Home Blog Page 3252

…तर राज्यातील हजारो अधिकाऱ्यांची पदावनती/डिमोशन

0

उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार

भगवानगड ऑफिसर्स अँड प्रोफेशनल्स असोसिएशन राज्य सरकारबरोबर याचिका दाखल करणार

पुणे, दि. 23 ऑक्टोबर : मागासवर्गीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे बढतीमधील आरक्षण रद्द करुन त्यांना मूळ पदावर नेमा, या उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे राज्यातील हजारो अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमधे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात 27 ऑक्टोबरपर्यंत याचिका दाखल करण्याची मुदत असून राज्य सरकारसोबत ‘भगवानगड ऑफिसर्स अँड प्रोफेशनल्स असोसिएशन’ या संघटनेनेही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी केली आहे.

बढतीमधील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने 4 ऑगस्ट रोजी दिला आहे. या निर्णयाचा दूरगामी परिणाम होणार आहे. राज्यातील हजारो अधिकारी आणि कर्मचारी यांना मूळ पदावर नेमावे लागेल. उदाहरणार्थ, पोलिस खात्यात आज प्रमोशनने डीवायएसपी किंवा एसीपी पदावर काम करणाऱ्या अधिकाऱ्याला परत पीआय म्हणून काम करावे लागेल. तर अन्य खात्यात अधीक्षक अभियंता किंवा कार्यकारी अभियंता म्हणून काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना कनिष्ठ अभियंता म्हणून मूळ पदावर पाठविण्यात येईल. हा निर्णय मागासवर्गीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर अन्यायकारक आहे. त्यामुळे त्याविरोधात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करणार आहे. याशिवाय महावितरण कंपनीमधील मागासवर्गीय संघटना, व्हीजेएनटी, एसबीसी ऑफिसर्स संघटना यांनीही सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याची तयारी केली आहे.

शिवाय आता अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाल्यामुळे राज्यातील वंजारी समाजाचे अधिकारी आणि कर्मचारीही ‘भगवानगड ऑफिसर्स अँड प्रोफेशनल्स एसोसिएशन’ या संघटनेच्या झेंड्याखाली एकत्र आले आहेत. सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांची पुण्यात नुकतीच एक बैठक झाली. विविध विभागात काम करत असलेल्या वंजारी समाजातील सनदी अधिकारी, वर्ग एकचे अधिकारी, उच्च पदस्थ अधिकारी, निवृत्त न्यायाधीश, वकील आदी या बैठकीला उपस्थित होते. उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय यावेळी एकमताने घेण्यात आला. सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी उच्च न्यायालयाने 27 ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली आहे. ही मुदत संपत आल्याने लगेचच विशेष याचिका दाखल करण्यात येणार आहे.

रेणके आयोग, इदाते समितीने दिलेल्या अहवालानुसार तसेच 2011 च्या जनगणनेनुसार एनटी प्रवर्गातील समाज हा एससी व एसटी प्रवर्गापेक्षाही सामाजिक व आर्थिकदृष्टया अधिक मागास असल्याचे नमूद करण्यात आले आहे. अशा परिस्थितीतही उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे प्रभावित होणाऱ्या सर्वच घटकांमधे भीती आणि निराशेचे वातावरण आहे.

‘हास्यदीपावली 2017’ व्‍यंगचित्र प्रदर्शन नाशकात

0

पुणे-  ‘कार्टूनिस्ट्स कम्बाईन’ या अखिल भारतीय व्यंगचित्रकारांच्‍या संघटनेच्‍यावतीने नाशिक येथे ‘हास्यदीपावली 2017’ हे व्‍यंगचित्र प्रदर्शन भरवण्‍यात येणार आहे.  दिनांक 28 ऑक्‍टोबर ते 30 ऑक्‍टोबर असे तीन दिवस हे प्रदर्शन कुसुमाग्रज स्मारकात सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत सुरु राहील.

आजपर्यंत पुणे, नांदेड, नागपूर, मुंबई अशा ठिकाणी संमेलने व अनेक ठिकाणी व्यंगचित्र प्रदर्शने झाली आहेत. नाशिक येथे संस्थेचे हे पहिलेच व्यंगचित्र प्रदर्शनआहे.  ‘हास्यदीपावली  2017’ या व्‍यंगचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवार दिनांक 28 ऑक्‍टोबर रोजी सकाळी 11.30 वाजता ज्येष्ठ व्यंगचित्रकार  प्रभाकर झळके यांच्या हस्ते होणार आहे.   यावेळी विवेक मेहेत्रे, चारुहास पंडित, संजय मिस्त्री, घनश्याम देशमुख, विनय चानेकर, रवींद्र बाळापुरे, अनंत दराडे, अवि जाधव, भटू बागले, दिनेश धनगव्हाळ, अरविंद गाडेकर, राजेंद्र सरग व इतर व्यंगचित्रकार उपस्थित असतील. तब्बल 50  व्यंगचित्रकारांची व्यंगचित्रे, 25हून अधिक व्यंगचित्रकारांचा प्रत्यक्ष सहभाग, नामवंत व्यंगचित्रकारांची भाषणे, प्रात्यक्षिके, मार्गदर्शन असा हा तीन दिवसांचा भरगच्च कार्यक्रम आहे. रसिकांना या व्यंगचित्रकाराबरोबर संवाद साधता येईल.

‘कार्टूनिस्ट्स कम्बाईन’ हे अखिल भारतीय व्यंगचित्रकारांचे व्‍यासपीठ आहे.  मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेतून व प्रभाकर ठोकळ, शि. द. फडणीस, वसंत सरवटे, श्याम जोशी, प्रभाकर झळके  यांसारख्या मान्यवर व्यंगचित्रकारांच्‍या उपस्थितीत व्यंगचित्रकलेच्या संवर्धनासाठी  या संस्थेची स्थापना झाली. महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेरही कार्यरत असलेले विविध तरुण व ज्‍येष्‍ठ व्यंगचित्रकार या संस्थेचे सदस्यआहेत.

