Home Blog Page 3251

जादू कशी झाली ?समान पाणी पुरवठा योजनेचा खर्च 300 कोटीने कमी कसा झाला ?

0
पुणे- शहराला समान पाणी पुरवठा करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून प्रस्तावित करण्यात आलेल्या वादग्रस्त समान पाणी पुरवठा योजनेचा खर्च तब्बल 300 कोटींनी घटला आहे.तो खर्च कोणत्या कारणामुळे घटला यासंदर्भात सविस्तर सादरीकरण सर्वसाधारण सभे पुढे करावे असे निवेदन  आयुक्त कुणाल कुमार यांना  दिले असल्याचे विरोधीपक्ष नेते चेतन तुपे  यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.हे पत्र तुपे पाटील आणि कॉंग्रेस चे गटनेते अरविंद शिंदे यांच्यावतीने देण्यात आले आहे.ते म्हणाले हि जादू कशी झाली ? आणखी खर्च कमी होऊ शकेल काय ? असे प्रश्न या निमित्ताने पुढे येणार आहेत .
महापालिकेकडून शहरासाठी समान पाणी पुरवठा योजना राबविण्यात येत आहे. त्यात शहरात अठराशे किमीच्या जलवाहिनी नव्याने टाकणे, पाणी मीटर बसविणे, पंपिंग स्टेशन अशा मोठ्या कामांचा समावेश आहे. यामधील जलवाहिनीच्या निविदा प्रशासनाने मागविल्या होत्या, मात्र त्या तब्बल 26 टक्के जादा दराच्या आल्या होत्या, त्यामुळे या कामाचा खर्च तब्बल साडेचारशे कोटींनी वाढणार होता.
पाणी मीटरच्या निविदा जादा दराने आल्याची चर्चा होती. त्यामुळे ही निविदा प्रकिया वादग्रस्त ठरल्याने ती रद्द करण्याची वेळ पालिका प्रशासनावर आली होती. त्यामुळे प्रशासनाने वस्तु व सेवा करामुळे अनेक वस्तुंच्या दरात बदल झाले असल्याने समान पाणी पुरवठा योजनेतील विविध कामांचे नव्याने एस्टीमेट करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार या योजनेच्या सल्लागार कंपनीने जलवाहिन्या, पाणी मीटर, पंपिग स्टेशन आदी कामांबरोबरच दहा वर्षांच्या देखभाल दुरुस्तीच्या कामांचे पूर्वगणन पत्र तयार केले आहे.
याच्या तपासणीसाठी तीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या तपासणीनंतर हे सुधारीत एस्टीमेट पालिकेच्या एस्टीमेट समितीसमोर ठेवले ठेवले जाणार आहे. ते पूर्वी पेक्षा ३०० कोटीने कमी झाले आहे.
यासंदर्भात बोलताना चेतन तुपे म्हणाले की, २४ तास पाणीपुरवठा योजनेच्या निविदा प्रक्रिये बाबत सूचना करणारे पत्र मुख्यमंत्री कार्यालयाकडून  पालिकेला देण्यात आले आहे. यामध्ये निविदा प्रक्रियेत निकोप स्पर्धा झाली पाहिजे , निविदा प्रक्रिया पारदर्शक झाली पाहिजे, अंदाजपत्रक पेक्षा जास्त दर आले नाही पाहिजेत आणि या सर्वांची जबाबदारी पुणे महापालिकेची असणार आहे असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. पालिकेची जबाबदारी म्हणजे ती मुख्यसभेची जबाबदारी आहे.  त्यामुळे २४ तास पाणीपुरवठा योजनेची राबविण्यात येणारी निविदा प्रक्रियेच्या ३०० कोटीने कमी झालेल्या खर्चाबाबत मुख्य सभेसमोर सादरीकरण होणे आवश्यक आहे. त्यामुळे या बाबतचे निवेदन आयुक्त कुणाल कुमार यांना देण्यात आल्याचे चेतन तुपे यांनी सांगितले.

भ्रष्टाचार विरोधी जनजागृती सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

0

पुणे दि.२५ : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने दि. ३० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर २०१७ या कालावधीत ‘भ्रष्टाचार विरोधी दक्षता जनजागृती सप्ताह’ आयोजीत करण्यात आला आहे. भ्रष्टाचार विरोधात जनजागृती करण्यासाठी या सप्ताहात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत, अशी माहिती प्र. जिल्हाधिकारी रमेश काळे यांनी दिली.

‘भ्रष्टाचार विरोधी जनजागृती सप्ताह’ आयोजनाबाबत श्री. काळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली, यावेळी त्यांनी ही माहिती दिली. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस अधीक्षक प्रसाद हसबनीस, पोलीस उप अधीक्षक जगदीश सातव तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

केंद्रीय दक्षता आयोगाच्या निर्देशानुसार दरवर्षी ‘भ्रष्टाचार विरोधी जनजागृती सप्ताह’ देशभरात सर्व शासकीय कार्यालयात आयोजित केला जातो. या माध्यमातून नागरिकांमध्ये भ्रष्टाचार विरोधी जनजागृती करण्यात येते. सोमवार पासून सुरु होणाऱ्या या सप्ताहात याविषयीच्या जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

‘समाजाचा विकास व भ्रष्टाचार, भ्रष्टाचार प्रतिबंध करण्यासाठीच्या उपाययोजना, भ्रष्टाचार प्रतिबंध संदर्भात मी काय करु शकतो?, भ्रष्टाचार समाजाला लागलेली एक कीड, भ्रष्टाचार संपवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर, भ्रष्टाचारमुक्त भारत माझे स्वप्न’ या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.

शहरातही सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ देऊन सप्ताहाला सुरुवात करण्यात येईल. या सप्ताहामध्ये शहर व जिल्ह्य़ातील सर्व शाळा, महाविद्यालये, सहकारी गृहनिर्माण सोसायटी, सरकारी रुग्णालये तसेच मोक्याच्या ठिकाणी भ्रष्टाचाराविरुद्ध जनजागृतीसाठी फलक, स्टीकर्स लावण्यात येणार आहेत. तालुका व गाव पातळीवर देखील भ्रष्टाचाराविरुद्ध जनजागृती करण्याचे नियोजन लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत करण्यात येत आहे, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या श्री. हसबनीस यांनी दिली.

७व्या हेमंत पाटील प्रीमिअर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेत क्रिकेट लव्हर्स संघाची विजयी सलामी

0

 

पुणे: भारत अगेंस्ट करप्शन, राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी जनशक्ती, हेमंत पाटील मित्र मंडळ, मुंबई  यांच्या तर्फे आयोजित ७व्या हेमंत पाटील प्रीमिअर लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेत क्रिकेट लव्हर्स संघाने एच.के बाऊंस क्रिकेट अकादमी(अ) संघाचा 93 धावांनी दणदणीत पराभव करून उद्घाटनाचा दिवस गाजवला. 

