Home Blog Page 3256

गर्ल्स हॉस्टेलच्या च्या सेटवर दिवाळीची धमाल …

0

हिंदू धर्मात सर्वांत महत्त्वाचा सण म्हणजे दिवाळी. हा सण म्हणजे वाईटाचा नाश, सत्याचा विजय व तिमिरातून तेजाकडे जाण्याचे प्रतीक आहे. दीपावली म्हणजे दिव्यांची माळ. म्हणूनच याला दिव्यांचा उत्सव (फेस्टीवल ऑफ लाईट) असेही म्हणतात. दिवाळी जवळ आली की घराची साफसफाई केली जाते. रंगरंगोटी, सजावट केली जाते. नवीन कपडे घेतले जातात. मराठी कुटुंबात चिवडा, लाडू, चकल्या, करंजी, शंकरपाळे असे फराळांचे पदार्थ केले जातात. घरासमोर सुंदर सुंदर रांगोळ्या काढल्या जातात. संध्याकाळी पणत्या लावल्या जातात. विद्युत रोषणाईने घर उजळले जाते. सोमवार ते शुक्रवार रात्री १०.०० वा. पहायला मिळणाऱ्या झी युवावरील गर्ल्स हॉस्टेल’ वर सुद्धा दिवाळीची धमाल अनुभवयाला मिळाली.  या मालिकेतील भयावय चित्रीकरणाच्या वातावरणातून थोडासा वेळ काढून गर्ल्स हॉस्टेल मधील ‘गर्ल्स ‘नी त्याचप्रमाणे मालिकेतील इतर पात्रांनी दिवाळीची एक रंगतदार संध्याकाळ अनुभवली. प्रियांका, तन्वी , मालती  , वल्लरी , ध्यानलक्ष्मी , सागरिका , वनिता ,  बीना ,सारा ,  दुर्गा आणि त्याच प्रमाणे  विभव ,सेतू ,  महाजन काका , इन्स्पेक्टर जाधव या सर्वानी या वेळी कामाच्या जबाबदाऱ्या वाटून घेतल्या . कोणी कंदील बनवला तर कोणी पणत्या लावल्या , कोणी रांगोळी सजवली तर कोणी गोडाचे पदार्थ बनवले आणि शेवटी सगळ्यांनी एकत्र होऊन दिवाळी सण साजरा केला.

 

दिवसरात्र  जागणारं आणि गर्दीनं ओसंडून वाहणारं  मुंबई शहर , महिलांसाठी अजूनही म्हणावं तसं सुरक्षित नाही. अशा परिस्थितीत स्वतःला सिद्ध करण्यासाठी  सारा , प्रियांका , तन्वी , मालती  , वल्लरी , ध्यानलक्ष्मी , सागरिका , नेहा  आणि वनिता  या पुणे , नाशिक , पंढरपूर , मराठवाडा अशा व इतर वेगवेगळ्या शहरांतून  आलेल्या  मुली सावित्री गर्ल्स हॉस्टेलमध्ये  एकमेकींच्या सानिध्यात रूममेट्स म्हणून , धमाल मस्ती आणि  लुटुपुटीची भांडण करूनसुद्धा मजेत राहत होत्या. रोजच्या आयुष्यातील संघर्ष करत असतानाच होस्टेलच्या भिंतीच्या  आत मात्र त्यांना प्रचंड सुरक्षित वाटतं होतं. सावित्री गर्ल्स हॉस्टेल मधील या मुलींना सगळ्यात मोठा आधार होता  तो एकमेकींचा ,  एकमेकांबरोबर असण्याचा , आणि त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात सुरक्षित हक्काची जागा होती  , त्यांचे सावित्री गर्ल्स हॉस्टेल . मात्र याच त्यांच्या सावित्री गर्ल्स हॉस्टेल च्या सुरक्षित जगात अतिशय भयानक घटना घडायला लागल्या ज्यामुळे या मुलींच्या आयुष्यातील धमाल मस्ती संपून त्याची जागा  थरकाप उडवणाऱ्या भयाने  घेतली आहे .गूढ घटनांची साखळी वाढू  लागलीय आणि त्यानंतर सुरु झालंय एक अनाकलनीय प्रसंगांचं भयंकर चक्र ! या सर्व मुली एक एक करून या चक्रात गुरफूटल्या जात आहेत. प्रथम सारा आणि आता नेहा च्या अनपेक्षित जाण्याने प्रत्येकवेळी कोणीतरी आहे तिथे ही भावना बळावू लागून हॉस्टेलमध्ये एक भीतीच सावट पसरू लागलय.झी युवा ही वाहिनी, नवोदित तरुण कलाकारांच्या अभिनय गुणांना नेहमीच वाव देते. या मालिकेत सुद्धा सर्वच नवोदित कलाकारांना संधी दिली आहे. या कलाकारांचं छोट्या पडद्यावरचं पदार्पण असलं तरी विविध नाटकांमधील भूमिकांच्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी यातली प्रत्येक व्यकिरेखा सशक्तपणे साकारली आहे. या मालिकेची कथा प्रसिद्ध लेखक शेखर ढवळीकर आणि पटकथा अभिनेता लेखक चिन्मय मांडलेकर यांची आहे तर संवाद कुमुद इतराज यांचे आहेत. “सोमिल क्रिएशन”ची निर्मिती असलेल्या या मालिकेचं दिग्दर्शन सचिन गोताड  यांनी केलं आहे.  “गर्ल्स हॉस्टेल ‘कोणीतरी आहे तिथे …”  ही मालिका सोमवार ते शुक्रवार रात्री १०.०० वा. झी युवावरून पहायला मिळते.

वीजयंत्रणेपासून सुरक्षित दिवाळी साजरी करण्याचे आवाहन

0

पुणे, दि. 16 : दिवाळी सणाला सुरवात झाली असून सार्वजनिक वीजयंत्रणेपासून तसेच घरगुती रोषणाईच्या विद्युत उपकरणांपासून सुरक्षित दिवाळी साजरी करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

दरम्यान, दिवाळी सणाच्या कालावधीत अखंडित वीजपुरवठा कायम ठेवण्यासाठी महावितरणच्या अभियंता, कर्मचारी यांना सज्ज व सतर्क राहण्याच्या सूचना मुख्य अभियंता श्री. एम. जी. शिंदे यांच्याकडून देण्यात आलेल्या आहेत.

