Home Blog Page 3245

महिंद्रा पॉवरॉलतर्फे नवे डिझेल जनरेटर्स सादर

0

250/320 केव्हीए पट्ट्यातील निर्मितीद्वारे उच्च केव्हीए प्रकारात स्थान बळकट  

कमी उत्सर्जनासाठी जनरेटर्स सीआरडी इंजिनने सज्ज 

 

मुंबई, 6 नोव्हेंबर 2017 – एकोणीस अब्ज अमेरिकन डॉलरची उलाढाल असलेल्या महिंद्रा समुहाच्या महिंद्रा पॉवरॉल या कंपनीने आज 250/320 केव्हीए या पट्ट्यातील डिझेल जनरेटरची निर्मिती करत असल्याचे जाहीर करून उच्च केव्हीए डिझेल जनरेटर प्रकारात प्रवेश करत असल्याची घोषणा केली. हे जनरेटर महिंद्रा एमपॉवर मालिकेतील असून, चेन्नईतील महिंद्रा रिसर्च व्हॅली या संशोधन आणि विकास केंद्रात विकसित झाले आहेत, तर पुण्याजवळील चाकण येथे त्याचे उत्पादन करण्यात आले आहे. हा 9.3 लिटर इंजिन प्रकार महिंद्रा पॉवरॉलच्या एमपॉवर मालिकेत नव्याने दाखल झाला असून, त्यामध्ये तंत्रज्ञानदृष्ट्या प्रगत असे सीआरडी इंजिन आहे.

 

सीआरडी इंजिनना उत्कृष्ट आणि प्रगत अशा कॉमन रेल डिझेल इंजिन (सीआरडीई) तंत्रज्ञानाने सक्षम केले जाते. हे तंत्रज्ञान भविष्यसज्ज असून, उच्च कामगिरी आणि इंधन कार्यक्षमतेसाठी ओळखले जाते. ते प्रदूषण मोठ्या प्रमाणावर कमी करणारे आणि प्रमाणित उत्सर्जन निकषांपेक्षाही अधिक कार्यक्षम आहे. हेच प्रगत तंत्रज्ञान नव्याने आणलेल्या 250 केव्हीए आणि 320 केव्हीए डिझेल इंजिन संचांत वापरण्यात आले आहे.

 

250 केव्हीए डिझेल जनरेटरची किंमत 12.5 लाख रुपये अधिक जीएसटी (एक्स-वर्क) आणि 320 केव्हीए डिझेल जनरेटरची किंमत 16 लाख रुपये अधिक जीएसटी (एक्स-वर्क) एवढी आहे.

 

या वेळी बोलताना महिंद्रा अँड महिंद्राच्या पॉवरॉल आणि स्पेअर्स व्यवसायाचे अध्यक्ष – चीफ पर्चेस ऑफसर हेमंत सिक्का म्हणाले, आजच्या या सादरीकरणामुळे उच्च केव्हीए डिझेल जनरेटर प्रकारात आमचा आमच्या स्वतःच्या इंजिनसह प्रवेश झाला आहे. आमच्यासाठी यामुळे एक नवे क्षेत्र आणि ग्राहकवर्ग खुला झाला आहे. आमच्या ग्राहकांना प्रगत आणि सहज उपलब्ध होणारे तंत्रज्ञान पुरविण्याचा आमचा महिंद्रामध्ये सातत्याने प्रयत्न असतो. सीआरडीई तंत्रज्ञानयुक्त 250/320 केव्हीए या पट्ट्यातील डिझेल जनरेटरची निर्मिती ही याच प्रयत्नांचे मूर्त रूप आहे. भविष्यसज्ज अशा या सीआरडीई तंत्रज्ञानामुळे कमी किमतीत कमी उत्सर्जन आणि उच्च कामगिरी साधली जाणार असून, यामुळे ग्राहककेंद्रित्वाचा निकषही उंचावला जाईल. अभिनवतेची कास आम्ही सातत्याने धरू आणि महिंद्रा पॉवरॉलद्वारे सर्वोत्तम उत्पादने आणि सेवा पुरवत राहू.

 

स्मार्ट सेवेसह स्मार्ट डिझेल जनरेटर

 

महिंद्रा पॉवरॉलच्या डिझेल जनरेटर संचांची क्षमता अधिक असून, ते अधिक भार असलेल्या कामांसाठी उपयोगी आहेत. हे नवे डिझेल जनरेटर संच डिजि-सेन्स तंत्रज्ञानाने युक्त असून, त्यामुळे ते स्मार्टही आहेत. या स्मार्ट संचांच्या कामगिरीवर कोठूनही लक्ष ठेवता येत असल्याने त्यांची कार्यक्षमता सुधारते.

 

डिझेल जनरेटर संचांच्या खरेदीचा निर्णय हा सेवेचे जाळे आणि विक्रीपश्चात सेवेबाबत असलेल्या कटिबद्धतेवर अवलंबून असतो. महिंद्रा पॉवरॉल डिझेल जनरेटर संचांना तर देशभरात 200 हून अधिक डीलर्स आणि 400 टच पॉइंट्स असलेल्या सर्वांत मोठ्या सेवा जाळ्याचे पाठबळ आहे.

 

ग्राहकांना मदत पुरविण्यासाठी अहोरात्र सुरू राहणारे सुसज्ज केंद्रीय कॉल सेंटरही आहे. ग्राहकांना कमीत कमी वेळात सर्वोत्तम सल्ला देण्यासाठी येथे तज्ज्ञांचे पथकही असते.

 

महिंद्रा पॉवरॉलने डिझेल जनरेटर संच कोरल ऑरेंज रंगांत उपलब्ध करून दिले आहेत.

 

महिंद्रा पॉवरॉलबाबत

सन 2001-02 मध्ये कंपनीने ऊर्जानिर्मिती क्षेत्रात प्रवेश केला. आर्थिक वर्ष 2002 पासून 2016-17 पर्यंत व्यवसायाची वाढ 1250 कोटी रुपयांवर गेली. सध्या महिंद्रा पॉवरॉलची इंजिन्स 5 केव्हीएपासून 320 केव्हीएपर्यंतच्या डिझेल जनरेटिंग संचांना बळ पुरवत आहेत.

