Home Blog Page 3269

‘आपली दिवाळी, स्वदेशी दिवाळी’ दिवाळीसाठी गृहोपयोगी साहित्याचे प्रदर्शन व विक्री

0
पुणे, ता. २ – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवभारत निर्मिती संकल्प ते सिध्दी अभियानाला प्रतिसाद देत ‘आपली दिवाळी, स्वदेशी दिवाळी’ या दिवाळीसाठी आवश्यक असणार्‍या गृहोपयोगी स्वदेशी साहित्याचे प्रदर्शन ४ ते ८ ऑक्टोबर या कालावधीत म्हात्रे पूलाजवळील सिध्दी गार्डन येथे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती समन्वयक योगेश गोगावले यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळवले आहे.
बुधवार, ४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येणार असून, उद्योजिका अरुणा ढोबळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. मेक इन इंडिया, स्किल इंडिया या शासनाच्या योजनांना प्रतिसाद देत महिला बचतगटांकडून महिलांची मानसिकता महिला उद्योगगटांकडे नेण्याच्या उद्देशाने प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
महिलांच्या व्यवस्थापनातून महिलांच्यामार्ङ्गत स्वस्त व दर्जेदार स्वदेशी उत्पादने प्रदर्शनात विक‘ीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. आकाश कंदील, पणत्या, रांगोळी, पूजा साहित्य, अत्तरे, लाईटच्या माळा, तयार कपडे, साड्या, डे्रस मटेरियल, लहान मुले व पुरुषांचे कपडे, बॅगा, शोभेच्या वस्तू, खाद्यपदार्थ, विविध प्रकारची पिठे, भाजण्या, लोणची, मसाले, पापड आदींचे १५० हून अधिक स्टॉल प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. सकाळी १० ते रात्री ८ प्रदर्शनाची वेळ असल्याची माहिती संयोजिका शशिकला मेंगडे यांनी दिली आहे.

राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘द सायलेन्स’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच! – येत्या 6 ऑक्टोबरला होणार संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित

0

इफ्फी, बंगळूरू, मुंबई, पुणे आणि कलकत्त्याबरोबरच जर्मनी, अमेरिका, ब्राझील, स्पेन, टांझानिया, चेक प्रजासत्ताक आणि बांग्लादेशसारख्या 35 हून अधिक नामांकीत चित्रपट महोत्सवांमध्ये हजेरी लावून 2 महाराष्ट्र राज्य पुरस्कारांबरोबर एकूण 15 पुरस्कारांवर नाव कोरलेला ‘द सायलेंस’ हा चित्रपट येत्या 6 ऑक्टोबरला प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘द सायलेंस’ एक वास्तवदर्शी चित्रपट… चित्रपट महोत्सवांत “जबरदस्त”, “दुष्प्रवृत्तींविरोधात लढा देण्यास प्रवृत्त करणारा चित्रपट”, “हा चित्रपट पाहताना उर भरून आला होता” अशा अनेक भावूक प्रतिक्रिया मिळवणाऱ्या या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच मुंबईत एका दिमाखदार सोहोळ्याद्वारे लाँच करण्यात आला. प्रसंगी चित्रपटाच्या निर्मात्या अश्विनी सिधवानी, निर्माते अर्पण भुखनवाला, नवनीत हुल्लड मोरादाबादी आणि अरूण त्यागी, तर सहनिर्माते गौरीश पाठारे आणि सनी ख्नन्नाबरोबरच दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांच्यासमवेत अंजली पाटील, नागराज मंजुळे, रघुवीर यादव यांसारखे चित्रपटातील नामवंत कलाकार आणि अॅड. पूजा कुटे उपस्थित होत्या.

अॅड. पूजा कुटे यांच्याकडे असणाऱ्या खटल्यावर चित्रपट बनवण्यासाठी कथा-पटकथा लेखन निर्मात्या अश्विनी सिधवानी यांनी केले असून दिग्दर्शन आणि संवाद लेखन गजेंद्र अहिरे यांनी केले आहे. तर संगीत इंडियन ओशन बँडने दिले आहे. तर छायाचित्रदिग्दर्शन कृष्णा सोरेन यांनी केले असून संकलन मयुर हरदास यांचे आहे.

हा चित्रपट येत्या 6 ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

गांधी जयंती चा करिष्मा – खासदार काकडे आणि महापलिका पदाधिकारी यांचे एकत्रित योगदान

0

खासदार काकडेंतर्फे ‘स्वच्छ भारत अभियानांतर्गत’ स्वच्छता मोहिमेचे आयोजन!

पुणे रेल्वे स्टेशन ते मालधक्का चौक व ससूनमध्ये केली स्वच्छता

राज्यमंत्री कांबळे, महापौर टिळक, खासदार शिरोळे, आमदार कुलकर्णी व काळे, 40 नगरसेवक व हजारो नागरिकांची उपस्थिती

पुणे, दि. 2 ऑक्टोबर :महापालिकेतील पदाधिकारी आणि खासदार काकडे यांचे काही तरी आहे वाकडे .. असे वाटण्याजोगी परिस्थिती या पूर्वी दिसून आलेली आहे . पण शेवटी दसऱ्याचा नाही तर महात्मा गांधी जयंतीचा च करिष्मा दिसला . खासदार संजय काकडे यांच्या समवेत चक्क महापौर ,सभागृहनेते आणि खासदार शिरोळे ,यांच्यासह आमदार मेधा कुलकर्णी,विजय काळे, आणि राज्यमंत्री कांबळे व सुमारे ४० नगरसेवक स्वच्छता अभियानाच्या निमित्ताने एकत्र दिसले . ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’चा नारा देत भाजपचे सहयोगी सदस्य व खासदार संजय काकडे यांनी आयोजित केलेल्या स्वच्छता मोहिमेला उदंड प्रतिसाद मिळाला. सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्यासह महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, आमदार मेधा कुलकर्णी व विजय काळे यांच्यासह 40 नगरसेवक व हजारो कार्यकर्त्यांनी आज पुणे रेल्वे स्टेशन ते मालधक्का हा रस्ता व ससून रुग्णालयाच्या परिसरात स्वच्छता केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत अभियानानिमित्त आज महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी पुणे रेल्वे स्टेशन येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला खासदार संजय काकडे व खासदार अनिल शिरोळे यांनी हार घातला व स्वच्छता मोहिमेला प्रारंभ झाला. रेल्वे स्टेशन ते मालधक्का चौकापर्यंतचा रस्ता आणि त्यानंतर ससून रुग्णालयातील परिसराची स्वच्छता यावेळी करण्यात आली. खासदार काकडे, खासदार शिरोळे, महापौर टिळक, आमदार कुलकर्णी, आमदार काळे आणि इतर मान्यवरांनी प्रत्यक्षात हातात झाडू घेऊन परिसरातील कचरा गोळा केला. राज्यमंत्री दिलीप कांबळे, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, 40 नगरसेवक व सुमारे 3 हजार नागरिकांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारताचे स्वप्न पाहिले आहे. स्वच्छता ही आरोग्याशी निगडीत आहे. आपला परिसर स्वच्छ असेल तर आपले आरोग्यही सुदृढ राहणार आहे. म्हणून देश स्वच्छ झाला तर, संपूर्ण देशाचे आरोग्य सुदृढ होईल. पंतप्रधान मोदी यांचे स्वच्छ भारताचे स्वप्न वास्तवात आणण्यासाठी सारा देश एकवटला आहे. ही आनंदाची बाब आहे, असे सांगून पुण्याचा कचरा प्रश्नही लवकरच सुटेल, असा विश्वास खासदार संजय काकडे यांनी व्यक्त केला.

