महाराष्ट्र आंतरजिल्हा अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत आझम कॅम्पसच्या विद्यार्थिनींना सुवर्णपदक
दिवाळी म्हणजे नेमके काय ? आहे ठाऊक ?
दीपावली हा सण मुळचा कृषिवल/पशुपालक संस्कृतीचा “यक्षरात्री” उत्सव आहे. कुबेर हा शिवाचा खजीनदार मानला जातो. बुद्धपुर्व काळापासून भारतात देशभर “यक्ष” संस्कृतीचा मोठा प्रभाव होता हे आपल्याला सर्व धर्मीय म्हणजे जैन, बौद्ध, हिंदू लेणी-मंदिरांतील यक्ष प्रतिमांवरुन व यक्षाच्या नांवाने असलेली गांवे/जमीनी/तलाव यावरून लक्षात येते. दीपावलीचे मुळचे नांवही यक्षरात्रीच होते हे हेमचंद्राने तर नोंदवलेच आहे, वात्स्यायनाच्या कामसूत्रातही नोंदलेले आहे.
यक्ष या शब्दाचा अर्थ प्रकाशमान असाही आहे. महाभारतात यक्ष हे ज्वाला अथवा सुर्यासारखे तेजस्वी असतात असे म्हटले आहे. या श्रद्धेतुनच दिपोत्सव यक्षांसाठी सुरु झाला व त्यांनाच यक्षरात्री असे म्हटले जावू लागले असे जी. बी कानुगा म्हणतात. (Immortal love of Rama, तळटीप. पृष्ठ-२७-२८) धनसंपत्ती देणारे, रक्षक असलेल्या यक्षांना दिपोत्सव करुन कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा हा उत्सव.
असूर संस्कृती भारतात मुख्य असली तरी प्रत्येक संस्कृतीच्या प्रभावक्षेत्रात उपसंस्कृत्याही सहास्तित्वात असतात. यक्ष संस्कृतीचा उदय हा गंगेच्या घन अरण्याच्या क्षेत्रात झाल्याचे मानले जाते. गुढत्व, भय, अद्भुतता या मिश्र भावनांतून यक्षकल्पना अरण्यमय प्रदेशांत जन्माला आली असावी. आज यक्ष हा जल, अन्न-धान्य-पशु व संपत्तीचा संरक्षक मानला गेला आहे. अगदी पुरातन काळी यक्ष हे वृक्ष व अरण्याचे रक्षक मानले जात. पुढे कृषी संस्कृतीच्या उदयानंतर ते ग्रामरक्षक या स्वरुपातही विराजमान झाले. यक्ष पुजा ही इतकी पुरातन आहे कि यक्ष म्हणजेच पुजा असे दक्षीणेत आजही मानले जाते. यक्षपुजा ही आजही शैवजन करत असतात…पण सांस्कृतिक लाटांत विस्मरणामुळे ते यक्ष आहेत हेच माहीत नसते. उदाहरणार्थ वीर मारुती, वीरभद्र, खंडोबा, भैरवनाथ इ. दैवता या यक्षश्रेणीतीलच आहेत. ते संरक्षक आहेत ही जनमानसाची श्रद्धा आहे…आणि म्हणुनच त्यांचे स्थान हे शक्यतो शिवेबाहेर असते…कारण ते ग्रामरक्षक असतात ही श्रद्धा. त्यांना शिवाचेच अवतार अथवा अंश मानले जाते.
उपनिषदांची रचना करणारे हे यक्ष संस्कृतीचेच प्रतिनिधी होते असे ठामपणे म्हणायला पुष्कळ वाव आहे. यक्ष हा शब्द अद्भूत, विश्वनिर्मितीचे गुढ कारण या अर्थाने उपनिषदांत वापरला जात होता. ब्रम्ह हाही एक यक्षच. (ऋग्वेदात ब्रम्ह ही देवता नसून त्याती ब्रम्हचा अर्थ मंत्र असा आहे.) पण मुळची उपनिषदे ही वैदिक नसून आगमिक असूर/यक्ष संस्कृतीच्या लोकांनी परिणत तत्वज्ञानाच्या आधारे वैदिक संस्कृतीला केलेला प्रतिवाद आहे हे लक्षात घ्यायला हवे.
गौतम बुद्धाच्या शाक्यकुलाचा कुलदेव शाक्यवर्धन नांवाचा यक्षच होताच तर खुद्द बुद्धालाही यक्ष म्हटले गेलेले आहे. जैन धर्मातही यक्ष-यक्षिणी तीर्थकरांचे सेवक मानले गेले आहेत. मातृपुजा अथवा सुफलनविधी यक्षिणींनाही केंद्रस्थानी ठेवून होत असावेत कारण त्या शिल्पांत नेहमीच नग्न दाखवलेल्या असून त्यांचे नितंब व स्तन प्रमाणापेक्षा मोठे दाखवले जातात. सर्वात जुनी यक्षमुर्ती ही सनपूर्व चवथ्या शतकातील असून ती परखम येथे मिळाली. आता ती मथुरा संग्रहालयात ठेवलेली आहे. पुढे महायान संप्रदायातही यक्षपुजा सुरु राहिली. यक्ष मुर्ती देशात सर्वत्र आढळल्या असून यक्षगानाच्या स्वरुपात दक्षीणेत कलादृष्ट्याही यक्षमाहात्म्य जपले गेलेले आहे.
एवढी व्यापक देशव्यापी असलेली यक्षपुजा पुराणांनी केलेल्या वैदिक कलमांत हळू हळू विस्मरणात गेली. कुबेर व रावणाचे बाप बदलले गेले. पुराणांनी यक्षांना अतिमानवी, माणसांना मारून खाणारे, जलाशयांजवळ निवास करणारे कुरूप-भिषण, लोकांना झपाटणारे वगैरे असे चित्रित केले. तरीही यक्ष ही संरक्षक देवता आहे व तिचा निवास जल-वृक्ष यात असते ही लोकस्मृती लोप पावली नाही. महाकवी कालिदासाने मेघदुतात यक्षालाच आपले दूत बनवले. यक्षपुजा आजही आपण करीत असतो पण त्यातील अनेक देवता मुळस्वरुपातील यक्षच आहेत याचे भान मात्र हरपलेले आहे. दिपावलीही खरे तर यक्षरात्रीच असली तरी तेही आपले भान सुटले आहे.
कुबेर हा शिवाचाच प्रतिनीधी…यक्षांचा अधिपती…धनसंपत्तीचा रखवाला…खजीनदार. एक कृषि-हंगाम जावुन दुसरा येण्याच्या मद्धे जो अवकाश मिळतो…त्या काळात या कुबेराचे अभिवादन करत समस्त कृषिवल असूर संस्कृतीचा जो महानायक बळी त्याच्या स्मरणाने नवीन वर्ष सुरु करण्याची ही पद्धत. त्यालाच आपण बळी प्रतिपदा म्हणतो…नववर्षाची सुरुवातच सर्वश्रेष्ठ, शैव संस्कृतीचा आजही जनमानसावर राज्य करीत असलेल्या महात्मा बळीच्या नांवाने सुरु होणे स्वाभाविकच आहे.
या दिवशी विष्णुचा अवतार वामनाने बळीस पाताळात गाडले अशी एक भाकड पुराणकथा आपल्या मनावर आजकाल बिंबलेली आहे. खरे तर ही दंतकथा कशी जन्माला आली हे आपण पाहुयात. मुळात ही कथा ऋग्वेदात अत्यंत वेगळ्या प्रतीकरुपात येते. विष्णु तीन पावलात विश्व व्यापतो अशी ही मुळची कथा. तिचा बळीशी काही संबंध नाही. परंतू गुप्तकाळात दिपावलीचेही सांस्कृतीक अपहरण करण्याच्या प्रयत्नांत वामन अवतार घुसवत त्याने बळीला पाताळात गाडल्याची कथा बनवली गेली. मुळात ते सत्य नाही. बळी वेदपुर्व काळातला. अवतर संकल्पना आली तीच मुळात गुप्तकाळात. त्यामुळे ही एक “वैदिक” भाकडकथा आहे हे सहज लक्षात येईल असे तिचे एकुणातील स्वरुप आहे. अर्थात ही कथा निर्माण केली म्हणून बळीराजाचे महत्व कमी झालेले नाही. झाले असते तर ती “वामनप्रतिपदा” झाली असती…बळीप्रतिपदा नव्हे. पण तसे झाले नाही…थोडक्यात हिंदुंनी आपल्या सांस्कृतीक श्रद्धा जपल्या, पण वैदिक धर्मियांनी बनवलेल्या कथाही सातत्यपुर्ण प्रचारामुळे कालौघात डोक्यात घुसवुन घेतल्या. बळीला पाताळात गाडुन वैदिक टेंभा मिरवणा-या वामनसमर्थकांच्या हे लक्षात येत नाही कि नववर्षारंभ बळीच्या नावाने का? कारण ते बळीमाहात्म्य संपवुच शकत नव्हते…एवढेच…म्हणुन भारतात या वामन-अवताराची पुजा कोणी करत नाही…त्याचे भारतात बहुदा एकच मंदिर आहे. पण बळीचे तसे नाही…तो आजही कृषिवल संस्क्रुतीचा श्वास आणि ध्यास आहे. बळीप्रतिपदेला आपण बळीचीच पूजा करतो…वामनाची नाही.