 

महिंद्रा पॉवरॉलने स्थापनेपासून अतिशय कमी कालावधीतच भारतीय जनरेटर संच उद्योगात वेगाने पावले टाकली आहेत. देशभरातील, तसेच जगातीलही आघाडीच्या दूरसंचार कंपन्यांचा महिंद्रा पॉवरॉल डिझेल जनरेटर संच हा प्राधान्याचा पर्याय आहे.

 

टोटल क्वालिटी मॅनेजमेंटची यशस्वी अंमलबजावणी करणा-या उद्योगांना गौरविणा-या युनियन ऑफ जॅपनीज सायन्टिस्ट्स अँड इंजिनीअर्स या संस्थेचा जागतिक दर्जाचा डेमिंग प्राइज हा पुरस्कार महिंद्रा पॉवरॉलला सन 2014 मध्ये प्राप्त झाला.

 

याशिवाय महिंद्रा पॉवरॉलला फ्रॉस्ट अँड सलिव्हान व्हॉइस ऑफ कस्टमर पुरस्कार, मास्टर ब्रँड, पॉवर ब्रँड आणि सुपरब्रँड पुरस्कार हे पुरस्कारही मिळाले आहेत.

 

दूरसंचार कंपन्यांव्यतिरिक्त महिंद्रा पॉवरॉल डिझेल जनरेटर संच भारतीय आणि जागतिक बाजारपेठेतील बँका, बांधकाम क्षेत्र, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग, रुग्णालये, हॉटेल्स, घरे आणि उत्पादन कंपन्यांना बळ देत आहेत.

 

 

महिंद्राबाबत

 

महिंद्रा समूह हा 19 अब्ज अमेरिकन डॉलर उलाढाल असलेल्या कंपन्यांची शिखर संस्था असून, तो नावीन्यपूर्ण उत्पादनांद्वारे लोकांना अधिक कार्यक्षम होण्यासाठी, ग्रामीण आणि शहरी जीवनशैली अधिक समृद्ध करण्यासाठी, नवे व्यवसाय रुजविण्यासाठी आणि विविध समुदायांना बळ देण्यासाठी झटतो. बहुपयोगी वाहने, माहिती तंत्रज्ञान, वित्तीय सेवा आणि व्हेकेशन ओनरशिप या क्षेत्रांत या कंपनीचे आघाडीचे स्थान असून, ही जगातील आकाराने सर्वांत मोठी ट्रॅक्टर कंपनी आहे. त्याशिवाय शेती व्यवसाय, कंपोनंट्स, सल्लासेवा, संरक्षण, उर्जा, लॉजिस्टिक्स, वाहतूक, एअरोस्पेस, स्थावर मालमत्ता, रिटेल, स्टील, व्यापारी उपयोगाची वाहने आणि दुचाकी व्यवसायात कंपनीचे स्थान मजबूत आहे. भारतात मुख्यालय असलेल्या महिंद्रामध्ये 100 देशांत मिळून दोन लाख कर्मचारी काम करतात.

विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत व श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने श्री क्षेत्र आळंदी येथे जागतिक सहिष्णुता सप्ताहाचे आयोजन

