Home Blog Page 325

टॉर्च आणि कॅश ठेवण्याचा सल्ला,देशातील 244 ठिकाणी उद्या मॉक ड्रिल:युद्धात बचावाचे मार्ग शिकवले जातील

नवी दिल्ली-


पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, बुधवारी (७ मे) देशातील २४४ भागांत युद्धात बचावाच्या तंत्रांवर मॉक ड्रिल आयोजित केले जातील. गृह मंत्रालयाने या भागांना नागरी संरक्षण जिल्हे म्हणून सूचीबद्ध केले आहे. हे सामान्य प्रशासकीय जिल्ह्यांपेक्षा वेगळे आहेत.गृह मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मॉक ड्रिल दरम्यान हवाई हल्ला आणि ब्लॅकआउट झाल्यास नागरिकांनी काय करावे हे सांगितले जाईल. नागरिकांना त्यांच्या घरात वैद्यकीय किट, रेशन, टॉर्च आणि मेणबत्त्या ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय, आपत्कालीन परिस्थितीत मोबाईल आणि डिजिटल व्यवहार अयशस्वी होऊ शकतात म्हणून रोख रक्कम सोबत ठेवा.

नागरी संरक्षण जिल्हे त्यांच्या संवेदनशीलतेनुसार 3 श्रेणींमध्ये विभागले गेले आहेत. श्रेणी-१ सर्वात संवेदनशील आहे आणि श्रेणी-३ कमी संवेदनशील आहे. ५ मे रोजी गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना मॉक ड्रिल करण्याचे आदेश जारी केले होते.

आज दिल्लीतील गृह मंत्रालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत मॉक ड्रिलच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. राज्यांचे मुख्य सचिव आणि नागरी संरक्षण प्रमुखांसह अनेक उच्चपदस्थ अधिकारी त्यात उपस्थित होते.

टाटा ऍसेट मॅनेजमेंटने अस्थिर बाजारपेठांमध्ये संभाव्य स्थिरता आणि कर बचत क्षमता डोळ्यासमोर ठेवून टाटा इनकम प्लस आर्बिट्रेज ऍक्टिव्ह फंड ऑफ फंड लॉन्च केला

मुंबई, :  टाटा ऍसेट मॅनेजमेंटने टाटा इनकम प्लस आर्बिट्रेज ऍक्टिव्ह फंड ऑफ फंड लॉन्च केल्याची घोषणा केली आहे. या नाविन्यपूर्ण फंड ऑफ फंड योजनेचे उद्दिष्ट आर्बिट्रेज फंडचे कमी अस्थिरतेचे धोरण आणि उच्च गुणवत्तेच्या कॉर्पोरेट बॉन्ड्सची स्थिर संचय क्षमता यांचा समन्वय घडवून आणणे हे आहे. नवीन फंड ऑफर ५ मे २०२५ रोजी खुली होईल आणि १९ मे २०२५ रोजी बंद होईल.

देशांतर्गत म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक करणारा हा ओपन एंडेड फंड ऑफ फंड कॉर्पोरेट बॉन्ड आणि इक्विटी आर्बिट्रेज रिटर्नवर मिळवलेले व्याज यांच्या संतुलित मिश्रणाच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना एक बहुउपयोगी सोल्युशन प्रदान करतो.

टाटा इनकम प्लस आर्बिट्रेज ऍक्टिव्ह एफओएफ दोन वर्षांच्या होरायझॉन असलेल्या गुंतवणूकदारांसाठी डिझाईन करण्यात आला आहे, जे स्थिर, संचय-उन्मुख आणि कर बचत सक्षम रिटर्न मिळवू इच्छितात. हा फंड जास्तीत जास्त ६५% टाटा कॉर्पोरेट बॉन्ड फंडाला आणि कमीत कमी ३५% टाटा आर्बिट्रेज फंडाला वाटप करतो, जो २ वर्षांचे होरायझॉन डोळ्यासमोर ठेवून ऋण स्थिरता आणि कर बचत सक्षम रिटर्न यांना एकत्र जोडतो.

टाटा आर्बिट्रेज फंड आपल्या १००% हेज्ड इक्विटी पोर्टफोलिओसह, अल्पकालीन स्थिर लाभ मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवतो, तर टाटा कॉर्पोरेट बॉन्ड फंड निवडक कालावधी प्रबंधनासह, मिळवलेल्या रिटर्नवर लक्ष केंद्रित करतो. फंड ऑफ फंड संरचनेंतर्गत हे मिश्रण, दोन वर्षांपेक्षा जास्त काळ ठेवण्यात आल्यावर स्टॅन्डअलोन आर्बिट्रेज किंवा कॉर्पोरेट बॉन्ड फंडाच्या तुलनेत अधिक चांगल्या कर बचत क्षमतेसह एक संतुलित दृष्टिकोन प्रदान करतो.

टाटा ऍसेट मॅनेजमेंटचे फंड मॅनेजर श्री शैलेश जैन यांनी सांगितले, “वर्तमान वातावरणामध्ये जिथे ऋण कमाई आकर्षक आहे आणि इक्विटी बाजारपेठेमध्ये अस्थिरता आहे, अशाप्रकारचे हायब्रिड धोरण पारंपरिक ऋण फंडांच्या तुलनेत अधिक जास्त कर-पश्चात रिटर्न देऊ शकते. फंडाचे सक्रिय वाटप आणि स्मार्ट लिक्विडिटी व्यवस्थापन रिटर्न अनुकूलित करण्याचे उद्दिष्ट ठेवते.”

हल्लीच्या वर्षांमध्ये आर्बिट्रेज आणि हायब्रिड धोरणांकडे आकर्षण वाढत आहे कारण गुंतवणूकदार असे पर्याय शोधत आहेत ज्यामध्ये ऋण सुरक्षा आणि इक्विटी लिंक्ड उत्पादनांची कर बचत क्षमता व लवचिकता यांना एकत्र जोडले जाते.

