Home Blog Page 3270

धान्याला कीड लागू नये म्हणून ’सेव्ह ग्रेन बॅग’ ची निर्मिती !

0
पुण्यातील ’पनामा फाउंडेशन’चे संशोधन 
पुणे :
शेतकर्‍यांनी पोत्यात साठवलेल्या धान्याला कीड लागू नये म्हणून ’सेव्ह ग्रेन प्लास्टिक बॅग ’ या आगळ्या वेगळ्या प्लास्टिक बॅग चे संशोधन पुण्यातील पनामा फाउंडेशन ने केले आहे . ’पनामा फाउंडेशन’ च्या सागर शहा यांनी हे संशोधन केले आहे . पुणे श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली .
  देशाची अर्थव्यवस्थाही शेतीवर अवलंबून आहे. देशात दरवर्षी शेतकरी हा लाखो टन धान्य पिकवत असतो त्यातील हजारो टन वायाही जाते. त्याला अनेक कारणेही आहेत. त्यामुळे तो ते धान्य पोत्यामध्ये साठवतो प्रसंगी त्याला किड लागून शेतक-यांना तोटा सहन करावा लागतो. यावर पुण्यातील संशोधक सागर शहा यांनी उपाय काढलाय तो म्हणजे या धान्याला कोणतीही किड लागु नये यासाठी त्यांनी ’सेव्ह ग्रेन प्लँस्टिक बॅग’ची निर्मिती केली. त्याला केंद्र सरकारच्या ’इंडियन इन्स्टिटयूट आँफ फूड प्रोसेसिंग’नेही मान्यता दिली आहे. राज्यात पहिल्यादांच त्यांनी हा प्रयोग केला आहे.
  ’पनामा फांऊडेशन’च्या माध्यमातून सागर शहा यांनी हा शोध लावला असून शेतकरी, ग्राहक यांना याचा फायदा होणार आहे. ही पूर्णतः प्लँस्टिक बॅग असून 50 किलोमध्ये ती उपलब्ध आहे. जपानचे तंत्रज्ञान  त्यांनी ही बॅग तयार  करताना वापरले  आहे. एथिलिन व्हिनाईल अल्कोहोल हे पाँलिमर असून कोणत्याही प्रकारचे गँसेस या पिशवीत येत नाही. त्यामुळे धान्याला किड लागत नाही .जर किडे असल्यास ते आतच मरतात, किंवा नव्याने कोणतीही किडे तयार होत नाही.
या प्रकारच्या समस्येवर 2012 पासून सागर शहा, सचिन गांगल, अंकु प्रकाश, श्रीपाद आमरे, अनिता यांनी या संशोधनाला सुरवात केली. शेतकरी, ग्राहक यांचे हित पाहता सध्या ही बँग 70 रुपयाला उपलब्ध आहे. पण शहा यांना जिथे धान्य पिकते अशा ग्रामीण भागात जाऊन शेतक-यांचे याबाबतीत प्रबोधन करणे आणि त्यांना किडीद्वारे साठवणुकीत होणार्‍या नुकसानीपासून वाचवणे हा उद्देश आहे.
ही बॅग टिकाऊ असून पुन्हा पुन्हा वापरता येण्यासारखी आहे, अशी माहिती सागर शहा यांनी यावेळी दिली

 

रणबीर कपूर ने ‘गौरी खान डिजाइन’ का दौरा किया!

0

अपने जन्मदिन के दो दिन बाद, रणवीर कपूर कल शाम को गौरी खान के स्टोर में गए थे।

अभिनेता ने साज-सजावट की चीज़ें और फर्नीचर को निहारते हुए वहाँ ढाई घंटे का वक़्त बिताया।

रणबीर वहाँ मौजूद भव्य फर्नीचर से काफी प्रभावित हुए और अन्य बातों के अलावा, कुछ कुर्सियों को चुनने के बाद, वह गौरी के साथ एक घंटे के लिए बैठे ताकि वह इस बात पर चर्चा कर सकें कि घर के चारों ओर अपनी नवीनतम खरीदी हुई वस्तुओं को कहाँ-कहाँ रखा जा सकता है।

हाल ही में बनाये हुए अपने नए घर के लिए अभिनेता गौरी की इस नए संग्रह वस्तु खरीदना चाहते थे।

रणबीर हाल फिलहाल में ही पाली हिल्स में मौजूद वास्तु नामक घर मे शिफ्ट हुए है और गौरी ने कुछ समय पहले ही सोशल मीडिया पर प्रशंसकों के साथ घर की एक झलक साझा की थी। इससे पहले, रणबीर के माता-पिता – ऋषि और नीतू कपूर ने प्रशंसा जाहिर की थी और ऋषि ने ट्वीट कर कहा की,”वास्तु, शानदार! गौरी खान! आपने रणबीर के मकान को घर बनाया है।नीतू और मैं दोनों अभिभूत हैं। धन्यवाद! नीतू ने भी अपनी खुशी ज़ाहिर करते हुए कहा कि,”गौरी खान द्वारा किया गया शानदार काम देखा। उनका स्वाद, विवरण करने का तरीका, परिष्करण – सभी शानदार। उनका जुनून उनके काम में दिखाता है।”

रणबीर एकमात्र ऐसे अभिनेता नहीं थे, जो गौरी के स्टोर पर गए थे, इससे पहले रानी मुखर्जी, सुसेन खान, फराह खान जैसे कुछ कलाकारों भी वहाँ अपनी उपस्थिति दर्ज करवा चुके है।

रणबीर कपूर ने कहा कि,”मैंने गौरी से मेरे घर का काम करवाया है, इसलिए मैं उनकी प्रतिभा जानता हूं, मुझे पता है कि वह घर कैसे डिजाइन करती है और इसे घर बनाती है। इसी के साथ घर की शैली और ग्लैमर सब कुछ बहुत अधिक है। मैं पहली बार ‘गौरी खान डिजाइन’ के स्टोर पर गया था। यह वाकई अति सुंदर है, वह दुनिया के विभिन्न हिस्सों से तरह-तरह प्रकार की चीज को एक साथ रखती है। प्रत्येक अनुभाग, स्टोर में प्रत्येक मंजिल में ऐसा कुछ है जो आपको इस पर विश्वास करने के लिए देखना होगा। तो कृपया आइये और गौरी खान डिजाइन का स्टोर देखें।”