0
पुणे : विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत व श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि. १० नोव्हेंबर ते गुरूवार, दि.१६ नोव्हेंबर २०१७ या दरम्यान संत शिरोमणी तत्त्वज्ञ श्री ज्ञानेश्‍वर माऊली यांच्या ७२१ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्ताने जागतिक सहिष्णुता सप्ताहाचे आयोजन केले आहे. कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त होत असलेल्या या सप्ताहात ‘श्रीसंत ज्ञानेश्‍वर-तुकाराम ज्ञानतीर्थ’, विश्‍वरूप दर्शन मंच, श्रीक्षेत्र आळंदी येथे लोकप्रबोधनपर विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
या सप्ताहाचे उद्घाटन सोमवार, दि. १० नोव्हेंबर २०१७ रोजी सायंकाळी ६.०० वाजता होणार आहे. या सोहळ्याला प्रसिद्ध संगणकतज्ञ , नालंदा विद्यापीठाचे कुलपती व सप्ताहाचे प्रमुख सल्लागार पद्मश्री डॉ. विजय भटकर, श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समितीचे अध्यक्ष ह.भ.प. श्री. किसन महाराज साखरे, विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड, श्री. तुकाराम महाराज देवस्थानचे अध्यक्ष श्री.पंढरीनाथ उर्फ बाळासाहेब मोरे, आळंदी नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष सौ.वैजयंतताई उमरगेकर, आळंदी नगरपरिषदचे उपनगराध्यक्ष श्री. सागर तुळशीराम भोसले, श्री क्षेत्र देहूच्या सरपंच सौ. सुनिता चंद्रकांत टिळेकर, आळंदीचे माजी नगराध्यक्ष श्री. अशोक कांबळे, आळंदी देवाची येथील थोर स्वातंत्र्यसैनिक ह.भ.प.श्री. बाळासाहेब रावडे, इंद्रायणी मातेच्या आरतीचे मानकरी ह.भ.प.श्री.गणपतराव कुर्‍हाडे हे उपस्थित राहाणार आहेत.
‘विज्ञान व अध्यात्माच्या समन्वयातून विश्‍वशांती’ या स्वामी विवेकानंदांच्या वचनानुसार सुदृढ, निकोप व सुसंस्कृत समाज निर्मितीसाठी पवित्र तीर्थक्षेत्रांचे खर्‍या अर्थाने ज्ञानतीर्थ क्षेत्रांमध्ये परिवर्तन घडविण्याच्या हेतूने सहिष्णुता सप्ताहाचे आयोजन केले जाते. बंधुत्व, मानवी हक्क, लोकशाही, सर्वधर्मसमभाव, विज्ञान व अध्यात्माचा समन्वय आणि सहिष्णुता अशा विविध विषयांवरील लोकशिक्षणाचा व समाजप्रबोधनाचा हा सोहळा आहे.
या सोहळ्यात आळंदी येथील  ह.भ.प.श्री. गणपत महाराज जगताप, संत साहित्याचे गाढे अभ्यासक ह.भ.प.श्री. आसाराम महाराज बडे, परभणी येथील ह.भ.प.डॉ. तुकाराम महाराज गरूड, ठाकुरबुवा दैठणेकर, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री ह.भ.प.श्री. बबनरावजी पाचपुते, जगदगुरु संत तुकाराम महाराज यांचे वंशज ह.भ.प. श्री. बापूसाहेब मोरे-देहूकर इत्यादी मान्यवरांच्या प्रवचनातून विज्ञान, अध्यात्म व विविध धर्मांचा शांती संदेश यावरील विचार भाविकांना ऐकायला मिळणार आहेत.
तसेच, मंगळवार, दि.१४ नोव्हेंबर २०१७ रोजी संध्या.६.०० वाजता सौ. उर्मिला विश्‍वनाथ कराड लिखीत प्रज्ञाचक्षू श्री.ह.भ.प. गणपत महाराज जगताप  यांच्या जीवनचरित्रावरील ‘दिव्यदृष्टीचा दैदिप्यमान ज्ञानदीप’ या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा होणार आहे.
संध्याकाळच्या सत्रात आळंदी येथील ज्ञानेश्‍वरी प्रवक्ते ह.भ.प.श्री. अर्जुन महाराज खाडे, बीड येथील ह.भ.प. श्री. बालयोगी हरिहर महाराज दिवेगांवकर, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार व रामायणाचार्य ह.भ.प.श्री. रामराव महाराज ढोक, वै.ह.भ.प. दादा महाराज साखरे फडाचे प्रमुख व  ज्ञानेश्‍वरीचे गाढे अभ्यासक ह.भ.प. श्री. किसन महाराज साखरे व महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. श्री. बाबामहाराज सातारकर यांची सुश्राव्य कीर्तने होतील.
रात्रीच्या सत्रात डॉ. प्रियांका गुळवणी यांचा अभंगरंग हा भक्ती संगिताचा कार्यक्रम, विश्‍वशांती संगीत कला अकादमी येथील शिक्षक व विद्यार्थ्यांचा भक्तीसंगीत व शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम, पुणे येथील सुप्रसिद्ध गायक पं.आनंद भाटे यांचा अभंगवाणीचा कार्यक्रम, पुणे येथील सुप्रसिद्ध पार्श्‍वगायिका श्रीमती चारूशीला बेलसरे यांचा भक्तीसंगीताचा सुरेल कार्यक्रम व डॉ. रेवा नातू यांचा सुश्राव्य अभंगवाणीचा कार्यक्रम होणार आहे.
सकाळच्या सत्रात  ह.भ.प. श्री. प्रकाश महाराज साठे, ह.भ.प.श्री सोपान महाराज शास्त्री, शिवचरित्र व्याख्याते ह.भ.प. धर्मराज महाराज हांडे, ह.भ.प. श्री ज्ञानेश्‍वर माऊली वाबळे, ह.भ.प.श्री नारायण महाराज उत्तरेश्‍वर पिंपरीकर व भागवताचार्य ह.भ.प.श्री. बाळू महाराज गिरगावकर यांची कीर्तने होतील.
संतश्री ज्ञानेश्‍वर माऊली यांच्या ७२१ व्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने गुरूवार,                दि.१६ नोव्हेंबर २०१७ रोजी सकाळी १०.०० वाजता ह.भ.प. डॉ. सुदाम महाराज पानेगावकर यांचे काल्याचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. त्यानंतर घंटानाद व महाप्रसाद होऊन या सप्ताहाची सांगता होणार आहे.
अशी माहिती विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड, विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे प्रमुख समन्वयक डॉ. सुनील का. कराड आणि  समन्वयक प्रा. स्वाती कराड-चाटे यांनी दिली.

स्वच्छता अभियानातून जमा केला दोन टन कचरा

0
मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे देहूगावात स्वच्छता अभियान
स्वच्छता अभियानातून जमा केला दोन टन कचरा
पिंपरी / प्रतिनिधी:
मराठवाडा जनविकास संघ संचलित मराठवाडा चॅरीटेबल ट्रस्ट एकसंघ समिती पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची पावन भूमी तीर्थक्षेत्र देहूगाव येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी इंद्रायणी नदीपरिसरही स्वच्छ करण्यात आला.
तुकाराम महाराजांचे दर्शन घेवून देहुगावच्या सरपंच सुनीता टिळेकर यांच्या हस्ते या अभियानास सुरुवात करण्यात आली. गाथा मंदिर रोड, नदीघाट परिसरात हे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यामध्ये सुमारे दोन टन कचरा जमा करण्यात आला. यावेळी देहूगाव ग्रामपंचायत सदस्य हेमाताई काळोखे, उपसरपंच संतोष हगवणे, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष गोपाळ माळेकर, माधव मनोरे, नितीन चिलवंत, नामदेव पवार, माजी ग्रामपंचायत समिती सदस्य बाळासाहेब काळोखे, सुनील हगवणे, सोमनाथ मुसुडगे, अंकुश मुसुडगे, अहिल्यादेवी फौंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र गाडेकर, अ‍ॅड. महेश घोडके, गोविंद दुधभाते, केरबा वाघमोडे, बिरप्पा घोडके, सतीश कागे, श्रीयश गाडेकर,  केरबा वाघमोडे, बिरप्पा घोडके, सतीश कागे, श्रीयश गाडेकर,  ज्ञानेश्वर खोसे , सोमनाथ मासुडगे, नीलकंठ शिडोले, प्रेमदास राठोड, प्रसाद खारकर,  संतोष जगताप, अमोल गोरे, विष्णु माडीवर, संतोष घोडके , मोहन जाधव, सुनील आरे, दत्ता अस्वले आदी मान्यवर उपस्थित होते.
हेमाताई काळोखे म्हणाल्या, देहू ही संतांची भूमी आहे. त्यामुळे मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्टने केलेले स्वच्छता अभियान स्तुत्य उपक्रम आहे.
माधव मनोरे म्हणाले, सामाजिक भान ठेवून पर्यावरण समतोल राखण्यासाठी पर्यावरणपूरक  कार्य करणे, ही काळाची गरज आहे. ही गरज लक्षात घेवून जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पावनभूमीमध्ये स्वच्छता अभियान घेतले आणि इंद्रायणी नदी परिसर स्वच्छ केला. यामध्ये तब्बल दोन टन कचरा जमा झाला. देहू नगरी स्वच्छ झाली आहे.  तुकोबारायांनी प्रत्यक्ष त्यांच्या विचारधारेतून माणूस घडविला. त्यांच्या या अतुलनीय कार्यात आपण कितीही कार्य केले, तरी कमीच आहे. मात्र, दर महिन्याला येथे स्वच्छता अभियान राबवून पर्यावरण रक्षणाचे कार्य करु, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केशव अहिवळे यांनी केले. तर आभार अहिल्यादेवी होळकर फौंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र गाडेकर यांनी मानले.

