Home Blog Page 3261

मनोरुग्णांच्या पुनर्वसनाचा वसा- पुण्याच्या कर्वे समाज सेवा संस्थेचा पुढाकार- संस्थेच्या वतीने विविध उपक्रमांनी मानसिक आरोग्य दिन साजरा

0

पुणे: “कुटुंब व समाजापासून दूर होऊन दिवसेंदिवस रस्त्यावर भटकत फिरणारे”, “पोटाची खळगी भरण्यासाठी कचराकुंडीत टाकून दिलेले अन्न व तहान भागविण्यासाठी गटारीतील पाणी पिऊन उदरनिर्वाह करणारे”, आणि दुर्दैवाने  याच समाजाचा दुर्लक्षित का होईना पण एक महत्वपूर्ण घटक असणारे “मनोरुग्ण” आज कर्जत येथील श्रद्धा पुनर्वसन केंद्राच्या सहकार्याने रस्त्यावरून उचलून त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी पुण्याची कर्वे समाज सेवा संस्था सरसावली असून जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून आज १० मनोरुग्णांना पुण्याच्या विविध रस्त्यांवरून उचलून पुढील उपचार व पुनर्वसनासाठी कर्जत येथील श्रद्धा पुनर्वसन केंद्रामध्ये पाठविण्यात आले आहे.

जगभरात सर्वत्र १० ऑक्टोबर हा जागतिक मानसिक आरोग्य दिवस म्हणून साजरा केला जातो, याचेच औचित्य साधून पुण्याच्या कर्वे समाज सेवा संस्थेच्या समुपदेशन विभाग व कर्जत, जि रायगड येथील श्रद्धा पुनर्वसन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रमांनी हा साजरा करण्यात आला.

राज्याचे अपंग कल्याण आयुक्त नितीन पाटील यांच्या हस्ते तसेच संस्थेचे संचालक डॉ दिपक वलोकर, डॉ महेश ठाकूर, प्रा. चेतन दिवान यांच्या प्रमुख उपस्थितीत मानसिक आरोग्य सप्ताहाचे उद्घाटन करून विद्यार्थ्यांना मानसिक आजारवर मार्गदर्शनपर व्याख्यानाने सप्ताहाच्या कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली.

पुण्याच्या रस्त्यावर फिरणाऱ्या मनोरुग्णांना श्रद्धा पुनर्वसन केंद्राच्या रेहान रझा, रमाकांत वड्डेवार, पूजा व वंदना या समाजकार्यकर्त्यांच्या मदतीने उचलून पुढील उपचार व पुनर्वसनासाठी कर्जत येथील श्रद्धा पुनर्वसन केंद्रामध्ये पाठविण्यात आले आहे. ” विशेष म्हणजे राज्याचे अपंग कल्याण आयुक्त नितीन पाटील यांनी आपल्या दालनातून बाहेर येऊन रुग्नवाहीकेमध्ये बसलेल्या सर्व मनोरुग्णांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला व त्यांच्या पुढील उपचारासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

कर्वे समाज सेवा संस्थेचे संचालक डॉ दीपक वलोकर, समुपदेशन अभ्यासक्रम प्रमुख डॉ महेश ठाकूर, समन्वयक व प्रमुख प्रा. चेतन दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा दादा दडस व समुपदेशन विभागाच्या विद्यार्थ्यांनी ससून हॉस्पिटल ते अपंग कल्याण आयुक्त कार्यालय अशी रॅली काढून विविध बॅनर्स, पोस्टर्स व माहिती पत्रके वाटपाच्या माध्यमातून जनजागृती करीत आयुक्तांना विविध मागण्यांचे निवेदन देखील सादर करण्यात आले.

कौशल्य बुद्धी हे अभ्यासक्रमाचे उद्दिष्ट असावे’ – डॉ. माणिकराव साळुंखे

0
‘फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम’चे आयएमईडीमध्ये उद्घाटन
पुणे :
‘कोणताही नवीन अभ्यासक्रम आखताना कौशल्यबुद्धी, नाविन्य आणि संशोधनाची संधी त्यात असली पाहिजे’, असे प्रतिपादन भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी केले.
‘भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंट’ (आयएमईडी) येथे ‘दूरशिक्षण अभ्यासक्रमांसाठी अध्ययन  सामग्रीचे लेखन‘ या विषयावरील ‘फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम’ चे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी आयएमईडी एरंडवणे कॅम्पस येथे झालेल्या कार्यशाळेत डॉ. माणिकराव साळुंखे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
डॉ. साळुंखे म्हणाले, ‘दूरशिक्षण पद्धतीचे अभ्यासक्रम सुरू करणे सोपे आहे. मात्र, त्याच्यासाठी अध्ययन सामग्री तयार करणे अवघड असते. कोणताही नवीन अभ्यासक्रम सुरू करताना विद्यार्थ्यांमध्ये कौशल्यवृद्धी होणे हे उद्दिष्ट असावे. विषयाची पूर्ण माहिती विद्यार्थ्यांना देता येणे गरजेचे आहे. संबंधित अभ्यासविषयात नावीन्य असावे, संशोधनाच्या संधी असाव्यात.’
‘भारती विद्यापीठाच्या स्कूल ऑफ डिस्टन्स एज्युकेशन’चे संचालक डॉ. एस. बी. सावंत यांनी पारंपरिक पद्धतीने शिकताना विद्यार्थ्यांना येणार्‍या अडचणींची माहिती दिली.
डॉ. जे. एफ. पाटील म्हणाले, ‘दूरशिक्षण अभ्यासक्रमासाठी कोर्स मटेरिअल तयार करताना त्या विषयाचा गुणवत्ता पूर्ण आशय आणता आला पाहिजे. प्रत्यक्ष लेखनापूर्वी त्याचा आराखडा तयार असणे आवश्यक आहे. डॉ. अंबुजा साळगावकर यांनी माहिती-तंत्रज्ञानाच्या उपयोगाबाबत मार्गदर्शन केले, तर डॉ. माधवी धारणकर यांनी प्रत्यक्ष लेखनाचा सराव करून घेतला.’
 डॉ. सचिन वेर्णेकर (‘भारती विद्यापीठ व्यवस्थापनशास्त्र शाखेचे अधिष्ठाता आणि इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंट’ (आयएमईडी) चे संचालक) यांनी स्वागत केले.

खादी महोत्सव यात्रेचे आयोजन

0

पुणे,दि. 11: राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या 150 व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत जिल्ह्यात महाखादी यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत ग्रामीण भागातील कारागिरांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘महाखादी’ ब्रँडचे अनावरण केले जाणार आहे.

या महोत्सवाच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगार युवकांना विविध योजनांची माहिती देणे व ग्रामीण कारागीर व शेतकरी यांना लाभान्वित करून रोजगार निर्मिती करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. या यात्रेचे आयोजन हातकागद संस्था, कृ.बा.जोशी पथ, शिवाजीनगर, पुणे येथे दि. 13 ते 17 ऑक्टोबर 2017 या कालावधीत सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी 8291916634 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा व अधिकाधिक नागरिकांनी या यात्रेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, अशोक लाड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

शुभं करोति कल्याणम् प्रेक्षकांच्या भेटीला

0

मुलांचे प्रश्न आणि त्यांचे बालविश्व दाखवणारे अनेक मराठी चित्रपट अलीकडच्या काळात आलेत. याच पार्श्वभूमीवर लहान मुलांना केंद्रस्थानी ठेवून मानवी नात्यांचं प्रतिबिंब दाखवणारा शुभं करोति कल्याणम् हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विश्वकर्मा चित्र यांची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती दिपा भालेराव यांनी केली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन शैलेन्द्रसिंह राजपूत यांनी केले आहे.

