Home Blog Page 3214

दुसर्‍या ‘नॅशनल टीचर्स काँग्रेस’चे आयोजन

0
पुणे: माईर्स एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट (मिटसॉग), पुणे आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेतर्फे  दि. १० ते १२ जानेवारी २०१८ या कालावधीत दुसर्‍या ‘नॅशनल टीचर्स काँग्रेस’ (एनटीसी) या तीन दिवसीय परिषदेचे कोथरुड, पुणे येथील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या प्रांगणात आयोजन करण्यात आले आहे. या दुसर्‍या ‘नॅशनल टीचर्स काँग्रेस’चे उद्घाटन आध्यात्मिक गुरू श्री. दलाई लामा यांच्या हस्ते होणार आहे. ‘शिक्षकांना प्रेरित करुन सक्षम पिढी घडविणे’ हा या परिषदेच्या आयोजना मागील उद्देश आहे.
महाराष्ट्र शासन, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई), असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज (एआययु), भारतीय छात्र संसद फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य प्राचार्य  महासंघ व विश्‍वशांती केंद्र (आळंदी), पुणे, युनेस्को अध्यासन व असोसिएशन ऑफ इंडियन कॉलेज प्रिन्सिपॉल्स फेडरेशन या संस्थांच्या सहकार्यातून ही अशा प्रकारची आंतरराष्ट्रीय परिषद प्रथमच होत आहे. देशभरातून पदवी व पदव्यूत्तर पदवी अभ्यासक्रमाचे ८,००० शिक्षक यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होणार आहेत.
डॉ. विश्‍वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड यांच्या संकल्पनेतून या परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या परिषदेचे चीफ पॅट्रन आहेत. महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना.श्री. विनोद तावडे हे पॅट्रन आहेत.
या तीन दिवसांच्या परिषदेचा उद्घाटन समारंभ बुधवार, दि. १० जानेवारी २०१८ रोजी, तर समारोप शुक्रवार, दि. १२ जानेवारी २०१८ रोजी होणार आहे. तीन दिवसीय परिषदेत एकूण सात सत्रे ठेवण्यात आली असून, विषय खालीप्रमाणे आहेत:
१. भारतातील उच्च शिक्षण : आढावा आणि भावी दिशा
२. भारतातील उच्च शिक्षणाचे जागतिकीकरणः योजना आणि नियोजन
     (इंडो-युएस व्हिजन २०३०, इंडो-युरोप व्हिजन २०३० व इंडो-ऑस्ट्रेलिया व्हिजन२०३०)
३. वैश्‍विक मूल्याधिष्ठित शिक्षण- विश्‍व शांतीचा पाया
४. उच्च शिक्षणातील गुणवत्ता- सत्य आणि सामोपचार
५. उच्च शिक्षणात तंत्रज्ञानाचा उपयोग- फायदे विरूद्ध अडथळे
६. शिक्षकांचे प्रशिक्षण
७. शिक्षणाचे अर्थशास्त्र
याशिवाय विशेष अशा दोन ‘टीचर टू टीचर कनेक्ट’ सत्रांचेही आयोजन केले आहे.
या विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी शैक्षणिक, अध्यात्मिक, राजकीय, सामाजिक, कला, पत्रकारिता आदी क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रित केले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंग, डॉ. ए.बी. देशपांडे, डॉ. ए.के. सेन गुप्ता, डॉ.अनिल के गुप्ता, डॉ.अनिल माहेश्‍वरी, डॉ.अनिल सहस्त्रबुद्धे, सुप्रसिध्द शास्त्रज्ञ डॉ.सीएनआर राव, डॉ.देवी सिंग, डॉ.दिलीप रांजेकर, न्यायमूर्ती हेगडे, डॉ.एन.एम.कोंडप, डॉ. मनिष कुमार, डॉ. नरेंद्र जाधव, डॉ.नारायण मूर्ती, डॉ. पंडित विद्यासागर, डॉ.पी.बी.शर्मा, डॉ. वेद प्रकाश, डॉ. आय.के.भट,  डॉ.संजय धांडे, डॉ.स्कॉट हेरियॉट, डॉ. एस.परशुरामन, प्रा.डेरियल भट, डॉ.सुशील शर्मा, डॉ.प्रा.व्ही.जी.नारायण, डॉ. यज मेदूरी, जैन संत आचार्य लोकेश मुनी, डॉ. ध्यान सिंग रावत, डॉ. के.ई.सितारामन, प्रा.डॉ. जॉन्सन मायकेल व रायन परेरा आदि मान्यवर वक्ते प्रस्तावित आहेत.
आपल्या देशाला अनेक चांगल्या शिक्षकांची परंपरा आहे. त्यांनी आपल्या शिकविण्यातून प्रेम आणि आदर मिळविला. ध्येय, आदर्शवाद आणि निःस्वार्थी सेवा हीच त्यांची ओळख आहे. त्यातील अनेकांनी केवळ ज्ञान दिले नाही, तर मूल्ये आणि आदर्शाच्या सहाय्याने समाजाला एक दिशा दिली. अशाच राष्ट्रउभारणीच्या भावनेने भारलेल्या आणि केवळ शिक्षक म्हणून नाही, तर उत्तम संशोधक, संवेदनशील, समाजाभिमुख, प्रगतीशील, दिशादर्शक, प्रेरणादायी आणि तत्त्वनिष्ठ शिक्षकांची फळी निर्माण करण्याचे या परिषदेचे उद्दिष्ट आहे.
या राष्ट्रीय परिषदेच्या नियामक मंडळाचे फाऊंडिंग पेट्रन ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ  डॉ.अनिल काकोडकर, चेअरमनपदी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, कार्याध्यक्षपदी प्रसिद्ध संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर, अध्यक्षपदी विश्‍वशांती केंद्र (आळंदी), एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी चे अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड हे आहेत. डॉ. विश्‍वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड हे या परिषदेचे संस्थापक समन्वयक आहेत.
अशी माहिती नॅशनल टीचर्स काँग्रेसचे प्रमुख निमंत्रक व एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड, महाराष्ट्र राज्य प्राचार्य महासंघाचे उपाध्यक्ष डॉ. नंदकुमार निकम, महाराष्ट्र राज्य प्राचार्य महासंघाचे महासचिव डॉ. सुधाकरराव जाधवर व एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलसचिव प्रा.डी.पी.आपटे व एमआयटी डब्ल्यूपीयूच्या स्कूल ऑफ मॅनेजमेंटचे अधिष्ठाता प्रा.डॉ. आर.एम.चिटणीस यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पुणे परिमंडलात 55 हजार नवीन वीजमीटर उपलब्ध

0

पुणे: पुणे परिमंडलातील पुणे व पिंपरी चिंचवड शहरासह ग्रामीण भागासाठी सिंगल फेजचे नवीन 55 हजार वीजमीटर उपलब्ध झालेले असून येत्या तीन ते चार दिवसांत आवश्यकतेनुसार संबंधीत शाखा कार्यालयांपर्यंत पाठविण्यात येणार आहेत.