रक्तदान शिबिरात २०० पिशव्या रक्तसंकलित

0

पुणे-इंदिरा गांधी व वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्त हडपसरजवळील वैदवाडीयेथील रिध्दी- सिध्दी बिल्डिंगमध्ये युवक कॉंग्रेस वैदवाडी शाखेच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर संपन्न झाले . रक्तदान शिबिरात २०० पिशव्या रक्तसंकलित करण्यात आले . या शिबिराचे उदघाटन पुणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेशदादा बागवे यांच्याहस्ते करण्यात आले . यावेळी माजी आमदार माणिकराव जगताप , माजी नगरसेवक संजय बालगुडे , माजी नगरसेवक सतीश लोंढे , शिबिराचे संयोजक खंडू सतीश लोंढे , प्रशांत सुरसे , हर्षद बोराटे , हडपसर युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमित घुले , वैशाली शिंदे , भानुबाई कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते .

या शिबिराचे संयोजन युवक काँग्रेसचे कार्यकर्ते खंडू लोंढे , दादा देडे , महेश फुलावरे , रोहित बागडे , संतोष लोंढे , धनाजी सूर्यवंशी , मामा आल्हाट , मुस्ताक शेख , अमजद पठाण , तानाजी सूर्यवंशी , शुभम सुरेश गायकवाड , सूरज पवार , वामन धाडवे आदींनी विशेष परिश्रम घेतले . रक्तदान शिबिरासाठी हडपसर येथील अक्षय ब्लड बँकेने विशेष सहकार्य केले . तर रक्तदान करणाऱ्यांना प्रमाणपत्र व अल्पोपहार देण्यात आला . 

नोटबंदीचे दुष्परिणाम देशाला भोगावे लागत आहेत – माणिकराव ठाकरे

0

पुणे-नोटबंदीच्या काळात अनेक नागरिक मृत्युमुखी पडले, बँकांच्या बाहेर नोटा बदलण्यासाठी रांगा लागल्या, नोटबंदीनंतर केवळ दोनच महिन्यात 15 लाख लोक बेरोजगार झाले, शेतकरी-शेतमजूर हवालदिल झाले, अनेक उद्योगांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सरकारच्या या नोटबंदीचे दुष्परिणाम संपूर्ण देशातील जनता भोगत आहे. याच जनतेचा आक्रोश सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी 8 नोव्हेंबर रोजी देशभरात काँग्रेसतर्फे काळा दिवस पाळण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी दिली.

नोटबंदीनंतर देशभरात घडलेल्या विविध घडामोडीवर रेखाटलेल्या व संकलित केलेल्या व्यंगचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन कै.बाळासाहेब ठाकरे कलादालनात त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, आमदार शरद रणपिसे, प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ़ विश्वजीत कदम, महिला काँग्रेसच्या सरचिटणीस कमल व्यवहारे, माजी आमदार मोहन जोशी आदी उपस्थित होते.

साईबाबांची 30 फूट उंच 18 फुट रूंद पुष्प रांगोळी चित्र ठरले लक्षवेधक

0

शिवतीर्थनगर पौडरोड येथील श्री गणेश मंदिरामध्ये त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव साजरा

पुणे : 
 
शिवतीर्थ नगर, पौडरोड येथील श्री गणेश मंदिरामध्ये शुक्रवारी सायंकाळी त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करण्यात आली. गेली 17 वर्षे या उपक्रमाचे मंदीरात आयोजन केले जाते. त्रिपूरारी पोर्णिमेनिमित्त श्रीकांत गोरे (वय 77) यांनी काढलेल्या साई बाबांच्या 30 फूट उंच 18 फुट रूंद पुष्प रांगोळी चित्राभोवती पणत्या लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला. रसिका सुतार यांनी त्रिपूर वात लावून उपक्रमाचे उद्घाटन केले.
Shrikant Gore
 
या उपक्रमास शशिकांत सुतार, उत्सव प्रमुख पृथ्वीराज सुतार यांचे सहकार्य लाभले. यावेळी व्यवस्थापक आनंदा अंबरडेकर, मधुकर शिंदे, आनंद फडके, ओमकार गेहुले, ममता गेहुले, प्रीती गेहुले, कश्मीरा लाड सहभागी झाले होते. 
 
संस्थापक माजी मंत्री शशिकांत सुतार यांनी 27 वर्षांपुर्वी खासदार निधीतून बांधलेल्या या श्री गणेश मंदिरामध्ये अनेक धार्मिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. पेशाने इंजिनिअर असलेले श्रीकांत गोरे (वय 77) समाजकार्याची आवड म्हणून पौड रोड येथे गेली 30 वर्षे विद्यार्थ्यांना चित्रकलेचे मोफत प्रशिक्षण देत आहेत. 
 
दरवर्षी श्रीकांत गोरे संत, देव देवता यांची चित्रे काढतात. यंदाच्या वर्षी त्यांनी श्री साई बाबा यांची पुष्प रांगोळी काढली. ही रांगोळी अतिशय लक्षवेधक होती. महिला, नागरिक मोठ्या संख्येने या दीपोत्सवात सहभागी झाले होते. 

> 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत क्रिशन हुडा, ऋतुजा चाफळकर यांना विजेतेपद ऋतुजा चाफळकरला दुहेरी मुकुट

0

औरंगाबाद- एन्ड्युरन्स्‌ मराठवाडा-एमएसएलटीए टेनिस सेंटर(इएमएमटीसी)यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए – योनेक्स्‌ सनराईज्‌ 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या ऋतुजा चाफळकरने महाराष्ट्राच्याच  सुदिप्ता कुमारचा तर, मुलांच्या गटात छत्तीसगडच्या क्रिशन हुडाने आसामच्या उदित गोगईचा  पराभव करत विजेतेपद पटकावले.