महावितरणची वीजयंत्रणा ही सार्वजनिक ठिकाणी आहे. यात उच्च आणि लघुदाबाच्या उपरी वीजवाहिन्या, रोहित्र, फीडर पिलर आदी यंत्रणा उघड्यावर असल्याने फटाके फोडताना त्यापासून सुरक्षित अंतर ठेवावे. फटाक्यांच्या आतषबाजीत सार्वजनिक वीजयंत्रणेला आगीचा धोका निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी. रोहित्र किंवा फिडर पिलरपाशी टाकलेल्या कचर्‍याजवळ फटाके फोडू नयेत किंवा तो कचरा पेटवून देण्याचे प्रकार टाळावेत. वीजवाहिन्यांना स्पर्श होईल किंवा त्यापासून धोका होईल असे प्रामुख्याने रॉकेटसारखे फटाके वाहिन्यांखाली उडवू नयेत. मोकळ्या जागेतच फटाके उडावावेत. वीजयंत्रणेला आग लागल्यास, तसा धोका निर्माण झाल्यास किंवा वीजपुरवठा खंडित झाल्यास महावितरणच्या 24×7 सुरु असणार्‍या कॉल सेंटरच्या 1912 किंवा 18002003435 किंवा 18002333435 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.

दिवाळी साजरी करताना घरगुती उपकरणांपासून सतर्क राहावे. घराच्या किंवा इमारतींच्या रोषणाईसाठी दिव्यांची विद्युत माळ चांगल्या दर्जाची असल्याची खात्री करून घ्यावी. या विद्युत माळेचे वायर, दिवे, सॉकेट दर्जेदार नसल्यास धोका निर्माण होतो. घर किंवा इमारतीच्या अर्थिंगची तपासणी करून घ्यावी. घराबाहेर आकाशदिवा लावताना तुटलेल्या वायरचा वापर टाळावा किंवा तुटलेली वायर चांगल्या दर्जाच्या इन्सूलेशन टेपने सुरक्षित करून घ्यावी. घरगुती उपकरणांसह विद्युत माळेपासून सुरक्षित अंतरावर वातीचे दिवे लावावेत, असे आवाहन महावितरणने केले आहे.

 

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांचा सत्कार समारंभ

0

पुणे: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या पुणे जिल्हयातील लाभार्थ्यांचा प्रातिनिधिक स्वरुपात सत्कार समारंभ बुधवार दि. 18 ऑक्टोबर 2017 रोजी दुपारी 12 वाजता विधानभवन, पुणे येथे अन्न्‍ व नागरी पुरवठा मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते होणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या राज्यातील लाभार्थ्यांचा प्रातिनिधिक स्वरुपात मुख्य सत्कार समारंभ दिनांक 18 ऑक्टोबर 2017 रोजी सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. याचवेळी संपुर्ण राज्यभरात प्रत्येक जिल्हयामध्ये संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री  महोदयांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

पुण्यातील कार्यक्रमामध्ये या योजनेच्या पुणे जिल्हयातील 25 लाभार्थी शेतक-यांचा प्रातिनिधिक स्वरुपात सपत्निक सन्मान करण्यात येणार आहे. यावेळी लाभार्थ्यांना कर्जमाफीचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमापुर्वी प्रत्येक जिल्हयातील या योजनेतील पहिल्या फेरीतील पात्र लाभार्थ्यांच्या कर्ज खात्यामध्ये रक्कम जमा करण्याचे नियोजन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे. याशिवाय योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना नंतर स्थानिक पातळीवर शासकीय यंत्रणेमार्फत प्रमाणपत्राचे वितरण करण्यात येणार आहे.

 

दिवाळीसाठी सिंगापूरही सज्ज

0

दिपावली (किंवा दिवाळी) अगदी जवळ येऊन ठेपली आहे आणि केवळ भारतातच नाही, तर संपूर्ण जगभरात प्रत्येकजण दिव्यांच्या या सणाची तयारी करण्यात मग्न आहे. बहुसांस्कृतिक समाज या नात्याने सिंगापूरचे नागरिक कायमच त्यांच्या सणांबद्दल उत्साही असतात आणि दिवाळी मोठ्या जोशात व उत्साहात साजरी करतात.

सिंगापूरमधील डझनभर हिंदू कुटुंबिय आपल्या घरे सोनेरी रंगात उजळवतात आणि प्रार्थना करतात, भेटवस्तूंची देवाणघेवाण करतात व प्रियजनांना गोडधोड खाऊ घालतात. दोन सप्टेंबर ते १२ नोव्हेंबर २०१७ दरम्यान लिटिल इंडिया हे आवर्जून भेट देण्यासारखे आणि सणाचा आनंद घेण्यासाठी आदर्श ठिकाण असते, कारण यादरम्यान दिपावलीनिमित्त सेरंगून रस्ता ते रेस कोर्स रस्त्यादरम्यान संध्याकाळी सात ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत दिव्यांची रोषणाई केली जाते.

अभिनेत्री विद्या बालन व दिया मिर्झाच्या हस्ते ‘अल अदील’च्या दुबईतील दोन नव्या सुपर स्टोअर्सचे उद्घाटन

0

दुबई : ‘मसालाकिंग’ डॉ. धनंजय दातार यांच्या कुशल नेतृत्वाखाली प्रगती करणाऱ्या ‘अल अदील ग्रुप’ने दुबईत नुकतीच आणखी दोन सुपर स्टोअर्स उघडली आहेत. या समूहाची आता एकूण ३८ सुपर स्टोअर्सची साखळी आखाती प्रदेशात यशस्वी कार्यरत झाली आहे. ‘अल अदील ट्रेडिंग कंपनी’चे ३७ वे स्टोअर दुबईतील अल क्यूसिस या मध्यवर्ती वसाहतीत बैरुत स्ट्रीटवर सुरु झाले असून त्याचे उद्घाटन अभिनेत्री दिया मिर्झाच्या हस्ते झाले, तर ३८ वे स्टोअर अल बरशा भागात उघडले असून त्याचे उद्घाटन अभिनेत्री विद्या बालनच्या हस्ते झाले. या दोन्ही शानदार समारंभांना डॉ. धनंजय दातार, त्यांचे कुटूंबीय आणि मोठ्या संख्येने दुबईतील भारतीय समाजाची उपस्थिती होती.

