Home Blog Page 3217

टाटा स्कायचा ओला सनबर्न महोत्सव २०१७ शी करार

0

चार दिवसीय संगीत महोत्सवाचे पहिल्यांदाच टाटा स्काय मोबाइल अपवर लाइव्ह स्ट्रीमिंग

ओला सनर्बन महोत्सव २०१७ पाहाणाऱ्या सर्व वापरकर्त्यांना टाटा स्काय मोबाइल अप मोफत

मुंबई, – भारतातील आघाडीचे कंटेट वितरण व्यासपीठ असलेल्या टाटा स्कायने ओला सनबर्न महोत्सव २०१७ या जगातील सर्वात मोठ्या संगीत महोत्सवांपैकी एक असलेल्या महोत्सवाशी करार केला असून त्याद्वारे संगीत, मनोरंजन आणि विशेष अनुभवाचे खास मिश्रण छोट्या पडद्यावर उपलब्ध केले जाणार आहे. ओला सनबर्न महोत्सव २०१७ च्या लाइव्ह स्ट्रीमिंगशिवाय टाटा स्काय मोबाइल अपवर इतक्या वर्षांतील संगीत महोत्सवाचे जवळपास ५०० उपलब्ध केले जाणार असून ते नोंदणीदार नसलेल्यांसह सर्वांसाठी खुले असतील.

सनबर्न महोत्सवाच्या विशेष आकर्षणांमध्ये – दिमित्री व्हेगस आणि माइक, डीजे स्नेक, क्लीन बँडिट्स, मार्टिन गॅरिक्स, अफ्रोजॅक आणि केएसएचएमआर यांचा समावेश असून त्याचे टाटा स्काय मोबाइल अपवर लाइव्ह स्ट्रीमिंग केले जाईल. चार दिवसांच्या लाइव्ह स्ट्रीमिंगखेरीज, सोहळ्यापूर्वी अपवर मागणीनुसार भरपूर कंटेटचा संग्रह उपलब्ध करून दिला जाणार आहे. यामध्ये अधिकृत, आफ्टर मूव्हीज, कलाकारांच्या मुलाखती, बॅकस्टेजचे खास फुटेज आणि जगातील सर्वात आघाडीच्या ईडीएमचे परफॉर्मन्सेस उदा. केवायजीओ, न्यूक्लिया, हार्डवेल, डेव्हिड गुएट्टा, टिएस्टो, अर्मिन व्हॅन बरेन आणि अशा कित्येकांचा समावेश असेल. त्याशिवाय सनर्बन सीझन १० पासूनच्या सर्व सोहळ्यांचा संग्रहही अनुभवता येणार आहे.

२८ डिसेंबर २०१७ रोजी सुरू होत असलेल्या ओला सनबर्न महोत्सवाचे यावेळेस पहिल्यांदाच टाटा स्काय मोबाइलवर लाइव्ह स्ट्रमिंग केले जाणार असून महोत्सवाचे लाइव्ह कव्हरेज देणारे हे एकमेव ओटीटी व्यासपीठ असेल.

हा सर्व कंटेट अपवर साठवला जाणार असून तो महोत्सव संपल्यानंतरही पाहाता येईल. यामुळे ईडीएम चाहत्यांना आशियातील या सर्वात मोठ्या संगीत महोत्सवाच्या ११ व्या आवृत्तीचा केव्हाही आणि कधीही आस्वाद घेता येईल. इतकेच नाही, तर टाटा स्कायद्वारे ओला सनबर्न महोत्सव २०१७ चे काही खास किस्से चॅनेल १०० वर प्रक्षेपित केले जाणार आहेत.

टाटा स्कायचे मुख्य कम्युनिकेशन अधिकारी, मलाय दीक्षित म्हणाले, स्क्रीन्सची संख्या तसेच वेगवेगळा कंटेट अनुभवण्याची तरुणांची आस वाढत असतानाच ग्राहकांच्या मनोरंजनविषयक गरजा, त्यांना पाहिजे त्या पद्धतीने पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. तरुणांबरोबर प्रभावशाली आणि दीर्घकालीन नाते जोडण्यासाठी आणि सर्व प्रकार व आकारातील कंटेट स्क्रीन्सवर उपलब्ध करण्यासाठी टाटा स्काय मोबाइल अपने अतिशय प्रसिद्ध असलेल्या सनबर्न या संगीत महोत्सवाशी करार केला आहे.

वर्षभरातील सनबर्न कार्यक्रमांचे मुख्य आकर्षण असलेला सनबर्न महोत्सव ईडीएम चाहत्यांसाठी अतिशय महत्त्वाचा वार्षिक सोहळा बनला असून तो अनुभवण्यासाठी देश तसेच जगभरातून दरवर्षी हजारो लोक गर्दी करतात.

या चाहत्यांना सेवा देण्यासाठी टाटा स्कायने काही अनोख्या अनुभवांची तयारी केली आहे.

–    श्वास रोखून धरायला लावणारा ३६० डिग्री व्हर्च्युअल रिअलिटी अनुभव, ज्यामुळे चाहत्यांना डीजेला सहज पाहाता येईल व सगळ्या धामधुमीच्या केंद्रस्थानी असल्याची अनुभूती घेता येईल.

–    ग्राफिटी वॉल जिथे चाहत्यांना त्यांचे फोटो काझून घेता येईल व वैयक्तिक संदेश, चित्रविचित्र पोशाख किंवा स्प्रे पेंटच्या सहाय्याने त्यावर चित्रकला करता येईल.

–    कार्यक्रमस्थळी विविध ठिकाणी कंपनीचा थ्रीडी होलोग्राम चाहत्यांना भारताच्या आघाडीच्या कंटेट वितरण व्यासपीठाशी नाते जोडण्यासाठी मदत करेल.

टाटा स्कायबद्दल

टाटा स्काय लिमिटेड (टाटा स्काय) हे टाटा सन्स आणि २१ सेंच्युरी फॉक्स यांच्यातील संयुक्त भागिदारी आहे. २००१ मध्ये स्थापन झालेले आणि २००६ मध्ये लाँच करण्यात आलेले टाटा स्काय भारतातील आघाडीचे कंटेट वितरण व्यासपीठ बनले आहे, जे पे टीव्ही आणि ओटीटी सेवा पुरवते. जगभरात कोणत्याही बजेटमध्ये, कोणत्याही स्क्रीनवर, केव्हाही आणि कुठेही सर्वोत्तम आशय पुरवण्याच्या हेतूने सुरू करण्यात आलेले टाटा स्काय देशातील नोंदणीदारांचा मनोरंजनाचा अनुभव बदलणारी विविध उत्पादने व सेवा लाँच करणारे पहिले होते.

एचडी सेट टॉप बॉक्स क्षेत्रात टाटा स्काय प्रवर्तक असून त्यांच्याकडे या विभागाचा लक्षणीय हिस्सा आहे. टाटा स्काय विविध विभाग आणि भाषांमध्ये सातत्याने नवी चॅनेल्स व व्यासपीठ सेवा पुरवत असून त्याद्वारे सर्व प्रकारच्या प्रेक्षकांना दर्जेदार आशय पुरवला जातो. सध्या टाटा स्काय दोन लाख शहरांमध्ये उपलब्ध असून भारतात त्याच्य १८ दशलक्ष जोडण्या आहेत.