खासदार संजय काकडे यांनी स्वच्छता अभियानाचा उपक्रम राबविला आणि त्याला हजारो नागरिकांनी सहभागी होऊन पाठिंबा दिला. हा अत्यंत चांगला उपक्रम असून पुणे शहर हे स्वच्छतेच्या बाबतीत अग्रभागी राहील व पुण्याचा कचरा प्रश्नही सुटेल, असे महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले.

स्वच्छ भारत झाला तर, सुदृढ भारत बनेल. हे पंतप्रधान मोदी यांचे स्वप्न वास्तवात येईल. खासदार काकडे यांनी आयोजिलेल्या उपक्रमाला हजारोंच्या संख्येने लोक आले. त्यामुळे स्वच्छ भारताचे स्वप्न नक्कीच वास्तवात येईल असे वाटते, असे खासदार अनिल शिरोळे म्हणाले.

स्वच्छ भारत अभियानात नगरसेवक राजेंद्र शिळीमकर, प्रकाश ढोरे, शंकर पवार, बापु कर्णे गुरुजी, राहुल भंडारे, दिनेश धाडवे, धीरज घाटे, विष्णू हरिहर, मनीषा लडकत, मंगला मंत्री, कालिंदा पुंडे, राजाभाऊ लायगुडे, अमोल बालवडकर, किरण दगडे पाटील, विजय शेवाळे, दिलीप वेडेपाटील, प्रसन्न जगताप, जोत्स्ना एकबोटे, सरस्वती शेडगे, तुषार पाटील, हरिभाऊ चरवड, राजश्री काळे, नीता दांगट, राजश्री नवले, परशुराम वाडेकर, भरत वैरागे, हरिश परदेशी, ज्योती कळमकर, उमेश गायकवाड, अशोक लोखंडे, सुशील मेंगडे, चंद्रकांत चौधरी, रायबा भोसले, संतोष आरडे, अजय सावंत, धनराज घोगरे, सुनील कांबळे आदी सहभागी झाले होते.

गांधी जयंती निमित्त दीपोत्सव

0

पुणे -पुणे रेल्वे स्टेशनयेथील  महात्मा गांधी पुतळ्यासमोर असंख्य दिवे लावून पुणे शहर युवक काँग्रेस तर्फे महात्माजींना आदरांजली वाहण्यात आली . यावेळी शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, तसेच उल्हास पवार ,विकास लांडगे, नरेंद्र व्यवहारे, व असंख्या कार्यकर्ते उपस्थित होते.या  कार्य क्रमाचे आयोजन आशिष नरेंद्र व्यवहारे यांनी केले.

गंगेकाठच्या विद्यापीठात स्त्रियांना मारहाणीने देशाच्या आत्म्याचे आक्रन्दन :डॉ . गणेश देवी

0
पुणे :
‘ गांधीजींनी आपल्या कार्यात मानवातील  पुरुषत्वाइतके  स्त्रीत्वाला महत्व दिले होते ,आता मात्र ५६ इंची पिंजरा असलेल्या आणि हृदय नसलेल्यांच्या राज्यात  भारतात पवित्र मानल्या गेलेल्या गंगेकाठच्या विद्यापीठामध्ये स्त्रियांना मारहाण होते ,ते पाहून देशाचा आत्मा आक्रन्दन करून गांधीजींना परत बोलवतो आहे ‘ असे उद्गार आंतरराष्ट्रीय भाषातज्ज्ञ डॉ  गणेश देवी यांनी काढले .

महाराष्ट्र गांधी स्मारक निधी तर्फे  सलग ८ व्या  वर्षी आयोजित  ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी’ सप्ताहाचे उद्घाटन   आंतरराष्ट्रीय भाषातज्ज्ञ,  दक्षिणायन सांस्कृतिक चळवळीचे प्रवर्तक प्रा. डॉ . गणेश देवी तसेच सर्वधर्मीय धर्मगुरूंच्या उपस्थितीत झाले. यावेळी डॉ गणेश देवी बोलत होते

महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन आणि भारतीय संविधानाच्या उद्देशिकेला अभिवादन करून आणि सर्वधर्मीय प्रार्थना करून  सप्ताहास प्रारंभ झाला.
सप्ताहाचे यंदाचे ८ वे वर्ष आहे. दिनांक १ ते ८ ऑक्टोबर २०१७ या कालावधीमध्ये होणाऱ्या  या सप्ताहात विविध कार्यक्रम होणार आहेत.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. कुमार सप्तर्षी (अध्यक्ष : महाराष्ट्र गांधी स्मारक निधी) होते.
सप्ताह ‘महाराष्ट्र गांधी स्मारक निधी’, गांधीभवन, कोथरूड, पुणे येथे हा कार्यक्रम झाला. व्यासपीठावर अभय छाजेड, एम.एस. जाधव, अन्वर राजन, तसेच पं. वसंत गाडगीळ, मौलाना झाएदभाई , पदम ऋषी महाराज, नोएल माजगावकर, चित्रलेखा जेम्स, अमरजितसिंह हे सर्व धर्मीय धर्मगुरु उपस्थित  होते .