 

यासंदर्भात माहिती देताना ‘अल अदील ग्रुप’च्या वित्त संचालक सौ. वंदना दातार म्हणाल्या, “दिया मिर्झा आणि विद्या बालन या केवळ रुपवान अभिनेत्रीच नसून आपल्या व्यक्तीमत्त्वातून भारतीय स्त्रीची अभिव्यक्ती दाखवून देतात. वैविध्यपूर्ण आणि मनावर ठसणाऱ्या भूमिका मेहनतीने साकारुन त्यांनी लाखो प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे दृढ स्थान निर्माण केले आहे. नेमके हेच गुणवैशिष्ट्य आमच्या ‘अल अदील’ ब्रँडचेही असल्याने दुबईतील नव्या स्टोअर्सचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करणे आम्हाला यथोचित वाटले. ही नवी स्टोअर्स दिवाळीच्या सणाचे औचित्य साधून उघडण्यात आली आहेत. सणासुदीच्या खरेदीचा आनंद वाढवण्यासाठी आम्ही आमच्या सर्व स्टोअर्समध्ये निवडक उत्पादनांवर अगदी ५० टक्क्यांपर्यंत सवलत देऊ केली आहे.”

वर्ष १९८४ मध्ये वडिलांनी दुबईत सुरु केलेल्या लहानशा दुकानातून सुरवात करुन त्याचे रुपांतर सुपरमार्केट, मसाल्यांचे कारखाने, पीठ गिरण्या व आयात-निर्यात कंपनी असलेल्या जागतिक समूहात करण्यात ‘अल अदील ग्रुप’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय दातार यांचा महत्त्वाचा वाटा आहे. प्रगतीच्या या टप्प्यावर पोचल्याचा आनंद व्यक्त करताना ते म्हणाले, “अल अदील हा ब्रँड सुरवातीपासूनच उत्पादनांची अस्सलता, दर्जा व सुरक्षितता यासाठी ओळखला जातो. आखाती देशांमधील भारतीयांप्रमाणेच बहुसांस्कृतिक समाजांच्या मनात त्याने दृढ विश्वास संपादन केला आहे. या प्रवासात आम्ही कधीही आमच्या मध्यवर्ती मूल्यांशी तडजोड केली नाही. म्हणूनच जगभर मंदीचे वातावरण असतानाही आमच्या कंपनीने भरघोस प्रगतीची घोडदौड कायम ठेवली. यामध्ये आमचे ग्राहक, हितचिंतक आणि कर्मचाऱ्यांचे योगदान अनमोल आहे.”

ते पुढे म्हणाले, “कोणताही उद्योग यशस्वी व्हायचा असेल तर प्रामाणिकपणा, कष्ट आणि संयम ही त्रिसूत्री अत्यंत महत्त्वाची ठरते. मराठी माणसाला व्यवसाय जमत नाही, असा उपरोध मला अनेकदा ऐकून घ्यावा लागला, परंतु मी वरील त्रिसूत्रीवर दृढ श्रद्धा ठेवली. कामकाजात पारदर्शकता राखली. त्याचाच परिणाम म्हणजे एका मराठी माणसाच्या छोटेखानी व्यवसायाचे रुपांतर जागतिक समूहात झाले आहे. वाटचालीत साथ व सदिच्छा देणाऱ्या, तसेच मार्गदर्शन करणाऱ्या सर्वांचा मी ऋणी आहे.”

‘अल अदील ट्रेडिंग’चे संचालक हृषिकेश दातार म्हणाले, “आमचा समूह विस्ताराच्या महत्त्वाच्या टप्प्यात असून बदलत्या काळाचा वेध घेऊन अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोचण्यासाठी आम्ही डिजीटल माध्यमांतही मोठी गुंतवणूक करत आहोत. आम्ही नुकतेच अल अदील ऑनलाईन स्टोअर सुरु केले असून त्याला ग्राहकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळेच आम्ही आमचे ऑनलाईन रीटेल व्यवसाय प्रारुप बाजारपेठेत आघाडीवर राहण्याच्या दिशेने बदलले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे ‘अल अदील’च्या ऑनलाईन व स्टोअर्सद्वारे अशा दोन्ही विक्रींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आमचा ग्राहकवर्ग वाढत असल्याचेच ते द्योतक आहे. वर्ष २०२० पर्यंत ऑनलाईन विक्री, स्टोअर्सची संख्या व ग्राहकांची संख्या या तीन्हीमध्ये लक्षणीय वाढ दिसून येण्याची आम्हाला खात्री आहे.”

डॉ. धनंजय दातार यांच्या चैतन्यशील नेतृत्वाखाली प्रगती करणाऱ्या ‘अल अदील ट्रेडिंग’ने ९००० भारतीय उत्पादने संयुक्त अरब अमिरातीत (युएई) उपलब्ध करुन देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आजघडीला ‘अल अदील ग्रुप’ची आखाती देशांत ३८ सुपरमार्केट्स, दुबई, अबूधाबी, शारजा व अजमान भागांत २ पीठाच्या गिरण्या, २ मसाला उत्पादन कारखाने असे नेटवर्क विस्तारले आहे आणि ‘मसाला किंग एक्स्पोर्ट्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड’ या नावाने मुंबई निर्यात विभागही कार्यरत आहे. अल अदील समूह सक्रिय विस्तार साधत असून त्याने नुकतेच ओमान व बहारीनमध्ये नवी आऊटलेट्स उघडली आहेत. कंपनीने अमेरिका, कॅनडा, टांझानिया, केनया, स्वीत्झर्लंड, इटली व एरित्रिया त्याचप्रमाणे कुवेत, ओमान व युएई या देशांत व्यापारी मार्ग निर्माण करुन विशेष वर्गातील आस्थापनांद्वारे आयात व निर्यात क्षेत्रांतही विस्तार केला आहे.

‘अल अदील’ने आपल्या ‘पिकॉक’ या लोकप्रिय ब्रँडअंतर्गत ७०० हून अधिक खाद्यउत्पादने उपलब्ध करुन दिली असून आगामी काळात त्यांत आणखी भर पडेल. ‘पिकॉक’ हा मसाल्याचे पदार्थ व तयार मसाल्यांच्या सर्वाधिक मोठ्या ब्रँडपैकी असून त्याच्या संग्रहात सध्या मसाल्यांबरोबरच डाळी, पीठे, लोणची, मुखवास, पापड आणि सुकामेव्याचाही समावेश आहे.

