Home Blog Page 3249

621 किलो ई कचरा संकलित करून दिल्या ७९ एलई डी ट्यूब मोफत

0
पुणे-नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,क्रीएटिव्ह फौंडेशन आणि श्री रिसायकलर्स च्या संयुक्त विद्यामाने दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रभाग क्र १३ मधे ई कचरा संकलन अभियान राबविण्यात येते,
आज ही मोहीम वनराई,कमींस इंडिया,आर्ट ऑफ लिव्हिंग व मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ इंजिनियरींग चे विद्यार्थी यांच्या सहकार्याने राबविण्यात आली,
*यावेळी ६२१ किलो ई कचरा संकलित करण्यात आला तर त्या बदल्यात 79 एल ई डी ट्युब व बल्ब मोफत वितरित करण्यात आले*
नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी हा उपक्रम सुरु करुन आता ४ महिने झाले असुन वरिष्ठ आरोग्य निरीक्षक दीपक ढेलवान,एस आय राहुल शेळके यांच्या टीम ने आजची मोहिम यशस्वी करण्यात मोलाचा वाटा उचलला.तब्बल ४० सोसायट्यान्मधुन हे संकलन करण्यात आले.

सृजन सुपर 20 युथ कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत महाराणा प्रताप संघ विजयी

0

पुणे- एक्सेलार स्पोर्टस् अॅड एन्टरटेमेंट प्रायव्हेट लिमिटेड व पुणे जिल्हा कबड्डी संघटना यांच्या सहकार्याने ओयोजित सृजन सुपर 20 युथ कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत खेड विभागात मुलींच्या गटात आंबेगावच्या महाराणा प्रताप संघाने अंबेगावच्या अभिनव कबड्डी संघाचा पराभव करत विभागात विजेतेपद पटकावले.
खेड येथे आजपासून सुरू झालेल्या खेड विभागातील सामन्यांमध्ये मुलींच्या अंतिम फेरीच्या लढतीत आंबेगावच्या महाराणा प्रताप संघाने अंबेगावच्या अभिनव कबड्डी संघाचा 43-36 असा पराभव करत विजेतेपद पटकावले.
मुलांच्या उपांत्यपुर्व फेरीच्या सामन्यात खेडच्या वेताळेश्वर क्लब संघाने खेडच्याच ओम कबड्डी क्लब संघाचा 21-19 असा पराभव केला. अंबेगावच्या कमलजादेवी कबड्डी क्लब संघाने खेडच्या महाराजा कबड्डी क्लब संघाचा 29-21 असा तर आंबेगावच्या महाराणा प्रताप संघाने आंबेगावच्या भैरवनाथ संघाचा 35-20 असा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.
स्पर्धेचे उद्घाटन बारामती जिल्हा परिषद सदस्य रोहीत पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अर्जून पुरस्कर विजेते कबड्डी खेळाडू शांताराम जाधव,  एक्सेलार स्पोर्टस् अॅड एन्टरटेमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे प्रमुख कौस्तुभ देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेतील प्रत्येक विभागातील विजेता व उपविजेता संघात(मुले व मुली) 18 आणि 19 नोव्हेंबर रोजी बारामती येथे सुपर प्लेऑफ सामने होणार आहेत.

स्पर्धेचा सविस्तर निकाल- मुली- उपांत्य फेरी
अभिनव कबड्डी संघ, आंबेगाव 39 वि.वि शिवराय स्पोर्टस् क्लब, खेड- 19
महाराणा प्रताप, अंबेगाव- 38 वि.वि पंडूरंग महाविद्यालय, जुन्नर- 21
अंतिम फेरी- महाराणा प्रताप, आंबेगाव- 43 वि.वि अभिनव कबड्डी संघ, आंबेगाव- 36
उपांत्यपुर्व फेरी- मुले
वेताळेश्वर क्लब, खेड-21 वि.वि ओम कबड्डी क्लब, खेड-19
कमलजादेवी कबड्डी क्लब, आंबेगाव- 29 वि.वि महाराजा कबड्डी क्लब, खेड- 21
महाराणा प्रताप, अंबेगाव- 35 वि.वि भैरवनाथ संघ, अंबेगाव-20

एमएसएलटीए योनेक्स सनराईज 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धेचे आयोजन * क्रिशन हुडा, सुदिप्ता किमार यांना अग्रमानांकन

0
पुणे- एड्युरन्स्‌ मराठवाडा-एमएसएलटीए टेनिस सेंटर(इएमएमटीसी)यांच्या तर्फे  आयोजित एमएसएलटीए – योनेक्स्‌ सनराईज्‌ 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात क्रिशन हुडा व मुलींच्या गटात सुदिप्ता किमार यांना अग्रमानांकन  देण्यात आले आहे.
ही  स्पर्धा इएमएमटीसी टेनिस कोर्ट,डिव्हिजनल स्पोर्टस्‌ कॉम्पलेक्स्‌ येथे  30 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर 2017 या कालावधीत होणार आहे.
*खेळाडूंची मानांकन यादी खालीलप्रमाणेः
मुलेः1. क्रिशन हुडा, 2. उदित गोगोई, 3. अजय मलिक, 4. अमन दहिया, 5. चिराग दुहन, 6. कार्तिक सक्सेना, 7. धन्या शहा, 8. विशेष पटेल
 