डॉ गणेश देवी म्हणाले ,’ गांधीजींनी मानवातील स्त्रीत्वालाही  पुरुषत्वाइतके महत्व दिले . स्त्रीत्वाचे हे महत्व त्यांनी कस्तुरबांच्या सत्याग्रहात पहिल्यांदाच  स्त्री सामील होण्यातून ओळखले . मौन ,असहकार ,मिठाचा सत्याग्रह या स्त्रीत्वाच्या गोष्टी आहेत . कस्तुरबानी गांधींना भयमुक्त केले आणि राजकारणात स्त्रीला केंद्रस्थानी आणण्याचा मंत्र शिकवला .
या पार्श्वभूमीवर सध्याचे नेतृत्व कठोर होऊन जनतेला स्त्री मानून कधी नोटबंदी ,कधी जीएसटी अमलात आणून  छळत आहे .मात्र ते  ज्यांना आदर्श मानून हे प्रयोग करीत आहेत ,त्याला जगाने आधीच पराभूत केले आहे .तरीही  जगभर उजव्या विचारांचा प्रभाव वाढत असताना गांधीविचार प्रभावीपणे सर्वत्र पोहचवला पाहिजे . त्यासाठी तिसऱ्या सत्याग्रहाची गरज आहे .  गांधीजींनी आपल्या कार्यात मानवातील  पुरुषत्वाइतके  स्त्रीत्वाला महत्व दिले होते ,आता मात्र ५६ इंची पिंजरा असलेल्या आणि हृदय नसलेल्यांच्या राज्यात  भारतात पवित्र मानल्या गेलेल्या गंगेकाठच्या विद्यापीठामध्ये स्त्रियांना मारहाण होते ,ते पाहून देशाचा आत्मा आक्रन्दन करून गांधीजींना परत बोलवतो आहे.
गांधी सप्ताहात स्त्रीत्वाला केंद्रस्थानी ठेवून चर्चा आणि उपक्रम केले पाहिजेत ,असेही डॉ  देवी म्हणाले .
यावेळी महाराष्ट्र गांधी स्मारक निधी च्या ग्रंथालयाच्या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले.
डॉ  सप्तर्षी म्हणाले ,’ देशातील वातावरण बदलत असल्याने घाबरलेले लोक ध्रुवीकरणासाठी दंगलींचा वापर करण्याची भीती आहे . मात्र ,आम्ही हिंदू -मुस्लिम दंगल होऊ देण्याच्या विरोधात काम करीत आहोत . यापूर्वी सत्याग्रहातून नेतृत्व  येत  होते ,आता ‘हत्याग्रहातून ‘ नेत्रत्व येता कामा  नये .
 सप्ताहाबद्दल माहिती देताना डॉ. कुमार सप्तर्षी म्हणाले , ‘महात्मा गांधींजींची विचारसरणी, त्यांच्या चारित्र्याचा प्रभाव नेमका कसा होता हे नव्या पिढीला सांगणे आजही अत्यावश्यक आहे. त्या विचारांचे स्मरण करण्याच्या निमित्ताने महात्मा गांधी सप्ताहात गांधी भवनात विविधांगी कार्यक्रम होत आहेत. गांधी सप्ताहादरम्यान गांधी जयंती (दिनांक 2 ऑक्टोबर) हा दिवस ‘जागतिक अहिंसा दिन’ म्हणून पाळला जातो. या निमित्ताने ‘महाराष्ट्र गांधी स्मारक निधी’तर्फे ‘शांती मार्च’चे आयोजन करण्यात येते. हा ‘शांती मार्च’ सकाळी 9 वाजता आयोजित करण्यात आला आहे. ‘शांती मार्च’ चा मार्ग सेनापती बापट पुतळा, अलका चौक, कुमठेकर रोड, बाजीराव रोड,  सीटी पोस्ट मार्गे शनिवार वाडा असा असून, शनिवार वाडा येथे समारोप सभा होईल.’
सप्ताह कालावधीत खादी, हातमाग व इतर गृहोपयोगी वस्तूंचे प्रदर्शन सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत ‘महाराष्ट्र गांधी स्मारक निधी’, गांधीभवन, कोथरूड, पुणे येथे सर्वांसाठी खुले राहणार आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहा बाबत संस्थेचे सचिव अन्वर राजन आणि संयोजक संंदीप बर्वे यांनी माहिती दिली.
पुढील कार्यक्रम :
………..
सोमवार दिनांक २ ऑक्टोबर रोजी सकाळी ८. ३० वाजता शुभांगी मुळे व सहकारी यांचे प्रार्थना व भजन, सकाळी ९ वाजता (सेनापती बापट पुतळा, अलका टॉकीज ते शनिवारवाडा) मार्गे शांती मार्च चे आयोजन, सायंकाळी ४ वाजता ‘महात्मा’ (जीवनपट ),
मंगळवार दिनांक ३ ऑक्टोबर रोजी शिक्षणतज्ञ अनिल सद्गोपाल यांच्याशी खुला संवाद, दुपारी २ ते ५  ‘कापूस कोंड्याची गोष्ट’ चित्रपट , सायंकाळी ५ वाजता ‘शिक्षणक्षेत्रातील समस्या व उपाय’ या विषयावर व्याख्यान,
दिनांक ४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता ‘शेती आणि मेक इन इंडिया’ विषयावर कार्यशाळा : वक्ते विजय जावंधिया (शेतकरी आंदोलनातील कार्यकर्ते , वक्ते आणि लेखक) आणि मिलिंद मुरुगकर (अर्थतज्ञ आणि विश्लेशक ), सायंकाळी ६ वाजता अमरेंद्र धनेश्वर यांचे भक्ती आणि सुफी संगीत,
गुरुवार ५ ऑक्टोबर रोजी  ‘आंतरराष्ट्रीय राजकारण व दशहतवादाचे स्वरूप’ विषयावर कार्यशाळा -वक्ते लक्ष्मीकांत देशमुख (लेखक आणि निवृत्त प्रशासकीय अधिकारी), सायंकाळी ६ वाजता काव्यांजली कार्यक्रमात कोजागिरीनिमित्त ‘त्रिभाषिक मुशायरा’ -कवी प्रदीप निफाडकर, साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित कवी नझीर फतेहपुरी,सहकारी यांचा सहभाग,
शुक्रवार दिनांक ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता राज कुलकर्णी (पंडीत नेहरूंचे अभ्यासक) यांच्याबरोबर चर्चा, सायंकाळी ६ वाजता ‘आधुनिक भारताचे निर्माते’ विषयावर व्याख्यान,
शनिवार दिनांक ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता जिग्नेश मेवाणी (दलितांतवर होणार्‍या हल्ल्यांविरुद्ध लढणारे तरुण नेते, गुजरात), विश्‍लेषक तुषार गांधी (गांधीजींचे पणतू) आणि सामाजिक कार्यकर्ते प्रा. मिलिंद आव्हाड (जेएनयू, दिल्ली) यांच्याशी चर्चा,  सायंकाळी ६ वाजता   ‘जाती का सवाल और वर्तमान दलित राजनीती’ विषयावर समारोपानिमित्त परिसंवाद,
रविवार दिनांक ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते २ ‘लघुपट निर्मिती’ कार्यशाळा :  मार्गदर्शक अशोक राणे (समीक्षक लेखक आणि दिग्दर्शक), दुपारी ३. ३० वा. ‘रोड टू संगम’  चित्रपट, दुपारी ४ वा जादूगार संजय रघुवीर यांचे जादूचे प्रयोग. असे अनेक कार्यक्रम या सप्ताहात होतील.