पुणे फुटबॉल लीग स्पर्धेत फिनआयक्यू, व्होबा संघांची आगेकूच -प्रकाश थोरातची हॅट्ट्रिक कामगिरी

0

पुणे- पुणे जिल्हा फुटबॉल  संघटना(पीडीएफए)यांच्या तर्फे आयोजित पुणे फुटबॉल लीग(2017-18) स्पर्धेत तृतीय श्रेणी गटात फिनआयक्यू जीओजी, व्होबा या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून आगेकूच केली.

पीडीएफएच्या ढोबरवाडी येथील मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत तृतीय श्रेणी गटात पहिल्या सामन्यात फिनिक्यू जीओजी एफसी संघाने टेलीकॉम स्पोर्ट्स क्लबचा ९-० असा धुव्वा उडविला. विजयी संघाकडून प्रकाश थोरात(७,२९,३६मि.), भुवनेश पिल्ले(३२, ४०, ४३मि.)यांनी प्रत्येकी तीन गोल, श्रीकांत मलंगिरीने दोन, कार्तिक राजूने एक गोल केला.

व्होबा संघाने नॅशनल युथ फुटबॉल अकादमीचा ३-२ असा संघर्षपूर्ण पराभव केला. जायंट्स ब व  थंडरकॅट्ज ब यांच्यातील सामना २-२ असा बरोबरीत सुटला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: गटसाखळी फेरी: तृतीय श्रेणी गट: 

फिनिक्यू जीओजी एफसी: ९(प्रकाश थोरात ७मि.पास-कार्तिक राजू, श्रीकांत मलंगिरी ८मि.,प्रकाश थोरात २९मि.पास-अर्शद मुल्ला, भुवनेश पिल्ले ३२मि.,प्रकाश थोरात ३६मि.पास-श्रीकांत मलंगिरी, भुवनेश पिल्ले ३८मि., श्रीकांत मलंगिरी ४०मि.पास-कार्तिक राजू, कार्तिक राजू ४२मि.पास-भुवनेश पिल्ले, भुवनेश पिल्ले ४३मि.)वि.वि.टेलीकॉम स्पोर्ट्स क्लब: ०;

व्होबा: ३(रेयान जे १३मि.पास-ऍरोन डिसिल्वा, रेयान जे ३४मि.(सोलो), जितेंद्र ललवानी ४०मि.पास-डॅनियल डिसूजा)वि.वि.नॅशनल युथ फुटबॉल अकादमी: २(अजिंक्य शिंदे ३५मि., अमित निलपाणी ३७मि.पास-कपिल गौरव);

जायंट्स ब: २(निलेश वर्मा २१मि.पास-शगुन पाटील,वर्जिवन दस्तूर २९मि.)वि.वि.थंडरकॅट्ज ब: २(रोहन ३२मि., रुपेश के. ३७मि.);

लिजेंड्स युनायटेड एफसी: ० बरोबरी वि.एएफए सॅमफोर्ड: ०.  

दिलीप कांबळेना डच्चू देवून टिळेकरांना मंत्रिपद देणार ?

0

पुणे : घाबरायला मी काय ब्राम्हण आहे काय ? अशा वक्तव्याचा फटका आता मंत्रिमंडळाच्या फेरबदल -विस्तारात सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांना बसेल आणि त्यांच्या ऐवजी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आणि हडपसरचे आमदार योगेश टिळेकर यांचा संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात समावेश होणार असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. दरम्यान उद्या होणाऱ्या बैठकीसाठी आज सायंकाळी पालकमंत्री गिरीश बापट मुंबईला रवाना होत असून याप्रकरणी त्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होण्याची शक्यता वर्तविली जाते आहे .पुण्याच्या राजकीय दृष्टीकोनातून मुख्यमंत्री ,पालकमंत्री आणि महापौर अशी तिन्ही महत्वाची पदे ब्राम्हण समाजाकडे आहेत, कांबळे यांना डच्चू दिला तर मागासवर्गीय समाजावर त्याचा काही परिणाम होईल काय ,याची चाचपणी करणे गरजेचे आहे काय ? या प्रश्नावरही खल होतो आहे .

पुण्यातील भाजपचे ज्येष्ठ कार्यकते आणि आमदार गिरीश बापट व दिलीप कांबळे यांच्याकडे मंत्रिपदे आहेत.शहराला आताच 2 मंत्री आहेत .हडपसर कचरा डेपो प्रकरणी , आणि येवलेवाडी विकास आराखड्याप्रकरणी टिळेकर यांनी महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे . तर कात्रज कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणासाठी देखील ते विशेष मेहनत घेत आहेत .तर दुसरीकडे गेल्या मार्च महिन्यात लातूर येथे दिलीप कांबळे यांनी केलेले वक्तव्य भाजपमधील काही मंडळींनी बरेच मनावर घेतलेले दिसते आहे . या पार्श्वभूमीवर कांबळे यांना आता मंत्रीपदावरून मुक्त केले जाईल असे काहींचे मत आहे . तर टिळेकर यांच्या मंत्रीपदाची चर्चा व्हाटसएप वरून रंगते आहे .पिंपरीतून पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे आणि आता भाजपचे लक्ष्मण जगताप व महेश लांडगे हे देखील ताकद मिळावी म्हणून मंत्रिपदासाठी प्रयत्नशील आहेत. नव्या चेहऱ्यांचा समावेश करण्याचे फडणवीस यांनी ठरविले असले तरी विद्यमान मंत्रिमंडळातील कोणाला डच्चू देणार ?यावर बरीच समीकरणे असल्याचे बोलले जाते .यापूर्वी पुण्यातून प्रकाश ढेरे , रमेश बागवे,वसंत चव्हाण  दिलीप कांबळे , बाळासाहेब शिवरकर , चंद्रकांत छाजेड ,शशिकांत सुतार  यांनी पुणे शहरातून राज्यमंत्री म्हणून काम केले आहे .  मात्र त्यांना पाच वर्षे मंत्रीपदावर  राहू देण्यात आले नही .. त्यामुळे सध्या मंत्रिमंडळात असलेले गिरीश बापट आणि दिलीप कांबळे यांना सलग पाच वर्षे मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मिळणार का, याबाबत उत्सुकता आहे.

