार्गाने च खर्च होणार काय हा खरा प्रश्न आहे . म्हणजेच आता पालिकेची एक तिजोरी आहे जीच्या आधारावर दरवर्षी अर्थसंकल्प उभा राहतो आहे .आणि आता सीएसआर तसेच अशा संस्था कडून येणारी मदत हि दुसरी तिजोरी आहे जी जवळ जवळ अदृश्य स्वरूपात पुण्याची मदत करणार आहे मात्र ती रक्कम किती हे पुण्याला कळणार नाही काय असा सवाल उपस्थित केला जातो आहे . खरोखर पुण्याच्या मदतीवर यातील १०० टक्के पैसा खर्च होणार आहे काय ? कि निव्वळ कागदपत्रे रंगविली जातील ? पालिकेच्या या अदृश्य तिजोरीचा रंग कायम नगरसेवक आणि पुणेकरांपासून लपून राहील काय हे आता पुढील काळच बहुधा ठरविणार आहे . तर पहा यावरील एक छोटासा व्हिडीओ,…

योगिता बनली ‘निर्भया’

0

‘जरा संभालके’ ‘ट्रॅफिक सिग्नल’ हे हिंदी तसेच ‘दुर्गा म्हणत्यात मला’, ‘राडा रॉक्स’ ‘सुखांत’ यासारख्या मराठी चित्रपट व नाटकांमधून भूमिका साकारणारी अभिनेत्री योगिता दांडेकरच्या विविधांगी भूमिकांचं आजवर चांगलंच कौतुक झालं आहे. आता निर्भया या आगामी मराठी चित्रपटात ती झळकणार आहे. स्वानंदी प्रोडक्शन प्रस्तुत निर्भया हा मराठी सिनेमा येत्या ६ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाची निर्मिती अमोल अहिरराव यांची असून दिग्दर्शन आनंद बच्छाव (साई आनंद) यांचं आहे.

सार्वजनिक ठिकाणी मुलींना, महिलांना मोठय़ा प्रमाणावर लैंगिक छळवणुकीचा सामना करावा लागतो. या महत्त्वाच्या मुद्दय़ावर बेतलेल्या निर्भया या सिनेमात योगिता एका आव्हानात्मक भूमिकेत दिसणार आहे. आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना योगिता सांगते की, कठोर वास्तवाचा अनुभव देणारा हा सिनेमा असून एका दुर्देवी घटनेनंतरचा जीवन संघर्ष, भाव-भावनांचे चढ उतार यांचे हृदयद्रावक चित्रण या चित्रपटात पहायला मिळते. त्या घटनेनंतर बदललेलं आयुष्य आणि त्यानंतरचा प्रवास दाखवणं हा माझ्या अभिनयाला आव्हान देणारा भाग होता. तो मी पेलण्याचा प्रयत्न केला असून प्रेक्षकांना तो नक्कीच आवडेल असा विश्वास योगिता व्यक्त करते.

निर्भया चित्रपटाची कथा संतोष हुदलीकर यांची असून पटकथा-संवाद डॉ. मुरलीधर भावसार यांचे आहेत. संकलन विनोद चौरसिया तर छायांकन मनिष पटेल यांचं आहे. गीते बाबासाहेब सौदागर, अभिजीत कुलकर्णी, ज्ञानेश्वर वाघ यांनी  लिहिली असून संगीत देव-आशिष यांचं आहे. सहनिर्माते नितीन पाटील आहेत. ६ ऑक्टोबरला निर्भया प्रदर्शित होत आहे.

पशुबळी थांबविण्यासाठी सरकारने कायदा करावा – डॉ. कल्याण गंगवाल

0

पुणे-नवरात्र महोत्सवात पशूबळी न देण्याचा नाशिक येथील सप्तशृंगी देवस्थानने घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. राज्यभरातील देवी-देवतांच्या उत्सवात होणारी पशुहत्या थांबविण्यासाठी सरकारने लवकरात लवकर कायदा करावा, अशी मागणी सर्व जीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कल्याण गंगवाल यांनी पत्रकार परिषदेत केली. देवीसमोर पशुबळी देणे ही अंधश्रद्धा असून, त्यामुळे अनारोग्य, अस्वच्छता आणि दुर्घटना होण्याची शक्यता असते. त्यामुळे देवीभक्तानी अशा अनिष्ट रूढींना फाटा द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

डॉ. कल्याण गंगवाल म्हणाले, “नवरात्र उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या उत्सवात खंडेनवमीच्या दिवशी ‘अजबली’ देण्याची प्रथा आहे. मात्र, ही प्रथा अत्यंत चुकीची असून, या विरोधात सर्व जीव मंगल प्रतिष्ठान कायदा व प्रबोधन यामार्फत गेली 21 वर्षे लढा देत आहे. यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथील तुळजाभवानी देवीसमोर अजबळी देण्याची प्रथा आहे. या प्रथेला कोणतेही धार्मिक अधिष्ठान नाही. ही अतिशय अमानुष पद्धतीने भौतिक-कौटुंबिक मानसिक गरज भागविण्यासाठी केलेल्या नवसपूर्तीच्या नावाखाली हजारो बोकडांचा बळी दिला जातो. परिसरात पडलेल्या मांसामुळे, रक्तामुळे मोठ्या प्रमाणात अस्वच्छता, अनारोग्य निर्माण होते. स्वच्छ भारत अभियानाला छेद देणारी ही प्रथा आहे. त्याचबरोबर अनेकदा यातून दुर्घटना होऊन निष्पाप लोकांचा बळी जातो. ही अधार्मिक आणि अवैज्ञानिक प्रथा आहे. त्यामुळे सरकारने अशा प्रथा बंद करण्यासाठी कायदा करावा. तसेच सप्तशृंगी देवस्थानचा आदर्श घेऊन देवस्थानांनी पुढाकार घेत या प्रथेला हद्दपार करावे ”