अभिनेता विवेक ओबेरॉय विद्यार्थी सेवा संघाच्या संमेलनात सहभागी

0

पुणे-स्वर्गीय खासदार वसंतराव चव्हाण यांनी स्थापन केलेल्या विद्यार्थी सेवा संघाच्या  सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त वार्षिक स्नेह संमेलन व  विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते  .पुणे कॅम्पमधील नेहरू मेमोरियल हॉलमध्ये होणाऱ्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिध्द सिनेअभिनेता विवेक ओबेरॉय यांच्याहस्ते विद्यार्थ्यांचा सन्मानित करण्यात आले . तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते  .

     या कार्यक्रमास महाराष्ट्र  राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे , आमदार जयदेवराव गायकवाड ,विद्यार्थी सेवा संघाचे विश्वस्त कनव वसंतराव चव्हाण ,विद्यार्थी सेवा संघाचे अध्यक्ष ऍड. आनंद मोहन चव्हाण ,कार्याध्यक्ष विनोद निनारिया ,  माजी आमदार कृष्णा हेगडे , महेश तपासे , रामू पवार  , नगरसेविका राजश्री काळे , मोतीलाल निनारिया , नरोत्तम चव्हाण , विश्वास चव्हाण ,बंडू चरण ,  नरेश जाधव , मनोज पटेलिया, रवी परदेशी ,   उपस्थित होते .

     यावेळी कार्यक्रमाचे प्रास्तविक करताना विद्यार्थी सेवा संघाचे अध्यक्ष ऍड. आनंद मोहन चव्हाण यांनी सांगितलॆ कि , सन १९६७ साली सुरु करण्यात आलेली मेहेतर वाल्मिकी समाजातील विशेष नैपुण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला जातो . या संघाची सुरुवात समाजसुधारक स्व. विठ्ठलदास चव्हाण , माजी नगरसेवक स्व. केशवकांत जानजोत , समाजसुधारक स्व. मनोहर लालबिगे , समाजसुधारक स्व. बाबुलाल मुलतानी व स्व. माजी खासदार वसंतराव चव्हाण यांनी समाजात शैक्षणिक महत्व पटवून देण्यासाठी आणि समाज उन्नतीसाठी या विद्यार्थी सेवा संघाची स्थापना केली .

यंदाच्या वर्षी सुमारे एक हजार विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला  . या विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य , रोख पारितोषिके, स्मृतिचिन्ह  देण्यात आले .सहावी ते  दहावी , बारावी , पदवीधर , उच्च पदवीधर विद्यार्थ्यांना  सन्मानित करण्यात आले  .

यावेळी प्रसिध्द सिनेअभिनेता विवेक ओबेरॉय यांनी सांगितले कि समाजसेवा करणे अवघड गोष्ट आहे , स्वतःसाठी काही फायदा न करता समाजासाठी मदत व पैसे एकत्र करणे अवघड असते . देशात अनेक गरीब गरजू नागरिक आहेत त्यामुळे आपापल्या कुवतीनुसार दररोज त्यांच्यासाठी एक चांगले केल्यास लोकसंख्येनुसार प्रत्येक दिवशी १२५ कोटी कामे गरजू लोकांची होतील . आयुष्यात अडचणींबद्दल विचार केला तेव्हा त्या सुटल्या नाहीत , परंतु उत्तराबद्दल विचार केला तेव्हा सर्व अडचणी सुटत गेल्या . हाच विचार करून मी पंधरा वर्षांपासून समाजसेवेत कार्यरत आहे . समाजासाठी संपूर्ण जीवन व्यथित करणे हा मोठा संघर्ष आहे . देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी सात कोटी नागरिक दिव्यांग असून काही वेळा त्यांची हेटाळणी होते . तर अनेक जण त्यांच्याकडे सहानुभूतीपूर्वक पाहतात त्यामुळे दिव्यांग लोकांच्या केवळ शारीरिक समस्या नसून सामाजिक समस्याही खूप आहेत . आयुष्यात ९९ टक्के स्वतःसाठी आणि एक टक्का समाजासाठी काम करा . कारण कोणत्याही कामाची सुरुवात स्वतःपासून केल्यावरच मार्ग सापडतो . देवदूत आभाळातून येत नसतात आपण सर्व जण देवदूत बनू शकतो , फक्त विचार आणि प्रत्यक्ष कृती यामधले अंतर पार करायचे आहे .

यंदाच्या वर्षी समाजातील दोन समाजसेवकांचा समाजभूषण पुरस्कार देउन सन्मानित करण्यात आले  . यामध्ये पुणे महापालिका शिक्षण मंडळ माजी उपाध्यक्ष नारायण सारवान व महात्मा फुले महामंडळ व्यवस्थापकीय संचालक राकेश अमीरचंद बेद यांना स्मृतिचिन्ह , मानपत्र , शाल व श्रीफळ देउन सन्मानित  करण्यात आले  .

यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थी सेवा संघाचे कार्याध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक विनोद मोतीलाल निनारिया यांनी केले तर  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  विद्यार्थी सेवा संघाचे विश्वस्त वृक्ष संवर्धन समितीचे सदस्य कविराज संघेलिया यांनी केले तर आभार  धनराज जावा यांनी मानले .

नोटा बदलल्या -पण परिस्थिती कोणाची बदलली ? ८ नोव्हेंबर ‘काळा दिवस’

0

मुंबई -८ नोव्हेंबरला नोटा बदलल्या ,पण परिस्थिती कोणाची बदलली ? सामान्य माणसाच्या पदरात काय पडले … असे प्रश्न करत ८ नोव्हेंबर  हा दिवस काँग्रेसकडून ‘काळा दिवस’ म्हणून पाळण्यात  यावा आणि यानिमित्त  देशव्यापी आंदोलनही करण्यात यावे यासाठी कॉंग्रेस पक्षाने हालचालींना प्रारंभ केला आहे .