केरळी बांधवानी सामाजिक बांधिलकी जोपासली

0

पुणे-रास्ता पेठमधील अय्यप्पा मंदिराच्यावतीने पुणे महापालिकेच्या सफाई कर्मचारी बांधवाना मिठाई व दिवाळी फराळ देउन केरळी बांधवानी सामाजिक बांधिलकी जोपासली . गेले दहा वर्षांपासून हा सामाजिक उपक्रम राबविला जातो . यावेळी अय्यप्पा मंदिराचे अध्यक्ष जनार्दन पॊदूवल , राजेश पॊदूवल ,  नगरसेवक विशाल धनावडे , तेजेंद्र कोंढरे , उपाध्यक्ष व्ही. सुब्रमण्यम अय्यर , सचिव महेश पॊदूवल , सहसचिव पी . शशांक नायर , सदस्य विजय पॊदूवल , एम. पी. नायर , के. विजयकुमार , जयंती नायर , के. एस. आर. नायर , व्ही. एस. पिलाई , राजेश पॊदूवल ,  माधवन नंबियार , सुरेश नायर , मोहनदास नायर , जगदीश पॊदूवल आदी म्णायवर उपस्थित होते .

भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाचे स. गो. बर्वे शाळेमधील कोठीमधील मुकादम राजू पेटाडे , सॅनिटरी इन्स्पेकटर समीर मसुरकर , डेप्युटी सॅनिटरी इन्स्पेकटर राम सोनवणे , सफाई कामगार राजेश कुचेकर , अनिल वाघमारे , संजय सकट , उत्तम दस्तुरे , भरत सकट आदी कामगारांना मिठाई वाटप करण्यात आली .

यावेळी नगरसेवक विशाल धनावडे यांनी सांगितले कि , गेल्या दहा वर्षांपासून केरळी बांधव महापालिकेच्या सफाई कर्मचारी बांधवाना मिठाई वाटप करून आपली दिवाळी साजरी करून सामाजिक बांधिलकी जोपासत आहे . सफाई कर्मचारी आपला परिसर स्वछ ठेवून आपली आरोग्याची काळजी घेत असतात . त्यांच्या जीवनात अशा कार्यक्रमातून त्यांनी आनंद निर्माण केला आहे .

रिंकू राजगुरू पुन्हा मराठी चित्रपटात

0
रिंकू राजगुरूनं सैराट या चित्रपटातील आर्ची या भूमिकेतून आपल्या रावडी अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. सैराटला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर  अवघ्या महाराष्ट्राला प्रतीक्षा आहे, तिच्या पुढच्या चित्रपटाची… आता दिवाळीच्या मुहूर्तावर रिंकूच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. रिंकू राजगुरू लवकरच एका मराठी चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रिंगण या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाचा दिग्दर्शक मकरंद माने याच्या नव्या चित्रपटात रिंकू महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
दिवाळीच्या मुहूर्तावर या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. अद्याप या चित्रपटाचं नाव गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. मात्र, सर्वांना भावेल असं कथानक या चित्रपटात पहायला मिळणार आहे. सोबतच श्रवणीय संगीताची पर्वणीही असेल. उदाहरणार्थ निर्मित या निर्मिती संस्थेचे सुधीर कोलते आणि विकास हांडे या चित्रपटाची निर्मिती करत आहे. सुधीर कोलते यांनी या पूर्वी ‘चिडिया’ या हिंदी चित्रपटाची निर्मिती केली आहे. त्यात विनय पाठक यांची प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं ते मराठी चित्रपट निर्मितीमध्ये पदार्पण करत आहेत.
मकरंद आणि रिंकू या दोघांना एकाच वेळी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तसंच मकरंद आणि रिंकू दोघंही अकलूजचे आहेत. मकरंदचा ‘रिंगण’ हा चित्रपट राष्ट्रीय पुरस्कारासह अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरवला गेला आहे.
चित्रपटाविषयी माहिती देताना मकरंद म्हणाला, ‘चित्रपट सर्वांना भावेल अशी मला खात्री वाटते. आपण जेव्हा एखाद्या कथेची मांडणी करत असतो, तेव्हा त्यातील पात्र असू देत किंवा इतर गोष्टी या चित्र स्वरूपात आपण पाहण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्यानुसार त्या सर्व बाबींचा शोध सुरू होतो. रिंकूच्या रूपाने या कथेच्या नायिकेचा शोध पूर्ण झाला. चित्रपटाची गोष्ट ऐकून तिनंही तत्काळ चित्रपटात काम करण्यासाठी होकार दिला. तिनं या चित्रपटात काम करणं ही आमच्या टीमसाठी आनंदाची बाब आहे.’
‘मकरंदचा रिंगण हा चित्रपट आम्ही पाहिला होता. त्याची गोष्ट सांगण्याची पद्धत विलक्षण आहे. त्याला चित्रपट हे माध्यम नेमकं माहीत आहे. त्यामुळे त्यानं या चित्रपटाचं कथानक ऐकवल्यावर आम्हाला ते आवडलं. आजुबाजूला घडणारं वातावरण संवेदनशील पद्धतीनं या चित्रपटात मांडलं जाणार आहे,’ असं निर्माते सुधीर कोलते यांनी सांगितलं.