“पशुक्रुरता निवारण कायदा 1960’नुसार उघड्यावर पशुहत्या कायद्याने गुन्हा आहे. यासंदर्भात 1996 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय देत पशुबळी संदर्भात भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले होते. मुंबई उच्च न्यायालय व औरंगाबाद खंडपीठात रिट पिटिशन दाखल आहेत. खंडपीठाने देवाच्या नावावर होणारी पशुहत्या बंद करण्यासाठी सरकारने योग्य पावले उचलावीत, असे आदेश दिले होते. मात्र, राजकीय स्वार्थापोटी सरकारकडून त्याकडे कानाडोळा केला जात आहे. गुजरात व आंध्रप्रदेश राज्यातही हा कायदा करण्यात आला आहे. पोलिसांकडून अशा घटनाना आळा घालण्याचे राज्य सरकारने आदेश दिले असतानाही सर्रासपणे ही प्रथा चालू आहे. काही ठिकाणी ही प्रथा बंद झाली असून, जनजागृती करण्यात मोठे यश येत आहे ” असे डॉ. गंगवाल यांनी नमूद केले.

डॉ. गंगवाल पुढे म्हणाले, “देवाची आणि नवस पूर्ण करण्याची भीती नागरिकांच्या मनात असल्याने कर्ज काढून अशा प्रथा पूर्ण केल्या जातात. त्यामुळे शेतकरी आणि ग्रामीण भागातील लोकांची पिळवणूक होते. राज्यभरातील विविध गावांतील छोट्या-मोठ्या देवस्थांनामध्ये दिले जाणारे हे बळी रोखण्यासाठी आणि अंधश्रद्धा निर्मूलन व पर्यावरण संवर्धनासाठी कायदा करावा, अशा मागणीचे निवेदन मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, उच्च न्यायालयाकडे पाठविण्यात आले आहे ”

आईभक्तांनी अंधश्रद्धेला थारा देऊ नये

महाराष्ट्राचे कुलदैवत श्री तुळजाभवानी मातेच्या भक्तांनी खंडेनवमीला अजबळी देऊ नये. ही अंधश्रद्धा आहे. देवीला पुरण, नारळ, गोड नैवेद्य दाखवायला हवा. पशुधन ही राष्ट्रीय संपत्ती आहे. पक्षी-प्राण्यांवर प्रेम करण्याऐवजी त्यांचा बळी घेण्यात अजिबात पुण्य नाही. पशुबळींसाठी जमवलेले पैसे स्वतःच्या मुलांच्या शिक्षण आणि प्रगतीसाठी खर्च करा. त्यामुळे भक्तांनी येत्या खंडेनवमीला पशुबळी देऊ नये, असे आवाहनही डॉ. गंगवाल यांनी केले. यासंदर्भातील जनजागृती करणारी पत्रके तुळजापूर आणि परिसरात वाटली जाणार आहेत.

प्रख्यात गायक वसंतराव देशपांडे यांची नात दीप्ती माटेचे पार्श्वगायनात पदार्पण

0

निपुण धर्माधिकारी याचा बहुचर्चित बापजन्म‘ हा चित्रपट येत्या २९ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात सचिन खेडेकर, पुष्कराज चिरपुटकर, शर्वरी लोहोकरे, सत्यजित पटवर्धन हे प्रमुख भूमिका बजावत आहेत. बापजन्म‘ या चित्रपटाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटातून प्रख्यात शास्त्रीय गायक वसंतराव देशपांडे यांची नात दीप्ती माटे ही पार्श्वगायनात पदार्पण करत आहे. हा तीचा पहिलाच मराठी चित्रपट आहे. बापजन्म चित्रपटातील मन शेवंतीचे फूलअसे शब्द असणारे गाणे दीप्ती माटे यांनी गायले आहे. गाण्याचे बोल क्षितीज पटवर्धन यांनी लिहिले असून असून संगीत दिग्दर्शक गंधार संगोराम यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे.

दीप्ती माटे या प्रख्यात गायक वसंतराव देशपांडे यांची नात आणि आघाडीचा तरूण शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांची बहीण आहेत. मराठी नाट्यसृष्टीत संगीत नाटकांमधून दिसणाऱ्या दीप्ती यावेळी बापजन्म’ या चित्रपटातून पार्श्वगायनात पदार्पण करत आहेत.

बापजन्म चित्रपटातील मन शेवंतीचे फूलया गाण्याच्या अनुभवाविषयी दीप्ती माटे म्हणाली कि मी यापूर्वी नाट्य संगीत, त्याचबरोबर काही गझल व भावगीतेसुद्धा गायली आहेत. पण चित्रपटात कधीच गायन केले नव्हते. बापजन्म चित्रपटातील मन शेवंतीचे फूलहे गाणे गायले आहे ते फक्त संगीतकार गंधारमुळे. मला हे गाणे गायला खूपच भीती वाटत होती त्याला कारण असे होते कि माझ्या आजोबांनी व माझा भाऊ राहुल देशपांडे यांनी आमच्या घरातील गायकी इतक्या वर नेऊन ठेवली आहे कि त्याला माझ्या गाण्याने कुठे धक्का लागू नये असे मला सतत वाटत रहायचे. या गाण्याच्या संगीताची पार्श्वभूमी हि पस्तीस वर्षांपूर्वीची असल्यामुळे मला खूप दडपण आले होते. पण गंधार आणि राहुल या दोघांनी मला हे गाणे गायला भरपूर प्रोत्साहन दिले. या दोघांच्या पाठिंब्याशिवाय मी हे गाणे गाऊच शकले नसते. म्हणूनच मी गंधार आणि राहुलची खूप आभारी आहे’.