शुभं करोति कल्याणम् या चित्रपटातून एका ध्येयवेड्या मुलाच्या वेगळेपणाची व त्याला मिळालेल्या चांगल्या साथीची कथा मांडली आहे. आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं स्वप्न पाहिलं जातं तेव्हा लहान मुलं असो वा मोठे त्यांना प्रचंड कष्टाशिवाय यश मिळत नाही, हे सांगत त्यांना लहान वयातच ‘स्वप्न पाहा आणि ती झटून पूर्ण करा’ हे सांगण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला आहे. चांगल्या-वाईटाची समज देत लढायला शिकवणाऱ्या या चित्रपटातून मनोरंजनाच्या माध्यमातून सुरेख संदेश दिला आहे.

अश्विनी एकबोटे, सिया पाटील, नरेश बिडकर, अरविंद कोळी, हरिंदर सिंग राणा यांच्यासोबत बालकलाकार तेजल भालेराव, सिद्धेश लिंगायत, विनय शिरसाट, तन्मय म्हात्रे, सानिया पाटील, श्रावणी मेढेकर, राहुल मुळीक, मर्नोवी ओक, सुजल गायकवाड, आकाश शिरसाट यांच्या भूमिका आहेत.

शुभं करोति कल्याणम् या चित्रपटाची कथा, पटकथा गीते बी.विजय यांनी लिहिली असून संवाद शैलेन्द्रसिंह राजपूत यांनी लिहिले आहेत. संकलन चैतन्य तन्ना तर छायांकन सुरेश उतेकर व मनिष पटेल यांनी केलं आहे. नृत्यदिग्दर्शन प्रविण बारिया यांचे असून कलादिग्दर्शन मधु कांबळे यांचं आहे. संगीत राजेश कमल यांनी दिलं असून वैशाली माडे व मंगेश चव्हाण यांनी या चित्रपटातील गीते स्वरबद्ध केली आहेत. कार्यकारी निर्माते विनोद बरई आहेत. 

फक्त मराठीवर दिवाळी निमित्त खास चित्रपटांचा नजराणा

0

आनंदाची पुनरावृत्ती होत राहण्याचे सण हे एक निमित्त असते. दिवाळी म्हणजे करमणुकीच्या कार्यक्रमांची मांदियाळी. ‘दिवाळी सण मोठा, नाही आनंदा, उत्साहा तोटा’ अस म्हणंत गेल्या काही वर्षापासून दिवाळी सणाच्या आनंदात छोटा पडदाही सामील झाला आहे. अनेक वाहिन्या केवळ दिवाळी निमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करतात. प्रेक्षकांची यंदाची दिवाळी स्पेशल व्हावी यासाठी फक्त मराठी  वाहिनीने पाच मनोरंजनपर चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांसाठी आणली आहे.

‘ढोलकी’, ‘काकण’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘भाऊबीज’, ‘काळूबाई पावली नवसाला’ या पाच मराठी चित्रपटांचा आस्वाद मंगळवार १७ ऑक्टोबर ते शनिवार २१ ऑक्टोबर दरम्यान सकाळी ११ वा. घेता येईल. दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचं औचित्य साधत हे चित्रपट दाखवले जाणार आहेत. पाडव्याला ‘नवरी मिळे नवऱ्याला’ तर भाऊबीजेला ‘भाऊबीज’ चित्रपट दाखवण्यात येईल. मनोरंजनाच्या माध्यमातून यंदाची दिवाळी प्रेक्षकांसाठी खास करण्याचा फक्त मराठी चा प्रयत्न आहे. दिवाळीचं सेलिब्रेशन व सिनेमांची मेजवानी हे प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा खास धमाका ठरेल. फक्त मराठी वाहिनीने नेहमीच प्रेक्षक पसंतीचा विचार केला आहे. या सणाच्या निमित्ताने प्रेक्षकांशी असलेलं आमचं नातं अधिक दृढ व्हावं व प्रेक्षकांच्या सणाचा आनंद द्विगुणीत व्हावा यासाठी आम्ही ही दिवाळी भेट प्रेक्षकांसाठी आणली असल्याचे फक्त मराठीचे बिझनेस हेड श्याम मळेकर यांनी सांगितले.

 

आक्षेप कलावंतांचे कि राजकीय ? सांस्कृतिक मंत्री तावडेंनी केला सवाल .

0

मुंबई -अपात्र दर्जाच्या चित्रपटांना अनुदान मिळावे यासाठी काही लोक आग्रही असतात पंरतू अनुदान हे केवळ गुणवत्तेच्या आधारावर मिळावे ही माझी स्पष्ट भूमिका आहे. एखादया  विशिष्ट चित्रपटाला अनुदान मिळावे असे मी कधीही सांगत  नाही, सांगणार नाही असे वक्तव्य करीत राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या भूमिकेचा आज समाचार घेतला आणि  अभिनेता मोहन जोशी यांना वेळ नाकारण्याइतका काही मी मोठा नाही.तेच बोलावूनही बैठकीला आलेले नाहीत असा टोला  लगावत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या आरोपांनाही सडेतोड उत्तरे आज येथे दिली .
आपल्याबाबत उपस्थित केलेले आक्षेप कलावंतांचे कि राजकीय असाही सवाल त्यांनी केला आहे .
सांस्कृतीक खात्यासाठी पुर्णवेळ मंत्री हवा अशी मागणी काल करीत या तिन्ही संस्थांनी तावडे यांच्यावर काही आरोप केले होते ,त्याची तत्काळ दाखल घेत तावडे यांनी या सर्व आरोपांचा समाचार घेणारे प्रसिद्धीपत्रक आज काढले आहे .