बनारस घराण्याचे रंग उलगडणारी ‘उन्मुक्त’ मैफल

0
तालायनतर्फे आयोजन, दिग्गज कलावंताचे सादरीकरण एकाच व्यासपीठावर
पुणे  : पद्मविभूषण पं. किशनमहाराज यांचे ९५ वे जयंतीवर्ष तसेच प्रसिद्ध तबलावादक पं. अरविंदकुमार आजाद यांचा ५० वा जन्मदिन असे दुहेरी औचित्य साधून तालायन म्युझिक सर्कलतर्फे ‘उन्मुक्त’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या रविवारी (दि.२९) बालगंधर्व रंगमंदिर येथे सायंकाळी ५.३० वाजता ही मैफल पार पडेल.
बनारस शहराला अभिजात शास्त्रीय कलेचा वारसा लाभला असून अनेक दिग्गज कलावंत या शहरातून घडले आहेत.अशा बनारस घराण्याच्या कलेची अनुभूती घेण्याचा दुर्मिळ योग म्हणजे उन्मुक्त मैफल असे म्हणता येईल. गायन, वादन आणि नृत्य यांचा त्रिवेणी संगम जणू एकाच व्यासपीठावर घडवणाऱ्या ज्येष्ठ व श्रेष्ठ कलाकारांचे सादरीकरण हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असेल. कथक सम्राट पं. विशाल कृष्णा यांचा नृत्याविष्काराने या मैफलीस आरंभ होईल. त्यानंतर प्रसिद्ध गायक पद्मभूषण पं. राजन साजन मिश्रा आपल्या गायकीतून पं किशन महाराज यांना स्वरांजली अर्पण करतील. तर ठुमरी सम्राज्ञी अशी सर्वदूर ख्याती असलेल्या सुप्रसिद्ध गायिका पद्मविभूषण गिरीजादेवी यांच्या सुमधुर स्वरांजलीने  कार्यक्रमाची सांगता होईल.
प्रसिद्ध तबलावादक पं अरविंदकुमार आझाद यांच्या साथीने कार्यक्रमाची रंगत वाढेल. तर पं. धरमनाथ मिश्रा आणि देवेंद्र देशपांडे (संवादिनी), पं. संतोष मिश्रा (सारंगी), रोहित वनकर (बासरी), सुरंजन खंडांळकर (गायन) यांसारखे नामवंत कलाकार साथसंगत करतील. सूर ताल आणि पदन्यास यांच्या सुरेल मिलाफ साधणारी ‘उन्मुक्त’ मैफल रसिक पुणेकरांसाठी पर्वणी ठरेल, असा विश्वास आयोजकांकडून  व्यक्त करण्यात येत आहे.

स्वप्निल राजशेखरचा नवा अवतार

0

घरातच अभिनयाचं बाळकडू लाभलेल्या अभिनेता स्वप्निल राजशेखर यांनी आजवर विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. यापैकी काही कायम स्मरणात राहणाऱ्या ठरल्या आहेत. नायक, खलनायक तर कधी चरित्र व्यक्तिरेखांमध्ये दिसणारे स्वप्निल राजशेखर माझा एल्गार या आगामी मराठी चित्रपटात पुन्हा एका नव्या रूपात दिसणार आहेत. दिग्दर्शक मिलिंद कांबळे यांनी दिग्दर्शित केलेल्या माझा एल्गारची निर्मिती सौरभ आपटे यांनी केली असून, सद्गुरू फिल्म्सच्या बॅनरखाली श्रीकांत आपटे हा चित्रपट प्रस्तुत करीत आहेत. १० नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या चित्रपटाने स्वप्निलला पुन्हा एकदा त्याच्या अभिनयाचा कस लावणारी भूमिका दिली आहे. स्वप्निलने यात एका महंताची भूमिका साकारली असून, वरवर पाहता जनतेच्या हिताची कामं करणारा हा महंत खरं तर या चित्रपटाचा खलनायक आहे. गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी लुबाडणं आणि आध्यात्मिकतेच्या नावाखाली बुवाबाजी करणं हा महंत महाराजचा खरा धंदा असतो. या व्यक्तिरेखेला स्वप्निल राजशेखर योग्य न्याय देऊ शकेल असं वाटलं आणि त्यांनी होकार दिल्याने मनाजोगत्या कलाकारासोबत काम करण्याचं समाधान लाभल्याचं दिग्दर्शक मिलिंद कांबळे सांगतात. या भूमिकेसाठी स्वप्निल यांनी वेगळा गेटअप केला आहे. पांढरा पोषाख, कमरेला उपरणं, लांब केस, कपाळावर सूर्यरूपी कुंकू, गळ्यामध्ये रूद्राक्षांच्या माळा, दोन्ही हातांच्या बोटांमध्ये अंगठ्या, हाती जपमाळा अशा अवतारात स्वप्निल या चित्रपटात दिसणार आहे. वाचिक अभिनयासोबतच नेत्रअभिनयाद्वारे स्वप्निलने या व्यक्तिरेखेत गहिरे खलनायकी रंग भरण्याचा प्रयत्न केला आहे.