इएमएमटीसी टेनिस कोर्ट,डिव्हिजनल स्पोर्टस्‌ कॉम्पलेक्स्‌ येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत एकेरीत अंतिम फेरीत मुलींच्या गटात पाचव्या मानांकित महाराष्ट्राच्या ऋतुजा चाफळकरने सनसनाटी निकालाची नोंद करत अव्वल मानांकीत महाराष्ट्राच्या सुदिप्ता कुमारचा एक तास तीस मिनिट चाललेल्या सामन्यात 3-6,6-1,6-1 असा पराभव करत विजेपद पटकावले. ऋतुजा चाफळकरने नैशा श्रीवास्तवच्या साथीत रेनी सिंगला व रेनी सिंग यांचा 6-3, 6-4 असा पराभव करत दुहेरीचे विजेतेपद पटकावले. 13 वर्षीय ऋतुजाने ऑक्टोंबर मध्ये झालेल्या फेनेस्टा राष्ट्रीय स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले होते.

13 वर्षीय ऋतुजा पुणे येथे डीईएस इंग्लिश मिडियम शाळेत आठवी इयत्तेत शिकते.

मुलांच्या गटात अंतिम फेरीत अव्वल  मनांकित छत्तीसगढच्या क्रिशन हुडाने आसामच्या दुस-या मानांकीत उदित गोगईचा 6-1,7-5  पराभव करून विजेतेपद पटकावले. क्रिशनचे हे या वर्षातील सातवे विजेतेपद आहे. दिल्ली येथे झालेल्या स्पर्धेत त्याने उपविजेतेपद पटकावले होते.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण एन्ड्युरन्स्‌ ग्रुप(हेड कॉर्पोरेट अफेअर्स)चे अनिल इरावने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एन्ड्युरन्स्‌ ग्रुपचे हर्षल शर्मा, स्पर्धा निरीक्षक वैशाली शेकटकर, फिजिओ डॉ. आश्विनी जैस्वाल, आशुतोष मिश्रा, प्रवीण गायसमुद्रे, गजेंद्र भोसले आणि वरुण मांगीकर आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण एन्ड्युरन्स्‌ ग्रुपच्या प्रमुख वर्षा जैन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अनिल इरावने(हेड कॉर्पोरेट अफेअर्स), एन्ड्युरन्स्‌ गुरुपाचे हर्षल शर्मा, स्पर्धा निरीक्षक वैशाली शेकटकर,  फिजिओ डॉ. आश्विनी जैस्वाल, आशुतोष मिश्रा, प्रवीण गायसमुद्रे, गजेंद्र भोसले आणि वरुण मांगीकर आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल- अंतिम फेरी- मुले

क्रिशन हुडा(छत्तीसगढ)(1) वि.वि.उदित गोगई(आसाम)(2) 6-1,7-5

मुली:

ऋतुजा चाफळकर(महा)(5)वि.वि. सुदिप्ता कुमार(महा)(1) 3-6,6-1,6-1

महिला अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत सालसा अहेर, शिवानी इंगळे यांचा दुस-या पात्रता फेरीत प्रवेश

0

पुणे,7- आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांच्या सहकार्याने व नवनाथ शेटे स्पोर्टस्‌ अकादमी तर्फे आयोजित एआयटीए, एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 25000डॉलर पुणे ओपन आयटी महिला अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत वाईल्ड कार्ड मिळालेल्या सालसा अहेर व शिवानी इंगळे यांनी अनुक्रमे प्रिती उज्जेनी व आस्था दरगुडे यांचा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.

Salsa Aher

एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, श्री शिवछ्त्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत पहिल्या पात्रता फेरीत वाईल्ड कार्ड मिळालेल्या सालसा अहेरने प्रिती उज्जेनीचा 6-2, 6-2 असा तर शिवानी इंगळेने आस्था दरगुडेचा 6-3, 6-1 असा पराभव करत दुस-या पात्रता फेरीत प्रवेश केला.

अव्वल मानांकीत रिया भाटियाने हर्षिता चुघचा 6-0, 6-0 असा सहज पराभव करत आगेकुच केली. दुस-या मानांकीत आरती मुनीयन शर्मिन रिझ्वीचा 6-0, 6-0   असा तर तिस-या मानंकीत निधी चिलुमूलाने प्रकृती बनवानीचा 6-1, 6-0 असा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.

स्पर्धेचे उद्घाटन उद्या महाराष्ट्र राज्याचे शिक्षण व क्रीडा मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते संध्याकाळी 4 वाजता एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, श्री शिवछ्त्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे करण्यात येणार आहे. यावेळी पुण्याचे पालक मंत्री गिरीष बापट व आमदार प्रा. मेधा कुलकर्णी उपस्थित असतील.

स्पर्धेचा सविस्तर निकाल- पहिली पात्रता फेरी

रिया भाटिया(भारत, 1) वि.वि हर्षिता चुघ (भारत) 6-0, 6-0

आरती मुनीयन(भारत, 2) वि.वि शर्मिन रिझ्वी (भारत) 6-0, 6-0

निधी चिलुमूला(भारत, 3) वि.वि प्रकृती बनवानी (भारत) 6-1, 6-0

प्रेरणा भाब्री(भारत, 4) वि.वि श्रेया तातावर्ती(भारत) 6-3, 6-1

साई संहीता चामार्थी(भारत, 5) वि.वि सौम्या वीग 6-1, 6-3

रिषीका सुंकारा(भारत, 6) वि.वि श्वेता राणा(भारत) 6-0, 6-2

सालसा अहेर(वाईल्ड कार्ड)(भारत) वि.वि प्रिती उज्जेनी(भारत) 6-2, 6-2

अमृता मुखर्जी(भारत) वि.वि नफीस बानो सयेद (भारत) 6-0, 6-0

सोहा सादीक(भारत) वि.वि नेहा घारे (भारत) 6-2, 7-6(2)

शिवानी इंगळे(वाईल्ड कार्ड)(भारत) वि.वि आस्था दरगुडे(भारत) 6-3, 6-1

परिन शिवेकर (भारत) वि.वि दक्षता पटेल(वाईल्ड कार्ड) (भारत) 6-1, 6-1

सारा यादव(भारत) वि.वि सिंधू जनगम(भारत) 2-6, 6-1, 6-3

साई देदिप्या येड्डूला(भारत) वि.वि मौलाका राम(भारत) 6-2, 6-4

प्रगती सोलणकर(भारत) वि.वि हुमेरा शेख (भारत) 6-4, 4-6, 6-0

सृजन सुपर 20 युथ कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत आराध्या प्रतिष्ठान,कालभैरवनाथ कबड्डी संघ यांचा उपांत्य फेरीत प्रवेश