टाटा कॉर्पोरेट बॉन्ड फंड – रेग्युलर प्लॅनने एका वर्षात ८.३४% चे वार्षिक रिटर्न दिले आहे, तर याच कालावधीत क्रिसिल कॉर्पोरेट बॉन्ड ए-II इंडेक्सने ७.९७% रिटर्न दिले आहे. २०२१ मध्ये स्थापनेपासून फंडने ५.९६% चे रिटर्न दिले आहे (स्रोत: प्रेझेंटेशन). व्हॅल्यू रिसर्चनुसार, टाटा आर्बिट्रेज फंड – डायरेक्ट प्लॅन १ वर्ष आणि ५ वर्षांच्या एसआयपी रिटर्न दोन्हींसाठी आर्बिट्रेज फंडांमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. १ वर्षाच्या एसआयपीवर ८.०५% आणि ५ वर्षांच्या एसआयपीवर ७.०६% रिटर्न दिले आहे.

टाटा इनकम प्लस आर्बिट्रेज ऍक्टिव्ह फंड ऑफ फंडच्या प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये ५००० रुपयांच्या कमीत कमी गुंतवणुकीवर २ वर्षांनी इक्विटी टॅक्सेशन लाभ आणि ३० दिवसांनी रिडीम केल्यावर ०.२५% चा खूपच कमी एक्झिट लोड यांचा समावेश आहे.

टाटा ऍसेट मॅनेजमेंट गुंतवणूकदारांना खूप चांगल्या प्रकारे संशोधन करून तयार केलेली, नाविन्यपूर्ण सोल्युशन्स प्रदान करण्यासाठी आपली वचनबद्धता मजबूत करत आहे, ही सोल्युशन्स बदलत्या बाजारपेठेचा वेग आणि दीर्घकालीन धन निर्मिती या उद्दिष्टांना अनुरूप आहे.

स्टार हेल्थ’च्या संचालक मंडळाच्या अध्यक्षपदी राजीव खेर यांची नियुक्ती

चेन्नई,  – स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (स्टार हेल्थ इन्शुरन्स) या भारतातील सर्वांत मोठ्या व्यक्तिग्राही आरोग्यविमा कंपनीच्या संचालक मंडळाच्या अध्यक्षपदी राजीव खेर यांची नियुक्ती झाली आहे. खेर हे या कंपनीत सध्या स्वतंत्र संचालक म्हणून काम करीत आहेत. त्यांची नियुक्ती २९ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत निश्चित करण्यात आली. भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरण (ईर्डा) या संस्थेची मंजुरी मिळाल्यानंतर खेर यांच्या नियुक्तीला अधिकृतता प्राप्त होईल.राजीव खेर यांना आंतरराष्ट्रीय व्यापार, औद्योगिक विकास, शाश्वत धोरणे आणि नियामक प्रशासन या क्षेत्रांत चार दशकांहून अधिक काळाचा अनुभव आहे. भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी असलेले खेर हे केंद्रात वाणिज्य सचिव होते. त्यांनी पर्यावरण आणि वाणिज्य मंत्रालयांमध्ये अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या हेत. तसेच स्पर्धा अपीलीय न्यायाधिकरणाचे सदस्य म्हणूनही त्यांनी कार्य केले आहे. २०१५ ते २०२० या काळात भारताचे विदेश व्यापार धोरण घडवण्यात, आंतरराष्ट्रीय व्यापार वाटाघाटींचे नेतृत्व करण्यात आणि जागतिक स्तराशी सुसंगत नियामक चौकट निर्माण करण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. धोरणात्मक सल्लागार म्हणून त्यांची ख्याती सरकार, आंतरराष्ट्रीय कंपन्या आणि धोरण अभ्यास संस्थांमध्येही आहे.

या नियुक्तीबाबत प्रतिक्रिया देताना राजीव खेर म्हणाले, “भारताच्या सामाजिक व आर्थिक स्थैर्यासाठी आरोग्यविमा अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. या टप्प्यावर ही जबाबदारी स्वीकारणे ही माझ्यासाठी गौरवाची बाब आहे. ‘स्टार हेल्थ’ने ग्राहक-केंद्रिततेसह नवकल्पनांचा अवलंब करत एक विश्वासार्ह ब्रँड म्हणून स्थान निर्माण केले आहे. संचालक मंडळ आणि व्यवस्थापनासोबत जवळून काम करताना मी चांगल्या प्रशासकीय पद्धती बळकट करण्यावर, दीर्घकालीन मूल्यनिर्मितीवर आणि आरोग्य तसेच विमा क्षेत्रातील बदलत्या परिस्थितीत कंपनीला योग्य दिशेने नेण्यावर भर देईन. समावेशक विकास, नैतिक नेतृत्व आणि संस्थात्मक उत्कृष्टता यावर आमचा ठाम विश्वास राहील.”

या संदर्भात ‘स्टार हेल्थचे व्यवस्थापकीय संचालक  मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रॉय म्हणाले, “या महत्त्वपूर्ण टप्प्यावर राजीव खेर यांचे नेतृत्व लाभणे हे आमच्यासाठी मोठे भाग्य आहे. त्यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व, धोरण क्षेत्रातील सखोल जाण आणि सार्वजनिक हिताविषयीची समज स्टार हेल्थच्या पुढील विकासप्रवासात मोलाची ठरेल. विविध क्षेत्रांतील त्यांच्या अनुभवामुळे स्टार हेल्थ अधिक सक्षम, ध्येयधोरणांनी प्रेरित आणि भविष्यातील आव्हानांना तोंड देणारी संस्था बनण्याच्या दिशेने पुढे जाईल. सर्वांसाठी सहज उपलब्ध आणि विश्वासार्ह आरोग्यविमा सेवा देण्याच्या आमच्या संकल्पात त्यांच्या मार्गदर्शनामुळे नक्कीच अधिक बळ येईल.”

सोमेश्वर फाउंडेशन’ तर्फे ‘पुणे आयडॉल’ स्पर्धा १९ मे रोजी सुरू

प्रसिद्ध गायिका सावनी रविंद्र यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन : माजी नगरसेवक सनी निम्हण यांची माहिती

पुणे : ‘सोमेश्वर फाउंडेशन’ आयोजित महाराष्ट्रातील हौशी गायक, कलाकरांची ‘पुणे आयडॉल २०२५’ स्पर्धा दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील १९ ते २४ मे २०२५ या दरम्यान, पंडित भिमसेन जोशी नाट्यगृह, औंध येथे होणार असल्याची माहिती सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण यांनी दिली.