अखिल भारतीय नाटय परिषदेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ अभिनेते श्री. मोहन जोशी यांना सांस्कृतिक कार्य मंत्र्यांबद्दल असे का म्हणावेसे वाटले याचा विचार माझ्यासारख्या संवदेनशील राजकीय कार्यकर्ता करीत आहे,कारण सांस्कृतिक कार्य मंत्र्यांची जबाबदारी स्वीकारल्यानंतर गेल्या तीन वर्षात या विभागातील विविध प्रलंबित प्रश्न यशस्वीपणे मार्गी लावण्यात यश मिळविले आहे. तसेच विभागाच्या विविध अभिनव योजना आणि महत्वकांक्षी प्रकल्प सुरु करण्यात आले,असे सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. विनोद तावडे यांनी आज स्पष्ट केले.
मोहन जोशी यांनी उपस्थित केलेल्या जीएसटीच्या मुद्दयावर बोलताना श्री. विनोद तावडे यांनी सांगितले की, जीएसटी मुळे नाटकांच्या तिकिट दरात वाढ होईल अशी भीती नाट्य व चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींनी माझ्याकडे व्यक्त केल्यानंतर आपण स्वत: तातडीने अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासमवेत बैठक घेतली. मोहन जोशी यांना या बैठकीचे निमंत्रण दिले होते, परंतु ते या बैठकीला आले नाहीत. जीएसटी चा मुद्दा माझ्या विभागाच्या अखत्यारित्य येत नाही. हा विषय केंद्र सरकारशी संबंधित आहे, तरीही या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी आपण प्रयत्न केले असून आताही मा. वित्तमंत्र्याच्या सहकार्याने या विषयाचा पाठपुरावा करण्यात येत आहेत.
सांस्कृतिक कार्यक्रमांना मंत्री हजर राहत नाही या जोशी यांनी केलेल्या दाव्याबाबत श्री. तावडे यांनी सांगितले की, सांस्कृतिक विभागाच्या प्रत्येक कार्यक्रमाला आपण उपस्थित राहिलो आहोत. अलिबाग येथे नुकत्याच आयोजित केलेल्या मराठी नाटय स्पर्धांच्या पुरस्कार कार्यक्रमाला आपण जोरदार पावसामुळे आणि उद्भवलेल्या वाहतूकीच्या कोंडीमुळे उपस्थित राहू शकलो नाही, असे काही अपवाद वगळता आपण स्वत: प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहिलो आहे.
सांस्कृतिक कार्यमंत्री लेखक-कलावंताना वेळ देत नाही या जोशी यांच्या वक्त्यव्यावर बोलताना श्री. तावडे म्हणाले की, आपण वेळ देत नाही असा दावा करणे अन्यायकारक आहे. मोहन जोशी यांनी आपल्याकडे वेळ मागितली आणि आपण त्यांना दिली नाही असे कधीही झाले नाही. श्री. जोशी यांना वेळ नाकारण्याइतका काही मी मोठा नाही.
परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी यांनी सांस्कृतिक क्षेत्रातील प्रश्न सोडविण्या संदर्भात सरकारमध्ये प्रचंड अनास्था असल्याचा काल उल्लेख केला होता, त्याबददल बोलताना श्री. तावडे यांनी स्पष्ट केले की, साहित्य संस्थाच्या अनुदानात वाढ करण्याचा प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित होता. या बाबत आपण पाठपुरावा करुन व वित्त विभागाशी वारंवार चर्चा करुन हा प्रश्न सोडविण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या “साहित्य संस्थांना अनुदाने”  या योजनेंतर्गत अनुदानात वाढ करण्याचा निर्णय कालच मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला. विविध वाङमयीन उपक्रमांद्वारे मराठी भाषा आणि साहित्याच्या  विकासाचे कार्य करण्यासाठी प्रतिवर्षी प्रत्येकी रूपये  ५ लाखाचे अनुदान प्रतिवर्षी प्रत्येकी रू.१०. लाखापर्यंत वाढविण्यात आले. याचा लाभ साहित्य आणि संस्कृती मंडळामार्फत १) अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, २) विदर्भ साहित्य संघ, नागपूर, ३) मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद,  ४) महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, ५) मुंबई मराठी साहित्य संघ, मुंबई, ६) कोकण मराठी साहित्य परिषद, रत्नागिरी, ७) दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर या ७ साहित्य संस्थांना मिळणार आहे.
साहित्य संमेलनाचे अनुदान दरवर्षी दस-याच्या दिवशी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या खात्यावर जमा करण्याची जी घोषणा केली होती, ती प्रत्यक्षात आणली आहे. गेल्या वर्षी शासनाच्या नियमाप्रमाणे आवश्यक असलेले संस्थेचे विनियोग अहवाल अप्राप्त असतांनाही व वित्त विभागाची हरकत असतांनाही अखिल भारतीय साहित्य महामंडळाचेअध्यक्ष श्रीपाद जोशी यांच्या विनंतीला मान  देऊनकेवळ मराठी साहित्य संमलेनाच्या कामामध्ये कुठलाही अडथळा येऊ नये यासाठी सरकारी पातळीवर सर्व जबाबदारी मी स्वीकारली आणि 25 लाखांचे अनुदान मंडळाच्या खात्यावर  मराठी साहित्यावरील प्रेमापोटी वेळेत जमा केले. त्यापुर्वीच्या पिंपरी चिंचवडसंमेलनाचे स्वागताध्यक्ष श्री. पी. डी. पाटील यांनी सदर निधी नियोजित कारणाशिवाय इतरत्र जमा केलेला असतांनाही केवळ सकारात्मक विचार करुन विशेष बाब म्हणून मान्यता दिली.
तसेच मराठी भाषा विभागामार्फत प्रथमच गेट वे ऑफ इंडीया मुंबई येथे   “ गौरव ज्ञानपीठ विजेत्यांचा,गौरव मराठी भाषेचा ” हा भव्यदिव्य व दिमाखदार कार्यक्रम घेण्यात आला. भाषासंवर्धन पुरस्कार व भाषा अभ्यासक पुरस्कार हे दोन वैशिष्टयपुर्ण पुरस्कार देण्यास सुरुवात करण्यात आली. मराठी भाषा गौरव दिन अभूतपुर्व पध्दतीने साजरा करण्यात येत आहे. केवळ राज्यातील नव्हे तर देशातील एकमेव व वैशिष्टयपुर्ण अशा भिलार येथील “ पुस्तकाचे गाव ” या उपक्रमाचे लोकार्पण करण्यात आले. या प्रकल्पास आज वाचक व पर्यटक यांचा फार मोठा प्रतिसाद मिळत आहे.
आमच्या सरकारच्या मागील तीन वर्षाच्या कालावधीत सांस्कृतिक विभागाने अनेक कामे व योजना यशस्वीपणे अंमलात आणल्या. यापैकी 25 टक्के कामेसुध्दा कॉग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या कालावधीत होत नव्हती. तरीही त्यांचे सरकार चांगले होते असे मत साहित्यिक, कलावंतांचे आहे की, हे राजकीय मत आहे असा प्रश्न अनेक लोक मला विचारत आहेत.
अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले यांनी आपल्याला प्रत्यक्ष भेटून अनेक मागण्या केल्या होत्या. त्यांच्या अशा मागण्यांवर चर्चा करुन त्यांचे प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरु केली. अपात्र दर्जाच्या चित्रपटांना अनुदान मिळावे यासाठी ते आग्रही होते, पंरतू अनुदान हे केवळ गुणवत्तेच्या आधारावर मिळावे ही माझी स्पष्ट भूमिका आहे. मंत्री म्हणून अनुदानाच्या विषयात आपण कधीच ढवळाढवळ करीत नाही. चित्रपटांना अनुदान देण्यासाठी मान्यवर कलाकारांची समिती नियुक्त करण्यात आली असून अनुदान देण्याचा निर्णय या समितीत घेण्यात येतो. एखादया  विशिष्ट चित्रपटाला अनुदान मिळावे यासाठी गेल्या तीन वर्षात आपण समिती सदस्यांना एकही फोन केलेला नाही.
श्री. मोहन जोशी यांनी ज्या काही मागण्या केल्या आहेत, त्यामध्ये साहित्य, नाटय संमेलनाचे अनुदान दुप्पट करा असे नमूद केले आहे. सांस्कृतिक मंत्र्यांना अनुदानात वाढ करण्याचा अधिकार नाही, पंरतू वित्तविभागाकडे याबाबत आपण वेळोवेळी पाठपुरावा करीत आहोत. मराठी चित्रपटाचे अनुदान पाच कोटीवरुन पंचवीस कोटी करा ही त्यांची दुसरी मागणी आहे. परंतू अनुदान वाढविण्याचा थेट अधिकार सांस्कृतिक कार्य मंत्र्यांकडे नाही, तरीही याविषयाबाबत वित्त विभागाकडेमी आग्रह धरला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याच्या त्यांच्या तिसऱ्या मागणीबाबतसांगावयाचे म्हणजे यापुर्वीच हा विषय केंद्र सरकारपर्यंत पोहचविण्यात मला यश मिळाले आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी गेल्या तीन वर्षात आपण केंद्रीय स्तरावर प्रयत्न करीत आहोत.
श्री. मोहन जोशी यांचे विविध प्रश्न आपण समजवून घेतले असून, त्या प्रश्नांपैकी अनेक प्रश्न आमच्या सरकारच्या कारकिर्दीत यशस्वीपणे मार्गी लागले आहेत. तरीही श्री जोशी यांच्याकडे काही प्रलंबित प्रश्न वा समस्या असतील तर त्यांनी माझ्याकडे थेट मांडाव्यात. त्या नक्कीच यशस्वीपणे सोडविण्यात येतील असेही श्री तावडे यांनी स्पष्ट केले.
गेल्या तीन वर्षात सरकारमध्ये सांस्कृतिक क्षेत्रातील प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने अनास्था होती असा उल्लेखही कालच्या पुणे येथील पत्रकार परिषदेत करण्यात आला. परंतू या खात्याचा मंत्री म्हणून सरकारमधील गेल्या तीन वर्षातील उल्लेखनीय व वस्तुस्थितीदर्शक कामगिरीचा संक्षिप्त तपशील पुढीलप्रमाणे आहे हे सुध्दा या निमित्ताने मी निदर्शनास आणून देत आहे.
मराठी चित्रपट सातासमुद्रापार कोणत्याही महोत्सवात जात नव्हते. मी मंत्री झाल्यावर मराठी चित्रपटांच्या मार्केटिंगसाठी पुढाकार घेतला. त्यामुळे “कान्स” आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मार्केटिंगसाठी मागील वर्षी 3 व या वर्षी 3 मराठी चित्रपट नेले. तसेच “गोवा” येथे सुध्दा मराठी चित्रपट जात नव्हते. परंतू मागील वर्षापासून गोवा येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी चित्रपट मार्केटिंगसाठी गेले . गेल्या दोन वर्षात दहा मराठी चित्रपट नेले. या वर्षीसुध्दा ही प्रक्रिया सुरु आहे व पुढेही सुरु राहणार आहे.
छोटया गावांमध्ये चित्रपटगृहे उभारली जावीत यासाठी व्हिडीओ पार्लर ॲक्ट (सिनेमॅटोग्राफर ॲक्ट) अटींमध्ये दुरुस्ती केली. पूर्वी फक्त तळमजल्यावरच थिएटर होऊ शकत होते. ते बदलून आता कोणत्याही मजल्यावर थिएटर करण्यास परवानगी दिली.  तसेच या थिएटरची आसन क्षमता 75 पर्यंत मर्यादित होती ती 150 पर्यंत वाढवली.
सरस्वतीबाई फाळके मराठी फिल्म अर्काइव्हजचे कामकाज सुरु झाले असून यामध्ये जुन्या व दुर्मिळ चित्रपटांचे जतन केले जाईल .
कोल्हापूर चित्रनगरीच्या कामासाठी भरीव आर्थिक तरतूद केली व रखडलेली कामे मार्गी लावली. कोल्हापूर चित्रनगरी येथे 25 पेक्षा जास्त चित्रिकरण स्थळे निर्माण केली.
चित्रिकरणासाठी राज्यभरातील विविध स्थळांचे लोकेशन कॉम्पेडीयम प्रसिध्द करण्यात येत आहे.
राज्यात चित्रिकरण करणे सुलभ व्हावे या दृष्टिकोनातून एक खिडकी परवाना पध्द्त सुरु करण्याचे काम अंतिम टप्प्यात आणले आहे.
मराठी चित्रपट निर्मात्यांच्या सुविधेसाठी पु.ल.देशपांडे अकादमी येथे अद्ययावत असा डी.सी.प्रोजेक्टर बसविण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.
चित्रपट, नाटय, साहित्य क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंतांशी गप्पा साधून त्यांच्या आठवणी, त्यांचे जूने प्रसंग नवीन पिढीला समजावेत व त्याची ओळख व्हावी यादृष्टीने त्यांचे व्हिडीओ चित्रिकरण करण्यास सुरुवात केली.
कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी केवळ 2 टक्के कोटा होता त्याऐवजी अतिरिक्त गुण मिळण्याची योजना गेल्या वर्षापासून कार्यान्वित केली.
संगीत नाटकांच्या शतकपूर्तीनिमित्त “मर्मबंधातली ठेव” हा भव्य नाटयगीतांवर आधारित कार्यक्रम सांगली येथे साजरा केला.
दशावतार महोत्सव गेली सहा वर्षे होत नव्हता.  तो परत सुरु करुन 7 दिवसांचा महोत्सव यशस्वीपणे पार पाडला.
कलांगण सारखा अभिनव कार्यक्रम सुरु केला.  ज्या माध्यमातून महाराष्ट्रभर अनेक स्थानिक लोक कलाकारांना व्यासपीठ उपलबध करुन दिले.
विविध् एकांकिका स्पर्धेत विजयी ठरलेल्या एकाकिकांचा महोत्सव व त्याला जोडूनच कॉलेजमधील विद्यार्थ्यांसाठी एकांकिका प्रशिक्षण शिबीर सुरु करण्यात आले.
राज्य नाटय स्पर्धा अंतर्गत होणाऱ्या हिंदी आणि बालनाटय स्पर्धांना गेल्या 2 वर्षांमध्ये तुलनेने दुप्पटीहून अधिक प्रवेशिका प्राप्त झालेल्या आहेत.
राज्य नाटय स्पर्धेच्या पारितोषिकाच्या रक्कमेत, निर्मिती खर्चात तसेच दैनंदिन भत्त्यांमध्ये शासनाने दुप्पटीहून अधिक वाढ केलेली आहे.
एक भारत श्रेष्ठ भारत या योजनेअंतर्गत ओरिसा राज्यातील भुवनेश्वर येथे 60 लोक कलावंतांच्या सादरीकरणाचा 5 दिवसांचा महोत्सव यशस्वीपणे आयोजित करण्यात आला.
मी 1995 पासून राजकारणात आहे, परंतू आतापर्यंतच्या कोणत्याही सांस्कृतिक मंत्र्याच्या एका कार्यकालातच नाही तर अनेक कार्यकाळात सुध्दा एवढे उपक्रम झाल्याचे निदर्शनास आलेले नाही. तरीही आपण केलेले वक्तव्य हे साहित्य व संस्कृतीच्या हितासाठी केले असावे असे समजून मी संबधितांना भेटून या सर्व विषयांमध्ये कार्यवाही सुरु करतो असेही श्री विनोद तावडे यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.