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पुणे परिमंडलासाठी एकूण 55 हजार सिंगलफेज नवीन मीटर उपलब्ध झालेले आहेत. त्यातील 15 हजार पुणे ग्रामीण मंडलअंतर्गत तर रास्तापेठ मंडल व गणेशखिंड मंडलअंतर्गत प्रत्येकी 20 हजार वीजमीटर देण्यात येत आहेत. येत्या तीन ते चार दिवसांत शाखा कार्यालयांना आवश्यकतेनुसार हे नवीन मीटर वितरीत करण्यात येत आहे.

हे सर्व नवीन वीजमीटर नवीन वीजजोडणी, जुने सदोष वीजमीटर बदलून देण्यासाठी वापरण्यात येणार आहे. मागील डिसेंबर महिन्यात पुणे परिमंडल अंतर्गत 11 हजार नवीन वीजमीटर वितरीत करण्यात आले होते. त्यानंतर या महिन्यांत 55 हजार वीजमीटर उपलब्ध झालेले आहेत.

बुधवारी वीजग्राहक तक्रार निवारण दिन

 पुणे परिमंडलातील सर्व विभागीय कार्यालयांत बुधवारी (दि. 3 जानेवारी) महावितरणच्या वतीने वीजग्राहक तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

वीजग्राहकांच्या प्रामुख्याने वीजबील, नवीन कनेक्शन आदींसह वीजसेवेशी संबंधीत तक्रारी त्वरीत निकाली काढण्यासाठी सर्व विभाग कार्यालयांत या तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

रास्तापेठ, पद्मावती, नगररोड, पर्वती, बंडगार्डन, कोथरूड, पिंपरी, भोसरी, शिवाजीनगर तसेच मंचर, राजगुरुनगर आणि मुळशी या विभाग कार्यालयांत सकाळी 11 ते दुपारी एक वाजेदरम्यान कार्यकारी अभियंता हे वीजग्राहकांनी दाखल केलेल्या तक्रारींवर सुनावणी घेतील आणि त्या निवारणासाठी तात्काळ कार्यवाही करणार आहेत. वीजग्राहकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.

सामाजिक संदेश देत न्यू इंग्लिश स्कूलचे स्नेहसंमेलन

0

पुणे – मुलगा व मुलगी समान आहे, पाणी जपून वापरा, स्वच्छतेचे महत्व आणि प्लॅस्टिकपासून पर्यावरणाचे रक्षण करा अशा विविध सामाजिक प्रश्‍नांवर प्रबोधन करणारी २७ सामुदायिक नृत्यांचे सादरीकरण करीत डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन साजरे करण्यात आले.
अभ्यास आणि अभ्यासेतर उपक‘मांतील गुणवंत विद्यार्थ्यांचा शाला समितीचे अध्यक्ष डॉ. सुनील भंडगे यांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला. या वर्षीचा कृतज्ञता पुरस्कार ज्येष्ठ सेवक सतीश भुजबळ यांना देण्यात आला. पं. शिवकुमार शर्मा यांचे शिष्य दिलीप काळे यांच्या संतूरवादनाने कार्यक‘मात रंगत आणली. सोसायटीचे आजीव सदस्य डॉ. शरद आचार्य यांची प्रमुख उपस्थिती होती.
मु‘याध्यापक नागेश मोने यांच्या मार्गदर्शनाखाली उपमु‘याध्यापिका मनिषा मिनोचा, पर्यवेक्षिका सुषमा गायकवाड, पालक संघाचे उपाध्यक्ष राजू नाणेकर, सहकार्यवाह संतोष उभे, संमेलनाच्या कार्याध्यक्षा स्वाती मिश्रा, उपकार्याध्यक्ष आनंद पाटील, सुवर्णा बोरकर, विद्यार्थी प्रतिनिधी सचिन मिरगुडे, मोहक बर्वे यांनी कार्यक‘माचे संयोजन केले.

फर्ग्युसनचा वर्धापनदिन साजरा

0

पुणे – डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या १३३ व्या वर्धापनदिनानिमित्त विशेष कार्यक‘माचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक‘मात सोसायटीच्या परिषद व नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांच्या हस्ते संस्थापकांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.
उपाध्यक्ष विकास काकतकर, कार्यवाह प्रा. आनंद भिडे, संचालक राम निंबाळकर, प्राचार्य डॉ. आर. जी. परदेशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
गुणवत्ता आणि कार्यक्षमता या दोन गुणांच्या आधारे अधिकाधिक चांगले काम करण्याचा संकल्प करुन तो सिध्दीला नेण्यासाठी योग्यप्रकारचे नियोजन करण्याचे आवाहन डॉ. कुंटे यांनी यावेळी केले. प्राचार्य परदेशी यांनी प्रास्ताविक केले. उपप्राचार्य प्रकाश पवार यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.
१ जानेवारी १८८० रोजी न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेपासून डेक्कन एज्युकेशन सोसायटीने शिक्षण कार्यात प्रवेश केला. हे औचित्य साधून राज्याचे माध्यमिक शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे यांच्या हस्ते पर्यावरण पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. वृक्षारोपण, पर्यावरण, अध्यपन, क‘ीडा, संगीत, इंग‘जी साहित्य, प्रशिक्षण आदी क्षेत्रात विशेष कामगिरी करणार्‍या शिक्षक व प्राध्यापकांचा विशेष सत्कार करण्यात आला.
डॉ. शरद कुंटे, पर्यावरण शिक्षण विभागाचे राष्ट्रीय संयोजक सदाचारीसिंह तोमर, सोसायटीचे कार्यवाह आनंद भिडे, संचालक किरण शाळिग‘ाम, राम निंबाळकर, आजीव सदस्य डॉ. श्रीकृष्ण कानेटकर यांची उपस्थिती होती.