दिवंगत आमदार विनायक निम्हण यांनी सन २००३ साली सुरू केलेल्या या स्पर्धेचे यंदा २३ वे वर्ष आहे. स्पर्धेचे उ‌दघाटन गायन क्षेत्रात राष्ट्रपती पदक विजेत्या, प्रसिद्ध गायिका सावनी रविंद्र यांच्या हस्ते सोमवार दि.१९ मे, सकाळी ९.३० वा. पंडित भीमसेन जोशी नाट्यगृह, औंध येथे होणार आहे. अंतीम फेरी २४ मे २०२५ रोजी, १२ ते ३ या वेळेत बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे होणार आहे. स्पर्धेचे फॉर्म www.sunnynimhan.com या संकेस्थळावर उपलब्ध असणार आहेत. प्रवेशाची अंतीम तारीख १५ मे २०२५ राहिल. अधिक माहितीसाठी संपर्क : सोमेश्वर फाउंडेशन कार्यालय, शिवाजीनगर गावठाण, जंगली महाराज रोड, पुणे.

स्पर्धेचे परिक्षक म्हणून रामेश्वरी वैशंपायन, कल्याणी देशपांडे, जितेंद्र भुरूक, कोमल लाळगे हे काम पहाणार आहेत. वय वर्षे १५ पर्यंत ‘लिटिल चॅम्प्स’, वय ‘१५ ते ३० वर्ष ‘युवा आयडॉल ‘,३० ते ५० वर्ष ‘जनरल आयडॉल ‘वर्ष ५० नंतर ‘ओल्ड इज गोल्ड’ अशा चार गटात स्पर्धा होणार आहेत. सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या पाच हौशी कलाकारांना विशेष निमंत्रित करून त्यांना गाण्याची संधी देऊन त्यांना सोमेश्वर फाउंडेशन तर्फे सन्मानित केले जाणार आहे. प्रत्येक गटातील विजेत्यास रोख रक्कम १५ हजार, १० हजार व मानाचे ‘पुणे आयडॉल’ सन्मान चिन्ह दिले जाणार आहे. सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने काही निवडक व प्रतिभावंत कलाकारांना शैक्षणिक व वैद्यकीय गरजेपोटी मदत म्हणून रोख रक्कम दिली जाते.

प्रसिद्ध गायक अरूण दाते, प्रभा अत्रे, रविंद्र साठे, महेश काळे, त्यागराज खाडिलकर, डॉ. सलील कुलकर्णी, शौनक अभिषेकी, राहुल देशपांडे, वैशाली सामंत, अभिजित सावंत, अभिजित कोसंबी अशा गायन क्षेत्रातील दिग्गज मंडळींनी या स्पर्धेच्या माध्यमातून नवोदित कलाकारांना मार्गदर्शन केले आहे. सौरभ साळुंके, कोमल कृष्ण, तुषार रिठे, प्रमोद डाडर, विनोद सुर्वे, महंमद रफी अशा अनेक प्रतिभावंत कलाकारांनी गायन क्षेत्रात आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. अशी माहिती जितेंद्र भुरूक आणि बिपीन मोदी यांनी दिली.स्पर्धेसाठी अमित मुरकूटे, अनिकेत कपोते, गणेश शेलार, संजय तारडे, प्रमोद कांबळे आदी नियोजन करत आहेत.

मुंबई, पुणे, संभाजीनगरसह नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्गअशा एकूण १६ ठिकाणी युद्धाची मॉकड्रील

पुणे-केंद्र सरकारने खबरदारी म्हणून देशभरातील महत्त्वाच्या शहरांत युद्धाचे मॉक ड्रील करण्याचा निर्णय घेतला आहे. या शहरांत महाराष्ट्रातील 16 ठिकाणांचा समावेश असून, तिथे बुधवारी एकाचवेळी ही मॉकड्रील होणार आहे.यासंबंधीच्या माहितीनुसार, पाकिस्तानसोबतच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने देशातील 244 शहरांत युद्धाची मॉकड्रील घेण्याचे आदेश दिलेत. त्यानुसार दोन्ही देशांमधील तणाव वाढला किंवा युद्धाची स्थिती उद्धवली तर आपत्कालीन स्थितीत काय करावे? यासंबंधीचे दिशानिर्देश जारी केलेत. त्यानुसार, देशभरात 7 मे रोजी नागरी संरक्षण जिल्हे, ठिकाणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ही मॉक ड्रील घेतली जाणार आहे.

देशपातळीवर घेण्यात येणाऱ्या मॉकड्रीलमध्ये महाराष्ट्रातील 16 ठिकाणांचा समावेश आहे. या ठिकाणांची 3 गटांत विभागणी करण्यात आली आहे. सर्वात पहिला गट हा अतिसंवेदनशील ठिकाणांचा आहे. यात देशाची आर्थिक राजधानी मुंबईसह लगतच्या उरण व तारापूर या 2 ठिकाणांचा समावेश आहे. दुसऱ्या गटात ठाणे, पुणे, नाशिक, रोहा -धाटाव – नागोठणे, मनमाड, सिन्नर, थळ वैशेत, पिंपरी चिंचवड या ठिकाणांचा समावेश आहे.

तर तिसऱ्या गटात छत्रपती संभाजीनगर, भुसावळ, रायगड, रत्नागिरी, व सिंधुदुर्ग या ठिकाणांचा समावेश आहे. या तिन्ही गटांतील 16 ठिकाणांवर बुधवारी युद्धाची मॉकड्रील केली जाईल. त्यामुळे तेथील प्रशासनाने त्याची जय्यत तयारी सुरू केली आहे.

वीज पुरवठा खंडित करून ब्लॅकआऊट केले जाणार

या मॉकड्रील अंतर्गत हवाई हल्ल्यावेळी वाजवले जातात तसे सायरन वाजवले जातील. तसेच अनेक शहरांत वीज पुरवठा खंडीत करून ब्लॅकआऊट केले जाईल. सायरन वाजताच नागरिकांना सुरक्षित आश्रयस्थळी धाव घ्यावी लागले. स्थानिक प्रशासन, पोलिस, होमगार्ड्स, एनसीसी, एनएसएस, नेहरू युवा केंद्र संघटना व शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी या मॉकड्रीलमध्ये सहभागी होणार आहेत. यासंबंधी उपरोक्त सर्वच ठिकाणच्या प्रशासनाने योग्य ती पूर्वतयारी केली आहे.