 

प्रथमेश पाटील, अझमिर शेख, जुई काळे,रिया मथारू यांची मानांकीत खेळाडूंवर मात

0

पुणे-– प्रविण मसालेवाले प्रायोजित व हिलसाईड जिमखाना बिबवेवाडी यांच्या तर्फे आयोजित ३१व्या प्रविण करंडक राष्ट्रीय(12 वर्षाखालील) मानांकन टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात बिगर मानांकीत प्रथमेश पाटीलने सहाव्या मानांकीत अनिरूध्द नल्लापाराजूचा व अझमिर शेखने सातव्या मानांकीत राधेय शहाणेचा तर मुलींच्या गटात जुई काळेने चौथ्या मानांकीत  हृिती अहूजाचा तर रिया मथारूने तिस-या मानांकीत स्वरा काटकरचा पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.

बिबवेवाडी येथील हिलसाईड जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत उपउपांत्यपुर्व  फेरीत मुलांच्या गटात बिगर मानांकीत प्रथमेश पाटीलने सहाव्या मानांकीत अनिरूध्द नल्लापाराजूचा 6-3, 6-3 असा पराभव केला तर अझमिर शेखने सातव्या मानांकीत राधेय शहाणेचा 7-5, 1-6, 6-2 असा पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.

अव्वल मानांकीत मानस धामणेने शौर्य राडेचा 6-0, 6-1 असा पराभव केला. दुस-या मानांकीत जैश्णव शिंदेने  हर्ष ठक्करचा 6-2, 6-3 असा तर पाचव्या मानांकीत अर्णव पापरकरने केवल किरपेकरचा 6-2, 6-0 असा सहज पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.

मुलींच्या गटात उपउपांत्यपुर्व  फेरीत बिगर मानांकीत जुई काळेने चौथ्या मानांकीत हृिती अहूजाचा 6-7(0), 6-3, 6-2 असा टायब्रेकमध्ये तर बिगर मानांकीत रिया मथारूने तिस-या मानांकीत स्वरा काटकरचा 6-3, 7-5 असा पराभव करत खळबळजनक निकालाची नोंद केली. अव्वल मानांकीत ईरा शहाने प्राप्ती पाटीलचा 6-1, 3-6, 6-0 असा तिन सेटमध्ये पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपउपांत्यपुर्व फेरी फेरी: मुले:

मानस धामणे(1) वि.वि शौर्य राडे 6-0, 6-1

जैश्णव शिंदे(2) वि.वि हर्ष ठक्कर 6-2, 6-3

राघव हर्ष(3) वि.वि पृथ्विराज बारी 6-2, 6-1

अंशूल सातव(4) वि.वि नील जोगळेकर 6-0, 6-2

अर्णव पापरकर(5) वि.वि केवल किरपेकर 6-2, 6-0
प्रथमेश पाटील वि.वि अनिरूध्द नल्लापाराजू(6) 6-3, 6-3
अझमिर शेख वि.वि राधेय शहाणे(7) 7-5, 1-6, 6-2
अश्विन नरसिंघानी ईशान देगमवार 3-6, 6-3, 6-4
उपउपांत्यपुर्व फेरी फेरी: मुली:
ईरा शहा(1) वि.वि प्राप्ती पाटील 6-1, 3-6, 6-0
रुमा गाईकवारी(2) वि.वि साईशा कारेकर  6-0, 6-0
रिया मथारू वि.वि स्वरा काटकर(3) 6-3, 7-5
जुई काळे वि.वि हृिती अहूजा(4) 6-7(0), 6-3, 6-2
अनन्या भाटीया(5) वि.वि श्रेया देशपांडे  6-4, 6-3
कश्मिरा सुंबरे(6) संचिता नगरकर 6-3, 6-1
अदिती लाखे(7) वि.वि उर्वी काटे 6-1, 6-4
पुर्वा भुजबळ वि.वि आकांक्षा अग्निहोत्री 6-4, 6-4

कॉंग्रेस पक्षाचा १३२ वा वाढदिवस .. पुण्यातील कॉंग्रेस भवनाला आली झळाळी

0

पुणे- २८ डिसेंबर १८८५ मध्ये म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी स्थापन झालेल्या कॉंग्रेस पक्षाचा उद्या १३२ वा वाढदिवस आहे . ज्यास आपण वर्धापन दिन असे संबोधतो .महात्मा गांधी , पंडित जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री ,दादाभाई नौरोजी,वल्लभभाई पटेल, इंदिरा गांधी ,वसंतदादा पाटील ,यशवंतराव चव्हाण ,राजीव गांधी,शंकरराव चव्हाण  अशा असंख्य दिग्गज नेत्यांचा पक्ष ,स्वातंत्र्यासाठी प्रत्यक्षात ब्रिटिशांशी लढलेला पक्ष म्हणून ज्या राजकीय पक्षाची ख्याती आहे तो एकमेव पक्ष उद्या १३२व वर्धापन दिन साजरा करतो आहे . या पक्षाची प्रतिमा  धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणून कायम टिकून राहीली . गांधी घराण्याच्या बलिदानाचे कवच असलेला ,असंख्य वादळातही मोठ्या हिकमतीने टिकलेला पक्ष ..म्हणून या पक्षाकडे पाहिले जाते .

१३२ वा वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यासाठी पुण्यातील कॉंग्रेस भवन आज सायंकाळी सज्ज झाले होते . कुठे चहाचे कप कोणते हवे , नाष्टा कसा हवा , इमारतीला लाईटच्या माळा कशा हव्यात , मांडव कसा हवा ?निमंत्रणे पाठविली काय ? फोन केलेत काय ? अशा साऱ्या कामकाजाची इथे आज लगबग सुरु होती .शहर अध्यक्ष रमेश बागवे, तसेच नगरसेवक अजित दरेकर , आणि रमेश अय्यर, गेली ३७ वर्षे येथे कार्यरत असलेले उत्तम भूमकर  आदी कार्यकर्ते उद्याच्या सोहळ्याच्या तयारीत व्यस्त असताना ..केलेला हा व्हिडीओ रिपोर्ट …

महाराष्‍ट्र हे रेशीम व्‍यवसायात देशात एक क्रमांकाचे राज्य व्हावे- सहकार मंत्री सुभाष देशमुख

0

पुणे– शेती व्‍यवसाय फायदेशीर व्‍हावा, यासाठी शासन प्रयत्‍नशीलअसून शेतक-यांच्‍या आत्‍महत्‍या रोखण्‍यासाठी रेशीम शेती  प्रभावी  उपाय ठरेल, असा विश्‍वास व्‍यक्‍त करुन महाराष्‍ट्र हे रेशीम व्‍यवसायात देशात एक क्रमांकावर आणण्यासाठी  प्रयत्न करावा, असे आवाहन पणन व वस्‍त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी केले.