सिंहगड रोड येथील व्हिजन क्रिकेट  मैदानावर आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत सुजीत उबाळेच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर क्रिकेट लव्हर्स  संघाने एच.के बाऊंस क्रिकेट अकादमी(अ) संघाचा 93 धावांनी दणदणीत पराभव केला. पहिल्यांदा खेळताना सुजूत उबाळेच्या 32 चेंडूत 42 धावा, रूषिकेश गायकवाडच्या 31 चेंडूत 48 धावा तर विशाल कार्ले याने 38 धावांच्या बळावर  क्रिकेट लव्हर्स संघाने 20 षटकात 6 बाद 182 धावा केल्या. 182 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सुजीत उबाळे व मनोज यादव यांच्या अचूक गोलंदाजीपुढे एच.के बाऊंस क्रिकेट अकादमी(अ) संघाचा डाव केवळ  19.1 षटकात सर्वबाद 89 धावांत गारद झाला. सुजीत उबाळे सामनावीर ठरला.

स्पर्धेचे उद्घाटन पुणे जिल्हा क्रिकेट संघटनेचे सदस्य व सनी ईलेव्हन क्रिडा प्रतिष्ठानचे संचालक जयंत भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विरजीत भुजबळ, विशाल कसबे, एस. पालसूळे, हेमंत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. 

स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी
क्रिकेट लव्हर्स-  20 षटकात 6 बाद 182 धावा(सुजूत उबाळे 42(32), रूषिकेश गायकवाड 48(31), विशाल कार्ले 38, राज पेंडसे 2-18, पुलकीत शिंदे 1-37, अकीब पठाण 1-20, निख्ल वाघ 1-29) वि.वि एच.के बाऊंस क्रिकेट अकादमी(अ) – 19.1 षटकात सर्वबाद 89 धावा(प्रभाकर ठाकूर 23(29), अजिंक्य थेटे 16(15), सुजीत उबाळे 2-14, मनोज यादव 2-15, राहूल शिंदे 1-7, मंगेश भुईकुडे 1-10, ज्ञानेश नाईकवाड 1-15, रणजीत निंबाळकर 1-6) सामनावीर- सुजीत उबाळे
क्रिकेट लव्हर्स संघाने 93 धावांनी सामना जिंकला. 

 

12 नोव्हेंबरला ‘चला हवा येऊ द्या’ ची लंडनवारी

0

पुणे  :

युनायटेड किंगडम (यु के) मधील मराठी रसिकांसाठी भारतीय आणि खासकरून मराठी मनोरंजन विश्वातील विविध प्रयोग करण्यासाठी ‘बाराखडी एंटरटेनमेंटस्’ ने पुढाकार घेतला असून, रविवार दि. 12 नोव्हेंबर रोजी ’चला हवा येऊ द्या’ टीम लंडनमध्ये खास शो करणार आहे.

लंडनमधील ‘बाराखडी एंटरटेनमेंटस्’चे संचालक अमोघ धामणकर, गंधार बाबरे यांनी ही माहिती दिली.

लंडनमध्ये ‘ट्रॉक्सी थिएटर’मध्ये हा खास शो होत असून, ‘झी मराठी’ ची गाजलेली टीम तिथे शो साठी जात आहे.

अमोघ धामणकर आणि गंधार बाबरे या चित्रपटवेड्या दोन अभियंता मराठी तरुणांनी मनोरंजन विश्वातील चांगले प्रयोग, उपक्रम युनायटेड किंगडम वासियांना दाखवायच्या उद्देशाने ‘बाराखडी एंटरटेनमेंटस्’ची स्थापना केली. 2016 मध्ये ‘एक अलबेला’ हा मराठी सिनेमा त्यांनी इंग्लंडमधील 25 ठिकाणी प्रदर्शित केला आाणि त्याचे 75 शो झाले. ‘ब्रिटिश फिल्म सर्टीफिकेशन बोर्ड’कडून प्रमाणित होऊन प्रदर्शित होणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरला! अशा तर्‍हेने ब्रिटिश टेरीटरी मराठी सिनेमाला ‘बाराखडी’च्या माध्यमातून खुली झाली.

नोव्हेंबर 2016 मध्ये त्यांनी ‘लई बाराचे’ हा कार्यक्रम 4 ठिकाणी केला. त्यात कुशल बद्रीके, भाऊ कदम, मंगेश देसाई, संतोष जुवेकर, विजू माने यांचा समावेश होता. ‘स्ट्रगलर साला’ या कॉमेडी शो च्या चित्रीकरणात त्यांनी लंडनमध्ये मदत केली.

या पार्श्वभूमीवर ‘चला हवा येऊ द्या’ चा खास प्रयोग 12 नोव्हेंबरला ‘ट्रॉक्सी थिएटर’मध्ये होत आहे. ‘चला हवा येऊ द्या’चे डॉ. नीलेश साबळे, भाऊ कदम, कुशल बद्रीके, श्रेया बुगडे, सागर कारंडे, भारत गणेशपुरे हे कलावंत लंडनमधील शो मध्ये सहभागी होणार आहेत. ’ट्रॉक्सी’ हे प्रख्यात थिएटर असून, तेथे यापूर्वी डॅनी बॉयल (स्लम डॉग मिलेनियर), रिचर्ड ब्रॅनसन (व्हर्जिन ग्रुप) अशा दिग्गजांनी शो केले आहेत.

‘चला हवा येऊ द्या ‘ च्या लंडन शो साठी ‘झी मराठी’, ‘वीणा वर्ल्ड’, ‘रॅपचिक’, रोटीमॅटीक, नक्षी डॉट कॉम यांचे सहकार्य लाभत आहे.

मराठी चित्रपट, नाटक, मनोरंजन विश्वाला युनायटेड किंगडममध्ये चांगले व्यासपीठ मिळवून देणे हा ‘बाराखडी एंटरटेनमेंट’च्या स्थापनेमागचा उद्देश असल्याचे अमोघ धामणकर, गंधार बाबरे यांनी सांगितले. नाटक, स्टेज शो, चित्रीकरण, टीव्ही शो, पारितोषिक वितरण सोहळे अशा सर्व गोष्टींसाठी हे व्यासपीठ ते उपलब्ध करून देणार आहेत.

युनायटेड किंगडम मध्ये (इंग्लंड, वेल्स्, स्कॉटलंड, नॉर्दर्न आयर्लंड) साधारण १o हजार इतके मराठी रसिक राहतात. त्यांच्या पर्यंत विविध उपक्रमाद्वारे पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे, असेही त्यांनी सांगितले.

कॉमेडीचा बाप येतोय … न.स.ते. उद्योग झी टॉकीजची हटके मालिका !!