मॉकड्रीलमध्ये नेमके काय होणार?

हवाई हल्ल्याची पूर्वसूचना दिली जाणार.
हल्ल्यावेळी सुरक्षित ठिकाणी लपून बसण्याचे प्रशिक्षण जिले जाणार.
रात्रीच्या वेळी शत्रूला महत्त्वाची ठिकाणे समजू नये यासाठी ब्लॅकआऊट केले जाणार.
महत्त्वाचे कारखाने शत्रूला दिसू नयेत म्हणून योग्य ती उपाययोजना केली जाणार.
सामान्य नागरिकांना बचावकार्याचे प्रशिक्षण दिले जाणार.
घरात पाणी, अन्न, इंधनाचा साठा कसा करावा याचे महत्त्वे सांगितले जाणार.

मॉकड्रीलवेळी कुठे वाजणार सायरन?

प्रशासकीय भवन
सरकारी भवन
पोलीस मुख्यालय
अग्निशमन दल केंद्र/ मुख्यालय
लष्करी तळ
शहरातील मोठे बाजार
गर्दीची ठिकाणे
सायरन वाजताच काय करावे अन् काय करु नये?

सायरन वाजताच घाबरून जाऊ नका.
कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका.
तातडीने सुरक्षित ठिकाणी आसरा घ्या. किमान 5 ते 10 मिनिटांच्या आत सुरक्षित स्थळ गाठा.
मोकळ्या जागेपासून दूर राहा.
रेडिओ, टीव्ही आणि शासकीय सतर्कतेच्या इशाऱ्यांवर लक्ष द्या.
घरात किंवा एखाद्या सुरक्षित इमारतीत प्रवेश करा.

SC चे आदेश, चार आठवड्यांत अधिसूचना, चार महिन्यांत निवडणूक : 2022 पूर्वीच्या स्थितीनुसार होणार इलेक्शन

महाराष्ट्रातील महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुकांबाबत आज सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मोठा निर्णय दिला आहे. राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता येत्या चार महिन्यांत घेण्याचे निर्देश कोर्टाने दिल्याने निवडणूक प्रक्रियेला गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका पुढील 4 महिन्यांच्या आत घेण्याचे महूत्वपूर्ण निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी एका प्रकरणात सुनावणी करताना दिले. कोर्टाने ही निवडणूक 1994 ते 2022 पर्यंत ओबीसी आरक्षणाची जी स्थिती होती त्यानुसार घेण्याचे आदेश दिलेत. विशेषतः राज्य निवडणूक आयोगाला यासंबंधी 4 आठवड्यांच्या आत अधिसूचना जारी करण्याचेही निर्देश दिलेत. त्यामुळे महाराष्ट्रातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बार दिवाळीपूर्वी उडणार हे निश्चित झाले आहे.

ओबीसी आरक्षणाच्या वादामुळे महाराष्ट्रात 2021 पासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. न्यायमूर्ती सूर्यकांत व न्यायमूर्ती एन के सिंह यांच्या खंडपीठापुढे मंगळवारी या प्रकरणी सुनावणी झाली. त्यात कोर्टाने ह्या निवडणुका 4 महिन्यांच्या आत घेण्याचे निर्देश दिलेत. कोर्टाच्या आदेशांनुसार, ओबीसी समुदायाला 2022 पूर्वी असणारे आरक्षण कायम ठेवून 4 महिन्यांच्या आत ही निवडणूक घ्यावी लागेल.

4 आठवड्यांच्या आत काढावी लागेल अधिसूचना

कोर्टाने आपल्या आदेशात काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 5 वर्षांपासून निवडणूक झाली नसल्याची बाब प्रामुख्याने अधोरेखित करण्यात आली आहे. त्यामुळे कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला 4 आठवड्यांच्या आत अधिसूचना काढण्याचे निर्देश दिलेत. ही निवडणूक बांठिया आयोगाच्या अहवालाला आव्हान देणाऱ्या याचिकांवरील निकालाच्या अधीन असतील, असेही कोर्टाने या प्रकरणी स्पष्ट केले आहे.

ओबीसी समुदायाला 2022 पूर्वीचे राजकीय आरक्षण

या प्रकरणाशी संबंधित एका वकिलाने बोलताना सांगितले की, महाराष्ट्रातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 5 वर्षांपासून प्रशासक कार्यरत आहेत. हे राज्यघटनेत नमूद तरतुदींच्या विरोधात आहेत. छत्रपती संभाजीनगर व नवी मुंबई महापालिका ही याची उदाहरणे आहेत. आमच्याकडे अशा अनेक अनियमितता आल्या आहेत. त्यामुळे या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर लोकनियुक्त लोकप्रतिनिधी असणे गरजेचे आहे, असे कोर्टाने आपल्या नमूद केले आहे. कोर्टाने या प्रकरणाशी संबंधित सर्वच पक्षकारांना निवडणूक घेण्यास कुणाचा विरोध आहे का? असा प्रश्न केला. त्यावर सर्वांनी ‘नाही’ असे उत्तर दिले. त्यानंतर कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले.

ओबीसी समुदायाला 2022 पूर्वी जे राजकीय आरक्षण होते, तेच आरक्षण त्यांना पुन्हा देण्यात यावे. त्यानंतर 4 आठवड्यांच्या आत राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुकीची अधिसूचना काढावी. या प्रकरणी वादाचे सर्वच मुद्दे टाळले जावेत असेही कोर्टाने या प्रकरणी म्हटल्याचे या वकिलाने सांगितले.

सप्टेंबरपूर्वी निवडणूक प्रक्रिया होणार पूर्ण

दुसरीकडे, वकील सिद्धार्थ शिंदे यांनीही सुप्रीम कोर्टाचा आदेश समजावून सांगितला आहे. सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 महिन्यांच्या आत घेण्याचे निर्देश दिलेत. कोर्टाने ही निवडणूक 1994 ते 2022 पर्यंत ओबीसी आरक्षणाची जी स्थिती होती त्यानुसार ह्या निवडणुका घेण्याचे आदेश दिलेत. निवडणूक आयोग व राज्य सरकारला येत्या सप्टेंबर महिन्याच्या आत ही निवडणूक घ्यावी लागेल, असे ते म्हणालेत.