फर्ग्युसनचा ‘डिपार्टमेंटल फस्ट’ उत्साहात

– डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन महाविद्यालयात ‘डिपार्टमेंटल फस्ट’ उत्साहात साजरा करण्यात आला. अभ्यासाला पूरक असणारी आणि माहिती देणारी विविध विषयांवरील प्रदर्शने, व्या‘यानमाला, परिसंवाद, चर्चा, गटचर्चा, प्रचार ङ्गेर्‍या आणि ‘स्पंदन’ या सांस्कृतिक कार्यक‘मांचा सहभाग होता.
मराठीचे मायबोली, इंग‘जीचे वॉलस्ट्रीट, इतिहासाचे ऍण्टिक्यूरम, भूगोलाचे फ्लिम्टस, मानसशास्त्राचे सायङ्गी, रसायनशास्त्राचे अल्केम, इलेक्टॉनिक्सचे इलेक्ट्रोनिका, प्राणीशास्त्राचे झून, छायाचित्राचे ङ्गोटासिंक आदी २८ विभागांनी आपआपल्या विषयांतील माहितीचे प्रदर्शन केले. विविध १५ शाळांमधील आठ हजार विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाला भेटी दिल्या.
‘स्पंदन’ या सांस्कृतिक कार्यक‘मात नृत्य, नाट्य, संगीत, वाद्य वादन, पारितोषिकप्राप्त एकांकिकांचे सादरीकरण करण्यात आले. अभिनेता भाऊसाहेब शिंदे यांच्या हस्ते या कार्यक‘माचे उद्घाटन करण्यात आले. कथ्थक, भरतनाट्यम, लावण्या, भांगडा, गरबा आदी विविध प्रांतातील नृत्य सादर करण्यात आली. १७० गटातील पंधराशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
ऋग्वेद सोमण लिखित भेट ही सावरकर व सुभाषचंद्र बोस यांच्या मुंबईतील भेटीचे वर्णन करणारी एकांकिका, लैंगिक शिक्षण देणारे जाधवर करंडक विजेते पथनाट्य, घोरपडेच्या बैलाला घो हे बक्षिसपात्र नाटक ही या कार्यक‘माची वैशिष्ट्ये होती. पारंपरिक दिनानिमित्त विविधप्रकारच्या वेशभूषा करून विद्यार्थी आले होते.

शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो महामार्गाला राज्य मंत्रीमंडळाची मंजुरी

0

पुणे: हिंजवडी ते शिवाजीनगर या तब्बल 23 कि.मीच्या मेट्रोला आज राज्याच्या मंत्रीमंडळाने मंजूरी दिली.  तब्बल 8313 कोटी रुपयांचा हा प्रकल्प अवघ्या 48 महिन्यात पूर्णत्वास जाणार आहे अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी मंगळवारी पत्रकारांना दिली. 

       ते म्हणाले हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रोमार्गावर एकूण 23 स्थानके असतील.  सार्वजनिक व खाजगी सहभागाने दिल्ली मेट्रो रेल कार्पोरेशन आणि पी.एम.आर.डी.ए. यांच्यामार्फत हा प्रकल्प राबविला जाणार आहे.  दिल्ली मेट्रो रेल कार्पोरेशनने नोव्हेंबर 2016 मध्ये या प्रकल्पाचा आराखडा तयार केला तो डिसेंबर 2016 मध्ये पी.एम.आर.डी.ए.च्या सभेत मंजूर करण्यात आला.  या प्रकल्पाचा कालावधी 48 महिन्यांचा असून तीन डब्यांच्या मेट्रोतून एका वेळी 764 प्रवासी प्रवास करु शकतील.  बापट पुढे म्हणाले सन 2021 मध्ये 2 लाख 61 हजार प्रवाशांना या सेवेचा लाभ मिळेल.  या प्रकल्पाचा एकूण खर्च 8313 कोटी रुपये असून त्यापैकी केंद्र सरकार 1137 कोटी रुपये देणार आहे. तर राज्याचा वाटा 812 कोटी रुपयांचा असणार आहे आणि उर्वरित रक्कम खाजगी भागीदारीतून उभी केली जाणार आहे.  मेट्रोचा पहिला टप्पा स्वारगेट ते पिंपरी व वनाज ते रामवाडी हा प्रगती पथावर असून पहिल्या टप्प्यातील 31 कि.मी. मार्गाला यापूर्वीच मंजूरी मिळाली आहे.  मेट्रोचा विविध प्रकल्पांसाठी नव्या वर्षात साडेसहा हजार कोटी रुपयांचा निधी अपेक्षीत आहे.  शासनासह विविध वित्तीय संस्थांकडून हा निधी मिळेल.  50 लाखाहून अधिक पुणेकरांना महामेट्रोचा लाभ मिळणार असून या प्रकल्पाची कामे वेळेपूर्वीच संपविण्याचा आमचा इरादा आहे. 

​एम ए रंगूनवाला ​दंत महाविद्यलयाच्या वतीने ​रक्तदान शिबीर

0
पुणे : ​महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ‘एम.ए.रंगूनवाला कॉलेज ऑफ डेंटल सायन्स अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर’ ​आणि ‘सार्वजनिक दंत चिकित्सा विभाग’ ​​च्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
​​रक्तदान शिबिरात ​महाविद्यलयाचे विद्यार्थी आणि नागरिक असे एकूण ३१ जणांनी

रक्तदान केले​, अशी माहिती ​​महाविद्यालयाचे रजिस्ट्रार

आर. ए. शेख ​यांनी दिली. यावेळी प्राचार्य डॉ. रमणदीप दुग्गल
उपस्थित होते. एम.सी.ई.सोसायटीचे अध्यक्ष यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. महाविद्यलयाचे रजिस्ट्रारआर. ए. शेख आणि’सार्वजनिक दंत चिकित्सा विभाग’​प्रमुख ​रेणुका नागराळे यांनी या रक्तदान शिबिराचे संयोजन केले होते.