ऐश्वर्या राजेश, यश कदम, अमोल रेडीज, अर्चना जोशी, ऋचा आपटे, गंधार जोशी, प्रफुल्ल घाग, राजकिरण दळी, गोपाळ जोशी, सचिन सुर्वे, नितीन जाधव, पूजा जोशी, वैदेही पटवर्धन, डॉ भगवान नारकर आदि कलाकारांनी या चित्रपटात विविध भूमिका साकारल्या आहेत.  दिग्दर्शक मिलिंद कांबळे यांनीच माझा एल्गार चित्रपटाची कथा लिहीली असून, पटकथा आणि संवाद चेतन किंजळकर यांनी लिहिले आहेत. १० नोव्हेंबरला माझा एल्गार प्रदर्शित होणार आहे.

मकरंद बनला मुंबईचा डबेवाला

0

‘मॅनेजमेंट गुरू’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतील डबेवाल्यांनी जागतिक पातळीवरही आपल्या कार्याचा ठसा उमटवत जगासमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. लंडनच्या प्रिन्सनेही ज्यांची दखल घेतली अशा मुंबईतील डबेवाल्यांनी आजवर भुकेल्या मुंबईकरांना वेळेवर जेवणाचा डबा पोहोचवून त्यांची क्षुधाशांती केली आहे. आता हाच डबेवाला मराठी सुपरस्टार मकरंद अनासपुरेंच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विनोदी अभिनयासोबतच आपल्या धीरगंभीर भूमिकांद्वारे कधी हसवणाऱ्या तर कधी अंतर्मुख होऊन विचार करायला लावणाऱ्या अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी आजवर विविध भूमिका साकारल्या आहेत.Thank U विठ्ठला या आगामी मराठी चित्रपटात मकरंद मुंबईच्या डबेवाल्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. एम.जी.के. प्रोडक्शनची प्रस्तुती तसेच गोवर्धन काळे, गौरव काळे व अंजली सिंग यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन देवेंद्र जाधव यांनी केलं असून, या चित्रपटाची कथादेखील त्यांचीच आहे. चित्रपटाचे सहनिर्माते एम.सलीम असून पटकथा ही त्यांचीच आहे. ३ नोव्हेंबरला Thank U विठ्ठला प्रदर्शित होणार आहे.

या भूमिकेच्या माध्यमातून डबेवाल्यांच्या अनोख्या विश्वाचा वेध घेतला जाणार आहे. एकसंध राहात सामाजिक व धार्मिक उपक्रमांमध्येही हिरीरीने सहभागी होणाऱ्या मुंबईतील डबेवाल्यांचं प्रतिनिधीत्व करणारी भूमिका साकारताना आजवर केलेल्या कामापेक्षा काहीतरी खूप वेगळं केल्याचं समाधान लाभल्याची भावना मकरंद यांनी व्यक्त केली आहे. कंटाळवाणं दैनंदिन जीवन जगणाऱ्या मकरंदने साकारलेल्या डबेवाल्याला भगवान विठ्ठलाची साथ लाभल्यानंतर त्याच्यात काय बदल होतात आणि त्यानंतर त्याचा जीवनप्रवास कसा सुखकर होतो ते Thank U विठ्ठला  या चित्रपटात पाहायला मिळेल.

या चित्रपटात मकरंदच्या जोडीला महेश मांजरेकर, दीपक शिर्के, कमलेश सावंत, स्मिता शेवाळे, सुनील गोडबोले, प्रदीप पटवर्धन, किशोर चौघुले, जयवंत वाडकर, योगेश शिरसाट, अभिजीत चव्हाण, मौसमी तोंडवळकर, पूर्वी भावे, तेजा देवकर, याकूब सय्यद, अरुण घाडीगावकर, अरुण टकले, संतोष केवडे, मिलिंद सफई, सतिश सलागरे, संग्राम सरदेशमुख, राजेंद्र जाधव, शैलेश पितांबरे, अंतून घोडके, आनंद जोशी, अमीर शेख, मनीषा राऊत, शिवा व बालकलाकार वरद यांच्या भूमिका आहेत. संवाद एम.सलीम व योगेश शिरसाट यांचे आहेत. चित्रपटाला रोहन-रोहन यांच संगीत लाभलं आहे. छायांकन दिनेश सिंग तर संकलन अजय नाईक यांचं आहे. कलादिग्दर्शन अनिल गुंजाळ यांनी केलं असून वेशभूषा लक्ष्मण गोल्लार यांची आहे. ग्राफिक्स अरविंद हतनुरकर यांचं तर साऊंड इंजिनिअर विजय भोपे आहेत. नृत्यदिग्दर्शन गणेश आचार्य यांनी केले आहे. कार्यकारी निर्माते जितेंद्र कुलकर्णी आहेत.

परदेशी पक्षांच्या १५० प्रजाती आणि माशांच्या ५० जाती-भारतातील पहिले ‘वर्ल्ड ऑफ विंग्ज २०१७’ हे अनोखे पक्षी प्रदर्शन पुण्यात

0

पुणे- येथील आर्यन वर्ल्ड शाळेने भारतातील पहिले ‘वर्ल्ड ऑफ विंग्ज २०१७’ हे अनोखे असे प्रदर्शन आयोजित केले आहे. त्यात १५० परदेशी पक्षी आणि ५० जातींचे मासे यांचा समावेश असणार आहे. त्याशिवाय ‘विंग्ज ऑफ स्काय आणि वॉटर’च्या कित्येक जाती पहिल्यांदाच पुणे येथील या प्रदर्शनात असणार आहेत. हे प्रदर्शन गणेश कला क्रीडा हॉल, स्वारगेट, पुणे येथे २५ ते २९ ऑक्टोबर २०१७दरम्यान सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे आणि ते दररोज खुले असणार आहे.