0

दोन घटका करमणूक होईल व थोडे खळाळून हसता येईल अशा प्रकारच्या मनोरंजनाची नेहमीच गरज असते. विनोदी कार्यक्रम सर्वच मोठय़ा आवडीने पाहत असतात. हीच गरज हेरून झी टॅाकीज या चित्रपट वाहिनीने मनोरंजनाच्या क्षेत्रात आणखी एक मोठे पाऊल टाकत न..ते. उद्योग हा एक  हलका – फुलका विनोदी  कार्यक्रम प्रेक्षकांच्या  भेटीला  आणला हे.   मराठी मनोरंजनाच्या दुनियेत आपल्या प्रेक्षकांना सातत्याने नवनवीन दर्जेदार कार्यक्रम देणा-या झी टॅाकीज वाहिनीने आणलेल्या न..ते. उद्योग या कार्यक्रमातून प्रेक्षकांना धमाल अभिनयखळखळून हसवणारे संवाद आणि निखळ मनोरंजनाची ट्रीट  मिळणार आहे. येत्या २९ ऑक्टोबरपासून या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. या कार्यक्रमाद्वारे मराठी सिनेमा आणि नाटकांमधील दिग्गज कलाकार छोट्या पडदा गाजवायला येत आहेत. ..ते. उद्योग करण्यासाठी  सुप्रसिद्ध अभिनेते संजय नार्वेकर आणि त्यांच्याबरोबर निलेश दिवेकरनम्रता आवटेपंकज पंचारियाजनार्दन लवंगारे हे विनोदवीर पुढाकार घेणार आहेत. दर आठवड्याला एक नवा उद्योग करत या विनोदवीरांचे न..ते. उद्योग हास्याची कारंजी फुलवणार आहेत.

शिऱ्याच्या भूमिकेतून गाजलेले आणि सध्या हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये कार्यरत असलेले विकास कदम  आपल्या विनोदाचे उत्कृष्ट टायमिंगघेऊन प्रथमच मराठी टेलिव्हिजन शो च्या दिग्दर्शनात उतरत आहेत.   विनोदाची चौफेर फटकेबाजी असलेल्या न..ते. उद्योग या कार्यक्रमाबद्दल बोलताना झी टॅाकीजचे बिझनेस हेड  बवेश जानवलेकर म्हणाले की, झी टॉकीज ही चित्रपट वाहिनी असली तरी प्रेक्षकांची कॉमेडीची आवड लक्षात घेऊन आम्ही या नवीन कार्यक्रमाची निर्मिती करत आहोत. रोजचे ताणतणाव विसरुन दोन घटका मनमुराद हसण्याची संधी या कार्यक्रमातून प्रेक्षकांना मिळत राहीलअसा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. प्रेक्षकांना खळखळून हसवून त्यांचे मनोरंजन करणारा ..ते.उद्योग हा नवीन कार्यक्रम २९ ऑक्टोबरपासून दर रविवारी रात्री ९.००  वा. झी टॅाकीजवर पहाता येईल.

अनुपम खेर, शायरा बानो प्रमोद महाजन पुरस्काराचे मानकरी

0

पुणे – ‘मुक्तछंद’ या सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असणार्‍या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा या वर्षीचा ‘स्व. प्रमोदजी महाजन स्मृति पुरस्कार’ ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर आणि ‘तीन तलाक’साठी यशस्वी लढा देणार्‍या शायरा बानो यांना देण्यात येणार असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांनी कळविली आहे.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते येत्या रविवारी (ता. २९ ऑक्टोबर) दुपारी साडेचार वाजता कोथरुडच्या ‘यशवंतराव चव्हाण नाट्यगृहा’त पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे. पालकमंत्री गिरीश बापट कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. खासदार अनिल शिरोळे, खासदार पूनम महाजन, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर मुक्ता टिळक यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
अनुपम खेर यांची नुकतीच ‘फील्म ऍण्ड टेलिव्हिजन ऑफ इंडिया’च्या (एफटीआयआय) अध्यक्षपदी निवड झाली आहे. श्री. खेर यांनी ३५ वर्षांहून अधिक काळ चित्रपट आणि कला क्षेत्रासाठी बहुमूल्य योगदान दिले आहे. त्याचा बहुमान करण्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
‘तीन तलाक’ प्रथेविरोधात उत्तराखंडमधील शायरा बानो यांनी मूळ याचिका दाखल केली होती. ‘तीन तलाक’ ही घटस्फोटाची पध्दत मुस्लिम महिलांच्या मूलभूत हक्कावर गदा आणणारी आहे. आकस्मिक, एकाकी व बदलता न येणारी ही पध्दत घटनाबाह्य ठरवावी यासाठी शायरा बानो यांनी यशस्वी लढा दिला. सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना पुरस्कार देण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माहिती अधिकार क्षेत्रातील कार्यकर्ते डॉ. विश्‍वंभर चौधरी, सरकारी वकील ऍड उज्ज्वल निकम, ‘सीताराम बुवा चॅरिटेबल ट्रस्ट’चे विकास वालवलकर, शहीद जवान चंद्रकांत गलांडे यांच्या वीरपत्नी निशा गलांडे आदी मान्यवरांना यापूर्वी ‘प्रमोद महाजन स्मृति पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले आहे. पुरस्काराचे हे दहावे वर्ष आहे.

भारतीय विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाने भारावले जर्मन विद्यार्थी भारत-जर्मनी सांस्कृतिक आदान-प्रदान कार्यक्रम