 

खंडित वीजपुरवठ्याचे प्रमाण वाढल्यास कारवाई प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे यांचा इशारा

0

पुणे : विजेच्या सुरळीत पुरवठ्यासाठी बिघाडरहित वीजयंत्रणेसाठी आवश्यक सर्व उपाययोजना कराव्यात. वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढल्यास किंवा दुरुस्ती कामात हयगय झाल्याचे आढळल्यास संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा इशारा महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांनी दिला.

गणेशखिंड येथील ‘प्रकाशभवना’त मंगळवारी (दि. 10) वीजपुरवठ्यातील तांत्रिक बिघाड टाळण्यासाठी उपाययोजनांची आढावा बैठक झाली. यावेळी प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे बोलत होते. पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. एम. जी. शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. भोसरी विभागात गेल्या काही दिवसांपासून तांत्रिक बिघाडाने वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले. या पार्श्वभूमिवर ही बैठक घेण्यात आली.

प्रादेशिक संचालक श्री. ताकसांडे म्हणाले, की बिघाडांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास वीजग्राहकांना त्रास होतो. सोबतच महावितरणचे मोठे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे देखभाल व दुरुस्तीअभावी यंत्रणेत बिघाड व वीजपुरवठा खंडित झाल्यास सहन केले जाणार नाही. देखभाल व दुरुस्ती हे नियमित स्वरुपाचे काम आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष करणार्‍यांविरुद्ध कारवाई निश्चितपणे होणार आहे. बिघाडरहित यंत्रणेसाठी उपाययोजना करण्यासाठी महावितरणकडे कोणत्याही साहित्याची कमतरता नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

वीजयंत्रणेची पाहणी करून वारंवार होणारे बिघाड कायमस्वरुपी दुरुस्त करण्याचे काम प्राधान्याने करण्यात यावेत. येत्या 10 दिवसांत बिघाडरहित व सक्षम वीजयंत्रणेसाठी उपाययोजना कराव्यात. तसेच यंत्रणेच्या दुरुस्ती कामात स्थानिक अभियंत्यांनी व आवश्यकतेनुसार वरिष्ठांनीही उपस्थित राहण्याचे निर्देश प्रादेशिक संचालक श्री. ताकसांडे यांनी यावेळी दिले. रस्ते किंवा इतर खोदाई कामात भूमिगत वीजवाहिन्या तोडण्याचा संभाव्य धोका टाळण्यासाठी संबंधित ठिकाणी कर्मचाऱ्याची देखरेखीसाठी नियुक्ती करण्यात यावी. शिवाय बेजबाबदारपणा किंवा हयगय केल्याने यंत्रणेतील बिघाडांचे प्रमाण व दुरुस्तीकामांचा कालावधी वाढल्यास संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असे प्रादेशिक संचालक श्री. ताकसांडे यांनी सांगितले. रस्ते किंवा इतर खोदाई कामात वीजवाहिनीचे नुकसान होऊन वीजपुरवठा खंडित झाल्यास संबंधीत एजंसीविरुद्ध फौजदारी तक्रार करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी अधीक्षक अभियंता श्री. महेंद्र दिवाकर, कार्यकारी अभियंता श्री. मदन शेवाळे, श्री. गौतम गायकवाड, श्री. दीपक लहामगे आदींसह अभियंते उपस्थित होते.

काही वीजग्राहकांकडूनही चुकीची माहिती – देखभाल व दुरुस्ती तसेच विविध उपाययोजनांमुळे वीजपुरवठा खंडित होण्याचे व यंत्रणेतील बिघाडांचे प्रमाण लक्षणीय प्रमाणात कमी झाले आहे. परंतु काही वीजग्राहकांद्वारे चुकीची माहिती वरिष्ठांकडे हेतुपुरस्सरपणे पाठविण्यात येत असल्याचे निदर्शनास येत आहे. बाणेर बालेवाडी परिसरात गेल्या 10 दिवसांत 10 पैकी 9 वीजवाहिन्यांमध्ये एकदाही बिघाड झाल्याचा प्रकार घडला नाही. तर उर्वरित एक वाहिनीवर पावसामुळे 20 मिनिटे वीजपुरवठा खंडित होता, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

एफटीआयआयच्या अध्यक्षपदी अभिनेते अनुपम खेर

0

पुणे-‘फिल्म अॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट’च्या अध्यक्षपदी ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांची आज निवड करण्यात आली.  यापुर्वीचे अध्यक्ष दोन वर्षांपूर्वी गजेंद्र चौहान यांची एफटीआयच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. त्यावेळी  त्यांच्या नियुक्तीवरून मोठा वाद झाला होता.

बहुतांश हिंदी चित्रपटासोबत त्यांनी आंतरराष्ट्रीय चित्रपटामध्येहि काम केले आहे. ज्यामध्ये बेकनहम, लस्ट सारख्या लोकप्रिय चित्रपटाचा समावेश आहे. अनुपम यांना 5 वेळा बेस्ट कॉमिक रोल साठी फिल्मफेयर चा अवार्ड मिळालेला आहे. चित्रपट विजय साठी त्यांना बेस्ट सपोर्टिंग अॅक्टर चा फिल्मफेयर अवार्ड मिळाला आहे.

कार्डिओव्हस्क्युलर आजारांतील ‘प्रिसिजन मेडिसिन’वर कार्डिऑलॉजिस्टनी केले विचारमंथन

0

पुणे: अगदी अलीकडच्या काळापर्यंत, जिनॉमिक्स किंवा प्रिसिजन मेडिसन यांचा संदर्भ कॅन्सरच्या रुग्णांशी लावला जात असे. कार्डिओव्हस्क्युलर आजारांसाठी त्यांचा वापर व प्रभावी उपयोग अतिशय कमी होता. पर्सोनॉम या जागतिक मॉलिक्युलर कंपनीने भारताच्या दृष्टिकोनातून जिनॉमिक्सच्या परिणामावर विचारमंथन करण्यासाठी भारतभरातील कार्डिऑलॉजिस्ट, सर्जन्स व फिजिशिअन्स यांच्या परिसंवादाचे आयोजन केले होते. मॉलिक्युलर जिनॉमिक तंत्रज्ञानातील नव्या घडामोडी व त्यांचा कार्डिओव्हस्क्युलर आजारांबाबत उपयोग यांचा समावेश या परिसंवादात करण्यात आला. या चर्चेचे नेतृत्व प्रा. डॉ. कॅलम मॅकरे यांनी केले. डॉ. मॅकरे इंटर्नल मेडिसिन व कार्डिओव्हस्क्युलर आजारांबाबत बोर्डाकडून प्रमाणित आहेत आणि बोस्टनमधील बीडब्लूएच जिनॉमिक्स सेंटर येथील जागतिक स्तरावर नावाजलेले कार्डिऑलॉजिस्ट व जिनॉमिक्स तज्ज्ञ असून ते हार्वर्ड मेडिकल स्कूल येथे मेडिसिनचे असोसिएट प्रोफेसर आहेत.

डॉ. मॅकरे यांनी जिन्सच्या सर्वंकष प्रोफाइलिंगवर दृष्टिक्षेप टाकत रुग्णांच्या दृष्टीने त्यांचे रोगकारक वा सौम्य असण्याबाबत महत्त्वाचे वैद्यकीय विश्लेषण केले. याद्वारे सादर करण्यात आलेल्या चाचण्या व अहवाल यांमधून रुग्णांना असलेल्या धोक्यांचे वर्गीकरण करता येते ज्याच्या आधारे रुग्णांना संबंधित रोग निर्माण होण्याची शक्यता, थेरपी व्यवस्थापन व जिनॉमिक टेस्ट डाटाच्या स्पष्टीकरणाच्या आधारे प्रोग्नोसिस याविषयी माहिती दिली जाते.

अहवाल सादर करताना, ब्रिगहॅम अँड विमेन्स हॉस्पिटलमधील (बीडब्लूएच) कार्डिओव्हस्क्युलर मेडिसिनचे चीफ प्रा. डॉ. कॅलम मॅकरे म्हणाले – “भारतीय मेडिसिनला या झपाट्याने बदलत्या व विकसित होणाऱ्या क्षेत्रामध्ये जिनॉमिक्सचा समावेश करून घेत जागतिक क्लिनिकल केअरमध्ये रूपांतरण करण्याची संधी भारताला आहे.”

रुबी हॉल क्लिनिकमधील कार्डिऑलॉजिस्ट डॉ. सी. एन मखाले यांनी सांगितले, “कार्डिओव्हस्क्युलर मेडिसिनमधील कॅसकेड टेस्टिंग व फार्माकोजिनॉमिक्समध्ये जिनॉमिक्सचे महत्त्व झपाट्याने वाढत आहे.”

कार्डिओव्हस्क्युलर सर्जन डॉ. जी. एस. नागी म्हणाले, “जिनॉमिक्स या नव्या संकल्पनेतून सर्वांना शिकण्यासारखे खूप आहे आणि प्रोग्नोस्टिकेशनमधील उत्तम साधन आहे. कार्डिओच्या संदर्भाने जिनॉमिक्सबद्दल अद्याप प्रचंड ज्ञान आपल्याला मिळवायचे आहे व या विषयात पुरावा, माहितीच्या आधारे योग्य दृष्टिकोन घडवणे अत्यावश्यक आहे.”

कार्डिऑलॉजिस्ट डॉ. इश्वर झंवर यांनी नमूद केले, “जिनॉमिक्समध्ये भारतीय लोकसंख्येत आढळणाऱ्या विविध प्रकारच्या, स्पष्ट न झालेल्या सिंड्रोमच्या बाबतीत प्रत्यक्षातील अंमलबजावणीचा दृष्टिकोन आढळतो”.