शेवटच्या श्‍वासापर्यंत पुण्यात राहीन-डॉ. रघुनाथ माशेलकर

0

पुणे- :“मला पुण्याने मोठे केले. मी माशेलकर नसून पुणेकरच आहे. या पुण्याने माझे लाड केले आणि मला वाढविले. त्यामुळे शेवटच्या श्‍वासापर्यंत मी पुण्यातच राहीन.” अशी भावना जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केली.
एमआयटी विश्‍वशांती विद्यापीठ, भारती डिम्ड युनिव्हर्सिटी, सिम्बायोसिस विद्यापीठ, डॉ.डी.वाय.पाटील युनिव्हर्सिटी, एमआयटी आर्ट, डिझाईन अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी विद्यापीठ, विश्‍वकर्मा युनिव्हर्सिटी व इंडिया इंटरनॅशनल मल्टिव्हर्सिटी यांच्यातर्फे डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अमृतमहोत्सवा निमित्त सत्कार करण्यात आला. त्यांनी वैज्ञानिक व सामाजिक क्षेत्रात आयुष्यभर केलेल्या शिक्षण, संशोधन व राष्ट्रसेवेच्या कार्याबद्दल त्यांना तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्‍वर माऊली ज्ञान-विज्ञान-ब्रह्मऋषि पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्काराला उत्तर देतांना ते बोलत होते.
यावेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड, सिम्बायोसिस विद्यापीठाचे कुलपती पद्मविभूषण डॉ.शां.ब.मुजुमदार, भारती विद्यापीठाचे प्र-कुलपती डॉ.शिवाजीराव कदम, नालंदा विद्यापीठाचे कुलपती पद्मभूषण डॉ. विजय भटकर, सौ. वैशाली रघुनाथ माशेलकर, भारती विद्यापीठाचे सचिव डॉ.विश्‍वजीत कदम, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष प्रा.राहुल विश्‍वनाथ कराड, सिंबायोसिसच्या प्रिन्सिपॉल डायरेक्टर डॉ. विद्या येरवडेकर, डॉ. जय गोरे, डॉ. राजेंद्र शेंडे, श्री.तुळशीराम दा. कराड, पं. वसंत गाडगीळ, फिरोज बख्त अहमद, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.एस.एन.पठाण व एमआयटी आर्ट, डिझाईन अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुनिल राय उपस्थित होते.
तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्‍वर माऊलीची सुवर्ण जडीत प्रतिमा, सन्मानपत्र, सुवर्ण पदक व रोख रूपये सव्वा लाख असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
डॉ.रघुनाथ माशेलकर म्हणाले,“उर्जा केंद्रित केल्यावर काहीही घडू शकते. तसेच, भारतादेश एक झाला, तर या विश्‍वात काहीही करू शकतोे.पण त्यासाठी कठोर मेहनत व परस्पर सहकार्य असावे लागेल. भारत देशात १३० कोटी मेंदू आहेत. त्यांच्या कल्पकतेचा वापर या देशासाठी केल्यास येणार्‍या काळात भारत वेगाने प्रगती पथावर जाईल. जय जवान-जय किसान या प्रचलित घोषणेनंतर माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी जय विज्ञान ही घोषणा दिली. त्यानंतर देशात वैज्ञानिक क्रांती आली.”
‘त्यांनी घोषणा केली, की माझ्या आईच्या नावने, म्हणजेच अंजली माशेलकर फाउंडेशनची आम्ही स्थापना करीत आहोत. या माध्यमातून चांगले कार्य करणार्‍या परंतू जगासमोर न आलेल्या तरूण शास्त्रज्ञांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. त्या माध्यमातून एक नव्हे, तर हजारो माशेलकर तयार होतील.’
विद्यार्थ्यांनी आकांक्षा मोठी ठेवावी. कुठल्या कार्याची फलश्रृती तत्काळ मिळत नाही, अहोरात्र मेहनत आणि खचून न जाता कार्य करत राहिल्याने यश तुमच्याकडे धावत येईल.फेल या शब्दाचा विस्तार करताना ते म्हणाले फस्ट अटेम्प्ट इन लर्निंग. त्यामुळे आयुष्य जगताना खचून जाऊ नये. विद्यार्थ्यांनी सदैव आपल्या मेंदूचा नव्हे, तर हदयाचा आवाज ऐकून कार्य करावे.
प्रा. डॉ.विश्‍वनाथ दा. कराड म्हणाले,“ २१वे शतक हे भारताचे असेल, असे भाकीत करणारे स्वामी विवेकांनद यांचे स्वप्न डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या सारखे आध्यात्मिक वैज्ञानिक पूर्ण करतील. ज्ञान-विज्ञान व अध्यात्माच्या आधारे भारत भूमी संपूर्ण विश्‍वाला शांतीचा मार्ग दाखवील. भारतीय परंपरा ही त्याग व समर्पणाची आहे. डॉ. माशेलकरांच्या माध्यमातून भारताला मानवतावादी वैज्ञानिक मिळाला आहे. जगभरात ते भारताची नवी प्रतिमा उजळून टाकतील.”
डॉ.शां.ब. मुजुमदार म्हणाले,“ सकारात्मक विचार, कठोर परिश्रम आणि कर्तृत्वाच्या जोरावर डॉ. माशेलकर यांनी जगात विज्ञानच्या क्षेत्रात भारताचे नाव वरच्या स्थानावर नेवून ठेवले आहे. जे विद्यार्थी निराश असतात, त्यांच्या जीवनाला दिशा देणारे प्रभावी औषध म्हणजे डॉ. माशेलकर यांचे जीवन आहे. खरे म्हणजे ते पुण्याचे ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर आहेत.”
डॉ.विजय भटकर म्हणाले,“ सरस्वती नगरीमध्ये ऋषितुल्य वैज्ञानिकाचा सत्कार होणे, ही देशासाठी ऐतिहासिक घटना आहे. प्राचीन संस्कृतीत गुरूंना आदराचे स्थान दिले आहे. आज नव वर्षाच्या पहाटे याच गुरूचा सत्कार होणे ही भारतीय विज्ञान-तंत्रज्ञानासाठी महत्वपूर्ण घटना आहे.”
डॉ.शिवाजीराव कदम म्हणाले,“येथे विज्ञान महर्षीचा सत्कार होत आहे ही अलौकिक घटना आहे. हळदीच्या पेटंट संदर्भात डॉ. माशेलकर यांनी जागतिक पातळीवर लढा दिला. ज्ञानातून तरूण पिढी कशी घडविता येईल, या साठी त्यांनी सदैव प्रयत्न केला. विद्यार्थ्यांच्या जडण-घडणीमध्ये त्यांचा महत्वपूर्ण सहभाग आहे.”
प्रा. राहुल वि.कराड म्हणाले, “आज अनेक शिक्षण संस्था एकत्र आल्या ते सर्वश्री डॉ. माशेलकर यांच्यावरील प्रेमामुळे होय. देशामध्ये अनेक शहरात शिक्षण संस्था एकत्र येत नाही पण पुण्यात जे घडले त्यामुळे येथील शैक्षणिक प्रगतीला मोठा हातभार लागेल.”
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या संदेशाच्या माध्यमातून डॉ. माशेलकर यांना शुभेच्छा दिल्या. डॉ. विद्या येरवडेकर, विश्‍वजीत कदम, फिरोज बख्त अहमद व पं.वसंत गाडगीळ यांनी आपल्या भाषणाातून डॉ. माशेलकर यांनी जीवनभर विज्ञान क्षेत्रात केलेल्या अतुलनिय कार्याचा गौरव केला. तसेच, प्रा.मिलिंद पांडे यांनी मानपत्राचे वाचन केले.
प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. विश्‍वजीत कदम यांनी आभार मानले.