0

पुणे- एक्सेलार स्पोर्टस् अॅड एन्टरटेमेंट प्रायव्हेट लिमिटेड व पुणे जिल्हा कबड्डी संघटना यांच्या सहकार्याने ओयोजित सृजन सुपर 20 युथ कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत पिंपरी चिंचवड विभागात मुलांच्या गटात आदिनाथ कबड्डी संघ, आराध्या प्रतिष्ठान, राकेशभाऊ घुले संघ, कालभैरवनाथ कबड्डी संघ यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला

पिंपरी चिंचवड येथील ज्ञान प्रबोधीनी शाळा, निगडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत आदिनाथ कबड्डी संघने  भैरवनाथ कबड्डी संघाचा 34-21 तर आराध्या प्रतिष्ठान संघाने शिवाजी उदय मंडळ संघाचा  36-17 असा पराभव करत आगेकुच केली. राकेशभाऊ घुले संघाने ब्रम्हा विष्णु महेेश संघाचा  36-34 असा तर कालभैरवनाथ कबड्डी संघ संघाने मोरया कबड्डी संघाचा 35-12 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल- मुले- उपांत्यपुर्व फेरी

आदिनाथ कबड्डी संघ- 34 वि.वि भैरवनाथ कबड्डी संघ 21

आराध्या प्रतिष्ठान – 36 वि.वि शिवाजी उदय मंडळ 17

राकेशभाऊ घुले संघ- 36 वि.वि ब्रम्हा विष्णु महेेश 34

कालभैरवनाथ कबड्डी संघ- 35 वि.वि मोरया कबड्डी संघ 12

क्रेडाई नॅशनल तर्फे न्यू इंडिया समिटचे आयोजन

0

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती

नागपूर :- क्रेडाई नॅशनल तर्फे येत्या ९ व १० नोव्हेंबर रोजी नागपूर येथे न्यू इंडिया समिटचे आयोजन करण्यात आले आहे. देशातील जास्तीत जास्त शहरांमधील रिअल इस्टेट विकासकांची प्रगती आणि आव्हाने याबाबत चर्चा करण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील उपस्थित असणार आहेत. यात देशातील १७२ शहरातील ८०० पेक्षा अधिक विकसक यात सहभागी होणार आहेत. अशी माहिती क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया यांनी दिली.

पंतप्रधानांच्या ‘स्वच्छ भारत अभियानात’ योगदान देण्यात क्रेडाई सदस्यांचा सहभाग वाढावा यासाठी  क्रेडाई क्लीन सिटी मूव्हमेंट तर्फे ‘कचरा व्यवस्थापन’ संदर्भातील सामंजस्य करार क्रेडाई तर्फे केला जाणार आहे.  यामुळे क्रेडाईशी संघटीत प्रत्येक विकसकाला स्वत:च्या प्रकल्पांमध्ये कचरा व्यवस्थापनाची ही प्रणाली बसवणे आवश्यक असणार आहे. प्रशासनावर कचरा व्यवस्थापनाचा अधिक बोजा येऊ नये यासाठी या प्रणालीचा उपयोग केला होईल.

‘छोटी शहरे मोठ्या क्षमता’ ही या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना असून भारतीय रिअल इस्टेट क्षेत्रात छोट्या शहरांमधील विकासकांचे योगदान वाढविण्याच्या दृष्टीने त्यांच्या क्षमतांचा उपयोग करून घेणे हे क्रेडाईचे उद्दिष्ट आहे.

क्रेडाई  महाराष्ट्रचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया म्हणाले कि, “नव्या सरकारी धोरणांना क्रेडायने नेहमीच पाठींबा दिला आहे. या क्षेत्रातील एक अग्रणी संस्था म्हणून ‘२०२२ सालापर्यंत सर्वांसाठी घरे’ या मिशनसाठी योगदान देण्यास आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो. यासाठी आमच्या सदस्यांना टिअर II, III वIV शहरांचा विकास करण्यासाठी प्रोत्साहन देत आहोत. या विकासकांना ज्या आव्हानांना सामोरे जावे लागते, त्याबाबत चर्चा करणे हा या न्यू इंडिया समिटचा हेतू आहे.

गुरुनानक जयंती विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरी

0

पुणे

गुरुनानक जयंतीनिमित्त पुणे लष्कर भागातील गुरुद्वारा गुरुनानक दरबारममध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली . गुरुद्वारामध्ये शीख व सिंधी बांधवानी मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी गर्दी केली होती . गुरुद्वारामध्ये कीर्तन , लंगर , भजनाचे गायन सुरु होते . या उत्सवामध्ये शीख व सिंधी बांधवांसह इतर धर्माचे नागरिक देखील मोठ्या  संख्येने सहभागी होतात . यंदाच्या वर्षी अमृतसर येथील प्रमुख कीर्तनकार रायसिंग व काश्मीरमधील बारामुल्लायेथील अरविंदरपालसिंग व दिल्ली येथील चरणसिंग सुखिया यांचे कीर्तन झाले . तसेच गेले दोन दिवसापासून अखंड पाठ सुरु होते , त्याचा समारोप आज सकाळी झाला .

यावेळी महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे ,  गुरुद्वारा गुरुनानक दरबारचे अध्यक्ष चरणजितसिंग सहानी , बिल्डिंग कमिटी चेअररमन संतसिंग मोखा ,गुरुद्वाराचे माजी अध्यक्ष  हरमिंदरसिंग घई,  उपाध्यक्ष करमजितसिंग आनंद , उपाध्यक्ष आर. पी. एस. सहेगल , सरचिटणीस बलविंदरसिंग ऑबेरॉय , चिटणीस दलजितसिंग  रॅन्क , सहचिटणीस कुलजितसिंग चौधरी , जनसपंर्क अधिकारी मोहिंदरसिंग कंधारी ,लंगर व्यवस्थापक इंद्रजितसिंग सहानी आदी मान्यवर उपस्थित होते .