0

पुणे- गणेश वंदना, नांदी, तबला वादन, कथ्थक, भरतनाट्यम, कब डान्स, जर्मन डान्स, राजस्थानी नृत्य, बॉलिवूड डान्स आदी भारतीय विद्यार्थ्यांनी केलेल्या सादरीकरणातून पुणे भेटीवर आलेले जर्मन विद्यार्थी आणि शिक्षक भारावून गेले. शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी विविध कला सादर केल्या.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे फर्ग्युसन महाविद्यालय आणि जर्मनीतील ऍड्रिआज श्‍नायडर शूल यांच्यातील शैक्षणिक व सांस्कृतिक आदान-प्रदान कार्यक्रमाअंतर्गत जर्मनीतील सहा विद्यार्थी आणि दोन शिक्षक भारत भेटीला आले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जिजाऊ देशपांडे या विद्यार्थिनीने छत्रपती शाहू महाराज यांचा जीवनपट जर्मन भाषेत विषद केला. डीईएस-आयएएस जर्मन सेंटरच्या माध्यमातून उच्च शिक्षणासाठी जर्मनीला जाणार्‍या डॉ. प्रांजली बोबडे हिचा विशेष सत्कार करण्यात आला.
जर्मनीचे मुंबईतील उच्चायुक्त युरनेग मोरहार्ड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळ व परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे अध्यक्षस्थानी होते. प्राचार्य रविंद्रसिंह परदेशी, इंडो-जर्मन चेंबर ऑफ कॉमर्सचे फ्रॉक होपमन, जर्मन ऍकॅडमिक एक्सचेंजच्या संचालिका देवी अराल्ड, उद्योजक मनोज बर्वे यांची प्रमुख उपस्थिती होती.
विद्यार्थी आदान-प्रदान कार्यक्रमामुळे दोन देश जवळ येतात. त्यांचे शिक्षण, भाषा, संस्कृती, उद्योग आणि परस्पर परराष्ट्रीय संबंध दृढ होण्यासाठी मदत होते, असे मत युरगेन मोरहार्ड यांनी व्यक्त केले. दोन देशांतील भाषा, संस्कृती, खाद्यपदार्थ सारखे नाहीत. त्यामध्ये चांगले किंवा वाईट असा भेद करू नका. ते तुमच्यापेक्षा कसे वेगळे आहेत याचा अभ्यास करा, असे विचार डॉ. कुंटे यांनी मांडले. ख्रिस्टियान म्युलर व अमेनी रिव्हेन्टलो या शिक्षकांनी विचार मांडले. प्राचार्य डॉ. परदेशी यांनी स्वागत व प्रास्ताविक भाषण केले. या कार्यक्रमाच्या समन्वयिका डॉ. सविता केळकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले.
पुढील पंधरा दिवस हे विद्यार्थी पुणे शहरात राहणार आहेत. पुण्याजवळील विविध ऐतिहासिक, शैक्षणिक, सांस्कृतिक केंद्रांना भेटी देणे, शहरातील प्रेक्षणीय स्थळांचा अभ्यास करणे, विविध कलांची माहिती घेणे, आदीवासी व कुटुंब पध्दती, ग्रामीण लोकजीवन अभ्यासणे, शाळा व महाविद्यालयातील शिक्षण पध्दतींचा तौलनिक अभ्यास करणे आदी बाबींचा या कार्यक्रमात सहभाग आहे. आदान-प्रदान उपक्रमाचा हा सहावा कार्यक्रम आहे. ही माहिती डॉ. केळकर यांनी दिली.

बचत गटातील महिलांना साड्या भेट

0

पुणे-सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून गोसावी वस्तीतील बचत गटातील महिलांना नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्या हस्ते साड्या भेट देउन त्यांच्या समवेत दिवाळी साजरी करण्यात आली.धर्मसभा न्यासा च्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी बोलताना मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या की “दिवाळीच्या निमित्ताने आपण एकमेकांना शुभेच्छा देत असतानाच आनंद वाटण्याचे काम ही केले पाहिजे, समाजातील सर्व घटकांपर्यंत हा आनंद पोहोचला तरच खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी झाली असे म्हणता येइल,आणि म्हणूनच धर्मसभेच्या माध्यमातून आज बचत गटातील महिलांना साडी भेट देताना मनस्वी आनंद होत आहे असे ही त्या म्हणाल्या.धर्मसभा न्यासाच्या वतीने बालसंस्कार वर्ग,गरीब मुलांना अन्नदान,खाऊ वाटप,शालेय साहित्य वाटप,इ कार्यक्रम राबविले जातात अश्या उपक्रमांना माझे नेहमीच सहकार्य असेल असे सौ खर्डेकर म्हणाल्या. यावेळी शर्मिला निमकर यांनी दिवाळी सणाची माहिती दिली तर मीनल मनमाडकर यांनी संयोजन व प्रास्ताविक केले.बचत गटाच्या प्रमुख शोभाताई सरोदे यांनी आभार व्यक्त केले.या वेळी सौ रुक्मिणी कांबळे,सौ कुंदा राऊत यांच्यासह २५ भगिनींनी या उपक्रमाचा लाभ घेतला.

भारनियमनाच्या काळात खरेदी केलेली वीज स्वस्तच-महावितरणचा दावा

0

मुंबई  :      ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांसाठी विजेची मागणी लक्षात घेऊन महावितरणने  वीज नियामक आयोगाच्या मंजुरीने अल्पकालीन काराराद्वारे वीज खरेदी केली आहे. या वीज खरेदीच्या प्रक्रियेमुळे ग्राहकांचे भारनियमन कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत.

            सप्टेंबर व ऑक्टोबर 2017 मध्ये कोळशाच्या उपलब्धतेत आलेल्या अडचणीमुळे तसेच महावितरणला वीजपुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडून केलेल्या करारानुसार वीजपुरवठा कमी होत असल्याने विजेची उपलब्धता वाढविण्यासाठी महावितरणने ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यांत अल्पकालीन निविदा काढल्या होत्या. तसेच विजेच्या मागणी आणि पुरवठ्यात मेळ घालण्यासाठी  दररोज पॉवर एक्सचेंजमधूनही बोली लावून (Bid) वीज मिळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करण्यात येत होते.

संपूर्ण देशातच विजेच्या उपलब्धतेत कमतरता असल्याने सप्टेंबर, ऑक्टोंबरमध्ये पॉवर एक्सचेंजचे दर 5 रुपये 62 पैशापासून कमाल मागणीच्या काळात ते 9 रुपये 37 पैसे प्रतियुनिटवर पोहचले होते.  तसेच अल्पकालीन निविदाचे जास्तीत जास्त दर प्रतियुनिट 5 रुपये 50 पैसे एवढे होते.  ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन मा. आयोगास सद्यस्थिती सादर करून अल्पकालीन वीजखरेदीची 4 रुपये प्रतियुनिटची मर्यादा वाढवून मिळावी, यासाठी महावितरणने याचिका दाखल केली होती.  तसेच यासोबत अल्पकालीन निविदांची माहितीही आयोगाकडे सादर करण्यात आली होती.

महावितरण कंपनीने ग्राहकांचे हित लक्षात घेऊन नेहमीच अल्पकालीन कराराची वीज प्रतियुनिट 4 रुपयांपेक्षा कमी दराचीच घेतली आहे.  कमाल मागणीच्या काळातही सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांसाठी घेतलेल्या विजेचा दि. 24.10.2017 पर्यन्तचा प्रतियुनिट सरासरी दर हा 3 रुपये 89 पैसे एवढाच राहिला आहे.

वरील वस्तुस्थितीवरून काही वृत्तपत्रांत महावितरण कंपनीने अल्पकालीन वीजखरेदी सरासरी प्रतियुनिट 5 रुपये 50 पैसे दराने केली आहे, हा जो आरोप करण्यात आला आहे, तो ग्राहकांची दिशाभूल व विनाकारण महावितरणविषयी गैरसमज पसरविणारा आहे.असा दावा महावितरणकडून करण्यात येतो आहे .