संगीत दिग्दर्शक गंधार संगोराम यांनी सांगितले की मी आणि निपुणनी या अगोदर बऱ्याच संगीत नाटकांमधून एकत्र काम केले आहे. निपुण माझ्याकडे बापजन्म चित्रपटाची कथा घेऊन आला त्यावेळेस त्यांने मला चित्रपटात दोन गाणी असल्याचे सांगितले. त्यातील एक गाणे हे ३५ वर्षांपूर्वीच्या संगीतावर होते. म्हणजेच चित्रपटातील भास्कर पंडित यांच्या पत्नीने हे गाणे गाऊन ते रेकॉर्ड करून ठेवले आहे ते भास्कर पंडित नेहमी रेडिओवर ऐकत असतात अशी या गाण्याची पार्श्वभूमी होती. या गाण्यासाठी दीप्ती माटेच हीच माझी पहिली निवड होती. मन शेवंतीचे फूलहे गाणे दीप्तीने एवढे सुंदर गायले आहे की तुम्हाला ते गाणे ऐकताना जुन्या गाण्याचा भास होईल. चित्रपटातील दुसरे गाणे गंध अजूनही हे जयदीप वैद्य याने गायले आहे. ते पण सुंदर झाले आहे.

या चित्रपटाचे गाणं, टीझर आणि ट्रेलर पाहून प्रेक्षकांना या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. कास्टिंग काउच या वेबसीरिजच्या माध्यमातून लोकप्रिय झालेला अभिनेता आणि दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी याने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटनी प्रस्तुत केलेला आणि सुमतिलाल शाह आणि सिक्स्टीन बाय सिक्स्टी फोर प्रॉडक्शन्सन यांची निर्मिती असलेला बापजन्मचित्रपट  येत्या २९ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. 

बापजन्मची कथा, पटकथा आणि संहिता निपुण धर्माधीकारीनेच लिहीली आहे. सचिन खेडेकर आणि पुष्कराज चिरपूटकर यांच्यासह या चित्रपटात शर्वरी लोहोकरे, सत्यजित पटवर्धन आणि अकर्श खुराणा यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे सह-निर्माते आहेत केयूर गोडसे, नीरज बिनीवाले, अमृत आठवले आणि निपुण धर्माधिकारी. इतर तंत्रज्ञांचा चमू पुढीलप्रमाणेछायाचित्रण दिग्दर्शकअभिजित डी आबदे; संकलकसुचित्रा साठे; संगीत आणि पार्श्वसंगीतगंधार; गीतेक्षितीज पटवर्धन; ध्वनीरचनाअक्षय वैद्य; निर्मिती रचनासत्यजित पटवर्धन; वेशभूषासायली सोमण; मेक-अपदिनेश नाईक; विपणनअमित भानुशाली (52 फ्रायडे सिनेमाज); रंगकलर-रेडचिलीज डॉट कॉम; व्हिज्युअल प्रमोशन्सनवप्रभात स्तुडीओ; डिजिटल विपणनबी बिरबल; प्रसिद्धी मोहीमसचिन सुरेश गुरव. 

बापजन्मचे सादरीकरण एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटचे आहे. या कंपनीने आत्तापर्यंत मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, शिक्षणाच्या आयचा घो, हापूस, आयडीयाची कल्पना, तुकाराम, आजचा दिवस माझा, हॅप्पी जर्नी, कॉफी आणि बरेच काही, टाईम प्लीज, मुंबई-पुणे-मुंबई २यांसारखे अनेक गाजलेल्या चित्रपटांची निर्मिती केली आहे.

 

कोथरूड नवरात्र महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल…. नाट्यमहोत्सवासह विविध समाजोपयोगी उपक्रम

0
पुणे-कोथरूड नवरात्र महोत्सवाचे हे बारावे वर्ष असून दर्जेदार कार्यक्रमांमुळे हा महोत्सव कोथरुडकरांच्या पसंतीस उतरला आहे असे या महोत्सवाचे संयोजक संदीप खर्डेकर,नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, विशाल भेलके,मंदार बलकवडे  आणि उमेश भेलके यांनी सांगितले.क्रिएटीव्ह फाउंडेशन आयोजित या नवरात्र महोत्सवास गुरुवार दिनांक २१ सप्टेंबर रोजी भेलकेवाडी आझादनगर येथे घटस्थापनेने सुरुवात होणार असून दिनांक २३ सप्टेंबर पासून यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात नाट्यमहोत्सव रंगणार आहे,यात २३ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता “आई रिटायर होतीये ” रविवार  24 सप्टेंबर दुपारी 12 वाजता फक्त महिलांसाठी लावणीचा  बहारदार कार्यक्रम ” तुमच्यासाठी काय  पण  ” होणार आहे.सोमवार २५ सप्टेंबर रोजी रात्रौ ९ वाजता जितेंद्र भुरूक यांचा गीतो का सफर हा ऑर्केस्ट्रा,२६ सप्टेंबर रोजी रात्रौ ९ वाजता संदीप पाठक यांचे वऱ्हाड निघालाय लंडनला तर बुधवारी रात्रौ ९ वाजता पती सगळे उचापती हे नाटक सादर केले जाणार असल्याचे संदीप खर्डेकर यांनी सांगितले,हे सर्व कार्यक्रम मोफत असल्याचे ही ते म्हणाले.
या महोत्सवांतर्गत भोर येथी वाघजाईमाता सांस्कृतिक हॉल ला २०० ताटे व ४०० वाट्या भेट देण्यात येणार असल्याचे विशाल भेलके म्हणाले. शुक्रवार २९ सप्टेंबर व शनिवार ३० सप्टेंबर रोजी दांडियाचा कार्यक्रम रंगणार असून विविध वस्त्यांमध्ये भोंडल्याची कार्यक्रम आयोजित केले आहेत असे नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी सांगितले,तसेच या कार्यक्रमांदरम्यान स्वदेशी वापराकडे नागरिकांचा कल वाढावा यासाठी प्रचार करणार असल्याचे ही त्या म्हणाल्या.नागरिकांनी मोफत पासेस साठी संयोजक विशाल भेलके ९९६००२३०२३,मंदार बलकवडे ९७३०९४९४९४ व उमेश भेलके ९८२३२३८१८१ यावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने १५१ मंडळांचा सन्मान व १४ मंडळांना पारितोषिके प्रदान