गुरुद्वारास मनजितसिंग विरदी , इकबाल शेख , संदीप खर्डेकर , दिलीप उंबरकर , सतीश गायकवाड , नदीम मुजावर , रिझवान सय्यद आवडीने भेटी दिल्या . यावेळी गुरुद्वाराचं आवारात वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . यामध्ये रोटरी क्लब ऑफ पुनाच्यावतीने सहाशे जणांची संपूर्ण शरीराची आरोग्य तपासणी आरोग्य तपासणी करण्यात आले . या शिबिराचे आयोजनरोटरी क्लब ऑफ पुनाचे नरेंदरपालसिंग बक्षी यांनी विशेष परिश्रम घेतले . तर पूना सिरॉलॉजिकल इन्स्टिट्यूटच्यावतीने रक्तदान शिबीर घेण्यात आले . यामध्ये २०० पिशव्या रक्तसंकलित करण्यात आले . या रक्तदान शिबिरासाठी  पूना सिरॉलॉजिकल इन्स्टिट्यूटचे डॉ. इंद्रमोहनसिंग चढोक  ,  विक्रमसिंग कंढा  व वैद्यकीय पथकाने विशेष परिश्रम घेतले . रक्तदान केलेल्याना अल्पोपहार व प्रमाणपत्र देण्यात आले .

एशियन आय हॉस्पिटलच्यावतीने पाचशे जणांची  मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. या नेत्रतपासणीसाठी हरमिंदरसिंग  घई व दलजितसिंग  रॅन्क यांनी विशेष परिश्रम घेतले .

यावेळी उत्सवासाठी पूना इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेण्ट २०० विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले . आम आदमी पार्टि पुणेतर्फे गुरूनानक जयंती प्रित्यर्थ कँप गुरूद्वारा येथे भाविकांचे पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या त्यावेळी मुजुमदार काका,अलीभाई,आनंद अंकुश,राजेश चौधरी, सुभाष करांडे,असगर बेग, शितल मित्तल,रज्जाक शेख,इफ्तकार खान,जान जगदानी,फेलिक्स इतर आप कार्यकर्ते उपस्थित होते.

सौर कृषी वाहिनीद्वारेच शेतकऱ्यांना वीज: मुख्यमंत्री

0

राळेगणसिद्धीत सौर कृषी वाहिनीचे भूमिपूजन

ग्रामरक्षक दल अंमलबजावणीसाठी सरपंच मेळावा   

अहमदनगर:

राज्यातील शेतकऱ्यांच्या कृषिपंपांसाठी देण्यात येणारी वीज सौर फिडरद्वारेच देण्याची शासनाची योजना आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीज उपलब्ध होण्यासोबतच शासनाच्या पैशांची बचत होण्याचा दुहेरी उद्देश साध्य होईल. राज्याच्या या पथदर्शी प्रकल्पाचे देशातल्या अन्य राज्यांनी अनुकरण करत सौर कृषी फिडर योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

ग्रामरक्षक दलाच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील सरपंचांचा मेळावा आणि मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचे भूमिपूजन राळेगणसिद्धी येथे करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे होते. प्रमुख पाहुणे म्हणून ऊर्जा व राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मृद व जलसंधारण मंत्री राम शिंदे, राज्यमंत्री विजय देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनीताई विखे, खासदार दिलीप गांधी, आमदार शिवाजी कर्डीले, विजय औटी, बाबुराव पाचरणे, भाऊसाहेब कांबळे, सभापती राहुल झावरे, सरपंच रोहिणी गाजरे, महाऊर्जाचे महासंचालक राजाराम माने, उत्पादन शुल्क विभागाच्या प्रधान सचिव, वल्सा नायर सिंग, महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संचालक संजीवकुमार, जिल्हाधिकारी अभय महाजन व अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, हा ऐतिहासिक दिवस आहे. ग्रामविकास आणि लोकसहभागाचा विचार ज्या राळेगणसिद्धीतून संपूर्ण देशात रुजला त्याच ठिकाणी देशातील पहिल्याच सौर फिडरचे भूमिपूजन होत आहे. या गावात दोन महत्वपूर्ण योजनांचा शुभारंभ होत आहे. ग्रामरक्षक दलाची स्थापना व त्यासाठी कायदा करण्याची भूमिका अण्णांनी मांडली होती. त्यानुसार या कायद्याला मूर्त स्वरूप देण्यात आले. अण्णांनी सुचविलेल्या सर्व दुरुस्त्यांचा समावेश यात केला आहे. या कायद्यामुळे गावागावातील अवैध दारूचे संकट टळणार आहे. अवैध दारू उत्पादन व विक्रीस या कायद्याने आळा बसणार आहे. या कायद्याच्या अमंलबजावणीतून एक आदर्श गाव तयार होऊ शकेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सौर कृषी फिडर योजनेमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन होईल. शेतकऱ्यांना दिवस १० ते १२ तास हमखास वीज मिळण्याची खात्री या योजनेतून देता येणार आहे. याशिवाय शासनाने जलसंधारणात अनेक कामे केली आहेत. अण्णांच्या कामातून प्रेरणा घेऊनच हे काम शक्य झाले. विहिरींसोबतच पाणलोट पुनःर्भरणाकडे जाण्याचे काम राज्याने केले आहे. विविध योजना राज्याने यशस्वीपणे राबवल्या असून परिवर्तन होत आहे.

———

सौर उर्जेवर या: अण्णा हजारे 

राज्याला प्रदूषणाच्या विळख्यातून सोडवायचे असेल तर सर्वांनी जास्तीत जास्त सौर ऊर्जेचा वापर करावा. तसेच अवैध दारू निर्मिती, व्यसनाधीनता व महिलांवरील अत्याचारांवर नियंत्रण आणायचे असल्यास अधिकारी आणि ग्रामस्थांनी हातात हात घालून काम करणे आवश्यक आहे. ग्रामरक्षक दलाने पोलिसांना माहिती दिल्यानंतर १२ तासाच्या आत कारवाई करावी लागणार आहे. तसेच दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्यांविरुद्ध माहिती मिळताच पोलिसांना तात्काळ कारवाई करावी लागणार आहे. अत्यंत प्रबळ आणि सक्षम असा हा कायदा असून गावांना निर्भीड बनविण्याचे काम यातून साधणार आहे. ‘वेस्ट इज बेस्ट’ असे सांगून आता कचऱ्यापासून वीज निर्मिती करावी लागणार असल्याचे सांगत अण्णांनी यातून ऊर्जानिर्मितीसह स्वच्छताही साधेल, याकडे लक्ष वेधले.