श्री स्वामी समर्थाची महाराष्ट्रातील मानाची पहिली पायी पालखीचे उत्साहात प्रस्थान

0

पुणे-वानवडी जवळील भैरोबानाला मधील श्री भैरवनाथ मंदिरामधून श्री स्वामी समर्थ पालखीचे अक्कलकोटकडे  उत्साहात प्रस्थान झाले . पहाटे काकडआरती करण्यात आली त्यानंतर महापूजा व अभिषेक झाला . त्यानंतर दिनेश हेगडे व गणेश हेगडे बंधू यांच्याहस्ते सामूहिक आरती करण्यात आली . त्यानंतर सर्व स्वामी भक्तांनी प्रसाद घेतला . स्वामींच्या जयघोषात , हातामध्ये भगवा पताका धरून असंख्य स्वामी भक्त पायी पालखीमध्ये सहभागी झाले होते .

यावेळी सूर्यकांत चौघुले , सुभाष जांभुळकर , विजया चौघुले ,सोपानराव गवळी शाम जांभुळकर , पंढरीनाथ साबळे , अनिल गवळी , निलेश सायकर , पुंडलिक गवळी , नयन मलिक , मकसूद सरकार , राजू चौघुले , ज्ञानेश्वर जांभुळकर , संजय बनकर , सुजाता बनकर आदी मान्यवर उपस्थित होते .

यावेळी सकाळी नाष्टयाची व्यवस्था दिनेश हेगडे व गणेश हेगडे बंधूनी केली होती .यावेळी श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष अण्णा देशमुख उपस्थित होते . 

दीपावली संगीत महोत्सवात पोलिसांचा गौरव !

0
पुणे 
शिवसेना व नवनिर्माण आयोजित दीपावली संगीत महोत्सवात  यंदा पोलिसांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी पोलीस अधिकारी स्व. उदयभाऊ मोरे यांच्या स्मरणार्थ पोलीस दलातील अधिकारी- कर्मचाऱ्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. 
मॉडेल कॉलनीतील चित्तरंजन वाटिका येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही माजी नगरसेवक राजू पवार यांनी आयोजित केलेल्या दीपावली संगीत महोत्सवाला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. रितेश व रजनीश मिश्रा  यांचे शास्त्रीय गायन तर देबूप्रिया व सुचिस्मिता यांचे बासरी वादन, ताका  हिरो यांचे संतूर वादनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. डॉ. कल्याणी बोन्द्रे यांच्या शास्त्रीय गायनाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. राधा मंगेशकर, जयदीप वैद्य, राजेश दातार , राहुल घोरपडे ,अमर ओक यांनी भावसंगीत -सुगम संगीतामध्ये रसिकांना मग्न केले. या महोत्सवात धडाडीचे पोलीस अधिकारी स्व.उदयभाऊ मोरे यांच्या स्मरणार्थ आणि पोलीस हुतात्मा दिवसानिमित्त   सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे , सहायक

​ विक्रीकर ​आयुक्त नलावडे​, राजा मोरे यांच्या हस्ते ​सुनील पवार , शैलेश जगताप, रविंद्र साबळे या पोलीस बांधवांचा

सन्मानचिन्ह देऊन विशेष गौरव करण्यात आला. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख राम गावडे , माजी नगरसेवक व संयोजक  राजू पवार, दीपक आल्हाट, ​किशोर जोशी​,विवेक जोशी​,​  सचिन भालेराव, आशिष अंबुडकर , शशिकांत शिंदे, , संदीप पवार, , सचिन नवघणे ,सुनील जाधव आदींसह मान्यवर उपस्थित होते. 

स्टार हेल्थ इन्शुरन्सतर्फे कर्करोगाचे निदान झालेल्या व्यक्तींसाठी पहिलीवहिली विमा पॉलिसी सादर

0

~आजाराची पुनरावृत्ती, आजार विस्तारणे यासाठी योजनेत सुरक्षा कवच,

दुसऱ्यांदा आजार बळावल्यास नेहमीच्या वैद्यकीय सुरक्षा कवचाशिवाय सुरक्षा उपलब्ध~

 मुंबई : स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स या देशातील पहिल्या आरोग्य विमा कंपनीने, कर्करोगाचे निदान झालेल्या व्यक्तीसाठी पहिल्या वहिल्या स्टार कॅन्सर केअर गोल्ड या आरोग्य विम्याचे आज उद्घाटन केले.

स्टार कॅन्सर केअर गोल्डतर्फे 5 महिन्याच्या बालकापासून 65 वयोगटातील व्यक्तीस 5 लाख रुपयांपर्यंत सुरक्षा कवच दिले जाते, हे कवच आजाराच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यासाठी दिले जाते. या योजनेअंतर्गत आजाराची पुनरावृत्ती झाल्यास, आजार बळावल्यास आणि दुसऱ्यांदा आजार बळावल्यास सुरक्षा कवच दिले जाते. यात नियमित कर्करोगाशी संबंधित नसलेल्या इतर आजारांच्या हॉस्पिटायझेशन खर्चही समाविष्ट आहे.

विमा पॉलिसीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ही पॉलिसी खऱेदी करण्यासाठी कुठल्याही वैद्यकीय तपासणीची गरज नाही. ग्राहक आपल्या पूर्वीच्या वैद्यकीय नोंद सादर करू शकतात, यात अलिकडे घेतलेले उपचार त्यांच्या प्रस्ताविक अर्जाचाही समावेश आहे.

स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्सचे सीएमडी व्ही. जगन्नाथन् म्हणाले की, “पूर्वी असलेल्या आजारांच्या निदानाशिवाय कुठलाही आजार नसल्यास साधारणपणे आरोग्य विमा दिला जातो. परंतु आम्ही स्टार हेल्थ इन्शुरन्सने लोकांना जीवनास घातक असलेल्या उपचारपद्धती घेता याव्यात यासाठी विशिष्ट उत्पादने विकसित केली आहेत. अशा आजाराशी सामना करणाऱ्यांना, पुढील काही वर्षे वैद्यकीय आणि वित्तीय साहाय्याची गरज असते. आमचा विश्वास आहे की, प्रत्येक भारतीयासाठी आरोग्य विमा ही मूलभूत गरज आहे. हे लक्षात घेता, आम्ही सातत्याने लोकांसाठी जास्तीत जास्त चांगले असेल अशी काही उत्पादने सादर करण्याचा प्रयत्न करत असतो.’’

स्टार कॅन्सर केअर गोल्डचे इतर लाभ म्हणजे, कर्करोगाचे निदान झाल्यास एकूण रक्कमेच्या निम्मी रक्कम तातडीने दिली जाते. याशिवाय शस्त्रक्रिया करायची असल्यास, नसल्यास किंवा कर्करोगाशी संबंधित नसलेले इतर आजार, अपघात अशा सर्वच गोष्टींचा यात समावेश होतो, थोडक्यात या सुरक्षा कवचाअंतर्गत नियमित वैद्यकीय विम्याचेही लाभ प्राप्त होतात.