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 29 महापालिका, 257 नगर परिषद, 26 जिल्हा परिषद, 289 पंचायत समित्यांच्या निवडणुका रखडल्या आहेत. त्यामुळे या संस्थांमध्ये निवडणुका न झाल्यामुळे प्रशासकांमार्फत कारभार सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2025 च्या मे महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता व्यक्त केली होती. परंतु हे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून होते. आता या बाबतचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या निवडणुकांच्या विलंबामुळे स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधित्वाचा अभाव जाणवत असून, नागरिकांमध्ये असंतोषाची भावना होती. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर आता निवडणुकांची प्रक्रिया सुरू होण्याची अपेक्षा आहे.
महाराष्ट्र राज्यात सध्या एकूण 29 महानगरपालिकांच्या निवडणुका प्रलंबित

बृहन्मुंबई महानगरपालिका (मुंबई) – 1888
पुणे महानगरपालिका – 1950
नागपूर महानगरपालिका – 1951
सोलापूर महानगरपालिका – 1964
कोल्हापूर महानगरपालिका – 1972
ठाणे महानगरपालिका – 1982
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका – 1982
नाशिक महानगरपालिका – 1982
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका – 1982
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका – 1982
अमरावती महानगरपालिका – 1983
नवी मुंबई महानगरपालिका – 1992
नांदेड-वाघाळा महानगरपालिका – 1997
उल्हास नगर महानगरपालिका – 1992
सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका – 1998
अकोला महानगरपालिका – 2001
मालेगाव महानगरपालिका – 2001
मीरा-भाईंदर महानगरपालिका – 2002
भिवंडी-निजामपूर महानगरपालिका – 2002
जळगाव महानगरपालिका – 2003
अहिल्या नगर महानगरपालिका – 2003
धुळे महानगरपालिका – 2003
वसई-विरार महानगरपालिका – 2009
लातूर महानगरपालिका – 2011
चंद्रपूर महानगरपालिका – 2012
परभणी महानगरपालिका – 2012
पनवेल महानगरपालिका – 2016
इचलकरंजी महानगरपालिका – 2022
जालना महानगरपालिका – 2023
प्रलंबित जिल्हा परिषदांची यादी

रायगड
रत्नागिरी
सिंधुदुर्ग
नाशिक
जळगाव
अहमदनगर (अहिल्या नगर)
पुणे
सातारा
सांगली
सोलापूर
कोल्हापूर
औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)
जालना
परभणी
हिंगोली
बीड
नांदेड
उस्मानाबाद (धाराशिव)
लातूर
अमरावती
बुलढाणा
यवतमाळ
वर्धा
चंद्रपूर
गडचिरोली

पाकिस्तानातील 3 कोटी लोक पाण्यासाठी तरसणार:भारताने चिनाब नदीचा प्रवाह थांबवला

पहलगाममध्ये अटकेचे सत्र तीव्र, आतापर्यंत १८० संशयितांना ताब्यात

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने पाकिस्तानविरुद्ध केलेल्या वॉटर स्ट्राइकचा परिणाम दिसून येत आहे.भारताने बगलीहार धरणातून चिनाब नदीचे पाणी थांबवले आहे. यानंतर, सोमवारी पाकिस्तानातील सियालकोटमध्ये चिनाब नदीची पाण्याची पातळी १५ फूटांपर्यंत घसरली. ही पातळी रविवारपेक्षा ७ फूट कमी आहे.

चिनाब नदीच्या सततच्या आकुंचनामुळे, पंजाबमधील २४ महत्त्वाच्या शहरांमधील ३ कोटींहून अधिक लोकांना ४ दिवसांनी पिण्याच्या पाण्यासाठी थांबावे लागू शकते. पाकिस्तानातील फैसलाबाद आणि हाफिजाबाद सारख्या दाट लोकवस्ती असलेल्या शहरांमधील ८०% लोकसंख्या पिण्याच्या पाण्यासाठी चिनाब नदीच्या पृष्ठभागावरील पाण्यावर अवलंबून आहे.

पाकिस्तानच्या सिंधू जल प्राधिकरणाला भीती होती की भारताच्या या निर्णयामुळे खरीप पिकांसाठी २१% पाणी कमी होईल. पाकिस्तानी संसदेने याला युद्ध पुकारण्याचे कृत्य म्हटले आहे.पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू पाणी करार स्थगित केला आहे. १९ सप्टेंबर १९६० रोजी भारत आणि पाकिस्तानमध्ये ६ नद्यांचे पाणी वाटण्यासाठी सिंधू पाणी करार झाला. या करारानुसार, भारताला तीन पूर्वेकडील नद्यांवर (रावी, बियास आणि सतलज) अधिकार मिळाले, तर पाकिस्तानला तीन पश्चिमेकडील नद्या (सिंधू, झेलम आणि चिनाब) वापरण्याची परवानगी देण्यात आली.

पाकिस्तानची ८०% शेती सिंधू, झेलम आणि चिनाब नद्यांच्या पाण्यावर अवलंबून आहे. आता भारताने या नद्यांचे पाणी रोखल्यामुळे पाकिस्तानमधील पाणी संकट अधिकच वाढेल. तिथली आर्थिक परिस्थिती बिघडेल. याशिवाय, पाकिस्तान अनेक धरणे आणि जलविद्युत प्रकल्पांमधून वीज निर्मिती करतो. पाण्याच्या कमतरतेमुळे वीज निर्मितीत घट होऊ शकते, ज्यामुळे आर्थिक आणि औद्योगिक क्रियाकलापांवर परिणाम होईल.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील गुन्हेगारांचा शोध सुरक्षा यंत्रणांनी तीव्र केला आहे. आतापर्यंत २८०० हून अधिक लोकांची चौकशी करण्यात आली आहे आणि १८० संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. दहशतवादी नेटवर्क आणि दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्यांचा नायनाट करण्यासाठी कारवाई सुरू करण्यात आली आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार पाळत वाढवण्यात आली आहे. दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात असल्याचे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. तसेच, काश्मीर प्रदेशात वाहनांची तपासणी तीव्र करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी चेकपॉईंटवर कडक तपासणी सुरू असते.