या प्रदर्शनाचे उद्घाटन श्री संभाजीराजे भोसले हे २५ ऑक्टोबर २०१७ रोजी सकाळी ११ वाजता करणार आहेत. या पवित्र क्षणी गडकिल्ले आणि त्यांच्या कथांची आणि संवार्धानांची पुस्तके दुर्गवीर प्रतिष्ठानला सुपूर्द केली जातील. पुण्याच्या महापौर मुक्ताताई टिळक यासुद्धा यावेळी उपस्थित राहणार आहेत. आयोजकांच्या म्हणण्यानुसार या प्रदर्शनात परदेशी पक्षांच्या १५० जाती आणि माशांच्या ५० जाती असतील. त्याशिवाय लोकांकडून दुर्लक्षित पक्षी आणि प्राणीसुद्धा या प्रदर्शनात असतील. हे प्रदर्शन सर्व दिवशी सकाळी १० ते रात्री ९ या कालावधीत खुले राहील.

सामाजिक हेतूने आयोजित असलेले हे प्रदर्शन कित्येक महत्वपूर्ण पक्षांच्या अनेकानेक जाती लोकांसमोर मांडतील. त्यांत सन कोनुर-६, आफ्रिकन ग्रे-३, ब्ल्यू गोल्ड मकाऊज-२, ग्रीन विंग मकाऊज-२, स्कार्लेट मकाऊ-२, सेनेगल पॅरट-४, यलो सायडेड कोनुर-६, सीनमोन कोनुर-६, गाला कोकटू-२, नांदाय कोनुर-६, कोकटेल बर्ड-१२, कानारी-३, सल्फर कोकटू-६, लोरीकीट-४, रोसेल्ला-४, अॅमाझोन पॅरट ६, इक्लेकट्स पॅरट-४, आफ्रीकन लव्ह बर्डस-२४, बडगेरीगर-६, गुल्डीयन-१२, पॅरटलेटस-५, क्वेकर पॅरट -६, पॅराकीट-६, स्प्लेंडीड पॅराकिट-६, बुर्क पॅराकिट -६, नेकेड आय कॉकॅटू -६,मौलुक्कन कॉकॅटू -४, हान्स मकाऊ -२, नॉर्मल क्वॉलीस -५, लेडी अॅमरहेस्ट फीझंट -२, झेब्रा फिंच -५०, आफ्रिकन गोल्डन ब्रेस्टेड फिंच -५०, जावा फिंच – ५०, रेड आयब्रोवड आफ्रिकन फिंच – ५०, आऊल फिंच – ५०, गोल्डन फिझंट -२, ब्लीडींग हार्ट डोव्ह-३, तुर्को डोव्ह -२, मंडारीन डक्स -२, पॅरट फिंच -३०, व्हीक्टोरीया क्राऊन्ड पिजन हे संपूर्ण भारतभर आढळणारे पक्षी यांत असतील. विविध पिसांचे आणि प्रकारातील हे पक्षी म्हणजे डोळ्यांसाठी एकप्रकारची मेजवानीच असेल. त्याशिवाय या आयोजनामध्ये १० अॅक्वेरीयममध्ये परदेशी मासे असतील तर छायाचित्रांच्या गॅलरीमध्ये भारतीय वन्यजीवनातील कित्येक दुर्मिळ पक्षीही असतील.

हे प्रदर्शन म्हणजे शाळेचे संस्थापक मिलिंद लाडगे यांच्यासाठी स्वप्न प्रत्यक्षात उतरण्यासारखे असेल. मिलिंद यांना लहानपणापासूनच पक्षी आणि प्राण्यांची खूप आवड आहे आणि त्यांचे असे मानणे आहे की अशाप्रकारच्या जनजागृतीमुळे अधिक उत्सुकता निर्माण होते आणि त्यातून संबधित गोष्टींना चालना मिळते. पुणेकरांमध्ये विविध प्रकारचे पक्षी आणि मासे यांबाबत जागृती निर्माण करण्याचे काम ते करत आले आहेत.

या प्रदर्शनाच्या माध्यमातून पक्षी आणि मासे यांच्या वैविध्यपूर्ण जातींबद्दल माहिती मिळविण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. त्याशिवाय या भल्या मोठ्या कामामागील जे प्रयत्न आणि आर्थिक गुंतवणूक आहे, तीसुद्धा लोकांसमोर येणार आहे. या सर्व गुंतवणुकीमुळे या प्रदर्शनासाठी प्रवेशशुल्क ठेवणे अनिवार्य झाले आहे. या प्रचंड अशा कामाला प्रोत्साहन मिळावे म्हणून सर्वांना या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. त्यांनी या प्रदर्शनामागील हेतूला पाठबळ द्यावे अशी अपेक्षा आहे कारण अशा संधी वारंवार येत नसतात.

या अत्यंत आगळ्या अशा प्रदर्शनासाठी प्रवेशमूल्य प्रौढ व्यक्तींसाठी ८० रुपये आणि शालेय विद्यार्थ्यांसाठीसाठी ५० रुपये एवढे असेल.