स्टार हेल्थ इन्शुरन्सचे प्रमुख प्रक्रिया अधिकारी डॉ. एस. प्रकाश म्हणाले की, “भारतात कर्करोग होणाऱ्यांची संख्या वाढते आहे आणि यासाठी अत्याधुनिक उपचारपद्धतीही उदयास येत आहेत. लोकांमध्ये जागरुकता वाढत असल्याने, कर्करोगाचे निदान आता प्राथमिक पातळीवरच होऊ लागले आहे. परंतु दुर्दैवाची गोष्ट म्हणजे यासाठी आजारी व्यक्तीला आपले उपचार पूर्ण करण्यासाठी आर्थिक साहाय्य हवे असते, याव्यतिरिक्त कर्करोग बळावल्यास तर मोठ्या मदतीची गरज असते. स्टार कॅन्सर केअर गोल्डमध्ये कर्करोग झालेल्या व्यक्तींना कर्करोगाशी संबंधित नसलेल्या इतर आजारांसाठीही सुरक्षा कवच प्राप्त होते. यामुळे स्टार हेल्थ इन्शुरन्सद्वारे एका अत्यावश्यक गरज असेलल्या विमाधारकाला मनःपूर्वक समाधान प्राप्त होते.’’

“आमचे नेटवर्क देशातील प्रत्येक राज्यात विस्तारलेले आहे आणि शक्य तितक्या कर्करोग झालेल्या व्यक्तींपर्यंत पोचण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत, त्यांना कर्करोगाशी आणि इतर आजारांशी लढण्यासाठी आर्थिक मदत करत आहोत,’’ असे स्टार हेल्थ इन्शुरन्सचे कार्यकारी संचालक आणि प्रमुख वितरण अधिकारी आनंद रॉय म्हणाले.

स्टार हेल्थ आणि अलाईड इन्शुरन्सतर्फे स्टार कॅन्सर केअर गोल्ड या प्रमुख उत्पादनाचे आयआरडीएआयच्या 2016 साली जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार उद्घाटन करण्यात आले आहे.

कचरा गाडया अडवून पाठविल्या परत…

0

पुणे-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संतप्त कार्यकर्त्यांनी रोकेम कचरा प्रकिया प्रकल्पाकडे जाणा-या महापालिकेच्या कचरा गाडया आडवून परत पाठविल्या. रामटेकडी येथील महापालिकेच्या प्रस्तावीत कचरा प्रकल्पाचे काम बंद झालेच पाहिजे, अशी घोषणाबाजी केली. जनतेचा विरोध डावलून या प्रकल्पाचे काम सुरू ठेवले तर रोकेम प्रकल्प बंद पाडू, असा इशाराही आंदोलकांनी महापालिका प्रशासनाला दिला. हे आंदोलन विरोधी पक्ष नेते चेतन तुपे यांच्या मार्गदर्शनाखाली आज (मंगळवार) अकरा वाजण्याच्या सुमारास रामटेकडी येथे झाले.

हडपसर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संतप्त कार्यकर्त्यांनी रोकेम कचरा प्रकिया प्रकल्पाकडे जाणा-या महापालिकेच्या कचरा गाडया आडवून परत पाठविल्या. रामटेकडी येथील महापालिकेच्या प्रस्तावीत कचरा प्रकल्पाचे काम बंद झालेच पाहिजे, अशी घोषणाबाजी केली. जनतेचा विरोध डावलून या प्रकल्पाचे काम सुरू ठेवले तर रोकेम प्रकल्प बंद पाडू, असा इशाराही आंदोलकांनी महापालिका प्रशासनाला दिला. हे आंदोलन विरोधी पक्ष नेते चेतन तुपे यांच्या मार्गदर्शनाखाली आज (मंगळवार) अकरा वाजण्याच्या सुमारास रामटेकडी येथे झाले.

हे आंदोलन पूर्व नियोजीत नव्हते. अचानक गाडया आडविल्या गेल्याने रामटेकडी ते औदयोगीक वसाहत या दरम्यानच्या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पक्षाच्या कार्यकर्त्यांसह स्थानिक नागरिकांनी देखील या आंदोलनात सहभाग घेतला. घटना समाजताच वानवडी पोलिस तत्काळ पोहचले. परवानगी शिवाय आंदोलन करू नका, अशी समज पोलिसांनी आंदोलकांनी दिली. त्यानंतर पोलिस निघून गेले. त्यानंतरही पून्हा काही कार्यकर्त्यांनी कचरा गाडया आडवून परत पाठविल्या.

याप्रसंगी हडपसर प्रभाग समिती अध्यक्ष योगेश ससाणे, नगरसेवक अशोक कांबळे, उत्तम अल्हाट, मामा अल्हाट, हेमंत ढमढेरे, जॅकी कल्याणी, नागेश काळुंखे, आप्पा गरड, आप्पा शिंदे, तुषार जाधव, युसुफ पठाण, इरफान तांबोळी, तोफिक सैय्यद, चिंतामन लाकडे, नदीम पटेल शरीफ पठाण, मुस्ताक शेख यांसह मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

रामटेकडी येथील रोकेम प्रकल्पात सध्या ३०० टन प्रतिदिन कचरा येत आहे. जर १२५० टनांचे नविन प्रकल्प सुरू झाले तर रामटेकडी वसाहतीतील नागरीकांना रस्त्यावर चालणे अवघड होणार आहे. तसेच औद्योगिक वसाहतीतील अनेक कारखाने बंद होवून बेरोजगारीत वाढ होईल. हडपसर परिसरात दुर्गंधी व रोगराई वाढून सार्वजनिक आरोग्य धोक्यात येईल, असे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नमूद केले. त्यामुळे नागरिकांच्या हितास बाधक असणारा नवीन कचरा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत होवू देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी पक्षा तर्फे देण्यात आला.

प्रश्न दिवसेंदिवस पेटत चालला आहे…
यापूर्वी महापालिकेच्या प्रस्तावित कचरा प्रकल्पास विरोध करण्यासाठी शिवसेना, हडपसर-रामटेकडी कचरा प्रकल्प हटाव समिती यांनी दोन मोठी जन आंदोलन केली. पालिकेत घटांनाद आंदोलन झाले. मात्र, जनतेचा विरोध डावलून प्रस्तावित कचरा प्रकल्पाचे काम पोलिस बंदोबस्तात सुरू ठेवण्यात येणार असल्याची भूमिका महापालिका प्रशासनाने घेतली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी पक्ष तसेच हडपसर-रामटेकडी कचरा प्रकल्प हटाव समिती तर्फे कचरा प्रकल्पा विरोधात जनजागृती सुरू केली आहे. अगोदरच या भागात महापालिकेचे चार प्रकल्प आहेत. त्यामुळे या प्रकल्पा विरोधात जनमत सत्ताधा-या विरोधात वळले आहे. पालिका आयुक्तांनी याबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी बैठक आयोजीत करू, असे अश्वासन दिले आहे. मात्र, ठोस निर्णय दिलेला नाही. त्यामुळे येथील कचरा प्रकल्पाचा प्रश्न दिवसेंदिवस पेटत चालला आहे.