            महारेशीम अभियान 2018 च्‍या राज्‍यस्‍तरीय पुरस्‍कार वितरण समारंभात ते बोलत होते. यशवंतराव चव्‍हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) मध्‍ये आयोजित कार्यक्रमास  वस्‍त्रोद्योगचे अपर मुख्‍य सचिव उज्‍ज्‍वल उके, रेशीम संचालनालयाचे संचालक संजय मीणा, बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे (बार्टी)  महासंचालक कैलास कणसे आदी उपस्थित होते.

            सहकार व वस्‍त्रोद्योग मंत्री श्री. देशमुख म्‍हणाले,  मराठवाडा आणि विदर्भ हे विभाग आर्थिकदृष्‍टया मागासलेले आहेत. या भागातील बागायती क्षेत्र कमी आहे, शेतीचे उत्‍पादन कमी आहे,  मालाला भाव, कर्जपुरवठा  अशा अडचणींवर मात करत शेती केली जाते. रेशीम व्‍यवसाय हा फायदेशीर ठरणारा असून शेतक-यांच्‍या आत्‍महत्‍येवर तो प्रभावी उपाय ठरेल.  मराठवाडा आणि विदर्भ हे केंद्रबिंदू मानून या भागात रेशीम उद्योग वाढीसाठी प्रयत्‍न व्‍हावेत. बार्टीच्‍या समतादूतांच्‍या मदतीने रेशीम व्‍यवसायाची माहिती शेवटच्‍या शेतक-यापर्यंत  पोहोचवण्‍यास मदत झाल्‍याचा गौरवपूर्ण उल्‍लेख करुन श्री. देशमुख यांनी रेशीम व्‍यवसायात महाराष्‍ट्र हे देशातील एक क्रमांकाचे राज्‍य बनवण्‍यासाठी प्रयत्‍न करण्‍याचे आवाहन केले. गतवर्षीचे उद्दिष्‍ट पूर्ण झाल्‍याबद्दल अभिनंदन करुन यंदा 30 हजार एकर रेशीमलागवडीचे उद्दिष्‍ट डोळ्यासमोर ठेवून ते साध्‍य करण्‍याचेही त्‍यांनी आवाहन केले.

            बार्टीचे  महासंचालक कैलास कणसे यांनी बार्टीच्‍या समतादूतांच्‍या माध्‍यमातून रेशीम संचालनालयाशी जोडले गेल्‍याचे नमूद करुन शेतक-यांच्‍या जीवनात सकारात्‍मक बदल घडवण्‍यात यश मिळत असल्याचे सांगितले.  देशात रेशीम उद्योगात महाराष्‍ट्र एक क्रमांकावर आणण्‍यासाठी सहकार्य करु, असेही ते म्‍हणाले.

            वस्‍त्रोद्योगचे अपर मुख्‍य सचिव उज्‍ज्‍वल उके यांनी सर्व अधिकारी, कर्मचारी आणि समतादूतांच्‍या एकत्रित समन्‍वयाने रेशीम लागवडीचे उद्दिष्‍ट साध्‍य झाल्‍याचे सांगितले. भविष्‍यातही याच उत्‍साहाने उद्दिष्‍टपूर्ती होईल, असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

            सहकार मंत्री देशमुख यांच्‍या हस्‍ते राज्‍यातील सर्वोत्‍तम प्रादेशिक  विभागाचा पुरस्‍कार औरंगाबादचे सहायक संचालक दिलीप हाके यांनी तर राज्‍यस्‍तरीय सर्वोत्‍कृष्‍ट जिल्‍हा पुरस्‍कार औरंगाबादचे रेशीम विकास अधिकारी बी. के. सातदिवे यांनी स्‍वीकारला. याशिवाय पुणे प्रादेशिक रेशीम कार्यालयाचे सहायक संचालक डॉ. कविता देशपांडे,  बार्टीच्‍या प्रकल्‍प संचालक प्रज्ञा वाघमारे, औरंगाबादचे क्षेत्र सहायक एम.पी.साळुंखे,समतादूत श्‍याम गंगाधर, हिंगोलीचे  रेशीम विकास अधिकारी  जी. एस. ढावरे,अमरावतीचे सहायकसंचालक एम.बी. ढवळे यांचाही पुरस्‍कार देऊन  गौरव करण्‍यात आला.

            रेशीम संचालनालयाचे संचालक संजय मीणा यांनी  आभार प्रदर्शन केले. ते म्‍हणाले, समतादूतांनी रेशीम शेतीविषयी शेतक-यांमध्‍ये जागृती निर्माण केली. रेशीमसंचालनालयाच्‍या अधिकारी-कर्मचारी रेशीम शेतीचे उद्दिष्‍टपूर्ण करुन उच्‍चांक साधतील, अशी खात्री व्‍यक्‍त केली.   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्‍हा रेशीम अधिकारी गणेश राठोड आणि अजय मोहिते यांनी केले.

‘ओढ’ चित्रपटाचे संगीत अनावरण संपन्न

0

आजच्या तरुणाईला आवडतील असे कथाविषय मराठी चित्रपटांमध्ये आवर्जून दिसू लागले आहेत. मैत्रीचे वेगळे रूप दर्शवणारा ओढहा चित्रपट १९ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या मराठी चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा नुकताच मुंबईत संपन्न झाला. याप्रसंगी चित्रपटाचा ट्रेलर व गीताची झलक दाखवण्यात आली. कलाकारांच्या रंगतदार लाइव्ह परफॉर्मन्सने या सोहळ्यात चांगलेच रंग भरले. सोनाली एन्टरटेन्मेंट हाऊसची प्रस्तुती तसंच एस. आर. तोवर यांची निर्मिती असलेल्या ओढमैत्रीतील अव्यक्त भावना चे दिग्दर्शन नागेश दरक व एस. आर. तोवर यांनी केले आहे. तरुणाईच्या ओठावर सहज रुळतील अशी वेगवेगळ्या जॉनरची चार गीते यात असून हा सुरेल नजराणा प्रेक्षकांना निश्चित आवडेल असा विश्वास निर्मात्यांनी याप्रसंगी व्यक्त केला. तसेच उपस्थित सर्व कलाकारांनी निर्मात्यांनी दिलेल्या संधीबद्दल त्यांचे आभार मानले.

संजाली रोडे लिखित ‘निरंतर राहू दे’ हे गाणं स्वप्नील बांदोडकर, नेहा राजपाल यांनी गायले आहे. कौतुक शिरोडकर यांचे ‘नाचू बिनधास्त’ हे धमाकेदार गाणं आदर्श शिंदे, वैशाली माडे यांनी स्वरबद्ध केले आहे. ‘ना जाने क्या हुआ है’ हे अभय इनामदार यांनी लिहिलेलं गाणं रोहित राऊत व आनंदी जोशी यांनी गायले आहे. जो दिल से किसी कोहे सुफी सॉंग कुकू प्रभास यांनी लिहिले असून जावेद अली यांनी ते आपल्या आर्त स्वरात गायलं आहे. संगीतकार प्रवीण कुवर यांचा संगीतसाज या गीतांना लाभला आहे.