0

पुणे-जनसेवा प्रतिष्ठान ,घोरपडी ,  च्या वतीने दरवर्षी गणेउत्सव देखावा स्पर्धेचे आयोजन केले जाते या स्पर्धेत सहभागी सर्व मंडळांना सन्मान चिन्ह व प्रशस्तीक पत्रक प्रदान केले जाते तसेच विजेत्या मंडळांना पारितोषिके प्रदान केले जातात या वर्षी या स्पर्धेत सहभागी १५१ मंडळाचा सन्मान व १४ विजेत्या मंडळांना पारितोषिके प्रदान कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते पार पडलाप्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी पुण्यातील नामवंत गणेशोउत्सव मंडळांच्या अध्यक्षांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात येते तसेच विविध क्षेत्रातील अधिकारी व कलाकारानंच्या हस्ते पारितोषिके वितरण करण्यात येते या वर्षी मनाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळाचे अध्यक्ष मा. प्रविण परदेशी यांच्या हस्ते पारितोषिके वितरण करण्यात आले यावेळी महाराष्ट्र महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्री. लक्ष्मीकांत पाचारणे, पोलीस निरीक्षक श्री महेंद्र जगताप, नगरसेवक उमेश गायकवाड, नगरसेविका लताताई धायरकर, उद्योजक नानासाहेब अबनावें, उद्योजक राजेश पवार चीफ एकसुकेटीव्ह ऑफिसर श्री मोहन दुधाने, चित्रपट दिग्दर्शक सुवदन आंग्रे यांच्या हस्ते पारितोषिके वितरण करण्यात आले 

या मंडळांना पारितोषिके मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रस्तावना सौ प्रिया खैरे यांनी केले परीक्षक म्हणून श्री संतोष टोणपे तर सूत्र संचालन उपेंद्र शितुत यांनी केले जनसेवा प्रतिष्टान चे अध्यक्ष व गणेशोउत्सव स्पर्धेचे आयोजक श्री रविंद्र खैरे यांनी आभार मानले

पारितोषिक विजेते मंडळे पुढील प्रमाणे 

सहभागी सर्व १५१ मंडळांना सन्मान चिन्ह व प्रशस्तीक पत्रक 

विद्युत रोषणाई – 

प्रथम क्रमांक – ओंसई मित्र मंडळ, 

दुतिय क्रमांक – गजराज मित्र मंडळ , 

तृतीय क्रमांक – संतोष मित्र मंडळ    

हालता देखावा – 

प्रथम क्रमांक – क्रांती मित्र मंडळ-घोरपडी , 

दुतिय क्रमांक – गोदावरी टेरेस मित्र मंडळ, 

तृतीय क्रमांक – प्रशांत मित्र मंडळ,

सुबक सुंदर गणेशमूर्ती – 

प्रथम क्रमांक – शिव मित्र मंडळ, 

दुतिय क्रमांक- क्रांती मित्र मंडळ -मुंढवा,

 तृतीय क्रमांक – उमेश मित्र मंडळ,

जनजागृती जनसेवा देखावा – 

प्रथम क्रमांक -श्रीमंत श्री, रंगविलास तरुण मित्र मंडळ – कोरेगाव पार्क, 

दुतिय क्रमांक – नटराज मित्र मंडळ, 

तृतीय क्रमांक – गणराज मित्र मंडळ जहांगीर नगर ,

आदर्श मंडळ – 

प्रथम क्रमांक – अखिल गणेशबाग मित्र मंडळ,

उत्कृष्ट ढोल ताशा पथक – 

प्रथम क्रमांक – एक दिल ढोल ताशा पथक मुंढवा 

अश्विनी भावे आणि तिच्या चाहत्यांमधील अंतर होणार कमी!

0

अश्विनी भावे हे सिनेसृष्टीतील एक नावाजलेलं नाव गेली २ दशके या क्षेत्रात कार्यरत आहे. तिने केलेल्या सर्वच
भूमिका या रसिकप्रेक्षकांच्या मनात अजूनहि जिवंत आहेत. फक्त मराठीतच नाही तर तिने तिच्या कलाकृतीने
बॉलीवूड मध्ये वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. बॉलीवूडच्या बड्या बड्या स्टार्स सोबत तिने काम केलं
आहे. फक्त तिचे फॅन्सच नाहीतर चित्रपट समीक्षकांनीहि तिच्या कामाची नेहमीच तारीफ केली आहे. लग्नानंतर
ती अमेरिकेत जाऊन स्थायिक झाली. गेल्याच वर्षी ती पुन्हा तिच्या मायदेशात परतली आणि तिने तिच्या
कारकिर्दीची पुन्हा नव्याने सुरुवात केली. इतके वर्षे अमेरिकेत राहून हि तिच्यात पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव
दिसला नाही. तिची भाषा, पेहराव हे सगळंच आजही तसंच आहे. यातून ती आपल्या मातीशी किती जोडली
आहे हे दिसून येतं. भारतात परतल्यावर तिची सिनेमाप्रती असलेली ओढ दिसून आली आणि बहुतेक याच
कारणास्तव तिने परत चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली. या वर्षी तिचे ‘ध्यानीमनी’ आणि ‘मांजा’ हे
दोन सिनेमे प्रदर्शित झाले आणि दोन्ही चित्रपटातील तिचे काम लोकांनी खूप पसंत केले. वैशिष्ट्य म्हणजे
दोन्ही सिनेमात तिने आईची भूमिका बजावली पण त्या दोन्ही भूमिकेंमधील आई हि परस्पर विरोधी होती पण
तिने अगदी सहज त्या निभावल्या बहुतेक म्हणूनच तिचा चाहता वर्ग एवढ्या प्रमाणात आहे.
अश्विनीची फॅन फॉलोविंग हि प्रचंड प्रमाणात आहे. फक्त भारतातच नाहीतर संपूर्ण जगभर तिचे चाहते आहेत.
तिचे चाहते हे नेहमीच तिला नवनवीन भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक असतात. तिच्याबद्दल जितकं जास्त
जाणून घेता येईल याकडे नेहमीच त्यांचा कल असतो. काही दिवसांपूर्वी अश्विनी भावे हिने तिच्या सोशल
मीडियावर लाल गाऊन परिधान केलेला तिचा एक अतिशय सुंदर फोटो पोस्ट केला आणि त्यानंतर सर्व
नेटिझन्समध्ये एकच चर्चा सुरु झाली, हा फोटो अश्विनीने नेमका का अपलोड केला असावा? तिने हे ग्लॅमरस
फोटोशूट नक्की का केलं? तिचा नवीन चित्रपट येतोय का? असे अनेक तर्क वितर्क लावले गेले. या फोटोशूटचं
उत्तर म्हणजे अश्विनी भावे यांची वेबसाईट. अश्विनी भावे हिने नुकतीच स्वतःची www.ashvinibhave.com
हि वेबसाईट लाँच केली आणि वेबसाईटचे आकर्षण म्हणजे अश्विनी भावेचे एक्सक्लुसिव्ह असे फोटोज. आजही
तिच्या सुंदरतेचे मापदंड देणारे असे ते फोटोज प्रेक्षकांना तिच्या या वेबसाईटवर पाहायला मिळतील.
अश्विनीबद्दल सर्वच माहिती तिच्या या वेबसाईटवर अगदी सहजरित्या मिळणार आहे. फक्त चित्रपटच नाही,
तर तिच्या संपूर्ण आयुष्याची कारकीर्द त्यांना जवळून अनुभवता येईल. या वेबसाईटद्वारे तिच्या फॅन्सना तिच्या
संपूर्ण आयुष्याचा सफर घेता येईल. किशोर वयापासून ते आतापर्यंत तिच्या आयुष्यात घडलेल्या सर्वच गोष्टींची
नोंद त्यात आहे. तिचे सिनेसृष्टीतील पदार्पण आणि अमेरिकेतील स्थलांतर याबद्दल