मायक्रोमॅक्स आणि व्होडाफोन यांच्यातर्फे केवळ 999 रुपये इतक्या कमी किंमतीत 4जी स्मार्टफोनचे उद्घाटन

0

मुंबई – व्होडाफोन ही भारतातील अग्रणीची टेलिकम्युनिकेशन्स सेवा पुरवठादार कंपनी आहे आणि मायक्रोमॅक्स हा भारतातील सर्वात लोकप्रिय मोबाइल ब्रँड आहे, या दोहोंतर्फे भारतातील सर्वात कमी किंमतीतील म्हणजेच केवळ 999 रुपयांतील 4जी स्मार्टफोन व्होडाफोन सुपरनेट 4जीसह सादर करण्यात आला आहे.

डेटा स्वीकृतीच्या विकासाला चालना देण्यासाठी संलग्नित दृष्टीकोनासह व्होडाफोन आणि मायक्रोमॅक्सने एकत्रितपणे सर्वोत्तम कन्झ्युमर मोबाइल अनुभव सादर केला आहे. स्मार्टफोन `भारत 2 अल्ट्रा’ हा मायक्रोमॅक्सचा यशस्वी झालेला `भारत सिरीज’मधला 4जी स्मार्टफोन असून, याचे ध्येय सर्वोत्तम कॅमेरा, बॅटरी आणि नव्या स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी डिस्प्लेचे पर्याय आदी सुविधा परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध करून देणे हे आहे. भारत -2 अल्ट्रा रिटेल आउटलेट आणि व्होडाफोनच् दुकानात नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून उपलब्ध होतील.

या भागीदारीविषयी सध्याच्या आणि नव्या व्होडाफोनच्या ग्राहकांना मायक्रोमॅक्स भारत -2 अल्ट्रा स्मार्टफोन 2,899 रुपयांना विकत घेता येईल – आणि यावेळ 36 महिन्यांसाठी केवळ 150 रुपयांचे रिचार्ज करायचे आहे. (हे रिचार्ज प्रति महिन्याला कमीत कमी 150 रुपयांचे उपलब्ध आहे.) 18 महिन्यांच्या पूर्ततेनंतर वापरकर्त्यांना 900 रुपयांची रक्कम परत मिळेल आणि अन्य 18 महिने झाल्यावर आणखी 1,000 रुपये परत मिळतील, व्होडाफोनच्या एम-पेसा वॉलेटमध्ये ही रक्कम टाकली जाईल, ही रक्कम आपल्या सुलभतेनुसार डिजिटली वापरू शकतो किंवा रोख रक्कम काढून घेऊ शकतो.

 मायक्रोमॅक्सचे सहसंस्थापक श्री. राहुल शर्मा याविषयी म्हणाले की, “स्मार्टफोन वापरणाऱ्यांच्या पहिल्या पिढीच्या संपादनाचे ध्येय भारत सिरीजने समोर ठेवले आहे. यासाठी व्होडाफोनबरोबर भागीदारी केल्याने, स्मार्टफोनच्या स्वीकृतीतील पुढचा टप्पा गाठण्यास मदत होणार आहे, आतापर्यंत असे फोन न वापरणाऱ्या ग्राहकांवा अपग्रेड करून फिचर फोन ते स्मार्टफोनपर्यंत आणण्यात येईल. ही उपकरणे परवडणाऱ्या किंमतीत तर असतीलच, शिवाय कमी किंमतीतील डेटा पॅकमुळे स्मार्टफोनची स्वीकृती लवकर होऊ शकेल, सध्या तरी या वापरात खूपच अंतर आहे. मायक्रोमॅक्सला लोकांना सर्वोत्तम उपकरण वापरण्याचा अनुभव द्यायचा आहे, तोही परवडणाऱ्या किंमतीत आणि भारत श्रेणीतच, याअंतर्गत आतापर्यंत तब्बल 2 दशलक्षांपेक्षा जास्त हँडसेटची विक्री झाली आहे.’’

या ऑफरविषयी व्होडाफोन इंडियाचे कन्झ्युमर बिझनेसचे संलग्नित संचालक अवनश खोसला म्हणाले की, “4जी स्मार्ट फोन आतापर्यंत कधीही सादर न करण्यात आलेल्या, म्हणजेच 999 रुपयांमध्ये सादर करण्यात येत आहे, अशा प्रकारे उत्पादनांचे लोकशाहीकरण करण्यासाठी मायक्रोमॅक्सबरोबर आम्ही भागीदारी करत आहोत, याचा आम्हाला आनंदच आहे. यामुळे स्मार्ट फोन घेण्याची इच्छा असते, परंतु परवडत नसल्याने तो घेता येत नाही, अशा देशातील लाखो लोकांची इच्छा पूर्ण करण्यासाठी यामुळे मदत होणार आहे. यामुळे सध्या 4जी न वापरणाऱेही ते वापरू शकतील आणि व्होडाफोन सुपरनेट 4जीचा सर्वोत्तम आनंद घेऊ शकतील.’’

 मायक्रोमॅक्स भारत सिरीजबद्दल

आर्थिक मर्यांदांबद्दल कमालीच्या जागरूक असलेल्या देशातील नव्या पिढीच्या स्मार्टफोन वापरकर्त्यांना समोर ठेवण्यात आलेल्या, भारत सिरीजला आतापर्यंत तब्बल 2 दशलक्ष वापरकर्त्यांनी स्वीकारले आहे, या सिरीजने प्रथम संपूर्णपणे निर्दोष फोनचे प्रकार सादर केले.

भारत-2 अल्ट्राची वैशिष्ट्ये म्हणजे याचे सुरेख डिझाइन, याचे प्रायोजन स्प्रेडट्रम एससी9832 1.3 गिगाहर्ट्ज क्वाड कोअर प्रोसेसर, 512 एमबी रॅम + 4 जीबी रोमसह करण्यात आले आहे. याशिवाय याचा डिस्प्ले 4 इंचाचा डब्ल्यूव्हीजीएचा आहे आणि याच्या 0.3 एमपीच्या फ्रंट कॅमेरासह 2एमपीचा रेअर कॅमेरा सादर करण्यात आला आहे. याशिवाय हे उपकरण सीन, फ्रेम आणि बर्स्टसारख्या विविध पद्धतींसह येते, याच्या प्राथमिक वैशिष्ट्यांमुळे वापरकर्ते याचा आनंद लुटू शकतील. 1300 एमएएच बॅटरीच्या अँड्रॉइड मार्शमेलोसह हा हँडसेट सज्ज आहे, शिवाय यावर पूर्ण व्हिडिओ पाहणे सहज शक्य आहे, सोशल नेटवर्किंग आणि चॅट अॅप यामुले स्मार्टफोनचा सर्वोत्तम अनुभव वापरकर्त्यांना मिळतो.