मैत्री, प्रेम दर्शवणारी ‘ओढ’ मैत्रीच्या नात्याला कोणत्या वळणावर घेऊन जाणार? याची रंजक कहाणी या चित्रपटात मांडण्यात आली आहे. गणेश तोवर आणि  उल्का गुप्ता ही नवी जोडी या चित्रपटातून आपल्या समोर येणार आहे. सोबत  मोहन जोशी, भाऊ कदम, भारत गणेशपुरे, शशिकांत केरकर, जयवंत भालेकर, राहुल चिटनाळे, आदित्य आळणे, सचिन चौबे, शीतल गायकवाड, तेजस्विनी खताळ, मृणाल कुलकर्णी आदि कलाकारांच्या भूमिका आहेत. कथा व पटकथा दिनेश सिंग ठाकूर यांनी लिहिली असून, त्यांनीच गणेश कदम आणि दर्शन सराग यांच्यासोबत संवादलेखन केलं आहे. या चित्रपटाचं छायांकन रविकांत रेड्डी व संकलन समीर शेख यांनी केलं आहे.

१९ जानेवारीला ‘ओढ’ प्रदर्शित होणार आहे.

नवीनकरणीय ऊर्जा खरेदीच्या बंधन पूर्तेतेसाठी महावितरण स्वस्तदरात वीज खरेदी करणार

0

मुंबई,  :- महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने ठरवून दिलेल्या नवीनकरणीय ऊर्जा खरेदी बंधनाचे उद्दीष्ट पूर्ती करण्यासाठी आवश्यक ती नुतन नवीनकरणीय ऊर्जा खरेदी करण्यास महावितरण बांधील आहे. त्यानुसार महावितरणने सौरऊर्जा पवनऊर्जेच्या वीज खरेदीची प्रक्रिया सुरू केली आहे.

या वीज खरेदीसाठी महावितरणने स्वस्त दरामध्ये वीज उपलब्ध व्हावी म्हणून स्पर्धात्मक निविदा प्रक्रियेचा अवलंब केला आहे. त्यामुळे ग्राहकांना स्वस्त दरात वीज उपलब्ध होऊ शकेल. महावितरणने 1000 मेगावॅट क्षमेतेची सौरऊर्जा 500 मेगावॅट क्षमतेची पवनऊर्जा खरेदी करण्याकरिता टीसीआयएल, भारत सरकार उपक्रम संकेतस्थळामार्फत ई-निविदा जाहीर केलेल्या आहेत. या निविदा भारत सरकार, ऊर्जा मंत्रालय यांच्या द्वारे पारित केलेल्या पारेषण संलग्न सौर पवन ऊर्जा खरेदी करण्याच्या दरावर आधारीत स्पर्धात्मक बोली प्रक्रिया बाबतच्या मार्गदर्शक तत्वावर आधारित आहेत.

महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील प्रस्तावित किंवा जे प्रकल्प आधीपासून कार्यान्वित झालेले आहेत, परंतु त्यांचे कुठल्याही संस्थेशी दीर्घकालीन वीजखरेदी करार नाहीत आणि जे प्रकल्प लघुकाळासाठी किंवा व्यापारी तत्वावर वीज विकण्यास विद्यमान ग्राहकांकडे बांधील नाहीत असे वीज उत्पादक या निविदा प्रक्रियेमध्ये सहभागी होवू शकतात. निविदा प्रक्रियेची सविस्तर माहिती http://www.tcil-india-electronictender.com आणि www.mahadiscom.in या संकेतस्थळावर दिनांक 21.12.2017 पासून उपलब्ध आहे. तरी राज्यातील पवन सौर ऊर्जा प्रकल्पांनी सहभागी होवून याचा फायदा घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

‘एमआयटी सांस्कृतिक संध्या’ संगीत महोत्सवाचे आयोजन

0

पुणे: विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी व विश्‍वशांती संगीत कला अकादमी, राजबाग, पुणे यांच्यातर्फे शनिवार, दि. ३० व रविवार, दि. ३१ डिसेंबर २०१७ रोजी सायंकाळी ५.१५ ते रात्री ९.३० वाजेपर्यंत विश्‍वराज बंधारा, विश्‍वशांती गुरुकुल, राजबाग, लोणी काळभोर,पुणे येथे ‘एमआयटी सांस्कृतिक संध्या’ संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
दोन दिवस रंगणार्‍या या ‘एमआयटी सांस्कृतिक संध्या’ संगीत महोत्सवाचे उद्घाटन शनिवार, दि. ३० डिसेंबर २०१७ रोजी सायंकाळी ५.१५ वाजता थोर समाजसेवक मा. श्री.अण्णा हजारे हे उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या समारंभात मध्यप्रदेश सरकारच्या तानसेन सन्मानाचे मानकरी पंडित उल्हास कशाळकर यांचा विशेष सत्कार होणार आहे.
अत्यंत निसर्गरम्य व सुंदर अशा परिसरात होणार्‍या या संगीत महोत्सवामध्ये आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पखवाज वादक पंडित उध्दवबापू आपेगावकर (शिंदे), शास्त्रीय संगीत गायक श्री. समीहन कशाळकर, सुप्रसिद्ध गायिका सौ. शुभांगी मुळे, सुप्रसिध्द गायक श्री. सुरंजन खंडाळकर, सुप्रसिध्द व्हायोलिनवादक श्री.तेजस उपाध्ये आणि सुप्रसिद्ध गायिका श्रीमती गोदावरीताई मुंडे हे आपली कला सादर करतील. दि. ३१ डिसेंबर २०१७ रोजी विश्‍वशांती संगीत कला अकादमीचे शिक्षक व विद्यार्थीदेखील आपली कला सादर करणार आहेत. या कार्यक्रमाची सुरुवात शहनाई वादनाने होईल.
भारतीय संस्कृती व परंपरेनुसार चैत्र शुध्द प्रतिपदा ‘गुढी पाडवा’ हाच खर्‍या अर्थाने नववर्ष दिन म्हणून ओळखला जातो. तथापि, ३१ डिसेंबरचा दिवस हा नववर्ष दिनाची पूर्वसंध्या म्हणून वेगळ्याच पाश्‍चात्य स्वरूपातील जल्लोषात सर्व भारतात व जगातही साजरा केला जातो. परंतु, विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे आणि विश्‍वशांती संगीत कला अकादमी, पुणे या संस्थेच्या माध्यमातून आपल्या संपूर्ण समाजामध्ये व विशेष करून तरूण वर्गाच्या मनामध्ये ‘स्वधर्म, स्वाभिमान व स्वत्व’ जागवून खर्‍या अर्थाने ‘भारतीय अस्मिता’ जागविण्याचा संस्थेचा एक विनम्र प्रयत्न आहे. ‘एमआयटी सांस्कृतिक संध्येच्या’ कार्यक्रमातून ‘संगीताच्या साधनेतून ईश्‍वर दर्शन व शांत रसाची अनुभूती’ देणारा एक आगळावेगळा अलौकिक आविष्कार सर्व जाणकार रसिकांना मंत्रमुग्ध करेल.