समारोप करताना, डॉ. केतन खुरजेकर म्हणाले, “पारंपरिक दृष्टीकोनाला पूरक ठरत व त्यास चालना देत जिनॉमिक्स झपाट्याने मेडिसिनमध्ये समाविष्ट होत आहे. भविष्यामध्ये जिनॉमिक्सला फार महत्त्व असणार आहे आणि त्यामुळे चांगले आरोग्य व कल्याण यांना सकारात्मक दिशा मिळणार आहे.”

पर्सोनॉमचे सह-संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत औसेकर यांनी सांगितले – “प्रिसिजन मेडिसिन या दृष्टिकोनामुळे रुग्णांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल. रुग्णांना ते आर्थिक बाबतीतही फायदेशीर असेल. पर्सोनॉममध्ये, कार्डिओव्हस्क्युलर आजारांच्या बाबतीत मॉलिक्युलर जिनॉमिक्सवर आधारित मूल्यमापनाचे विभाजन पुढीलप्रमाणे केले आहे: अऱ्हिथिमिया, कार्डिओमायोपॅथी, फॅमिलिअल हायपरकोलेस्टेरॉलेमिया, कान्जेनिटल हार्ट डिसऑर्डर्स, फार्माकोजेनेटिक्स आणि रिस्क स्ट्रॅटिफिकेशन व प्रोग्नोसिस ऑफ सीएडी. रुग्णांच्या जेनॉमिक व बायोमार्कर स्थितींचा अभ्यास करता, सध्याच्या आरोग्यसेवा क्षेत्रामध्ये प्रचंड बदल होणार आहेत, असे पर्सोनॉमला वाटते.”

लोकांमध्ये जागृतीचे प्रमाण अजूनही वाढत असले तरीही भारतासारख्या देशात प्रिसिजन मेडिसिन या नावीन्याला मोठ्या प्रमाणात स्वीकारार्हता मिळाली आहे.

 

समाविष्ट गावांमधील विकास कामांसाठी लवकरच बैठक – श्रीनाथ भिमाले (व्हिडीओ)

0


पुणे- महापालिकेत समावेश  होत असलेल्या अकरा गावांचा विकास हा तेथील जनतेला विश्वासात घेवूनच केला जाईल अशी ग्वाही येथे महापालिकेतील सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी दिली आहे .
समाविष्ट गावांमधील नागरी कृती समितीने नुकतीच महापालिकेत महापौर आणि सभागृहनेते यांची भेट घेतली ,याबाबत माय मराठी शी बोलताना भिमाले यांनी सांगितले कि, तेथील नागरिक आणि लोकप्रतिनिधी आणि महापालिका अधिकारी यांची संयुक्त बैठक घेण्यात येईल. तेथील नागरिकांच्या भावना समजून च पुढील कार्यवाही होईल … पहा आणि ऐका ..नेमके भिमाले यांनी काय सांगितले …

गरीब रुग्णांना स्थायी समितीकडून दिलासा देण्याचा प्रयत्न(व्हिडीओ)

0

पुणे- गरीब आणि गरजू रुग्णांना डायलेसिस चे उपचार करण्यासाठी 1 लाख रुपये खर्चापर्यंत आर्थिक मदत करण्याचा निर्णय आज दिवाळीच्या तोंडावर घेवून स्थायी समितीने गरीब रुग्णांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे .त्याचबरोबर चांगले काम करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांना रोख रकमेच्या पारितोषिकात घसघशीत वाढ आणि महिलांसाठी  सॅनेटरी नॅपकीन डिस्पोजल  प्रकल्प  अशा विविध निर्णयांबाबत स्थायी समितीचे  अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी माहिती दिली … पहा आणि ऐका नेमके मोहोळ यांनी काय सांगितले ….

महिंद्रातर्फे नवी केयूव्ही100 नेक्स्ट सादर (व्हिडीओ)

0

नव्या एसयूव्ही डिझाइनसह 40 नवी वैशिष्ट्ये व सुधारणा,
नव्या व अधिक प्रीमिअम व आकर्षक अंतर्भागासह नवी हाय-टेक वैशिष्ट्ये,
किंमत 4.39 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम मुंबई, के2 प्रकारासाठी)

 

मुंबई : महिंद्रा अँड महिंद्रा लि. (एमअँडएम लि.) या भारातील आघाडीच्या एसयूव्ही उत्पादकाने आज नव्या केयूव्ही100 नेक्स्टचे अनावरण केले. 40 नवी वैशिष्ट्ये व सुधारणांचा समावेश असलेल्या केयूव्ही100 नेक्स्टची नवे व अधिक आक्रमक एसयूव्ही डिझाइन, अधिक हाय-टेक वैशिष्ट्ये, अधिक प्रीमिअम अंतर्भाग आणि गाडी चालवण्याचा उत्तम व आनंददायी अनुभव ही ठळक वैशिष्ट्ये आहेत. केयूव्ही100 नेक्स्ट आता 5 व 6 आसनी पर्यायांसह, पेट्रोल व डिझेल या दोन्ही पर्यायांत के2 व के2+, के4+, के6+ आणि के8 या पाच प्रकारांमध्ये उपलब्ध होईल.केयूव्ही100 नेक्स्टची किंमत के2 प्रकारासाठी 4.39 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम मुंबई) असेल.

यावेळी महिंद्रा अँड महिंद्रा लि.चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. पवन गोएंका यांनी सांगितले, “केयूव्ही100ने 4.5 रुपये ते 7.5 लाख रुपये या दरम्यानच्या किमतीच्या श्रेणीमध्ये एसयूव्हीमध्ये नवी श्रेणी निर्माण केली आहे. आम्ही नेहमीच ग्राहकांचे म्हणणे ऐकून घेतो व त्यानुसार आम्ही 21 महिन्यांमध्ये नवी केयूव्ही100 यशस्वीपणे दाखल केली आहे. त्यातील वैशिष्ट्ये विचारात घेता, आघाडीवर राहती अशी उत्पादने तयार करण्याबाबतचा ग्राहकांचा महिंद्राच्या क्षमतांवरील विश्वास केयूव्ही100 नेक्स्टमुळे निश्चितच वाढेल, असा विश्वास वाटतो.”

महिंद्रा अँड महिंद्रा लि.चे ऑटोमोटिव्ह सेक्टरचे अध्यक्ष राजन वधेरा यांनी सांगितले, “नवी केयूव्ही100 नेक्स्ट दाखल करताना आम्हाला अतिशय आनंद होतो आहे. आजच्या ग्राहकांची प्रीमिअमनेस, स्टायल व हाय-टेक वैशिष्ट्ये या बाबतीत बरीच अपेक्षा असते आणि केयूव्ही100 नेक्स्टमध्ये या अपेक्षा नक्कीच पूर्ण होताना दिसतील. यूव्ही श्रेणीच्या वाढीला प्रामुखअयाने कॉम्पॅक्ट एसयूव्हीमुळे चालना मिळत असल्याचे लक्षात घेता, पहिल्यांदा कार घेणारे व अपग्रेड करणारे अशा दोन्ही ग्राहकांच्या अपेक्षा केयूव्ही100 नेक्स्टमुळे पूर्ण होतील”.

नव्या केयूव्ही100 नेक्स्टची बांधणी एसयूव्हीसारखी दणकट आहे व त्यामध्ये एकंदर सुरक्षा व मनःशांतीसाठी एबीएस व ड्युएल एअरबॅग्स (के2+ पासून पुढे) आहेत. 6 व्यक्ती अतिशय आरामात व ऐसपैस जागेत बसू शकतील, अशी या किमतीची ही एकमेव गाडी आहे.