तीन हजार विद्यार्थिनी देणार मानवंदना

0

पुणे – मुलींसाठी पुण्यात पहिली शाळा सुरू करून महिला शिक्षणाची मुहूर्तमेढ करणार्‍या सावित्रीबाई ङ्गुलेंच्या जयंतीनिमित्त डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाळांतील तीन हजारहून अधिक विद्यार्थिनी सावित्रीबाईंना मानवंदना देणार आहेत.
बुधवारी, ३ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता न्यू इंग्लिश स्कूल रमणबागच्या मैदानावर या कार्यक‘माचे आयोजन करण्यात आले असून, शिक्षण सह संचालिका डॉ. सुवर्णा खरात प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या परिषद व नियामक मंडळाचे डॉ. शरद कुंटे कार्यक‘माचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.
अहिल्यादेवी प्रशाला, मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालय, डीईएस इंग्लिश मीडियम स्कूल, नवीन मराठी शाळा, न्यू इंग्लिश मीडियम स्कूल या शाळांतील विद्यार्थिनी, शिक्षिका आणि माता पालक या कार्यक‘मासाठी उपस्थित राहणार आहेत.
जिजाऊ, सावित्रीबाई, अहिल्यादेवी, झाशीची राणी, रमाबाई, भगिनी निवेदिता, सरोजिनी नायडू, डॉ. आनंदी जोशी, मेरी क्युरी, इंदिरा गांधी, प्रतिभा पाटील यांच्या वेशभूषा करून विद्यार्थिनी स्त्री शक्तीचा सन्मान करणार आहेत. मैदानावर संचलन करून बॅण्ड पथकाद्वारे मानवंदना देण्यात येणार आहे. सोसायटीचे संचालक किरण शाळिग‘ाम यांच्या संकल्पनेतून हा उपक‘म आयोजित करण्यात आला आहे.

फर्ग्युसनमध्ये रंगणार ‘मुक्तछंद’

0

पुणे- डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन महाविद्यालयात ३ ते ५ जानेवारी या कालावधीत ‘मुक्तछंद’ या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हे या महोत्सवाचे विसावे वर्ष आहे.
प्रसिध्द अभिनेता राजन भिसे नाटकाच्या ध्वनिप्रकाश योजनेपासून अभिनयापर्यंत सर्वच बाबतीत अष्टपैलू कामगिरी करणार्‍या राजन भिसेे ‘नाट्यावकाश’ हा कार्यक्रम ३ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता सादर करणार आहेत. आंतरराष्ट्रीय स्काय डायव्हर शीतल महाजन हिचे सादरीकरण व मुलाखत ‘ड्रीम टू फॉल’ त्याच दिवशी संध्याकाळी सहा वाजता होणार आहे.
मंदिरांचे अभ्यासक उदयन इंदूरकर यांचे ‘एक होतं देऊळ’ या कार्यक्रमातून वैज्ञानिकदृष्ट्या मंदिरांचे महत्व ४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता उलगडणार आहे. संध्याकाळी सहा वाजता अभिनेता अभय महाजन व सिध्दार्थ मेनन यांच्याशी ‘ऑफस्क्रीन गप्पा होणार आहेत.
‘प्रकाशाची अक्षरे’ हा प्रविण दवणे यांची मुलाखत व कवितांच्या अभिवाचनाचा कार्यक्रम ५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता होणार असून, संध्याकाळी साडेसहा वाजता सपना दातार व त्यांच्या बारा सहकार्‍यांचा ‘स्वरस्वप्न’ हा व्हायोलियन वादनाचा कार्यक्रम होणार आहे. सर्व कार्यक‘म ङ्गर्ग्युसन महाविद्यालयाच्या ऍम्फीथिएटरमध्ये होणार असून, सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रवेश विनामूल्य व खुला राहणार आहे.

सूर्यदत्ता स्कूल ऑफ इंटेरियर डिझाईन’तर्फे इंटेरियर डिझाईन प्रदर्शन

0

आपल्या विद्यार्थांच्या कल्पक कामाला प्रेरणा आणि प्रशंसा देण्यासाठी सूर्यदत्ता एज्युकेशन फाऊंडेशनच्या पुणे इन्स्टिट्यूट ऑफ प्लाईड टेक्नॉलॉजीतर्फे (पीआयएटी) ऑरा – २०१७ या नाविन्यपूर्ण प्रदर्शनाचे नुकतेच आयोजन करण्यात आले. २८ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०१७ या कालावधीत हे प्रदर्शन पीआयएटीच्या परिसरात झाले.  प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध चित्रकार मुरली लाहोटी यांच्या हस्ते व महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या पुणे विभागाचे सहाय्यक उपसचिव विजय कोल्हे, प्रसिद्ध अंतर्सजावट छायाचित्रकार आनंद दिवाडकर, सूर्यदत्ता ग्रुपचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया आणि सौ. सुषमा चोरडिया यांच्या उपस्थितीत झाले.