विश्‍वशांती गुरुकुल येथील विश्‍वराज बंधार्‍याच्या विस्तीर्ण जलाशयात उभारलेल्या मंदिरस्वरूपी श्री महासरस्वती, श्री महालक्ष्मी व श्री महाजलदेवता या तीन विशेष मंचांवरून शांतरसाची अनुभूती देणारा ‘एमआयटी सांस्कृतिक संध्या’ हा विशेष कार्यक्रम दरवर्षी ३० व ३१ डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
दि. १ जानेवारी २०१८ रोजी सुरू होणार्‍या नव्या वर्षाची ही अभिनव सुरूवात भारतीय संस्कृतीला अनुसरून नामवंत, तसेच तरुण गायक व संगीतकार यांच्या सादरीकरणातून होणार आहे. एमआयटी सांस्कृतिक संध्येचा समारोप दि. ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री, त्याग व समर्पणाचे प्रतीक असलेल्या यज्ञकुंडामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, मद व मत्सर, विकार, विकृती व विकल्पासारख्या दुर्गुणांची आहुती देऊन, स्वत:चे आणि संपूर्ण समाजाचे पुढील २०१८ हे वर्ष अत्यंत सुखाने, समाधानाने व शांततेने पार पडावे यासाठी प्रार्थना करून संकल्प सोडला जाईल.
या सांस्कृतिक संध्येच्या कार्यक्रमात सहभागी होऊन नाद-ब्रह्म-स्वरूपी ‘संगीताच्या साधनेतून ईश्‍वर दर्शन व शांतरसाची अनुभूती’ घ्यावयाची असेल, त्यांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे विनम्र आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

शनवारवाड्यावर आ. जिग्नेश मेवाणींसह एल्गार परिषदेस येणाऱ्या नेत्यांना राजकीय भाषण बंदी ?(व्हिडीओ)

0

पुणे-शनवार वाड्यावर राजकीय कार्यक्रम नाही , अशी भूमिका घेत ३१ डिसेंबर रोजी होणाऱ्या एल्गार परिषदेला शनवार वाडा देता येणार नाही या दृष्टीने महापालिकेत हालचालींना प्रारंभ झाला असून माजी नगरसेवक आणि  समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांनी आज या कर्यक्रमाला दिलेली परवानगी रद्द करा अशी मागणी करणारे पत्र महापलिका आयुक्त आणि महापौर यांना दिले आहे . तर महापौर मुक्ता टिळक यांनी शनवार वाड्यावर केवळ सांकृतिक कार्यक्रम होतील, राजकीय कार्यक्रम ,भाषणे यांना परवानगी देवू नका असे आदेश प्रशासनाला दिले आहेत .
काल संभाजी ब्रिगेड आणि अन्य काही संघटनांनी पत्रकार परिषद घेवून ३१ डिसेंबर रोजी शनवार वाड्यावर एल्गार परिषदेचे आयोजन केल्याची माहिती दिली होती .हि परिषद भीमा कोरेगाव शौर्य दिन प्रेरणा अभियान म्हणून घेण्यात येणार आणि या परिषदेत नव्या पेशवाई विरोधातला सांस्कृतिक एल्गार म्हणून समर गाणी तसेच पहिल्या  सत्रात राष्ट्रीय दलित अधिकार मंचाचे ,गुजरात चे आमदार जिग्नेश मेवानी , जेएन यू  चे उमर खालीद ,भिम आर्मीचे विनय रतन सिंग आणि हैद्राबाद विद्यापीठातील आंबेडकर स्टुडंट असोसिएशन चे प्रशांत दोन्था या वक्त्यांची भाषणे होतील तर पुढील सत्रात  भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर ,माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील,तसेच साव्हारा आंदोलनाच्या उल्का महाजन ,आदिवासी महिला नेत्या सोनी सोरी आणि ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लाॅ बोर्डाचे मौलाना अब्दुल हमीद अजहरी या वक्त्यांची भाषणे होतील असे पत्रकार परिषदेतून सांगण्यात आले होते .
आज याबाबतच्या बातम्या माध्यमांमधून प्रसिद्ध झाल्यानंतर . याला समस्त हिंदू आघाडीकडून विरोध दर्शविण्यात आला असून हा कार्यक्रम राजकीय आहे. असा आक्षेप घेत शनवार वाड्यावर या साठी परवानगी दिली असल्यास ती तातडीने रद्द करा अशी मागणी महापालिकेकडे केली तर प्रसंगी याबाबत आपण पोलिसांकडे देखील  अशा कार्यक्रमास परवानगी देवू नका अशी मागणी करू असे सांगितले.
यावर महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या की,ऐका संस्थेकडून सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून महापालिकेची परवानगी घेण्यात आली आहे.येथे सांस्कृतिक कार्यक्रम करता येईल मात्र राजकीय कार्यक्रम अथवा राजकीय भाषणे करता येणार नाही   हा कार्यक्रम जर राजकीय असल्यास नियमाप्रमाणे परवानगी देणे शक्य नाही. त्यामुळे हा कार्यक्रम नियमानुसार नसल्यास त्यांची परवानगी नाकारण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत, असे महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले.

नव्या पेशवाई विरोधात शनवार वाड्यावर एल्गार परिषद (व्हिडीओ)

0

पुणे-नव्या पेशवाई विरोधात येत्या ३१ डिसेंबर रोजी असंख्य संघटनांच्या वतीने एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आज पुणे पत्रकार भवन येथे पत्रकार परिषदेतून संभाजी ब्रिगेड चे संतोष शिंदे, तसेच ज्योती जगताप ,अंजुम इनामदार आदी कार्यकर्त्यांनी दिली .
1 जानेवारी २०१८ रोजी भीमा कोरेगावच्या जाती अंत लढ्याला २०० वर्षे पूर्ण होत आहेत .या निमित्ताने १६ जिल्ह्यातील संघटनांनी भीमा कोरेगाव शोर्य दिन प्रेरणा अभियान या आघाडीची स्थापना करून संविधान वाचवा , लोकशाही वाचवा ,देश वाचवा  हि भूमिका घेत फुले शाहू आंबेडकरी विचारांच्या कार्यकते  या परिषदेत  सहभागी होत आहेत अशी माहिती यावेळी देण्यात आली .
गुजरात चे आमदार जिग्नेश मेवानी ,तसेच उमर खालीद,भिम आर्मीचे विनय रतन सिंग,,प्रशांत डोंथा ,तसेच सुधी रढवळे, भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर,माजी न्यायमूर्ती बी.जी कोळसे पाटील,सर्व्हर जनांदोलनाचे उल्काताई महाजन ,आदिवासी महिला नेत्या सोनी सोरी,ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लाॅ बोर्डाच्या राष्ट्रीय सचिव मौलाना अजहरी आदी मान्यवर शनवार वाड्यावरील या एल्गार परिषदेत सहभागी होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले .
उद्घाटन सत्राला नव्या पेशवाई विरोधातला सांस्कृतिक एल्गार असे नाव देण्यात आले असून या मध्ये भीमा कोरेगाव लढ्याची गाणी आणि नव्या पेशवाईच्या अंताची गाणी होतील . शहीद रोहित वेमुला यांच्या मातोश्री राधिका वेमुला या सत्राचे उद्घाटन करतील तर अभियानाची भूमिका डॉ. संग्राम मौर्य विषद करतील. माजी न्यायमूर्ती पी बी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली हे उद्घाटन सत्र होईल .
त्यानंतर पहिल्या सत्राला नव्या पेशवाई विरोधात उभरत्या प्रतिकाराचा एल्गार असे नाव देण्यात आले आहे याबाबतची भूमिका राहुल वाघ विषद करतील ,सूत्रसंचालन सागर गोरखे करतील . आ.जिग्नेश मेवाणी,भगतसिंग आंबेडकर स्टुडंट ऑर्ग. चे उमर खालीद ,भिम आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि युपी तील विनय रतनसिंग आणि हैद्राबाद विद्यापीठातील आंबेडकर स्टुडंट असो . चे प्रशांत दोन्था यांची भाषणे होतील .
दुसऱ्या सत्राला भीमा कोरेगाव ने दिलाय धडा ,नवी पेशवाई मसणात गाडा असे नाव देण्यात आले असून सुधीर ढवळे यामागची भूमिका विषद करतील सूत्र संचालन वीरा साथीदार करतील .भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर ,माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील,तसेच उल्का महाजन , सोनी सोरी, मौलाना अब्दुल हमीद अजहरी  यांची या सत्रात भाषणे होतील .असे या पत्रकार परिषदेतून सांगण्यात आले .