स्लीपर सेल्स ओळखून कारवाई केली जात आहे. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दुर्गम भागात असलेले ६० ट्रेकिंग मार्ग आणि पर्यटन स्थळे तात्पुरती बंद करण्यात आली आहेत.

दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीर खोऱ्यातील पर्यटकांचा ओघ ८५% ने कमी झाला आहे.

पर्यटन विभाग आणि टूर ऑपरेटर्सच्या मते, हल्ल्यापूर्वी दररोज ७,००० पर्यटक खोऱ्यात येत असत जे आता ८०० ते १००० पर्यंत कमी झाले आहे .

भारतीय नौदलाद्वारे स्वदेशी बनावटीच्या बहु-प्रभावक तसेच बहुउद्देशीय भू- सुरूंगाची (कमी स्फोटकांसह) युद्धजन्य प्रमाणीकरण चाचणी यशस्वी

0

नवी दिल्‍ली-

संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) आणि भारतीय नौदलाद्वारे स्वदेशी बनावटीच्या बहु-प्रभावक तसेच बहुउद्देशीय भू- दारूगोळा सुरूंगाची (एमआयजीएम) युद्धजन्य प्रमाणीकरण (कमी स्फोटकांसह) चाचणी यशस्वी झाली. ही प्रणाली अतिशय  प्रगत आहे. विशाखापट्टणमच्या नौदल विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रयोगशाळेने आणि पुण्याच्या हाय एनर्जी मटेरियल्स रिसर्च लॅबोरेटरी आणि चंदीगडच्या टर्मिनल बॅलिस्टिक्स रिसर्च लॅबोरेटरी या डीआरडीओ च्या अन्य प्रयोगशाळांच्या सहयोगातून हे बहुउद्देशीय विघातक दारूगोळ्यासह भू सुरूंग  विकसित केले आहे.

आधुनिक प्रचंड  जहाजे आणि पाणबुड्यांच्या  विरोधात भारतीय नौदलाची क्षमता वाढवण्यासाठी ‘एमआयजीएम’ची रचना करण्यात आली आहे. विशाखापट्टणम येथील भारत डायनॅमिक्स लिमिटेड आणि हैदराबाद येथील  अपोलो मायक्रोसिस्टम्स लिमिटेड या प्रणालीचे उत्पादन भागीदार आहेत.

A floating object in the waterDescription automatically generated

डीआरडीओ, भारतीय नौदल आणि उद्योगाचे कौतुक करताना, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नमूद केले की, या प्रगत प्रणालीमुळे भारतीय नौदलाच्या समुद्राखालील युद्ध क्षमतांमध्ये आणखी वाढ होणार आहे.

संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि डीआरडीओ चे अध्यक्ष डॉ. समीर व्ही. कामत म्हणाले की, या प्रमाणीकरण चाचणीसह, ही प्रणाली आता भारतीय नौदलात समाविष्ट होण्यासाठी सज्ज आहे.

भाजपकडून राज्यातील तब्बल ७८ शहर आणि जिल्हाध्यक्षांची नावे एकाच वेळी जाहीर होणार-पुण्यातून कोण? भिमाले कि बिडकर ?

0

पुणे-भाजपमध्ये सध्या केंद्र आणि राज्य पातळीवर संघटनात्मक बदलांची तयारी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे शहराध्यक्ष पदावर बदल होण्याची शक्यता अधिक स्पष्ट होत चालली आहे. काही दिवसांपूर्वी मंडल अध्यक्षांची नियुक्ती झाल्यानंतर आता शहर आणि जिल्हाध्यक्ष निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून, नुकतेच यासाठी मतदान प्रक्रिया देखील पार पडली आहे.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षपदासाठीच्या नावांची निवड पूर्ण झाली असून, त्याची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. भाजपकडून राज्यातील तब्बल ७८ शहर आणि जिल्हाध्यक्षांची नावे एकाच वेळी जाहीर होणार असून, त्यासाठी मुहूर्तही निश्चित करण्यात आला आहे.

पुणे शहराध्यक्ष पदासाठी सध्या भाजपचे विद्यमान अध्यक्ष धीरज घाटे, माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, गणेश बिडकर, गणेश घोष आणि राजेश पांडे ही नावे चर्चेत आहेत. महिला नेत्यांमध्ये माजी नगरसेविका वर्षा तापकीर, आरती कोंढरे आणि वर्षा डहाळे यांची नावे पुढे येत आहेत. मात्र सर्वाधिक चर्चा ही गणेश बिडकर आणि श्रीनाथ भिमाले यांच्या नावाभोवती केंद्रित आहे.

आठ वर्षांच्या मुलाने सांगितली आईच्या खुनाची आंखोदेखी कहाणी :घरात पैसे न दिल्याच्या कारणावरून वाद त्यातून पत्नीचा खून

पुणे- रात्री ज्या राकेश निसार ला पोलिसांनी बाईक वरून पत्नीचा मृतदेह विल्हेवाटीसाठी नेताना पकडला .त्याच्या ८ वर्षाच्या मुलाने आपल्या समोरच पित्याने आईची हत्या केल्याची आखो देखी पोलिसांना कथन केली आहे. या आठ वर्षांच्या मुलासमोरच आपल्या पत्नीचा अत्यंत निर्घृणपणे खून केल्याची घटना घडली आहे. पत्नीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी जाताना पोलिसांनी आरोपीला पकडले. ही हत्या घरगुती वादातून झाल्याचे समोर आले आहे. ही घटना नांदेड सीटीजवळ घडली आहे.

घटनेची अधिक माहिती अशी की, स्वयंपाक करण्यावरून व घरात पैसे न दिल्याच्या कारणावरून पती व पत्नीमध्ये वाद झाले. हा वाद इतका विकोपाला गेला की आरोपी पतीने आपल्या 8 वर्षांच्या मुलासमोरच पत्नीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर पत्नीचा मृतदेह कपड्यात गुंडाळून विल्हेवाट लावण्यासाठी दुचाकीवरून घेऊन निघाला. यावेळी रस्त्यातच पोलिसांनी त्याला पकडले. यावेळी चौकशीत आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांना त्याच्या बोलण्यावर संशय आला व कसून चौकशी सुरू केली. यावेळी पोलिसांनी 8 वर्षांच्या मुलाला विचारले असता, मुलाने घडलेला संपूर्ण प्रकार डोळ्यात पाणी आणत सांगितला आणि आरोपी पतीचे पितळ उघडे पडले.