मोदी सरकारच्या नोटाबंदीमुळे केवळ सामान्यांवरच काटकसर करण्याची वेळ आली असे नव्हे तर अर्थव्यवस्थेलाही मोठा झटका बसला, असा आरोप काँग्रेसने केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्यावर्षी ८ नोव्हेंबरला संध्याकाळी अचानकपणे नोटाबंदीची घोषणा करत ५०० व १००० रूपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्याचे जाहीर केले होते. या निर्णयामुळे देशभरात तब्बल महिनाभर चलनाचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे सामान्यांचे खूप हाल झाले होते. या पार्श्वभूमीवर सरकारचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने ८ नोव्हेंबर हा काळा दिवस म्हणून पाळायचे ठरवले आहे. त्यानुसार काँग्रेस नेते आणि प्रवक्ते देशभरात फिरून नोटाबंदीच्या दुष्परिणामांचा प्रचार करतील. तसेच नोटबंदी कशाप्रकारे अपयशी ठरली, हे दाखवून देण्यासाठी पक्षाच्या रिसर्च टीमकडून व्यापक प्रमाणावर माहिती गोळा करण्यात आल्याचे समजते. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नोटाबंदी म्हणजे अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त करणारे पाऊल, असे निर्णयाचे वर्णन केले होते. तर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी नोटाबंदी म्हणजे ‘महाकाय गैरव्यवस्थापन आणि संघटित व कायदेशीर लूट’ असल्याची टीका केली होती.

ग्रामीण भागात दसरा -दिवाळी अंकाची परंपरा शिवमार्गने रुजविली…रामचंद्र ठोंबरे

0
जामगाव (प्रतिनिधी):-मुळशी तालुक्यासारख्या अत्यंत ग्रामीण भागात मासिक शिवमार्गने दरवर्षी दसरा -दिवाळी अंक प्रसिद्ध करत ग्रामीण तरुणांनामध्ये  वाचनाची आवड निर्माण केली आहे. गेली आकरा वर्षे मासिक शिवमार्ग ने ग्रामीण भागात  शहरातुन प्रसिद्ध होणाऱ्या दिवाळी अंकाच्या तोडीचा दसरा  अंक प्रसिद्ध करीत एक नवा आदर्श निर्माण केला आहे असे प्रतिपादन पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ कात्रज चे माजी अध्यक्ष व  विद्यमान संचालक रामचंद्र ठोंबरे यांनी केले . दत्तात्रय सुर्वे संपादित मासिक शिवमार्ग च्या दसरा -दिवाळी अंकाचे प्रकाशन दसऱ्याच्या निमित्ताने जामगाव येथे अत्यंत सध्या पद्धतीने करण्यात आले तेव्हा ते बोलत होते. 
शिवमार्ग दसरा-दिवाळी अंकाचे प्रकाशन जामगाव येथील भैरवनाथ मंदिरात करण्यात आले.यावेळी  जामगाव चे माजी सरपंच यशवंत मालुसरे,रामभाऊ कोंडीबा ठोंबरे,माजी उपसरपंच सोपं डोख ,पोलीस पाटील दत्तात्रय सुर्वे ,जामगाव  ग्रामपंचायतचे सदस्य लक्ष्मण ठोंबरे, सामाजिक कार्यकर्ते  गणपत बांदल ,दत्तात्रय ठोंबरे, श्रीराम सहकारी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे सचिव सीताराम कंधारे,उपाध्यक्ष सौ .नंदा दत्तात्रय सुर्वे, माजी ग्रामपंचायत सदस्य वसंत सुर्वे ,चिंतामण सुर्वे,भाजप युवा मोर्चाचे योगेश मारुती सुर्वे,संतोष सुर्वे,नंदू मालुसरे, एकनाथ बांदल,शिवसेनेचे उपविभागप्रमुख बाळासाहेब सुर्वे ,दशरथ ठोंबरे, नामदेव मालुसरे ,शंकर मालुसरे, निवृत्ती सुर्वे, देवराम सुर्वे, आदी ग्रामस्थ व विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे सभासद,संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मासिक शिवमार्गचे संपादक दत्तात्रय सुर्वे यांनी या सर्व उपस्थितांचे स्वागत केले.
 शिवमार्ग दसरा -दिवाळी अंक-2017 हा सुमारे 200 पानांपेक्षा जास्त पानांचा असून अत्यंत आकर्षक मुखपृष्ठ देण्यात आलेले आहे. हा अंक “सायकल विशेष”म्हणून प्रसिद्ध करण्यात आला आहे.त्यामध्ये वाचकांसाठी सुमारे 14 वाचनीय कथा ,18 प्रतिष्टीत,नवोदित  लेखकांचे वाचनीय लेख आहेत.सायकल  विशेष विभागात 23 सायक लपट्टू, लेखकांचे सायकल विषयीचे अनुभव,प्रसंग,महत्व आणि इतर बराच काही देण्याचा प्रयत्न उल्लेखनीय असा आहे. प्रेरणा बँकेचे चेअरमन गुजर व बकुळ मावशी यांची मुलाखत ,30 कवींच्या मनोवेधक कविता, वात्रटिका ,चुटकुले,राजेंद्र सारंग ,अतुल पुरंदरे यांची व्यंगचित्रे या अंकाची वाचनाची गोडी वाढवतात. प्रत्येकाने वाचावा असा मासिक शिवमार्गचा दसरा -दिवाळी अंक-2017 झालेला आहे.