मुली- 1. सुदिप्ता किमार, 2. श्रृजना रायरला, 3. संदना सिरिमल्ला, 4. नाईशा श्रीवास्तव, 5. रुतूजा चाफळकर, 6. रेन सिंगला, 7. हृदया शहा, 8. याना धमिजा

दलितांच्या समवेत जेवणाची नौटंकी करण्याऐवजी राहुल गांधीनी दलित मुलीशी विवाह करावा-रामदास आठवले

0
अकोला- ‘मी ब्राम्हण मुलीशी विवाह केला, राहुल गांधीनी दलित मुलीशी विवाह करावा, दलित समाजात आता त्यांच्या योग्य मुली आहेत; दलितांच्या घरात जाऊन जेवण करण्याची नौटंकी बंद करावी,’ असा टोला केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी लगावला. ते आज अकोल्यात पत्रकारांशी बोलत होते.
रिपब्लिकन पक्षाचे ऐक्य झाल्यास माझ्या पेक्षा वरिष्ठ नेता म्हणून मला त्यांचे नेतुत्त्व मान्य आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वात आपण काम करण्यास तयार आहोत. एक्यानतर बहुमतचे निर्णय मला मान्य आहे. अल्पमत असणाऱ्यानी बहुमत असलेल्याना पाठिंबा द्यावा, बहुमताने निर्णय घेतल्यास ऐक्य टिकेल, एक्याची आज गरज आहेबाबासाहेबांना अपेक्षित सत्तेचे राजकारण प्रकाश आंबेडकरांनी अकोला जिल्ह्यात यशस्वी करुन दाखवले, मात्र राज्यभरात ते जमले नसल्याचे ते म्हणाले.

अन्नसुरक्षा हिच जीवन सुरक्षा हे ध्येय हॉटेलव्यावसायिकांनी बाळगावे- पालकमंत्री गिरीष बापट

0

पुणे –   पुणे विभागातील हॉटेल व्यावसायिकानी त्यांच्या व्यवसायाची वृध्दी करताना अन्न सुरक्षेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन (म.रा) मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांनी आज येथे केले. बालगंधर्व रंगमंदिरामध्ये आज अन्न व औषधे प्रशासनाच्या वतीने अन्न सुरक्षा व  मानदे अधिनियम2006अंतर्गत सुरक्षित अन्नपदार्थ उत्पादन,साठवण,हाताळणी व विक्रीबाबत हॉटेल,रेस्टॉरन्ट,केटरर्स व्यावसायिकांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होत, त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी पालकमंत्री बापट यांनी त्यांच्या विभागाच्या वतीने  संपूर्ण राज्यामध्ये हॉटेल व्यवसाय              करणा-यांकरीता अशा प्रकारच्या जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगितले.  हॉटेलमध्ये जेवणाकरीता आल्यावर ग्राहकांकडून तात्काळ जेवणाचा दर्जा ठरविला जातो. व त्याचा  व्यवसायवृध्दीवर परिणाम होत असल्याचे सांगितले. त्यामुळे जेवण तयार करताना पदार्थांची गुणवत्ता राखण्याबरोबरच तेथे स्वच्छतेबाबत जे नियम ठरविले आहेत. त्याचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांनी स्वयंशिस्त बाळगावी, त्यामुळे ग्राहकांचेही समाधान होईल. व एक प्रकारे सामाजिक बांधिलकी जपली जाईल. हॉटेल व्यावसायिकांना येणा-या अडी अडचणींचा निपटारा होण्याकरीता त्यांना या प्रशिक्षणाच्या माध्यमातून तसेच इतर वेळीही या विभागामार्फत सहकार्य होणार असल्याचे सांगितले.

हॉटेल व्यवसाय करताना कच्चा माल खरेदी ते पदार्थ तयार होईपर्यंत पाळावावयाचे नियम याबाबत माहिती देण्याकरीता अन्न व औषधे प्रशासनाच्या तसेच पुणे रेस्टॉरन्ट ॲन्ड हॉटेलियर्स असोशिएन यांच्या संयुक्त विद्यमाने आज कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. केंद्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार हॉटेल व रस्त्यांवरील व्यवसाय करणा-यांकरीता प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात यावे या उद्देशाने करण्यात आलेल्या या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी अन्न व औषधे प्रशासनाच्या आयुक्त डॉ. पल्लवी दराडे   यांनी पुणे विभागामार्फत मागील महिन्यापासून सुरु करण्यात आलेल्या या जनजागृती मोहिमेबाबत माहिती दिली. पुणे विभागाच्या 300 मंदिरामधील साधारणत 3500 विश्वस्तांना त्यांच्या मंदिरामार्फत वाटण्यात येणारा प्रसाद तयार करताना घ्यावयाच्या काळजी बाबत प्रशिक्षण देण्यात आल्याचे सांगितले. तर पुढील 3 महिन्यात 40 ते 50 हजार हॉटेल व्यावसायिकांना याबाबत प्रशिक्षीत करण्यात येणार आहे.  हॉटेल व्यवसायामध्ये 12 लाख रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असणा-यांकरीता लायसन्सची तर त्याखालील उलाढाल असणा-या व्यावसायिकांना नोंदणीची आवश्यता असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यशाळेच्या आयोजनावेळी  श्री.गणेश शेट्टी, अध्यक्ष, हॉटेल असोसिएशन व श्री.किशोर सरपोतदार, सचिव, हॉटेल असोशिएशन यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे आयोजनाकरीता सह आयुक्त (पुणे विभाग) शिवाजी देसाई, सं.मा.देशमुख व इतर अधिकारी कर्मचारी यांनी प्रयत्न केले. यावेळी  मोठया संख्येने हॉटेल व्यावसायिक उपस्थित होते.