राकेश निसार असे आरोपीचे नाव आहे तर बाबीता निसार असे मृत महिलेचे नाव आहे. आंबेगाव आणि भारती विद्यापीठ पोलिसांनी राकेश निसारला रंगेहाथ पकडले आणि सिंहगड पोलिसांनी अटक केली. राकेश हा धायरी परिसरात आपल्या कुटुंबासोबत राहत होता व मजूरी काम करायचा. रात्री एकच्या सुमारास स्वामीनारायण मंदिरासमोरून भुमकर पुलाजवळ राकेश आपल्या पत्नीचा मृतदेह घेऊन जात असताना काही लोकांनी पाहिले. येथील नागरिकांना संशय आला व त्यांनी तातडीने पोलिसांना याची कल्पना दिली. यावेळी भुमकर पुलाजवळ बिट मार्शल पोहोचले आणि राकेशला पकडले. यावेळी राकेशने दुचाकी सोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला.

मृतदेह कोणाचा आहे आणि कुठे घेऊन चालला असा प्रश्न विचारल्यावर राकेशने उडवाउडवीचे उत्तर देण्यास सुरू केले. मित्राने मृतदेह मागवला होता. त्याला खेडशिवपूरजवळ नेऊन देतो असे त्याने सांगितले. तसेच मृत पत्नीने फाशी घेत आत्महत्या केल्याचेही त्याने सांगितले. पोलिसांना संशय आला व त्यांनी थेट राकेशचे घर गाठले. यावेळी घरात राकेश आणि बाबीताचा आठ वर्षांचा मुलगा होता. मुलाकडे चौकशी केली असता मुलाने पोलिसांना सांगून टाकले की वडिलांनीच आईला मारून टाकले. आई आणि वडिलांमध्ये जेवणावरून आणि पैसे देण्याच्या कारणावरून रोज वाद व्हायचे. आज भांडण झाल्यावर बाबांनीच आईला गळा दाबून मारून टाकले, असे उत्तर मुलाने पोलिसांना दिले. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

UN मध्ये भारत-पाक तणावावर बंद दाराआड बैठक:चर्चेनंतर कोणताही तोडगा नाही

पाकिस्तानच्या आवाहनानंतर बंद दाराआड बैठक

सोमवारी रात्री उशिरा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) भारत आणि पाकिस्तानमध्ये बंद दाराआड बैठक झाली. तथापि, या बैठकीनंतर UNSC ने कोणतेही अधिकृत निवेदन जारी केले नाही किंवा कोणताही ठराव मंजूर करण्यात आला नाही.तथापि, बैठकीनंतर, संयुक्त राष्ट्रांमधील पाकिस्तानचे राजदूत इफ्तिखार अहमद यांनी सांगितले की, दक्षिण आशियातील वाढता तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानने ही बैठक बोलावण्याची विनंती केली होती. ते म्हणाले की त्यांचा उद्देश साध्य झाला आहेही बैठक सुरक्षा परिषदेच्या मुख्य सभागृहात नव्हे तर ‘कन्सल्टेशन रूम’मध्ये झाली. या खोलीत गोपनीय संभाषणे होतात. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा तात्पुरता सदस्य असलेल्या पाकिस्तानने बैठकीसाठी बंद दाराआड चर्चेचे आवाहन केले होते.

या बैठकीला १५ देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. ही चर्चा सुमारे दीड तास चालली. बैठकीनंतर सुरक्षा परिषदेने कोणतेही अधिकृत निवेदन जारी केलेले नाही. बैठकीतून बाहेर पडताना एका रशियन राजनयिकाने सांगितले की आम्हाला आशा आहे की तणाव कमी होईल.बैठकीनंतर संयुक्त राष्ट्रांमधील पाकिस्तानचे राजदूत असीम इफ्तिखार अहमद यांनी पत्रकारांना संबोधित केले. पाकिस्तानची बहुतेक उद्दिष्टे साध्य करण्यात ही चर्चा यशस्वी झाली, असा दावा त्यांनी केला. यासोबतच त्यांनी सांगितले की पाकिस्तान शांततेच्या बाजूने आहे आणि चर्चेसाठी नेहमीच तयार आहे.

इफ्तिखार म्हणाले की, सुरक्षा परिषदेतील अनेक सदस्यांनी सर्व मुद्दे शांततेने सोडवले पाहिजेत यावर सहमती दर्शवली. यामध्ये काश्मीरचा मुद्दाही समाविष्ट आहे. ते म्हणाले की, या प्रदेशात शांतता केवळ संवाद आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन करूनच शक्य आहे.

२३ एप्रिल रोजी भारताने ‘एकतर्फी आणि बेकायदेशीर’ पावले उचलल्याचा आरोप इफ्तिखार यांनी केला. यासोबतच लष्करी जमवाजमव आणि प्रक्षोभक विधाने करण्यात आली. यामुळे तणाव धोकादायक पातळीवर वाढला. इफ्तिखार म्हणाले की, पाकिस्तान संघर्ष करू इच्छित नाही परंतु गरज पडल्यास आपल्या सार्वभौमत्वाचे आणि प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्यास पूर्णपणे तयार आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यासाठी पाकिस्तान जबाबदार असल्याचा भारताचा आरोप इफ्तिखार यांनी फेटाळून लावला. ते म्हणाले की, पाकिस्तान आणि सुरक्षा परिषदेच्या सर्व सदस्यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.इफ्तिखार यांनी बैठकीत सिंधू पाणी करार एकतर्फी स्थगित करण्याच्या भारताच्या निर्णयावरही गंभीरपणे चर्चा केली. त्यांनी सांगितले की हा करार जागतिक बँकेच्या मध्यस्थीने झाला होता आणि तीन युद्धांदरम्यानही तो अबाधित राहिला. पाकिस्तानी राजदूत म्हणाले, “पाणी हे जीवन आहे, त्याचा वापर शस्त्र म्हणून करू नये.