पिंपरी-चिंचवडमध्ये मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

0

पिंपरी / प्रतिनिधी:
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन एकसंघ समिती आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
मराठवाडा मित्र मंडळ महाविद्यालय (एम.एम. कॉलेज), काळेवाडी येथे अच्युत हांगे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी हांगे यांनी मराठवाडा शौर्यगाथा कथन करीत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर एम.एम.कॉलेज ते निगडीतील भक्तीशक्ती चौक दरम्यान भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. यामध्ये पिंपरी-चिंचवडस्थित मराठवाड्यातील नागरीक सहभागी झाले होते.

                        मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त भोसरीतील स्व. अंकुशराव लांडगे नाट्यगृह येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ह.भ.प. गजानन वाव्हळ महाराज यांनी मराठवाडा शौर्यगाथा कथन करीत निजामशाही राजवटीत निजामांने हिंदुचा केलेला छळ यावर प्रकाश टाकीत तत्कालीन इतिहास डोळ्यासमोर मांडला.
                     यावेळी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, आमदार सुजीतसिंग ठाकूर, महेश लांडगे, महापौर नितीन काळजे, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, मराठवाडा चेरीटेबल ट्रस्ट एकसंघ समितीचे अध्यक्ष अरुण पवार, उपमहापौर शैलजा मोरे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे, भाऊसाहेब जाधव, आळंदीच्या नगराध्यक्षा वैजयंती उमरगेकर, सहायक आयुक्त डॉ. महेश डोईफोडे, डॉ प्रविण अष्टीकर, अशोक कांबळे, बाबासाहेब त्रिभुवन, योगिता नागरगोजे, निकिता कदम, कमल घोलप, यशोदा बोईनवाड, शत्रुघन काटे, ह.भ.प शिवानंद महाराज, ह.भ..प. गजानन वाव्हळ, व्यंकटेश जामदाळे, साहेबराव धुमाळ, बळीराम माळी, शिवदास हांडे, विजय सोनवणे, नवनाथ गीते, सुहास दुघनव, किसनराव पालवे, संतोष फाळके आश्रुबा पालवे , सतीश आव्हाड, श्रीनिवास दुघनव, बाळू सुतार, अनिल सुतार ,किरण चौधरी ,दिनेश गाडेकर ,संतोष अंधारे, सुनील भोसले , सूर्यकांत कुरुलकर ,वामन भार्गांडे , रंगनाथ पवार ,जनार्धन मुनेश्वर, शाहूराज कद्रे ,शशिकांत दुधारे, किशोर अत्तार्गेकर ,शिवाजी घोडके, विजय देवकर , सूर्यकांत भिसे ,अनिल अन्कुष्कार, अभिमन्यु गाडेकर,अविनाश थिटे, नितीन पाटील, आदिती निकम ,विजय वडमारे, आण्णा जोगदंड, बळीराम कातंगले आदी उपस्थित होते.
बबनराव लोणीकर म्हणाले, की पिंपरी-चिंचवडमध्ये मराठवाडा चॅरीटेबल ट्रस्ट एकसंघ समिती चांगले काम करीत आहे. सुजीतसिंह ठाकूर यांनी भूमिपुत्रांचे चालू असलेले कार्य वाखाणण्याजोगे आहे, याला नक्की यश येईल. महापौर नितीन काळजे यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये सुसज्य मराठवाडा भवन निर्मिती करण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
अरुण पवार म्हणाले, की पिंपरी-चिंचवड महापालिका व मराठवाडा चॅरीटेबल ट्रस्ट एकसंघ समितीच्या वतीने प्रथमच उद्योगनगरीमध्ये मराठवाडा मुक्तीदिनाच्या कार्यक्रमामुळे मराठवाड्यातील बांधव एकत्र येण्यास मदत होईल. मराठवाडयातील प्रत्येक बांधवाला नेहमीच संघर्ष करावा लागला आहे. येथे राहणार्‍या सुमारे सहा लाख बांधवांचे प्रश्‍न सोडविणे, त्यांना मुक्त व्यासपीठ मिळावे, आर्थिक, सामाजिक, धार्मिक प्रश्न सुटावेत यासाठी आपले प्रयत्न चालू आहेत. त्यादृष्टीनेच आतापर्यंत सुमारे सव्वालाख बांधवांची नोंदणी केली आहे. पुढील वर्षभरात दोन लाखाचा टप्पा गाठला जाईल, असा विश्‍वासही पवार यांनी व्यक्त केला.