अश्वीन अमावस्येला आपण आज जे लक्ष्मीपुजन करतो त्याचाही असाच सांस्कृतीक अनर्थ झालेला आहे. मुळात ही यक्षरात्री असल्याने या रात्री लक्ष्मीपुजन नव्हे तर कुबेरपूजन करण्याची पुरातन रीत. कुबेर हा शिवाचा खजीनदार. धनसंपत्तीचा स्वामी. दीपप्रज्वलन करून यक्ष आणि त्यांचा अधिपती कुबेराला निमंत्रित करुन पुजणे हा मुळचा सांस्कृतीक कार्यक्रम. परंतू गुप्तकाळात वैष्णव पंथाला राजाश्रय मिळाल्याने आधी कुबेराबरोबरच लक्ष्मीचीही पुजा होऊ लागली. नंतर कालौघात मात्र कुबेराला गायबच करण्यात आले.
खरे तर विष्णू आणि लक्ष्मी हा संबंध जोडण्यात आला तोही उत्तरकाळात. गुप्तकाळात. ऋग्वेदात विष्णुला मुळात पत्नीच नाही. श्रीसूक्त हे प्रक्षिप्त असून ते उत्तरकाळात जोडले गेले आहे (गणपती अथर्वशिर्षाप्रमाणे) पण यातही विष्णु व लक्ष्मी यांचा पती-पत्नी संबंध, विष्णुचे शेषशायी समुद्रतळीचे ध्यान वगैरे वर्णित नाही. तो उपेंद्र आहे यापलीकडे त्याला महत्व नाही. त्याचे महत्व वाढवले गेले ते गुप्तकाळात. गुप्तांनी वैदिक धर्माला राजाश्रय दिला त्यामुळे गुप्तकाळ सुवर्णकाळ मानायची प्रथा पडली. पण सांस्कृतिक गोंधळाचा काळ म्हणजे गुप्तकाळ हे लक्षात घ्यायला हवे.
हा उत्सव मुळचा अवैदिक (आगमिक व म्हणजेच हिंदुंचा, वैदिकांचा नव्हे) असल्याचे अनेक पुरावे जनस्मृतींनी आजही संस्कृतीत जपलेले आहे. मुळच्या यक्षरात्रीचे अनेक अवशेष आजही जनस्मृतीतून गेले नाहीत असे जी. एन. कानुगा (तत्रैव) म्हणतात. बंगालमद्ध्ये लक्ष्मीऐवजी कालीची पुजा करंण्यात येते. अनेक समाज यक्षरात्रीला गोवर्धन पर्वताची कृष्णासहित पूजा करतात. कृष्ण हा मुळचा इंद्रविरोधी (म्हणजेच वैदिक विरोधी) ही जनस्मृती आजही कायम आहे. काही लोक आजही लक्ष्मीबरोबरच कुबेराचीही पुजा करतात. म्हणजेच मुळचे अवशेष वैदिकांना समूळ पुसटता आलेले नाहीत.
वसुबारस, धनतेरस (धनतेरस हा शब्द “धान्यतेरस” असा वाचावा…कारण धन हा शब्द धान्य शब्दाचा पर्यायवाची आहे.) हे सण कृषिवल शैव संस्कृतीचीच निर्मिती आहे. कृषीसंस्कृतीत गाय-बैलाचे स्थान केंद्रवर्ती होते व आजही बव्हंशी आहे. वैदिकांनी त्यावर अतिक्रमण करुन त्यांना वैदिक रुप बहाल करण्याचा प्रयत्न केला आहे एवढेच. कारण या सणाचा राम वनवासातून परत आला या भाकडकथेशीही काहीएक संबंध नाही.
नरकासूराच्या दुष्टपणाच्या व सोळा हजार राजकन्यांना बंदिवासात ठेवण्याच्या कथेत तथ्यांश असता तर नरकासुराच्या नांवाने एक दिवस लोकांनी अर्पण केला नसता. मुळ रुपाला धक्का न लावता त्याचा बनावट कथा प्रसवत त्याचा अर्थच बदलून टाकायची वैदिकांची कला मात्र अचाट आहे. देव-असूर सांस्कृतीक (कथात्मक) संघर्षात असूर महामानवांना बदनाम करण्यासाठी अशा भाकडकथा रचण्यात आल्या हे उघड आहे. भारतात सोळा हजार राजकन्या कैदेत ठेवायच्या तर तेवढे उपवर मुली असणारे राजे तरी हवेत कि नकोत? या कथेने नरकासुराला तर बदनाम केलेच पण कृष्णालाही बदनाम केले गेले. कांचा इलय्या नामक बहुजन विचारवंत (?) कृष्णाला “रंडीबाज” म्हणतो ते या कथेच्या आधारावर. मुळात ही कथा का निर्माण झाली हे समजावून घ्यायला हवे. कृष्ण वैदिक नव्हता, असुही शकत नव्हता कारण त्याचा काळ वेदपुर्व असल्याचे संकेत खुद्द महाभारतात मिळतात. हे वास्तव समजावून घेतले कि अशा भाकडकथांचा उलगडा होतो. जनसामान्यांत नरकासूर अप्रिय नव्हता हे त्याच्या नांवाचाच सण आहे हे वास्तव लक्षात घेतले कि सांस्कृतीक पेच पडत नाहीत.
थोडक्यात मित्रांनो, हा यक्षरात्री उत्सव आहे…त्यांच्या स्वागतासाठीचा, वैभवप्राप्तीच्या प्रार्थनांचा दीपोत्सव आहे. मी तरी लक्ष्मीपूजन न करता कुबेरपुजनच करत असतो. कारण तोच खरा सांस्कृतीक मुलाधार आहे. असूर संस्कृती व त्याचीच उपसंस्कृती म्हणजे यक्ष संस्कृती हे लक्षात घेतले पाहिजे. वैदिक सांस्कृतीक आक्रमणाला थारा देण्यात अर्थ नाही. खरे तर बळीप्रतिपदेस महात्मा बळीची भव्य मिरवणुक काढावी… (आजकाल ती प्रथा अनेकांनी सुरू केली आहे, त्यांचे अभिनंदन!) तेच खरे आपल्या एका महान पुर्वजाला अभिवादन!
यक्षरात्रीच्या सर्वांना मन:पुर्वक शुभेच्छा!
लेखक – संजय सोनवणी
पुणे
‘झी युवा वरील अंजली मालिकेचा धम्माल शतकोत्सव!!
‘नवे पर्व युवा सर्व’ म्हणत तरुणांच्या मनात राज्य करायला आलेली युथफूल वाहिनी “झी युवा” ही महाराष्ट्रातील तरुण मुलं मुली आणि त्यांची आवड लक्षात घेऊनच झी नेटवर्क ने लाँच केली होती. झी युवा या वाहिनीला हल्लीच १ वर्ष पूर्ण झाले आहे आणि या वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘अंजली ‘ चे १०० एपिसोड नुकतेच पूर्ण झाले. हॉस्पिटलच्या भावविश्वावर प्रकाशझोत टाकणाऱ्या “अंजली “या मालिकेच्या प्रेमात अख्खी तरुणाई पडली आहे. या मालिकेतील कलाकार सुरुची अडारकर, पियुष रानडे , हर्षद अतकरी , राजन भिसे , रेशम श्रीवर्धनकर , अभिषेक गावकर , भक्ती देसाई , उमा सरदेशमुख , योगेश सोमण , मीना सोनावणे , उमेश ठाकूर , संकेत देव , अर्चना दाणी या सर्वांनाच प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिलंय .
एखादी मालिका जेव्हा तिचे १०० भाग यशस्वी रित्या पूर्ण करते याचाच अर्थ प्रेक्षकांनी या मालिकेला पसंतीची पावती दिलेली असते . सुरुची अडारकर म्हणजेच अंजली क्षीरसागर ही नाशिक जवळच्या एका लहान गावातून आलेली एक स्वाभिमानी तरुण मुलगी .अतिशय साधी , हुशार आणि प्रेमळ असलेली अंजली सर्वांची अतिशय लाडकी आहे . तिला कोणालाही दुखवायला आवडत नाही. डॉक्टर बनण्यामागे तिची दोन मुख्य कारणे आहेत ती म्हणजे वडिलांचे स्वप्न पूर्ण करणे आणि ज्या ठिकाणी रुग्णालये बांधली जाऊ शकत नाहीत तिथल्या लोकांवर उपचार करण्यासाठी “मोबाईल रुग्णालय” सुरु करणे . ही स्वप्ने उराशी बाळगून घेऊन ती शहरात शिकायला येते . अतिशय नावाजलेले असे डॉ. जनार्दन खानापुरकर (राजन भिसे) यांच्या हॉस्पिटल मध्ये ती इंटर्नशिप करायला सुरुवात करते . तिच्याबरोबर अनुराधा आणि ओंकार हे दोघे सुद्धा इंटर्न म्हणून रुजू होतात. याच हॉस्पिटल मध्ये जनार्दन खानापूरकर यांचा हुशार आणि निष्णात सर्जन असेलेला मुलगा डॉ. यशस्वी खानापूरकर म्हणजेच हर्षद अतकरी अमेरिकेतून उच्च शिक्षण घेऊन हॉस्पिटलचा कार्यभार हाताळत असतो. अतिशय हुशार डॉक्टर असूनही त्याची वृत्ती ही रुग्णांच्या काळजीपेक्षा व्यवहारी जास्त असते. त्याला भारतातील अतिशय प्रगत आणि तंत्रज्ञानाने समृद्ध असे हॉस्पिटल बनवायचे असते. आणि अगदी बरोबर उलट डॉ. असिम म्हणजेच पियुष रानडे हा गावोगावी फिरून गरीब रुग्णाची सेवा करत आहे. सध्या अंजली आणि पियुष यांच्या एकमेकांवरील अव्यक्त प्रेमाचा प्लॉट मालिकेत सुरु असून त्यालाही प्रेक्षकांनी पसंती दिली आहे. अंजलीची तत्वे आणि यशस्वी ची स्वप्न यात नेमका कोणाचा विजय होईल हे सांगणारी ही मालिका आहे. हॉस्पिटलच्या भावविश्वावर प्रकाशझोत टाकणारी अंजली ही मराठीतील पहिलीच मालिका आहे. अंजली कश्या प्रकारे या हॉस्पिटल मध्ये तिची इंटर्नशिप ते डॉक्टर बनण्याचा प्रवास करते आणि त्यात काय काय गोष्टी घडतात हे पाहणे एक वेगळाच अनुभव देईल . झी युवावर सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता ही मालिका पहायला मिळेल .
येस बँकेतर्फे पुण्याच्या नॅशनल डिफेन्स अकॅडमी येथे येस विजय ही विशेष बँक उपक्रम सेवा
मुंबई : येस बँक या भारताच्या खासगी क्षेत्रातील पाचव्या क्रमांकावरील सर्वात मोठ्या
बँकेने, पुण्याच्या नॅशनल डिफेन्स अकॅडमी येथे आपल्या शाखेचे उद्घाटन करून महाराष्ट्र राज्यात आणखी
विस्तार केला आहे. याअंतर्गत भारतीय लष्कर, त्यांचे कुटुंबिय आणि एनडीएमध्ये कार्यरत असणारे सामान्य
नागरिक यांना येस विजय या उपक्रमाद्वारे सानुकूल बँक सेवा पुरवण्यात येणार आहेत. या शाखेचे उद्घाटन
वायएसएम (ब्रिगेडिअर अॅडम, एनडीए)चे ब्रिगेडिअर झुबिन ए. मिनवल्ला यांच्याहस्ते करण्यात आले.
यानिमित्ताने, येस बँकच्या रिटेल आणि व्यावसायिक बँक सेवांच्या सीनिअर ग्रूपचे अध्यक्ष प्रलय मोंडाल
म्हणाले की, “येस बँकेतर्फे आपल्या देशासाठी अदम्य ऊर्जा आणि योगदान देणाऱ्या आपल्या लष्करी दलाला
मानवंदना देण्यात आलेली आहे. लष्करी अधिकाऱ्यांना विशेष वित्तीय मार्गदर्शनाची गरज असते, हे
मार्गदर्शन त्यांच्या अनोख्या जीवनशैलीशी जुळणारी असायला हवी. यासाठीच येस बँकेन प्रमुख माहितीवर
आधारित अशी सानुकूल बँक सेवा आमच्या ग्राहकांना देण्याचे ठरवले आहे; लष्करी अधिकाऱ्यांसाठी येस
विजय उपक्रमातून हे तत्त्वज्ञान मांडण्यात येणार आङे. अधिकारी आणि त्यांचे कुटुंबिय आता सर्वोत्तम बँक
सेवेचा अनुभव येस बँकेसह घेऊ शकतील, बँक त्यांची एक विश्वासार्ह भागीदारच बनेल.’’
लष्करी अधिकाऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या येस विजय उपक्रमात, येस बँकेतर्फे डिजिटल प्रायोजित शून्य
बाकी बचत खाते सेवा भारतातील सर्व लष्करी अधिकाऱ्यांना विनामूल्य एटीएम व्यवहारासाठी देण्यात
येणार आहे. इतर मोठ्या बँकांच्या तुलनेत, येस बँक 70 टक्क्यांपर्यंतचे परतावे बचत व्याजी दरात देते, हे
दर 1 लाख रुपयांपर्यंतच्या बाकीसह दिले जातात आणि यापेक्षा जास्त रकमेसाठी 6 टक्के इतका आकर्षक दर
दिला जातो. याशिवाय येस बँकेने वैयक्तिक अपघाती सुरक्षा कवच खास लष्करी अधिकाऱ्यांसाठी वाढवले
आहे, सध्याच्या 5 लाख रुपयांपासून ते 30 लाख रुपयांपर्यंत हा विस्तार करण्यात आला आहे. याशिवाय
येस बँकेने रोख रकमेच्या व्यवस्थापनासाठी आणि सीएसडी, डिफेन्स क्लब आणि शाळांच्या पीओएस
उपाययोजनाही देऊ केल्या आहेत.
येस बँकेबद्दल …
देशभरात 29 राज्ये आणि 7 केंद्रशासित प्रदेश असा विस्तार असलेली, एलपीआयडी जिल्ह्यातील
लोअर परेल या मुंबईच्या नावीन्यपूर्ण जिल्ह्यात (एलपीआयडी) मुख्य कार्यालय असलेली येस
बँक ही भारतातील खासगी क्षेत्रातील पाचव्या क्रमांकावरील सर्वात मोठी बँक आहे. तिचे
संस्थापक राणा कपूर यांच्या व्यावसायिक आणि उद्योजकीय प्रयत्नांनी ती या स्थानी पोचली
आहे. तसेच त्यांच्या टीमच्या उत्तम दर्जाची निर्मिती, ग्राहककेंद्री, सेवाकेंद्री प्रयत्नांमुळे ही खासगी
भारतीय बँक भारताची भविष्यकालीन व्यवसाय सेवा पुरवेल.
येस बँकेने आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम अभ्यास केला असून, ग्राहकांना उच्च दर्जाची सेवा
आणि सक्षम ऑपरेशन्स, आणि व्यापक बँक व्यवहार आणि वित्तीय उपाययोजना पुरवते.