ऋतिक रोशन ने दी “छट पूजा” की शुभकामनाएं |

मुम्बई की उपनगरी जुहू में रहने वाले ऋतिक अक्सर हर साल इस तिथि पर जुहू बीच पर छट पूजा करने आए श्रद्धालुओं की भीड़ देखते थे लेकिन इस वर्ष की छट पूजा की बात ही ओर थी क्योंकि इस साल असल मायने में अभिनेता को छट पूजा का महत्व समझा और ऐसे में ऋतिक ने पहली बार ट्वीटर के माध्यम से सभी को छट पूजा की बधाई दी।

देशवासियों को छट पूजा की शुभकामना देते हुए अभिनेता ने लिखा,“मैं हर साल बीच पर श्रद्धालुओं की भीड़ देखता था। लेकिन इस वर्ष मुझे छट पूजा का असल महत्व समझा। सभी को छट पूजा की शुभकामनाएं |”

ऋतिक रोशन, गणितज्ञ आनंद कुमार की जीवनी पर बनने वाली बायोपिक फिल्म में काम करेंगे, जिसमे ऋतिक मुख्य भूमिका में नज़र आएंगे। इस फ़िल्म में पहली बार अभिनेता पटना जैसे छोटे से कस्बे से तालुख रखने वाले व्यक्ति की भूमिका निभाएंगे और यह पहली दफ़ा होगा कि ऋतिक इस तरह का किरदार अदा करेंगे।

अपने इस किरदार के लिए ऋतिक बारीकी से बिहार की चाल-चलन और रीति रिवाज़ को समझ रहे है और इसी दौरान उन्हें छट पूजा के बारे में जानने का मौका मिला जिस वजह से वो इस त्योहार को बारीकी से समझ पाए और सही समय आने पर अभिनेता ने सभी को छट पर्व की बधाई दे दी।

विकास बहल के निर्देशन में बनने वाली यह फ़िल्म अपने आप में काफी अनोखी होगी और ऋतिक के प्रशंसक पहली बार उन्हें इस तरह के किरदार में देखें

सई ताम्हणकरने स्वीकारला तिचा पहिला फिल्मफेर अवार्ड फॅमिली कट्टासाठी

0

नेसको आयटी पार्क येथे २७ ऑक्टोबर २०१७ रोजी जिओ फिल्मफेअर अवॉर्ड्स २०१७ हा सोहळा अगदी दिमाखात पार पडला. विविध प्रकारचे परफॉर्मन्स हा सोहळ्याचा नेहमीचा प्लस पॉईंट असला तरी देखील, ह्या वेळेसचे रेडकार्पेट हि जोरदार होते.

सई ताम्हणकरचा ब्लु गाऊन विथ डायमंड नेकलेस विशेष लक्षवेधी ठरला हे नक्कीच! या व्यतिरिक्त सईसाठी फिल्मफेअरच हे तिसरं वर्ष विशेष ठरलं आहे!

ह्या वेळेस चा जिओ फिल्मफेअर अवॉर्ड्स सई ताम्हणकर साठी नक्कीच विशेष होता. कारण जिओ फिल्मफेअर २०१७ मध्ये सईला दोन चित्रपटांसाठी नामांकन होती – उत्कृष्ट अभिनेत्री, वजनदार आणि उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री, फॅमिली कट्टा!

सई ताम्हणकरला फॅमिली कट्टासाठी उत्कृष्ट सहाय्यकअभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला . सईच्या सिनेमातील वाटचालीमधला हा पहिला फिल्मफेअर अवॉर्ड आहे. फिल्मफेअरचे हे तिसरे वर्ष आहे आणि त्यामुळे तिच्यासाठी हा विशेष होता. हा अवॉर्ड स्वीकारताना सई खूप भारावून गेली होती. ह्या बाबत सई म्हणाली, ‘हो हा माझा पहिला फिल्मफेर आहे आणि मला खरंच खूप छान वाटतंय. हा फिल्मफेर आणखी खास आहे कारण मला हा अवॉर्ड फॅमिली कट्टासाठी मिळाला आहे. हा चित्रपट माझ्यासाठी अनेक पर्सनल कारणांसाठी खास होता, खूप जवळचा होता, आणि त्या चित्रपटासाठी पुरस्कार मिळणं आणि ते हि पहिला फिल्मफेर मिळणं हे तर नक्कीच फार आनंददायी आहे. पण मी ह्या सेलेब्रेशनवर जास्त वेळ रमणार नाहीये, पुढच्या कामासाठी लगेच तयार होणार आहे. इनफॅक्ट माझा डेली रुटीन सुरु झालंय.’