वेळ – सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत (२५ ते २९ ऑक्टोबर)

केदार शिंदेचा नवा सिनेमा “रंगीला रायबा”

0
आजपर्यंत एकापेक्षा एक  कलाकृती साकारल्यानंतर प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे *रंगीला रायबा* हा एक नवा चित्रपट घेऊन येत आहेत.
     नुकतेच दिवाळीच्या शुभमुहूर्तावर *रंगीला रायबा* चे कलरफुल पोस्टर सोशल मिडिया वर प्रसिद्ध करण्यात आले. Atitude is everything अशी टॅगलाईन असलेला हा चित्रपट  आहे.
     दक्षिणेतील चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चित्रपट वितरक विजय बाबू डी. यांची श्री. विजय साई प्रॉडक्शन ही संस्था आणि या पोस्टरमध्ये दिसणारे फ्रेश चेहरे आल्हाद आणि राधिका हे  *रंगीला रायबा* या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत.
रंगतदार पोस्टर आणि हटके नाव यामुळे *रंगीला रायबा* सोशल मिडिया वर  viral झाला आहे.
  केदार शिंदे दिग्दर्शित रंगीला रायबा ची कथा त्रिनधा राव यांनी तर पटकथा चिन्मय कुलकर्णी यांची आहे तसेच चिन्मय कुलकर्णी सोबत चेतन डांगे यांनी या चित्रपटाचे  संवाद लिहिले आहेत,  छायालेखन सुरेश देशमाने तर संकलन मनिष मिस्त्री यांनी केले आहे. संगीत पंकज पडघन आणि निषाद तर पार्श्वसंगीत शेखर चंद्रा यांचे आहे. कार्यकारी निर्माता सुरेश शिंदे आहेत.
कलरफुल दिवाळीत प्रदर्शित झालेल्या कलरफुल पोस्टर वरचा हा *रंगीला रायबा* १० नोव्हेंबर पासून  येत आहे.

मुख्यमंत्र्यांच्या साथीनेच मनसे ची गुंडागर्दी -संजय निरुपम

0

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई-ठाण्यातील रेल्वे स्थानकांबाहेरील फेरीवाल्यांविरोधात खळ्ळ खट्यॅक केल्यानंतर काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी  मनसे कार्यकर्त्यांनी फक्त परप्रांतीय फेरीवाल्यांविरोधातच आंदोलन चालविले आहे , आणि मनसे ची हि गुंडागर्दी मुख्यमंत्री पाठीशी असल्याने ,त्यांच्या मूक सहमतीनेच चालू असल्याचा आरोप  केला आहे . 

संजय निरुपम  मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. 15 दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी खुलेआमपणे धमकी दिली. कायदा, मुख्यमंत्री यांना खुलं आवाहन दिलं. मात्र मुख्यमंत्री बांगड्या भरुन बसले आहेत. त्यांनी 15 दिवसांत कोणतीही कारवाई केली नाही, असं निरुपम म्हणाले.मनसेच्या कार्यकर्त्यांनी गरीब आणि परप्रांतीय फेरीवाल्यांवर हल्ला चढवला. मात्र पोलिस बघ्याच्या भूमिकेत होते. मनसेच्या गुंडगिरीचं मुख्यमंत्र्यांनी समर्थनच केल्याची टीका निरुपम यांनी केली.

 

 

गरीब फेरीवाल्यांवर हल्ला करण्यापेक्षा सीमेववर देशाच्या दुष्मनांशी लढा- रामदास आठवले

0

मुंबई-– शिवसेनेने भाजपा सोबत वाद करू नये असा सल्ला देत ;  केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी  गोरगरीब फेरीवाल्यांवर दादागिरी करीत त्यांच्यावर हल्ला करण्यापेक्षा मनसैनिकांनी लष्करात जाऊन सीमेववर  देशाच्या दुष्मनांशी लढावे. गरीब फेरीवाल्यांवर हल्ला झाला तर भीमसैनिक मनसैनिकांना चोख उत्तर देतील असा इशारा  दिला.

एल्फिन्स्टन रोड स्थानकातील पुलावरील चेंगराचेंगरीत २३ जणांचा मृत्यू झाल्यानंतर महाराष्ट नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी रेल्वे पूल आणि परिसरातील फेरीवाल्यांना हटवण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली होती. शनिवारी १५ दिवसांची मुदत संपल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी कुर्ला, ठाणे, घाटकोपर, कल्याण अशा विविध ठिकाणी फेरीवाल्यांना हुसकावून लावले होते.या पार्श्वभूमीवर आज मिरारोड येथील हॉटेल सनशाईन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत रामदास आठवले बोलत होते. यावेळी रिपाइंचे मिरा भाईंदर जिल्हा अध्यक्ष देवेंद्र शेलेकर, रिपाइंचे राष्ट्रीय सचिव सुरेश बरशिंग, मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे, हेमंत रणपिसे, नगरसेविका रुपाली शिंदे, मदन मनवर आदी मान्यवर उपस्थित होते.

आठवले म्हणाले की, फेरीवाल्यांमुळे होणाऱ्या त्रासाबद्दल तक्रार पोलीस आणि प्रशासनाला करता येऊ शकते. त्यांच्यावर प्रशासन कारवाई करेल मात्र मनसेने कायदा हातात घेऊ नये. मनसैनिकांनी गरीब फेरीवाल्यांवर दादागिरी करीत हल्ले करू नये. फेरीवाल्यांवर ज्या मनसैनिकांनी हल्ले केले आहेत. त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी असे सांगत गरीब फेरीवाल्यांच्या रक्षणासाठी भीमसैनिक आणि आरपीआयचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील असा इशाराही रामदास आठवले यांनी दिला आहे. सामान्य जनतेतील 70 टक्के लोक फेरीवाल्यांकडूनच वस्तू घेतात. सरकारने ही फेरीवाल्यांबद्दल निश्चित धोरण ठरविले पाहिजे. दिल्लीत फेरीवाल्यांना मान्यता आहे. तशीच सन 2014 च्या निवडणुकीत मतदान केलेल्यांच्या झोपड्या पात्र ठरवाव्यात या मागणीप्रमाणेच सन 2014 पर्यंतचे फेरीवाले अधिकृत करण्यात यावे अशी रिपाइंची मागणी असल्याचे रामदास आठवले म्हणाले. भाजपा शिवसेनेने वाद करू नये आगामी निवडणुकांमध्ये भाजपा शिवसेनेने एकत्र येऊन निवडणूक लढावी असा सल्ला रामदास आठवलेंनी दोन्ही पक्षांना दिला. आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपा सोबत रिपब्लिकन पक्षाची युती होणार असून जास्तीत जास्त दलित मतदान भाजपाला मिळवून देण्यासाठी रिपाइं भाजपा सोबत राहील असेही रामदास आठवले यांनी यावेळी सांगितले.