मराठवाड्यातील गुणवंतांचा सन्मान
                       विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे मराठवाड्यातील भूमिपूत्र डॉ राघवेंद्र शाईवाले, गोपाळ माळेकर, राजेंद्र हुंजे, विश्वंभर चौधरी, शिवाजीराव जाधव, बापूसाहेब गायकवाड, गिरीधर काळे, रमेश जाधव, शारदा मुंढे, राम सातपुते यांचा ‘मराठवाडा पुरस्कार’ देवून सन्मान करण्यात आला. तसेच मूळची मराठवाड्याची असणारी गायिका कार्तिकी गायकवाड विविध गीते सादर करीत उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले. संगीत रसिकांनीही या गाण्यांना उत्स्फूर्त दाद दिली.

मारूती सुझुकी ऑटोप्रिक्स 2017 (सीझन 1) ची दुसरी फेरी पुण्यात

0

पुणे,19 सप्टेंबर 2017 : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरात मारूती सुझुकी ऑटोप्रिक्स 2017 (सीझन 1) च्या ऑटोक्रॉस फॉरमॅटची दुसरी फेरी होत आहे.

या चॅम्पियनशीपची पहिली फेरी बंगळुरूमध्ये 10 सप्टेंबर रोजी पार पडली असून पश्‍चिम विभागातील पहिला विजेता शोधण्यासाठी 22 सप्टेंबर रोजी पुण्यात दुसरी फेरी हिंदुस्थान अँटीबायोटिक्स एक्झिबिशन ग्राऊंड,पिंपरी येथे होणार आहे.

5 महिने चालणार्‍या या स्पर्धेमध्ये बंगळुरू,पुणे,कोईम्बतूर,चंदीगड,इंदौर,गुडगाव आणि गुवाहाटी या 7 शहरांमधील नवोदित रेसर्स व मोटरस्पोर्टसमध्ये उत्साही असलेले सहभागी स्पर्धक होतील.ग्रेटर नोएडा येथील बुध्द इंटरनॅशनल सर्किट येथे मारूती सुझुकी ऑटोप्रिक्स चॅम्पियनशीप या प्रतिष्ठित किताबासाठी 6 वेगवेगळ्या प्रकारात लढतील.

मारूती सुझुकी ऑटोप्रिक्स 2017 (सीझन 1) हे अ‍ॅमॅच्युअर मोटरस्पोर्टस् उत्साहींसाठी त्यांचे मोटरींगमधील कौशल्य सुधारण्यासाठी एक योग्य व्यासपीठ असून अधिक कठिण रॅलींगच्या फॉरमॅटसमध्ये जाण्याआधी सुरक्षित वातावरणात आपले कौशल्य सुधारत या साहसाचा अनुभव घेता येईल.

दुसर्‍या फेरीचा समारोप 24 सप्टेंबरला पुण्यात पारितोषिक वितरण समारंभाने होईल व यातील विजेते शहराचे प्रतिनिधित्व राष्ट्रीय चॅम्पियनशीपमध्ये करतील.

मारूती सुझुकी ऑटोप्रिक्स 2017 (सीझन 1) च्या राष्ट्रीय विजेत्याला 29 जानेवारी ला नोएडा येथे होणार्‍या अंतिम फेरीनंतर मारूती सुझुकी स्वीफ्ट हे बक्षीस मिळेल,तर शहरातील फेर्‍यांमध्ये विजेत्यांना रोख रक्कम स्वरूपात पुरस्कार मिळतील.

 

सरस्वती मंदिर संस्था येथे शनिवारी रोजगार मेळाव्याचे आयोजन

0

पुणे, दि. 19: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र पुणे व सरस्वती मंदिर संस्थेचे सरस्वती मंदिर स्किल डेव्हलपमेंट सेंटर, शुक्रवार पेठ पुणे यांच्या संयुक्त विद्यामाने शनिवार दि. 23 सप्टेंबर 2017 रोजी सरस्वती मंदिर संस्था, शुक्रवार पेठ, बाजीराव रोड, नातुबाग, पुणे-2 येथे सकाळी 10 वाजता रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

मेळाव्यासाठी पुणे शहर, हडपसर, एम.आय.डी.सी औद्योगिक परिसरातील एकूण 26 उद्योजक सहभागी होणार असून एकूण 2664 रिक्तपदे उपलब्ध आहेत. जिल्ह्यातील  10 वी/12वी/आय.टी.आय/तांत्रीक पदवीधारक, पदवीधर तसेच उच्च पदवीधर उमेदवारांनी या खाजगी क्षेत्रातील उपलब्ध असणाऱ्या जागेसाठी प्रत्यक्ष मुलाखतीस उपस्थित राहून या सुवर्णसंधिचा लाभ घ्यावा. सहभाग घेणाऱ्या सर्व उमेदवारांनी www.mahaswayam.in या संकेत स्थळावर उद्योजकांची मागणी पाहून अपली संमती नोंदवावी, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, पुणे सहायक संचालक अ.ऊ.पवार व सरस्वती मंदिर संस्थेचे चेअरमन विनायक आंबेकर यांनी प्रसिध्दी  पत्रकाद्वारे केले आहे.