येस बँकेचा दृष्टीकोन हा माहितीवर आधारित आहे आणि किरकोळ, कॉर्पोरेट ग्राहकांना आणि
उदयोन्मुख कार्पोरेट बँकिंग ग्राहकांना उत्तम दर्जेदार सेवा पुरवते. दीर्घकालीन मिशनच्या
साहाय्याने येस बँक `2020 पर्यंत जगातील सर्वोत्कृष्ट बँक; भारतात स्थापन करण्याचे बँकेचे
प्रयत्न आहेत.
भाजप सरकार विरोधात शंखनाद आंदोलन
पुणे-भारतीय माइनॉरिटीज सुरक्षा महासंघ पार्टीच्यावतीने महागाई विरोधात भाजप सरकार विरोधात शंख फुकून भाजप सरकारला जागे करण्यासाठी ” शंखनाद आंदोलन ” करण्यात आले . यावेळी भाजप सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या तसेच कार्यकर्त्यांनी हातात फलक धरून निषेध व्यक्त केला . पुणे स्टेशन समोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर भारतीय माइनॉरिटीज सुरक्षा महासंघ पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मारुती कदम यांच्या नेर्तृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले . गोगरिबांवर अन्याय करणाऱ्या भाजप सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला . या आंदोलनात भारतीय माइनॉरिटीज सुरक्षा महासंघ पार्टी राष्ट्रीय महासचिव मुनिरा खान , राष्ट्रीय उपाध्यक्ष अमित कांबळे , महिला प्रदेश अध्यक्षा रंजना पेडणेकर , प्रदेश उपाध्यक्ष कल्याणभाऊ अडागळे , प्रदेश सरचिटणीस संतोषभाऊ खाडे ,मराठवाडा उपाध्यक्ष रितेश देशमुख , महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख चंद्रकांत मुळे , महिला उपाध्यक्षा वंदनाताई अडागळे , युवक प्रदेश अध्यक्ष रवींद्र अडागळे , युवक शहर अध्यक्ष अजय देडे , पुणे जिल्हा महासचिव विकास अष्टुळ , पुणे शहर अध्यक्ष मनोज अडागळे , पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अमीर शेख , इंदापूर तालुका अध्यक्ष मोबीन मुलानी ,महिला उपाध्यक्ष पार्वतीताई कांबळे , पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा रेश्माताई डोगरा , पुणे जिल्हा अध्यक्षा नसीम कांबळे , पुणे जिल्हा युवक उपाध्यक्ष विशाल रावळ , सोलापूर जिल्हा अध्यक्ष सागर माने , सोलापूर शहर सचिव जय भंडंगे , सिंदखेड ग्रामपंचायत सदस्य फिरोज पटेल व अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते .
मनोरुग्णांच्या पुनर्वसनाचा वसा- पुण्याच्या कर्वे समाज सेवा संस्थेचा पुढाकार- संस्थेच्या वतीने विविध उपक्रमांनी मानसिक आरोग्य दिन साजरा
पुणे: “कुटुंब व समाजापासून दूर होऊन दिवसेंदिवस रस्त्यावर भटकत फिरणारे”, “पोटाची खळगी भरण्यासाठी कचराकुंडीत टाकून दिलेले अन्न व तहान भागविण्यासाठी गटारीतील पाणी पिऊन उदरनिर्वाह करणारे”, आणि दुर्दैवाने याच समाजाचा दुर्लक्षित का होईना पण एक महत्वपूर्ण घटक असणारे “मनोरुग्ण” आज कर्जत येथील श्रद्धा पुनर्वसन केंद्राच्या सहकार्याने रस्त्यावरून उचलून त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी पुण्याची कर्वे समाज सेवा संस्था सरसावली असून जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून आज १० मनोरुग्णांना पुण्याच्या विविध रस्त्यांवरून उचलून पुढील उपचार व पुनर्वसनासाठी कर्जत येथील श्रद्धा पुनर्वसन केंद्रामध्ये पाठविण्यात आले आहे.
जगभरात सर्वत्र १० ऑक्टोबर हा जागतिक मानसिक आरोग्य दिवस म्हणून साजरा केला जातो, याचेच औचित्य साधून पुण्याच्या कर्वे समाज सेवा संस्थेच्या समुपदेशन विभाग व कर्जत, जि रायगड येथील श्रद्धा पुनर्वसन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रमांनी हा साजरा करण्यात आला.
राज्याचे अपंग कल्याण आयुक्त नितीन पाटील यांच्या हस्ते तसेच संस्थेचे संचालक डॉ दिपक वलोकर, डॉ महेश ठाकूर, प्रा. चेतन दिवान यांच्या प्रमुख उपस्थितीत मानसिक आरोग्य सप्ताहाचे उद्घाटन करून विद्यार्थ्यांना मानसिक आजारवर मार्गदर्शनपर व्याख्यानाने सप्ताहाच्या कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली.
पुण्याच्या रस्त्यावर फिरणाऱ्या मनोरुग्णांना श्रद्धा पुनर्वसन केंद्राच्या रेहान रझा, रमाकांत वड्डेवार, पूजा व वंदना या समाजकार्यकर्त्यांच्या मदतीने उचलून पुढील उपचार व पुनर्वसनासाठी कर्जत येथील श्रद्धा पुनर्वसन केंद्रामध्ये पाठविण्यात आले आहे. ” विशेष म्हणजे राज्याचे अपंग कल्याण आयुक्त नितीन पाटील यांनी आपल्या दालनातून बाहेर येऊन रुग्नवाहीकेमध्ये बसलेल्या सर्व मनोरुग्णांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला व त्यांच्या पुढील उपचारासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
कर्वे समाज सेवा संस्थेचे संचालक डॉ दीपक वलोकर, समुपदेशन अभ्यासक्रम प्रमुख डॉ महेश ठाकूर, समन्वयक व प्रमुख प्रा. चेतन दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा दादा दडस व समुपदेशन विभागाच्या विद्यार्थ्यांनी ससून हॉस्पिटल ते अपंग कल्याण आयुक्त कार्यालय अशी रॅली काढून विविध बॅनर्स, पोस्टर्स व माहिती पत्रके वाटपाच्या माध्यमातून जनजागृती करीत आयुक्तांना विविध मागण्यांचे निवेदन देखील सादर करण्यात आले.
कौशल्य बुद्धी हे अभ्यासक्रमाचे उद्दिष्ट असावे’ – डॉ. माणिकराव साळुंखे
खादी महोत्सव यात्रेचे आयोजन
पुणे,दि. 11: राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या 150 व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत जिल्ह्यात महाखादी यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत ग्रामीण भागातील कारागिरांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘महाखादी’ ब्रँडचे अनावरण केले जाणार आहे.
या महोत्सवाच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगार युवकांना विविध योजनांची माहिती देणे व ग्रामीण कारागीर व शेतकरी यांना लाभान्वित करून रोजगार निर्मिती करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. या यात्रेचे आयोजन हातकागद संस्था, कृ.बा.जोशी पथ, शिवाजीनगर, पुणे येथे दि. 13 ते 17 ऑक्टोबर 2017 या कालावधीत सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी 8291916634 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा व अधिकाधिक नागरिकांनी या यात्रेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, अशोक लाड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
शुभं करोति कल्याणम् प्रेक्षकांच्या भेटीला
मुलांचे प्रश्न आणि त्यांचे बालविश्व दाखवणारे अनेक मराठी चित्रपट अलीकडच्या काळात आलेत. याच पार्श्वभूमीवर लहान मुलांना केंद्रस्थानी ठेवून मानवी नात्यांचं प्रतिबिंब दाखवणारा शुभं करोति कल्याणम् हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विश्वकर्मा चित्र यांची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती दिपा भालेराव यांनी केली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन शैलेन्द्रसिंह राजपूत यांनी केले आहे.
शुभं करोति कल्याणम् या चित्रपटातून एका ध्येयवेड्या मुलाच्या वेगळेपणाची व त्याला मिळालेल्या चांगल्या साथीची कथा मांडली आहे. आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं स्वप्न पाहिलं जातं तेव्हा लहान मुलं असो वा मोठे त्यांना प्रचंड कष्टाशिवाय यश मिळत नाही, हे सांगत त्यांना लहान वयातच ‘स्वप्न पाहा आणि ती झटून पूर्ण करा’ हे सांगण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला आहे. चांगल्या-वाईटाची समज देत लढायला शिकवणाऱ्या या चित्रपटातून मनोरंजनाच्या माध्यमातून सुरेख संदेश दिला आहे.
