पुणे-राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः रस्त्यावर उतरल्याने पावसाची कोणतीही तमा न बाळगता दीपक मानकर ,सुभाष जगताप ,चेतन तुपे पाटील, योगेश ससाणे , भैयासाहेब जाधव , प्रिया गदादे ,बाबुराव पाचारणे आदी नगरसेवकांनी कसलेली कंबर ,आणि त्यांचे मैदानात उतरलेले कार्यकर्ते यांच्यामुळे पुणे शहर राष्ट्रवादी चा मोर्चा मोठ्ठा जन आक्रोश करणारा मोर्चा ठरला .विशेष म्हणजे टिळक रस्त्यावरील अभिनव चौकात मोर्चासाठी जमलेले दीपक मानकर, योगेश ससाणे,प्रिया गदादे ,सुनील टिंगरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली त्यामुळे चारही दिशांची वाहतूक जाम झाली . खुद्द अजित पवार यांची मोटार स .प. महाविद्यालयाजवळ अडकून पडली तर चेतन तुपे पाटील स्वतः स्वारगेटला अडकून पडले , तुपे पाटील आपली मोटार सोडून दुचाकीने येवून मोर्चात सहभागी झाले . तर अंकुश काकडे आणि कार्यकर्त्यांनी अभिनव चौकात स्वारगेट कडे जाणारी वाहनेच केवळ सोडल्याने अजित पवार मोर्चाच्या प्रारंभ स्थळी पोहोचू शकले .अभिनव चौका पासून हा मोर्चा शानिपारापर्यंत आला यावेळी चारही दिशांनी वाहतूक जाम झाली होती .मात्र कुठेही पोलिसांचा एखादा चेहरा हि नजरेस पडत नव्हता . पोलीस नसल्याची हि बाब मोठ्ठी आश्चर्यकारक मानली जात होती .
भाजप सरकार फक्त घोषणाबाज सरकार असून केंद्र आणि राज्य सरकारने नागरिकांना दाखवलेले अच्छे दिनचे स्वप्न उध्वस्त झाल्याचा घणाघात आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यामध्ये केला. वाढत्या महागाईच्या विरोधात पुणे शहरात आज राष्ट्रवादीने जनआक्रोश आंदोलन केले. या आंदोलनाच्या समारोप प्रसंगी झालेल्या सभेत त्यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला.
वाढत्या महागाईच्या विरोधात पुणे शहरात आज राष्ट्रवादीने जनआक्रोश आंदोलन केले. यावेळी टिळक रस्त्यावरील वसंतदादा पाटील यांच्या पुतळ्यापासून शनिवारवाड्यापर्यंत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात अजित पवार यांच्या सहित राष्ट्रवादी काँग्रेसचे शहरातील सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, विविध सेल आणि आघाड्यांचे अध्यक्ष आणि कार्यकर्ते त्यात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .
शनिवारवाड्यावर झालेल्या सभेत अजित पवार यांनी भाजप सरकारचा खरपूस समाचार घेतला . पवार म्हणाले की, भाजप सरकारने निवडणुकीपूर्वी जी आश्वासने दिली ती पूर्ण केली नाहीत. नोटाबंदीचा निर्णय देशाच्या अर्थव्यवस्थेला घातक ठरला यामुळे तरुणांच्या नोकऱ्या गेल्या, डिझेल, पेट्रोलचे दर या सरकारने वाढवून ठेवले आहेत. मुख्यमंत्री, पंतप्रधानच्या विरोधात बोलले तर गुन्हे दाखल होतात ही वेगळ्या प्रकारची आणीबाणी या सरकारच्या काळात नागरिकांवर लादली जात असल्याची टीका देखील त्यांनी केली. कर्जमाफीच्या घोषणेला चार महिने पूर्ण झाल्यानंतर अद्याप शेतकऱ्याला कर्जमाफी मिळाली नाही त्यामुळे हे सरकार घोषणाबाजी करून नागरिकांची दिशाभूल करत असल्याचे सांगत सरकारला महागाई कमी करण्याचा निर्वाणीचा इशारा त्यानी दिला.