अनोखी पहाट … रांगोळ्यांचा थाट, मांडलेला पाट ,औक्षणाचं ताट

0
‘त्यांनी’ लुटला अभ्यंगस्नानाचा शाही आनंद !
पुणे
एक अनोखी पहाट … रांगोळ्यांचा थाट,  मांडलेला पाट आणि दिव्यांचा झगमगाट , तेल- उटण्यांचा सुवास, औक्षणाचं ताट, गोडाचा घास, नव्या कपड्यांचा साज या साऱ्यांचा अविस्मरणीय अनुभव घेत ‘त्यांनी सोमवारी वसुबारसेच्या मुहूर्तावर  अभ्यंगस्नानाचा शाही आनंद लुटला  !
निमित्त होते दरवर्षीप्रमाणे पदपथावरील राहणाऱ्या मुलांसाठी  माजी उपमहापौर आबा बागुल आणि  पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस  अमित बागुल यांनी आयोजित केलेल्या  शाही अभ्यंगस्नानाचे. शंकरशेठ रस्त्यावरील पदपथावर राहणाऱ्या  मुलांमुलींना सोमवारची सकाळ सुखद ठरली.
खेळण्याचे आणि शिकण्याचे वय असतानाही केवळ परिस्थितीने  पोटाची खळगी भरण्यासाठी दररोजची सकाळ रोजगारासाठीच उजाडते. आई-वडिलांसह पदपथावर राहणाऱ्या या मुलांची सोमवारची  सकाळ मात्र आनंददायी ठरली. कार्यकर्त्यांकडून परिसराची स्वछता करून घातलेला रांगोळ्यांचा सडा आणि  मांडलेले  पाट हे चित्र बघून ती मुले हरखून गेली. माजी उपमहापौर आबा बागुल , जयश्री बागुल , अमित बागुल , हर्षदा बागुल आणि समस्त बागुल कुटुंबियांसह कार्यकर्त्याकडून या मुलांना  सुवासिक तेल – उटणे लावून त्यांचे औक्षण करून मंगलमय वातारणात हा  शाही  अभ्यंगस्नानाचा सोहळा रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत होता आणि नागरिकही त्यात सहभागी होत होते.
 शाही  अभ्यंगस्नानानंतर या मुलांना नवे कपडे , फराळ आणि फटाके अशी मेजवानी मिळाल्याने ‘त्या ‘ मुलांचा आनंद गगनात मावेनासा झाला  तर हा सुखद सोहळा पाहणाऱ्या ‘त्या ‘ मुलांच्या  पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू पाहावयास मिळत होते.
यावेळी या उपक्रमाचे संयोजक अमित बागुल म्हणाले , माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली  आम्ही हा उपक्रम राबवितो. यंदाचे हे चौथे वर्ष आहे. महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. परिस्थितीने पदपथावर राहणाऱ्या आणि पोटाची खळगी भरण्यासाठी शिकण्या – खेळण्याच्या वयात सिग्नलवर फुले किंवा अन्य वस्तू विकणाऱ्या या मुलांना दिवाळीचा आनंद मिळावा या उद्देशाने आम्ही हा उपक्रम राबवित असतो. या उपक्रमात रोटरी क्लब शनिवारवाडा या संस्थेचे पदाधिकारी अँड चंद्रशेखर पिंगळे, अभिषेक बागुल,गोरख मरळ,शाम काळे,सोमनाथ कोंडे,महेश ढवळे,हेमंत बागुल , सागर आरोळे,विक्रम खन्ना, अशोक शिंदे, विजय बिबवे,धनंजय कांबळे,सुरेश कांबळे,योगेश निकाळजे, इम्तियाज तांबोळी, राहुल बागुल,राजाभाऊ पोळ, सुयोग धाडवे,दीपक गोरखा,पंकज गायकवाड  हे सहभागी झाले होते. ​

अनाथ व विशेष मुलांना दिपावली फराळ

0

पुणे-मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेच्या वतीने पिंपळे गुरव येथील मातोश्री अश्रमातील मुलांना व ममता अंधकल्याण केंद्र येथील विशेष मुलांना दीपावली फराळ देवून  शुभेच्छा दिल्या. *याबाबत बोलताना मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष आण्णा जोगदंड सांगितले की, विशेष मुले व अनाथ मुलांबरोबर दिपवाळीच्या उत्सवानिमित्ताने अशा मुलांना दिपवाळी फराळ कपडे व साबन इ. साहित्ये देवून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा म्हणुन गेली पाच वर्षपासून वेगावेगळ्या आश्रमात जावून हा उपक्रम राबवित आहोत. यावेळी अश्रमातील मुल आमच्या दिर्घ आयुष्यासाठी प्रार्थाना करतात व जेंव्हा प्रेमाने मिट्ठी मारतात तेंव्हा गहीवरून येते. आणि दर वर्षी आपणही समाजाचे काही देणे आहोत या माणुष्कीच्या भावनेने केलेल्या या उपक्रमाचे सार्थक झाल्याचे भाव निर्णान होतात. या आनाथ मुलांना ही दिवाळीचा आनंद साजरा करता यावा.त्यांना ही आपल्या घरी नातेवाईक आल्याचा आनंद मिळावा यासाठी हा उपक्रम राबविला जातो.* यावेळी मातोश्री अश्रमाचे संस्थापक राम दौंडकर यांनी सांगितले की ते स्वःता पार्टटाईम काम करुन व समाजातील काही दानसुर व्यक्तींच्या मदतीने या मुलांचा सांभाळ करीत आहेत. तसेच ममता अंध कल्याण केंद्राचे संस्थापक तुषार कांबळे यांनी सांगितले की मराठवाडा व इतर भागातुन आनेक विशेष मुले या संस्थेत येतात त्यातील काही अंध मुले आज युपीसी – एमपीसी परीक्षाची तयारी करीत आहेत. समाजातील प्रत्येकाने असा मुलांच्या मदतीसाठी पुढे येयाला हवे. यावेळी मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष विकास कुचेकर, विकास शाहाणे ,अँड. सचिन काळे , मुरलीधर दळवी, आरुण मुसळे, संगिता जोगदंड, शुभांगी जोशी, गजानन धाराशिवकर, एस.टी विभुते, आरविंद मांगले,आदी पदाधिकारी उपस्थित होते.

पुण्यासह राज्यात दारुंबदी साठी आनंदवन ची जागृती मोहीम

0

पुणे-” दारुंबदी” पुण्यासह राज्यात दारुंबदी साठी आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र,चंदन नगर यानी चालु केलेल्या मोहिमेला  येरवडा येथील आंबेडकर चौक येथे जोरदार प्रतिसाद मिळालाउपस्थित महिला,तरुण,जेष्ट नागरिकानी जोरदार ” दारुंबदी” झालीच पाहिजे या घोषणा दिल्या व स्वाक्षरी करुन या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला यावेळी पुण्याचे उपमहापौर डॉ सिध्दार्थ धेंडे,नगर सेविका अश्विनी लांडगे आनंदवन संस्थेचे अध्यक्ष डॉ अजय दुधाणे उपस्थित होते डॉ अजय दुधाणे म्हणाले प्रयंत्नातुन हि मोहिम सुरु राहणार आहे. आता पुढील रविवारी येरवडा येथे गाडीतळापासुन पदयात्रा काढण्यात येणार आहे. याप्रसंगी स्थानिक कार्यकर्ते,संपतराव पोळ,वैभव पवार,शैलेंद्र भोसले,आनंद रसाळ, विपुल रोकडे,विक्रांत भोसले,अनिरुध्द हळंदे ,विशाल काकडे,भिमसिंग गायकवाड,सिध्दार्थ कांबळे,महेश वाडेकर ,विवेक कदम,प्रकाश धिडे,प्रमोद शेळके, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी महिलांची संख्या लक्षणीय होती

“साहो” के सेट पर प्रभास की प्रसंशको से खास मुलाकात!