गुरुवर्य पुरस्कार केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना प्रदान

0

पुणे – लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समता परिषदेच्या वतीने दिला जाणारा यावर्षीचा गुरुवर्य पुरस्कार रामदासजी आठवले यांना माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिर येथे प्रदान करण्यात आला .

बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे नेणाऱ्यांपैकी रामदास आठवले आहेत, जे चमकले आणि टिकले.

हा पुरस्कार म्हणजे समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचणाऱ्या व्यक्तीचा गौरव असून, दलित आणि उपेक्षितांच्या प्रश्नांसाठी हक्काने लढणारा कार्यकर्ता ते सामाजिक न्याय मंत्री असा  रामदासजी आठवले यांचा प्रवास थक्क करणारा आहे, असे कौतुकोद्गार यावेळी श्रीमती प्रतिभाताई पाटील यांनी काढले.

आद्य क्रांतिकारक लहुजी साळवे यांच्या नावाने जो पुरस्कार रामदास आठवले यांना दिला जात आहे, त्यामागचा हेतू हा ते ज्या पद्धतीने अनेक वर्षांपासून  दलितांसाठी कार्य करत आहेत म्हणून  त्यांना प्रेरणा देणे हा आहे.वस्ताद लहुजी साळवे यांनी तालमीच्या  माध्यमातून मोठे कार्य केले आहे. तसेच स्वातंत्र्याची मागणी करत असताना समाजसुधारणेसाठीही कार्य केले आहे. मोठ्या उंचीच्या नेत्याच्या नावाने आठवले यांना हा पुरस्कार मिळत आहे हा खूप मोठा सन्मान आहे असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले.

यावेळी राज्यमंत्री दिलीप कांबळे, उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, नगरसेविका राजश्री काळे,स्वाती लोखंडे, जेष्ठ विचारवंत काकासाहेब खंबाळकर शिक्षणतज्ज्ञ एम. डी. शेवाळे,संयोजक हनुमंत साठे, महेंद्र कांबळे,शरद गायकवाड़, आदी मान्यवर उपस्थित होते.

आंदोलकांचा मोर्चा,भाजपा आमदार टिळेकर कुलूप लावून भुर्र..कचराडेपो प्रकरणी कोथरूडप्रमाणेच हडपसरला हवा न्याय ..(पहा फोटो )

0

पुणे- महापालिकेमार्फत हडपसरमधील रामटेकडी येथे नव्याने उभारण्यात येणाऱ्या कचरा प्रकल्पाला स्थानिक नागरिकांनी विरोध केला आहे. हा कचराडेपो रामटेकडी येथे होऊ नये या मागणीसाठी आज ससाणेनगर येथील रेल्वे गेटपासून कचरा प्रकल्पापर्यंत सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी आमदार योगेश टिळेकर यांच्या कार्यालयाला कुलूप असल्याने , आंदोलनकर्त्यांनी आमदार योगेश टिळेकर यांच्या कार्यालयासमोर कचरा फेकून निषेध नोंदवला.आणि आमदारांच्या विरोधात घोषणा दिल्या. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये वादावादी ,ढकलाढकली झाली .

पारंपरिक वेशभूषा परिधान करत अनेक विद्यार्थ्यांनीही मार्चात सहभाग घेतला होता. त्यामुळे ते नागरिकांचे लक्ष वेधून घेत घेत होते. मार्चेकऱ्यांकडून यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मोर्चामध्ये विरोधी पक्षनेते चेतन तुपे, खासदार शिवाजीराव आढळराव , माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर  उपस्थित होते.

यावेळी चेतन तुपे म्हणाले, पुणे शहरातील कचरा उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथे टाकला जातो. हा कचरा प्रकल्प बंद व्हावा यासाठी येथील ग्रामस्थ आजही लढा देत आहेत. त्यानंतरही आता पुन्हा याच भागात रामटेकडी येथे कचराप्रकल्प सरकार उभारणार असल्याने त्याला सर्वपक्षीयांचा विरोध राहणार आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत कचरा प्रकल्प होऊ देणार नाही या भूमिकेवर ठाम राहणार आहे. अशाप्रकारे भूमिका घेऊन सरकार हडपसर येथील नागरिकांच्या आरोग्याशी खेळतअसल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

यावेळी आढळराव पाटील म्हणाले की, हडपसर भागातील कचरा प्रकल्पाला आमचा विरोध असून हा प्रकल्प रद्द होण्यासाठी आज ज्या प्रकारे सर्वपक्षीय लोक रस्त्यावर उतरले आहेत, हा लढा असाच शेवटच्या क्षणापर्यंत सुरु राहणार आहे. या भागात कोणत्याही परिस्थितीत कचरा प्रकल्प होऊ देणार नाही.

भाजपचे नेते वगळता हडपसरमधील सर्व पक्षीय नेते आणि नागरिक या मोर्चामध्ये सहभागी झाले होते.

‘बिट्स वार्षिक भाषा उद्योग पारितोषिके – 2017’च्या विजेत्यांची घोषणा

0

पुणे– भाषांतर हा पूर्ण वेळ व्यवसाय होऊ शकतो, याबाबत जागृती करण्यासाठी आणि व्यावसायिक; तसेच आश्वासक भाषांतरकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी भारतातील भाषा सेवा उद्योगातील आघाडीची कंपनी बिट्स प्रायव्हेट लिमिटेडतर्फे बिट्स वार्षिक भाषा उद्योग पारितोषिकांची सन 2011 मध्ये सुरुवात करण्यात आली.