अश्विनी एकबोटे, सिया पाटील, नरेश बिडकर, अरविंद कोळी, हरिंदर सिंग राणा यांच्यासोबत बालकलाकार तेजल भालेराव, सिद्धेश लिंगायत, विनय शिरसाट, तन्मय म्हात्रे, सानिया पाटील, श्रावणी मेढेकर, राहुल मुळीक, मर्नोवी ओक, सुजल गायकवाड, आकाश शिरसाट यांच्या भूमिका आहेत.
शुभं करोति कल्याणम् या चित्रपटाची कथा, पटकथा गीते बी.विजय यांनी लिहिली असून संवाद शैलेन्द्रसिंह राजपूत यांनी लिहिले आहेत. संकलन चैतन्य तन्ना तर छायांकन सुरेश उतेकर व मनिष पटेल यांनी केलं आहे. नृत्यदिग्दर्शन प्रविण बारिया यांचे असून कलादिग्दर्शन मधु कांबळे यांचं आहे. संगीत राजेश कमल यांनी दिलं असून वैशाली माडे व मंगेश चव्हाण यांनी या चित्रपटातील गीते स्वरबद्ध केली आहेत. कार्यकारी निर्माते विनोद बरई आहेत.
फक्त मराठीवर दिवाळी निमित्त खास चित्रपटांचा नजराणा
आनंदाची पुनरावृत्ती होत राहण्याचे सण हे एक निमित्त असते. दिवाळी म्हणजे करमणुकीच्या कार्यक्रमांची मांदियाळी. ‘दिवाळी सण मोठा, नाही आनंदा, उत्साहा तोटा’ अस म्हणंत गेल्या काही वर्षापासून दिवाळी सणाच्या आनंदात छोटा पडदाही सामील झाला आहे. अनेक वाहिन्या केवळ दिवाळी निमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करतात. प्रेक्षकांची यंदाची दिवाळी स्पेशल व्हावी यासाठी फक्त मराठी वाहिनीने पाच मनोरंजनपर चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांसाठी आणली आहे.
‘ढोलकी’, ‘काकण’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘भाऊबीज’, ‘काळूबाई पावली नवसाला’ या पाच मराठी चित्रपटांचा आस्वाद मंगळवार १७ ऑक्टोबर ते शनिवार २१ ऑक्टोबर दरम्यान सकाळी ११ वा. घेता येईल. दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचं औचित्य साधत हे चित्रपट दाखवले जाणार आहेत. पाडव्याला ‘नवरी मिळे नवऱ्याला’ तर भाऊबीजेला ‘भाऊबीज’ चित्रपट दाखवण्यात येईल. मनोरंजनाच्या माध्यमातून यंदाची दिवाळी प्रेक्षकांसाठी खास करण्याचा फक्त मराठी चा प्रयत्न आहे. दिवाळीचं सेलिब्रेशन व सिनेमांची मेजवानी हे प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा खास धमाका ठरेल. फक्त मराठी वाहिनीने नेहमीच प्रेक्षक पसंतीचा विचार केला आहे. या सणाच्या निमित्ताने प्रेक्षकांशी असलेलं आमचं नातं अधिक दृढ व्हावं व प्रेक्षकांच्या सणाचा आनंद द्विगुणीत व्हावा यासाठी आम्ही ही दिवाळी भेट प्रेक्षकांसाठी आणली असल्याचे फक्त मराठीचे बिझनेस हेड श्याम मळेकर यांनी सांगितले.
आक्षेप कलावंतांचे कि राजकीय ? सांस्कृतिक मंत्री तावडेंनी केला सवाल .
मुंबई -अपात्र दर्जाच्या चित्रपटांना अनुदान मिळावे यासाठी काही लोक आग्रही असतात पंरतू अनुदान हे केवळ गुणवत्तेच्या आधारावर मिळावे ही माझी स्पष्ट भूमिका आहे. एखादया विशिष्ट चित्रपटाला अनुदान मिळावे असे मी कधीही सांगत नाही, सांगणार नाही असे वक्तव्य करीत राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या भूमिकेचा आज समाचार घेतला आणि अभिनेता मोहन जोशी यांना वेळ नाकारण्याइतका काही मी मोठा नाही.तेच बोलावूनही बैठकीला आलेले नाहीत असा टोला लगावत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या आरोपांनाही सडेतोड उत्तरे आज येथे दिली .
आपल्याबाबत उपस्थित केलेले आक्षेप कलावंतांचे कि राजकीय असाही सवाल त्यांनी केला आहे .
सांस्कृतीक खात्यासाठी पुर्णवेळ मंत्री हवा अशी मागणी काल करीत या तिन्ही संस्थांनी तावडे यांच्यावर काही आरोप केले होते ,त्याची तत्काळ दाखल घेत तावडे यांनी या सर्व आरोपांचा समाचार घेणारे प्रसिद्धीपत्रक आज काढले आहे .
अखिल भारतीय नाटय परिषदेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ अभिनेते श्री. मोहन जोशी यांना सांस्कृतिक कार्य मंत्र्यांबद्दल असे का म्हणावेसे वाटले याचा विचार माझ्यासारख्या संवदेनशील राजकीय कार्यकर्ता करीत आहे,कारण सांस्कृतिक कार्य मंत्र्यांची जबाबदारी स्वीकारल्यानंतर गेल्या तीन वर्षात या विभागातील विविध प्रलंबित प्रश्न यशस्वीपणे मार्गी लावण्यात यश मिळविले आहे. तसेच विभागाच्या विविध अभिनव योजना आणि महत्वकांक्षी प्रकल्प सुरु करण्यात आले,असे सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. विनोद तावडे यांनी आज स्पष्ट केले.
मोहन जोशी यांनी उपस्थित केलेल्या जीएसटीच्या मुद्दयावर बोलताना श्री. विनोद तावडे यांनी सांगितले की, जीएसटी मुळे नाटकांच्या तिकिट दरात वाढ होईल अशी भीती नाट्य व चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींनी माझ्याकडे व्यक्त केल्यानंतर आपण स्वत: तातडीने अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासमवेत बैठक घेतली. मोहन जोशी यांना या बैठकीचे निमंत्रण दिले होते, परंतु ते या बैठकीला आले नाहीत. जीएसटी चा मुद्दा माझ्या विभागाच्या अखत्यारित्य येत नाही. हा विषय केंद्र सरकारशी संबंधित आहे, तरीही या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी आपण प्रयत्न केले असून आताही मा. वित्तमंत्र्याच्या सहकार्याने या विषयाचा पाठपुरावा करण्यात येत आहेत.
सांस्कृतिक कार्यक्रमांना मंत्री हजर राहत नाही या जोशी यांनी केलेल्या दाव्याबाबत श्री. तावडे यांनी सांगितले की, सांस्कृतिक विभागाच्या प्रत्येक कार्यक्रमाला आपण उपस्थित राहिलो आहोत. अलिबाग येथे नुकत्याच आयोजित केलेल्या मराठी नाटय स्पर्धांच्या पुरस्कार कार्यक्रमाला आपण जोरदार पावसामुळे आणि उद्भवलेल्या वाहतूकीच्या कोंडीमुळे उपस्थित राहू शकलो नाही, असे काही अपवाद वगळता आपण स्वत: प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहिलो आहे.
सांस्कृतिक कार्यमंत्री लेखक-कलावंताना वेळ देत नाही या जोशी यांच्या वक्त्यव्यावर बोलताना श्री. तावडे म्हणाले की, आपण वेळ देत नाही असा दावा करणे अन्यायकारक आहे. मोहन जोशी यांनी आपल्याकडे वेळ मागितली आणि आपण त्यांना दिली नाही असे कधीही झाले नाही. श्री. जोशी यांना वेळ नाकारण्याइतका काही मी मोठा नाही.
परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी यांनी सांस्कृतिक क्षेत्रातील प्रश्न सोडविण्या संदर्भात सरकारमध्ये प्रचंड अनास्था असल्याचा काल उल्लेख केला होता, त्याबददल बोलताना श्री. तावडे यांनी स्पष्ट केले की, साहित्य संस्थाच्या अनुदानात वाढ करण्याचा प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित होता. या बाबत आपण पाठपुरावा करुन व वित्त विभागाशी वारंवार चर्चा करुन हा प्रश्न सोडविण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या “साहित्य संस्थांना अनुदाने” या योजनेंतर्गत अनुदानात वाढ करण्याचा निर्णय कालच मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला. विविध वाङमयीन उपक्रमांद्वारे मराठी भाषा आणि साहित्याच्या विकासाचे कार्य करण्यासाठी प्रतिवर्षी प्रत्येकी रूपये ५ लाखाचे अनुदान प्रतिवर्षी प्रत्येकी रू.१०. लाखापर्यंत वाढविण्यात आले. याचा लाभ साहित्य आणि संस्कृती मंडळामार्फत १) अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, २) विदर्भ साहित्य संघ, नागपूर, ३) मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद, ४) महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, ५) मुंबई मराठी साहित्य संघ, मुंबई, ६) कोकण मराठी साहित्य परिषद, रत्नागिरी, ७) दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर या ७ साहित्य संस्थांना मिळणार आहे.
साहित्य संमेलनाचे अनुदान दरवर्षी दस-याच्या दिवशी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या खात्यावर जमा करण्याची जी घोषणा केली होती, ती प्रत्यक्षात आणली आहे. गेल्या वर्षी शासनाच्या नियमाप्रमाणे आवश्यक असलेले संस्थेचे विनियोग अहवाल अप्राप्त असतांनाही व वित्त विभागाची हरकत असतांनाही अखिल भारतीय साहित्य महामंडळाचेअध्यक्ष श्रीपाद जोशी यांच्या विनंतीला मान देऊनकेवळ मराठी साहित्य संमलेनाच्या कामामध्ये कुठलाही अडथळा येऊ नये यासाठी सरकारी पातळीवर सर्व जबाबदारी मी स्वीकारली आणि 25 लाखांचे अनुदान मंडळाच्या खात्यावर मराठी साहित्यावरील प्रेमापोटी वेळेत जमा केले. त्यापुर्वीच्या पिंपरी चिंचवडसंमेलनाचे स्वागताध्यक्ष श्री. पी. डी. पाटील यांनी सदर निधी नियोजित कारणाशिवाय इतरत्र जमा केलेला असतांनाही केवळ सकारात्मक विचार करुन विशेष बाब म्हणून मान्यता दिली.
तसेच मराठी भाषा विभागामार्फत प्रथमच गेट वे ऑफ इंडीया मुंबई येथे “ गौरव ज्ञानपीठ विजेत्यांचा,गौरव मराठी भाषेचा ” हा भव्यदिव्य व दिमाखदार कार्यक्रम घेण्यात आला. भाषासंवर्धन पुरस्कार व भाषा अभ्यासक पुरस्कार हे दोन वैशिष्टयपुर्ण पुरस्कार देण्यास सुरुवात करण्यात आली. मराठी भाषा गौरव दिन अभूतपुर्व पध्दतीने साजरा करण्यात येत आहे. केवळ राज्यातील नव्हे तर देशातील एकमेव व वैशिष्टयपुर्ण अशा भिलार येथील “ पुस्तकाचे गाव ” या उपक्रमाचे लोकार्पण करण्यात आले. या प्रकल्पास आज वाचक व पर्यटक यांचा फार मोठा प्रतिसाद मिळत आहे.
आमच्या सरकारच्या मागील तीन वर्षाच्या कालावधीत सांस्कृतिक विभागाने अनेक कामे व योजना यशस्वीपणे अंमलात आणल्या. यापैकी 25 टक्के कामेसुध्दा कॉग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या कालावधीत होत नव्हती. तरीही त्यांचे सरकार चांगले होते असे मत साहित्यिक, कलावंतांचे आहे की, हे राजकीय मत आहे असा प्रश्न अनेक लोक मला विचारत आहेत.
अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले यांनी आपल्याला प्रत्यक्ष भेटून अनेक मागण्या केल्या होत्या. त्यांच्या अशा मागण्यांवर चर्चा करुन त्यांचे प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरु केली. अपात्र दर्जाच्या चित्रपटांना अनुदान मिळावे यासाठी ते आग्रही होते, पंरतू अनुदान हे केवळ गुणवत्तेच्या आधारावर मिळावे ही माझी स्पष्ट भूमिका आहे. मंत्री म्हणून अनुदानाच्या विषयात आपण कधीच ढवळाढवळ करीत नाही. चित्रपटांना अनुदान देण्यासाठी मान्यवर कलाकारांची समिती नियुक्त करण्यात आली असून अनुदान देण्याचा निर्णय या समितीत घेण्यात येतो. एखादया विशिष्ट चित्रपटाला अनुदान मिळावे यासाठी गेल्या तीन वर्षात आपण समिती सदस्यांना एकही फोन केलेला नाही.
श्री. मोहन जोशी यांनी ज्या काही मागण्या केल्या आहेत, त्यामध्ये साहित्य, नाटय संमेलनाचे अनुदान दुप्पट करा असे नमूद केले आहे. सांस्कृतिक मंत्र्यांना अनुदानात वाढ करण्याचा अधिकार नाही, पंरतू वित्तविभागाकडे याबाबत आपण वेळोवेळी पाठपुरावा करीत आहोत. मराठी चित्रपटाचे अनुदान पाच कोटीवरुन पंचवीस कोटी करा ही त्यांची दुसरी मागणी आहे. परंतू अनुदान वाढविण्याचा थेट अधिकार सांस्कृतिक कार्य मंत्र्यांकडे नाही, तरीही याविषयाबाबत वित्त विभागाकडेमी आग्रह धरला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याच्या त्यांच्या तिसऱ्या मागणीबाबतसांगावयाचे म्हणजे यापुर्वीच हा विषय केंद्र सरकारपर्यंत पोहचविण्यात मला यश मिळाले आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी गेल्या तीन वर्षात आपण केंद्रीय स्तरावर प्रयत्न करीत आहोत.
श्री. मोहन जोशी यांचे विविध प्रश्न आपण समजवून घेतले असून, त्या प्रश्नांपैकी अनेक प्रश्न आमच्या सरकारच्या कारकिर्दीत यशस्वीपणे मार्गी लागले आहेत. तरीही श्री जोशी यांच्याकडे काही प्रलंबित प्रश्न वा समस्या असतील तर त्यांनी माझ्याकडे थेट मांडाव्यात. त्या नक्कीच यशस्वीपणे सोडविण्यात येतील असेही श्री तावडे यांनी स्पष्ट केले.
गेल्या तीन वर्षात सरकारमध्ये सांस्कृतिक क्षेत्रातील प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने अनास्था होती असा उल्लेखही कालच्या पुणे येथील पत्रकार परिषदेत करण्यात आला. परंतू या खात्याचा मंत्री म्हणून सरकारमधील गेल्या तीन वर्षातील उल्लेखनीय व वस्तुस्थितीदर्शक कामगिरीचा संक्षिप्त तपशील पुढीलप्रमाणे आहे हे सुध्दा या निमित्ताने मी निदर्शनास आणून देत आहे.
मराठी चित्रपट सातासमुद्रापार कोणत्याही महोत्सवात जात नव्हते. मी मंत्री झाल्यावर मराठी चित्रपटांच्या मार्केटिंगसाठी पुढाकार घेतला. त्यामुळे “कान्स” आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मार्केटिंगसाठी मागील वर्षी 3 व या वर्षी 3 मराठी चित्रपट नेले. तसेच “गोवा” येथे सुध्दा मराठी चित्रपट जात नव्हते. परंतू मागील वर्षापासून गोवा येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी चित्रपट मार्केटिंगसाठी गेले . गेल्या दोन वर्षात दहा मराठी चित्रपट नेले. या वर्षीसुध्दा ही प्रक्रिया सुरु आहे व पुढेही सुरु राहणार आहे.
छोटया गावांमध्ये चित्रपटगृहे उभारली जावीत यासाठी व्हिडीओ पार्लर ॲक्ट (सिनेमॅटोग्राफर ॲक्ट) अटींमध्ये दुरुस्ती केली. पूर्वी फक्त तळमजल्यावरच थिएटर होऊ शकत होते. ते बदलून आता कोणत्याही मजल्यावर थिएटर करण्यास परवानगी दिली. तसेच या थिएटरची आसन क्षमता 75 पर्यंत मर्यादित होती ती 150 पर्यंत वाढवली.