 संस्थेच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासाचा भाग म्हणून केलेले रचना (डिझाईन) काम, तसेच अंतर्गत सजावटीसाठी आवश्यक असलेली विविध उत्पादने या प्रदर्शनात मांडण्यात आली होती. सदनिका, बंगले, कार्यालये, बँका, रेस्टॉरंट्स, माहिती तंत्रज्ञान क्षेत्र आदींच्या अंतर्रचनेत उपयुक्त ठरणारे फर्निचर, उत्पादने, आराखडे व संदर्भही आंतरराष्ट्रीय निकषांनुसार प्रदर्शित करण्यात आले.  ऑरा प्रदर्शनाने पंधराव्या वर्षात यशस्वी पदार्पण केले आहे. आतापर्यंत झालेल्या प्रदर्शनांत जगातील सात आश्चर्ये, एकत्र कुटूंब पद्धती, अजंठा लेणी, रेल्वे स्थानके, गॅरेज, खेड्याकडे चला, आपले पुणे – पुनवडी ते पुण्यनगरी एक प्रवास, अंतराळ विश्व, राजवाडे अशा संकल्पना, तसेच वर्तुळाकार गती, ताल – डिझाईन फ्लो असे विषय हाताळण्यात आले आहेत.

 यंदा या प्रदर्शनात टाकाऊपासून टिकाऊ व पुनर्वापर, तसेच समुद्रातील अंतर्विश्व अशी नाविन्यपूर्ण संकल्पना निवडण्यात आली होती. त्यातून स्वच्छ भारत, सुंदर भारत, प्रदूषणमुक्त भारत हा संदेश, तसेच ते ध्येय गाठण्यासाठीचे प्रयत्न प्रतिबिंबित झाले.

 अपयश ही यशाची पहिली पायरी असून यशासाठी अपयशाचा अनुभव घेणेही अत्यंत महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन मुरली लाहोटी यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात केले. विजय कोल्हे यांनी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे अभ्यासक्रम व त्यांचे महत्त्व स्पष्ट केले. कचरा व प्रदूषण या जगभरात भेडसावणाऱ्या समस्या असल्याच्या मुद्द्यावर भर देऊन ते म्हणाले, की मानव जातीच्या वाढत्या गरजांकडे लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण त्याच्याअभावी कचरा व्यवस्थापनाची प्रमुख समस्या उभी राहिली आहे. अंतर्रचनेचे महत्त्व व त्याची योग्य अंमलबजावणी यावर आनंद दिवाडकर यांनी आपले विचार व्यक्त केले.

सूर्यदत्ता एज्युकेशन फाऊंडेशनच्या पीआयएटी संस्थेतून उत्तीर्ण झालेले अनेक विद्यार्थी आज आपल्या व्यवसायात अत्यंत यशस्वी ठरुन कार्यरत आहेत.

पुण्यातील शनवारवाड्यावरून आ.जिग्नेश मेवाणींचे पीएम मोदींना थेट आव्हान (व्हिडीओ )

0

पुणे : “मोदीजी, पुण्यात येऊन गटारात उतरा अन अध्यात्मिकतेचा आनंद घ्या’, अशा शब्दांत गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट आव्हान दिले .

भिमा कोरेगाव शौर्य दिन प्रेरणा अभियानांतर्गत आज पुण्यात शनिवार वाड्यावर झालेल्या ‘एल्गार परिषदे’त मेवानी बोलत होते. यावेळी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील, राधिका वेमुला (रोहीत वेमुलाची आई), जेएनयूचा विद्यार्थी उमर खालिद, उल्काताई महाजन, सोनी सोरी, अब्दुल हमिद अजहर आयोजक संतोष शिंदे आणि सहकारी आदी उपस्थितहोते.

मेवाणी म्हणाले की, मोदी हे मुख्यमंत्री असताना त्यांनी “कर्मयोगी’ नावाचे पुस्तक लिहले. जे लोक स्वच्छता करतात, त्यांना अध्यात्मिक आनंद मिळतो, असे त्यांनी पुस्तकात लिहले. खरे हीच तर “न्यू पेशवाई’ आहे. भीमा कोरेगावच्या शहीदांना अभिवादन करत असताना मला मोदींना एक आवाहन करायचे आहे. त्यांनी पुण्यात यावे, गटारात उतरावे आणि घ्यावा अध्यात्मिक आनंद. त्यानंतर देशाला नवी पेशवाई कळेल, असे मेवाणी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना प्रत्येक निवडणुकीपूर्वी अखेरच्या वर्षात राम मंदिर आणि हजच्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरे गेले. यंदा देखील तीच परंपरा त्यांनी कायम राखली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डोक्यासाठीच सध्या स्वच्छता अभियान राबवण्याची गरज आहे, अशा शब्दांत गुजरातमधील तरुण आमदार जिग्नेश मेवानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कडाडून टीका केली.

मेवानी म्हणाले, यंदाच्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजप ने १५० जागा येतील असा अंदाज बांधला होता. मात्र, तो त्यांचा केवळ अंदाजच राहिला असून त्यांना प्रत्यक्षात ९९ जागा मिळाल्या. हे तेथील जनतेने त्यांच्या विरोधात केलेल्या मतदानामुळे शक्य झाले. आता २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपला घरी पाठवण्यासाठी सर्वांनी एकत्र आल्यास तेव्हा देखील त्यांना दोन अंकीच जागा मिळतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. यासाठी सर्व विरोधकांनी एकाच व्यासपीठावर येण्याची आवश्यकता आहे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

(पहा आ. मेवानी यांचे पूर्ण भाषण जसेच्या तसे ….)

पुणे शहर काँग्रेस सेवा दल तर्फे ” ९४ वा दलदिन ” मोठ्या उत्सवात संपन्न.