प्रभास अपने जन्मदिन पर अपने प्रसंशको को देंगे खास तोहफ़ा!

0
बाहुबली सुपरस्टार प्रभास का जन्मदिन अब बस कुछ ही दिन दूर है और हर बार प्रसंशको द्वारा उनका जन्मदिन एक त्योहार की तरह धूमधाम से मनाया जाता है।

लेकिन इस बार प्रभास ने अपने प्रसंशको के लिए एक बेहद ही खास सरप्राइज प्लान किया है। यह सरप्राइज प्रभास को अपने प्रसंशको से मिलने वाले प्यार का धन्यवाद करने का एक तरीका है।

इस खास मौके पर अपने जन्मदिन से महज कुछ घंटे पहले अभिनेता अपने सोशल मीडिया पर कुछ ऐसा पोस्ट करेंगे जिससे प्रभास के प्रसंशको दिल बागबाग़ हो जाएगा और इस साल का यह जन्मदिन उनके लिए और भी खास बन जाएगा।

लेकिन तब तक उनके प्रसंशको को करना होगा थोड़ा इंतेज़ार और अनुमान लगाते रहिये कि आखिर प्रभास से मिलने वाला ये सरप्राइज है क्या!

वही हर साल की तरह इस साल अभिनेता के प्रसंशक उनके जन्मदिन को खास बनाने की तैयारियों में जुट गए है और एक बार फिर अभिनेता के प्रति अपना प्यार जाहिर करने के लिए तयार है।

साईनाथ मंडळ ट्रस्ट तर्फे खडकी येथील अपंग सैनिक पुर्नवसन केंद्रात अनोखी भाऊबीज

0

पुणे-सिमेवर शत्रूंच्या गोळ्यांचा सामना करण्यासाठी सज्ज असताना अपंगत्व आलेल्या सैनिकांना नृत्यवंदनेतून सलाम करत   चाकाच्या खुर्चीवर कायमचे बसून आयुष्याची दुसरी लढाई लढणा-या ‘या’भावांना प्रेमाने औक्षण करण्यासोबतच लाडूचा घास भरवित साईनाथ मंडळ ट्रस्ट आणि सैनिक मित्र परिवाराने भाऊबीज साजरी केली.
 खडकी येथील अपंग सैनिक पुर्नवसन केंद्रांतील सैनिकांसाठी  कलाकारांसोबत भाऊबीज या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .. यावेळी ज्येष्ठ भरतनाटयम नृत्यांगना स्वाती दैठणकर, नुपूर दैठणकर यांनी सैनिकांना औक्षण करुन त्यांच्याशी संवाद साधला. केंद्राचे प्रमुख पी.आर.मुखर्जी, कर्नल बी.एल.भार्गव, ट्रस्टचे अध्यक्ष पीयुष शहा, सैनिक मित्र परिवाराचे आनंद सराफ, शंकर निंबाळकर, साहिल केळकर, प्रसाद भडसावळे, सुवर्णा गोडबोले, संगीता मावळे, प्रशांत पंडित स्वाती रजपूत, संकेत निंबाळकर, नरेंद्र व्यास, नंदा पंडित, गंधाली शहा, कल्याणी सराफ, अनिल दिवाणजी, समृद्धी पाटेकर, पूर्वा देशपांडे उपस्थित होते. दोन्ही कलाकारांनी भरतनाटयम् नृत्यातून सैनिकांना मानवंदना दिली.  उपक्रमाचे यंदा ४ थे वर्ष आहे.
स्वाती दैठणकर म्हणाल्या, देशाच्या सिमेवर लढणा-या जवानांमुळेच आम्ही सुखाचे दोन घास खाऊ शकतो, याची आम्हाला जाण आहे. युवकांच्या मनात देशाविषयी आणि सैन्याविषयी आपुलकीची भावना जागृत करण्याकरीता आम्ही नृत्यातून नेहमीच प्रयत्न करतो, असेही त्यांनी सांगितले. नुपूर दैठणकर म्हणाल्या, समाजातील सर्व घटकांपेक्षा सैनिकांचे कार्य मोठे आहे. त्यांचा आदर्श आपण प्रत्येकाने घ्यायला हवा.
पी.आर.मुखर्जी म्हणाले, अपंगत्व आल्यानंतर सैनिकांचे पुढील आयुष्य अवघड असते. त्यामुळे सैनिकांसमवेत सण उत्सव साजरे केल्याने त्यांचे मनोेबल वाढते. अपंगत्व आले तरीही प्रत्येक सैनिकामधील सकारात्मकता मोठी असते. कोणत्याही संकटाला ते धैर्याने सामोरे जातात. केवळ सैनिकच देशसेवा करतात असे नाही. तर देशातील प्रत्येकजण आपापल्यापरीने आपल्या क्षेत्रात योगदान देऊन देशसेवाच करीत असतो.
अपंग सैनिक भोपालसिंग चौधरी म्हणाले, आज भाऊबीज साजरी करताना आमच्या कुटुंबियांसमवेत भाऊबीज साजरी केल्याचा आनंद मिळाला. त्यामुळे आजचा दिवस अत्यंत आनंदाचा आहे. अपंगत्व आले असले तरी आमचे मनोबल खचले नाही, असे त्यांनी सांगितले. आनंद सराफ यांनी सूत्रसंचालन केले. पीयुष शहा यांनी प्रास्ताविक केले.