सरस्वतीबाई फाळके मराठी फिल्म अर्काइव्हजचे कामकाज सुरु झाले असून यामध्ये जुन्या व दुर्मिळ चित्रपटांचे जतन केले जाईल .
कोल्हापूर चित्रनगरीच्या कामासाठी भरीव आर्थिक तरतूद केली व रखडलेली कामे मार्गी लावली. कोल्हापूर चित्रनगरी येथे 25 पेक्षा जास्त चित्रिकरण स्थळे निर्माण केली.
चित्रिकरणासाठी राज्यभरातील विविध स्थळांचे लोकेशन कॉम्पेडीयम प्रसिध्द करण्यात येत आहे.
राज्यात चित्रिकरण करणे सुलभ व्हावे या दृष्टिकोनातून एक खिडकी परवाना पध्द्त सुरु करण्याचे काम अंतिम टप्प्यात आणले आहे.
मराठी चित्रपट निर्मात्यांच्या सुविधेसाठी पु.ल.देशपांडे अकादमी येथे अद्ययावत असा डी.सी.प्रोजेक्टर बसविण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.
चित्रपट, नाटय, साहित्य क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंतांशी गप्पा साधून त्यांच्या आठवणी, त्यांचे जूने प्रसंग नवीन पिढीला समजावेत व त्याची ओळख व्हावी यादृष्टीने त्यांचे व्हिडीओ चित्रिकरण करण्यास सुरुवात केली.
कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी केवळ 2 टक्के कोटा होता त्याऐवजी अतिरिक्त गुण मिळण्याची योजना गेल्या वर्षापासून कार्यान्वित केली.
संगीत नाटकांच्या शतकपूर्तीनिमित्त “मर्मबंधातली ठेव” हा भव्य नाटयगीतांवर आधारित कार्यक्रम सांगली येथे साजरा केला.
दशावतार महोत्सव गेली सहा वर्षे होत नव्हता. तो परत सुरु करुन 7 दिवसांचा महोत्सव यशस्वीपणे पार पाडला.
कलांगण सारखा अभिनव कार्यक्रम सुरु केला. ज्या माध्यमातून महाराष्ट्रभर अनेक स्थानिक लोक कलाकारांना व्यासपीठ उपलबध करुन दिले.
विविध् एकांकिका स्पर्धेत विजयी ठरलेल्या एकाकिकांचा महोत्सव व त्याला जोडूनच कॉलेजमधील विद्यार्थ्यांसाठी एकांकिका प्रशिक्षण शिबीर सुरु करण्यात आले.
राज्य नाटय स्पर्धा अंतर्गत होणाऱ्या हिंदी आणि बालनाटय स्पर्धांना गेल्या 2 वर्षांमध्ये तुलनेने दुप्पटीहून अधिक प्रवेशिका प्राप्त झालेल्या आहेत.
राज्य नाटय स्पर्धेच्या पारितोषिकाच्या रक्कमेत, निर्मिती खर्चात तसेच दैनंदिन भत्त्यांमध्ये शासनाने दुप्पटीहून अधिक वाढ केलेली आहे.
एक भारत श्रेष्ठ भारत या योजनेअंतर्गत ओरिसा राज्यातील भुवनेश्वर येथे 60 लोक कलावंतांच्या सादरीकरणाचा 5 दिवसांचा महोत्सव यशस्वीपणे आयोजित करण्यात आला.
मी 1995 पासून राजकारणात आहे, परंतू आतापर्यंतच्या कोणत्याही सांस्कृतिक मंत्र्याच्या एका कार्यकालातच नाही तर अनेक कार्यकाळात सुध्दा एवढे उपक्रम झाल्याचे निदर्शनास आलेले नाही. तरीही आपण केलेले वक्तव्य हे साहित्य व संस्कृतीच्या हितासाठी केले असावे असे समजून मी संबधितांना भेटून या सर्व विषयांमध्ये कार्यवाही सुरु करतो असेही श्री विनोद तावडे यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.
खंडित वीजपुरवठ्याचे प्रमाण वाढल्यास कारवाई प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे यांचा इशारा
पुणे : विजेच्या सुरळीत पुरवठ्यासाठी बिघाडरहित वीजयंत्रणेसाठी आवश्यक सर्व उपाययोजना कराव्यात. वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढल्यास किंवा दुरुस्ती कामात हयगय झाल्याचे आढळल्यास संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा इशारा महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांनी दिला.
गणेशखिंड येथील ‘प्रकाशभवना’त मंगळवारी (दि. 10) वीजपुरवठ्यातील तांत्रिक बिघाड टाळण्यासाठी उपाययोजनांची आढावा बैठक झाली. यावेळी प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे बोलत होते. पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. एम. जी. शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. भोसरी विभागात गेल्या काही दिवसांपासून तांत्रिक बिघाडाने वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले. या पार्श्वभूमिवर ही बैठक घेण्यात आली.
प्रादेशिक संचालक श्री. ताकसांडे म्हणाले, की बिघाडांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास वीजग्राहकांना त्रास होतो. सोबतच महावितरणचे मोठे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे देखभाल व दुरुस्तीअभावी यंत्रणेत बिघाड व वीजपुरवठा खंडित झाल्यास सहन केले जाणार नाही. देखभाल व दुरुस्ती हे नियमित स्वरुपाचे काम आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष करणार्यांविरुद्ध कारवाई निश्चितपणे होणार आहे. बिघाडरहित यंत्रणेसाठी उपाययोजना करण्यासाठी महावितरणकडे कोणत्याही साहित्याची कमतरता नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
वीजयंत्रणेची पाहणी करून वारंवार होणारे बिघाड कायमस्वरुपी दुरुस्त करण्याचे काम प्राधान्याने करण्यात यावेत. येत्या 10 दिवसांत बिघाडरहित व सक्षम वीजयंत्रणेसाठी उपाययोजना कराव्यात. तसेच यंत्रणेच्या दुरुस्ती कामात स्थानिक अभियंत्यांनी व आवश्यकतेनुसार वरिष्ठांनीही उपस्थित राहण्याचे निर्देश प्रादेशिक संचालक श्री. ताकसांडे यांनी यावेळी दिले. रस्ते किंवा इतर खोदाई कामात भूमिगत वीजवाहिन्या तोडण्याचा संभाव्य धोका टाळण्यासाठी संबंधित ठिकाणी कर्मचाऱ्याची देखरेखीसाठी नियुक्ती करण्यात यावी. शिवाय बेजबाबदारपणा किंवा हयगय केल्याने यंत्रणेतील बिघाडांचे प्रमाण व दुरुस्तीकामांचा कालावधी वाढल्यास संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असे प्रादेशिक संचालक श्री. ताकसांडे यांनी सांगितले. रस्ते किंवा इतर खोदाई कामात वीजवाहिनीचे नुकसान होऊन वीजपुरवठा खंडित झाल्यास संबंधीत एजंसीविरुद्ध फौजदारी तक्रार करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी अधीक्षक अभियंता श्री. महेंद्र दिवाकर, कार्यकारी अभियंता श्री. मदन शेवाळे, श्री. गौतम गायकवाड, श्री. दीपक लहामगे आदींसह अभियंते उपस्थित होते.
काही वीजग्राहकांकडूनही चुकीची माहिती – देखभाल व दुरुस्ती तसेच विविध उपाययोजनांमुळे वीजपुरवठा खंडित होण्याचे व यंत्रणेतील बिघाडांचे प्रमाण लक्षणीय प्रमाणात कमी झाले आहे. परंतु काही वीजग्राहकांद्वारे चुकीची माहिती वरिष्ठांकडे हेतुपुरस्सरपणे पाठविण्यात येत असल्याचे निदर्शनास येत आहे. बाणेर बालेवाडी परिसरात गेल्या 10 दिवसांत 10 पैकी 9 वीजवाहिन्यांमध्ये एकदाही बिघाड झाल्याचा प्रकार घडला नाही. तर उर्वरित एक वाहिनीवर पावसामुळे 20 मिनिटे वीजपुरवठा खंडित होता, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
एफटीआयआयच्या अध्यक्षपदी अभिनेते अनुपम खेर
पुणे-‘फिल्म अॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट’च्या अध्यक्षपदी ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांची आज निवड करण्यात आली. यापुर्वीचे अध्यक्ष दोन वर्षांपूर्वी गजेंद्र चौहान यांची एफटीआयच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. त्यावेळी त्यांच्या नियुक्तीवरून मोठा वाद झाला होता.