गौरी खान डिजाइन मुंबई के जुहू में स्थित इंटीरियर डिज़ाइनिंग स्टोर है जो घर की सजावट में विभिन्न प्रकार के चयन प्रदान करता है।

निराधार वृद्धेला आसरा देणाऱ्या ‘प्रणवचा ‘ कसबा मतदार संघाच्या वतीने सत्कार

0

पुणे : एका वृद्ध निराधार महिलेला आसरा उपलब्ध करून देणाऱ्या प्रणव गंजीवाले याचा कसबा मतदार संघाच्या वतीने पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रणव चे काम आदर्शवत असून तरुणांनी त्याचा कामाचा आदर्श घ्यावा असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी यावेळी केले.

यावेळी नगरसेवक राजेश येनपुरे, हेमंत रासने, दिपक पोटे, अजय खेडेकर, सम्राट थोरात,अशोक येनपुरे, सुलोचना कोंढरे,आरती कोंढरे, रवी अनासपुरे,वैशाली नाईक, छगन बुलाखे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

पर्वती पायथ्याला राहणारी एक वृद्ध व निराधार महिला बाजीराव रोडला भटकत होती. तिच्या अंगावरील कपडे जीर्ण होऊन फाटले होते. बाजीराव रस्त्यावर ही महिला रात्री ११ च्या सुमारास थंडीने कुडकुडत पडली होती.  येथे जवळच राहणाऱ्या प्रणव गंजीवाले यांना ही वृद्ध महिला दिसली. त्यांनी तिची आपुलकीने चौकशी केली असता ती निराधार असल्याचे त्यांना समजले.  लगेचच त्यांनी स्माईल फौंडेशन या सामाजिक संस्थेला संपर्क साधून त्या महिलेला वृद्धाश्रमात दाखल केले.

त्याचा सत्कार करताना पालकमंत्री बापट म्हणाले, आजची तरुण पिढी एका वेगळ्या मार्गाने जात आहे. आजच्या बहुतांश तरुणांमध्ये अहं भाव दिसून येतो. अशा परिस्थितीत प्रणव ने उपेक्षित  आणि दुर्बल वृद्धेच्या सेवेसाठी निरपेक्षपणे केलेले काम अत्यंत स्तुत्य आहे. त्याच्या कामाचा इतरांनीही आदर्श घ्यावा. प्रणव सारख्या तरुणांचा सन्मान करून त्यांना चांगले काम करण्यासाठी आपण प्रोत्साहित केले पाहिजे. यामुळे आपला समाजाच्या व पर्यायाने देशाच्या प्रगतीला हातभार लागेल. असे ही ते म्हणाले.

 

२२० हून अधिक प्रकारचे शरीर वजन व्यायाम करता येतील असे अद्वितीय फंक्शनल ट्रेनिंग उपकरण

0

 

पुणे-पुण्याचे सर्वांत मोठे आणि अत्यंत खास तंदुरुस्ती केंद्र नायट्रो वेलनेस अँड फिटनेस हब आजपासून कल्याणीनगर येथे सुरु झाले. या केंद्राचे उद्घाटन  पंचशील ग्रुपचे अध्यक्ष अतुल चोरडिया यांच्या हस्ते झाले.

 नायट्रोच्या या पुणे केंद्रात फंक्शनल ट्रेनिंग, स्ट्रेंथ ट्रेनिंग, स्विमिंग पूल व ग्रुप क्टिव्हिटीज अशा परिपूर्ण सुविधा उपलब्ध आहेत. व्यायामाची उपकरणे अत्याधुनिक व वाढीव सुरक्षा वैशिष्ट्यांनी युक्त आहेत. फिजिओथेरपिस्ट व न्यूट्रिशनिस्ट यांच्यासह प्रशिक्षित व प्रमाणित अशा तंदुरुस्ती व्यावसायिकांचा संघ सज्ज आहे. नायट्रो वेलनेस अँड फिटनेस हबने एक अद्वितीय फंक्शन ट्रेनिंग उपकरणही आणले आहे ज्यावर २२० हून अधिक प्रकारचे शरीर वजन व्यायाम खास प्रशिक्षण क्षेत्रात करता येतात. या केंद्राने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रोफेशनल साईझ एमएमए किक बॉक्सिंग रिंगची रचना केली असून आपल्या स्पिनिंग स्टुडिओमध्ये टॉप एंड बाइक्स आणल्या आहेत. या स्टुडिओला आकाशाचे सुंदर दृश्य दिसेल असे काचेचे छत आहे आणि सभोवताल पाणी खेळवलेला लाऊंजही आहे. येथील हेल्थ कॅफेमध्ये व्यायामानंतर खाण्याचे ताजे, चविष्ट व आरोग्यपूर्ण पदार्थ व पेये उपलब्ध आहेत. त्याखेरीज या केंद्रात स्पा, सलून व अन्य भरपूर सुविधा आहेत.

 या आधुनिक तंदुरुस्ती केंद्रातील जिम्नॅशियममध्ये मध्यवर्ती भागात सिग्नेचर जायंट डिस्को बॉल बसवला असून त्यामुळे जिमला जणू एखाद्या क्लबचे रुप प्राप्त झाले आहे. जांभळ्या रंगातील प्रकाश योजनेमुळे जिममध्ये शांत व स्फूर्तिदायक वातावरण निर्माण झाले आहे. या केंद्रात अत्याधुनिक व्यायामशाळा, अद्ययावत उपकरणे, प्रमाणित प्रशिक्षक व व्यायामादरम्यान संगीताचा आनंद लुटण्यासाठी लाईव्ह डीजेची सोय असल्याने हे केंद्र परिपूर्ण तंदुरुस्ती अनुभव मिळवून देणारे ठरले आहे.