‘स्मार्ट’च्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घ्या : महापौरांच्या गाडीसमोर मनसे चा ठिय्या (व्हिडिओ)

0

पुणे – महानगरपालिकेच्या नागरवस्ती विभागामार्फत स्मार्ट संस्थेतील सेवकांना  पुन्हा पालिकेच्या सेवेत घ्यावे या  मागणीसाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आज, मंगळवारी महापौर आणि उपमहापौरांच्या गाडीसमोर ठिय्या देऊन आंदोलन केले.

गेल्या 10 ते 12 वर्षापासून स्मार्ट संस्थेच्या माध्यमातून 230 संगणक ऑपरेटर पालिकेच्या विविध विभागात कार्यरत आहेत. मात्र जानेवारी 2017 पासून त्याची मुदत संपुष्टात आली आहे. त्यामुळे त्यांना  कामावरून कमी करण्यात आले आहे.त्यांना पुन्हा सेवेत सामावून घ्यावे या मागणी साठी आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात मनसे नगरसेवक वसंत मोरे, साईनाथ बाबर आणि माजी नगरसेविका रुपाली ठोंबरे पाटील यांच्यासह 50 ते 60 स्मार्ट संस्थेच्या सेविका उपस्थित होत्या. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनानंतर महापौर मुक्ता टिळक आणि उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांनी आंदोलकांची भेट घेऊन याबाबत उद्या महापौर कार्यालयात पदाधिकारी आणि अधिकाऱ्याची संयुक्त बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.

कर्वे समाज सेवा संस्थेच्या विशेष शिबीराच्या माध्यमातून मलवंडी ठुले गावचा कृती व विकास आराखडा

0

समाजकार्य अभासक्रमाच्या विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी

 पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व कर्वे समाज सेवा संस्थेच्या प्रथम वर्ष समाजकार्याच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी मावळ तालुक्यातील मलवंडी ठुले या गावी नुकत्याच पार विशेष राष्ट्रीय सेवा योजना शिबिरादरम्यान उल्लेखनीय कामगिरी करीत पी आर ए व सर्वेक्षणाच्या आधारे गावचा कृती आराखडा व विकास आराखडा बनविण्याची किमया करून दाखविली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व कर्वे समाज सेवा संस्थेच्या संयुक्त विद्यमाने मलवंडी ठुले गावी राष्ट्रीय सेवा योजने च्या विशेष ७ दिवसीय निवासी शिबिराचे आयोजन संस्थेचे संचालक डॉ दीपक वलोकर व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम अधिकारी डॉ. महेश ठाकूर व प्रा. चेतन दिवाण यांनी केले होते.

शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी शिबीर कालावधीमध्ये मशाल फेरी, प्रभात फेरी, शिवार फेरी, मूल्य साखळी, गाव सामाजिक नकाशा, संसाधन नकाशा, महिला व विद्यार्थी बैठका, सर्वेक्षण आणि पी. आर. ए. आदी व्यावसायिक पद्धतींचा अवलंब करीत संपूर्ण गावचा सखोल अभ्यास व आढावा घेऊन शिबिराच्या सांगता समारोप समारंभावेळी आयोजित ग्रामसभेमध्ये ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यासमोर गावचा कृती आराखडा व विकास आराखडा सादर केला.

कर्वे समाज सेवा संस्थेचे संचालक दीपक वलोकर, मावळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री निलेश काळे, मावळ जि. प. शिक्षण विभाग केंद्र प्रमुख रामराव काळे, जि. प. शाळेचे मुख्याध्यापक अभिमन्यू ओतारी, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेश राऊत आदी मान्यवरांनी शिबिरास भेट देऊन शुभेच्छा दिल्या तसेच शिबीर समारोपावेळी आयोजित ग्रामसभेस गणेश धानिवले, मलवंडी ठुले विकास सेवा सोसायटीचे चेअरमन संतोष ठुले, माजी चेअरमन आप्पा आमले, संचालक दशरथ लोहर, मारुती तोंडे, नामदेव राक्षे, सरपंच लहू सुतार, ग्रा. प. सदस्य सतिका पवार, ग्रामसेवक सौ. बाबर तसेच ग्रामस्थ यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या उपक्रमांचा गौरव केला.

प्रा. महेश ठाकूर, प्रा. चेतन दिवाण, चयन पारधी, रुपेश पवार, श्याम खोंड यांनी शिबिरार्थी विद्यार्थ्यांना शिबिरामधील उपक्रमांसंबंधी व्यावसायिक मार्गदर्शन केले. 

अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ श्रीराम लागू यांच्या हस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ…