२०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या फॅमिली कट्टा ह्या चित्रपटात सईने ‘मंजू’ नावाची भूमिका साकारली होती. चित्रपटातला तिचा वावर अवघा काही मिनिटांचा असला तरी तिने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने कायम लक्षात राहिलं असा प्रभाव प्रेक्षकांवर नक्कीच पाडला होता. आणि या तिच्या भूमिकेसाठी तिला उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

बापूसाहेब गानला यांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त सत्कार

0
पुणे -कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष तथा सिध्दार्थ ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष बापूसाहेब गानला यांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त कर्तव्य फाऊंडेशन तर्फे पुणेरी पगडी,मफलर व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर,लष्कर पो.ठाण्याचे व.पो.निरीक्षक वसंत कुवर,फाऊंडेशनचे अध्यक्ष विकास भांबुरे,कार्याध्यक्ष अशोक देशमुख,उपाध्यक्ष सचिन कांबळे,ग्रंथपाल दिलीप भिकुले,बज्मे रहेबर कमिटीचे अक्रम शेख,समता सामाजिक संस्थेचे विजय भोसले, दीपक   कु-हाड़े, अय्युब खान,संजय फटके,इरफान मुल्ला आदी उपस्थित होते.
बापूसाहेब गानला यांनी कॅन्टोन्मेंट भागात राजकीय,सामाजिक,सांस्कृतिक व साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. ते 1968 ते 1997 या कालावधीत पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सदस्य होते याच दरम्यान ते सहा वेळा बोर्डाचे उपाध्यक्ष होते.1976 पासून ते पुणे जिल्हा बाॅड़ी बिल्डींग असोसिएशन मध्ये कार्यरत असून सध्या ते अध्यक्ष आहेत तसेच त्यांनी पुणे जिल्हा हाॅकी फेड़रेशन,पुणे जिल्हा सायकल असोसिएशन ,पुणे जिल्हा वेटलिफ्टींग असोसिएशन आदी संघटनावर त्यांनी काम केले आहे.ते अनेक वर्षे पुणे कॅन्टो.सहकारी बॅंकेचे संचालक व अध्यक्षही होते.गेली 30 वर्षापासून सिध्दार्थ ग्रंथालयाचे पदाधिकारी असून सध्या कार्याध्यक्ष पदी कार्यरत आहेत.पुणे कॅन्टो.शातता कमिटीच्या माध्यमातून आजतागायत त्यांनी सर्व धर्मीय मिरवणूकींचे स्वागत करून जातीय सलोखा राखण्याचा प्रयत्न केला आहे.

टेनिस स्पर्धेत गिरीश चौगुले, रोहन फुले, कामया परब, आर्या पाटील यांची आगेकूच

0

पुणे- ओम दळवी मेमोरियल ट्रस्ट यांच्या तर्फे आयोजित व एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या नवव्या ओम दळवी मेमोरियल स्काय डेव्हलपर्स्‌ करंडक अखिल भारतीय मानांकन सुपर सिरीज(18 वर्षाखालील) टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात गिरीश चौगुले, रोहन फुले यांनी, तर मुलींच्या गटात कामया परब, आर्या पाटील या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून पात्रता फेरीच्या दुसऱ्या चरणात प्रवेश केला.
महाराष्ट्र पोलिस(एमटी जिमखाना)टेनिस जिमखाना,परिहार चौक, औध येथे आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत पात्रता फेरीत रोहन फुलेने साहिल धनवानीचा 9-5 असा तर, अथर्व राणेने अक्षत झुणझुणवालाचा 9-6 असा पराभव करून आगेकूच केली. गिरीश चौगुलेने रिषभ गुंडेचावर टायब्रेकमध्ये 9-8(3) असा विजय मिळवला.
मुलींच्या गटात आर्या पाटील हिने  स्नेहा रानडेला 9-7 असे नमविले. कामया परबने अनिशा शेवाळेला 9-6 असे पराभूत केले.  सायली जाधवने भाविका गुंडेचाचा 9-0असा सहज पराभव केला.
 
स्पर्धेचा सिवस्तर निकाल- पहिली पात्रता फेरी- मुले
रोहन फुले (महाराष्ट्र)वि.वि साहिल धनवानी(महाराष्ट्र) 9-5
सिद्धांत भवनानी(महाराष्ट्र)वि.वि.सत्या सिंग(महाराष्ट्र)9-0;
अथर्व राणे(महाराष्ट्र) वि.वि अक्षत झुणझुणवाला (महाराष्ट्र)9-6
आदित्य जवळे (महाराष्ट्र)वि.वि.पार्थ सुंब्रे (महाराष्ट्र)9-6
गिरीश चौगुले(महाराष्ट्र)वि.वि.रिषभ गुंडेचा(महाराष्ट्र)9-8(3);
मुली- धरणा मुदलीयार(महाराष्ट्र)वि.वि.तेजस्वीनी डी(महाराष्ट्र)9-0
अग्रीमा तिवारी(महाराष्ट्र)वि.वि.अमिषा पटेल(महाराष्ट्र)9-3
सायली जाधव(महाराष्ट्र)वि.वि.भाविका गुंडेचा(महाराष्ट्र)9-0
जोत्स्ना मदाने(महाराष्ट्र)वि.वि सानिका कांबी(महाराष्ट्र)9-5
कामया परब(महाराष्ट्र) वि.वि अनिशा शेवटे(महाराष्ट्र)9-6
आर्या पाटील (महाराष्ट्र)वि.वि स्नेहा रानडे (महाराष्ट्र)9-7.