बिट्स प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संदीप नूलकर यांची ही संकल्पना असून, दर वर्षी आंतरराष्ट्रीय भाषांतर दिनानिमित्त 30 सप्टेंबरला ही पारितोषिके देण्यात येतात. भाषांतर आणि स्थानिकीकरण उद्योगातील यशस्वी व्यक्तींची दखल घेणे, तसेच भाषांतराकडे एक व्यवसाय म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन रूजवणे असे यामागे उद्देश आहेत. त्याचप्रमाणे व्यावसायिक भाषांतरकारांबरोबर काम करण्याचे महत्त्व काय असते, याची उभरत्या भाषांतरकारांना आणि भाषा उद्योगाच्या ग्राहकांना जाणीव करून द्यावी, अशीही या पारितोषिकांमागची कल्पना आहे.

यंदा माधुरी हेगडे यांना बिट्स लँग्वेज प्रोफेशनल ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना स्मृतिचिन्ह आणि 21 हजार रुपये रोख असे पारितोषिक मिळाले. सुनंदा महाजन या यंदाच्या बिट्स स्पेशल रेकग्निशन अवॉर्डच्या मानकरी ठरल्या. त्यांना स्मृतिचिन्ह आणि 11 हजार रुपये रोख असे पारितोषिक प्रदान करण्यात आले. योगिता तहिलराम यांना बिट्स अस्पायरिंग लँग्वेज प्रोफेशनल ऑफ द इयर हा पुरस्कार देण्यात आला. स्मृतिचिन्ह आणि पाच हजार रुपये रोख असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे. त्याचप्रमाणे त्यांना देशभरातील काही सर्वोत्तम भाषांतरकार काम करत असलेल्या बिट्स या कंपनीमध्ये उमेदवार म्हणून काम करण्याची संधीही मिळणार आहे. या उमेदवारीदरम्यान त्यांना कामाचे मानधन, तसेच भाषा उद्योगाशी संबंधित अनेक कौशल्ये आत्मसात करण्याच्या संधीही मिळतील.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जर्मन फेडरल असोसिएशन ऑफ एसएमईजचे भारतातील प्रमुख मनोज बर्वे आणि बिट्स प्रा. लि.चे संस्थापक, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संदीप नूलकर यांच्या हस्ते सर्व विजेत्यांचा सत्कार करण्यात आला.

या वेळी बोलताना मनोज बर्वे म्हणाले, भाषा व्यावसायिकांची दखल घेणारा देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम आयोजित करत असल्याबद्दल मी बिट्सचे आभार मानतो. भाषा व्यावसायिकांची मागणी दिवसेंदिवस वाढणारच आहे. भाषा व्यावसायिकांनी अधिकाधिक सर्जनशील, उत्स्फूर्त आणि संधींच्या शोधात राहिले पाहिजे.

बिट्स प्रा. लि.चे संस्थापक, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संदीप नूलकर म्हणाले, खरा भारत हा खेड्यांत दिसतो, असे म्हणतात, त्याप्रमाणे उद्योजकता, नवता आणि व्यवसाय हे ख-या अर्थाने लघु आणि मध्यम उद्योगांत रुजतात. देशातील 4 कोटी 80 लाखांहून अधिक लघु आणि मध्यम उद्योग हे त्यांचा व्यवसाय स्थानिक आणि जागतिक पातळीवर विस्तारू पाहत आहेत. अशा वेळी एका मोठ्या बाजारपेठेला आवाहन करण्यासाठी इंग्रजी, भारतीय बाजारपेठांत रुजण्यासाठी प्रादेशिक भाषा आणि परदेशांत पोहोचण्यासाठी परकीय भाषा यांची आवश्यकता असल्याने त्यासाठी भाषा, भाषांतर आणि स्थानिकीकरण ही हळूहळू त्यांची सर्वांत मोठी साधने बनत आहेत. लघु आणि मध्यम उद्योगांना नव्या बाजारपेठांत शिरकाव करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या लघु आणि मध्यम उद्योगांसाठी भाषासाह्य या नव्या उपक्रमाविषयीही त्यांनी माहिती दिली.

पारितोषिक वितरण समारंभानंतर इंटरनॅशनल असोसिएशन फॉर परफॉर्मिंग आर्टस् अँड रिसर्चतर्फे (आयएपीएआर) द बॅलन्सिंग एक्ट हे नाटक सादर करण्यात आले. या नाटकाची संकल्पना आणि दिग्दर्शन आयएपीएआरचे संस्थापक आणि राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे स्नातक विद्यानिधी वनारसे यांची होती. जिबरिश भाषेचा वापर असलेल्या या नाटकात बालकांना सामो-या जाव्या लागणा-या हिंसेविषयीचे भाष्य पाच विदूषकांच्या माध्यमातून मांडण्यात आले आहे.

अण्णा हजारे यांचे दिल्लीत पुन्हा आंदोलन .. .पुन्हा देश होणार जागा ?

0

पुणे-लोकपाल कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीच्या मागणीसाठी सोमवारी, २ ऑक्टोबरला दिल्ली येथे राजघाटावर आंदोलन करण्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज, शनिवारी राळेगणसिद्धीत बोलताना जाहीर केले.गेल्या लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांना घेवून दिल्लीत आंदोलन केले होते जे देशभर पोहोचले होते . आणि ज्यामुळे कॉंग्रेसची सत्ता पाय उतारही झाली . आता २०१९ च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अण्णा यांचे हे आंदोलन महत्वपूर्ण मानले जाणार आहे . सत्ता बदलली तरी लोकपाल ची प्रभावी अंमलबजावणी झाली नाही , अण्णा यांच्या आंदोलनाला यश आले नाही , आता अण्णा कुठे आहेत ? असा सवाल अनेकांच्या मनात घोळत होता . आता अण्णा यांनी उद्याच्या आंदोलनाच्या घोषणेने त्यास उत्तर दिले असले तरी , गेल्यावेळेस आंदोलन सुरु करण्यासाठी लागणाऱ्या प्राथमिक बाबी केजरीवाल यांनी सांभाळल्या होत्या . आता अण्णाच्या आंदोलनाची दिल्लीतील धुरा कोण सांभाळणार हा प्रश्न आहेच.