 यासंदर्भात नायट्रो वेलनेस अँड फिटनेस हबचे संस्थापक प्रबोध डावखरे म्हणाले, “या केंद्रात काहीसे रॉक स्टार शैलीचे उत्साहवर्धक व हलकेफुलके रुप आणि अनुभव निर्माण करण्याचे आमचे ध्येय होते. पारंपरिक जिम व क्लबमध्ये आपण जे वातावरण पाहतो त्याहून वेगळेपण राखण्याची आमची इच्छा होती. प्रत्येक जिममध्ये आढळणारी एकसमान व वैतागवाणी अंतर्रचना मला येथे नको होती. त्यामुळे मी अशी रचना केली आहे जी माझ्यातील राकट, ऊर्जापूर्ण, चाकोरीबाह्य आणि माझ्या स्पर्धकांहून सरस राहण्याच्या आकांक्षेचे प्रतिबिंब ठरेल.

 नायट्रो फिटनेस ही प्रबोध डावखरे यांनी स्थापन केलेली तंदुरुस्ती केंद्रांची साखळी आहे. वर्ष २०१२ मध्ये त्यांनी कल्याणकारी प्रशिक्षण देण्याच्या एकमेव हेतूने पहिले नायट्रो फिटनेस हब उघडले. आज त्यांची ठाण्यात दोन तर ब्रिच कँडी येथे एक केंद्रे आहेत. पुण्यातील केंद्र चौथे असून लवकरच नाशिक येथे एक केंद्र उघडण्याची योजना आहे.

 नायट्रो फिटनेस हब हे असे केंद्र आहे, जेथे तंदुरुस्ती गांभीर्याने, पण रंजक वातावरणात केली जाते. येथील सर्व उपकरणे आणि प्रत्येक गोष्ट गरजेनुरुप बनवून घेण्यात आली असून जगातील सर्वोत्तम उत्पादकांकडून आयात केली आहे. केंद्राची अंतर्ऱचना व बाह्यरचनाही सर्वोत्तम दर्जाची असून त्यातील घटकही प्रसिद्ध ब्रँडसचेच आहेत. विविध स्रोतांतून सर्वोत्तम ते घेण्यामुळे, विशेषतः जिम स्थापन करताना दर्जाबाबत कोणतीही तडजोड केलेली नाही.

 आम्ही अगदी प्रत्येक बाबतीत म्हणजे आमच्या उपकरणांचा दर्जा व सेवांतही वेगळेपण जोपासले आहे. ग्राहकांना अनोखा नायट्रो एक्स्पिरियन्स मिळावा, हेच आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. तंदुरुस्ती उद्योगात क्रांती घडवण्यासाठी आणि जिम कसे असावे याबाबतचा दृष्टीकोन बदलून टाकण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत. म्हणूनच आम्ही चाकोरीच्या बाहेरचे आहोत, असे प्रबोध यांनी स्पष्ट केले.

 विशेष उल्लेखनीय उपक्रम म्हणजे या केंद्रातील जिममध्ये शारीरिक विकलांग व अपंग व्यक्तींना सुविधांचा वापर करण्यासाठी आणि पोषक पदार्थ मिळण्यासाठी मोफत प्रायोजन पुरवले जाणार आहे.

 दसऱ्याच्या पवित्र मुहूर्ताचे औचित्य साधून प्रबोध यांनी एक स्तुत्य पुढाकारही जाहीर केला आहे. नायट्रो हबच्या वाहनतळाच्या जागेत दर रविवारी दुपारी वंचित बालकांसाठी इंग्रजी व इतर विषयांचे मोफत शिकवणी वर्ग सुरु केले जाणार आहेत. सर्व पुस्तके, शैक्षणिक साहित्यही जिमतर्फे पुरवले जाईल. समाजाच्या देण्याची परतफेड करण्याचा हा आमचा नम्र मार्ग आहे, अशा भावना प्रबोध यांनी व्यक्त केल्या आहेत.

गाजर आंदोलनात जनतेचा आश्चर्यकारक सहभाग (व्हिडीओ)

0

पुणे- शहर कॉंग्रेसच्या वतीने कर्वे रस्त्यावर मोदी सरकारच्या विरोधात ,पोलीस बंदोबस्तात गाजर आंदोलन सुरु होते . आणि आश्चर्य म्हणजे हे आंदोलन पाहून चक्क जनतेने उत्स्फूर्ततेने आंदोलकांना दाद दिली . एक वयस्क महिला , आणि एक विद्यार्थी आंदोलकापर्यंत पोहोचले आणि आम्हालाही माईक वर बोलू द्यात म्हणून त्यांनी काही वाक्ये बोलून सरकारबद्दल असंतोष नोंदविला .अनेकांनी बसमधून जाताना खिडकीतून ,दरवाजातून आंदोलकांना हात करून दाद दिली .
असे चित्र सहसा दिसत नाही ते या आंदोलनात दिसले .शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन काल करण्यात आले ,यावेळी आमदार अनंतराव गाडगीळ,तसेच अभय छाजेड ,अजित दरेकर आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते .

कचऱ्यातील ७० हजारांचे सोने परत केले -स्वच्छता कर्मचारी महिलेची कामगिरी

0
पुणे  आजच्या काळत नेहमी बोलले जाते की लोक आता प्रमाणिक राहीले नाहीत परंतु नैतिकता आणि प्रामाणिकपणाचे जीवंत उदाहरण नुकतेच भोसरीत घडलेल्या घटनेने दिसून आले.  पिंपरी-चिंचवड येथे बीव्हीजी इंडिया कचरा व्यवस्थापन सेवा विभागातकरणाऱ्या या  लता चव्हाण यांनी येथील  निवासी मिसेस शाहु यांचे सोन्याचे दागिने कचऱ्यातून  शोधुन परत केले आहेत.
लता चव्हाण यांस मिसेस शाहू यांच्याकडून समजले की मिसेस शाहुंनी चुकुन त्यांची सोने व त्याची पावती ठेवलेली बॅग कचऱ्यात फेकली आहे. बीव्हीजी कचरा संकलन सेवा विभागाद्वारे मिसेस शाहु राहत असलेल्या परिसरातील कचरा घरोघरी दरवाजावर जाऊन गोळा केला जातो. हे सोने जवळपास ७० हजार रूपये किमतीचे होते.
यानंतर लता यांनी  तातडीने फेकलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून सोने असलेली बॅग आणि पावती शोधून काढली. बॅग शोधल्यानंतर लता यांनी श्रीमती शाहू यांच्याकडून बक्षीस स्वीकरण्यास देखील नकार दिला आणि त्यांनी आपल्या कामाशी एकनिष्ट राहुन प्रामाणिकपणे संघटनेच्या नियमांचे पालन केले.
आजच्या प्रकारावर  प्रतिक्रिया देताना, बीव्हीजी इंडियाचे सीएमडी एच.आर गायकवाड म्हणाले, लता चव्हाण यांनी आज सिद्ध केले की ‘मानवता अजुनही शिल्लक आहे’  ही केवळ आमच्या दृष्टीनेच नव्हे तर बीव्हीजी इंडियासाठीही जीवनाचा एक मार्ग आहे. मला  त्यांच्याबद्दल आणि येथे कार्य करणार्या लोकांबद्दल अभिमान वाटतो, त्यांच्या ह्या प्रामाणिक कृतीमध्ये खरोखरच बीव्हीजीद्वारा निर्धारीत मूलभूत मूल्य प्रतिबिंबित होत आहेत.
लता चव्हाण म्हणाल्या “मी डम्पिंग ग्राऊंडवर सोने शोधू शकले  याचा मला आनंद झाला. मला वाटले की श्रीमती शाहूंचे सोने शोधून परत णे ही माझी जबाबदारी होती

वैभव-प्रार्थनाचं लागणार ‘व्हॉट्सअप लग्न’

0

कॉफी आणि बरंच काहीया चित्रपटातील वैभव तत्त्ववादी आणि प्रार्थना बेहरे ही हिट जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना मोहिनी घालण्यासाठी सज्ज झाली आहे. व्हॉट्सअप लग्न या आगामी चित्रपटात प्रेक्षकांना पुन्हा एकदा वैभव-प्रार्थनाची केमिस्ट्री अनुभवता येईल. नटसम्राटचे निर्माते विश्वास जोशी आणि दुनियादारीया चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते नानू जयसिंघानी यांनी प्रथमच एकत्र येत व्हॉट्सअप लग्न या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट ९ फेब्रुवारी २०१८ म्हणजेच पुढल्या वर्षी व्हॅलेंटाईन डेच्या आठवड्यात प्रदर्शित होणार आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीत ज्याप्रमाणे वर्षभर किंवा सहा महिने आधीच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख घोषित करण्याची परंपरा आहे, त्याप्रमाणेच व्हॉट्सअप लग्नच्या निर्मात्यांनीही जवळजवळ चार महिने अगोदर म्हणजेच दसऱ्याच्या मुहूर्तावर या चित्रपटाची घोषणा करीत सुनियोजित पद्धतीने चित्रपट प्रदर्शित करण्याचा संदेश दिला आहे. म्युझिकल रोमँटिक लव्हस्टोरी असलेल्या या चित्रपटाचं कर्णमधूर संगीत संगीतप्रेमींपर्यंत योग्य प्रकारे पोहोचावं हा देखील यामागचा हेतू आहे. प्रदर्शनाची तारीख अगोदर घोषित केल्याने ऐन वेळी होणारा तारखांचा घोळ टाळता येईलच, पण त्यासोबतच चित्रपटाच्या प्रमोशनसाठीही मुबलक वेळ मिळेल हा एक महत्त्वपूर्ण विचारही व्हॉट्सअप लग्न च्या निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.

या चित्रपटाची आणखी एक खासियत म्हणजे नटसम्राटया चित्रपटाचे निर्माते विश्वास जोशी यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. फिनक्राफ्ट मीडिया आणि व्हिडीओ पॅलेसची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचं चित्रीकरण संपलं असून, पोस्ट प्रोडक्शनचं काम लवकरच पूर्ण होईल.

जिंदगी नॉट आउट मध्ये दिसणार ‘क्रिकेट मधील द्रोणाचार्य’ विजय कदम यांचे छोट्या पडद्यावर पुनरागमन

0

विजय कदम ह्या कलाकाराने मराठी सिनेसृष्टीत केलेलं काम लाखमोलाचं आहे. गेली ४३ वर्षे रंगभूमीची सेवा करणारे रंगकर्मी व चतुरस्त्र अभिनेते विजय कदम, अनेक वर्षांनी छोट्या पडद्यावर येणार आहेत. मराठी चित्रपटांमधील व नाटकांमधील या प्रसिद्ध अभिनेत्याने आपल्या कारकिर्दीत मुख्यतः विनोदी भूमिका साकारल्या. सहज विनोदी अभिनयामुळे ते विनोदी अभिनेते म्हणून नावारूपाला आले. मनाने युवा असलेले विजय कदम झी युवा या वाहिनीच्या लोकप्रिय मालिका ‘जिंदगी नॉट आउट ‘ या मालिकेद्वारे पुन्हा छोट्या पडद्यावरील नवीन इनिंग खेळणार आहेत. कुटुंबातील एका व्यक्तीच्या डोळ्यातील स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी जेव्हा सगळ्यांची साथ मिळते तेव्हा त्या स्वप्नपूर्तीलाही वेगळेच तेज येते. याच भावविश्वावर आधारित ‘जिंदगी नॉट आउट ‘ ही मालिका झी युवा या वाहिनीवर  सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता पहायला मिळते . या मालिकेद्वारे विजय कदम त्यांचा मराठी मालिकेमधील कम बॅक करत आहेत