इंद्रकुमार की आखरी फिल्म क्रिना जल्द ही सिनेमाघरों में

पुणे : 90 के दशक में महशूर हुए बॉलिवूड अभिनेता इंद्रकुमार के देहांत के बाद नवम्बर में उनकी आखिरी फिल्म क्रिना रिलीज होने जा रही है। इस फिल्म में इंद्रकुमार के ही कई साथी और उनकी 90 बें की दशको फिल्मों के अभिनेता और अभिनेत्री भी दिखाई देगे। इस फिल्म में शाहबाज खान, दिपसिखा, सुदेश बेरी, सुधाचंद्रन जैसे मंजे हुए कलाकारों ने काम किया हुआ है। इस फिल्म द्वारा बालकलाकार पार्थ सिंह चौहान को लाँच किया जाएगा।
आदिवासियों पर आधारित इस फिल्म में मनोरंजन अ‍ॅक्शन सभी कुछ मिलेगा। फिल्म की निर्मिती पार्थ के पिता हरविंद सिंह चौहान ने की है। आयोजित एक पत्रकार परिषद में निर्माता हरविंद चौहान ने कहा कि, हमने एक छोटी बजट की फिल्म बनाने का प्रयास किया है। उनकी यह पहली फिल्म है वे आशा करते है कि, दर्शकों को यह फिल्म पसंद आएगी। फिल्म की कहानी :क्रिना कहानी है जंगल में रह रहे उन आदिवासियों के जीवन पर आधारित, जो किसी भी तरह से अपना जीवीकापार्जन करते है। उसी जंगल के कबीले का क्रूर सरदार चित्रा (शाहबाज खान) उन गरीब कबीलायी पर तरह-तरह का जुल्म करता रहता है, लेकिन कोई भी आवाज उठाने की हिम्मत नहीं करता, ऐसे में उसके जुल्म से त्रस्त होकर गांव की ही एक वृद्ध महिला मंगला (सुधा चंद्रन) उसके खिलाफ आवाज उठाती है। चित्रा उसे भी मौत की सजा दे देता है, लेकिन मंगला की चुनौती खाली नहीं जाती, और कुछ दिन ही बाद उसी कबीलले के एक गरीब दम्पति कृहांष (इंद्रकुमार) और नारीवा (दीपशिखा) के काफी मिन्नतो के बाद वनदेवी के आशिर्वाद से एक पुत्र का जन्म होता है जिसका नाम होता है क्रिना)
क्रिना (पार्थ सिंह चौहान) एक वीर बालक है, जो कि अन्तत: उस चित्रा नामक सरदार से उन गरीब कबीलायी को मुक्ति दिलाता है और इस तरह द्वन्द खुद्ध में उसका साथ देता है, दूसरे कबीले का सरदार (सुदेश बेरी)। रूद्रा की एक सुंदर सी प्यारी बेटी भी है जिसका नाम है रूमानी। रूमानी (तनिशा शर्मा) जो कि क्रिना को मन ही मन प्यार करने लगती है।