—————–

ग्रामरक्षक दल राज्याला व्यसनमुक्तीकडे नेणार: बावनकुळे

अवैध दारूच्या निर्मिती व विक्रीला रोखण्यासाठी गठीत करण्यात येणारे ग्रामरक्षक दल हे राज्याला व्यसनमुक्तीकडे नेणारे असल्याचे मत ऊर्जा व राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी आणि ग्रामरक्षक दलाच्या कायद्याने राज्यात नव महाराष्ट्राची निर्मिती सुरु झाली आहे. पांगरमलसारख्या घटना घडू नयेत, यासाठी या कायद्याची निर्मिती करण्यात आली आहे.

सौर कृषी वाहिनी योजनेतून राज्यातील ४२ लाख शेतकऱ्यांना दिवस वीज मिळणार आहे. या योजनेचे जनक मुख्यमंत्री फडणवीस असून त्यांच्याच कल्पनेतून ही योजना साकार झाली आहे. शेतकऱ्यांच्या वीजबिलाच्या थकबाकीतून दंडव्याज बाजूला करणारे हे पहिलेच मुख्यमंत्री असल्याचे बावनकुळे म्हणाले.

—————————

सौर ऊर्जेने गवे समृद्ध होतील : राम शिंदे 

राळेगणसिद्धीने या राज्याला दिशा देण्याचे काम केले आहे. सौर कृषी फिडर व ग्राम सुरक्षा दलाची स्थापना यासाठी पथदर्शी म्हणून नगर जिल्ह्याची निवड ही आनंदाची बाब असल्याचे पालकमंत्री राम शिंदे म्हणाले. अण्णा हजारे यांचा दूरदृष्टीकोन असून यातून या प्रकल्पांना प्रेरणा मिळणार आहे. ग्रामरक्षक दल हे गावांना व्यसनमुक्त करून समृद्ध करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

ग्रामरक्षक दलाची माहिती असलेली पुस्तिका यावेळी प्रकाशित करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रधान सचिव वल्सा नायर सिंग आणि व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी यांनी केले. या दोन्ही प्रकल्पाचे कळ दाबून मुख्यमंत्री व इतर मान्यवरांच्या हस्ते डिजिटल भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला सुमारे एक हजार सरपंचांनी हजेरी लावली. तर पाच हजारांपेक्षा अधिक नागरिक यावेळी उपस्थित होते.

______________

सजला धजला… श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणराजा ..

0

पुणे- नानाविध प्रकारची फळे,  पदार्थ, मिठाई अशा 450 हून अधिक प्रकारच्या मिष्टान्नांचा एक हजार 200 किलो पदार्थांचा अन्नकोट , दगडूशेठ गणपतीसमोर मांडण्यात आला. .. मंदिराच्या कळसापासून ते गाभा-यापर्यंत तब्बल 25 हजार दिव्यांनी  सजविण्यात आलेले मंदिर  ..मग काय ..त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त बाप्पाचा थाट पाहून , आनंदाने  दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये दीपोत्सव आणि अन्नकोट आयोजित करण्यात आला होता. यावेळी परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त डॉ. बसवराज तेली, ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, महेश सूर्यवंशी, सुनील रासने आदी उपस्थित होते. मंदिराच्या कळसासह संपूर्ण गाभा-यात लावलेल्या पणत्यांनी मंदिराचा परिसर उजळून निघाला होता. याशिवाय तोरण आणि रांगोळ्यांनी मंदिराचा परिसर सजविण्यात आला.
त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त आयोजित अन्नकोटाकरीता पदार्थ देण्याचे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले होते. त्यानुसार तब्बल ४५०हून अधिक भाविकांकडून विविध प्रकारचे पदार्थ मंदिरात गोळा झाले. ते सर्व पदार्थ अन्नकोटामध्ये मांडण्यात आले. या सर्व पदार्थांचा प्रसाद ससून रुग्णालयात, वृद्धाश्रम, अंधशाळा आणि मंदिरातील भक्त यांना देण्यात येणार असल्याचे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले.

बालाजी मंदिरात दीपोत्सव …(फोटो)

0

नाशिक -नाशिकच्या गंगापूर रोडवरील बालाजी मंदिरात त्रिपुरारी पोर्णिमेनिमित्त आज दीपोत्सव साजरा करण्यात आला.आकर्षक विद्युत रोषणाई आणि हजारो पणत्यांमुळे मंदिर परिसर उजळून निघाला होता…

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव चंद्रोदयाच्या साक्षीने उजळले दीप !

0
पुणे :’नवचैतन्य हास्ययोग परिवार ‘ तर्फे  *त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त शुक्रवारी चतुश्रुंगी मंदिरात  ५ हजारहुन अधिक पणत्यांचा दीपोत्सव* आयोजित करण्यात आला होता ! चंद्रोदयाच्या साक्षीने हजारो पणत्या उजळल्याचे दुर्मिळ दृश्य पाहायला मिळाले
शुक्रवार दि. ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता हा दीपोत्सव झाला.. या उपक्रमाचे हे चवथे वर्ष हाेते. नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे अध्यक्ष विठ्ठल काटे यांनी प्रास्ताविक केले
*विजयराव भोसले यांनी केलेले दीपोत्सवासाठी भव्य आकाराचे रेखांकन व प्रसिद्ध रांगोळी कलाकार रामदास चौंडे यांची रांगोळी* हेही या दीपोत्सवाचे आकर्षण होते
कार्यक्रमासाठी *श्रीमती प्रतिभाताई शाहू मोडक, डॉ. सतीश देसाई, डॉ. मिलिंद भोई हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.* मकरंद टिल्लू यांनी सूत्रसंचालन केले. सुहास अनगळ यांनी आभार मानले.
चतुश्रुंगी देवी दर्शन आणि  देवी समोर पणती लावण्यासाठी पुणेकरांनी गर्दी केली. प्रारंभी हास्ययोग परिवार सदस्यानी हास्य दीपही प्रज्वलित केले ! हास्य प्रकार सादर केले