जिंदगी नॉट आउट ह्या मालिकेत २१ वर्षाच्या सचिन देसाई या मुलाचं क्रिकेट या खेळावरील प्रेम आणि ते पूर्ण करण्याचा ध्यास घेतलेलं त्याचं कुटुंब आपल्याला पाहायला मिळतंय. सचिनच्या या स्वप्नात येणाऱ्या अडचणी आणि त्याला संपूर्ण कुटुंब कसे तोंड देते हे पाहताना नकळतपणे आपल्याला आपल्या कुटुंबाची नव्याने ओळख होते. सध्या ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीला उतरत आहे. मुख्यतः क्रिकेट हा खेळ ज्यांच्यासाठी धर्म आहे अशी तरुण मंडळी ही मालिका आवडीने पाहते आहे. मालिकेत सर्वोतोपरी क्रिकेट साठी आयुष्य देणाऱ्या सचिनला एका योग्य क्रिकेट कोच ची गरज असते, पण पैसे नसल्या कारणाने त्याला योग्य संधी मिळत नाही. याच वेळी त्याची क्रिकेट मधील द्रोणाचार्य असलेल्या विजय कदम यांची भेट होते. आता विजय कदम सचिन ला त्याच्या करिअर मध्ये कशी मदत करतात हे पाहण्यासारखे असेल. आजच्या मध्यम वर्गीय कुटुंबातील प्रत्येक क्रिकेट वेड्या मुलाच्या हृदयाशी जाऊन भिडणारी अशी ही जिंदगी नॉट आउट मालिकेची कथा आहे. विजय कदम या मालिकेत सचिन देसाई चे क्रिकेट मधील द्रोणाचार्य म्हणजेच त्याचे कोच म्हणून येत आहेत. नेहमीच प्रेक्षकांना हसवणारे विजय कदम ही एक वेगळी भूमिका कशी सादर करतात हे नक्कीच पाहण्यासारखे असेल. या मालिकेमध्ये  सचिन देसाई च्या भूमिकेत तेजस बर्वे  व स्नेहा च्या भूमिकेत ज्ञानदा रामतीर्थकर  आणि शैलेश दातार , वंदना वाकनीस , नेहा अष्टपुत्रे  , सायली झुरळे , तेजश्री वालावलकर , स्वप्नील फडके , उज्वला जोग , प्रसन्ना केतकर , सिद्धीरूपा करमरकर , अथर्व नकती , राहुल मेहेंदळे , आदिश वैद्य असे अनेक कलाकार आहेत.

नवरात्र महोत्सवात वीरपत्नींचा सन्मान

0

पुणे-यंग भोर्डे आळी मित्र मंडळ आयोजित नवरात्र महोत्सव कार्यक्रमात कारगिल युद्धात शहिद झालेल्या पुणे जिल्ह्यातील हुतात्मा विजय मोरे व प्रदीप मोरे यांच्या वीरपत्नींचा प्रत्येकी 25 हजार रूपयांचा धनादेश , साडी , शाल , श्रीफळ व मातेची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी यंग भोर्डे आळी मित्र मंडळ नवरात्र महोत्सवाचे अध्यक्ष अध्यक्ष अजय भोसले , सौ. भोसले , आमदार जगदीश मुळीक , माजी  आमदार महादेव बाबर , नगरसेवक विशाल धनवडे , नगरसेवक अविनाश बागवे , नगरसेवक प्रदिप गायकवाड , माजी नगरसेवक प्रशांत बधे , डॉ. कुणाल कामठे , गजानन पंडित आणि मंडळाचे कार्यकर्ते  उपस्थित होते . त्या कार्यक्रमात आपल्या भावना व्यक्त करताना वीरपत्नी दिपाली मोरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ठाणे महापालिकेत नोकरी मिळवून दिल्या बद्दल आभार मानले.

फुलपाखरू मध्ये वाईट प्रवृत्तींचे ‘ रावण दहन ‘

0

मराठी संस्कृती प्रमाणे , दसरा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे.. दश म्हणजे दहा आणि हरा म्हणजे हरल्या आहेत. दसर्‍याच्या आधीच्या नऊ दिवसांच्या नवरात्रात दाही दिशा देवीच्या शक्तीने भारलेल्या असतात. नियंत्रणात आलेल्या असतात, म्हणजेच दाही दिशांतील दिक्भव, गण इत्यादींवर नियंत्रण आलेले असते, दाही दिशांवर विजय मिळालेला असतो.दुर्गानवरात्र संपल्यानंतर लगेच दसरा हा दिवस येतो; म्हणून याला ‘नवरात्रीच्या समाप्तीचा दिवस’ असेही मानतात. प्रभु श्रीराम याच दिवशी रावण वधाकरिता निघाला होता. श्रीरामाने रावणावर विजय मिळवून त्याचा वध केला त्यामुळे या दिवसाला ‘विजयादशमी’ असे नाव मिळाले आहे.. पूर्वीच्या काळात चांगल्या गोष्टींचा वाईट गोष्टीवर होणारी कुरघोडी दाखवण्यासाठी वर्षोनवर्षे रावण दहनाची गोष्ट सांगितली जाते . सध्या नवरात्र सुरु आहे. त्याच प्रमाणे फुलपाखरू मालिके मध्ये सुद्धा नवरात्र आणि दांडिया गरबा यांची मजा दाखवण्यात आली. दसऱ्याचा विशेष भागात फुलपाखरू मालिकेतील मानस आणि वैदेही सकट कॉलेजमधील सर्व मित्र मंडळी वाईट प्रवृत्तीचे दहन दसऱ्याच्या दिवशी ‘रावण दहन’ करून करणारआहेत.