दरम्यान महात्मा गांधींच्या जयंतीदिनी, २ ऑक्टोबरला दिल्लीत येथे राजघाटावर म. गांधींच्या समाधीस्थळी हजारे हे चिंतन करणार आहेत. त्याच दिवशी आंदोनाची तारीख व रूपरेषा ते जाहीर करणार आहेत. पंधरा दिवसांपूर्वी मोदी यांना पाठविलेल्या पत्रात येत्या तिन महिन्यात लोकपाल विधेयकाची प्रभावी अंमलबजावणी करावी अशी मागणी हजारे यांनी केली आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनानंतर नविन वर्षांच्या सुरूवातीला जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवडयात हजारे यांचे आदोलन सुरू होईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

राळेगणसिद्धीच्या (ता. पारनेर) पद्मावती मंदीरातील नवरात्रोत्सवाची सांगता हभप बाळकृष्ण महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने झाली. त्यावेळी हजारे यांनी पंचक्रोशीतील नागरीकांशी संवाद साधला. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे, उद्योजक भगवान पठारे, सुरेश पठारे, सुभाष पठारे, शंकर नगरे, दादा पठारे, राळेगणसिद्धीच्या सरपंच रोहीणी गाजरे आदी उपस्थित होते.

हजारे म्हणाले, जनतेला सरकार दरबारी कामे मार्गी लावताना अधिकारी, कर्मचाऱ्यांचे हात ओले करावे लागतात. सरकारी कामे पुर्ण करण्यासाठी विलंब होतो व त्यातूनच भ्रष्टाचार बोकाळतो. हे टाळण्यासाठी, सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना लोकपालाच्या कक्षेत आणणे गरजेचे आहे, तसे झाले तर भ्रष्टाचारास आळा बसू शकेल. मात्र मोदी सरकारने सरकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांना लोकपालाच्या कक्षेतून वगळले आहे. लोकपाल कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी आपण गेल्या तिन वर्षांपासून पंतप्रधानांकडे सातत्याने करीत आहोत. मात्र त्याकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत आहे. तर दुसरीकडे या कायद्यातील दुरूस्तीचे विधेयक अवघ्या तिन दिवसांत मंजुर करून घेतले जाते, हा विरोधाभास आहे.

पैसे खर्च केले तरच देश पुढे नेता येईल – अरुण जेटली

0

फरीदाबाद -लक्षात घ्या देशाचा विकास साधायचा असेल तर त्यासाठी किंमत चुकवावी लागेल,देशाची तिजोरी भरावी लागेल अशी प्रतिक्रिया केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी दिली. विकास साधायचा असेल तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे साधन आहे ते म्हणजे पैसा हा पैसा प्रामाणिकपणे खर्च झाला तर विकास निश्चित होणार आहे.फरीदाबाद येथील ‘नॅशनल अॅकॅडमी ऑफ कस्टम्स अँड नार्कोटिक्स’ च्या स्थापना दिवसाच्या कार्यक्रमात अरूण जेटली यांनी ही प्रतिक्रिया दिली.

महसूल म्हणजे सरकारी व्यवस्थेची लाइफलाइन आहे. सरकारी तिजोरीत जेवढा महसूल जमा होईल तेवढी देशाच्या विकासाला गती येईल. या देशात एक काळ असा होता की आपल्या उत्पन्नावर लागणाऱ्या कराबाबत लोक चिंता करत नव्हते. आता कर भरण्यासाठी करदाते स्वतःहून पुढे येत आहेत. लोकांनी पुढाकार घेतल्यामुळेच आम्ही जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर लागू करून देशाच्या कररचनेत फेरबदल केले असेही जेटली यांनी स्पष्ट केले.

उत्पन्नावर कर लागत असूनही जे लोक कराचा भरणा करत नाहीत अशा लोकांना कराच्या कक्षेत आणण्यासाठी कर विभागाच्या अधिकाऱ्यांनी जास्त जबाबदारीने काम केले पाहिजे. जे लोक कराच्या कक्षेत येत नाहीत त्यांच्यावर दबाव टाकण्याची गरज नाही असेही जेटलींनी म्हटले आहे. भारताची अर्थव्यवस्था प्रगतीपथावर आहे. प्रत्यक्ष कर हा करदात्यांकडून घेतला जातो, जास्तीत जास्त करदात्यांनी पुढे आले पाहिजे. असेही जेटलींनी स्पष्ट केले.

एमएसएलटीए-योनेक्स सनराईज पीएमडीटीए अखिल भारतीय मानांकन 12 वर्षाखालील चॅलेंज सिरीज स्पर्धेत चिन्मयी बागवे, अन्वेशा मूळगे, प्रथमेश पाटील यांचा मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का

0

पुणे, 1 ऑक्टोबर 2017- महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) आणि पीएमडीटीए यांच्या संलग्नतेने आयोजित एमएसएलटीए-योनेक्स सनराईज पीएमडीटीए अखिल भारतीय मानांकन 12 वर्षाखालील चॅलेंज सिरीज स्पर्धेत मुलींच्या गटात चिन्मयी बागवे, अन्वेशा मूळगे यांनी तर, मुलांच्या गटात
प्रथमेश पाटील  यांनी मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी क्रीडा संकुल येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत मुलींच्या गटात उप-उपांत्यपूर्व फेरीत बिगरमानांकित चिन्मयी बागवे हिने तिसऱ्या मानांकित सलोनी डेचा 8-6 असा सनसनाटी पराभव केला. अन्वेशा मूळगेने अकराव्या मानांकित गौरी माणगांवकरचा  8-4 असा पराभव केला. अव्वल मानांकित सोहा पाटीलने सहाव्या मानांकित सानिका भोगाडेचा टायब्रेकमध्ये 8-7(6) असा संघर्षपूर्ण पराभव केला.