0

पुणे-काँग्रेस सेवा दल तर्फे ” ९४ वा दलदिन ” सेवादल तर्फे अनेक खेळ स्पर्धा काँग्रेस भवन येथे आयोजित करण्यात आले.  रमेश बागवे ( अध्यक्ष पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी ) यांच्या हस्ते स्व. डॉ. ना. सु. हार्डीकर ( काँग्रेस सेवादल संस्थापक ) यांना पुष्पहार अर्पण करून तर  अभय छाजेड ( चिटणीस महाराष्ट्र प्रदेश ) यांच्या हस्ते ज्योत प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात अली.
या प्रसंगी सेवा दल मोठ्या संख्याने उपस्थित होते. २०० मुले, मुलींनी विविध स्पर्धेत भाग घेतला.रविंद्र म्हसकर ( मुख्य संघटक ), अर्जुन लोणंदकर, राजू गायकवाड, शोभा रजपूत, रंजना रजपूत, शीला रजपूत, व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

भारतीय संगीतातून शांत रसाची अनुभूती- पं.उल्हास कशाळकर

0
पुणे :“भारतीय संगीतात शांत रस आहे जे इतर संगीतात मिळत नाही. म्हणून याला अध्यात्मिक स्थान दिले आहे.आपल्या येथे संगीताला अध्यात्माशी जोडल्यामुळे त्यातून आत्मशांतीचा अनुभव होतो. जो शरीर व मनला प्रसन्न करतो.”अशी प्रतिक्रिया पं.उल्हास कशाळकर यांनी व्यक्त केली.
विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेतर्फे राजबाग, लोणी-काळभोर येथील विश्‍वराज बंधारा येथे आयोजित केलेल्या दोन दिवसीय ‘एमआयटी सांस्कृतिक संध्या’ संगीत महोत्सवाचे उद्घाटन सुप्रसिद्ध गायक पं.हदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मध्यप्रदेश सरकारच्या तानसेन सन्मानाचे मानकरी पंडित उल्हास कशाळकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देतांना ते बोलत होते.
यावेळी विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष                        प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड, ध्रुपद गायक पं. उदय भवळकर, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.एस.एन.पठाण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुभाष आवळे, एमआयटी आर्ट, डिझाईन अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुनिल राय, विश्‍वशांती संगीत कला अकादमीचे महासचिव श्री.आदिनाथ मंगेशकर व श्री. सुरेंद्र मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.
पं. उल्हास कशाळकर म्हणाले,“ संगीत साधनेसाठी गुरूकुल पद्धतीच योग्य आहे. यामध्ये योग्य प्रकारचे संगीताचे शिक्षण देता येते. त्यातूनच चांगले कलाकार निर्माण करता येतात. भारतीय शास्त्रीय संगीत हे आपल्या देशाचे वैभव आहे. आजच्या तरूण पिढीवर पाश्‍चात्य संस्कृतीचा पगडा आहे. त्यामुळे भारतीय संगीताकडे तरूणांचा येण्याचे प्रमाण कमी आहे. परंतू, विश्‍वशांती संगीत अकादमीच्या माध्यमातून जास्तीत जास्त गायक व संगीतकार निर्माण होऊ शकतील. गुरू शिष्य परंपरा ही सर्वात मोठी आहे. एका गुरूचे संस्कार घेवून मोठे होता येत नाही त्यात सगळ्याचा सहभाग असावा लागतो.”
पं.हदयानाथ मंगेशकर म्हणाले,“थोर गायकांचा सत्कार करून मी स्वतःचा सत्कार केला आहे असे मानतो. दहा वर्षापूर्वी संगीत कला अकादमी कशी असवी सात सुरांचे सात बंगले असावे. गार्डन असावे असे मी स्वप्न पाहिले होते. त्या संबंधी मी श्रीकृष्ण कर्वे गुरूजी यांच्याकडे बोललो होतो. त्याप्रमाणे ते जगातील एकमेव असे संगीत क्षेत्रातील अद्धितीय अकादमी डॉ. कराड यांनी प्रत्यक्षात साकार केले.”
प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड म्हणाले,“संगीताच्या साधनेतून शांतरसाची अनुभूती मिळते. पाश्‍चिमात्य संस्कृतीच्या अतिक्रमणामुळे भारतीय संस्कृतीचा आजच्या पिढीला विसर पडत चालल्याचे दिसत आहे. तो परिचय त्यांना व्हावा, यासाठी हा उपक्रम आहे. भारतरत्न लता दिदींच्या आशिर्वादाने आज येथे संगीत कला अकादमी उभी राहिली आहे. संगीताच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे जगाला दर्शन घडणार आहे. संगीताच्या माध्यमातून जगात सुख, शांती व समाधान नांदेल व आपली भारत माता विश्‍वगुरू म्हणून उदयास येईल.”
आदिनाथ मंगेशकर म्हणाले,“सध्या जगात मनोरंजन क्षेत्रात तेजीने वाढ होत आहे. त्याला अनुसरून या कॅम्पस मध्ये संगीताचे शिक्षण दिले जात आहे ते कौतुकास्पद आहे. डॉ.विश्‍वनाथ कराड यांनी सुरू केलेली ही भारतीय संस्कृतीचे संगीत शिक्षण अतुलनिय आहे. दहा वर्षापासून उत्तम कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. येथे भारतीय संस्कृती व परंपरा दिसून येत आहे.”
डॉ.एस.एन.पठाण व सुरेंद्र मोहिते यांनी आपले मनोगत व्यक्त केेले. सोनाली श्रीखंडे यांनी सूत्रसंचालन केली. डॉ.सुनील राय यांनी आभार मानले.
एमआयटी सांस्कृतिक संध्येची सुरुवात शहनाई वादक तुकाराम दैठणकर यांच्या सुमधूर शहनाई वादनाने झाली.