कॅडसिस (इंडिया) लिमिटेडच्या प्रारंभी समाभाग विक्रीला 21 सप्टेंबर रोजी सुरुवात

0

मुंबई, सप्टेंबर 19, 2017. हैदराबादमधील कॅडसिस (इंडिया) लिमिटेड या प्रामुख्याने अमेरिकेतील मोठ्या ग्राहकवर्गास सेवा देणाऱ्या व नफ्यात असणाऱ्या इन्फर्मेशन टेक्नालॉजी एनेबल्ड सर्व्हिसेस (आयटीईएस) क्षेत्रातील कंपनीने 21 सप्टेंबर 2017 रोजी प्रारंभी समभाग विक्रीला (आयपीओ) सुरुवात करायचे ठरवले आहे. प्रत्येकी 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या 21,00,000 इक्विटी शेअरची प्रत्येकी 70 रुपयांप्रमाणे एकूण 1,470 लाख रुपयांना विक्री केली जाणार आहे. यापैकी 1,08,000 शेअर्स मार्केट मेकरसाठी राखून ठेवले जातील. विक्रीनंतर कंपनीच्या इक्विटी भागभांडवलामध्ये नेट इश्यूचे योगदान 26.55% असेल. शेअर्सची नोंदणी नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या एनएसई ईमर्ज व एसएमई प्लॅटफॉर्मवर केली जाणार आहे. आयपीओ 25 सप्टेंबर 2017 रोजी बंद होणार आहे. या विक्रीसाठी सॅफ्रॉन कॅपिटल अॅडव्हॉयजर्स एकमेव लीड मॅनेजर आहे.

 

कंपनीने घेतलेले दीर्घकालीन कर्ज काही प्रमाणात किंवा पूर्ण भरण्यासाठी आणि कंपनीच्या अन्य कामांसाठी या विक्रीतून मिळालेल्या रकमेचा वापर केला जाणार आहे.

 

1992 मध्ये स्थापन झालेल्या कॅडसिस (इंडिया) लिमिटेड या डोमेन-फोकस्ड जीआयएस व इंजिनीअरिंग बिझनेस टेक्नालॉजी सर्व्हिस देणाऱ्या कंपनीचे मुख्यालय हैदराबाद येथे असून ती अमेरिकेतही कार्यरत आहे. कंपनी टेलिकॉम, सीएटीव्ही, तेल व वायू, वीज व अन्य सुविधा अशा क्षेत्रांसाठी प्रामुख्याने जिओस्पॅटिअल, फिल्ड इंजिनीअरिंग सर्व्हे, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट व इंजिनीअरिंग डिझाइन सेवा यासाठी आयटी-एनेबल्ड सेवा देते. ग्राहकांना उत्तम मूल्य देण्यासाठी कॅडसिस (इंडिया) लिमिटेड प्री-फॅब्रिकेटेड सॉफ्टवेअर कंपोनंट्स व फ्रेमवर्क्स यामध्ये गुंतवणूक करून वैविध्यपूर्ण बिझनेस मॉडेलची मदत घेते. कंपनीने आयटी सेवा क्षेत्रातील संतुलित कंपनी म्हणून लौकिक मिळवण्यासाठी संपादनामार्फत आपल्या सेवांचा विस्तार केला आहे. या संपादनांसाठी कंपनीने घेतलेली कर्जे काही प्रमाणात किंवा पूर्णपणे फेडण्यासाठी आयपीओतून मिळणाऱ्या रकमेचा वापर केला जाणार आहे. कॅडसिस (इंडिया) लिमिटेडच्या ग्राहकांमध्ये सरकारी विभाग व टेलिकॉम, ऊर्जा व अन्य सुविधा क्षेत्रांतील कंपन्यांचा समावेश आहे.

 

कॅडसिस (इंडिया) लिमिटेडला डिझाइन, विकास, उत्पादन, जिऑग्राफिकल इन्फर्मेशन सिस्टीम व इंजिनीअरिंग सेवांसाठी आयएसओ 9001:2015 प्रमाणपत्र आणि संस्थेची सर्व पूरक कार्ये, तसेच जिऑग्राफिकल इन्फर्मेशन सिस्टीम व इंजिनीअरिंग सेवांसाठी  ISMS Certificate – आयएसओ/आयईसी 27001:2013 आयएसएमएस प्रमाणपत्र मिळाले आहे.

 

रीस्टेटेड कन्सॉलिडेटेड फायनान्शिअल स्टेटमेंट्सच्या आधारे, 2017, 2016, 2015, 2014 व 2013 मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात कॅडसिस (इंडिया) लिमिटेडला ऑपरेशन्समधून अनुक्रमे 4,257.47 लाख रुपये, 2,984.15 लाख रुपये, 2,354.37 लाख रुपये, 2,000.46 लाख रुपये व 1,369.18 लाख रुपये उत्पन्न मिळाले आणि करोत्तर नफा (मायनॉरिस्टी इंटरेस्टचा हिस्सा जुळवल्यानंतर) 1,094.79 लाख रुपये, 551.74 लाख रुपये, 468.40 लाख रुपये, 296.99 लाख रुपये व 218.57 लाख रुपये मिलाला.

 

माहिती तंत्रज्ञान (आयटी) उद्योगासाठी भारत हे जगातील सर्वात मोठे सोर्सिंगचे ठिकाण असून, अमेरिकेतील 124-130 अब्ज डॉलर बाजारामध्ये भारताचा हिस्सा अंदाजे 67 टक्के आहे. या क्षेत्रामध्ये अंदाजे 1 कोटी मनुष्यबळ कार्यरत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या उद्योगाने देशातील आर्थिक परिवर्तनाला चालना दिली आहे आणि जागतिक अर्थव्यवस्थेत भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. अमेरिकेच्या तुलनेत अंदाजे 3-4 पट स्वस्त दराने भारतात आयटी सेवा उपलब्ध असल्याने, जागतिक सोर्सिंग बाजारात भारताची ही जमेची बाजू ठरत आहे. आयटी उद्योगामुळे भारतातील शिक्षण क्षेत्र, प्रामुख्याने इंजिनीअरिंग व कॉम्प्युटर सायन्स क्षेत्रांतही मोठी मागणी निर्माण झाली आहे. त्यामुळे कॅडसिसचा अनुभव व कौशल्ये सध्याच्या आयटी उद्योगाच्या गरजांना एकदम साजेसे आहे. अशी कौशल्ये विकसित केलेल्या कॅडलिसचे उद्दिष्ट जगभर प्रगती करणे आणि जगभरातील अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांना सेवा देणे हे आहे.