मुलांच्या गटात बाराव्या मानांकित प्रथमेश पाटीलने पाचव्या मानांकित जय पवारचा 8-4 असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदविला. अव्वल मानांकित ऋषिकेश अय्यरने बाराव्या मानांकित ईशान देगंबरला 8-2 असे नमविले. सातव्या मानांकित आर्यन हूडने वेद पवारचा टायब्रेकमध्ये 8-7(5) असा पराभव केला. दुसऱ्या मानांकित
अर्णव पापरकरने आश्विन नरसिंघानीचा 8-1असा एकतर्फी पराभव करून उपांत्यपूर्व गाठली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: उप-उपांत्यपूर्व फेरी:
सोहा पाटील(1)वि.वि.सानिका भोगाडे 8-7(6);
अन्वेशा मूळगे वि.वि.गौरी माणगांवकर(11) 8-4;
चिन्मयी बागवे वि.वि.सलोनी डे(3) 8-6;
रुमा गायकवारी(5)वि.वि.माही खोरे 8-1;
कश्मिरा सुम्बरे(12)वि.वि.दानिका फर्नांडो 8-3;
स्वरा काटकर(4)वि.वि.संचिता नगरकर(14) 8-2;
अपर्णा पताईत वि.वि.ईशान्य हतनकर(6)8-3;
त्रिशा मिश्रा(2)वि.वि.पूर्वा भुजबळ 8-6

मुले:
ऋषिकेश अय्यर(1)वि.वि.ईशान देगंबर(15)8-2;
सुधांशू सावंत(10)वि.वि.अर्णव कोकणे 8-3;
सर्वेश झावर वि.वि.पार्थ देवरूखकर 8-4;
अनमोल नागपुरे(9)वि.वि.राधेय शहाणे(6)7-3सामना सोडून दिला;
प्रथमेश पाटील(12)वि.वि.जय पवार(5)8-4;
केवल किरपेकर(16)वि.वि.देवादित्य मखिजा 8-5;
आर्यन हूड(7)वि.वि.वेद पवार 8-7(5);
अर्णव पापरकर(2)वि.वि.आश्विन नरसिंघानी(16)8-1.

रवाईन हॉटेल दिवाळी स्मॅश सुपर सिरीज् 16 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत दक्ष अगरवाल, अथर्व आमरुळे, अर्जुन गोहाड यांचा मुख्य फेरीत प्रवेश

0

पाचगणी, दि.1 ऑक्टोबर  2017ः रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या  रवाईन हॉटेल दिवाळी स्मॅश सुपर सिरीज् 16 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात दक्ष अगरवाल, अथर्व आमरुळे, अर्जुन गोहाड या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून मुख्य फेरीत प्रवेश केला.

रवाईन हॉटेल, पाचगणी येथील टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत अंतिम पात्रता फेरीत दक्ष अगरवालने गौतम काळेचा टायब्रेकमध्ये 6-3, 7-6(5) असा पराभव करून मुख्य फेरी गाठली. अथर्व आमरुळेने प्रसाद इंगळेचा टायब्रेकमध्ये 6-4, 1-6, 7-6(3) असा पराभव करून आगेकूच केली. संदेश कुरळेने क्रिश वघानीला 6-3, 6-3 असे नमविले. अर्जुन गोहाडने साहिल तांबटचा 6-0, 6-1असा सहज पराभव केला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम पात्रता फेरी: मुले: पी.हितेश(तामिळनाडू) वि.वि.क्रिश टिपणीस(महा) 6-1, 6-3;
ऋषी जलोटा(उत्तरप्रदेश)वि.वि.आरव साने(महा) 7-5, 6-2;
दक्ष अगरवाल(महा)वि.वि.गौतम काळे(महा) 6-3, 7-6(5);
संदेश कुरळे(महा)वि.वि.क्रिश वघानी(महा) 6-3, 6-3;
अथर्व आमरुळे(महा)वि.वि.प्रसाद इंगळे(महा) 6-4, 1-6, 7-6(3);
अर्जुन गोहाड(महा)वि.वि.साहिल तांबट(महा) 6-0, 6-1;
साहेब सोदी(महा)वि.वि.क्रिस नासा(महा) 6-0, 6-1;

मुली:
श्रुनाया सिरसाट(महा)वि.वि.ऋतुजा तुडयेकर(महा)6-1 6-0;
विधी बर्मन(महा)वि.वि.तन्मयी तुडयेकर 6-1, 6-3.

धान्याला कीड लागू नये म्हणून ’सेव्ह ग्रेन बॅग’ ची निर्मिती !

0
पुण्यातील ’पनामा फाउंडेशन’चे संशोधन 
पुणे :
शेतकर्‍यांनी पोत्यात साठवलेल्या धान्याला कीड लागू नये म्हणून ’सेव्ह ग्रेन प्लास्टिक बॅग ’ या आगळ्या वेगळ्या प्लास्टिक बॅग चे संशोधन पुण्यातील पनामा फाउंडेशन ने केले आहे . ’पनामा फाउंडेशन’ च्या सागर शहा यांनी हे संशोधन केले आहे . पुणे श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली .
  देशाची अर्थव्यवस्थाही शेतीवर अवलंबून आहे. देशात दरवर्षी शेतकरी हा लाखो टन धान्य पिकवत असतो त्यातील हजारो टन वायाही जाते. त्याला अनेक कारणेही आहेत. त्यामुळे तो ते धान्य पोत्यामध्ये साठवतो प्रसंगी त्याला किड लागून शेतक-यांना तोटा सहन करावा लागतो. यावर पुण्यातील संशोधक सागर शहा यांनी उपाय काढलाय तो म्हणजे या धान्याला कोणतीही किड लागु नये यासाठी त्यांनी ’सेव्ह ग्रेन प्लँस्टिक बॅग’ची निर्मिती केली. त्याला केंद्र सरकारच्या ’इंडियन इन्स्टिटयूट आँफ फूड प्रोसेसिंग’नेही मान्यता दिली आहे. राज्यात पहिल्यादांच त्यांनी हा प्रयोग केला आहे.
  ’पनामा फांऊडेशन’च्या माध्यमातून सागर शहा यांनी हा शोध लावला असून शेतकरी, ग्राहक यांना याचा फायदा होणार आहे. ही पूर्णतः प्लँस्टिक बॅग असून 50 किलोमध्ये ती उपलब्ध आहे. जपानचे तंत्रज्ञान  त्यांनी ही बॅग तयार  करताना वापरले  आहे. एथिलिन व्हिनाईल अल्कोहोल हे पाँलिमर असून कोणत्याही प्रकारचे गँसेस या पिशवीत येत नाही. त्यामुळे धान्याला किड लागत नाही .जर किडे असल्यास ते आतच मरतात, किंवा नव्याने कोणतीही किडे तयार होत नाही.
या प्रकारच्या समस्येवर 2012 पासून सागर शहा, सचिन गांगल, अंकु प्रकाश, श्रीपाद आमरे, अनिता यांनी या संशोधनाला सुरवात केली. शेतकरी, ग्राहक यांचे हित पाहता सध्या ही बँग 70 रुपयाला उपलब्ध आहे. पण शहा यांना जिथे धान्य पिकते अशा ग्रामीण भागात जाऊन शेतक-यांचे याबाबतीत प्रबोधन करणे आणि त्यांना किडीद्वारे साठवणुकीत होणार्‍या नुकसानीपासून वाचवणे हा उद्देश आहे.
ही बॅग टिकाऊ असून पुन्हा पुन्हा वापरता येण्यासारखी आहे, अशी माहिती सागर शहा यांनी यावेळी दिली

 

रणबीर कपूर ने ‘गौरी खान डिजाइन’ का दौरा किया!