 

फुलपाखरू या मालिकेत या ‘रावण दहन’या विशेष भागात, एक १५ फुटी रावण बनवला आहे .  ह्या रावणाच्या प्रत्येक शिराखाली बलात्कार, स्त्रीभूण हत्या, विनयभंग , अल्पवयीन मुलींवर अत्याचार , व्यसनाधीनता , बाल कामगार , भ्रष्टाचार , फसवणूक , गुंडगिरी , वृद्धांचा अपमान  समाजातील वाईट प्रवृत्तींबद्दल लिहिले असून ,कॉलेज मधील सर्वच मुले देशाचे सिटीझन म्हणून ह्या सर्व प्रवृत्ती नष्ट करायला हातभार लावण्याचे रेसोलुशन करतात . सध्या फुलपाखरू या मालिकेने तरुणाईच्या हृदयात घर केले असून मानस आणि वैदेही यांचे लाखोंनी चाहते झाले आहेत. कॉलेज जीवनातील मानस म्हणजेच यशोमन आपटे आणि वैदेही म्हणजेच हृता दुर्गुळे यांचे निरागस प्रेम दाखवणारी ‘फुलपाखरू’ ही मालिका सोमवार ते शनिवार रोज संध्याकाळी ७:३० वाजता झी युवावर प्रदर्शित होते.

एकही दिव्यांग व्यक्ती लाभापासून वंचित राहू नये. -खा.अनिल शिरोळे

0

 पुणे दि. 29: पुणे परिसरातील दिव्यांग नागरिकांसाठी पुणे येथे विकलांग प्रशिक्षण शिबिराचे आयोजन लवकरच करण्यात येणार आहे.दिव्यांग व्यक्तींना विविध योजनांचा लाभ मिळवून देणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे.यासाठी अपंग कल्याण आयुक्त कार्यालय,पुणे महानगरपालिका,पिंपरी-चिंचवड महानगरपालिका,स्वयंसेवी संस्था अपंग कल्याणकारी संस्था यांच्या सहकार्याने पुणे परिसरातील पात्र  दिव्यांग व्यक्तींची अद्यावत यादी बनविण्याचे काम चालू आहे. यादी बनवताना एकही पात्र व्यक्ती या लाभापासून वंचित राहणार नाही, याची संबंधित विभागांनी काळजी घ्यावी अशा सूचना खा.अनिल शिरोळे यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित विकलांग शिबिराच्या पूर्वतयारीच्या बैठकीत ते बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी सौरभ राव, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, तहसीलदार मीनल कळसकर, उपसंचालक आरोग्य सेवा डॉ. संजय देशमुख, पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे समाज कल्याण विभाग तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

उत्तम आरोग्यासाठी खेळ महत्वाचा : पालकमंत्री गिरीश बापट – नामदार करंडक क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन

0

पुणे : उत्तम आरोग्यासाठी खेळ महत्वाचा आहे.त्यामुळे प्रत्येकाने खेळ खेळला पाहिजे असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले. कसबा मतदार व अनिल बेलकर मित्र परिवार यांच्या वतीने येथील शिंदे हायस्कुलच्या मैदानावर नामदार करंडक या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

उदघाटन प्रसंगी नगरसेवक हेमंत रासने, गायत्री खडके, अनिल बेलकर, नितीन पंडित, उदय लेले, राहुल माने, रोहित करपे, प्रतिक शहा यांच्यासह कसबा मतदार संघातील कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री बापट म्हणाले, आपले शरीर आणि मन स्वस्थ राहण्यासाठी प्रत्येकाने नियमितपणे  मैदानी खेळ खेळले पाहिजेत. त्याचप्रमाणे त्यांनी पावसाच्या अडथळा आल्याने रद्द करण्यात आलेल्या स्पर्धा पुन्हा जिद्दीने भरवल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले.

नगरसेवक हेमंत रासने यांनी  नामदार गिरिश बापट राजकारणाच्या पिचवर ४० वर्षे नाबाद असल्याचे सांगत या स्पर्धेचे नामदार करंडक हे नाव सार्थक असल्याचे सांगितले.

तरुणांना एकत्रित आणून विधायक उपक्रम राबवायचा म्हणून या स्पर्धेचे आयोजन केले असल्याचे अनिल बेलकर यांनी सांगितले.

वादळाच्या तडाख्यात हडपसरमध्ये 16 वीजखांब, वाहिन्या जमीनदोस्त हडपसर, मगरपट्टा परिसरात पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा

0

पुणे, दि. 29 : पुणे शहरात शुक्रवारी (दि. 29) दुपारी दोनच्या सुमारास झालेल्या वादळी पावसाच्या तडाख्याने तसेच वीजतारांवर झाडे व फांद्या पडल्याने हडपसर व परिसरातील 4 वीजवाहिन्यांचे 16 वीजखांब व त्यावरील वाहिन्या जमीनदोस्त झाल्या. त्याची दुरुस्ती युद्धपातळीवर सुरु झाली आहे.

या वादळाच्या तडाख्यात वीजयंत्रणा नादुरुस्त झाल्याने हडपसर गाव व सोलापूर रोड परिसरातील सुमारे 22 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यापैकी सुमारे 18 हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा पर्यायी व्यवस्थेतून सायंकाळी सुरु करण्यात आला आहे तर उर्वरित भागातील वीजपुरवठा पर्यायी व्यवस्थेतून रात्री सुरु करण्यात येत आहे.

याबाबत माहिती अशी की, बंडगार्डन विभाग अंतर्गत हडपसर इंडस्ट्रीयलमधील हेन्ले 22 केव्ही उपकेंद्रातून रामटेकडी, सेंट मेरी, हेन्ले 1 व 2 अशा 22 केव्हीच्या 4 ओव्हरहेड वाहिन्यांद्वारे हडपसर गाव, हडपसर मार्केट, साडेसतरानळी, सातववाडी, शिंदेवस्ती, रामटेकडी, सोलापूर रोड, मगरपट्टा रोड, बी.टी. कवडे रोड आदी परिसरात वीजपुरवठा केला जातो. आज दुपारी 2 वाजताच्या सुमारास वादळ व मुसळधार पाऊस यामुळे या चारही वीजवाहिन्यांवर अनेक ठिकाणी झाडे व फांद्या कोसळल्या. वीजवाहिन्यांवर ताण आल्याने वीजवाहिन्यांवरील 16 वीजखांब जमीनदोस्त झाले. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. महावितरणचे अभियंता व कर्मचार्‍यांनी तातडीने सर्वप्रथम खाली पडलेल्या वीजवाहिन्यांची पाहणी करून त्यात सार्वजनिक सुरक्षेचा धोका नसल्याची खात्री केली आणि पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरु करण्याचे प्रयत्न सुरु केले. मुख्य अभियंता श्री. एम. जी. शिंदे यांनीही सूचना करून पर्यायी व्यवस्थेतून संबंधीत परिसरात वीजपुरवठा सुरु करण्याचे निर्देश दिले व कोसळलेले वीजखांब व वाहिन्या उभारण्यासाठी तातडीने काम सुरु करण्यास सांगितले.