‘टेरेस हॉटेलवर कारवाई करा’-उपमहापौर

0
पुणे-‘कोंढवा, कोथरूड, औंध, पाषाण, बावधन, खराडी याबरोबरच शहरातील मोठ्या हॉटेल व्यावसा‌यिकांनी टेरेसवर लाकडी शेड आणि कापड टाकून बेकायदा पद्धतीने हॉटेल व्यवसाय सुरू केले आहेत. बेकायदापणे सुरू केलेल्या व्यावसायिकांवर तातडीने कारवाई करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत,’ अशी सूचना उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी केली आहे.
मुंबई येथे हॉटेलला आग लागून झालेल्या दुर्घटनेत अनेक नागरिकांना आपला जीव गमावावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहून कारवाई करावी, अशी सूचना धेंडे यांनी पालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे केली आहे. पालिकेच्या बांधकाम नियमावलीमध्ये इमारतीच्या टेरेसवर कोणत्याही प्रकारचे हॉटेल व्यवसाय करण्याची परवानगी दिली जात नाही. त्यामुळे पालिकेने कोणालाही टेरेसवर हॉटेल सुरू करण्याची परवानगी दिलेली नाही. शहरातील अनेक भागात मोठ्या संख्येने टेरेसवर हॉटेल असल्याचे समोर आले आहे. यावर पालिका कारवाई करत नसल्याने बेकायदा पद्धतीने व्यवसाय करणाऱ्यांना कोणताही चाप बसत नाही. बेकायदा पद्धतीने सुरू असलेल्या हॉटेल्सला कोणाच्याही ना हरकत प्रमाणपत्राची गरज पडत नाही. सर्व नियम धाब्यावर बसवून हे व्यवसाय सुरू असून पालिकेतील अधिकारी देखील जबाबदार असल्याचा आरोप धेंडे यांनी केला.
टेरेसवर हॉटेल उभारताना लाकडी शेड आणि कापडाचा वापर केला जात असल्याने मुंबईसारखी दुर्घटना घडल्यास त्याची मोठी किंमत पालिका आणि नागरिकांना चुकवावी लागणार आहे. यापूर्वी‍ही टेरेसवर बेकायदा पद्धतीने उभारण्यात आलेल्या हॉटेल्सवर कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे करुनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे धेंडे यांनी सांगितले. या बेकायदा हॉटेल्सवर कारवाई करून संबधित मालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी केली.

एनओसी मिळकतींचे तातडीने फायर ऑडिट

शहरातील मोठी हॉटेल्स, क्लब, रेस्तरॉं तसेच पालिकेच्या अग्निशमन विभागाने ज्या मिळकतींना ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (एनओसी) दिलेल्या आहेत, अशा मिळकतींचे तातडीने ‘फायर सेफ्टी ऑडिट’ करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. शहरातील ज्या मिळकतींनी बेकायदा बांधकाम करून वापर सुरू केला आहे, अशा मिळकतींवर कारवाई करून त्यांचेही ऑडिट करावे, असे आदेश पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी दिले आहेत.
मुंबई येथील कमला मिल्स परिसरातील रेस्तरॉंला लागलेल्या आगीत अनेक निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला. या घटनेची पुनरावृत्ती घडू नये यासाठी महापालिका प्रशासनाने विशेष खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. पालिकेने ज्या वापरासाठी परवानगी दिली आहे, त्याऐवजी अन्य गोष्टींसाठीच जागांचा वापर होत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शहरातील हॉटेल्स, रेस्तरॉं यांना दिलेल्या एनओसीची तपासणी करून फायर सेफ्टी ऑडिट करावे. यासाठी अग्निशमन दलाच्या प्रमुखांनी आवश्यकतेनुसार विशेष पथकांची नेमणूक करून कार्यवाही सुरू करावी. बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंत्यांनी त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या निवासी आणि व्यावसायिक मिळकतींची पाहणी करुन मान्य नकाशाप्रमाणेच बांधकाम झाले आहे की नाही, याची पाहणी करावी.
पालिकेची परवानगी न घेता व्यावसायिक कारणांसाठी मिळकतींचा वापर होत असल्याचे लक्षात आल्यास त्यावर कडक कारवाई करावी, अशा सूचना आयुक्तांनी शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांना केल्या आहेत. पालिकेतील आरोग्य विभागातील सहायक आरोग्यप्रमुखांनी ज्या उद्देशाने नागरिकांनी पालिकेकडून परवानगी घेतली आहे. त्या व्यतिरिक्त त्या इमारतीमध्ये हॉटेल्स, नर्सिंग होम, हॉस्पिटल सुरू असल्यास तातडीने कारवाई करून वापर तातडीने थांबवावा. पालिकेतील तिन्ही विभागाच्या प्रमुखांनी केलेल्या कारवाईचा अहवाल १५ जानेवारीपर्यंत पालिका आयुक्तांसमोर सादर करावा, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

ताबूत स्ट्रीट यंग स्टार्स ग्रुपच्यावतीने अनाथ मुलांसाठी स्नेहभोजन

0

पुणे- कॅम्प मधील ताबूत स्ट्रीटवरील हुसेनी बेकरीजवळील ताबूत स्ट्रीट यंग स्टार्स ग्रुपच्यावतीने अनाथ मुलांसाठी स्नेहभोजन व भेटवस्तू वाटप करण्यात आले . या कार्यक्रमाचे आयोजन ताबूत स्ट्रीट यंग स्टार्स ग्रुपचे अध्यक्ष जेम्स आर्लेन यांनी केले होते . या कार्यक्रमामध्ये वाघोली मधील मरीया शरन सामाजिक संस्थेमधील अनाथ मुलांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला , त्यानंतर मुलांनी संगीत खुर्ची , नृत्य , फुगे फोडण्याच्या स्पर्धा संपन्न झाल्या . त्यानंतर मुलांना  भेटवस्तू देण्यात आल्या .

या कर्यक्रमाचे संयोजन ताबूत स्ट्रीट यंग स्टार्स ग्रुपचे अध्यक्ष जेम्स आर्लेन  , जॅक्सन पिंटो , शकीला शेख ,एडविन अर्नाल्ड ,दास आर्लेन , गॉडफ्रे  आर्लेन , अहमद शेख , फैय्याज शेख , हैदर रायटर , हुसेन रायटर, मॅथ्यू आर्लेन ,शाहनवाज शेख ,   आदींनी केले होते . यावेळी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या नगरसेविका प्रियांका श्रीगिरी , माजी नगरसेवक उद्यकांत आंदेकर , मरीया शरन सामाजिक संस्थेच्या सिस्टर रिटा डिसोझा , सिस्टर फुलमनी अका , सिस्टर मारिया , सिस्टर सेलस सिस्टर अलका आदी उपस्थित होते .