बहुतांश हिंदी चित्रपटासोबत त्यांनी आंतरराष्ट्रीय चित्रपटामध्येहि काम केले आहे. ज्यामध्ये बेकनहम, लस्ट सारख्या लोकप्रिय चित्रपटाचा समावेश आहे. अनुपम यांना 5 वेळा बेस्ट कॉमिक रोल साठी फिल्मफेयर चा अवार्ड मिळालेला आहे. चित्रपट विजय साठी त्यांना बेस्ट सपोर्टिंग अॅक्टर चा फिल्मफेयर अवार्ड मिळाला आहे.
कार्डिओव्हस्क्युलर आजारांतील ‘प्रिसिजन मेडिसिन’वर कार्डिऑलॉजिस्टनी केले विचारमंथन
पुणे: अगदी अलीकडच्या काळापर्यंत, जिनॉमिक्स किंवा प्रिसिजन मेडिसन यांचा संदर्भ कॅन्सरच्या रुग्णांशी लावला जात असे. कार्डिओव्हस्क्युलर आजारांसाठी त्यांचा वापर व प्रभावी उपयोग अतिशय कमी होता. पर्सोनॉम या जागतिक मॉलिक्युलर कंपनीने भारताच्या दृष्टिकोनातून जिनॉमिक्सच्या परिणामावर विचारमंथन करण्यासाठी भारतभरातील कार्डिऑलॉजिस्ट, सर्जन्स व फिजिशिअन्स यांच्या परिसंवादाचे आयोजन केले होते. मॉलिक्युलर जिनॉमिक तंत्रज्ञानातील नव्या घडामोडी व त्यांचा कार्डिओव्हस्क्युलर आजारांबाबत उपयोग यांचा समावेश या परिसंवादात करण्यात आला. या चर्चेचे नेतृत्व प्रा. डॉ. कॅलम मॅकरे यांनी केले. डॉ. मॅकरे इंटर्नल मेडिसिन व कार्डिओव्हस्क्युलर आजारांबाबत बोर्डाकडून प्रमाणित आहेत आणि बोस्टनमधील बीडब्लूएच जिनॉमिक्स सेंटर येथील जागतिक स्तरावर नावाजलेले कार्डिऑलॉजिस्ट व जिनॉमिक्स तज्ज्ञ असून ते हार्वर्ड मेडिकल स्कूल येथे मेडिसिनचे असोसिएट प्रोफेसर आहेत.
डॉ. मॅकरे यांनी जिन्सच्या सर्वंकष प्रोफाइलिंगवर दृष्टिक्षेप टाकत रुग्णांच्या दृष्टीने त्यांचे रोगकारक वा सौम्य असण्याबाबत महत्त्वाचे वैद्यकीय विश्लेषण केले. याद्वारे सादर करण्यात आलेल्या चाचण्या व अहवाल यांमधून रुग्णांना असलेल्या धोक्यांचे वर्गीकरण करता येते ज्याच्या आधारे रुग्णांना संबंधित रोग निर्माण होण्याची शक्यता, थेरपी व्यवस्थापन व जिनॉमिक टेस्ट डाटाच्या स्पष्टीकरणाच्या आधारे प्रोग्नोसिस याविषयी माहिती दिली जाते.
अहवाल सादर करताना, ब्रिगहॅम अँड विमेन्स हॉस्पिटलमधील (बीडब्लूएच) कार्डिओव्हस्क्युलर मेडिसिनचे चीफ प्रा. डॉ. कॅलम मॅकरे म्हणाले – “भारतीय मेडिसिनला या झपाट्याने बदलत्या व विकसित होणाऱ्या क्षेत्रामध्ये जिनॉमिक्सचा समावेश करून घेत जागतिक क्लिनिकल केअरमध्ये रूपांतरण करण्याची संधी भारताला आहे.”
रुबी हॉल क्लिनिकमधील कार्डिऑलॉजिस्ट डॉ. सी. एन मखाले यांनी सांगितले, “कार्डिओव्हस्क्युलर मेडिसिनमधील कॅसकेड टेस्टिंग व फार्माकोजिनॉमिक्समध्ये जिनॉमिक्सचे महत्त्व झपाट्याने वाढत आहे.”
कार्डिओव्हस्क्युलर सर्जन डॉ. जी. एस. नागी म्हणाले, “जिनॉमिक्स या नव्या संकल्पनेतून सर्वांना शिकण्यासारखे खूप आहे आणि प्रोग्नोस्टिकेशनमधील उत्तम साधन आहे. कार्डिओच्या संदर्भाने जिनॉमिक्सबद्दल अद्याप प्रचंड ज्ञान आपल्याला मिळवायचे आहे व या विषयात पुरावा, माहितीच्या आधारे योग्य दृष्टिकोन घडवणे अत्यावश्यक आहे.”
कार्डिऑलॉजिस्ट डॉ. इश्वर झंवर यांनी नमूद केले, “जिनॉमिक्समध्ये भारतीय लोकसंख्येत आढळणाऱ्या विविध प्रकारच्या, स्पष्ट न झालेल्या सिंड्रोमच्या बाबतीत प्रत्यक्षातील अंमलबजावणीचा दृष्टिकोन आढळतो”.
समारोप करताना, डॉ. केतन खुरजेकर म्हणाले, “पारंपरिक दृष्टीकोनाला पूरक ठरत व त्यास चालना देत जिनॉमिक्स झपाट्याने मेडिसिनमध्ये समाविष्ट होत आहे. भविष्यामध्ये जिनॉमिक्सला फार महत्त्व असणार आहे आणि त्यामुळे चांगले आरोग्य व कल्याण यांना सकारात्मक दिशा मिळणार आहे.”
पर्सोनॉमचे सह-संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत औसेकर यांनी सांगितले – “प्रिसिजन मेडिसिन या दृष्टिकोनामुळे रुग्णांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल. रुग्णांना ते आर्थिक बाबतीतही फायदेशीर असेल. पर्सोनॉममध्ये, कार्डिओव्हस्क्युलर आजारांच्या बाबतीत मॉलिक्युलर जिनॉमिक्सवर आधारित मूल्यमापनाचे विभाजन पुढीलप्रमाणे केले आहे: अऱ्हिथिमिया, कार्डिओमायोपॅथी, फॅमिलिअल हायपरकोलेस्टेरॉलेमिया, कान्जेनिटल हार्ट डिसऑर्डर्स, फार्माकोजेनेटिक्स आणि रिस्क स्ट्रॅटिफिकेशन व प्रोग्नोसिस ऑफ सीएडी. रुग्णांच्या जेनॉमिक व बायोमार्कर स्थितींचा अभ्यास करता, सध्याच्या आरोग्यसेवा क्षेत्रामध्ये प्रचंड बदल होणार आहेत, असे पर्सोनॉमला वाटते.”
लोकांमध्ये जागृतीचे प्रमाण अजूनही वाढत असले तरीही भारतासारख्या देशात प्रिसिजन मेडिसिन या नावीन्याला मोठ्या प्रमाणात स्वीकारार्हता मिळाली आहे.
समाविष्ट गावांमधील विकास कामांसाठी लवकरच बैठक – श्रीनाथ भिमाले (व्हिडीओ)
पुणे- महापालिकेत समावेश होत असलेल्या अकरा गावांचा विकास हा तेथील जनतेला विश्वासात घेवूनच केला जाईल अशी ग्वाही येथे महापालिकेतील सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी दिली आहे .
समाविष्ट गावांमधील नागरी कृती समितीने नुकतीच महापालिकेत महापौर आणि सभागृहनेते यांची भेट घेतली ,याबाबत माय मराठी शी बोलताना भिमाले यांनी सांगितले कि, तेथील नागरिक आणि लोकप्रतिनिधी आणि महापालिका अधिकारी यांची संयुक्त बैठक घेण्यात येईल. तेथील नागरिकांच्या भावना समजून च पुढील कार्यवाही होईल … पहा आणि ऐका ..नेमके भिमाले यांनी काय सांगितले …