सायंकाळपर्यंत 22 केव्ही रुबी हॉल वीजवाहिनीवरून नादुरुस्त झालेल्या सेंट मेरी व रामटेकडी वीजवाहिनीवरील ग्राहकांना वीजपुरवठा सुरु करण्यात आला आहे. तसेच इतर ठिकाणीही पर्यायी सोय उपलब्ध करून हडपसर इंडस्ट्रीयल, हडपसर मार्केट, रामटेकडी इंडस्ट्रीयल, सातववाडी, मगरपट्टा, सेंट मेरी आदी भागातील सुमारे 18 हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा सुरु करण्यात आला आहे. तर शिंदेवस्ती, साडेसतरानळीचा काही भाग, बी. टी. कवडे मार्ग, गाडीतळ या परिसरातील ग्राहकांचाही वीजपुरवठा पर्यायी व्यवस्थेतून सुरु करण्यात येत असून रात्री उशिरा त्याचे काम पूर्ण होईल. दरम्यान वादळाच्या तडाख्यात जमीनदोस्त झालेले वीजखांब व वाहिन्यांची दुरुस्तीला सुरवात झाली असून येत्या दोन दिवसांत त्याचे काम पूर्ण होणार आहे. या कालावधीत पर्यायी व्यवस्थेतून भारव्यवस्थापन शक्य झाले नाही तर हडपसर, सोलापूर रोड, मगरपट्टा, रामटेकडी आदी परिसरात नाईलाजास्तव दोन ते तीन तासांचे भारनियमन करावे लागण्याची शक्यता आहे. वीजयंत्रणेची दुरुस्ती व पुरवठा सुरळीत करण्यासाठी अधीक्षक अभियंता श्री. सुंदर लटपटे, कार्यकारी अभियंता श्री. मुरलीधर येलपले, अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. चंद्गकांत चव्हाण यांच्यासह सुमारे 55 अभियंते व कर्मचारी कार्यरत आहेत.

चौकट – शिवाजीनगर, रास्तापेठ, पिंपरी विभागात काही ठिकाणी वीजखंडित – शुक्रवारी (दि. 29) दुपारी झालेल्या वादळी पावसामुळे महावितरणच्या शिवाजीनगर, रास्तापेठ व पिंपरी विभागातील वीजपुरवठा काही ठिकाणी खंडित झाला होता. यात फातिमानगर, शिंदेछत्री, एनआयबीएम रोड, लुल्लानगर, रहेजा गार्डन, कोंढवा, बाणेर, बालेवाडी, पाषाण, वाकड रोड, कस्पटेवस्ती, जगताप डेअरी, शितोळेनगर, ताथवडे आदी परिसरात झाडे, फांद्या पडल्याने तसेच काही फलके वादळाने उडून वीजतारांवर पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. शिवाजीनगर, रास्तापेठ विभागातील सर्व ठिकाणी वीजपुरवठा सुरु करण्यात आला आहे. तर पिंपरीमधील जगताप डेअरी, वाकड रोडचा काही परिसर, शितोळेनगरमधील वीजपुरवठा यंत्रणेची दुरुस्ती किंवा पर्यायी व्यवस्था करून रात्री उशिरापर्यंत सुरु करण्यात येत आहे.

आजच खर्‍या अर्थाने विश्वशांती ची गरज डॉ. रघुनाथ माशेलकर यांचे मत;

0
एमआयटी डब्लूपीयू तर्फे डॉ.विजय भटकर आणि डॉ. स्कॉट हॅरियाट यांना ‘समर्पित जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान
पुणे-आजची परिस्थीती ही अत्यंत भयावह आहे. ही परिस्थीती पाहता जुन्या काळापेक्षा आजच्या तंत्रज्ञानाच्या दृष्टीने प्रगत असणार्‍या काळातच  खर्‍या अर्थाने विश्वशांतीची गरज आहे. असे मत जगविख्यात शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले.
विश्वशांती केंद्र (आळंदी) व एमआयटी विश्वशांती विद्यापीठ, पुणे तर्फे जागतिक कीर्तीचे संगणक तज्ज्ञ, नालंदा विद्यापीठाचे कुलपती पद्मभूषण डॉ.विजय भटकर आणि अमेरिका येथील महर्षी युनिव्हर्सिटी ऑफ मॅनेजमेंटचे कुलगुरू डॉ.स्कॉट हॅरियट यांना पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते ‘समर्पित जीवन गौरव पुरस्कार’ ने सन्मानित करण्यात आले. त्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी  डॉ. विश्‍वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड,
 थोर तपस्वी श्रीकृष्ण कर्वे उर्फ कर्वे गुरुजी,  जे. के. लक्ष्मीपत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रोशनलाल रैना, शारदा ज्ञानपीठाम्चे अध्यक्ष पंडित वसंत गाडगीळ, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड, एमआयटीचे अधिष्ठाता प्रा. शरदचंद्र दराडे-पाटील, प्रा. डी.पी. आपटे, डॉ. एल. के. क्षीरसागर हे  उपस्थित होते.
डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले, “ विज्ञान आणि अध्यात्म या दोघांनी एकत्र येत संपूर्ण जगात शांती प्रस्थापित करणे गरजेचे आहे. आणि हे केवळ आपला भारत देशच करू शकतो. त्यामूळे त्या उद्देशाप्रत पोचण्यासाठी आज प्रत्येक व्यक्तीने आपापल्या ध्येयाप्रती अत्यंत प्रामाणिक असणे गरजेचे आहे.     ”
डॉ. विश्‍वनाथ दा. कराड म्हणाले, “ संत वृत्तीचे शास्त्रज्ञ म्हणून डॉ.  विजय भटकर आणि स्कॉट हॅरियाट  यांचा उल्लेख करावा लागेल.  खरे म्हणजे राष्टृाची आणि भाषेची बंधने ओंलाडून जाणारे त्यांचे कार्य आहे.  ”
सत्काराला उत्तर देतांना डॉ. विजय भटकर म्हणाले, “ आजच्या काळात विज्ञान निश्चितच महत्वाचे आहे. त्यातच आता तंत्रज्ञानाची भर पडली आहे. मात्र आज या विज्ञान व तंत्रज्ञानापेक्षा अधिक गरज अध्यात्माची आहे. विज्ञान व तंत्रज्ञान हे तुम्हाला जगाचे, विश्वाचे भौतिक ज्ञान देते पण अध्यात्म तुम्हाला जगण्याचा अर्थ शिकवते. ”
सत्काराला उत्तर देतांना डॉ. स्कॉट हॅरियाट म्हणाले, “ जेव्हा तुम्ही  निसर्गाला सोबत घेऊन एखादी कृती करता तेव्हांच त्या कृतीला सफलतेचा भाव असतो. ज्या क्षणी तुम्ही निसर्गाचा व पर्यायाने संपूर्ण समाजाचा देखील विचार करेनासे होता, तेंव्हा तुम्ही कितीही बौद्धिके देत असलात तरी तुम्हाला कोणीही बुद्धीवादी म्हणणार नाही. त्यासाठी असणारा विवेकच तुम्हाला बुद्धीवादी ठरवेल. संपूर्ण जगात विवेका इतके महत्त्वाचे दुसरे काहीच नाही.  ”

