पुणे,7- आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांच्या सहकार्याने व नवनाथ शेटे स्पोर्टस् अकादमी तर्फे आयोजित एआयटीए, एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 25000डॉलर पुणे ओपन आयटी महिला अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत वाईल्ड कार्ड मिळालेल्या सालसा अहेर व शिवानी इंगळे यांनी अनुक्रमे प्रिती उज्जेनी व आस्था दरगुडे यांचा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.

एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, श्री शिवछ्त्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत पहिल्या पात्रता फेरीत वाईल्ड कार्ड मिळालेल्या सालसा अहेरने प्रिती उज्जेनीचा 6-2, 6-2 असा तर शिवानी इंगळेने आस्था दरगुडेचा 6-3, 6-1 असा पराभव करत दुस-या पात्रता फेरीत प्रवेश केला.
अव्वल मानांकीत रिया भाटियाने हर्षिता चुघचा 6-0, 6-0 असा सहज पराभव करत आगेकुच केली. दुस-या मानांकीत आरती मुनीयन शर्मिन रिझ्वीचा 6-0, 6-0 असा तर तिस-या मानंकीत निधी चिलुमूलाने प्रकृती बनवानीचा 6-1, 6-0 असा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.
स्पर्धेचे उद्घाटन उद्या महाराष्ट्र राज्याचे शिक्षण व क्रीडा मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते संध्याकाळी 4 वाजता एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, श्री शिवछ्त्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे करण्यात येणार आहे. यावेळी पुण्याचे पालक मंत्री गिरीष बापट व आमदार प्रा. मेधा कुलकर्णी उपस्थित असतील.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- पहिली पात्रता फेरी
रिया भाटिया(भारत, 1) वि.वि हर्षिता चुघ (भारत) 6-0, 6-0
आरती मुनीयन(भारत, 2) वि.वि शर्मिन रिझ्वी (भारत) 6-0, 6-0
निधी चिलुमूला(भारत, 3) वि.वि प्रकृती बनवानी (भारत) 6-1, 6-0
प्रेरणा भाब्री(भारत, 4) वि.वि श्रेया तातावर्ती(भारत) 6-3, 6-1
साई संहीता चामार्थी(भारत, 5) वि.वि सौम्या वीग 6-1, 6-3
रिषीका सुंकारा(भारत, 6) वि.वि श्वेता राणा(भारत) 6-0, 6-2
सालसा अहेर(वाईल्ड कार्ड)(भारत) वि.वि प्रिती उज्जेनी(भारत) 6-2, 6-2
अमृता मुखर्जी(भारत) वि.वि नफीस बानो सयेद (भारत) 6-0, 6-0
सोहा सादीक(भारत) वि.वि नेहा घारे (भारत) 6-2, 7-6(2)
शिवानी इंगळे(वाईल्ड कार्ड)(भारत) वि.वि आस्था दरगुडे(भारत) 6-3, 6-1
परिन शिवेकर (भारत) वि.वि दक्षता पटेल(वाईल्ड कार्ड) (भारत) 6-1, 6-1
सारा यादव(भारत) वि.वि सिंधू जनगम(भारत) 2-6, 6-1, 6-3
साई देदिप्या येड्डूला(भारत) वि.वि मौलाका राम(भारत) 6-2, 6-4
प्रगती सोलणकर(भारत) वि.वि हुमेरा शेख (भारत) 6-4, 4-6, 6-0