या बैठकीतून कोणतेही ‘ठोस निकाल’ अपेक्षित नसावेत, असे माजी भारतीय स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. ते म्हणाले की, पाकिस्तान या व्यासपीठाचा वापर करून फक्त “धारणा निर्माण करण्याचा” प्रयत्न करत आहे ज्याला भारत योग्य प्रतिसाद देईल.

प्रकाश मगदूम यांनी चित्रपट महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा कार्यभार स्वीकारला

मुंबई-

प्रकाश मगदूम यांनी आज राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या (एनएफडीसी) व्यवस्थापकीय संचालक पदाचा कार्यभार स्वीकारला.प्रकाश मगदूम हे भारतीय माहिती सेवेचे 1999 च्या तुकडीतील अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी अहमदाबाद येथे प्रेस इन्फर्मेशन ब्युरो (पीआयबी), पत्र सूचना कार्यालय आणि सेंट्रल ब्युरो ऑफ कम्युनिकेशनचे (सीबीसी) अतिरिक्त महासंचालक म्हणून काम पाहिले आहे.

मगदूम यांनी आपल्या दोन दशकांच्या कारकिर्दीत पुणे येथील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे (एनएफएआय) संचालक म्हणून काम पाहिले. या काळात भारताच्या सिने वारशाचे जतन, डिजीटायझेशन आणि पुनरुज्जीवन करत त्यांनी राष्ट्रीय  चित्रपट वारसा मोहिमेचे काम जारी राखले.

फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय), अर्थात भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेचे रजिस्ट्रार आणि तिरुवनंतपुरम येथे संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ता  म्हणूनही त्यांनी काम केले.

संयुक्त राष्ट्र प्रमुख म्हणाले – लष्करी उपायाने समस्या सुटणार नाही

0

बंद दाराआड झालेल्या बैठकीच्या काही तास आधी, संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाबद्दल चिंता व्यक्त केली होती. त्यांनी दोन्ही देशांना जास्तीत जास्त संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.

गुटेरेस यांनी एका निवेदनात म्हटले आहे की – “भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. मी दोन्ही देशांच्या सरकारांचा आणि नागरिकांचा आदर करतो आणि संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेत दोघांच्याही योगदानाबद्दल कृतज्ञ आहे. अशा परिस्थितीत, त्यांचे परस्पर संबंध इतक्या धोकादायक टप्प्यावर पोहोचले आहेत हे पाहून मला दुःख होत आहे.”

भारताला २८ मे रोजी रशियन युद्धनौका तमल मिळणार

५४ वर्षांनंतर देशात नागरी संरक्षण मॉक ड्रिल-देशात अशा प्रकारचा शेवटचा मॉक ड्रिल १९७१ मध्ये घेण्यात आला होता. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झाले. ही मॉक ड्रिल युद्धादरम्यान झाली.तथापि, पंजाबमधील फिरोजपूर कॅन्टोन्मेंटमध्ये रविवार-सोमवार रात्री ब्लॅकआउट सराव करण्यात आला. या काळात, गावे आणि परिसरात रात्री ९ ते ९:३० वाजेपर्यंत वीज बंद होती.

पाकिस्तानसोबतच्या युद्ध​​​​​ तणावादरम्यान, भारताला या महिन्यात रशियाकडून तमल ही युद्धनौका मिळणार आहे. रशिया २८ मे रोजी ते भारतीय नौदलाला सोपवेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जूनमध्ये ते अधिकृतपणे नौदलात समाविष्ट केले जाईल. ही युद्धनौका ब्रह्मोस क्षेपणास्त्राने सुसज्ज असेल, जी रडारवरही येणार नाही.

नागरी संरक्षण मॉक ड्रिलबाबत गृह मंत्रालयाची उच्चस्तरीय बैठक लवकरच सुरू होईल. केंद्र सरकारने ७ मे रोजी देशातील २४४ जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल करण्याचे सांगितले आहे. यामध्ये नागरिकांना हल्ल्यादरम्यान स्वतःचे संरक्षण करण्याचे प्रशिक्षण दिले जाईल. हवाई हल्ल्याचा इशारा देणारे सायरन वाजवले जातील.

पाकिस्तानने सलग १२ व्या दिवशी शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. ५-६ मे रोजी रात्री पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेवरील आठ ठिकाणी गोळीबार केला – कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, राजौरी, मेंढर, नौशेरा, सुंदरबनी आणि अखनूर. भारतीय सैन्याने याला प्रत्युत्तर दिले.यापूर्वी, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी दावा केला होता की भारत नियंत्रण रेषेवर (एलओसी) कधीही लष्करी कारवाई करू शकतो. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी राजकीय फायद्यासाठी या प्रदेशाला अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर ढकलत आहेत.२२ एप्रिल रोजी पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढत आहे. या हल्ल्यात दहशतवाद्यांच्या गोळीबारात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला.

मध्यरात्री बाईकवर पत्नी ची हत्या करून मृतदेह घेऊन फिरत होता तरुण, पोलिसांनी हटकलं अन्…

पुणे: पुण्यातील नांदेड सिटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. इथं मध्यरात्री दीडच्या सुमारास एक तरुण बाईकवर महिलेचा मृतदेह घेऊन फिरत होता. यावेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांनी त्याला हटकलं. त्याची विचारपूस केली असता पुण्याला हादरवणारं हत्याकांड समोर आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपी तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत.
राकेश रामनायक निसार असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. मध्यरात्री दीड वाजता आरोपी राकेश एका महिलेचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. यावेळी पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता, संबंधित मृतदेह दुसरा तिसरा कुणाचा नव्हे तर त्याच्याच पत्नीचा असल्याचं तपासात निष्पन्न झालं. बबीता राकेश निसार असं मयत पत्नीचं नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री उशिरा आरोपी राकेश याने पत्नी बबीताची गळा दाबून हत्या केली होती. पत्नीची हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो चक्क दुचाकीवरून प्रवास करत होता. तो पत्नीचा मृतदेह घेऊन भूमकर पुलाकडून स्वामीनारायण मंदिराच्या दिशेने निघाला होता. त्यावेळी आंबेगाव आणि भारती विद्यापीठ पोलिसानी आरोपीला बेड्या ठोकल्या.