अजित पवार रस्त्यावर उतरल्याने मोठ्ठा जनआक्रोश -पोलीस गायब (व्हिडीओ)

0
पुणे-राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः रस्त्यावर उतरल्याने पावसाची कोणतीही तमा न बाळगता दीपक मानकर ,सुभाष जगताप ,चेतन तुपे पाटील, योगेश ससाणे , भैयासाहेब जाधव , प्रिया गदादे ,बाबुराव पाचारणे  आदी नगरसेवकांनी कसलेली कंबर ,आणि त्यांचे मैदानात उतरलेले कार्यकर्ते  यांच्यामुळे पुणे शहर राष्ट्रवादी चा मोर्चा मोठ्ठा जन आक्रोश करणारा मोर्चा ठरला .विशेष म्हणजे टिळक रस्त्यावरील अभिनव चौकात मोर्चासाठी जमलेले दीपक मानकर, योगेश ससाणे,प्रिया गदादे ,सुनील टिंगरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली त्यामुळे चारही दिशांची वाहतूक जाम झाली . खुद्द अजित पवार यांची मोटार स .प. महाविद्यालयाजवळ अडकून पडली तर चेतन तुपे पाटील स्वतः स्वारगेटला अडकून पडले , तुपे पाटील आपली मोटार सोडून दुचाकीने येवून मोर्चात सहभागी झाले . तर अंकुश काकडे आणि कार्यकर्त्यांनी अभिनव चौकात स्वारगेट कडे जाणारी वाहनेच केवळ सोडल्याने अजित पवार मोर्चाच्या प्रारंभ स्थळी पोहोचू शकले .अभिनव चौका पासून हा मोर्चा शानिपारापर्यंत आला यावेळी चारही दिशांनी वाहतूक जाम झाली होती .मात्र कुठेही पोलिसांचा एखादा चेहरा हि नजरेस पडत नव्हता . पोलीस नसल्याची हि बाब मोठ्ठी आश्चर्यकारक मानली जात होती .
भाजप सरकार फक्त घोषणाबाज सरकार असून केंद्र आणि राज्य सरकारने नागरिकांना दाखवलेले अच्छे दिनचे स्वप्न उध्वस्त झाल्याचा घणाघात आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यामध्ये केला. वाढत्या महागाईच्या विरोधात  पुणे शहरात आज राष्ट्रवादीने जनआक्रोश आंदोलन केले. या आंदोलनाच्या समारोप प्रसंगी झालेल्या सभेत त्यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला.
वाढत्या महागाईच्या विरोधात  पुणे शहरात आज राष्ट्रवादीने जनआक्रोश आंदोलन केले. यावेळी टिळक रस्त्यावरील वसंतदादा पाटील यांच्या पुतळ्यापासून शनिवारवाड्यापर्यंत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात अजित पवार यांच्या सहित राष्ट्रवादी काँग्रेसचे शहरातील सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, विविध सेल आणि आघाड्यांचे अध्यक्ष आणि कार्यकर्ते त्यात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .
 
शनिवारवाड्यावर झालेल्या सभेत अजित पवार यांनी भाजप सरकारचा खरपूस समाचार घेतला . पवार म्हणाले की, भाजप सरकारने निवडणुकीपूर्वी जी आश्वासने दिली ती पूर्ण केली नाहीत. नोटाबंदीचा निर्णय देशाच्या अर्थव्यवस्थेला घातक ठरला यामुळे तरुणांच्या नोकऱ्या गेल्या, डिझेल, पेट्रोलचे दर या सरकारने वाढवून ठेवले आहेत.  मुख्यमंत्री, पंतप्रधानच्या विरोधात बोलले तर गुन्हे दाखल होतात ही वेगळ्या प्रकारची आणीबाणी या सरकारच्या काळात नागरिकांवर लादली जात असल्याची टीका देखील त्यांनी केली. कर्जमाफीच्या घोषणेला चार महिने पूर्ण झाल्यानंतर अद्याप शेतकऱ्याला कर्जमाफी मिळाली नाही त्यामुळे हे सरकार घोषणाबाजी करून नागरिकांची दिशाभूल करत असल्याचे सांगत सरकारला महागाई कमी करण्याचा निर्वाणीचा इशारा त्यानी दिला.