ग्राहकांना गॅसोलिन व डिझेल अशा दोन्ही पर्यायांतून सोयीच्या पर्यायाची निवड करता येईल – एमफाल्कन जी80 हे 1.2 लिटर, एमपीएफआय व ड्युएल व्हीव्हीटी पेट्रोल इंजिन असून त्याची क्षमता 61 किलोवॅट (82bhp) आहे व टॉर्क 115 एनएम आहे आणि एमफाल्कन डी75 हे 1.2 लिटर टर्बो-चार्ज्ड, डिझेल इंजिन असून त्यामध्ये सीआरडीआय तंत्रज्ञान आहे व त्याची क्षमता 57.4 किलोवॅट (77bhp) आहे व टॉर्क 190 एनएम आहे.

नव्या केयूव्ही100 नेक्स्टमध्ये या श्रेणीतील पहिलेच फ्लेक्सी 6 व 5 आसनी पर्याय आहेत व त्यातील फ्लॅटफ्लोअरमुळे 6 प्रौढ व्यक्तींना बसण्यासाठी भरपूर लेगरूम व हेडरूम उपलब्ध होते. यामध्ये कपहोल्डर्ससह फ्रंट व रिअर आर्मरेस्ट, कूल्ड ग्लोव्ह बॉक्स, अंडरफ्लोअर व अंडरसीट स्टोअरेज आणि 243 लिटर्स बूट स्पेस (फ्लॅट फ्लोअरसह 473 लिटरपर्यंत वाढवण्याची सोय) अशी साठवणुकीची नावीन्यपूर्ण वैशिष्ट्ये आहेत.

नवी केयूव्ही100 नेक्स्ट 8 आकर्षक रंगांत मिळेल – फिएरी ऑरेंज, फ्लॅमबॉयंट रेड, पर्ल व्हाइट, डॅझलिंग सिल्व्हर, डिझाइनरग्रे, मिडनाइट ब्लॅक व फ्लॅमबॉयंट रेडचे मेटॅलिक ब्लॅक व मेटॅलिक ब्लॅकसह डॅझलिंग सिल्व्हर असे 2 ड्युएल टोन पर्याय

नव्या केयूव्ही100 नेक्स्टमधील नवी वैशिष्ट्ये व प्रमुख सुधारणा

सुधारित स्टाइल व एसयूव्ही शैली:

1. नवे आक्रमक फ्रंट ग्रिल

2. सिल्व्हर स्किड प्लेट्ससह नवे दणकट फ्रंट व रिअर बम्पर्स

3. व्हील क्लेडिंगसह नवे फ्लेअर्ड व्हील आर्चेस

4. नवी दणकट बांधणी

5. नवे डिझाइन टेल-गेट

6. ब्लॅक बेझ सराउंड्ससह नवे फॉग लॅम्प्स

7. एलईडी डीआरएलसह नवे सनग्लास-प्रेरित ड्युएल चेम्बर हेडलॅम्प्स

8. नवे 38.1 सेमी (15”) डायमंड कट ड्युएल टोन अलॉय

9. साइड-टर्न इंडिकेटर्ससह नवे ओआरव्हीएम

10. नवे एकात्मिक रूफ रेल्स

11. नवे डोअर व सिल क्लेडिंग

12. नवे डबल बॅरेल क्लिअर लेन्स टेल लॅम्प्स

13. एअरो कॉर्नर्ससह नवे एरिओडायनॅमिक स्पॉयलर

तंत्रज्ञानाची आधुनिक वैशिष्ट्ये:

1. यूएसबी, ऑडिओ, इमेज व व्हीडिओ प्लेबॅकसह नवी 17.8 सेमी (7”) टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टीम

2. नवे जीपीएस नेव्हिगेशन

3. नवे इलेक्ट्रॉनिक टेम्परेचर कंट्रोल पॅनेल

4. इंटिग्रेटेड टर्न इंडिकेटर्ससही नवे इलेक्ट्रिकली फोल्डेबल ओआरव्हीएम

5. नवे इलेक्ट्रिक पद्धतीने चालणारे टेलगेट लॅच

6. नवे इंटलिपार्क – रिव्हर्स पार्किंग असिस्ट सेन्सर्स

7. व्हॉइस अलर्टसह नवी ड्रायव्हर इन्फर्मेशन सिस्टीम

8. रिमोट बूट ओपनिंग की

9. नवे गिअर शिफ्ट अलर्ट

इंजिनातील बदल: गाडी चालवण्याच्या नव्या व आनंददायी अनुभवासाठी नवे इंजिन माउंट तंत्रज्ञान.

प्रीमिअम व आकर्षक अंतर्भाग:

1. नवा स्पोर्टी ब्लॅक अंतर्भाग

2. नवे सीट फॅब्रिक डिझाइन व रंग

3. सुधारित सीट ब्लोस्टरिंग

4. नवे क्लस्टर इल्युमिनेशन

5. नवे सेंटर कन्सोल डिझाइन

महिंद्राविषयी

19 अब्ज डॉलर उलाढाल असलेला महिंद्रा समूह म्हणजे कंपन्यांचे फेडरेशन असून व्हॉल्युमच्या बाबतीत, समूह युटिलिटी व्हेइकल्स, माहिती तंत्रज्ञान, वित्तीय सेवा व व्हेकेशन ओनरशिप यामध्ये आघाडीच्या स्थानी आहे. मुंबईत मुख्यालय असलेल्य महिंद्राचे 100 देशांत अंदाजे 200,000 कर्मचारी आहेत.

 

झी मराठी अवॉर्ड्सवर ‘लागिरं झालं जी’ ची ठसठशीत मोहोर ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेनेही पटकावले महत्त्वाचे पुरस्कार

0

 

झी मराठीने यावर्षी अठरा वर्षे पूर्ण केली. अठरा वर्ष म्हणजे एका अर्थाने नवतारुण्यात पदार्पण. यामुळेच यावर्षी ‘उत्सव नात्यांचा नवतारुण्याचा’ अशी संकल्पना घेऊन झी मराठी अवॉर्ड्सचा सोहळा अतिशय रंगतदार पद्धतीने पार पडला. ज्यामध्ये १० पुरस्कार पटकावत ‘लागिरं झालं जी’ ने बाजी मारली. त्यापाठोपाठ ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेनेही सात पुरस्कार मिळवत आपला ठसा उमटवला. प्रेक्षकांच्या मतांद्वारे निवडण्यात येणा-या या पुरस्कारांसाठी यंदा भरघोस मतदानही झाले. राज्यातील २२ शहरांमधून झालेल्या या मतदान प्रक्रियेत प्रत्यक्ष मतदान, फेसबुकद्वारे मतदान, वेबसाईटवरुन मतदान आणि मिस्ड् कॉलद्वारे मतदान असे पर्याय ठेवण्यात आले. या सर्व माध्यमांतून प्रेक्षकांनी १२ लाखांच्यावर मतांचा पाऊस पाडत भरभरून प्रतिसाद दिला. झी मराठीवरील मालिकांमधील कलाकारांचे रंगतदार नृत्य सादरीकरण, चला हवा येऊ द्या च्या कलाकारांनी उडवून दिलेली धम्माल आणि जोडीला संजय मोने आणि अतुल परचुरेसारख्या अनुभवी कलाकारांनी आपल्या निवेदनातून केलेल्या तुफान फटकेबाजीने हा कार्यक्रम एका वेगळ्या उंचीवर नेला. सळसळता उत्साह आणि जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडलेला हा सोहळा येत्या रविवारी, १५ ऑक्टोबरला सायंकाळी ७ वा. झी मराठी आणि झी मराठी एच डी वाहिनीवरुन प्रसारित होणार आहे.