 मायक्रोमॅक्स इन्फॉरमेटिक्सबद्दल

मायक्रोमॅक्स इन्फॉरमेटिक्सबद्दल लिमिटेड हा जगातील दहावा सर्वात मोठा मोबाइल ब्रँड आहे (स्पर्धकांवरील संशोधनातून) आणि ही एक अग्रणीची ग्राहक इनेक्ट्रॉनिक्स कंपनी आहे. गेल्या दशकभरापासून, मायक्रोमॅक्सने समाजासाठी तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण केलेले आहे, याद्वारे आपल्या उत्पादनांतून परवडणाऱ्या किंमतीतील नावीन्यपूर्णता सादर केली आहे, तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी मोठ्या प्रमाणावर स्वीकृती व्हावी यासाठी यातील अडचणी दूर करण्यात आल्या आहेत. ब्रँडद्वारे नावीन्यपूर्ण उत्पादनांच्या विविध पोर्टफोलिओची श्रेणी सादर करण्यात आली आहे – यात वैशिष्ट्यांसह, दोन सिम असलेला, 4जी अँड्रॉइड स्मार्टफोन, टॅब्लेट, स्मार्ट टेलिव्हिजन, एअर कंडिशनर आणि लॅपटॉप अशा उत्पादनांचा समावेश आहे. भारत, रशिया आणि सार्क बाजारपेठांमधील यशस्वी प्रक्रियांसह मायक्रोमॅक्सने प्रत्येक महिन्याला 3 दशलक्ष मोबिलिटी उपकरणे सादर केली आहेत.

सलमान खान ने अपनी अगली ‘भारत’ के लिए 2019 की ईद की अपने नाम!

ईद के उत्सव के अवसर पर अपनी फिल्मों को रिलीज करने की परंपरा को जारी रखने के लिए, बॉलीवुड सुपरस्टार सलमान खान ने अपनी आगामी फिल्म ‘भारत’ के लिए 2019 की उस शुभ तिथि को अभी से अपने नाम कर लिया है।

यह फिल्म 2014 की दक्षिण कोरियाई फिल्म “ओड टू माय फादर” का एक आधिकारिक रूपांतर है, जो 1950 से आधुनिक मनुष्यों के जीवन के माध्यम से वर्तमान दिन तक आधुनिक कोरियाई इतिहास को दर्शाती है।

फ़िल्म निर्माता अतुल अग्निहोत्री ने बर्लिन फिल्म फेस्टिवल में स्क्रीनिंग के बाद इस फ़िल्म को भारतीय फिल्मों के लिए संभावित कहानी के रूप में देखा, जो अब निर्माता के रूप में इस फिल्म का समर्थन करेंगे।

यह उस व्यक्ति की यात्रा को दर्शाएगा जो 1947 में शुरू हो कर 2002 में समाप्त होती है। निर्माता अतुल अग्निहोत्री ने बताया कि, “यह एक देश की यात्रा है और एक व्यक्ति की भी, जहाँ दोनों को ही भारत के नाम से जाना जाता है।”

फिल्म के बारे में बात करते हुए निर्माता अतुल अग्निहोत्री ने बताया,”यह फिल्म हमारे लिए सिर्फ शुरुआती बिंदु है, लेकिन क्योंकि यह एक प्रेरणा थी, हम सभी न्याय तौर पर आधिकारिक रूप से इसे खुद ही हासिल करना चाहते थे और ‘भारत’ बनाने से पहले रीमेक अधिकार प्राप्त किये।”

‘भारत’ को निर्देशक अली अब्बास जफर की निगरानी में बनाया जाएगा जिसमे सलमान खान को नायक के रूप में पेश किया जाएगा।

इस नायक के किरदार के लिए सलमान का चुनाव करते हुए, अतुल ने जोर देकर कहा कि यह एक अभिनेता, निर्माता और निर्देशक के रूप में अपने साले के साथ लंबे समय से संबंध रखने वाले दिल से लिया गया निर्णय है। इसके बारे में बात करते हुए अतुल ने कहा कि,”यह एक ऐसा चरित्र है जिसे मैंने सोचा था कि उनके साथ प्रतिध्वनित होगा। सलमान के साथ फिल्म बनाना एक बड़ी जिम्मेदारी है क्योंकि उनकी फिल्मों के साथ बड़ी उम्मीदें होती हैं।”

अतुल ने बताया कि,”मैं सलमान के प्रशंसक आधार के बारे में बहुत सचेत हूँ। और एक बार फिर, मुझे विश्वास है कि एक पारिवारिक फिल्म होने के कारण इसका उत्सव के समय आना एक योग्य समय है। और वैसे भी, ईद के मौके पर रिलीज करना हमेशा से हर निर्माता की पसंदीदा तारीख होती है।”

फ़िल्म के बारे में संक्षेप से बताते हुए निर्माता कहते हैं, क्योंकि फिल्म कई अवधि तक फैली हुई है, इसमें बहुत सारी यात्रा और विस्तृत सेट की आवश्यकता होगी। ” भारत में पंजाब और दिल्ली के अलावा, हम अबू धाबी और स्पेन में शूटिंग करेंगे। हर विभाग में तैयारी विस्तृत रूप से होगी। फ़िल्म की कास्टिंग अगले तीन महीनों में हमारा मुख्य एजेंडा होगा और चूंकि यह चरित्र-चालित कहानी है, हम उन कलाकारों को लेंगे जो उस किरदार के लिए एकदम फिट होगा। यह नामों को एक साथ पाने के बारे में नहीं होगा, लेकिन इसके चित्रण में ईमानदार होगा।

फिल्म निर्माता अतुल अग्निहोत्री 2011 की ब्लॉकबस्टर ‘बॉडीगार्ड’ के बाद एक बार फिर से सलमान खान के साथ हाथ मिलाएंगे और 2016 में आई “सुल्तान” के निर्देशक रहे अली अब्बास जफर अब इस फ़िल्म का निर्देशन करने के लिए तयार है।

अतुल अग्निहोत्री द्वारा निर्मित और अली अब्बास जफर द्वारा निर्देशित, फिल्म की शुरुवात अप्रैल 2018 से होगी।