0

अपने जन्मदिन के दो दिन बाद, रणवीर कपूर कल शाम को गौरी खान के स्टोर में गए थे।

अभिनेता ने साज-सजावट की चीज़ें और फर्नीचर को निहारते हुए वहाँ ढाई घंटे का वक़्त बिताया।

रणबीर वहाँ मौजूद भव्य फर्नीचर से काफी प्रभावित हुए और अन्य बातों के अलावा, कुछ कुर्सियों को चुनने के बाद, वह गौरी के साथ एक घंटे के लिए बैठे ताकि वह इस बात पर चर्चा कर सकें कि घर के चारों ओर अपनी नवीनतम खरीदी हुई वस्तुओं को कहाँ-कहाँ रखा जा सकता है।

हाल ही में बनाये हुए अपने नए घर के लिए अभिनेता गौरी की इस नए संग्रह वस्तु खरीदना चाहते थे।

रणबीर हाल फिलहाल में ही पाली हिल्स में मौजूद वास्तु नामक घर मे शिफ्ट हुए है और गौरी ने कुछ समय पहले ही सोशल मीडिया पर प्रशंसकों के साथ घर की एक झलक साझा की थी। इससे पहले, रणबीर के माता-पिता – ऋषि और नीतू कपूर ने प्रशंसा जाहिर की थी और ऋषि ने ट्वीट कर कहा की,”वास्तु, शानदार! गौरी खान! आपने रणबीर के मकान को घर बनाया है।नीतू और मैं दोनों अभिभूत हैं। धन्यवाद! नीतू ने भी अपनी खुशी ज़ाहिर करते हुए कहा कि,”गौरी खान द्वारा किया गया शानदार काम देखा। उनका स्वाद, विवरण करने का तरीका, परिष्करण – सभी शानदार। उनका जुनून उनके काम में दिखाता है।”

रणबीर एकमात्र ऐसे अभिनेता नहीं थे, जो गौरी के स्टोर पर गए थे, इससे पहले रानी मुखर्जी, सुसेन खान, फराह खान जैसे कुछ कलाकारों भी वहाँ अपनी उपस्थिति दर्ज करवा चुके है।

रणबीर कपूर ने कहा कि,”मैंने गौरी से मेरे घर का काम करवाया है, इसलिए मैं उनकी प्रतिभा जानता हूं, मुझे पता है कि वह घर कैसे डिजाइन करती है और इसे घर बनाती है। इसी के साथ घर की शैली और ग्लैमर सब कुछ बहुत अधिक है। मैं पहली बार ‘गौरी खान डिजाइन’ के स्टोर पर गया था। यह वाकई अति सुंदर है, वह दुनिया के विभिन्न हिस्सों से तरह-तरह प्रकार की चीज को एक साथ रखती है। प्रत्येक अनुभाग, स्टोर में प्रत्येक मंजिल में ऐसा कुछ है जो आपको इस पर विश्वास करने के लिए देखना होगा। तो कृपया आइये और गौरी खान डिजाइन का स्टोर देखें।”

गौरी खान डिजाइन मुंबई के जुहू में स्थित इंटीरियर डिज़ाइनिंग स्टोर है जो घर की सजावट में विभिन्न प्रकार के चयन प्रदान करता है।

निराधार वृद्धेला आसरा देणाऱ्या ‘प्रणवचा ‘ कसबा मतदार संघाच्या वतीने सत्कार

0

पुणे : एका वृद्ध निराधार महिलेला आसरा उपलब्ध करून देणाऱ्या प्रणव गंजीवाले याचा कसबा मतदार संघाच्या वतीने पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रणव चे काम आदर्शवत असून तरुणांनी त्याचा कामाचा आदर्श घ्यावा असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी यावेळी केले.

यावेळी नगरसेवक राजेश येनपुरे, हेमंत रासने, दिपक पोटे, अजय खेडेकर, सम्राट थोरात,अशोक येनपुरे, सुलोचना कोंढरे,आरती कोंढरे, रवी अनासपुरे,वैशाली नाईक, छगन बुलाखे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

पर्वती पायथ्याला राहणारी एक वृद्ध व निराधार महिला बाजीराव रोडला भटकत होती. तिच्या अंगावरील कपडे जीर्ण होऊन फाटले होते. बाजीराव रस्त्यावर ही महिला रात्री ११ च्या सुमारास थंडीने कुडकुडत पडली होती.  येथे जवळच राहणाऱ्या प्रणव गंजीवाले यांना ही वृद्ध महिला दिसली. त्यांनी तिची आपुलकीने चौकशी केली असता ती निराधार असल्याचे त्यांना समजले.  लगेचच त्यांनी स्माईल फौंडेशन या सामाजिक संस्थेला संपर्क साधून त्या महिलेला वृद्धाश्रमात दाखल केले.

त्याचा सत्कार करताना पालकमंत्री बापट म्हणाले, आजची तरुण पिढी एका वेगळ्या मार्गाने जात आहे. आजच्या बहुतांश तरुणांमध्ये अहं भाव दिसून येतो. अशा परिस्थितीत प्रणव ने उपेक्षित  आणि दुर्बल वृद्धेच्या सेवेसाठी निरपेक्षपणे केलेले काम अत्यंत स्तुत्य आहे. त्याच्या कामाचा इतरांनीही आदर्श घ्यावा. प्रणव सारख्या तरुणांचा सन्मान करून त्यांना चांगले काम करण्यासाठी आपण प्रोत्साहित केले पाहिजे. यामुळे आपला समाजाच्या व पर्यायाने देशाच्या प्रगतीला हातभार लागेल. असे ही ते म्हणाले.