 

देशांतर्गत बाजारात, स्मार्ट सिटी, डिजिटल इंडिया कार्यक्रम, डिजिटल इंडिया व स्टार्टअप इंडिया अभियानांचा भाग म्हणून ‘इंटरनेट ऑफ थिंग्स’ (आयओटी) स्टार्ट-अप्ससाठी पाच इन्क्युबेशन सेंटर्स विकसित करण्याची केंद्र सरकारची योजना, सायबर सुरक्षा, मॅन्युस्क्रिप्ट्सचे डिजिटायझेशन, भारतीय रेल्वेच्या कामांचे डिजिटायझेशन अशा अनेक सरकारी उपक्रमांसाठी आयटीईएस क्षेत्राला येणाऱ्या मागणीचा फायदा कॅडसिस इंडिया लिमिटेडला मिळणार आहे.

आ.अनिल भोसले आणि नगरसेविका रेश्मा भोसलेंचे संचालकपद रद्द

0

पुणे-शिवाजीराव भोसले सहकारी बँकेस स्वतःच्या जागा भाड्याने देऊन सहकार कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले आणि त्यांच्या पत्नी भाजपच्या नगरसेविका रेश्मा भोसले यांना बँकेच्या संचालक पदावरुन काढून टाकण्यात आले आहे. तसेच संचालक मंडळाचा पुढील पाच वर्षांच्या कालावधीची मुदत समाप्त होईपर्यंत कोणत्याही सहकारी संस्थेच्या संचालक पदाची निवडणूक लढवता येणार नसल्याचे सहकार आयुक्त डॉ. विजय झाडे यांनी दिलेल्या आदेशात नमूद केले आहे.

याबाबत सुधीर रामचंद्र आल्हाट (रा. शिवाजीनगर) यांनी सहकार आयुक्तांकड़े तक्रार दिली होती.अनिल भोसले हे राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे आमदार आहेत, तर त्यांच्या पत्नी सौ. रेश्मा भोसले या भाजपाच्या पाठिंब्यावर पुणे महापालिकेत नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. भोसले यांनी शिवाजीराव भोसले सहकारी बँकेला आपल्या स्वतःच्या आणि आपल्या फर्मच्या मालकीच्या मिळकती भाड्याने दिल्या. यामुळे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील कलम 78 (1) (ब) मधील महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 57 (1) अ चे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत सहकार आयुक्तांनी त्यांचे संचालक पद रद्द केले आहे. सहकार कायद्यातील तरतुदीनुसार अशा प्रकारे संचालकांना संस्थेशी हितसंबंध निर्माण करणारा कोणताही करार करता येत नाही. तरीही भोसले यांनी विद्यानगर, कोथरुड, डेक्कन, विश्रांतवाडी आणि येथे तसेच बँकेच्या शिवाजीनगर मुख्यालयासाठी आपल्या जागा भाड्याने दिल्या. त्यामुळे त्यांच्यावर संचालकपद रदची कारवाई केली आहे. तसेच कोणत्याही सहकारी संस्थेत स्वीकृत सदस्यपदी किंवा नामनिर्देशित करण्यासही अपात्र ठरवण्यात आले आहे

‘सोवळे’ प्रकरणात भाषणबंदी स्विकारून निषेध … गोष्ट अॅडजेस्टेबल तहकुबीची (व्हिडीओ)

0

पुणे- पुणे तिथे काय उणे , या उक्तीप्रमाणे सोवळे प्रकरणाने अजूनही आहे जुने ..शहर आमचे पुणे .. चा प्रत्यय आणून दिला ..पण आता याच सोवळे प्रकरणाने महापालिकेच्या मुख्यसभेत हि  विरोधी पक्ष आणि सत्ताधारी यांच्यात अॅडजेस्टेबल कामकाज होऊ शकते ..याचा प्रत्यय आणून दिला आहे . यास कोणी सामंजस्यदायी भूमिका असेही नाव देवू शकेल. पण या निमित्ताने का होईनात , विरोधक सत्ताधाऱ्यांशी मिळते जुळते घेण्याच्या मनस्थितीत असू शकतात हे मात्र स्पष्ट झाले आहे .
हे सारे कसे घडले पहा, पहिली मुख्यसभा सप्टेंबर कार्यपत्रिकेची होती . सभा सुरु झाली तेव्हा माजी महापौर दिवाकर जयसिंग खिलारे, आणि आदी मान्यवरांच्या निधनामुळे त्यांना श्रद्धांजली वाहून हि सभा तहकूब करण्यात आली. दुसरी सभा, खास सभा होती , या वेळी अरविंद शिंदे ,अविनाश साळवे , अविनाश बागवे, संजय भोसले,दिलीप बराटे  यांनी ‘सोळवे’ प्रकरणातील खोले यांच्या चुकीच्या कृत्याचा निषेध करणारी तहकुबी मांडली, या वेळी कित्येक वेळ सभागृहात शांतपणे .. कामकाज ठप्प झालेले होते . मध्ये कोणी तरी म्हटले.. तुम्ही तहकुबी मांडा , अन्यथा ९६ आकडा काढून टाका … पण  अशा टिप्पणीला सत्ताधाऱ्यांकडून दाद मिळाली नाही ,आणि ही तहकुबी संमत करू पण त्यावर कोणी बोलायचे नाही, भाषणे करायची नाही ,अशी अट सत्ताधाऱ्यांकडून घातली गेली. आणि एकमताने ती मान्य करून तहकुबी मांडली गेली. मात्र तहकुबीतले काही शब्द देखील आयत्यावेळेला महापौरांनी वगळले … पहा याचा खास व्हिडीओ रिपोर्ट.. प्रत्येकाच्या याबाबतच्या मतासह….