धर्म आणि जाती-पातीच्या व्यवस्थेवर देशाची विभागणी नको-मीरा कुमार

0
पुणे : भारतात जाती प्रथा हजारो वर्षांपासून चालत आली आहे. ज्या व्यवस्थेमुळे समाजातील लोकांना त्रास सहन करावा लागतो, अशा व्यवस्थेला आपण का स्थान दिले आहे. धर्म आणि जाती-पातीच्या या व्यवस्थेमुळे लोकांचा आत्मसन्मान पांगळा होत आहे. तरीही ही व्यवस्था का नष्ट होत नाही, हा प्रश्न कायम आहे. जाती व्यवस्थेमुळे आज समाज विखुरलेला आहे. त्यामुळे आपली ताकद दिसत नाही. जगातील सर्वांत प्राचीन संस्कृती असलेला अद्भूत असा भारत देश असूनही आपण अशा देशाची धर्मा आणि जाती-पातींमध्ये विभागणी का करीत आहोत, असा सवाल लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीरा कुमार यांनी व्यक्त केला.
‘स्वातंत्र्यसेनानी ते उपपंतप्रधान बाबू जगजीवनराम’ या डॉ. विकास आबनावे लिखीत पुस्तकाचे प्रकाशन मीराकुमार यांच्या हस्ते टिळक स्मारक मंदिर येथे झाले. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, डॉ.विकास आबनावे, अविजित अंशुल, डॉ. नफेसिंह खोबा, त्रिमोहन कुमार, मनोज कुमार, दिलीप आबनावे, राजेश आबनावे, शिरीष आबनावे, प्रथमेश आबनावे, पुष्कर आबनावे, प्रकाश आबनावे प्रसाद आबनावे आदी उपस्थित होते.
मीरा कुमार म्हणाल्या, बाबू जगजीवनराम यांनी ८२ वर्षापूर्वी सन १९३५ साली दलितांच्या मंदिर प्रवेशाबाबतचा लढा पुण्यातूनच संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचविला होता. यावेळी जातीपातीविरोधात झालेल्या या क्रांतीनंतर अनेक मंदिराचे दरवाजे समाजातील प्रत्येकासाठी खुले झाले. परंतु आजही अनेक मंदिराचे दरवाजे बंद आहेत. अजूनही क्रांती संपली नाही. त्यामुळे पुणेकरांनी ही क्रांतीची ज्वाला तेवत ठेवावी.
त्या पुढे म्हणाल्या, महिला, दलित, गरीब लोकांसाठी सरकार अनेक योजना राबविते. योजनांच्या माध्यमातून सरकार त्यांच्यावर कोणतेही उपकार करत नाही. या समाजघटकांनी त्यांचे बलिदान स्वातंत्र्यलढ्यात दिले आहे. त्यामुळे जे मागे राहिले आहेत, त्यांना सोबत घेऊन पुढे जाऊ अणि नवीन भारत घडवू. स्वातंत्र्यसेनानी ते उपपंतप्रधान बाबू जगजीवनराम या पुस्तकातून नवीन पिढीला योग्य मार्ग मिळेल, त्यासाठी प्रकाशस्तंभाचे काम हे पुस्तक करेल, असेही त्यांनी सांगितले.
उल्हासदादा पवार म्हणाले, राजमाता जिजाऊ, इंदिरा गांधी, मीराकुमार यांसारख्या कर्तृत्ववान महिलांचा बौद्धीक वारसा भारताला मिळाला आहे. सुमारे १२५ कोटी लोकसंखेच्या देशात १६ वर्षे इंदिरा गांधी यांनी राज्य केले आणि पंतप्रधान कसा असावा याचा आदर्श घालून दिला. मोहन जोशी म्हणाले, १९७१ च्या युद्धात बाबू जगजीवनराम यांचे मोठे योगदान होते. सैनिकांना भेटून त्यांनी त्यांच्यामध्ये आत्मविश्वास जागविला. आजच्या बदललेल्या परिस्थितीत त्यांच्या विचारांची गरज आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
डॉ.विकास आबनावे म्हणाले, बाबू जगजीवनराम यांची स्वातंत्र्यसेनानी आणि देशाचे माजी उपपंतप्रधान म्हणून सर्वदूर ओळख आहे. मात्र, देशाच्या स्वातंत्र्यलढयातील त्यांचे योगदान, सामाजिक प्रश्नांवरील कार्य आणि स्वातंत्र्योत्तर राजकारणात देशाच्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने उचलेली पाऊले याविषयी अनेकांना फारशी माहिती नाही. त्यामुळे त्याविषयी सविस्तर लेखन करुन त्यांच्या कार्याला अभिवादन करण्याचा प्रयत्न पुस्तकाच्या माध्यमातून केला आहे, असे त्यांनी सांगितले. डॉ.सुमीता सातारकर यांनी देवीस्तवन करुन कार्यक्रमाची सुरुवात केली. नीता गुमास्ते यांनी प्रास्ताविक केले. डॉ. छाया आबनावे यांनी सूत्रसंचालन केले. ज्योती हिरे यांनी आभार मानले.
* कॉंग्रेस मुक्त भारताऐवजी गरीबी, जाती-पाती मुक्त भारताचा नारा हवा – मीरा कुमार
आज काँग्रेस मुक्त भारत असा नारा काहीजण देत आहेत. परंतु काँग्रेसमुक्त भारतापेक्षा गरीबीमुक्त भारत, जाती-पातीमुक्त भारत, संप्रदाय मुक्त भारत असा नारा का दिला जात नाही. आज मी मन की बात नाही, तर दिल की बात, आत्मा की बात करीत आहे. एकाच धर्माचे लोक भारतात राहणार असतील, तर बाकीच्या धर्माचे काय होणार, ते लोक कुठे जातील. वाद किंवा द्वेष निर्माण करणे हे धर्माचे काम नाही. तर चांगले विचार निर्माण करणे आणि माणसाच्या मनात देवत्व निर्माण करणे, हे धर्माचे काम आहे. माझे बाबा जगजीवनराम यांनी मला शिकविले होते की जेव्हा आपण ख-या अर्थाने दुसºया धर्माचा आदर करु,  तेव्हाच आपण आपल्या धर्माचा आदर करायला शिकू आणि हाच खरा भारतीय विचार आहे.
* पुणे ही क्रांतीची भूमी – मीरा कुमार यांच्याकडून पुण्याचे कौतुक
तब्बल २२ वर्षांनंतर मी पुण्यात आले आहे. इथले वातावरण अतिशय सुंदर आहे. आधुनिक भारताचे हे आधुनिक शहर आहे. उद्यम, परिश्रम, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे हे शहर असून ही क्रांतीची भूमी देखील आहे. क्रांतीचे बीज येथे रोवण्यात आले होते. इथे खूप प्रेम मला मिळाले, परंतु मी पुण्यात यायला उशीर केला, असे सांगत त्यांनी पुण्याचे कौतुक केले.

देवेंद्र फडणवीस इतिहासातील सर्वात बालीश मुख्यमंत्री- शरद पवारांची टिका

0

मुंबई- महाराष्ट्राच्या आजवरच्या इतिहासात मी इतका बालीश मुख्यमंत्री पाहिला नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.5 नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची अंमलबजावणी न झाल्यास शेतकऱ्यांची असहकार चळवळ सुरू करण्याचा विचार असल्याचा गर्भित इशारा शरद पवार यांनी दिला आहे .
इंग्रजी वेबसाइटवर ‘फर्स्ट पोस्ट’वर शरद पवार यांची विशेष मुलाखत प्रकाशित झाली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमध्ये झालेला घोळ हा मुख्यमंत्र्यांमुळेच असल्याचा आरोपही पवार यांनी केला आहे.
पवार यांनी म्हटले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतःची एक वेगळी यंत्रणा उभी करत आहेत. ही यंत्रणा राज्यासाठी नव्हे, तर केवळ मुख्यमंत्र्यांसाठी काम करते. कारण, मुख्यमंत्र्याचा स्वतःच्याच खात्यांवर आणि त्या खात्यामधील सनदी अधिकाऱ्यांवर विश्वास नाही.