0
पुणे-माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या ९३ व्या वाढदिवसानिमित्त नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्या विकास निधीतून पटवर्धन बागेतील  श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान येथे स्प्रिंकलर बसविणे,योगासाठी ची शेड वाढवणे,नक्षत्र उद्यान अद्यावत करणे,पाण्याची लाईन टाकणे,यासह विविध विकास कामे करणे व सत्यवादी सोसायटी ते साकेत सोसायटी (डी पी रस्त्यापर्यंत ) येथे नवीन  पदपथ करणे ह्या कामांचा शुभारंभ डॉ श्रीराम लागू ,सौ दीपा लागू यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सौ वीणा हावनूरकर (मुख्याध्यापिका सिंबायोसिस शाळा) नगरसेवक
 दीपक पोटे ,माधुरीताई सहस्त्रबुद्धे ,जयंत भावे भाजप चे शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर,विविध सोसायट्यांचे पदाधिकारी
अंजलीताई रोडे,प्रमोद कुबेर,दत्तात्रेय डोइफोडे ,श्री सुनील भोसले ,सौ प्रज्ञा लोखंडे ,श्री अमित कदम,साकेत सोसायटीचे श्रीकांत पुजारी,बाळासाहेब धनवे,सुभाष ढावरे ,सुधीर फाटक,मयुर देशपांडे,ऋत्विज अघोर,सतीश मोहिते,सुनिल होलबेले,अजय काळे,दीपक इनामदार,सुजाताताई घाणेकर,संगीता आदवडे,हर्षदा फरांदे,ॲड प्राची बगाटे,अपर्णा लोणारे,सुशीला साठे,प्रमिलाताई फाले,माणिकताई दीक्षित,नारायण वायदंडे,रामदास गावडे,रवी आठवले,जयेश सरनौबत,चंद्रकांत भिसे,रमेश चव्हाण,जगदीश डिंगरे,देशमुखताई,दीपालीताई मगर,शेखताई इ मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डॉ श्रीराम लागू यांच्या हस्ते कुदळ मारुन वरील कामांचे भूमीपूजन करण्यात आले तर दीपाताई लागू आणि वीणाताई हावनूरकर यांच्या हस्ते नारळ वाढविण्यात आला.
यावेळी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी सांगितले की “पावसाळ्यात ह्या बागेत योगासने करणारे नागरिक,हास्यकल्बचे सदस्य व ज्येष्ठ नागरिकांना त्रास होत असे ते डोळयासमोर ठेवुन बागेत विविध विकास कामांचे नियोजन केले आहे.माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या वाढदिवसानिमित्त जनसंघाचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेले डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या नावाच्या उद्यानात कामांचे भूमीपूजन होत आहे याचा मनस्वी आनंद होतो आहे.त्यातून डॉ श्रीराम लागूंच्या हस्ते या कामांचा शुभारंभ होणे हा दुग्धशर्करा योग असून डॉ.लागू ह्या बागेत फिरावयास येतात त्यामुळे येथील कामे त्यांच्या उपस्थितीत होणे औचित्यपूर्ण असून या भागातील नागरिकांना पदपथाअभावी रस्त्यावरून चालताना मोठा त्रास सहन करावा लागत असे.आता हा पदपथ झाल्यावर येथील वाहतूकीस व पार्किंग ला शिस्त लागेल व अपघातांचे प्रमाण ही कमी होइल.तसेच डॉक्टर व दीपाताईंच्या सूचनेनुसार बागेसमोर ज्येष्ठ नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी पेडेस्ट्रीयन क्रॉसिंग केले आहे याचा ही त्यांनी उल्लेख केला.
यावेळी संदीप खर्डेकर यांनी डॉ लागूंचे स्वागत केले व  “या सूर्य पाहिलेल्या माणसाच्या हिमालया येवढी सावली आम्हाला लाभली असुन कायम गैर गोष्टींच्या विरोधात सामना करणारे डॉक्टर सर्वसामान्य माणसाच्या ह्रदयातील पिंजऱ्यात सिंहासनावर विराजमान झालेले नटसम्राट आहेत” असे सांगताच डॉक्टरानी त्यास दाद दिली.१९९८ साली डॉक्टर लागू यांनी अण्णा हजारेंच्या आंदोलनात सहभाग घेउन उपोषण केले होते व त्यावेळी मी ही त्यांच्या समवेत होते अशी आठवण ही खर्डेकर यांनी सांगितली.प्रकृती अस्वास्थ्य असताना ही डॉक्टर कार्यक्रमास उपस्थित राहिले याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना त्यांनी वयाचे शतक पूर्ण करावे अशी शुभेच्छा ही खर्डेकर यांनी दिल्या.
यानंतर डॉक्टर श्रीराम लागू यांनी अत्यंत प्रसन्नचित्तपणे आपण बोलणार असल्याचे सांगितले.ते म्हणाले,मला वयोमानाप्रमाणे खूप वेळ थांबता येत नाही,दम लागतो असे सांगतानाच घरातून ह्या बागेत आल्यावर किती प्रसन्न वाटते,आम्ही या भागात राहतो याचा मला अभिमान वाटतो,लोकप्रतिनिधींनी वेडीवाकडी कामे करण्यापेक्षा मंजुश्री खर्डेकर यांच्या प्रमाणे लोकोपयोगी कामे करावीत व नागरिकांच्या मागणी प्रमाणे व गरजेनुसार विकास कामे करावीत,मी त्यांच्या कार्यास शुभेच्छा देतो.आपल्या भोवती असे हिरवेगार असले की मन प्रफुल्लित होते असे ही ते म्हणाले  “आणि मी नव्वद वर्षाचा नसून एकोणनव्वद वर्षांचा असल्याचे ही त्यांनी मिस्किलपणे सांगितले.दीपाताई लागू म्हणाल्या ” आम्ही येथे नेहमीच फिरायला येत असतो आणि मंजुश्री खर्डेकर यांनी आमच्या हस्ते ह्या बागेतील व भागातील विकास कामांचे भुमीपूजन केले याचा मला आनंद वाटतो.आम्हाला या कामाचा एक भाग होता आले याबद्दल मंजुश्रीचे आभार.” यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकांनी ८९ वर्षाच्या डॉक्टर लागू ना शतक पूर्ण करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप खर्डेकर यांनी केले,मंजुश्री खर्डेकर यांनी प्रास्ताविक तर दीपक पोटे व जयंत भावे यांनी मनोगत व्यक्त केले.

व्होडाफोन इंडिया जानेवारी 2018 मध्ये सुरू करणार व्होल्ट सेवा

0

व्होडाफोन व्होल्ट सेवा मुंबई, गुजरात, दिल्ली, कर्नाटक आणि कोलकात्यात प्रथम सुरू होऊन नंतर देशभरात उपलब्ध होणार

·         एचडी दर्जाचे व्हॉइस कॉल आणि वेगवान कॉल सेट अप टाइम

·         व्होडाफोन सुपरनेट 4जी ग्राहकांना व्होल्ट (व्हॉइस ओव्हर एलटीई) सेवा मोफत मिळणार

भारतातील एक आघाडीची दूरसंचार पुरवठादार कंपनी व्होडाफोनने व्होल्ट सेवा जानेवारी 2018 पासून सुरू करण्याचे निश्चित केले आहे. व्होडाफोन व्होल्ट सेवा सध्या मुंबई, गुजरात, दिल्ली, कर्नाटक आणि कोलकाता येथे सुरू होणार असून, काही काळातच त्या संपूर्ण देशात उपलब्ध केल्या जातील.  

व्होडाफोनच्या व्होल्ट सेवांमुळे व्होडाफोन सुपरनेट 4जी ग्राहकांना एचडी दर्जाचा स्पष्ट  आवाज आणि कॉल करण्यासाठीचा कमीत कमी वेळ अशा सुविधा उपलब्ध होतील. व्होडाफोन 4जी ग्राहकांना व्होल्ट सेवांसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही. या सेवांसाठी केवळ व्होडाफोन व्होल्ट सेवा ज्यावर चालू शकतील, असा हँडसेट आणि 4जी सिम लागेल.

व्होल्ट सेवांची घोषणा करताना व्होडाफोन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील सूद म्हणाले, नवे तंत्रज्ञान आणि डिजिटल सेवांबरोबर व्होडाफोन भविष्यसज्ज होत आहे. व्हॉइस ओव्हर एलटीई अर्थात व्होल्ट सेवांमुळे ग्राहकाला एचडी दर्जाचे कॉलिंग, तसेच आणखी नव्या शक्यता उपलब्ध होतील. व्होल्ट सेवा हे भविष्यवेधी तंत्रज्ञान आणण्याच्या उद्देशातील महत्त्वाचे पाऊल असून, यामुळे आमचे डेटा बळकट जाळेही अधिक सक्षम होईल.