बाहुबली उर्फ प्रभास जब भी “साहो” के सेट पर शूट करते है वहाँ हर बार प्रसंशको का जमावड़ा लग जाता है ताकि वो अपने पसंदीदा सुपरस्टार को एक झलकभर देख सके और जब भी इन प्रसंशको को इस बात का अंदाज़ा होता कि प्रभास कही आस-पास है तो वो ज़ोर-ज़ोर से उनका नाम पुकारने लगते थे।

अब जब फ़िल्म की पहली अनुसूची सम्पात हो गयी है, तो ऐसे में हम अनुमान लगा सकते है कि पलभर के लिए ही सही प्रशंसकों की भीड़ कम हो जाएगी।

सुप्रसिद्ध फ़िल्म “बाहुबली” के बाद प्रभास के प्रसंशको की संख्या को पर लग गए और यह संख्या देखते ही देखते अनगिनत आंकड़े पर पहुंच गई।

प्रभास की त्रिभाषी फ़िल्म “साहो” की पहली अनुसूची काफी लंबी थी और ऐसे में हर रोज़ सेट पर उनके प्रसंशको का तांता लगा रहता था। यह सिलसिला यू ही नियमित रूप से चलता रहा और हमने तो ये भी सुना है कि जब प्रभास के प्रसंशको की संख्या बढ़ गयी तो ऐसे में प्रभास की सुरक्षा को मद्देनजर रखते हुए उनकी व्यक्तिगत सुरक्षा भी दोगुनी कर दी गयी थी।

इसके अलावा, फ़िल्म में नज़र आने वाले उनके अवतार को भी गोपनीय रखना था इसिलए हर कोई अतिरिक्त सावधानी बरत रहा था।

त्रिभाषी फ़िल्म “साहो” 2018 में रिलीज होगी और इसी के साथ प्रभास को एक बार फिर बड़े पर्दे पर देखने के लिए प्रशंसकों के बीच प्रत्याशा दोगुनी बड़ गयी है।

मंगला चित्रपटगृहातील कामगारांची सहकारी पतसंस्था हा नवीन रोल मॉडेल

0

मंगला मल्टील्पेकस सिनेमागृहातील कर्मचाऱ्यांची एक स्वतंत्र सहकारी पतसंस्था स्थापन करून कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा एक चांगला प्रयत्न या माध्यमातून केला आहे .चित्रपटगृहातील कर्मचाऱ्यांनी स्वत्रंतपणे पतसंस्था चालविणे हा एक नावीन्यपूर्ण प्रयोग असून तो अन्य ठिकाणच्या चित्रपटगृहातील कामगारांसाठी अनुकरणीय आहे असे प्रतिपादन खासदार वंदना चव्हाण यांनी केली आहे .

मंगला चित्रपटगृहातील कर्मचाऱ्यांना मंगला सिनेमागृहातील कामगारांची सहकारी पतसंस्था दिवाळीनिमित्त कर्जवाटप करण्यात आले . या कर्जाचे वितरण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे शहर अध्यक्षा खासदार ऍड. वंदनाताई  चव्हाण यांच्याहस्ते करण्यात आले .त्यावेळी त्या बोलत होत्या .

या कामगारांचे नेते भगवानराव वैराट यांनी यावेळी बोलताना पतसंस्था स्थापनेबाबतची भूमिका सांगितली . ते म्हणाले कि , कामगारांना त्यांच्या दैनंदिन अडचणीच्या काळात आर्थिक मदत व्हावी म्हणून हि पतसंस्था स्थापन करण्यात आली असून त्याला मंगला चित्रपट गृहाचे चालक चाफळकर बंधूनी उदार मनाने दहा लाख रुपये बिनव्याजी भांडवल उपलब्ध करून दिले आहे . भविष्यात या पतसंस्थेचा आणखी विकास करून कामगारांचा आर्थिक उत्कर्ष करण्याचा प्रयत्न करू .

या कार्यक्रमास शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे , मंगला चित्रपट गृहाचे मालक प्रकाश चाफळकर, अरविंद चाफळकर , कामगार सुरक्षा दलाचे दौंड शाखेचे शांताराम बोराटे , रमेश गायकवाड , संजय कुदळे , विलास भालेराव , झोपडपट्टी सुरक्षा दलाचे शहराध्यक्ष मोहम्मद शेख , महादेव मोरे , सूर्यकांत सपकाळ , सुरेखा भालेराव , संतोष जगताप , गणेश लांडगे , संतोष बोतालजी , आदी मान्यवर उपस्थित होते .

या कार्यक्रमाचे प्रास्तविक व सूत्रसंचालन कामगार सुरक्षा दलाचे सरचिटणीस काशिनाथ गायकवाड यांनी केले तर मंगला सिनेमागृहातील कामगारांची सहकारी पतसस्थेचे अध्यक्ष भाऊ कसबे यांनी आभार मानले .

प्यार माँगा है तुम्हीं से, न इनकार करो…

0

जीवनात काही माणसे खूप मोठ्ठी होतात , ज्यांना कायमची ओळख मिळते, ज्यांचे नाव आणि काम  कायम राहते , अशा अजरामर झालेल्या महान हस्तींच्या व्यक्तिगत जीवनात  आणि सामान्य माणसाच्या जिवनात काही फरक असतो काय ? असा प्रश्न अनेकांना पडतो ,पैसा,प्रतिष्ठा ,सारे काही मिळूनही काहींना खरोखरचे प्रेम लाभते काय ?असे प्रश्न वारंवार निर्माण होत असतात . राजेश खन्ना चा एक काळ होता , असंख्य तरुणी त्याच्यावर फिदा असत ,त्या राजेश खन्नाला आयुष्यात खरे प्रेम लाभले काय ?त्याचा विवाह यशस्वी झाला काय ?या सारख्या साऱ्या प्रश्नांची उत्तरे हि सामान्य माणसाच्या जिवनात जशी उत्तरे मिळतात त्याहून वेगळी काही नसतात .  प्रेम हि एक गोष्ट अशी आहे , कि जी श्रीमंतीवर , प्रसिद्धीवर ,प्रतिष्ठेवर मिळविता येते हा  तरुणाईचा  वारंवार झालेला भ्रम च होता हे अनेक किस्स्यांमधून वेळोवेळी स्पष्ट झालेले आहे .