पवार म्हणाले, शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याने केवळ काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वर्चस्वाखालील बँका आणि सहकारी बँकांना फायदा होणार आहे, असे मुख्यमंत्र्यांना वाटते. परंतु हा आरोप पूर्णपणे निराधार आहे. मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी राष्ट्रीयीकृत बँकांनी कर्जमाफीसाठी पात्र खात्यांचे आकडे फुगवून सांगितल्याचा आरोप केला आहे. मग आता राष्ट्रीयीकृत बँकाही काँग्रेस-राष्ट्रवादी पक्ष चालवतात का? असा सवालही पवार यांनी केला आहे.
5 नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची अंमलबजावणी न झाल्यास शेतकऱ्यांची असहकार चळवळ सुरू करण्याचा विचार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. कर्जमाफी हा शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याचा अंतिम उपाय असू शकत नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी शेतमालाला उत्पादन खर्चापेक्षा 50 टक्के नफा देण्याची गरज आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.

लीला पुनावाला फाउंडेशनने केला शूर जवानांचा सन्मान!

0
पुणे- दिवाळी हा आनंदाचा सण असतो, आपल्या परिवारापासून दूर राहून स्वतःचे आयुष्य पणाला लावत नागरिकांचे रक्षण करणाऱ्या आपल्या शूर जवानांचा सन्मान करण्यासाठी दिवाळी हा एक खास सण आहे. युद्धादरम्यान जखमी होऊन अपंगत्व आलेल्या शूर सैनीकांसाठी भाऊबीजेच्या शुभ मुहूर्तावर पीस अम्बॅसिडर्स म्हणजेच लीला पुनावाला फाउंडेशनच्या लीला गर्ल्स आणि फेलोजने विविध आणि विशेष  मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
गरजुंना प्रोत्साहन देऊन सक्षम बनविण्यासाठी लीला पुनावाला फाऊंडेशन नेहमीच आघाडीवर राहिले आहे. शिक्षण आणि मुलींचे सबलीकरण लीला पूनवाला फाउंडेशनचे  दोन मुख्य स्तंभ आहेत. फाऊंडेशन समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील हुशार मुलींना पाठिंबा देतो. अश्या मुलींचा सातवी ते पदवीपर्यंतच्या शिक्षणाचा खर्च एलपीएफ फाऊंडेशन उचलतो. एलपीएफ फाउंडेशनमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल अश्या कितीतरी मुलींना शिक्षण घेणे शक्य झाले आहे.
यूके यथील अशा सेंटर मधून लीडरशिप प्रोग्राम पूर्ण करून आलेल्या २४ लीला गर्ल्सच्या बॅच मधील पीए २०१७ च्या लीडर अंकिता जोशी व डेप्युटी लीडर भावना साळवी याची संकल्पनेतुन हा कार्यक्रम साकारण्यात आला. पीए टीम २०१७ व पीस अम्बॅसिडर कश्मीरा देवल यांनी या कार्यक्रमाचे व्यवस्थापन केले होते.
युद्धादरम्यान जखमी झालेल्या जवानांवर केंद्रित असलेला हा कार्यक्रम देशभक्तीने दुमदुमला होता. देशभक्ती व प्रदेशिक गीत गाऊन मुलींनी भारतीय संस्कृतीच्या विविध छटांवर प्रकाश टाकला. मुलींनी भारत रत्न लता मंगेशकर यांनी गायलेल्या ‘ए मेरे वतन के लोगो’ हे गीत सादर करताच उपस्थित लोक गहिवरून आले.
कमी आर्थिक उत्पन्न असलेल्या आणि शैक्षणिक दृष्ट्या हुशार मुलींना शिक्षणासाठी मदत करत सक्षम  केल्याबद्दल ब्रिगेडिअर एच.एस अगरवाल (एमएस, डी ऑर्थो, फेलो आर्थ्रोप्लास्टी, जर्मनी) यांनी  लीला पुनावाला फॉउंडेशन आणि फिरोज पुनावाला यांचा प्रशस्तिपत्र देऊन सन्मान केला.
 फाऊंडेशनतर्फे सीमेवर देशाचे रक्षण करताना जखमी झालेल्या व अपंगत्व आलेल्या सैनिकांचे पुनर्वसन करून त्यांना एक नवीन आयुष्य दिल्याबद्दल मिलिटरी हॉस्पिटलचे ब्रिगेडिअर एच.एस अगरवाल व त्यांच्या कर्मचारी वर्गाचा प्रशस्तिपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
जे सैनिक या कार्यक्रमासाठी येऊ शकले नाहीत त्यांना लीला पुनावाला आणि पीस अम्बॅसिडर्स यांनी खडकी येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये जाऊन या सैनिकांना भेटून त्यिांची चौकशी केली आणि त्यांना 350  स्नॅक्स बॉक्स देखील दिले. या येथेवेळी सैनिकांना मानवंदना देऊन या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