दिवाळीचा सण जवळ आला की प्रेक्षकांना उत्सुकता असते ती ‘झी मराठी अवॉर्डस’च्या रंगतदार आतिषबाजीची. या सोहळ्यात कोणती व्यक्तिरेखा सर्वोत्कृष्ट ठरणार ? लोकप्रिय नायक, नायिकेच्या पुरस्काराची विजयी माळ कुणाच्या गळ्यात पडणार ? लोकप्रिय मालिकेचा मान कुणाला मिळणार? असे उत्सुकतापूर्ण प्रश्न सर्वांच्या मनात असतात. अशीच उत्सुकता यंदाही होती. यावर्षी ‘लागिरं झालं जी’ आणि ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकांमध्ये चुरशीची स्पर्धा रंगणार असं चित्र सुरुवातीपासूनच निर्माण झालं होतं. याचा प्रत्यय प्रत्यक्ष पुरस्कार सोहळ्यातदेखील आला. ज्यामध्ये ‘लागिरं झालं जी’ या मालिकेने सर्वोत्कृष्ट शीर्षक गीत, सर्वोत्कृष्ट सहाय्यक स्त्री आणि पुरुष व्यक्तिरेखा, सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा , सर्वोत्कृष्ट बाल कलाकार, सर्वोत्कृष्ट जोडी,  सर्वोत्कृष्ट आजी, सर्वोत्कृष्ट वडिल, सर्वोत्कृष्ट नायिका, सर्वोत्कृष्ट जोडी असे पुरस्कार पटकावित या सोहळ्यावर आपली ठसठशीत मोहोर उमटवली. तर सर्वोत्कृष्ट भावंडं, सर्वोत्कृष्ट सासरे, सर्वोत्कृष्ट आई,  सर्वोत्कृष्ट सून, सर्वोत्कृष्ट कुटुंब आणि सर्वोत्कृष्ट नायक असे पुरस्कार मिळवत सोहळ्यावर आपली छाप सोडली. यंदाचा सर्वोत्कृष्ट मालिकेच्या पुरस्कारांसाठीही या दोन मालिकांमध्ये जोरदार चुरस रंगली. प्रेक्षकांनी दिलेला प्रतिसाद हा समसमान होता त्यामुळे या दोन्ही मालिकांना हा पुरस्कार विभागून देण्यात आला.

रंगतदार परफॉर्मन्स

यावर्षीच्या सोहळ्याची शान ठरली ते यात सादर झालेले रंगतदार परफॉर्मन्स यातही लक्षवेधी ठरली ती प्रसाद ओक आणि पुष्कर श्रोत्रीने सादर केलेली कव्वाली. ‘युं ही सौ साल तक झी मराठी हम भी देखेंगे’ म्हणत या दोघांनी ही कव्वाली सादर करत एकच धम्माल उडवून दिली. तर अजिंक्य-शितल, राणा-अंजली, समीर-मीरा, नीरज-नुपूर या जोड्यांचा रंगतदार डान्स आणि मल्लिका-जुई, राधिका-शनाया, भानू-शोभा मधील टशन दाखवणा-या डान्स परफॉर्मन्सने उपस्थितांची मने जिंकली. याशिवाय ‘चला हवा येऊ द्या’च्या टीमने सादर केलेल्या स्किटने प्रेक्षकांना खळखळून हसवले. कलाकारांसोबतच सूत्रसंचालक संजय मोने आणि अतुल परचुरेंनी विनोदाचं अचूक टायमिंग साधत आपल्या खुमासदार निवेदनाने हा सोहळा अधिकच रंगतदार बनवला.

एकंदरीतच, धम्माल मजा मस्तीने रंगलेला ‘झी मराठी अवॉर्ड्स २०१७’ चा हा  सोहळा  येत्या १५ ऑक्टोबरला सायंकाळी ७ वा. झी मराठीसह झी मराठी एचडीवर प्रदर्शित होणार आहे .

‘अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसी’ च्या बी. फार्म अभ्यासक्रमास एन.बी.ए. बोर्डाकडून अधीस्वीकृती

0
पुणे :
‘महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या ‘अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसी’ च्या बी. फार्म अभ्यासक्रमास ‘नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रीडिटेशन’ (नवी दिल्ली ) कडून अधीस्वीकृती (अॅक्रीडिटेशन) मिळाली आहे. ही अधीस्वीकृती ३ वर्षांकरिता (जून २०१७ ते जून २०२०) आहे.
या प्रित्यर्थ आझम कॅम्पस येथे कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला डॉ. एम.डी.बुरांडे (अध्यक्ष आय.पी.ए. कम्युनिटी फार्मसी डिव्हिजन) प्रमुख पाहुणे होते. हा कार्यक्रम डॉ. ए आर. शेख असेम्ब्ली हॉल मध्ये झाला.
एम. सी. ई. सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी डॉ. प्रवीण चौधरी, डॉ. सोहन चितलांगे, डॉ. साधना शाही हे मान्यवर उपस्थित होते.
महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. किरण भिसे यांनी प्रास्ताविक केले तर डॉ. दिलनवाझ पठाण यांनी आभार मानले. विद्यार्थी, प्राध्यापक, पालक उपस्थित होते.

विदर्भ मराठवाडयातील कृषीपंपाचा प्रादेशिक असमतोल – वर्षभरात 80 हजार 729 कृषी पंपांना वीज जोडणी देणार

0
महावितरणला आवश्यक अनुदान देण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी
मुंबई –
विदर्भ आणि मराठवाडयातील कृषी पंपांच्या जोडणीचा प्रादेशिक असमतोल दूर करण्याच्या दृष्टीने सन 2015-16 आणि  2016-17 जानेवारीपर्यंत विदर्भ आणि मराठवाडयातील 89 हजार 506 कृषी पंपांना वीज जोडणी देण्यात आल्यानंतर आता वर्षभरात 80,729 कृषी पंपांची जोडणी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासनाने शेतकऱ्यांसाठी घेतलेला हा एक धाडसी निर्णय ठरला असून वीज जोडण्याच्या कामासाठी महावितरण कंपनीला आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्याच्या महावितरणच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली. या निर्णयामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या पाठीशी महाराष्ट्र शासन खंबीरपणे उभे असल्याचा परिचय शासनाने दिला. हा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांना दिवाळीभेट ठरली.
या दोन्ही क्षेत्रात कृषी पंप जोडणीची कामे महावितरण करणार असून विशेष योजनेकरिता सन 2017-18 च्या अर्थसंकल्पात कृषी पंप प्रादेशिक असमतोल दूर करणे यासाठी 916.20 कोटीच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली. यापैकी रू. 421 कोटी ची तरतूद उपलब्ध आहे.
 या विशेष योजनेसाठी सन 2017-18 या वर्षाकरिता आणखी आवश्यक असलेला 495.46 कोटी हा अतिरिक्त निधी देण्याची मागणी ऊर्जा विभागाने केली होती. त्या मागणीला मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
महावितरण 2016-17 या वर्षाकरिता विदर्भ मराठवाडयातील कृषी पंप जोडणीसाठी 916.20 कोटींची मागणी केली होती.2017-18 साठी 421 कोटी अर्थसंकल्पात तरतूद करून मंत्रितंडळाच्या मान्यतेनंतर महावितरण कंपनीस वितरित करण्यात येतील. उर्वरित 495.46 कोटी  रूपये अतिरिक्त नियतव्यय मंजूर करण्यात येणार आहेत.
 राज्यात मार्च 2017 अखेर 2 लाख 5 हजार 590 अर्जदारांनी कृषी पंप वीज जोडणीसाठी पैसे भरले आहेत. त्या शेतकऱ्यांना वीज जोडण्या देण्यात येतील.