प्यार माँगा है तुम्हीं से, न इनकार करो
पास बैठो ज़रा आज तो, इक़रार करो

कितनी हसीं है रात, दुल्हन बनी है रात (२)
मचले हुए जज़बात, बात ज़रा होने दो
मुझे प्यार करो (२)
प्यार माँगा है तुम्हींसे, न इनकार करो

पहले भी तुम्हें देखा, पहले भी तुम्हें चाहा (२)
इतना हसीं न पाया, साथ हसीं होने दो
मुझे प्यार करो (२)
प्यार माँगा है तुम्हींसे, न इनकार करो

कितना मधुर सफ़र है, तू मेरा हमसफ़र है (२)
बीते हुए वो दिन, ज़रा याद करो
मुझे प्यार करो (२)
प्यार माँगा है तुम्हींसे, न इनकार करो
पास बैठो ज़रा आज तो, इक़रार करो

 कॉलेज गर्ल या चित्रपटातील शिव कुमार सरोज यांच्या या गीताला बप्पी लहरींनी संगीत दिले आहे . आणि किशोर कुमार यांनी हे गाणे गायले आहे . प्रेमा वरची , विरहावरची, बेवफाई वरची … अशा असंख्य नानाविध विषयावरची अप्रतिम आणि अजरामर झालेली गाणी ज्या किशोरदांनी गायली त्या किशोरदांचे आयुष्य पाहिले तर स्वतः त्यांनीही प्रेमासाठी बर्याच खस्ता खाल्लेल्या दिसतात .

किशोर कुमार ने स्वतःची चार लग्न केली त्यांची पहिली पत्नी  गायक आणि  अभिनेत्री रुमा घोष होती. 1950 ते 1958 या काळात किशोरदा नी आपले जीवन रुमा घोष यांच्या बरोबर व्यतीत केले . त्यानंतर किशोरदांचे लग्न अभिनेत्री मधुबाला समवेत झाले .  जिच्यासाठी किशोरदांनी धर्मपरिवर्तन देखील केले .पण मधुबालाच्या परिवाराने  त्यांना स्वीकारले नाही 1969 मध्ये मधुबाला चे निधन झाल्यानंतर  किशोरदांनी प्रख्यात अभिनेत्री योगिता बाली बरोबर लग्न केले . १९७६ ते १९७८ एवढाच काळ हे लग्न टिकले . किशोरकुमार यांचे चौथे लग्न अभिनेत्री लीना चंदावरकर यांच्या शी १९८० ला झाले . लीना चंदावरकर हि त्यांची शेवटची पत्नी . किशोर कुमार यांची निधन १३ ऑक्टोबर 1987 ला झाले .विशेष म्हणजे याच दिवशी किशोरकुमार यांचे मोठे बंधू  अशोक कुमार यांचा वाढदिवस होता .

अशा महान लोकांच्या जिवनकथा पाहिल्या तर समजते स्वकर्तुत्वावर सारे काही मिळविणाऱ्यांनाही प्रेम मिळविण्यासाठी बरीच धडपड करावी लागली असावी . तेव्हा प्रेमाची किंमत अनमोल असते , ज्यांचे प्रेम यशस्वी झालेले असते अशा लोकांची संख्या खरोखर खूपच अत्यल्प असावी असाही अंदाज आजच्या स्थितीत लावला जातो .

 -अभिषेक अरुण लोणकर , पुणे .

शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही-राज्यमंत्री विजय शिवतारे

0

पुणे दि. 15: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत प्रस्तावीत रिंग रोड मुळे शहरातील कनेक्टीव्हीटी चांगली होणार आहे. या रिंग रोड मुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर शहरातील ट्रॅफिकही कमी होणार आहे. प्रचंड वेगाने नागरिकीकरण होत असल्यामुळे पीएमआरडीएने सुनियोजित नियोजन केले असून याचा निश्चितच नागरिकांना फायदा होणार आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी  अधिग्रहण करुन त्यांना विकसित प्लॉट देण्यात येतील यात कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही, असे प्रतिपादन जलसंपदा, जलसंधारण व संसदीय कार्य राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केले.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आयोजित  टि. पी. स्कीम कार्यशाळा, सोनाई कार्यालय उरुळी देवाची येथे ते बोलत होते. या कार्यशाळेसाठी रिंगरोड क्षेत्रात येणा-या उरुळी देवाची, वडकी, फुरसुंगी, फडतरे वाडी, गायकवाडवाडी, सायकरवाडी, तरवडी या गावातील संबधित जमिनधारकांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण गित्ते यांनी निरसन केले.

प्रकल्पबाधित लोकांचे प्रश्न सोडविण्यात येतील, शेतक-यापर्यंत या योजनेसंदर्भात योग्य माहिती पोहोचविली जाईल. प्रत्येक गोष्टीची कल्पना शेतक-यांना देऊनच या कामास सुरुवात केली जाईल. सर्वांच्या फायद्यासाठीच ही योजना असून यामुळे सर्व नागरिकांची सोय होणार आहे. लवकरच या परिसरात पीएमआरडीएचे कार्यालय सुरु करण्यात येईल. ज्यामुळे नागरिकांना नकाशाव्दारे अधिका-यांकडून थेट माहिती मिळू शकेल व शंकांचे निरसन करण्यात येईल असेही श्री. शिवतारे म्हणाले.

प्रस्तावीत रिंग रोड 129 कि.मी. चा असून  शेतकऱ्यांची संमती मिळाल्यापासू तीन महिन्यात ड्राफ्ट टाऊन प्लॅनिंग स्किम तयार करण्यात येईल. पाणी, गटारे, वीज तसेच गार्डन, शाळा, दवाखाने, बसस्टँड, पार्कींगची जागा, ओपनस्पेसच्या सर्व सुविधा पीएमआरडीएमार्फत पुरविल्या जातील. या योजनेमार्फत शेतक-यांचा आठपट फायदा होईल. रिंगरोड जवळील शेतक-यांना रिंगरोड लगतच जमिन मिळेल. शेतक-यांना चौकोनी आकाराचे भुखंड देण्यात येईल. प्रत्येक प्लॉटला रस्ता देण्यात येईल अशी माहिती  श्री. गित्ते यांनी दिली.

या कार्यशाळेस पीएमआरडीएचे  नियोजनकार विजयकुमार गोस्वामी, पीएमआरडीएचे मुख्य अभियंता सुनिल वांढेकर, जिल्हा परिषद सदस्य बाजीराव सासकर,  पंचायत समिती सदस्य अनिल टिळेकर, राजीव भाडळे, सचिन घुले, ग्रामपंचायत सदस्य प्रविण कामठे, संदिप मोडक आणि  संबधित गावांचे सरपंच तसेच जमिनधारक शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.