अद्ययावत तंत्रज्ञान वापरून व्होडाफोनने एक मोठे 140000 साइट्सचे डेटा सक्षम जाळे उभारले असून, यामुळे कॉल आणि मोबाइल इंटरनेट सेवेची गुणवत्ता अधिक वाढली आहे. ग्राहकांना सुविहितपणे कनेक्टिव्हिटी देण्यामध्ये व्होडाफोनसाठी हा एक कळीचा पैलू ठरणार आहे.

 

सरकारच्या योजना सर्वसामन्यांपर्यंत पोहचवा : पालकमंत्री गिरीश बापट

0

पुणे : सर्वसामान्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकार दर दोन महिन्यांनी विविध योजना जाहीर करते या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत असे आवाहन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले. भाजप कसबा मतदार संघाच्या वतीने येथील सरस्वती विद्यामंदिर येथे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त संजय गांधी निराधार योजनेतील तसेच श्रावण बाळ योजनेतील पात्र लाभार्थांना आदेश पत्राचे वाटप करण्यात आले यावेळी ते बोलत होते. 

 या कार्यक्रमाला तहसीलदार अर्चना यादव,शहराध्यक्ष योगेश गोगावले, नगरसेवक महेश लडकत,दीपक पोटे,संजय गांधी निराधार योजना कमिटीचे भारत निजामपुरकर, अशा शिंदे, मुक्ता माने, क्रांती खांडेर, बापू नाईक, छगन बुलाखे, वैशाली नाईक आदी उपस्थित होते.

 यावेळी बोलताना मंत्री बापट म्हणाले, जनतेने मोठ्या विश्वासाने भारतीय जनता पक्षाला केंद्रात, राज्यात त्याचप्रमाणे महानगरपालिकेतही निवडून दिले. आता लोकांना आपल्याकडून अपेक्षा आहेत. त्यांची पूर्तता करणे हे आपले कर्त्यव्य आहे. सर्व सामान्यांसाठी केंद्र आणि राज्यसरकारच्या अनेक चांगल्या योजना आहेत. पण दुर्देवाने या योजना सामान्यांना माहिती होत नाहीत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अधिक वेळ देऊन या योजना सर्व सामान्यापर्यंत पोहचवल्या पाहिजेत.प्रत्येक कार्यकर्त्याने किमान 10 लाभार्थी तयार केले तर किमान 20 हजार लाभार्त्यांना आपण पुढील वर्षीपर्यंत लाभ मिळवून देऊ शकतो.

 आज देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा वाढदिवस आहे. त्यांनी आपल्या कामाच्या जोरावर कार्यकर्त्यांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे आज त्यांच्या वाढदिवसा निमित्त पुढच्यावर्षी 20 हजार लाभार्त्यांचा मेळावा घेण्याचा संकल्प करूया. असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

कोथळ्यातील “होम मिनिस्टर” रंगल्या पैठणीच्या खेळात

0

जेजुरी ( प्रतिनिधी ) – लग्नातल्या उखाण्यांची ठसक….मनोरंजनासाठी गाणी…गप्पा…...चिमुरड्यांचे नृत्य   ओसंडून वाहणारा तरुणी आणि महिलांचा उत्साह…ग्रुप बनविण्याच्या स्पर्धेतील महिलांची चढाओढयाबरोबरच फुगे फोडणे त्यामधून अनेक महिलांनी चढलेली गुणांची शिडी आणि अखेरच्या संगीत खुर्चीच्या सामन्यात एकमेकींना दिलेली जोरदार टक्कर..,अशा विविध खेळांचा आनंद घेत कोथळे येथील आझाद चौक येथे पैठणीचा खेळ रंगला. प्रसिद्ध शिवव्याख्याते निलेश जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त खेळ पैठणीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी एकापेक्षा एक रंगलेल्या या बहारदार स्पर्धेत सहभागी होऊन यशाचे शिखर गाठत महिलांनी पैठणीचा मान मिळविला. या वेळी जेजुरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा वीणा सोनवणे, मार्तंड देव संस्थानचे प्रमुख विश्वस्त राजकुमार लोढा , संदीप जगताप , शिवराज झगडे ,पंकज निकुडे , जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हाके साहेब , भारतीय जनता पक्षाचे आर.एन.जगताप ,नगरसेवक योगेश जगताप , नगरसेवक गणेश जगताप ,हेमंत सोनवणे, दिवेकर साहेब ,प्रा.केशव काकडे, नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक धनंजय भोईटे, दिलीप जगताप , वाल्मिक जगताप, राहुल भोसले, प्रकाश महाराज जगताप , दत्ताआबा भोईटे , विश्वास जगताप आणि विविध मान्यवर उपस्थित होते. शिवव्याख्याते निलेश जगताप यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले .  अखेरपर्यंत रंगलेल्या खेळपैठणीच्या’ या कार्यक्रमात महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला. कोथळे पंचक्रोशीमधील शेकडो  महिला या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.कार्यक्रमाची सुरुवात खुमासदार उखाणे घेत झाली. एकापेक्षा एक बहारदार उखाण्यांचा जणू रंगमंचावर पाऊसच पडला. याप्रसंगी हा खेळ खेळतानादेखील महिलांचा उत्स्फूर्त उत्साह पाहायला मिळाला. स्वाती कडूच्या निवेदनाणे, रितेश साळवेच्या कवितांनी आणि अनिकेत हुंबरेच्या गाण्यांनी कार्यक्रमात रंगत आणली.

याबरोबरच फुगे फोडणे ,स्ट्रोच्या माध्यमातून बोल घेऊन जाने  हे मनोरंजनात्मक खेळदेखील या वेळी घेण्यात आले. त्यानंतर आयोजित अखेरचा संगीत खुर्चीचा सामना जोरदार रंगला. संगीत खुर्चीचा सामना पाहताना सर्वांच्या मनात धस्स झाले होते. मात्रझालेल्या सर्व स्पर्धांमध्ये मिळविलेल्या यशाप्रमाणे संगीत खुर्चीमध्येही यश मिळवत वंदना जगताप, राणी गुरव , ज्योती जगताप , सुरेखा जगताप ,शारदा जगताप यांनी मानाची पैठणी पटकावली. उल्का भोईटे ,संगीता जगताप, सविता शिळमकर ,राजश्री जगताप यांच्या हस्ते विजेत्या महिलांना पैठणी देण्यात आली . पैठणीच्या खेळात सहभागी झालेल्या सर्व महिलांना आणी तरुणींना आकर्षक भेटवस्तू देण्यात आली तसेच चिमूकल्याना सुद्धा यावेळी भेटवस्तू देण्यात आल्या. कार्यक्रमाचे आयोजन संदीप जगताप, आकाश शिळमकर , प्रतिक वखरे, तुषार काकडे , आकाश लेंडे, , ऋषिकेश काकडे ,विजय जगताप , शुभम साबळे आदींनी केले , सूत्रसंचालन दत्तात्रय भोईटे यांनी तर आभार संदीप जगताप यांनी मानले.