भाऊराव कऱ्हाडे यांच्या आगामी ‘बबन’ मधील ‘साज ह्यो तुझा, जीव माझा गुंतला…’ गाणे प्रदर्शित

0

‘साज ह्यो तुझा, जीव माझा गुंतला…’  या सोप्या शब्दाआधी येणारी व्हायोलिन ची कर्णमधुर सुरावट, त्यावर बासरीचा सुंदर साज अशा या अवीट गाण्यावर हळुवारपणे ठेका धरायला लावणारा ताल आणि स्क्रीनवर दिसणारे सुंदर खेडेगाव, हिरवीगार शिवारे, याच गावातले कॉलेज आणि एका सुंदर मुलीवर भाळलेला,  शेती आणि दुग्धव्यवसाय करणारा,  चांदरातीला उशाखाली तिचा फोटो ठेवून प्रेम व्यक्त करणारा आजच्या काळातला शेतकरी तरुण.

ही दृश्ये आहेत राष्ट्रीय पुरस्कार विजेते भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांच्या आगामी बबन या रोमँटिक चित्रपटातल्या गाण्यातील.

समाजाला अंतर्मुख व्हायला लावणाऱ्या “ख्वाडा” या अनेक मानाचे पुरस्कारप्राप्त चित्रपटाच्या यशानंतर राष्ट्रीय पुरस्कार विजेते भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे, एका तरुण शेतकऱ्याची प्रेमकथा बबन या चित्रपटातून घेऊन येत आहेत. या चित्रपटाची कथा भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांचीच आहे. या चित्रपटाच्या टीजर ला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभल्यानंतर नुकतेच या चित्रपटातील ‘साज ह्यो तुझा’ हे रोमँटिक गाणे प्रसिद्ध करण्यात आले आणि अल्पावधीतच हे गाणे  व्हायरल झाले आहे. सुहास मुंडे यांनी लिहिलेल्या या गीताचे संगीतकार आणि गायक आहेत ओंकारस्वरूप.

हळुवार प्रेमभावना व्यक्त करणारे अतिशय श्रवणीय असे हे गाणे भाऊसाहेब शिंदे आणि या चित्रपटातून पदार्पण करणारी अभिनेत्री गायत्री जाधव यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. सुंदर लोकेशन्स, सतत गुणगुणावी वाटेल अशी सोपी चाल यामुळे ‘साज ह्यो तुझा’ हे गाणे तरुण पिढीचे पुढचे ‘लव्ह अँथम’ ठरले तर आश्चर्य वाटायला नको.

‘चित्रक्षा फिल्म्स’ प्रस्तुत ‘बबन’ या चित्रपटात भाऊसाहेब शिंदे, गायत्री जाधव, शीतल चव्हाण, देवेंद्र गायकवाड, योगेश डिंबळे, अभय चव्हाण या कलाकारांच्या प्रमुख भूमिका असून हा चित्रपट २९ डिसेंबर संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

खा.अनिल शिरोळेंच्या न्यूयॉर्क दौऱ्यानंतर खा. वंदना चव्हाण शिकागो दौऱ्यावर

0
पुणे : . २२ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर २०१७ ह्या कालावधीत संयुक्त राष्ट्रसंघ आम सभेच्या ७२ व्या अधिवेशनामध्ये सहभागी होण्यासाठी पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांचा दौरा पूर्ण होत असताना
दुसरीकडे पर्यावरणविषयक बदलांच्या अभ्यासासाठी आयोजित अमेरिकेेतील शिकागो विद्यापीठ येथील ‘क्लायमेट पार्लमेंट’ अभ्यास दौऱ्यामध्ये संसद सदस्य म्हणून खासदार वंदना चव्हाण यांचा भारतीय शिष्टमंडळात समावेश झाला आहे.दिनांक ३० ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०१७ या कालावधीमध्ये संसदेतील सदस्य आणि सहकारी यांच्या शिष्टमंडळासाठी या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

शिकागो विद्यापीठातील तज्ज्ञांबरोबर उर्जा आणि पर्यावरणविषयक विविध प्रकारच्या समस्या विषयक चर्चासत्रांचा समावेश या परिषदेत आहे.

खासदार वंदना चव्हाण यांच्या समवेत विन्सेंट पाला (लोकसभा सदस्य),  डॉ. संजय जैसवाल (खासदार, राज्यसभा), कालीकेश सिंग देव (लोकसभा सदस्य), राकेश सिंग (लोकसभा सदस्य), रिती पाठक (लोकसभा सदस्य), प्रभास कुमार सिंग (लोकसभा सदस्य), विवेक गुप्त (खासदार, राज्यसभा) यांना देखील निमंत्रित करण्यात आले आहे.
या परिषदेच्या माध्यमातून शिकागो आणि वॉशिंग्टन (डीसी) या दोन्ही क्षेत्रातील संशोधक आणि सरकारी नेत्यांसोबत ‘संशोधन आणि धोरणविषयक भागीदारी’ विषयावर संवाद साधण्याची आणि त्याबद्दल सल्ला देण्याची एक महत्त्वपूर्ण संधीदेखील उपलब्ध होणार आहे.